Post views: counter

Current Affairs April 2016 Part - 3

  • देशातील तीन वारसा स्थळांचे अस्तित्व धोक्यात
" डब्लूडब्लूएफ 'चा अहवाल; वृक्षतोड , खाण उद्योगाचे संकट  कोची - नैसर्गिक वनसंपदेने नटलेले पश्चिम घाट , सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि मानस अभयारण्य या तिन्ही जागतिक वारसा स्थळांचे अस्तित्व खाण आणि तत्सम स्वरूपाच्या उद्योगांमुळे धोक्यात आल्याचे "वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड ' (डब्लूडब्लूएफ ) या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे . खाण उद्योगाप्रमाणेच बेकायदा वृक्षतोड , तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेले सर्वेक्षण यामुळे 229 पैकी 114 नैसर्गिक वारसा स्थळांना थेट धोका निर्माण झाला असून , यामध्ये सुंदरबन, पश्चिम घाट आणि आसाममधील मानस अभयारण्याचा समावेश आहे.
सुंदरबनमधील वाघ आणि "मानस ' मधील गेंड्यांची यामुळे घुसमट होऊ लागली आहे . पश्चिम घाटाची व्याप्ती ही गुजरात , महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये दिसून येते . या ठिकाणी खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पर्यावरणचक्र बिघडण्याचा धोका आहे . मानस अभयारण्यास धरणे आणि पाण्याचा होत असलेला वारेमाप वापर यांचा फटका बसत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते . सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या सीमेवर असून , येथेही पाण्याचा अतिरेकी वापर , धरणांचे बांधकाम , वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी , मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणावर खोदले जाणारे चर यामुळे पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वन्य प्राण्यांवर संकट
पश्चिम घाट परिसर हा आशियाई सिंह , रानगवे यांचे हक्काचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते . येथील वृक्षराजी झपाट्याने संपत असल्याने या प्राण्यांसमोर आता जायचे कोठे , असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . नेमकी हीच अवस्था सुंदरबनमधील वाघांची झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे .
वारसा स्थळांची संपत्ती
" युनेस्को ' ने तयार केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधील दोन तृतीयांश स्थळे ही नैसर्गिक साधनसामग्रीने परिपूर्ण आहेत. त्यांच्यामुळेच पूर, भूस्सखलनासारख्या संकटांची तीव्रता कमी होते . देशातील 11 दशलक्ष एवढे लोक अन्न , पाणी, निवारा आणि औषधांसाठी थेट या वारसा स्थळांवर विसंबून असल्याचे " डब्लूडब्लूएफ ' च्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे .
मानवी अस्तित्व आणि चिरंतन विकासामध्ये या वारसा स्थळांची मोठी भूमिका असून , त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही , त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे .
  • राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण :
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (दि.12) 56 दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला.


तसेच यावेळी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी निवड करण्यात आलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

पद्म पुरस्कारांची यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली होती.

पहिल्या टप्प्यात 28 मार्च रोजी 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच, इतर पुरस्कारार्थींचा (दि.12) पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारला तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने पद्मश्री आणि सानिया मिर्झाने पद्मभूषण पुरस्कार स्विकारला.
-----------------------
  • भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना :
हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना (कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम) लागू करण्यास मंजुरी दिली आहे.

अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर 24 तास सीमेवर कडक नजर ठेवणारी ही योजना भारत पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कच्छपासून काश्मीरपर्यंत 2900 किलोमीटर परिसरासाठी असेल.

सीमेतून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी प्रत्येक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम स्थापन केली जाणार आहे.

कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास या कंट्रोल रूममधून सीमा सुरक्षा दलांना लगेच अलर्ट संदेश जारी होईल.

युद्धक्षेत्रात पहारा ठेवणाऱ्या रडार यंत्रणेचा वापर करण्याबरोबरच सीमेवर जागोजागी अंडरग्राऊंड सेन्सर्सही बसवले जाणार आहेत.

पाचस्तरीय नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की एका यंत्रणेच्या नजरेतून एखादी बाब सुटली तरी पर्यायी यंत्रणेच्या देखरेखीतून ती सुटणे शक्य नाही.
-----------------------
  • केरळमध्ये सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंत फटाक्‍यांना बंदी :
पुट्टींगल मंदिरातील दुर्घटनेनंतर केरळ उच्च न्यायालयाने सूर्यास्त ते सूर्योदय या दरम्यान आवाज करणाऱ्या फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

परवानगीशिवाय असे फटाके वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने निकालावेळी दिले आहेत.

मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांवर बंदी घालण्याची मागणी करत न्या. चिदंबरेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर (दि.12) सुनावणी झाली.

पुट्टींगल मंदिरामध्ये महोत्सवादरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांचा भंग करण्यात आला होता, तसेच सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती, असे केरळ सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

दरम्यान, आगीनंतर बेपत्ता झालेले मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष पी. एस. जयालाल, महासचिव कृष्णाकुट्टी पिल्लई यांच्यासह विश्वस्त प्रसाद, सोमासुंदरम पिल्लई आणि रवींद्रन पिल्लई यांनी (दि.11) मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
-----------------------
  • भारताला अमेरिकेशी लष्करी साह्यास तत्त्वत: मान्यता :
दोन्ही देशांच्या सैन्याला दुरुस्ती आणि साहित्याच्या पुरवठ्यासाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा करार (लॉजिस्टिक एक्‍स्चेंज) करण्यास भारत आणि अमेरिकेने (दि.12) तत्त्वत: मान्यता दिली आहे.

भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी (दि.12) संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली.

तसेच सागरी सुरक्षेसंदर्भात दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये नियमितस्वरूपावर चर्चा सुरू करण्यासही दोन्ही देशांनी तयारी दाखविली आहे.

भारत आणि अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये नियमितस्वरूपावर चर्चा सुरू आहेत.

तसेच या चर्चांची व्याप्ती वाढवून पाणबुड्यांचा विषयही त्यात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सागरी सीमेबाबत धोरणनिश्‍चितीमध्येही सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.
-----------------------
  • हॉकी स्पर्धेत भारताचा पाकवर सर्वांत मोठा विजय :
अझलान शाह हॉकी करंडक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर 5-1 असा मोठा विजय मिळविला.

मलेशियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत इपोह येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

तसेच या विजयामुळे स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत भारतीय संघाने ब्राँझपदक मिळविण्याच्या आशा कायम राखल्या आहेत.

सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानवर 5-1 असा मोठा विजय मिळविल्याने भारतीय संघाचे क्रमवारीतील स्थान दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे.
-----------------------
  • आधार आता स्मार्ट कार्ड स्वरुपात :
सरकारने आधार कार्डाला स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली असून, सध्या कागदी स्वरुपात मिळत असलेले ‘आधार कार्ड’ लवकरच ‘स्मार्ट कार्ड’ स्वरुपातदेखील नजरेस येईल.

तसेच नवे आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड असेल.

आधार कार्डधारकास यासाठी 60 रुपये मोजावे लागतील.

60 रुपये दिल्यावर आधार कार्डाची दोन स्मार्ट प्रिंट मिळतील.

स्मार्ट आधार कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्डसाठीची नोंदणी असणे गरजेचे आहे.

आधार कार्डधारक किंवा ज्यांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे, असे सर्वजण आपले आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड कार्डामध्ये परिवर्तित करू शकतात.
  • चलनी नोटावर वारसा स्थळे:-
* रिझर्व बँकेच्या निर्णयानुसार जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असलेली स्मारके चलनी नोटवर मुद्रित केली जाणार आहेत
* देशात चलनात असलेल्या १० रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतच्या नोटावरच्या प्रतिमा बदलण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने आणी आरबी आयने घेतला
* १० रुपयांच्या नोटावर :- हंपी रथ
* २० रुपयांच्या नोटावर :- राष्ट्ध्वजासह लाल किल्ला
* ५० रुपयांच्या नोटावर :- कोणार्कचे सूर्यनारायण मंदीर
* १०० रुपयांच्या नोटावर :- ताजमहल
* ५०० रुपयांच्या नोटावर :- गोव्यातील पुरातन चर्च
* १००० रुपयांच्या नोटावर :- अंजटाची गुहा
हंपी रथ:-
* नावाप्रमाणे हा रथ नसून ही दगडात बांधलेली एक वास्तू आहे
* हंपी येथील विठ्ठलमंदिराच्या आवारामध्ये हा रथ आहे
* विठ्ठलमंदिराच्या गाभार्याकडे तोंड असलेला हा रथ एक फुट किवा त्याहून थोड्या मोठ्यां चौथरयावर बांधण्यात आला असून ह्या चौथरयावर पुरणातील युद्धप्रसंग कोरण्यात आले आहे
लाल किल्ला:-
* शहाजनने आपल्या राजवटीची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहाजनबाद हे शहर बांधण्याचा निर्णय घेतला.
* १६३९ मध्ये लाल किल्ला बांधण्यास त्याने सुरुवात केली
* ९ वर्षानतर १६४८ मध्ये त्याचे काम पूर्ण केले
सूर्य मंदीर:-
* कोणार्कचे सूर्य मंदीर हे १३व्या शतकात बांधलेले गेले असून ते राजा नरसिह ह्याने बांधले
* सूर्याला अर्पण केलेले हे मंदीर रथाच्या स्वरुपात बांधलेले असून त्याला २४दगडी चाके कोरण्यात आली आहेत. ही चाके प्रत्येकी ३ मीटरची असून ह्या रथाला उजवीकडे ४ व डावीकडे ३असे ७घोडे आहेत.
* कालींगा वास्तूशास्र पध्तीनुसार हे मंदीर बांधण्यात आले
अजंठाची गुहा;-
* औरंगाबादच्या उत्तरेला १०६ कि. मी. वर वसलेल्या अजंठाच्या गुहांच्या शोध
एका ब्रिटीश सैन्य अधिकार्याला १८१९ मध्ये त्याच्या एका शिकारी मोहिमेदरम्यान लागला
* ह्या गुहांमध्ये इ.स. पू.दुसऱ्या शतकापासुन इसवीसनच्या ६ व्या शतकापर्यंत काम झाल्याचे पुरावे सापडतात. एकून ३० गुहापैकी ५ चैत्यग्रह असून बाकीच्या गुहा विहार स्वरुपात आहेत
ताजमहल:-
* यमुना नदीच्या दक्षिण किनारयावर वसलेला ताजमहल हा जगातील सात आश्चर्यपैकी एक असून आता त्याला युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वारसास्थळानच्या यादीतही स्थान मिळाले आहे.
मुघल बादशाह शहाजन ह्याने १६३२साली आपली पत्नी मुमताज हिच्या मृत्यू नतंर समाधी म्हणून ताजमहल बांधला
* ताजमहल बांधून होईपर्यंत तिच्या हस्थी झैनाबाद उद्यानात पुरण्यात आल्या होत्या. ऐकून १७वर्ष ह्या वास्तूचे बांधकाम चालले.
  • आरोग्य विभागाचे नवे संचालक डॉ. मोहन जाधव :
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार (दि.13) डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला.
मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर लढाई जिंकलेल्या डॉ. जाधव यांना अखेर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून दिला.
निलंबित संचालक डॉ. सतीश पवार यांनी केवळ औषध खरेदीत मनमानी केली नाही, पण संचालकपदापर्यंत पोहोचण्यासाठी आपणच पात्र ठरले पाहिजे, अशा प्रकारे निवडीचे निकष आयत्या वेळी बदलल्याचे स्पष्ट निष्कर्ष सर्वच न्यायालयांनी काढले होते.
लोकमतने औषध खरेदीचा भांडाफोड केल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला आणि त्यात डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली. 
विभागाच्या यादीत कोठेही नाव नसलेल्या डॉ. मोहन जाधव यांच्या लढ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर जाधव यांच्याकडे पदभार द्यावा, असा निर्णय दिला.
  • पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर :
पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 250 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.तसेच यामध्ये मुंबई, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबादच्या सहा महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येत्या 1 मे रोजी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त भारती कुऱ्हाडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तर, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना विलास रासम यांना सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवा बजाविल्याबद्दल महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.पुणे शहराच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा गजानन बांबे यांना बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविल्याबद्दल गौरवण्यात येईल.उत्तम कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा सुभाष काळे आणि उस्मानाबादच्या पोलीस निरीक्षक अश्विनी एस. भोसले यांचा सन्मानचिन्हाने सत्कार करण्यात येणार आहे.क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिया राजाराम थोरात यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.स्पोर्ट्स व पोलीस कल्याण कलीनाचे पोलीस उपायुक्त शांतीलाल अर्जुन भामरे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त प्रदीप रोहीदास सोनावणे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत.
  • आयपीएलचे काही सामने महाराष्ट्राबाहेर होणार :
राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे सामने महाराष्ट्रात न खेळविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (दि.13) दिला.सरकारने जरी बघ्याची भूमिका घेतली असली, तरी राज्यातील पाणीटंचाईकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही, अशी चपराक राज्य सरकारला हाणत, न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.न्यायालयाला हरप्रकारे समजवू पाहणाऱ्या बीसीसीआय, एमसीए आणि आयोजकांना यामुळे मोठा दणका बसला आहे.सहभागी संघांनी केलेली मोठी गुंतवणूक व ऐनवेळी सामने अन्यत्र भरविण्यातील व्यवहार्य अडचणींची दखल घेऊन न्यायालयाने आयोजकांना पर्यायी जागी तयारी करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला व 30 एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर नेण्याचा आदेश दिला.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ :
राज्य सरकारने एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या व खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्यामर्यादा वाढविली आहे.राजपत्रित अधिकाऱ्यांची वर्यामर्यादा 33 वरुन 38 वर्ष करण्यात आली आहे.
तसेच पोलिस शिपाई पदाची वयोमर्यादा 25 वरुन 28 वर्ष करण्यात आली आहे.
तर पीएसआयची वर्यामर्यादा 28 वरुन 33 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • लंडनमध्ये पहिली महाराष्ट्रीयन व्यावसायिक संस्था स्थापन :
यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन पहिली महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था नुकतीच लंडनमध्ये स्थापन केली आहे.परदेशात राहून काम करताना या व्यावसायिकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
ओएमपीईजीचा (OMPEG) उदघाटन सोहळा 10 एप्रिल 2016 रोजी लंडन येथील सडबरी  गोल्फ क्लबमध्ये पार पडला. तसेच कार्यक्रमाला ब्रेन्ट शहराच्या महापौर श्रीमती लेस्ली जोन्स तसेच साऊथहॉलचे श्री विरेंद्र शर्मा (ब्रिटीश पार्लमेंटचे खासदार), डॉ ओंकार साहोटा, (लंडन असेंब्ली मेंबर),  श्री उदय ढोलकीया (चेयरमन NABA, यु.के.) हे विषेश अतिथी म्हणून  उपस्थित होते.या कार्यक्रमात OMPEG च्या संकेतस्थळाचे (www.ompeg.org.uk) उदघाटन तसेच "महाराष्ट्रीयन उद्योजकता" या विषयावर एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते.तसेच या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांबरोबरच स्थानिक व्यवसायिक व उद्योजक – डॉ महादेव भिडे (आय. व्ही.एफ स्पेशलीस्ट), मनोज वसईकर (फाईन डायनिंग शेफ) यांनीही भाग घेतला.
  • रेल्वे विभागात पुणे सुपरफास्ट :
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 1 हजार 154 कोटींचे उत्पादन मिळाले आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 137 कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न 6 टक्के अधिक आहे. मागील वर्षी पुणे विभागाला 1 हजार 17 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तसेच गेल्या काही वर्षापासून पुणे विभागाने प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावलेली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 2.2 मेट्रिक टन माल वाहतुकीद्वारे सुमारे 328.81 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
  • बीपीआरच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर :
महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची (दि.8) पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अ‍ॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्या 1981 च्या तुकडीतील पोलीस अधिकारी आहेत. मुंबई गुन्हेशाखेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारितील कार्मिक विभागाने बोरवणकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. पदभार स्वीकारतील त्या दिवसांपासून 30 सप्टेंबर 2017 रोजी निवृत्त होईपर्यंत त्या पदभार सांभाळतील. बोरवणकर यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने ठेवल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीसंबंधी समितीने त्याला मंजुरी दिली.

  • आता बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती होणार :
भारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता.
 आता देशाच्या बँकिंग क्षेत्रातही क्रांती होऊ घातली आहे, कारण देशातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारा बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 देशात सध्या 1 लाख 60 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत.
 तसेच तिथे पासपोर्टचे फॉर्म, फी, विम्याचे हप्ते, विविध प्रकारची बिले भरण्याबरोबरच रोजगारासाठी अर्ज करणे, आधार कार्ड तयार करणे इत्यादी कामे सध्या चालतात.
 ग्रामीण भागात अवघे 7 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स असे आहेत की, जे बँकिंग सुविधाही पुरवतात.
 येत्या 3 महिन्यांत या कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारा देशातल्या किमान 60 हजार ग्रामपंचायतींत बँकिंग सुविधा सुरू होणार आहे.
 देशात 6 लाखांहून अधिक खेडी व अडीच लाख ग्रामपंचायती आहेत.
 सध्या केवळ 35 हजार खेडी बँकिंग सेवांशी थेट जोडली गेली आहेत, यासाठीच केंद्राने सीएससीच्या कामकाज विस्ताराची योजना व्यापक प्रमाणात अमलात आणण्याचे ठरवले.
  • विदेशी मनिऑर्डरच्या बाबतीत भारत प्रथम स्थानी :
2015 मध्ये विदेशातून मनिऑर्डरद्वारे पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी राहिला.
 जागतिक बँकेने ‘मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ’ नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 तसेच त्यात म्हटले आहे की, 2009 नंतर विदेशातून भारतात येणाऱ्या पैशांत प्रथमच घट झाली आहे.
 2015 मध्ये भारताला विदेशातून 69 अब्ज डॉलरच्या मनिऑर्डर मिळाल्या.
 2014 मध्ये हा आकडा 70 अब्ज डॉलर होता. याचाच अर्थ मनिऑर्डरमध्ये 2.1 टक्क्यांची घट झाली आहे.
 विकसनशील देशांना मिळणाऱ्या मनिऑर्डरमध्ये 0.4 टक्के वाढ झाली आहे.
  • गोंदिया जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकरांचे नाव :
‘गोंदिया जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. एवढेच नाही, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे कॉलेजला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचेही वचन सर्वांसमक्ष पूर्ण केले.
 तसेच हे नाव बदलण्याची हिंमत कोणी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिला.
  • चित्रपट महोत्सवासाठी नामांकने जाहीर :
राज्य सरकारच्या वतीने उत्कृष्ट मराठी चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त 30 एप्रिलला देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी (दि.14) घोषित केली.
 उत्कृष्ट चित्रपटांसाठी 10, वैयक्तिक पुरस्कारांसाठी 3 नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित करण्यात येतात. 30 एप्रिलला होणाऱ्या सोहळ्यात नामांकनांमधून अंतिम विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.
 तसेच हा सोहळा बोरिवली येथे जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर होणार आहे, मुंबई उपनगरांत प्रथमच हा सोहळा होत आहे. 53 व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यंदा 73 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
 तसेच त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरता कट्यार काळजात घुसली, दि सायलेन्स, दगडी चाळ, बायोस्कोप, डबलसीट, नटसम्राट, हलाल, रिंगण, रंगा पतंगा आणि हायवे या 10 चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. अंतिम फेरीनंतर या चित्रपटांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासाठी, तसेच सामाजिक प्रश्‍न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट व ग्रामीण प्रश्‍न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट निवडण्यात येईल.
  • मुंबईत पुन्हा लागू होणार ‘क्लीन अप मार्शल्स’ योजना :
मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी क्लीन अप मार्शल योजना पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे़ चार वर्षांनंतर ही मोहीम पुन्हा एकदा मुंबईत राबविण्यात येत आहे़. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, लघुशंका करणाऱ्या, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 2007 मध्ये क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली होती. खासगी सुरक्षा कंपनीला दंड करण्याचे अधिकार या मार्शल्सला देण्यात आल्याने त्यांची मुजोरी वाढली़ अनेक ठिकाणी मार्शल्सनी दमदाटीने वसुली सुरू केल्याच्या तक्रारी येऊ लागल्या़ तीन वेळा गुंडाळलेली ही योजना 2012 मध्ये कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ होता.   परंतु मार्शल्सशिवाय मुंबईचे परिसर स्वच्छ ठेवणे शक्य नाही, असा साक्षात्कार पालिकेला झाला आहे़ त्यामुळे नव्याने मार्शल्सची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत (दि.14) मंजूर करण्यात आला़.
  • युनोतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी :
संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आंबेडकर हे वंचितांसाठीचे ‘वैश्विक प्रतीक’ असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युनो भारतासोबत काम करण्यास बांधील आहे. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त युनोतील भारतीय मंडळाने (मिशन) प्रथमच येथे विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाऊंडेशन ऑफ ह्यूमन होरिझोन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकरांचे विचार 60 वर्षांपूर्वी जेवढे समकालीन होते तेवढेच ते आजही आहेत यावर जोर देताना न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान क्लार्क म्हणाल्या की, वंचितांचे सबलीकरण, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच कामगार कायद्यात सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाला चालना देण्यासाठी आंबेडकरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ते भारत आणि इतर देशातील वंचितांसाठी आदर्श प्रतीक ठरले आहेत.
  •  भारत अन्य देशांना 'व्याघ्रसाह्य' करणार 
➡जगातील सर्वाधिक व्याघ्रसंपत्ती असणारा देश म्हणून मिरविणाऱ्या भारताने आता वाघ नामशेष होत आलेल्या वा ते बिलकूल नसलेल्या कंबोडियादी देशांनाही वाघ पुरविण्याची सहर्ष तयारी दाखविली आहे.
➡केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तिसऱ्या आशिया व्याघ्र मंत्री परिषदेच्या समारोप कार्यक्रमात तशा शक्‍यतेचा उच्चार केला.
➡परदेशात धाडल्यावर मातृभूमीपासून दुरावलेल्या या वाघांना क्वचित प्रसंगी 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी भावना व्याकूळ करू नये या दृष्टीनेही मदतीची तयारी भारताने दाखविली आहे.
➡चीन व रशियासह तेरा देशांच्या वन तसेच कृषिमंत्र्यांच्या या परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारताने या व्याघ्र परिषदेत व्याघ्रसंपत्ती अन्य जणांना देण्याची तयारी दाखवून, नवा पायंडा पाडल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रतिनिधींमध्ये व्यक्त झाली.
➡जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ अडीच टक्के भूभाग व एकुणांतील 17 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास अडीच हजार पट्टेदार वाघ आहेत.
➡केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत वाघांचे जतन, संवर्धन व त्यांच्या शिकाऱ्यांबाबत 'झीरो टॉलरन्स'ची कठोर भूमिका घेतल्याचे जावडेकर यांनी अधोरेखित केले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  • जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर
➡जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत भारताला तिसरा क्रमांक मिळाला असून चीनला प्रथम तर अमेरिकेला दुसरे स्थान मिळाले आहे.
राष्ट्रीय देशांतर्गत उत्पनाच्या (जीडीपी) आधारे जगातील श्रीमंत देशांचा क्रम ठरविण्यात आला आहे.
➡जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या या यादीत मागील आर्थिक वर्षातील जीडीपीनुसार चीन (20.85 लाख कोटी डॉलर), अमेरिका (18.56 लाख कोटी डॉलर) तर त्यानंतर भारताचा (8.64 लाख कोटी डॉलर) क्रमांक आहे.
➡फोर्ब्स मासिकाच्या एका अहवालानुसार, भारतात मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत लक्षाधीशांच्या संख्येत 400 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.
➡तसेच देशातील एकूण संपत्तीमध्ये 211 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  • चेन्नईमध्ये उभारला रजनीकांतचा पुतळा 
➡चित्रपटांतून आपल्या अफलातून भूमिकांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला सुपरस्टार रजनीकांतचा 600 किलोग्रॅम चॉकलेटचा पुतळा तयार करण्यात आला आहे.
➡रजनीकांतला नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
➡तसेच या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी एकत्र एकत्र येत चेन्नईमध्ये हा पुतळा तयार केला आहे, झुका नावाच्या कॉफी शॉपमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
➡या पुतळ्यामध्ये दाखविण्यात आलेला रजनीकांतचा पेहराव काबली या त्याच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेचा आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  •  शस्त्रक्रियेमध्ये जे.जे. रुग्णालय जगात सर्वोत्तम 
➡अत्यंत गुंतागुंतीचा असलेला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजारावर जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाने वेगळ्या पद्धतीने केलेल्या ‘एन्डोस्कोपीक शस्त्रक्रियेच्या तंत्रा’ला जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्रक्रियेचा सन्मान मिळाला आहे.
➡‘सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टायनल अ‍ॅण्ड एंडोस्कोपीक सर्जन्स’च्या (सेजस) एन्डोस्कोपिक सर्जनच्या परिषदेत सादर केलेल्या या शस्त्रक्रियेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि दोन हजार डॉलरचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
➡तसेच गेल्या वर्षी मार्च महिन्यात बिहारच्या भागलपूर येथील बंबमकुमार मंडल या 27 वर्षीय तरुणाला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी या तरुणाला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजार झाल्याचे निदान करण्यात आले आणि त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
➡‘जेजे’त झालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जगातील दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  • अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल 
➡न्यूझीलंडकडून पराभूत होताच समीकरण बिघडल्यानंतर भारतीय संघाने 25व्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत मलेशियाचा  पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
➡पाच वेळेचा चॅम्पियन भारत संघाला स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा 6-1 अशा फरकाने पराभव करून विजय मिळवला.
➡अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे.
➡ऑस्ट्रेलिया संघ सलग पाच विजयांसह 15 गुण घेऊन अंतिम फेरीत दाखल झालेला आहे.
➡राऊंड रॉबिन सामन्यात मलेशियाचा पराभव केल्यामुळे गुणतालिकेत भारताने माजी विजेता न्युझीलंडला मागे टाकत गुणतालिकेत आपले स्थान मजबुत केले.
➡भारताचा अंतिम सामना विश्वविजेता ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर होणार आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  •  100 मेगावॅटच्या सौर ऊर्जाप्रकल्पाचा करार 
➡ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे.
तसेच हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
➡एसईसीआयने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे आवाहन करत ऑनलाइन लिलाव केला होता, ज्यामध्ये ऑरेंज रिन्युएबल पात्र ठरली आहे.
➡तसेच या करारानुसार ऑरेंज रिन्युएबलकडून 25 वर्षे 4.43 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करण्यात येईल.
➡नॅशनल सोलर मिशन अंतर्गतची उद्दिष्ट्ये वाढवण्यात आली असून 2021- 22 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातून 20 गिगावॅट निर्मितीचे लक्ष्य होते, जे वाढवून 100 गिगावॅट करण्यात आले आहे.
➡भारत सौरऊर्जेला प्रचंड महत्त्व देत असून त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांसाठी भारत एक आकर्षण ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
  • ओडिशात रेल्वे प्रकल्पासाठी एक नवी कंपनी :
मागील काही दिवसांमध्ये ओडिशातील रेल्वे प्रकल्पांना त्यांच्या हक्काचा निधी मिळालेला नाही, यामुळे येथील गुंतवणुकीचा ओघ काहीसा थांबल्याचे दिसून येते. राज्यातील प्रकल्पांना गती यावी म्हणून केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने एक नवी कंपनी स्थापन केली जाईल आणि हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.कलहांडीमधील नरला, गंजममधील सीतालापल्ली या ठिकाणी रेल्वे बोगी दुरुस्ती कारखाने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असून, यासाठी एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. कलहांडी आणि गंजम जिल्ह्यांमधील प्रकल्पांबाबत पुढील महिनाभराच्या अवधीमध्ये संयुक्त कृती समिती निर्णय घेईल. तसेच हे प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यंतरी रेल्वे मंत्रालयाने कलहांडीमधील एक प्रकल्प विशाखापट्टणमला नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओडिशामध्ये आंदोलनाचा भडका उडाला होता.
 तसेच त्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्राने संयुक्त कृती समिती नेमली आहे.
  • ऑस्ट्रेलियात अदानीच्या प्रकल्पाला मंजुरी :
अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 21.7 अब्ज डॉलरच्या कोळसा खाणकाम प्रकल्पाला अखेर तेथील पारंपरिक मालकांची मंजुरी मिळाली आहे. तसेच त्यामुळे मूलनिवासी गटांचे या प्रकल्पासाठी संपुर्ण साह्य असल्याचे सूचित होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वॅंगन अँड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) गटाने (दि.17) कंपनीसोबत झालेल्या बैठकीत बहुमताने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. संपूर्ण समुदायाला, त्यांच्या मुलांना आणि नातवंडाना भविष्यात मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कारमायकेल हा जगातील सर्वांत मोठा खाण प्रकल्प सुरू करीत आहे.
  • टाटा समूहाच्या कंपन्यांना अमेरिकेत दंड :
टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने 94 कोटी डॉलरचा (6200 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट‘ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल लागला आहे.
 टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसान भरपाई व 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश विस्कॉन्सिन राज्यातील ग्रँड ज्युरीने दिला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टम्सने म्हटले होते.
  • टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नववे विजेतेपद :
आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले नववे विजेतेपद जिंकले.
 राफेल नदालने गायलला 7-5, 5-7, 6-0 गुणांनी नमवित 28वे मास्टर्स टायटल जिंकले.
 तत्पूर्वी बलाढ्य राफेल नदालने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेला 2-1 असे नमवले. स्पेनच्या नदालने स्पर्धेतील आपला दबदबा सिद्ध करताना कसलेल्या मरेविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतरही विजय मिळवला. तसेच या स्पर्धेत 2005 ते 2013 पर्यंत सलग 46 सामने जिंकण्याचा पराक्रम केलेल्या नदलला अंतिम फेरीसाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले.
  • पाकमधील हिंदूंना भारतात मालमत्ता खरेदीची परवानगी :
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक वर्गात मोडणाऱ्या आणि व्हिसावर भारतात दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्या हिंदूंना या पुढे भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे आणि बॅंक खाते उघडण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच पाकिस्तानातील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या या स्थलांतरितांची संख्या तब्बल दोन लाख इतकी असून त्यामध्ये बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. तसेच यापैकी पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर, अहमदाबाद, राजकोट, कच्छ, भोपाळ, इंदौर यांसारख्या विविध शहरांमध्ये वास्तव्याला आहेत. दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना वेळोवेळी तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचा विचार करता सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.
  • फ्रान्सचे पथक भारतात येणार :
फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याबाबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी पुढील महिन्यात फ्रान्सचे एक उच्चस्तरीय पथक भारतात दाखल होणार आहे.राफेल विमानांच्या किमतीबाबत भारत आणि फ्रान्समध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे बऱ्याच काळापासून हा करार पूर्णत्वाला जाऊ शकला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी 36 राफेल विमानांची खरेदी करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर राफेलच्या किमतीवरून सुरू असलेली चर्चा अखेर शेवटाकडे आल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच त्यानंतर या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी फ्रान्सचे एक उच्चस्तरीय पथक पुढील महिन्यात भारतात येणार. विमानांची किमत कमी करण्यासाठी भारतातर्फे प्रयत्न केले जात होते. त्याला अखेरीस यश आले असून, या करारावर लवकरच स्वाक्षऱ्या होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
  • ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान :
अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन 2016’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या कन्या मंजिरी आणि अंजली यांनी स्वीकारला, तर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आपल्या पत्नीच्या साथीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
 सन्मानचिन्ह, मानपत्र, 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (दि.16) सावरकर स्मारकात पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्रकला हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. चार ते पाच अग्रलेखांत जे काम होत नाही, ते केवळ एका चित्रातून साध्य करता येते. तसेच हे संमेलन केवळ व्यंगचित्रकारांचे नाही, तर साहित्यिकांचेसुद्धा आहे.
  •  थोडक्यात महत्वाचे:
  1. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी कोणत्या दोन देशामध्ये करार केला गेला :- भारत आणी जर्मनी
  2. न्यूज़ीलैण्ड च्या कोणत्या खेळाडूला विज़डन क्रिकेटर ऑफ़ द इयर-2015 या पुरस्कारासाठी निवडण्यात आले - केन विलियम्सन
  3. भारतातील कोणत्या राज्यात मिशन पेयजल ची सुरुवात केली गेली –महाराष्ट्र
  4. तालीबानने अफगाणिस्तान मध्ये अफगाण व अमेरिका फौजावर हमलासाठी सुरु केलेले अभियान:- ऑपरेशन ओमारी (ऑपरेशन चे नाव तालिबान चा नेतामुल्ला उमर याच्या नावांवर ठेवले आहे )
  5. कोणत्या देशाने ‘के-4 बैलिस्टिक’ मिसाइल चे आत्ताच यशस्वी चाचणीकेली – भारत
  6. प्रसिद्ध लेखिका पद्मा सचदेव यांना २०१५ या वर्षाचा सरस्वती सम्मान पुरस्कार जाहीर झाला त्या कोणत्या भाशाच्या लेखिका आहेत - हिंदी आणी डोंगरी
  7. -------------- यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ अभियान चे की ब्रांड एंबेसडर म्हणून निवड केली - सोनी चौरसिया
  8. समलैंगिक विवाह साठी कोणत्या देशांतील न्यायालयाने परवानगी नाकारली - चीन
  9. कोणत्या संघटनेने मुस्लिम धर्मगुरुओं यांच्या ह्त्यचे आदेश दिले :-इस्लामिक स्टेट (आईएस)
  10. १३ एप्रिल २०१६ रोजी भारत आणी -------------- या देशात मत्स्य पालन संबधी करार केला गेला:- - बांग्लादेश
  11.  जम्मू काश्मींरच्या १३ व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या मेहबूबा मुफ्ती या देशातील ------------- मुस्लिम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत :-दुसऱ्या
  12.  आंध्र प्रदेशाकडे पर्यटकांचा ओढा वळविण्यासाठी येथील सरकारने ---------------- यांना आंध्राचे पर्यटनदूत म्हणून जाहीर केले :-अजय देवगन व काजोल
  13. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने जागतिक स्पर्धेसाठी अॅम्बेसीडर म्हणून नियुक्त केले ? :-मेरी कोम
  14. सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणारे---------------- हे देशातील पहिलेच राज्य ठरले? :-महाराष्ट्र
  15. २०१६ मधील जी :-७ यादेशांची बैटक ----------------- या देशात होणार आहे :-जपान
  16.  दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी मिशन भगीरथ हे अभियान कोणत्या राज्याने राबवले :-तेलंगणा
  17.  ------------------ या साठी आर व्ही ईश्वर समिती नेमण्यात आली आहे :-आयकर कायद्यात सुधारणा
  18. ------------------------- यांना " कृषी चे' ऋषी " म्हणून ओळखले जाते  :-सुभाष पालेकर
  19. फेमिना मिस इंडिया २०१६ चा किताब ------------------------- हिने जिंकला:- प्रियदर्शनी चटर्जी
  20. A State in Denial – Pakistan’s Misguided and Dangerous Crusad”?या पुस्तकाचे लेखक ----------------- हे आहेत :-बी जी वर्गीस
  21.  --------------- हे राज्य Land Bill पास करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ? :-राजस्थान
  22.  ---------------- यांची 'स्किल इंडिया' या अभियानासाठी ब्रांड अॅम्बेसीटर म्हणून नियुक्ती केली ? :-सचिन तेंडूलकर
  23. अलीकडेच सरकारी जाहिरातीचे निरीक्षण करण्यासाठी ------------- समितीची स्थापना करण्यात आली ? :-बी बी टंडन समिती
  24. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोणती मोहीम सुरु केली :- ग्रामोदय से भारत उदय
  25. --------- हिला  रिजर्व बैंक ऑफ इंडिया (आरबीआई) ने 11 एप्रिल  2016 रोजी पेमेंट बैंक चा परवाणा दि bला:- एयरटेल एम कॉमर्स सर्विसेस लिमिटेड (एएमएसएल)( भारती एयरटेल (Bharti Airtel)  ची सब्सिडियरी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा