Post views: counter

Current Affairs March Part - 2


  • राष्ट्रीय कौशल्य विकास योजना :
देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठीकेंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरूकेली.तसेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे76लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे प्रमाण वाढावे व विविध प्रकारेकौशल्यासंदर्भात प्रशिक्षण घेता यावे यासाठी केंद्राकडून आणखी1 हजार 500‘मल्टिस्कील’प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
जुलै 2015मध्ये केंद्र शासनाकडूनराष्ट्रीय करिअर सेवासुरू करण्यात आली होती,याअंतर्गत देशभरातून35लाख रोजगारेच्छुक तरुणांनी नोंदणी केली होती.
2016-17या वर्षात100‘मॉडेल’करिअर केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे, याशिवाय राष्ट्रीय करिअर सेवा‘प्लॅटफॉर्म’सोबत राज्य रोजगार केंद्र जोडण्याची बाबदेखील प्रस्तावित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या महत्त्वाकांक्षी‘स्कील इंडिया’योजनेसंदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात पावलेउचलली आहेत.
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमार्फत पुढील3वर्षांत देशातील1 कोटीतरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची अर्थमंत्रीअरुण जेटलीयांनी घोषणा केली.
  • फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ पुरस्कार :
‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांना ‘यंग प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’च्या ‘वर्ल्ड प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’चा (वायपीओ-डब्ल्यूपीओ) ‘फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
 दुबई येथे (दि.9) होणाऱ्या शानदार समारंभात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’च्या आंतरराष्ट्रीय समितीने नुकतीच ही घोषणा केली.

 ‘ट्रिनिटी सेव्हन’ संकल्पनेद्वारे पवार यांनी सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्तरांवर बदल घडवून आणण्याचा ध्यास घेतल्याचे ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’ने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे.
 ‘ट्रिनिटी सेव्हन’ संकल्पना व्यापक सकारात्मक परिणाम, भावनिक पातळीवरचा थेट लोकसंपर्क आणि थोड्या काळात मोठा परिणाम घडवून आणणारे सहज राबवता येतील अशा प्रयत्नांवर भर देते.
 महिलांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘तनिष्का स्त्री-प्रतिष्ठा अभियाना’साठी पवार यांना ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’ने फेब्रुवारी 2014 मध्ये ‘ग्लोबल इम्पॅक्‍ट’ पुरस्काराने गौरवले होते.
  • गिनेस बुकात नाव नोंदवत नवा पराक्रम :
लिम्का बुक’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या चितेगावच्या अप्पासाहेब गायकवाड यांनी (दि.1) गिनेस बुकात नाव नोंदवत नवा पराक्रम केला.
 गिनेस बुकने दिलेले 200 उठाबशांचे लक्ष्य गायकवाड यांनी तीन मिनिटांमध्ये 206 उठाबशा काढत पूर्ण केले.
 ‘गिनेस बुक’तर्फे घालून देण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करीत अप्पासाहेब गायकवाड यांनी हा विक्रम केला, या उपक्रमासाठी दोन क्रीडा जगताशी संबंधित साक्षीदार नेमण्यात आले होते.
  • ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रथमच भारतात येणार :
ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन प्रथमच भारतात येणार असून, एप्रिल महिन्यात मुंबई, दिल्ली, काझिरंगा आणि आग्राला भेट देणार असून, या भेटीत ते ताजमहालचीही सैर करणार आहेत.
 केसिंग्टन पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे शाही दाम्पत्य 10 एप्रिलला मुंबईत येणार असून, त्यानंतर ते दिल्लीला जाईल.
 विल्यम आणि केट हे शाही दाम्पत्य या दौऱ्यात भारताची गौरवशाली इतिहास जाणून घेईल, तसेच भारतीय युवकांच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यात आणि 21 व्या शतकातील त्यांची भूमिका समजून घेण्याचीही या शाही दाम्पत्याची इच्छा आहे.
 प्रिन्सेस डायनानेही भेट घेतली होती 24 वर्षांपूर्वी 1992 साली प्रिन्सेस डायनानेही भारताचा दौरा केला होता.
  • व्याजदरात 0.25 टक्के घट होणार :
वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या निर्धारामुळे रिझर्व्ह बँक आपले उदार पतधोरण यापुढेही चालूच ठेवण्याची शक्यता आहे.
 तसेच त्यामुळे आगामी पतधोरण जाहीर करताना धोरणात्मक व्याजदरात किमान 0.25 टक्के कपात केली जाण्याची शक्यता असल्याचे एचएसबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे.
 चालू वित्तीय वर्ष संपत आले असून, या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने 1.25 टक्के व्याज दरकपात केली आहे.
 मात्र 2 फेब्रुवारीला पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणतीही कपात न करता रेपो दर 6.75 टक्के इतका कायम ठेवला होता.
 वित्तीय तूट 3.5 टक्के ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चांगले परिणाम होतील.
  • दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प :
यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी एकूण 8,77,665 कोटींची तरतूद केली आहे.
 6.87 कोटी घरांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणार
 शेतकऱ्यांसाठी नऊ लाख कोटींचे कर्ज
 यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी एकूण 8,77,665 कोटींची तरतूद केली आहे.
 स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
 खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
 आयकर मर्यादेत कोणताही बदल नाही, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष
 पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह एकूण रस्ते विकासाकरिता 97,000 कोटी रुपयांची तरतूद
 उच्च शिक्षणाकरिता 1,000 कोटी रुपयांची तरतूद
 रस्ते आणि महामार्गाकरता 55,000 कोटी रुपयांची तरतूद
 शॉपिंग मॉल 24 तास उघडे ठेवण्यासाठी परवानगी देणार
 पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या करसवलतीत 3000 रुपयांची वाढ
 छोटय़ा पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी वाहनांवर 1 टक्के प्रदूषण अधिभार
 काही डिझेल वाहनावर 2.5 टक्के तर इतर मोठय़ा वाहनांवर 4 टक्के प्रदूषण अधिभार
 चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवर 1 टक्का उत्पादन शुल्क लागू
 सर्वच सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण अधिभार लागू
 मे 2018 पर्यंत देशातील सर्व गावागावांत वीज पोहोचवणार
 प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख 40 हजारांचा विमा
 मनरेगासाठी 38,500 कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद
 बुडीत कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी 25 हजार कोटी रुपये
 रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी दोन लाख 18 हजार कोटी खर्च करणार
 वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
 पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत जनरिक तीन हजार औषध दुकाने सुरू करणार
 वापरात नसलेले देशभरातील 160 विमानतळ पुन्हा सुरू करणार
 सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमिट मोडीत काढणार
 रस्ते आणि महामार्गासाठी 55 हजार कोटी
 सर्व जिल्हय़ात डायलिसिस केंद्र उभारणार
 स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी 1700 कोटींची तरतूद
 सर्व शिक्षा अभियानअंतर्गत आणखी 62 नवोदय विद्यालये उघडणार
 स्टॅण्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
 प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांचा विमा कव्हर, ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार अधिक.
 कराची चुकीची माहिती देणाऱ्याला 200 टक्के दंड आकारणार
 करविवाद सोडविण्यासाठी 11 नवीन लवाद सुरू करणार
 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मागे सरकार उभे
 60 स्क्वेअर मीटर घर बांधणाऱ्यांना सेवाकरातून सूट
 तंबाखूवर दोन टक्के अधिक उत्पादन शुल्क
 तंबाखू, सिगारेट, विडी महाग
 10 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाडय़ा महाग
 सरचार्ज 12.5 टक्क्यांवरून 15 टक्के
 डिझेल मोटारींवर 2.5 टक्के सेस
 एक कोटी रुपये कमाई असणाऱ्यांच्या सरचार्जमध्ये तीन टक्के वाढ
 तीन वर्षांत एक कोटी तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
 62 नवीन नवोदये विद्यालये सुरू
 राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेतून गावांचा विकास
 सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा
 नवीन उद्योगांना व लघुउद्योगांना कॉर्पोरेट करात सवलत
  • सुरक्षित वीज पुरवठ्यात भारत 90 व्या स्थानी :
स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात 126 देशांच्या यादीत भारताला 90 वा क्रमांक देण्यात आला आहे.
जागतिक आर्थिक मंचने (डब्लू-ई-एफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.
‘ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
तसेच त्यात 126 देशांतील वीज पुरवठ्याचे आकलन करण्यात आले आहे, त्यात उचित मूल्य, पर्यावरण, कायम आणि सुरक्षित पुरवठा यांचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • शिर्डीत उतरले पहिले चार्टर विमान :
साईनगरी हवाई नकाशावर आणण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या विमानतळावर (दि.2) पहिले चार्टर विमान उतरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांमध्ये विमानतळ सुरू करण्याचे ठरविले असून त्याचाच भाग म्हणून (दि.2) चाचणी घेण्यात आली.
बॉम्बे फ्लार्इंग क्लब अर्थात शासकीय मालकीच्या अमेरिकन बनावटीच्या पायपर सैनिका या सहा आसनी विमानाने (दि.2) सकाळी 8.30 वाजता जुहू हवाईतळावरुन शिर्डीसाठी उड्डाण केले होते़ विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील हे विमानातून शिर्डीला आले होते.
शिर्डीला येणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट होण्याचा मान कॅप्टन जे. पी. शर्मा, भगवती मेहेर यांना मिळाला.
मुंबई ते शिर्डी अशा अवघ्या 45 मिनिटांत लागतात.
  • न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे निधन :
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज मार्टिन क्रो (वय 53) यांचे (दि.3) कर्करोगाने निधन झाले.
मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते.
क्रो यांनी 77 कसोटी आणि 143 एकदिवसीय सामने खेळले होते.
क्रो यांनी कसोटीत 45.36 च्या सरासरीने 5,444 धावा करत 17 शतके झळकावली होती.
क्रो हे सलग 13 वर्ष न्यूझीलंड संघाचे सदस्य होते.
अंतराळवीरांचा 340 दिवस अंतराळात प्रवास :
अंतराळात वर्षभर म्हणजेच 340 दिवस प्रवास केल्यानंतर (दि.1) दोन अंतराळवीर पृथ्वीवर परतले.
अमेरिकेतील अंतराळवीर स्कॉट केली 27 मार्च 2015 पासून अवकाशात भ्रमण करत होते.
तसेच त्यांच्यासोबत मिखाईल कोर्निएंको हे रशियन अंतराळवीर होते.
प्रदीर्घकाळ अवकाशात राहिल्यानंतर मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पांतर्गत अवकाशात ते गेले होते.
भविष्यात मंगळ ग्रहावर मनुष्य पाठविण्यासाठी हे प्रयोग उपयुक्त ठरणार आहेत.
अंतराळात मानवी जीवनासाठी पूरक बनविण्यात आलेल्या 'सोयूझ' हे रशियन अवकाशयान मध्य आशियात कझाकिस्तानच्या ओसाड प्रदेशात उतरविण्यात आले.
  • नाशिक-पुणे रेल्वेमार्गावर 15 नवी स्थानके :
नाशिक - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ग्रीन सिग्नल दिलेल्या प्रस्तावित नाशिक-पुणे या 266 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर नव्या 15 रेल्वेस्थानकांची भर पडणार असल्याने या मार्गावरील रेल्वेस्थानकांची संख्या आता 22 होणार आहे.
तसेच याशिवाय रेल्वेमार्गावर एकूण 22 मोठे आणि 132 मध्यम पूल असतील. प्रस्तावित रेल्वेमार्गापैकी 145 किलोमीटर पुणे जिल्ह्यातून, 59 किलोमीटर नगर, तर 62 किलोमीटर लोहमार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे.
सध्या या तीन जिल्ह्यांत 46 हजार किलोमीटरहून अधिक मोठे रस्त्यांचे जाळे आहे.
तसेच यामध्ये तीन जिल्ह्यांत मिळून तब्बल 707 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, तर चार हजार 512 किलोमीटरच्या राज्यमार्गासह त्याच्या दीडपट जिल्हा मार्गाचे रस्ते वाहतुकीचे जाळे आहे.
  • जागतिक सांस्कृतिक महोत्सव :
आर्ट ऑफ लिव्हिंगला या वर्षी 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये 11 ते 13 मार्चदरम्यान जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 यमुना नदीच्या काठी होणाऱ्या या महोत्सवात 155 देशांतील 35 लाख नागरिक उपस्थिती दर्शवणार असल्याचा अंदाज आहे.
 प्रभू यांनी सांगितले की, ‘तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 तीन दिवस गायन, नृत्य, योगासने अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून, त्यासाठी सुमारे 7 एकर परिसरात भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे.
 जगातील सर्वात मोठा तात्पुरता रंगमंच म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद होण्याची शक्यता प्रभू यांनी व्यक्त केली.
 तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 35 हजार 973 कलाकारांनी नोंदणी केली आहे.
 कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रंगमंचाची निर्मिती केली असून, नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लुईस यांनी सर्व महोत्सवातील नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
  • 'फिल्ड मार्शल' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी :
भारतीय लष्करात 'फिल्ड मार्शल' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख आहे.
 पण गुजरात सरकारच्या वेबसाईटवर 'लँड ऑफ लिंजड्स' (गुजरातमधील महान व्यक्तीमत्व) या विभागात माणकेशॉ यांचा उल्लेख क्रीडा क्षेत्रात करण्यात आला आहे.
 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते, ते 'सॅम बहाद्दूर' या नावानेही प्रसिद्ध होते.
 चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत माणकेशॉ दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबतच्या युद्धात सहभागी होते.
 लष्करातील एवढा दैदिप्यमान इतिहास असलेल्या माणकेशॉ यांना गुजरात सरकारने मात्र 'खेळाडूं'च्या पंक्तीत स्थान दिले आहे.
  • इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश :
इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला (दि.2) शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला.
 रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद 7.9 एवढी झाली.
 भारतीय वेळेनुसार (दि.2) सायंकाळी 6.20 वाजता हा भूकंप झाला.
 भूकंपाचा केंद्रबिंदू पडांग या शहराच्या आग्नेयेला 808 कि.मी. दूर समुद्रात 10 कि.मी. खोलवर होता.
 इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश आहे, या बेटाला भूकंपाचे वारंवार हादरे बसतात, या भागात जागृत ज्वालामुखीही आहेत, मोठ्या भूगर्भीय हालचालींमुळे येथे भूकंप होत असतात.
  • अहमदाबाद, जयपूर विमानतळ विकसित करणार :
सिंगापूरची जगप्रसिद्ध चंगी विमानतळाच्या धर्तीवर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एआयएपी) व जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.
 तसेच यासाठी चंगी एअर लिमिटेड ऑपरेशन व मॅनेजमेंट कंपनी येत्या जून महिन्यापासून कामाला सुरवात करणार आहे.
 अहमदाबाद व जयपूर विमानतळ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
 तसेच त्यानुसार नुकतेच चंगी विमानतळाच्या (सीआयए) अधिकाऱ्यांनी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून (एएआय) अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या प्रस्तावित कराराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
 अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या विकासासाठी मोदींच्या नोव्हेंबरमधील सिंगापूर दौऱ्यादरम्यान एएआय सिंगापूर को ऑपरेशन एंटरप्रायझेसबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
 केंद्र सरकारनेही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे पुढाकार घेत विमानतळांच्या विकासाबाबत पावले उचलली आहेत.
  • मारुती मोटारींच्या किंमतीत वाढ :
मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
 केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
 मारुतीचे सियाझ व एर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत.
 परंतु अद्याप कंपनीने प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत होणारी नेमकी वाढ व ती केव्हापासून लागू होईल हे नमूद करण्यात आलेले नाही.
 वायू प्रदुषण व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक मदतीसाठी सरकारतर्फे हा कर लादण्यात आला आहे.
  • दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक मनोज कुमार यांना (दि.4) प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
 सुवर्ण कमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 'हरियाली और रास्ता', वो कौन थी, हिमालय की गोदमे, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, पूरब और पश्‍चिम, शहीद, रोटी कपडा और मकान आणि क्रांती हे त्यांचे गाजलेले काही चित्रपट.चित्रपट सृष्टीत सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे.
 मनोज कुमार यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या अबोटाबादमध्ये 1937 मध्ये झाला.
 हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे त्यांचे पूर्ण नाव आहे, 'कांच की गुडिया' याद्वारे त्यांनी 1960 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
 'उपकार' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
 तसेच 1992 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले होते.
  • सेतू भारतम प्रकल्पाचे उद्घाटन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.4) महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
 किमान 50 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 2019 पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वेक्रॉसिंगपासून मुक्त केले जातील.
 तसेच या प्रकल्पांतर्गत एकूण 208 मार्गांवरील पूल उभारले जाणार असून, महाराष्ट्रातील 12 पुलांचा त्यात समावेश आहे.
 विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर क्षेत्रातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरीसह 6 मार्गांचा त्यात समावेश आहे.
 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
 देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर रस्त्यांचा विकास अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
 रेल्वेमार्गावर क्रॉसिंग पूल तसेच आवश्यकता असेल तेथे अंडरब्रीज उभारण्यासाठी ‘सेतू भारतम्’ योजना तयार करण्यात आली आहे.
  • नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणार :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्त्राएलला भेट दिली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते.
 नरेंद्र मोदी हे इस्त्राएलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
 डेविड ओकोव आणि उपवाणिज्य दूत निमरोद असुलिन यांनी (दि.4) लोकमच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली.
 तसेच त्यावेळी त्यांनी भारत-इस्त्राएल संबंध आणि महाराष्ट्र-इस्त्राएल सहकार्य याविषयी सविस्तर चर्चा केली.
 कृषी, वाहननिर्मिती अशा अनेक क्षेत्रात येत्या काही वर्षांत दोन देशांतील कंपन्यांमध्ये आपणास सहकार्य पाहायला मिळू शकेल.
 भारतासारख्या देशाशी चांगले संबंध असणे इस्त्राएलला आवश्यक वाटत आहे, असे सांगताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील चांगल्या बदलांचा आणि आर्थिक विकास दराच्या वाढीचा आवर्जून उल्लेख केला.
  • अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार :
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना तर नाट्यलेखक जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 ज्येष्ठ लेखिका सुषमा अभ्यंकर यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
 27 मे रोजी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण होईल.
 कानेटकर व शिरवाडकर पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तर सावंत पुरस्काराचे स्वरूप 5 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
 पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकरांपासून मधुकर तोरडमल हे शिरवाडकर लेखन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
 ततसेच डॉ. श्रीराम लागूंपासून प्रशांत दामले हे कानेटकर रंगकर्मी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
  • रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी नटराजन चंद्रशेकरन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.4) रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या.
 मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे.
 नवनियुक्त संचालकांमध्ये टाटा कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेकरन, महिंद्रा अँड महिंद्राचे अ-कार्यकारी चेअरमन भारत दोषी आणि सुधीर मंकड यांचा समावेश आहे.
 तसेच ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर बोर्डावर जातील, त्यांची नियुक्ती अर्धवेळ असून बिगर सरकारी संचालक म्हणून ते रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डावर चार वर्षांसाठी काम पाहतील.
 चंद्रशेकरन आणि भारत दोषी यांना उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून बोर्डावर घेण्यात आले आहे.
 सुधीर मंकड हे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी असून 2005 मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्या राज्याचे मुख्य सचिव होते.
  • पहिली कर्करोग प्रतिबंधक लस विकसित :
कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याची शास्त्रज्ञांनी सांगितली आहे.
 तसेच ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात.
 या लसीचा प्रयोग कर्करोग झालेल्या एका महिलेवर करण्यात आला आहे.
 एखाद्या रुग्णाला लस दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोगाचा नायनाट करण्याचे या संशोधनामागे सूत्र आहे.
 या लसीत एक खास प्रकारचे प्रोटीन एन्झाईम असून तो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो.
 तसेच या इंजेक्शनमुळे शरीरात अशा अ‍ॅन्टीबॉडिज बनतील की त्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा