Post views: counter

Current Affairs September 2016 Part - 3

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘डेटा ट्रॅफिक’ पाचपट होणार!

वेगाने वाढणारे फोरजी नेटवर्क आणि त्यात रिलायन्स जिओचे झालेले आगमन यांमुळे माहितीची वाहतूक अर्थात डेटा ट्रॅफिक वर्षअखेर पाचपट होईल, असा अंदाज भारतीय तंत्रज्ञान कंपनी असलेल्या 'इंडस ओएस'ने वर्तवला आहे.

इंडस ओएस ही स्मार्टफोनसाठी भारतीय भाषांमध्ये ऑपरेटिंग प्रणाली तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनीच्या अंदाजानुसार, माहिती मिळवणे स्वस्त झाल्याने प्रत्येक ग्राहकाकडून दरमहिना एक जीबीपेक्षा अधिक माहिती वापरली जाणार आहे. जगात सरासरी दरमहिना ९५७ एमबी माहिती वापरली जाते. भारतात मात्र याच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश माहिती वापरली जाते. आता हे प्रमाणा जिओच्या प्रवेशामुळे बदलणार आहे. यामुळे भारत हा २०२०पर्यंत जगातील टॉप १० मोबाइल डेटा ग्राहकांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्होडाफोन-बीएसएनल यांच्यात करार

सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि व्होडाफोन यांच्यात राष्ट्रीय स्तरावर 'टूजी इंटरसर्कल रोमिंग' करार करण्यात आला आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्यांना आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास व कॉल ड्रॉपचे प्रमाण घटवण्यास मदत होणार आहे. करारानुसार दोन्ही कंपन्यांना एकमेकांचे टॉवरही वापरता येणार आहेत. देशात व्होडाफोनचे १ लाख ३७ हजार तर बीएसएनएलचे १ लाख १४ हजारपेक्षा अधिक टॉवर आहेत.

रिओ  पॅरालिंपिक २०१६ :-
दीपा मलिकला रौप्य:-
--------------------------------
* भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना
रौप्यपदकाची कमाई केली.
* अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली.
* या पदकासह पॅरालिंपिक स्पर्धेत आता भारताची तीन पदके झाली आहेत. यापूर्वी मरियप्पन थांगवेलूने उंच उडीत सुवर्ण आणि याच प्रकारात वरुण भाटीने ब्रॉंझपदक पटकावले आहे.

दीपा मलिक :-
* शरीरात खांदा ते कंबर या भागात तीन गाठी झाल्या होत्या. त्यांचा आकारदेखील मोठा होता. शस्त्रक्रिया करून काढताना खांद्याच्या खालील भागातील काही नस दाबल्या गेल्या आणि त्यांच्या पायातील ताकद गेली. तब्बल 183 टाके त्या वेळी घालण्यात आले होते. पंधरावर्षांपूर्वी झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर त्या अपंग झाल्या.
* 45 वर्षीय दीपा मलिक पॅरालिंपिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.
* दोन मुलांची आई असलेल्या दीपा यांना भारत सरकारच्या वतीने "अर्जुन‘ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
* दीपा यांच्या नावावर महिलांच्या भाला फेक प्रकारात आशियाई विक्रमाची नोंद आहे.
* मार्च २०१६ मध्ये दुबईमध्ये झालेल्या आशियाई ओशियन स्पर्धेत दीपाने भालाफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.
* दीपा यांनी 2008 मध्ये यमुना नदी प्रवाहाच्या विरोधात एक किलोमीटर अंतर पोहून पार केले होते.
* त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी विशेष मोटारसायकलवरून 58 कि.मी. अंतर पार केले होते.

Source: Study Circle FB page

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" ब्रिक्स' पर्यावरण मंत्र्यांची शुक्रवारी बैठक

पणजी - ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक शुक्रवारी ( ता. 16 ) केळशी येथील पार्क हयात हॉटेलमध्ये होणार आहे . परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे , हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे .
बैठकीचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे केंद्रीय पर्यावरण , वन आणि हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री अनिल माधव दवे उद्या गोव्यात येत आहेत .

 पर्यावरणासंदर्भातील परस्पर सामंजस्य करार आणि संयुक्त कार्यगट या विषयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे . " ब्रिक्स ' समूहातील देशांचे पर्यावरण मंत्री वायुप्रदूषण , जल प्रदूषण , कचरा व्यवस्थापन , हवामानबदल , जैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सहकार्याने कृती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाण्याची शक्यता आहे . या बैठकीनंतर अधिकारी स्तरावरील चर्चा होणार आहे .
पर्यावरणमंत्र्यांची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. विकासासाठीच्या आर्थिक सहकार्यासाठी अदिस अबाबा कृती विषयपत्रिका , शाश्वत विकास ध्येय आणि गेल्या वर्षी झालेला पॅरिस करार यानंतर ही बैठक होत आहे .

 ऑक्टोबरमध्ये गोव्यात "ब्रिक्स ' राष्ट्रप्रमुखांची बैठक होत आहे , त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अनेक स्तरावरील बैठकांपैकी ही बैठक आहे . केंद्र सरकारच्या पर्यावरण , वन आणि हवामानबदल खात्याने या बैठकीचे आयोजन केले आहे .

बैठकीकडे जगाचे लक्ष
ब्राझील , रशिया , भारत , चीन , दक्षिण आफ्रिका या "ब्रिक्स ' समूहातील राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्येत वाटा 41. 6 टक्के , जागतिक भू - भागाच्या 29 . 31 टक्के भूभाग व्यापला आहे आणि जागतिक "जीडीपी ' मध्ये 22 टक्के वाटा आहे . "ब्रिक्स ' समूहातील देशांकडे समृद्ध अशी नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधता आढळते . त्यामुळे या बैठकीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बलुच भाषेत आता संकेतस्थळ व मोबाईल ऍपही

नवी दिल्ली - बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने ( एआयआर ) आखली आहे . येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता . त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे . या कार्यक्रमांना बलुच नागरिकांबरोबर इतर देशांतील नागरिकांचाही प्रतिसाद मिळावा, या हेतूने संकेतस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याचा विचार सुरू होता . त्यावर तातडीने निर्णय घेत ही सुविधा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे .

डिजिटल युगात आपला श्रोतावर्ग वाढविण्यावर प्रसार भारतीने आपले लक्ष केंद्रित केले असून , संकेतस्थळ व ऍप सुरू करणे या त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे . बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती . रेडिओ सेवेचा लाभ पाकिस्तानबरोबर इतर शेजारी देशातील नागरिकही घेतात .

काश्मीरप्रश्नी होणारा पाकिस्तानचा हस्तक्षेप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता . त्याला बलुची नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची मागणी केली होती .

" एआयआर ' चा विस्तार
- 108 देशांमध्ये प्रसारण
- 27 भाषांमध्ये विविध कार्यक्रम
- कार्यक्रमांत 15 परदेशी भाषांचा अंतर्भाव

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' भारत- बांगलादेश संबंध नव्या उंचीवर '
भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोचले असून , दोन्ही देश विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांत असल्याचे प्रतिपादन भारताचे बांगलादेशमधील उच्चायुक्त हर्षवर्धन श्रींगला यांनी केले. ते सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून , त्रिपुरा येथे पत्रकारांशी बोलत होते .

 बांगलादेशने दहशतवादाविरोधात उघडलेली मोहीम कौतुकास्पद असून , भारताने यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन बांगलादेशला दिले आहे . द्विपक्षीय संबंधांबरोबर राज्यांशी विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात असून , त्रिपुरा व बांगलादेशमधील संबंध याची प्रचिती देतात , असे श्रींगला यांनी स्पष्ट केले. बांगलादेशने भारतास मेघना नदीवरील बंदर आणि नदीमार्गाबरोबर आसाम , आगरताळा सीमेवरील मार्गाचा वापर करण्यासही परवानगी दिली आहे . आसाम - आगरताळा महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून , त्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹याहूचे नाव वापरण्यास भारतीय कंपनीला मनाई

नवी दिल्ली - याहू कंपनीचा ट्रेडमार्क वापरण्यापासून भारतीय कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे . अमेरिकेतील याहू कंपनीचे नोंदणीकृत नाव वापरणे , हे नियमांचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे .

एप्रिकॉट फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ( एएफपीएल) संचालक संजय पटेल आणि श्री जी ट्रेडर्स यांच्याविरुद्ध ट्रेडमार्क नियमांचा भंग केल्याप्रकरणी याहू इन्कॉर्पोरेशनने खटला दाखल केला होता . या कंपन्यांनी याहूला 32 लाख नुकसान भरपाई आणि 6 . 44 लाख रुपये न्यायालयीन खर्च द्यावा , असा आदेश न्यायालयाने दिला आहे . एएफपीएलने त्यांची उत्पादने "याहू मसाला चक्र ' आणि "याहू टोमॅटो टॅंगी ' या नावाने बाजारात विक्रीसाठी आणली होती . हा ट्रेडमार्क नियमांचा भंग असल्याचे याहूचे म्हणणे होते . या सुनावणीला एएफपीएलचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित नव्हते ; तसेच लिखित स्वरूपातही कंपनीने न्यायालयात म्हणणे मांडले नाही . श्री जी ट्रेडर्सने याहूच्या नावाचा वापर केला नसल्याचे न्यायालयात सांगितले . यावर याहूने त्यांच्याविरुद्धची भरपाईची मागणी मागे घेतली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्रिटनमध्ये चलनात आता प्लॅस्टिक नोट

लंडन - " बॅंक ऑफ इंग्लंड ' ने प्लॅस्टिक चलनी नोट मंगळवारी प्रथमच व्यवहारात आणली आहे . पाच पौंडची ही नोट इंग्लंड आणि वेल्समध्ये वितरित करण्यात येणार असून , त्यावर दुसऱ्या महायुद्ध काळातील नेते विन्स्टन चर्चिल यांचे छायाचित्र आहे .

देशातील बॅंका आणि एटीएममधून आगामी आठवड्यांत ही नोट वितरित होणार आहे . ही नोट पॉलिमरची असून , ती पातळ व लवचिक प्लॅस्टिकची बनविलेली आहे . पर्यावरणासाठी ती कमी हानिकारक असून , सध्या चलनात असलेल्या नोटांपेक्षा तिच्या बनावट नोटा करणे अवघड आहे , अशा माहिती मध्यवर्ती बॅंकेने दिली आहे . पॉलिमरच्या वापरामुळे नोट पाकिटांमध्ये दुमडून ठेवता येणार आहे . वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यानंतरही ही नोट व्यवस्थित राहत आहे . सध्या अस्तित्वात असलेल्या नोटेच्या तुलनेत ही नोट अडीचपट अधिक काळ टिकेल.

स्कॉटलंडमध्ये मर्यादित स्वरूपात प्लॅस्टिकच्या पाच पौंडच्या चलनी नोटा मार्च 2015 पासून व्यवहारात आहेत. सर्व जनतेसाठी ऑक्टोबर 2016 पासून त्या व्यवहारात आणण्याची योजना आहे .

 प्लॅस्टिक नोटेचा वापर करणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनसह कॅनडा , मेक्सिको , न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे . नवी दहा पौंडची प्लॅस्टिक नोट 2017 मध्ये चलनात येणार असून , त्यावर "प्राइड ऍण्ड प्रिज्युडाईस ' या कादंबरीच्या लेखिका जेन ऑस्टिन आणि 19 व्या शतकातील चित्रकार जे. एम . डब्लू टर्नर यांचे छायाचित्र असलेली 20 पौंडची प्लॅस्टिक नोट 2020 पासून चलनात येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भूगर्भातील आण्विक इंधनाची मोजदाद होणार

वॉशिंग्टन - पृथ्वीच्या पोटात दडलेले आण्विक इंधन आणि किरणोत्सारी ऊर्जा यांचे मोजमाप 2025 पर्यंत करता येणे शक्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे . यामुळे या इंधनाचा वापर आणखी किती काळ करता येईल , याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे .

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूस्तर हालचाली , ज्वालामुखी आणि चुंबकीय क्षेत्रासाठी पृथ्वीला इंधनाची गरज असते . एखाद्या हायब्रीड कारप्रमाणे , पृथ्वी ऊर्जेच्या दोन स्रोतांचा वापर करते. पृथ्वीच्या निर्मितीपासून दडलेली पुरातन ऊर्जा आणि नैसर्गिकरीत्या किरणोत्सर्गापासून तयार होणारी उष्णता या दोन ऊर्जांचा वापर केला जातो . ही ऊर्जा मोजण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून करत आहेत. यासाठी त्यांनी विविध प्रयोग करत अनेक अंदाज बांधले मात्र , अद्यापही या इंधनाची मोजदाद झालेली नाही .

अमेरिकेतील मेरीलॅंड विद्यापीठ , प्राग येथील चार्ल्स विद्यापीठ आणि चीनमधील भूगर्भ विज्ञान संस्थेने मात्र पृथ्वीच्या पोटातील आण्विक इंधन 2025 पर्यंत मोजता येणे शक्य असल्याचा दावा केला आहे . आतापर्यंतचे सर्वांत सूक्ष्म कण म्हणून विज्ञानाला माहीत असलेल्या "जिओन्यूट्रिऑन्स' च्या शोधावर या शास्त्रज्ञांचा शोध अवलंबून आहे . तारे , सुपरनोव्हा , कृष्णविवर आणि अणुभट्ट्यांमधील आण्विक प्रक्रियेतून हे कण उत्पन्न होतात . याशिवाय भूगर्भात होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांच्या विघटनाच्या प्रक्रियेतूनही हे कण निर्माण होतात . हे कण शोधण्यासाठी एखाद्या इमारतीच्या आकाराच्या डिटेक्टरची आवश्यकता असून , तो जमिनीखाली किमान एक मैल खोल ठेवणे आवश्यक असते . या डिटेक्टरमध्ये हायड्रोजन कणांबरोबर धडक बसल्यानंतर हे " जिओन्यूट्रिऑन्स' शास्त्रज्ञांना मिळतात . या दोन कणांची धडक बसल्यावर विशिष्ट प्रकारचा प्रकाश बाहेर पडल्याने हे कण ओळखता येतात . अशी धडक जितक्या वेळा बसेल , तितके युरेनियम आणि थोरीयमचे कण भूगर्भात असल्याचे समजते . या घटकांचे पोटॅशियमबरोबर होणाऱ्या विघटनातून पृथ्वीच्या पोटात असलेल्या ऊर्जेचा अंदाज बांधता येईल , असे शास्त्रज्ञांना वाटते.

वर्षाला केवळ सोळा कण

सध्या तरी , हे " जिओन्यूट्रिऑन्स' सापडण्याचा वेग अत्यंत कमी असून शास्त्रज्ञांना प्रतिवर्ष केवळ सोळा कण मिळत असल्याचे दिसून आले आहे . या प्रयोगासाठीचे डिटेक्टर जपान आणि इटलीत कार्यरत आहेत. मात्र , पुढील काही वर्षांत आणखी तीन डिटेक्टर कार्यरत होऊन अधिक माहिती उपलब्ध होईल आणि त्याद्वारे आण्विक इंधनाची मोजदाद करता येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विश्वविक्रमासह देवेंद्रने पटकाविले दुसऱ्यांदा सुवर्ण

रिओ दि जानिरो - रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे . देवेंद्रने भालाफेकमध्ये 63. 97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला . देवेंद्रच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातून कौतुक करण्यात येत आहे . पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे .

ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे . रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण , एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे . डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे . हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे .

रिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ 46 प्रकारात देवेंद्रने विश्वविक्रम नोंदविला . यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62. 15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते. त्याने आता 2016 मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले . जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे . देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑगस्ट २०१६ ठरला सर्वाधिक उष्ण महिना

जागतिक तापमानवाढीची चर्चा होत असतानाच ऑगस्ट २०१६ हा महिना गेल्या १३६ वर्षांतील 'सर्वाधिक उष्ण' महिना ठरला असल्याची माहिती अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेने दिली आहे.

तापमान मोजण्याच्या आधुनिक पद्धतीनुसार, 'नासा'तर्फे या नोंदी घेण्यात आल्या आहेत. जागतिक तापमान साधारणपणे जुलैमध्ये सर्वाधिक असते. मात्र गेल्या ऑगस्ट महिन्याने सगळे 'रेकॉर्ड' मोडून उच्च तापमानाची नोंद केली आहे. 'नासा'च्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज (जीआयएसएस) या संस्थेतर्फे जागतिक तापमानाचे दर महिन्याला विश्लेषण केले जाते. त्या अभ्यासानुसार हे निष्कर्ष पुढे आले आहेत. याआधी ऑगस्ट २०१४ या महिन्यात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्या महिन्यापेक्षा ऑगस्ट २०१६ मध्ये ०.१६ अंशांनी अधिक तापमानाची नोंद झाली आहे. १९५१ ते १९८० या काळातील ऑगस्ट महिन्यांच्या तापमानाच्या सरासरीपेक्षाही ऑगस्ट २०१६ चे तापमान ०.९८ अंशांनी अधिक होते. 'दीर्घकालीन अभ्यासाअंती जो 'ट्रेंड' लक्षात येतो, त्याचा उपयोग पृथ्वीवर सध्या होत असलेले परिणाम अभ्यासण्यासाठी होतो', अशी माहिती 'जीआयएसएस'चे संचालक गॅविन श्मिट यांनी दिली.

जगभरात केल्या नोंदी

'जीआयएसएस'ने जगभरातील तब्बल ६ हजार ३०० वेधशाळांमधून या अभ्यासासाठी तापमानाच्या नोंदी गोळा केल्या आहेत. यामध्ये पृथ्वीवरील सर्वांत थंड प्रदेश असणाऱ्या अंटार्क्टिका येथील संशोधन केंद्राचाही समावेश आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजणाऱ्या विशेष उपकरणांचाही या अभ्यासामध्ये वापर करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पॅरालिम्पिकः दीपाला रौप्य

भारताच्या दीपा मलिकने सोमवारी रिओ पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पॅरालिम्पिकच्या महिला अॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. रिओ पॅरालिम्पिकच्या गोळाफेक एफ५३मध्ये तिने आपल्या सहाव्या प्रयत्नात ४.६१ मीटरवर गोळाफेक करत रौप्यपदकावर नाव कोरले. ही दीपाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीदेखील ठरली.

बाहरिनच्या फातीमा नेधमने (४.७६ मीटर) सुवर्णपदकाचा मान पटकावला, तर ग्रीसच्या दिमित्रा कोरोकिडाला ब्राँझपदकावर (४.२८ मीटर) समाधान मानावे लागले. यापदकासह भारताची रिओ पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या तीन झाली आहे. याआधी मरियप्पन तंगवेलूने उंच उडी टी-४२मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती, तर याच स्पर्धेत भारताच्या वरुणसिंग भटीने ब्राँझपदकाची कमाई केली होती.

मणक्याला ट्युमर झाल्याने दीपा मलिकला कमरेच्या खाली अपंगत्व आले.
१९९९मध्ये झालेल्या या आजारामुळे तिच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. तसेच १८३ टाकेही घालावे लागले. दीपाही सराईत स्विमर आहे, सहासी क्रीडा प्रकाराही तिला आवडतात. शिवाय बाईक चालवण्यातही तिचा हातखंडा होता. तीन हजार किलोमीटरचे चेन्नई-दिल्ली हे ३,००० किलोमीटरचे अंतर दीपाने कस्टमाईझ बाईकवरुन पार केले होते. मात्र मणक्याच्या आजाराने दीपाला अपंगत्व आले; पण हा आजार दीपाचा जोश कमी करू शकला नाही. तिने पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा ध्यास घेतला. अन् वयाच्या ४५ व्या वर्षी दीपाने हा पराक्रम करूनही दाखवला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹Rio Paralympics 2016: सुवर्णपदक विजेत्या देवेंद्रबद्दलच्या १० खास गोष्टी…

रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झाझरिया याने भालाफेकमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. देवेंद्रचे हे दुसरे पॅरालिम्पिक सुवर्णपदक ठरले. याआधी देवेंद्रने अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती, पण यावेळी देवेंद्रने सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रमाला देखील गवसणी घातली.

देवेंद्रने रिओमध्ये ६३.९७ मीटर लांब भालाफेक करून जागतिक विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम देखील देवेंद्रच्याच नावावर होता. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने ६२.१५ मी. भालाफेक केली होती. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील देवेंद्रने आजवर वैयक्तिक जीवनात अनेक आव्हानांचा सामना केला आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेची दोन सुवर्णपदके नावावर असलेल्या देवेंद्रबद्दलच्या १० गोष्टी-

१. देवेंद्र झाझरिया ८ वर्षांचा असताना त्याचा मित्रांसोबत खेळताना अपघात झाला होता. देवेंद्रला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड होती. जास्तीत जास्त वेळ तो मैदानात असायचा, असाच एके दिवशी खेळत असताना त्याला अपघाताला सामोरे जावे लागले. एका वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने देवेंद्रला ११,००० व्होल्ट क्षमतेचा झटका बसला होता.

२. दुर्घटनेत देवेंद्रचे शरीर मोठ्या प्रमाणावर भाजले गेले, यात त्याला आपला डावा हात देखील गमवावा लागला. पण प्रचंड इच्छाशक्ती आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे देवेंद्रने आपल्या अपंगत्वाला मागे टाकले. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी मोठा पाठिंबा दिला. माझ्यामुळे कुटुंबियांना होणारा त्रास त्यांनी कधीच दाखवून दिला नाही, उलट मला नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम केले. यामुळे मी जीवनात पुढे जाऊ शकलो, असे देवेंद्र सांगतो.

३. देवेंद्रने इयता दहावीत असताना पहिल्यांदा भाला उचलला. दुर्घटनेतून पूर्णपणे सावरल्यानंतर सततचा भालाफेकीचा सराव आणि प्रचंड मेहनतीने देवेंद्रने जिल्हास्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केले. आंतरमहाविद्यालयीन, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत देखील देवेंद्रने आपले नाव कोरले. सुरूवातीला देवेंद्रला पॅरालिम्पिक स्पर्धेबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.

४. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आर.डी.सिंह अर्थात देवेंद्रचे प्रशिक्षक यांनीच देवेंद्रची विशेष खेळाडूंसाठीच्या स्पर्धेची ओळख करून दिली. त्यानंतर आर.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रने भालाफेकीचे धडे गिरवले.

५. देवेंद्र झझारियाने २००४ साली अॅथेन्स पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला. सुवर्णपदकासह देवेंद्रने भालाफेकीत जागतिक विक्रमाची देखील नोंद केली होती. देवेंद्रने ६२.१५ मी. भालाफेक केला होता. त्यानंतर यंदा देवेंद्रने पुन्हा एकदा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. रिओ ऑलिम्पिकमध्ये देवेंद्रने ६३.९७ मी. लांब भालाफेक करून नव्या विक्रमाची नोंद केली.

६. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर देवेंद्रने २०१३ साली आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती.

७. अथेन्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतरही देवेंद्रची हलाकीच्या परिस्थितीशी झुंज देत होता. त्याला कोणताही आर्थिक मदत मिळाली नव्हती. भालाफेक खेळाप्रतीच्या देवेंद्रच्या योगदानाची २००४ नंतर हळूहळू दखल घेतली गेली. सरकार आणि खासगी प्रायोजक देखील देवेंद्रच्या मदतीसाठी धावून आले. देवेंद्रला सध्या गो-स्पोर्ट्स कंपनी सहकार्य करते.

८. २०१५ साली आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये देवेंद्रने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत देवेंद्रने रौप्य पदकाची कमाई केली होती.

९. २०१२ साली देवेंद्रला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळालेला पहिला पॅरा-खेळाडू म्हणून देवेंद्रला ओळखले गेले. त्यानंतर २०१४ साली देवेंद्रला सर्वोत्कृष्ट पॅरा-खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

१०. दोनवेळा सुवर्णपदक विजेत्या देवेंद्र झझारिया याच्याकडे आता १४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय पॅरा-स्पर्धेचा अनुभव गाठीशी आहे. भविष्यात आपल्यासारख्या विशेष युवा खेळाडूंना प्रशिक्षण देऊन भालाफेक खेळाचा प्रसार करण्याचे स्वप्न देवेंद्रचे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रायगड जिल्हय़ातील ३४ हजार कुटुंबांना स्वच्छता विभागाची नोटीस

रायगड जिल्ह्य़ातील ३४ हजार कुटुंबांना स्वच्छता विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वैयक्तिक शौचालये बांधा, नाही तर कारवाईला सामोरे जा, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात जनजागृती केली जात आहे. गावागावांत स्वच्छता आणि आरोग्य राहावे यासाठी लोकांना वैयक्तिक शौचालये बांधण्याचे आवाहन केले जात आहे. याचे चांगले परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असली तरी रायगड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांत हागणदारी मुक्त अभियानाला अपेक्षित सहभाग मिळताना दिसत नाही. त्यामुळे व्यापक जनजागृती करूनही सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्या कुटुंबांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय स्वच्छता विभागाने घेतला आहे. जिल्ह्य़ातील ३४ हजार कुटुंबांना आतापर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१च्या कलम ११५ आणि ११७ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शौचालये बांधा, सार्वजनिक ठिकाणी शौचाला बसून लोकांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचबरोबर यापुढील काळात वैयक्तिक शौचालये न बांधणाऱ्या कुटुंबांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करणे, शासकीय योजनांपासून त्यांना वंचित ठेवणे यांसारखी पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कर्जत १४ हजार ३२७, पनवेल १३ हजार ८८२, अलिबाग ११ हजार २७७, पेण ११ हजार २६६, रोहा ९ हजार ३५७, माणगाव ९ हजार २०९, खालापूर ७ हजार २८४, सुधागड ७ हजार २२० आणि मुरुडमधील ४ हजार २३८ कुटुंबांनी अद्याप वैयक्तिक शौचालये बांधलेली नाहीत. या सर्वाना आता स्वच्छता विभागाकडून नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

जिल्ह्य़ातील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत हे तालुके १०० टक्के हागणदारी मुक्त होणार आहेत. शहरीकरणापासून अद्याप दूर असणाऱ्या या तालुक्यांनी हे उद्दिष्ट साध्य केले आहे. मात्र दुसरीकडे पनवेल, अलिबाग, पेण, कर्जत यांसारख्या शहरीकरणाच्या वाटेवर असणाऱ्या तालुक्यांची हागणदारीमुक्त अभियानातील कामगिरी निराशाजनक आहे. या तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कारवाईचे हत्यार उपासण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागावर आली आहे.
वारंवार प्रबोधन करूनही शहरी तालुक्यातील लोक वैयक्तिक शौचालय बांधण्यास पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे कारवाईचे हत्यार उपसण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागावर आली आहे. शौचालये बांधण्यासाठी निधी देण्यासही आम्ही तयार आहोत. लोकांनी सामाजिक भान ठेवून समोर यावे आणि घर तिथे शौचालय योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री हागणदारी मुक्त योजनेचा आढावा घेणार

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारी मुक्त गाव मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कोकण विभागात झालेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १८ सप्टेंबरला घेणार आहेत. कोकणातील सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या बठकीला उपस्थित राहण्याचा फतवा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी धास्तावले आहेत. जिल्ह्य़ातील आकडेवारीचे अद्ययावतीकरण सुरू करण्यात आले आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्य़ांनी हागणदारी मुक्त अभियानात केलेले काम लक्षवेधी आहे. मात्र रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्य़ांचे काम समाधानकारक झालेले नाही. त्यामुळे या बठकीत काय होणार याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भाताच्या नव्या प्रजातीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य

ऑस्ट्रेलियन संशोधकांनी भारताच्या एम.एस.स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनशी भागीदारी केली असून त्यात क्षारता सहन करू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाणार आहे. टास्मानिया विद्यापीठ व स्वामीनाथन फाउंडेशन यांच्यात गेल्या आठवडय़ात चेन्नई येथे २० लाख अमेरिकी डॉलर्सचा करार झाला असून त्याला ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे पाठबळ आहे. यात क्षारपड जमिनीत टिकाव धरू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाईल. भात हे आशियात अनेकांचे अन्न असून एकूण ९२ टक्के उत्पादनही आशियात होते, असे विद्यापीठाच्या अन्न संशोधन विभागाचे प्रमुख होल्गर मेन्क यांनी सांगितले. या भागातील भाताच्या उत्पादनावर क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण शेतांमध्ये वाढल्याने परिणाम झाला आहे. जमिनी अनुत्पादित होत असून अनेक शेतक ऱ्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. टास्मानिया विद्यापीठाने म्हटले आहे, की टास्मानियन कृषी संस्था जंगली भाताच्या प्रजातीची लागवड क्षारपड जमिनीत करीत आहे. जंगली भातातील जनुकांचा वापर नेहमीच्या भाताच्या प्रजातीत केला, तर त्या क्षारपड जमिनीतही वाढू शकतील व जगातील कुठल्याही क्षारयुक्त परिसरात त्यांची वाढ करता येईल. ते म्हणाले, की हा प्रकल्प तीन महिन्यांचा असून सर्जेई शाबाला यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

 ऑस्ट्रेलियाचा क्रमांक भात म्हणजे तांदळाच्या निर्यातीत तिसरा लागतो. कृषी उत्पादनांच्या एकूण निर्यातीत त्या देशाचा नववा क्रमांक आहे. मूल्यवर्धित निर्यातीतून ५०० दशलक्ष डॉलर्स तर वार्षिक ८०० दशलक्ष डॉलर्सचा महसूल त्यातून निर्माण होतो. क्षारपड जमिनीत उत्पादन देणाऱ्या भाताच्या प्रजातीमुळे भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील शेतक ऱ्यांना फायदा होणार आहे. टास्मानिया विद्यापीठ वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे झोंगहुआ चेन यांचेही सहकार्य घेत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रत्येक खेडेगाव होणार २०१८ अखेरीस डिजिटल

राज्यात पायाभूत सुविधांवर भर देतानाच प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे सांगत २०१८ च्या अखेरीस प्रत्येक गाव डिजिटल झालेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल आणि त्याद्वारे आरोग्य, शिक्षणासह विविध सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’च्या समारोप भाषणात बोलताना व्यक्त केला.

२०२० मध्ये देश प्रगत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून त्यात पायाभूत सुविधा क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असेल. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पायाभूत प्रकल्पांबाबत कॉन्क्लेव्हचे आयोजन करून लोकमतने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली.

 विकासाच्या प्रक्रियेत रस्ते हे इंजिनासारखे आहेत. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे ओळखून सुवर्ण चतुष्कोन, ग्रामसडक योजना आणली होती. आज रस्त्यांच्या जाळ्यासोबतच डिजिटल युगामध्ये प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुलाबा ते सिप्झ व्हाया विमानतळ अशा ३० किलोमीटरच्या भूमिगत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या आॅक्टोबरमध्ये सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिीतीत झालेल्या पॅनल चर्चेत मुंबई आणि राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांचे रोडमॅप सादर केले. तर लोकमतचे व्यवस्थापकीय सहसंचालक ऋषी दर्डा यांनी आभार मनाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१६ चा दया पवार स्मृती पुरस्कार कवी-लेखक वीरा राठोड, लोककला अभ्यासक-शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा मंगळवार, २० सप्टेंबर २०१६ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई सायं. ७.१५ वाजता होणार आहे. यंदाचा हा विसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.

औरंगाबाद येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वीरा राठोड यांच्या भटक्या, बंजारा संस्कृतीवर आधारित असलेल्या `सेन सायी वेस’ या अतिशय चर्चिल्या गेलेल्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीने नुकतेच युवा साहित्य अकादमी पुरस्काने गौरवले होते. गावगाड्या बाहेर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या आक्रोश कवितांच्या माध्यमातून मांडणाऱ्या वीरा राठोड यांची `पिढी घडायेरी वाते’ हा गोरबंजारा बोलीतील कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे आणि `अजिंठ्याची पारू – वाद, वास्तव आणि विपर्यास’ हा संशोधन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेले वीरा राठोड अनेक दैनिकांमध्ये स्तंभलेखनही करीत असतात.

बाजीराव मस्तानी चित्रपटातील `दिवानी मस्तानी’ हे गाणं गाणारे मराठवाड्याचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापिठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत असून तमाशावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. लोककलांचे सादरीकरण आणि संशोधन अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या चंदनशिवे यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या खास रांगड्या गायनशैलीचा प्रभाव पाडला असून झाकीर हुसेन, शंकर महादेवन, तौफिक कुरेशी या दिग्गजांसोबत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितिक कार्यक्रम करीत आहेत.

समाजातल्या शोषित-वंचितांचे जगणे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून जगासमोर मांडणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या सर्व प्रमुख दैनिकांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे सुधारक ओलवे यांचे मुंबईतील सफाई कामगारांच्या भीषण वास्तवावर आधारित `न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ हे फोटोबुक खुप गाजले.

 झारखंडमधील माता-बालमृत्यू, कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन, मेघालयातील आदिवासींची स्थिती अशा विविध विषयांमधून त्यांनी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे. ओलवे यांनी दोनवेळा भारतभ्रमण केले आहे, तसेच परदेशातही छायाचित्रण केले आहे.

आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ.जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस

‘त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. या लघू ग्रहाचे प्रक्षेपण इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरमधून सप्टेंबरच्या अखेरीस करणार आहे.

आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ नावाचा उपग्रह तयार केला.
 एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर यांच्या संकल्पनेतून हा उपग्रह बनवण्यात आला. २००९ साली इस्रोसोबत या लघू उपग्रहासंदर्भात सामंजस्य करार झाला. हा करार २०१४ पर्यंत वाढविण्यात आला, पण या लघू उपग्रहाच्या प्रक्षेपणाला इस्रोचा हिरवा कंदील मिळत नव्हता. अखेर आठ वर्षांनंतर इस्रोकडून ‘प्रथम’ ला हिरवा कंदील मिळाला असून, महिन्याअखेरीस त्याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे.

प्रथम या उपग्रहाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी घेतली आहे. नासाचे माजी प्रशासक डॉ. मायकल ग्रिफीन यांनी विद्यार्थ्यांच्या या शोधाचे आणि कल्पक वृत्तीचे कौतुक केले, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनही
‘प्रथम’चे कौतुक करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कुपोषण समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

मुंबई - पालघर जिल्ह्यातील जव्हार , मोखाडा या भागातील बालकांच्या कुपोषणाच्या समस्या सोडविण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यपाल सी . विद्यासागर राव संतप्त झाले असून त्यांनी आज सरकारची खरडपट्टी केल्याचे समजते . आरोग्य , महिला व बालकल्याण आणि आदिवासी या तिन्ही विभागांच्या समन्वयातून युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत , असे निर्देश त्यांनी सरकारला दिले .

जव्हार , मोखाडा तालुक्यांत मोठ्या संख्येने कुपोषणग्रस्त बालके आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती . महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे , आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते .

राज्यपाल म्हणाले , की मुंबईलगतच्या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची गंभीर समस्या असणे चिंताजनक आहे . कुपोषणावर दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच तातडीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात , तसेच येत्या महिनाभरात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवावे. आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , आरोग्य अधिकारी यांची बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात यावा . आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांवर नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी हजर व्हावे यासाठी प्रभावी उपाय योजावेत ; तसेच गैरहजर डॉक्टरांविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई करावी , असेही ते म्हणाले . कुपोषणग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे , अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी सर्वच विभागांनी संवेदनशीलपणे काम करावे, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले , की पुढील तीन महिन्यांत या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळेल असा कृती आराखडा तयार करा . आरोग्य शिबिर आयोजित करून बालकांची तपासणी मोहीम हाती घ्यावी .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रमेश रासकर यांना " कुंभथॉन 'साठी " एमआयटी -लेमेलसन ' पुरस्कार

नाशिक - मूळचे नाशिकचे व गेल्या वीस वर्षांहून अधिक कालावधीपासून अमेरिकेत कार्यरत असलेले प्रा . डॉ . रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे . 5 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3 कोटी 35 लाख , अशी पारितोषिकाची रक्कम आहे . त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला आहे . रासकर यांच्या नावावर 75 हून अधिक पेटंट आहेत.

डॉ . रासकर 2008 पासून एमआयटीशी जोडलेले आहेत. सध्या ते एमआयटी मीडिया लॅबच्या कॅमेरा कल्चर ग्रुपचे प्रमुख आहेत. कुंभमेळ्यापूर्वी राबविलेल्या कुंभथॉन या संशोधन चळवळीच्या उभारणीत रासकर यांचे मोलाचे योगदान होते . स्मार्टफोनद्वारे चष्म्याचा नंबर शोधणे, डोळ्यांच्या महत्त्वाच्या तपासण्या करणे यासह विविध संशोधन कार्य त्यांनी केले असून 75 हून अधिक संशोधनांसाठी पेटंट नोंदविली आहेत. कुंभथॉन उपक्रम सुरू झाल्यापासून दर तीन महिन्यांनी ते " एमआयटी ' तील संशोधकांना भारतात विशेषत : नाशिकमध्ये संशोधनासाठी आणतात . शैक्षणिक संस्था व उद्योजकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग, उपक्रम राबविले आहेत. अवाक् करणारे संशोधन त्यांच्याकडून नेहमी केले जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वायुप्रदूषणामुळे मुंबईत श्वास कोंडतोय

मुंबई - मुंबईच्या हवेबरोबरच समुद्राचे पाणीही प्रदूषित असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात म्हटले आहे . वायुप्रदूषणामुळे मुंबईत श्वासोच्छ्वास करणे कठीण झाले आहे . सर्वाधिक प्रदूषण कुर्ला , माहूल परिसरात असल्याचे नमूद करण्यात आले आहे .

महापालिकेचा 2015 - 16 चा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल नगरसेवकांना सादर करण्यात आला आहे . या अहवालात नायट्रोजन डायऑक्साईड हे मानांकनापेक्षा दुप्पट आहे . हवेतील धूलीकणही वातावरणात दुप्पट प्रमाणात आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणांमुळे दमा , खोकला , तसेच फुप्फुसाचे आजार आणि क्षयही होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात . तरंगणाऱ्या धूलीकणांचे प्रमाण संपूर्ण मुंबईत जास्त आहे . विशेषतः बांधकामांमुळे हे धूलीकण हवेत पसरतात . मुंबईत वर्षाला तीन ते साडेतीन हजार इमारतींचे बांधकाम सुरू असते . वाहनांमुळे नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत सध्या रस्त्यावर तब्बल 27 लाख 86 हजार वाहने धावतात .

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील पाणीही प्रमाणाबाहेर दूषित झाले आहे . त्यात मानांकनापेक्षा दुप्पट ई कोलय हा भयानक विषाणू आहे . हे ग्लासभर पाणी पोटात गेले तरी डायरीयासारखा आजार होऊ शकतो. मुंबईतील मलजल आणि सांडपाणी सर्रास थेट समुद्रात सोडले जाते.

समुद्रात सोडले जाणारे मलजल अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शुद्ध करून सोडावे, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे . वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे , असे आयुक्त अजोय मेहता यांनी अहवालात म्हटले आहे .

- खार , अंधेरी , भांडुप , मरवली ( कुर्ला - माहूल रोड ) येथे मानांकनापेक्षा नायट्रोजन डायऑक्साईड जास्त आहे .
- तरंगणाऱ्या धूलीकणांचे प्रमाण मुंबईत सर्वत्र जास्त आहे .

समुद्र किनाऱ्यावरील ई कोलाय ( 100 मिलीलिटर पाण्यात ) ( मानांकन 100 / 100 मि. लि . )
- कुलाबा - 90
- वांद्रे - 130
- वरळी - 320

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाममध्ये भातपीक किडीमुळे नष्ट

गुवाहाटी - आसाममधील भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून , हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक अळ्यांनी फस्त केले आहे . यामुळे संपूर्ण शेती व्यवसाय धोक्यात आला आहे . यामुळे राज्यात पिकावरील रोगाची साथ आल्याचे जाहीर करण्यास सरकारवर दबाब वाढत आहे .

या किडीमुळे दहा जिल्ह्यांतील 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे . मध्य आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील 6 , 671 हेक्टर , दिब्रुगडमधील 5000, सिवसागरमध्ये 2 , 800 व जोरहाटमधील 1200 हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र बाधित झाले आहे . बारपेटा , नालबाडी, कोक्राझार , उत्तम लक्ष्मीपूर , माजुली व धुब्री या जिल्ह्यातही या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे . शेतीवर आलेल्या या संकटाला जबाबदार धरून कृषिमंत्री अतुल बोरा यांनी कृषी अधिकाऱ्याला मंगळवारी ( ता. 13 ) निलंबित केले असून , अन्य अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे . भात पिकावर अचानक उद्भवलेली ही साथ असून , कीटकनाशक औषधांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे , असे बोरा यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय वंशाच्या महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती

वॉशिंग्टन - भारतीय - अमेरिकन वंशाच्या महिलेची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असल्याचे व्हाइट हाउसतर्फे सांगण्यात आले . अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये 47 वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून , सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले .

अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयातील न्यूयॉर्क खंडपीठात न्यायाधीशपदी डायने गुजराती यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्या अमेरिकेतील नागरिकांची योग्य प्रकारे सेवा करतील , असे ओबामा यांनी म्हटल्याचे व्हाइट हाउसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे . भारतीय - अमेरिकन वंशाच्या गुजराती या 2012 पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकी सिनेटच्या मंजुरीनंतर गुजराती या न्यायाधीशपदाचा कार्यभार स्विकारतील .

गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत. दामोदर गुजराती यांनी 1960मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती . तसेच 1965 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती . डायने गुजराती यांनी आतापर्यंत विविध पदांवर काम केले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अस्वल व तिच्या पिल्लांच्या संरक्षणामुळे आतेगावचा जन-वन योजनेत समावेश

मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेले असतांनाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सीमेवरील आतेगावच्या गावकऱ्यांनी मात्र वन्यजीव संरक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे. अस्वल आणि तिच्या दोन पिलांना आसरा देऊन गावकऱ्यांनी जंगल आणि वन्यजीव संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे. ही कामगिरी पाहून वनाधिकाऱ्यांनी या गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलली आणि हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट केले आहे.

गेल्या २०१५ सालच्या दिवाळीत एका गावकऱ्याकडे गाईच्या गोठय़ात अस्वल आणि तिची दोन पिले आढळून आली. गावकऱ्यांसाठी ही बाब धक्कादायक होती. त्यावेळी ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे अध्यक्ष मनिराम कळपाते, सचिव अन्नाडकोरम, सदस्य वसंत हटवार, ए.डी. मेश्राम व सरपाते यांनी गावात वन्यप्राणी संवर्धनासाठी जनजागृती केली. वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले आणि त्यांनीही साथ दिली. गावकऱ्यांनी गाईच्या गोठय़ातच अस्वल आणि तिच्या दोन पिलांसाठी पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी फळे ठेवली, पण अस्वल व तिच्या पिलांनी सुरुवातीला त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. सायंकाळी ते गावाजवळच्याच जंगलात जाऊन बोरे आणि सहद खात होते. ५२ दिवसांनी मादी अस्वल आणि तिची पिले गावातून जंगलात कायमचे निघून गेले. जोपर्यंत अस्वल आणि तिची पिले गोठय़ात होती, तोपर्यंत गावकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली. ते जंगलात निघून गेल्यानंतर गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. जंगल आणि वन्यप्राणी संवर्धनात सहभागी झाल्यामुळे हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट करण्यात आले. वनखात्यातर्फे पुरवण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस जोडणी, सौर कुंपण, पाठदिवे, स्वच्छता गृह, तसेच गावातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याने सूक्ष्म योजना तयार करून गावाच्या विकासासाठी शिस्तबद्ध पद्धतीने योजना राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नवेगाव-नागझिराचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची यात मोलाची भूमिका आहे. आतेगावच्या या कामगिरीमुळे आता इतर गावांनीसुद्धा जंगल व वन्यजीव संवर्धनात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.

साकोली तालुक्यातील आतेगावच्या २४० कुटुंबांपैकी १९१ कुटुंबे एलपीजी गॅस जोडणीधारक आहेत. त्यामुळे जंगलावरील भार कमी झाला आहे. ५० कुटुंबांना माफक दरात स्वच्छतागृहे तयार करून दिले आहे. ग्राम परिस्थितीकीय विकास समितीच्या २० शेतकऱ्यांनी गावातील १९ एकरावर सेंद्रिय शेतीसाठी उत्स्फूर्त भात लागवड केली आहे. दोन शेतकरी मशरूम उत्पादन घेत आहेत. दोन तरुण जिप्सी चालवत आहेत, तसेच इतर युवक-युवतींना वनखात्याकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दूरसंचारात एकजुटीचे वारे.. ;
‘आर कॉम’मध्ये एअरसेल विलीन!

ग्राहकसंख्येत तिसरी मोठी, तर ‘जिओ’नंतर सर्वाधिक ध्वनिलहरी असणारी कंपनी
अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम) आणि मुख्यत: उत्तर भारतात बस्तान असलेली एअरसेल या मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांचे एकत्रीकरण झाले आले असून ग्राहक तसेच महसुली उत्पन्नाच्या रूपात देशातील मोठी कंपनी यातून उदयास आली आहे. थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसारख्या कडव्या स्पर्धकाचे आव्हान उभे राहिले असताना ‘आर कॉम’ने या व्यवहारामार्फत देशभरात अस्तित्व असलेली सर्वाधिक ध्वनिलहरी असलेली दुसरी कंपनी बनण्याचा मार्गही प्रशस्त केला आहे. एअरसेलच्या विलिनीकरणानंतर एकत्रित १९.४० मोबाईलधारक संख्येमुळे ‘आर कॉम’ने आयडिया सेल्युलरला ग्राहकसंख्येत मागे टाकले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने सिस्टेमा श्याम टेलिसव्र्हिसेसचा एमटीएस ही नाममुद्रा काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. आता सिस्टेमा श्याममध्ये हिस्सा असलेल्या मॅक्सिस कम्युनिकेशन्सचीच भागीदारी असणाऱ्या ‘एअरसेल’चीही खरेदी करत अनिल अंबानी यांनी ३५,००० कोटी रुपयांच्या नक्त मालमत्तेची कंपनी निर्माण केली आहे.

आर कॉम व एअरसेल यांची एकत्रित मालमत्तांचे मूल्य आता ६५,००० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे. नव्याने तयार झालेल्या व्यवस्थापन मंडळात उभय कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समान सहभाग असेल.

एअरसेल खरेदीमुळे ४२,५०० कोटी रुपयांहून अधिक कर्जभार असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा काही भार हलका होणार आहे.

मॅक्सिस कम्युनिकेशन्सने २००६ मध्ये एअरसेल खरेदी केली होती. यावेळी ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. भारतातील ही तेव्हाची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक ठरली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: कौनसा राज्य देश का उजाला योजना के तहत 2 करोड़ LED बल्बों का वितरण करने वाला पहला राज्य बना है ?
 A. राजस्थान
B. गुजरात
C. बिहार
D. केरल
 Answer: B. गुजरात

विस्तार: केन्द्रीय ऊर्जा मंत्रालय द्वारा 30 अगस्त 2016 को जारी आंकड़ों के अनुसार गुजरात देश का पहला राज्य बन गया है जिसने केन्द्र सरकार की Unnat Jyoti by Affordable LEDs for All (UJALA) योजना के तहत 2 करोड़ LED बल्बों के वितरण का आंकड़ा छुआ है। इसके द्वारा 42 लाख से अधिक परिवारों को LED बल्ब प्रदान किए गए हैं। 2 करोड़ LED बल्बों के वितरण से 249 करोड़ किलोवॉट घण्टा (249 KwH) ऊर्जा की वार्षिक बचत होगी जोकि देश के लगभग 5 लाख परिवारों को एक साल तक विद्युत आपूर्ति किए जाने के बराबर है। इस बचत के अलावा LED बल्बों के इस्तेमाल से राज्य में कार्बन डाइ-ऑक्साइड (CO2) उत्सर्जन में भी 5,000 टन प्रतिदिन की कमी आने का अनुमान है।

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: भारत ने 30 अगस्त को किस देश के साथ सैन्य अड्डे इस्तेमाल करने का समझौते पर हस्ताक्षर किये है?
 A. रूस
B. अमेरिका
C. चीन
D. जापान
 Answer: B. अमेरिका

विस्तार: भारत और अमेरिका ने 30 अगस्त को एक ऐसे महत्वपूर्ण समझौते पर हस्ताक्षर किया जो दोनों देशों को रक्षा क्षेत्र में साजो-सामान संबंधी निकट साझेदार बनाएगा और दोनों सेना मरम्मत और आपूर्ति के संदर्भ में एक दूसरे की संपदाओं और अड्डों का इस्तेमाल कर सकेंगी। साजो-सामान संबंधी आदान-प्रदान समझौते पर हस्ताक्षर किए जाने का स्वागत करते हुए रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर और अमेरिकी रक्षा मंत्री एश्टन कार्टर ने कहा कि यह समझौता ‘व्यवहारिक संपर्क और आदान-प्रदान’ के लिए अवसर प्रदान करेगा। यह समझौता दोनों देशों की सेना के बीच साजो-सामान संबंधी सहयोग, आपूर्ति और सेवा की व्यवस्था प्रदान करेगा। इसमें खाना, पानी, वस्त्र, परिवहन, पेट्रोलियम, तेल, लुब्रिकेंट, परिधान, चिकित्सा सेवाएं, कलपुर्जे व उपकरण, मरम्मत व देखभाल सेवाएं, प्रशिक्षण सेवाएं व अन्य साजोसामान की वस्तुएं और सेवाएं शामिल हैं।

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: केन्द्र सरकार ने अकुशल गैर-खेतिहर श्रमिकों का न्यूनतम वेतन 246 रुपये से बढ़ाकर कितने रुपये प्रति‍दिन कर दिया गया?
 A. रु. 450
B. रु. 350
C. रु. 420
D. रु. 380
 Answer: B. रु. 350

विस्तार: केन्द्र सरकार ने अकुशल गैर-खेतिहर श्रमिकों का न्यूनतम वेतन 246 रुपये से बढ़ाकर 350 रुपये प्रति‍दिन कर दिया है। मजदूरी में रु. 104 प्रतिदिन की वृद्धि की घोषणा केन्द्रीय श्रम मंत्री की अध्यक्षता में न्यूनतम वेतन सलाहकार बोर्ड (Minimum Wage Advisory Board) की बैठक के बाद की गई जिसमें केन्द्र सरकार से सम्बद्ध “सी” श्रेणी के कार्यक्षेत्रों में संलग्न श्रमिकों का न्यूनतम वेतन तय किया गया। सरकार ने न्यूनतम मजदूरी में 42 प्रतिशत की यह बढोतरी एक तरह से ट्रेड यूनियनों की मांग को देखते हुए की गयी थी।

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने 30 अगस्त 2016 को किस राज्य में सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन (SAUNI) परियोजना शुरू की है ?
 A. महाराष्ट्र
B. मध्यप्रदेश
C. गुजरात
D. राजस्थान
 Answer: C. गुजरात

विस्तार: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन (SAUNI) परियोजना के प्रथम चरण का उद्घाटन गुजरात के सनोसरा (Sanosara) में 30 अगस्त 2016 को किया। इसके द्वारा मुख्यत: राज्य के सूखाग्रस्त सौराष्ट्र क्षेत्र की जल समस्या को सुलझाने का खाका तैयार किया गया है। इस परियोजना पर काम वर्ष 2012 में शुरू किया गया था। Rs. 12,000 करोड़ की इस परियोजना के तहत सरदार सरोवर बाँध के अधिक जल को सौराष्ट्र के 115 छोटे बांधों में पहुँचाने का प्रयास किया जायेगा।  परियोजना के पहले चरण में जामनगर, राजकोट और मोरबी के 10 बांधों को सरदार सरोवर बाँध के जल से भरा जायेगा।

Question: पैरालिंपिक खेलों में पहला पदक जीतने वाली भारतीय महिला खिलाडी कौन है ?
 A. साक्षी मालिक
B. दीपा मालिक
C. सानिया मिर्ज़ा
D. इसमें से कोई नहीं
 Answer: B. दीपा मालिक
विस्तार: रियो में चल रहे पैरा ओलंपिक खेलों में भारत की दीपा मलिक ने शॉट-पट में रजत पदक जीत कर भारत के खेल इतिहास में अपना नाम दर्ज कर लिया है। पैरालिंपिक खेलों में पदक जीतने वाली दीपा पहली भारतीय महिला बन गई हैं। गोला फेंक में बहरीन की फातेमा निदाम ने स्वर्ण पदक हासिल किया और ग्रीस की दिमित्रा कोरकिडा ने कांस्य पदक मिला है।  दीपा मलिक हरियाणा के सेना परिवार से ताल्लुक रखती हैं। साल 2012 में उन्हें अर्जुन पुरस्कार मिला था।

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: यूएस ओपन 2016 में पुरुष एकल का ख़िताब किसने जीता है ?
 A. रोजर फेडरर
B. स्टेनिस्लास वावरिंका
C. नोवाक जोकोविच
D. केन रोज़वाल
 Answer: B. स्टेनिस्लास वावरिंका
विस्तार: स्विटज़रलैण्ड के स्टेनिस्लास वावरिंका ने सर्बिया के नोवाक जोकोविच को 11 सितम्बर 2016 को यू.एस. ओपन (U.S. Open) के पुरुष एकल फाइनल में चार सेटों में 6-7 (1/7), 6-4, 7-5, 6-3 से हराकर अपने करियर का तीसरा ग्राण्ड स्लैम खिताब जीत लिया। 31 वर्ष के वावरिंका इस प्रकार पिछले 46 वर्षों में यह खिताब जीतने वाले सबसे उम्रदराज खिलाड़ी बन गए। 1970 में केन रोज़वाल (Ken Rosewall) ने 35 वर्ष की आयु में यह टूर्नामेण्ट जीता था।

#eMPSCkatta_Current_Affairs

Question: यूएस ओपन 2016 में महिला एकल का ख़िताब किसने जीता है ?
 A. वीनस विलियम्स
B. वीनस विलियम्स
C. एंजेलिक केर्बर
D. कारोलीना लिसकोवा
 Answer: C. एंजेलिक केर्बर
विस्तार: जर्मनी की एंजेलीक कर्बर ने वर्ष 2016 के U.S. ओपन का महिला एकल खिताब 10 सितम्बर 2016 को जीत लिया। यह उनके जीवन का कुल दूसरा ग्राण्ड स्लैम खिताब है, उन्होंने इसी वर्ष का ऑस्ट्रेलियन ओपन खिताब जीता था। उन्होंने फाइनल में चेक गणराज्य की कारोलीना लिसकोवा  को 6-3, 4-6, 6-4 से हराकर यह खिताब जीता। 28 वर्ष में नंबर 1 खिलाड़ी बनने वाली कर्बर यह उपलब्धि हासिल करने वाली सबसे अधिक आयु की खिलाड़ी भी बन गई हैं। अभी तक अमेरिका की जैनिफर कैप्रियाती सबसे अधिक आयु में न. 1 खिलाड़ी बनीं थीं जब उन्होंने 25 वर्ष 200 दिन की आयु में यह उपलब्धि अक्टूबर 2001 के दौरान हासिल की थी।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹Question: भारत के मरियप्पन थंकावेलु ने रियो में किस खेल में स्वर्ण पदक जीता है?
 A. गोला फैंक
B. ऊँची कूद
C. लंबी कूद
D. निशानेबाजी
 Answer: B. ऊँची कूद
विस्तार: 1.89 मीटर की कूद लगाकर भारत के मरियप्पन थंकावेलु वर्ष 2016 के पैरालम्पिक्स खेलों में भारत के लिए पहला स्वर्ण पदक जीता। उन्होंने यह पदक ऊँची कूद स्पर्धा (T-42) में 6 सितम्बर 2016 को जीता। इसी स्पर्धा में ही भारत के वरूण सिंह भाटी ने काँस्य पदक जीतकर इस स्पर्धा को भारत के लिए शानदार बना दिया। पैरालम्पिक्स खेलों के इतिहास में स्वर्ण पदक जीतने वाले मरियप्पन थंकावेलु कुल तीसरे भारतीय हैं। उनके पहले 1972 में मुरलीकांत पेटकर ने तैराकी स्पर्धा में स्वर्ण पदक जीता था जबकि 2004 में भाला फेंक स्पर्धा में देवेन्द्र झाझरिया ने स्वर्ण जीता था।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹Question: 7 सितंबर 2016 को पैरालिंपिक खेल 2016 कहाँ शुरू हुए हैं ?
 A. जापान
B. ब्राज़ील
C. चीन
D. अमेरीका
 Answer: B. ब्राज़ील
विस्तार : वर्ष 2016 के रियो पैरालिंपिक खेल ब्राज़ील में 7 सितंबर को शुरू हुए जिसमें 4000 से ज्यादा पैराएथलीट हिस्सा ले रहे हैं। ये खेल 7-18 सितंबर तक ब्राज़ील के रियो में आयोजित होंगे। पैरालिंपिक गेम्स की शुरूआत 1960 में रोम में हुई थी। भारत से 17 एथलीट इन खेलों में हिस्सा लेंगे। गौरतलब है कि भारत ने पैरालिंपिक गेम्स में अब तक कुल 8 पदक जीते है जिसमें दो स्वर्ण पदक है। रियो ओलिंपिक के महासमर के ख़त्म होने के बाद अब दिव्य शक्ति के अद्भुत रूप से दुनिया दो चार होने के लिए तैयार है।

#eMPSCkatta_Current_Affairs

चालू घडामोडी:-
--------------------------------------------------------

१) आशियातील सर्वात जुनी ओळखली जाणारी कोण डुरंन्ड चषक फुटबॉल २०१६ ही स्पर्धा कोणी जिंकली :----------------- आर्मी ग्रीन

२) पोस्टल तक्रारी दाखल करून घेण्याकरता केंद्र सरकारने------------हा टोल-फ्री क्रमांक जाहीर के :----------------------१९२४

३) " युद्ध अभ्यास २०१६ हा संयुक्त लष्करी युद्ध सराव भारत आणि -------------या देशादरम्यान पार पडला :---------------- युनायटेड स्टेट्स

४) अलीकडेच दारिद्य निर्मूलनाबाबत रोड मॅप अहवाल ------------- यांनी केंद्र सरकारला सादर केला :----------------अरविंद पानगाडीया

५) २०१७ मध्ये होणाऱ्या मिस यूनिवर्स या स्पर्धेसाठी भारताचे प्रतीनिधीत्व कोण करणार आहे ? :----------------------रश्मिता हरिमूर्ति

६) --------------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रेल्वे अर्थसंकल्पातून सुटका अशा शीर्षकाच्या आपल्या अहवालात रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र सादर करण्याची ९२ वर्ष जुनीपरंपरा संपुष्टात आणून त्याचाकेंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्याची शिफारस केली :-------------विवेक देबराय

७)-------------- हे देशातील १०० टक्के घरगुती विद्युतीकरण असलेले दुसरे राज्य ठरले? :-----------आंध्रप्रदेश

८) पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या " स्वच्छ सर्वक्षण ग्रामीण २०१६ " या अहवालानुसार --------------- या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला :--------------सिक्कीम

#eMPSCkatta_Current_Affairs

चालू  घडामोडी:-

* युद्ध सराव :- २०१६
• फ्रेंडशिप २०१६ :- पाकिस्तान- रशिया
• दोस्तकी २०१६ :- भारत-कझाकिस्तान
• मलबार २०१६:-भारत , जपान , अमेरिका

* नवीन  पक्ष:-
•'आवाज-ए-पंजाब':-
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते नवज्योतसिंग सिद्धू,भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार परगतसिंग आणि बियांस बंधू यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना करण्यात आली

चर्चित  खेळाडू:-
• सेरेना विल्यम्स:-
• अमेरिकन ओपन स्पर्धेत सेरेनाने स्विडनच्या योहाना लार्सन हिचे आव्हान ६-२, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. तिचा हा ३०८वा विजय होता. टेनिस इतिहासात एखाद्या महिला खेळाडूने केलेली ही कामगिरी सर्वोत्तम ठरली.
• सेरेनाने रॉजर फेडररचा ग्रँड स्लॅममधील सर्वाधिक विजयांचा विक्रम मोडीत काढत ३०८व्या विजयाला गवसणी घातली. फेडररने ८ ऑगस्टला वयाची पस्तीशी ओलांडली तर सेरेनाचा ३५वा वाढदिवस २६ सप्टेंबरला आहे
• ग्रँडस्लॅम विजय
• अमेरिकन स्पर्धा:-  ८८
• विम्बल्डन:-  ८६
• ऑस्ट्रेलियन स्पर्धा :- ७४
• फ्रेंच स्पर्धा :-  ६०
• एकूण:-३०८

• कार्लोविच:-
• क्रोएशियाचा उंचापुरा टेनिसपटू इव्हो कार्लोविच याने सर्वाधिक ‘एसेस’चा (बिनतोड सर्व्हिस) विश्व्विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने तैवानच्या येन-ह्‌सून ल्यूविरुद्ध पहिल्या फेरीत ६१ ‘एसेस’ मारल्या

निवृती :-
अभिनव बिंद्रा:-
• भारताला ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्राने नेमबाजीतून  निवृत्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली.
• यंदाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बिजींग सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसला होता. हा  मन त्याला दुसर्यांदा  मिळाला होता
• यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल  क्रीडा स्पर्धेतही  तो भारताचा ध्वजधारक होता
• रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाने अवघ्या ०.५ गुणांच्या फरकाने हुलकावणी दिली होती. पात्रता फेरीत ७ वे स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
•  बिंद्राने २००८ मध्ये बीजिंग येथे रंगलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली
• बिंद्राची  कामगिरी:-
• २०००:- अर्जुन  पुरस्कार
• २००१:-राजीव  गांधी क्रीडा पुरस्कार
• २००९:-पद्म्भूष्ण
• २००२ व २०१० :- राष्ट्रकुल स्पर्धेत पेअर्स प्रकारात सुवर्णपदक
• २००६ व २०१० :- राष्ट्रकुलमध्ये वैयक्तिक रौप्य व ब्रांझ
• २०१०:-आशियाई क्रीडा स्पर्धेत  सांघिक रौप्य
• २०१४:- :- राष्ट्रकुलमध्ये वैयक्तिक सुवर्ण
• २०१४:-आशियाई क्रीडा स्पर्धा  सांघिक व वैयक्तिक ब्रांझ(सर्व पदके १० मीटर एअर रायफल प्रकारात)
• २०११ मध्ये प्रादेशिक सेनेकडूनमानद लेफ्टनंटकर्नलची पदवी

बॅस्टियन श्वेनस्टायगर :-
• जर्मनी फुटबॉल संघाचे १२ वर्ष नेतृत्व करनणारा दिग्गज खेळाडू बॅस्टियन श्वेनस्टायगर याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृती घेतली
• २०१४च्या विश्वचषक विजयी संघातील खेळाडू श्वेनस्टायगरला सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून मैदानावर प्रदक्षिणा घातली.
• युरो स्पध्रेनंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय ३२ वर्षीय श्वेनस्टायगरने आधीच जाहीर केला होता.
• श्वेनस्टायगरने २००४ साली हंगेरीविरुद्ध राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले. या लढतीत हंगेरीने २-० असा विजय मिळवला
• १२१ सामन्यांत जर्मनीचे नेतृत्व करणाऱ्या श्वेनस्टायगरच्या खात्यात २४ गोल्स आहेत

____________________________________________
👉Venues Of Sports Events
____________________________________________
🚼Summer Olympics
2012 – London, UK.
2016 – Rio de Janeiro, Brazil.
2020 – Tokyo, Japan.
____________________________________
🚼Winter Olympics
2014 – Sochi, Russia.
2018 – Pyeongchang, South Korea.
2022 – Beijing, China.
_____________________________________
🚼Commonwealth Games
2014 – Glasgow, Scotland, U.K.
2018 – Gold Coast, Queensland, Australia.
2022- Durban, South Africa.
______________________________________
🚼Asian Games
2014 – Incheon, South Korea.
2018 – Jakarta, Indonesia.
2022- Hangzhou, China.
______________________________________
🚼Hockey World Cup
2014 – The Hague, Netherlands (Winner- Australia).
2018 – New Delhi, India.
_______________________________________
🚼Women Hockey World Cup
2014 – The Hague, Netherlands (Winner- Netherlands).
2018 – London, England.
________________________________________
🚼FIFA World Cup
2014 – Brazil (Winner- Germany).
2018 – Russia2022 – Qatar.
_________________________________________
🚼Women Football World Cup
2015 – Canada (Winner – United States).
2019 – France.
_________________________________________
🚼ICC Cricket World Cup
2015 – Australia and New Zealand (Winner – Australia).
2019 – England.
2023 – India.
_________________________________________
🚼Women Cricket World Cup
2013 – India (Winner- Australia).
2017 – England.
2021 – New Zealand.
_________________________________________
🚼ICC World T-20 World Cup
2016 – India (Winner – West Indies).
2018 – Australia.
_________________________________________
🚼Women ICC World T-20 World Cup
2016 – India (Winner – West Indies).
2018 – West Indies.
_________________________________________
🚼ICC World Test Championship
2017 (1st edition) – England.
2021 – India.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केंद्राची उच्चशिक्षणासाठी 'हेफा' योजनेला मंजुरी

💻देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता व त्यांच्या विकासासाठी केंद्रीय उच्चशिक्षण वित्तसंस्थेची (हेफा) स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.12) रोजी मंजुरी दिली, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
💻 तसेच त्याप्रमाणे तंत्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधीही केंद्राने मंजूर केला आहे.
💻 मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर जावडेकर यांनी ही माहिती दिली.
💻 उच्चशिक्षणाची गंगा गावोगावी पोचविण्यासाठी 'हेफा'ची स्थापना केंद्राने केली आहे.
💻 या अंतर्गत एखाद्या विद्यापीठाच्या अखत्यारीतील; पण ग्रामीण व दुर्गम भागांतील शिक्षण संस्थेत उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
💻 'हेफा'च्या स्थापनेसाठी दोन हजार कोटींचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यात सरकारची भागीदारी एक हजार कोटींची असेल. उर्वरित निधी एखाद्या प्रायोजक वा उद्योजकांच्या मदतीने उभा करण्यात येईल.
💻 'हेफा'शी संलग्न होणाऱ्या संबंधित शिक्षण संस्थांमधील उच्चशिक्षण सुविधा व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्जरूपाने निधी उपलब्ध करण्याचीही तरतूद केली जाणार आहे.
💻 तसेच याशिवाय 'आयआयटी', 'आयआयएम' व 'एनआयटी' शिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 20 हजार कोटींचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी :

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
 केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी (दि.12) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीत याबाबत प्रशंसा केली.
 कौशल्य विकासाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबविणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे.
 2015-16 या वर्षात महाराष्ट्रात दोन लाख लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
 राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी पाच ते सात एकर जागा निश्चित करण्याबाबत या वेळी फडणवीस आणि रुडी यांच्यात चर्चा झाली.
 कौशल्य विकास मंत्रालय आणि भृपृष्ठ वाहतूक विभागाच्या संयुक्त सहभागाने या संस्था सुरू करण्यात येतील.
 पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बंद पडलेल्या महापालिका शाळांचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र होणार :

मिहान प्रकल्पातील पतंजली फूड अँड हर्बल पार्क 230 एकरांत उभारण्यात येणार आहे. त्यात 1600 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

 तसेच यातून देश-विदेशांत उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे नागपूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र म्हणून विकसित होईल, अशी माहिती योगगुरू रामदेवबाबा यांनी दिली.

 मिहान प्रकल्पातील पतंजली फूड पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले, की हा देशातील सर्वांत मोठा फूड अँड हर्बल पार्क आहे.

 दररोज पाच हजार टन कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाईल. पुढील सहा महिन्यांत प्रकल्प सुरू करण्यात येईल. दीड वर्षात प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

 तसेच यातून देश-विदेशांत फूड आणि हर्बल उत्पादने पाठविण्यात येणार आहेत.
 सरकारने प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तीन अटी घातल्या होत्या. त्या अटींची पूर्तता केली जाईल.

 विदर्भातील अंदाजे 20 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 याशिवाय विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून शेतीमालासह वनोपज खरेदी करण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 तसेच या प्रकल्पात प्रत्यक्ष दहा हजार आणि अप्रत्यक्ष 50 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विदर्भ - मराठवाड्यात " धवलक्रांती' अवतरणार

मुंबई - विदर्भ व मराठवाड्यात "धवलक्रांती ' चा नवा अध्याय सुरू होणारा करार राज्य सरकारने बुधवारी केला . या भागातील उत्पादित दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ ( एनडीडीबी ) संचालित "मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल ' या कंपनीशी करार करण्यात आला . यामुळे या भागातील दोन हजार गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

राज्य सरकार व "मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल ' यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा ' या निवासस्थानी आज सामंजस्य करार झाला. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मस्यव्यवसाय विकास विभागाचे मंत्री महादेव जानकर , पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मस्यव्यवसाय विकास विभागाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर , महसूल राज्यमंत्री संजय राठोड , मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते .

फडणवीस म्हणाले , "" नागपूर येथील दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अखत्यारीतील 21 . 86 एकर जमिनीपैकी 9 . 88 एकर जमीन त्यावरील दुग्ध शाळेची इमारत, गोदाम , बॉयलर , दुध भुकटी प्रकल्प , ट्रक टर्मिनल तसेच यंत्र सामग्री 30 वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर " मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल ' कंपनीला देण्यात येत आहे . या करारामुळे 60 हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळणार आहे .

 विदर्भ - मराठवाड्यातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे . विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दूध व्यवसाय विकास कार्यक्रम राबविणार आहे . '' सामंजस्य करारावर राज्य सरकारतर्फे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व " मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल ' कंपनीचे कार्यकारी संचालक एस . नागराजन यांनी स्वाक्षरी केल्या.

असा आहे करार
मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीशी करार
दोन हजार गावांतील शेतकऱ्यांना फायदा
60 हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तमिळनाडू : 'शुभमंगल 'साठी ' अम्मा मंगल कार्यालय '

तमिळनाडूत गरिबांसाठी योजना ; मुख्यमंत्री जयललितांची घोषणा
चेन्नई - तमिळनाडूत लोकप्रिय योजनांचा धडाका मुख्यमंत्री जयललिता यांनी गेल्या काही वर्षांत लावलेला आहे . घोषणेनुसार त्यांनी या योजना अंमलातही आणल्या आहेत. ' अम्मा ' ब्रॅंडखाली सुरू झालेल्या या योजना नागरिकांच्या हिताच्या असल्याने त्यांना प्रतिसादही भरभरून मिळत आहे . आता त्यात ' अम्मा मंगल कार्यालय ' ची भर पडली आहे .

राज्यात 11 ठिकाणी ' ' अम्मा मंगल कार्यालय ' बांधणार असल्याची घोषणा जयललिता यांनी शनिवारी केली . यासाठी 83 कोटी रुपये खर्च येणार आहे .
 कार्यालयांचे आरक्षण ऑनलाइन सेवेद्वारे उपलब्ध करण्यात करण्यात येणार आहे . गोरगरीब कुटुंबांना घरगुती कार्यक्रमांसाठी महागडे हॉल घेणे परवडत नाही . याकडे लक्ष वेधून जयललिता म्हणाल्या , ' गरिबांसाठी "अम्मा मंगल कार्यालय ' उभारण्याचा आदेश दिला आहे . कार्यालयातील सभागृह , वधू - वर व वऱ्हाडींच्या खोल्या , भोजन कक्ष , स्वयंपाकघर अशा सर्व ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा असेल. ही योजना अंमलात आणण्याची जबाबदारी तमिळनाडू गृहनिर्माण मंडळ व सहकारी संस्थांकडे सोपविण्यात आली आहे . चेन्नई, मदुराई, तिरुनवेली, सालेम, तिरुवल्लूर , तिरुपूर आदी ठिकाणी मंगल कार्यालय उभारण्यात येतील . तमिळनाडू झोपडपट्टी परवाना मंडळातर्फे 50 हजार घरे बांधण्याचीही घोषणा जयललिता यांनी केली . यासाठी 1800 कोटी रुपये खर्च येणार आहे . 45 हजार घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येक घरामागे 2 . 1 लाख रुपये अनुदान सरकारकडून मिळणार आहे .

निम्न वर्गीय , मध्यम वर्गीय व उच्च वर्गीय गटांसाठी दोन हजार सदनिका बांधण्याचा आदेश तमिळनाडू , गृहनिर्माण मंडळाला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले . यातील निम्न वर्गीय घटकांसाठीचा फ्लॅट 645 चौरस फूट क्षेत्राचा असेल. हॉल , दोन खोल्या व स्वयंपाकघर असलेल्या या फ्लॅटची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. मध्यम गटातील फ्लॅटचे क्षेत्र 807 चौरस फूट असून , त्याची किंमत 30 लाख रुपये असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी 908 , तर नागरिकांना विकण्यासाठी 1266 घरे बांधण्याचेही जयललिता यांनी जाहीर केले. यासाठी 401 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल.

अम्मा ब्रॅंडची धूम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी गोरगरिबांसाठी व अन्य लोकांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहे . " अम्मा ' नावाने सुरू असलेल्या या योजनांमध्ये विक्रीला उपलब्ध केलेल्या उत्पादनांचा भाव कमी असल्याने नागरिकांमध्ये त्या लोकप्रिय झाल्या आहे . यातील काही उत्पादने व किंमत ः " अम्मा कॅंटिन ' - 1 रुपयांत इडली. अम्मा पाणी - 10 रुपयांत बाटली , अम्मा लॅपटॉप - 8 - 100 हजार रुपये , अम्मा मीठ - 10 ते 14 रुपये किलो , अम्मा सिमेंट - 190 रुपये गोणी . याशिवाय अम्मा बियाणे , अम्मा पंखा आणि मिक्सर , अम्मा औषध दुकाने , अम्मा मोबाईल , अम्मा कॉल सेंटर, अम्मा भाजी विक्री केंद्र आदी योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माझगावमध्ये ' मोरमुगाओ ' युद्धनौका सादर

मुंबई - क्षेपणास्त्र विनाशिका अशी ओळख असलेली ' मोरमुगाओ ' ही युद्धनौका आज ( शनिवार ) माझगाव डॉकयार्डमध्ये सादर करण्यात आली . आयएनएस विशाखापट्टणमच्या श्रेणीतील ही युद्धनौका आहे .

माझगाव शिपयार्डमध्ये बनविण्यात आलेल्या या युद्धनौकेचे आज जलावतरण करण्यात आले. यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल सुनीन लांबा उपस्थित होते . या युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असून , अद्याप यावर क्षेपणास्त्र बसविण्यात आली नाहीत . पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे . माझगाव डॉकयार्ड लिमिटेड ( एमडीएल ) ने या युद्धनौकेची बांधणी केली आहे . या कंपनीकडून सहा पाणबुड्याही बनविण्यात येणार आहेत.

या युद्धनौकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका 56 किमी प्रतीतास वेगाने 75 हजार किमीपर्यंत सागरी सिमांचे संरक्षण करणार आहे . या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. ' मारमुगाओ ' वर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे . त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" पाकमध्ये तयार होतेय नवे आण्विक प्रक्रिया केंद्र'

अण्वस्त्रांचा सर्वाधिक साठा करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होत असून , इस्लामाबादपासून अवघ्या तीस किलोमीटरवर नवे आण्विक प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असल्याचा खळबळजनक खुलासा पाश्चिमात्य संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . या खुलाशामुळे " एनएसजी ' सदस्यत्वाचा पाकिस्तानचा दावा बारगळणार असल्याची चिन्हे आहेत.

इस्लामाबादपासून जवळच काहुटा येथे असलेल्या खान संशोधन प्रयोगशाळेमध्ये ( केआरएल) आण्विक प्रक्रिया करणारे नवे केंद्र पाकिस्तानकडून उभारण्यात येत असल्याचा अंदाज उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणानंतर तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे . तसेच , पुढील दहा वर्षांत पाकिस्तान प्रतिवर्षी 20 नव्या अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची शक्यता असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात केला आहे . सर्वाधिक अण्वस्त्रे असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकाकडे पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याचे कार्नेजी एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस आणि स्टिमसन सेंटर यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे .

" केआरएल' मधील सुमारे 1 . 2 हेक्टर जमिनीवर नव्या अण्विक प्रक्रिया केंद्राची निर्मिती सुरू असल्याचे उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांवरून दिसून येते , असे तज्ज्ञांचे मत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनने केले अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण

बीजिंग : अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे आज चीनने प्रक्षेपण केले. 2022 पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली . अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या या अवकाश कार्यक्रमाला प्राधान्य दिले असून चीन आगामी काळात "स्पेस पॉवर ' म्हणून उदयास येईल , असे म्हटले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बालाजीची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती

चेन्नई - भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने अखेर प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याची घोषणा केली . परिवारासोबत अधिक वेळ हवा , यामुळे निवृत्ती घेत असल्याचे ३४ वर्षीय बालाजीने सांगितले .

प्रथम श्रेणीमधून निवृत्ती घेतली असली , तरी तमिळनाडू प्रीमियर लीग आणि आयपीएलमध्ये खेळत राहील, असे त्याने स्पष्ट केले. २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर बालाजीला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली होती . त्या दौऱ्यात रावळपिंडी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत बालाजीने इंझमाम उल हकसह एकूण सात बळी मिळविले होते . त्यामुळे भारताला पाकिस्तानमध्ये मालिका विजय मिळविता आला होता . एक वर्षानंतर मोहाली येथे पाकिस्तानविरुद्धच्या झालेल्या सामन्यात बालाजीने नऊ गडी बाद केले होते .

बालाजीची कसोटी कारकीर्द कामगिरीपेक्षा दुखातपीनेच जास्त गाजली. आपल्याला झहीर खानने खूप मार्गदर्शन केले, असे बालाजी मानतो . त्याने वेळोवेळी मला मार्गदर्शन केले, तो खूप चांगला माणूस आहे , असे बालाजी म्हणाला . झहीरशिवाय जॉन राईट यांनी माझ्या गोलंदाजीवर नेहमीच विश्वास टाकला होता , असेही त्याने सांगितले . आठ कसोटी सामन्यांत बालाजीने २७ बळी मिळविले . प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १०६ सामन्यांत ३३० बळी घेतले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चंद्रपूर वीज केंद्राचा ५०० मेगावॅटचा ९ वा संच ऑक्टोबरात सुरू, क्षमता २९२० मेगावॅट होणार

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे. नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा संच लवकर सुरू व्हावा, यासाठी वीज केंद्राचे अभियंता युध्दपातळीवर कामाला लागले आहेत.

या महाऔष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता कधी काळी २३४० मेगावॅट होती. एकूण ७ संचांमधून ही विजनिर्मिती केली जात होती. यात २१० मेगावॅटचे ४, तर ५०० मेगावॅटचे ३, असे एकूण ७ संच कार्यान्वित होते, परंतु पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे संच कालबध्द झाल्यामुळे दोन्ही संच बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ४२० मेगावॅट विजनिर्मिती कमी झाली. त्याचा परिणाम कधी काळी २३४० मेगावॅट विजनिर्मितीची क्षमता असलेले हे केंद्र १ हजार ९२० मेगावॅट क्षमतेवर आले. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती.

कालांतराने ती पुसली गेली. दरम्यान, ५०० मेगावॅटचा आठव्या क्रमांकाचा संच ५ जुलैला व्यावसायिकदृष्टय़ा सुरू झाला. आता नवव्या क्रमांकाचा संचही तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने महाजनको युध्दपातळीवर प्रयत्नरत आहे.

या महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ५०० मेगावॅटचा नववा संच कार्यान्वित होणार आहे. त्या दृष्टीने ऊर्जा मंत्रालय व स्थानिक अभियंता कामाला लागले आहेत. नववा संच पूर्ण क्षमतेने सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट इतकी होणार असल्याने हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.

देशात सर्वत्र वीज केंद्रे पाण्याअभावी बंद होत असतांना चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे. या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही. राज्य शासनाला सर्व दृष्टीने हे महाऔष्णिक वीज केंद्र परवडणारे आहे, असेही मुख्य अभियंता बुरडे म्हणाले.

ऑक्टोबर हा थंडीचा महिना असल्याने या महिन्यात विजेची गरज कमी असते, त्यामुळे नववा संच सुरू करतांना वष्रेभरापासून सुरू असलेले २१० मेगावॅटचे तिसरा व चौथा संच, तसेच ५०० मेगावॅटचे ५, ६ व सातव्या क्रमांकाच्या संचाची वार्षिक देखभाल-दुरुस्ती टप्प्याटप्प्याने करता येईल. कारण, हिवाळा संपताच फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरू होतो. उन्हाळ्यात विजेची मागणी अचानक वाढत असल्यामुळेच नववा संच ऑक्टोबरमध्येच सुरू करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य व अभ्यासक सुरेशकुमार अडपा व सुरेश चोपणे यांनी वीज केंद्रातून इरई नदीत जाणाऱ्या लाल पाण्याची पाहणी केली, तसेच कोल हॅन्डलिंग प्लान्ट, कोळसा साठा, पाणी शुध्दीकरण प्लान्ट, इएसपी व ईटीपी प्लान्ट, अॅश बंडची पाहणी करून सविस्तर अहवाल दिल्लीला पाठविण्यात आला असल्याची माहिती दिली. येथील महाऔष्णिक वीज केंद्र इरई नदी प्रदूषित करीत असल्याच्या बरयाच तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आल्यावर या समितीने ही पाहणी केली आहे. समितीचा अहवाल मिळताच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची झेरॉक्स काढणे म्हणजे कॉपीराईटचे उल्लंघन नाही- उच्च न्यायालय

शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी नेमून दिलेल्या संदर्भ पुस्तकांतील मजकुराची झेरॉक्स काढणे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन ठरत नाही, या दिल्ली उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पाच मोठ्या प्रकाशन संस्थांनी दाखल केलेल्या खटल्यात सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती आर.एस. एंडला यांनी हा निकाल दिला. शैक्षणिक हेतूसाठी पुस्तकांचे पुर्नउत्पादन करण्याची तरतूद कॉपीराईट कायद्यात समाविष्ट आहे. त्यामुळे दिल्लीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या परिसरात असणाऱ्या रामेश्वरी या झेरॉक्सवाल्याकडून काढण्यात आलेल्या पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, युनायटेड किंग्डम, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टेलर अँड फ्रान्सिस ग्रूप (युके), टेलर अँड फ्रान्सिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या प्रकाशक संस्थांनी झेरॉक्स काढणारी दुकाने आणि संदर्भ पुस्तकांतील घटकांचा समावेश असणारी ‘कोर्स पॅकेटस्’ तयार करणाऱ्या दिल्ली विद्यापीठाविरोधात कारवाईची मागणी केली होती. दिल्ली विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना विकण्यात येणारी कोर्स पॅकेटस ही प्रकाशकांसाठी तयार करण्यात आलेल्या कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणारी आहेत. विद्यापीठाकडून व्यावसायिक हेतूसाठी झेरॉक्सवाल्यांचा उपयोग केला जात असल्याचा आक्षेप प्रकाशकांकडून नोंदविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने कॉपीराईट कायद्यातील तरतुदींचा दाखला देत प्रकाशकांची मागणी फेटाळून लावली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताचा क्रमांक घसरला

कायदा व सुव्यवस्था, नियमन अशा विविध गटांमध्ये भारताचा क्रमांक जागतिक क्रमवारीत घसरला आहे. १५९ देशांमध्ये भारताचा क्रमांक १० अंकांनी खाली येत ११२वा लागला आहे. ही माहिती इकॉनॉमिक फ्रिडम ऑफ दि वर्ल्ड - २०१६ या अहवालात देण्यात आली आहे.

इकॉनॉमिक फ्रिडम इंडेक्सनुसार, भारताच्या तुलनेत भूतान, नेपाळ व श्रीलंका यांचे अनुक्रमे ७८, १०८ व १११वे क्रमांक लागले आहेत. चीन, बांगलादेश व पाकिस्तान हे देश मात्र भारतापेक्षा अनुक्रमे ११३, १२१ व १३३व्या क्रमांकांवर पिछाडीवर आहेत. आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत हाँगकाँग सर्वाधिक उजवा देश ठरला आहे. त्याखालोखाल सिंगापूर, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, कॅनडा, जॉर्जिया, आयर्लंड, मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया व यूके हे देश आर्थिक स्वातंत्र्य देण्यात योग्य देश ठरले आहेत.
इराण, अल्गेरिया, चाद, जिनिया, अंगोला, अर्जेन्टिना, लिबिया, व्हेनेझ्युएला या काही देशांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य नसल्याचे आढळून आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कॅसिनी यान आता शनि निरीक्षणाच्या अंतिम टप्प्यात

शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे. आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे. ऐतिहासिक वैज्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.
३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात.
 कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत, असे कॅसिनी या नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या वैज्ञानिक लिंडा स्पिलकर यांनी सांगितले. गेल्या वेळी म्हणजे २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.

कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल. शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.

या मोकळय़ा जागेतून यानाला २२ उडय़ा घ्याव्या लागणार असून, पहिला प्रयत्न २७ एप्रिलला सुरू होणार आहे. कॅसिनीच्या अंतिम टप्प्यात शनिचे जवळून निरीक्षण केले जाणार आहे. शनिची अंतर्गत रचनाही यातून कळणार आहे, तसेच शनिचा दिवस नेमका किती तासांचा आहे, तसेच त्याच्या कडय़ांचे वस्तुमान किती आहे हे कळणार आहे. त्यांचे वयही यातून कळणार आहे.

कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे. २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोळा पदकांसह भारत दुसऱ्या स्थानी

भारतीय संघाने आशिया चषक ट्रॅक सायकल शर्यतीच्या अखेरच्या दिवशी दोन सुवर्णसह आठ पदकांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर भारताने १६ पदकांसह (५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्यपदक) स्पध्रेत दुसरे स्थान पटकावले. ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या हाँग काँगने अव्वल स्थान पटकावले.

‘भारतीय संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. विशेषत: कनिष्ठ गटातील खेळाडूंने उल्लेखनीय खेळ केला,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी व्यक्त केले. स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. देबोराह हेरोल्डने अंतिम शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत अनुक्रमे १२.५७६ सेंकद व १२.४९३ सेंकदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.

हाँग काँगच्या झाओजुआनला रौप्य, तर मलेशियाच्या फरीना शवातीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, केइरीन प्रकारात देबोराहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केझीया वर्घेस्सेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पध्रेत देबोराहने एकूण तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या केइरीन गटात भारताच्या अमरजीत सिंगला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु कनिष्ठ गटात इमर्सनने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. कनिष्ठ गटात भारताच्या सनुराज पी. याने कांस्यपदक जिंकले. महिलांच्या गटात नयना राजेश व अनु चुटीया यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. सांघिक महिला गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. राज कुमारी देवी, बिद्या लक्ष्मी तौरांगबाम, ऋतुजा सातपुते व जी. अम्रिता यांचा या संघात समावेश होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिंचन प्रकल्पांसाठी राज्याचे १५ हजार कोटींचे कर्जरोखे

कृष्णा खोरेच्या धर्तीवर सरकारचे पाऊल
राज्यातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी युती सरकारच्या आधीच्या कार्यकाळातही कर्जरोखे काढण्यात आले होते. त्या धर्तीवर आता हे कर्जरोखे काढले जाणार आहेत.

राज्यातील ३७६ सिंचन प्रकल्पांची कामे वर्षांनुवर्षे निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी किमान ८४ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण त्यापैकी फारसे काम सुरु न झालेले व अन्य अडचणी असलेले ४९ प्रकल्प सोडून, अन्य ३२७ प्रकल्पांसाठी या कर्जरोख्यांमार्फत निधी उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे ५८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारने राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी नुकतेच १८ हजार कोटी रुपये मंजूर केले असून आणखी १२ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहेत. नाबार्ड व अन्य स्रोतांतून ४२ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. पुढील साडेतीन वर्षांत राज्य सरकार अर्थसंकल्पातून सुमारे २४ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे सुमारे १५ हजार कोटी निधीची आवश्यकता असून तो कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प पुढील तीन वर्षांत मार्गी लागतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दाभोळ वीज प्रकल्पाचे विभाजन

रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लि. या प्रकल्पाचे विभाजन करून रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लि. (वीजनिर्मिती कंपनी) आणि कोकण एलएनजी प्रा. लि. (गॅस टर्मिनल कंपनी) या दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

बंद पडलेला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड योजनेंतर्गत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला पुनरुज्जीवित करण्यात आला होता. त्या वेळी केंद्राने घेतलेल्या निर्णयांमध्ये विभाजनाचाही समावेश होता. तसेच, या प्रकल्पाच्या विभाजनाबाबत कर्जपुरवठादार बँकाही आग्रही होत्या. कर्जाचे समभागात रूपांतर केल्यानंतर आरजीपीपीएल कंपनीकडे ३८२० कोटी रुपये इतके भागभांडवल आहे. या कंपनीच्या समभाग भांडवलामध्ये महाराष्ट्र शासनाचा एमएसईबी होल्डिंग कंपनीमार्फत १३.५१ टक्के म्हणजे ५१६ कोटी एवढा वाटा आहे. प्रस्तावित विभाजनामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

आरजीपीपीएल कंपनीस त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नव्हती. त्यामुळे आरजीपीपीएल ही राष्ट्रीय संपत्ती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून घोषित होऊ नये, यासाठी आरजीपीपीएल प्रकल्पाचे विभाजन करून विद्युतनिर्मिती केंद्र व आरएलएनजी टर्मिनल या स्वतंत्र कंपन्या करण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. (विशेष प्रतिनिधी)

राज्यात नव्याने बांधावयाच्या न्यायालयीन इमारती व न्यायाधीश निवासस्थाने; तसेच अस्तित्वातील इमारतींचे विस्तारीकरण व दुरुस्तीचा निर्णय तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी ‘न्यायालयांकरिता पायाभूत सुविधा धोरण’ मंजूर करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अपूर्णावस्थेत असणाऱ्या प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देऊन ते पूर्ण केले जातील.

न्यायालयीन इमारती व न्यायाधीश निवासस्थानांच्या बांधकामांसाठी सर्वसमावेशक नमुना नकाशा तयार करण्यात येऊन त्याप्रमाणेच बांधकाम करावे लागणार आहे. यामुळे कामात वाढ होणार नाही व सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याची गरजही पडणार नाही. या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी जेथे शक्य आहे तेथे ढोबळ अंदाजपत्रकाऐवजी सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्यात येईल.

कळे-खेरीवडेमध्ये न्यायालयाची स्थापना
कोल्हापूर जिल्ह्यातील कळे-खेरीवडे (ता. पन्हाळा) येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यासह २६ पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली. त्यासाठी एकूण ७० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹१६ जिल्ह्यांत राबविणार कुष्ठरोग शोध अभियान

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार आहे.कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे, रायगड व पालघर या १६ जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल. या अभियानामध्ये १६९ तालुके, १४ महानगरपालिका व ८८ नगरपालिकांचा समावेश आहे. ‘झीरो लेप्रसी मोहीम’ यशस्वी करू, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीव्यक्त केला.
डॉ. सावंत म्हणाले, या अभियानाअंतर्गत समाजातील संशयित कुष्ठरुग्ण शोधण्यात येतील. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. भारतातील १३ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १६३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

राज्यात चालू आर्थिक वर्षांत सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. या जिल्ह्यात ५२२ रुग्ण आढळले आहेत.

ठाणे, रायगड, पालघर तसेच मालेगाव येथे पल्सपोलिओ कार्यक्रम असल्याने तेथे १३ आॅक्टोबरपर्यंत अभियानातर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण ४ कोटी ९८ लाख लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १ कोटी ५३ लाख शहरी भागातील व ३ कोटी ४५ लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.

कुष्ठरुग्णांची संख्या
जिल्हा रुग्णसंख्या प्रमाण

गडचिरोली ५२२ ४.५२
चंद्रपूर ८४८ ३.५९
भंडारा ३९३ ३.०४
पालघर ७२७ २.९७
धुळे ४८१ २.१८
गोंदिया २७१ १.९
नंदूरबार ३३५ १.८९
रायगड ४३१ १.५२
जळगाव ६५९ १.४५
वर्धा २०३ १.४५
अमरावती ३३० १.०६
नागपूर ४६१ ०.९२
यवतमाळ २५४ ०.८५
नाशिक ५०५ ०.७७
वाशिम ९८ ०.७६
ठाणे ५८४ ०.६४

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !

दारिद्र्य रेषेखालील गरिबांची आणि त्यांच्या कुटुंबांची संख्या भारतात नेमकी किती आहे, याचे अधिकृत उत्तर केंद्र सरकारला सापडले नसून, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आता मोदी सरकार करणार आहे. देशात गरिबी हटवण्याचा रोडमॅप ठरवण्यासाठी नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स सध्या कार्यरत आहे. नीति आयोगाला राज्य सरकारांनीही या कार्यात मदत करावी, असे आवाहन टास्क फार्सने केले आहे.
याखेरीज बीपीएल कुटुंबांची खरी आकडेवारी शोधण्यासाठी एक नवी समिती नियुक्त करावी, असा आग्रह या टास्क फोर्सने धरला आहे. दारिद्र्य रेषेखालील गरिबांची, विशेषत: बीपीएल कुटुंबांची संख्या शोधून काढण्याचे प्रयत्न १९६२ पासून पाच वेळा सरकारच्या समित्यांद्वारे झाले. १९७१ साली इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ’ची घोषणा दिली, तेव्हा भारतात ३२.१३ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगत होते. ३0 वर्षांनी २00१ साली गरिबांची संख्या वाढली व ती ४0.७ कोटींवर पोहोचली. तथापि, आजवर एकाही आकडेवारीत देशात एकमत नाही.

पंडित नेहरूंच्या कारकिर्दीत १९६२ साली एका वर्किंग ग्रुपकडे गरिबांची आकडेवारी शोधण्याचे काम सोपवले गेले. वयाने सज्ञान ४ व्यक्तींसह पाच जणांच्या कुटुंबाचा ग्रामीण भागात दरमहा खर्च १00 रुपयांपेक्षा कमी आणि शहरांमध्ये १२५ रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशा कुटुंबाला गरीब मानण्यात यावे, असा निष्कर्ष या ग्रुपने त्या वेळी सादर केला.

 १९६२ साली गरिबांची लोकसंख्या ५५ टक्के होती. डॉ. वाय.के. अलघ टास्क फोर्सने १९८९ साली भारतीय शहरांमधे २४00 कॅलरीजपेक्षा कमी व ग्रामीण भागात २१00 कॅलरीजपेक्षा कमी अन्नग्रहण करणाऱ्यांना गरीब ठरवले. या निकषानुसार शहरात ५३.६४ टक्के, तर ग्रामीण भागात ४९.0९ टक्के व्यक्तीच्या दरमहा खर्चाला दारिद्रय रेषेखालील मानण्यात आले. या वेळी या निकषांनुसार गरिबांची संख्या ४५ टक्के होती. डी.टी. लकडावाला यांच्या १९९३ सालच्या तज्ज्ञ समितीने दारिद्र्य रेषेबाबत पूर्वी ठरवलेल्या व्याख्येत बदल केला नाही. त्याच व्याख्येच्या आधारे प्रत्येक राज्यात मात्र वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवण्यात आली. १९९७ साली लकडावाला समितीच्या शिफारशी सरकारने मान्य केल्या. देशातील गरिबांची संख्या त्या वेळी २४ टक्क्यांवर आली.

सुरेश तेंडुलकर यांच्या टास्क फोर्सने २00५ सालीदारिद्र्य रेषेची नवी व्याख्या ठरवली नाही. मात्र, २00४-0५ मध्ये ग्रामीण व शहरी भागातील दैनंदिन खर्चाच्या आधारे गरिबीचे मूल्यमापन करण्याचा प्रयोग केला. त्यानुसार, ग्रामीण भागात दररोज २७ रुपये व शहरात ३३ रुपयांपर्यंत अथवा त्यापेक्षा कमी खर्च करणाऱ्यांना गरीब मानले. या निकषानुसार भारतात गरिबांची संख्या २२ टक्क्यांवर आली. सी. रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली २0१२ साली टास्क फोर्स नियुक्त केला गेला. दररोज ३२ रुपयांपर्यंत व शहरात ४७ रुपयांपर्यंतच खर्च करण्याची क्षमता असणाऱ्याला गरीब ठरवले. या सर्व प्रयत्नानंतरही बीपीएल कुटुंबांची संख्या अथवा गरिबांच्या अधिकृत व्याख्येपर्यंत पोहोचता आले नाही.

मोदी सरकारच्या कारकिर्दीत नीति आयोगाच्या टास्क फोर्सवर मुख्यत्वे देशातील गरिबी दूर करण्याचा रोडमॅप ठरवणे व त्यानुसार अंमलबजावणीसाठी सरकारला विविध कार्यक्रम सुचवणे ही जबाबदारी आहे. त्या पूर्वी खऱ्या आकडेवारीसाठी तज्ज्ञांची एक नवी समिती नियुक्त करण्याचा आग्रह टास्क फोर्सने सरकारकडे धरला आहे.
नीति आयोगाने तेंडुलकर समितीने ठरवलेल्या दारिद्र्य रेषेच्या मूळ आधारे रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करून, केंद्र सरकारला ग्रामीण व शहरी भागातील दैनंदिन खर्चाचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला आहे. नवी आकडेवारी उपलब्ध होईपर्यंत एकूण लोकसंख्येपैकी ३0 टक्के आर्थिक दुर्बल घटकांची गरीब वर्गात गणना करावी व आगामी काळात सकस अन्न, निवारा, स्वच्छता, साफसफाई, वीजपुरवठा इत्यादी निकषांवर त्यांच्या प्रगतीवर सरकारने नजर ठेवावी, असे प्रमुख निकष सुचवले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.

एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे.

इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे, असे कंपनीने निवेदनाद्वारे कळविले आहे.

एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे. आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल, असे एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात बालसंगोपन रजा लागू - देवेंद्र फडणवीस

मुंबई - विकलांग मूल असलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आणि काही विशेष प्रकरणात पुरुष कर्मचाऱ्यांना 730 दिवसांची विशेष बालसंगोपन रजा लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे .

विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या ( समान संधी , हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग ) अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे . त्यानुसार विकलांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास आणि असे मूल असून पत्नी हयात नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच मुलाच्या वडिलांना संपूर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बालसंगोपन रजा मिळू शकणार आहे . पूर्णत : अंध, अल्पदृष्टी , कृष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंगामुळे आलेली चलनवलन विकलांगता, मतिमंदत्व आणि मानसिक आजार असलेले मूल या प्रकारातील अपत्याचे माता- पिता या सवलतीस पात्र ठरू शकतील. या सवलतीसाठी अपत्याची विकलांगता याबाबतच्या अधिनियमातील विकलांगतेच्या व्याख्येनुसार असणे आवश्यक आहे . यासोबतच आत्ममग्न ( ऑटीझम ) , सेरेब्रल पाल्सी , मतिमंद , बहुविकलांग आणि गंभीर स्वरूपाची विकलांगता असलेल्या मुलाचे माता- पिता या सवलतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. या सवलतीसाठी अपत्याचे वय 22 वर्षांहून कमी असणे आवश्यक असून , पहिल्या 2 हयात अपत्यांसाठी ती लागू राहील . विशेष बालसंगोपन रजा एकाहून अधिक हप्त्यांमध्ये तथापि , एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तीन वेळा अशा मर्यादेत घेण्यात येईल . परीविक्षाधीन कालावधीत विशेष बालसंगोपन रजा दिली जाणार नाही. मात्र , अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येऊ शकेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जव्हार , मोखाड्यातील बालकांचे पुन: सर्वेक्षण करा

मुंबई - पालघर जिल्ह्यातील जव्हार , मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यांतील 5 वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांचे पुन : सर्वेक्षण 17 ते 21 सप्टेंबर या कालावधीत तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या .

पालघर जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला , त्या वेळी सवरा बोलत होते . ते पुढे म्हणाले , की संबंधित तालुक्यांत पुन : सर्वेक्षण करून तीव्र व अतितीव्र कुपोषित मुलांची यादी अद्ययावत करण्यात यावी . ही यादी प्रत्येक दिवशी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी . जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपकेंद्रनिहाय यादीतील मुलांच्या 100 टक्के तपासणीचे नियोजन करावे . आवश्यकतेनुसार इतर तालुक्यांतील अथवा जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्यावी .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी

इटानगर : वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) विधेयकाला अरुणाचल प्रदेशने गुरुवारी मंजुरी दिली . जीएसटीमुळे भविष्यात देशभरात करप्रणाली सुटसुटीत होऊन कराचा एकच दर कायम राहणार आहे .

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला . याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली . जीएसटीला आधीच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली असून , यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे बाकी आहे . विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते तमियो तागा यांनी या विधेयकाला आधीच 19 राज्यांनी मंजुरी दिल्याने चर्चेशिवाय याला मंजुरी द्यावी , असे म्हणणे मांडले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹साहित्य संमेलन डोंबिवलीला

आगामी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. आगरी यूथ फोरम, या संस्थेला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेला निर्णय दोन दिवसांनी जाहीर करू, अशी आधुनिक काळाशी विसंगत भूमिका साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी घेतल्याने त्यांच्या 'एकला चलो रे' कार्यपद्धतीविषयी साहित्य महामंडळ, घटक संस्था व साहित्य वर्तुळात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेतून नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे गेले तरी साहित्य संमेलनाच्या महत्त्वाच्या विषयावरील बैठक रविवारी साहित्य परिषदेमध्ये पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विलास देशपांडे, इंद्रजित ओरके, सुधाकर भाले, प्रकाश पायगुडे, दादा गोरे, उज्ज्वला मेहेंदळे यांच्या समितीने स्थळ निवड अहवाल या बैठकीत मांडला. संमेलनासाठी डोंबिवली किंवा बेळगाव यापैकी एका ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आगामी संमेलनासाठी डोंबिवलीची निवड करण्यात आली.

कर्नाटकमधील वातावरण ढवळून निघत असल्याने बेळगावमध्ये संमेलन घेणे शक्य नाही तसेच डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक वातावरण असूनही त्याठिकाणी साहित्य संमेलन झालेले नाही, यानिकषांच्या आधारे डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी डोंबिवलीतील आगरी यूथ फोरमसह बेळगावमधील सार्वजनिक वाचनालय, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय तसेच सातारा, इंदापूर, चंद्रपूर, रिद्धपूर येथील निमंत्रणे महामंडळाकडे आली होती. संमेलन स्थळानंतर आता संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचं निधन

भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात काल 'सूरसाधना' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात होनप यांच्या व्हायोलिन वादनाची मैफल सुरू होती. मैफलीचा शेवट करण्यासाठी त्यांनी 'दत्ताची पालखी' गाणे वाजवायला सुरुवात केली. 'दिगंबरा दिगंबरा'चा गजर टिपेला पोहोचला असताना व्हायोलिन वाजवता वाजवताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते पाठीवर कोसळले. गायक त्यागराज खाडिलकर यांनी ही माहिती दिली.

कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीतरसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीतं, प्रेमगीतं आदींनाही त्यांनी संगीत दिले. त्यांची अनेक गीतं आजही लोकांच्या ओठावर आहेत.

नंदू होनप यांच्या व्हायोलिननं बॉलिवूडवरही गारुड केलं होतं.बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांनी व्हायोलिन साथ केली होती. दगाबाज रे... सावन आया है... सुनो ना संगे मरमर... सुन रहा है... या गाण्यांच्या यादीवर नजर टाकल्यास होनप यांच्यातील संगीतकाराच्या मोठेपणाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन ते कायम दुर्लक्षितच राहिले. मात्र, त्याबद्दल तक्रार न करता ते अखेरपर्यंत शांतपणे कार्यरत होते.

सौरऊर्जा प्रकरणाचा निकाल भारताविरोधात

जिनिव्हा - सौरऊर्जाप्रकरणी अमेरिकेने भारताला दिलेले आव्हान योग्य असल्याचे राष्ट्रीय व्यापार संघटनेने ( डब्ल्यूटीओ) एका अहवालात म्हटल्याची माहिती अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी मायकल फ्रोमॅन यांनी एका पत्रकाद्वारे दिली . सौरऊर्जेची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वदेशी साहित्य वापरावे , अशी भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय मानकांविरोधात असल्याचे निरीक्षण डब्ल्यूटीओने नोंदवले आहे . यावरून भारताला आपली बाजू सिद्ध करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले .

सौरऊर्जानिर्मिती व वापराविषयी डब्ल्यूटीओने घातलेल्या अटी व नियमांचे पालन न झाल्याचा ठपका भारतावर ठेवण्यात आला असून , भारताला संबंधित कायद्यांमध्ये तातडीने बदल करण्याची गरज असल्याचे डब्ल्यूटीओने स्पष्ट केले. मागे एका समितीने या प्रकरणी निर्णय देताना सौरऊर्जा आयातदारांमध्ये भारताकडून भेदभाव होत असून , त्यांच्यासोबतचे करारही आंतरराष्ट्रीय मानकांविरोधात असल्याचे म्हटले होते .
 भारत सरकारने 2011 मध्ये यादृष्टीने काही निर्णय घेतले होते. त्यास ओबामा सरकारने आक्षेप घेतला असून , या कारणास्तव सौरऊर्जेसंबंधी साहित्य निर्यातीत तब्बल 90 टक्के घसरण झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता .

डब्ल्यूटीओचा हा अहवाल म्हणजे अमेरिकन सौरउत्पादकांचा विजय असून , यामुळे हवामानबदलाविषयी सुरू असलेल्या लढाईत एक पाऊल पुढे पडल्याची प्रतिक्रिया फ्रोमन यांनी व्यक्त केली आहे . दरम्यान , भारताकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टेक्नोसॅव्ही महाराष्ट्र सायबर गुन्ह्यात दुसरा

माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबतच तंत्रज्ञानासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये देखील देशभरात वाढ होत आहे. देशात घडलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये टेक्नोसॅव्ही महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आला आहे.

 इतर गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशने येथेही बाजी मारली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१५ या वर्षात देशभरातील सायबर गुन्ह्यांमध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील एकूण गुन्ह्यांची संख्या ११ हजार ५९२ असल्याचे एनसीआरबीने स्पष्ट केले आहे. फेसबुक अकाऊंट हँकिंग, ई-मेल हँकिंग, अश्लील संदेश पाठविल्या जाणे, ई-बँकिंग फसवणूक आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्याही २०१४च्या तुलनेत वाढली आहे. यात सुमारे आठ हजार १२१ लोकांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतही घट
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतही सायबर गुन्हे कमी असल्याचा दावा एनसीआरबीने केला आहे.

शंभराखाली ११ राज्ये
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत देशातील ११ राज्यांनी शंभरी गाठलेली नाही. यात अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅन्ड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड यांचा समावेश आहे.

टॉप फाइव्ह राज्य

राज्य २०१४ २०१५

उत्तर प्रदेश ः १७३७ २२०८
महाराष्ट्र ः १८७९ २१९५
कर्नाटक ः १०२० १४४७
राजस्थान ः ६९७ ९४९
तेलंगण ः ७०३ ६८७

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डोंबिवलीत रंगणार ९० वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ?

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला नागपूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल असे वृत्त आहे.

८९ वे संमेलन पिंपरी-चिंचवड येथे पार पडले होते. संमेलन समारोपप्रसंगी ९० वे संमेलन आयोजित करण्यासाठी निमंत्रणे आलेल्या तीन संस्थांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्या संमेलनानंतर साहित्य महामंडळाचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथून विदर्भ साहित्य संघ, नागपूरकडे हस्तांतरित झाले.

 त्यामुळे संमेलन विदर्भात होते की अन्यत्र याची उत्सुकता होती. महामंडळाकडे आलेल्या एकूण सात निमंत्रणांमध्ये डोंबिवलीतील आगरी युथ फोरम , कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखा, अमरावतीमधील श्री प्रभू प्रबोधन संस्था, चंद्रपूर तळोधीतील रिद्धपूर कल्याण शिक्षण संस्था, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची इंदापूर शाखा आणि बेळगावमधील सार्वजनिक वाचनालय यांचा समावेश होता. महामंडळाने संमेलनासाठी स्थळ निवड समितीची नेमणूकही केली होती. यात महामंडळाच्या चार पदाधिकाऱ्यांसह अन्य तीन सदस्यांचा समावेश होता. कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीतील आगरी युथ फोरमने अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे केली होती. या मागण्यांचा विचार करून साहित्य महामंडळाचे पदाधिका-यांनी कल्याण डोंबिवलीतील प्रस्तावित स्थळांची पाहणीदेखील केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विराट कोहली १६ वर्ष ज्या बँकेचा ग्राहक होता आज त्याच बँकेचा ब्रँड अँबेसेडर

बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे. पंजाब नॅशनल बँक(पीएनबी)नं विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती केली आहे. भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहलीला पीएनबीनं अँबेसेडरपद बहाल केल्यानं सर्व आश्चर्यचकित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जाच्या खाईत डुबणा-या बँकेला वर काढण्यासाठी पीएनबीच्या संचालक मंडळानं विराट कोहलीला ब्रँड अँबेसेडर केल्याची चर्चा आहे.

पीएनबीनं विराट कोहलीला अँबेसेडरपद दिल्यानंतर त्याच्यावर स्तुतिसुमनंही उधळली आहेत. पीएनबी बँकेला जागतिक बँक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीमध्ये एकाग्रता आणि समाजाप्रति बांधिलकी असल्यानं त्याला ब्रँड अँबेसेडर केल्याचं पीएनबीनं सांगितलं आहे. यावेळी विराट म्हणाला, "पीएनबी ही माझी बँक आहे आणि त्या बँकेचा गेल्या 16 वर्षांपासून मी ग्राहक आहे."

ब-याचदा क्रिकेटपटू खेळासंबंधित उत्पादनाचा प्रचार करताना आढळून येतात. क्रिकेटपटूंसाठी बँकेचं ब्रँडिंग करणं तसे कठीण काम असून, विराटनं तेही आव्हान स्वीकारलं आहे. विशेष म्हणजे याआधी विराट कोहलीनं एडिडास, बूस्ट, फास्ट्रेक, फेअर अँड लव्हली, पेप्सी सारख्या मोठ्या कंपन्यांचं ब्रँड अँबेसेडरपद भूषवलं आहे. त्यामुळे विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी निवड करून पीएनबीला किती फायदा होणार हे येत्या काळातच समजणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पदकविजेत्यांचा ‘दिव्यांग खेलरत्न’ने गौरव

ब्राझीलमधील रिओ-डी जानेरो येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदके मिळवून देऊन देशाची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने ‘दिव्यांग खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तसेच प्रत्येकी पाच लाख रुपये रोख देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी येथे केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बडोले म्हणाले, ‘‘मुंबईत लवकरच एक सोहळा आयोजित करून भालाफेकमधील सुवर्णपदकविजेता देवेंद्र झझारिया, उंच उडीतील सुवर्णपदकविजेता मरियप्पन थंगवेलू, गोळाफेकमधील रौप्यपदकविजेती दीपा मलिक व उंच उडीतील कांस्यपदकविजेता खेळाडू वरुणसिंह भाटी या चौघांना गौरविण्यात येईल.’’

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील ६० टक्के आदिवासी बालमृत्यू महाराष्ट्रात

गेल्या ५ वर्षांत शासकीय आश्रमशाळांत ५२८ आदिवासी बालकांचा मृत्यू

आदिवासी बालकांच्या मृत्यूबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळांच्या आश्रयाला आलेल्या कोवळ्या आदिवासी बालकांच्या मृत्यूची संख्या सर्वानाच अस्वस्थ करणारी आहे. शासकीय आश्रमशाळांमधील अनास्था व दुरवस्थेमुळे गेल्या पाच वर्षांत ५२८ आदिवासी बालकांना जीव गमवावा लागला आहे. चटका लावून जाणाऱ्या या घटनांमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये नुसताच आघाडीवर नाही, तर तब्बल ६० टक्के मृत्यूंचे ओझे वाहणारे राज्य आहे!

माहिती अधिकारातून गोळा केलेली माहिती आणि लोकसभेच्या मागील अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, काळजाचा ठाव घेणारा हा मृतांचा आकडा एप्रिल २०१० ते डिसेंबर २०१५ दरम्यानचा आहे. यातील काही मृत्यू नसíगक किंवा अपघाती असले तरी मृत्यूंसाठी आश्रमशाळांमधील गरव्यवस्थापन आणि साध्या साध्या मूलभूत सुविधांचा अभाव या दोन प्रमुख गोष्टी बालकांच्या जिवावर उठल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. या मृत्यूंमागे सर्पदंशापासून ते लंगिक शोषणांपर्यंत अनेक कारणांचा समावेश आहे.

या पाच वर्षांच्या कालावधीत देशातील ११ आदिवासीबहुल राज्यांमधील शासकीय आश्रमशाळेमध्ये एकूण ८८२ आदिवासी बालकांचे मृत्यू झाले; पण त्यापकी तब्बल ५२८ मृत्यू स्वतला विकसित म्हणविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये झाले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जवळपास ६० टक्के आहे. अगदी मागास असलेला ओदिशाही (१३३) महाराष्ट्राच्या खूप खूप मागे आहे. आदिवासीबहुल छत्तीसगडमध्येही मृत्यूची संख्या (४७) तुलनेने कमी आहे. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा स्पर्धक असलेल्या गुजरात (३०), आंध्र प्रदेश (१३) या राज्यांमधील संख्या तर अगदीच कमी आहे. त्याचवेळी राजस्थान, झारखंड आदी राज्यांमध्ये तर अशी एकही दुर्दैवी घटना घडलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे, मृतांचा हा आकडा आदिवासी विकास मंत्रालयाकडून थेट चालविलेल्या आश्रमशाळांमधील आहे. शासकीय अनुदानांवर चालणाऱ्या खासगी आश्रमशाळांमधील माहितीचा यात समावेश नाही.

मृत्यू झालेल्या ११७ बालकांच्या पालकांना अद्यापही राज्य सरकारने प्रत्येकी ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिलेली नाही. आदिवासी विकास खात्याची वार्षकि तरतूद पाच हजार कोटींपेक्षा अधिक असताना नुकसानभरपाई देण्यासाठी निधी नसल्याचे उत्तर आदिवासी आयुक्तालयाने दिले आहे.

कारवाई कधी?

आदिवासी बालकांच्या या मृत्यूबद्दल महाराष्ट्र सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची घोषणा मध्यंतरी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी केली होती. मात्र, अद्याप कारवाई तर सोडाच, घोषणेप्रमाणे नोटीसही बजावली नसल्याचे समजते.

मृत्यूची कारणे..

सर्प आणि विंचू दंशगांधीलमाशांचे हल्लेवैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळणेआरोग्यहीन भोजन, विषबाधा आणि पर्यायाने कुपोषणमलेरिया आणि सिकल सेल हे आजारलंगिक शोषण, आत्महत्या, अपघात

बुडून मृत्यू

(सर्वाधिक तांडव तळोद्यात : आदिवासींचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ४२ आश्रमशाळांमध्ये गेल्या पाच वर्षांत ८९ बालकांचा मृत्यू झाला.)

मृत्यूचे भयावह आकडे..

२०१०- ११ – ११२
२०११-१२ – ८८
२०१२-१३ – ८३
२०१३-१४ – ९७
२०१४-१५ – ९९
२०१५- १६ (डिसेंबर १५ पर्यंत) – ४९

(स्रोत – आदिवासी विकास आयुक्त कार्यालय, नाशिक)