- भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर :
विश्वात सापडणाऱ्या अतिलघू अशा न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते, असा शोध लावणारे जपानचे संशोधक तकाकी काजिता आणि कॅनडाचे संशोधक आर्थर बी मॅक्डोनाल्ड यांना या वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते या शोधामुळे पदार्थाच्या सगळ्यात छोट्या कणाचे कार्य कसे चालते, याची कल्पना जगाला आली आणि त्याचबरोबर जगाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या अभ्यासाचे नवे दालन खुले झाले, असे रॉयल स्वीडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे. पोटान्सच्या खालोखाल न्यूट्रिनो कण सर्वाधिक प्रमाणात आढळतात. हजारो न्यूट्रिनो कण आपल्या शरीरातून प्रवाहित होत असतात. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची अत्यंत कमी माहिती आपल्याला होती. तकाकी काजिता आणि आर्थर बी मॅक्डोनाल्ड यांनी "न्यूट्रिनो ऑस्सिलेशन"ची पद्धत शोधून काढली. त्यातून त्या कणांची अधिक माहिती मिळण्यास मदत झाली. मॅक्डोनाल्ड हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात "प्रार्टिकल फिजिक्स"चे प्राध्यापक आहेत. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते म्हणाले, माझ्या संशोधनात अनेक सहकाऱ्यांचा हातभार आहे. त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे.
- स्वेतलाना अलेक्सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर :
आहे. स्वेतलाना यांना 6 लाख 91 हजार पौंड इतकी पारितोषिक रक्कम मिळणार आहे. स्वेतलाना अलेक्सिविच (वय 67) या राजकीय विश्लेषक असून, साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या त्या पहिल्या पत्रकार ठरल्या आहेत. रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेवरील "व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल" आणि सोव्हिएत महासंघ आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धाच्या प्राथमिक अहवालावरील "झिंकी बाइज्" ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची पुस्तके 19 देशांमध्ये प्रकाशित झाली असून, पाच पुस्तकांचे इंग्रजीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांनी तीन नाटकेही लिहिली असून, 21 माहितीपटासाठी पटकथा लिहिली आहे. स्वेतलाना अलेक्सिविच यांचा जन्म 1948 मध्ये युक्रेनमधील इव्हानो फ्रॅंकिस्क या गावात झाला. 1985 मध्ये त्यांनी "द अनवूमनली फेस ऑफ द वॉर" हे पहिले पुस्तक लिहिले. त्यांना स्वीडनचा प्रतिष्ठेचा "पेन‘ हा पुरस्कारही मिळाला आहे. यंदाच्या पारितोषिकासाठी जपानचे कादंबरीकार हारुकी मुराकामी आणि केनियाचे कादंबरीकार गुगी वा थिओन्गो हे स्पर्धेत होते. साहित्यासाठी नोबेल मिळविणाऱ्या त्या चौदाव्या महिला ठरल्या आहेत. 1901 ते 2015 या काळात 112 जणांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविले आहे.
- रसायनशास्त्रातील "नोबेल" पारितोषिक जाहीर :
- ट्युनिशियाच्या नॅशनल डायलॉग क्वार्टेटला शांततेचे नोबेल जाहीर
- मध्य पूर्वेतील देशांना हादरवणा-या जास्मीन रिव्होल्यूशनच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी काम केलेल्या ट्युनिशियाच्या 'दि नॅशनल डायलॉग क्वार्टेट' या संस्थेला २०१५ सालचा 'नोबेल पीस प्राईज' जाहीर झाला आहे.
- 'जास्मिन रिव्हॉल्यूशन'नंतर ट्युनिशियात झालेल्या राजकीय हत्या व अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चार संघटनांचा समूह असलेल्या या संस्थेची २०१३ साली स्थापना करण्यात आली .
- ट्युनिशियामध्ये 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकविण्यात भरीव कामगिरी केलेल्या "नॅशनल डायलॉग क्वार्टलेट‘ या संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर झाले
- ट्युनिशियातील चार प्रमुख संस्थांची मिळून द क्वार्टलेट ही संस्था बनली आहे. यामध्ये द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हॅंडिक्राफ्ट्स, द ट्युनिशियन ह्युमन राइट्स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स यांचा समावेश आहे.
- ‘नॅशनल डायलॉग क्वार्टेट’
’द टय़ुनिशियन जनरल लेबर युनियन. स्थापना – १९४६, कार्य – कामगारांच्या हिताचे रक्षण करणे.
’द टय़ुनिशियन कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री, ट्रस्ट अँड हँडीक्राफ्ट्स. स्थापना – १९४७, कार्य – लघुद्योगांमध्ये सहभाग
’द टय़ुनिशियन ह्य़ूमन राइट्स लीग. स्थापना – १९७६, कार्य – मानवी हक्कांचे रक्षण
’द टय़ुनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स. कायदेतज्ज्ञांच्या या संस्थेने टय़ुनिशियामध्ये लोकशाही प्रस्थापनात महत्त्वाचा सहभाग नोंदविला होता.
- या सर्व संस्थाद्वारे ट्युनिशियातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांमध्ये मानवाधिकार, कायद्याचे पालन, समाजकल्याण अशा मूल्यांचा प्रसार केला जातो. द क्वार्टलेट या संस्थेने आपल्या नैतिक सामर्थ्याच्या जोरावर ट्युनिशियामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी प्रमुख माध्यम म्हणून काम केले
- चार संस्थांनी मिळून बनलेल्या या संस्थेची स्थापना 2013 ला करण्यात आली.
- राजकीय हत्यासत्र आणि देशात पसरलेल्या अराजकतेमुळे लोकशाही प्रक्रिया संकटात सापडली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थापना झाली होती. या संस्थेने शांततापूर्ण मार्गाने समाजातील अशांत घटकांबरोबर चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. ट्युनिशियाअंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर असताना या संस्थेने पर्यायी राजकीय चर्चेचे वातावरण तयार केले.
- जस्मिन रिव्होलुशन
ट्युनिशियामध्ये 2010 मध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होऊन ही लाट सर्व अरबजगतात पसरली. म्हणूनच उठावांना "अरब स्प्रिंग‘ म्हणूनही ओळखले जाते. ट्युनिशियामध्ये याला "जस्मिन रिव्होलुशन‘ म्हणतात. ट्युनिशियामध्ये सुरवात होऊनही दोन वर्षांत येथे चर्चेची प्रक्रिया सुरू झाली. या उलट सीरिया, येमेन आणि इतर अरब देशांमध्ये सरकार उलथविले गेले अथवा तसे प्रयत्न होऊन अराजकता माजली. द क्वार्टलेटने मात्र देशाच्या इस्लामवादी आणि इतर पक्षांमध्ये राष्ट्रीय चर्चा घडवून आणली. त्यामुळे येथे लोकशाही वाचू शकली.
- अंबागड आणि नगरधन जीपीएसने जोडणार :
किल्ल्यांवर पर्यटन वाढावे, पुरातत्त्वीय महत्त्व जपले जावे, यासाठी राज्यातील 25 किल्ले ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे (जीपीएस) जोडण्यात येणार आहेत. यामध्ये तुमसरचा अंबागड आणि रामटेकच्या नगरधन किल्ल्याचा समावेश आहे. जीपीएसमुळे जगात कुठेही बसून, गुगलवरून या किल्ल्यांची स्थिती आणि माहिती प्राप्त करता येणार आहे.
- स्मार्ट सिटी' सल्लागारांची नावे केली जाहीर :
'स्मार्ट सिटी' म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या देशभरातील 98 शहरांपैकी 88 शहरांसाठी नेमलेल्या 37 सल्लागारांची नावे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली. यानुसार महाराष्ट्रातील 10 'स्मार्ट सिटीं'चे आराखडे तयार करण्यासाठी पाच सल्लागार नेमण्यात आले आहेत. निवड झालेल्या प्रत्येक शहराला 'स्मार्ट सिटी'चा संकल्प आराखडा तयार करण्यासाटी केंद्र सरकारने याआधीच दोन कोटी रुपये दिले आहेत. आता हे सल्लागार त्या त्या शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका व राज्य सरकारच्या देखरेखीखाली 'स्मार्ट सिटी'चे आराखडे तयार करतील.
शहरे व त्यांचे सल्लागार :
- बृहन्मुंबई : अलिया कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रा. लि. व जेनेसिस फिन.
- पुणे : मॅक्किन्सी कन्सलन्टंट्स
- नागपूर : क्रिसिल
- औरंगाबाद : नाईट फ्रँक (इं) प्रा. लि, फोर्ट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व पीएसपी फिनान्शियल कन्सल्टंट्स प्रा. लि.
- नागपूर: क्रिसिल
- नवी मुंबई : टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि., स्पॅटियल डिसिजन्स व महा इन्फोटेक प्रा. लि.
- ठाणे : क्रिसिल
- कल्याण-डोंबिवली : क्रिसिल
- सोलापूर : क्रिसिल
- अमरावती : क्रिसिल
- भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले चित्र नासाने केले शेअर :
भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले एक अद्भूत छायाचित्र नासाने शेअर केले आहे.
सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे रात्रीच्या काळोखात भारत-पाक सीमारेषा या छायाचित्रात अगदी स्पष्ट उठून दिसते. नासाच्या एका अंतराळवीराने निकॉन डी4 डिजिटल कॅमेरातून 28 मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हे छायाचित्र टीपले असून ते पाकमधील सिंधू नदीपात्रापासून उत्तर दिशेकडे पाहताना टिपण्यात आले आहे. छायाचित्रात भारत-पाक सीमा रेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या छायाचित्रात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले दिसते. सिंधू नदीपात्र आणि हिमालयाचाही भाग या छायाचित्रात नमूद करण्यात आला आहे.
- भारत २०१८ साली होणाऱ्या G-२० चा अध्यक्ष होणार आहे.
- G-२० ची २०१६ परिषद = चीन
- G-२० ची २०१७ परिषद = जर्मनी
- G-२० ची २०१८ परिषद = भारत
G-२० बद्दल :
१९९७ साली आशिया खंडात आर्थिक महामंदी आली होती.
त्या पार्श्वभूमीवर १९९९ साली जगातील प्रमुख अर्थसत्ता असलेल्या २० देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची एक परिषद भरली. तीच ही G-२० होय!
हे २० देश जगातील ८५% एकूण घरगुती उत्पन्नधारक (GDP) देश आहेत.
ही एखादी संघटना नाहीये. केवळ एक मंच (फोरम) आहे.
त्यामुळे G-२० चे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नसते.
ज्या देशात ही सभा भरणार असते, तेथे त्या वर्षभरासाठी तिचे तात्पुरते सचिवालय स्थापन केले जाते.
सदस्य : Brazil, China, Russia, India, South Africa, Australia, Argentina, Canada, France, Indonesia, Germany, Italy, Mexico, Japan,Saudi Arabia, Turkey, South Korea, UnitedKingdom (UK), United States (US) and European Union (EU).
- सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडिया गेटजवळील स्मारकास मंजूरी :
हे राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय पुढच्या पाच वर्षांत बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- इस्रायल आणि व्हिएतनामसोबत कर समझोता :
- 'पोलो' या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री थांबविण्याचे आदेश :
फोक्सवॅगनच्या गाड्यांचा बनाव उघड झाल्यावरही भारतात मौन बाळगणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 'पोलो' या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश वितरकांना दिले आहेत. कंपनीच्या अन्य मॉडेलच्या तुलनेत विक्रीच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास हे मॉडेल लोकप्रिय मानले जाते. मात्र, याची विक्री कंपनीने थांबविली आहे. परंतु, हा निर्णय घेतानाही कोणतेही कारण कंपनीने स्पष्ट केलेली नाही. चालू आर्थिक वर्षात कंपनीने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 20,030वाहनांची निर्मिती केली. यापैकी 13,827 पोलो गाड्यांची कंपनीने भारतात विक्री केली तर सुमारे 6052 पोलो गाड्यांची निर्यात केली आहे. भारतात पोलोची विक्री थांबविली असली तरी ज्या गाड्यांची निर्यात झाली आहे, त्यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फोक्सवॅगन कंपनीचा महाराष्ट्रातही प्रकल्प असून तो पुण्यात आहे. या प्रकल्पातून वर्षाकाठी एक लाख 30 हजार वाहनांची निर्मिती कंपनी करते.
- जगातील 51 कंपन्यांची यादी 'फॉर्च्युन'ने केली प्रसिद्ध :
- नयनतारा यांच्यानंतर अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केला परत :
- एम्स स्थापन करण्यास सरकारने दिली मंजुरी :
- चीन आणि पाकिस्तान संरक्षण करार :
- देबोराहने तैवानने 5 पदके जिंकून रचला इतिहास :
- जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक २०१५ जाहीर झाला आहे.
-मागच्या वर्षी भारत ७१ व्या स्थानी होता. (१६ क्रमांक वर गेला! )
-जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक तयार करण्याचे काम ‘जागतिक आर्थिक मंच’ (World Economic Forum WEF) करीत असतो.
-या वर्षी १४० देशांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे.top १० देश :--
-Switzerland, Singapore, United States, Germany, Netherlands, Japan, Hong Kong, Finland, Sweden and United Kingdom.
-नंबर १ = स्वित्झर्लंड (स्वित्झर्लंड सलग ७ व्या वर्षी या यादीत अव्वल आला आहे.)
विकसनशील देश :
चीन – २८
द. आफ्रिका – ४९
भारताच्या प्रगतीची कारणे :
-आर्थिक वातावरण पुन्हा एकदा चांगले होऊ लागलेआहे.
-संस्थांच्या स्पर्धात्मकतेत झालेली वाढ
-स्थूलअर्थशास्त्रीय वातावरणात आलेली आश्वासकता
-पायाभूत सुविधांत झालेली थोडीफार वाढ इ.
भारताला ५५ व्या क्रमांकावर ठेवणाऱ्या बाबी :
गुंतवणूकदारांना मिळणारे संरक्षण
शिक्षणाची गुणवत्ता
राष्ट्रीय बचतीचे चांगले प्रमाण
व्हेन्चर भांडवलाची उपलब्धता
भव्य घरगुती बाजारपेठ आणि उत्पन्न (GDP) इ.
भारत कशात मागे? : धोरण अनिश्चितता, भ्रष्टाचार, मूल्यवृद्धी (भाववाढ/चलनफुगवटा), कर्जाची उपलब्धतता होण्यात येणाऱ्या अडचणी
- ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला :
२६ ऑक्टोबररोजी सुभाष घई यांच्याहस्ते रेहमानला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त 'ह्रदयनाथ मंगेशकर' हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये व सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून आत्तापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाताई यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
- आता महिला फायटर पायलट म्हणून होणार सहभागी :
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिला आता लढाऊ विमानाच्या पायलट (फायटर पायलट) म्हणून हवाई दलात लवकरच सहभागी होणार आहेत. आजपर्यंत लढाऊ विमानांचे पायलट म्हणून पुरुषच होते. पण आता महिला यात सहभागी होऊ शकतील असे हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल अरूप राहा यांनी घोषणा केली. हवाई दलाच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ही घोषणा करण्यात आली आहे.मात्र, लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून त्यांना सहभागी करून घेण्याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. त्याबाबत काही कारणेही पुढे करण्यात आली होती. लढाऊ सोडून हवाई दलातर्फे वाहतूक करणाऱ्या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून त्या यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. अमेरिका, इस्राईल आणि पाकिस्तानसह अनेक देशांत महिला लढाऊ विमानाच्या पायलट आहेत.
- गुगुलचे 'दिल्ली पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऍप' उपलब्ध :
शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यासाठी गुगुलने 'दिल्ली पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऍप' उपलब्ध करून दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना रस्त्यांची माहिती मिळावी या उद्देशाने हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऍपमध्ये गुगल मॅप बरोबरच रस्त्यांबद्दलची माहिती आहे. एखाद्या प्रवाशाला इच्छितस्थळी पोचण्यासाठी या ऍपचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय, इंटरनेट स्लो असले तरी हे ऍप वापरताना अडचणी येणार नाहीत, असे गुगुलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्ली मेट्रो, बसचे वेळापत्रक, बस स्थानके, प्रवासादरम्यानचा मार्ग या ऍपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकदा ऍप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन नसतानाही या सेवेचा उपयोग करता येणार आहे. मात्र, प्रवाशाला जर ताज्या घडामोडींबाबतची सेवा हवी असल्यास छोटी रक्कम भरावी लागणार आहे.
- आयआरएनएसएस सर्व सातही उपग्रह कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा :
क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च 2016 पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे 'इस्रो' या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने स्पष्ट केले. केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या 'गगन' यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत. जीसॅट-15 हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे 10 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे. सर्व सातही उपग्रह मार्च 2016 पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे. यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. सध्या ही यंत्रणा 1500 कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे. तसेच आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय :
बदलते हवामान, शेतीमालांचे बाजारभाव, कृषी विद्यापीठे आणि तज्ज्ञांनी केलेले नवीन प्रयोग आणि शेतीसंदर्भातील अन्य महत्त्वाच्या घडामोडी समजण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहिती कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिली सध्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय अनेकदा संकटात सापडत आहे. बदलत्या हवामानाच्या अधारे शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करणे आवश्यक असून, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनाही घरबसल्या सर्व बदलांची माहिती मिळणे आवश्यक असल्याने सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याबाबत येत्या डिसेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना "सॉईल कार्ड" देण्यात येईल. या कार्डामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या परिस्थितीचा तपशील असेल. यावरून शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत आणि त्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा याबाबत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.
- ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन :
'सौदागर', "फकिरा", "गीत गाता चल", "अखियों के झरोंको से", "राम तेरी गंगा मैली", "हीना", "चितचोर", "तपस्या", "चोर मचाये शोर", "दुल्हन वही जो पिया मन भाये" अशा अनेक चित्रपटांना सुमधुर संगीताने सजवणारे ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल याच वर्षी त्यांना "पद्मश्री"ने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांचा सत्कार केला होता.
- अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :
भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची शुक्रवारी केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या पदावर अवघ्या 11 महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे. डॉ. बसू सध्या भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) संचालक असून, अणू पुनर्वापर मंडळाचे (एनआरबी) मुख्य कार्यकारी आहेत. सध्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख असलेले डॉ. आर.के. सिन्हा 23 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्याकडून बसू सूत्रे हाती घेतील. कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन पुन:प्रक्रिया सुविधा प्रकल्प स्थापन करण्यात डॉ. बसूंची मुख्य भूमिका आहे.
- एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर :
मुख्यमंत्र्यांच्या नावाने राज्याच्या ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर होईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय आत्मसन्मान कार्यशाळा पुण्यात बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. आराखडा बनवून राज्याने स्वत:ची मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. त्यासाठी 1 हजार कोटी मागितले आहेत. त्याला तत्त्वत: मंजुरीही मिळाली आहे. पुरवणी बजेटमध्ये त्याला निधी मिळेल. त्यानंतर लवकरच राज्याची ही योजना कार्यान्वीत होईल.
- प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे :
प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवली असून त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे. प्लुटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे. तेथील बर्फाळ धुक्याच्या कणांना राखाडी किंवा लाल रंग आहे, पण ज्या पद्धतीने ते निळा रंग पसरवतात त्यामुळे न्यू होरायझन्स मोहिमेचे वैज्ञानिक चकित झाले आहेत. एसडब्ल्यूआरआय या संस्थेचे संशोधक कार्ली हॉवेट यांच्या मते त्या निळ्या रंगातून आपल्याला धुक्याच्या सदृश कणांची व्याप्ती व संरचना कळू शकते.आकाश हे काही लहान कणांनी नेहमी सूर्यकिरण विखुरले गेल्याने निळे दिसते. पृथ्वीवर नायट्रोजनच्या लहान रेणूंनी सूर्यकिरण पसरले जाऊन आकाश निळे दिसते, तर प्लुटोवरही आकाश काजळीसारख्या थोलिन या कणांमुळे निळे दिसते. वैज्ञानिकांच्या मते प्लुटोच्या वातावरणातील अगदी वरच्या थरात थोलिनचे कण असतात तेथे अतिनील किरणांचे विघटन होते व त्यातून नायट्रोजन व मिथेनचे रेणू तयार होतात. ते एकमेकांशी अभिक्रिया करतात. त्यामुळे धन व ऋणभारित आयन तयार होतात. ते पुन्हा एकत्र आल्यानंतर स्थूलरेणू तयार होतात. अशी क्रिया शनीचा चंद्र असलेल्या टायटन या उपग्रहावर दिसून आली आहे. अधिक गुंतागुंतीचे रेणू एकत्र येऊन त्याचे छोटे कण बनतात. अस्थिर वायूंचे संघनन होते व ते त्या कणांच्या पृष्ठभागावर बसतात त्यामुळे बर्फाचे कण असल्यासारखे धुके दिसते, त्यामुळे प्लुटोच्या लालसर रंगातही भर पडते. न्यू होरायझन्स यानाने केलेल्या संशोधनानुसार प्लुटोच्या अनेक भागात बर्फ आहे. राल्फ स्पेक्ट्रल कंपोझिशन मॅपरने ते शोधले आहे. प्लुटोच्या विस्तारित भागात सरसकट बर्फ दिसत नाही, कारण तिथे अतिशय तरल अशा बर्फाचे थर आहेत. न्यू होरायझन्स अवकाशयान पृथ्वीपासून 5 अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यातील सर्व प्रणाली व्यवस्थित काम करीत आहेत.
- चर्चित बुक्स:-
"द अनटोल्ड ट्रूथ‘:- पी. एन. हून
(माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सरकार 1987 मध्ये उलथवून टाकण्याचा कट लष्कराने रचला होता, असा खळबळजनक आरोप लष्कराचे माजी लेप्टनंट जनरल पी. एन. हून यांनी या पुस्तकात केला )
‘क्लिंटन्स वॉर ऑन वुमन’:- रॉजर स्टोन
(या पुस्तकात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना पत्नीचा जाच असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. )
- ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत राज्यातील १९ शहरे पाणंदमुक्त झाल्याचे नगरविकास मंत्रालयाने जाहीर केले आहे.
यामध्ये जिल्हय़ातील सातारा, वाई, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर या पाच शहरांचा समावेश आहे.
यश कसे मिळाले :
यासाठी वेळोवेळी बैठका, जनजागृतीद्वारे नागरिकांना वैयक्तिक व लगतच्या दोनचार शेजाऱ्यात मिळून गटशौचालयाची योजना राबविण्यात येत होती.
जनजागृतीद्वारे नागरिकांना उघडयावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यात आले.
गुडमॉर्निंग पथकाद्वारे नदी काठावर ओढयालगत मोकळया मदानात शौचास जाणाऱ्यांकडून दंड वसुलीची मोहीम राबविण्यात आली.
पालिकेने नागरिकांसाठी सुलभ शौचालयासह शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत.
वाईला १३५ व्यक्तींकडे शौचालय नसल्याचे कळल्यावर याच नागरिकांवर लक्ष केंद्रित करुन यातील ७५ नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी पालिकेने दहा हजार, तर केंद्र व राज्य शासनाचेबारा हजार असे अनुदान देण्यात येत आहे.
अहमदाबाद येथील सेष्ट युनिव्हर्सिटीने वाई पालिकेला मदत केली.
- इमेज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील :
फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर "लाइक" आणि "कमेंट" करण्यापलीकडे जाऊन भावना व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या इमेज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यापैकीच काही इमेजींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सर्व इमोजी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक पोस्टखाली लाइकसह संबंधित पोस्टवरील भावना व्यक्त करण्यासाठी एकूण सात बटने उपलब्ध होतील. त्यामध्ये प्रेम, हास्य, यश, आश्चर्य, दु:ख आणि राग या पर्यायांचा समावेश असेल. तंत्रविषयक वृत्त देणाऱ्या एका इंग्रजी दैनिकाने स्पेन आणि आयर्लंडमध्ये अशा प्रकारच्या इमोजी दिसण्यास सुरवात झाल्याचे म्हटले आहे. इतर देशांसह भारतामध्ये ही सुविधा केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
- खड्गप्रसाद शर्मा ओली यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड :
पंतप्रधान निवडीसाठी नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानानंतर खड्गप्रसाद शर्मा ओली यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा त्यांनी पराभव केला. कोईराला यांनी राजीनामा देण्याचे निश्चित केल्यानंतर एकमताने नवा नेता निवडण्यात संसदेला अपयश आल्याने मतदान झाले होते. ओली लवकरच देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. कोईराला हे स्वत: 2014 मध्ये ओली यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते.
- जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे "370"वे कलम कायमस्वरूपाचे :
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील "370"वे कलम कायमस्वरूपाचे असून त्यामध्ये सुधारणा करणे अथवा ते रद्द करणे शक्य नसल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
तसेच राज्यघटनेतील कलम 35 (अ) हे विद्यमान कायद्याला संरक्षण देते, असे न्या. हसनैन मसुदी आणि न्या. जनकराज कोटवाल यांनी दिलेल्या 60 पानी निकालपत्रात म्हटले आहे.
या कलमामुळेच राज्याला मर्यादित स्वातंत्र्य आणि विशेष दर्जा मिळाला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
- सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला :
संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला आहे. सुमारे 15 वर्षांच्या खंडानंतर दोन देशांमध्ये संयुक्त आयोग पुन्हा स्थापन झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तसेच या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये क्रीडा आणि युवक कल्याणासंबंधी सहकार्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
- सानिया व मार्टिना यांनी सलग आठवा चषक जिंकला :
भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी आपले विजयी अभियान कायम राखले आहे.
डब्ल्यूटीए चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून सलग आठवा चषक जिंकला.
अग्रमानांकित सानिया-मार्टिना जोडीने सहाव्या मानांकित तैपेईच्या हाओ चिंग चान व युंग जान चान यांना 6-7 (9-11), 6-1 आणि 10-8 असे नमवून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.
तसेच टायब्रेकरमध्ये 7-7 अशी बरोबरी असताना या जोडीने सलग चार गुण मिळविले.
सानियाचे 2015 मधील हे नवववे तर हिंगीसचे आठवे विजेतेपद आहे.
- मुलींच्या सर्वाधिक हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर :
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, 6 वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या 62 महाराष्ट्रात झाल्या आहेत. या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (34), उत्तर प्रदेश (27), मध्य प्रदेश (26) यांचा क्रमांक आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये 'पॉस्को' कायदा करण्यात आला.
- ऑस्ट्रेलियाची गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार :
जर्मनीने अलीकडेच दुर्गामातेची मूर्ती भारताला परत दिल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या कलासज्जेत असलेली गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार आहे. बुद्धाची ही बसलेल्या अवस्थेतील मूर्ती उत्तर प्रदेशातील मथुरेची असण्याची शक्यता आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राष्ट्रीय कला सज्जेत आहे असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ाच ही मूर्ती परत करण्याबाबतची सूचना ऑस्ट्रेलियाच्या कला सज्जेने भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवली आहे. हे शिल्प वालुकाश्माचे बनवलेले असून तशी शिल्पे मथुरेतच आढळतात.
- थोडक्यात महत्वाचे :
- जागतिक टपाल दिनानिमित्त १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय डाक सप्ताह राबवण्यात येणार आहे.
- शिमलाः १९६५ च्या भारत-पाक युद्धातील विजयाला ५० वर्ष झाल्याच्यानिमित्ताने सैन्यांच्यावतीने युद्धचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- नेपाळच्या नव्या संविधानानुसार उद्या संसदेत निवडला जाणार नेपाळचा पंतप्रधान.
- देशात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेर्धात मल्याळम लेखिका सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केला परत.
- पुणे-मुंबई ई-वे आणि जुना हायवे दोन्ही मार्गांचा ग्रीनकॉरीडोर म्हणून विकास करणार, सीएनजी पंप उपलब्ध करुन देणारः धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री.
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना.
- बॅंक ऑफ बडोदावर सीबीआय आणि ईडीचा छापा, ६००० कोटींचा काळा पैसा हाँगकाँगला पाठवण्याचा आरोप.
- बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंदने हैदराबादमध्ये स्थापन केली नवी बॅडमिंटन अकादमी.
- जगातल्या टॉपच्या १२ शहरांमध्ये मुंबई हे राहण्यासाठी व काम करण्यासाठी सगळ्यात स्वस्त शहर असल्याचे सॅव्हिल्स वर्ल्ड रीसर्चच्या पाहणीत आढळले आहे. लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्क ही सगळ्यात महागडी शहरे आहेत.
- पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ----------- यांच्या भारत-पाकिस्तान संबंधावरील 'नायदर ए हॉक ऑर ए डव्ह' हे पुस्तकाचे प्रकाशन दोन दिवसापूर्वी नवी दिल्लीत करण्यात आले. :-खुर्शिद कसुरी
- भारताचे प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांना खालीलपैकी कोणत्या देशाने सांस्कृतिक दूत म्हणून 8 अक्टूबर 2015 रोजी सन्मानित केले:- सेशेल्स
- भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी ---------- यांची नियुक्ती करण्यात आली आहे.:- डॉ. शेखर बसू बेलारूसच्या लेखिका आणि पत्रकार स्वेतलाना अलेक्सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. असा पुरस्कार मिळवलेल्या त्या ------ व्या महिला ठरल्या:- १४
- अमेरिका मध्ये आलेले वित्तीय संकट आणी आर्थिक मंदी यावर " द करेज टू एक्ट- एमेमोयर ऑफ़ ए क्राइसिस एंड इट्स आफ्टर मैथ " हे पुस्तक कोणी लिहिले आहे:- बेन एस बर्नानके
- जागतिक टपाल दिनानिमित्त ---------- दरम्यान राष्ट्रीय डाक सप्ताह राबवण्यात येणार आहे.:-१० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर
- ब्लॅटर यांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर -----------यांची ‘फिफा’ च्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली :-इस्सा हयातो (दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉलचे सर्वेसर्वा )
- राष्ट्रीय टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो:- १०आक्टों(जागतिक टपाल दिन हा ९ आक्टों रोजी साजरा केला जातो)
- अलीकडेच कोणता देशाने राष्ट्रीय प्राणी गाय म्हणून घोषित केला:- नेपाळ
- आयर्न गर्ल निधी सिंह पटेलने एशियन बेंच प्रेस चॅम्पियनशिप २०१५ चे ( ओमान ) सुवर्णपदक पटकावले.
- एबीपी-नेल्सनचा सर्व्हे: बिहारमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता, सर्व्हेतील माहितीनुसार एनडीएला २४३ पैकी १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
- माजी केंद्रीय मंत्री मातंग सिंह यांच्या पत्नीला शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणीअटक.
- स्वीडनचे थॉमस लेदाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच आणि आणि तुर्कीचे अझीज सँकार यांना २०१५चा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर
- रेल्वे कर्मचा-यांना ७८ दिवसांचा बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, रेल्वेच्या तिजोरीवर १०३० कोटी रुपयांचा भार पडणार.
- दिल्लीतील इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक व संग्रहालय तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
- नागपूर (महाराष्ट्र), मंगलगिरी (आंध्र प्रदेश) आणि कल्याणी (प. बंगाल) अशा तीन नव्या 'एम्स'ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
- नयनतारा सेहगल यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयींनीही दादरीतील घटनेविरोधात पुरस्कार परत केला.
- कटक इफेक्ट, ११ ऑक्टोबररोजी कानपूरमध्ये होणा-या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात स्टेडियममध्ये पाण्याची बॉटल, डब्बा नेण्यास मनाई.
- आंध्रप्रदेशलाविशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी वायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगन मोहन रेड्डींचे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू
- यवतमाळ आणि उस्मानाबाद इस्त्रायलच्या सहकार्याने राज्यात स्वतंत्र पथदर्शी कृषीविकास प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची घोष
- -------- यांना २०१५चा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झाले:-स्वीडनचे थॉमस लेदाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच आणि आणि तुर्कीचे अझीज सँकार
- ------------- यांना यंदाचा हृदयनाथ पुरस्कार घोषित करण्यात आला,एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे :-ए. आर. रेहमान(आतापर्यंत लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सुलोचनादीदी व पं. हरिप्रसाद चौरासिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.)
- संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळच्या छांगला येथे समुद्र पातळीपासून ------- फूट उंचीवर आपले जमिनीवरचे केंद्र स्थापन केले आहे. हे जगातील सर्वाधिक उंच स्थळी असलेले केंद्र आहे :- १७६००
- ---------- या मराठी चित्रपटाने वॉशिंग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले:- परतु
- कोणत्या तीन नव्या 'एम्स'ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली:-नागपूर (महाराष्ट्र), मंगलगिरी (आंध्र प्रदेश) आणि कल्याणी (प. बंगाल)
- पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे ---------हे देशातील पहिले राज्य ठरले :- राज्यस्थान( दुसरे राज्य:- हरियाना)
- १६ सप्टेंबर २०१५ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र ला ---------- वर्ष पूर्ण झाले :- ८०
- --------- या राज्यात ९ सप्टेंबर हा दिवस हिमालय दिवस म्हणून साजरा केला जातो:- उत्तराखंड
- ---------- या देशाने १५ ऑगस्ट २०१५ या दिवसापासून आपला टाईम झोन ३० मिनिटाच्या फरकाने बदलला आहे :- उत्तर कोरिया
- --------- यांना २०१५ चा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला:- अमलेन्दू कृष्णा
- फोर्बेस या मासिकाने जाहीर केलेल्या कर्जबाजरी देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे :-३५(पहिल्या स्थानावर जपान तर दुसर्या वतिसर्या स्थानावर अनुक्रमे आयर्लंड व सिगापूर हे आहेत)
- युनिसेफच्या सर्वक्षेनानुसार हागणदारीमुक्त खेड्याची सर्वात जास्त संख्या कोणत्या जिल्हात आहे :- सिंधुदुर्ग( पुणे दुसर्या क्र्माकावर आहे)
- चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर-------- राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून (आयएमएफ) व्यक्त करण्यात आला:- ७.५ %
- चार महिन्यांच्या बंदीनंतर कर्नाटक सरकार मॅगीवरील बंदी उठवण्याचा विचार करत आहे. लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत असल्यामुळे बंदी उठवण्याचा विचार होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
- संगीतकार ए आर रेहमानला ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर.
- महिला फायटर पायलटचा प्रस्ताव विचाराधीन - ८३ व्या वर्धापनदिनी हवाई दलाचे प्रमुख अरूप शहा यांची घोषणा
- गुगलवर पॉर्न सर्च करणा-या जगातील टॉप १० शहरांपैकी सहाशहरं ही भारतातील आहे. विशेष म्हणजे गुगलवर पॉर्न सर्च करणा-यांमध्ये दिल्ली पहिल्या, पुणे दुस-या आणि मुंबई तिस-या स्थानावर आहे.
- मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर... ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना प्रतिष्ठेचा 'जीवन गौरव' पुरस्कार
- स्वस्त धान्यापासून ९ लाख शेतकरी वंचित, दुष्काळामुळे १५ ऑगस्टपासून सुरू केली होती योजना. बीड जिल्ह्यात ५८ टक्के तर नांदेड जिल्ह्यात ४३ टक्के धान्य वाटप
- भारतीय हवाई दलाचा ८३ वा वर्धापनदिन उत्तर प्रदेशात उत्साहात साजरा करण्यात आला.
- बांगलादेशचा क्रिकेटपटू शहादत हुसेन याला १९ वर्षांच्या मोलकरणीचा छळ केल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले. तीन आठवड्यांहून जास्त काळ फरार झाल्यानंतर तो न्यायालयात शरण गेला
- बेल्जियमच्या केबीसी समूहाने भारतात युनियन बँक ऑफ इंडियासह सुरू केलेल्या मालमता व्यवस्थापन कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकून भारतातून काढता पाय घेतला आहे. अलीकडच्या काळात भारताच्या म्युच्युअल फंड व्यवसायातून मॉर्गन स्टॅन्ले, आयएनजी इन्व्हेस्टमेंट, डॉइशे एएमसी, पाइनब्रिज आणि फेडिलिटी अशा सहा विदेशी कंपन्यांनी आपल्या योजना दुसऱ्या म्युच्युअल फंडांना विकून भारतातून म्युच्युअल फंड व्यवसायातून माघार घेतली आहे.
- सोने मुद्रणीकरण आणि सुवर्ण रोखे योजना सादर करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. सोने मुद्रणीकरण योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचे सोने हे बँकेमध्ये १ ते १५ वर्षांपर्यंत ठेवल्यास त्यावर व्याज मिळणार आहे. तर ५, १०, ५० व १०० ग्रॅम वजनाच्या प्रमाणात मूल्य असलेल्या ५ ते ७ वर्षे मुदतीच्या सुवर्ण रोख्यांवर ठरावीक वार्षिक व्याज मिळेल.
- बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद‘ आणि किशोर बियाणींच्या ‘फ्युचर समूह‘ यांच्यात नुकताच करार झाला असून, फ्युचर समूहाच्या ‘बिग बझार‘ व इतर आऊटलेट्समध्ये पतंजलीची उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या पतंजलीचे वार्षिक उत्पन्न 2500 कोटी रुपये असून ट्रस्टचे मूल्यांकन तब्बल चौदा हजार कोटी रुपये आहे. येत्या पाच वर्षात पतंजली समूहाचे पाच ते दहा हजार कोटी रूपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे.
- दुष्काळ व गारपिटीच्या अस्मानी संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नुकसानाचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन करणारा "किसान ऍप‘ हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू केला. यवतमाळसह राज्यातील नगर व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश
- पंजाबमधील मोगा हे गाव केंद्र सरकारच्या "डिजिटल इंडिया‘ या मोहिमेसाठी निवड झालेले पहिले गाव ठरले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील प्रसिद्ध "लाल-बाल-पाल‘मधील लाला लजपत राय यांचे ते जन्मगाव आहे. पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालाजींच्या या गावात पोलिस उपायुक्त परमिंदरसिंग गिल यांनी वायफाय सेवेचे उद्घाटन केले. हे गाव पंजाब नॅशनलबॅंकेने दत्तक घेतले आहे. लालाजी हे पंजाब नॅशनल बॅंकेचे संस्थापक होते.
- राज्य शासनाने अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ६० मीटरपेक्षा जास्त खोलीचे बोअरवेल खोदण्यास बंदी घातली आहे
- भारतीय सायकलपटू देबोराहने तैवान चषकात आतंरराष्ट्रीय क्लासिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह ५ पदके जिंकून इतिहास रचला
- स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या २२५०० पेक्षा जास्त सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीच्या इंडिया गेटशेजारी ५०० कोटी रुपये खर्चाचे एक राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय स्थापन करण्याची सशस्त्र दलांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली.
- विधिमंडळातील कामकाज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा चॅनलच्या धर्तीवर लवकरच महाराष्ट्र विधिमंडळाचे चॅनल सुरू होत आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
- कॅलिफोर्नियात इच्छामृत्यूची परवानगी देण्यात आली असून अमेरिकेत इच्छामृत्यूची परवानगी देणारे ते पाचवे राज्य ठरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा