#eMPSCkatta_Current_Affairs
🔹उपेक्षित नोबेल विजेत्याचा पाक पुन्हा सन्मान करणार
इस्लामाबाद - सुमारे 36 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने पाकिस्तानला पहिले नोबेल मिळवून दिले आणि आजतागायत पाकिस्तान त्या उपेक्षित व्यक्तीचा तिरस्कार करत होता , त्या व्यक्तीचा पाकिस्तान आता सन्मान करणार आहे .
पाकिस्तानमधील कायदे ए आझम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाला भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर दिवंगत अब्दुस सलाम यांचे नाव देण्याची योजना तयार केली जात आहे . गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान या शास्त्रज्ञाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत होते कारण ते अहमदी समाजातील होते. पाकिस्तानच्या कायद्यानुसार अहमदी नागरिकांना स्वत : ला मुसलमान म्हणण्याचा अधिकार नाही. सलाम हे केवळ पहिले पाकिस्तानी नाही तर नोबेल जिंकणारे ते पहिले मुस्लिम होते. मात्र , अहमदिया मुसलमान असल्याने पाकिस्तान त्यांना मुस्लिम मानत नव्हते . मात्र , पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले , की इस्लामाबादच्या कायदे ए आझम विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर फिजिक्स या विभागाला सलाम यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . पंतप्रधानांनी शिक्षण मंत्रालयालादेखील औपचारिक प्रस्ताव करण्याचे निर्देश दिले असून , जेणेकरून पाकिस्तानच्या अध्यक्षांची परवानगी घेतली जाईल .
अब्दुस सलाम यांना नोबेल
अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टिव्हन वाइनबर्ग यांच्यासह संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते . देवकण शोधण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला होता आणि हा शोध शंभर वर्षांतील सर्वांत मोठे यश मानले जात होते . मात्र , पाकिस्तानने आजपर्यंत या संशोधनाची कधीही कदर केली नाही . एवढेच नाही तर पाकिस्तानातील कट्टरपंथीयाच्या दबावामुळे नोबेलविजेते असूनही आपल्या कार्यकाळात त्यांना विद्यापीठात अध्यापनाचे कार्यदेखील करू दिले नाही . 1974 मध्ये एका कायदा करून अहमदियांना मुस्लिमेतर म्हणून जाहीर केले होते . 1984 साली पुन्हा एकदा कायदा तयार करण्यात आला आणि त्यानुसार जर एखादा अहमदी स्वत : ला मुस्लिम म्हणत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते . त्यामुळे अब्दुस यांचा शोध आयुष्यभर पाकिस्तानात दुर्लक्षित राहिला .
पाकिस्तानातील रबाव शहरात अब्दुस सलाम यांना दफन केलेले आहे . या शहरात अहमदी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे . त्यांच्या कबरीवर नोबेल जिंकणारे पहिले मुसलमान असा उल्लेख करण्यात आला होता ; परंतु अधिकाऱ्यांनी मुसलमान हा शब्द खोडून काढला.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹इस्रोच्या 'रिसोर्ससॅट-२ए' चे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोने आज सतीश धवन अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-२ए चे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी १०.२४ वाजता पीएसएलव्ही-सी३६ च्या मदतीने इस्रोने हा उपग्रह अंतराळात सोडला. हा रिसोर्ससॅट-१ आणि २ च्या
मालिकेतला उपग्रह आहे.
हा १.२३५ किलो वजनाचा उपग्रह जमीनीतील साधनांची माहिती देणार आहे. उदाहरणार्थ, भारताची वनसंपदा आणि जलसंसाधने, खनिजांची माहिती घेणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. हा उपग्रह ५ वर्षे सेवा देणार आहे. पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर तो फिरत राहणार आहे.
अंतराळ मोहिमांमधली भारताची ही मोठी कामगिरी आहे.
यापूर्वीचे रिसोर्ससॅट १ आणि २ अनुक्रमे २००३ आणि २०१२ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. पीएसएलव्ही रॉकेटचे एक्सएल व्हर्जन यासाठी वापरण्यात आले आहे. १९९४ पासून २०१६ पर्यंत १८ वर्षांत पीएसएलव्हीच्या माध्यमातून ३६ यशस्वी प्रक्षेपणांतून १२१ उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे. यापैकी ७९ उपग्रह परदेशी होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹ट्रम्प ठरले टाइम 'पर्सन ऑफ द इयर'
अमेरिकेचे नवनिवर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टाइम मासिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर २०१६' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी त्यांची लढत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अन्य देशांचे अध्यक्ष आणि कलाकारांसोबत होती. टाइम मासिकाने आपल्या वेबसाइटवर याची घोषणा केली.
वर्षभरात विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यंदा 'टाइम पर्सन ऑफ द इयर' म्हणून वाचकांनी पंतप्रधान मोदींना पसंती दिली होती. त्यांना सर्वाधिक १८ टक्के मते मिळाली होती. तर ट्रम्प आणि असांज यांना केवळ ७ टक्के मते मिळाली होती. टाइम मासिकाकडून गेल्या ८९ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. सर्वप्रथम १९२७मध्ये चार्ल्स लिंडबर्ग यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिकवरून विमान प्रवास केला होता.
यंदा या पुरस्काराच्या शर्यतीत ट्रम्प यांच्यासह हिलरी क्लिंटन आणि अन्य १० जण होते. 'पर्सन ऑफ द इयर २०१६' च्या यादीत हिलरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर द हॅकर हा ग्रुप तिस-या स्थानी आहे.
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याची ट्रम्प यांची पहिली वेळ नाही. आतापर्यंत १० वेळा ट्रम्प यांचा फोटो टाइमच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला आहे. सर्वप्रथम १९८९मध्ये त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. गेल्यावर्षी हा पुरस्कार जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना मिळाला होता.
वाचकांच्या पसंतीचा विचार केल्यास यंदा हा पुरस्कार मोदींना मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार कोणाला द्यायचा याचा निर्णय टाइम मासिकाच्या संपादकाद्वारे घेतला जाते. वाचकांनी या पुरस्कारासाठी ज्यांची निवड केली आहे. त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो असे नाही.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹RBI कडून रेपो दरात बदल नाही, कर्जांचे व्याजदर कायम राहणार
रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे तूर्त तरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एकीकडे नोटांबदीमुळे रोकडेची चणचण तर दुसरीकडे कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सामान्य लोक दुहेरी अडचणीत सापडणार आहेत. दरम्यान, रेपो दरात कोणताही बदल न झाल्यामुळे रिव्हर्स रेपो दरही ५.७५ टक्के इतकाच राहणार आहे.
यावेळी रिझर्व्ह बँकेकडून विकासदराच्या यापूर्वी वर्तविलेल्या अनुमानातही बदल करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.६ टक्के राहील इतका अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता त्यामध्ये बदल करून विकासदर ७.१ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्के इतका राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तविली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या
प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पण भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने चक्क पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही.
अश्वथ हेगडे हा उद्योजक मुळचा मंगलोरचा पण सध्या कतारमध्ये राहतो. त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेटेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. ३ रुपयांच्या आसपास त्या पिशव्या बाजारात उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.
या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळतील असा दावा हेगडे यांनी केला आहे. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्या तरी त्यांना अपाय होणार नाही असेही हेगडेंनी सांगितले आहे. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, हेगडे यांना भारत प्लास्टिकमुक्त बनवायचा आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹संघर्ष थांबल्याने बिबटय़ांत वाढ
१९९५ सालापर्यंत बिबटय़ाचे दर्शन हे केवळ अकोले तालुक्यात होत असे. भंडारदरा धरणाकडे जातांना त्याचे दर्शन झाले की, पर्यटक सुखावत. पण तेथील जंगलात त्यांना भक्ष्य व पाणी याची टंचाई जाणवू लागल्याने त्याने आपला अधिवास बदलला. गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांच्या कडेला असलेले उसाचे फड त्याला अधिक भावले. त्याचा अधिवास हा हळूहळू सरकत सरकत श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासे, संगमनेर या तालुक्यात झाला. १९९४ मध्ये जुन्नर भागात पहिल्यांदा बिबटय़ा मानवी वस्तीजवळ आढळल्याने त्याला वनखात्याने िपजरा लावून पकडले. पण २००३ पासून तो कुठे ना कुठे आढळतो. गावाच्या आजूबाजूच्या वस्त्यांवर शेळ्या, मेंढय़ांवर ताव मारण्यासाठी रात्री तो जातो. मग गावकरी वनखात्याला कळवून िपजरा लावण्यास सांगतात. पिंजऱ्यात बिबटय़ा अडकला की, गावकरी समाधानी होतात.
उसाच्या फडाची गोडी का?
पूर्वी जंगल व शेतीचा भाग या दरम्यान मोकळी जमीन (कॉरिडॉर) मोठय़ा प्रमाणावर होती. त्यात गवत व झुडपे असत. त्याला शिकारही सहजासहजी मिळत असे. पण १९९८ नंतरच्या काळात या मोकळ्या पडीक जमिनीत शेती केली जाऊ लागली. तेथे माणसांचा वावर जसा वाढला तसा तो असुरक्षित बनला. त्याला शिकारही मिळत नसे. त्यामुळे त्याने टप्प्याटप्प्याने अधिवास बदलण्यास सुरुवात केली. भीमाशंकर व अकोल्याच्या जंगलातून तो हळूहळू उसाच्या फडातून खालच्या भागात सरकू लागला. सुरुवातीला त्याच्याबद्दल लोकांना भीती होती. त्यामुळे माणूस व बिबटय़ा संघर्ष झाला. पण नंतर बिबटय़ाने बदललेल्या अधिवासातील पर्यावरणाशी जुळवून घेतले. आता पूर्वीसारखे लोक गावात राहत नाहीत. शिवारातील शेतरस्त्यांच्या कडेला वस्त्या टाकून ते राहतात. तेथे कुकूटपालन, शेळीपालन व गायी, म्हशींचा जोडधंदा करतात. त्यामुळे गावालगत शिवारातील मानवी वस्तीजवळच्या फडाला अधिक प्राधान्य दिले. उसात उंदीर, घुशी, रानमांजर, डुक्कर, मुंगूस, ससे हे प्राणी त्याला खाण्यासाठी उपयोगी पडू लागले. बिबटय़ाची मादी ही फडातच पिलांना जन्म देते. ते अधिक सुरक्षित असते. तिची उसात पिले आढळली की, शेतकरी तिकडे काही दिवस फिरकत नाही. अत्यंत सुरक्षित असा निवारा उसातच पिलांना मिळतो.
कायद्याबाबतचे ज्ञान वाढले
लोकांमध्ये वन्यप्राण्यांची हत्या केली की, शिक्षा होते. या कायद्याबद्दलचे ज्ञान वाढले आहे. तसेच बिबटय़ा आला की, वनखाते िपजरा लावते. तो पकडून नेऊन जंगलात सोडून देते. यावर विश्वास वाढीला लागला आहे. आता पाळीव प्राणी बिबटय़ाने खाल्ले की, वनखाते भरपाई देते. एका शेळीला ६ हजार, जखमी शेळीला ३ हजार, गायीच्या कालवडीला १० हजार रुपये मिळतात. बिबटय़ाने माणसांवर हल्ला केल्याच्या मोजक्याच घटना घडल्या असून त्यामध्ये त्यांना आíथक मदतही मिळते. तसेच वस्तीवर बिबटय़ा आला की, आरडाओरडा केला, फटाके वाजविले की, तो पळून जातो. त्याच्या पासून आता जिवाला फारशी भीती राहिलेली नाही, असा विश्वास लोकांमध्ये बळावला आहे. साहजिकच बिबटय़ांच्या हत्या होण्याचे प्रमाणही थांबले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्य़ात शंभराहून अधिक बिबटे हे उसाच्या फडात असल्याचा वनखात्याचा दावा आहे. त्याखेरीज पकडलेले काही बिबटे हे माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवाराकेंद्रात आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जयललितांचे विश्वासू सल्लागार चो रामास्वामी यांचे निधन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सल्लागार श्रीनिवास अय्यर रामास्वामी उर्फ चो यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आज सकाळी ४.१५च्या सुमारास त्यांनी अपोलो रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, उपहासात्मक लेखक, भाजपचे माजी राज्यसभा खासदार अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या होत्या. त्यांना गेल्या आठवड्यात छातीत दुखत असल्याने अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी आलेल्या हदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाहीत. चो हे जयललिता यांचे अत्यंत भरवश्याचे सल्लागार आणि विश्वासून साथीदार म्हणून ओळखले जात. तुघलक या राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुराही त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना ‘राजगुरु’ असे संबोधत. ऑगस्ट २०१५ साली जेव्हा रामास्वामी रुग्णालयात दाखल होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, काल संध्याकाळी जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर तमिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹संजय गांधी नॅशनल पार्क आता ‘इको सेन्सिटिव्ह’
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशान्वये ५९.४६ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी १९.२५ चौरस किलोमीटर क्षेत्र वनजमिनीत येते. ४०.२१ चौरस किलोमीटर क्षेत्र बिगर वनजमीन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून किमान १०० मीटर आणि कमाल ४ किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन करणे हे आदेश जारी करण्यामागील उद्देश असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. उद्यानातील बिबट्यांची घटती संख्या, बिबट्यांचा लोकवस्तीमध्ये वाढलेला वावर, लगतची वस्ती आणि वनसंपदेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक संस्था, मुंबई पालिका, मेट्रो रेल कॉर्पोरेशनसह उर्वरित प्राधिकरणांकडून ‘इको सेन्सिटिव्ह झोन’बाबत सूचना आल्या होत्या. तर मेट्रो कारशेडसाठी येथील १.६५ चौ. कि. परिसराचा समावेश आहे. यासह काही मंदिरांचा परिसरही ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मधून वगळला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हा निर्णय अन्यायकारक आहे. एकीकडे देशभर नागरीकरण वाढत असताना मुंबईसारख्या महानगरात काही किलोमीटरचा परिसराचा समावेश इको सेंसेटीव्ह झोनमध्ये करणे परवडणारे नाही. शहरांना लागू असणारी अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानांभोवती काही मीटरपर्यंतचा परिसर संरक्षित करणे समजू शकतो. मात्र काही किमी भाग संरक्षित करणे अन्यायकारक असल्याचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. पर्यावरण मंत्रालयाचा हा निर्णय आम्हाला अमान्य असून ८ डिसेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीत त्याला तीव्र विरोध करणार असल्याचेही गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>‘निर्णयाने पर्यावरणाची हानी’
पर्यावरणतज्ज्ञ डी. स्टॅलिन यांनी यासंदर्भात सांगितले की, एकीकडे आपण पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलने करतो. दुसरीकडे सरकार वनक्षेत्रांसह लगत बांधकामांसाठी मंजुरी दिली जाते, हे चुकीचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-३ चे कारशेड येथे उभारण्यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. झाडे तोडण्यासाठी परवानगी लागणार आहे.
वनविभागावर केंद्राने लक्ष ठेवणे गरजेचे असताना स्थानिक प्राधिकरणे म्हणजे पालिकेच्या ताब्यात असे भूखंड देणे योग्य नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फुलांच्या
८००, सस्तन प्राण्यांच्या ४५, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४३, सर्पाच्या ३८, उभयचरांच्या १२, पक्ष्यांच्या ३०० आणि फुलपाखरांच्या १५० प्रजाती असल्याची नोंद आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मध्य प्रदेशातील सफेद वाघिणीचा मृत्यू
मुकुंदपूरमधील जगातील पहिली व्हाइट टायगर सफारी पार्कमधली सफेद वाघीण राधा हिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. पार्कमधील एका वाघाने केलेल्या हल्ल्यात राधा वाघीण गंभीर जखमी झाली होती, यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राधा वाघीण आजारी होती. तिने खाणे-पिणे सोडले होते. प्राणीसंग्रहालयातील डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांना यश आले नाही. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती खालावली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
बुधवारी पर्यटकांसाठी सफारी पार्क बंद
पार्कमधील सफेद वाघीण राधाच्या मृत्यूनंतर तिला दफन करण्याच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्राणीसंग्रहालय आणि सफारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राधा वाघिणीवर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी एका वाघाने केला हल्ला
सफारी पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी राधाला रॉयल बंगाल टायगर नकुलसोबत सोडण्यात आले होते. यावेळी त्याने राधावर हल्ला केला, ज्यात ती गंभीर जखमी झाली. तेव्हापासून राधाच्या प्रकृतीत बिघाड सुरू झाल्याचे कळते आहे.
भिलाईमध्ये झाला होता राधाचा जन्म
राधा वाघिणीचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथील मैत्रिबाग प्राणीसंग्रहालयात 29 नोव्हेंबर 2011मध्ये झाला होता. तिला मुकुंदपुरात रघु नावाच्या सफेद वाघासोबत आणण्यात आले होते. याकाळात राधा आणि रघुला सफारी पार्कमध्ये एकत्र सोडण्यात आले होते. जेणेकरुन दोघांच्या मिलनामुळे सफेद वाघांच्या प्रजातींची संख्या वाढण्यास मदत होईल.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹व्हिएतनामच्या वैमानिकांना सुखोईचे प्रशिक्षण देणार भारत
चीन होऊ शकतो नाराज : व्हिएतनामला भारताकडून लष्करी मदतीचा प्रस्ताव
पुढील वर्षापासून भारत व्हिएतनामच्या लढाऊ वैमानिकांना ‘सुखोई-30 एमकेआय’च्या उड्डाणाचे प्रशिक्षण देणार आहे. भारत आधीच व्हिएतनामच्या नौदलाला किलो-क्लास पाणबुडीच्या कार्यान्वयनाचे प्रशिक्षण देत आहे. भारत आणि व्हिएतनाममधील वाढत्या जवळीकीमुळे चीन चिडू शकतो. दक्षिण चीन समुद्र वादामुळे व्हिएतनाम आणि चीनचे संबंध बिघडले आहेत.
व्हिएतनामच्या लढाऊ वैमानिकांना सुखोई विमानाच्या उड्डाणाचे प्रशिक्षण देण्याशी संबंधित करार सोमवारी झाला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल एन. जुआन लिच यांनी या करारावर स्वाक्षऱया केल्या. जनरल लिच 30 सदस्यी लष्करी शिष्टमंडळासोबत 3 दिवसांच्या भारत दौऱयावर आले आहेत. त्यांच्यासोबत व्हिएतनामचे हवाईदल आणि नौदल प्रमुख देखील आले आहेत. या करारावर 2013 सालीच सहमती बनली होती, परंतु काही कारणांमुळे करार होऊ शकला नव्हता.
सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदींच्या व्हिएतनाम दौऱयावेळी या कराराला अंतिम रुप देण्याची तयारी झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमध्ये 2007 साली झालेली द्विपक्षीय ‘सामरिक भागीदारी’ आणखी पुढे नेण्यावर सहमती झाली होती. प्रत्यक्षात आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे भारत आणि व्हिएतनाम दोघेही चिंतित आहेत आणि हळूहळू लष्करी प्रशिक्षण आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य पुढे नेत आहेत. याचबरोबर दोन्ही देश दक्षिण चीन समुद्रात संयुक्तरुपाने तेल शोधण्याची मोहीम चालवत आहेत.
भारत आणि व्हिएतनामचे संरक्षण सचिव 2017 च्या प्रारंभी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्हिएतनाम दौऱयात त्या देशाला 50 कोटी डॉलर्सची लष्करी मदत देण्याची घोषणा केली होती. दोन्ही देशांचे संरक्षण सचिव आपल्या भेटीत ही रक्कम खर्च होणारे प्रकल्प आणि उपकरणांची निवड करतील.
भारताने व्हिएतनामला ब्राह्मोस स्वनातीत आंतरखंडीय क्षेपणास्त्र देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय भारताने व्हिएतनामला पाणबुडीविरोधी पाणतीर वरुणास्त्र आणि इतर लष्करी उपकरणे आणि सॉफ्टवेअरच्या निर्यातीचा प्रस्ताव सादर केला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹‘डिजिटल अर्थव्यवस्थे’साठी ‘विसाका’
‘डिजिटल अर्थव्यवस्थे’बाबत पुरेशी जागृती न झाल्यामुळे ‘नोटाबंदी’नंतर सर्वसामान्यांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी देशभरातील विद्यापीठांच्या माध्यमातून ‘वित्तीय साक्षरता कार्यक्रम’ (विसाका) राबवून जनजागृती करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला आहे. याअंतर्गत देशभरातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांना कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशांनुसार, १२ डिसेंबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या कालावधी युजीसीअंतर्गत येणार सर्व विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांना ‘विसाका’ राबवायचा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाअंतर्गत प्राध्यापक आणि तज्ज्ञांनी डिजिटल अर्थव्यवस्थेचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. तसेच त्यांना अधिकाधिक व्यवहार कॅशलेस करण्यास उद्युक्त करायचे आहे. महाविद्यालयांचे कॅम्पस तर पूर्णत: कॅशलेस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून तयार झालेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रचार करण्यासही युजीसीने सूचित केले आहे. विसाका राबविण्यासाठी युजीसीने ७ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे. स्वयंसेवकांची निवड करण्यापासून ते विविध मंडर्इंमध्ये भेटी देण्यापर्यंत आणि अंतिम अहवाल तयार करण्यापर्यंत सर्व कार्यक्रम तारखेनिहाय आखून देण्यात आला आहे.
>कामांची माहिती वेळोवेळी यूजीसीला द्या
एनसीसी आणि एनएसएस यांसारख्या उपक्रमांद्वारे सेवाकार्यात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाची माहिती देऊन, त्यांच्या माध्यमातून मंडई, दुकाने आदी ठिकाणी डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच हा उपक्रम तातडीने राबवून याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती वेळोवेळी युजीसीला देण्यात यावी, अशा सूचनाही युजीसीने विद्यापीठांना सोमवारी पाठविलेल्या पत्रातून करण्यात आल्या आहेत.
>पुरस्कार देणार
‘विसाका’ उपक्रम प्रभावीपणे राबवून डिजिटल अर्थव्यवस्थेस हातभार लावणाऱ्या शैक्षणिक संस्थेला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.पुरस्कार देणार
‘विसाका’ उपक्रम प्रभावीपणे राबवून डिजिटल अर्थव्यवस्थेस हातभार लावणाऱ्या शैक्षणिक संस्थेला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹विदेशी गुंतवणूक ३00 अब्ज डॉलरपार
एप्रिल २000 ते सप्टेंबर २0१६ या काळात ३00 अब्ज डॉलरच्या विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) टप्पा भारताने
ओलांडला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताची विश्वासार्हता त्यामुळे सिद्ध झाली आहे.
या काळात ३0 टक्के एफडीआय मॉरीशस मार्गे आली आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यात दुहेरी कर टाळण्यासंबंधीचा करार झालेला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी मॉरीशसमार्गे गुंतवणूक आली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. प्राप्ता माहितीनुसार, एप्रिल २000 ते सप्टेंबर २0१६ या काळात १0१.७६ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक मॉरिशस मार्गे आली.
तसेच या काळात एकूण थेट विदेशी गुंतवणूक ३१0.२६ अब्ज डॉलर भारतात आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत २१.६२ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली. सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँडस येथूनही मोठ्या प्रमाणात थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
>गुंतवणूकदारांचे भारताला प्राधान्य
औद्योगिक संघटना फिक्की आणि सीआआय यांनी एफडीआयने ३00 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन नेवतिया यांनी सांगितले की, धोरणात्मक चौकटीचे शिथिलीकरण तसेच मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया यांसारखे उपक्रम आणि स्पर्धात्मकतेत झालेली वाढ यामुळे जगातील गुंतवणूकदारांनी भारताला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात एफडीआय प्रवाह आणखी वाढेल.
>अर्थव्यवस्था स्थिर आहे म्हणून...
सीआआयने म्हटले की, गेल्या दोन वर्षांत एफडीआय प्रवाह वाढला आहे. येणाऱ्या काळातही भारत गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण म्हणून आपले स्थान कायम राखील.
जागतिक अर्थव्यवस्था अस्थीर असताना भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भारताकडे गुंतवणुकीचे सुरक्षित ठिकाण म्हणून पाहात आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹म्यानमारकडून ओएनजीसी नैसर्गिक वायू आयात करणार
ओएनजीसी या सरकारी तेल आणि भूगर्भ वायू कंपनीने म्यानमारकडून नैसर्गिक वायू आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. अदलाबदलीच्या स्वरुपात (स्वॅप डील) ही आयात करण्यात येणार आहे. रशिया, चीन आणि म्यानमार या देशांचा यात समावेश असेल. यासंबंधीची प्राथमिक बोलणी सुरू आहेत, असे ओएनजीसीकडून स्पष्ट करण्यात आले. रशियाने आपल्याकडील नैसर्गिक वायू चीनला देणे, त्या मोबदल्यात आपल्याकडील नैसर्गिक वायू म्यानमारला देणे आणि तो म्यानमारकडून भारताला मिळणे, असे या योजनेचे स्वरुप आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मुंबईतील सीएसटी स्थानकाच्या नावात बदल
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही नावात पुन्हा बदल केला जाणार आहे. यापुढं या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केला जाईल.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शिवेसना-भाजप युती सरकारच्या काळात मध्य रेल्वेवरील व्हिक्टोरिया टर्मिनस स्थानकाचे नामांतर 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' तर, सहार विमानतळाचं नाव 'छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं करण्यात आलं होतं.
मात्र, या नावांमध्ये शिवरायांची ओळख असलेला व त्यांच्याप्रती आदर दाखवणारा 'महाराज' हा शब्द नव्हता. तो उल्लेख करण्यासाठी ही नावं बदलण्यात आली आहेत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कोल्हापूर: महापौरपदी NCPच्या हसीना फरास
कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास यांची आज बहुमताने निवड झाली तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने निवडून आले.
कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लिम महिला महापौर झाल्या. फरास यांना ४४ तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना ३३ मते मिळाली. शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹राज्यात मागासवर्गीय आयोग स्थापन करणार
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मागासलेल्या समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. राज्यात सध्या हा आयोगच अस्तित्वात नसल्याने राज्य मागासवर्गीय आयोगाची घोषणा राज्य सरकार लवकरच करेल, असे समजते.
मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत. यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणीही सुरू आहे. राज्य सरकारने मंगळवारी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. १४ डिसेंबरला नागपूर येथे मराठा क्रांती मोर्चा विधानभवनावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने तातडीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेची मागणी केलेली नसतानाही राज्यातील सत्ताधारी पक्षातर्फे बुधवारी मराठा आरक्षणासंदर्भांतील प्रस्ताव मांडण्यात आला, तसेच त्यावर चर्चाही सुरू झाली आहे.
राज्यातील एखाद्या समाज घटकाला आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या आरक्षण हवे असेल तर याबाबतची मागणी राज्य मागासवर्गींय आयोगाकडे करावी लागते. हा आयोग संबंधित समाज घटकांच्या मागण्यांचा, त्यांनी दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करतो, त्यानंतर या समाजाला आरक्षण द्यावे की नाही, याबाबतची शिफारस राज्य सरकारला करते. त्या शिफारशीची अंमलबजावणी करणे राज्य सरकारवर बंधनकारक असते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹डिजिटल पेमेंट करणा-यांना स्वस्तात पेट्रोल, रेल्वे तिकिट – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
नोटाबंदीला एक महिना झाल्यानंतर आता केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी सवलतींची घोषणा केली आहे. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करणा-यांना आता स्वस्तात पेट्रोल, डिझेल तसेच रेल्वे तिकिट मिळणार आहे. याशिवाय सर्वसाधारण विमा, आयुर्विमा ऑनलाइन घेतल्यास किंवा रेल्वेचे पास डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून काढल्यास सूट मिळणार आहे.
गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय अरुण जेटली यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नोटाबंदीच्या निर्णयाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून महिनाभरानंतर जेटली यांनी आता कॅशलेस व्यवहारांवर भर देणार असल्याचे जाहीर केले. नोटाबंदीला नागरिकांकडून समर्थन मिळत असून नोटाबंदीच्या माध्यमातून आम्ही रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले.
देशभरात दररोज साडे चार कोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेल खरेदी करतात. दररोज १,८५० कोटी रुपयांच्या पेट्रोल आणि डिझेलची खरेदी विक्री होते. नोटाबंदीनंतर या पेट्रोल डिझेलसाठी डिजिटल पेमेंट करणा-यांचे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले असे जेटली यांनी सांगितले. केंद्र सरकार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ई वॉलेटच्या माध्यमातून होणा-या व्यवहारांना चालना देत असल्याचे जेटली यांनी नमूद केले. नोटाबंदीच्या निर्णयाला महिना पूर्ण झाला असून गेल्या ३० महिन्यांत आम्ही अनेक बदल बघितले आहेत. आता कॅशलेस सोसायटी हेच आमचे ध्येय असल्याचे जेटली म्हणालेत. या पत्रकार परिषदेत जेटलींनी महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत.
> डिजिटल पेमेंट केल्यास पेट्रोल, डिझेलवर ०.७५ टक्क्यांची सूट
पेट्रोल आणि डिझेलसाठी डिजिटल पेमेंट केल्यास ०.७५ टक्क्यांची सूट मिळेल अशी घोषणा जेटली यांनी केली आहे. नोटाबंदीनंतर पेट्रोलपंपावरील डिजिटल पेमेंटचे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले आहे. यात आणखी ३० टक्क्यांची भर पडू शकते असा सरकारचा अंदाज आहे. यामुळे पेट्रोल पंपावर दरवर्षी लागणारे २ लाख कोटी रुपये वाचतील असे सरकारने म्हटले आहे.
> १ लाख गावांमध्ये २ पीओएस मशिन
ग्रामीण भागातही डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्र सरकार नाबार्डची मदत घेणार आहे. १० हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या १ लाख गावांमध्ये २ पीओएस (स्वॅप मशिन) दिली जाणार आहे. या निर्णयाचा फायदा १ लाख गावांमधील ७५ कोटी जनतेला होणार आहे.
> ४ कोटी ३२ लाख शेतक-यांना रुपे कार्ड देणार
नाबार्ड आणि ग्रामीण व सहकारी बँकांच्या माध्यमातून देशभरातील ४ कोटी ३२ लाख शेतक-यांना रुपे किसान कार्ड दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड धारकांनाच हे रुपे कार्ड दिले जाईल.
> डिजिटल पेमेंटद्वारे मासिक, त्रैमासिक पास काढणा-यांना ०.५० टक्क्यांची सूट
उपनगरीय रेल्वेसेवेतील (लोकल ट्रेन) प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास डिजिटल माध्यमातून काढल्यास ०.५० टक्क्यांची सूट मिळेल असे जेटली यांनी सांगितले. १ जानेवारी २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. उपनगरीय रेल्वेमध्ये ८० लाख प्रवासी मासिक किंवा त्रैमासिक पास काढतात. यामध्ये दरवर्षी २ हजार कोटी रुपयांची रोख रक्कम लागते. मात्र प्रवासी डिजिटल पेमेंटकडे वळल्यास दरवर्षी १ हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेची बचत होईल असे सरकारचे म्हणणे आहे.
> रेल्वेचे ऑनलाइन तिकिट काढणा-या प्रवाशांना १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार.
>रेल्वेतर्फे दिल्या जाणा-या कॅटरिंग, निवास व्यवस्था, आराम कक्ष अशा सुविधांसाठी डिजिटल पेमेंट करणा-यांना ५ टक्के सूट मिळणार.
> आरएफआयडी किंवा फास्ट टॅगच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर टोल भरल्यास १० टक्के सूट
> ऑनलाइन सर्वसाधारण विमा घेतल्यास १० टक्के तर आयुर्विमासाठी ८ टक्के सूट
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹४०० राजकीय पक्षांनी निवडणूका लढविल्याच नाहीत
राजकारणात नशीब अजमाविण्यासाठी जो तो उठतो आणि राजकीय पक्ष स्थापन करतो. त्यामुळे मुख्य निवडणुक आयोगाकडे १९ हजार राजकीय पक्षांची नोंद झालेली आहे. मात्र देशातील या १९ हजार राजकीय पक्षांपैकी तब्बल ४०० राजकीय पक्षांनी कधीच निवडणुका लढविल्या नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठीच या राजकीय पक्षांची स्थापना केली जात असल्याची शंका मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्षांची नोंदणी करुन कधीच निवडणूका न लढविणाऱ्या या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.त्या दृष्टीने या पक्षांना राजकीय पक्षांच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे झैदी यांनी सांगितले. या पक्षांना मिळणाऱ्या देणगीवर आयकरातून सुट मिळते. ही सवलत मिळू नये म्हणून त्यांना राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोग दरवर्षी छाननी करुन राजकीय पक्षांना डच्चू देत असते. या पक्षांना पुन्हा नोंदणी करता येईल काय? असा प्रश्न त्यांना केला असता नोंदणीची प्रक्रिया खुप दीर्घ असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या राजकीय पक्षांना भविष्यात पुन्हा नोंदणी करता येईल. परंतू सध्या तरी नेहमीच्या अनियमिततेमुळे कधीच निवडणूका न लढविणाऱ्या या राजकीय पक्षांवर त्वरित कारवाई करण्यात येत आहे,असे ते म्हणाले. कधीच निवडणूका न लढविणाऱ्या राजकीय पक्षांची यादी तसेच या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या अनूदान, देणग्यांचा तपशील पाठविण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगांना दिले आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹दीपिका ठरली सर्वात ‘मादक’ आशियायी सौंदर्यवती
बॉलिवूडमधून हॉलिवूडच्या चित्रपटात प्रियांकाला टक्कर देणाऱ्या दीपिकाने आणखी एक मिरविला आहे. दीपिकाने प्रियांकाला मागे टाकत “सेक्सिएस्ट एशियन वुमन” चा किताब पटकविला आहे. आपल्या सौंदर्याची जादू बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये दाखवून देणाऱ्या दीपिकाने पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळविला आहे. मागील दोन वर्षापासून या पुरस्कारासाठी प्रियांकाची वर्णी लागत होती. प्रियांकाला धोबी पछाड करत दीपिकाने यंदाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ब्रिटन स्थित वर्तमानपत्र ‘इस्टर्न आय’च्या सौजन्याने दरवर्षी आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या सौंदर्यवतीला या पुरस्काराने गोरविण्यात येते.
आशियातील सर्वाधिक सौंदर्यवतीची निवड करण्यासाठी इस्टर्न आय च्या वतीने जनमत कौल घेण्यात आला होता.यामध्ये दीपिकाने सर्वाधिक मते मिळविली. मागील दोन वर्षापासून या पुरस्कारावर कब्जा करणाऱ्या प्रियांकाला जनमत कौलच्या निकालानुसार दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जवाई राजा या मालिकेमध्ये रोशनी खुरानाची भूमिका साकारणाऱ्या निया शर्माला तिसरे स्थान मिळाले आहे. तर छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या दृष्टी धामी या अभिनेत्रीला चौथे स्थान मिळाले आहे. तर डिअर जिंदगी या चित्रपटातून शाहरुखसोबत शेअर स्क्रिन करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्यावर आपली जादू निर्माण करणाऱ्या आलिया भट्टला या यादीत पाचवे स्थान मिळाले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹दोन हजारपर्यंतच्या कार्ड व्यवहारांवर सेवा कर नाही!
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्यवहाराकडं वळावं म्हणून केंद्र सरकारनं डेबिट व क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवरील सेवा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकारनं पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात रोकड टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. चलन तुटवड्यामुळं लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी कार्ड पेमेंट, ऑनलाइनसारख्या कॅशलेस व्यवहाराकडं वळावं, असा सरकारचा आग्रह आहे. मात्र, अशा व्यवहारांपोटी सर्वसामान्यांना विनाकारण करांचा भुर्दंड सोसावा लागतो. हे लक्षात घेऊन सरकारनं डेबिट, क्रेडिट कार्डनं केलेल्या २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवरील सेवा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेवा करासंदर्भातील २०१२च्या अधिसूचनेत सुधारणा करावी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली चालू अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडणार असल्याचं सूत्रांकडून समजते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कीर्तनातून होणार कुपोषणमुक्तीचे प्रबोधन!
आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतरही देश अजूनही कुपोषणमुक्त होऊ शकला नाही. कुपोषणमुक्तीसाठी शासनाकडून विविध उपाय योजले जात असले, तरी त्याचा परिणाम होताना दिसत नाही. मुले कुपोषित होऊ नये, यासाठी माता सृदृढ असणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येकापर्यंत गरोदर माता, नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी, याची माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तनकार आणि प्रबोधनकार यांच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीचे धडे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील कीर्तनकारांना माहिती देण्यासाठी मिशनच्यावतीने ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या जात आहेत.
आधुनिक काळात झपाट्याने विकास होऊन पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. आरोग्य क्षेत्रातही क्रांती झाली असली, तरी मानव निर्देशांक मात्र अद्यापपर्यंत सुधारला नाही. राज्यातील अनेक भागात आजही मोठ्या संख्येने कुपोषित मुले दिसून येतात. शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी योजना आखल्या जातात; मात्र त्या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. बाळाच्या जीवनातील पहिले १००० दिवस हे वाढ व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या कालावधीत मातेचे व बालकाचे पोषण झाल्यास बाळांना आयुष्यभर कुपोषणापासून वाचविता येते. अनेक ठिकाणी मात्र गरोदर मातेच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा समाजमनावरील पगडा लक्षात घेता, त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गरोदर माता, बालकांचे संगोपन याबाबतची माहिती पोहोचविल्यास अधिक फायदा होईल, यादृष्टीने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला ह्ययुनिसेफह्णचे सहकार्य लाभले आहे. राज्यभरातील कीर्तनकारांना याबाबतची माहिती देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी मिशनच्यावतीने विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. पहिली कार्यशाळा भंडारा येथे व दुसरी कार्यशाळा अकोला येथे पार पडली.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹१९३० नंतर एकही भारतीय नाही ठरला टाइम पर्सन ऑफ द इयर
अमेरिकी नियतकालिक टाइमने २०१६ चा पर्सन ऑफ द इअर म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली आहे. ऑनलाइन पोलमध्ये आघाडीवर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानाने हुलकावणी दिली. टाइम या नियतकालिकाने १९२७ पासून पर्सन ऑफ द इअर हा सन्मान देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत केवळ एकाच भारतीय व्यक्तीचा या यादीमध्ये समावेश आहे. १९३० मध्ये महात्मा गांधी यांना पर्सन ऑफ द इअर म्हणून घोषित केले होते.
दांडी यात्रा आणि मीठाचा सत्याग्रह या कारणांमुळे त्यांची निवड पर्सन ऑफ द इअर म्हणून झाली होती. ज्या व्यक्तीने त्या वर्षी संपूर्ण जगावर आपला प्रभाव पाडला केवळ त्याच व्यक्तीचे नाव पर्सन ऑफ द इअर म्हणून घोषित केले जाते असा नियम आहे. एखादी व्यक्ती तिने जगावर नकारात्मक प्रभाव जरी टाकला असेल त्या व्यक्तीला देखील पर्सन ऑफ द इअर घोषित केले जाते. महात्मा गांधींचा सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश जगभर नावाजला गेला होता. अहिंसेच्या मार्गाने आतापर्यंत झालेले सर्वात मोठे आणि प्रभावी आंदोलन म्हणून दांडी यात्रेकडे पाहिले गेले होते. त्यामुळेच गांधींजींना पर्सन ऑफ द इअर हा सन्मान मिळाला होता.
१९२७ पासून टाइमने हा प्रघात सुरू केला. तेव्हा या सन्मानाला मॅन ऑफ द इअर म्हटले जात होते. हे सुरू झाल्यापासून याबाबत अनेक वादविवाद झाले आहेत. १९३९ ला अॅडॉल्फ हिटलर, १९४२ ला जोसेफ स्टालीन, १९५७ ला निकिता खुर्चेस्कोव आणि १९७९ ला अयातुल्लाह खोमेनी यांना टाइम पर्सन ऑफ द इअर म्हणून घोषित केले होते. यावरुन वाद झाल्यानंतर टाइमने सांगितले की या लोकांनी जगावर प्रभाव टाकला त्यामुळेच त्यांना पर्सन ऑफ द इअर घोषित केले होते.
का झाली नाही नरेंद्र मोदींची निवड
इंटरनेट आल्यानंतर टाइम नियतकालिक वाचकांना आपले मत नोंदवा असे सुचवते. त्यावरुन एक अंदाज बांधला जातो. नरेंद्र मोदी हे ऑनलाइन सर्व्हेमध्ये पुढे होते. परंतु अंतिम निवड ही टाइमच्या संपादकांद्वारेच होते.
१९९८ मध्ये ऑनलाइन सर्वेक्षणात पहलवान आणि समाजसेवक मिक फोले हे पुढे होते परंतु नंतर हा बहुमान बिल क्लिंटन आणि केन स्टार यांना देण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्याबाबत देखील यावेळी हेच घडले. ऑनलाइन सर्वेक्षणाकडे जनभावनेचा आदर म्हणूनच पाहिले जाते. नरेंद्र मोदींना या वर्षभरात असे एकही कार्य केले नाही ज्यामुळे संपूर्ण जग प्रभावित होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांची निवड का करण्यात आली
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्याविरोधात अमेरिकेतील शक्तीशाली लोक होते. डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक हारतील असे छातीठोकपणे देखील सांगितले जात होते. त्या सर्वांना तडा देत त्यांनी ही निवडणूक जिंकली. अमेरिकेच्या राजकारणाचा प्रभाव जागतिक राजकारणावर पडतो. त्यांची मते अत्यंत टोकदार आहेत आणि त्याबाबत त्यांना कधी गैर वाटले नाही. त्या कारणामुळेच त्यांना विरोध करणारा एक मोठा गट आहे. त्यामुळेच ट्रम्प हे जास्त प्रभावशाली ठरले आहेत. त्यामुळेच त्यांची निवड पर्सन ऑफ द इअर म्हणून करण्यात आली.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹बुरखाधारी मुस्लीम महिलांना जर्मनीत प्रवेश नाही : मर्केल
बुरखा घातलेल्यरा मुस्लीम महिलांना जर्मनीत येऊ दिले जाणार नाही असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी आपल्या चौथ्या कार्यकाळासाठी प्रचारादरम्यान सभेला संबोधित करताना जाहीर केले आहे. मर्केल यांच्या या घोषणेनंतर जवळपास 11 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.
मागील 16 वर्षांपासून आपण सातत्याने जिंकत आहोत. मागील वर्षी टोळधाडीप्रमाणे जर्मनीत प्रवेश करणाऱया लाखो शरणार्थींप्रमाणे यावर्षी असे करू दिले जाणार नाही असे त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियन सभेला एसनमध्ये संबोधित करताना सांगितले. पूर्णपणे चेहरा झाकलेल्या महिला जर्मनीच्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेऊ शकत नाहीत. त्यांनी आपला चेहरा दाखवावा, येथे बुरखा एकदम अयोग्य असल्याचे त्यांनी वक्तव्य केले. जर्मनीत अलिकडेच एका विद्यार्थिनीवर अफगाणी शरणार्थीने बलात्कार करत नंतर तिची हत्या केली होती. यानंतर तेथे मुस्लीम शरणार्थींविरोधात आप्रोश निर्माण झाला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मुख्य संरक्षण भागीदार बनण्याचा मार्ग मोकळा
अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारत दौऱयावर : भारताला मोठे यश मिळण्याची चिन्हे
अमेरिकेचे संरक्षण मंत्री एश्टन कार्टर गुरुवारी भारत दौऱयावर येत आहेत. अमेरिकेकडून भारताला मुख्य संरक्षण सहकारीचा दर्जा देण्याच्या औपचारिकेवर या दौऱयात चर्चा होण्याची चिन्हे आहेत. यादरम्यान काही ड्रोन विमानांच्या व्यवहारांवर देखील चर्चा होऊ शकते. दोन्ही देशांच्या संरक्षण संबंधांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱयावर गेले होते, तेव्हा अमेरिकेने हा दर्जा देण्याविषयी निर्णय घेतला होता. कार्टर यांच्या दौऱयात मुख्य संरक्षण सहकारी बनविण्याच्या काय तरतुदी असतील हे स्पष्ट केले जाऊ शकते. तरतुदींवर आधीदेखील चर्चा झाली आहे, परंतु त्यावर एकमत होऊ शकले नव्हते. आपण दुसरा मसुदा सादर करू असे अमेरिकन अधिकाऱयांनी सांगितले.
द्विपक्षीय हितसंबंधात लष्करी मोहिमांमध्ये भारत अमेरिकेची किती साथ देऊ शकतो याचे आकलन करण्यास कार्टर आणि अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांना अलिकडेच अमेरिकेच्या संसदेत सांगण्यात आले होते. भारताला अमेरिकेचा मुख्य संरक्षण सहकारीचा दर्जा देण्याची औपचारिकता पूर्ण करणाऱया विधेयकात संशोधनास वरिष्ठ अमेरिकन खासदार सहमत झाले आहेत.
अंतिम टप्प्यातील दौरा
कार्टर यांचा कार्यकाळ राष्ट्राध्यक्षपदावर ओबामांचा कार्यकाळ संपल्यावर संपुष्टात येईल. पहिल्यांदाच कोणत्याही अमेरिकन संरक्षण मंत्र्याने आपल्या कार्यकाळाच्या अंतिम विदेश दौऱयात भारताला सामील केले आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि कार्टर यावर्षी सहाव्यांदा भेटत आहेत. परंतु कार्टर यांच्या कार्यकाळाचा अंतिम टप्पा असल्याने कोणत्याही मोठय़ा व्यवहाराची अपेक्षा नाही. अमेरिकेसोबत हॉवित्झर तोफांच्या व्यवहारासाठी करारावर स्वाक्षऱया झाल्यानंतर इतर संरक्षण करारांवर चर्चा होऊ शकते. भारताने 22 प्रिडेटर गार्जन ड्रोनसाठी देखील मागणी केली आहे. कार्टर यांच्या या दौऱयात अमेरिका सकारात्मक उत्तर देईल. हा ड्रोन नौदलासाठी सागरी सुरक्षेत विशेषरित्या सहाय्यभूत ठरेल. तर भारतीय हवाईदलाला अमेरिकेकडून शस्त्रसज्ज ड्रोन अवेंजर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
लेमोआ
अमेरिकेसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवर (लेमोआ) अजून अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. यावर भारताने अमेरिकेसोबत वर्षाच्या प्रारंभी स्वाक्षरी केली होती. यांतर्गत दोन्ही देशांचे लष्कर इंधनपूर्तीच्या उद्देशाने एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर करू शकतील. हा करार लागू करण्यास अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत, कारण दोन्ही देशांच्या लष्कराची हिशेब ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही देशांनी कशाप्रकारे एकाच पद्धतीने काम करावे यावर अनेक बैठका झाल्या आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जगातील शक्तीशाली भाषांमध्ये हिंदी 10 व्या स्थानावर
जागतिक शक्तीशाली भाषा निर्देशांक (World Power Language Index- PLI) नुसार, हिंदी ला जगातील शक्तिशाली प्रथम 10 भाषांमध्ये 10 व्या स्थानावर ठेवले गेले आहे. हा निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच WEF ने असा अंदाज बांधला की पुढील वर्ष 2050 पर्यंत हिंदी हे नवव्या स्थानावर येणार.
अहवालानुसार, या यादीमध्ये अग्रस्थानी इंग्रजी ही सर्वात शक्तिशाली भाषा ठरली आहे, जिला जगभरातील लोक जाणून घेऊ इच्छित आहेत.
ठळक बाबी
प्रथम 10 मध्ये इतर भाषा पुढीलप्रमाणे आहेत: पुर्तगाली (9 वे स्थान), जापानी (8), जर्मन (7), रशियन (6), अरबी (5), स्पॅनिश (4), फ्रेंच (3), चीन मधील मंडारिन (2)
इंग्रजी ही जगातील सर्वात शक्तिशाली भाषा आहे, जी तीन G7 राष्ट्रांमध्ये (अमेरिका, यूके आणि कॅनडा) मध्ये प्रथम भाषा म्हणून बोलली जाते.
एकूण 335 दशलक्ष लोकांची इंग्रजी ही स्थानिक भाषा आहे, त्यामधील 225 दशलक्ष लोक अमेरिकेमध्ये आहेत. इतर भाषांसमवेत इंग्रजी ही जगभरात 110 देशांमध्ये बोलली जाते.
दहा जागतिक आर्थिक केंद्रांपैकी आठ या इंग्रजी बोलीभाषा वापरणारे शहरे आहेत. यामध्ये लंडन आणि न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि सिंगापूर, टोकियो यांचाही समावेश आहे.
मंचाच्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकाकडून दिलेले भाषा (त्याच्या PLI गुणांसह) आणि स्पर्धात्मकता यांच्यामधील संबंध हे सुद्धा यामध्ये ठळक केले आहे. सर्वात स्पर्धात्मक दहा अर्थव्यवस्थांमध्ये चार इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून वापरतात. जपान सोडून, उर्वरित सहामध्ये इंग्रजी बोलणार्यांची संख्या अधिक आहे.
शक्तीशाली भाषा निर्देशांक (PLI) बद्दल
शक्तीशाली भाषा निर्देशांक (PLI) हा भाषेचा प्रभाव आणि पोहोच यांचे मूल्यांकन करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे, जो की भाषामधून प्राप्त 5 मूलभूत संधीच्या मोजमापासाठी 20 निर्देशकांवर अवलंबून आहे. या 5 मूलभूत संधी म्हणजे:
भौगोलिक (प्रवास करण्याची क्षमता),
अर्थव्यवस्था (अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी करण्याची क्षमता),
संवाद (संवाद साधण्यासाठी वापरण्यात येण्याची क्षमता),
ज्ञान आणि माध्यम (ज्ञान आणि माध्यम वापरण्याची क्षमता)
आणि राजनीति (आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वापरण्याची क्षमता)
निधन:-
जॉन ग्लेन:-
-----------------
* पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे ९५ व्या वर्षी निधन झाले.
* १९६२ साली त्यांनी केलेल्या अवकाश प्रवासामुळे ते अमेरिकन लोकांच्या घराघरात पोहचले होते. स्वी अंतराळवीर झाले आणि तेथून निवृत्त झाल्यावर ओहियोचे प्रतिनिधी म्हणून ते २४ वर्षे सिनेटमध्ये होते.
* मर्क्युरी ७ या अवकाश यानातून प्रवास केलेले ते शेवटचे अंतराळवीर होते.
* वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी डिस्कवरी यानातून अंतराळ प्रवास केला आणि ते अमेरिकेतील सर्वात वृद्ध अंतराळवीर देखील ठरले.
* सोवियत युनियनने १९५७ साली पहिला स्पुतनिक १ उपग्रह प्रक्षेपित केला होता. त्यानंतर १९६१ ला युरी गगारीन हा जगातील पहिला अंतराळवीर ठरला ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा मारली. त्यानंतर अमेरिकेने देखील आपल्या अंतराळ मोहिमेवर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि १९६२ मध्ये ग्लेन पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अवकाशवीर ठरले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पुण्यातील पिंपरी बुद्रुक पहिले कॅशलेस गाव
देशाला कॅशलेस बनविण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयाची एकीकडे विरोधक खिल्ली उडवत असताना पुण्यातील पिंपरी बुद्रूक या गावाने मात्र देशातील पहिले कॅशलेस गाव होण्याचा मान मिळविला आहे. या गावात रेशनपासून ते दैनंदिन जीवनासाठी लागणारे सर्वच व्यवहार ऑनलाइन होत आहेत.
भामा नदीच्या काठावर हे गाव असून गावाची लोकसंख्या जेमतेम केवळ २८०० एवढी आहे. पुणे शहरापासून ६१ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव खऱ्या अर्थाने डिजिटल झाले आहे. या गावाला कॅशलेस करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बँकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्रसरकारच्या सेंटर फॉर गुड गव्हर्न्सनेही या गावाला बुधवारी कॅशलेस गाव म्हणून जाहिर केले आहे. या गावातील प्रत्येक गावकऱ्याचे बँकेत खाते आहे. त्यामुळे या गावातील लोक दळणापासून ते रेशनिंग पर्यंतचे सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करत आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹तंबाखू मिश्रणांवर संपूर्ण बंदी घाला
केंद्रीय आरोग्य विभागाचे निर्देश
संपूर्ण गुटखाबंदीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत निकोटीन किंवा तंबाखू असलेले सर्व प्रकाराचे पान मसाले आणि तत्सम मिश्रणांवर राज्यांनी संपूर्ण बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी दिले आहेत. ही उत्पादने स्वतंत्रपणे किंवा अन्य घटकांसोबत मिश्रण म्हणून विकली जात असतील तरीही ही बंदी लागू असेल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबरला दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकारांनी आवश्यक ते आदेश काढावेत आणि गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि अन्य तत्सम मिश्रणांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यांवर तातडीने बंदी घालावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
संबंधित उत्पादनामध्ये तंबाखू किंवा निकोटीन असेल, मग त्याचे नाव काहीही असो, तो पॅकबंद स्वरूपात अथवा सुट्या रूपात विकला जात असेल आणि तो ग्राहकाला सहज उपलब्ध होत असेल, तर हे तातडीने बंद व्हायला हवे अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव सी. के मिश्रा यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. बिहार, कर्नाटक, मिझोराम, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापूर्वीच या संदर्भात आदेश काढले असल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.
ग्लोबल ऑडिट टोबॅको सर्व्हे, इंडिया, २०१० नुसार तंबाखूसेवन हे जगभरात तसेच भारतात मृत्यू आणि गंभीर आजारांचे कारण राहिले आहे. २० कोटींहून अधिक लोक तंबाखूसेवन करते त्यात च्युइंगम आणि धूरविरहित तंबाखू यांची नव्याने भर पडली आहे. जगात सर्वाधिक तोंडाचा कॅन्सर झालेले रुग्ण भारतात आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
‘गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू अशा नावांखाली विकली जाणारी उत्पादने पुष्कळदा एकाच दुकानात, एकाच विक्रेत्याकडे उपलब्ध असतात. ‘खाण्यासाठी तयार’च्या नावाखाली तंबाखू कंपन्या आता वेगवेगळी मिश्रणे करून जोड पाकिटांमध्ये विकत आहेत,’ असेही पत्रात म्हटले आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम
गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम साकारतयं. अहमदाबाद येथील 'सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम'चा कायापालट करण्यात येणार असून हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. एकाचवेळी १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची या स्टेडियमची क्षमता असून लार्सन अँड टूब्रो ही कंपनी या स्टेडियमचा मेकओव्हर करणार असल्याची माहिती द गुजरात क्रिकेट असोसिएशनने दिली.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात हे स्टेडियम साकारणार आहे. अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यानुसार हे स्टेडियम तयार होणार आहे. सहा पेव्हेलियन असलेल्या सरदार पटेल स्टेडियमची सध्याची प्रेक्षक क्षमता ५४ हजार एवढी आहे. येत्या दोन वर्षात हे स्टेडियम पुर्ण होणार आहे.
स्टेडियम तयार करण्यासाठी कंपनीला केंव्हाही मैदान देण्यात येईल. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असेल. सर्व आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच हे स्टेडियम तयार केले जाणार असल्याचे गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नव्या स्टेडियममध्ये अनेक सुविधा असतील. त्यात वातनुकूलित बॉक्सेसची संख्या वाढवलेली असेल, शिवाय अत्याधुनिक पार्किंग सुविधाही देण्यात आलेली असेल असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मेळघाटचे दुष्टचक्र कायम!
मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत असल्या, तरी या भागात पायाभूत सुविधांचा अभाव कायम आहे. नियमित वीजपुरवठा नाही, त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प. रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध नाहीत. संपर्काचीही साधने नाहीत. रोजगाराच्या कमतरतेमुळे स्थलांतरावाचून पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी मेळघाट दौऱ्याच्या वेळी दिलेल्या निर्देशांचे अजूनही पालन झालेले नाही. कोटय़वधी रुपये खर्च करूनही मेळघाटचे दृष्टचक्र अजूनही कायम आहे.
मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यावर लगेचच नोव्हेंबर २०१४ मध्ये मेळघाटातील मालूर, चौराकुंड आणि राणामालूर या गावांना भेट दिली. त्या वेळी त्यांना मेळघाटात विजेची प्रमुख समस्या असल्याचे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील नेपानगरपासून धारणीपर्यंत ५५ किलोमीटरच्या पारेषण वाहिनीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ते मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण अजूनही हे काम अपूर्णच आहे. हिवरखेड ते धारणी या ३२ किलोव्होल्टच्या उच्चदाब वाहिनीचे कामही पूर्णत्वास गेलेले नाही. अनियमित वीजपुरवठय़ाचा प्रश्न कायम आहे.
मेळघाटातील १८ गावे विजेच्या मुख्य जाळय़ापासून वेगळी आहेत. या गावांमध्ये अपारंपरिक ऊर्जेशिवाय पर्याय नाही. पण, सौरऊर्जेवर चालणारी व्यवस्था तकलादू स्वरूपाची असल्याने ही गावे अंधारातच आहेत. चिखलदरा तालुक्यात चार पवनऊर्जा संयंत्रे उभारण्यात आली आहेत. पण, त्यांचा उपयोग मर्यादित आहे.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवण्याचा मुख्य प्रश्न आहे. गेल्या तीन वर्षांत मेळघाटच्या आरोग्य निर्देशांकात किंचित सुधारणा झाली असली, तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत ती कमीच आहे. अर्भक मृत्युदर दरहजारी ४८ वरून दरहजारी ३७ इतका खाली आला आहे. बाल मृत्युदर दरहजारी १३ वरून ९ पर्यंत कमी झाला आहे. माता मृत्युदरदेखील दरहजारी २.३३ वरून २.१९ पर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी गेल्या तीन वर्षांत संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण हे ५४ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकाच एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची कमतरता या समस्या कायम आहेत. कुपोषणामुळे बालमृत्यू घडल्यावर शासकीय यंत्रणांची धावपळ उडते. नंतर यंत्रणा सुस्त असते, असेही अनुभवास येते.
रस्ते विकासाचा प्रश्न
मेळघाटात अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाळय़ात तर तब्बल २२ गावांचा संपर्क कायम तुटतो. दुर्गम भागात पोहोचण्यासाठी तर संपूर्ण दिवस लागतो. एखादी व्यक्ती गंभीर आजारी असली, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक आदिवासी माता, बालकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या भागातील रस्त्यांच्या सुधारणेकडे लक्षच दिले गेले नाही, अशी ओरड आहे.
रोकडरहित व्यवहार दूरच
एकीकडे, हरिसाल या गावाला डिजिटल व्हिलेज बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना मेळघाटातील इतर गावांमध्ये मात्र, संपर्काची सुविधाच नाही. धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुका मुख्यालये वगळता उर्वरित गावांमध्ये मोबाइल क्रांती पोहोचलीच नाही. संपूर्ण मेळघाटात केवळ आठ बँकांच्या शाखा आहेत आणि त्यातील ४० कर्मचाऱ्यांवर तीन लाख नागरिकांचा बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. अशा स्थितीत रोकडरहित व्यवस्था कशी उभी राहू शकेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
पिण्याचे पाणी नाही
मेळघाट भागात ३२३ गावे आहेत. त्यापैकी २७६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना पोहोचल्याचा सरकारी यंत्रणांचा दावा आहे. पण बहुतांश गावांमध्ये अनियमित वीजपुरवठय़ाअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. थकीत वीज देयके आणि देखभाल-दुरुस्तीचा अभाव यामुळे अनेक योजना बंद स्थितीत आहेत. मेळघाटातील गावांना ८११ हातपंप आणि ३०४ सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी आदिवासींचा संघर्ष कायम आहे. हिवाळय़ातही दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते. गावांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.
रोजगार उपलब्ध करून द्यावा!
मेळघाटातील आदिवासींच्या हाताला काम आणि कामाचा योग्य मोबदला तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे व्यवस्थित वितरण केल्यास मेळघाटातील अनेक प्रश्न सुटू शकतील. आदिवासींना अन्नाची पाकिटे वितरित करून फायदा नाही. या भागातील पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दळणवळणाची साधने नसल्याने गंभीर परिस्थिती आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी सरकारने दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या पाहिजेत. मेळघाटातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शासकीय
यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे. – पूर्णिमा उपाध्याय, सामाजिक कार्यकर्त्यां.
वनांचे प्रश्न
आतापर्यंत २२३७ आदिवासी, ४०७ बिगरआदिवासी अशा एकूण २५४५ कुटुंबांनी वनहक्क कायद्यानुसार वन क्षेत्रावर दावे सांगितले आहेत. यापैकी ९५६ आदिवासी आणि ६५ बिगरआदिवासी कुटुंबांचे वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. २२४ जणांना सात-बाराचे वाटप करण्यात आले असून उर्वरित वनहक्क धारकांना पट्टय़ाचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही भागात महसूल विभागाने सर्वेक्षण केलेले नसल्याने सद्य:स्थितीत सात-बाराचे वाटप होऊ शकलेले नाही.
महाराष्ट्रातील चार व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प एक आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र १६७६.९३ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे. मेळघाट हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. सागाचे उत्तम असे वृक्ष मेळघाटातील जंगलात आहेत. मेळघाटची लोकसंख्या सुमारे चार लाख असून, धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये आदिवासी बहुसंख्येने आहेत.
मेळघाटात गावांमध्ये काम उपलब्ध होत नसल्याने आदिवासींना स्थलांतर करावे लागते. त्यातून त्यांच्या मुलांची आबाळ सुरू होते. त्यांना स्थानिक पातळीवर पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होते.
मेळघाट या आदिवासी भागात घरबांधणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रुग्णालये, शाळा यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. आश्रमशाळांमधील शिक्षणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी संस्थात्मक सेवेची सुलभता वाढवावी लागेल.
व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून उत्पादनक्षम मनुष्यबळनिर्मिती करणे आणि कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करावे लागेल. आदिवासींपर्यंत सेवांचा लाभ पोहोचवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रस्तेजोडणी आणि दळणवळण संपर्क मजबूत करावी लागेल.
मेळघाटातील शिक्षणाच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आदिवासी विकास व शिक्षण विभागाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹अश्विनची कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्पिनर आर अश्विनने कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आर अश्विनने दुस-या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर स्टोक्सची विकेट घेतली आणि नवा इतिहास रचला. आर अश्विनने एका डावात पाच विकेट्स घेतल्या असून हा भीमपराक्रम त्याने तब्बल 23 वेळा केला आहे. यासोबतच आर अश्विनने भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान वानखेडेत चौथा कसोटी सामना सुरु आहे.
कपिल देव यांनीदेखील एका डावात 23 वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम केला असून त्यासाठी त्यांना 131 कसोटी सामने खेळावे लागले. पण आर अश्विनने ही कामगिरी अवघ्या 43 कसोटींमध्ये केली आहे. या विक्रमाच्या यादीत आर अश्विनच्या पुढे दोनच भारतीय खेळाडू आहेत. आता आर अश्विनसमोर हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाचं आव्हान आहे. हरभजन सिंहने 103 कसोटीत 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. तर अनिल कुंबळेनं 132 कसोटीत 35 वेळा 5 गडी बाद केले असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतरही काही विक्रम झाले -
- मोईन अलीला बाद करून आश्विनने दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला (२३६) मागे टाकताना सर्वाधिक कसोटी बळी घेणारा सातवा भारतीय गोलंदाज म्हणून मान मिळवला. आश्विनच्या खात्यात आता २३९ बळींची नोंद आहे.
- वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या फलंदाजाची याआधीची सर्वाधिक खेळी ८८ धावांची होती. इंग्लंडच्याच ओवेस शाहची ही कामगिरी जेनिंग्सने मागे टाकली.
- मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मुंबईने देशाला एकाहूनएक सरस क्रिकेटपटू दिले. पण प्रथमच इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत घरच्या मैदानावर एकही मुंबईकर खेळाडू खेळताना दिसला नाही. 1933 सालानंतर प्रथमच मुंबई क्रिकेटला या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. बईकर अजिंक्य रहाणे जायबंदी झाल्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित मालिकेला मुकणार आहे. 1933 साली दक्षिण मुंबईतील बॉम्बे जिमखान्यावर देशातील पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. एकेकाळी भारतीय संघात निम्मे मुंबईचे खेळाडू असायचे पण आता चित्र पालटले आहे. क्रिकेटचा सर्वदूर प्रसार झाल्याने मुंबईच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
- क्रिकेट सामन्यात खेळाडूंना दुखापती होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र, या सामन्यात पंचांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा दिवंगत खेळाडू फिलीप ह्यूज याच्या आठवणी ताज्या झाल्या.
- २०१० पासून भारताविरुद्ध एकूण ५ फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावले आहे.
- २००६ पासून भारतात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना एकूण ५ इंग्लिश फलंदाजांनी ५० हून अधिक धावांची खेळी केली. यामध्ये कुक, शाह, रुट, हमीद आणि जेनिंग्स यांचा समावेश आहे.
- पदार्पणात शतक झळकावणारा जेनिंग्स इंग्लंडचा ८ वा सलामीवीर आणि १९ वा फलंदाज ठरला.
- या सामन्यात बाद होण्यापूर्वी अॅलिस्टर कुकने भारताविरुद्ध २००० कसोटी धावा करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी क्लाईव्ह लॉइड (वेस्ट इंडिज), जावेद मियाँदाद (पाकिस्तान), शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज), रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्क (दोघे ऑस्ट्रेलिया) यांनी केली आहे.
- या सामन्यापूर्वी २००० पासून भारताने वानखेडेवर खेळविण्यात आलेल्या ८ सामन्यांपैकी ४ सामने गमावले आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹चिनी सोलर सेल आयातीत वाढ
देशी उत्पादकांकडून मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी
सध्या सुरू असणाऱया आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताने चीनमधून सोलर आणि फोटोव्होल्टिक सेलच्या 5,573 कोटी रुपयांच्या सामग्रीची आयात करण्यात आली. विदेशातून करण्यात येणाऱया एकूण आयातीपैकी चीनमधून 87 टक्के सौर ऊर्जासंबंधी सामग्री आयात करण्यात आले. एप्रिल-सप्टेंबर 2016-17 दरम्यान भारतात विदेशातून एकूण 6,404 कोटी रुपयांच्या सोलर सेल्सची आयात करण्यात आली. यापैकी चीनमधून 87.05 टक्के म्हणजेच 5,573 कोटी रुपयांचा हिस्सा आहे. गेल्या वषी 15,825 कोटी रुपयांच्या सेल्यची आयात केली होती. यापैकी 13,231 कोटी रुपयांचे म्हणजेच 83.61 टक्के हिस्सा चीनमधून आयात करण्यात आला होता. 2014-15 मध्ये चीनमधून 73.49 टक्के हिस्सा चीनचा होता. चीनमधून 4,074 कोटी रुपयांच्या सोलर सेलच्या आयात करण्यात आली होती. त्यावर्षी एकूण 5,545 कोटी रुपयांच्या सोलर सेलची आयात करण्यात आली होती, असे ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
भारतात सोलर आणि फोटोव्होल्टिक सेल्सची मोठय़ा प्रमाणात मागणी आहे, मात्र त्याप्रमाणे देशात उत्पादन होत नाही. राष्ट्रीय सोलर योजनेंतर्गत उत्पादनवाढीला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. उत्पादकांना करसवलत देण्यात येत आहे. आयात आणि देशात उत्पादन घेण्यात आलेल्या सोलरची साम्रगीच्या सहाय्याने सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात चिनी बनावटीच्या सेलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय उत्पादनांच्या तुलनेत ती स्वस्त आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹घसरणीत भारतीय बाजार चौथ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्पचा फटका
नोटाबदलीची सरकारची घोषणा आणि अमेरिकेच्या निर्वाचित राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या. या दोन्ही घटनांना आता एक महिना उलटून गेला असून त्याचा मोठा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसला. 8 नोव्हेंबर रोजी नोटाबदलीचा निर्णय घेण्यात आल्यापासून शुक्रवारपर्यंत बाजारात निफ्टीमध्ये 3.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरात घसरण झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेअरबाजारांत भारत चौथ्या आणि आशियात चौथ्या स्थानी आहे. मेक्सिको 5.9 टक्के, ब्राझील 4.3 टक्के आणि फिलिपाईन्स 3.9 टक्क्यांनी घसरण या कालावधीत नोंदविण्यात आली आहे.
बीएसईचा सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये साधारण 7.5 टक्के घसरण झाली होती. मात्र आता त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. निफ्टी हा 21 नोव्हेंबर रोजी सर्वात निचांकी म्हणजेच 7,916 पर्यंत घसरला होता. सरकारच्या नोटाबदलीचा सर्वात जास्त फटका एनएसईमधील ऑटो, रियल्टी, खासगी बँका आणि एफएमसीजी कंपन्यांना बसला आहे. या कंपन्यांच्या समभागात 6 ते 16 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली. याउलट मेटल, फार्मा, सार्वजनिक बँका आणि एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात 2.5-4.7 टक्क्यांपर्यंत वृद्धी झाली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर निश्चिती आणि 2017-18 च्या भारताच्या अर्थसंकल्पावरून बाजाराचे पुढील भवितव्य ठरणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
पुढील सहा महिन्यांपर्यंत बाजारात अनिश्चितता राहील असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला. ऑटो, सिमेंट आणि रिटेल क्षेत्राच्या कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसेल असे मत मोतिलाल ओस्वालने व्यक्त केले आहे. डिसेंबर 2016-2017 दरम्यान बाजारातील मंदी कायम राहील असेही मत व्यक्त करण्यात आले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹'एसएनडीटी'ला 'टागोर लिटरसी पुरस्कार' प्रदान
महिलांना शिक्षण देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाला 4 नोव्हेंबर रोजी 'टागोर लिटरसी पुरस्कार 2014'ने लखनऊ येथील एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.
महिला शिक्षणातील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील भारतीय प्रौढ शिक्षा संघातर्फे 'टागोर लिटरसी पुरस्कार' दिला जातो.
1987 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून2014 साली हा पुरस्कार श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एसएनडीटी विद्यापीठाला जाहीर झाला. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त लखनऊ येथे भारतीय प्रौढ शिक्षा संघातर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या सोहळयादरम्यान उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी यांना प्रदान करण्यात आला.
भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली सुरू केलेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी
जळगावचा विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली. गुणांच्या जोरावर विजयने अभिजितवर मात केली. अनुभवासमोर ताकद कमी पडल्याचा प्रत्यय या लढतीने दिला. अभिजितने स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला परंतु विजयने त्याला संधीच दिली नाही.
पुण्यातील वारजे येथे महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आवर्जुन उपस्थित दर्शवली होती.
६ फूट १ इंच इतकी उंची असलेला २१ वर्षीय अभिजित हा विजयला भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु विजयने आपला अनुभव पणाला लावला. दोन्ही मल्लांचे वजन ११८ किलो इतके होते. विजयने यापूर्वी २०१४, २०१५ मध्ये जेतेपद पटकावले होते. नरसिंग यादव नंतर महाराष्ट्र केसरीची गदा सलग तीन वेळा मिळवणारा विजय दुसरा मल्ल ठरला.
निळ्या पोषाखात विजय व लाल पोषाखात अभिजित यांनी सुरूवातीला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. त्यानंतर विजयने आक्रमकता दाखवत पहिला गुण वसूल केला. त्याने पट काढण्याचाही प्रयत्न केला. पहिला गुण पटकावल्यामुळे आत्मविश्वास आलेल्या विजयने आणखी आक्रमक होत दुसरा गुण पटकावत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. विजय हा मातीवरचा मल्ल आहे. पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी केली. हॅटट्रिक विजेतेपदाचा त्याच्यावर दबाव होता. या दबावाला तो कसा सामोरा जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मॉरिशसमध्ये रंगणार आगरी साहित्य संमेलन
आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे १५वे आगरी साहित्य संमेलन या वर्षी सातासमुद्रापार म्हणजेच मॉरिशसमध्ये २५ ते २७ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान होत आहे. वाशीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी ही घोषणा केली.
या संमेलनामध्ये कवीवर्य अशोक नायगवाकर, कवी अरुण म्हात्रे, कवी डॉ. मेहश केळुस्कर, डॉ. विश्वास मेहंदळे यांचा सहभाग असेल. संमेलनामध्ये स्थानिक साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी आगरी संस्कृतीचा भाग असणारे भजन कीर्तन, कवी संमेलन, मराठी आगरी बोली भाषेवर चर्चा केली जाणार आहे. तर, आगरी पारंपरिक गीते, आगरी पुस्तके यावरही चर्चा केली जाणार आहे.
यामध्ये तेथील कवी-लेखकांचाही मोलाचा सहभाग लाभणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण ३५ साहित्यिकांनी सहभागी होण्यासाठी नावे नोंदविली आहेत. ज्या साहित्यिकांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९९६७० ७२५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹प्लॅस्टिक नोटा छापण्याची तयारी सुरू: केंद्र सरकार
नोटाबंदीनंतर काही नव्या नोटा आल्यानंतर आता यापुढे नागरिकांच्या हातात प्लॅस्टिकच्या नोटा दिसणार आहेत. नोटांची नक्कल टाळता यावी यासाठी प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक त्या साहित्याची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती सरकारने आज संसदेत दिल्यानंतर हे स्पष्ट झाले.
प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याबाबतची माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यासंबंधीत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात लोकसभेत दिली आहे. यासाठी आवश्यक त्या साहित्याची खरेदी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. आरबीआयद्वारे कागदांच्या नोटांच्या जागी प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याचा आरबीआयचा एखादा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न अर्थ राज्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता.
खरेतर, रिझर्व बँक फील्ड ट्रायलनंतर प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याचा विचार करत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये सरकारने असे स्पष्ट केले होते की, फील्ड ट्रायल म्हणून भौगोलिक आणि जलवायू भिन्नतांच्या आधारे निवड केलेल्या ५ शहरांमध्ये १०-१० रुपयांच्या एक अरब प्लॅस्टिकच्या नोटा व्यवहारात आणण्यात येणार आहेत. यासाठी कोची, मैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांची निवड करण्यात आली होती.
प्लॅस्टिकच्या नोटा सरासरी ५ वर्षे सुरक्षित राहतात. या नोटांची नक्कल करणेही कठीण असते. या व्यतिरिक्त, कागदी नोटांच्या तुलनेत या नोटा अधिक स्वच्छ दिसतात.
जगात सर्वप्रथम ऑस्ट्रिया देशाने प्लॅस्टिकच्या नोटा छापल्या.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹1,031 किमी समुद्र पोहण्याचा विश्वविक्रम
मुंबई येथील 6 साहसी तरुण जलतरणपटूंनी मुंबई ते मंगळूर हे समुद्र मार्गे 1,031 कि. मी. अंतर पार केले. यामुळे त्यांनी दोन जागतिक विक्रम निर्माण केले. हा विक्रम जलतरण पटूंनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना समर्पित केला. यामुळे यापूर्वीचे दोन जागतिक विक्रम मोडीत निघाले आहेत.
* अमेरिका येथील सहा जणांच्या जलतरणपटूंनी 505 कि. मी. चे अंतर पार केले होते. त्याचबरोबर लांब पल्ल्याचे रीले जलतरण 200 जणांनी 684.75 कि.मी. अंतर 2009 मध्ये पूर्ण केले होते. सदर दोन्ही विक्रम मागे पडले आहेत. सदर उपक्रमाला 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून सुरुवात झाली होती. त्यानंतर मंगळूर येथील तन्नीरबावी बीचवर 8 डिसेंबर 2016 रोजी सदर जलतरणपट्टू पोहोचले. सदर पथकाचे नेतृत्व एअर विंग कमांडर परमवीरसिंग यांनी केले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सौरऊर्जा... प्रगतीचा महामार्ग!
पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यातील दरेवाडी हे गाव, गेली ५०-६० वर्षे रॉकेलच्या दिव्यांवरच जगत होते. या गावात ‘ग्राम ऊर्जा सोल्युशन्स प्रा. लि.’ या सौरऊर्जा क्षेत्रातील अनोख्या स्टार्टअपने २०१२मध्ये कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, गावकऱ्यांच्या एकमताने, उच्च तंत्रज्ञानाची कास धरत ‘सोलर मायक्रो ग्रिड’ प्रकल्प यशस्वी करून दाखवला आणि संपूर्ण गाव सौरऊर्जेने उजळून निघाले. यात गावातील ३९ घरे, शेतीचे पंप, रस्त्यावरचे दिवे, गिरणी, संगणक यांना पुरेल इतकी ९.४ किलोवॅट वीज निर्माण करणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली. यासाठी आलेला ३० लाख रुपये खर्च जर्मनीच्या बॉश कंपनीने केला. ग्रामस्थांनी स्थापन केलेली समिती आता दरमहा विजेचे शुल्क गोळा करते व समितीच्या बँक खात्यात जमा करते. त्याचा वापर प्रकल्प चालवण्यासाठी व दुरुस्तीसाठी केला जातो. अशाच प्रकारचा प्रकल्प कर्नाटक राज्यातील २३ घरांच्या विरल गावात करण्यात आलाय. सौर उपकरणांच्या हाताळणी व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी गावातील तरुणांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
‘ग्राम ऊर्जा’ने ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात सात गावांतील २०० घरे व १५ शेतीपंप यांना वीज पुरवठा करणारी सौरऊर्जा यंत्रणा तयार केली. याशिवाय ग्रामीण भागातील शाळांत सौरऊर्जेवर आधारित छोटे पण कार्यक्षम प्रकल्प ग्राम ऊर्जाने उभे केले आहेत. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यातील वीज न पोहोचलेल्या गावांत स्थानिक वापरासाठी अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे व वितरणाचे प्रकल्प राबवण्यासाठी संस्था काम करत आहे.
ग्राम ऊर्जा सोल्युशन्सच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून अनेकांनी त्यावर निबंधही सादर केले आहेत. ऑब्झर्व्हर्स रिसर्च फाउंडेशनने ग्राम ऊर्जाला ‘सोलर हिरो’ (२०१४) हा पुरस्कार देऊन गौरवले आहे.
‘एक्सचेन्ज फॉर सोलर’
‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही सध्याची एक ‘हॉट’ संज्ञा. याच्याशीच संबंधित पर्यावरण आणि पारंपारिक उर्जा या विषयात सौरभ जैन यांना आठ वर्षांपूर्वी इंग्लंडमधील प्रतिष्ठेची ‘शिवनिंग’ शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली. या शिष्यवृत्तीच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आणि त्यासाठी करावे लागणारे उपाय यावर अभ्यास करत असतानाच सध्या सुरू असलेल्या वीजटंचाईवर सौरऊर्जा हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो यावर त्यांचे ठाम मत झाले. म्हणून इंग्लडहून परत आल्यावर सौरऊर्जेशी संबंधित कंपनीत त्यांनी दोन वर्षे काम केले. ‘रुफटॉप सोलर पॅनल’ बसवणाऱ्या या कंपनीत सौरऊर्जेची तांत्रिक बाजू तर नीट समजली. मात्र सौरऊर्जेच्या व्यवसायाला सामाजिक आणि किफायतशीर आर्थिक बाजूने फायदेशीर बनवण्याच्या त्यांच्या कल्पनांना तिथे फारसा वाव मिळेल, असे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी तिथून बाहेर पडून सौरऊर्जासंदर्भात गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्याविषयीच्या समस्यांवर तोडगा म्हणून 'एक्सचेन्ज फॉर सोलर' (www.exchange4solar.com) ही स्वतःची कंपनी स्थापन केली.
या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी येणाऱ्या प्रश्नापासून ते बसवण्यासाठी किती खर्च येईल, शिवाय यासाठी लागणारे साहित्य कुठल्या वेंडरकडून मिळणार, त्यातून चांगल्या प्रतीचे आणि स्वस्त साहित्य देणाऱ्या वेंडर्सची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय सोलर पॅनल लावण्यासाठी लागणारे अर्थसाह्यही येथे उपलब्ध होते. त्याचप्रमाणे जे काम केले जात आहे त्याचे सर्वेक्षण आणि त्याचा दर्जा आदींवर लक्ष ठेवले जाते. यामुळे ग्राहकाला कमी दरात सोलर पॅनल बसवून मिळते.
सौरऊर्जेच्या क्षेत्रात लागणारी मोठी गुंतवणूक पाहता कंपनीने सोलर पॅनल बसवणाऱ्या गुंतवणूकदारांचे जाळे विणले आहे. म्हणजे तुम्हाला सोलर पॅनल बसवायचा आहे पण तुमच्याकडे तेवढा निधी नाही. मग हे गुंतवणूकदार तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पैसे गुंतवतात. त्यातून निर्माण होणारी सौरऊर्जा तुम्हाला अतिशय कमी भावात मिळते.
‘एक्सचेंज फॉर सोलर’ची कार्यप्रणालीही अगदी कस्टमर फ्रेंडली आहे. फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडीलवर जसे स्वस्त शॉपिंगचे पर्याय आहेत तसेच इथं सौरऊर्जेसंदर्भात लागणारं साहित्य स्वस्त दरात देणारे वेंडर शोधता येतात. फक्त त्यासाठी तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे, याची माहिती द्यावी लागते. ही माहिती मिळाल्यानंतर तिथल्या सर्वेक्षणापासून इतर सर्व गोष्टी जुळवून आणण्याचे काम ‘एक्सचेन्ज फॉर सोलर’ करते. यामुळे ७५ लाखांना मिळणारे सोलर पॅनल अगदी ६२ लाखांपर्यंत उपलब्ध होते. पाच वर्षाच्या वीजवापरातून हा खर्च वसूल होतो. त्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प मोफत होतो. गेल्या तीन महिन्यात कंपनीनं आठ प्रकल्प मार्गी लावले असून आणखी १०० जणांच्या यादीवर काम सुरू आहे.
देशात वीजटंचाई असल्यामुळे वीज निर्मितीचे अनेक मोठे प्रक
ल्प सुरू करण्यात आले. पण ते कार्यान्वित होण्यासाठी कोळसा, गॅस यांची आवश्यकता असते, त्याचांही तुटवडा आहे. काही प्रकल्पांसाठी इंडोनेशियातून कोळसा आयात केला जातो, पण त्यामुळे विजेचा उत्पादन खर्च व पर्यायाने किंमत वाढते. सौरऊर्जा म्हणूनच महत्वाची आहे. ग्रामीण भागात, दुर्गम भागात जिथे नेहमीच्या विजकेंद्रातून थेट वीज पोचवणे शक्य नाही किंवा अति खर्चिक आहे अशा ठिकाणी, त्याबरोबर शहरी-निमशहरी भागातही हॉस्पिटल्स, मोठी तीर्थस्थाने, मंदिरे, शाळा, मोठी गृहसंकुले, सार्वजनिक स्वच्छतागृहे याठिकाणी सौरऊर्जेची पॅनल्स बसवली, तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकेल. पावसाच्या अनियमिततेमुळे सर्वसामान्यांना पाण्याची किंमत कळू लागली आहे. आता गरज आहे सौरऊर्जेची किंमत ओळखून त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याची!
- नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर
संस्थापक मॅक्सेल फाउंडेशन.
भारत विरुद्ध इंडिया...
ग्लोबलायझेशन व माहिती-तंत्रज्ञानामुळे शहरांतील तरुणांनी साधलेली प्रगती ग्रामीण भागातील तरुणांना अजूनही हवी तशी साधता आलेली नाही, हे कटू सत्य आपण मान्य करायला हवे. शहरात असलेल्या पायाभूत सुविधा देशातील हजारो गावांना अजूनही मिळालेल्या नाहीत. कित्येक गावांतील प्राथामिक शाळांतून एक साधा दिवादेखील नाही, तिथे संगणक कसा असेल? तिथे अजूनही ‘वीज’ नाही.
अशा अंधारात जगणाऱ्या गावांना सौरऊर्जेने प्रकाशमान करणारे हे किमयागार आहेत अंशुमन लाट, समीर नायर, प्रसाद कुलकर्णी हे तीन उच्चविद्याविभूषित तरुण! आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करत असूनही त्यांना सामाजिक जाणीव स्वस्थ बसू देत नव्हती. या तळमळीतूनच नेमके काय करायचे याचा शोध घेत असताना पारंपारिक उर्जास्रोतांच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासावर पर्याय शोधण्यावर काम करण्याचा विचार पक्का झाला आणि २४ एप्रिल २००८ ला रितसर 'ग्राम ऊर्जा सोल्यूशन्स प्रा. लि.' कंपनी स्थापन करण्यात आली. ग्राम ऊर्जा ही वीजेचे जाळे (पॉवर ग्रीड) नसलेल्या गावांसाठी सौरऊर्जेवर आधारित मायक्रो ग्रीड प्रकल्प, स्वयंपाकघरातील इंधनासाठी सामूहिक बायोगॅस प्रकल्प व बायोगॅस वितरणासाठी ग्रीड, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सौरपंप असे प्रकल्प राबवते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मुंबई पोलीस होणार हायटेक, बॉम्बशोधक पथकामध्ये सामील होणार रोबोट्स
एखाद्या हॉलीवूडपटाच्या चित्रपटाचे कथानक वाटावे असा अद्ययावत बदल मुंबईच्या पोलीस दलात होत असून बॉम्बशोधक पथकामध्ये दोन रोबोट्स येथ आहेत. बॉम्ब शोधणे आणि त्याला निकामी करण्याच्या कामात ते रोबोट्स पोलिसांना साथ देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे रोबोट्स वायरलेस असणार आहेत. ही एक प्रकारची कॉम्पॅक्ट मशीन असेल आणि बॉम्ब शोधणे आणि त्याला निकामी करणे ही दोन्ही कामे ही मशीन करू शकेल. या दोन रोबोट्ससाठी आम्ही ऑर्डर दिलेली असून लवकरच ती आमच्या बॉम्बशोधक पथकात सामील होईल असे पोलीस महासंचालक डी. जी. माथूर यांनी म्हटले.
रोबोट्स व्यतिरिक्त फुल बॉडी बॉम्ब सुट्स आणि डिजीटल वायरलेस अप्लिकेशन सिस्टम्स देखील येणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.
जगात अनेक ठिकाणी पोलीस या यंत्रणेचा वापर करतात. या रोबोट्सला अनेक कंट्रोल अप्लिकेशनल असतात. जसं की एखाद्या पाकिटात किंवा खेळण्यामध्ये जर बॉम्ब असेल तर हा रोबोट त्याला शोधून काढतो. तसेच जी व्यक्ती हे हाताळत आहे त्याला रोबोटिक आर्मदेखील वापरता येतो. त्यामुळे घातपाताचा धोका कमी होतो.
या रोबोटला तुम्ही अनेक सूचना देऊ शकतात आणि तो त्या प्रमाणे कार्य करतो असे त्यांनी सांगितले. रोबोटला अनेक अॅसेसरीज जोडता येऊ शकतात जसे की कात्री, टॉर्च, एखादे हत्यार. या रोबोटला आपल्या १०० मीटर कक्षेतील बॉम्ब शोधता येऊ शकतो. तेव्हा हा रोबोट ट्रेनमध्ये जाऊ शकतो, बॉम्ब शोधू शकतो आणि तो निकामी करुन तुमच्याकडे आणून देऊ शकतो.
हे रोबोट माणसासारखे दिसणार नसून ती एक कॉम्पॅक्ट मशीन असणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र पोलिसांच्या दलात याआधी देखील रोबोट्सचा वापर करण्यात आला होता. १९९० मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडे रोबोट्स होते परंतु ती गोष्ट आता कालबाह्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस दल अद्ययावत करण्याच्या प्रयत्नातून हे करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या ज्या बॉम्ब सुट्सची ऑर्डर देण्यात आली आहे ते बॉम्ब सुट्स आताच्या सुट्सपेक्षा खूप निराळे आहेत. या सुट्समुळे पूर्ण संरक्षण होऊ शकते असे पोलिसांनी म्हटले.
या व्यतिरिक्त पोलीस कंट्रोल रुम वायरलेस अप्लिकेशन प्रोटोकॉलने अद्ययावत केली जाणार आहे. सध्या असलेली प्रणाली ही जुनी झाली असून उंच इमारतींमुळे सिग्नल्स मिळणे अवघड होऊन बसते या प्रणालीमुळे ही समस्या दूर होईल असे पोलिसांनी म्हटले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹राजाराम शिंदे कालवश
राजकारण, शिक्षणासह सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा नेता हरपला
चिपळूणचे माजी आमदार, नाट्यमंदारचे संस्थापक व मंदार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व ६९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राजाराम केशवराव शिंदे उर्फ अप्पा (८६) यांचे आज (शनिवारी) सायंकाळी ७ वाजता कोळकेवाडी येथे निधन झाले. उद्या रविवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता कोळकेवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजाराम शिंदे हे दोन वेळा चिपळूणचे आमदार म्हणून निवडून आले होते. प्रथम १९७८ साली ते जनता पक्षातर्फे आमदार झाले. त्यानंतर १९८0 साली जनता (जेपी) पक्षातर्फे ते दुसºयांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये त्यांनी इंदिरा काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले.
दसपटीचे सुपूत्र असणाºया शिंदे यांनी दि. ४ एप्रिल १९६५ रोजी नाट्य मंदार या संस्थेची स्थापना केली आणि ४० व्यावसायिक नाटकांची निर्मिती केली. नाट्यकलावंतांसाठी पहिली लक्झरी बस त्यांनी उपलब्ध करुन दिली. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे त्यांनी १९८८ मध्ये अध्यक्षपद भूषविले.
नाट्य मंदारच्या माध्यमातून त्यांनी विविध नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यनिर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून त्यांनी काम केले. १९८३ मध्ये पेढांबे येथे मंदार एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विकासाला गती दिली. वाघजाई केदार देवस्थान ट्रस्ट व टेक्नोमेड फाऊंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असताना त्यांनी दसपटीतील दादर येथे रामवरदायिनीच्या भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.
२००१ मध्ये परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते. मुंबई मराठी साहित्य संघ व अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. दसपटी विभाग मराठा सेवा संघाचे ते संस्थापक व संघटक होते. ग्रामसुधार केंद्र मुंबई व परशुराम सहकारी साखर कारखाना चिपळूणचे ते चेअरमन होते.
व्ही. शांताराम यांच्या रंगमंदिर निर्मित शिवसंभवमध्ये त्यांनी भूमिका केली होती. हिरा हरपला, साष्टांग नमस्कार, एकच प्याला, क्रांतिकौशल्य, बेबंदशाही, धर्मवीर संभाजी, अटकेपार, डॅडीचा नवरा मम्मीची बायको व जय जगदीश हरे या नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी कांचनगंगा या नाटकाचे लेखन केले होते. त्यांच्या आयुष्यावर ‘राजाराम शिंदे माणूस मोठा जिद्दीचा’ हा गौरवग्रंथ काढण्यात आला आहे. ‘दोन कोटींचा माणूस’ आत्मचरित्रत्यांनी लिीहले आहे. ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपटही त्यांनी केला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष स्वत:ची वृत्तवाहिनी सुरू करणार
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाकडून स्वत:ची वृत्तवाहिनी सुरू करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत आज तब्बल १० वर्षांनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देशाच्या सर्व राज्यांतील माहिती व प्रसारण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समाजवादी पक्षाकडून हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या माहिती व प्रसारण खात्याची सूत्रे अखिलेश यादव यांच्याकडेच आहेत. मात्र, आजच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी उत्तर प्रदेशचे व्यापारी कर खात्याचे मंत्री यासर शहा समाजवादी पक्षाची भूमिका केंद्रासमोर मांडतील. केंद्र सरकार कोणत्याही राज्याला स्वत:ची वृत्तवाहिनी सुरू करण्यास परवानगी देत नाही. हा चितेंचा विषय आहे. जर खासगी आणि सरकारी संस्थांना अशी परवानगी दिली जात असेल, तर मग राज्य सरकारला का नाही, असा सवाल यासर शहा यांनी उपस्थित केला.
दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांनी त्यांच्या मंत्र्यांना समाजवादी पक्षाला वृत्तवाहिनी सुरू करून द्यावी, यासाठी भक्कमपणे बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्य सरकार व विधिमंडळांना अशाप्रकारची परवानगी देता येत नाही, हे अगोदरच केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने दिल्ली विधिमंडळातील सभापती राम निवास गोयल यांची याचिका फेटाळून लावली होती. गोयल यांनी लोकसभा आणि राज्यसभा वाहिनीच्या धर्तीवर सभागृहातील कामकाजाचे प्रक्षेपण करण्यासाठी नवीन वाहिनी सुरू करण्याची परवानगी मागितली होती.
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि भाजप जोरात तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून भाजपने प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करून प्रत्येक निवडणुकीत यश मिळवले आहे. हीच गोष्ट ओळखून अखिलेश यादव यांच्याकडून राज्य सरकारच्या प्रचारासाठी स्वतंत्र वृत्तवाहिनीची मागणी करण्यात आल्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत सरकार या मागणीला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
तत्पूर्वी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे. नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जाहीर केले. या माध्यमातून नोटाबंदीच्या निर्णयामुळे भाजप विरोधात निर्माण झालेल्या रोषाचा फायदा उठविण्याची समाजवादी पक्षाची रणनीती आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कस्तुरबांची साडी, रवींद्रनाथ टागोरांचे हस्तलिखित सापडले आश्रमात
सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीमच्या शिल्पकार आशादेवी व इ.डब्ल्यू. आर्यनायकम (माँ-बाबा) यांच्या निधनापासून कुलूपबंद असलेली आलमारी तब्बल ४७ वर्षांनंतर उघडण्यात आली. या आलमारीत माँ-बाबा यांनी जतन केलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आढळल्या. एका गाठोड्यात कस्तुरबा गांधी यांची खादीची पांढरी साडीही होती. सोबतच कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या हस्तलिखित तीन पत्रांसह अनेक ऐतिहासिक व मौल्यवान साहित्यही आढळले.
सन १९३६मध्ये तेव्हाच्या शेगाव या खेड्यात गांधीजी व कस्तुरबा वास्तव्यास आले. नंतर शेगावला सेवाग्राम असे नाव पडले. आश्रमातून त्यांचे कार्य सुरू झाले.
गांधीजींच्या इच्छेनुसार रवींद्रनाथांनी शिक्षणाच्या कार्यासाठी आशादेवी व आर्यनायकम यांना शेगावला पाठविले. १९३७ मध्ये गांधीजींच्या शिक्षणप्रणालीला हिंदुस्थानी तालिमी संघाच्या स्थापनेने सुरुवात झाली. मसुदा समितीची एक बैठक नई तालीममध्ये झाली होती.
१९६७मध्ये बाबा व १९७०मध्ये माँचे निधन झाले. यानंतर नई तालीम कुटीमधील त्यांच्या लोखंडी आलमारीला उघडण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही.
‘अॅन्टीक्लॉक टष्ट्वेल टू नाईन’ अशी कुलपाची व्यवस्था असून याचे ज्ञान कुणाला नसल्याने ती उघडू शकली नाही. याबाबत सेवाग्राममधील मंत्री प्रदीप दासगुप्ता यांना थोडी फार माहिती होती. अथक प्रयत्नानंतर ते कुलूप उघडले गेले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹लवकरच रद्द होणार गव्हावरील आयात कर
गव्हावर जारी करण्यात आलेला १० टक्के आयात कर रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आता विचाराधीन असून तापमानात हिवाळय़ामध्येही झालेली वाढ पाहता, हा निर्णय मिळणा-या संकेतामधून घेण्यात येणार असल्याचे समजते. विभागाच्या माहितीनुसार, गव्हाच्या उत्पादनावर तापमानात होणा-या बदलामुळे मोठय़ा प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आणि किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी आयात कर घटविल्याने व्यापक मदत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अन्न मंत्रालयाकडून पाठविण्यात आले आहे.
तापमानातील बदलाचा कमी-अधिक प्रमाणात गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तापमान आगामी वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर तापमानात १ डिग्री सेल्सियसने वाढ झाल्यास गव्हाच्या उत्पादनात १० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. याबाबत कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि कृषि सचिव शोभा पटनायक यांनी गव्हाच्या पिकाबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹डॉ. रमेश प्रभू यांचे निधन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेचे माजी महापौर, माजी आमदार व मनसेचे विद्यमान नेते डॉ. रमेश प्रभू (७५) यांचे रविवारी पहाटे विलेपार्ले येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रभू हे सन १९८५ ते १९९२ या कालावधीत शिवसेनेतर्फे विलेपार्ले येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी सन १९८७-८८ या कालावधीत मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. १९८७मध्ये झालेल्या विधानसभेच्या विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रभू निवडून आले होते. या निवडणुकीत प्रभू यांनी हिंदुत्वाच्या नावावर मते मागितल्याने न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली होती.
शिवसेनेने सन २००४च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने प्रभू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा तसेच सेनेच्या उमेदवाराचा पराभव होऊन काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. मात्र तेथेही ते फार काळ रमले नाहीत. मनसेत मागील काही वर्षे ते काम करीत होते. विलेपार्ले येथे प्रबोधन क्रीडा संकुलाची बांधणी व जुहूच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पार्ले भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जगातील सर्वांत मोठा बोगदा कार्यान्वित
जगातील सर्वांत मोठा बोगदा असलेल्या स्वित्झर्लंडमधील गॉटहार्ड बेस टनेलमधून रविवारी प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. या बोगद्याचे उद्घाटन यंदा जूनमध्ये करण्यात आले होते.
रविवारी झ्युरिच ते लुगानो रेल्वे प्रवासी घेऊन या बोगद्यातून धावली. स्विस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ही रेल्वे झ्युरिचहून स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३९) रवाना झाली आणि लुगानोला (स्वित्झर्लंडच्या दक्षिणेकडील शेवटचे मोठे शहर) सकाळी आठ वाजून १७ मिनिटांनी पोहोचली. बोगद्यामुळे या प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी झाला.
हा बोगदा ५७ किलोमीटरचा आहे. तो बांधण्यासाठी १७ वर्षे लागली असून, त्यासाठी १.८ कोटी डॉलर खर्च आला आहे. या बोगद्यातून पहिली रेल्वे लुगानोला पोहोचल्यानंतर ‘इट्स ख्रिसमस’ अशा शब्दांत स्विस रेल्वेचे (एसबीबी) प्रमुख अँड्रेस मेयेर यांनी आनंद व्यक्त केला.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या प्रकल्पाने युरोपातील तमाम स्थापत्य क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. या बोगद्याच्या बांधणीत पारंपरिक ब्लास्ट अँड ड्रिल या तुलनेने जोखमीच्या पद्धतीऐवजी टनेल बोअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे रॉटरडॅम (पश्चिम नेदरलँडमधील शहर, उत्तर समुद्राच्या किनाऱ्याजवळ) आणि अॅड्रियाटिक समुद्र (इटलीचा पूर्व किनारा) या दरम्यानचे अंतर कमी वेळात कापणे शक्य होणार आहे.
गॉटहार्ड बेस टेनल - स्वित्झर्लंड
जगातील सर्वांत मोठा बोगदा
लांबी : ५७ किलोमीटर
सेइकान बोगदा -जपान
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा
लांबी : ५३.९ किलोमीटर
चॅनेल टनेल (ब्रिटन व फ्रान्सला जोडणारा)
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बोगदा
लांबी : ५०.५ किलोमीटर
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹स्क्रिझोफ्रेनियाचे निदान होणार वेगाने
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या तीन वद्यिार्थ्यांनी भारताचा झेंडा अटकेपार रोवला आहे. या विद्यार्थ्यांनी एका विज्ञान स्पर्धेमध्ये तब्बल दोन लाख अमेरिकन डॉलर्सची स्कॉलरशीप मिळवली आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी केलेल्या संशोधनाचा जगभरातील डॉक्टर्सना खूप उपयोग होणार आहे. या संशोधनाच्या मदतीने डॉक्टर विविध रोगांसह स्क्रिझोफ्रेनियाचेही निदान वेगाने करू शकणार आहेत.
श्रीया आणि अध्या बीसम (१६) या टेक्सासमध्ये राहणाऱ्या अकरावीत शिकणाऱ्या जुळ्या बहणिींना एक लाख डॉलर्सचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. तर वनिीत इदुपुगांती या विद्यार्थ्याला ‘इंजेस्टबिल बॅटरी’ तयार करण्यासाठी एक लाख डॉलर्सचे स्वतंत्र बक्षीस मिळाले आहे. या बॅटरीच्या मदतीने डॉक्टर्सच्या रोगनिदानात क्रांतकिारी बदल होऊ शकतात.
या तघिांव्यतिरिक्त भारतीय वंशाच्या अन्य तीन विद्यार्थ्यांनी विविध विभागांत पुरस्कार प्राप्त केले आहेत. तर दोघांना विभागून पुरस्कार देण्यात आला आहे.
‘बीसम बहणिी आणि वनिीतने केलेल्या संशोधनांचा उपयोग जगभरातील डॉक्टर्स आणि रुग्णांना होणार आहे. या तघिांव्यतिरिक्त मनन शाह, प्रतीक कलाकुंतला, प्रणव शिवकुमार, अनकिा चीरला आणि निखिल चीरला यांनाही पुरस्कार मिळाले आहेत,’ असे सिमेन्स फाऊंडेशनचे कार्यकारी अधिकारी डेव्हडि यांनी सांगितले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मानवाधिकार आयोगाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
सूचनांची अंमलबजावणी करण्याची मागणी
मुंबई- जानेवारीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या सूचनांकडे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जनआरोग्य अभियानाने केली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जानेवारीत एका जनसुनावणीच्या वेळी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील रुग्णांच्या तक्रारी ऐकल्या. या वेळी राज्याचा आरोग्य विभाग आणि प्रशासनाला काही सूचना करण्यात आल्या होत्या. रुग्णांचे हित जपण्यासाठी या सूचना होत्या. वर्ष संपत आले तरी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या सूचनांची अंमलबजावणी केलेली नाही, असे जनआरोग्य अभियानातर्फे सांगण्यात आले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य समितीचे सदस्य डॉ. अभय शुक्ला यांनी आयोगाच्या सूचनांचे स्वागत केले पाहिजे, असे सांगितले.
आरोग्य व्यवस्थेचे भान ठेवून या सूचना करण्यात आल्या होत्या. डॉक्टरांवर हल्ले होऊ नयेत म्हणून सरकार कायदे करू शकते, तर मोठ्या संख्येने नाडल्या जाणाऱ्या रुग्णांचा विचार का केला जात नाही? वैयक्तिक प्रकरणांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे दिलेल्या सूचनांचे पालन झाले नसेल, तर संबंधित यंत्रणेवर कारवाई होऊ शकते.
डॉक्टरांवरील हल्ले सरकारला रोखायचे असतील, तर रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने योग्य असलेले कायदे आणणे आवश्यक आहे, असे डॉ. शुक्ला म्हणाले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचना
- राज्यात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा आणणे
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तक्रार निवारण यंत्रणेचा आढावा घेणे
- मोफत उपचार नाकारणाऱ्या खासगी आणि चॅरिटेबल ट्रस्टविरोधात तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणे
- एचआयव्ही आणि एड्स झालेल्या रुग्णांना औषधांचा पुरवठा वेळेवर व्हावा, यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करणे
- रुग्णांच्या तक्रारी पोलिसांकडे जाण्यापूर्वी होणारे स्क्रीनिंग सात दिवसांत पूर्ण व्हावे. या पॅनलमध्ये निवृत्त न्यायाधीश असावा
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कॅशलेस व्यवहारांत टीजेएसबीची आघाडी
टीजेएसबी सहकारी बँकेने कॅशलेस व्यवहारांत आघाडी घेतली असून केंद्र सरकारचे रोकडविरहित अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी ट्रान्झॅप हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. बँकेच्या अशा उपक्रमांची दखल घेऊन या प्रयत्नांचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी रविवारी बँकेचे कौतुक केले. कॅशलेस व्यवहारांची सातत्याने वाढ व्हावी, यासाठी राजपुरिया बाग, विलेपार्ले येथे एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राधामोहन सिंग बोलत होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षय कुमार काळे यांची निवड
फेब्रुवारीमध्ये डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षय कुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक प्रवीण दवणे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना हरवून ज्येष्ठ काव्य समीक्षक अक्षय कुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे.
काळे हे साहित्य अकादमीचे सदस्य आहेत. नागपूर विद्यापीठात ते मराठीचे विभागप्रमुख देखील आहेत.
गालीबचे काव्यविश्व: अर्थ आणि भाष्य, अर्वाचिन मराठीचे काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता आकलन आस्वाद आणि चिकित्सा हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच, सूक्तसंदर्भ’, ‘गोविंदाग्रज-समीक्षा’, ‘कविता कुसुमाग्रजांची’ या त्यांच्या पुस्तकांनाही समीक्षक आणि अभ्यासकांची दाद मिळाली आहे.
काळे यांनी ‘स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह’ या विषयामध्ये पीएचडी मिळवलेले आहे.
शनिवारी मतपत्रिका पाठविण्याची शेवटची मुदत होती. मतदारांनी पाठवलेल्या १०७९ मतपत्रिकांद्वारे आज सकाळी संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार हे ठरणार होते.
सुरुवातीपासूनच या निवडीची चर्चा वर्तुळात होती. प्रवीण दवणे यांनी प्रवास करुन मतदारांची मने वळविण्याच प्रयत्न केला परंतु त्यांना केवळ १४९ मते पडली. मदन कुलकर्णी आणि जयप्रकाश घुमटकर यांची कामगिरीदेखील निराशाजनकच राहिली.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹थिबा राजाच्या पुण्यतिथीला म्यानमारचे उपराष्ट्रपती येणार
गेल्या शतकात ब्रिटिशांनी येथे कैदेत ठेवलेला तत्कालीन ब्रह्मदेशचा (म्यानमार) राजा थिबा याच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त म्यानमारचे उपराष्ट्रपती यु मयन्त सवे आणि लष्करप्रमुख अनुग हलाइंग येत्या १६ डिसेंबर रोजी येथील थिबा राजवाडय़ाला भेट देणार आहेत.
या दौऱ्यात हे ज्येष्ठ अधिकारी येथील थिबा राजाच्या समाधीस्थळालाही भेट देऊन आदरांजली अर्पण करणार आहेत.
तत्कालीन ब्रह्मदेशचे राजेपद थिबाने ग्रहण केले. पण त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी ब्रिटिशांनी त्या देशावर स्वारी करून थिबाच्या सैन्याचा पराभव केला. त्यानंतर थिबाराजाचा प्रजेपासून संपर्क पूर्णपणे तोडण्यासाठी त्याला भारतात आणण्यात आले.
तत्कालीन मद्रास बंदरामार्गे थिबाला सहकुटुंब रत्नागिरीत आणले गेले. येथे काही काळ अन्य ठिकाणी ठेवल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या राजवाडय़ात त्याला हलवण्यात आले. पण तेथे फक्त सात वर्षांच्या वास्तव्यानंतर १ डिसेंबर रोजी थिबाराजाचे देहावसान झाले. हे ठिकाण आता ‘थिबा राजवाडा’ म्हणून पर्यटन स्थळ बनले आहे. थिबाराजाच्या वापरातील काही वस्तू आणि अन्य पुरातन कलात्मक वस्तूंचे छोटेखानी संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे.
रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेतर्फे दरवर्षी जानेवारीत तीन दिवस येथे अतिशय दर्जेदार संगीत महोत्सव आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे या परिसराला पुन्हा एकवार ऊर्जितावस्था आली आहे. म्यानमारचे उपराष्ट्रपती व अन्य मान्यवर येत्या शुक्रवारी (१६ डिसेंबर) या ठिकाणी भेट देऊन आपल्या देशाच्या शेवटच्या राजाला आदरांजली अर्पण करणार आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹आंध्र-तामिळनाडूत अतिदक्षतेचा इशारा
चक्रीवादळ ‘वरदा’मुळे दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूचे किनारी भाग अतिदक्षतेच्या इशाऱयावर आहेत. वरदा चक्रीवादळ सोमवारी दुपारपर्यंत तेथे पोहोचण्याची चिन्हे आहेत. प्रादेशिक हवामान खात्यानुसार या 2 राज्यांबरोबरच पाँडेचेरीमध्ये देखील बहुतेक ठिकाणी रविवारी संध्याकाळपासून मोठय़ा प्रमाणात पाऊस पडू शकतो. 90 ते 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून आंध्रच्या 6 जिह्यांमध्ये 190 मिलिमीटर पाऊस पडू शकतो.
दोन्ही राज्यांच्या किनारी भागात समुद्रात उंच लाटा उसळू शकतात. यामुळे मच्छीमारांना पुढील 2 दिवसांपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये सोमवारी दुपारी 12 पर्यंत चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशच्या कृष्णा, गुंटुर, प्रकाशम, चित्तूर, कुडप्पा आणि अनंथापूरमध्ये 190 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक एस. बालकृष्णन यांनी दिली.
विजयवाडात नियंत्रण कक्ष
वरदामुळे निर्माण होणाऱया स्थितीचा सामना करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या विजयवाडामध्ये नियंत्रण कक्ष बनविण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चक्रीवादळ प्रभावित जिह्यांच्या देखरेखीसाठी 4 आयएएस अधिकाऱयांना नियुक्त केले आहे. याशिवाय एनडीआरएफच्या 5 पथकांना या भागांमध्ये रवाना करण्यात आले आहे. किनारी भागाच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळाचे मार्गक्रमण
भारतीय हवामान खात्यानुसार पश्चिम-मध्य आणि बंगालच्या उपसागरावर बनलेले चक्रीवादळ वरदा 11 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकत आहे. वर्तमान काळात ते नेल्लोरच्या दक्षिण-दक्षिणपूर्वेपासून 520 किलोमीटर, मछलीपट्टणमच्या पूर्व-दक्षिणपूर्वेपासुन 490 किलोमीटर तर चेन्नईच्या पूर्व-उत्तरपूर्वेपासून 480 किलोमीटर अंतरावर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची ही तीव्रता कायम राहण्याची चिन्हे आहेत. यानंतर ते दक्षिण आंध्रपदेश किनारा आणि उत्तर तामिळनाडू किनाऱयाच्या दिशेने पुढे सरकेल.
भीषण चक्रीवादळाचे स्वरुप
बंगालच्या उपसागरात बनलेले वरदा लवकरच आणखी प्रभावी होत भीषण चक्रीवादळाचे स्वरुप घेऊ शकते असा स्कायमेटचा अनुमान आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबारमध्ये मागील 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. दक्षिण ओडिशा आणि छत्तीसगढच्या दक्षिण भागात पाऊस पडू शकतो.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कॅशलेस पेमेंटच्या शंकानिवारणासाठी येत आहे हेल्पलाईन, १४४४४ वर करा डायल
नोटाबंदीच्या एक महिन्यानंतरही बॅंका आणि एटाएमसमोरील रांगा कमी होत नसल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने टी. व्ही. चॅनल आणि वेबसाइट्सद्वारे डिजीटल पेमेंटचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटचे वेगवेगळे उपाय काढणाऱ्या सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे.
कॅशलेस पेमेंट करताना जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर त्यासाठी सरकारने कॅशलेस टोल फ्री हेल्प लाइन नंबर सुरू केला आहे. जर तुम्हाला कॅशलेस पेमेंट करण्यात काही अडचण असेल तर तुम्ही १४४४४ या नंबरवर फोन करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पुढील आठवड्यामध्ये ही सेवा सुरू होणार आहे.
यासाठी सरकारने नासकॉमची मदत घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी जरी या सेवेचा लाभ घेतला तरी फोन करण्यास अडचण होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे. संपूर्ण देशासाठी एकच हेल्प लाइन वापरली जाणार आहे. त्यामुळेच या सेवेचा क्रमांक हा पूर्ण देशासाठी एकच असणार आहे. देशात यासाठी कॉल सेंटर्सची स्थापना केली जाईल अशी माहिती नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी म्हटले.
ही हेल्पलाइन लोकांना वेगवेगळ्या स्तरावर मदत करणार आहे. ग्राहकांकडून माहिती घेऊन त्यांच्या समस्येचे समाधान केले जाईल. नेमकी अडचण कोठे आहे विचारुन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. जसे की फोनमध्ये काय फीचर्स आहेत, आधारकार्ड नंबर आणि बॅंकेचे अकाउंट या स्तरावर त्यांची मदत केली जाईल.
लोकांच्या समस्यांचे समाधान व्हावे याकरिता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘डीजीशाला’ हे चॅनेल सुरू केले आहे. दूरदर्शनची डीटीएच सेवा घेतल्यास त्यावर हे चॅनल दिसते तर कॅशलेस इंडिया ही वेबसाइट देखील सरकारने सुरू केली आहे. त्या वेबसाइटद्वारे देखील कॅशलेस पेमेंटबद्दल ज्ञान दिले जाते.
आठ नोव्हेंबर नंतर देशामध्ये कॅशलेस पेमेंटचे ४०० ते १००० टक्क्यांनी वाढल्याचे माहिती आणि विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. हेल्पलाइन सेवा कधीपर्यंत सुरू होईल असे विचारले असता पुढील आठवड्याच्या शेवटीला सुरू होईल असे उत्तर चंद्रशेखर यांनी दिले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹‘पुरुषोत्तम’’वर ‘पाझर’ची मोहोर
‘पीआयसीटीच्या ‘अवडंबर’ला तिसरा क्रमांक
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पाझर या एकांकिकेने महाअंतिम फेरीचे विजेतेपद मिळवून पुरुषोत्तम करंडकावर आपली मोहोर उमटवली. डीबीजे कॉलेज चिपळूणच्या ‘खारूताईचा ड्रॅमॅटिक वीकेंड’ या एकांकिकेने सांघिक द्वितीय तर, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या (पीआयसीटी) ‘अवडंबर’ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी ८ ते ११ डिसेंबर दरम्यान भरत नाट्य मंदिर येथे रंगली. जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नागपूर या पाच केंद्रांवरील १८ संघांनी एकांकिका सादर केल्या. स.प. महाविद्यालयाच्या ‘३०० मिसिंग’ या एकांकिकेला प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार देण्यात आला. विजेत्यांना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, स्पर्धेचे परीक्षक विनीता पिंपळखरे, किरण यज्ञोपवित, स्पर्धेसाठी अर्थिक सहकार्य करणारे आगटे दाम्पत्य आदी या वेळी उपस्थित होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹धारणीत महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय
कोवळ्या पानगळीमुळे विदर्भातील शापित नंदनवन अशी मेळघाटची राज्यात कुप्रसिद्धी आहे. गरोदर मातांचे पुरेसे पोषणच होत नसल्याने या भागातली कुपोषणाची समस्या उग्र रूप धारण करून आहे. यातून मार्ग काढण्यासाठी गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धारणीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु केले जाणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आढावा घेतला. मेळघाटच्या दौऱ्यावर आलेल्या क्षत्रिय यांनी कुपोषणाची वस्तुस्थिती खील जाणून घेतली.
यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, अप्पर आदिवासी आयुक्त गिरीश सरोदे, परिविक्षाधिन अधिकारी राहुल कर्डिले, अग्रणी बँक व्यवस्थापक रामटेके उपस्थित होते.
मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी अमृत आहार योजनेतून २४ हजार १९९ बालकांना आठवड्यातून चार अंडी दिली जातात. त्याचाही क्षत्रिय यांनी आढावा घेतला. मेळघाटात घरात होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण जवळपास २८ टक्के आहे.
बालमृत्यू कमी करण्यासाठी दवाखान्यातील प्रसूतींचे प्रमाण वाढवावे लागेल. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी प्रयत्न करावे. मेळघाटातील स्ट्रॉबेरी प्रकल्पासोबतच बोड येथील ७४५ हेक्टरवर होणारा नागपूरी म्हशी व गायीच्या संवर्धनासाठी होणारा प्रकल्प हा मेळघाटातील लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतशीर ठरू शकेल.
या प्रकल्पाची विस्तृत माहितीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना दिली. मेळघाटात दुग्धव्यवसाय व
मत्स्यव्यवसाय वाढीसाठी पूरक व पोषक वातावरण असून, त्यादृष्टीने प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. पालघरच्या धर्तीवर मेळघाटातील आश्रमशाळेतील मुलांना स्वच्छ व सकस आहाराच्या दृष्टीने टाटा ट्रस्टच्या मदतीने मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा प्रकल्प सुरू करण्यात येईल. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹'वरदा' नाव पाकिस्तानी! वरदा म्हणजे गुलाब
तामिळनाडून घोंघावत शिरलेल्या चक्रीवादळाच्या नावाचा म्हणजे 'वरदा' या शब्दाचा अर्थ आहे - गुलाब. हा मूळ उर्दू शब्द आहे. या वादळाचे बारसे पाकिस्तानने केले आहे.
मागील दहा दिवसांपासून या वादळाचा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात थायलंडच्या दक्षिणेला हे चक्रीवादळ तयार झाले. 'वरदा'च्या पूर्वी आलेल्या 'हुडहुड' वादळाचे नाव ओमानने ठेवले होते. त्यापूर्वीचे 'फायलीन' नाव थायलंडने सुचवले होते. यंदा नाव ठेवण्याची पाळी पाकिस्तानची होती. आतापर्यंत चक्रीवादळांची ६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका वादळाला 'लहर' हे नाव दिले होते.
कशी झाली सुरुवात?
चक्रीवादळाच्या नामकरणाला १९५३ मध्ये अटलांटिक क्षेत्रात झालेल्या करारानुसार सुरुवात झाली. हिंदी महासागरात येणाऱ्या वादळांना नावे देण्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता. त्यानुसार २००४ पासून हिंदी महासागरातल्या वादळांना आशियातले ८ देश क्रमाक्रमाने नावे सुचवतात. भारत, बांगला देश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान आणि थायलंड या ८ देशांचा त्यांच्या नावांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार क्रम लावला जातो. त्यानुसार ते नावे सुचवतात.
तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाला वरदा हे नाव पाकिस्तानने ठेवले. चक्रीवादळांना नाव देण्याची परंपरा 20 व्या शतकापासून सुरु झाली.
चक्रीवादळांना एखादं विशिष्ट नाव देण्याचं कारण म्हणजे, चक्रीवादळासंदर्भात दोन देशात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत होणं हे मुख्य कारणं आहे. माहितीची देवाण-घेवाण करताना जर एकाच चक्रीवादळाला अनेक नावांनी संबोधले तर घोळ होऊ शकतो. तसेच, अनेक अफवा पसरु शकतात. त्यामुळे प्रत्येक देशांने येणा-या चक्रीवादळाला नाव देण्याचं ठरवलं. चक्रीवादळाला नाव देण्याचा करार अटलांटिक क्षेत्रात 1953 साली झाला.
भारतानं २००४ साली हिंदी महासागरात येणार्या वादळाला नाव देऊन या परंपरेला सुरूवात केली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंड परिसरातील अन्य देशांच्या वेधशाळांशी संपर्क करते. म्हणजेच ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड इत्यादी देशांशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादे नाव निश्चित केलं जातं.
वरदा या वादळापूर्वी हुडहुड हे वादळ आलं होतं. या वादळाला ओमान या देशानं नाव ठेवलं होतं. त्याआधीच्या वादळाला फायलीन हे नाव थायलंडने दिले होतं. तर, भारतानं आत्तापर्यंत अग्नि, आकाश, बिजली आणि जल अशी नावं दिली आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भोजपूरीला घटनात्मक दर्जा मिळणार
भोजपूरी, भोटी आणि राजस्थानी या तीन भाषांचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे. त्यामूळे या तिन्ही भाषांना लवकरच घटनात्मक दर्जा मिळणार आहे. अजून ३८ भाषा आठव्या अनुसूचित येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस,त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असून तिथे या भाषांना मान्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपाचे नवी दिल्लीचे अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली. या तिन्ही भाषांना घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार असल्याचे तिवारी म्हणाले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹Vardah updates: वरदा चक्रीवादळाचै थैमान, चौघांचा मृत्यू
वरदा चक्रीवादळ सोमवारी दुपारी चेन्नईत धडकले असून या वादळात आत्तापर्यंत चार जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. वादळात परिसरातील झाडे उन्मळून पडली असून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. झाड उन्मळून पडण्याच्या घटनांनी शहराच्या विविध ठिकाणी अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वरदा हे चक्रीवादळ तयार झाले आहे. थायलंडपासून वरदा चक्रीवादळाचा प्रवास सुरु असून थायलंडमध्ये या वादळाने १२ जणांचे बळी घेतला होता. त्यानंतर हे वादळ भारताच्या दिशेने सरकत होते. सोमवारी दुपारी या वादळाने चेन्नईत धडक दिली. वादळी वा-यांसह मुसळधार पावसाने परिसराला झोडपले आहे. सुमारे दोन ते तीन तासानंतर हे वादळ चेन्नईतून पुढे सरकेल असा अंदाज आहे. मात्र त्यानंतरही मुसळधार पाऊस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्रीनंतर चेन्नईमधील वादळाची तीव्रता कमी होईल असे सांगितले जाते. या वादळाच्या तडाख्यात चेन्नईत २, कांचीपूरम आणि नागापट्टीनममध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
वरदा चक्रीवादळामुळे परिसरात १२० ते १३० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत आहेत. तामिळनाडूमध्ये या वादळाच्या तडाख्यात आत्तापर्यंत दोन जणांनी जीव गमावला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर आपातकालीन यंत्रणांही सतर्क झाल्या आहेत. एनडीआरएफ, सैन्य आणि अन्य यंत्रणा बचावकार्य राबवण्यासाठी सज्ज आहेत. कांचीपूरम आणि तिरुवल्लूरमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. तर चेन्नई विमानतळावरील वाहतूक संध्याकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी, अंदमान व निकोबार बेटांवर अचानक झालेल्या हवामान बदलांमुळे अनेक पर्यटक अडकून पडले होते. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळसदृश्य परिस्थिती यामुळे अंदमानमधील नील आणि हावेलॉक बेटावर अडकलेल्या सर्व २,३६७ पर्यटकांची भारतीय हवाई दल आणि नौदलाने सुखरुप सुटका केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील ५० हून अधिक पर्यटकांचाही समावेश होता.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारताचा ‘एनएसजी’ प्रवेश व मसूद अझहरवरील बंदी मोहिमेस चीनचा विरोध कायम
संयुक्त राष्ट्र संघात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या मोहिमेला चीनने समर्थन देण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर अणुपरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या समावेशाच्या आपल्या भूमिकेतही बदल करण्यास नकार दिला आहे.
एनएसजी देशात भारताचा समावेश करण्यास चीनने यापूर्वी विरोध केला होता. आपण अजूनही आपल्या याच भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केली नसल्याचे कारण पुढे करत चीनने भारताच्या एनएसजीमध्ये समावेशास विरोध केला आहे. भारताच्या एनएसजी सदस्यत्वाच्या अर्जाबाबत चीनने निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. नुकताच भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर म्हणाले होते, चीनने आण्विक ऊर्जेचा औद्योगिक वापरासाठीच्या प्रयत्नांना राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचे भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी म्हटले होते.
चीनने संयुक्त राष्ट्र संघाने मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का दिला आहे. चीनने सुरूवातीपासूनच या प्रकरणात तांत्रिक खोडा घालून ठेवला आहे. याप्रकरणी चीन भारताच्या संपर्कात असल्याचे वृत्त चीनकडून पसरवण्यात आली होती. अखेर चीन आपल्या जुन्या भूमिकेवरच ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹व्हेनेजुएलातही नोटबंदी, मोदींच्या पावलावर पाऊल
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अब की बार, ट्रम्प सरकार' असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'कॉपी' केल्यानंतर, आता व्हेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनीही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत नोटबंदीचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे. व्हेनेजुएलामधील सर्वाधिक मूल्याची, म्हणजेच १०० बोलिवरची नोट पुढील ७२ तासांत चलनातून रद्द करण्याचे आदेश राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी दिले आहेत. नोटांची साठेबाजी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांना दणका देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा ८ नोव्हेंबरला केली होती. तेव्हापासून रोजच, चलन चणचण, बँकांबाहेरील रांगा, एटीएममधील खडखडाट आणि विरोधकांचा हल्लाबोल यामुळे हा निर्णय चर्चेत आहे. त्यावर उलटसुलट मतं मांडली जाताहेत. त्याचवेळी दुसरीकडे, तब्बल११ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. हा आकडा नक्कीच लक्षणीय आहे. बहुधा त्यानेच प्रभावित होऊन व्हेनेजुएला सरकारनंही आपली सर्वाधिक मूल्याची नोट बंद केली आहे.
व्हेनेजुएलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. चलनाचं अवमूल्यन झाल्यानं तेथील महागाई दर जगातील सर्वाधिक आहे. १०० बोलिवर ही त्यांची सर्वाधिक मूल्याची नोट घेऊन बाजारात गेलं, तर फक्त एक चॉकलेट कँडी विकत घेता येते. दोन अमेरिकी सेंट्स म्हणजे १०० बोलिवर, इतकी त्यांच्या चलनाची वाईट अवस्था आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय माफिया जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष करतात. कोलंबिया आणि बाझीलमध्ये १०० बोलिवरच्या अब्जावधी नोटा लपवण्याचं एका चौकशीतून उघड झालं होतं. या नोटांची रद्दी होऊन माफियांना 'जोर का झटका' देण्याच्या उद्देशानंच १०० बोलिवरची नोट चलनातून रद्द करत असल्याचं राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी स्पष्ट केलं आहे. साठवलेल्या नोटा बदलण्याची संधीच माफियांना मिळू नये, म्हणून कोलंबिया, ब्राझीलमधून व्हेनेजुएलात येणारे सर्व सागरी, हवाई मार्ग आणि रस्ते बंद करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, १५ डिसेंबरपासून ५०० आणि २० हजार बोलिवरच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा व्हेनेजुएलाच्या मध्यवर्ती बँकेनं अलीकडेच केली होती.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कॅशलेस व्यवहारांत टीजेएसबीची आघाडी
टीजेएसबी सहकारी बँकेने कॅशलेस व्यवहारांत आघाडी घेतली असून केंद्र सरकारचे रोकडविरहित अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी ट्रान्झॅप हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. बँकेच्या अशा उपक्रमांची दखल घेऊन या प्रयत्नांचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी रविवारी बँकेचे कौतुक केले. कॅशलेस व्यवहारांची सातत्याने वाढ व्हावी, यासाठी राजपुरिया बाग, विलेपार्ले येथे एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राधामोहन सिंग बोलत होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष सी. नंदगोपाल मेनन, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप ठाकूर, वरिष्ठ संचालक विद्याधर वैशंपायन, सीईओ सुनील साठे तसेच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित होते. कॅशलेस व्यवहार, ई-पेमेंट, ई-वॉलेट याविषयी सर्वसामान्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी सरकारी पातळीवरून राबवले जात असलेले उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्रिमहोदयांनी उपस्थितांना केले. सुनील साठे यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. बँकेत अद्ययावत तंत्रज्ञानाने कॅशलेस व्यवहार स्वीकारले जात आहेत. ई-पेमेंट्समध्ये ७५ ते १२५ टक्के तर व्हिसा, रुपे कार्डाखरेदीत ५०० ते ६०० टक्के वाढ झाली आहे, असा दावा साठे यांनी यावेळी केला.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारताचा 'विराट' 'विजय', मुंबई जिंकली आणि मालिकाही!
कर्णधार विराट कोहलीचा द्विशतकाचा पराक्रम, सलामीवीर मुरली विजयचा शतकी धमाका, जिगरबाज जयंत यादवचं विक्रमी शतक आणि किमयागार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या एक डझन विकेट, या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट विजय मिळवला आहे. एक डाव आणि ३६ धावांनी इंग्लंडला धूळ चारून भारतानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. या मालिकाविजयामुळे भारतानं सलग पाच कसोटी मालिका जिंकण्याची किमया केली आहे.
एका वर्षात तीन कसोटी द्विशतकं झळकावणारा विराट कोहली 'मॅन ऑफ द मॅच' ठरला असून एका डावात पाच विकेट घेण्याची किमया २४व्यांदा करून अश्विननं कपिल देवला मागे टाकलं आहे.
पहिल्या डावात ४०० धावांचा डोंगर रचणाऱ्या 'कूक कंपनी'ला दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी १९५ धावांत गुंडाळलं. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो वगळता इंग्लंडचा एकही शिलेदार पीचवर फार काळ टिकू शकला नाही. किंबहुना, अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांनी त्यांना 'सेट' होण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे पहिल्या डावातील २३१ धावांची आघाडीच टीम इंडियाला विजयासाठी पुरेशी ठरली. पहिल्या डावात ४००चा टप्पा गाठूनही एका डावाने पराभूत होण्याचा बाका प्रसंग इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढवला.
भारतानं पहिल्या डावात ६३१ धावा केल्या होत्या. हा आकडा पाहूनच बहुधा इंग्लंडची गाळण उडाली होती. म्हणूनच, दुसऱ्या डावात ते पार गडगडले. काल, चौथ्या दिवसअखेर त्यांची अवस्था ६ बाद १८२ अशी होती. त्यामुळे भारताचा विजय निश्चितच होता. त्यावर, अश्विननं आज पाऊण तासात शिक्कामोर्तब केलं. काल ५० धावांवर नाबाद असलेला बेअरस्टो किती काळ तग धरणार, यावर भारताचा विजय किती लांबणार हे ठरणार होतं. परंतु, अश्विननं त्याला तिसऱ्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलं. त्यानंतर, शेपटाला फक्त दहा धावांची भर घालता आली.
इंग्लंडच्या एकूण २० विकेटपैकी १९ विकेट घेऊन भारताच्या फिरकीपटूंनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा