Post views: counter

Current Affairs Sept 2015 Part - 4


  • काही नवीन योजना:- श्या:माप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘


 योजना(एसपीएमआरएम)

•स्मार्ट सिटी‘ योजनेच्या पाठोपाठ आता स्मार्ट गावे तयार करण्यासाठी व शहरांकडील स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशाने देशाच्या 300 विभागांत स्मार्ट गावे निर्माण करण्याची श्याशमाप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘ योजना (एसपीएमआरएम) सरकारने घोषित केली
•स्मार्ट गाव योजनेसाठी केंद्राकडून 5142 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद
•यासाठी 300 विभाग आहे त्यातील गावांची संख्या धरली तर हजारो गावे या योजनेत समाविष्ट होतील
* पहिल्या टप्प्यात 100 विभाग केले जातील. एकेका विभागात मिळून गावांची एकूण लोकसंख्या 25 ते 50 हजार व दुर्गम तसेच वाळवंटी भागात पाच ते 15 हजार अशी अट असेल
•गावांना स्मार्ट बनविण्यासाठी 15 ठळक निकष  आहे ग्रामीण भारताचा आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा या तिन्ही बाजूंनी सर्वंकष विकास करण्यासाठी नवी योजना सरकारने घोषित केली आहे. यात पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, इंटरनेट सुविधा, तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासह त्याबाबतच्या संधी, शेतमालासाठी सुलभतेने बाजारपेठ मिळवून देणे आदींचा समावेश असेल.
•ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास करणार
•गावांचा विकास करण्यासाठी राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव व संभाव्य गावांची नावे पाठवायची आहेत

  • 'नासा'कडून छायाचित्रे प्रसिद्ध :


अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. "नासा"च्या न्यू हॉरिझॉन या अवकाश यानाने घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये प्लुटोवर हिमशिखरे, पठारे आणि धूसर वातावरण असल्याचे दिसून आले आहे. या नव्या छायाचित्रांवरून प्लुटोवरील वातावरण पृथ्वीसारखेच दिसत असून, जलचक्रासमान प्रक्रिया
होत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. प्लुटोवर लांबच लांब पठारी प्रदेश दिसत असून, अंदाजे अकरा हजार फूट उंचीचे पर्वत असलेला प्रदेशही दिसत आहे. तसेच या पर्वतांवर हिमनद्या असल्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. प्लुटोची छायाचित्रे पाहताना आपण पृथ्वीकडेच पाहत आहोत असा आभास होतो, असे या मोहिमेतील शास्त्रज्ञ डॉ. ऍलन स्टर्न यांनी म्हटले आहे. न्यू हॉरिझॉनने 14 जुलैला सुमारे अकरा हजार मैल अंतरावरून सूर्यास्तावेळी ही छायाचित्रे घेतली आहेत. प्लुटोच्या सर्वांत खालच्या वातावरणात धूळ आणि इतर कणांचे धूसर वातावरण असल्याचे दिसून येत आहे. प्लुटोच्या पृष्ठभागापासून 60 मैल उंचीपर्यंत अशा वातावरणाचे अंदाजे बारा थर असल्याचेही आढळून आले आहेत.प्लुटोवर जलचक्र असल्याचे पुरावे या छायाचित्रांवरून मिळत असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्लुटोवर आढळून आलेल्या पर्वतांना नोर्गे मॉंटस्‌ आणि हिलरी मॉंटस्‌ अशी नावे देण्यात आली आहेत. पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणाऱ्या शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांच्यावरून ही नावे देण्यात आली आहेत.

  • फेसबुकने "सिग्नल" ऍप केले सुरू :


फेसबुकवर सुरू असलेले ट्रेंडस्‌, फोटोज्‌, व्हिडिओ आदींबाबत बातमीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देण्यासाठी फेसबुकने नुकतेच "सिग्नल" ऍप सुरू केले आहे. माध्यमांना सातत्याने माहितीच्या स्रोताची आवश्‍यकता असते. यासाठीच जगभरातील काही पत्रकारांनी बातमीसाठीची महत्त्वाची माहिती पत्रकारांना उपलब्ध करून देण्याबाबत फेसबुकला कळविले होते. त्यास प्रतिसाद देत फेसबुकनेही "सिग्नल" ऍप सादर केले आहे. या ऍपद्वारे फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवरील सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा तसेच इतर सर्व विषयांवर बातमीच्या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. फेसबुकचे हे ऍप पत्रकारांच्या एका समुदायाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आल्याचेही फेसबुकने कळविले आहे. विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी व्यक्तींनी फेसबुकवर मांडलेले मत, फेसबुकवर चर्चेत असलेला विषय, त्यासंबंधीचा व्हिडिओ, छायाचित्रे आदी माहिती या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहे.

  • मुंबईत "बॅंक ऑफ चायना"ची भारतातील पहिली शाखा सुरू :

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत "बॅंक ऑफ चायना"ची भारतातील पहिली शाखा सुरू झाल्यास भारत आणि चीन या देशांचे आर्थिक आणि औद्योगिक संबंध वृद्धिंगत होतील. त्यामुळे बॅंकेच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बॅंक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला दिले. बॅंक ऑफ चायना ही चीनमधील अग्रेसर बॅंक आहे. या बॅंकेच्या पर्यवेक्षकीय बोर्डचे संचालक ली जून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. "मेक इन महाराष्ट्र"अंतर्गत राज्यातील गुंतवणूकवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह नुकताच चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनुसार "बॅंक ऑफ चायना" मुंबईत आपली शाखा सुरू करीत आहे. मुंबईसह राज्यात विविध चिनी उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकेच्या राज्यातील शाखेमुळे भारत-चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळणार आहे.


  • फिफा महासचिव जेरोम वाल्के निलंबित :

तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाला वेग यावा, यासाठी अटकेत असलेल्या फिफा उपाध्यक्षांना अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास मात्र स्वित्झर्लंडने नकार दिला. विश्वचषकाच्या तिकीट विक्रीतील घोटाळ्यात सामील असल्याचा वाल्के यांच्यावर आरोप आहे. तिकिटांच्या कमाईचा मोठा वाटा त्यांच्या खात्यात वळता करण्यात आल्याची चर्चा आहे. 2014 च्या विश्वचषक फुटबॉलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या एका कंपनीतील अमेरिकेचे सल्लागार बेली एलिन यांनी घोटाळ्याची चर्चा होताच हा करार नंतर रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन 4 ऑक्टोबरला :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला होणार आहे. इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम एका फ्रेंच कंपनीला आणि मुंबईतील प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आले होते. दोघांनीही आपले आराखडे सादर केले आहेत. प्रभू यांनी स्मारकाच्या कामासाठी 425 कोटी रुपये खर्च येईल, असे नमूद केले होते. स्मारकामध्ये भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा, समृद्ध ग्रंथालय, बौद्ध स्तूप आदींचा समावेश असेल. तसेच लंडनमध्ये डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य होते ती वास्तू खरेदी करण्यासाठीची रक्कम घरमालकाला राज्य शासनाकडून सोमवारी अदा करण्यात येणार आहे.

  • आयएनएस  अध्यक्षपदी पी. व्ही. चंद्रन यांची निवड :

दि इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) 76व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 'मातृभूमी' वृत्तपत्र समूहाचे पी. व्ही. चंद्रन यांची 2015-16 या वर्षांकरिता अध्यक्षपदी निवड झाली. 'राष्ट्रदूत' साप्ताहिकाचे सोमेश शर्मा यांची डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून, 'बिझिनेस स्टँडर्ड'च्या अकिला उरणकर यांची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तर मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स) यांची मानद कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. व्ही. शंकरन हे नवे सरचिटणीस असतील. तसेच किरण बी. वडोदरिया यांच्या जागी निवड झालेले चंद्रन हे मातृभूमी वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. अनेक वर्षांपासून 'आयएनएस'च्या कार्यकारी समितीवर असलेले चंद्रन हे 2013-14 मध्ये संघटनेचे व्हाइस प्रेसिडेंट, तर 2014-15 साली डेप्युटी प्रेसिडेंट होते.




  • गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प:-

आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा भारर्तातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे नदीजोड प्रकल्पाच्या आधारे गोदावरी नदीच्या पोलावरम कालव्याच्या माध्यमातून ८० टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. भविष्यात यामुळे जवळपास १७ लाख एकर जमिनीचे सिंचन होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा, गुंटूर, अनंतपूर, चित्तूर आणि प्रकाशम या जिल्ह्यातील शेतकऱयांनाही याचा फायदा होणार आहे. आगामी काळात आंध्र प्रदेशातून वाहणाऱया कृष्णा-पेन्नार, पेन्नार-तुंगभद्रा या मोठ्या नद्यांसोबत देशभरातील एकूण ३० नद्यांना एकमेकांसोबत जोडण्याचा सरकारचा मानस आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :-

  1. 174 किमी : अंतर कापून गोदावरीचे पाणी कृष्णेला मिळणार
  2. 1,427 कोटी : पट्टीसीमा प्रकल्पाचा खर्च
  3. पुढील वर्षापर्यंत 24 जनित्रे बसवून गोदावरीचे पाणी
  4. पोलावरमच्या उजव्या कालव्यात सोडणार
फायदा :-
  1. कृष्णेच्या त्रिभूज प्रदेशाला सिंचन करण्याचा श्रीशैलम धरणावरील भार कमी होणार
  2. श्रीशैलमचे पाणी रायलसीमा भागाकडे वळवता येणार
  3. वळविण्यात येणाऱ्या 80 टीएमसीपैकी 10 टीएमसी पाणी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी
  4. 70 टीएमसी कृष्णा आणि गोदावरी जिल्ह्यातील सिंचनासाठी
  5. याद्वारे सात लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार



  • चर्चितील राज्य/ शहर

केरळ:-

•महिला प्रधान चित्रपट निर्मतीसाठी देशातील महिला चळवळीससुरुवात झाली
•या राज्यात फिमेल फिल्म सोसायटी या नावाने संस्थेची स्थापना केली त्या अंतर्गत महिलाप्रधान चित्रपटाना प्रोत्साहन दिले जाणार आहे

हॅंगझू:-
•चीनमधील हॅंगझू या शहरात २०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्याचा निर्णय आशियाई ऑलिंपिकसमितीच्या सदस्यांनी घेतला.
•पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये इंडोनेशिया येथे होणार आहेत.


  • नोटाला मिळाले चिन्ह 

राजकीय पक्षांप्रमाणेच आता नोटालाही आता स्वतंत्र चिन्ह मिळाले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावर हे चिन्ह वापरण्यात येणार आहे. मतदान यंत्रावर काळया रंगाची फुली हे नोटाचे चिन्ह असेल. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईनने हे चिन्ह तयार केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 2013मध्ये निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर सर्वात शेवटी नोटाचा समावेश केला होता. 2014मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 60 लाख मतदारांनी नोटाचा वापर केला होता. मात्र, त्यावेळी नोटाला स्वतंत्र चिन्ह देण्यात आले नव्हते.





  •  महत्वाचे विविध अहवाल:-

#संयुक्त राष्ट्रांचा अहवाल बाल मृत्युदर:-

•संयुक्त राष्ट्रांच्या बालक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत बालमृत्यूबाबत एक अहवाल तयार करण्यात आला त्यानुसार
•पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अत्यांतिक गरिबी, सकस आहार न मिळणे आदी कारणांमुळे अनेक देशांत ०-५ वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो. नव्वदच्या दशकात आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बालमृत्यू होण्याची संख्या अधिक होती. मात्र २५ वर्षांनंतर ही परिस्थिती बदलली आहे. आता जगभरातील बालमृत्यूची संख्या निम्म्याने कमी झाली आहे., असे या अहवालात म्हटले आहे
•१९९०मध्ये ०-५ वयोगटातील एक कोटी २७ लाख मुलांचा मृत्यू झाला होता मात्र २०१५ म्हणजेच यावर्षी हा आकडा ६० लाखांच्या खाली आहे. म्हणजेच बाल मृत्युदरात ५३ टक्क्यांची घट झाली आहे.
•‘‘१९९० ते २०१५ या कालावधीत जगभरातील बाल मृत्युदराची संख्या ६६ टक्क्यांनी कमी करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष्य होते. परंतु हे लक्ष्य साध्य झाले नाही ते प्रमाण ५३ टक्के वर स्थिर

  1. दररोज जगभरात ०-५ वयोगटातील १६००० मुलांचा मृत्यू होतो.
  2. न्यूमोनिया, अतिसार, मलेरिया आदी विकारांमुळे बालमृत्यू होत असल्याचे चित्र आहे.
  3. जगभरातील ५० टक्के बालमृत्यू कुपोषणामुळे होत आहेत.
  4. जन्मत:च काही दिवसांत मृत्यू येणे हीही मोठी समस्या आहे.
  5. आफ्रिका खंडात दर १२ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. विकसित व विकसनशील देशांमध्ये दर १४७ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो.
  6. सर्वाधिक बालमृत्यू असणारे देश : अंगोला, सोमालिया, चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.
  7. कमी बालमृत्यू असणारा देश : लक्समबर्ग, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे.


#वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-२०१५’:- 


  1. कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-२०१५’ या अहवालात जगभरातील गर्भश्रीमंताची यादी जाहीर करण्यात आली
  2. या अहवालानुसार २०१४ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीनुसार भारतात १,९८,००० लक्षाधीश होते.
  3. जगामध्ये सर्वाधिक लक्षाधीश असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा ११ वा क्रमांक लागतो.
  4. यापूर्वी २०१३ मध्ये ही संख्या १,५६,००० इतकी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या घसरलेल्या किंमती आणि देशात झालेल्या ऐतिहासक सत्तापालटामुळे भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आले


#जागतिक बँके अहवाल:-


  1. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्राचा आठवा क्रमांक लागला
  2. बँकेने दिलेल्या मानांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेला गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर गेला असून अरुणाचल प्रदेश यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
  3. या राज्यांना लालफीतशाहीचा अडथळा दूर करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवली जाते.
  4. मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी १८९ देशांमध्ये पाकिस्तान व इराणनंतर भारताचा असलेला १४२ वा क्रमांक २०१७ पर्यंत ‘टॉप ५०’पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.



  • चर्चितील खेळाडू:-

१)मनप्रीत कौर:-

•रेल्वेच्या गोळाफेक प्रकारातील खेळाडू मनप्रीत कौर हिने रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध केली. कोलकता येथे सुरू असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय खुल्या अथलेटिक्से स्पर्धेत तिने १८ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली.
•तीन वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या मनप्रीत हिने १७.९६ मीटर गोळा फेकला.. तिने या कामगिरीने १९९७ मध्ये हरबन्स कौर हिने नोंदविलेला विक्रम अर्ध्या मीटरने मागे टाकला. तिने १७.१९ मीटरच्या कामगिरीने सुरवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने १७.९६ मीटर अशी विक्रमी फेक केली. आणखी एका प्रयत्नात तिने १७.३० मीटर गोळा फेकला.

२)नरसिंग यादव:-

* मुंबईच्या नरसिंग यादवने जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्रान्सच्या झेलिमखान खादिजेव याला हरवून जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले
* जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकून ऑलिंपिक पात्रता मिळविलेला नरसिंग हा भारताचा पहिलाच कुस्तीगीर ठरला

३)युकी भांब्री:-

•शांघाय एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या युकी भांब्रीने जागतिक क्रमवारीत दमदार झेप घेतली.
•युकीने वीस स्थानांनी सुधारणा करत १२५वे स्थान पटकावले आहे. कारकीर्दीत क्रमवारीत युकीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
•यंदाच्या हंगामाअखेर अव्वल शंभर खेळाडूंत स्थान पटकावण्याचे युकीचे उद्दिष्ट आहे.


  • चर्चेतील व्यक्ती:-

संजीव साहोटां:-

  1. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मॅन बुकर पुरस्कारासाठी सहा लेखकांच्या नावांच्या नामांकनांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक संजीव साहोटा यांचा समावेश करण्यात आला आहे.
  2. कादंबरी या साहित्य प्रकारासाठी (२०१५) सहा लेखकांची निवड करण्यात आली आहे.
  3. साहोटा यांचा जन्म डर्बिशायर परगण्यात झाला असून त्यांनी ‘दी इअर ऑफ द रनवेज’ या पुस्तकात एकाच घरात राहणाऱ्या, परिस्थितीमुळे एकत्र आलेल्या १३ व्यक्तींच्या कुटुंबाची कहाणी सादर केली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन :

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया (वय 75) यांचे निधन झाले.
 हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 दालमिया यांनी सुमारे तीन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटचे प्रशासक म्हणून काम पाहिले.
 तसेच याचवर्षी मार्चमध्ये ते दुसऱ्यांदा "बीसीसीआय"चे अध्यक्ष झाले होते.
 त्यांनी "आयसीसी"चे अध्यक्षपदही भूषविले आहे.

  • बरोलिया गाव मनोहर पर्रीकर यांनी घेतले दत्तक :

पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यापाठोपाठ केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील गाव दत्तक घेतले आहे. राहुल यांच्या अमेठी मतदारसंघातील बरोलिया गाव पर्रीकर यांनी पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे.

  • विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन केले तयार :

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचा विद्यार्थी पॅडी न्यूमन याने विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन तयार केले असून त्याने नासाचे सध्याचा इंधनाचा कमाल वापर करण्याचा विक्रम मोडीत काढल्याचे समजले जात आहे. न्यूमन हा विद्यापीठाचा भौतिकशास्त्राचा डॉक्टरेटचा विद्यार्थी आहे. आयन प्रोपल्शन (विद्युतभाराने पुढे ढकलणे) हे असे तंत्रज्ञान आहे की त्यात अंतरीक्ष यान पुढे ढकलण्यासाठीच्या वायूचे विद्युतभारित कणांत रूपांतर होते. अंतराळ यानाला प्रेरक शक्ती म्हणून पारंपरिक रासायनिक गॅसचा वापर करण्याऐवजी गॅस झेनोन (हा गॅस न्यूआॅन किंवा हेलियमसारखा; परंतु जड असतो) विजेची शक्ती देतो किंवा विद्युतभारित कणांत रूपांतर होतो. नासाचा सध्याचा इंधनाच्या कमाल वापराचा विक्रम हाय पॉवर इलेक्ट्रिक प्रॉपल्शन (एचआयपीईपी) सिस्टीमचा आहे. ही सिस्टीम निश्चित अशा प्रेरक शक्तीचे 9,600 (प्लस/मायनस 200) सेकंद देते. पॅडी न्यूमनने हीच शक्ती 14,690 (प्लस/मायनस 2,000) एवढी विकसित केली


  • नेपाळने केला पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही नव्या घटनेचा स्वीकार :


सात वर्षे सखोल विचारविनिमय केल्यानंतर नेपाळने रविवारी पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही अशा नव्या घटनेचा स्वीकार केला. संसदेने मंजूर केलेली आणि संसदेच्या अध्यक्षांनी अधिप्रमाणित केलेली नेपाळची घटना रविवार, 20 सप्टेंबर 2015 पासून नेपाळच्या जनतेसमोर लागू होत आहे, अशी घोषणा अध्यक्ष रामबरन यादव यांनी संसदेत या कायद्याचे अनावरण करताना केली. 67 वर्षांच्या संघर्षांनंतर निर्वाचित लोकप्रतिनिधींनी तयार केलेली ही पहिलीच घटना आहे. नव्या घटनेवर संसदेच्या (काँस्टिटय़ुअन्ट असेंब्ली) ६०१ सदस्यांपैकी ८५ टक्के सदस्यांनी शिक्कामोर्तब केले असून, तीत द्विसदनी कायदानिर्मितीची (बायकॅमेरल लेजिस्लेशन) तरतूद आहे.कनिष्ठ सभागृह किंवा लोकप्रतिनिधींच्या सभागृहात ३७५, तर वरिष्ठ सभागृहात ६० सदस्य असतील.नव्या घटनेचे ३७ विभाग, ३०४ अनुच्छेद व ७ पूरक अंश आहेत.नव्या रचनेतील सात प्रांतांना एक उच्चस्तरीय आयोग एका वर्षांच्या आत अंतिम रूप देणार आहे.


  • ✈जपानने सैन्य परदेशात पाठवण्यास दिली परवानगी :

जपानने सत्तर वर्षांनी प्रथमच आपले सैन्य परदेशात लढण्यासाठी पाठवण्यास परवानगी दिली आहे.
 त्याबाबतची वादग्रस्त सुरक्षा विधेयके तेथील संसदेने शनिवारी पहाटे मंजूर केली.
 देशातील लष्करावर असलेले र्निबध शिथिल करण्याच्या उद्देशाने खासदारांनी ही विधेयके मंजूर केली आहेत.
 ही विधेयके मंजूर झाल्याने आता जपान हा देश त्यांचे सैन्य मित्र देशांच्या संरक्षणासाठी पाठवू शकेल.

  • अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आणण्याबाबत चर्चा सुरू :

ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आणण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. समाज कल्याण खात्याकडे याची जबाबदारी असून, कायदा अस्तित्वात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री एच. आंजनेय यांनी सांगितले आहे. अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या आधारे फसवणूक करण्यावर नियंत्रण मिळविण्याचा उद्देश यामागे आहे. राष्ट्रीय कायदा शाळा, राज्य कायदा विद्यापीठाने अंधश्रद्धा निर्मूलन मसुदा तयार केला आहे. यासंबंधीची पाहणी करण्याची सूचना न्यायमूर्ती एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखालील कायदा आयोगाला देण्यात आली आहे. या आयोगाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा आवश्‍यक असल्याचे सांगून समाज कल्याण खात्याला अहवाल दिला आहे.

  • जगाची अर्धी लोकसंख्या अद्यापही इंटरनेटपासून दूर :
जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग मंदावत असून जगाची अर्धी लोकसंख्या अद्यापही इंटरनेटपासून दूर आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या ब्रॉडबॅंड आयोगाने दिला आहे.
 सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमाल पातळीवर पोचले असून, त्यात आता फारशी वाढ होत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.  जगातील 48 गरीब देशांमधील 90 टक्के जनता इंटरनेटच्या वापरापासून दूर आहे.
 मागील वर्षी इंटरनेट वापराच्या वाढीचा वेग 8.6 टक्के होता. तो यंदा 8.1 वर येण्याची शक्‍यता अहवालात व्यक्त केली आहे.
 2012 पर्यंत हा वेग दहा टक्‍क्‍यांच्या वर होता.
 सध्याचा वेग पाहता जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार अब्जांवर नेण्याचे उद्दिष्ट 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी असल्याचे अहवाल सांगतो. तसेच, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी नियमित वापर असणाऱ्यांची संख्याही बरीच कमी आहे. पायाभूत सुविधांचा वाढता खर्च आणि मोबाईलची घटलेली मागणी यामुळे वेग मंदावल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. सध्या जगातील 43.4 टक्के नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय आहे. संयुक्त राष्ट्र संघाला ही संख्या 60 टक्‍क्‍यांपर्यंत न्यायची आहे. गरीब देशांमध्ये पुरुषांपेक्षा 25 टक्के कमी महिलांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय उपलब्ध आहे. जगातील ज्ञात 7,100 भाषांपैकी फक्त पाच टक्के भाषांचेच प्रतिनिधित्व इंटरनेटवर होते.

  • नासा-हनीबी रोबोटिक्सचा करार :

आपल्या पृथ्वीच्या भोवती अनेक लघुग्रह फिरत आहेत. त्यातील एखादा जरी मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तरी धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी क्षेपणास्त्राने त्याची दिशा बदलणे किंवा त्याचे तुकडे करणे अशा अनेक कल्पना आतापर्यंत मांडल्या गेल्या आहेत. या लघुग्रहांवर यान उतरवण्याच्याही कल्पना मांडल्या गेल्या. त्यामुळे तेथे खाणकाम करून खनिजे मिळवणेही शक्य आहे, पण त्यासाठी तो लघुग्रह किती दणकट आहे हे बघण्यासाठी नासाने ब्रुकलिनच्या एका कंपनीबरोबर करार केला आहे. यात अवकाशात चालवता येणारी शॉटगन तयार केली जाणार आहे. तिच्या मदतीने तो लघुग्रह नमुने घेण्यास किंवा खाणकाम करण्यास योग्य आहे की नाही हे ठरवता येणार आहे. शिवाय तो पृथ्वीवर आदळणार असेल तर त्याची कक्षा बदलून टाकता येणार आहे. ही बंदूक हनीबी रोबोटिक्स ही ब्रुकलिन नेव्ही यार्ड येथील कंपनी नासाच्या अ‍ॅस्टेरॉईड रिडायरेक्शन प्रकल्पांतर्गत तयार करीत आहे. या बंदुकीच्या मदतीने लघुग्रहाला तो पृथ्वीवर आदळण्याच्या स्थितीत असेल तर चंद्राच्या कक्षेत ढकलता येणार आहे. मंगळावर जाण्याची मोहीम राबवली जाईल तेव्हा एवढय़ा मोठय़ा अंतरात अवकाशवीरांना एक थांबा असावा म्हणूनही लघुग्रहाचा वापर करता येणार आहे, त्यामुळे त्याचे नमुने घेणेही या बंदुकीच्या मदतीने शक्य होणार आहे. ही बंदूक लघुग्रहाचे मोठे तुकडे उडवेल व त्याला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत नेईल. त्यामुळे या लघुग्रहांचे संशोधन करणे वैज्ञानिकांना सोपे जाईल. लघुग्रह म्हणजे अंतराळातील फिरणारा खडक कितपत दणकट आहे हे त्याच्यावर बंदुकीतून गोळी झाडून समजणार आहे. लघुग्रहांचे नमुने गोळा करणेही त्यामुळे शक्य होणार आहे, असे हनीबी रोबोटिक्सच्या एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीजचे क्रिस झ्ॉकने यांनी सांगितले.


  • आयटी कर्मचाऱयांना कमी वेतन देणार्‍या देशांच्या यादीमध्ये भारत सातवा :

भारतातील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱयांना जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी वेतन दिले जाते, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील मधल्या फळीतील व्यवस्थापकाला सरासरी 41,213 डॉलर इतके वेतन दिले जाते. तर याच पदावर स्वित्झर्लंडमध्ये काम करणाऱयाला त्याच्या चार पट अधिक वेतन मिळते, असे दिसून आहे. 'मायहायरिंगक्लब डॉट कॉम'ने चालू वर्षात केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वात कमी वेतन मिळणाऱया देशांच्या यादीमध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. गेल्यावर्षीपेक्षा यंदा त्यामध्ये एका क्रमांकाने घट झाल्याचेही दिसून आले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे भारतातील व्यवस्थापकाला 41,213 डॉलर इतके वेतन मिळत असताना बल्गेरियातील कर्मचाऱय़ाला सर्वात कमी 25,680 डॉलर, व्हिएतनाममधील व्यक्तीला 30,938 डॉलर तर थायलंडमधील व्यक्तीला 34,423 डॉलर इतके वेतन मिळते. दुसऱ्या बाजूला स्वित्झर्लंडमधील या पदावरील कर्मचाऱ्याला सर्वाधिक म्हणजे 1,71,465 डॉलर इतके वेतन दिले जाते. त्या खालोखाल बेल्जियमचा क्रमांक लागतो. बेल्जियममध्ये 1,52,430 डॉलर इतके वेतन मिळते, असे या सर्वेक्षणात दिसून आले. कमी दरात काम होत असल्यामुळेच पाश्चिमात्य देशांतून भारतातच माहिती-तंत्रज्ञानाची काम देण्याकडे मोठा कल असल्याचे दिसून आले.


  • पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम:


•सुरुवात: १५ ऑगस्ट २०१५(अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’ची घोषणा केली होती.)
•सहयोगी बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया
•निर्मिती व व्यवस्थापन:या पोर्टलची निर्मिती आणि देखभालीची जबाबदारी ‘ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (एनएसडीएल) या सरकारी उपक्रमाकडे देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थखाते, वित्तीय सेवा खाते, उच्चशिक्षण खाते, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या (आयबीए) मार्गदर्शनाखाली‘एनएसडीएल’ उपक्रमाचे व्यवस्थापन पाहणारआहे.

* उद्दिष्टे:


  1. आर्थिक मदतीअभावी देशातील कुणीही विद्यार्थी शिक्षणाविना राहू नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यालक्ष्मी पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
  2. ‘प्रधानमंत्रीविद्यालक्ष्मी कार्यक्रमा’अंतर्गत (पीएमव्हीएलके) वाटप करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांनाकरण्यात येणारी आर्थिक मदत यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
  3. १३ बँकांच्या २२ योजना : अर्थखात्याने दिलेल्या माहितीनुसार वेबपोर्टलवर १३ बँकांनी २२ शैक्षणिक कर्जाच्या योजना देऊ केल्या आहेत. त्यातील स्टेट बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा आणि युनियन आदी बँकांनी एकत्र येऊन नोंदणी करण्यात येणाऱ्या एकाच अर्जावर आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे.


 वैशिष्ट्ये:


  1. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सर्व शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज व तत्सम विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अर्थसहाय्याचे एकसूत्री स्रोत या नात्याने हे संकेतस्थळ पुढे आले आहे.
  2. वेगवेगळ्या बँकांकडे कर्जासाठी खेटे घालण्यापेक्षा, विद्यार्थ्यांनाया संकेतस्थळावर उपलब्ध माहिती पडताळून,आवश्यक तितक्या गरजेच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज सादर करता येईल. बँका मग विद्यार्थ्यांच्या अर्जाची दखल घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडतील.
  3. सध्या जरी १३ बँकांनी त्यांच्या २२ प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती सादर केली असली तरी पुढे जाऊन सर्वचबँका या संकेतस्थळाशी जोडल्या


  • स्पॅनिश फुटबॉल लीग : रिआल माद्रिद अव्वल स्थानावर

अॅटलेटिको आणि बार्सिलोना प्रत्येकी ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
करिम बेंझेमाने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या बळावर रिआल माद्रिद क्लबने स्पॅनिशफुटबॉल लीगमध्ये ग्रॅनाडावर १-० असा विजय साजरा करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अॅटलेटिको माद्रिदनेही आगेकूच केली.ग्रॅनाडाचा शिस्तबद्ध बचाव आणि गोलरक्षक अॅण्ड्रेस फर्नाडिसची मजबूत बचावभिंत ओलांडण्यात माद्रिदला पहिल्या सत्रात अपयश आले. पहिल्या सत्रात यजमान माद्रिदने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु ग्रॅनाडाच्या बचावासमोर त्या तग धरू शकल्या नाही. दुसरीकडे युसेफ अल अरबीने केलेला गोल ऑफ साइड ठरविण्यात आल्याने ग्रॅनाडाची पूर्वार्धात आघाडी घेण्याची संधी हुकली. ५५व्या मिनिटाला करिम बेंझेमाने ग्रॅनाडाची बचावफळी भेदून माद्रिदला१-० अशी आघाडी मिळवून दिली. बेंझेमाचा हाच गोल निर्णायक ठरला. या विजयामुळे माद्रिदच्या खात्यात दहा गुण जमा झाले असून, अॅटलेटिको आणि बार्सिलोना प्रत्येकी ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या सामन्यात अॅटलेटिकोनेही फर्नाडो टोरेस व अँजेल कोरिआ यांनी पहिल्या सत्रात नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर एैबारवर २-० असा विजय नोंदवला.


  • भारताने इस्राईलकडून वैमानिकरहित ड्रोन विमाने घेण्याच्या प्रक्रियेस गती :

भारताने इस्राईलकडून वैमानिकरहित ड्रोन विमाने घेण्याच्या प्रक्रियेस गती दिली आहे. इस्राईलकडून हेरॉन्स ही ड्रोन विमाने खरेदी करण्याची योजना प्रथम तीन वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. जम्मु काश्‍मीरमधील डोंगराळ भागामध्ये तसेच चीनबरोबरील सीमारेषेवरही याआधीच इस्राईलकडून खरेदी करण्यात आलेली "अनमॅन्ड एअर व्हेहिकल्स"द्वारे टेहळणी सुरु करण्यात आली आहे. आता खरेदी करण्यात येणाऱ्या ड्रोन्सद्वारे जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करणे शक्‍य होणार आहे.

  • चीनमधील तियाजीन विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी डेटिंग कोर्स सुरू :

चीनमधील स्त्री-पुरुषांच्या गुणोत्तरामध्ये मोठी विषमता आढळून आल्याने उत्तर चीनमधील तियाजीन विद्यापीठाने मुला-मुलीमधील नाते बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी डेटिंग कोर्स सुरू केला आहे. चीनमध्ये लैंगिक गुणोत्तरातील विषमता हा मोठा सामाजिक विषय बनत चालला आहे. विवाहयोग्य मुला-मुलींच्या पालकांसमोर ही मोठी अडचण ठरत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील क्‍युकिओहुई या विद्यार्थ्यांच्या समुदायाने विद्यापीठाच्या सहकार्याने डेटिंग कोर्स सुरु केला आहे. या कोर्समध्ये मित्र-मैत्रिण बनविण्याच्या विशेष पद्धती शिकविण्यात येणार असून हा एकूण 32 तासांचा कोर्स आहे.

  • कोर्ट'चा अटकेपार झेंडा, ऑस्करसाठी भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका


- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' चित्रपटाने अटकेपार झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी 'कोर्ट' चित्रपट भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला आहे. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.

- अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर भारतातून होणाऱ्या ऑस्करच्या निवड समितीचे ज्युरी म्हणून आहेत. विविध भाषांमधल्या 30 चित्रपटांमधून कोर्ट चित्रपटाची निवड केली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या समितीची निवड केली होती.

- चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' सिनेमात आरोपी, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर भाष्य करण्यात आलं आहे.

- राजकुमार हिरानींचा पीके, नीरज घायवान यांचा मसान, ओमंग कुमार यांचा मेरी कॉम, विशाल भारद्वाजचा हैदर, साऊथचा सिनेमा काक्का मुट्टी आणि बाहुबली या सिनेमांमधून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या मराठी सिनेमावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

  • अर्चना-श्रीजा यांना कांस्य: 

भारतीय महिला खेळाडू अर्चना कामत गिरीश आणि श्रीजा अकुला यांनी शानदार कामगिरी करताना क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत तीन कांस्यपदकेजिंकली.स्पर्धेत एकूण १६ संघांनी विविध स्पर्धांत सहभाग घेतला. एका आठवड्याआधी इंदौर येथे झालेल्या भारतीय ज्युनिअर व कॅडेट ओपनमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अर्चना व श्रीजा यांनी क्रोएशियातील ज्युनिअर स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली.अर्चना आणि श्रीजा यांनी हंगेरीच्या किरा स्जाबोच्या साथीने संघ बनवला आणि सर्बिया, चौथा मानांकित इटली, फिनलँड आणि प्युर्तो रिको या मिश्र संघाला सहज पराभूत केले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा ३-१ असा पराभव केला; परंतु उपांत्य फेरीत त्यांना अव्वल मानांकित जर्मनी संघाकडून २-३ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत अर्चनाने तिच्या दोन्ही लढती जिंकल्या; परंतु श्रीजा व स्जाबो प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलू शकले नाहीत.

  •  भारत-अमेरिका व्यापार ५०० अब्ज डॉलरचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात अमेरिका आणि भारताने सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करणे आणि द्विपक्षीय व्यापारपाचपट वाढवून ५०० अब्ज अमेरिकन डॉलर करण्याचे ठरविले आहे.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या पहिल्या भारत-अमेरिका व्यूहात्मक आणि व्यापारी संवादाच्या समारोपानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, दहशतवादाशी लढणे, व्यापारी संबंध बळकट करणे आणि अमेरिकेची गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भारतात आणणे यावर यावेळी भर देण्यात आला आहे. यावेळी सुषमा स्वराज उपस्थित होत्या. लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्क आणि दाऊद कंपनीसारख्या दहशतवादी गटांबाबत दोन्ही देशांची भूमिका ही एकच असल्याचा पुनरुच्चार स्वराज यांनी केला. २००८ मधील मुंबई हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा करा, असे आवाहन आम्ही पाकिस्तानला केले आहे, असेही स्वराज म्हणाल्या. अमेरिका आणि भारत दहशतवादाविरुद्ध लढण्यास एकत्रित शक्ती वापरण्यासबांधील असल्याचे केरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितल

  • विकास दर ७.४ टक्क्य़ांवरच; आशियाई विकास 

आशियाई विकास बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज कमी केला असून ही वाढ २०१५-१६ मध्ये ७.४ टक्के असेल, असे म्हटले आहे. या आधी बँकेने विकास दर७.८ टक्के राहणे अंदाजले होते. कमजोर मान्सून, बाहेरच्या देशातून कमी मागणी व आर्थिक सुधारणा पुढे नेण्यात सरकारचे अपयश यामुळे भारताची आर्थिक वाढ कमी राहील, असे या बँकेच्या अंदाजात म्हटले आहे. चलनवाढही ४ टक्के (०.२ टक्के कमी जास्त) राहील असे नवीन अंदाजात म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती वाढणार असून त्याचा फटका देशांतर्गत किमतींना बसणार आहे. परिणामी आशियाई विकास बँकेने २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज ०.४ टक्क्य़ांनी कमी केला आहे, तर २०१६-१७ मध्ये तो ७.८ टक्के असेल असे म्हटले आहे. मार्चमध्ये बँकेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास दर २०१५-१६ मध्येच ७.८ टक्के तर २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के असेल असे अंदाजले होते.

  • मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती :

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 18.9 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी आहेत. त्यांच्याकडे 18 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 15.9 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यंदाच्या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांना प्रथमच भारतातील आघाडीच्या 100 श्रीमंत उद्योजकांच्या यादीत सामील होण्याचा मान मिळाला आहे. या दोघांकडे प्रत्येकी 1.3 अब्ज डॉलर संपत्ती असून त्यांना या यादीत 86 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. देशातील सर्व उद्योजकांची एकत्रितपणे 345 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. वर्ष 2014 मध्ये हा आकडा 346 अब्ज डॉलर होता. यावर्षी भारताचा विकास दर सात टक्क्यांनी वाढणे अपेक्षित होते, परंतु उद्योगपतींच्या संपत्तीतील घसरणीचे प्रमुख कारण शेअर बाजारातील मोठी घसरण व रूपयातील अस्थिरता असल्याचे फोर्ब्सकडून सांगण्यात आले आहे.
फोर्ब्जच्या यादीतील पहिले दहा अब्जाधीश -

मुकेश अंबानी - ( 18.9  अब्ज डॉलर)दिलीप संघवी - (18 अब्ज डॉलर)अझीम प्रेमजी - (15.9 अब्ज डॉलर)हिंदुजा ब्रदर्स - (15.9 अब्ज डॉलर)पालोनजी मिस्त्री - (14.7 अब्ज डॉलर)शिव नाडर - (12.9 अब्ज डॉलर)गोदरेज परिवार - (11.4 अब्ज डॉलर)लक्ष्मी मित्तल - (11.2 अब्ज डॉलर)सायरस पुनावाला - (7.9 अब्ज डॉलर)कुमार मंगलम बिर्ला - (7.8 अब्ज डॉलर)


  • कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक :

रेशन कार्ड संगणकीकरणाच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशन कार्ड हे आधार कार्डाशी जोडण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आजअखेर 13 लाख 13 हजार 977 लाभार्थ्यांना जोडत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल 13 लाख 12 हजार 839 लाभार्थ्यांचे लिंकिंग करून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • अमेरिका, भारत आणि जपान यांनी त्रिपक्षीय कराराचा निर्णय :


अमेरिका, भारत आणि जपान यांनी मंत्री पातळीवर भागीदारी उन्नत करण्यासाठी त्रिपक्षीय कराराचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये पुढील आठवड्यात होईल. आयर्लंडशी द्विपक्षीय संबंध व सहकार्य बळकट करण्यासाठी मोदी यांचा हा दौरा आहे. 60 वर्षांनंतर आयर्लंडला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी 1956 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आयर्लंडला भेट दिली होती.

  • जेएनयू कुलगुरूपदी सुब्रह्मण्यम स्वामी :

आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी भाजपचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. जेएनयुचे विद्यमान कुलगुरू प्रा.एस.के.सोपोरी यांच्या कारकीर्दीची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपेल. रा.स्व.संघाच्या आग्रहामुळे पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा