- शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली.
या 34 वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये खेळला.
त्या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाला 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
- मेनसाला बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण :
दीडशे मिनिटांत तिने 162 गुण मिळवले.
तिला गणित, भौतिक विज्ञान आणि रसायनशास्त्रात रस होता. मेनसा (एमइएनएसए)ने आयोजित कॅटेल थ्री बी पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
तसेच या परीक्षेतील प्रश्न तिने काही मिनिटांतच सोडविले.
हॉकिंग आणि आइन्स्टाइन यांचा बुध्यांक 160 इतका आहे, तर लॅडियाचा 162 आहे.
- साताऱ्याच्या पश्चिमेला एक नवीन रेकॉर्ड :
साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. 'डोंगरावरील धावण्यात सर्वाधिक लोक-एक डोंगर' यासाठी ही नोंद केली आहे. गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेत इथिओपिया देशातील खेळाडूंनी विजेतेपद मिळविले. तसेच यामध्ये बिर्क जिटर, टॅमरट गुडेटा आणि गुडिसा डेबेले विजेते ठरले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत 2,122 स्पर्धक सहभागी झाले होते, तर सातारा येथील स्पर्धेत तब्बल 5हजार स्पर्धक सहभागी झाले होते.
- डॉ. विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार जाहीर :
महारोगी तसेच वंचित-उपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या डॉ. विकास आमटे यांना नागपूर अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
शहराच्या त्रिशताब्दीनिमित्त विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविलेल्या, समाजकार्यासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीस दरवर्षी नागभूषण परस्कार देऊन गौरविले जाते.
एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- "एच टू ई" पॉवर सिस्टिम तयार केली :
भारतातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि स्वस्तात अखंडित वीज मिळावी म्हणून उद्योजक सिद्धार्थ मयूर यांनी "एच टू ई" पॉवर सिस्टिम तयार केली आहे.
याद्वारे 24 तास वीज उपलब्ध होणार असूनपुणे आणि न्यूयॉर्क येथील क्लीन एनर्जी कंपनीतर्फे हा प्रकल्प होत आहे. "सॉलिड ऑक्साईड फ्युएल"वर हा प्रकल्प आधारित असून, पॉवर जनरेटर विकसित केले आहे. जर्मनीच्या "फ्रॉऊनहोपर आयकेटीएस इन्स्टिट्यूट"च्या भागीदारीत हा प्रकल्प होत आहे.
- एलएचसी बनवण्यात यश :
विश्वाच्या निर्मितीच्या वेळी द्रव्याची जी अवस्था होती त्यातील लहान थेंब सर्नच्या लार्ज हैड्रॉन कोलायडरमध्ये (एलएचसी) बनवण्यात यश आले आहे.
काही कण वेगाने एकमेकांवर आदळवून हा प्रयोग करण्यात आला.
कन्सास विद्यापीठाचे संशोधक एलएचसी प्रयोगात काम करीत असून त्यांनी क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा ही द्रव्याची अवस्था मिळवली असून त्याचे काही थेंब तयार झाले.
शिशाचे अणुकेंद्र उच्च ऊर्जेला महाआघातक यंत्राच्या म्युऑन सॉलेनाइड डिटेक्टरमध्ये (सीएमएस) प्रोटॉनवर आदळवण्यात आले, त्यानंतर हे थेंब तयार झाले.
भौतिकशास्त्रज्ञांनी या प्लाझ्माला सूक्ष्मतम द्रव असे नाव दिले आहे.
- 13.2 अब्ज वर्षांच्या आकाशगंगेचा शोध :
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) संशोधकांनी तब्बल 13.2 अब्ज वर्षांच्या आकाशगंगेचा शोध लावल्याचा दावा केला असून, ती आतापर्यंत दिसलेली सर्वांत दूरची आकाशगंगा असण्याची शक्यता आहे.बहुतांश तज्ज्ञांच्या मान्यतेनुसार, विश्वाची उत्पत्ती 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे 13.2 अब्ज वर्षे वय असलेली ही आकाशगंगा सर्वांत मोठी आणि दूरची असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिसलेल्या या आकाशगंगेचे नाव ईजीएस8पी7 असे ठेवण्यात आले आहे. ही आकाशगंगा इतर आकाशगंगांच्या तुलनेत अत्यंत प्रकाशित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तप्त ताऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे,‘ असे सिरीओ बेली या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या संशोधकाने सांगितले आहे. या आकाशगंगेच्या विशेष वैशिष्ट्यामुळे यामध्ये इतरांच्या मानाने फार लवकर हायड्रोजन तयार झाला असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गृहितकानुसार, महास्फोटानंतर लगेचच विविध भारीत कण आणि फोटॉन्स यापासून विश्वाची निर्मिती सुरू झाली. विश्वाचे वय 50 कोटी ते एक अब्ज वर्षे या दरम्यान असताना पहिल्या आकाशगंगेची निर्मिती झाली. या सुरवातीच्या आकाशगंगांची वैशिष्ट्ये "ईजीएस8पी7‘मध्ये दिसत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
- गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कल्याण करया
विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांचा कार्यकाळ ५ मार्च, २०१४ला संपला.गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल आणि विद्यापीठांचे सी. विद्यासागर राव यांनी रविवारी डॉ. कल्याणकर यांची पाच वर्षांकरिता कुलगुरूपदी निवड जाहीर केली. डॉ. कल्याणकर नांदेडच्या नामांकित यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरूडॉ. विजय आईंचवार यांचा कार्यकाळ ५ मार्च, २०१४ला संपला. त्यानंतर डॉ. एम.जी. चांदेकर यांच्याकडे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार होता. डॉ. कल्याणकर यांनी १९५७ साली भौतिकशास्त्रात पीएच.डी. केली. २००३पासून ते यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संगणक विज्ञान अभ्यासक्रमाचे एम. फिल. संशोधक मार्गदर्शक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
- झुम्पा लाहिरी यांची राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड
भारतीय वंशाच्या अमेरिकन आणि पुलिस्त्झर
पारितोषिक विजेत्या झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीयमानवतावादी पदकासाठी निवड करण्यात आली आहे.
पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. मानवतावादी
लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी
निवड करण्यात आल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून
देण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण
केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे इतिहासकार, लेखक, तत्त्वज्ञ, तज्ज्ञ, परीरक्षक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अव्वल विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात येणार आहे. पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक 1996 मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत 175 जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानच्या दौऱ्यावर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज जपानच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांचा समावेश आहे. तसेच कोयासान आणि डॉ. आंबेडकर विद्यापीठात करार होणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) आणि मेट्रो प्रकल्पांसाठी जपानच्या व्यापार आणि आर्थिक व्यवहारविषयक विभागाशी राज्य शासनाचा करार होणे अपेक्षित आहे.
- 'गुगल इंडिया'कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी शिक्षकांची दखल :
शिक्षक दिनी यंदा 'गुगल इंडिया'कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी चार शिक्षकांची दखल घेण्यात आली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील प्रा. दीपक ताटपुजे तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव या दोन शिक्षकांचा समावेश आहे. सातारा येथील प्रा. दीपक ताटपुजे हे गेल्या 30 वर्षांपासून सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत. तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी संगणक क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना शिक्षणक्षेत्राला वाहिलेले संकेतस्थळ तयार केले आहे.
- विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात :
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे "नासा" या अमेरिकी संस्थेने स्टार ट्रेक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवकाशात काम करू शकणारा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात एका अमेरिकी कंपनीशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. अवकाशातील कुठलीही वस्तू हा बाहू पकडू शकेल, त्यात उपग्रहही पकडता येतील, उपग्रह किंवा अवकाश कचरा चक्क उचलून दूर करण्याचा मार्गही त्यात उपलब्ध असेल. नासाने त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या अॅर्क्स पॅक्स कंपनीशी करार केला असून त्या अंतर्गत 'बॅक टू फ्युचर' चित्रपटातील मार्टी मॅकफ्लायच्या तरंगणारा स्केटिंगबोर्ड तयार केला जाईल. त्यात विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जाणार आहे. तसेच यात हेंडो ओव्हरबोर्ड वापरला असून त्यावर काही इंजिनांच्या मदतीने विरूद्ध बाजूने चुंबकीय क्षेत्र खालून लावले जाते, त्यामुळे तो बोर्ड उंच उचलला जातो.
- भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच मॉजेन्स लायकेटॉफ्ट यांची भेट घेतली.
*मॉजेन्स लायकेटॉफ्ट हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. (२ दिवस)
*मॉजेन्स लायकेटॉफ्ट = संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ७० व्या अधिवेशनाचे अध्यक्ष
*या भेटीत स्वराज यांनी दहशतवादविरोधी करार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सुधारणा इ.ची जोरदार मागणी केली.
भारताच्या मागण्या:--
१. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सुधारणा :--
-जागतिक राजकारणात विकसनशील देशांचा वाटा वाढतो आहे. त्यामुळे त्याला अनुसरून भारताला आणि इतर विकसनशील देशांना जागतिक पटलावर योग्य स्थान मिळायला हवे.
-भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) कायम स्वरूपी सदस्य करून घ्यायला हवे.
२. दहशतवाद :--
-CCIT करार संमत व्हायला हवा.
-CCIT = ह्या करारानुसार दहशतवाद्यांवर बंदी घालणे, त्यांना निधी नाकारणे, देशात थारा न देणे इ. सर्व देशांना बंधनकारक होईल.
-हा करार भारताने १९९६ साली UN मध्ये मांडला होता.
मॉजेन्स लायकेटॉफ्ट बद्दल :--
-संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ७० व्याअधिवेशनाचे अध्यक्ष
-देश – डेन्मार्क*.ते डेन्मार्कचे माजी परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) ७० वे अधिवेशन :--
-राष्ट्र महासभेच्या (UNGA) ७० व्या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे –
-संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सुधारणा
-संयुक्त राष्ट्र शांतता अभियानाचे पुनर्विलोकन (REVIEW)
-हवामान बदल
-शाश्वत विकास अजेंडा २०३० चा स्वीकार आणि अंमलबजावणी
-ट्युनिस अजेंडा पुनर्विलोकन
- ताजा गणनेतील माहिती; भारतात सुमारे १४ हजार बिबटे
व्याघ्र गणनेचीच पद्धत वापरून देशात बिबट्यांचीही गणना करण्यात आली असता, यातून अतिशय आनंदाची बातमी बाहेर आली आहे. भारतात सुमारे १४ हजार बिबटे असल्याचे या गणनेत आढळून आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली आहे.
देशात किती बिबटे आहेत, याची मोजणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्याघ्र गणनेत जी पद्धत वापरण्यात आली, त्याच पद्धतीने बिबट्यांचे छायाचित्रण आणि त्यांच्या अस्तित्वाचे इतर पुरावे गोळा करण्यात आले.
व्याघ्र गणना मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्र देव यांच्या नेतृत्वात बिबट्यांची गणना करण्यात आली. यात देशाच्या विविध भागांत असलेल्या बिबट्यांची सविस्तर माहिती उपलब्ध झाली. शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत तसेच पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या सुमारे साडेतीन लाख किमी क्षेत्रफळ भागाचा यात अभ्यास करण्यात आला.
- नवी संघटना:- वूमन्स-२० (W20)
• आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी २० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली
• जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
• गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
• वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
वूमन्स-२० चे स्वरूप
• जी २० समुहात असणार्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील
• त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
• सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला
• राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील
सदस्य देश
अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राज़ील, कॅनाडा, चीन, फ़्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान मेक्सिको, रशिया , दक्षिण अफ़्रीका, सौदी अरेबिया दक्षिण कोरिया, तुर्कस्थान ,इंग्लंड ,अमेरिका आणी यूरोपीयन युनियन
- महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ यांनी केला :
वयाच्या 25व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ या आता 89 वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असेही रेकॉर्ड त्यांनी बनविले आहे. आज त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन 63 वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लहानपणी लिलिबेट अशा नावाने हाक मारली जाई. राणीपदावर असताना त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आहेत. आजवर 116 देशांना 265 भेटी देण्याचा त्यांचा विक्रम आहे. अमेरिकेच्या गेल्या 13 राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी 12 राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.
- गगन नारंग आशियाई नेमबाजी क्रमवारीत अव्वल :
भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने 50 मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले. नारंगने लंडन येथे 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने 626.3 गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत 185.8 गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.
32 वर्षीय नारंगचे आता 971 गुण झाले आहेत.
चीनच्या शेंगबो झाओने 896 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. तर पिस्तूल विभागात जितूने 1929 गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे. गुरप्रित सिंगने 25 मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.
- व्हिलर बेटाचे आता कलाम बेट म्हणून नामांतराची घोषणा :
क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island) म्हणून नामांतराची अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात 1993 मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले. कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या. ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला. या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.
- कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची 'ट्राय'ची सूचना :
मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर 'ट्राय'ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर 28 सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला 'ट्राय' दंड आकारते.
एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे 'ट्राय'चे म्हणणे आहे. 'ट्राय'ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.
- फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत 155 व्या स्थानावर :
फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत 155 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची 156 व्या स्थानावर घसरण झाली होती.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.
बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे
- निमलष्करी आणि केंद्रीय सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव
*निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचीकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहयांनी घोषणा केली.
*ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारोहात बोलत होते. सध्याच्या घडीला सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त५.०४ टक्केइतके आहे.
*केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकीमहिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे सीआयएसएफ हे पहिले दलआहे. सीआयएसएफमधील जवांनाची संख्या सध्या १.४७ लाख असून ती भविष्यात दोन लाख करण्याचा सरकारचा इरादा आहे.
- अनिरुद्ध काथिरवेलने "द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी" स्पर्धा जिंकली :
भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील "द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी" स्पर्धा जिंकली.या स्पर्धेचे बक्षीस 50 हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही दहा हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेला काथिरवेलचा मंगळवारी गौरव करण्यात आला.
ऑस्ट्रेलियातील स्पेलिंग बी स्पर्धेत अंतिम पाचमध्ये भारतीय वंशांची मुलगी अर्पिताने (वय 8) धडक मारली होती.
- ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधन ग्राफिनला :
ग्राफिनला लिथियमच्या अणूंचे आवरण देऊन भौतिकशास्त्रज्ञांनी त्याचे अतिवाहक रूप तयार केले आहे.
अतिवाहक हा असा पदार्थ असतो ज्यात विशिष्ट तापमानाला विद्युतरोध शून्य असतो, त्यामुळे सगळीच्या सगळी वीज ऱ्हास न होता वाहून नेली जाते.अतिवाहकता हा गुणधर्म ग्राफाईटमध्ये काही विशिष्ट त्रिमिती स्फटिकांना अल्कली धातूंच्या अणूंचे आवरण दिल्यास निर्माण होतो हे आधी माहिती होते, पण ग्राफिन म्हणजे एकस्तरीय कार्बनमध्ये अतिवाहकतेचा गुणधर्म निर्माण करता येऊ शकतो याची कल्पना नव्हती.तसेच त्यात इलेक्ट्रॉनिक्स व पूंज भौतिकीवर आधारित नॅनो उपकरणे तयार करणे शक्य होणार आहे.काही धातूंमध्ये अतिवाहकतेचा गुणधर्म केवल शून्य तापमानाच्या खाली तयार होतो.ग्राफिन हे पोलादापेक्षा 200 पट मजबूत असते.ग्राफिन हा कार्बन अणूंचा मधाच्या पोळ्यासारखा रचलेला एकच थर असतो.आता त्यामुळे अतिवेगवान ट्रान्झिस्टर (इलेक्ट्रॉनिक भाग), अर्धवाहक, संवेदक व पारदर्शक इलेक्ट्रोड तयार करता येणार आहेत.
- विराटला ट्विटरवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 80 लाखांच्या पुढे :
विराट कोहलीने कर्णधार बनल्यावर काही महिन्यांतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांना मागे टाकलेय.विराटला ट्विटरवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 80 लाखांच्या पुढे गेली आहे.त्याने सचिन आणि धोनीला मागे टाकले होते.ट्विटरवर सचिनचे 77 लाख फॉलोअर्स आहेत, तर धोनीचे सुमारे 45 लाख फॉलोअर्स आहेत.
- ओएनजीसीद्वारे व्हॅनकोरनेफ्ट मधील 15 टक्के हिस्सा खरेदी :
तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम 'ओएनजीसी विदेश लिमिटेड'ने रशियातील व्हॅन्कोर तेलक्षेत्रात कार्यरत व्हॅनकोरनेफ्ट या कंपनीचे 15 टक्के भांडवली समभाग 1.268 अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात ताब्यात घेतले आहेत.रशियातील सैबेरिया क्षेत्रात क्रॅस्नोयाक प्रदेशातील तुरुखान्स्की जिल्ह्यात व्हॅन्कोर हे तेलक्षेत्र आहे.रशियातील दुसरा मोठा तेलसाठा असलेले या क्षेत्राचे त्या देशाच्या एकूण तेल उत्पादनांत त्याचे 4 टक्के योगदान आहे.येथून दिवसाला 4.42 लाख पिंप म्हणजे दरसाल अडीच अब्ज पिंपे तेल मिळविता येईल आणि त्यापैकी 33 लाख टन उत्पादित तेल ओएनजीसी विदेशला प्रतिवर्षी प्राप्त होऊ शकेल.2013 मध्ये 'ओएनजीसी विदेश लिमिटेड'ने मोझांबिकमधील गॅस साठ्यासाठी 4.125 अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजले होते.तर 2009 मध्ये 2.1 अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजून रशियाची इंपेरियल एनर्जी कंपनी विकत घेतली होती.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण :
जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
जपानच्या नागरिकांना महाराष्ट्राने दिलेली ही अमूल्य भेट आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत अनुकूल नसल्याचे संशोधन :
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत हे ठिकाण फारसे अनुकूल नसल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. "हेल्पएज" या संस्थेने साऊथहॅंप्टन विद्यापीठाच्या संशोधनाने 'ग्लोबल एजवॉच इंडेक्स‘बाबत संशोधन केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. या संशोधनात जगातील विविध देशांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी असलेल्या अनुकूल परिस्थितीनुसार मानांकन देण्यात आले आहे. त्यामध्ये स्वित्झर्लंड सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. तर एकूण 96 देशांमध्ये भारत 71 व्या क्रमांकावर आहे. प्रत्येक देशामधील ज्येष्ठांसाठी आवश्यक ती सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. स्वित्झर्लंडनंतर नॉर्वे आणि स्विडनचा क्रमांक लागतो. तर जर्मनी चौथ्या क्रमांकावर तर कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नेदरलॅंड, आईसलॅंड, जपान, युएस, युके आणि डेन्मार्कचा क्रमांक लागतो.
- अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रायचौधरी यांच्या नियुक्ती :
अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी एचटी मीडिया लिमिटेडचे संचालक बिनॉय रायचौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा गुरुवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषदेत करण्यात आली. रायचौधरी यांचा कार्यकाळ 2015-16 असा एक वर्षाकरिता असेल. तसेच अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी आर.के. स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्रीनिवासन. के. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मीडिया ब्रँड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर सिन्हा यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे.
- युवा राष्ट्रकुल स्पर्धेत प्राचीआणि टेनिसच्या मुकुंद व वेणुगोपाल सुवर्णपदक :
युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महिलांच्या गटात भारताच्या प्राची सिंगने रिकर्व्ह प्रकारात आणि टेनिसच्या मिश्र दुहेरीत शशिकुमार मुकुंद व धृती टी. वेणुगोपाल यांनी धडाकेबाज खेळ करून सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने एकूण 17 पदकांसह पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.
- चर्चित पुस्तके’:
- " टू द ब्रिंक अॅड बँक: इंडीयाज १९९१ स्टोरी ":- जयराम रमेश
- " द इनसायडर " :- आकाश चोप्रा
- नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह‘ :- खुर्शिद कासुरी (पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री)
- एंड गेम:-मथ्यू ग्लास (अमेरिकेपाठोपाठचा दुसरा महाबलढ्य देश म्हणून उद्याला येणारा चीन २०१८ मध्ये अमेरिकच्या बाजारात हल्लाकल्लोळ करेल असे चित्रण या पुस्तकात केलेले आहे)
- ‘ह्य़ुब्रीस – व्हाय इकॉनॉमिस्ट्स फेल्ड टू प्रेडिक्ट दक्रायसिस अँड हाऊ टू अॅयव्हॉइड द नेक्स्ट वन’ :- मेघनाद देसाई
- लिअँडर पेस, मार्टिना हिंगीसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद :
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. पेस-हिंगीस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सॅंड्स आणि सॅम क्यूरी या जोडीचे आव्हान 6-4, 3-6, 10-7 असे मोडीत काढत विजय मिळविला. चौथे मानांकन असलेल्या या जोडीची बेथानी मॅटेक आणि सॅम क्यूरी यांच्याबरोबरील लढत तीन सेटपर्यंत चालली. अखेर पेस-मार्टिनाने अनुभवाच्या जोरावर तिसरा सेट 10-7 असा जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पेस-मार्टिना या जोडीने या वर्षभरातील ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिळविलेले हे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी टेनिसच्या इतिहासात 1969 मध्ये मार्टी रिसेन आणि मार्गारेट कोर्ट यांनी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली होती. त्यानंतर प्रथमच एखाद्या जोडीने वर्षात तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली आहेत. पेसने भारताच्याच महेश भूपतीच्या साथीने कारकिर्दीत सर्वाधिक 9 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेली आहेत.
- जया बच्चन, विजय दर्डा आणि सचिन तेंडुलकर नामनियुक्त :
प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य 28 खासदारांना 2015-16 या वर्षासाठी माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आले आहे. ही समिती सूचना व प्रसारण मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीची समीक्षा करेल आणि धोरणात्मक बदल सुचवेल. या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 'हाईक' मेसेंजरची एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध :
दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील 'हाईक' मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेनुसार 100 लोकांशी मोफत संपर्क होऊ शकेल. ही सुविधा अँड्रॉईडवर 4-जी आणि वायफायवर कार्यान्वित असेल. वर्ष अखेरीस ही सुविधा आयओएस आणि विंडोज यांच्या कक्षेत आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. तसेच दूरसंचार विभागाने (डीओटी) नेट तटस्थतेवरील आपल्या अहवालात ओटीटी शाखांद्वारे पेश केल्या जाणाऱ्या 'व्हाईस कॉलिंग' सुविधेला या नियमातहत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या नवीन सुविधेमुळे एक बटन दाबताच 100 लोकांशी आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी कोणतीही पिन, क्रमांक डायल करण्याची गरज नाही.
- मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध :
मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावल्याचा दावा येथील काही संशोधकांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेमधील एका दुर्गम भागातील अंधाऱ्या गुहेत सापडलेल्या हाडांच्या सांगाड्याच्या अभ्यासावरून त्यांनी हा दावा केला आहे. संशोधकांनी या प्रजातीचे नाव "होमो नालेदी" असे ठेवले आहे. "होमो नालेदी"मध्ये विकसित होत असलेला मानव आणि प्राथमिक पातळीवरील मानवाची वैशिष्ट्ये आढळून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जोहान्सबर्गपासून जवळ असलेल्या गुहेत दोन वर्षांपूर्वी संशोधकांना हाडांचे सुमारे1,550 नमुने सापडले. ही एकूण 15 व्यक्तींची हाडे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, "होमो नालेदी" हा दोन्ही पायांवर ताठ उभा राहून चालत होता. त्याच्या हात आणि पायाच्या हाडांची रचना "होमो" या विकसित होत असलेल्या मानवाशी मिळतीजुळती असून, खांदे आणि कवटीची रचना मात्र आदिमानवाप्रमाणे आहे. त्याचा मेंदू लहान होता. "होमो नालेदी"चे मूळ "होमो"कुळातच असून, सापडलेली हाडे 25 ते 28 लाख वर्षांपूर्वीची आहेत, असे संशोधकांच्या गटाचे प्रमुख ली बर्जर यांनी सांगितले.
- चर्चित व्यक्ती:
1) राणी एलिझाबेथ:-
- ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ सम्राज्ञी राहण्याचा विक्रम केला आहे.
- त्यांनी २३२२६ दिवस इतका काळ हे पद भूषवले
- त्यांनी विन्स्टन चर्चिल यांच्यासह बाराहून अधिक पंतप्रधान पाहिले तसेच त्यांनी त्यांच्या काळात अमेरिकेचे बारा अध्यक्ष व सात पोप पाहिलेत्यांचा परिचय
- २१ एप्रिल १९२६ : युवराज्ञी एलिझाबेथ अलेसांद्रा मेरी यांचा जन्म. राजे जॉर्ज (सहावे) व राणी एलिझाबेथ यांची कन्या.
- ९ सप्टेंबर २०१५: राणी व्हिक्टोरिया यांना मागे टाकून सर्वाधिक काळ ब्रिटनची सेवा करण्याचा विक्रम.
२) झुम्पा लाहिरी
- भारतीय वंशाच्या अमेरिकन आणि पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड करण्यात आली
- मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली
- लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतीलवितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केलेले आहे
- पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले होतेपरिचय
- झुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्ये एका बंगाली कुटुंबामध्ये झाला आहे.
- या लेखिकेची इंटरप्रिटर ऑफ मालदीवज, द नेमसेक, द लोलॅंड इत्यादी पुस्तके भारतात आणि परदेशात ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.
- त्यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात पुलित्झर पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. तसेच त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट बनवला आहे.
३) उदय प्रकाश
- कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत व लेखक, संशोधक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला
- २०१०मध्ये त्यांना मोहन दास या संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.
- चर्चित गाव/शहर:
१) माळेगाव (ता. सिन्नर)
- मासिक धर्माच्या काळात महिलांना लागणारे सॅनिटरी नॅपकीन सहजगत्या आणी स्वस्तदरात उपलब्ध व्हावे यासाठी माळेगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला
- बंगळूरू येथील खासगी कंपनीच्या सहकार्यातून गावात दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनसाठी एटीम सुविधा उपलब्ध करून दिली आहे
- अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे
2) इस्लामपूर
- फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली
- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे दीड लाख लोकवस्तीचे शहर. या शहराला नवी ओळख मिळालीय. इस्लामपूर हे देशातलं पहिलं ४ जी वायफाय शहर बनंलयं.
- रिलायन्स जिओच्या मदतीनं इस्लामपूर नगरपालिकेने नागरिकांसाठी फोर जी वायफाय सुविधा उपलब्ध केली
✈3) व्हिलर द्विप:-
- जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
- बीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.
- व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.
- योजना: सार्वभौम सुवर्ण हमी रोखे:
• सोने खरेदीतील गुंतवणूक चलनात यावी, यासाठी सरकारने"सॉव्हरीन गोल्ड बॉंड‘ (सार्वभौम सुवर्ण हमी रोखे) आणण्याचा निर्णय घेतला
• यातून सोन्याची बिस्किटे आणि नाणी खरेदी पोटी दरवर्षी 300 टन सोन्याची मागणी नियंत्रित करता येईल, असा सरकारचा अंदाज
• केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंक हे "सार्वभौम सुवर्ण हमी रोखे‘ बाजारात आणेल.
• यामुळे गुंतवणूकदारांनासोन्याऐवजी दोन ग्रॅम, पाच ग्रॅम, दहा ग्रॅम, 100 ग्रॅम नाण्यांच्या किमतीच्या प्रमाणातील सुवर्ण रोखे खरेदी करता येतील.
• वर्षभरात प्रतिव्यक्ती 500 ग्रॅमपर्यंतचेच सुवर्ण रोखे घेता येतील. शिवाय या रोख्यांवर व्याज मिळेल.
• पाच ते सात वर्षे मुदत असेल आणि मुदतीनंतर बॅंकांमध्ये या रोख्यांवर सोन्याच्या बाजारभावाएवढी रक्कम परतावा म्हणून मिळेल.
• डीमॅट आणि पेपर अशा दोन्ही स्वरूपात हे रोखे मिळतील. बॅंका, बॅंकेतर वित्तीय संस्था, टपाल कार्यालये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र प्रतिनिधींमार्फत रोख्यांची खरेदी आणि विक्री करता येईल. शिवाय हे रोखे कर्जासाठी तारण म्हणूनही मानले जातील.
- महत्वाच्या निवडी :-
१) जे. मंजुळा:-
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली
- या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
- मंजुळा यांनी बंगळूरमधील "डिफेन्स ऍव्हिओनिक्सत रिसर्च सेंटर‘मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
- मंजुळा यांना उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉिनिक्सं अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व 2011 मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे
२) डॉ. नामदेव कल्याणकर:-
- गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध सुरू होता.
- पूर्णवेळ कुलगुरूंच्या निवडीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार आणि गोव्याचे डॉ. रेड्डी यांचा समावेश होता
- चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासासाठी 2011 मध्ये या नव्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
३) अहमद जावेद :-
- मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली
- १९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
- १८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- ते पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.
थोडक्यात महत्वाचे:
- कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची निवड करण्यात आली ? गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध सुरू होता. यासाठी पूर्णवेळ कुलगुरूंच्या निवडीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती :- गोंडवाना
- मासिक धर्माच्या काळात महिलांना लागणारे सॅनिटरी नॅपकीन सहजगत्या आणी स्वस्तदरात उपलब्ध व्हावे यासाठी कोणत्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून त्यासाठी गावात सॅनिटरी नॅपकीनसाठी एटीम सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली ? :-माळेगाव (ता. सिन्नर)
- भारतीय कोणत्या organisation ने ध्येयवादी नायक ,प्रेरणादायी कथा यांच्या अमर चित्रकथा कथा व Aan कॉमिक्सचे प्रकाशन केले:- भारतीय लष्कर
- "Ekuverin-सहा हे संयुक्त लष्करी प्रशिक्षण कोणत्या दोन देशात आयोजीत केले होते :-भारतीय आणि मालदीव (सप्टेंबर १३,२०१५ ते ऑगस्ट ३१, २०१५ दरम्यान त्रिवेंद्रम, केरळ येथे आयोजित केले होते)
- जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यांनी अलीकडेच' कोणत्या देश माता आणि नवजात धनुर्वात मुक्त देश म्हणून घोषित केले आहे' :- भारत
- कोणत्या बँकने अलीकडेच "IndPay" मोबाइल सेवा सुरू केली:-इंडियन बँक
- भारताने कोणत्या देशाला वराह हे गस्त जहाज भेट म्हणून दिली आहे;-श्रीलंका
- भारतीय रेल्वेने महिलाच्या सुरक्षेसाठी कोणते मोबाईल App प्रदर्शित केले :- आर-मित्रा
- 2016 जानेवारी महिन्यात भारतात जानेवारी २०१६ मध्ये आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय सीफुड शो कोणत्या शहरात होणार आहे ? :- चेन्नई
- सरकारी बँकाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम आखली आहे ?:- इंद्रधनुष्य (१३ ऑगस्ट २०१५)
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी कोणाची यांची निवड करण्यात आली असून, त्या या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या :- जे. मंजुळा
- जागतिक आरोग्य संघटना १० सप्टेंबर हा दिवस------------------म्हणून पाळला जातो ? :- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन(या वर्षीची थीम:- आत्महत्या प्रतिबंध लोकापर्यंत पोचणे आणी जीव वाचविणे)
- निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील किती' टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. :- ३३.
- वूमन्स-२० ची पहिली परिषद ------- येथे ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार आहे:- इस्तुंबूल
- --------यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्त, म्हणून महाराष्ट्र शासनाने निवड केली ;- अहमद जावेद(अहमद जावेद हे मुंबईचे 39 वे पोलिस आयुक्त आहे. जावेद येत्या 31 जानेवारी 2016ला सेवा निवृत्त होणार आहेत 1 ते 980 च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी आहे)
- ---------------यांना अत्यंत प्रतिष्टेचा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला ? ;-डॉ. विकास आमटे
- आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी २० समुहाने -------गटाची स्थापना केली :- वूमन्स-२०
- सोने खरेदीतील गुंतवणूक चलनात यावी, यासाठी सरकारने "---------- योजना आणण्याचा निर्णय घेतला :-सॉव्हरीन गोल्ड बॉंड‘ (सार्वभौम सुवर्ण हमी रोखे)(यामुळे गुंतवणूकदारांना सोन्याऐवजी दोन ग्रॅम, पाच ग्रॅम, दहा ग्रॅम, 100 ग्रॅम नाण्यांच्या किमतीच्या प्रमाणातील सुवर्ण रोखे खरेदी करता येतील.)
- भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा ----------- हिने ऑस्ट्रेलियातील "द ग्रेट ऑस्ट्रे लियन स्पेलिंग बी‘ स्पर्धा जिंकली.:-अनिरुद्ध काथिरवेल
- तिबेटचे चीनबरोबर एकत्रीकरण होण्याच्या घटनेस ९ सप्टेंबर रोजी किती वर्ष पुर्ण झाली :- पन्नास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा