Post views: counter

Current Affairs October 2016 Part - 5



  • शहरातील स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून आढावा 


स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील शहरी भागात दोन वर्षांत 22 लाख 97 हजार 389 वैयक्तिक घरगुती प्रसाधन गृहे बांधण्यात आली आहेत.  पाच वर्ष मुदतीचे हे अभियान 2019 पर्यंत चालणार असून त्याअंतर्गत एकूण 66 लाख 42 हजार 221 प्रसाधन गृहे बांधण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहेत. दोन वर्षांत 35 टक्के लक्ष पूर्ण झाले आहे.
गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये शहरी भागांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधत निर्धारित लक्ष पूर्ण केले आहे. या दोन्ही राज्यांमधील शहरी क्षेत्रात उघड्यावरील शौचमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रात एकूण 6 लाख 29 हजार 819 प्रसाधन गृहे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी 2 लाख 7 हजार 888 प्रसाधन गृहे बांधण्यात आली आहेत.

लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कार 2016 :

क्रिडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो.
 
वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू - नेवॉक जोकोविच (सर्बिया) खेळ-टेनिस, तिसर्‍यांदा हा पुरस्कार पटकावला यापूर्वी 2015, 2012 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
 
वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार टेनिस
खेळाडू सेरेना विल्यम्स (अमेरिका) हिला तिसर्‍यांदा हा पुरस्कार मिळाला. यापूर्वी 2010, 2003 मध्ये मिळाला होता.
 
जीवनगौरव पुरस्कार - निस्की लौंडा (ऑस्ट्रेलियाचे माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन)
 
वर्ल्ड बेस्ट टीम - ऑफ स्लक्स (न्यूझीलंड रुग्बीसंघ)
 
ब्रेकथ्रु ऑफ द इयर - जॉर्डन स्मिथ (अमेरिका) गोल्फपटू
 
कमबॅक ऑफ द इयर - डेन कार्टर (न्यूझीलंड रुग्बीपटू)
 
अॅक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर - जॅन फ्रोडेनी (जर्मनी, अॅथलिट)
--------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विजेच्या मागणीचा ट्रेंड सकाळकडून संध्याकाळकडे

मुंबई : राज्यात ऑक्टोबरमधील विजेची सर्वाधिक मागणी सकाळी होत होती . यंदा मात्र हा ट्रेंड बदलून संध्याकाळी मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे .
सायंकाळी विजेची मागणी वाढण्यामागे शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याचे वाढलेले तास कारणीभूत आहेत. शेतीपंपाला 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे .

गेल्या वर्षी 23 ऑक्टोबरला 18 , 250 मेगावॉट विजेची मागणी होती . त्या वेळी महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीज पुरवली होती . यंदा विजेची मागणी 20 ऑक्टोबरला सकाळच्या वेळेत 16 , 500 मेगावॉट इतकी होती ; तर महावितरणने 17, 300 मेगावॉट इतकी वीज दिली होती . सायंकाळच्या वेळेत विजेच्या मागणीतील वाढ सरासरी 800 मेगावॉट इतकी नोंदवण्यात आली . महावितरणला शेतीपंपासाठी पुरवण्यात येणाऱ्या जादा विजेसाठी अर्थ विभागाकडून आर्थिक तरतूद होणे अपेक्षित आहे . सामाजिक बांधिलकी म्हणून शेतीला जादा तास वीज पुरवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे . राज्यात सध्या 39 लाख वीजपंप आहेत; त्यांना आठ तासांऐवजी 10 तास वीज पुरवण्यात येत आहे . शेतीसाठी एक हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवावी लागणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' शकुंतले 'ला अखेर 'प्रभू ' पावले . ..

यवतमाळ ते अचलपूर दरम्यान गेली तब्बल 116 वर्षे धावून धावून थकलेली शकुंतला नॅरोगेज रेल्वे 1500 कोटी रुपये खर्चून ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच मंजूर केला आहे . यामुळे या भागातील प्रवाशांची वर्षानुवर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे . गेली 11 वर्षे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱ्या खासदार भावना गवळी यांनी ' सकाळ ' शी बोलताना या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना, रेल्वे प्रशासनाने मनावर घेऊन येत्या दोन वर्षांत हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करावा , अशी मागणी केली आहे . या निर्णयामुळे खासगी कंपनीच्या ताब्यात असलेली देशातील बहुधा ही एकमेव रेल्वे असून ती आता रेल्वेच्या छत्राखाली येणार आहे .

शकुंतला एक्स्प्रेसची मालकी असलेल्या ' सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी ' ला ( एसपीआरसी ) मात्र केंद्राच्या निर्णयाचा अद्याप पत्ताच नसल्याचे सांगितले जाते. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार , प्रभू यांनी मागच्याच आठवड्यात हा निर्णय घेतल्याने संबंधित कंपनीपर्यंत अद्याप तो पोचलेला नसावा . ट्विटरवर सक्रिय असलेल्या प्रभू यांचे रेल्वे खाते अद्याप टपालानेच संपर्क करते काय , असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे . ' किलिक निक्सन ' या ब्रिटिश कंपनीने 1910 मध्ये मुख्यतः विदर्भातील कापूस वाहतूक करण्यासाठी ही नॅरोगेज शकुंतला एक्स्प्रेस सुरू केली . यवतमाळ -वाशीम - कारंजा- मूर्तिजापूर - अचलपूर हा 188 किलोमीटरचा टप्पा ही गाडी पार करते . यापूर्वी पंढरपूरला जाणाऱ्या ' देवाच्या गाडी' प्रमाणेच ' शकुंतला' ही नॅरोगेज असल्याने धावत्या गाडीतूनही प्रवासी चढू व उतरू शकतात . या रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करून तो ब्रॉडगेज बनविण्याची मागणी दीर्घकाळापासून रेल्वेच्या फायलींच्या ढिगाऱ्यात पडून होती . भावना गवळी यांनी 2005 मध्ये सर्वप्रथम या प्रश्नाला हात घातला तेव्हा हा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठीचा प्रस्तावित खर्च 500 कोटी रुपये इतका होता . रेल्वेच्या फायलींवरची धूळ झटकली जाता जाता मध्यंतरीच्या काळात तो तिपटीने वाढला आहे . या कंपनीचा करार याच वर्षी संपतो आहे . मात्र , करारातील तरतुदीनुसार रेल्वेतील बाबूशाहीने प्रभूंची धडाडी कायम ठेवली नाही तर पुढची किमान दहा वर्षे रेल्वेला ' शकुंतला ' च्या विस्तारीकरणाचा हक्क राहणार नाही . या कंपनीकडून ' शकुंतला' च्या मार्गाचा ताबा घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला त्यांना पहिल्या टप्प्यात ' शकुंतला ' च्या उत्पन्नातील 55 टक्के हिस्सा द्यावा लागेल . ही रक्कम अंदाजे 12 कोटी रुपये इतकी होते .

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा मार्ग ब्रॉडगेज झाला तर दिल्ली , चेन्नई व बंगळूरदरम्यानचे अंतर किमान 80 किलोमीटरने कमी होणार आहे . शिवाय मालवाहतुकीसाठीही हा प्रस्तावित ब्रॉडगेज मार्ग रेल्वेला विलक्षण फायदेशीर ठरणार आहे . प्रभू यांनी स्वतः ' शकुंतला' ची फाइल क्लिअर केल्याने रेल्वे मंडळाला घाई करावीच लागणार आहे , असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे . मात्र , तरीही रेल्वेच्या हाती संबंधित कंपनीशी करारमदार करण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक आहेत, ही वस्तुस्थिती आहे .

ब्रिटिशांची देणगी

' किलिक निक्सन ' या ब्रिटिश कंपनीने 1910 मध्ये मुख्यतः विदर्भातील कापूस वाहतूक करण्यासाठी ही नॅरोगेज ' शकुंतला एक्स्प्रेस' सुरू केली . यवतमाळ - वाशीम - कारंजा- मूर्तिजापूर-अचलपूर हा 188 किलोमीटरचा टप्पा ही गाडी पार करते . यापूर्वी पंढरपूरला जाणाऱ्या ' देवाच्या गाडी' प्रमाणेच ' शकुंतला' ही नॅरोगेज असल्याने धावत्या गाडीतूनही प्रवासी चढू व उतरू शकतात .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कुपोषणग्रस्तांसाठीचा निधी आटला

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढते असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारनेच सुरू केलेल्या ग्राम बालविकास केंद्रे (व्हीसीडीसी) अद्याप निधीच्या प्रतीक्षेत असून, या केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी कपात करून रोखण्यात आला आहे. ही केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी २१३ कोटींचा निधी सरकारने अद्याप वितरित केला नसल्याचेही उघड झाले आहे.

राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी विकास विभागानेही यातील २१ कोटी रुपये ८५ दुर्गम भागामध्ये वितरित करणे अपेक्षित होते. मात्र, तेही झाले नसून निधीअभावी कुपोषणाच्या समस्या कशी सोडवणार, हा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेडसावतो आहे.

निधीवाटप तीन महिन्यांच्या अंतराने

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढते असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारनेच सुरू केलेल्या ग्राम बालविकास केंद्रे (व्हीसीडीसी) अद्याप निधीच्या प्रतीक्षेत असतानाच, पालघरमध्ये आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत ही सुविधा पूर्ववत करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी सांगितले. तसेच तीन महिन्यांच्या अंतराने या निधीचे वाटप करण्यात येणार असून, राज्यात इतरत्र ग्राम बालविकास केंद्रांची परिस्थिती कशी आहे याची माहिती घ्यावी लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

पालघरमध्ये कुपोषणाच्या प्रश्नांवर रान उठवणाऱ्या श्रमजीवी संघटनेने मात्र ही केंद्रे पूर्ववत झाल्याला दुजोरा दिला नाही. केवळ प्रत्येक मुलामागे वीस रुपयांचा निधी संमत करून प्रश्न सुटणार नाही, अंगणवाडी सेविकांचा निधी, आहाराचा दर्जा, ग्राम बालविकास केंद्रांमधील सुविधांचा एकत्रित विचार करता निधीअभावी राज्यातील कुपोषित मुलांचा प्रश्न जैसे थेच असल्याचा आक्षेप या संघटनेने घेतला आहे.

पोषक आहाराअभावी कुपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या सोडवण्यासाठी ऑगस्ट २०१५मध्ये ग्राम बालविकास केंद्रांची सुरुवात करण्यात आली. केंद्राच्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना’कडून पहिल्या टप्प्यात यासाठी निधी संमत करण्यात आला होता. मात्र, पुढे त्यात कपात करून तो पूर्णपणे थांबवण्यात आला. केंद्र सरकार निधी देत नसेल तर राज्याने महिला व बालविकास, आरोग्य विभागाच्या अंतर्गत या निधीची तरतूद करावी, या मागणीचा रेटा लावून धरला. सरकारने एकूण निधीतील २४ कोटी आदिवासी विकास विभागाने ८५ दुर्गम भागासाठी ग्राम बालविकास केंद्रांना निधी देणे अपेक्षित होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जवानांना ई-पोस्टल मतदान करता येणार

लष्कराच्या जवानांसाठी पोस्टल मतदान प्रक्रियेऐवजी आता ई-पोस्टल मतदान सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत कायदा मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना काढली आहे.

पोस्टल मतदान प्रक्रियेत वेळ लागत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळं ई-पोस्टल मतदान सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं जवानांना मतदानाचा अधिकार बजावणं अधिक सोयीचं होणार आहे. पोस्टल मतदानात जवान कर्तव्यावर असताना, विशेषत: सीमेवर अथवा दूर्गम भागात असताना त्यांना मतदानास मुकावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-पोस्टल बॅलेटचा पर्याय अंमलात आणला आहे. या पर्यायामुळे जवानांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणे शक्य होणार असून या मतपत्रिका ठरलेल्या कालावधीत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहचणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.पी.पी.पाटील

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उमविच्या स्कूल आॅफ फिजीकल सायन्सेसचे माजी संचालक प्रा.पी.पी.पाटील यांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी दुपारी राजभनातून करण्यात आली. उद्या, बुधवार, २६ आॅक्टोबर रोजी प्रा.पाटील हे कुलगुरुपदाचा पदभार प्रभारी कुलगुरु तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता स्वीकारणार आहेत.

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या सहीचे पत्र मुुंबई येथील राजभवनातून इ-मेलद्वारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागास प्राप्त झाले. हे पत्र सायंकाळी प्रा.पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. प्रा.पाटील यांच्या रुपाने विद्यापीठाच्या एखाद्या प्रशाळेतील (कॅम्पस) व्यक्तीला प्रथमच कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. ते उमविचे सहावे कुलगुरू आहे.

Mahesh Waghmare:
#ManBooker2016 अमेरिकन लेखक पॉल बेयटी यांनी जिंकला बुकर पुरस्कार
 बुकर पुरस्कार मिळवणारे पॉल बेयटी पहिले अमेरिकन लेखक ठरले

‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ हे नव्या परिवर्तनाचे सकारात्मक संकेत
नवी दिल्ली, 25-10-2016

माध्यम आणि करमणूक क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडत असल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.  नवी दिल्लीत आज पाचव्या सीआयआय बिग पिक्चर संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात ते आज बोलत होते.
केंद्र सरकारची ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ या मोहिमा नव्या परिवर्तनाचे सकारात्मक संकेत आहेत, असे सांगत वस्तू सेवा कराच्या समावेशानंतर माध्यम आणि करमणूक क्षेत्रात मोठे बदल घडून येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिकांच्या कमतरतेची सरकारला जाणीव आहे. या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा यातील अंतर मिटवण्यासाठी उद्योगांनी शिफारशी कराव्यात, अशी सूचनाही नायडू यांनी यावेळी केली.

सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या मतदारांसाठी ई-टपाल मतदान यंत्रणा
नवी दिल्ली, 25-10-2016

केंद्र सरकारने 21 ऑक्टोबर 2016 रोजी अधिसूचना जारी करून निवडणूक नियमावली 1961 च्या नियम 23 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सशस्त्र बलातील कर्मचाऱ्यांसह सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या मतदारांना ई-टपालाच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या यंत्रणेअंतर्गत त्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने एक रिक्त मतदान पत्रिका पाठवली जाईल. अशा प्रकारे टपाल सेवेमार्फत मतदान पत्रिका पाठवणे आणि ती परत मागवण्याच्या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होईल. दूरगामी तसेच सीमा भागात कार्यरत सशस्त्र बलाच्या कर्मचाऱ्यांना याचा प्रामुख्याने लाभ मिळू शकेल. या अधिसूचनेमुळे सशस्त्र बलातील कर्मचाऱ्यांची टपालाद्वारे मतदान करण्यासंदर्भातील ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

केन्द्र ने किसानों के हित में महाराष्ट्र में सोयाबीन खरीद के लिए मूल्य समर्थन योजना के अंतर्गत खरीफ 2016-17 के सोयाबीन की खरीद करने की अनुमति दी

केन्द्र सरकार को महाराष्ट्र की तरफ से सोयाबीन खरीद के लिए न्यूनतम समर्थन मूल्य का प्रस्ताव मिला है। केन्द्र सरकार ने किसानों के हित में महाराष्ट्र में सोयाबीन खरीद के लिए मूल्य समर्थन योजना के अंतर्गत खरीफ 2016-17 के सोयाबीन की खरीद करने की अनुमति दे दी है। महाराष्ट्र सरकार का प्रस्ताव आज दिनांक 25-10-2016 को स्वीकृत किया गया है। नेफेड और SFAC को निर्देश दिया गया है कि वे सोयाबीन की तत्काल खरीद शुरू कर दें।

हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

          ग्रॅण्डमास्टर आणि राष्ट्रकुल चॅम्पियन अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. फिडे ओपन स्पर्धेत सलग दोन विजेतेपद पटकावणारा तो पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. अभिजितने 9 पैकी 7 गुणांची कमाई केली आणि दुसर्‍या स्थानावर असलेल्या गॅ्रण्डमास्टर संदीपन चंदाच्या तुलनेत आघाडी घेतली. भारतीय ग्रॅण्डमास्टर एम. आर. ललित बाबूने तिसरे तर ग्रॅण्डमास्टर एम. श्यामसुंदरने चौथे स्थान पटकावल

🔹 पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार प्रदान :

अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला.

  साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.

  पॉल बेट्टी यांच्या प्रसिद्ध 'द सेलआऊट' या कादंबरीला हा पुस्कार मिळाला.

  चार तास चाललेल्या बैठकीनंतर परिक्षकांनी एकमताने ‘मॅन बुकर’ पुरस्कारासाठी लेखक पॉल बेट्टी यांच्या 'द सेलआऊट' या कादंबरीची निवड केली.

  तसेच या पुरस्कारासाठी 50 हजार पौंड बक्षिस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती परिक्षक अमांडा फोरेमन यांनी दिली.

  अमेरिकेतील कृष्णवर्णीय-आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसवताना श्वेतवर्णीयांना खालची वागणूक देण्याचा आटोकाट प्रयत्न होणे, असे अचाट कथानक 'द सेलआऊट' या कादंबरीत पाहावयास मिळते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नाशिकच्या रुंग्टा ग्रुपला राज्यस्तरीय पुरस्कार :

नाशिक येथील बांधकाम व्यवसायातील अग्रणी असलेल्या रुंग्टा ग्रुपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे.

  तसेच या समूहाने परवडणारी घरे तयार केल्याबद्दल हा बहुमान देण्यात आला.

  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ललित रुंग्टा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  राज्य शासनाच्या वतीने विविध गटात आयोजित स्पर्धेत अफॉर्डेबल होम विथ बेस्ट ॲमेनिटीज ऑफ द इयर या गटात अनेकांना मागे टाकत रुंग्टा ग्रुपने बाजी मारली.

  मुंबईत एका शानदार सोहळ्यात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदि उपस्थित होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबई थंडावली, ६ वर्षातले निचांकी तापमान!

लांबलेल्या मान्सूनमुळे यंदाच्या दिवाळीतले अभ्यंगस्नान घामाच्या धारांमध्ये करावे लागते की काय ही भीती अगदी कालपर्यंत होती आणि आज पहाटे मुंबईच्या तापमापकाचा पारा तब्बल ४.३ अंशांनी घसरला आहे. आज पहाटे सांताक्रूझ वेधशाळेने १८.८ अंश तर इतक्या किमान तापमानाची नोंद केली. मागील ६ वर्षातले हे मुंबईचे ऑक्टोबर महिन्यातले सर्वाधिक निचांकी तापमान आहे. या गुलाबी थंडीच्या आगमनामुळे ऑक्टोबर हिट मात्र यावर्षीपुरतीतरी हवामानाच्या कॅलेंडरमधून पुसली गेली आहे. किमान तपमानातली ही घसरण मुंबईसह राज्यभरात आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लांबला. त्यामुळे त्यापुढचा ऋतुबदलाचा काळ घामेजून टाकणार अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात मान्सूनच्या परतीनंतरच्या पंधरवड्यात केवळ एक दिवस पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला होता. १४ ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली होती. पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे होत असलेल्या ऋतुबदलात होणाऱ्या तापमानवाढीला (हा बदल साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात होत असल्याने) ऑक्टोबर हिट म्हणतात. पण यंदा हा उकाडा जाणवण्यापूर्वीच थंडीचे आगमन झाले आहे. परिणामी आज घसरलेल्या मुंबईच्या पाऱ्याने ऑक्टोबरच्या मागच्या ६ वर्षांच्या निचांकी तापमानाचा विक्रम मोडला आहे.

याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले, 'गेल्या ८-१० दिवसांपासूनच कमाल आणि किमान तापमान हळहळू कमी होत होते. आज राज्यात सर्वत्रच तपमान कमी आहे. नाशिकमध्ये तर १४ अंशांची नोंद आहे. यावर्षी ऋतुबदलावर पावसाचा प्रभाव होता, त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवली नाही. पण कदाचित नोव्हेंबरमध्ये पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण साधारणपणे १५ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत मुंबईत सातत्याने तपमान कमी राहते, तो खऱ्या अर्थाने थंडीचा काळ असतो.'

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्लिपकार्टचे सीएफओ संजय बावेजांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख ई - कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र कायम आहे . आता कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी ( सीएफओ) संजय बावेजा यांनी आपला राजीनामा सादर केला आहे .

 फ्लिपकार्टतर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे . टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेल्या बावेजा यांनी दोन वर्षांपुर्वी फ्लिपकार्टमध्ये प्रवेश केला होता . जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील 10 महिन्यांमध्येच राजीनामा सादर केला आहे .

बावेजा यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण व त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही . फ्लिपकार्टचे हेड ऑफ कॅटेगरी मॅनेजमेंट कल्याण कृष्णमुर्ती हे सीएफओची भूमिका तात्पुरती पार पाडू शकतात . याआधीही त्यांनी ही कामगिरी बजावली आहे .

गेल्या काही काळात फ्लिपकार्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे . मिंत्राचे संस्थापक व फ्लिपकार्टच्या कॉमर्स व अॅडव्हर्टायझिंग विभागाचे प्रमुख मुकेश बन्सल आणि कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अंकित नागोरी यांनी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला निरोप दिला होता . याशिवाय , कंपनीचा आर्थिक पातळीवरील संघर्ष सुरु आहे . दिवाळी सवलत योजनांनंतर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे . कंपनीने काही दिवसांपुर्वी कॉस्ट- कटिंगअंतर्गत 1 , 000 कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे . फ्लिपकार्ट आता नव्या फेरीत निधी उभारण्याची तयारी करीत आहे . या फेरीत अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्टचा सक्रीय सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर बंदीचे आदेश

नैनिताल : व्हाईटनरचा प्रमाणापेक्षा अधिक वास घेतल्याने एका किशोरवयीन मुलाच्या मृत्युमुळे उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर संपूर्णपणे बंदी आणण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नैनितालपासून दहा किलोमीटर अंतरावरील भोवाली येथे मंगळवारी 14 वर्षाच्या एका मुलाने व्हाईटनरचा वास घेतला होता . मात्र प्रमाणाबाहेर अधिक वास घेतल्याने त्याचा मृत्यु झाला होता . या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने स्वत : हून याचिका दाखल केली . या प्रकरणी न्यायमूर्ती राजीव शर्मा यांनी राज्य सरकारला व्हाईटनरवर संपूर्णपणे बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत . याशिवाय उच्च न्यायालयाने आयोडेक्स आणि फेविक्विक हे 18 वर्षांखालील मुलांना न विकण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही अल्पवयीन मुलाला हुक्का क्लबमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये , असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
व्हाईटनर, आयोडेक्स, फेविक्विकचे व्यसन
किशोरवयीन मुले व्हाईटनर , आयोडेक्स आणि फेविक्विकसह अन्य काही पदार्थांचा वास घेऊन नशा करतात. तसेच हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे . सहज उपलब्धता , स्वस्त किंमत आणि नशेचा पुरेसा आनंद मिळत असल्याचे वाटत असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये अशा प्रकारचे व्यसन वाढत असून या गंभीर समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" अफगाण युद्धामधील मोनालिसा ' स अटक .. .

नवी दिल्ली - नॅशनल जिओग्राफिक वाहिनीच्या छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळालेल्या शरबत बीबीस पाकिस्तानमधील पेशावर येथे भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आलीसासल्याचे वृत्त पाकमधील डॉन या वृत्तपत्राने दिले आहे .

नॅशनल जिओग्राफिकचे छायाचित्रकार स्टीव्ह मॅककरी यांनी 1984 मध्ये पेशावरजवळील निर्वासितांच्या एका छावणीमध्ये बीबीचे छायाचित्र काढले होते . त्यावेळी 12 वर्षांची असलेली बीबी या छायाचित्रामुळे "अफगाण गर्ल ' म्हणून प्रसिद्ध झाली झाली होती . मॅककरी यांच्या या छायाचित्रास नॅशनल जिओग्राफिकच्या ख्यातनाम मासिकाचे मुखपृष्ठ म्हणूनही स्थान मिळाले होते .

याशिवाय , नॅशनल जिओग्राफिककडून तिच्या आयुष्यावर आधारित एक छोटी डॉक्युमेंटरीही तयार करण्यात आली होती . बीबीला "अफगाण युद्धाची मोनालिसा ' असे नामाभिधानही देण्यात आले होते . बीबीला राष्ट्रीय ओळखपत्रामध्ये फेरफार केल्याच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली असल्याचे डॉनने म्हटले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹धनोत्रयोदशीला पहिला ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’

दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय अखेर केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला असून पहिला आयुर्वेद दिन २८ ऑक्टोबरला मधुमेहाचे जनजागरण करून साजरा होणार आहे.
गत १५ ते २० वर्षांंपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. इतर शाखांचा ‘डॉक्टर डे’ मान्यताप्राप्त आहे, पण भारतीय उपचार पध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. काहींनी २७ फे ब्रुवारी हा दिवस सुचविला. १९२० साली याच दिवशी नागपूरच्या कांॅग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.
आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ.मनोज नेसरी (आयुर्वेद) यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. केंद्र शासनाने दरवर्षी ‘धनोत्रयोदशी’ला आयुर्वेद दिन साजरा करण्याचे निश्चित केले असून यंदा प्रमुख कार्यक्रम २८ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदाचा पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा ‘मधुमेह नियंत्रणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर साजरा केला जाणार आहे. सर्व राज्यातील आयुष संचालनालय, आरोग्य विभाग, आयुर्वेद महाविद्यालये, आयुर्वेद फोर्मसी कंपन्या, तसेच शुभचिंतक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील.

प्रदर्शनी, व्याख्यान, कार्यशाळांचे आयोजन करून हा दिनी मधुमेहावरील उपचारांची माहिती देतील. जिल्हा रुग्णालयांनाही याविषयी राज्याने अवगत करण्याची सूचना या परिपत्रकातून करण्यात आली आहे.

‘भारतीय संस्कृतीलाच नमन’

महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.श्याम भुतडा म्हणाले की, आयुर्वेदप्रेमींसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. भारतीय चिकित्साप्रणाली असणाऱ्या आयुर्वेदाची स्वतंत्र ओळख असल्याने या प्रणालीचा दिनविशेष असावा, अशी अनेक वर्षांंपासून मागणी होती. आयुष मंत्रालयाने योगदिनापाठोपाठ आयुर्वेद दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन भारतीय संस्कृतीलाच नमन केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लैंगिक समानतेच्याबाबतीत १४४ देशांमध्ये भारत ८७ वा; पाकिस्तान तळाला

आगामी काळात भारत जागतिक महासत्ता होणार किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन बनणार, याची चर्चा रंगली असतानाच सामाजिक निकषांच्याबाबतीत भारताला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे दाखविणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. लैंगिक समानतेबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आकडेवारीनुसार १४४ देशांच्या यादीत भारत चक्क ८७ व्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरूषांच्या शिक्षण आणि वेतनातील फरक बऱ्याच अंशी मिटविण्यात भारताला यश आल्यामुळे यंदा या क्रमवारीत भारताचे स्थान २१ क्रमाकांनी वधारले आहे. जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) केलेल्या या सर्वेक्षणात भारताचा शेजारी पाकिस्तान मात्र शेवटहून दुसऱ्या स्थानावर असून येमेन अखेरच्या स्थानावर आहे.

केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, अहवालातील आकडेवारीमुळे या योजनांना बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे सिद्ध झाले आहे. कालच प्रसिद्ध झालेल्या जागतिक जेंडर गॅप रिपोर्टमध्ये भारताने प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या नोंदणीतील मुले आणि मुलींच्या संख्येतील तफावत जवळपास मिटवली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रमवारीत बांगलादेशासह दक्षिण आशियातील अनेक देशांनी भारताला मागे टाकले आहे. या क्रमवारीत आईसलँड पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ फिनलँड, नॉर्वे, स्वीडन या देशांचा क्रमांक आहे. जागतिक महासत्ता असणारी अमेरिका या यादीत चक्क ४५ व्या स्थानी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹SHE Team मुळे हैदराबादमध्ये महिलांबाबतच्या गुन्ह्यांत २० टक्के घट

‘शी टीम’च्या करड्या नजरेमुळे हैदराबादमधील महिलांबाबतच्या गुन्ह्यात जवळजवळ २० टक्के घट झाली आहे. ‘शी टीम’मध्ये जास्त करून स्त्रियांचा सहभाग असून, महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी २०१४ मध्ये या तुकडीची निर्मिती करण्यात आली. यावर्षी सप्टेंबरपर्यंत महिलांना त्रास देण्याची आणि विनयभंगाची एकंदर १२९६ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत नोंदविण्यात आलेल्या या गुन्ह्यांची संख्या १५२१ उतकी होती.

 २०१४ मध्ये २४ ऑक्टोबरला ‘शी टीम’ची स्थापना करण्यात आली. हैदराबाद शहर महिलांसाठी सुरक्षित बनविणे हा यामागील उद्देश होता. स्थापनेपासूनच ‘शी टीम’ त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर मेहनत घेत असून, हैदराबाद शहर स्त्रियांसाठी सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचे हैदराबाद पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देण्याचे प्रकार कमी होताना दिसत असून, मुलेदेखील मुलींची छेड काढताना आढळून येत नाहीत. ‘शी टीम’ची आपल्यावर नजर असल्याचे भय त्यांच्यात निर्माण झाले आहे. हैदराबादमधील महिलांसंबंधीच्या अपराधांमध्ये २० टक्के घट झाल्याची माहिती स्वाती लकडा (अप्पर पोलीस आयुक्त – क्राइम अॅण्ड एसआयटी) यांनी दिली. ‘शी टीम’ने आत्तापर्यंत गस्तीदरम्यान एकंदर ८०० जणांना अपराध करताना पकडले असून, यात २२२ अल्पवयीन आणि ५७७ सज्ञान आहेत. फोन, ई-मेल, सोशल मीडिया इत्यादीच्या माध्यमातून स्त्रियांना त्रास देणाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्यात आल्याचे स्वाती यांनी सांगितले. महिलांचा पाठलाग करणे, फोनवर अथवा प्रत्यक्ष अश्लील टिप्पणी करणे, सोशल मीडियावर त्रास देणे, मोबाईलवर फोटो अथवा व्हिडिओ पाठविणे, अनुचित प्रकारे स्पर्श करणे, परवानगीविना फोटो काढणे, याशिवाय दुचाकी अथवा चारचाकीचा वापर करून बस स्टॉप, कॉलेज, हॉस्टेल इत्यादी परिसरात उपद्रव माजविणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

अल्पवयीन मुलांच्याबाबतीत त्यांच्या आई-वडिलांच्या समक्ष मानोपसचारतज्ज्ञामार्फत समजावले जाते. ‘शी टीम’चे अधिकारी सामान्य वेशात गस्त घालत असतात. कॉलेजजवळ अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येते. त्यांच्याजवळील गुप्त कॅमेराने घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात. शी टीमच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या NSG सदस्यत्वासाठी न्यूझीलंड सकारात्मक

भारताच्या अणू पुरवठादार देशांच्या संघटनेमधील (एनएसजी) सदस्यत्वासाठी आपण सकारात्मक असल्याचे न्यूझीलंडने बुधवारी जाहीर केले. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात संबंध दृढ करण्याबाबत सहमती दर्शवली. त्यावेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी न्यूझीलंड भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली.

मात्र 48 देश सदस्य असलेल्या एनएसजीमधील सदस्यत्वासाठी न्यूझीलंडने स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नाही. मात्र न्यूझीलंडने भारताची स्वच्छ ऊर्जेची गरज ओळखली असून, भारतात अणुऊर्जेच्या प्रसारासाठी जागतिक नियमांमध्ये स्पष्टता येण्याची गरज असल्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. "एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना न्यूझीलंड सातत्यपूर्वक आणि रचनात्मकपणे सहकार्य करत राहील. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी एनएसजीच्या सदस्य देशांसोबत न्यूझीलंड प्रयत्नशील राहील," असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की म्हणाले. दरम्यान, न्यूझीलंडच्या भूमिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. "भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत मी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांचे आभार मानतो," असे मोदी म्हणाले.

अणुप्रसार करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचाही समावेश आहे. तसेच भारतालाही या नियमातून सूट देण्यात येऊ नये , असे जून महिन्यात दक्षिण कोरिया येथे झालेल्या एनएसजीच्या बैठकीत स्पष्टपणे म्हटले होते. या बैठकीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये दहशतवादाच्या मुद्यावर एकमत झाले आहे. तसेच या भेटीत दोन्ही देशांमध्ये विविध करारांवही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ग्रिएझमन लीग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडु

लिग फुटबॉल स्पध्रेतील पुरस्कारांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची चालत आलेली मक्तेदारी अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या अँटोइने ग्रिएझमनने मोडली. ला लिगा २०१५-१६च्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत मेस्सी व रोनाल्डो यांच्यावर मात करून ग्रिएझमनने बाजी मारली.

अ‍ॅटलेटिकोच्या डिएगो सिमोन यांनी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा, तर बार्सिलोनाच्या लुईस सुआरेझने सर्वोत्तम युरोपीय देशाबाहेरील खेळाडूचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारांमध्ये अ‍ॅटलेटिकोचा दबदबा दिसला. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून जॅन ओब्लॅक, बचावपटू म्हणून डिएगो गॉडीन या अ‍ॅटलेटिकोच्या खेळाडूंना गौरविण्यात आले आणि प्रेक्षकपसंतीचा पुरस्कार ग्रिएझमनने पटकावला. रिअल माद्रिदच्या लुका मॉड्रिकला सर्वोत्तम मध्यरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' द सेलआउट 'साठी पॉल बीटींना " बुकर'

लंडन : अमेरिकेतील वांशिक राजकारणावर आधारित व्यंग्य "द सेलआउट ' साठी पॉल बीटी यांना प्रतिष्ठेच्या मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले अमेरिकी लेखक ठरले आहेत.

परीक्षकांनी या कादंबरीला "धक्कादायक आणि अनपेक्षितपणे मजेदार ' असे संबोधले आहे . या कादंबरीत एका आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीची कथा सांगण्यात आली आहे . लंडनच्या गिल्डहॉलमध्ये काल रात्री आयोजित एका कार्यक्रमात 54 वर्षीय बीटी यांना या साहित्यिक पुरस्कारांतर्गत 50 हजार पाउंडची रक्कम देण्यात आली .

पुरस्कार स्वीकारताना बीटी अतिशय भावनाविवश झाले . लॉस एंजल्समध्ये जन्मलेले बीटी म्हणाले , की मला लिखाणाविषयी तिरस्कार वाटतो . हे एक कठीण पुस्तक आहे . माझ्यासाठी हे लिखाण अतिशय अवघड होते. मला माहीत आहे , की हे पुस्तक वाचणेही कठीण आहे . प्रत्येक जण याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहात आहे . लेखकाने अमेरिकी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ज्या अचूक आकलन; तसेच उपहासात्मक पद्धतीने पुस्तक लिहिले आहे , त्याची परीक्षकांनी मोठी स्तुती केली असून , त्यांच्या कामाची तुलना मार्क ट्वेन; तसेच जोनाथन स्विफ्ट यांच्याशी केली आहे .

सर्वसहमतीने निवड

परीक्षक मंडळाचे अध्यक्ष अमांडा फोरमन यांनी सांगितले , की चार तासांच्या विचारविनिमयानंतर या कादंबरीची सर्वसहमतीने निवड करण्यात आली . व्यंग्य ही एक अवघड गोष्ट आहे आणि बऱ्याचवेळा त्याला न्याय मिळत नाही . मात्र , " द सेलआउट ' या कादंबरीचा व्यंग्यचा उत्कृष्ट प्रयोग करण्यात आलेल्या अतिशय दुर्मिळ पुस्तकांत समावेश होतो .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिंक्रोट्रॉनमध्ये भारत सहभागी

शक्तिशाली क्ष- किरणांच्या झोताद्वारे पदार्थाच्या अतिसूक्ष्म पातळीवर अवस्थांचा अभ्यास करणाऱ्या इटली येथील इलेट्रा सिंक्रोट्रॉनचा थेट वापर करण्याची संधी आता भारतीय शास्त्रज्ञांना मिळणार आहे. भारत आणि इटलीने संयुक्तपणे तयार केलेल्या दोन बीमलाइनचे नुकतेच इटलीच्या त्रिएस्तेमधील संशोधन केंद्रात उद्घाटन करण्यात आले. भारताच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या नव्या बीमलाइनच्या निर्मितीमध्ये पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे (एनसीसीएस) संचालक डॉ. शेखर मांडे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’ या नव्या बीमलाइनच्या निर्मितीसाठी भारताचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय (डीएसटी) आणि इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्तरित्या आर्थिक सहकार्य केले आहे. डीएसटीचे सचिव डॉ. आशुतोष शर्मा आणि इटलीचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फॅब्रिझिओ निकोलेटी यांच्या उपस्थितीत इलेट्रा सिंक्रोट्रॉनच्या दोन नव्या बीमलाइनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील (आयआयएस्सी) प्रा. डी. डी. शर्मा, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधील (बीएआरसी) डॉ. एस. एम. शर्मा आणि पुण्यातील ‘एनसीसीएस’च्या डॉ. शेखर मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बीमलाइनची निर्मिती करण्यात आली आहे.

वर्तुळाकार चुंबकीय क्षेत्रातून अत्यंत वेगाने इलेक्ट्रॉनला फिरवून त्यापासून शक्तिशाली आणि अत्यंत सूक्ष्म अशा क्ष-किरणांच्या झोताची निर्मिती इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये केली जाते. प्रकाशापेक्षा क्ष-किरणांची तरंगलांबी बरीच कमी असल्यामुळे पदार्थाचे जे भाग दृश्यकिरणांनी दिसू शकत नाहीत (रेणवीय पातळीवरील), त्यांची रचना क्ष-किरण धडकवून अभ्यासता येते. इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनचा स्रोत अखंड सुरू राहत असून, त्याला जोडलेल्या विविध २७ बीमलाइनच्या माध्यमातून क्ष-किरणांच्या साह्याने पदार्थाचे विविध गुणधर्म अभ्यासता येतात.

याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. मांडे म्हणाले, ‘भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या एक्सप्रेस या बीमलाइनच्या माध्यमातून अतिदाबाच्या अंतर्गत पदार्थाच्या सूक्ष्म पातळीवरील अवस्थांचा एक्स रे डिफ्रॅक्शनद्वारे अभ्यास करणे शक्य होऊ शकेल. या बीम लाइनमध्ये हिऱ्याच्या साह्याने पदार्थावर वातावरणाच्या तब्बल पाच लाख पटींनी अधिक दाब दिला जातो. नवे गुणधर्म असलेले पदार्थ तयार करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल.’

अत्याधुनिक सुविधा
‘भारत आणि इटलीच्या संयुक्त विद्यमाने या बीमलाइनची निर्मिती करण्यात आल्यामुळे दोन्ही देशांना सामान वेळेत या बीमलाइनचा वापर करता येणार आहे. भारतातील पदार्थ विज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना अतिसूक्ष्म पातळीवरील रचना समजून घेण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’च्या रूपाने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. येत्या जानेवारीपासून भारतीय संशोधकांसाठी या बीमलाइन उपलब्ध असतील,’ डॉ. मांडे यांनी ‘मटा’ला सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सुखराज नहार यांची निवड

मुंबई: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो या संघटनेच्या मुंबई क्षेत्राच्या अध्यक्षपदी नहार समूहाच्या सुखराज नहार यांची निवड करण्यात आली आहे. जितोच्या संचालक मंडळाच्या ५४व्या बैठकीत नहार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले सुखराज नहार यांची निवड २०१६ ते २०१८ या कालावधीसाठी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शैक्षणिक व संशोधन परिषद आता विद्या प्राधिकरण

शैक्षणिक सुधारणांचा व्यापक कार्यक्रम राबविणार

शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रास देशपातळीवर प्रथम तीन क्रमांकात आणण्याच्या हेतूने राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेची पुनर्रचना करण्यात आली असून आता ती विद्या प्राधिकरण नावाने ओळखली जाईल. प्राधिकरण शैक्षणिक सुधारणेचे व्यापक कार्यक्रम हाती घेईल.

शालेय शिक्षण विभागाच्या (डाएट) अंतर्गत आता विद्या प्राधिकरण कार्यरत होईल. राज्यातील ६० हजार ५८१ शाळांमध्ये ज्ञानरचना शिक्षणवादी कार्यान्वित झाल्यानंतर २८ हजार ७२१ शाळा डिजिटल, १३ हजार ९२३ शाळा रचनात्मक शिक्षणवादी व २ हजार २७९ शाळा आयएसओ मानांकित झाल्या. ४४ हजार ४१६ शिक्षकांची तंत्रस्नेही शिक्षक म्हणून नोंद झाली आहे. प्रशिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांनी २२ हजार ७९३ शाळा दत्तक घेतल्या असून लोकसहभागातून १७३ कोटींचा निधी गोळा झाल्याची आकडेवारी आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे. या पाश्र्वभूमीवर १७ ऑक्टोबरच्या निर्णयाद्वारे गठित विद्या प्राधिकरण ही संस्था हे उद्दिष्टय़ साध्य करण्यासाठी कार्यरत होईल. वीस सदस्यांच्या या प्राधिकरणात अधिकाऱ्यांसह शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश राहील. शिवाय, प्रादेशिक पातळीवर सहा प्राधिकरणे अस्तित्वात येतील. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमधून सक्षम अधिकारी निवडून त्यांना जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी नसली तरी अनुभवाने पारंगत व्यक्तींनाही संधी मिळेल. काही पदे बालभारतीतून भरली जातील.

प्राधिकरणाद्वारे अभ्यासक्रम व पाठय़क्रम विकसित करणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षकांचे विकसन, मूल्यमापन प्रक्रिया, विकसित व संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करण्याचे ठरले आहे. १०० टक्के मुले शिकू शकतात, याविषयी खात्री नसणाऱ्या शिक्षकांच्या वृत्तीत बदल घडवितांना सर्व समान असतात, हे सूत्र बिंबविले जाईल. मुक्त दूरस्थ अध्ययन, स्वयंअध्ययन, केंद्रस्तरीय चर्चा, ऑनलाईन आदानप्रदान या पध्दती राहतील. प्रादेशिक प्राधिकरणाद्वारे विषयनिहाय सक्षमीकरणासाठी निवड समित्यांची स्थापना होईल. सर्वाधिक बदल घडवून आणणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य मिळेल.

 राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर या समित्या कार्यरत होतील. जिल्हा पातळीवर उपक्रमशील तज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी बारा अतिरिक्त शैक्षणिक पदे निर्माण करण्याचा निर्णय झाला आहे.
उर्दूसाठी अतिरिक्त दोन पदे राहतील. शिक्षकांच्या गरजा, अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण, वर्गकार्याचे निरीक्षण, अध्ययन पध्दतीत बदल, केंद्र संमेलने सक्षम करणे, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण, अशा बाबी जिल्हा पातळीवर हाताळल्या जाणार आहेत. केंद्रप्रमुखांना प्रशासकीय कामांचा भार पडू नये म्हणून त्यांना शाळाभेटी, केंद्र संमेलने, समूह साधन केंद्र, शैक्षणिक नियोजन याच जबाबदाऱ्या मिळणार आहेत. या प्रक्रियेत शिक्षक व खात्याबाहेरील तज्ज्ञांना प्रामुख्याने सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. काही व्यक्ती आपापल्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी असतात. त्या स्वत:चे कार्य न सोडता मार्गदर्शक म्हणून काम करण्यास तयार असतात. पद न घेता कार्य करण्याची त्यांची तयारी असल्याने त्यांचा समाजासाठी उपयोग करून घेण्याचा मानस शासनाने ठेवला आहे. त्यांना संसाधन समूह म्हणून संबोधित करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कार्यशाळा व परिसंवादासाठी करून घेतला जाणार आहे. नेतृत्व, कला, क्रीडा, संशोधन, संस्थाचालक अशा क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधन देऊन सेवा घेण्याचा विचार आहे.

 राज्य, जिल्हा, गट व केंद्र पातळीवर संसाधन समूह स्थापन केले जाणार आहेत. या सर्व कार्याचे विशेष मूल्यमापन ठराविक काळाने केले जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खतावरील अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

१६ जिल्हय़ात थेट हस्तांतरणाचा यशस्वी प्रयोग; ५० टक्के शेतकरी जमिनीचे मालक नाहीत

शेतीसाठी खतावर देण्यात येणारे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून १६ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या योजनेच्या यशानंतर ही योजना पूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे खतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचे ७५ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास मदत होणार आहे.

सरकार थेट हस्तांतरण योजनेवर (डीबीटी) काम करत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा होतील. १६ जिल्हय़ामध्ये राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला यशस्वी प्रतिसाद मिळत असल्याचे रसायने आणि खते मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.

पुढील खरीप हंगामापर्यंत सर्व माहिती गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. खते क्षेत्रासाठी थेट हस्तांतरण योजना राबविण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने युरियाचा समावेश आहे. खतांसाठी केंद्र सरकारकडून जवळपास वार्षिक ७५ हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी थेट हस्तांतरण योजना राबविणे ही आव्हानात्मक आणि अवघड बाब आहे. ५० टक्के शेतकऱ्यांकडे त्यांच्या मालकीची जमीन नाही. मात्र हे असताना देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करण्यासाठी तसेच स्वस्तात मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शकुंतला रेल्वे लाईनचे भारतीय रेल्वेत होणार विलीनीकरण

भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची आहे. पण भारतात एक रेल्वेमार्ग असा आहे जो खासगी मालकीचा आहे. शकुंतला रेल्वे असे या रेल्वेमार्गाचे नाव असून, लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे.

विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा १८८ किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या मालकीचा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग ताब्यात घेण्याच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे. ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने १९१० साली शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली.

स्वातंत्र्यपूर्वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जायचा. स्वातंत्र्यानंतर अन्य खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले. पण शुकंतला रेल्वे मार्गाची मालकी खासगी कंपनीकडेचं राहिली. करारानुसार भारत सरकारने हा मार्ग २०१६ मध्ये ताब्यात घेतला नाही तर, राष्ट्रीयकरणासाठी आणखी दशकभर थांबावे लागेल.

या अरुंद रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यामुळे दिल्ली-चेन्नई-बंगळुरुमधील अंतर ८० किमीने कमी होईल. हा मार्ग वापरण्यासाठी भारतीय रेल्वे शकुंतला रेल्वेला वर्षाला २ ते ३ कोटी रुपये दोते. दोन प्रवासी गाडया आणि काही मालगाडया या मार्गावरुन धावतात. सध्या शकुंतला रेल्वेची मालकी भारतीय व्यक्तीकडे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' एनआयए' महासंचालक ;शरदकुमारांना मुदतवाढ

राष्ट्रीय तपास संस्थेच्या ( एनआयए) महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शरदकुमार यांना सलग दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे .

सलग दुसऱ्यादा मुदतवाढ देण्याचा हा निर्णय दुर्मिळ मानला जातो . शरदकुमार हे 1979 च्या तुकडीचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. 30 जुलै 2013 रोजी त्यांची "एनआयए ' च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती . पठाणकोट हल्ला , काश्मीरमधील दहशतवादी हल्ले , समझोता एक्स्प्रेस स्फोट , वर्धमान स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास सध्या "एनआयए ' करीत आहे . या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होण्यासाठी शरदकुमार यांच्या नियुक्तीचा लाभ होणार आहे . शरदकुमार यांना त्यांच्या सेवाकाळात 1996 आणि 2004 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' यू- ट्युब ' ठरतंय ' गुगल'साठी सर्वांत फायदेशीर

 ' गुगल ' च्या विविध सुविधांपैकी अर्थकारणाच्या दृष्टीने ' यू - ट्युब' सर्वाधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे . तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेणाऱ्या नव्या पिढीसाठी ' यू - ट्युब ' हे केबल टीव्हीपेक्षाही अधिक महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे .

स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे इंटरनेट आपल्या हातात आले आहे . बातम्या , मनोरंजन किंवा संगीत ऐकण्यासाठी नवी पिढी आता स्मार्टफोनवरच आणि त्यातही ' यू - ट्युब ' वरच अवलंबून असल्याचीही निरीक्षणे आहेत. यामुळे माध्यम विश्वातील जाहिरातींवरील खर्चाच्या प्रमाणामध्येही बदल होत चालला आहे . पारंपरिक माध्यमांपेक्षा आता ' यू -ट्युब ' सारख्या माध्यमांवरून जाहिराती करण्याकडे जाहिरातदारांचा कल वाढू लागला आहे .

' यू - ट्युब' कडे वाढत चाललेल्या जाहिरातींच्या प्रमाणामुळे या सुविधेचा ' गुगल ' च्या उत्पन्नात लक्षणीय वाटा आहे . ' गुगल ' ने काल ( गुरुवार) तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला . ' गुगल ' ची मातृसंस्था असलेल्या ' अल्फाबेट' या कंपनीला गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपेक्षा तब्बल 27 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे . यंदाच्या तिसऱ्या तिमाहीअखेरचे ' अल्फाबेट' चे उत्पन्न 5 . 1 अब्ज डॉलर इतके होते.

या भक्कम आर्थिक कामगिरीमुळे ' गुगल ' आता विविध दूरचित्रवाहिन्यांवरील अधिकाधिक कार्यक्रम ' यू - ट्युब' वरून प्रसारित करण्याचे हक्कही विकत घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे . यामुळे ' यू - ट्युब' च्या युझर्समध्ये आणखी वाढ होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे . ' यू - ट्युब ' च्या वाढत्या उत्पन्नामुळे ' सेल्फ ड्रायव्हिंग कार' सारख्या ' गुगल ' च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रकल्पांनाही आर्थिक बळ मिळण्याची शक्यता आहे . ' यू -ट्युब ' मधून नेमके किती उत्पन्न मिळाले , याची माहिती ' अल्फाबेट' ने जाहीर केलेली नाही .

इंटरनेटच्या वाढत्या प्रसारासह गेल्या काही वर्षांमध्ये ' यू - ट्युब ' ची लोकप्रियताही वाढत गेली आहे . ' यू - ट्युब ' च्या युझर्सची संख्या एक अब्जांहून अधिक झाल्याचेही अहवालात म्हटले आहे . तसेच , ' यू - ट्युब' चे बहुतांश युझर्स 18 ते 34 या वयोगटातील आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तिबेटमध्ये अद्यापही सर्वश्रेष्ठ पर्यावरण

बीजिंग - तिबेटमध्ये खाण प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोचत असल्याची टीका चीनवर होत असताना चीनने तिबेटमध्ये पर्यावरण संरक्षण योजना सुरू केली आहे .

तिबेटचे सौंदर्य , पर्यावरण आणि वातावरण राखले जावे , या हेतूने उपाययोजना केल्या जात असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे . चीनच्या ऍकॅडमी ऑफ सायन्सच्या मते संरक्षण पर्यावरण योजनेनुसार याठिकाणी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

तिबेटच्या स्वायत्त प्रादेशिक सरकारचे उपाध्यक्ष वांग हैजोऊ यांनी सांगितले , की तिबेटमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ पर्यावरण अद्याप कायम आहे . तिबेटमधील पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी 2009 मध्ये चीनच्या मंत्रिमंडळाने "तिबेटमधील पर्यावरण सुरक्षा मर्यादा संरक्षण आणि बांधणी ( 2008- 2030 )' या योजनेला मंजुरी दिली होती . या योजनेनुसार पर्यावरण सुधारणा आणि संवर्धन केले जात आहे . चीनच्या खाण उत्खनन योजनांमुळे तिबेटच्या पर्यावरणाची हानी होत असल्याची टीका केली जात होती . त्यानंतर चीनने पर्यावरण संवर्धनाची योजना सुरू केली .

 तिबेटमधील विकासकामासंदर्भातील अहवाल काल सीएसएसने प्रसिद्ध केला . या योजनेत विकासाला प्राधान्य देत म्हटले, की तिबेटच्या पठारावर पर्यावरणातील शुद्धता कायम ठेवण्यासाठी येथील वनसंपदा ही आच्छादन बनली आहे . चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार चीनच्या योजनांमुळे आतापर्यंत तिबेटमध्ये असलेल्या उजाड जमिनीच्या प्रमाणात 107 . 100 हेक्टरपर्यंत घसरण झाली आहे . उजाड जमिनीवर चारा पैदास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे . सध्या तिबेटचा नैसर्गिक राखीव भाग हा एकूण 413 , 700 चौरस किलोमीटर आहे . तिबेटमधील दुर्मिळ जनावरे आणि वृक्षांचे संरक्षण केले जात असल्याचे अहवालात नमूद केले आहे . तिबेटमधील पाणी, हवा , जमीन आणि वातावरण हे उत्तम स्थितीत असल्याचे वांग यांनी म्हटले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बीसीसीआयच्या मानगुटीवर डेलॉइट अहवालाचे भूत ?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थिती बुडत्याचा पाय अधिकच खोलात होणार , अशीच दिसत आहे . डेलॉइट लेखा अहवालात भारतीय मंडळाच्या संलग्न संघटनांवर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले आहेत . या अहवालामुळे लोढा समितीच्या शिफारशींची कठोरपणे अंमलबजावणी होईल , असेच मानले जात आहे .
अमेरिकेतील डेलॉइट या व्यावसायिक संस्थेने मंडळाच्या संलग्न संघटना निधीचा कसा दुरुपयोग करत आहेत, तसेच संघटनांचे पदाधिकारी त्यातून वैयक्तिक फायदा कसा करून घेत आहेत, याचे पुरावे दिले आहेत. हा अहवाल सध्या भारतीय मंडळाचे कायदेशीर सल्लागार अमरचंद मंगलदास यांच्याकडे आहे , असे वृत्त आहे .

डेलॉइट अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आला , तर भारतीय मंडळ आणि संलग्न संघटनांची नव्याने चौकशी सुरू होईल , असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे . या अहवालातील टिप्पणीनुसार गोवा , हैदराबाद , केरळ , आसाम, ओडिशा या संघटनांची सखोल चौकशी सुरू होईल . हा अहवाल आपल्यावर चांगलाच शेकणार , याची कल्पना आल्यावर काही संघटना खडबडून जागा झाल्या असल्याचे सांगितले जात आहे . यापैकी काही संघटनांनी कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले असल्याचे सांगितले जात आहे .

कुठे काय घडले

- गोवा संघटनेने कार्यकारिणी सदस्यांसाठी 18 कारची खरेदी . त्याच्या देखभालीचा तसेच पेट्रोलचा खर्चही संघटनेकडूनच वसूल
- हैदराबाद संघटनेने निविदा प्रक्रियेच्या वेळी सदस्यांना सोन्याची नाणी दिली , तर त्यांच्या पत्नीस दागिन्यांची भेट
- हैदराबाद संघटनेने अनेक कोटींची कर्जे दिली . त्याचा हिशेब नाही
- केरळने कोणतीही प्रक्रिया न अमलात आणता 30 कोटींची जमीन खरेदी , त्याचा उपयोग क्रिकेटसाठी काहीही नाही
- कोणत्याही निविदा न मागवताही करार
- ओडिशा संघटनेतील सर्व हिशेबाच्या हस्ताक्षरात नोंदी
- आसामला बीसीसीआयचे 60 कोटींचे कर्ज ; पण त्या रकमेचे काय झाले , याचा कोणताही हिशेब नाही
- जम्मू - काश्मीर संघटनेच्या सदस्यांकडूनही आर्थिक गैरव्यवहार

अहवाल संकेतस्थळावर नाही

भारतीय क्रिकेट मंडळ कायम आम्ही पन्नास लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराच्या नोंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध करतो , असे सांगते ; पण डेलॉइटचा हा अहवाल सादर झाल्यावरही त्याची संकेतस्थळावर नोंद नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन

महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.

वसंत पळशीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धांगवायूनं आजारी होते. या आजारपणातच त्यांचं निधन झालं. पळशीकर हे 'समाज प्रबोधन पत्रिका' व 'नवभारत' या नियतकालिकांचे संपादक होते. लोकशाही समाजवाद व त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली होती. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पळशीकर यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यात त्यांनी वेळोवेळी कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली होती. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, दुसऱ्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला.

पळशीकर यांची ग्रंथसंपदा

चौकटी बाहेरचे चिंतन
परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा
जिहाद, गुलाल आणि सारीपाट
धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा
जमातवाद
पारंपारिक आणि आधुनिक शेती

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोवाः माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर कालवश

गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रमुख नेत्या शशिकला काकोडकर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या.

१९७३ मध्ये, दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला बांदोडकर यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. १९७९ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यानंतर, ९०च्या दशकात शिक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. गोव्यातील प्राथमिक शिक्षणात मराठी शिकवणं बंधनकारक करण्याबाबत त्या आग्रही होत्या आणि त्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्नही केले होते. भारतीय भाषा सुरक्षा मंच या गोव्यातील संघटनेचे अध्यक्षपद शशिकला काकोडकर यांनी भूषवलं होतं.

गोव्यात सध्या मातृभाषेचा मुद्दा गाजतोय. शिक्षणात मातृभाषेला मानाचं स्थान मिळावं, यावरून राजकारणही पेटलंय. अशावेळी, शशिकला काकोडकर यांचं निधन गोवेकरांना चटका लावून जाणारंच आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगभरातील वन्यजीव संकटात

येत्या चार वर्षांत वन्यजीवांच्या संख्येत मोठी घट होण्याची भीती वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर या स्वयंसेवी संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. १९७०च्या संख्येच्या तुलनेत २०२० अखेरीपर्यंत वन्यजीवांची संख्या ६७ टक्क्यांनी घटेल, अशी शक्यता या संस्थेने वर्तवली आहे.

वन्यजीवांची संख्या घटण्याची अनेक कारणे असून लोकसंख्यावाढ हे त्यातील प्रमुख कारण आहे. मनुष्यांची वाढती अन्नमागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादन वाढीस लागले असून या शेतीमुळे जंगलांवर अतिक्रमण होत आहे. जगातील एकूण जमिनीपैकी एक तृतीयांश जमिनीवर शेती केली जात असून या शेतीसाठी जगातील पाणीसाठ्यापैकी ७० टक्के पाणी लागते. शेतीचे प्रमाण वाढत चालल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, मासे यांची संख्या १९७० ते २०१२ या कालावधीत तब्बल ५८ टक्क्यांनी घटली आहे.

जगातील एकेक प्रजाती अशाच नष्ट होत गेल्या तर त्यांच्यावर अवलंबून असलेली शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि हवामान ही साखळीच तुटेल, असा इशारा या संस्थेचे आंतरराष्ट्रीय महासंचालक मार्को लँबर्टिनी यांनी दिला.

भारतातील पाणीटंचाई

जगातील एकूण ताज्या पाण्याच्या स्त्रोतापैकी चार टक्के स्त्रोत भारतात आहेत. यामुळे जगातील पहिल्या १० पाणीश्रीमंत देशांत भारताचा समावेश होतो. तरीही भारतात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, यावरुन ढासळत्या पर्यावरणाची कल्पना येऊ शकेल, असे निरीक्षण या अहवालात नोंदले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रभा गणोरकर, प्रेमानंद गज्वी, प्रकाश बाळ जोशी यांच्यासह ३५ लेखकांना राज्य वाङमय पुरस्कार

प्रख्यात लेखिका, कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, लेखिका प्रतिमा इंगोले, रमेश पतंगे, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लघुकथा लेखक प्रकाश बाळ जोशी, राजीव तांबे यांच्यासह ३५ लेखक, साहित्यकांना महाराष्ट्र शासनाचा २०१५ या वर्षाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त १ लाख रूपये रोख आणि किमान ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. यंदा एकूण २४ लेखकांना १ लाख रूपये रोख रकमेचे तर ८ लेखकांना ५० हजार रूपये रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जीवाश्मीभूत शैवालाचा बॅटरीतील अॅनोडसाठी वापर

डायटमस या एकपेशीय शैवालीच्या जीवाश्मीभूत अवशेषांपासून बनवलेल्या अॅनोडचा वापर केलेल्या सिलिकॉनच्या मदतीने विद्युत वाहनांना वीज पुरवठा करणाऱ्या किफायतशीर लिथियम आयन बॅटरी वैज्ञानिक विकसित करीत आहेत. रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात याबाबत संशोधन झाले असून याच्या आधारे विद्युत वाहने व पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक साधनात वापरता येणाऱ्या लिथियम आयन बॅटरी किफायतशीर दरात तयार करता येणार आहेत. लिथियम आयन बॅटरीज या रिचार्जेबल बॅटरीजमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत त्यात अॅनोड, कॅथोड व इलेक्ट्रोलाईट असे घटक असतात. ते लिथियम क्षार सेंद्रिय द्रावणात विरघळवून तयार केले जातात. ग्राफाईट हा अॅनोडसाठी चांगला पर्याय आहे पण त्याच्या काही मर्यादांमुळे वापर अवघड आहे.

पर्यायी सिलिकॉन दहा पट ऊर्जा साठवू शकतो पण त्याची काबरेथर्मिक पद्धतीने निर्मिती महागात पडते. त्यामुळे डायटोमॅशियस अर्थ या शैवालाच्या जीवाश्माचा वापर यात करता येईल असे वैज्ञानिकांचे मत असून त्याची उपलब्धताही भरपूर आहे, खडकांमध्ये तो सापडतो, गेली काही लाख वर्षे तो जीवाश्म स्वरूपातील अवशेषात आहे. मॅग्नेशियोथर्मिक रिडक्शन पद्धतीने सिलिकॉन डायॉक्साईडच्या या स्रोताचे सिलिकॉन नॅनो कणात रूपांतर करण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

पेनल्टी शूट आऊटमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ५-४ असा पराभव करुन चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ असे गोलबरोबरीत राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.

भारताने मिळालेल्या पाचही संधीचे गोलमध्ये रुपांतर केले पण दक्षिण कोरियालाय चारच संधी गोलमध्ये बदलता आल्या. अखेर भारताने एका गोलच्या अंतराने उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात दक्षिण कोरियाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. मलेशिया आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार असून, त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा सामना होईल.

२०११ मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकाद विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे. भारताला राऊंड रॉबिन लीगमध्ये दक्षिण कोरियाच्या युवा संघाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. राऊंड रॉबिन लीग फेरीनंतर भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मानवी हक्क परिषदेच्या फेरनिवडणुकीत रशिया पराभूत

संयुक्त राष्ट्राच्या मानव हक्क परिषदेवरील पुन: नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रशियाचा हंगेरी आणि क्रोएशियाकडून पराभव झाला. युद्धग्रस्त सिरीयाला सुरु असलेल्या सैन्य मदतीमुळे रशियाच्या सदस्यत्वावर गंडातर आले आहे. रशियाची मानवी हक्क परिषदेतील उमेदवारी डिसेंबर ३१ रोजी संपणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘ जलयुक्त ’ मधून एक लाख ४५ हजार टीसीएम पाणीसाठा

पुणे : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे . अभियानातून राज्यभरात तब्बल एक लाख ४५ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला आहे . यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी असलेली टंचाई कमी होऊन हजारो हेक्टरला फायदा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला .

पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड, यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती . त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाला होता . त्याचप्रमाणे राज्यातील बहुतांशी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली . त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने योग्य पाऊले उचलत जलसंधारणाची कामे हाती घेतली . गेल्या दोन वर्षांत १८ हजार ५६८ गावांमध्ये सिंमेट साखळी बंधारे , जुन्या अस्तित्वातील सिंमेट नालाबांध, केटी वेअर दुरुस्ती व नूतनीकरण , जलस्राेतांतील गाळ काढणे, जलस्राेत बळकटीकरण करणे , विहीर पुनर्भरण, अशी विविध कामे हाती घेण्यात आली होती . यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे .

गेल्या वर्षी ९ हजार ७५३ गावांमध्ये शासकीय व लोकसहभागातून १५ हजार ७९८ गावात कामे केली . त्यातून सुमारे एक लाख सात हजार घनमीटर गाळ काढला होता . त्यासाठी तब्बल ६५९ कोटी रुपये खर्च झाला अाहे. त्यात सुमारे एक लाख ७ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला . यंदा ८ हजार ८१५ गावांत चार हजार २४२ कामे केली आहेत. त्यातून ३७ हजार ९५० घनमीटर एवढा गाळ काढला असून , त्यावर १७२ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे .

विभागानिहाय काढलेला गाळ :

वर्ष - - काढलेला गाळ ( घनमीटर )
२०१४ - १५ : कोकण ६४९० , नाशिक १२०४९ , पुणे ९१२६ , कोल्हापूर ५८२५ , औरंगाबाद १७ , ६२३ , लातूर २८ , ८३२ , अमरावती ११ , ८१८ , नागपूर १४ , ४२१
२०१५ - १६ : कोकण ९५ , नाशिक २०९५ , पुणे १० , ७१४ , कोल्हापूर ३१८६ , औरंगाबाद ४६३३ , लातूर १२ , ६३२ , अमरावती १४५८ , नागपूर ३२२२

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंध्र प्रदेश , तेलंगणाने टाकले गुजरातला मागे

देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे ; तर तेलंगण राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे . केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती .

व्यवसायास पूरक वातावरण तयार करण्याच्या या मोहिमेमध्ये गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले असून या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले आहे . छत्तीसगढ राज्याने चौथे स्थान कायम राखले आहे .

 छत्तीसगढनंतर या यादीमध्ये अनुक्रमे मध्य प्रदेश , हरयाना , झारखंड , राजस्थान , उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे . महाराष्ट्राचा या यादीमध्ये तब्बल 10 वा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले आहे .

कर्नाटक , उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये " उदयोन्मुख नेतृत्व ' असे संबोधण्यात आले आहे ; तर हिमाचल प्रदेश , तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यांनी कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे . औद्योगिक विकास विभाग पोलिसदल व जागतिक बॅंकेच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीमधील वायु प्रदुषण वाढता वाढे .....

दीपावली हा खरे तर आनंदाचा क्षण. . उत्तम आरोग्यामुळे कोणत्याही सणाचा आनंद द्विगुणित होतो . मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे होणाऱ्या वायु प्रदुषणाच्या पातळीने सुरक्षेचे सर्व मापदंड ओलांडल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे . भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही दिवाळीच्या रात्रीस वायुप्रदुषणाचे प्रमाण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून निश्चित करण्यात आलेल्या निकषांपेक्षा तब्बल 14 ते 16 पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे . हवेच्या गुणतवत्तेची तपासणी करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिवाळीच्या रात्री दिल्लीमधील वायु प्रदुषणाची पातळी " अत्यंत गंभीर ' होती .

दिल्ली प्रदुषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार , राजधानीमधील आनंद विहार भागामध्ये 2 . 5 मायक्रोमीटर अथवा त्यापेक्षा कमी व्यास असलेल्या कणांचे ( पर्टिक्युलेट मॅटर ) प्रमाण एका क्युबिक मीटरमागे 883 ( मायक्रोग्राम्स ) इतके दिसून आले . सुरक्षा मापदंडांनुसार प्रत्येक क्युबिक मीटरमागे या कणांचे प्रमाण 60 इतके निश्चित करण्यात आले आहे . याचबरोबर , आनंद विहार भागामध्येच पीएम 10 ( 10 मायक्रोमीटर वा त्यापेक्षा कमी व्यास असलेले कण ) कणांचे प्रमाण प्रत्येक क्युबिक मीटरमागे तब्बल 1680 ( मायक्रोग्राम्स ) इतके दिसून आले . मापदंडांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण तब्बल 16 पटींपेक्षाही जास्त आहे .
याचबरोबर , पश्चिम दिल्लीमधील पंजाबी बाग भागामध्ये पीएम 2 . 5 व पीएम 10 कणांचे प्रमाण सुरक्षा निकषांच्या तुलनेमध्ये 10 व 15 पटींनी जास्त असल्याचे आढळून आले आहे .

 याशिवाय , राजधानीमधील अन्य भागांमध्येही प्रचंड प्रदुषण झाल्याचे निष्पन्न झाले . दिल्ली व देशातील अन्य भागांमधील वायु प्रदुषणाच्या या प्रचंड प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरांवर अनेक वेळा चिंता व्यक्त करण्यात आली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" धोकादायक हिमतलावाची पातळी झाली कमी'

काठमांडू - माऊंट एव्हरेस्टच्या अगदी नजीक असलेल्या व प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या हिमतलावामधील ( ग्लेशिअल लेक) जलसाठा कमी करण्यात नेपाळला यश आले आहे . इमजा त्शो असे या तलावाचे नाव असून तो माऊंट एव्हरेस्टच्या दक्षिणेस अवघ्या 10 किमी अंतरावर आहे . समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 16 , 437 फूट उंचीवर आहे .

इमजा त्शो हा नेपाळमधील सर्वांत वेगाने प्रसरण पावणारा हिमतलाव आहे . मात्र हवामान बदलाच्या संकटामुळे अशा स्वरुपाच्या हिमतलावांमधील बर्फ अत्यंत वेगाने वितळण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे . या तलावामधील बर्फही वितळून पूर आल्यास त्यामुळे हजारो नागरिकांना फटका बसून मोठी जीवितहानी होण्याचीही शक्यता होती . या पार्श्वभूमीवर , नेपाळने या हिमतलावामधील जलसाठी कमी केला आहे . " पुराची शक्यता लक्षात घेता या तलावामधील जलसाठा कमी करण्यास सरकारचे प्राधान्य होते . तेव्हा सध्यापुरता हा धोका टाळण्यात यश मिळाले आहे , '' असे या प्रकल्पाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी तोप बहादुर खत्री यांनी सांगितले .

सुमारे दीडशे फुट खोल असलेल्या या तलावाची पातळी सहा महिन्यांच्या कष्टप्रद मोहिमेनंतर साडेतीन मीटरने खाली आली आहे . या प्रयत्नांत तलावामधील पन्नास लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त पाणी तलावाबाहेर काढण्यात आले आहे . नेपाळ व संयुक्त राष्ट्रसंघांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला . यासाठी येथील स्थानिक 100 नागरिकांसह नेपाळी सैन्यामधील 40 सैनिकांची तुकडी गेल्या एप्रिल महिन्यापासून कार्यरत होती . साहित्याच्या दळणवळणासाठी याक वा हवाई मार्गाचा वापर करण्यात आला . तलावामधील पाणी बाहेर सोडण्यासंदर्भात नियंत्रण मिळविण्यासाठी येथे यांत्रिक दरवाजाही बसविण्यात आल्याची माहिती सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल भारत लाल श्रेष्ठ यांनी दिली . या भागामधील वारे, बर्फ आणि विरळ हवेमुळे दिवसामध्ये केवळ दोन तीन तास काम करणेच शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले .

1984 ते 2009 या काळामध्ये या तलावाचे क्षेत्रफळ 0 . 4 किमीवरुन 1 . 1 चौरस किमी इतके वाढले होते . यामुळे या तलावामधील पाणी बाहेर पडून 50 हजारपेक्षाही जास्त नागरिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती . आता हाच प्रकल्प इतर धोकादायक हिमतलावांसाठीही अंमलात आणला जाणार आहे .

नेपाळमध्ये सुमारे तीन हजार हिमतलाव आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रसंघाची इमारतही दिवाळीच्या तेजाने उजळली

न्यूयॉर्क - दिवाळीनिमित्त भारतभर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून , अनेक देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांमुळे जगभरातही हा सण साजरा केला जात आहे . संयुक्त राष्ट्रसंघामध्येही यंदा प्रथमच दिवाळी साजरी करण्यात आली असून , त्यानिमित्त येथील मुख्यालयावर रोषणाई करण्यात आली आहे .

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवर लावलेली " हॅप्पी दिवाली' हे शब्द आणि पारंपरिक दिव्याची प्रतिकृती येणाऱ्या - जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे . याबाबत भारताचे राष्ट्रसंघातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे . आमसभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांच्या पुढाकारातून राष्ट्रसंघात हा आनंदोवत्सव साजरा होत असल्याबद्दल अकबरुद्दीन यांनी थॉमसन यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रसंघाची इमारत प्रथमच दिवाळीनिमित्त रोषणाईने चकमत असल्याने अनेक नागरिक आवर्जून छायाचित्रे काढत असल्याचेही अकबरुद्दीन यांनी सांगितले . थॉमसन यांनीही इमारतीचे छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे . " अंधकारावर प्रकाशाने , निराशेवर आशेने, अज्ञानावर ज्ञानाने आणि दुष्टशक्तीवर चांगुलपणाने मात करा . शुभ दीपावली , ' असे थॉमसन यांनी ट्विट केले आहे . ही इमारत 29, 30 आणि 31 ऑक्टोबर असे तीन दिवस उजळून निघत आहे .

राष्ट्रसंघातही दिवाळीची सुटी
संयुक्त राष्ट्रसंघाने डिसेंबर 2014 मध्ये दिवाळीचे महत्त्व ठळक करणारा ठराव संमत केला होता . हा सण जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जात असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणतीही बैठक आयोजित केली जाऊ नये , असे ठरावात म्हटले होते. या वर्षापासून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये दिवाळीची सुटीचा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर खुला असणार आहे , असेही अकबरुद्दीन यांनी सांगितले . याच वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तही राष्ट्रसंघाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात आली होती .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंटार्क्टिक महासागरावर मोठे " सागरी उद्यान'

अंटार्क्टिक महासागरावर जगातील सर्वांत मोठे " सागरी उद्यान' करण्यास 24 देश आणि युरोपियन युनियनने तयारी दर्शविली आहे . महासागराच्या एकूण 1 . 55 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात हे भव्य उद्यान असेल.

अंटार्क्टिक महासागर संवर्धन आयोगाच्या सूत्रांनी हॉबर्ट ( ऑस्ट्रेलिया) येथे सांगितले , की या " रॉस सी सागरी उद्याना ' मुळे सुमारे 35 वर्षे तरी व्यापारी मच्छीमारांपासून संरक्षण होईल .

 महासागरातील रॉस समुद्र हा पर्यावरणाच्या दृष्टीने जगातील एक महत्त्वाचा समुद्र आहे . महासागराच्या दक्षिण भागातील 12 टक्क्यांपेक्षा अधिक भाग या उद्यानाने व्यापाला जाईल . जे पेंग्विन , व्हेल, समुद्र पक्षी , प्रचंड असे जलचर , अशा दहा हजार प्रकारच्या प्रजातींचे घर आहे , या भागात 1 . 1 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात मासेमारीला पूर्ण बंदी असेल. येथील काही भाग संशोधनासाठी राखून ठेवण्यात येणार आहे . सागरी वैविध्याच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी व्यक्त केले आहे . एकूण 25 सदस्य असलेल्या या आयोगामध्ये रशिया, चीन , अमेरिका आणि युरोपियन युनियनचा समावेश असून , या सर्वांनी " सागरी उद्याना ' स पाठिंबा दर्शविला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बांगलादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

अखेरच्या एकमात्र सत्रात केवळ दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजच्या भन्नाट स्पेलच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 108 धावांनी पराभव केला . बांगलादेशने तिसऱ्या दिवशीच विजय साकार केला . दुसरी कसोटी फलंदाजांच्या हाराकिरीनेच लक्षात राहील . तीन दिवसांत तब्बल 40 फलंदाज म्हणजे दोन्ही संघांचे दोन डाव आटोपले . बांगलादेशने ही कसोटी जिंकून मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली.

विजयासाठी 273 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड चहापानाच्या विश्रांतीला बिनबाद 100 असे सुस्थितीत होते . सामन्याचे अजून पूर्ण दोन दिवस शिल्लक असल्यामुळे इंग्लंडची बाजू भक्कम होती . कर्णधार ऍलिस्टक कूक आणि बेन डुकेट यांनी नांगर टाकला होता . मात्र, चहापानानंतर सामन्याचे चित्र असे काही पालटले की तोपर्यंत 23 षटकांत 100 धावा करणाऱ्या इंग्लंडचा डाव नंतरच्या 22 . 3 षटकांत आणखी 64 धावांची भर घालून 164 धावांवर आटोपला .

 चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर मेहदी हसन याने डुकेटचा त्रिफळा उडवला . आपल्या पुढच्याच षटकात त्याने कुकचा अडसर दूर केला . कर्णधार मुशफिकूरने त्याला बाजू बदलून गोलंदाजी दिल्यावर त्याने गॅरी बॅलन्स आणि मोईन अली यांना एकाच षटकांत बाद करून इंग्लंडच्या आव्हानातील "बॅलन्स ' च बिघडवून टाकला . मेहदीला दुसऱ्या बाजूने अनुभवी शकिबने आपल्या फिरकीने सुरेख साथ दिली . शकिबने चार फलंदाज बाद केले.

 पहिल्या डावांत सहा गडी बाद करणाऱ्या मेहदीने दुसऱ्या डावातही सहा गडी बाद केले. त्यानेच फिनला पायचित करून बांगलादेशच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले . मेहदीने सलग दुसऱ्या सामन्यात तिसऱ्यांदा डावांत पाच गडी बाद करण्याची किमया साधली. कूक ( 59 ) आणि डुकेट ( 56 ) या सलामीच्या जोडीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स ( 25) यालाच दोन आकडी मजल मारता आली . इंग्लंडचे चार फलंदाज शून्यावरच परतले .

त्यापूर्वी, बांगलादेशचा दुसरा डाव 3 बाद 152 धावसंख्येवरून आज 296 धावांत संपुष्टात आला . सलामीचा फलंदाज इम्रुल कायेस ( 78 ) , महमुदुल्ला ( 47 ) आणि शकिब अल हसन ( 41) यांनी आपले योगदान दिले . बांगलादेशचा दुसरा डाव झटपट गुंडाळल्यामुळे इंग्लंडसमोर जवळपास अडीच दिवसांत 273 धावांचे किरकोळ आव्हान होते .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे हिनाची माघार

महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारताची नेमबाज हिना सिद्धूने इराणमध्ये होणाऱ्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे . ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे .

मला काही क्रांती करायची नाही , पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे , तसेच अशा अडथळ्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे माझे वैयक्तित मत आहे आणि त्यामुळेच मी या स्पर्धेतून माघार घेत आहे , असे हिनाने स्पष्ट केले . आपल्या माघारीचा निर्णय तिने भारतीय नेमबाजी संघटनेला कळवला आहे .

खेळाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या संस्कृतींचे , वेगवेगळ्या देशांचे , वेगवेगळ्या धर्मांचे खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत आणि त्या वेळी केवळ खेळ हेच त्यांचे ध्येय असते , असेही हिनाने म्हटले आहे .

 इराणमधील या स्पर्धेत हिनाकडून पदकांची अपेक्षा केली जात होती . 2013 मधील विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ती रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन

भारतीय संघाने आक्रमक खेळाच्या जोरावर पाकिस्तानवर ३-२ अशी मात करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताचे या स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. सलग तिसरे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानवर मात केली.

जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर पाकिस्तान १३व्या स्थानी आहे. या स्पर्धेतील साखळीत भारताने पाकिस्तानवर ३-२ने मात केली होती.

 २०११मध्ये भारताने पाकिस्तानवर मात करूनच या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तर २०१२मध्ये पाकिस्तानने भारतावर मात करून विजेतेपद मिळवले. २०१३मध्ये पाकिस्तानने सलग दुसरे विजेतेपद मिळवले. याच्या तीन वर्षांनंतर झालेल्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा अंतिम फेरीत आमनेसामने आले. अंतिम फेरीच्या प्रवासापर्यंत भारतीय संघ अपराजित होता, तर पाकिस्तानला दोन लढतींत पराभव पत्करावा लागला होता. भारताने या स्पर्धेत २७ गोल नोंदवून धडाकेबाज खेळ केला होता, तर पाकिस्तानने १४ गोल केले होते. भारत-पाकिस्तानमधील हा १६७वा सामना होता. अंतिम लढतीतही गोलकीपर पी. आर. श्रीजेश खेळू शकला नाही आणि महत्त्वपूर्ण लढतीत महाराष्ट्राचा आकाश चिकटे संघात कायम राहिला.

दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. आघाडी घेऊन प्रतिस्पर्ध्यावर दबाव राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न होता. लढतीच्या सातव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण जसजितसिंग कुलरला यावर गोल नोंदविण्यात यश आले नाही. लढतीच्या बाराव्या मिनिटाला पाकिस्तानला आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. मात्र, महम्मद रिझवान ज्युनि.ला गोल करण्यात यश आले नाही. यानंतर भारतीय खेळाडूंनी चेंडूवर ताबा राखला खरा; पण त्यावर अचूक नियंत्रण राखता येत नव्हते. पहिल्या सत्राच्या अखेरच्या दोन मिनिटांसाठी रशिद महसूदला ग्रीन कार्ड मिळाल्याने पाकिस्तान दहा खेळाडूंसह खेळत होता. अखेरच्या दोन मिनिटांत दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली. पण दोन्ही संघांच्या गोलकीपरने आघाडी मिळणार नाही, याची काळजी घेतली. पहिल्या सत्रात गोलशून्यची कोंडी काही फुटली नाही. दुसऱ्या सत्रात भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर रुपिंदरपाल सिंगने (१८ मि.) पाकिस्तानचा गोलकीपर अमजद अलीला कुठलीही संधी न देता गोल नोंदविला आणि भारताला आघाडी मिळवून दिली. रुपिंदरला पेनल्टी स्पेशालिस्ट का म्हणतात, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याचा हा या स्पर्धेतील पेनल्टी कॉर्नरवर नोंदविलेला अकरावा गोल होता. याच्या तीन मिनिटांनंतर सरदारसिंगने निक्कीन थिम्मैयाकडे चेंडू सोपविला आणि निक्कीने तलविंदरला पास दिला. मात्र, तलविंदरने मारलेला रिव्हर्स हिटचा फटका क्रॉस बारच्या बाहेर गेला.

 लढतीच्या २३व्या मिनिटाला रमणदीपच्या पासवर अफन युसूफने गोल करून भारताची आघाडी २-०ने वाढवली. याच्या तीन मिनिटानंतर पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर अलिम बिलालने भारताचा गोलकीपर आकाशला चकवून गोल नोंदवला आणि पाकिस्तानचे खाते उघडले. अखेरच्या मिनिटांत भारताने वेळकाढूपणा केला. दुसऱ्या सत्रानंतर भारताकडे २-१ अशी आघाडी होती.

तिसऱ्या सत्राची सुरुवात काहीशी संथ झाली. भारताने अधिक वेळ चेंडूवर ताबा राखला होता. पण आक्रमक चाली रचल्या जात नव्हत्या. भारताने लाँग पासवर अधिक भर दिला. यातच लढतीच्या ३८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अली शानने भारताचा गोलकीपर आकाश चिकटेला चकवून गोल नोंदविला आणि पाकिस्तानला २-२ अशी बरोबरी साधून दिली. याच्या दोन मिनिटानंतर भारताने गोल नोंदविला; पण रिव्ह्यूनंतर सर्कलच्या बाहेरून कोथजितने केलेला हा गोल पंचांकडून नाकारण्यात आला. तिसऱ्या सत्राअखेर २-२ अशी बरोबरी कायम होती. चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. सुरुवातीलाच भारताला गोल करण्याच्या दोन सुरेख संधी मिळाल्या. पण गोल नोंदविण्यात भारताला यश आले नाही. यात तर निक्कीन थिम्मैयाला तर सुवर्णसंधी होती. मात्र, पुढच्याच मिनिटाला त्याने आपल्या चुकीची भरपाई केली. लढतीच्या ५१व्या मिनिटाला त्याने गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळाली. याच्या दोन मिनिटानंतर पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, या वेळी त्या संघाला भारताचा बचाव भेदता आला नाही. अखेरच्या दोन मिनिटांत भारताने हाराकिरी न करता विजय मिळवला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशभरात फटाक्यांमुळे वायू प्रदुषणाने ओलांडली धोक्याची पातळी

देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असली तरी दिवाळीतील फटाक्यांमुळे वायू प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सर्वाधिक प्रदुषण दिल्लीत असून मुंबई आणि पुण्यातही वायू प्रदुषणात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशभरात दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात आहेत. पण या फटाक्यांमुळे प्रदुषण वाढत असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. हवेतील धुलीकण (पीएम १०) आणि सूक्ष्मकण (पीएम २.५) चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीतून समोर आले आहे. दिल्लीतील यूएस दुतावास परिसरातील पीएम २.५ चे प्रमाण ९९९ पर क्यूबिक मीटर होते. तर आनंद विहारमध्ये हेच प्रमाण ७०२ पर क्यूबिक मीटर होते. मुंबईत पीएम २.५ चे प्रमाण ४९४, पुण्यात हेच प्रमाण ४०० पर क्यूबिक मीटर ऐवढे होते. शिवाजीनगर परिसरात पीएम १० चे प्रमाण २६८ ऐवढे होते. दिल्लीपाठोपाठ अहमदाबादमध्ये वायू प्रदुषणाने वायू प्रदुषणाची पातळी ओलांडली होती. अहमदाबादमध्ये पीएम २.५ चे प्रमाम ९९९ ऐवढे होते. हे प्रमाण मर्यादेपेक्षा १५ पट जास्त असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

मुंबईतील वायूप्रदुषणाची पातळी ही नवी मुंबई आणि दिल्लीपेक्षा कमी होती अशी माहितीसमोर आली आहे. हवेच्या प्रतवारीचे (एअर क्वालिटी इंडेक्स) प्रमाण जास्तीत जास्तीत ३३४ असणे अपेक्षित होते. नवी मुंबईत हे प्रमाण ३०९ तर नवी दिल्ली हे प्रमाण ३९४ ऐवढे होते. दिल्लीत वायू प्रदुषणात वाढ झाल्याने सकाळी रस्त्यावरील वाहतूक काहीशी मंदावली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात आंध्र-तेलंगण १, महाराष्ट्र ९ व्या स्थानी

उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा तसेच व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया अधिक सोपी सुटसुटीत करणा-या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन राज्ये संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आली आहेत. केंद्र सरकारने सोमवारी उद्योग-व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यांसंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला.

त्यामध्ये गुजरातने पहिले स्थान गमावले आहे. महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. गुजरातची थेट दुस-या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते. ३४० निकष लक्षात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांना ९८.७८ टक्के मिळाले. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. छत्तीसगड चौथ्या स्थानावर कायम आहे.

राज्यांची क्रमवारी
१) तेलंगण, आंध्रप्रदेश
२) गुजरात
३) छत्तीसगड
४) मध्यप्रदेश
५) हरयाणा
६) झारखंड
७) राजस्थान
८) उत्तराखंड
९) महाराष्ट्र

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हिलरींची आघाडी कायम!

मतदारांच्या पाठिंब्यात मात्र लक्षणीय घट
अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी आघाडी कायम राखली आहे. हिलरी यांना रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दोन टक्के अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याचे जनमत चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, क्लिंटन यांची आघाडी लक्षणीयरीत्या घटली आहे.

‘एबीसी न्यूज’/‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलेल्या ताज्या जनमत चाचणीतही डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत हिलरी यांना ४७ टक्के, तर ट्रम्प यांना ४५ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हिलरी क्लिंटन यांची ही आघाडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
गेल्या आठवडय़ात २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत हिलरी क्लिंटन यांना ५० टक्के, तर ट्रम्प यांना ३८ टक्के मतदारांनी पाठिंबा व्यक्त केला होता. ताज्या जनमत चाचणीत मात्र ट्रम्प यांनी आणखी ७ टक्के मतदारांची पसंती मिळवत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. याउलट हिलरी यांनी ३ टक्के मतदारांचा पाठिंबा गमावला आहे. हिलरी यांच्या ई-मेल गैरप्रकाराची चौकशी करण्याची घोषणा एफबीआयने करण्याच्या एक दिवस आधीच ही ताजी जनमत चाचणी करण्यात आली.

त्यात हिलरी यांची आघाडी कमी झाल्याचे स्पष्ट झाल्याने या लढतीबाबत उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

एफबीआयचा तपास त्रासदायक – हिलरी
परराष्ट्रमंत्रिपदावर असताना हिलरी यांनी खासगी ई-मेल सव्र्हरचा वापर केल्याच्या आरोपाबाबत एफबीआयने तपास करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर हिलरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चौकशीची वेळ अभूतपूर्व आणि त्रासदायक आहे, असे हिलरी यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मतदारांना पूर्ण माहिती मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, हाताशी जुजबी माहिती असूनही याबाबत गवगवा करण्यात येत आहे. एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनी याबाबत माहिती जाहीर करावी, असे आपण सांगितल्याचे हिलरी म्हणाल्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिस्पर्धी ट्रम्प हे याच प्रकरणाचा आधार घेऊन निराधार आरोप करीत असल्याचे हिलरी यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंबाजोगाई येथील लेणी होत आहेत दुलर्क्षित

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते.

 राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचा वापर होत असे. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नसल्याची धक्कादायक माहिती सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी दिली.
अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. बहामनी काळात हत्ती पाणी पिण्यासाठी या जागेचा वापर करत असे. पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी पाहण्याजोगे असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ््या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना मोकळ््या श्वासाची गरज असल्याचे मत कोठारी यांनी व्यक्त केले.

जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ््या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ््या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो.

 युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात.
 जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बुधवारी दिल्लीत करण्यात येणार आहे. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सर्व भाषांमधील पत्रकारितेसाठी हा मानाचा पुरस्कार दिला जातो. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, २०१५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २८ वर्गवारीतील विजेत्यांना, हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यांतून म्हणजेच काश्मीरपासून ते ईशान्येकडील भागांतून त्याचप्रमाणे मोठय़ा शहरातून आणि छोटय़ा खेडय़ातून देण्यात आलेल्या वृत्तांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भारत हा जितका वैविध्यपूर्ण आहे तितकाच जटिलही आहे हे पुरस्कारप्राप्त वृत्तांमधून अधोरेखित झाले आहे. ज्या प्रश्नांवर चर्चा होण्याची गरज आहे आणि ज्या प्रश्नांची चौकशी होण्याची गरज आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक कै. रामनाथ गोएंका यांचा वारसा जतन करण्यासाठी रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने २००५ मध्ये या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा एक मानबिंदू बनला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना आणि वैयक्तिक पातळीवरही या पुरस्काराने सन्मानित केले जाते. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या माध्यम, शोधक, राजकीय आणि क्रीडा पत्रकारिता, स्तंभलेखन आणि विश्लेषणात्मक लेखन आदी वर्गवारीसाठी पुरस्कार दिले जातात. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या वृत्तांमधून विजेत्यांची निवड करणे हे निवड मंडळासाठी एक आव्हानच असते. नेहमीप्रमाणेच वृत्ते अगदी उत्तम असतात, त्यामुळे त्यामधून निवड करणे कठीण होते. त्यामुळे त्यामधील नावीन्य आणि महत्त्व आणि त्याचा होणारा परिणाम पाहण्याचा आपण प्रयत्न करतो, असे निवड मंडळाचे सदस्य आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले.

देशातील हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असल्याने त्यांची व्यापकता अबाधित ठेवणे गरजेचे असते. त्यात सूक्ष्म पातळीवरील वार्ताकन ते विश्लेषण असा दोन्हींचा समावेश असतो. त्यात दोन्हींचा मिलाफ असणे गरजेचे आहे कारण येथे राष्ट्रीय विभागीय आणि स्थानिक पातळीवरील उत्कृष्ट कामाची निवड करायची असते, असे निवड मंडळाच्या सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार पामेला फिलिपोज यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तीन अंतराळवीर सुखरूप परतले

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरील (इंटरनॅशनल स्पेस सेंटर-आयएसएस) ११५ दिवसांचे वास्तव्य संपवून अमेरिका, जपान व रशियाचे अंतराळवीर रविवारी येथे सुखरूप परतले. अमेरिकेच्या केट रुबिन्स, रशियाचे अनातोली इव्हॅनिशीन आणि जपानचे ताकुया ओनिशी हे कझागस्तानच्या दक्षिणपूर्वेकडील झेजकागॅन गावात सोयुझ यानातून सुखरूप उतरले, असे रशियाच्या मिशन कंट्रोलने सांगितले.केट रुबिन्स व ओनिशी यांचा हा अंतराळातील पहिलाच प्रवास होता, तर फ्लाइट कमांडर इव्हॅनिशिन यांनी पाच वर्षांपूर्वी आयएसएस मोहिमेत भाग घेतला होता. आम्हा प्रत्येक जणाला खूपच छान वाटत असल्याचे इव्हॅनिशिन यांनी म्हटले. ते यानातून ते पहिल्यांदा बाहेर पडले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सलग दुस-या वर्षी सानिया ‘नंबर वन’

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप करणार आहे. सानिया व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीला डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस डब्ल्यूटीए स्पर्धेत सानियाला जेतेपद राखता आले नाही. पण ताज्या डब्ल्यूटीए क्रमवारीत मात्र तिने अव्वल स्थान कायम राखले आहे.

 क्रमवारीत
सलग दुस-या वर्षी महिला दुहेरीत अव्वल खेळाडू म्हणून ती वर्षाचा समारोप करणार आहे. गत चॅम्पियन सानिया-हिंगीस जोडीला उपांत्य फेरीत एकातेरिना माकारोव्हा व एलिना वेस्निना या जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

 सानियाच्या
नावावर ८१३५ मानांकन गुणांची नोंद आहे. तिची माजी सहकारी हिंगीस वर्षाचा शेवट चौथ्या स्थानावरील खेळाडू म्हणून करणार आहे. हिंगीस व सानिया संयुक्तपणे अव्वल स्थानी होत्या. पण अलीकडेच हिंगीसची क्रमवारीत घसरण झाली. दुस-या स्थानी फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया व ख्रिस्टिना म्लोदेनोव्हिच आहेत. सानियाने टिष्ट्वटरवर अव्वल असल्याचा आनंद व्यक्त केला. सानिया म्हणाली, ‘सलग दुस-या वर्षी अव्वल स्थानी कायम राहणे सन्मानाची बाब आहे.’ सानियाने यंदा हिंगीसच्या साथीने आॅस्ट्रेलियन ओपन व बारबोरा स्ट्राइकोव्हाच्या साथीने सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत जेतेपद पटकावले. आॅगस्ट महिन्यात सानिया हिंगीसपासून वेगळी झाली आणि चेक प्रजासत्तकच्या बारबोरासोबत जोडी बनविली. पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना २२ व्या स्थानी कायम आहे, तर लिएंडर पेसची एका स्थानाने घसरण झाली असून, तो ५६ व्या स्थानी आहे. पुरुष एकेरीत साकेत मिनेनीने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १९३ व्या स्थानी आहे. अव्वल २०० खेळाडूंमध्ये तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला एकमेव
खेळाडू आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताला एनएसजीमध्ये स्थान मिळाल्यास शांतता धोक्यात, पाकिस्तानचा कांगावा

भारताला अणू पुरवठादार गटात (एनएसजी) स्थान मिळाल्यास त्याचा परिणाम दक्षिण आशियाच्या सुरक्षेवर होईल, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. ‘भारताचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम शांततेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे भारताला अणू पुरवठादार गटात स्थान देण्यात येऊ नये,’ असे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारताला अणू पुरवठादार देशांच्या गटात स्थान मिळू नये, म्हणून पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ‘२००८ मध्ये अणू पुरवठादार गटाने भारताला सूट दिली होती. त्यामुळे भारताला अण्वस्त्र उभारणी करण्यास मदत झाली. भारताने यानंतर आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी म्हटले आहे.

‘भारताने अण्वस्त्र निर्मितीला वेग दिल्याने जागतिक अण्वस्त्र प्रसार बंदीच्या अभियानाला धक्का बसला आहे. यामुळे या अभियानाच्या विश्वासार्हतेवरच परिणाम झाला आहे. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे या अभियानाच्या प्रभावालादेखील सुरुंग लागला आहे. या सगळ्याचा दक्षिण आशियातील संतुलनावर नकारात्मक परिणाम होतो आहे’, असेही नफीस जकारिया यांनी म्हटले आहे.

‘भारताकडून अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम जोमाने राबवला जातो आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्याला धोका आहे,’ असेदेखील नफीस यांनी म्हटले आहे. भारताला अणू पुरवठादार देशांच्या गटात स्थान मिळू नये, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यात चीनकडूनही पाकिस्तानला मदत केली जाते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा