Post views: counter

आफ्रिका खंड Africa



राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.


आफ्रिका खंड 


  1. जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
  2. प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे.
  3. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
  4. या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
  5. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.
  6. या खचदरीत टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झालेली आहे.
  7. खचदरीच्या भागात पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत.
  8. किलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
  9. आफ्रिका खंडाला खूप लांब सागरकिनारा लाभला आहे. तरीही तो दंतुर नाही, त्यामुळे येथे नसíगक बंदरे कमी आहेत.
  10. हवामान - या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कॅनरी व बेंग्युला या शीतप्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते.
  11. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते. नाईल नदीस दोन उपनद्या आहेत- नील नाईल, श्वोत नाईल नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदानमधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे.
  12. आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे.
  13. दक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते. झांबेझी नदीवर करीबा हे धरण बांधलेले आहे झांबेझी नदीच्या दक्षिणेला िलपोपो नदी आहे.
  14. आफ्रिकेतील वाळवंटे - सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट, कलहारा वाळवंट

आफ्रिकेतील महत्त्वाचे देश :
  1. मोरोक्को (राजधानी रबात) : मोरोक्कोतील मर्राकेश हे ऐतिहासिक शहर असून यास लाल शहर असेदेखील म्हणतात, कारण घरबांधणीसाठी लाल दगड व तांबडय़ा मातीचा वापर करण्यात आला आहे.
  2. इजिप्त (राजधनी कैरो) : कैरो या शहराजवळील गीझा येथील पिरॉमिड जगप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात दाट लोकसंख्या असलेला हा देश आहे. यालाच मित्र असेदेखील म्हणतात. हा देश उष्णकटिबंधातील हवामानाच्या प्रदेशात येतो. येथे उन्हाळा तीव्र तर हिवाळ सौम्य असतो. उन्हाळ्याच्या काळात नाईल नदीच्या प्रदेशात खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. ते वारे मोठय़ा प्रमाणात धूळ व वाळू वाहून आणतात. अलेक्झांड्रिया : हे इजिप्तमधील महत्त्वाचे शहर असून ते नसíगक बंदर आहे. पोर्ट सद : हे एक उत्तम बंदर आहे. तसेच व्यापारी दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते.
  3. दक्षिण आफ्रिका : हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागास असून सोने, हिरे या खनिजांसाठी तसेच प्राणी संपत्तीसाठी हा प्रसिद्ध आहे. हा देश समशीतोष्ण कटिबंधात आल्याने येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. बेंग्युला हा शीतप्रवाह यांच्या पश्चिम किनाऱ्यावरून जातो. पर्वतीय प्रदेशात रूंदपर्णीय पानझडी वने असून येथील व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांची संख्या विपुल आहे. येथील किंबल्रे हे शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिऱ्यांच्या खाणीसाठी खोदलेली विहीर ही भूतलावरील माणसाने खोदलेली सर्वात खोल विहीर समजली जाते. दक्षिण आफ्रिकेत निग्रो वंशाच्या लोकांमध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदी प्रमुख जाती अहेत. किनाऱ्याजवळील लोकसंख्या दाट असून पठारी भागात व वाळवंटी भागात लोकसंख्या कमी आहे. या देशातील प्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबान ही प्रमुख शहरे आहेत.
महत्त्वाचे मुद्दे -
  1. कलहारी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेझी नदी यांच्या दरम्यान आहे.
  2. कलहारी वाळवंटातून भूमध्यसागराकडे वाहणाऱ्या उष्ण स्थानिक वाऱ्यांना सिरॅको असे म्हणतात.
  3. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीिमजीरो आहे.
  4. सुएझ कालवा हा १७२ किमी. असून भूमध्यसागराला गल्फ ऑफ सुएझ व तांबडा समुद्र या माग्रे जोडतो.
  5. कांगो नदीच्या खोऱ्यात पिग्मी ही जनजाती राहते.
  6. झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांची नसíगक सीमा झांबेझी ही नदी बनवते.
  7. झांबेझी या नदीवर प्रसिद्ध कोबोरा बासा (Cobora Bassa) हे धरण आहे.
  8. व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर असून ते युगांडा, केनिया आणि टांझानिया या दरम्यान पसरलेले आहे. श्व्ोत नाईल नदी येथून उगम पावते. हे सरोवर खचदरीत येत नाही. या सरोवरातून विषुववृत्त जाते.
  9. व्हिक्टोरिया सरोवर हे जगातील क्रमांक तीनचे सरोवर आहे. १) कॅस्पियन समुद्र २) लेकसुपेरीयर (उत्तर अमेरिका) ३) व्हिक्टोरिया सरोवर
  10.  जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य सागर ते अटलांटिक समुद्र यांना जोडते, तर युरोप व आफ्रिका यांना वेगळी करते.
  11. तांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळा करतो.
  12. तांबडा समुद्राला लागून असलेले आफ्रिकेचे देश इजिप्त, सुदान, इरीट्रीया (Eritrea) जीबौती (Djibouti)
  13.  सोमालिया (Somalia), जीबौती (Djibouti), इर्रिटीया (Eritrea) आणि इथोपिया (Ethopia) यांना आफ्रिकेचे िशग म्हणतात.
  14. सहारा वाळवंटातील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. तर लिबियामधल्या दगडी खडकाळ वाळवंटास सेरीर म्हणतात.
  15. आफ्रिका खंडातील लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा उतरता क्रम - १) नायजेरिया २) इजिप्त ३) इथोपिया ४) झेर
  16. सोने हिऱ्यांची भूमी म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते.
  17. सिरॅका वाऱ्यांना लिबियात गिब्ली या नावाने ओळखले जाते.
  18. टांगानिका हे सरोवर टांझानिया, झैर आणि झांबिया देशांदरम्यान आह.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा