Post views: counter

Current Affairs December 2016 Part 5


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अशोकस्तंभाचे चित्रकार दीनानाथ भार्गव यांचे निधन

राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचे स्केच करणाऱ्या टीमचे सदस्य दीनानाथ भार्गव यांचे आज इंदुरमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भारतीय संविधानाच्या पांडुलिपीची पानेही भार्गव यांनी तयार केली होती. त्यांनी गेली १० वर्षे हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीदेखील करण्यात आली होती, अशी माहिती त्यांची सून सापेक्षी भार्गव यांनी दिली.

१ नोव्हेंबर १९२७ ला मध्य प्रदेशातल्या बैतुल जिल्ह्यातल्या मुलताई येथे त्यांचा जन्म झाला होता. कला भवन शांती निकेतनचे कला गुरू नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते. भारतीय संविधानाच्या पांडुलिपीतल्या पृष्ठाच्या डिझाइनसाठी बोस यांनीच भार्गव यांची निवड केली होती. शांती निकेतनमध्ये ललित कलेत तीन वर्षांच्या पदविकेचा अभ्यास करत असताना भार्गव यांची निवड या डिझाइन टीममध्ये झाली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिंधुदुर्गात शिवरायांचे वास्तुसंग्रहालय सुरू होणार

शिछत्रपतींच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुकळवाड येथे मातोश्री कला-क्रीडा मंडळाच्या वतीने उभारण्यात येत आहे. या वास्तुसंग्रहालयाचे पहिले दालन नवीन वर्षांत जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येत आहे. हे देशातील पहिले वास्तुसंग्रहालय ठरेल, असा विश्वास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला. मालवण तालुक्यातील सुकळवाड येथे एक कोटी रुपये
खर्चाचे वास्तुसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या वास्तुसंग्रहालयाचे ४५ लाख रुपये खर्चाचे काम पूर्ण झाले आहे; उर्वरित कामासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्याला उदार हस्ते आर्थिक मदत केली जावी, असे शिवशाहीर पुरंदरे म्हणाले. शिवछत्रपतीच्या जीवनावर आधारित वास्तुसंग्रहालयाचे एक दालन जानेवारीत सुरू करण्यात येईल. तेव्हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सादर केला जाईल. या सोहळ्यात हत्ती, घोडे, उंट असतील, तसेच स्थानिक कलाकारांच्या सहभागाने शिवराज्याभिषेक सोहळा निर्माण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मालवण-कसाल मार्गावर सुकळवाड येथे शिवछत्रपतीचा जीवनपट दर्शविणारे वास्तुसंग्रहालय उभे राहावे म्हणून मनसे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे साकडे घातले होते. त्यासाठी त्यांचाही पुढाकार होता.

जगभरातून छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल २३ ओरिजनल पेंटिंग्ज आढळली आहेत, त्यापैकी सहा पेंटिंग्ज आमच्याकडे आहेत, तर अन्य पेंटिंग्जच्या कॉपीज्देखील ज्या पुरातन आहेत त्या प्राप्त झाल्या आहेत, असे शिवशाहीर म्हणाले.
आमच्याकडे असणारी पेंटिंग्ज या वास्तुसंग्रहालयात शिवप्रेमींसाठी ठेवली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे, राजमाता जिजाऊंच्या तसेच शिवशाहीचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळेच्या हस्ताक्षरातील ओरिजनल पत्रे, शिवकालीन सर्व प्रकारची हत्यारे, पुतळे या वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत, असे पुरंदरे म्हणाले.

या वास्तुसंग्रहालयात शिवकालीन शोसाठी मीनी थीएटरचीदेखील सोय निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची माहिती या वास्तुसंग्रहालयात असणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक महत्त्वाला त्यामुळे प्रेरणा मिळेल, असा विश्वासदेखील पुरंदरे यांनी व्यक्त केला. शिवछत्रपतींचा जीवनपट या वास्तुसंग्रहालयातून सर्वासमोर उभा राहणार आहे.

त्यामुळे अभ्यासक पर्यटकांची या ठिकाणी हजेरी लागेल, तसेच जिल्ह्य़ात येणारा पर्यटक व शालेय विद्यार्थीदेखील निश्चितपणे संग्रहालयाला भेट देतील. पहिल्या टप्प्याच्या कलादालनाचे काम झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹९ वॅट एलईडी योजनेची विदर्भातील सुरुवात होणार अकोल्यातून

 केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली आहे. नऊ वॅट एलईडी दिवे केवळ ६५ रुपयांत देण्याच्या योजनेला पुण्यात सुरुवात झाली असून, विदर्भातील सुरुवात अकोल्यातून होणार असल्याची माहिती ही योजना राबविणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ईईएसएल या कंपनीने महावितरणच्या सहाय्याने महाराष्ट्रात जुलै २०१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सात वॅटचे १० बल्ब प्रत्येकी केवळ ८५ रुपयांना वितरित करण्यात आले. महावितरण आणि ईईएसएल यांच्या वतीने प्रमुख शहरांमध्ये वितरण केंद्रे उभारण्यात आली होती. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळून लाखो एलईडी दिव्यांची विक्री झाली.

 दरम्यानच्या काळात इतर राज्यांमध्ये या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातही या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे आणण्याचा प्रस्ताव ईईएसल कंपनीने राज्य सरकारपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा किंवा १ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात ९ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यात येणार होते; परंतु हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. दरम्यान, अधिवेशन आटोपल्यानंतर राज्यात पुणे येथून या योजनेची सुरुवात झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे सर्व मार्ग मोकळे झाल्यामुळे लवकरच राज्यातील सर्वच शहरांमध्ये ही योजना सुरू होणार असून, विदर्भात योजनेची सुरुवात अकोला शहरातून होणार आहे.

केवळ ६५ रुपयांत ९ वॅट एलईडी दिवा
या योजनेअंतर्गत ९ वॅटचा एलईडी दिवा केवळ ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे. पूर्वीच्या सात वॅट एलईडी योजनेप्रमाणेच या योजनेतही वीजग्राहकास प्रत्येकी ६५ रुपयांमध्ये १० एलईडी दिवे मिळणार आहेत. यामध्ये वीजबिलातून मासिक कपातीचा पर्यायही असणार आहे.

योजनेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे; मात्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. पुण्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातही योजना सुरु होणार असून, सुरुवात अकोला शहरातून होणार आहे. - दीपक कोकाटे, प्रादेशिक व्यवस्थापक, ईईएसएल, मुंबई.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमेरिकी संरक्षण अर्थसंकल्पात भारताबरोबर सहकार्यावर भर

ओबामा यांची स्वाक्षरी; हक्कानी नेटवर्क विरोधात कारवाईच्या अटीवर पाकला मदत

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१७ या वर्षांच्या संरक्षण अर्थसंक ल्पावर स्वाक्षरी केली असून, या तरतुदीमुळे भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढणार आहे.

 पाकिस्तानला हक्कानी नेटवर्क विरोधात पावले उचलण्याच्या अटीवर अर्धीच मदत दिली पाकिस्तानला हक्कानी नेटवर्क विरोधात पावले उचलण्याच्या अटीवर अर्धीच मदत दिली जाण्याची शक्यता आहे. ओबामा हे सध्या हवाई बेटांवर सुटीसाठी गेले असून, त्यांनी नॅशनल डिफेन्स अॅथॉरायझेशन २०१७ विधेयकावर काल स्वाक्षरी केली. त्यातील तरतुदीनुसार संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री यांना भारताला अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून स्थान देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या सिनेट समितीचे अध्यक्ष जॉन मॅक्केन यांनी सांगितले, की या संरक्षण अर्थसंकल्पामुळे भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढणार आहे. भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी वेगवेगळय़ा पातळय़ांवर अनुभवी अधिकारी नेमण्यास सांगण्यात आले आहे. या संरक्षण अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार १.२ अब्ज डॉलर्सचा आयसिसविरोधी निधी उभारला जाणार आहे. पाकिस्तानला ९०० दशलक्ष डॉलर्सपैकी ४०० दशलक्ष डॉलर्सचा म्हणजे निम्मा निधी देण्यासाठी हक्कानी नेटवर्कवर कारवाईसह काही अटी घालण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान अटींची पूर्तता करीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच ही मदत पाकिस्तानला मिळू शकणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शाळाबाह्य मुलांच्या पालकांना निवडणूक लढवण्यास बंदी!

‘एनसीपीसीआर’ची राज्यांना निवडणूक नियमांत दुरुस्ती करण्याची विनंती
यापुढे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाल्याला शाळेत दाखल न केल्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ अथवा ‘पंचायत राज’ची निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक लढवण्यासाठी पाल्य शाळेत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) याबाबत देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवून निवडणूक नियमांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. आयोगाच्या सूूचनेनुसार, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला त्याचे पाल्य शाळेत जात असल्याचे आणि नियमित उपस्थित असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ज्या उमेदवारांच्या मुलाचे वय ६ ते १४ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळाबा मुलांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्येक राज्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक नियमांमध्ये दुरुस्ती करावी. यामध्ये ज्या उमेदवारांची मुले ६ ते १४ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांनी आपले पाल्य शाळेत दाखल केले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आयोगाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोटय़वधी मुले शिक्षणापासून वंचित
बालशिक्षण हक्क अधिकार (२००९) नुसार, ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार आहे. मात्र आजही देशातील कोटय़वधी मुले शाळेपासून वंचित आहे. नवीन नियमांमुळे उमेदवारांची शाळेशी असणारी जवळीक वाढेल आणि शाळेतील समस्याही समजून घेण्यास मदत होईल. मुलांना त्यांचा मोफत शिक्षणाचा अधिकार नाकारल्यास घटनेला विरोध केल्यासारखेच आहे, असे प्रियांक कानुंगो यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोएडाच्या स्टेडियमला आयसीसीकडून मान्यता

आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली असल्याचा दुजोरा भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी दिला.

बीसीसीआयने म्हटले, ‘आयसीसीने सर्वात आधी डिसेंबर २0१५ मध्ये स्टेडियमची पाहणी केली होती आणि त्यावेळी फक्त असोसिएट सदस्यांच्या सामन्यांचे आयोजनास मान्यता मिळाली होती. या स्टेडियममध्ये अतिरिक्त सुविधा दिली गेली. ज्यामुळे पूर्ण सदस्यांचे सामने येथे खेळले जाऊ शकतील. गेल्या आठवड्यात आयसीसीने स्थळाचे निरीक्षण केले पूर्ण सदस्यांच्या सामन्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण झाल्या. नतीजतन, ग्रेटर नोएडाचे एस.व्ही.एस.पी. क्रिकेट स्टेडियमला पूर्ण सदस्यीय संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची स्वीकृती मिळाली आहे.’

आयसीसीने दिलेल्या मान्यतेविषयी आनंद व्यक्त करताना बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, ग्रेटर नोएडा येथील एसपीएसपी क्रिकेट स्टेडियम पूर्ण सदस्यांच्या आंतराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी पात्र असल्याची घोषणा करताना मला आनंद वाटतोय.

 बीसीसीआय २३ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर २0१६ दरम्यान दिवस-रात्र स्वरूपात गुलाबी चेंडूवर दुलीप करंडक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे पायाभूत सोयी आणि सुविधांची चाचणी करता आली.’

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हिमकडा कोसळण्यास हवामान बदल कारणीभूत

हवामान बदलामुळे तिबेटमध्ये यावर्षी मोठा हिमकडा कोसळला असा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. या दुर्घटनेत नऊ जण मरण पावले होते. १७ जुलैला ७ कोटी टन वजनाचा हिमकडा अरू हिमनदीतून पश्चिम तिबेटच्या पर्वतराजीत कोसळला होता व त्यात याक पाळणारे नऊ जण मरण पावले होते. १७ जुलैच्या या हिमकडा कोसळण्याच्या घटनेबाबत असे सांगण्यात आले की, ही घटना चार ते पाच मिनिटांत घडली होती व त्यात ३.७ चौरस किलोमीटरचा भाग हिमकडय़ाखाली गेला होता. हिमनदीतील काही पाणी तळाशी वितळण्याने ही घटना घडली असावी त्यामुळे हा हिमकडा कोसळला असे ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीचे लोनी थॉमसन यांनी म्हटले आहे. ज्या वेगाने ही घटना घडली व जेवढा भाग झाकला गेला त्याचा विचार करता त्याचा संबंध वितळलेल्या पाण्याशी असावा. इतर हिमनद्याही याबाबत धोकादायक असून अशा दुर्घटनांचे भाकित करणे शक्य नाही. शेजारच्याच हिमनदीत पुन्हा असे होणार आहे हे भाकित वर्तवता आले नाही पण सप्टेंबर २०१६ मध्ये पुन्हा तशीच घटना घडली होती. त्यात प्राणहानी झाली नव्हती पण त्याचा तपास सुरू आहे.

 संशोधकांनी उपग्रह माहिती व जीपीएसच्या आधारे केलेल्या मापनानुसार पहिला हिमकडा कोसळण्याने किती हिम पडले व किती भाग झाकला गेला याचे मोजमाप केले आहे. संगणकीय प्रारूपांच्या आधारे त्या घटनेचे सादृश्यीकरण करण्यात आले. त्यावेळी जवळच्या हवामान केंद्रावर तापमान गेल्या ५० वर्षांत प्रथमच १.५ अंश सेल्सियसने वाढलेले दिसून येते. त्यामुळे बर्फ व हिम वितळले त्यामुळे हिमकडे कोसळणे पश्चिम तिबेटमध्ये एरवी अवघड असताना आता ते घडले आहे कारण हवामान बदलांचा परिणाम दक्षिण व पूर्व तिबेटमधील हिमनद्यांवर झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सायबेरियात उणे 62 डिग्री सेल्सिअसवर पारा

रशियाच्या सायबेरियात आर्कटिक ब्लास्ट झाला आहे. यामुळे भागात तापमानाचा पारा 62 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पूर्ण भागात पारा उणे 40 डिग्री सेल्सिअस ते उणे 62 डिग्रीपर्यंत आहे. केस, भुवया आणि दाढीवर देखील बर्फ जमा झाला आहे. कार आणि बाईक बर्फाने झाकल्या गेल्या आहेत. सर्वाधिक थंडी काउंटी मानसी भागात नोंदली गेली. तेथे तापमानाचा पारा 62 डिग्री आहे, हे 83 वर्षातील सर्वात कमी तापमान आहे. 6 फेब्रुवारी 1933 मध्ये उणे 67.2 डिग्री तापमान नोंदले गेले होते. थंडीमुळे मोबाइल समवेत इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली आहेत.

लोकवस्ती असणाऱया भागांमध्ये सायबेरिया सध्याच्या काळात जगातील सर्वात थंड भाग आहे. येथे 83 वर्षांमधील सर्वाधिक हिवाळा आहे. जानेवारीत पारा उणे 60 डिग्री सेल्सिअस राहते.

 पृथ्वीवरील सर्वाधिक थंड स्थान अंटार्टिका आहे. येथे तापमान उणे 89.2 डिग्री राहते. आर्क्टिक ब्लास्टमुळे ठिकठिकाणी बर्फ जमा झाला आहे.

काय होतोय परिणाम

एवढय़ा कमी तापमानात हाडे देखील तुटतात. या थंडीपासून वाचण्यासाठी जंगली हरिण आणि घोडे देखील तेथून पलायन करत नागरी अपार्टमेंटमध्ये येत आहेत.

आर्क्टिक ब्लास्ट

उत्तर ध्रूवाला आर्क्टिक देखील म्हटले जाते. येथे महासागर देखील आहे. तापमान अत्याधिक कमी झाल्याने लोअर लॅटिटय़ूड (अक्षांश) वाल्या भागात हिमवादळे येऊ लागतात. पूर्ण भागात बर्फाचा मोठा थर जमा होऊ लागतो. सायबेरिया आर्क्टिकपासून जवळ आहे. त्यामुळे येथे ब्लास्टचा सर्वाधिक प्रभाव पडतो. तापमान खूपच खालावते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शिवा केशवनला आशियाई स्पर्धेत सुवर्ण

ट्रेनिंगच्या वेळी छोटासा अपघात झाल्याने तयारीवर परिणाम झाला असला तरी भारताचा वेळचा हिवाळी ऑलिम्पियन शिवा केशवनने नागानो, जपान येथे झालेल्या आशियाई ल्युज चॅम्पियनशिपमध्ये शानदार प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले.

केशवनने या स्पर्धेत पूर्ण वर्चस्व गाजवत प्राथमिक फेरीतील दोन रेस 1 मि. 39.962 सेकंदात पूर्ण केली आणि 130.4 किमी प्रतितास असा सर्वोच्च वेग नेंदवला. जपानच्या तनाका शोहेइने दुसरे (1:44.874 से. व 124.6 किमी / तास) स्थान मिळविले तर चिनी तैपेईच्या लिएन टे ऍनने कांस्य (1:45.120 से. व 126.3 किमी/तास) मिळविले.

या स्पर्धेची तयारी करताना सरावावेळी 130 किमी वेगात स्लेड (घसरगाडी) क्रॅश झाले आणि ते मोडले. याशिवाय त्याच्या डाव्या पावलाच्या स्नायुनाही दुखापत झाली. त्यामुळे अधिकृत टेनिंगचा बराचसा भाग त्याला हुकला होता. त्यावर मात करीत मुख्य स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविण्यापर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला. या वर्षाच्या प्रारंभीच्या काळात त्याला 2016 विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून निधीअभावी माघार घ्यावी लागली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ रंगकर्मी बापू लिमये काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमीवरील बापू लिमये या नावाने परिचित असणारे ज्येष्ठ नेपथ्यकार परशुराम कृष्णाजी लिमये यांचे सोमवारी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तरुण कलाकारांमधील नाट्यजोषाला पुन्हा वाव देण्यासाठी बुजूर्ग नेपथ्यकार बापू लिमये यांनी पुढाकार घेतला होता.

मूळचे अमरावतीचे असलेले लिमये यांनी गेली सहा दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले.

 प्रसिद्ध नाटककार विजय तेंडूलकर यांच्या ‘गिधाडे’ या नाटकाने त्यांना नेपथ्यकार म्हणून ओळखले जावू लागले. नाटकाच्या आवडीबरोबरच त्यांनी लिखाणमध्येही आपली छाप सोडली आहे. ‘गोष्ट नेपथ्याची,’ ‘प्रयोग समीक्षा संग्रह’, ‘बखर नेपथ्याची’ ही त्यांची नाटय़विषयक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरी निमित्तच ते अमरावतीहून मुंबईला आले. त्यानंतर ते कल्याणमध्ये स्थायिक झाले. नोकरीबरोबरच रंगभूमीची सेवाही त्यांनी सुरू ठेवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्तुंग पुरस्कार जाहीर

उत्तुंग या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे यंदाचे सांस्कृतिक ट्रस्ट पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदा या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. रविवारी १ जानेवारी रोजी लोकमान्य सेवा संघाच्या मैदानावर हा पुरस्कार सोहळा होणार असून उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा उत्तुंग साफल्य सन्मान सुमन कल्याणपूर यांना देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग जीवन गुणगौरव सन्मान पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे तर पु. ल. देशपांडे स्मृती उत्तुंग कलायोगदान पुरस्कार चतुरस्त्र अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात येणार आहे. यंदाचा विमलताई भावे स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान पुरस्कार लेखक डॉ. गिरीश दाबके आणि उत्तुंग सेवाव्रती भाऊबीज सन्मान पुरस्कार उषा मडावी यांना जाहीर झाला आहे. इतर सर्व पुरस्कारांचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि स्मृतिपत्र असे स्वरूप आहे.

क्रीडा घडामोडी:- २०१६
क्रिकेट:-
-------------------------------------
अशिया चषक:-
• ६ मार्च २०१६ रोजी मीरपूर येथे भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान टी-२०चा अंतिम सामना झाला. यात बांगलादेशचा टीम इंडियाने ८ विकेटने पराभव करून अशिया चषक जिंकला
• ही स्पर्धा प्रथमच टी:२०च्या फोर्मेट मध्ये खेळली गेली
• मॅन ऑफ द मॅच :- शिखर धवन
• मॅन ऑफ द  सिरीज :- शबीर रहेमान

१९ वर्षांखालील अशिया चषक:
• भारताच्या १९ वर्षांखालील संघाने २०१६ या वर्षाचा शेवटी सलग तिसऱ्यांदा अशिया चषका जिंकला
• .श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. भारताने सलग तिसऱ्यांदा हा किताब पटकावला.
• यापूर्वी वर्ष २०१२, २०१४ यावर्षी विजय मिळवला होता.

महिला अशिया चषक:
• ४ डिसेंबर रोजी बँकाक येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारती महिला संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १७ धावांनी पराभव करत अशिया कप जिंकला
•  भारताने सलग सहाव्यांदा या चषकावर आपले नाव कोरले होते.
• प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने ७३ धावांची खेळी करत पाकसमोर १२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानची संपूर्ण टीम १०४ धावांत संपुष्टात आली होती.

१९ वर्षांखालील विश्वचषक:
• बांगलादेशमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली हाेती.
• अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा ५ विकेटने पराभव केला होता.
• संघ प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने चांगली कामगिरी केली होती.
• सर्फरज खान याने सहा सामन्यात पाच अर्थशतक ठोकली आणि तो अंडर १९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अर्थशतक (सात) करणारा पहिला खेळाडू ठरला

आयसीसी टी-२० विश्वचषक:
• २०१६ मध्ये  ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत टी-२० विश्वचषक स्पर्धा पार पडली.
• या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला.
• त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा चार विकेटने पराभव करत चषक आपल्या नावे केला. या मालिकेत विराट कोहली याला  मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

करूण नायरचे त्रिशतक:
• भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात करूण नायरने नाबाद ३०३ धावांची खेळी केली. करूणने आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या कसोटीतच त्रिशतक केले आहे. वीरेंद्र सेहवाग नंतर त्रिशतक करणारा करूण नायर भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

इंग्लंड, न्यूझीलंडला पराभवाची धूळ:
• २०१६ या वर्षा मध्ये टीम इंडियाने कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करत प्रथम न्यूझीलंडला ३-० त्यानंतर इंग्लंडला ४-० अशा फरकाने पराभूत केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग १८ कसोटीत विजयी होण्याचा विक्रम बनवला आहे.

आर. अश्विन:
• टीम इंडियाला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचवण्यात रविचंद्रन अश्विन याचे मोठे योगदान आहे.
• अश्विनने वर्ष २०१६ मध्ये १२ सामन्यात ७२ गडी बाद केले. यादरम्यान ८ वेळा डावात ५ बळी आणि ३ वेळा १० हून अधिक बळी घेतली
•  अश्विन यंदा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
• त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने २०० बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
• अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयसीसीने वर्षांतील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटर ऑफ द इअर हा किताब जाहीर केला.

विराट कोहली:
• विराट कोहलीने वर्ष २०१६ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतासाठी धावांचा केल्या
• विराटने यावर्षी कसोटीमध्ये सुमारे ८० च्या सरासरीने १२१५ धावा बनवल्या. याचदरम्यान त्याने ३ द्विशतके ही ठोकले.
• एका वर्षांत ३ द्विशतके ठोकणारा विराट कोहली भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी विराट कोहलीने प्रथमश्रेणी सामन्यात एकही द्विशतक केलेले नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत दाखल झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी सोमवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी बाकी होता.

सोमवारी दुपारी मिथुन चक्रवर्ती यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला असला तरी पक्षाचे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो’ असे ओब्रायन यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसने फेब्रुवारी २०१४ मध्ये मिथून चक्रवर्ती यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले होते. मात्र पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा घोटाळ्यात मिथून चक्रवर्ती यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले होते. या घोटाळ्याप्रकरणी मिथून चक्रवर्ती यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्सही बजावले होते. मार्च २०१५ पासून चक्रवर्ती राजीनामा देतील अशी चर्चा रंगली होती. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या जागी तृणमूल काँग्रेसकडून कोणाला खासदारकी दिली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोठा पडदा गाजवणारे मिथुन चक्रवर्ती यांची संसदेतील कामगिरी फारशी चमकदार नव्हती. राज्यसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या हजेरीचे प्रमाण फक्त १० टक्केच होते. राज्यसभेतील चर्चेत त्यांनी कधीच सहभाग घेतला नव्हता. तसेच त्यांनी राज्यसभेत कधी प्रश्नही उपस्थित केला नव्हता. आजारपणामुळे त्यांच्याकडून संसदेतून सुट्टीसाठी परवानगी मागण्यात आली तेव्हा खासदारांनी त्यांच्या सुट्टीवर आक्षेप घेतला होता. मिथुन यांनी नंतर वैद्यकीय प्रमाणपत्रही दाखवले. २००९ मध्ये एका सिनेमातील स्टंट करताना मिथुन चक्रवर्ती यांच्या पाठीला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी, चीनपर्यंत मारा करण्याची क्षमता

भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या तटावर अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) ही चाचणी करण्यात आली आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी होती. यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. संपूर्ण चीन अग्नी-५ च्या कक्षेत असणार आहे. अग्नी-५ अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहे.

ओडिशाच्या व्हिलर बेटावरुन अग्नी-५ ची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन येत असल्यामुळे व्यूहनितीच्या दृष्टीने ही चाचणी अतिशय महत्त्वाची होती. अग्नी-५ ची शेवटची चाचणी जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. चीनपर्यंत मारा करण्याची अग्नी-५ ची क्षमता आहे. संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी-५ चे ३ टप्पे आहेत. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधीची अग्नी-५ ची ही शेवटची चाचणी होती. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडची (एसएफसी) स्थापना २००३ मध्ये करण्यात आली आहे. देशाच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे काम स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे आहे.

अण्वस्त्र डागण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ ला अगदी सहजपणे कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते. अग्नी-५ च्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून शत्रूवर अण्वस्त्र सोडले जाऊ शकते. यााधी २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये अग्नी-५ ची चाचणी घेण्यात आली आहे. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे ५ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. आता या देशांच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत जगातील सहावा देश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शाहरुख खानला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाची मानद पदवी बहाल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याच्या याच पुरस्कारांमध्ये भर घालत बॉलिवूडच्या या किंग खानला नुकतेच मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठातर्फे मानद पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटद्वारे किंग खानचा गौरव होतानाची छायाचित्रे ट्विट करण्यात आली आहेत.

यावेळी मानद पदवीने गौरव झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना किंग खान म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. आज माझी आई असती तर तीलासुद्धा या गोष्टीचा फार आनंद झाला असता. कारण, तिच्या जन्मस्थानी मला हा बहुमान मिळत आहे’. मानद पदवी मिळण्याची ही किंग खानची पहिलीच वेळ नाहीये. याआधी शाहरुखला त्याच्या आजवरच्या कारकिर्दीसाठी विविध बहुमान मिळाले आहेत. शाहरुखने त्याच्या आजवरच्या बॉलिवूड चित्रपटांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांतून विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याचा मानद पदवीने गौरव होत असल्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, १९९८ मध्ये स्थापना झालेल्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाद्वारे जवळपास २८८५ पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये गौरविण्यात येत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘न-नापास’ धोरण पाचवीपर्यंतच

विधि मंत्रालयाची मंजुरी; शिक्षण अधिकार कायद्यातील दुरुस्तीचा मार्ग मोकळा
आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या ‘न-नापास’ धोरणावर र्निबध घालण्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या धोरणामुळे नापास होण्याची भीती नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासातील गांभीर्य कमी होत असल्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निरीक्षणाची नोंद घेत २००९ च्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातील कलम १६ मध्ये दुरुस्तीस विधि मंत्रालयाने मंजुरी दिली. हे धोरण आता पाचवीपर्यंत सीमित राहणार आहे.

शिक्षणाचा अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारे ‘न-नापास’ धोरण लागू आहे. मात्र, उपसमितीच्या अहवालानुसार या तरतुदीत ‘शाळेत दाखल करण्यात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला पाचवीपर्यंत नापास किंवा निलंबित करता येणार नाही’ अशी दुरुस्ती करण्यास काहीच आक्षेप नसल्याचे दिसत असल्याचे विधि मंत्रालयाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी दिल्यास त्यांना सहावी, सातवी आणि आठवीत अनुत्तीर्ण करण्याबाबतचा नियम राज्य सरकार गरज वाटल्यास करू शकते, असे विधि मंत्रालयातील कायदा व्यवहार विभागाने ८ डिसेंबरच्या टिपणीत नमूद केले होते. सध्याच्या तरतुदीच्या विपरीत परिणामांचा आढावा घेतल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालय ‘न-नापास’ धोरणावर र्निबध घालण्याच्या विचारापर्यंत आले. विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होण्याची भीती राहिली नसल्याने त्यांचे अभ्यासातील गांभीर्य कमी झाले आहे. शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे निरीक्षणही या टिपणीत नोंदविण्यात आले होते.

शिक्षणाचा अधिकार कायद्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासंबंधीच्या तरतुदीबरोबरच ‘न-नापास’ धोरणाचाही समावेश करण्यात आला होता.
या तरतुदीची अंमलबजावणी आणि सर्वव्यापी मूल्यांकनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती.

उपसमितीच्या बैठकीत अनेक राज्यांनी या धोरणाला विरोध करत त्याचा आढावा घेण्याची मागणी केली होती.

निवड:-
 अॅड. रोहित देव :-
• राज्याच्या महाधिवक्तापदी अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाचा प्रभार सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
• जून २०१५ मध्ये देव यांची नियुक्ती सहयोगी महाधिवक्तापदी करण्यात आली होती.
• श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाचा प्रभार सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

चर्चित खेळाडू:-
सामित गोहेल:-
• प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन सर्वाधिक धावसंख्या रचणाचा विक्रम गुजरातच्या सामित गोहेलने रचला आहे.
• त्याने रणजी चषकामध्ये ओडिशाविरोधात ३५९ धावा काढून ११७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
• १८९९ मध्ये ओव्हल येथे सर्रे या संघाच्या बॉबी आबेलने सोमेरसेट विरोधात ३५७ धावा करुन हा विक्रम रचला होता.
• गोहेलने ७२३ बॉलमध्ये ४५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५९ धावा केल्या आहेत. तो नाबादच राहिला. गुजरातचा संघ ६४१ बाद झाला आहे
•  ३०० धावा काढून नाबाद राहणारा तो गेल्या ८१ वर्षातील पहिला फलंदाज ठरला आहे.
• गुजरातच्या प्रियांक पांचालने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्रिशतक झळकावले होते.या सत्रात त्रिशतक करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. दीक्षित यांना ‘साहित्य अकादमी’

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीतर्फे भाषा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. दीक्षित यांनी मध्ययुगातील साहित्य व अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीतर्फे फेब्रुवारी महिन्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये, ताम्रपट, शाल व श्रीफळ असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. डॉ. दीक्षित हे १९६६ ते १९८५ पर्यंत विद्यापीठात हिंदी विभाग प्रमुख होते. २०१०पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ९३ वर्षांचे असेलेले दीक्षित आजही सक्रिय आहेत. त्यांना यापूर्वी इंदूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे अखिल भारतीय साहित्य पारितोषिक, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अखिल भारतीय सेवा पुरस्कार, अलहाबाद येथील हिंदी साहित्य संमेलनात साहित्य वाचस्पती, कानपूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे साहित्य भारती, लखनऊ येथील उत्तर प्रदेश हिंदी संस्थानतर्फे साहित्यभूषण असे सन्मान मिळाले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सुरेश कलमाडींना ‘बक्षीस’, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले सुरेश कलमाडी यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कलमाडी यांच्यासोबतच बॉक्सिंग महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष अभय चौटाला यांचीही आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. यामध्ये सर्व माजी अध्यक्षांची असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सुरेश कलमाडीही आता आयओएचे आजीवन अध्यक्ष असतील. याशिवाय भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला पुन्हा परवानगी मिळावी यासाठी त्रिसदस्यीस समितीही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१० मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. फसवणूक व कटकारस्थानच्या आरोपावरून कलमाडी यांना सुमारे १० महिने तुरुंगात काढावे लागले होते. याप्रकरणाची चौकशी अजूनही सुरु आहे.

 स्पर्धासाठीची टीएसआर (टायमिग -स्कोरिंग -रिझल्ट) प्रणाली घेताना तब्बल ९५ कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसला होता. कलमाडी यांच्यासहआयोजन समितीचे संयुक्त महासंचालक ए. एस. व्ही. प्रसाद व उपसंचालक सुरजित लाल यांनादेखील अटक झाली होती. या घोटाळ्यानंतर कलमाडी यांना आयओएच्या अध्यक्षपद गमवावे लागले होते. तर काँग्रेससाठीही हा घोटाळा डोकेदुखी ठरला होता. दिल्लीच्या तत्कालिन मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी देशहितासाठी निर्णय घेतल्याचे सांगत स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहार झाले नाही असा दावा केला होता. मात्र त्यानंतर कलमाडी यांनी केलेला घोटाळा समोर आला आणि काँग्रेसची नाचक्की झाली. भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष होते. बॉक्सिं महासंघातील गलथान कारभारामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती महासंघाचीही परवानगी रद्द केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रोहित देव नवे अॅडव्होकेट जनरल

 राज्याचे नवीन अॅडव्होकेट जनरल म्हणून अॅड. रोहित देव यांची राज्य सरकारने निवड केली आहे. त्या प्रस्तावाची फाइल मान्यतेसाठी सरकारने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजभवन कार्यालयात पाठविली आहे. त्या फाईलवर रात्री उशिरापर्यंत राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या अधिकृत घोषणेनंतर अॅड. देव यांची राज्याचे अॅडव्होकेट ‌जनरल म्हणून रितसर नियुक्ती होईल. यापूर्वींचे अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी हे पद भूषविताना स्वतंत्र विदर्भ राज्याची उघडपणे मागणी करून राजकीय वर्तुळात वाद निर्माण केला होता.अॅडव्होकेट जनरल पद भूषविणारा व्यक्ती जाहीरपणे स्वतंत्र विदर्भाची मागणी कशी करू शकतो असा सवाल करून याआधीच्या अधिवेशनात दोन्ही काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सार्वजनिक प्रकल्पांसाठी गायरान खुले

शासनाच्या धोरणात सुधारणा; गावातच दुप्पट क्षेत्रफळाचे चराऊ कुरण देणे बंधनकारक

गायरान म्हणून राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनी सार्वजनिक प्रकल्प आणि सार्वजनिक सुविधांसाठी दिल्यास त्या बदल्यात त्याच गावातील तितक्याच किमतीची दुप्पट क्षेत्रफळाची पर्यायी जमीन गायरान म्हणून उपलब्ध करून देण्याची तरतूद असलेले कलम जमीन महसूल संहितेत समाविष्ट करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध होण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी काही जमीन राखीव ठेवण्यात येते. या जमिनी संबंधित ग्रामपंचायतींच्या ताब्यात असतात.

 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२ नुसार विशेष कारणांसाठी बिनभोगवटय़ाच्या जमिनी राखीव ठेवण्याच्या तरतुदीनुसार, गावातील भोगवटय़ात नसलेल्या जमिनी गावातील गुरांचे मोफत कुरण, राखीव गवत, वैरण, गावठाण, मळणी इत्यादी सार्वजनिक वापरासाठी देण्यात येतात. त्यापैकी मोफत कुरण अथवा राखीव गवत, वैरणीसाठी देण्यात आलेल्या जमिनींना ‘गायरान जमीन’ म्हटले जाते. अनेक ठिकाणी अशा जमिनींवर अतिक्रमणे होतात किंवा अनधिकृतरीत्या ग्रामपंचायतींकडून व्यापारी स्वरूपाचा वापर केला जातो. याबाबतच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.

 त्यानुसार राज्य शासनाने गायरान जमिनीच्या वापराबाबत सर्व यंत्रणांना सविस्तर आदेश दिले असून कोणत्याही खाजगी व्यक्ती अथवा संस्थेस गायरान जमिनी किंवा सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जमिनीचे वाटप करू नये असे स्पष्ट केले आहे. मात्र, या धोरणानुसार जमीन महसूल संहितेत सुधारणा करणे गरजेचे होते. तसेच शासकीय अथवा अशासकीय संस्थांच्या प्रकल्पांसाठी तसेच सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या विकास कामांसाठी अनेकदा अपरिहार्यपणे गायरान जमिनी ताब्यात घेणे आवश्यक ठरते. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.

या संहितेत कलम २२ नंतर कलम २२ (क) हे नव्याने समाविष्ट करण्यात येणार असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना गायरान म्हणून राखीव असलेली शासकीय जमीन काही विशिष्ट परिस्थितीत प्रकल्पांसाठी भाडेपट्टय़ाने अथवा कब्जेहक्काने देता येणार आहे.

काही अटी निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार अशी जमीन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी केंद्र अथवा राज्य शासनास किंवा त्यांच्या कोणत्याही वैधानिक प्राधिकरणास आवश्यकता असल्यास प्रदान करता येणार आहे. मात्र, ज्या खाजगी प्रकल्पासाठी ती देण्यात येईल त्या प्रकल्पाच्या प्रवर्तकाकडून अशा जमिनीच्या क्षेत्राच्या किमान दुप्पट क्षेत्रफळाची आणि तिच्या किमतीइतकी जमीन त्याच गावात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी प्राप्त झालेली जमीन गायरान म्हणूनच वापरण्यात येईल.

प्रकल्पांसाठी गायरान जमिनींच्या आवश्यकतेची अपरिहार्यता विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने राज्य शासन तपासून पाहील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन

हरियाणामध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन धावणार आहे. प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तयार केले आहे. यासाठी भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्याला अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या कार्यालयाला कॅटरपिलर ट्रेनच्या प्रकल्पात प्राधान्याने लक्ष घालण्यास सांगितले आहे. गुरुग्राममधील या प्रकल्पाला जागा पुरवण्याच्या सूचना खट्टर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. अश्वनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्ना विकसित केली. एमआयटीमधून पीएचडी झालेल्या या दोघांनी ८ डिसेंबरला मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती.

‘मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कॅटरपिलर ट्रेनची कल्पना आवडली आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे आदेश त्यांच्याकडून स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त स्वीय सहाय्यक राकेश गुप्ता यांनी दिली आहे. अश्वनी उपाध्याय यांनी गुरुग्रामचे उपायुक्त टी. एल. सत्य प्रकाश आणि पोलीस आयुक्त संदीप खिरवार यांचीदेखील भेट घेतली. कॅटरपिलर ट्रेनचा प्रकल्प कुठे उभारला जाऊ शकतो, याबद्दल या भेटीत चर्चा झाली.

हुडा सिटी आणि सुशांत लोक या भागात कॅटरपिलर ट्रेन धावू शकते. हा भाग अतिशय वर्दळीचा असल्याने या भागातून कॅटरपिलर ट्रेन नेण्याबद्दल खट्टर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. यासोबतच ऍम्बियन्स मॉल परिसरात कॅटरपिलटर ट्रेन सेवा सुरू केली जाऊ शकते.

कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. एका कॅटरपिलर ट्रेनच्या रुळांवरुन दुसरी ट्रेनदेखील जाऊ शकते. एक ट्रेन रुळांवरुन जात असताना दुसरी ट्रेन रुळांच्या खालील बाजूने जाऊ शकते, हे कॅटलपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. १०० किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांना जाहीर

नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नागभूषण फाउंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी यांनी मंगळवारी ही घोषणी केली. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, या वेळी उपस्थित होते.

मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर फडणवीस यांच्या रूपाने राज्याला विदर्भाचा मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यांनी कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, असे डॉ. गांधी यांनी सांगितले. पुरस्काराचे वितरण १ जानेवारी १०१७ रोजी राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृहात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोहेलचे विक्रमी त्रिशतक

समित गोहेलने केलेल्या विक्रमी ३५९ धावांच्या जोरावर गुजरातने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ओडिशाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर गुजरातने ही कामगिरी केली. गोहेलने सलामीला येऊन नाबाद राहात ही धावसंख्या केल्यामुळे त्याचा हा जागतिक विक्रम झाला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ११० धावांवर असलेल्या गोहेलने चौथ्या दिवशी द्विशतक ठोकले, पण तिसऱ्या दिवशी त्याने चक्क त्रिशतकाला गवसणी घालून गुजरातला ६४१ धावांचा डोंगर रचून दिला. गोहेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधला ११७ वर्षांपूर्वीचा विक्रमही यावेळी मोडित काढला. १८९९मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केनसिंग्टन ओव्हलवर सरेच्या बॉबी एबलने सॉमरसेटविरुद्ध सलामीला येत नाबाद राहून केलेल्या ३५७ धावांचा विक्रम गोहेलने मागे टाकला. हनीफ मोहम्मद यांनी सलामीवीर म्हणून ४९९ धावांचा विक्रम केला होता. तो अद्याप कायम आहे.

गोहेलने सलामीवीर म्हणून मैदानात उतरत नाबाद राहात ३५९ धावा केल्या. त्याच्या ७२३ चेंडूंच्या खेळीत ४५ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. ही लढत तसे पाहिले तर अर्थहीन होती. कारण पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर गुजरातचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होता, पण गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल व प्रशिक्षक विजय पटेल यांनी गोहेलला प्रदीर्घ खेळी करण्याची मुभा दिली. गुजरातमधील आणंदच्या असलेल्या गोहेलने हा सल्ला प्रमाण मानून खेळी केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बँकिंगचा वृद्धीदर ५४ वर्षांच्या नीचांकावर

नोटाबंदीमुळे बँकिंग क्षेत्राचा वृद्धीदर तब्बल ५४ वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. गृह, वाहन आणि ग्राहक कर्जाची मागणी प्रचंड घटल्याने बँकांना मोठा फटका बसला आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात डाटा जारी केला आहे. त्यानुसार, ९ डिसेंबरला संपलेल्या १५ दिवसांत बँकांच्या कर्जाचा वँद्धीदर ५.८ टक्क्यांवर आला आहे. हा १९६२ नंतरचा सर्वाधिक कमी वृद्धीदर ठरला आहे. दोन महिन्यांपूर्वी कर्जाचा वृद्धीदर ८ टक्के होता. देशातील आर्थिक हालचाली निर्धारित करण्यात कर्जाचा वृद्धीदर महत्त्त्वाचा आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्जाची मागणी घटली आहे. बडोदा बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, किरकोळ क्षेत्रातील ग्राहक किमती कमी होण्याची वाट पाहत आहे. गृह आणि वाहन कर्जाची वाढ जवळपास सपाट झाली आहे.

कर्जाच्या परतफेडीवरही मोठा परिणाम झाला आहे. बँकांना अतिरिक्त ठेवी आणि कोशीय लाभ मिळेल, तरीही तिसऱ्या तिमाहीत बँकांना तात्पुरत्या मंदीचा सामना करावा लागेल. (वाणिज्य प्रतिनिधी)
वीजेची मागणी ६ टक्क्यांनी घटली
नोटाबंदीमुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वीजेची मागणी ६ टक्क्यांनी घटली आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

नोटाबंदीमुळे मध्यम, सुक्ष्म आणि छोट्या उद्योजकांचे धंदे बसले आहेत. वीजेवर अवलंबून असलेल्या वाहन, हॉटेल आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांनाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी वीजेची मागणी कमी केली आहे.

टंचाई काहीशी कमी

- याचा सर्वांचा परिणाम म्हणून वीजेची टंचाई कमी झाली आहे. आॅक्टोबरमध्ये वीजेची तूट १ टक्का होती, ती नोव्हेंबरमध्ये घटून 0.६ टक्क्यावर आली.
सूत्रांनी सांगितले की, कृषी क्षेत्रातील वीजेची मागणीही कमी होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीमुळे शेतकरी हैराण आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचा परिणाम वीजेच्या मागणीवर होईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता अग्नी-6 वर लक्ष केंद्रीत

अग्नी-5 ची यशस्वी चाचणी : एकाचवेळी अनेक शस्त्रास्त्रs वाहून नेण्यास सक्षम असेल नवे क्षेपणास्त्र

अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीनंतर भारत आता क्षेपणास्त्र क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अग्नी-5 नंतर भारत आता अग्नी-6 देखील काम करत आहे. हे क्षेपणास्त्र अनेक शस्त्रास्त्रs एकाचवेळी वाहून नेण्यास सक्षम असेल आणि शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला म्हणजेच एमआयआरव्हीला (मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हेईकल्स) मात देण्यासाठी तांत्रिक दृष्टय़ा पात्र असेल.

एमआयआरव्हीचा अर्थ कोणत्याही एका क्षेपणास्त्रात अनेक अण्वस्त्रs वाहुन नेण्याची क्षमता असणे आहे. ही शस्त्रास्त्रs वेगवेगळी लक्ष्ये भेदण्यासाठी असतात. भारत जगाच्या मोठय़ा क्षेपणास्त्र शक्तींमध्ये आधीपासूनच सामील आहे. अग्नी-6 पूर्णपणे अस्तित्वात आल्यानंतर ही शक्ती आणखीनच वाढेल.

याआधी सोमवारी भारताने आपल्या आण्विक शक्तीत आणखी भर टाकत आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची ओडिशाच्या एका बेटावर यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने अग्नी-5 क्षेपणास्त्र भारताच्या आण्विक ताफ्यात सामील करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही आणखी चाचण्यांनंतर ते स्ट्रटिजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) मध्ये सामील केले जाईल. आण्विक क्षमतायुक्त अग्नी-5 क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरच्या अंतरापर्यंत वार करण्यास सक्षम आहे. याची मारकक्षमता उत्तर चीनपर्यंत आहे.

या क्षेपणास्त्रासोबतच भारत 5000 ते 5500 किलोमीटरच्या अंतरापर्यंत वार करणाऱया आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी सज्ज देशांच्या गटात सामील होईल. सध्या ही क्षमता अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या देशांजवळच आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीवर डीआरडीओचे अभिनंदन केले. या क्षेपणास्त्रामुळे भारताची सामरिक आणि संरक्षणात्मक क्षमता बळकट होईल असे म्हटले. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डीआरडीओची प्रशंसा केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹100 रेल्वेस्थानकांवर मोफत वाय-फायचे लक्ष्य पूर्ण

आता नजर 400 स्थानकांवर :

दक्षिण भारताच्या कोल्लम रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय उपलब्ध केल्यानंतर रेल्वेने आपले लक्ष्य पूर्ण केले आहे. 2016 च्या अखेरपर्यंत देशाच्या 100 मुख्य स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा देण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले होते. आता रेल्वेचे पुढील लक्ष्य 2017 च्या अखेरपर्यंत देशाच्या 400 स्थानकांवर ही सुविधा देण्याचे आहे.

रेल्वेने मुंबई रेल्वेस्थानकापासून मोफत वाय-फाय सुविधा देण्यास प्रारंभ केला होता. तर लक्ष्य कोल्लममध्ये पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पात रेल्वेला गुगलची साथ मिळाली आहे. यावर्षी मुंबईच्या सेंट्रल रेल्वेस्थानकापासून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता.

 देशाच्या सर्वाधिक गर्दी होणारी रेल्वेस्थानके भुवनेश्वर, बेंगळूर, हावडा, कानपूर, मथुरा, अलीगढ, बरेली आणि वाराणसी सारख्या स्थानकावर मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करविण्यात आल्याचे अधिकाऱयाने सांगितले.

प्रतिदिन जवळपास 1 कोटी लोक या स्थानकांमधून प्रवास करतात. आता त्यांच्याजवळ इंटरनेट ऍक्सेस करण्याची सुविधा देखील असेल. वापरकर्ते एचडी व्हिडिओ पाहू शकतील तसेच गेम खेळू शकणार आहेत. भारतात मोफत सार्वजनिक वाय-फाय सेवा सुरू करून कंपनी आनंदित आहे, तर लोक देखील हायस्पीड आणि मोफत इंटरनेट सेवेमुळे समाधानी असल्याचे गुगलचे कनेक्टिव्हिटी प्रमुख गुलजार आझाद यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रदूषणाला तोंड देणाऱया चीनने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

चीनने प्रदूषणाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सोमवारी मोठा निर्णय घेतला. त्याने पर्यावरण रक्षणासाठी संसदेत कायदा संमत करून उद्योगांना विशेषकरून अवजड उद्योग क्षेत्राला लक्ष्य करत पर्यावरण कर लागू करण्याचा निर्णय घेतला. चीनची राजधानी बीजिंग समवेत अनेक शहरांमध्ये धुरक्याने वेढा घातला आहे. पेइचिंगजळच्या प्रांतांना प्रदूषणामुळे एक आठवडाभर रेड अलर्टचा सामना करावा लागला होता. याचमुळे तेथे शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि वाहनांना नियंत्रित करण्यासाठी सम-विषम व्यवस्था लागू करण्यात आली होती.

हा कायदा चीनमध्ये 1 जानेवारी 2018 पासून अंमलात येईल. अर्थमंत्रालयाच्या कर धोरण विभागाचे संचालक वांग जिआनफैन यांच्यानुसार हा कायदा लागू झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात प्रदूषणाशी लढता येईल कर अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.

भूमी, जल आणि हवा प्रदूषण रोखण्यात सरकारच्या अपयशामुळे लोकांमध्ये फैलावलेली नाराजी पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रदूषणामुळे उत्तर चीनचा एक मोठा हिस्सा धुरक्याला तोंड देत आहे.

या नव्या कायद्यांतर्गत पर्यावरण प्रदूषणाचा प्रति कंपनी कर दर 1.2 युआन (11.70 रुपये) असेल, जल प्रदूषणासाठी प्रति कंपनी 1.4 युआन (13.64 रुपये) तर प्रति टन कोळसा वापरासाठी 5 युआन (48.73 रुपये) कर असेल. धोकादायक कचऱयासाठी प्रति टन 1000 युआन (9745.88 रुपये) कर वसूल केला जाईल. ध्वनी प्रदूषणाला देखील करकक्षेत आणले गेले आहे. ध्वनी प्रदूषणासाठी उद्योगांकडून प्रति महिना कर वसूल केला जाणार आहे. 1979 पासून चीन प्रदूषणासाठी उत्सर्जन शुल्क आकारत आला आहे. 2015 साली त्याने 2 लाख 80 हजार उद्योजकांकडून 2.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सएवढी रक्कम जमा केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टाटा सदिच्छादूतपदी ‘खिलाडी’ची निवड

टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या सदिच्छादूतपदी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची निवड केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ओरिजिनल खिलाडी’ टाटा मोटर्सच्या नव्या श्रेणीतील वाहनांच्या जाहिरातीसाठी निवड करण्यात आली.

 जानेवारी 2017 पासून तो जाहिरातींमध्ये दिसणार आहे, असे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हणण्यात आले. टाटा मोटर्सकडून आयोजित करण्यात आलेल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमातही तो दिसणार आहे. यामध्ये नाविण्यपूर्ण वितरण आणि ग्राहक सेवांचा समावेश असेल. अक्षय कुमार याची व्यावसायिक वाहनांच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्या लोकप्रियतेमुळे कंपनीच्या विक्रीमध्ये भविष्यात चांगली वाढ होईल असे व्यावसायिक वाहन विभागाचे प्रमुख रविंद्र पिशारोडी यांनी म्हटले. भारतीयांमध्ये टाटा हा एक विश्वसनीय ब्रॅन्ड आणि कंपनीबरोबर जोडला गेल्याचा आपल्याला सन्मान वाटतो. भारतात ट्रक व्यवसायासंबंधी टाटाव्यतिरिक्त कोणत्याही कंपनीला अधिक माहिती नाही, असे अक्षय कुमार याने माध्यमांसमोर म्हटले.

हिंदी महासागराच्या भागातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, अशा अनेक संधी आहेत. पण, या प्रदेशाची काही आव्हाने आहेत, त्यावर योग्यप्रकारे काम केले, तर देशाच्या आर्थिक बळकटीसाठी हा प्रदेश मोलाचे योगदान देऊ शकतो.


‘बॅराकुडा’ या भारतीय टेहळणी जहाजाचे मॉरिशसमध्ये गेल्या वर्षी हस्तांतर झाले, त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागराचे महत्त्व, या संदर्भात भाषण केले. त्यात त्यांनी हिंदी महासागरासंदर्भातील आपल्या राष्ट्रीय धोरणातील ‘सागर’ या धोरणावर विशेष प्रकाश टाकला होता. ‘सिक्‍युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ अर्थात, संबंधित घटकांचा विकास आणि त्यांच्यासाठी आवश्‍यक असे सुरक्षित जीवनमान, या गोष्टी या धोरणाच्या केंद्रस्थानी आहेत. प्रमुख भारतीय भूभाग आणि भारतीय बेटे यांचे हित व सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपले जाण्याच्या दृष्टीने देशादेशांत अपेक्षित परस्पर सहकार्य, भारतीय सागरी भूभागांतील शांतता व सुरक्षा टिकून राहण्यासाठी होणारे एकत्रित प्रयत्न, हिंदी महासागराच्या माध्यमातून आर्थिक व राजकीय बळकटी निर्माण करण्यात हातभार लावणारी ‘नीलक्रांती’ (ब्ल्यू रिव्होल्युशन) आणि इतर देशांना हिंदी महासागर क्षेत्रात असणारा रस; या आहेत ‘सागर’ धोरणात अनुस्यूत असणाऱ्या आणि पंतप्रधानांनी उल्लेखलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी !

सध्या हिंदी महासागर क्षेत्रात जी परिस्थिती आहे, ती पाहता या भाषणाचे महत्त्व अधिकच वाढते. राष्ट्रीय नेतृत्वाने थेटपणे हिंदी महासागराच्या संदर्भात राष्ट्रहिताच्या काही गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करणे, हे भारतात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. सागरसुरक्षा आणि त्यासोबतच देशांतर्गत सामाजिक- आर्थिक विकासाचा मानस भारताकडून या भाषणातून मांडण्यात आला. हिंदी महासागराच्या क्षेत्रात भारतीय सामरिक क्षमता कशा आहेत, याच्या उत्तरावरच आपल्या देशाचे भागधेय वर्षानुवर्षे ठरत आले आहे; याची साक्ष इतिहासच देतो. एरवी आपण कितीही उत्तरेकडील देशांकडून निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्‍याबद्दल जागरूक राहत असू, तरीही हिंदी महासागर क्षेत्रात असणारी आपली ताकदच आपले स्वातंत्र्य टिकवू शकणार असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ब्रिटिशांना भारताचा ताबा घेता आला तो आपण हिंदी महासागरावर असणारे आपले नियंत्रण गमावल्यामुळेच, असे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक धुरिणांना वाटायचे ते उगीच नव्हे. भारताच्या संस्कृतीचा महान असण्याचा पाया हासुद्धा भारताचे सागरी सामर्थ्य आणि इतर देशांशी सागरी मार्गांच्या माध्यमातून निर्माण झालेले संबंध यांवरच घट्ट पाय रोवून उभा आहे. सागरी प्रदेशावरील देशादेशांच्या वर्चस्वाचा गंभीर प्रश्नही आज आपल्यापुढे आहे.

हिंदी महासागर प्रदेशात अमेरिकेच्या खालोखाल इतर कोणत्याही देशापेक्षा सशक्त आणि सामर्थ्यशाली असण्याचा मान भारतीय नौदलालाच आहे, हे बेलाशक खरेच... मात्र, इतर अनेक देशांच्या या प्रदेशातील निरनिराळ्या हितसंबंधांमुळे आपल्यापुढे सतत आव्हानात्मक परिस्थिती असण्याचे वास्तवही नाकारता येणार नाही. इराणचा आखाती प्रदेश आणि तांबड्या समुद्रभागात असणारी सततची तणावपूर्ण परिस्थिती, समुद्री चाचेगिरी आणि दहशतवादाचे या भागातील वाढते वर्चस्व, चीनच्या नौदलाने या भागात केलेला शिरकाव आणि त्याला मिळत असणारी पाकिस्तानी नौदलाच्या जवळिकीची जोड; अशा अनेक गोष्टींमुळे या भागातील सुरक्षेच्या दृष्टीने भारतापुढे नेहमीच खडतर आव्हाने उभी असतात ! तशात, अमेरिकेने येथील आपली ताकद कमी करण्यासंदर्भात घेतलेल्या संभाव्य निर्णयामुळे आपल्याला अधिकच दक्ष राहावे लागणार आहे.

इतर देशांच्या नौदलांशी उद्‌भवू शकणारे तात्कालिक संघर्ष आणि प्रसंगी दहशतवादी संघटनांकडून या ठिकाणचा ताबा घेण्याचे केले जाऊ शकणारे प्रयत्न, यासाठी ही दक्षता आवश्‍यकच आहे. कुणी सांगावे, उद्या काही अतिमहत्त्वाच्या भागांत आपली सुरक्षा कमी पडली आणि त्याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी डाव साधला तर ?... या सगळ्या परिस्थितीत भारतापुढे जबाबदारी असणार आहे ती आपल्या आरमाराची ताकद इतरांच्या तुलनेत सतत टिकवून ठेवण्याची. एकीकडे ही ताकद भौगोलिकदृष्ट्याही वाढवत नेणे आणि दुसरीकडे तंत्रकुशलता अंगीकारत टेहळणी क्षमता अधिकाधिक विकसित करणे, ही दिशा या भागातील आपले स्थान अधिक मजबूत करण्यास उपयोगी ठरू शकेल. हे सगळे करताना अमेरिकेसारख्या मित्रदेशाला सोबत घेत जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या हिंदी महासागरात ठळक अस्तित्व असलेल्या देशांशीही भारताने संबंध वृद्धिंगत करणे फायद्याचे ठरेल. यासोबतच सागरी भागातील शांतता आणि स्थैर्यासाठी आपण पुढाकारही घेऊ शकू. चीन आणि पाकिस्तानच्या आरमारापुढे उभे राहायचे झाल्यास हे पाऊल आवश्‍यक आहे.

अर्थात, आज या सागरी क्षेत्रात एक नवाच गंभीर प्रश्न डोके वर काढू लागला आहे, तो म्हणजे ‘क्‍लायमेट चेंज’चा. या बदलांचा मोठा फटका हिंदी महासागर क्षेत्राला बसला असून, तेथील सजीवसृष्

टी आणि एकूणच पर्यावरण त्यात भरडले जाण्याचा धोका आहे. राष्ट्रीय विकासाच्या गतीसाठी आणि अनेकदा तर प्रादेशिक व मानवी अस्तित्वासाठीही हा धोका तेवढाच गंभीर आहे. भारताच्या किनारपट्टीच्या भागात अनियंत्रित पद्धतीने वाढते शहरीकरण आणि उद्योगधंदे हे या नकारात्मक पर्यावरणीय बदलांना पूरक परिस्थितीच निर्माण करीत आहेत. अशा या परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येत हिंदी महासागरासारखा समृद्ध सागरी प्रदेश नीट हाताळला, तर त्याचा सर्वांनाच उपयोग होणार आहे. भारतापुरते बोलायचे झाल्यास, आपल्या गरजेला पुरून उरेल एवढी नैसर्गिक साधनसंपत्ती या भागातून उपलब्ध होऊ शकेल. फक्त गरज आहे ती ही उपयुक्तता जाणून घेण्याची आणि त्यादृष्टीने धोरणे आखण्याची. (अनुवाद : स्वप्नील जोगी)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माजी आयएएस अधिकारी अनिल बैजल दिल्लीचे नवे नायब राज्यपाल

नजीब जंग यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा दिलेला राजीनामा बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदासाठी आता अनिल बैजल यांची यांचे नाव पाठवले असून आता राष्ट्रपतींनीही त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बैजल यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैजल हे दिल्लीचे २१ वे नायब राज्यपाल असतील.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत राहणारे नजीब जंग यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यावर आश्चर्य व्यक्त होत होते. बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जंग यांचा राजीनामा मंजूर केला. केंद्र सरकारने नायब राज्यपालपदासाठी अनिल बैजल यांचे नाव पाठवले आहे. ७० वर्षीय बैजल हे १९६९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले असून नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६ मध्ये निवृत्त झाले होते.

 राष्ट्रपतींनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अनिल बैजल यांच्यासमोर सत्ताधारी आपसोबत समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे. बैजल यांच्या नियुक्तीचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले आहे.

गेल्या आठवड्यात नजीब जंग यांच्या राजीनाम्याने खळबळ माजली होती. सत्ताधारी आपकडून वारंवार होणा-या शाब्दिक हल्ल्यामुळे जंग नाराज झाले होते. यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. राजीनामा दिल्यावर जंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याभेटीनंतर त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. मोदींना हिंदूसोबत अल्पसंख्याक समाजालाही पुढे न्यायचे आहे. त्यांच्याकडे सर्वांना एकत्र नेण्याची दृष्टी आहे असे त्यांनी म्हटले होते.

जंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांचे कौतूक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. राजीनामा दिल्यावर नजीब जंग पुन्हा शिक्षण क्षेत्रात परततील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते.

 मध्यप्रदेशमधील माजी आयएएस अधिकारी आणि जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील माजी कुलगुरु नजीब जंग यांची जुलै २०१३ मध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित ‘आदिरंग महोत्सव’

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) नवी दिल्ली आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित भव्य महोत्सव ‘आदिरंगम’ च्या मुंबईतील (महाराष्ट्र) चौथ्या आवृत्तीचे आयोजन दि. २९ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान, पु. ल. देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर), प्रभादेवी- मुंबई येथे करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमत योजनेनुसार, राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) नवी दिल्ली आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित आदिरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

या महोत्सवात आदिवासी लोककला, नाट्य, संगीत, नृत्य आणि हस्तकला आदींचा संक्षिप्त परिचय करुन देण्यात येणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील जमाती विशेषतः ईशान्येकडील सात राज्यांमधील काही जमाती, त्यांच्या परंपरा आणि संस्कृती, श्रद्धा, त्यांच्या मान्यता, त्यांचे विधी मुख्य प्रवाहापासून अजूनही दूर आहेत. ‘आदिरंग’ महोत्सवाच्या माध्यमातून हा अनमोल सांस्कृतिक वारसा ठळकपणे मांडण्यात येईल. हा महोत्सव म्हणजे आदिवासी संस्कृती आणि आदिवासी कलाकारांच जग उलगडून दाखविण्याचा एक प्रयत्न आहे आणि तेही त्यांच्याकडून ज्यांनी आपल्याला मानवी अस्तित्वाची मुलतत्वे शिकवली, तीही कुठल्याही कृत्रिम सुविधा आणि तंत्रज्ञानाविना.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोबाईलधारकांची ‘कॉल ड्रॉप’च्या त्रासापासून लवकरच सुटका

मोबाईलधारकांची ‘कॉल ड्रॉप’च्या त्रासापासून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी सरकारने युद्धपातळीवर मोहीम राबवली आहे. त्यानुसार, मुंबई, दिल्लीसह देशभरात आयव्हीआरएस प्रणालीचे (इंटीग्रेटेड व्हाईस रिस्पॉन्स सिस्टीम) उद्घाटन केले आहे. त्याद्वारे वापरकर्त्यांकडून कॉलच्या गुणवत्तेबाबत अभिप्राय मागवला जाईल. कॉल ड्रॉपची समस्या दूर करण्यासाठी वापरकर्त्यांनी दिलेला अभिप्राय दूरसंचार कंपन्यांना पाठवला जाईल. आयव्हीआरएस प्रणाली लवकरच संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात येईल.

सरकारी परिपत्रकानुसार, कॉल ड्रॉपची समस्या दूर करण्यासाठी दूरसंचार विभागाने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांकडून अभिप्राय मागवण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी २३ डिसेंबरला आयव्हीआरएस प्रणाली कार्यान्वित केली आहे.

मोबाईल वापरकर्त्यांना १९५५ या क्रमांकावरून कॉल करण्यात येईल. परिसरातील कॉल ड्रॉपसंबंधी समस्येवर प्रश्न विचारले जातील. कॉल ड्रॉपची समस्या सतावत असेल तर, त्याच क्रमांकावर आपल्या परिसरातील ठिकाणाचा मेसेज वापरकर्ते पाठवू शकतात. त्यानंतर ही समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित कंपन्या कार्यवाही करतील. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांकडून त्यांचा अभिप्राय मागवला जाईल. त्यानुसार, सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. सुरुवातीला कॉल ड्रॉपवर अभिप्राय मागवण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

कॉल ड्रॉपची समस्या सोडवण्यासाठी दूरसंचार विभागाने जून २०१६ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान एक लाख ३० हजार अतिरिक्त बीटीएस (बेस ट्रान्सीवर स्टेशन) लावले आहेत. याशिवाय मार्च २०१७ पर्यंत दीड लाख अतिरिक्त ‘बीटीएस’ उभारण्याचे नियोजन केले आहे. गेल्या महिन्यात दूरसंचार कंपन्यांच्या मालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर कॉल ड्रॉपपासून मोबाईलधारकांची मुक्तता करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील, असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हागणदारीमुक्त ७३३ गावांत स्वच्छता अभियानाचा गजर

नवीन वर्षात अमरावती विभागातील हागणदारीमुक्त ७३३ गावात स्वछता अभियान राबविण्यात येणार असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून नवीन वर्षात अमरावती विभागात स्वच्छता अभियानाचा गजर होणार आहे.

तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास राज्यात नवीन ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे या अभियानाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली होती. या अभियानामुळे राज्यातील अनेक गावे स्वच्छ होवून आरोग्याचा नवा आदर्श ठेवण्यात आला होता. त्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गंत हागदारीमुक्त झालेल्या गावांसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीस पंचायत समितीस्तरावर बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

आता प्रथम बक्षीस २५ हजार रूपये ऐवजी १ लाख, व्दितीय १५ हजार ऐवजी ५० हजार, तृतीय १० हजारऐवजी २५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.

 यासाठी हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात येणार आहे. तर बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय बक्षीस पात्र ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गंत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सहभागी सर्वाधिक २३५ हागदारीमुक्त ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १५४, यवतमाळ जिल्ह्यातील १४१, अकोला जिल्ह्यातील १०३ व वाशिम जिल्ह्यातील १०० हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीपैकी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव दाखल केलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी १ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात येणार असून प्रथम, व्दितीय व तृतीय ग्रामपंचायतीस २६ जानेवारी २०१७ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोटाबंदी, तरीही विदेशी पर्यटकांच्या संख्येत वृद्धी

नोटाबंदीनंतर भले सर्व आर्थिक हालचालींमध्ये घसरणीचा दावा केला जात असला तरी पर्यटन क्षेत्रात वृद्धी पाहावयास मिळाली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 8.91 लाख पर्यटक भारत फिरण्यासाठी दाखल झाले. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हा आकडा 9.3 टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये 8.16 लाख विदेशी पर्यटक भारतात आले होते. तर 2014 मध्ये हा आकडा 7.65 लाख एवढा होता. आकडेवारीनुसार पर्यटनामुळे नोव्हेंबरमध्ये 14474 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा 12469 कोटी रुपये राहिला होता.

 याचप्रकारे विदेशी पर्यटकांमुळे भारताच्या नोव्हेंबर महिन्याच्या उत्पन्नात मागील वर्षांच्या तुलनेत 14.4 टक्क्यांची वाढ झाली. अधिकृत आकडेवारीनुसार भारतात येणाऱया विदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या अमेरिकन नागरिकांची होती. तर ब्रिटनचे पर्यटक दुसऱया आणि बांगलादेशी पर्यटक तिसऱया स्थानावर राहिले. यावर्षी जानेवारीपासून नोव्हेंबरदरम्यान 78.53 लाख विदेशी पर्यटकांनी भारताचा दौरा केला. हे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 10 टक्के अधिक प्रमाण आहे. जानेवारीपासून नोव्हेंबरदरम्यान विदेशी पर्यटकांद्वारे 138845 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. याच कालावधीत मागील वर्षी कमाईचा हा आकडा 121041 कोटी रुपये इतका होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विरल आचार्य रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर

केंद्र सरकारने विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. विरल आचार्य हे अमेरिकेतील स्टर्न विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्त होते. या रिक्त पदावर विरल आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वनाथन, एस.एस.मुंद्रा, आर. गांधी या इतर तीन डेप्युटी गव्हर्नरबरोबर ते काम करतील. यातील मुंद्रा, गांधी यांची माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. तर विश्वनाथन यांची नियुक्ती विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात झाली आहे.

आचार्य हे राजन यांच्याप्रमाणेच शैक्षणिक पार्श्वभूमीतून आले आहेत. ते न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे २००८ पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अर्थविषयक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकताच त्यांना आर्थिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बँकांच्या एनपीएबाबत त्यांच्या विशेष अभ्यास असल्याचे बोलले जाते.

काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग या वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी जीएसटी विधेयक हा एका सकारात्मक निर्णय असल्याचे म्हटले होते. आयआयटी मुंबई येथून त्यांनी १९९५ मध्ये कॉम्प्युटर सायन्समधून बी.टेक पदवी मिळवली आहे. वर्ष २००१ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क स्टर्न विद्यापीठातून आर्थिक विषयातून पीएच.डी प्राप्त केली. स्टर्न विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी ते २००१ ते २००८ पर्यंत लंडन बिझनेस स्कूलमध्ये कार्यरत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांचे संगमनेरजवळील लोणी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. बाळासाहेबांच्या मागे पत्नी, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील, डॉ. अशोक विखे पाटील हे तीन पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बाळासाहेब विखे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा कालखंड चार दशकांचा आहे. जिल्हा परिषद ते केंद्रात अर्थ राज्यमंत्री आणि उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत विखेंनी प्रवास केला. अनेक वर्षे त्यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले.

 १९८० पासून ते भारत-सेव्हिएत मैत्री संघाचे अध्यक्ष होते. १९८१ ते ८४ या काळात ते राज्य साखर संघाचे अध्यक्षही होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्ष होते. लोकसभेच्या पिटीशन कमिटीचेही ते अध्यक्ष होते. याशिवाय विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले.

राज्यातील पहिले खासगी तंत्रनिकेतन १९८० मध्ये प्रवरानगर येथे सुरु करुन ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ सुरु करण्याची मुहूर्तमेढ विखे यांनी रोवली. नंतर राज्यात विविध ठिकाणी शंभरहून अधिक तंत्रनिकेतने सुरु झाली. अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांनाही परवानगी मिळाली. शिक्षणाची दारे शेतकरी, शेतमजूरांच्या मुला-मुलींना खुली करण्याचे ऐतिहासिक काम विखे यांनी केले. राज्याच्या राजकारणात इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून बाळासाहेब विखे ओळखले जात. काँग्रेसच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा शब्द इंदिराजी कधीही डावलत नसत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना अनेकदा संधी असताना त्यांनी इतरांना हे पद मिळवून दिली.

१९९९ मध्ये ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री झाले. अर्थ राज्यमंत्री असताना त्यांनी ऐतिहासिक असे काम केले. त्या जोरावरच त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. केंद्रात अर्थ राज्यमंत्री असताना अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागासाठी ७५ हजार कोटींची तरतूद विखे यांनी केली होती. देशाच्या इतिहासात हा उच्चांक समजला गेला. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण जनतेला मदतीचा हात देवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम विखे यांनी केले.

बाळासाहेब विखे-पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. ते ८ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवेसनेतही प्रवेश केला होता. त्याच दरम्यान त्यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवले होते. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाचगाव पर्वती, वारज्यात वनउद्याने
राज्यात २६ वनउद्याने साकारणार

मुंबई : केंद्र सरकारच्या नगर वनउद्यान योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षांत राज्यात २६ वनउद्याने साकारणार असून, त्यात पुण्यातील पाचगाव पर्वती आणि वारजे येथील उद्यानांसह नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथील उद्यानांचा समावेश आहे.

देशभरातील २०० विविध शहरांमध्ये ही योजना राबविण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यात ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून उर्वरित २० टक्के निधी राज्य सरकारांनी उभारायचा आहे. मात्र, या उद्यांनासाठी २० हेक्टरपेक्षा अधिक जमीन हा नियम ठेवण्यात आला आहे. यात सध्या असलेल्या उद्यानांचे पूर्ण सुशोभिकरण, हिरवळ लागवड, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी जागा, लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य आदी गोष्टींची परिपूर्तता करण्यात येणार आहे. नागपूरमधील अंबाझरी, चंद्रपूर शहर, यवतमाळ मधील वडगाव, पुण्यातील पाचगाव पर्वती व वारजे या पाच ठिकाणी नगर वन उद्याने होणार आहेत.

शहरांची फुफ्फुसे म्हणून मौदाने व उद्याने ही शहर नियोजनातील महत्त्वाची बाब समजली जाते. मात्र, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये बिल्डरांच्या आक्रमणामुळे उभे राहिलेले काँक्रिकटचे जंगल तसेच रिकाम्या जागांची कमतरता पाहता, तरुण मुले व लहानग्यांना खेळण्यासाठी मैदाने वा उद्याने उरलेली नाहीत. गाड्यांची प्रचंड वाढलेली संख्या व शहरांमधील वाढलेली लोकसंख्या पाहता एखादे असले तरीही वृद्धांना फिरण्यासाठी त्याचा काहीही फायदा नसल्याची तक्रार सत्तेवर असलेले व नसलेले दोन्ही राजकीय पक्ष सातत्याने करत असतात. प्रत्यक्षात मात्र सगळेच राजकीय पक्ष याबाबत ओरड करत असले तरी प्रत्यक्षात काहीही होत नसल्याची गेल्या अनेक वर्षांमध्ये दिसून आले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या वन विभागातर्फे ही योजना राबविण्यात येणार असून, त्यात वन विभागाची जमीन किंवा असलेले उद्यान अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘मटा’शी बोलताना दिली. एका उद्यानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असून यातील ८० टक्के निधी म्हणजे एक कोटी साठ लाख रुपये केंद्राकडून येणार असून उर्वरित रक्कम राज्य सरकारने द्यायची आहे. या नव्या योजनेमुळे वेगाने शहरीकरण होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये उद्यानांची संख्या वाढण्यास फायदा होणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

नागरी सहभागातून विकास

वारजे येथील वनउद्यान हे नागरी सहभागातून उभे राहिलेले देशातील पहिले वनउद्यान आहे. या खात्याचे पूर्वीचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू झाला आहे. येथे नेचरवॉक आणि वनस्पती परिचय केंद्रही उभे राहत आहे. प्रामुख्याने चाफ्याचे उद्यान, नक्षत्रवन आणि फुलपाखरे या संकल्पनांमधून तीन उद्याने येथे उभी राहणार आहेत. येथील काम प्राधान्याने सुरू होत असून काही काळातच पाचगाव पर्वती येथील उद्यानाचे कामही सुरू होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वाघांच्या शिकारींचा उतरला ‘ग्राफ’

सरत्या वर्षात राज्यांतील जंगलांमध्ये होणाऱ्या व्याघ्र शिकारींना आळा घालण्यात मोठे यश प्राप्त झाल्याचा दावा वन विभागाने केला आहे. २०१६ मध्ये राज्यात केवळ एका वाघाची शिकार झाली असून इतर बेकायदेशीर कारवायाही कमी झाल्याचे विभागाने म्हटले आहे.

२०१६ संपायला अवघे दोन दिवस उरले असताना राज्याच्या वन्य जीव विभागाने वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला आहे. या वर्षभरात शिकार थांबविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून २०१६ साली वाघाच्या शिकारी कमी झाल्या आहेत. या वर्षी एकूण १४ वाघांचा मृत्यू झाला व त्यामध्ये केवळ एका शिकारीचा समावेश आहे. उरलेल्या ११ वाघांचे मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले तर दोन वाघांचा अपघातामुळे मृत्यू झाला. २०१२-१३ या वर्षात झालेल्या वाघ शिकारींनी वन विभागाला हादरवून सोडले होते. एक डझनापेक्षा जास्त वाघांची त्या वर्षभरात शिकार झाली होती. त्या अपयशानंतर वन विभागाने विविध उपाययोजना केल्या. या उपाययोजनांमध्ये क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ मजबूत करणे, जंगलात २४ तास गस्त सुरू करणे, गुप्तहेरांची मदत, कॅमेरा ट्रॅपचा वापर अशा गोष्टींचा समावेश होता. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्रप्रकल्प, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून व्याघ्र शिकारी कमी झाल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दुधाळ जनावरांसाठीही आता यूआयडी

प्रत्येक नागरिकासाठी विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच यूआयडी क्रमांक देण्याच्या धर्तीवर आता दुधाळ जनावरांसाठीही यूआयडी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कृषी खात्याच्या पशुधन संजीवनी योजनेतून हे यूआयडी दिले जातील. कर्ज योजनेतून घेतलेल्या जनावरांना ज्याप्रमाणे कानावर पितळी बिल्ला लावला असतो, तशा प्रकारचे दुधाळ जनावरांना हे ओळख क्रमांक लावले जातील.

कृषी मंत्रालयाच्या वार्षिक कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी या प्रस्तावित पशुधन संजीवनी योजनेची माहिती दिली. दुधाळ जनावरे रोगमुक्त ठेवणे आणि दुग्धोत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक जनावराचा तपशील हाताशी असावा आणि त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून सुमारे साडेआठ कोटी पशूंची माहिती यातून संग्रहीत केली जाईल.

प्रत्येक दुधाळ जनावरासाठी हेल्थ कार्ड (आरोग्यविषयक तपशिलांच्या नोंदी असलेले कार्ड) दिले जाईल. त्यामध्ये जनावराची जात, वय, लसीकरण, आहार यांसारख्या नोंदी असतील. ही संपूर्ण माहिती राष्ट्रीय पातळीवरील डाटाबेसमध्ये जमा केली जाईल. साहजिकच यातून पशुधनाची काळजी घेणे, धवलक्रांतीचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यात अडचण येणार नसल्याचा दावाही कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी या वेळी केला.

कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशभरातील सर्व दुधाळ जनावरांच्या नोंदी घेऊन त्यांना यूआयडी देण्याची प्रक्रिया आगामी दोन वर्षांत (2019 पर्यंत) पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 जगभरात प्रगत देशांमध्ये डेअरी व्यवसायासाठी उपयुक्त जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्याची पद्धत प्रचलित असल्याने भारतातही त्याचा अवलंब केला जावा, अशी मागणी होती. या पाहणीतून उपलब्ध होणारी आकडेवारी, जनावरे खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांसाठीही लाभदायक ठरेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुख्यमंत्री खांडू पक्षातून निलंबित

अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापि कायम असून आज मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पीपल्स पक्षाने निलंबनाची कारवाई केली. खांडू, उपमुख्यमंत्री चौना मे व अन्य पाच आमदारांना पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.

अरुणाचल प्रदेशात गेल्या वर्षभरापासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादातून आधी राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय रद्दबातल ठरवला आणि पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तारुढ झाली. मात्र, दीड ते दोन महिन्यांच्या आतच खांडू यांनी ४२ आमदारांसह काँग्रेसला रामराम ठोकून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला व सत्तास्थापन केली. या सरकारमध्ये खांडू यांना भाजपचीही साथ मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीपल्स पक्षात खांडू यांच्याविरोधात धूसफूस वाढली होती. काही आमदारांचा भाजपच्या सत्तासहभागाला व खांडू यांच्या वर्चस्वाला आक्षेप होता. पक्षातील या गटबाजीतूनच आज खांडू व त्यांच्या समर्थकांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले.

पक्षाने आज खांडू व त्यांच्या सहा समर्थक आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या सर्वांचं प्राथमिक सदस्यत्व पक्षाने रद्द केलं आहे. या कारावाईनंतर आता अरुणाचलच्या राजकीय नाट्यात पुढचा अंक कोणता रंगतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनने उभारलेल्या अणुप्रकल्पाचे शरीफ यांच्या हस्ते उद्घाटन

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी 340 मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जाप्रकल्पाचे बुधवारी उद्घाटन केले. पाकिस्तानातील मिआनवली जिल्ह्यात या अणुप्रकल्पाचे ठिकाण असून चष्मा 3 असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे, अशी माहिती रेडिओ पाकिस्तान या पाकिस्तानी रेडिओ वाहिनीने दिली आहे.

या वेळी शरीफ यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. घातपाती कारवाया करून देशविरोधी कृत्य करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहू नये, असे आवाहन शरीफ यांनी या वेळी केले. पाकिस्तानने देशाचा बहुमूल्य वेळ मोर्चे, दंगे यांना थोपविण्यात वाया घालवू नये, असेही शरीफ यांनी या वेळी सांगितले. देशातील लोडशेडिंगच्या समस्येवर उपाय शोधण्याला सरकारचे प्राधान्य राहणार आहे. 2018 पर्यंत वीजटंचाईमुक्त पाकिस्तान करण्याचा मानसही शरीफ यांनी या वेळी बोलून दाखविला.

चीनसोबत भागीदारीतून साकारला प्रकल्प

पाकिस्तान ऍटोमिक एनर्जी कमिशन (पीएईसी) व चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून हा अणुऊर्जा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. आगामी वर्षामध्ये चष्मा 3 च्या धर्तीवर सी 4 प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चित्ता वेगात नामशेष होण्याच्या मार्गावर!

ताशी सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने धावणारा, सर्वांत वेगवान आणि चपळ प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, संपूर्ण जगामध्ये आता केवळ 7100 चित्ते उरले असल्याचे एका नव्या संशोधनात समोर आले आहे.

सध्या 'असुरक्षित' (vulnerable) म्हणून गणल्या जाणाऱ्या चित्त्याचे वर्गीकरण 'धोक्यात असलेला, चिंताजनक' असे करणे आवश्यक आहे. चित्त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये चित्ता सध्या 'असुरक्षित' या वर्गामध्ये आहे. त्याला आता 'चिंताजनक' (endangered) म्हणून गणना करण्याची आता वेळ आली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

चित्त्यांच्या ऐतिहासिक रहिवासापैकी आतापर्यंत 91 टक्के रहिवास संपुष्टात आला आहे. एकेकाळी संपूर्ण आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये चित्त्यांचा रहिवास विस्तारलेला होता. चित्ता आशिया खंडातून तर आता अदृश्यच झाला आहे.

 इराणमध्ये 50 पेक्षाही कमी संख्येने चित्ता अस्तित्वात आहे, असे 'प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनपर लेखात म्हटले आहे.

झिंबाब्वे देशात 1999 मध्ये 1200 चित्ते होते. ती संख्या 2015 मध्ये 170 एवढीच उरली. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील जमीन धारणा आणि इतर धोक्यांची गुंतागुंत वाढल्याने चित्त्यांवर हा विपरीत परिणाम झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला

चीन हा देश अत्यंत महत्वाकांक्षी देश म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. चीन देशाच्या नावे अशा वास्तू,शिल्प बांधण्याचे विक्रम आहेत. या लौकिकाला साजेशा गोष्टींमध्ये आता आणखी एक भर पडत आहे. चीनमधील युनाना-गीझू या दोन प्रांताना जोडणारा पूल आज वाहतुकीसाठी खुला केला आहे.

या दोन्ही ठिकाणी पूर्वी पोहचण्यास चार तासांहूनही जास्त वेळ लागत असे,मात्र आता हे अंतर केवळ एक तासात करता येणे शक्य आहे. बेईपानजियांग नावाचा हा पूल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच पूल आहे.अभियांत्रिकीचे आश्चर्यचकित करणारी अनेक उदाहरणे चीनमध्ये पाहायला मिळतात. प्रचंड धुक्यात हरवलेला, उंचीवर असलेला हा पूल गुरूवारी वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात आला. काचेच्या पुलानंतर आता चीनमधला सगळ्यात उंच असा हा पूल आहे. बेईपानजियांग या पुलावर बघता बघता वाहनांनी गर्दी केली होती.

हा पूल जमिनीपासून एक हजार 854 फूट उंचीवर आहे. या पुलाची लांबी एक हजार 341 मीटर आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे. चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी खुला केला होता. या काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केल्यानंतर फक्त दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. आता हा पूल तरी किती दिवस खुला राहणार याविषयी अशी चर्चा रंगत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमेरिकेतील प्रा. आचार्य RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. देशाचे पतधोरण निश्चित करताना आता आर. गांधी, एस. एस. मुंदडा व एन. एस. विश्वनाथन यांच्यासमवेत आचार्य यांचादेखील सहभाग असणार आहे. ऊर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नेमणूक झाल्यानंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदी आचार्य यांची नियुक्ती झाली आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे विरल यांना शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. न्युयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कुल ऑफ बिझनेस येथे 2008 सालापासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बँका आणि वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कर्जाचे मूल्यांकन यासारख्या विषयांमध्ये आचार्य यांनी संशोधन केले आहे.

नोटाबंदीनंतर बॅंकिंग व्यवस्थेत रोकड पुरवठ्याच्या कामामध्ये बॅंकिंग व्यवस्थेवर ताण येत असून, चलनपुरवठ्याच्या कामात व्यग्र असलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय मंडळावर सध्या 10 बिगरशासकीय संचालक व एका डेप्युटी गव्हर्नरचे पद रिक्त असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹२९व्या वर्षीच अॅना इव्हानोविच निवृत्त

महिला एकेरीच्या टेनिस इतिहासात सर्बियाला पहिले वहिले ग्रँडस्लॅम जेतेपद (फ्रेंच ओपन) मिळवून देणारी टेनिसपटू अॅना इव्हानोविच हिने टेनिसमधून निवृत्त जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे टेनिस खेळण्यासाठी आपले शरीर पूर्णपणे फिट नाही, याची जाणीव झाली अन् तिने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

अॅनाने २००८मध्ये रशियाच्या दिनारा साफिनाला हरवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. त्याचवर्षी नोव्हाक जोकोविचने मोसमाच्या सुरुवातीची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे राजकिय व आर्थिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या सर्बियातून आणि मुख्यतः बेलग्रेडसारख्या शहरातून पुढे येणाऱ्या अॅना इव्हानोविच व जोकोविच यांचे खूप कौतुकदेखील झाले.

‘फिटनेसच्या वाढत्या तक्रारी बघता माझ्यापुढे निवृत्तीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. होय, हा खूप कठीण निर्णय आहे; पण आयुष्य एवढ्यावरच थांबणार नाही. सेलिब्रेशनच्या खूप संधी जीवनात आहेत व येतील’, असे अॅना म्हणाली.

 स्वप्नातही टेनिसशिवाय दुसरे काहीही न बघणाऱ्या अॅनाने वयाच्या पाचव्या वर्षापासून खेळाचे तंज्ञशुद्ध शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पालकांनीही लेकीचे कौतुक करत टेनिस प्रशिक्षणात कोणत्या पद्धतीचा खंड पडणार नाही, याचा कटाक्षाने लक्ष दिले. अॅना म्हणते, ‘कारकिर्दीत यश व अपयश अशी दोन्ही टोके पाहिली. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकून जागतिक रँकिंगमध्ये अव्वल झाले.

 टेनिसपटू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते; पण अशी जगात अव्वल होईन, असे कधीच वाटले नव्हते’. २००८मध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झालेली अॅना दुखापतींचे सत्र, खालावलेली कामगिरी यामुळे पुढे रँकिंगमध्ये माघारी पडली; पण २०१४मध्ये तिने दणक्यात पुनरागमन करत अव्वल पाचांत प्रवेश मिळवला. २०१५मध्ये फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली; पण पुन्हा मिळलेले हे यश क्षणिक होते. नवख्या टेनिसपटूंकडून हरल्याने रँकिंग ६०वर घसरले. अमेरिकन ओपनमध्ये चेक प्रजासत्ताकच्या डेनिसा अॅलर्टोव्हाकडून ती हरली. हा तिचा अखेरचा डब्ल्यूटीए सामना ठरला.

‘आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये कामगिरी राखायची असेल, तर फिटनेस सर्वोच्च हवा. मला मात्र दुखापतींचा खो सतत बसला. फिटनेस चोख नसेल, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा फायदा नाही. तेव्हा इथेच थांबायला हवे’, असे अॅनाने सांगितले. याचवर्षी अॅनाने जर्मनीचा माजी फुटबॉलपटू श्वेनस्टायगरशी विवाह केला.

अॅना इव्हानोविच

व्यावसायिक टेनिसला सुरुवातः १७ ऑगस्ट २००३.

निवृत्तीः २८ डिसेंबर २०१६

जेतेपदेः १५ डब्ल्यूटीए, ५ आयटीएफ

सर्वोच्च रँकिंगः १ (९ जून २००८)

निवृत्तीच्या वेळचे रँकिंगः ६५ (७ नोव्हेंबर २०१६)

ग्रँडस्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी

ऑस्ट्रेलियन ओपनः उपविजेती (२००८)
फ्रेंच ओपनः विजेती (२००८)
विम्बल्डनः उपांत्य फेरी (२००७)
अमेरिकन ओपनः उपांत्यपूर्व फेरी (२०१२)
टुअर फायनल्सः उपांत्य फेरी (२००७)
ऑलिम्पिकः तिसरी फेरी.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹LBW घेण्यात कुंबळे माहीर, सचिन 'विक्रमवीर'

क्रिकेटमध्ये एकूण दहा प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. त्यातला एलबीडब्ल्यू अर्थात पायचीत हा प्रकार सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, कसोटीत सर्वाधिक वेळा पायचीत होण्याचा आणि सर्वाधिक वेळा फलंदाजांना पायचीत पकडण्याचा विक्रम भारताच्याच दोन महान माजी क्रिकेटवीरांच्या नावावर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे दोन शिलेदार म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'जम्बो' अनिल कुंबळे.

द. आफ्रिकेचा हाशिम आमला कालच कसोटी क्रिकेटमधील एलबीडब्ल्यूचा १० हजारावा बळी ठरला. त्यानंतर, जुने रेकॉर्ड तपासताना समोर आलेली माहिती भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नक्कीच रंजक आहे. सर्वाधिक वेळा पायचीत होणाऱ्यांच्या यादीत क्रिकेटमधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तो ६३ वेळा पायचीत झाला होता. त्याच्या खालोखाल विंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि इंग्लंडच्या ग्रॅहम गूचचा नंबर येतो. हे दोघं अनुक्रमे ५५ आणि ५० वेळा एलबीडब्ल्यू झाले होते. इंग्लंडचा सध्याचा कर्णधार अॅलिस्टर कूक आत्तापर्यंत ४७ वेळा पायचीत झाला आहे. तो सचिनला मागे टाकतो का हे पाहावं लागेल.

दुसरीकडे, फलंदाजांना पायचीत पकडण्यात भारताचाच फिरकीपटू अनिल कुंबळे माहीर असल्याचं दिसतं. कसोटीत कुंबळेच्या नावावर ६१९ विकेट आहेत. त्यापैकी १५६ विकेट एलबीडब्ल्यू आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरननं १५० वेळा फलंदाजांना पायचीत पकडलंय. तिसऱ्या क्रमांकावर आहे, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. त्याच्या एकूण ७०८ विकेटपैकी १३८ पायचीत आहेत.

आपल्या करिअरमध्ये एकदाही एलबीडब्ल्यू न झालेला एकमेव शिलेदार म्हणजे ऑस्ट्रेलियाचा जोए डार्लिंग. १८८४ ते १९०५ दरम्यान ते ३४ कसोटी सामने खेळले पण त्यात एकदाही पायचीत झाले नव्हते. तर, ऑस्ट्रेलियाचेच क्लॅम हिल ८९ डावात फक्त एकदाच पायचीत झाले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिजि-धन मेळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते ‘भीम’ अॅपचे उद्घाटन

केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत 'भारत इंटरफेस फॉर मनी' अर्थात 'भिम' मोबाईल ऍप्लिकेशन सादर केले आहे.

 या ऍप्लिकेशनबद्दलच्या काही ठळक बाबी:

वापरकर्ते आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ऍप डाऊनलोड करु शकतात. 'आयओएस' ऑपरेटिंग सिस्टमवरदेखील हे ऍप्लिकेशन चालणार आहे.

एकदा मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले की वापरकर्त्यांनी बॅंक खात्याचा क्रमांक टाकला की युपीआय पिन तयार होईल. यानंतर वापरकर्त्याचा मोबाईल नंबर हाच त्याचा 'पेमेंट ऍड्रेस' असेल. आर्थिक व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना इंटरनेटची गरज भासणार नाही. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ऍपवरुन पैशांची देवाण घेवाण सुरू करता येईल.

वापरकर्त्यांना एकमेकांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यासाठी फक्त मोबाईल नंबरची गरज भासेल. विशेष म्हणजे, 'युनिफाइड पेमेंट इंटरफेस' (यूपीआय) ही पेमेंट प्रणालीचा अवलंब न करणाऱ्या बॅंकांच्या खात्यांमध्येदेखील पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी त्या बॅंकेचा एमएमआयडी आणि आयएफएससी क्रमांक सादर करावा लागेल.

वापरकर्त्यांना केव्हाही आपल्या खात्यातील बॅलेन्स तपासून व्यवहार पार पाडता येईल. त्यासाठी आपल्या फोन नंबरव्यतिरिक्त एखादा कस्टम पेमेंट ऍड्रेस किंवा क्‍यूआर कोड सेट करता येईल.
या ऍप्लिकेशनद्वारे 24 तासांमध्ये किमान 10,000 तर जास्तीत जास्त 20,000 रुपयांचा व्यवहार शक्‍य आहे
वापरकर्त्यांना पैसे पाठविण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क लावण्यात येणार नाही. परंतु बॅंकांकडून युपीआय किंवा आयएमपीएस शुल्क लागू केले जाऊ शकते. यावर सरकारचे नियंत्रण नसेल.
हे ऍप वापरण्यासाठी वेगळे जाऊन मोबाईल बॅंकिंग सुरू करण्याची गरज नाही.

सध्या हे ऍप्लिकेशन इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अखेर चिन्नमा शशीकलाकडेच महासचिव पदाची धुरा

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्याकडेच अपेक्षेप्रमाणे अण्णा द्रमुकच्या महासचिव पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या आम परिषदेमध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. 1980पासून शशिकला या जयललिता यांच्या सोबत आहेत.

पक्षाच्यावतीने निवडीची औपचारिकता पूर्ण झाल्याने शशिकला यांना आता या पदाचे सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. तथापि शशिकला यांच्या निवडीबाबतही पक्षात दोन प्रवाह होते. एका प्रवाहाच्या मते पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत पक्ष सर्वसहमतीने चालवण्यात यावा तर दुसऱया गटाच्या मते शशिकला यांनी महासचिव पदाबरोबरच मुख्यमंत्री पदही स्वीकारवे, असा आग्रह धरला होता. तथापि शशिकला यांनीच तो नाकारून फक्त महासचिवपद स्वीकारले आहे.
आम परिषदेची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री पनीरसेल्वम, वरिष्ठनेते मंत्री ए.पलीनीस्वामी, लोकसभेचे उपसभापती एम. थंबी दुराई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शशिकला यांची भेट घेऊन प्रस्तावाची माहिती दिली आणि पद आणि पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत आवाहन केले.

चिन्नमा तथा छोटी माँ या नावाने परिचित असणाऱया शशिकला या 1980 पासून जयललिता यांच्या समवेत आहेत. त्या दोघींची मैत्री जयललिता यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत कायम राहिली होती. मध्यंतर 2011 साली शशिकला यांच्यावर जयललिता यांना विषप्रयोग केल्याचा आरोप झाला होता. याशिवाय शशिकला यांचे पती नटराजन यांचा सत्तेच्या वर्तुळात होणारा हस्तक्षेपही त्यांच्यातील वितुष्टाला कारण ठरला होता. त्यामुळे जवळपास 100 दिवस त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तथापि शशिकला यांनी माफी मागितली तसेच कुटुंबियांशी संबंध तोडून त्या जयललिता यांच्यासमवेत राहाण्यास आल्या. एवढा अल्पकाळ वगळता शशिकला या कायमच जयललिता यांच्यासमवेत राहिल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मल्याळी गटाकडून पाकिस्तान विमानतळाची वेबसाइट हॅक

बुधवारी काश्मिरी चिता नावाच्या पाकिस्तानी सायबर अटॅकर गटाने त्रिवेंद्रम विमानतळाची वेबसाइट हॅक केली होती. यावर प्रत्युत्तरादाखल हल्ला करत मल्याळी सायबर तज्ञांनी पाकिस्तानच्या विमानतळाची वेबसाइट हॅक केली आहे. मल्याळी तज्ञांद्वारे करण्यात आलेल्या सायबर स्ट्राईकनंतर विमानतळाचा आयडी-पासवर्ड फेसबुकवर शेअर करण्यात आला.

सूत्रानुसार मल्याळी सायबर तज्ञांनी सियालकोट विमानतळाचा ऍडमिन लॉगइन हॅक केला. यानंतर या लॉगइनचा पासवर्ड बदलून मल्याळीज असा केला. मल्याळी सायबर तज्ञांनी याचा स्क्रीन शॉट घेत आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. या शेअरसोबतच त्यांनी फेसबुकशी संबंधित लोकांना पासवर्ड आणि आयडी वापरून या साइटला भेट देण्याचे आवाहन केले. या पोस्टसोबत त्यांनी एक उपहासात्मक टिप्पणी केली. ट्रॉलर्सनी पासवर्ड बदलू नाही, यामुळे फेलो ट्रॉलर्सना आपली नाविन्यता दाखविण्याची संधी मिळते असे त्यांनी लिहिले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चंद्राच्या दुसऱया हिस्स्यावर पोहोचणारा पहिला देश ठरणार चीन

2018 साली राबविणार महत्त्वांकाक्षी चेंज-5 मोहीम

लष्करी क्षमतेनंतर चीन आता अंतराळ तंत्रज्ञानात देखील आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनने आपल्या महत्त्वांकाक्षी अंतराळ कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे. यानुसार चीन 2018 साली चंद्राच्या न दिसणाऱया हिस्स्यावर आपले यान पाठविणार आहे. जर सर्वकाही सुरळीत झाले तर चीन असे करणारा पहिलाच देश ठरेल.

चीन चंद्राच्या दुरवरच्या हिस्स्यांविषयी माहिती जमविण्यासाठी त्याच्या दोन्ही टोकांवर रोबोट पाठविण्याची योजना बनवत आहे. चंद्रावर अंतराळवीरांना पाठविण्याविषयी अजून चर्चा आणि सल्लामसलत केली जात आहे. चेंज-5 चंद्र मोहिमेद्वारे अंतराळवीरांना चंद्रावर सुखरुप उतरविण्याचे काम योग्यरितीने पुढे जात असल्याचे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाच्या उपसंचालकांनी सांगितले.

‘चीन स्पेस ऍक्टिव्हिटिज इन 2016’ या शीर्षकाने जारी करण्यात आलेल्या श्वेतपत्रात पुढील 5 वर्षांमध्ये आपली चंद्र संशोधन योजना सुरूच ठेवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याआधी चीनने चंद्रावर रोव्हर उतरविला आहे, परंतु आता चंद्राच्या दुसऱया हिस्स्यावर तो पोहोचू इच्छितो. श्वेतपत्रानुसार या संशोधन योजनेत 3 धोरणात्मक पावले उचलली जातील. कक्षेत स्थापित करणे, पृष्ठभागावर उतरणे आणि परतणे अशी ही पावले असतील. चेंज-5 संशोधन 2017 च्या अखेरपर्यंत सुरू होईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एप्रिलपासून बंगळुरूत सुरू होणार ‘आयफोन’चे उत्पादन

जगप्रसिद्ध अॅपल कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. खास भारतीय बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन बंगळुरू येथे आयफोन उत्पादन सुरू करण्याचे नियोजन अॅपलने केले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. अॅपलसाठी ओईएमचे (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफक्चर) काम करणारी तैवानची कंपनी विस्ट्रॉनने बंगळुरू मधील पिन्या येथील औद्योगिक वसाहतीत आयफोनचे उत्पादन सुरू होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतात उत्पादन सुरू करण्यास अॅपल गंभीर आहे. सध्या अॅपलला आपली उत्पादने भारतात विकण्यासाठी १२.५ टक्के आयात कर द्यावा लागतो. भारतातच याचे उत्पादन सुरू केल्यास कंपनीला हा कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे ग्राहकांनाही कमी किमतीत आयफोन विकता येईल.

अॅपलची सर्वात मोठी सहयोगी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने यापूर्वी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु या प्रकल्पात फक्त अॅपलचे उत्पादन तयार केले जातील.
तत्पूर्वी, अॅपलने भारतात उत्पादन सुरू करण्यापूर्वी सवलतींसह लेबलिंग नियमांत सूट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅपलच्या उत्पादनावर उत्पादनाशी निगडीत कोणतीही सूचना किंवा माहिती कंपनीला छापायची नाही. उत्पादनाशी निगडीत सर्व माहिती ही त्या फोन किंवा टॅब्लेटच्या सॉफ्टवेअरमध्ये देण्याची कंपनीची तयारी आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.

भारतीय लेबलिंग नियमांतर्गंत उत्पादनावर अशा पद्धतीची माहिती देणे सक्तीचे आहे. कंपनीने भारतात उत्पादन सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी सरकारला काही सवलतीही मागितल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशनने (डीआयपीपी) अॅपलची ही मागणी नोव्हेंबर महिन्यात महसूल विभाग आणि डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (डीईवायटीवाय) यांच्याकडे पाठवला होता. विशिष्ट डिझाइन हीच अॅपलच्या उत्पादनांची वेगळी ओळख आहे, असे अॅपलने म्हटले आहे. अनेक देशांमध्ये अॅपल उत्पादनावर जी माहिती असते. ती अत्यंत कमी असते. परंतु, भारतासारख्या देशात याबाबत विस्तृतपणे माहिती द्यावी लागते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता डॉक्टर होणे आणखी अवघड, कॉलेजबाहेर पडण्यापूर्वी द्यावी लागणार ‘एक्जिट टेस्ट’

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी एक वैद्यकीय प्रवेश चाचणी पास व्हावे लागते. त्यानंतर साडे पाच वर्षांच्या शिक्षणानंतर डॉक्टरची पदवी मिळते. परंतु यापुढे ही पदवी इतक्या सहजपणे मिळणार नाही. ही पदवी मिळवण्यासाठी नॅशनल लेव्हल एक्जिट टेस्ट द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच डॉक्टरची पदवी मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मेडिकल काउंसिल (सुधारणा) विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्या मसुद्यामध्ये ही तरतूद ठेवण्यात आली असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

१९ जुलैला आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. हा नवा प्रस्ताव त्याच विधेयकात जोडण्यात येणार आहे. सर्व देशात एकसमान गुणवत्तेचे निकष असावेत या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे जी महाविद्यालये नियमांना धाब्यावर बसवून आपल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करतात त्यांची अडचण होणार आहे.

जर या चाचणीचा निकाल ९० टक्क्यांच्या वर आला तर महाविद्यालयाची गुणवत्ता काय आहे हे कळू शकेल. विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड करताना जागरुक व्हावे हा देखील या चाचणीचा उद्देश आहे. त्याबरोबरच या चाचणीचे काही अन्य फायदे देखील आहेत.

पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या एनईईटी (नीट) ला हा पर्याय ठरू शकेल, केंद्रीय आरोग्य सेवा भरतीच्या परीक्षेलाहा हा पर्याय ठरणार आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर फॉरेन ग्रॅज्युएट मेडिकल एक्जाम देण्याची आवश्यकता भासणार नाही असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

याआधी देशभरात प्रत्येक राज्यासाठी एक वेगळी वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतली जात असे. सरकारने नियमात बदल घडवून संपूर्ण देशात नॅशनल इलिजिबिलिटी इंट्रांस टेस्ट ही परीक्षा घेणे सुरू केले. सरकारने अचानकपणे नियमात बदल केल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टेनेसिन 117 वे मूलद्रव्य , IUPAC चे शिक्कामोर्तब

सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजड अशा 117 व्या मूलद्रव्याचे 'टेनेसिन' असे नामकरण करण्यात आले आहे.

नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी) या संस्थेने तब्बल एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 'टेनेसिन' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

'टेनेसिन'चा शोध एप्रिल 2010 मध्ये लागला होता. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरीत्या ते आढळत नाही. विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पडल्यास संश्‍लेषण होते. त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रके एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार होते. 'टेनेसिन'च्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य 117 तयार होण्यास बर्केलियम- 249 हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे लागते.

या मूलद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी टेनेसी या अमेरिकेतील राज्याचा सिंहाचा वाटा असल्याने मूलद्रव्याला या राज्याच्या नावावरूनच "टेनेसिन' हे नाव देण्यात आले आहे. हे हॅलोजन प्रकारातील मूलद्रव्य असल्याने टेनेसी शब्दाच्या अखेरीस जोड देऊन टेनेसिन हे नाव तयार झाले आहे. आवर्तसारणीत "टीएस' या नावाने ते दर्शविले जाणार आहे.

🔹चर्चित व्यक्ती:-
---------------------

अनिल बैजल:-

* अनिल  बैजल यांची दिल्लीचे २१ वे नायब राज्यपाल पदी निवड
* ७० वर्षीय बैजल हे १९६९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले आहे
* नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६ मध्ये निवृत्त झाले होते.

 विरल आचार्य :-

* केंद्र सरकारने विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.
* विरल आचार्य हे  न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे २००८ पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
* आयआयटी मुंबई येथून त्यांनी १९९५ मध्ये कॉम्प्युटर सायन्समधून बी.टेक पदवी मिळवली आहे.
* वर्ष २००१ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क स्टर्न विद्यापीठातून आर्थिक विषयातून पीएच.डी प्राप्त केली. स्टर्न विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी ते २००१ ते २००८ पर्यंत लंडन बिझनेस स्कूलमध्ये कार्यरत होते.

चालू घडामोडी:-
-------------------------------------------

१) भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत हा जगातील ---------देश आहे.
:- सहावा

२) १९५७ पासुन प्रकाशित होत असलेले योजना हे मासिक भारतातील किती भाषेतून प्रकाशित होते:- १३

३)---------------- या राज्य सरकारने आपली सुरक्षा योजना घोषित केली :- गुजराथ

४) गर्व:-२ हे मोबाईल अॅप कोणत्या मंत्रालयाने सुरु केले  :-उर्जा मंत्रालय

५) डिसेंबर २०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने कैद्यासाठी टेलीफोन ची सुविधा सुरु केली :- उत्तरप्रदेश

६) जगातील पहिला सोलर हायवे खालीलपैकी कोणत्या देशाने बनवला:-  फ्रांस

क्रीडा घडामोडी:- २०१६:-
महिलांचे ‘विराट’ राज्य
---------------------------------------
* रिओ ऑलिम्पिक, ट्वेन्टी-२० विश्वचषक, कनिष्ठ हॉकी विश्वचषक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धानी सरते वर्ष क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहील. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक तसेच कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी २०१६ या वर्षांत भारतीयांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवले.
* कबड्डी, हॉकी, महिला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, जिम्नॅस्टिक या खेळांमधील भारतीयांची कामगिरी लक्षवेधी ठरली. हे वर्ष महिला खेळाडूंच्या पराक्रमामुळे गाजले. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान राखले. हॉकी संघांनी आपल्या दमदार कामगिरीनिशी आशा उंचावल्या आहेत. तसेच १५ वर्षांनंतर भारताने कनिष्ठ विश्वचषकावर नाव कोरले. कबड्डी आणि कॅरम या खेळांमधील विश्वचषकात भारताचे वर्चस्व अबाधित राहिले.
* ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यामुळे भारताला   दोन पदके.
* भारतात दीपा कर्माकरमुळे जिम्नॅस्टिकला संजीवनी. तर ललिता बाबरची ३००० मीटर स्टीपलेसमध्ये ऐतिहासिक कामगिरी.
* टेनिसपटू सानिया मिर्झासाठी हे स्वप्नवत वर्ष. तर भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई स्पध्रेत मक्तेदारी

बॅडमिंटन:-
------------

* पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक रौप्यपदकासह इतिहास घडवला. अंतिम मुकाबल्यात कॅरोलिन मारिनने तिला नमवले.
* ऑलिम्पिक स्पध्रेत पदक पटकावणारी सायनानंतर ती दुसरी भारतीय बॅडिमटनपटू तर रौप्यपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली.  * सिंधूने चीन सुपर सीरिज जेतेपद जिंकले  सुपर सीरिज दर्जाच्या स्पध्रेचे सिंधूचे पहिलेच जेतेपद ठरले.  
* सायना नेहवालला यंदाच्या वर्षांत गुडघ्याच्या दुखापतीने सतावले. मात्र तिने केलेले पुनरागमन संस्मरणीय ठरले. समीर वर्माने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शनासह छाप उमटवली.

कुस्ती:-
--------
* साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत देशाला यंदाच्या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.
* भारताला ऑलिम्पिकमध्ये या खेळात पदक मिळवून देणारी ती पहिली महिला ठरली.
* उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे नरसिंग यादवला रिओहून एकही लढत न खेळता मायदेशी परतावे लागले.

जिम्नॅस्टिक्स:-
----------------
* रिओ ऑलिम्पिकमध्ये यंदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते त्रिपुराच्या २३ वर्षीय जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरने. महिलांच्या व्हॉल्ट प्रकारातील अंतिम फेरीत फक्त ०.१५० गुणांनी तिचे कांस्यपदक हुकले.  
* तिने सर्वात आव्हानात्मक असा प्रोडय़ुनोव्हा प्रकार सादर करण्याची जोखीम पत्करली होती. ऑलिम्किपमध्ये पात्र ठरलेली ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टिकपटू. याचप्रमाणे ५२ वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ऑलिम्पिक जिम्नॅस्टिकमध्ये प्रतिनिधित्व करीत होता.
* तिच्या या वैशिष्टय़पूर्ण पराक्रमाबद्दल क्रीडा मंत्रालयाने तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. तिचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला.

क्रिकेट:-
----------
*भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष विराट कोहलीमय होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने सलग १८ सामन्यांपैकी एकही सामना गमावला नाही.
* कोहलीची तीन द्विशतके आणि आर. अश्विनची भेदक फिरकी गोलंदाजी हे या वर्षांचे वैशिष्टय़ ठरले.
* करुण नायरने भारताचा दुसरा त्रिशतकवीर होण्याचा मान पटकावला. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक राहिली. त्याचबरोबर भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारत अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. याचशिवाय सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींमुळे बीसीसीआय आणि त्यांच्या संलग्न संघटनांवरील फासे आवळले गेले आहेत. महिला क्रिकेटपटूंनीही आशिया चषक उंचावून सलग सहाव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.

अ‍‍ॅथलेटिक्स:-
------------
*ललिता बाबरने तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवत मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. परंतु तिला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्य खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारांमध्ये पहिल्या २० क्रमांकांमध्येही स्थान मिळविता आले नाही. त्या तुलनेत पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्र झांझरिया (भालाफेक-सुवर्ण), मरिय्यप्पन थांगवेलु (उंच उडी-सुवर्ण), वरुणसिंग भाटी (उंच उडी-कांस्य), दीपा मलिक (गोळाफेक-रौप्य) यांनी पदकांची कमाई करीत सुदृढ खेळाडूंनी आदर्श घ्यावा अशीच कामगिरी केली.

टेनिस:-
-------
* सानिया मिर्झाने जागतिक टेनिसमधील दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. सानिया आणि मार्टनिा िहगीस जोडीने ८ जेतेपदांची कमाई केली. यामध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचा समावेश आहे. सलग ४१ विजयाची मालिका खंडित झाल्यावर काही दिवसांतच या दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सानिया

ने ल्युसी स्टायरोकोव्हाच्या बरोबरीने खेळण्याचा निर्णय घेतला. या जोडीने २ जेतेपदांवर नाव कोरले. लिएण्डर पेसने फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या जेतेपदासह कारकीर्दीत ‘करिअर स्लॅम’ पूर्ण केले. मात्र अखिल भारतीय टेनिस संघटना (आयटा), पेस, सानिया आणि रोहन बोपण्णा यांच्यात समन्वय नसल्याने ऑलिम्पिक स्पध्रेत भारताची पदकाची संधी हुकली. लंडनप्रमाणे रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघनिवडीवेळी वैयक्तिक अहंकार, बंडाळ्या यांनी खेळाडू आणि ‘आयटा’ यांची प्रतिमा मलीन झाली.

हॉकी
-------
* हॉकीसाठी २०१६ हे वर्ष खऱ्या अर्थाने भावी सुवर्णयुगाची मुहूर्तमेढ करणारे ठरले. जागतिक चॅम्पियन्स स्पर्धेतील रौप्यपदकापाठोपाठ आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने सोनेरी कामगिरी केली.
* रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले तरीही घरच्या मैदानावर झालेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवत ऑलिम्पिकमधील अपयश काही अंशी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने १५ वर्षांनंतर हा विश्वचषक जिंकला. महिलांमध्ये भारतीय संघाने ३६ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत अनोखी कामगिरी केली. अर्थात बलाढय़ संघांचा समावेश असल्यामुळे महिलांकडून चांगली कामगिरी अपेक्षितच नव्हती.

कबड्डी:-
------------
अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भारताने इराणचा ३८-२९ असा पराभव करून जगज्जेतेपदावरील आली हुकूमत अबाधित राखली. अजय ठाकूर विजयाचा शिल्पकार ठरला. यंदाच्या वर्षांत प्रो कबड्डी लीगचे दोन हंगाम (तिसरा आणि चौथा) झाले. यावर पाटणा पायरेट्सने प्रभुत्व गाजवले. चौथ्या हंगामात महिलांच्या तिरंगी प्रायोगिक स्पध्रेचा घाट घालण्यात आला. मात्र पुरुषांच्या मैदानावर हा प्रयोग अयशस्वी ठरला.

कॅरम:-
--------
विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुष एकेरीमध्ये प्रशांत मोरे आणि महिला एकेरीमध्ये एस. अपूर्वाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. पुरुष दुहेरीमध्ये संदीप देवरुखकर आणि रियाझ अकबर अली यांनी जेतेपद पटकावले, तर महिला दुहेरीमध्ये एस. अपूर्वा आणि काजल कुमारी यांनी अजिंक्यपद मिळवले. सांघिक गटात पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताला श्रीलंकेने हरवले. महिलांच्या सांघिक गटामध्ये अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला.

खो-खो:-
----------
भारताने खो-खो मधील आपली हुकूमत कायम राखताना दक्षिण आशियाई (सॅफ) आणि आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत पुरुष व महिला गटाचे जेतेपद नावावर केले. विशेष म्हणजे भारताच्या या विजयात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा ठरला. आशियाई स्पध्रेत पुरुष गटात अनिकेत पोटे व सारिका काळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. राष्ट्रीय स्पध्रेत महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला.

फुटबॉल:-
-----------
जागतिक फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारताने (१३५) सहा वर्षांतील सर्वोत्तम स्थानावर झेप घेतली. दक्षिण आशियाई (सॅफ) स्पध्रेत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आय-लीग विजेत्या बंगळुरू एफसी क्लबने ऐतिहासिक कामगिरी करत एएफसी चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.इंडियन सुपर लीगमध्ये अ‍‍ॅटलेटिको डी कोलकाताने केरळा ब्लास्टर्सना त्यांच्याच घरी नमवत दुसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला.