भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार
१) रामसर करार -
- वर्ष - १९७१
- दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
- अमलात येण्याचे वर्ष - १९७५
- भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
- वर्ष - १९७३
- संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
- अमलात येण्याचे वर्ष - १९७६
- भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
- वर्ष -१९७९
- स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
- अमलात येण्याचे वर्ष - १९८३
- भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
- वर्ष - १९८५
- ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
- भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
- वर्ष - १९८९
- हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
- अमलात येण्याचे वर्ष - १९९२
- भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
- वर्ष - १९९२
- हवामान बदल रोखणे
- अमलात येण्याचे वर्ष - १९९४
- भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
- हरितवायू उत्सर्जनात घट
- अमलात येण्याचे वर्ष - २००५
- भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
- जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
- अमलात येण्याचे वर्ष - १९९३
- भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
- वर्ष - २०००
- जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
- अमलात येण्याचे वर्ष - २००३
- भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
- वर्ष - १९९४
- वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
- अमलात येण्याचे वर्ष - १९९६
- भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
- वर्ष - १९९८
- हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
- अमलात येण्याचे वर्ष - २००४
- भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
- वर्ष - २००१
- अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
- ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
- अमलात येण्याचे वर्ष - २००४
- भारताने मान्य केला - २००६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा