Post views: counter

Current Affairs November 2016 Part- 3



🔹भारत नेपाल संयुक्‍त प्रशिक्षण अभ्‍यास- सूर्य किरण संपन्‍न

भारत नेपाल संयुक्‍त सैन्‍य प्रशिक्षण का संचालन नेपाल के सल्‍झांडी के आर्मी बैटल स्‍कूल (एनएबीएस) में 31 अक्‍टूबर से 13 नवंबर, 2016 तक किया गया, जिसमें कुमाऊं रेजीमेंट एवं नेपाल सेना की जबर जंग बटालियन ने भाग लिया। सूर्य किरण- X दोनों देशों के बीच ऐसा 10वां भारत-नेपाल संयुक्‍त्‍ प्रशिक्षण अभ्‍यास था जिसने दोनों देश की सेनाओं को आतंकी कार्रवाइयों का मुकाबला करने एवं आपदा प्रबंधन पर अपने अनुभवों को साझा करने के लिए एक आदर्श मंच मुहैया कराया।

प्रशिक्षण के दौरान संचालित अन्‍य गतिविधियों में आतंक रोधी वातावरण में संचालन के दौरान एक-दूसरे के हथियारों एवं उपकरणों तथा अवधारणाओं के साथ मूलभूत रूप से अवगत होना शामिल था। प्रशिक्षण 72 घंटों के एक आउटडोर अभ्‍यास के साथ संपन्‍न हुआ, जिसमें दोनों देशों की सेनाओं की टुकड़ियों ने एक कृत्रिम गांव में घेरा डाला तथा तलाशी अभियान के कार्यों को अंजाम दिया।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिझेलवर चालणाऱ्या जुन्या वाहनांना दिल्लीत ' ब्रेक'!

आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरुपी " ब्रेक' लागणार असून
अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे .

राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील वाहतूक विभागाला डिझेलवर चालणाऱ्या पंधरा वर्षांपूर्वीच्या 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते . शुक्रवारी रात्री उशिरा वाहतूक विभागाने या 1 लाख 91 हजार वाहनांनी यादी दिल्लीतील शुक्रवारी रात्री वाहतूक पोलिसांना पाठविल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने दिली . त्या यादीत वाहनाचे नाव , वाहनधारकाचे नाव , नोंदणी क्रमांक आणि पत्त्याचाही समावेश आहे . तसेच त्या यादीत संबंधित वाहन कोणत्या वाहतूक प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( आरटीओ) नोंद केलेले आहे त्याचीही माहिती आहे .

" आतापर्यंत 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे . ही वाहने कायद्याने रस्त्यावर चालविता येणार नाहीत . तसेच या वाहनांचे रस्त्यावर पार्किंगही करता येणार नाही . एवढेच नव्हे तर 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या सर्वच वाहनांची यादी तयार करण्यात आली आहे . राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आले की या वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे ,' अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली .

 वाहतूक विभागाने नोंदणी रद्द झालेली पंधरा वर्षांपूर्वीची वाहने पार्क करण्यासाठी 21 ठिकाणे उपलब्ध करून दिली आहे . सद्यस्थितीत या 21 ठिकाणांवर एकावेळी प्रत्येकी साधारण 1000 - 1200 वाहने लावण्याची सुविधा आहे . त्यामुळे विभागाने या कामासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹IndvsEng: राजकोट कसोटी अनिर्णीत, विराटच्या नाबाद ४९ धावा


दुसऱया डावात भारतीय संघाच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

राजकोट स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णीत राहीली. इंग्लंडच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाला ५२.३ षटकांत पाचव्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद १७२ धावा करता आल्या. विराट कोहली ४९, तर जडेजा ३२ धावांवर नाबाद राहिला. कसोटीच्या पाचव्या दिवशी उपहारानंतर अलिस्टर कूक १३० धावांवर झेलबाद झाल्यावर ३ बाद २६० धावांवर इंग्लंडने आपला डाव घोषित केला आणि भारताला विजयासाठी ३१० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खराब सुरूवात केली.

सलामीवीर गौतम गंभीर आपले खाते देखील उघडू शकला नाही. गंभीर स्लिपमध्ये झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी सुरू केला. पण यावेळी पुजारा स्वस्तात बाद झाला. रशीदच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत होऊन माघारी परतला. भारताची धावसंख्या ६८ असताना मुरली विजय बाद झाला आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला. अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतल्यावर भारतीय संघाच्या अडचणींत वाढ झाली. त्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. रहाणे बाद झाल्यानंतर विराटने अश्विनला साथीला घेऊन खिंड लढवली. अश्विन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. साहा देखील स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, जडेजाने कोहलीला अखेरपर्यंत साथ देत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडच्या मोईन अली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोईन अलीने सामन्यात शतकी कामगिरीसह तीन विकेट्स देखील घेतल्या.

इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत २ बाद २६० धावांच्या आघाडीची नोंद केली होती. सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांकडून चाहत्यांना बऱयाच अपेक्षा होत्या. पण भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. हमीद आणि कूक यांनी चांगली फटकेबाजी केली. सुरूवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर दोघांनीही आक्रमक फलंदाजी सुरू केली. भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत असलेली कूक आणि हमीदची जोडी अखेर ५९ व्या षटकात फुटली. अमित मिश्राच्या फिरकीवर मोठा फटका मारताना हमीद ८२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर जो रुट देखील मैदानात आक्रमक पवित्रा घेऊनच उतरला. पण त्याचे मनसुबे मिश्राने फोल ठरवले. जो रुटला मिश्राने स्वस्तात माघारी धाडले. दुसऱया बाजूने कूकने आपली फटकेबाजी कायम ठेवून आपले ३० वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक साजरे केले. कसोटी विश्वात ३० वे शतक गाठणारा कूक हा १३ वे खेळाडू ठरला.  सामन्याची सध्याची परिस्थितीपाहून कसोटी अनिर्णित राहिल असेच चित्र सध्या आहे. उपहारानंतर कूकने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि मोठा फटका मारताना तो १३० धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने कूकचा झेल टीपला. कूक बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाने आपला डाव घोषित केला आणि भारतासमोर ३१० धावांचे आव्हान ठेवले होते.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३७ धावांचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव चौथ्या दिवशी ४८८ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९ धावांची घेता आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंबा बागायतदार मधनिर्मिती करणार

जांभूळ हनी, मोहरी हनीप्रमाणे कोकणच्या हापूसची ओळख ‘अल्फान्सो हनी’ म्हणून होणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्य़ातील बागायतदार मधुमक्षिकापालनाचा जोडधंदा करणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी १० नोव्हेंबरला झालेल्या कार्यशाळेत महाबळेश्वर येथील तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांना आंबा बागायतदारांना मधुमक्षिकापालनाविषयी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात ही कार्यशाळा झाली. महाबळेश्वर येथील मधुमक्षिकापालन संशोधन केंद्राचे डॉ. सुनील पाटील यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पुरवठा अधिकारी जयप्रकाश फड, आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी, नारळ संशोधन केंद्राचे वैभव शिंदे, सुधाकर मराठे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी एस. डी. देशमुख यांच्यासह शेकडो बागायतदार उपस्थित होते.

हापूसचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून आंबा बागांमध्ये ‘सतिरी’ जातीच्या मधमाशा पालन केले जाणार आहे. परागीभवनाची क्रिया ज्या मध्यस्थामार्फत होते, तेच मारले गेल्याने मोहोरात पुरेशा संख्येने नर व स्त्रीपुष्प असूनही पुरेशा प्रमाणात परागीभवन न झाल्याने फलधारणाच होत नाही. यावर कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जातीची मधमाशी ही कोकणातील स्थानिक जात आहे. ती पेटीमध्ये पाळता येते. परागीभवनाच्या क्रियेत पर्यायाने फलोत्पादनवाढीसाठी ही मधमाशी अत्यंत उपयोगी ठरू शकते. नारळाच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.
अशा प्रकारचे प्रयोग जांभूळ, मोहरीच्या लागवडीमध्ये झालेले आहेत. त्या बागांमधून तयार होणाऱ्या मधाला फळाचे नाव दिले जाते. त्याप्रमाणे आंब्याच्या बागेतही अशा प्रकारचे मधुमक्षिकापालनाचा प्रयोग केला जाणार आहे.

कोल्हापूरसह महाबळेश्वर येथे सातिरी जातीच्या मधमाशांचे स्टेशन आहे. त्या ठिकाणी मधमाशांच्या पेटय़ा शेतकऱ्यांसाठी मिळू शकतात. एका पेटीला पाच हजार रुपये खर्च येतो. मधाच्या निर्मितीबरोबरच आंब्याच्या उत्पादनातही भरघोस वाढ होऊ शकते, असे डॉ. पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. उदय बने म्हणाले की, हापूस आंब्याची ही नवीन ओळख निर्माण होणार आहे.

 बाजारामध्ये अल्फान्सो हनी चांगल्या प्रकारे वितरित होईल. अशा प्रकारचे नवीन ट्रेंड आले तरच शेतीचा चेहरामोहरा बदलू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजीपाला लागवडीविषयी मार्गदर्शन करताना वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ले दिले. हिरवा माठ, तोंडली, वाल यासारख्या भाज्यांना बाजारामध्ये मागणी आहे. हिरवा किंवा लाल माठाची एक गुंठय़ातील लागवड शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपयांची कमाई करून देऊ शकते. बाजारात मागणी असलेल्या भाजीचीच लागवड केली तर त्यातून फायदा होईल.

त्याचप्रमाणे तयार केलेली भाजी प्रोटीन पॉनिक (पॅकिंग करून) म्हणून विकली तर त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो, असे शिंदे यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राजस्थानच्या वाळवंटात लष्कराचा 'घातक' सराव


राजस्थानच्या वाळवंटात हवाई दल आणि लष्कराच्या तुकड्यांचा दोन दिवसांचा संयुक्त सराव सुरू आहे. हवाई दलातील अनेक लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि नुकत्याच दाखल झालेल्या अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने हा युद्धाभ्यास केला जातोय. भारतीय लष्कराच्या सशस्त्र आणि हल्ला करणाऱ्या दलातील जवानांचा पूर्ण क्षमतेने हा सराव सुरू आहे. भारतीय सैन्याने ज्या प्रकारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले तशाच प्रकारचा हा संयुक्त सराव होतोय.

विविध दलांमध्ये सुसूत्रता यावी आणि युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्यात ताळमेळ असावा यासाठी हा आक्रमक सराव सुरू आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल मनिष ओझा यांनी दिली. शत्रूवर अचानक हल्ला करून त्याला सर्व बाजूंनी उद्ध्वस्त करणाऱ्या यशस्वी योजनांचा वापर सरावात केला जातोय.

 अशा प्रकारच्या सरावाचा उपयोग सर्जिकल ट्राइस सारख्या मोहीमांमध्ये होतो. यातून जवानांची मानसिक आणि शारीरीक तयारी केले जाते. अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या मोहीमांमध्ये या सरावाचा उपयोग होतो, असं ओझा म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹🔹चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ !

पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यामधील अंतर सर्वात कमी राहणार असून, चंद्रबिंब मोठ्या आकाराचे दिसणार आहे. या खगोलिय चमत्काराचा आनंद अवकाश निरीक्षकांनी लुटावा, असे आवाहन निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.

एकंदर ८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. याआधी चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येण्याची घटना १९४८ मध्ये घडली होती. यापुढे ही स्थिती २०३४ मध्ये पहावयास मिळणार आहे.

 आपला चंद्र प्रत्येक राशीत २ पूर्णांक एक चतुर्थांश दिवस मुक्कामी राहून एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण १२ राशींचे चक्र पूर्ण करतो. यामुळे आकाशातील प्रत्यक्ष दिसणाऱ्या राशींची माहिती व त्यांच्या दर्शनाचा आनंद देण्यास चंद्र मदतच करतो. याच राशी चक्रातून सर्व ग्रह फिरत असल्याने दरमहा चंद्र प्रत्येक ग्रहाजवळ येतो. यालाच आपण चंद्राची त्या ग्रहसोबत युती झाल्याचे संबोधतो. चांद्र मासातील प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा त्या-त्या नक्षत्रात बघता येऊ शकतो. तसाच तो या कार्तिक पौर्णिमेला आकाशातील कृतिका या नक्षत्राजवळ पाहता येईल.

सुपरमूनचा घ्या अनुभव
या घटनेलाच सुपरमूनसुद्धा म्हटल्या जाते. या स्थितीत पृथ्वी व चंद्र यामधील अंतर केवळ ३ लाख ५० हजार किलोमिटर एवढे कमी असते. त्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेणे निश्चितच अवर्णनिय राहणार आहे.

- ही खगोलीय घटना ६८ वर्षांनंतर होत आहे. कार्तिक पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यामधील अंतर कमी होऊन, चंद्र बिंब मोठे दिसणार आहे. दुर्मिळ असलेली ही स्थिती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ट्रम्पविरोधकांची आता सह्यांची मोहीम
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेतील परंपरेनुसार लोकशाही मार्गाने अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनांपाठोपाठ आता सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे! प्रतिनिधी मंडळात (इलेक्टरोल कॉलेज) ५३८पैकी २९० मते ट्रम्प यांच्या पारड्यात पडल्याने ते विजयी झाले आहेत. हे प्रतिनिधी १९ डिसेंबर रोजी मतदानाद्वारे ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार आहेत. मात्र, त्यांनी संकेतभंग करून हिलरी यांना विजयी करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर अमेरिकेतील ३२ लाख लोकांनी सह्या केल्या आहेत.

ट्रम्प यांनी आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवल्याने हिलरी समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद वेगवेगळ्या प्रकारांमधून दिसत आहेत. ‌हिलरी यांना अध्यक्ष करण्याची याचिका ही त्यापैकीच एक आहे. प्रतिनिधी मंडळातील ५३८ मतदाते १९ डिसेंबर रोजी मतदान करणार आहेत. त्यांच्या राज्यात झालेल्या मतदानांनुसार (पॉप्युलर व्होट्स) त्यांनी मतदान करण्याचा संकेत आहे. तसे झाल्यास ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल; परंतु या मतदात्यांनी त्यानुसार मतदान केले नाही, तर चित्र वेगळे दिसेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. अशी बंडखोरी अमेरिकेतील २४ राज्यांमध्ये कायदेशीर नसली, तरी अल्प दंड भरून त्यांना ‘क्रॉस व्होटिंग’ करता येऊ शकते. एवढेच नव्हे, तर हिलरी क्लिंटन निवडून येतील, असे गृहीत धरून बर्नी सँडर्स यांच्या समर्थकाने ‘हिलरी यांनी इलेक्टोरल कॉलेज जिंकल्या तरी त्यांना मत देणार नाही,’ असा इशारा दिला होता.

हिलरी समर्थकांना दंड भरताना आनंदच होईल, असे सांगणाऱ्या चेंज डॉट ऑर्ग याचिकेमार्फत स्टेट व्होटकडे दुर्लक्ष करा आणि हिलरीसाठी मतदान करा, असे आवाहन ‘इलेक्टोरल’ना करण्यात येत आहे. ‘ट्रम्प देशसेवा करण्यासाठी अयोग्य आहेत. सर्व अमेरिकी नागरिकांना त्यांनी बळीचा बकरा बनवला आहे. ते सवंग आहेत, नागरिकांना धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत आणि लैंगिक छळ केल्याचेही मान्य करत आहेत. त्यांना राजकारणाचा अजिबात अनुभव नसल्याने ते देशासाठी धोकादायक आहेत,’ असे या याचिकेत म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

न्यूझीलंड आज ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाने हादरले. ख्राइस्टचर्च शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

यूएस जिओलॉजी सर्व्हेच्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च शहरापासून ९१ किलोमीटरवर स्थानिक वेळेनुसार, रात्री ११ वाजून ०२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. फेब्रुवारी २०११ मध्येही या शहराला ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरवले होते. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास १८५ लोक मृत्यूमुखी पडले होते. आजच्या भूकंपानंतर युएस त्सुनामी इशारा केंद्र आणि न्यूझीलंडने त्सुनामीचा इशारा दिला आहे. आम्ही भूकंपाबाबत माहिती घेत आहोत. त्यानंतर याची विस्ताराने माहिती देऊ, असे शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. भूकंपाने शहरात मोठे नुकसान झाले आहे. भूकंपाने मोठे हादरे बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

भूकंपाची तीव्रता अधिक होती. त्याचे धक्के संपूर्ण देशाला जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे न्यूझीलंड सरकारच्या जिओनेट वेबसाइटने सांगितले. स्थानिकांनी भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले. आम्ही झोपेत होतो. भूकंपाने आमचे घर हलायला लागले. त्यामुळे आम्ही झोपेतून जागे झालो. काही वेळ धक्के जाणवतच होते. आमच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीजपुरवठाही खंडित झाला आहे, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळील शहरे आणि गावांमध्ये मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्यापार मेळ्यामध्ये डिजिटल महाराष्ट्र

प्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातर्फे ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे दालन उभारण्यात येणार असून, त्यामुळे राज्याची वनसंपदा, उद्योग क्षेत्रातील प्रगती इत्यादीचे डिजिटल व व्हर्च्युअल दर्शन देश-विदेशातील ग्राहकांना व पर्यटकांना घडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ नोव्हेंबर रोजी या दालनाचे उद्घाटन करणार असून, अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई असतील.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन संघटनेतर्फे दरवर्षी या तारखांना आंतराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा संकल्पना डिजिटल इंडिया आहे. व्यापार मेळ्यात २४ देश, भारतातील २७ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या दालनात तळमजल्यावर लघुउद्योगांचे ८0 स्टॉल्स विक्री व प्रदर्शनासाठी असतील. विविध हस्त शिल्प कलांच्या प्रात्यक्षिकांसाठी १८0 हस्त शिल्पकारांसह लघुउद्योजकही यात सहभागी आहेत. तसेच महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सिडको, सिकॉम यांचेही स्टॉल्स असतील.

राज्याच्या दालनात सनई-चौघडा वादनासह लोकवाद्ये, तुतारीच्या निनादात स्वागत केले जाणार असून, ‘शाबास इंडिया’ पथकातर्फे तलवारबाजी, शारीरिक कसरती दांडपट्टा सादर करण्यात येतील. रोज विविध लोककला सादर केल्या जातील आणि २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र संस्कृती दर्शन दिन कार्यक्रम होईल. त्यात कलारंजन सांस्कृतिक पथकाचे ३४ कलाकार सहभागी होत आहेत.

जगातील ७ हजार कंपन्या उत्पादनांसह सहभागी होत आहेत. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांतील २४0 कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचे भव्य स्टॉल्स आहेत. दक्षिण कोरिया या मेळ्याचा भागीदार देश असून, बेलारूस फोकस देश आहे. हरयाणा हे फोकस राज्य तर मध्य प्रदेश व झारखंड ही भागीदार राज्ये आहेत. व्यापारी वर्गासाठी १४ ते १८ नोव्हेंबर हे पाच राखीव आहेत, तर १९ नोव्हेंबरपासून सर्वसामान्य जनतेला मेळा खुला होईल

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रीय घडामोडी

सध्या भारतीय 24 उच्च न्यायालयात 601 न्यायाधीश आहेत.
सर्वाधिक अलाहाबाद उच्च न्यायालयात 86 न्यायाधीश आहेत. व
सर्वात कमी जम्मु-काश्मीर उच्च न्यायालयात 8 न्यायाधीश आहेत.
सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 10 न्यायाधीश असे प्रमाण आहे.
 
उत्तराखंडमधील 2013 च्या ढगपुटी, अतिवृष्टी, पुराच्या प्रलयानंतर
प्रथमच केदारनाथ गंगोत्री, यमनोत्री मंदिर (9 मे 2016), बद्रिनाथ मंदिर (11 मे 2016) खुले करण्यात आले.
 
चीनमधील दुधाला भारतात बंदी घालण्यात आली आहे.
 
देशातील 'पाणबदाड, क्षारयुक्त व खारपाणपट्टा म्हणून ओसाड पडलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी सुपीक बनविण्यासाठी शेतकर्‍यांना
केंद्र सरकार 60% अनुदान देणार आहे. (राज्य सरकार 36% व केंद्र सरकार 24% वाटा)
 
भारतातील 600 जिल्हयासाठी केंद्र सरकारने आकस्मिक योजना लागू केली.
 
दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक कुटुंबाला दररोज 100 ऐवजी 150 रुपये रोजगाराची हमी
 
धिंगा गवर महोत्सव - राजस्थान
 
गाईच्या दुधाची पहिली बँक दिल्ली येथे नियोजित.
 
विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर, गुजरातमध्ये 12.36 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.

(2015 मध्ये) 2014 मध्ये 2.01 अब्ज डॉलर गुंतवणूक झाली होती.
 
हरियाणा जनहित काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षात विलिन झाला. (28 एप्रिल 2016) 2007 मध्ये हा पक्ष हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी स्थापन केला होता.
 
गुजरातमध्ये आर्थिक आरक्षण : सामान्य वर्गातील (अनारक्षित जाती) आर्थिकदृष्टया मागासवर्गीयांसाठी 10 टक्के आरक्षणासाठी गुजरात राज्य सरकारने घोषणा केली.

(29 एप्रिल 2016) 6 लाख अथवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब या आरक्षणासाठी पात्र असणार आहे.

यापूर्वी या राज्यात मागासवर्गीय अनुसूचीत जाती आणि जनजातींना 50% आरक्षण देण्यात आले आहे.
 
शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेवजी यांची 463 वी जयंती साजरी करण्यात आली. (29 एप्रिल 2016)
 
आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी 139 क्रमांक.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रीय घडामोडी

भारत-फ्रान्स करार (30 एप्रिल 2016) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील सहा अणुभट्ट्यांच्या अंमलबाजवणीसाठी भारतीय अणुऊर्जा महामंडळाने फ्रान्सशी करार केला.

2032 पर्यंत 63 हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे.
 
विजय माल्या याने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा 2 मे 2016 रोजी राजीनामा दिला.
 
केंद्र सरकारने देशात साखरेच्या साठयावर 500 टनांची मर्यादा घातली आहे.

देशात सर्वाधिक साखर कारखाने तामिळनाडू राज्यात आहेत.

(35) महाराष्ट्र (13) राज्यात 30 एप्रिल 2016 पर्यंत 83.75 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
 
केंद्र सरकारने मनरेगाची मंजुरी 162 वरुन 167 रुपयांवर केली.
 
रोजगार निर्मितीत कर्नाटक प्रथम, महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर
 
देशातील जलसंकट, दुष्काळ आणि पाणी टंचाई यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नदी पुनर्जीवन कायदा करावा यासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी 5 मे 2016 रोजी दिल्ली जल सत्याग्रह केला.
 
पोलीसांच्या आत्महत्येत तमिळनाडू प्रथम, महाराष्ट्र व्दितीय, कर्नाटक तृतीय क्रमांकावर.
 
भौगोलिक माहिती नियामक विधेयक 2016 नुसार भारताचा चुकीचा नकाशा वापरण्यात 100 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा 7 वर्ष तुरुंगवास होणार.
 
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बंगालमध्ये कुचबिहार जिल्ह्याच्या सीमेवरच्या लोकांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच मतदान केले.
 
भारत आणि बांग्लादेश यांच्या भूखंड करार झाला. (2016) त्यात परस्पराच्या हद्दीत असलेले भूभाग परत करण्यात आले.

बांग्लादेशातील 9776 नागरिक त्या अंतर्गत भारतात आले त्यांच यावेळी प्रथमच मतदान होते. 103 वर्षीय असगर अली या व्यक्तीने प्रथमच निवडणुकीत मतदान केले.
 
माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा 3 मे 2016 ला 100 जयंती दिन साजरा करण्यात आला.  
 
देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य आंध्रप्रदेश.
 
रवींद्रनाथ टागोर यांची 7 मे 2016 रोजी 155 वी जयंती साजरी करण्यात आली.
 
केरळचे राज्यपाल व माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम केरळमध्ये मतदान करणारे भारतातील राज्यपाल होय.
 
देशातील पहिली आणि ऐकमेव आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सोने वा चांदीची रिफायनरी एमएमटीसी पीएएमपीने 6 मे 2016 रोजी दतोला नावाने वैदिक सुवर्णनाणे सादर केले. दतोला 999.9 शुद्ध सोन्यातील एक अष्टकोणी नाणे आहे त्याचे वजन 11.6638 ग्रॅम आहे.
 
मे महिन्यात उत्तराखंड व जम्मु काश्मीर जंगलामध्ये आग लागली होती.
 
गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणामध्ये मेडीगड्डा धरण उभारण्यात येणार आहे. असा करार महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'केप टू रियो रेस’ मध्ये INSV म्हदेई सहभागी होणार

भारतीय नौदल सेलिंग जहाज - INSV म्हदेई, ज्याच्या चालक दलामध्ये सर्व महिला आहेत, 26 डिसेंबर 2016 रोजी दक्षिण आफ्रिका मध्ये होणार्‍या ‘केप टू रियो रेस’ (Cape Town to Rio de Janeiro) मध्ये सहभाग घेण्यासाठी गोवा मधून केपटाउन साठी रवाना झाले आहे.
लेफ्टनंट कमांडर वर्तिकाजोशी या जहाजाचे नेतृत्व करीत आहे.
ही शर्यत दक्षिण अटलांटिक महासागर मध्ये एकूण6500 किमी अंतरासाठी दक्षिण गोलार्ध मध्ये खेळण्यात येणारी सर्वात लांब नौका शर्यत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये

मायक्रो सोलर डोम (MSD) हा केंद्रीय मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला स्वच्छ व हरित ऊर्जा उपक्रम आहे. हा उपक्रम वीजेपासून वंचित असलेल्या भागात, विशेषतः शहरी झोपडपट्ट्या किंवा ग्रामीण भागात सूर्यप्रकाश वापरुन तेथील भागासाठी वीज निर्मिती करण्यासाठी चालविण्यात आलेला आहे.

तसेच हे ग्रीन इंडिया अभियानासारख्या हरित ऊर्जा पुढाकाराला पूरक म्हणून असणार.
याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत नाही आणि हे 24 तास कार्यरत व सूर्योदयानंतर सतत चार तास कार्य करते.
सूर्य ज्योती हे तीन पद्धतीने कार्य करते – (i) वीजेशिवाय दिवसा प्रकाशात, (ii) सोलर PV सह रात्री वेळी आणि (iii) कार्यान्वित झाल्यानंतर 17 तासांनी पारंपरिक ग्रिड सह रात्री वेळी.

PV-MSD ची किंमत सुमारे रु.1200 आहे आणि नॉन PV आवृत्ती ची किंमत सुमारे रु. 500 आहे.

उत्पादन प्रक्रिया वाढल्यास ही किंमत पुढे अनुक्रमे रु. 900 आणि रु. 400 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे आणि भविष्यातील नगरविकास, ग्रामीण विकास आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून यासाठी विद्यमान अनुदान दिले जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विशाखापट्टणम येथे ‘पार्टनर समिट 2017’ आयोजित

वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सीतारामन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रा बाबू नायडू यांनी 27-28 जानेवारी 2017 ला होणार्‍या 23 व्या  ‘पार्टनर समिट 2017’ हे विशाखापट्टणम मध्ये आयोजित केले जाईल ही घोषणा केली. सलग दुसर्‍यांदा ही परिषद येथे आयोजित केली जात आहे.

आंध्र प्रदेश सरकार आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांच्या सहकार्याने औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग (DIPP), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. ज्यामध्ये जागतिक पातळीवरील आणि भारतीय उद्योग नाविन्यपूर्ण धोरणे आणि महत्वपूर्ण धोरण यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्रि. गुरमीत कनवाल लिखित ‘द न्यू अर्थशास्त्र: ए सेक्युरिटी स्ट्रॅटजी फॉर इंडिया’ पुस्तकाचे अनावरण

ब्रिगेडियर गुरमीत कनवाल (निवृत्त) लिखित ‘द न्यू अर्थशास्त्र: ए सेक्युरिटी स्ट्रॅटजी फॉर इंडिया’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक हार्परकोलिन्स इंडिया हे आहेत.
कनवाल हे संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था, नवी दिल्ली चे विशेष फेलो आहेत. आणि सेंटर फॉर स्ट्रॅटजीक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS), वाधवानी चेअर, वॉशिंग्टन, डी.सी. चे एडजंक्ट फेलो आहेत. ते दोन दिल्लीस्थित फोरम ऑफ स्ट्रॅटजीक इनिशीएटिव्ह आणि साऊथ एशियन इंस्टीट्यूट फॉर स्ट्रॅटजीक अफ्फैर्स (SAISA) चे सह-संस्थापक आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पश्चिम लहर’ :-

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात ‘पश्चिम लहर’ हा युद्धसराव आयोजित केला आहे.

 या युद्धसरावात 40 युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी होणार आहेत. लढाऊ विमाने, टेहळणी विमाने आणि मानव विरहित टेहळणी विमाने यांचा ताफा युद्धसरावात सहभागी होणार आहे...

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुंटूर येथील मिरची होणार स्वस्त

पुणे - देशातील मिरचीची सर्वांत जास्त उत्पादन आणि आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात यंदा मिरचीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे . त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाढलेल्या भावांत घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे . पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांत या गुंटूर येथील मिरचीची आवक होत असते .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आज दिसणार सुपरमून. .

पुणे - आज ( सोमवार) सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी खगोलप्रेमींना सुपरमून बघण्याची संधी मिळणार आहे .
पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर त्याला सुपरमून म्हणतात . त्यावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसते . चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर एवढे आहे . पंरतु , आज हे अंतर 3 लक्ष 56 हजार 509 किलोमीटर एवढे असणार आहे .
खगोलप्रेमींसाठी हा दूग्धशर्करा योग जवळजवळ 68 वर्शांनी साधून आला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बालदिनानिमित्त पुण्याच्या अन्विताचे गुगलवर ' डुडल'

 विविध प्रकारच्या लक्षवेधी ' थीम्स ' ने जगभरातील नेटिझन्सच्या नेहमीच चर्चेत असणाऱ्या गुगल डुडलवर यंदा पुण्याचा झेंडा फडकला असून , आज ( 14 नोव्हेंबर) बालदिनानिमित्त पुण्याच्या अन्विता तेलंग हिने रेखाटलेले डुडल गुगलवर झळकले आहे .

गुगलतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या ' डुडल 4 गुगल ' स्पर्धेत पुण्याच्या बालेवाडी येथील विब्ग्योर हायस्कूलची विद्यार्थिनी अन्विता प्रशांत तेलंग ही राष्ट्रीय विजेती ठरली . तिने रेखाटलेल्या कल्पक , प्रेरणादायी आणि ' एन्जॉय एव्हरी मोमेंट ' हे शीर्षक असलेल्या डुडलची निवड करण्यात आली होती .

अन्विताने तयार केलेले हे डुडल आज बालदिनानिमित्त गुगल इंडियाच्या होमपेजवर प्रदर्शितही करण्यात आले आहे . या वर्षीच्या डुडल स्पर्धेची संकल्पना "इफ आय कुड टीच एनीवन एनीथिंग , इट वुड बी. .. ' ही होती . अर्थात , "कुणाला मला काहीतरी शिकवायचे असेल, तर ते .. .' अशी ही संकल्पना होती . अन्विताने " एंजॉय एव्हरी मोमेंट ' अर्थात , प्रत्येक क्षण आनंदाने जगा - हा संदेश देणारे डुडल तयार केले. इयत्ता चौथी ते सहावीच्या गटात अन्विताने बाजी मारली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘वर्ल्ड सिटीज’मध्ये पुण्याला नामांकन

स्पेनमधील बार्सिलोनात उद्यापासून रंगणार अंतिम फेरी

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक मिळविल्यावर आता जागतिक स्तरावर होणाऱ्या ‘वर्ल्ड स्मार्ट सिटीज अॅवॉर्ड’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पुण्याने स्थान पटकावले आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान अंतिम फेरी रंगणार असून, त्यात विजेत्या शहरांची निवड केली जाईल.

‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस’ स्पेन येथे होणार आहे. यामध्ये, ‘सिटी अॅवॉर्ड’, ‘प्रोजेक्ट अॅवॉर्ड’ आणि ‘इनोव्हेटिव्ह अॅवॉर्ड’ अशा तीन प्रकारांत जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये स्पर्धा होणार आहे.

 पुणे महापालिकेला सिटी अॅवॉर्ड आणि प्रोजेक्ट अॅवॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘देशातील सर्व शहरांमध्ये राहण्यायोग्य सर्वोत्तम ठिकाण’ या संकल्पनेवर पुण्याने सिटी अॅवॉर्डमध्ये अंतिम सहा शहरांमध्ये स्थान मिळविले आहे. अंतिम फेरीतील शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क, कोरियाचे सोल, रशियातील मॉस्को, चीनमधील जिकॉन आणि नेदरलँड्समधील हॉलंड्स क्रून या शहरांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी विविध धोरणे, प्रकल्प आखणाऱ्या आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणाऱ्या शहरांना याद्वारे गौरविण्यात येणार आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुण्याने दुसरा क्रमांक मिळविला होता. शहरातील औंध-बाणेर-बालेवाडी या भागाचा कायापालट करण्यात येणार असून, शहरातील इतर सर्व नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा घडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीतील विविध प्रकल्पांचा शुभारंभ जूनमध्ये झाला. येत्या काही दिवसांत यातील काही प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होण्याची अपेक्षा केली जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आशा भोसले यांना राम मराठे पुरस्कार

भारत गायन समाजाच्या वतीने पं. राम मराठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे यंदा २७ वे वर्ष असून स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती भारत गायन समाजाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ गायिका शैला दातार यांनी दिली. ‘कलेप्रती समर्पित असलेल्या कलाकाराचा योग्य गौरव व्हावा या उद्देशाने पं. राम मराठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दर वर्षी भारत गायन समाजाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या आधी भालचंद्र पेंढारकर, यशवंतबुवा जोशी, जयमाला शिलेदार, पं. उल्हास कशाळकर, उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौदीत नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या शाळांवर बंदी

सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.

एका वृत्त एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये नॉन-इस्लामिक म्हणजे ख्रिसमस आणि न्यू इयरला सुट्या, तसेच त्यांच्याच चौकटीत राहून परिक्षेत बदल करणा-या शाळांवर बंदी घालण्यात येईल, अशा इशारा दिला आहे. तसेच सौदीतील सर्व शाळांमध्ये सुट्या आणि परिक्षा यासंदर्भातील शैक्षणिक कॅलेंडर लावण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. याचबरोबर शाळांनी नियम तोडल्यास त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

सौयी अरेबिया हा सुन्नी-पुराणमतवादी लोकांचा प्रांत असून याठिकाणी सर्वांनी इस्लामिकचे नियम पाळले पाहिजे.

#eMPSCkatta_Current_Affairs

प्रश्न:-
भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आल्याच्या प्रकरणाची  ---------- यांच्या नेतृत्त्वाखालील न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्यात आला
Ans- न्या. एस. के. पांडे

प्रश्न:-
चीनमधील ऐतिहासिक चित्रपट ‘शुआनजांग’ची ८९ व्या अकॅडमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात ----------------- या अभिनेत्याने या चित्रपटाद्वारे चीनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते.

Ans-सोनू सूद

प्रश्न:-
---------- ची स्वित्झर्लंड टूरिझमने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होणारा तो  पहिला भारतीय अभिनेता आहे.

Ans-रणवीर सिंग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2018 में जिनेवा में COP के आठवें संस्करण की अध्यक्षता भारत करेगा

विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) के तम्बाकू नियंत्रण पर फ्रेमवर्क कन्वेंशन (FCTC) के लिए कांफ्रेंस ऑफ़ पार्टीज़ (COP) का आठवां संस्करण, 2018 में स्विट्ज़रलैंड के जिनेवा में होगा। इसकी अध्यक्षता भारत करेगा। COP 7 के समापन सत्र में सर्वसम्मति से, स्वास्थ्य सचिव सीके मिश्र अगले दो वर्षों के लिए COP ब्यूरो के अध्यक्ष चुने गए हैं।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इथेनॉलच्या धोरणासाठी पंतप्रधान अनुकूल

पुणे - देशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी वास्तववादी धोरण ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दर्शविली असून संसद अधिवेशनानंतर ती होईल , अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली .

मांजरी येथील "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ' (व्हीएसआय ) येथे आयोजित " शुगरकेन व्हॅल्यू चेन -व्हीजन शुगर 2015 ' या परिषदेत " साखर बाजारातील जागतिक घडामोडी आणि भारतीय साखर उद्योगाची वाटचाल ' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते . केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी , सहकारमंत्री सुभाष देशमुख या वेळी उपस्थित होते .

केंद्र सरकारने योग्य दर दिल्यास हवे तेवढे इथेनॉल पुरविण्याची राज्यातील साखर कारखान्यांची तयारी असल्याचेही या वेळी पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले , "" इथेनॉलच्या भावाच्या धोरणात सातत्य ठेवले जात नाही . त्यामुळे यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल पुरवठ्यासाठी 50 टक्केही निविदा भरल्या नाहीत . ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली. त्यामुळे मी आणि नितीन गडकरी यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन इथेनॉलच्या भावासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे . ''

साखर कारखान्यांच्या वेगवेगळ्या कर्जांचे पुनर्गठन करण्याची मागणीही या वेळी पवार यांनी केली . केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधानांमार्फत याबाबत अनुकूल निर्णय घेण्याचा प्रयत्न करू , असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले .

विदर्भ आणि मराठवाड्याला " व्हीएसआय ' मार्फत उत्तम दर्जाचे ऊस बेणे पुरविण्याची तयारीही पवार यांनी दर्शवली . परंतु , त्यासाठी राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यात जालना येथे पाण्याची सुविधा असलेली प्रत्येकी शंभर एकर जमीन उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी त्यांनी केली .

या वेळी बोलताना उसाखालील संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली येण्याची आवश्यकता नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती . त्याला पवार यांनी विरोध दर्शवला .

ते म्हणाले , "" उसाला ठिबकने पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गडकरी यांची बैठक झाली ही चांगली बाब आहे . मात्र, ठिबकसाठी पाइपने पाणी पुरवावे लागते . पाटाचे , कालव्याचे, नदी आणि ओढ्यातून पाणी आणून ठिबकने देण्यासाठी पाइप , 24 तास वीज आवश्यक असते . त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल .''

. . . तर शेतकऱ्यांचा फायदा किती ?

साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना " एफआरपी ' पेक्षा अधिक रक्कम देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे . परंतु , त्यासाठी कारखान्यांना कर्ज काढावे लागणार असून त्याची फेड शेतकऱ्यांच्या पैशातूनच होणार आहे . यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होईल , याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले . साखर कारखाने बंद का पडत आहेत, याचा आढावा साखर आयुक्तांनी घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आदिवासींसाठी रुग्णवाहिका!

आदिवासीबहुल क्षेत्रासाठी रुग्णवाहिका पुरविण्यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद करावी, असे निर्देश केंद्र सरकारच्या ‘कॉमन रिव्ह्यू मिशन’ समितीचे प्रमुख डॉ. झोया अली यांनी दिले. आरोग्य सेवेची तपासणी करण्यासाठी अलीकडेच नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ही समिती आली होती. आरोग्य सेवेची काय स्थिती आहे, याची झाडाझडती समितीने या दौऱ्यात घेतली.

एक लाख रुग्णांमागे एक रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे. रामटेक हा आदिवासी तालुका आहे. मात्र, रामटेक तालुक्यात केवळ एकच रुग्णवाहिका आहे. ही बाब समितीच्या लक्षात आली. त्यानंतर समितीने राज्य सरकारला निर्देश देत रुग्णवाहिका देण्याचे सांगितले. समितीने मनोरुग्णालय, डागा हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्राचीही तपासणी केली. मनोरुणालय आणि डागा हॉस्पिटलमध्ये अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान असल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. पण, मौदा, रामटेक, उमरेड तालुक्यात अक्षरशः रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे दिसून आले.

 औषधांसाठी सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तरीही, औषधांचा थांगपत्ता नसल्याचे वास्तव समितीला या दौऱ्यात आढळले. औषध माफक दरात आणि तातडीने मिळावे, यासाठी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश सरकार औषध मशिन्स लावत असेल, तर महाराष्ट्र मागे का? असा सवालही समितीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना केला. यावर अधिकारी कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत, हे विशेष. सध्या आरोग्य यंत्रणा बऱ्यापैकी ऑनलाइन होत आहे. पण, रुग्ण तंत्रज्ञानस्नेही होत आहेत का, यासाठी कोणती पावले उचलली, अशी विचारणा करून समितीने पुन्हा अधिकाऱ्यांना कात्रित पकडले. डेंग्यू, गॅस्ट्रोत झालेल्या हयगयीमुळे अधिकाऱ्यांची धडधड वाढली आहे. तर, ‌सर्कलमध्ये आरोग्याच्या काय त्रुटी आहेत, याची माहिती सदस्यांना असते. पण, समितीने जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्यात रोष आहे. समितीवर विरोधी पक्षाने आगपाखडही केली. अखेर समितीने राज्य सरकारकडे हा अहवाल दिला आहे.

मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधानपरिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून चार नवीन आणि 11 प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली. यावेळी दोन्ही बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेतील बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभेतील आमदार अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, राज पुरोहित, सुनिल प्रभू यांच्यासह विधानपरिषदेच्या बैठकीला उपसभापती माणिकराव ठाकरे, परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार नारायण राणे, निलम गोऱ्हे, जयंत पाटील, हेमंत टकले, शरद रणपिसे, सतीश चव्हाण, संजय दत्त यांच्यासह वित्त विभागाचे प्रधान सचिव डी.के. जैन, संसदीय कार्य विभागाचे प्रधान सचिव पी. एच. माळी, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के. चव्हाण आदी उपस्थित होते.
या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले. पाच डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात मांडली जाणारी व प्रलंबित विधयेकांची यादी पुढीलप्रमाणे

विधानसभेत प्रलंबित विधेयके- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (चौथी सुधारणा) विधेयक 2015 व महाराष्ट्र स्थानिक सदस्य प्राधिकरण अनर्हता (सुधारणा) विधेयक 2016
विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके – 1) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक 2016, 2) महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक 2016. 3) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2016. 4) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2016. 5) महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक 2016. 6) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक 2016.
प्रस्तावित नवीन विधेयके – 1) डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठ विधेयक 2016. 2) महाराष्ट्र खनिज विकास निधी (निर्मिती व उपाययोजन) (निरसन) विधेयक 2016. 3) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2016, (मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यासंबंधात विवक्षित तरतुदींमध्ये सुधारणा करणे). 4) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (पाचवी सुधारणा) विधेयक, 2016.
संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, 2015.
प्रख्यापित अध्यादेश – 1) महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) विधेयक 2016. 2) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2016 (महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नागरिकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी नवीन प्रभाग करण्याबाबत तरतुदी). 3) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) अध्यादेश 2016. 4)महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) अध्यादेश 2016. 5) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016. 6) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016, 7) महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुढे चालू ठेवणे) अध्यादेश 2016. 8) महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड (सुधारणा) अध्यादेश 2016 9) महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड (दुसरी सुधारणा) अध्यादेश 2016, 10) महाराष्ट्र विद्यापीठ (निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे आणि विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे तदर्थ घटित करणे) अध्यादेश 2016 11) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, 2016 (मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यासंबंधात विवक्षित तरतुदींमध्ये सुधारणा करणे).
Source: Maha News

 
मुंबई : सणांनिमीत्त होणाऱ्‍या आतषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.
ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल तर रात्री 70 डेसीबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसीबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल तर रात्री 45 डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल ते रात्री 40 डेसीबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.
ध्वनीप्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ध्वनीप्रदुषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
ध्वनीप्रदुषण संदर्भातील घटनांची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष 100 या क्रमांकावर द्यावी. तसेच https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर तसेच मुंबई पोलीस ट्विटर अकाऊंटवर माहिती द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.
Source: Maha News

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उजनी जलाशयावर करोता, काळशिर खंड्याचे दर्शन

कळस- थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे . इंदापूर तालुक्यातील पळसदेव ते कुंभारगाव पट्ट्यातील उजनीच्या फुगवट्यावर रोहित , सिगल , थापट्या , शंभू बदक , ब्राह्मणी डक, स्पॉटबिल , स्पूनबिल , वारकरी , राखी बगळे व विविध प्रकारच्या पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे . त्यात रोहित पक्ष्यांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे येथील पक्षिनिरीक्षकांकडून सांगण्यात आले. यंदा प्रथमच करोता व काळशिर खंड्या हे पक्षीही या जलाशयावर आढळून आल्याचे सांगण्यात आले .

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी पक्षी यायला सुरवात करतात . सुरवातीला त्यांची संख्या कमी असते . परंतु , डिसेंबरमध्ये त्यांची संख्या वाढते . जानेवारीपर्यंत येथे विणीच्या हंगामासाठी येणारे पक्षी लाखोंच्या संख्येने आढळून येतात .
 पावसाळा सुरू होईपर्यंत येथे या पक्ष्यांचा मुक्काम असतो. दरम्यानच्या काळात विणीचा हंगाम उरकून नवजात पिल्लांच्या पंखात बळ आल्यानंतर येथून हे पक्षी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात . उजनीचा विस्तीर्ण जलाशय, मुबलक खाद्य यामुळे येथे दरवर्षी पक्षी आपली हजेरी लावत असतात . रोहित पक्ष्यांची नेत्रसुखद कवायत येथे पहावयास मिळते . सध्या पाणीसाठा भरपूर असल्याने पाण्याची उथळ ठिकाणे कमी प्रमाणात आढळून येत आहेत.

पाणी कमी झाल्यानंतर उथळ पाण्याचा बराचसा भाग पक्ष्यांसाठी उपलब्ध होईल . या उथळ भागातील मुबलक खाद्य मिळविण्यासाठी पक्ष्यांची सुरू असलेली धडपड कवायतीप्रमाणे दिसून येते . कुंभारगाव येथील पक्षिनिरीक्षक दत्ता नगरे , नितीन डोळे व अभिषेक लोंढे यांनी सांगितले की , यंदा प्रथमच करोता व काळशिर खंड्या हे पक्षी या जलाशयावर आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे बदकवर्गीय पक्ष्यांच्याही काही नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. करोता हा पक्षी पाणकोंबडा प्रजातीतील आहे . पाण्यातून बाहेर येऊन कोवळे ऊन घेताना हा पक्षी खूपच आकर्षक दिसतो . त्याचबरोबर काळशिर खंड्या हा पक्षीही सुंदर आहे . जलाशयालगतच्या दाट झाडीत त्याचे वास्तव्य आढळून आले. पर्यटकांच्या मागणीवरून जलाशयालगतच्या माळरानावर रात्रीची भटकंती केली जाते. यामध्ये माळावरील विविध प्रकारचे साप, पाल, विविध जातींची घुबड पाहावयास मिळते .

नोटाबंदीने पर्यटकसंख्या घटली

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीने आम्ही क्रांती फ्लेमिंगो पॉइंटची स्थापना केली आहे . या माध्यमातून पर्यटकांना राहण्याची व पक्षी निरीक्षणासाठी बोटीतून फिरविण्याची सोय केली आहे . प्रत्येक हंगामात या ठिकाणी चाळीस हजारांहून अधिक पर्यटक भेट देत असतात . सध्या डिसेंबरमधील बुकिंग करण्यात आले आहे . मात्र , नोटाबंदीमुळे सध्या पर्यटकांची हव्या त्या प्रमाणात हजेरी लागत नाहीये , असे पक्षिनिरीक्षकांकडून सांगण्यात आले.

वाळूउपशाचा धसका

मध्यंतरी उजनीतील वाळूउपशाची घोषणा झाल्यानंतर येथील पक्षिप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे . वाळूउपशामुळे अनेक पक्ष्यांची उथळ पाण्याची ठिकाणे नष्ट होण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे . या भागात वाळूउपसा झाल्यास पुढील काळात पक्षी विणीच्या हंगामासाठी येतील का , असा सवाल उपस्थित केला जात आहे , त्यामुळे येथील वाळूउपशास परवानगी देण्यात येऊ नये , अशी मागणी स्थानिकांतून होत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विधिमंडळाचे ५ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे . या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून , चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे .

विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली . या वेळी विधानसभेतील बैठकीस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील , शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे , संसदीय कार्यमंत्री विजय शिवतारे , विधानसभेतील आमदार अजित पवार , जयंत पाटील , गणपतराव देशमुख , राज पुरोहित , सुनील प्रभू यांच्यासह विधान परिषदेच्या बैठकीस उपसभापती माणिकराव ठाकरे , परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी उपस्थित होते . या बैठकीत विधिमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले . पाच डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके , शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे , अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सीआरपीएफ’च्या ताफ्यात रणरागिणी
१३५ महिला कमांडोंची पहिली तुकडी तैनात

झारखंडमधील नक्षलवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये आता पुरुषांसोबत महिला कमांडोही खांद्याला खांदा लावून लढताना दिसणार आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) प्रथमच तब्बल १३५ महिला कमांडोंची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

ही तुकडी १७ ऑक्टोबरला सीआरपीएफमध्ये समाविष्ट करण्यात आली. डेल्टा कंपनीच्या २३२ बटालियनमधील या महिला सध्या रांचीजवळील खुंटी येथे ‘सीआरपीएफ’च्या १३३ बटालियनच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत, असे झारखंड ‘सीआरपीएफ’चे महासंचालक संजय लाटकर यांनी सांगितले.

या कमांडो अतिशय धाडसी असून, सध्या त्या जंगलातील नक्षलींविरोधी कारवायांचा प्राथमिक अनुभव घेत आहेत. नक्षलींचा सामना करण्यासाठी त्यांना ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पमध्ये पुरुषांप्रमाणेच विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या पुरुषांच्या तोडीची कामगिरी करू शकतात. त्यांच्या सहभागाने ‘सीआरपीएफ’ची ताकद दुपटीने वाढली आहे, असे १३३ बटालियनचे प्रमुख नीरज पांडे म्हणाले.
‘सीआरपीएफ’चे उपमहासंचालक गिरी प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, महिला नक्षलींविरोधी कारवाई करताना या महिला कमांडोंची खूपच मदत होणार आहे. त्या पुरुष कमांडोंप्रमाणेच पूर्णत: सक्षम असून, दोघांची कामगिरी एकाच क्षमतेची आहे. या कमांडो कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.

या महिला कमांडोंना नक्षलविरोधी कारवायांचे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे देण्यात आली असून, कारवाईत उपयुक्त ठरणारे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लिंगनिदानासंबंधी माहिती काढून टाका; सुप्रीम कोर्टाचे गुगल, याहूला आदेश

लिंगनिदानसंबंधी माहिती आणि जाहिराती ३६ तासांत हटवण्यात याव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुगल, याहूसारख्या सर्च इंजिन साइटला दिले आहेत. अशा प्रकारच्या वेबसाइटवर देखरेखीसाठी एका नोडल एजन्सीची नियुक्ती करावी, असे आदेश केंद्र सरकारलाही दिले आहेत.

या वेबसाइटवर लिंगनिदानसंबंधी माहिती आणि जाहिरातींबाबत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने माहिती द्यावी, असेही न्या. दीपक मिश्रा आणि अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहूसारख्या सर्च इंजिन साइटने जबाबदारीने ३६ तासांच्या आत लिंगनिदानसंबंधीची माहिती हटवावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
सरकारला एक नोडल एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ही एजन्सी टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांमध्ये यासंबंधी जाहिराती देईल.

 लिंगनिदानसंबंधीची माहिती अथवा जाहिरात केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या एजन्सीमार्फत संबंधित सर्च इंजिन साइटला कळवण्यात येईल. यानंतर त्या-त्या सर्च इंजिनने ३६ तासांच्या आत ही माहिती हटवावी, तसेच संबंधित एजन्सीला याबाबत कळवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. लिंगोत्तर प्रमाणात घट होत आहे. यावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. यावेळी गुगल इंडियातर्फे वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

 न्यायालयाच्या आदेशानुसारच यासंबंधी काम होत आहे. गुगलकडून अशा प्रकारच्या जाहिराती आणि मजकूर ब्लॉक करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, असे सिंघवी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत - चीनचे लष्कर दहशतवादाविरोधात एकत्र

पुणे - दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एकत्र आल्याचा संदेश बुधवारी संपूर्ण जगाला मिळाला. दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी हे दोन बलाढ्य विकसनशील देश लष्कराच्या संयुक्त सरावासाठी एकत्र आल्याचा विश्वास दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला .

भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील "हॅंड इन हॅंड ' या सहाव्या संयुक्त सरावाला आजपासून पुण्यात सुरवात झाली . हा संयुक्त लष्करी
सराव सुरू झाल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल वांग हायजिआंग यांनी सांगितले . भारतीय लष्कराचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी या वेळी उपस्थित होते . निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोटबंदीचे नेपाळलाही चटके, पंतप्रधान दहल यांनी मोदींकडे मागितली मदत

नोटबंदीचे परिणाम फक्त देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर होतानाही दिसत आहेत. नेपाळमधील नागरिकांनाही ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे.

 त्यामुळे तेथील नागरिकही हवालदिल झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी नागरिकांकडील जुन्या नोटा बदलून देण्याची सोय करावी अशी विनंती केली आहे. प्रचंड यांनी मोदींशी या विषयावर सुमारे पाच मिनिट चर्चा केली. नेपाळी नागरिकांकडे भारतीय चलनाच्या ५०० व हजाराच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहेत. नेपाळचे हजारो लोक रोजगारासाठी भारतात येतात. अनेक लोक उपचारासाठी भारतात येतात तर काही दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात भारतीय चलन आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नेपाळमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नेपाळी लोकांच्या सोयीसाठी भारताने नेपाळमध्ये सोय करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनीही सकारात्मकता दाखवत हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असे आश्वस्त केले व याबाबत अर्थमंत्र्यांना सांगून नेपाळमध्येही याची सोय केली जाईल असे सांगितल्याचे पंतप्रधान प्रचंड यांच्या वैयक्तिक वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहे. भारताच्या ५०० व हजार रूपयांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नेपाळ राष्ट्रीय बँकेनेही या नोटांवर बंदी घातली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नामांतर विधेयक केंद्राकडून आश्चर्यकारकरीत्या मागे

‘बॉम्बे हायकोर्टा’चे नामांतर मुंबई उच्च न्यायालय करण्याचे विधेयक मागे घेण्याचा आश्चर्यकारक निर्णय सरकारने घेतला आहे. या यू टर्नचे अधिकृत कारण समजू शकले नाही; परंतु कोलकाता उच्च न्यायालय असे नामकरण करण्यास कलकत्ता उच्च न्यायालय आणि पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या विरोधामुळे हे विधेयक मागे घ्यावे लागल्याचे कारण सांगितले जात आहे.

‘बॉम्बे हायकोर्टा’चे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करण्याबरोबरच ‘मद्रास हायकोर्टा’चे नामांतर चेन्नई उच्च न्यायालय आणि कलकत्ता हायकोर्टाचे नामांतर कोलकाता उच्च न्यायालय करण्याचा प्रस्ताव असलेली उच्च न्यायालये (नामांतर) विधेयक जुलैमध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते. त्यानुसार ते लोकसभेत सादर करण्यातही आले होते. मात्र, पुढे ते स्थायी समितीकडेसुद्धा पाठविलेले नाही. आता तर ते थेट मागेच घेण्यात आले आहे. १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केल्यानंतर बहुतेक सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांनी आपली नावे बदलली आहेत. जे मोजके अपवाद राहिले आहे, त्यामध्ये ‘बॉम्बे हायकोर्ट’, ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (बीएसई) आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचसी) आदींचा समावेश आहे. त्यापैकी ‘बॉम्बे हायकोर्टा’चे नामकरणाचा पाठलाग राज्य सरकार २००५ पासून करीत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जिल्हाधिकाऱ्यांनी केला गव्हाचा पेरा

‘उत्तम शेती, मध्यम व्यापार , कनिष्ठ नोकरी ’ आज हा विचार प्रत्येकच युवक करीत असल्याने युवकांचा शेती करण्याकडे आेढा कमी हाेत चालला आहे . स्वतः जिल्ह्याच्या सर्वाेच्च पदावर आरूढ असतांना जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी नाेकरीसाेबत शेती ही संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला असून बुधवारी (ता.१६ ) त्यांनी गव्हाचा पेरा केला .

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी हाेण्यासाठी जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी मिशन दिलासा सुरू केला आहे . मिशन दिलासाच्या माध्यमातून गावाेगावी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध समस्यांची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीच्या खरिप हंगामापासून बंगल्यावर शेतीचा प्रयाेग सुरू केला . बसस्थानक राेडवरील मुख्य पाेस्ट आॅफीससमाेर जिल्हाधिकाऱ्यांचा सहा एकर जागेत बंगला आहे . याठिकाणी आधी बाभळीची झाडे वाढलेली हाेती . या अनावश्यक झाडांची कटाई करून त्याठिकाणी पाच एकर जागा शेतीसाठी तयार केली . त्यावर तुर , साेयाबीन , उडीद , ज्वारी , बाजरी यासारख्या पिकांसाेबत टोमॅटो , मिरची , वांगी , भेंडी, पालक, कोथिंबीर , गवार यासारखी विविध पालेभाज्या पिके घेण्यात येतात . सध्या रब्बीचा हंगाम सूरू झाला आहे . त्यामुळे खरिपाप्रमाणे रब्बी गव्हाचा पेरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सचिन तेंडुलकरची दत्तक घेतलेल्या गावाला भेट

 माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेल्या आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाला बुधवारी भेट दिली. स्वच्छ आणि आरोग्यदायी भारत बनविल्यामुळे मुले निरोगी होतील आणि अनेक खेळ खेळू शकतील, असा संदेश यावेळी त्याने गावक-यांना दिला.

'सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत' सचिनने 110 कुटुंबाचं पुत्तमराजूकन्ड्रिगा हे गाव दोनवर्षांपूर्वी दत्तक घेतलं आहे. तसेच, ‘खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजने’तून या गावाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये निर्धारित केले आहेत. त्याने या गावाला दुस-यांदा भेट दिली असून यावेळी गावच्या विकासाबाबत चर्चा केली आणि गावातील शाऴेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार

सणांनिमित्त होणा-या आतषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत.

  ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.

  ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगीक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल तर रात्री 70 डेसीबल एवढी ध्वनीमर्यादा असावी.

  व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसीबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल तर रात्री 45 डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल ते रात्री 40 डेसीबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्मार्ट सिटी मंजुरीसाठी " एक खिडकी योजना'

महाराष्ट्रात होणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पामधील गुंतवणुकीचे आम्ही स्वागतच करू . स्मार्ट सिटीसाठीच्या प्रकल्पांना सामायिक अर्जावर आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मंजुरी देतानाच स्पर्धाक्षम आणि गुणवत्ता या निकषांच्या आधारावर पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे प्रकल्पांची निवड केली जाईल , असे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी स्पेन, बार्सिलोना येथे सुरू असलेल्या " स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस ' मध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितले .

भारतातील विविध राज्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केले आहे . बार्सिलोना येथील जागतिक परिषेदेतील " मेक इन इंडिया ' दालनाचे उद्घाटन क्षत्रिय यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले . स्मार्ट सिटी एक्स्पो जागतिक परिषदेमध्ये राज्याच्या शिष्टमंडळाने बेल्जिअमच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत चर्चा केली . भारतात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेल्या प्रकल्पांबाबत मुख्य सचिवांनी बेल्जिअमच्या शिष्टमंडळाला माहिती दिली . पुणे आणि नागपूर महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत बेल्जिअमच्या सहकार्याविषयी चर्चा केली .

स्मार्ट सिटी प्रकल्पांत महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतानाच बेल्जिअम शिष्टमंडळाचे प्रमुख टॅंग जि लेस्ट्रे यांनी सुरक्षा , अपारंपरिक ऊर्जा आणि माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात बेल्जिअम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक असल्याचे या वेळी सांगितले .

गुंतवणूकदारांच्या परिसंवादात क्षत्रिय म्हणाले की , देशात औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने "इज ऑफ डुईंग बिझनेस ' वर भर दिला आहे . स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत भारतात शाश्वत , सुरक्षित स्मार्ट शहरे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे . महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना सामाईक अर्जाच्या माध्यमातून एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी दिली जाईल . महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार , नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर , माहिती व तंत्रज्ञान संचालक शंकरनारायणन , नागपूरचे पोलिस उपायुक्त इशू संधू यांचा समावेश आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विदेशी तंत्रज्ञानाने शुद्ध देशी गाईची निर्मिती

शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्याकरिता विदेशात नव्याने वापरले जाणारे भ्रूण प्रत्यारोपणाचे (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) हे तंत्र आता वापरले जाणार आहे. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती भविष्यात होऊन चांगल्या प्रतीचे दूध ग्राहकांना मिळू शकेल.

रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योगसमूह व उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या जे.के. ट्रस्टने देशी गाईमध्ये विदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशाळेतून थेट गोठय़ापर्यंत ते पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. भ्रूण प्रत्यारोपण किंवा प्रयोगशाळेतील गर्भधारणा (आयव्हीएफ) याचा वापर अमेरिका, इस्रायल व ब्राझिलसारख्या देशांत केले जाते. प्रयोगशाळा, कुशल मनुष्यबळ यावर कोटय़वधी रुपये खर्च येतो. तंत्रज्ञान महागडे असले तरी शुद्ध गीर, थारपारकर, कांकरेज आदी गाईंची निर्मिती या महागडय़ा पद्धतीनेच होऊ शकेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदाच्या वर्षी ‘पोस्ट ट्रथ’ सर्वात लोकप्रिय शब्द

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीतील अनपेक्षित विजय व ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी दिलेला कौल यासारख्या घटनांमुळे पोस्ट ट्रथ हा या वर्षांतील आंतरराष्ट्रीय शब्द ठरल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरीजने म्हटले आहे. या शब्दाचा वापर दोनशे पटींनी वाढला आहे. वस्तुनिष्ठ परिस्थिती जनमतावर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याच्या परिस्थितीत हा शब्द वापरला गेला असून, लोकांनी भावना व व्यक्तिगत श्रद्धा यांच्या आधारे त्यांचे जनमत ठरवले आहे. गेल्या वर्षभरापासून लोकप्रिय ठरलेल्या या शब्दाचा वापर २००० टक्के वाढला असल्याचे शब्दकोश संशोधनातून दिसून आले आहे. गेली वीस वर्षे हा शब्द अस्तित्वात असून, युरोपीय समुदायात राहायचे की बाहेर पडायचे, याबाबत ब्रिटनची जनमत चाचणी, अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक या दोन घटनांत या शब्दाचा वापर जास्त वाढला होता.

 ब्रेक्झिट मतदानानंतर जूनमध्ये या शब्दाच्या वापरात वाढ झाली व नंतर ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून या शब्दाचा वापर आणखी वाढला. या शब्दाचा वापर कमी होण्याची चिन्हे नाहीत. आताच्या काळातील हा सर्वात महत्त्वाचा शब्द ठरणार आहे, असे ऑक्सफर्ड डिक्शनरीजचे अध्यक्ष कॅस्पर ग्रॅथवोल यांनी सांगितले. अतिशय भारलेल्या राजकीय व सामाजिक वातावरणाचा प्रत्यय आम्ही निवडलेल्या शब्दातून येतो.

समाजमाध्यमावरही आता बातम्या दिल्या जातात, त्यामुळे प्रस्थापितांनी सादर केलेल्या वस्तुस्थितीबाबत वाढता अविश्वास दाखवण्यासाठी पोस्ट ट्रथचा वापर केला गेला. अडल्टिंग, अल्टराइट, ब्रेक्झिटियर, ग्लास क्लीफ, वोक या शब्दांशी स्पर्धा करीत पोस्ट ट्रथने बाजी मारली असून, गेल्या वर्षी आनंदाश्रू असलेल्या चेहऱ्याचा उल्लेख करणारा इमोजी हा शब्द निवडला गेला होता, पण तो वादग्रस्त ठरला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लागोपाठ आठव्या वर्षी चीनचा महासंगणक जगात पहिल्या क्रमांकावर

चीनने लागोपाठ आठव्या वर्षी वेगवान महासंगणकाचा मान पटकावला आहे, त्यांचा सनवे तियानहू लाइट हा महासंगणक जगात पहिला आला. त्याचा गणनाचा वेग सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी इतका आहे. तियानहू लाइट हा संगणक मोठा असून त्याचे प्रोसेसर म्हणजे संस्कारक हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत.

अर्धवार्षिक टॉप ५०० यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात महासंगणकांमध्ये चीनने बाजी मारली आहे. तियानहू लाइट या महासंगणकाचे प्रदर्शन जूनमध्येच झाले होते व त्याने मागचा विजेता तियानहे २ ला मागे टाकले होते. तो संगणकही चीनचाच होता पण त्यात इंटेलच्या चीप आहेत. तियानहू लाइट हा संगणक सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी करू शकतो. तियानहे २ पेक्षा तो तीनपट वेगवान आहे.

तियानहे २ हा संगणक लागोपाठ तीन वर्षे पहिल्या क्रमांकावर आला होता. लागोपाठ आठ वर्षे चिनी महासंगणक पहिल्या क्रमांकावर आहे. उच्चशक्ती संगणन प्रक्रियेत चीन आघाडीवर आहे त्याचेच हे द्योतक आहे. गेल्या यादीत चीनने महासंगणकांच्या संख्येतही अमेरिकेला मागे टाकले होते. २३ वर्षांपूर्वी महासंगणकांची यादी सुरू झाली, त्यानंतर गेल्या वर्षी प्रथमच चीनने अमेरिकेला मागे टाकले होते.

चीनमध्ये १७१ महासंगणक असून गेल्यायादीनुसार ते १६८ होते. कामगिरीतही चीन व अमेरिका तोडीस तोड असून चीनची क्षमता ३३.९ टक्के तर अमेरिकेची ३३.३ टक्के आहे. अमेरिकेचे टायटन व सिक्वोइया हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले. अमेरिकेतील कोरी हा महासंगणक बर्कले प्रयोगशाळेत असून तो पाचव्या स्थानावर गेला आहे, त्याची क्षमता सेकंदाला १४ पेंटाफ्लॉप कृतींची आहे.

भारतामधील नद्यांच्या आंतर-जोडणीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता

27 फेब्रुवारी 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाने "नद्यांच्या आंतर-जोडणीसाठी विशेष समिती" चे गठन करण्यासाठी आणि या संबंधी सादर केलेल्या स्थिती-व-प्रगती अहवालाला त्यांची मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे भारत सरकारच्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना 1980 अंतर्गत चालविण्यात येणार्‍या या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यास मदत होईल.


मंत्रिमंडळाने DMIC प्रकल्पाअंतर्गत ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर घटकाच्या विकासाला मान्यता दिली

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली-मुंबई औद्योगिक वसाहत (DMIC) प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र मधील शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा-II विकासाचा भाग म्हणून ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर घटकाच्या विकासाला मंजुरी दिली आहे.
याअंतर्गत, शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र (SBIA) च्या ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर च्या बांधकामासाठी 6,414.21 कोटी रुपये इतका अंदाजे खर्च मंजूर झाला आहे. तसेच, DMIC ट्रस्ट चे इक्विटी म्हणून 2,397.20 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे.
DMIC हे सुमारे USD90 अब्ज अंदाजे गुंतवणूक असलेले जगातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे आणि त्यांनी आता वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर च्या सोबतच सात राज्यांमध्ये पसरलेले 1,500 किमी लांबीचे उच्च-तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्र तयार करण्याची योजना केली आहे.

मंत्रिमंडळाने 2016-17 हंगामाच्या रब्बी पिकांसाठी सुधारीत MSP मंजूर केले आहे

आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2016-17 हंगामाच्या सर्व रब्बी लागवडीसाठी किमान आधारभूत किंमती (Minimum Support Prices -MSPs) मध्ये वाढ करण्यासाठी त्यांची मंजुरी दिली आहे.
यानुसार, गहू - प्रति क्विंटल रु 1625 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), बार्ली - प्रति क्विंटल रु 1325 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), ग्राम - प्रति क्विंटल रु 4000 (500 रुपयांची निरपेक्ष वाढ), मसूर - प्रति क्विंटल रु 3950 (550 रुपयांची निरपेक्ष वाढ), मोहरी - प्रति क्विंटल रु 3700 (350 रुपयांची निरपेक्ष वाढ) आणि करडई - प्रति क्विंटल रु 3700 (400 रुपयांची निरपेक्ष वाढ).
रब्बी पीक हे भारतातील वसंत ऋतूत कापणी होणारे हिवाळी पीक आहे. याची दरवर्षी ऑक्टोबर च्या शेवटी लागवड केली जाते आणि मार्च-एप्रिल मध्ये कापणी होते. भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू, बार्ली, मोहरी, तीळ, मटार हे आहेत.


गंगा नदी वर पूल बांधण्यासाठी भारत आणि ADB मध्ये $500 दशलक्ष कर्जासाठी करार

आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank -ADB) आणि भारत सरकार यांच्यामध्ये गंगा नदी वर 9.8 किलोमीटर लांबीचा पूल तयार करण्यासाठी $ 500 दशलक्ष चे कर्ज घेण्यासाठी करार झाला आहे. हे भारतातील सर्वांत लांबीचे नदीवरील पूल असेल.
यामधून उत्तर आणि दक्षिण बिहार जोडले जातील, तसेच राज्याची राजधानी पटना हे आसपासच्या भागांशी जोडली जाणार आहे.
ADB च्या कर्जासह, पूलाचे कार्य आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी $ 900,000 चे तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे. सोबत, बिहार राज्य सरकारकडून $ 215 दशलक्ष अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2020 च्या अखेरीस पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.


आंतरराष्ट्रीय सौर युती च्या करारावर 20 देशांनी स्वाक्षर्‍या केल्या

भारत, ब्राझील आणि फ्रान्स या देशांच्या समावेशासह, एकूण वीस राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) च्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या करारावर स्वाक्षर्‍या करण्यासाठी मोरोक्को मध्ये मराकेश येथे झालेल्या हवामान बदलावरच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या फ्रेमवर्क परिषदेच्या (UN Framework Convention on Climate Change -UNFCCC) CoP22 मध्ये हे करार उघड करण्यात आले होते.
किमान 15 देशांकडून मंजूर केल्यानंतर हा करार कार्यान्वित होईल.
ISA हे नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे पार पाडलेल्या CoP21 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस होलंड यांच्या कडून संयुक्तपणे सादर करण्यात आले होते.

गोल्फर चौरसिया ने भारताबाहेर प्रथम एशियन टूर टाइटल जिंकले

भारतीय गोल्फर एस.एस.पी. चौरसिया ने 13 नोव्हेंबर 2016 रोजी मनिला (राजधानी), फिलीपिन्स येथे खेळण्यात आलेली रिसॉर्ट्स वर्ल्ड मनिला मास्टर्स स्पर्धा जिंकली आहे. हे चौरसियाचे भारताबाहेरचे प्रथम एशियन टूर टाइटल आहे.
ही फिलीपिन्स मधील सर्वात श्रीमंत गोल्फ स्पर्धा आहे आणि भारताबाहेर 38 वर्षीय खेळाडूसाठी हा पहिला विजय आहे. त्याने या स्पर्धेची $1 दशलक्ष रक्कम जिंकली आहे.

ऑस्ट्रेलिया वर्ष 2018 पासून प्री-स्कूल मध्ये हिंदी भाषा शिकवणार

इंग्रजी भाषेशिवाय दुसऱ्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी, ऑस्ट्रेलिया ने वर्ष 2018 पासून हिंदी भाषेसह परदेशी भाषा शिकण्यासाठी प्री-स्कूल विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाइन कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्याची घोषणा केली आहे.
आरंभिक शिक्षण भाषा ऑस्ट्रेलिया (Early Learning Languages Australia -ELLA) द्विभाषिक अनुप्रयोग नवीन भाषा जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना मदत करणार.
तसेच वर्ष 2017 पासून इटालियन आणि स्पॅनिश शिकण्याची संधी दिली जाणार आणि वर्ष 2018 पासून हिंदी व आधुनिक ग्रीक जाणून घेण्यासाठी कार्यक्रम राबवविले जाणार.

@mpscmantra
तिरुवानंतपुरम ही देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी”

तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना स्तनाचा कर्करोग आढळून आल्याने, या उच्चांकासह तिरुवानंतपुरम हे देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी” जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय किरणोत्सर्गी आणि इमेजिंग महामंडळ (Indian Radiological and Imaging Association -IRIA) परिषदेत सादर केलेल्या आकड्यामधून तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना, तर राष्ट्रीय सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 20आणि केरळ राज्यामधील सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 14 इतकी आढळून आली आहे.

प्रश्न-25 अक्टूबर, 2016 को विश्व बैंक तथा अंतरराष्ट्रीय वित्त निगम द्वारा जारी रिपोर्ट डूइंग बिजनेस इंडेक्स, 2017 के अनुसार भारत को कौन-सा स्थान प्राप्त हुआ है?

(a) 131वां
(b) 125वां
(c) 115वां
(d) 130वां

उत्तर-(d)

संबंधित तथ्य
25 अक्टूबर, 2016 को वाशिंगटन स्थित विश्व बैंक तथा अंतरराष्ट्रीय वित्त निगम द्वारा 14 वीं रिपोर्ट ‘डूइंग बिजनेस, 2017’ (Doing Bussiness, 2017) जारी किया गया।

इस वर्ष की रिपोर्ट का केंद्रीय विषय (Theme) ‘सभी के लिए समान अवसर’ (Equal Opportunity for all) है।
वर्ष 2017 हेतु जारी रिपोर्ट में 190 देशों की अर्थव्यवस्थाओं को सम्मिलित किया गया है।

रिपोर्ट में प्रस्तुत ‘डूइंग बिजनेस इंडेक्स’ (Doing Bussiness Index) में न्यूजीलैंड (स्कोर-87.01) को शीर्ष स्थान प्राप्त हुआ है।

इसके पश्चात सिंगापुर (स्कोर-85.05) को दूसरा, डेनमार्क (स्कोर-84.87) को तीसरा, हांगकांग (स्कोर-84.21) को चौथा तथा कोरिया गणराज्य (स्कोर-84.07) को पांचवां स्थान प्राप्त हुआ है।

डूइंग बिजनेस इंडेक्स, 2017 में सबसे निम्न व्यापार नियामक माहौल वाले देशों की सूची में क्रमशः सोमालिया (190 वां स्थान), इरिट्रिया (189 वां स्थान), लीबिया (188 वां स्थान), वेनेजुएला (187 वां स्थान) तथा दक्षिण सूडान (186 वां स्थान) शामिल हैं।

डूइंग बिजनेस इंडेक्स, 2017 में भारत को 130 वां स्थान (स्कोर-55.27) प्राप्त हुआ है, गतवर्ष में भी यह 130वें स्थान पर था।

भारत के पड़ोसी देशों में भूटान को 73 वां, चीन को 78 वां, नेपाल को 107 वां, श्रीलंका को 110 वां, पाकिस्तान को 144 वां तथा बांग्लादेश को 176 वां स्थान प्राप्त हुआ है।

इस सूचकांक में ब्रिक्स देशों में रूस 40वें, दक्षिण अफ्रीका 74वें चीन 78 वें तथा ब्राजील 123वें स्थान पर रहा।

विश्व बैंक की इस रिपोर्ट के अनुसार उच्च रैंकिंग का मतलब है कि उस विशिष्ट देश की सरकार ने कारोबार करने के लिए अनुकूल विनियामक माहौल उपलब्ध कराया है जबकि निम्न रैंकिंग व्यापार के प्रतिकूल माहौल को दर्शाती है।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹क्रीडा क्षेत्राला ' सीएसआर' मुळे येणार सुगीचे दिवस

राज्य शासनाचे धोरण जाहीर

समाजातील विविध क्षेत्रांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक मदतीतून व उपक्रमांद्वारे बळ देण्याच्या उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात " सीएसआर ' चा लाभ आता क्रीडा क्षेत्रालाही करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . हे धोरण शासनाने नुकतेच एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे . उद्योजकांचा पैसा क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीकडे वळल्यास भविष्यात राज्यातून चांगले क्रीडापटू निर्माण होण्याची शक्यता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे .

केंद्र सरकारच्या कंपनी अधिनियम , 2013 च्या कलम 135 नुसार 500 कोटींपेक्षा निव्वळ मुल्य ( नेट वर्थ) असणाऱ्या , रुपये 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या किंवा 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या 2 टक्के रक्कम सामाजिक कार्याकरिता वापरणे बंधनकारक आहे . या अधिनियमाच्या अनुसची 7 मध्ये निश्चित केलेले प्रकल्प उद्योगांना राबविता येतात . केंद्राने 27 फेब्रुवारी 2014 रोजी अधिसूचना काढून त्यात ग्रामीण खेळ , राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त खेळ, पॅरा ऑलिंपिक खेळ आणि ऑलिंपिक खेळांच्या संवर्धनासाठी प्रशिक्षण यांचा या सूचीत समावेश केला . तसेच 8 जून 2006 च्या पत्रान्वये क्रीडा सुविधा, त्यांची देखभाल दुरुस्ती तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीचे प्रकल्प यांचाही समावेश सूचीत करण्यात आला .

महाराष्ट्र शासनाने आता केंद्राच्या निर्णयाला अनुसरुन आपल्या क्रीडा धोरणात सीएसआरचा समावेश केला आहे . त्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे . क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन , पायाभूत क्रीडा सुविधांची निर्मिती , गाव पातळीवर खेळाच्या सुविधा निर्माण करणे , मुलांमध्ये लहान वयातच खेळाची आवड निर्माण करणे , मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रकारांकडे वळविणे आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे यासाठी शासनाने क्रीडा धोरण आखले आहे .

आता सीएसआर अंतर्गत क्रीडा क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उद्योजकांचा सहभाग घेण्याकरीता प्रकल्पांचा समन्वय आणि नियंत्रण या करीता धोरणाची आखणी करण्यात आली आहे . शासनाने जाहीर केलेल्या या धोरणानुसार खालील प्रकल्प कंपन्यांना हाती घेता येणार आहेत.. .

- क्रीडा सुविधा व क्रीडा प्रबोधिनीतील पायाभूत सुविधा बळकट करणे
- क्रीडा संकुलाकरीता अद्ययावत साहित्य उपलब्ध करुन देणे
- क्रीडा प्रशिक्षण केंद्र , निपुणता क्रीडा केंद्र , क्रीडा वैद्यकीय केंद्र, फिटनेस सेंटर आदींची उभारणी करणे
- क्रीडा संकुलांची देखभाल व दुरुस्ती
- राज्य अथवा जिल्हा क्रीडा विकास निधीस सहाय्य
- विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन
- उदयोन्मुख व प्रतिभावंत खेळाडूूंना त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी अर्थसहाय्य
- असे खेळाडू किंवा संघ दत्तक घेणे
- खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण व अद्ययावत साधनसामग्री उपलब्ध करुन देणे तसेच त्यांच्या आहाराच्या विशिष्ट गरजा पुरविण्यासाठी सहाय्य करणे
- खेळाशी निगडीत वैद्यकीय सुविधा व विमा संरक्षण उपलब्ध करुन देणे
- खेळाडूंना देशांतर्गत तसेच परदेशात प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे
- प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्या क्षमतांमध्ये वाढीसाठी उपक्रम
- पारितोषिक विजेत्या खेळाडूंना शिष्यवृत्ती

हे धोरण राबविण्यासाठी शासनाने राज्य व जिल्हा स्तरीय नियंत्रण समित्यांची स्थापना केली आहे . शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचीव हे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील. तर जिल्हास्तरीय समितीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. या समित्या आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन तसेच इच्छुक उद्योगसमुहांबरोबर चर्चा करुन प्रस्तावाला अंतीम स्वरुप देणार आहेत. तसेच प्रकल्पांसाठीचे सर्वेक्षण , आढावा आणि फलनिष्पत्ती याकडेही या समित्यांचे लक्ष असणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹३० वर्षांनंतर १ रुपयाची नोट

देशातील नोटा टंचाईमुळे प्रेस नोटांची छपाई वाढली आहे. विशेष म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर १ रुपयाच्या नोटेची छपाई करण्यात आली आहे. सध्या व्यवहारात छोट्या नोटांची तीव्र टंचाई आहे. ती लक्षात घेऊन प्रेसमध्ये पाचशेपेक्षा छोट्या नोटांवर भर दिला जात आहे. वीस, पन्नास आणि शंभराच्या नोटा छपाई जास्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने ५००सह दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटा जास्त प्रमाणात छापण्याचे आदेश नाशिकरोड प्रेसला दिले आहेत. तसेच ऐन कामात यंत्र नादुरूस्त होण्याचे प्रसंग ओढवू नये म्हणून पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. १६ नोव्हेंबरला शंभराच्या १ कोटी ९० लाख नोटा छापण्यात आल्या. शंभराच्या आणखी सव्वा कोटी आणि २०च्या दीड कोटी नोटा छापण्याचे नियोजन आहे. एक रुपयाची नोट तर तब्बल तीस वर्षांनी या प्रेसमध्ये छापण्यात आली. एक रुपयांच्या दहा लाख नोटा दोन दिवसांपूर्वी रवाना करण्यात आल्या आहेत. आठवडाभरात नाशिकरोड प्रेसमधून सुमारे पाच कोटी नोटा पाठविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ध्वनिप्रदूषण केल्यास पाच वर्षे कारावास

मुंबई - सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून , यासंदर्भात कठोर कारवाईचा आदेश सरकारने पोलिस नियंत्रणास दिले आहेत.

ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल , तर रात्री 70 डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल , तर रात्री 55 डेसिबल एवढी , रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल , तर रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल ते रात्री 40 डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा आहे .

ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास , श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे . अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे . ध्वनिप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे . नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी , असा आदेश सरकारने दिला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खापरखेडा प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती

महानिर्मितीच्या १३४0 मेगावॅट क्षमतेच्या वीज केंद्रातून बुधवारी १६ नोव्हेंबरला स्थापित क्षमतेएवढे म्हणजेच १००.१ टक्के भारांकासह १३४१ मेगावॅट वीज उत्पादन झाले. खापरखेडा वीज केंद्र उभारल्यापासून पहिल्यांदाच हे विक्रमी वीज उत्पादन झाले आहेत, हे विशेष.

प्रकल्प स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज उत्पादनाचा विक्रमी आकडा पारखापरखेडा वीजकेंद्र उभारल्यापासून १३४0 मेगावॅटच्या वीज उत्पादनाचा आकडा यापूर्वी गाठण्यात आला नव्हता, मात्र या वर्षी १० सप्टेंबरला, २० ऑक्टोबरला आणि २५ ऑक्टोबरला १३०० मेगावॅटच्या वर वीज उत्पादनाचा पल्ला गाठला. खापरखेडा वीज केंद्रात २१0 मेगावॅट क्षमतेचे चार संच व ५00 मेगावॅट क्षमतेचा एक संच आहे.

संच क्रमांक १ व २ हे २७ वर्षे जुने असून संच क्रमांक ३ व ४ हे १७ वर्षे जुने आहेत. महत्तम वीज उत्पादन गाठण्याकरिता देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर करणे, यंत्रसामग्री बदलविणे, संच बंद असताना तांत्रिक स्वरूपाची कामे करून घेणे, चांगला कोळसा व कोळसा व्यवस्थापन करणे. मुख्य कार्यालयाकडून वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, मनुष्यबळाला प्रोत्साहन देणे इत्यादींचे बारकाईने नियोजन केल्यानेच हे शक्य झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महागॅम्सचे उद्घाटन आज

महानिर्मिती राख व्यवस्थापन सेवा मर्यादित (महागॅम्स) या कंपनीच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता विद्युत भवन, काटोल रोड येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

राज्य शासनाच्या राख वापर धोरणामुळे महागॅम्सच्या राख व्यवस्थापन उपक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. राखेवर आधारित उद्योग व काही संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये संशोधन संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालये, प्रयोगशाळा, औद्योगिक संस्थांचा समावेश राहील. तसेच राखेचे महत्त्व, उपयोग, राखेपासून तयार करता येणाऱ्या विविध वस्तूंचे व राखेवर झालेले संशोधनात्मक कार्य इत्यादीबाबत जनजागरणपर माहिती देणारे स्टॉल्स कार्यक्रम स्थळी लावण्यात येणार आहेत. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके असतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आशियाची शान असलेला सिंह 'मौलाना'चा मृत्यू

आशियाची शान आणि अभयारण्यातील सुप्रसिद्ध सिंह 'मौलाना'चा अखेर बुधवारी मृत्यू झाला. 'मौलाना' नावाने प्रसिद्ध असलेल्या या सिंहाने गुजरात राज्याच्या पर्यटनाच्या एका जाहिरातीमध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनसोबत काम केले होते.

गेल्या १० वर्षांपासून मौलानावर उपचार करण्यात येत होते. परंतु बुधवारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मौलाना हा अभयारण्यातील सर्वात वयस्कर (१६ वर्ष) सिंह होता, अशी माहिती वन विभागाचे प्रमुख ए. पी. सिंह यांनी दिली.

 या सिंहाला पाहिल्यानंतर तो मौलानासारखा दिसत असल्याने त्याला मौलाना हे ना देण्यात आले. संपूर्ण देशभर तो मौलाना म्हणूनच प्रसिद्ध होता. गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या एका जाहिरातीत अमिताभ बच्चनसोबत मौलानाने काम केले होते. अभयारण्यात चित्रित करण्यात आलेल्या या जाहिरातीत आशियाचे ८ सिंह होते त्यात मौलाना याचाही समावेश होता.

२०१० साली जाहिरात शूट करण्यासाठी आलेला अमिताभ बच्चन मौलानाला पाहताच त्याच्या प्रेमात पडला होता. अमिताभने आपल्या ब्लॉगमध्ये यासंबंधी लिहिले होते. 'सिंह!! केवळ एक नाही तर अनेक सिंह अभयारण्यात आहेत. ते येतात..३, ४...५... एकूण ७ सिंह या ठिकाणी आहेत. या सिंहामधील त्यांचा म्होरक्या एक नर सिंह आहे, असे अमिताभने आपल्या ब्लॉगमध्ये म्हंटले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नागपूर मेट्रोसाठी कर्जाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली - महत्त्वाकांक्षी नागपूर मेट्रो प्रकल्पाला फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी ( एएफडी ) बॅंकेकडून 130 दशलक्ष युरो , म्हणजेच 975 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . याबाबतच्या सामंजस्य करारावर आज नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिग्लर, एएफडी बॅंक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित , नगरविकास विभाग मंत्रालयाचे संचालक जनार्दनप्रसाद आदी उपस्थित होते .

नागपूर मेट्रोला निधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत असून , मेट्रोच्या प्रत्यक्ष परिचलनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार असल्याचे झिग्लर यांनी सांगितले . नागपूर मेट्रोचे बहुतांश परिचलन सौरऊर्जेवर चालणार असल्यानेही आम्ही नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले , असेही ते म्हणाले . दीक्षित म्हणाले , की या करारामुळे नागपूर मेट्रोच्या कामाला गती येणार असून , हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे . नागपूर मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून अल्पावधीत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे . एकूण गरजेपैकी दोनतृतीयांश वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणारा भारतातील हा पहिला मेट्रो प्रकल्प असणार असल्याचे दीक्षित म्हणाले .

नागपूर मेट्रोसाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बॅंकेने याआधीच 3 हजार 750 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे . त्याबाबत यंदा एप्रिलमध्ये करार झाला होता . त्यापाठोपाठ आता फ्रान्सच्या बॅंकेकडूनही या प्रकल्पासाठी कर्ज मिळणार आहे .

कर्जाच्या रकमेतून सेवासुविधा
आज झालेल्या करारानुसार नागपूर रेल्वे महामंडळाला एफडीए बॅंकेकडून 20 वर्षांच्या मुदतीचे 975 कोटींचे कर्ज मिळणार आहे . यातून नागपूर मेट्रोची सिग्नलिंग यंत्रणा , यंत्राद्वारे प्रवासी तिकिटांची कुपन्स देण्याची व्यवस्था , स्थानकांवरील लिप्ट व अन्य कामे या साऱ्यांसाठी आर्थिक पूर्तता केली जाईल . नियमानुसार हा करार दोन देशांतच होऊ शकतो. त्यामुळे केंद्राच्या आर्थिक सेवा व्यवहार विभागाशी फ्रान्सच्या बॅंकेला पहिला करार करावा लागणार आहे . त्यानंतर ही एफडीए बॅंक व नागपूर मेट्रो महामंडळ यांच्यात प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी आणखी एक करार केला जाईल .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्राईलच्या "आयडीसी ' विद्यापीठाशी " एसआयएलसी ' चा शैक्षणिक करार

नवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि "स्टार्टअप ' कंपन्यांना चालना देण्यासाठी " सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर ' ने ( एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला .

नवी दिल्लीत ताज पॅलेसमध्ये आयडीसी विद्यापीठाच्या " झेल प्रोग्रॅम ' अंतर्गत हा करार झाला . इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन यांच्या उपस्थितीत "सकाळ माध्यम समूहा ' चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि " आयडीसी ' चे अध्यक्ष राइशमन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा . वेद प्रकाश , आयडीसी विद्यापीठाचे एरिक झिमरमन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .

कुशल मनुष्यबळ आणि संशोधन आणि विकास या क्षेत्रांत सर्वांत जास्त खर्च करणारा देश म्हणून इस्राईलची ओळख आहे . या देशात सर्वाधिक " स्टार्टअप ' कंपन्या कार्यरत आहेत . या करारामुळे " स्टार्टअप ' च्या माध्यमातून नवे उद्योजक घडविण्याचे मोठे दालन खुले झाले आहे . आयडीसी विद्यापीठाने आतापर्यंत अनेक नामवंत उद्योजक घडविले आहेत . या विद्यापीठाचा " झेल प्रोग्रॅम ' हा खास उद्योजकांसाठी आहे . याअंतर्गत केलेल्या करारामुळे नव्याने उद्योजकतेकडे वळणाऱ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे . या कराराच्या माध्यमातून एसआयएलसी आणि आयडीसी विद्यापीठ यांच्या समन्वयातून आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जातील . तसेच , उद्योजकांसाठी आणि " स्टार्टअप ' ला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या वर्षात एसआयएलसीमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तोफा खरेदीची मरगळ दूर; आता येणार हॉवित्झर्स

बोफोर्स घोटाळ्यानंतर तोफांच्या खरेदीबाबत झालेली उदासीनता लवकरच दूर होणार असून पुन्हा एकदा बोफोर्स कंपनीच्या मालकीची बीएई सिस्टीम भारताला या तोफा पुरवणार आहे. २०१७च्या मध्यापासून लष्कराला १५५ मिमी तोफा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षेच्या संदर्भातील कॅबिनेट कमिटीने ‘एम-७७७ अल्ट्रा लाइट हॉवित्झर्स’ या प्रकारातील १४५ तोफांच्या खरेदीला मंजुरी दिली. अमेरिकेकडून या तोफा घेण्यात येणार असून अमेरिकेबरोबर ७३.७ कोटी डॉलरचा (सुमारे ५००० कोटी) करार करण्यात येणार आहे. या करारामध्ये तीस टक्के ‘ऑफसेट क्लॉज’ असून येत्या दोन ते तीन आठवड्यांत हा करार करण्यात येणार आहे.

या करारासंदर्भातील पेंटागॉनचे ‘लेटर ऑफ ऑफर अँड अॅक्सेप्टन्स’ची (एलओए) मुदत वीस नोव्हेंबरपर्यंत आहे. पण, दहा ते पंधरा दिवसांनी त्यात वाढ होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एलओए’संदर्भात दोन्ही देशांमध्ये २००९-१०पासून सल्लामसलत सुरू आहे. ‘एलओए’ची मुदत पुन्हा एकदा ७ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. याची मुदत वाढून मिळविण्यासाठी दोन्ही बाजूंनी वादविवाद झाले.

विशेष म्हणजे, एम-७७७ तोफा या ‘बीएई सिस्टीम’ने बनवल्या आहेत. मूळची स्वीडनची बोफोर्स कंपनी हिने याची मालकी घेतली आहे. १४५ तोफांपैकी १२० तोफांची बांधणी, चाचणी भारतात होणार आहे. यासाठी महिंद्रा कंपनी ‘बीएई’ची भागीदार असणार आहे. पहिल्या दोन तोफा करारानंतर सहा महिन्यांत मिळणार असून बाकीच्या दोन महिन्याला एक अशा मिळणार आहेत.

अमेरिका-भारत वाढते संबंध

■ गेल्या दहा वर्षांत अमेरिकेची भारताबरोबर १५ अब्ज डॉलरची संरक्षण क्षेत्रातील विविध कंत्राटे
■ भारताशी करार करून अमेरिकेने रशिया आणि इस्रायलला याबाबतीत मागे टाकले.
■ मात्र, भारताचा रशियाशी ऑक्टोबर महिन्यात करार. ५ ‘एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टीम’, चार फ्रिगिट, २०० कमाव्ह २२६टी हलकी लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार. याची एकत्रित किंमत १०.५ अब्ज डॉलर.

तोफांचे विशेष

■ १५५ मिमी / ३९ व्यासाच्या तोफेची २५ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता
■ उंचावरील ठिकाणी विमानातून सहज नेता येते.
■ १७ माउंटन स्ट्राइक कोअर तोफांनी सज्ज होणार
एम ७७७ तोफा
■ या प्रकारच्या तोफांची लष्कराकडून गेल्या दहा वर्षांपासून मागणी
■ पेंटागॉनने पहिल्यांदा १४५ तोफा ६४.७ कोटी डॉलरना विकण्याची २०१०मध्ये तयारी दाखवली. त्याची किंमत आता ७३.७ कोटी डॉलर इतकी झाली आहे.
■ २५ तोफांची आयात. उरलेल्या १२० तोफा भारतात बनवणार
■ पहिल्या दोन तोफा सहा महिन्यांत येणार. दहा महिन्यांनी दर दोन महिन्याला एक तोफ मिळणार.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑक्सफर्डच्या शब्दकोशात पटेलांचा डंका

पटेल हे आडनाव ब्रिटनमधील सर्वाधिक परिचित भारतीय आडनाव असल्याचे ऑक्सफर्डच्या शुक्रवारी प्रकाशित शब्दकोशात नमूद करण्यात आले आहे. ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ फॅमिली नेम्स इन ब्रिटन अॅण्ड आर्यर्लंड’मध्ये सुमारे ५०,००० आडनावांची व्युत्पत्ती देण्यात आली असून अशा पद्धतीचा हा पहिलाच अभ्यास आहे.

‘पटेल आडनाव सर्वांधिक ओळखीचे असून हिंदूंमधील प्रतिष्ठेचे मानले जाते. ब्रिटनमध्ये, २०११च्या जनगणनेनुसार एक लाख पटेल आहेत,’ असा उल्लेख कोशात करण्यात आला आहे. ‘चक्रवर्ती’ या आडनावाची माहिती देताना, ‘ज्याच्या साम्राज्याचे चाक विनाअडथळा प्रगतीचे राहिले तो चक्रवर्ती’ असा या संस्कृत शब्दाचा अर्थ असल्याचे म्हटले आहे.

का पडली आडनावे?

आडनावांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासकार आणि भाषातज्ज्ञांनी चार वर्षे अभ्यास केला. कुटुंबांची माहिती घेण्यासाठी अकराव्या शतकापर्यंतचे संदर्भ धुंडाळण्यात आले. त्यासाठी ब्रिटन आणि आर्यर्लंडमधील नोंदीचा आधार घेण्यात आल्याचे ‘ऑक्सफर्ड’मधील सूत्रांनी म्हटले आहे. चिरपरिचित २०,००० आडनावांपैकी अर्धी आडनावे स्थळांवरून तर, एक पंचमांश टोपणनावांवरून पडलेली असल्याचे अभ्यासात उघड झाले आहे. आठ टक्के व्यवसायांवरून पडल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

''योग्य पुरावे आणि तंत्राच्या मदतीने आम्ही हा अभ्यास केला आहे. कर भरणा पावत्या, चर्चमधील नोंदी, जनगणना आदी विश्वसनीय नोंदींवरून हे संशोधन असल्याचे ते सविस्तर व अचूक झाले आहे.'' - प्रा. रिचर्ड कोट्स, भाषातज्ज्ञ, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न इंग्लंड

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कागदी चलन जाणार, ई-चलन येणार, स्वीडनचे ऐतिहासिक पाऊल

स्वीडनच्या केंद्रीय बँकेकडून ई-चलन आणण्याचा विचार सुरू आहे. स्वीडनच्या रिक्सबँकने हा निर्णय घेतल्यास असे पाऊल उचलणारा स्वीडन हा जगातील पहिला देश ठरणार आहे. रिक्सबँकेच्या डेप्युटी गव्हर्नर सीसिलिया स्काइंग्जली यांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली आहे. लोकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याने ई-चलन आणण्याचा विचार करत असल्याचे सीसिलिया स्काइंग्जली यांनी म्हटले आहे.

३०० वर्षांपूर्वी युरोपात पहिल्यांदा नोटा वापरण्याची सुरुवात स्वीडनमधूनच झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वीडनमधील नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला. स्वीडनमधील अनेक दुकानदार रोख रक्कम घेत नाहीत. रोख रकमेचा वापर अत्यंत कमी झाल्याने स्वीडनमधील एटीएमची संख्यादेखील कमी झाली आहे.

ई-चलन किंवा डिजीटल चलन डेबिट क्रेडिट कार्ड सारखेच काम करते. ई-चलनाची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते. ऑनलाइन दुकानांमध्ये ई-चलनाचा वापर वाढू लागला आहे. ‘स्वीडन याबाबतीत अतिशय पुढे आहे. आम्हाला याबद्दल इतर कोणत्याही देशाची नक्कल करण्याची आवश्यकता वाटत नाही. जगात कोणत्याही देशाने स्वीडनने ज्या प्रमाणात चलनाचा वापर कमी आहे, त्या प्रमाणात चलनाचा वापर कमी केलेला नाही,’ असे रिक्सबँकेच्या डेप्युटी गव्हर्नर सीसिलिया स्काइंग्जली यांनी म्हटले आहे.

‘विविध कारणांमुळे पारंपारिक बँकांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या किंवा बँकेपर्यंत पोहोचणे शक्य नसलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे,’ असे सीसिलिया पत्रकारांसोबत बोलताना म्हणाल्या. ई-चलन काही वर्षांमध्ये वादग्रस्त राहिले आहे. मात्र वादग्रस्त असूनही ई-चलन इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय आहे. मात्र ई-चलनामुळे पैशांचे अपहार आणि काळ्या पैसा वाढेल, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जाते आहे. ई-चलन हे कागदी नोटांच्या तुलनेत जास्त असुरक्षित असेल, असे तज्ञाांना वाटते आहे.

सध्या भारतात नोटबंदीची सर्वत्र चर्चा आहे. पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेबरला जाहीर केला आहे. यानंतर देशभरात सुट्ट्या प्रश्नांचा प्रश्न निर्माण झाला. नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा घालता येऊ शकतो, असे स्पष्टीकरण या निर्णयानंतर सरकारकडून देण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रोजगारनिर्मिती सात वर्षांच्या नीचांकावर - राष्ट्रपती

देशातील रोजगार निर्मिती सात वर्षांच्या नीचांकावर गेली असून, हे चित्र असेच राहिल्यास देशासाठी घातक ठरू शकते, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी दिला.

राष्ट्रपती भवनात आयोजित शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना मुखर्जी म्हणाले की, रोजगार निर्मितीचे आकडे सात वर्षांत नीचांकी पातळी दर्शवित आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांत वाढत असलेल्या असंतोषाकडे लक्ष वेधताना मुखर्जी यांनी अभ्यासासाठी शिक्षण संस्थांत शांतता आणि सौहार्दाचे वातावरण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले, तसेच शैक्षणिक नेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन सरकारला केले. मुखर्जी म्हणाले की, देशातील शिक्षण संस्था गुणवत्तेच्या चुंबक बनायला हव्या. ब्रेन ड्रेनची जागा ब्रेन रेनने घ्यायला हवी. भारतात भरपूर गुणवत्ता आहे. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. काम करू शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तथापि, जास्तीत जास्त लोकांना काम करण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी रोजगाराची जास्तीत जास्त निर्मिती होणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती घटली, तर ही बाब घातक ठरेल. आपल्या शिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या व्हायला हव्यात. असे झाले, तर आपण ब्रेन नेटवर्क विकसित करू शकू. त्यातून ब्रेन ड्रेन संपून ब्रेन रेन निर्माण होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा