Post views: counter

Current Affairs Oct 2015 Part- 4



  • वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत :



                     भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले. वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.

                    वीरू, नवाब ऑफ नजफगढ, सुल्तान ऑफ मुल्तान आणि जेन मास्टरऑफ मोर्डेन क्रिकेट या टोपणनावाने प्रसिध्द असलेला भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंदर सेहवागने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह इंडियन प्रिमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्तीची औपचारीक घोषणा केली. आपल्या ३७ व्या वाढदिवसाच्या दिवशी सेहवागने टि्वटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.

                     सेहवाग यापुढे यूएईमधील मास्टर्स चॅम्पियन्स लीग टी-२०स्पर्धेत खेळणार आहे.या स्पर्धेमध्ये खेळणा-या क्रिकेटपटूसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणे बंधनकारक होते. या रणजी मोसमात हरयाणाकडून खेळतरहाणार असल्याचे संकेत सेहवागने दिले आहेत.
                     सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०४ कसोटीत ४९.३४च्या सरासरीने त्याने ८५८६ धावा केल्या आहेत. त्यात २३ शतकांचा समावेश आहे. कसोटीत दोन त्रिशतके ठोकणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे. वनडे कारकिर्दीत २५१ लढती खेळताना सेहवागने ३५.०५च्या सरासरीने ८२७३ धावा फटकावल्या आहेत. वनडेत १५ शतके त्याच्या नावावर आहेत. वनडेमध्ये २०११ मध्ये सेहवागने इंदूरला वेस्ट इंडिज विरुध्द व्दिशतकही झळकवले होते. २००१मध्ये त्याने दक्षिण आफ्रिके विरुध्द कसोटी पदार्पण केले.पदार्पणाच्या कसोटीतच त्याने शानदार शतकी खेळी केली होती.


                     कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे त्रिशतक झळकावणारा एकमेव फलंदाज असलेल्या सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यात दोन द्विशतके झळकावण्याचा अनोखा विक्रमही आहे. २००७मधील ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक अशा दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सेहवाग अविभाज्य घटक होता.‪

मिळालेले ‎पुरस्कार:‬

२००२:- अर्जुन पुरस्कार
२००८:- विज्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड
२००९:- विज्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड
२०१०:- आयसीसी बेस्ट टेस्ट प्लेअर ऑफ द इअर
२०११:- ईएसपीएन क्रिकीन्फो पुरस्कार

  • रायगड जिल्हा परिषद

अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून शासकीय कार्यालयात वीज निर्मिती करणारी रायगड जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद
केंद्र सरकारच्या डायरेक्टर जनरल ऑफ सप्लायर अँण्ड डिस्पोजल युनिटच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांनी अपारंपरिक वीज निर्मिती साहित्याचा वापर करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या व या सूचनांनुसार रायगड जिल्हा परिषद सौर विद्युत निर्मिती प्रकल्प बसवणार आहे.
अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून रायगड जिल्हा परिषदेने १० केव्हीचे सौर विद्युत
प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला
जिल्हा परिषदेचे दर महिन्याला साधारणपणे 1.20 लाख हजार वीजबिल
या योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या इमारतीवर १० के.व्ही. क्षमतेचा सौरऊर्जा निर्मिती करणारा संच बसविण्यात येणार.
प्रकल्पासाठी जवळपास २७ लाख रुपयांचा खर्च येणार व दर तासाला १० युनिट वीज निर्मिती होणार
सौरऊर्जेचा दर महिन्यास २४ दिवस आणि 9 तास वापर केल्यास 2, १२० युनिट विजेची बचत होणार


  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

खेड्यांना जोडणारे नवीन रस्ते करणे आणि रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 14 हजार कोटी रुपये येत्या 4 वर्षांत खर्च करण्याची तरतूद असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

योजनेची वैशिष्ट्ये -

  1. ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे.
  2. या योजनेत रस्त्यांची निवड ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या निकषांनुसार करण्यात येणार आहे.
  3. गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय तपासणी यंत्रणेची उभारणी, सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण आणि पाच वर्षांचा दोषदायित्व कालावधी ही या योजनेची कार्यप्रणाली राहणार आहे.
  4. जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांची लांबी किंवा राज्यातील जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची लांबी आणि जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक यांना प्रत्येकी 50 टक्के गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यास साधारण 85 किमीची लांबी मिळणार आहे.


  • ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी
- वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या गाजलेल्या नाटकांचे लेखन करणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासंदर्भात नाट्य परिषदेची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने गंगाराम गवाणकर यांच्यानावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गवाणकर यांचे वस्त्रहरण हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजले. मालवणी भाषेला उंची गाठून देण्यात गवाणकर यांनी मोलाचे योगदान दिले. नाट्यसंमेलनाचे स्थळ अद्याप निश्चित झाले नसून सातारा व ठाणे या दोन शहरांची नावे आघाडीवर आहेत.  बेळगाव येथे पार पडलेल्या ९५ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांनी भूषवले होते.

  • मराठी भाषेतील कायदे अपलोड करा - हायकोर्ट

पक्षकारांच्या फायद्यासाठी मराठीत असलेले सर्व कायदे संकेतस्थळावर एका वर्षात अपलोड करा; तसेच सर्व इंग्रजी कायदे एका महिन्यात संकेतस्थळावर दिसू द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारला दिले.राज्यातील कनिष्ठ न्यायालयांत शौचालय, वॉटर कूलर, बसण्याची व्यवस्था व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबाबत व सुधारित कायदेही संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या महिन्यात खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांचे फायर सेफ्टी आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. आता खंडपीठाने यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
एका वर्षाची मुदत १९९८मध्येच याचिका दाखल करण्यात आली आहे. आता आम्ही एक वर्षाची मुदत देत आहोत. ३० जून २०१६पर्यंत सर्व कायदे आॅनलाइन उपलब्ध करा; तसेच इंग्रजी कायदे एका महिन्यात आॅलाइन दिसू द्या, असे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

  • विष्णुदास भावे गौरव पदक :

मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मींना देण्यात येणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला.  1959 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे हे 50वे वर्ष आहे. हा पुरस्कार दर वर्षी 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी प्रदान करण्यात येतो गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे मानकरी गोखले यांचे वडील अभिनेते चंद्रकांत गोखले यांना भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वडील आणि मुलाला पुरस्काराने गौरवण्याचा योग जुळून आला आहे. नाटक, चित्रपट, वाहिन्यांवरील मालिकांमध्ये शेकडो भूमिका त्यांनी साकारल्या. मराठी रंगभूमीवरील त्यांनी साकारलेला "बॅरिस्टर" पूर्वसुरींमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडणारा ठरला. "स्वामी", "जास्वंदी", "कमला", "महासागर", "राहूकेतू", "दुसरा सामना", "संकेत मिलनाचा", "मी माझ्या मुलाचा, "नकळत सारे घडले‘ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. गेल्या 58 वर्षांत त्यांनी 75 हिंदी, 60 मराठी आणि 20 गुजरातीसह कन्नड, तेलगू चित्रपटांत भूमिका साकारल्या. अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी स्थान प्राप्त केले.

  • मॅन बुकर पुरस्कार :

जमेकाचे लेखक मारलॉन जेम्स यांना यंदाचा मॅन बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच जमेकाच्या लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.त्या 686 पानांच्या कादंबरीत सात खुनांचा संक्षिप्त इतिहास आहे. परीक्षकांनी ती गुन्हेगारी विषयावरची कादंबरी असल्याचे सांगतानाच आजच्या काळातील अभिजात कलाकृती असल्याचे म्हटले आहे. त्यात किमान 75 पात्रे आहेत. हा पुरस्कार 50 हजार पौंडाचा आहे. जम्स हे 44 वर्षांचे असून मिनियापोलिसचे निवासी आहेत. जेम्स यांची जॉन क्रोज डेव्हिल ही पहिली कादंबरी लॉसएंजल्स टाइम्स बुक प्राइज स्पध्रेत व राष्ट्रकुल लेखक स्पध्रेत होती. द बुक ऑफ नाईट विमेन या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीला 2010 मध्ये डेटन साहित्य शांतता पुरस्कार मिळाला होता. अ ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन कििलग्ज या कादंबरीतील कथानक किंगस्टनमध्ये घडते, तेथेच जेम्स यांचा जन्म झाला. बॉब माल्रे यांच्या खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेवर आधारित हे पुस्तक आहे. त्यात माल्रे यांचा उल्लेख केवळ द सिंगर असा आलेला आहे. एफबीआय, सीआयए एजंट, ड्रग डीलर, ब्यूटी क्वीन्स यांच्या मुखातून ही कथा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. 1970 मध्ये किंगस्टनला असलेला संगीत वारसा, तेथील राजकारण व िहसाचार यावरही त्यातून प्रकाश पडतो.

पुरस्काराविषयी :
मॅन बुकर पुरस्कार प्रथम 1969 मध्ये देण्यात आला.
गेल्या वर्षीपासून तो कुठल्याही देशाच्या इंग्रजीतून लेखन करणाऱ्या साहित्यिकांसाठी खुला आहे, पण त्यासाठी ते पुस्तक ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले असणे आवश्यक असते. पूर्वी या पुरस्कारात ब्रिटन व राष्ट्रकुल देश, आर्यलड व झिम्बाब्वे यांनाच सहभागी होता येत असे.

  • पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा :

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली.
 एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांसाठी दार यांनी पंच म्हणून काम पाहिले असून, चेन्नईत 22 ऑक्‍टोबरला आणि मुंबईत 25 ऑक्‍टोबरला होणाऱ्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या सामन्यातही ते पंच असणार होते. दार यांच्याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अलीम दार यांना उर्वरित सामन्यांसाठी वगळणेच योग्य असून, पर्यायी पंचाची लवकरच घोषणा केली जाईल, असे आयसीसीच्या एका प्रवक्‍त्याने सांगितले.

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नासीर खान जंजुआ यांची नियुक्ती :

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर (एनएसए) लेफ्टनंट जनरल नासीर खान जंजुआ (निवृत्त) यांची नियुक्ती करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरविले आहे. भारताबरोबरील सध्याचे तणावाचे संबंध लक्षात घेता देशाच्या सुरक्षाविषयक बाबींवर लष्कराची असलेली पकड आणखी मजबूत करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. सरताज अझीझ हे पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्याकडे पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे सल्लगार म्हणूनही काम आहे.

  • मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत 'मराठी यशवंत पुरस्कार' जाहीर :

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत 'मराठी यशवंत पुरस्कार' जाहीर झाला आहे. अभिनेते अरुण नलावडे यांना के. नारायण काळे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण मुंबई मराठी साहित्य संघाच्या 80 व्या वर्धापनदिनी 28 ऑक्टोबर रोजी डॉ. अ. ना भालेराव नाट्यगृहात करण्यात येईल.

  • मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात एफडीसीएने उठवली :

नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात अन्न व औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एफडीसीए) उठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्येच मॅगीवरील देशव्यापी बंदी उठवण्याचा निकाल दिला होता. गुजरातचे अन्न व औषध प्राधिकरण आयुक्त एच. जी कोशिया यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मॅगीवरील बंदी उठवण्यात येत आहे. गुजरातने जुलैत मॅगीवर बंदी घातली होती, कारण त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिशाचे प्रमाण जास्त आढळले होते. नंतर ही बंदी सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली होती. मॅगीच्या तीन प्रयोगशाळांमध्ये नवीन उत्पादन केल्यानंतरच्या चाचण्यात काहीही दोष आढळला नाही त्यामुळे आता मॅगीची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजूनही गुजरातमध्ये मॅगी उपलब्ध नाही, पण लवकरच या नूडल्स उपलब्ध होतील. मॅगीचा सर्व साठा त्यावेळी बाजारातून मागे घ्यायला लावला होता. देशातील विविध भागातून घेतलेले मॅगीचे नमुने पूर्वी सदोष आढळले होते.

  • व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन :

वैज्ञानिकांनी अनेक वर्षे प्रतीक्षा असलेला ग्लूबॉल नावाच्या नवीन कणाचे अस्तित्व शोधून काढल्याचा दावा केला आहे. अणुकणांना एकत्र ठेवणाऱ्या चिकट कणांना ग्लुऑन असे म्हटले जाते. ग्लुबॉल्स हे अस्थिर असतात व त्यांचे थेट अस्तित्व जाणवत नाही, त्यांचे क्षरण होत असताना विश्लेषण केले तरच त्यांचे अस्तित्व जाणवते. ग्लुबॉल्सच्या क्षरणाची प्रक्रिया मात्र अजून पूर्णपणे समजलेली नाही. प्रा. अँटन रेभान व फ्रेडरिक ब्रुनर या व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यात सैद्धांतिक दृष्टिकोन वापरला असून त्यातून त्यांनी ग्लुबॉलचे क्षरण कसे होते हे शोधून काढले आहे. कण त्वरणकाने केलेल्या निरीक्षणातील माहितीशी हे संशोधन जुळणारे आहे. अनेक प्रयोगात एफ 0 (1710) हे सस्पंदन जाणवले असून ते प्रत्यक्षात ग्लुबॉल असल्याचे दिसून आले आहे. आणखी प्रयोगात्मक निष्कर्ष येत्या काही महिन्यात मिळणे अपेक्षित आहे. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामध्ये आणखी सूक्ष्म कण असतात त्यांना क्वार्क म्हणतात व क्वार्क हे शक्तिमान आण्विक बलाने एकत्र बांधलेले असतात.

  • देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानला भेट दिली, तेव्हा या प्रकल्पात साह्य करणाऱ्या 'जायका' (जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी) कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, ती मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर. जपानी कंपन्यांच्या प्रकल्पांना जलदगतीने काम करता यावे, यासाठी 'जपान डेस्क' स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. पहिली ट्रेन धावेल ती तब्बल दहा वर्षांनंतर 2024 मध्ये.  पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे आव्हान मोठे आहे. त्यासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
अंदाजानुसा, मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे तिकीट 2800 ते 3000 रुपये असेल. हे अंतर 458 कि.मी. आहे. 'फॉर्च्युन 500' या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या जून 2015 च्या अंकातील 'अमेरिका बाईट्‌स बिग ऑन बुलेट ट्रेन्स' या लेखानुसार, बुलेट ट्रेनच्या संदर्भात (भारताप्रमाणे) 'अमेरिकाही चीन, जपान व युरोपच्या कित्येक वर्षे मागे आहे,' असे म्हटले आहे.

  • नेताजींसंदर्भातील रशियातील कागदपत्रे उघड होण्याची शक्‍यता :

भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रे उघड करण्याच्या भारताच्या विनंतीचा विचार करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन रशियाचेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे नेताजींसंदर्भातील रशियातील कागदपत्रे उघड होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नेताजीसंदर्भातील रशियाकडे असलेले कागदपत्रे उघड करण्याची विनंती केली. पुढील वर्षी 23 जानेवारीपासून त्यांच्यासंदर्भातील कागदपत्रे खुली करणार असल्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले


  • शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार

१) महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
२) या पुरस्कारांमध्येलातूरचे गणपतराव माने आणि पुण्याचे रमेश विपट यांची निवड करण्यात आली आहे.
३) राज्य सरकारने २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला.
४) यात १०१२-१३ साठी रमेश विपट आणि २०१३-१४ साठी गणपतराव माने यांना जाहीर करण्यात आला.
५) शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार हा क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

  • अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य गाठणे राज्याला केवळ अशक्य


राज्याची अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता १४ हजार ४०० मेगावॉट आहे.तरी आत्तापर्यंत केवळ ६ हजार ७०५ मेगावॉट इतकीच वीजनिर्मिती करणे महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला म्हणजेच महाऊर्जाला शक्यझालेले आहे.राज्य सरकारने नवीन अपारंपरिक ऊर्जानिर्मितीधोरण जाहीर केले असले, तरी प्रकल्प उभारणीला गती मिळू शकलेली नाही.

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत :-
पवनऊर्जा, ऊसाच्या चिपाडापासून सहवीजनिर्मिती, कृषी अवशेषांवर आधारित ऊर्जानिर्मिती, लघू जलविद्युत प्रकल्प, शहरी घन आणि द्रव कचऱ्यापासून वीज, औद्योगिक कचऱ्यापासून वीजनिर्मिती, तसेच सौरऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत.यालाच नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतही म्हटले जाते.

महत्वाकांक्षी उद्दिष्टे :-
केंद्र सरकारने या माध्यमातून देशात २०२२ पर्यंत १७५ गिगावॉट वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.
राज्य सरकारने पुढील पाच वर्षांमध्ये एकूण १४हजार ४०० मेगावॉट क्षमतेचे नवीन व नवीकरणीय ऊर्जेपासून वीजनिर्मितीचे पारेषण संलग्न प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
मात्र अनेक प्रकल्प अजून सुरूही झालेले नाहीत.
राज्याच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ३ हजार ३६० मेगावॉट ऊर्जानिर्मिती अपेक्षित असताना केवळ१ हजार ९३२ मेगावॉट इतकीच ऊर्जानिर्मिती झाली.

कारणे :-
महाऊर्जाकडून अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेली दिरंगाई !!
उद्योजकांना स्वारस्य नाही - पवन ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र पूर्णपणे खाजगी उद्योजकांवर आहे. लघू जलविद्युत उभारणीच्या बाबतीतही उद्योजकांना स्वारस्य नाहीये.

  • महिला आयोगाच्या सदस्यपदी प्रथमच पुरुषाची निवड:

माजी कॅबिनेट सेक्रेटरी अलोक रावत यांची राष्ट्रीय महिला आयोगामध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.ते या आयोगाचे पहिले पुरुष सदस्य आहेत, ते १९७७ ला आयएएस झाले होते.कॅबिनेट सेक्रेटरी होण्यापूर्वी ते वेगवेगळ्या प्रशासकीय पदावर होते. आयोगामध्ये काम करणे हा नवा अनुभव असणार आहे असे ते म्हणाले.

राष्ट्रीय महिला आयोग बाबत माहिती:-

राष्ट्रीय महिला आयोग ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली.

राष्ट्रीय महिला आयोगाची रचना:-

आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार, आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात.पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो.सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे.आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे.

आयोगाच्या कार्याची पुढील महत्वाची वैशिष्ट्ये आहेत:-

महिलांसाठी संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेणे.कायदेमंडळाला उपायांबद्दल शिफारस करणे.गाऱ्हाणी दूर करण्याचा मार्ग सुकर करणे.महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.

  • पदवी प्राप्त करण्यासाठी आता पाच वर्षांची मर्यादा

पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मर्यादा घातल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालावधीतच पदवी प्राप्त करावी लागणार आहे. पदवीच्या कालावधीपेक्षा अधिकची केवळ दोन वर्षे दिली जातील. अन्यथा पुन्हा पहिल्या वर्षाला प्रवेश घ्यावा लागेल.विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही विद्यापीठांकडून बराच कालावधी दिला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे तीन वर्षांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाची पदवी प्राप्तकरण्यासाठी सहा वर्षांची मुदत दिली जात होती, तर चार वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आठ वर्षेकालावधी दिला जात होता. अभ्यासक्रमांच्या कालावधीत एकसंधता यावी यासाठी आता विद्यापीठांच्या नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीव्यतिरिक्त पदवी प्राप्त करण्यासाठी केवळ दोन वर्षांचा अधिकचा कालावधी दिला जाणार आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांना यूजीसीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मिळेल त्या वेळेत अभ्यास करून परीक्षादेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्षांचे बंधन पाळावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या कालावधीत पदवी प्राप्त करणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने संबंधित अभ्यासक्रमाचे सर्व विषय घेऊन परीक्षा द्यावी लागेल.परिणामी पुढील काळात बी. ए., बी.कॉम., बी.एस्सी. हे तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांतच पूर्ण करावे लागतील. अभियांत्रिकीसारखी पदवी सहा वर्षांत पूर्ण करावी लागेल. अपवादात्मक स्थितीत विद्यापीठएखाद्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा कालावधी वाढवून देऊ शकेल, अशीही तरतूद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या कालावधीबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठांना परीक्षांच्या कालावधीसंदर्भात निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे.

  • प्रत्येक शाळेत आता हॅण्डवॉश स्टेशन


स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्येशाळांमध्ये ‘हॅण्डवॉश स्टेशन्स’ सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेण्याआधी कधी हात धुवावेत, तसेच ते कशा पद्धतीने धुवावेत, याबाबत युनिसेफसंस्थेने जालना जिल्ह्यात एक ‘हॅण्डवॉश स्टेशन’ विकसित केले आहे. या प्रयोगाचा दाखला देत शिक्षण विभागाने आता राज्यातील सर्व शाळांत अशी स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेला किमान एक हजार रुपये मिळणार आहेत.

‘हॅण्डवॉश स्टेशन’ म्हणजे काय?
युनिसेफ या संस्थेने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या पद्धतीने हात धुऊ शकतील, अशी एक संकल्पना मांडली असून, त्याला ‘हॅण्डवॉश स्टेशन’ असे म्हटले आहे. अशा स्टेशन्सची शाळांमध्ये उभारणी करावयाची आहे.हात धुण्याच्या सात पायऱ्या ठरविण्यात आल्या आहेत. हात धुण्यासाठीशाळांनी कोणती साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी किती वेळ लागेल, अशा सर्व बाबींचा विचार करून याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत.

  • अण्वस्त्रांच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनण्याकडे पाकिस्तानची वाटचाल :

अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीतजगातील पाचव्या क्रमांकाचादेश बनण्याकडे पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याचा इशारा अमेरिकेमधील तज्ज्ञांनी दिला आहे.पुढील दहा वर्षांमध्ये पाकिस्तानकडे250 हूनअधिक अण्वस्त्रे असतील, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.पाकिस्तानकडे सध्या110 ते 130 अण्वस्त्रेआहेत.2011मध्ये हीच संख्या90 ते 110इतकी होती, असे बुलेटिन ऑफ ऍटोमिक सायन्टिस्ट यासंस्थेने प्रसिद्ध केलेल्या"पाकिस्तानी न्यूक्लिअर फोर्स 2015"या अहवालात म्हटले आहे.पाकिस्तानमध्ये काही प्रक्षेपक यंत्रणा विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे चार प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्या आणि एक युरेनियम अणुभट्टीच्या साह्याने पुढील दहा वर्षांमध्ये अण्वस्त्रांची संख्या बरीच वाढू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.अण्वस्त्रवाढीचा हा वेग दुप्पट असू शकतो, असा अंदाजही या अहवालात व्यक्त केला आहे.भारताच्या आक्रमक धोरणांची भीती वाटून कमीक्षमतेच्या व्यूहात्मक क्षेपणास्त्रांची निर्मिती केल्याचे पाकिस्तानने नुकतेच मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.पाकिस्तानकडे सध्याशाहीन 1 ए, शाहीन-3 सह सहा प्रकारची अण्वस्त्रक्षमक्षेपणास्त्रे आहेत.तसेच,हत्फ-7 आणि हत्फ-8 ही क्षेपणास्त्रेविकसित होण्याच्या मार्गावर आहेत.

  • भारतामधील पहिलीवाहिली "बुलेट ट्रेन" विकसित करण्यासाठी जपानचा प्रस्ताव :

भारतामधील पहिलीवाहिली"बुलेट ट्रेन"विकसित करण्यासाठी जपानने1 टक्क्यापेक्षा कमीव्याजदर असलेले अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्यामुंबई ते अहमदाबादया505 किमीअंतरासाठी ही बुलेट ट्रेन विकसित करण्याची योजना असून, त्यासाठी सुमारे15 अब्ज डॉलर्सइतका खर्चअपेक्षित आहे.याआधी, गेल्या महिन्यामध्येदिल्ली ते मुंबईया1200 किमीअंतरामध्ये जलदगती ट्रेन विकसित करण्यासंदर्भातील प्रस्तावाची पडताळणी करण्यासंदर्भातील कंत्राट मिळविण्यात चीनला यश आले होते.या कामासाठी अद्यापी अर्थसहाय्याचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच अतिजलदरेल्वे बांधणीसंदर्भातील तंत्रज्ञानाचे काही प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आले आहेत.कंपन्यांकडून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेले साहित्य विकत घेतल्यास मुंबई अहमदाबाद प्रकल्पासाठी80%अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव जपानने केंद्र सरकारपुढे मांडला आहे.

  • जीएसटी व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला कर भरावा लागण्याची शक्यता:

प्रास्तावित वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास (जीएसटी)व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला कर भरावा लागण्याची शक्यता आहे.एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस असून, यासाठी हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर करण्याचा प्रमुख अजेंडा केंद्राचा असणार आहे.केंद्राच्या संयुक्त समितीकडून जीएसटीचा कृती आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरूआहे.या समितीने जीएसटीमध्ये वेगवेगळ्या व्यवहारांसाठीआठ विविध प्रकारचे फॉर्म उपलब्धकरण्याची शिफारस केली आहे.केंद्राचा जीएसटी, राज्य सरकारचा जीएसटी आणि अंतर्गत जीएसटी या तीन प्रमुख करांचा भरणा प्रत्येक महिन्याला करण्याची शिफारसही यामध्ये करण्यात आली आहे.प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला कर भरणा केला जाईल.दरमहा रिटर्न फाइल करणाऱ्यांना20 तारीखनिश्चित करण्याचे प्रस्तावित आहे.ज्या करदात्यांकडून दर महिन्याला करभरणा केला जाणार नाही, अशा करदात्यांची माहिती पुढील कारवाईसाठी तत्काळ जीएसटी समितीकडे पाठवली जाणार आहे.

  • 'मिस दिवा युनिव्हर्स' स्पर्धेच्या अंतिम फेरीत नवेली देशमुख :'

मिस इंडिया'ऑर्गनायझेशनतर्फे घेण्यात आलेल्या'मिस दिवा युनिव्हर्स'स्पर्धेच्या अंतिम फेरीतऔरंगाबादच्या नवेली देशमुखने बाजी मारली आहे.देशभरातील16 सौंदर्यवतींमधून नवेलीने तिसरा क्रमांक मिळवित रत्नजडित मुकुट पटकावला.तिला'मिस टॅलेंटेड'हे वेगळे 25 हजारांचे पारितोषिक मिळाले.तिसरा क्रमांक आला म्हणून पाच लाखांचे रोखआणि रत्नजडित मुकुट मिळाला.

  • अमरावती या आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचे भूमिपूजन :

विविध देशांमधील प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यामध्येपंतप्रधान नरेंद्रमोदीयांच्या हस्ते काल अमरावती या आंध्र प्रदेशच्या नव्याराजधानीचेभूमिपूजन करण्यात आले.गुंटूर जिल्ह्यामधीलउद्दांदरायुनिपलेम गावाजवळ ही नवी राजधानीवसविण्यात येणार आहे.

  • मुलींच्या मृत्यूचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक :

भारतात पाच वर्षांखालीलमुलींच्या मृत्यूचे प्रमाण मुलांपेक्षाअधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.द वर्ल्ड्स विमेन2015या अहवालात म्हटल्यानुसार पूर्व आशिया, दक्षिण आशिया, ओशिनिया व पश्चिम आशियात पुरुषांची संख्यामहिलांपेक्षा जास्त झाली आहे.या तीनही प्रदेशांत पुरुषांची संख्या जास्त असून पुरुषांचे अतिरिक्त प्रमाण पूर्व आशियात50.5दशलक्ष आहे, त्याचे कारण चीनमध्ये असलेला असमतोल हे आहे.दक्षिण आशियात49.5दशलक्ष पुरुष जास्त आहेत, कारण भारतात स्त्रियांची संख्या कमी आहे.पश्चिम आशियात12.1दशलक्ष अधिक पुरुष आहेत, कारण संयुक्तअरब अमिरात व सौदी अरेबियातस्त्रियांची संख्या कमी आहे.

  • भारताकडून वीज आयात करण्याची योजना पाकिस्तानने रद्द :

भारताकडून4 हजार मेगावॉटवीज आयात करण्याची योजना पाकिस्तानने रद्द केली आहे.भारतात पाकिस्तानविरोधी भावना वाढल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटले आहे.'डॉन'या वृत्तपत्राने जल व ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेमुळे ही योजना रद्द करण्यात आली आहे.जल व ऊर्जा मंत्री ख्वाजा असीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान व भारताच्या अधिकाऱ्यांनीएप्रिल 2012मध्ये वीज पुरवण्याच्या योजनेवर चर्चा केली होती.त्यानंतर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल2014मध्ये पाकिस्तानला वीज आयातीबाबत भेटही दिली होती.अदानी एंटरप्राईजेस लि. या कंपनीने500 ते800मेगावॉट वीज दोन-तीन वर्षांत पाकिस्तानला देण्याचे मान्य केले होतेपण नंतर3500-4000 मेगावॉटवीज देण्याचीही तयारी दर्शवण्यात आली, पण त्यात नंतर काहीच प्रगती झाली नाही.

  • व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकवर एक पेज उघडले:

कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे.सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार व पंतप्रधानांबाबत लोकांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे.अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा या पेजचाउद्देश आहे.गुरुवारी दुपारपर्यंत37 हजारांहूनअधिक लाईक्स या पेजला मिळाल्या होत्या.गेल्या आठवड्यापेक्षा13 पटअधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

  • संगीत नाटक अकादमी पुरस्काराने नाथराव नेरळकर सन्मानित:

संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष २०१४ चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. नाथराव नेरळकर आणि अश्विनी भिडे -देशपांडे यांचा पुरस्कारप्राप्त मान्यवरांत समावेश आहे.

संगीत, नृत्य, नाटक क्षेत्रात उत्कृष्ट, तसेच अविरत कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फेराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्कारप्राप्त कलाकारांची निवड महा परिषदेच्या वतीने केली जाते. त्यात संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रातील एकूण ४० कलाकारांची निवड २०१४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून शास्त्रीय गायक अश्विनी भिडे-देशपांडे आणि नाथराव नेरळकर यांचा समावेश, तर गोव्यातून तुलसीदास बोरकर आणि नाट्य अभिनेते रामदास कदम यांचा समावेश आहे.

संगीत नाटक अकादमी फेलोशिपप्राप्त कलाकारांना ३ लाख रुपये रोख, शाल, आणि स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावर्षी ४ ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये तुलसीदास बोरकर (संगीतकार), एस. आर. जानकीरमन (संगीतज्ज्ञ), एम.एस. सथ्यू (चित्रपट निर्माते), विजय कुमार कीचलु (शास्त्रीय गायक) यांना सन्मानित करण्यात आले.

  • थोडक्यात महत्वाचे :


  1. महाराष्ट्रातील डान्स बार बंदी आणणाऱ्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याने राज्यात पुन्हा एकदा डान्स बार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, न्यायालयाने असभ्य प्रकार टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  2.  पुढील वर्षी होणाऱ्या युरो करंडक फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरण्यात नेदरलॅंड्‌सला अपयश आले. त्याचवेळी चेक प्रजासत्ताकने मात्र युरो स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली
  3. रशियाने सलग चौथ्यांदा, तर स्लोव्हाकियाने प्रथमच युरो करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
  4. विश्वन जलद बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन विजेता
  5. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने बंदी घातलेला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ल्यू विन्सेंट याने आयसीएल (इंडियन क्रिकेट लीग) मधील सामने फिक्स करण्यासाठी चौघांच्या चमूत (गँग) दिनेश मोंगियाही होता. असे न्यायालयात सांगितले
  6. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि एकदिवसीय सामन्यात वादग्रस्त निकाल देणारे पंच विनित कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार केली
  7. इन्फोसिस सीईओ राजीव बन्सल यांचा राजीनामा, एम. डी. रंगनाथन होणार नवे सीईओ.
  8. दक्षिण आशियाई ऑलिंपिक समितीने पुढील वर्षी भारतात गुवाहाटी आणि शिलाँग येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 
  9. भारताच्या विजेंदर सिंगने व्यावसायिक बॉक्सिंनगमध्ये विजयी पदार्पण केले. पदार्पणाच्या लढतीत शनिवारी त्याने इंग्लंडच्या सोनी व्हाईटनिंगचा पराभव केला.
  10.  शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन
  11. एफटीआयआय वाद, राज्यवर्धनसिंह राठोड आणि विद्यार्थ्यांमधील चर्चा निष्पळ, आज झालेल्या बैठकीतही तोडगा नाहीच.
  12. मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्याची कॉमेंट्री करण्यास वसिम अक्रम आणि शोएब अख्तरचा नकार, शिवसेनेच्या आंदोलनानंतर निर्णय
  13. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
  14. काश्मीरमधील हुर्रियतचा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमरफारूकने काल घेतली भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांची दिल्लीत भेट
  15. ससून हॉस्पिटलच्या मायक्रोबॉयलॉजी प्रयोगशाळेला नॅशनलअॅक्रिडेटेशन बोर्ड ऑफ लॅबरोटरीजचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्र मिळविणारी सरकारी मेडिकल कॉलेजची पुण्यातील पहिली व राज्यातील दुसरी लॅब
  16. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती, ट्विटरवरून केली घोषणा
  17. पंजाबमध्ये होणारा कबड्डी वर्ल्ड कप रद्द, धार्मिक ग्रंथाच्या विटंबनेच्या अफवेनंतर राज्यात सुरु असलेल्या हिंसेमुळे आयोजकांचा निर्णय.
  18. टाटा स्टील इंग्लंडमधल्या प्रकल्पामधून १२०० कामगारांची कपात करणार आहे. चीनमधून येणा-या स्वस्त मालाच्या आयातीमुळे नोकरकपातीचे पाऊल उचलावे लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  19.  केंद्रीय महिला आयोगावर प्रथमच पुरुष सदस्य, माजी कॅबिनेट सचिव अलोक रावत यांची नियुक्ती
  20. जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्यात स्वतंत्र डेस्क सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  21. पुण्यातील आघाडीचे उद्योजक सायरस पूनावाला यांनी मुंबईतील प्रसिद्ध "लिंकन हाउस' ही आलिशान वास्तू विकत घेतली असून, साडेसातशे कोटी रुपयांना हा सौदा झाला
  22. कलर्स मराठी मिक्ता 2016'चा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियात 26 ते 31 जानेवारीदरम्यान रंगणार आहे. यंदाचा "गर्व महाराष्ट्र' हा पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील यांना देण्यात येणार आहे
  23. नाशिक व मराठवाडा विभागात नव्या साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये, अशी स्पष्ट शिफारस गोदावरी खोरी जल आराखड्यात करण्यात आली आहे.
  24. केंद्र किंवा राज्य सरकारवर टीका केल्यास भादंविच्या 124 अ कलमानुसार राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्याच्या राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार तूर्तास कोणतीही कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मनाई केली.
  25. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीची पायभरणी: सुमारे १८०० वर्षांपूर्वी अमरावती सातवाहन राजांची राजधानी होती.
  26. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीकेंद्राचा आनंदाचा 'बोनस', बोनससाठी मासिक वेतन मर्यादा ७ हजारांवर
  27. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, पुण्याच्या रमेश विपट यांना २०१२-१३ वर्षाचा तर लातूरच्या गणपतराव माने यांना २०१३-१४ चा जीवन गौरव
  28. साहसी क्रीडा प्रकारात गिर्यारोहक उमेश झिरपे आणि पल्लवी वर्तक यांना शिवछत्रपती पुरस्कार
  29. राही सरनोबत आणि वीरधवल खाडेला शिवछत्रपती पुरस्कार
  30. राजधानी दिल्लीत आज 'कार फ्री डे'... मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सायकल रॅली.
  31. लंडन ठुमकदा'चा गायक लाभ जांजुआचा संशयास्पद मृत्यू
  32. चीन रेल्वे आणि रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (CRRC) आणि एमजीएमटी कंपनी CIMM च्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील मेट्रो प्रोजेक्टचे मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण केले.
  33. कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे यांची निवड. तर कॉसमॉस बँक व कॉसमॉस ई सोल्यूशन्सच्या समूह अध्यक्षपदीडॉ मुकुंद अभ्यंकर यांची निवड.
  34. पुणेः गुलटेकड़ी येथील औद्योगिक वसाहत (मिनाताई ठाकरे वसाहत) मध्ये आग, दोन गाड्या घटनास्थळी दाखल, आगीत ८ झोपड्या जळून खाक.
  35. पाकिस्तानातीलशिया मशीदमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १० ठार.
  36. नाम फाऊंडेशन देणार ६०० शेतकरी विधवांना मदत
  37. भारतात ‘बुलेट ट्रेन’साठी जपानचे अर्थसहाय्य
  38. अमेरिका पाकिस्तानला ‘एफ-१६’ विमाने विकणार
  39. सोनिया आणि राहुल गांधींची यंग इंडियन कंपनी वादाच्या भोवऱ्यात, काळ्यापैशाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून १ कोटी कर्ज घेतल्याचं उघड.
  40. मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ ३० नोव्हेंबरपर्यंतलांबणीवर 


६ टिप्पण्या:

  1. This is really great article it’s very informative for us thank you so much for this wonderful information and I do hope that they can have a better future.Freejobalert


    उत्तर द्याहटवा