Post views: counter

Current Affairs Jan 2017 Part- 1

🔰 Current Affairs Marathi 🔰
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार; खंडू मुख्यमंत्री.

ईटानगर - अरुणाचल प्रदेशातील राजकीय घडामोडीत आज (शनिवार) एक नवा बदल झाला असून, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून बडतर्फ करण्यात आलेल्या 34 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजप नेते राम माधव यांनी ट्विटवरून माहिती देताना सांगितले, की अरुणाचल प्रदेशात आता भाजपचे सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह 34 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पीपीएमधून निलंबित करण्यात आले होते. 60 जागांच्या या विधानसभेत आता भाजपची संख्या 45 आणि दोन अपक्ष अशी 47 झाली आहे. याठिकाणी भाजपचे दहा आमदार आहेत.

पेमा खंडू यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी कोणतेही कारण न दाखविता पीपीएमधून निलंबित करण्यात आल्याचा आरोपही केला. आमदारांवर अविश्वास दाखविल्याने दोन तृतीयांशहून अधिक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पीपीएने केलेली कारवाई आमच्यासाठी फायद्याची ठरली, असे खंडू यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री पीपीएने पेमा खंडू यांच्यासह 6 आमदारांना निलंबित करत तकाम पारियो यांना मुख्यमंत्री घोषित केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जलयुक्त अभियान भूमिपुत्रांसाठी नवसंजीवनी

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जलयुक्त शिवार अभियान हे भूमिपुत्रांसाठी नवसंजीवनी आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथील १ कोटी १० लाख रुपयांच्या नाला खोलीकरण
व इतर कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. ३०) रोजी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

जलयुक्त शिवारच्या कामामुळे परिसरातील जमीन सिंचनाखाली येवून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होणार आहे. या कामांच्या भूमिपूजन समारंभ नुकताच झाला. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, एकलग्न सरपंच राजू बडगुजर, तहसिलदार कैलास कडलग, गटविकास अधिकारी कल्पना वुईके तालुका कृषी अधिकार ए. के. माळी, आय. बी. पवार, मंडळ कृषी अधिकारी देसले, उपसरपंच कमलाबाई पाटील, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर भालेराव, नवल पाटील, ठेकेदार कोतवाल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही.सैंदाणे यांनी तर प्रास्ताविक ए.के.माळी यांनी केले.

पाच कोटींची विकासकामे मंजूर

कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत धरणगाव तालुक्यातील चांदसर, पिंपळे बु., महंकाळे, वाघळुद खु. - हणुमंत खेडे, झुरखेडा-निमखेडा, पाळधी, बोरगाव बु, चोरगाव, एकलग्न, पोखरी व टहाकडी अशा तेरा गावांमध्ये याचा फायदा होणार आहे. त्यामध्ये सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, बंडिंग व शेततळे अशा विविध कामांसाठी ५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपये गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले आहेत.



#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7.2 टक्क

अर्थमंत्रालयाची माहिती; आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील स्थिती
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत 7.2 टक्के राहिला, अशी माहिती अर्थमंत्रालयाने शुक्रवारी दिली. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान भारताने कायम राखल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.

अर्थमंत्रालयाने वर्षअखेरचा आर्थिक आढावा घेतला आहे. अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, की एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत महागाई नियंत्रणात असून, किरकोळ व घाऊक चलनवाढ अनुक्रमे 5.2 टक्के व 2.7 टक्के आहे. खर्चात करण्यात आलेली कपात आणि महसूल वाढविण्यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सहकारी आर्थिक प्रशासनासाठी प्रशासकीय उपाययोजना सुरू असून, चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यात मदत झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात जागतिक पातळीवरील मंदीचे वातावरण, पेट्रोलियम उत्पादनांचे वाढते भाव हे घटक असूनही अर्थव्यवस्थेची चांगली वाढ झाली आहे.
 तसेच, चलनवाढही स्थिर आहे. वित्तीय तूट आणि चालू खात्यावरील तुटीमध्येही सुधारणा झाली आहे. पहिल्या सहा महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग 7.2 टक्के राहिल्याने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान भारताने कायम ठेवला आहे, असे अर्थमंत्रालयाने नमूद केले आहे.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर (एप्रिल ते ऑक्टोबर)

- किरकोळ चलनवाढ : 5.2 टक्के
- घाऊक चलनवाढ : 2.7 टक्के
- अन्नधान्य चलनवाढ : 6.1 टक्के
- कृषी क्षेत्राचा वाढीचा वेग : 2.5 टक्के
- उद्योग क्षेत्राचा वाढीचा वेग : 5.6 टक्के
- सेवा क्षेत्राचा वाढीचा वेग : 9.2 टक्के

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सागरी सुरक्षेत दमदार पाऊल

जगभरात सागरी सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन आता सागरी सुरक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ देशाला पुरविण्यासाठी नवीन इन्स्टिट्यूट साकारत आहे. नाशिकमधील सीएचएमई सोसायटी आणि मुंबई विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे. अठराव्या शतकात ब्रिटिश अन् पोर्तुगीजांसह डच, फ्रेंच यांसारख्या बलशाली परकीय आक्रमकांचा लीलया बीमोड करणारे मराठा आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे ही इन्सिट्यूट लवकरच कार्यरत होणार असून, त्याचे अभ्यास केंद्र नाशिकला होणार आहे.

शहरातील भोसला मिलिटरीच्या कॅम्पसमध्ये अभ्यास केंद्राच्या रूपाने या ध्येयाची मुहूर्तमेढ नुकतीच रोवली गेली. भोंसलाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात ‘सी कोस्ट’ एरियामध्ये उभा राहणार आहे. मात्र, त्याचे प्रमुख संचलन केंद्र नाशिक असणार आहे. या ‘रिसर्च इन्स्टिट्यूट’चा प्रमुख भर सागरी सुरक्षेशी निगडित विविध आयामांसोबतच संबंधित विषयांच्या संशोधनावर असणार आहे. यात प्रामुख्याने सागरी सुरक्षाविषयक धोरणे, सागरी इतिहास आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यावर असणार आहे. याशिवाय संरक्षण दलाला धोरणांनुसार अपेक्षित ती आवश्यक मदत करण्याचीही भूमिका या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सांभाळली जाणार आहे.

सागरी सुरक्षेचे मोठे आव्हान

भारताला तब्बल ७ हजार ५१७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या विशाल किनाऱ्यावर १२ मोठी, तर १८७ लहान बंदरे आहेत. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘सागरी सुरक्षा’ विषयाचे महत्त्व विशेष वाढले आहे. येथील भोंसला मिलिटरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणारे बहुतांश विद्यार्थी संरक्षण दलात निवडले जातात. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेबाबत संस्थेच्या ज्या विद्यार्थ्यांना ‌विशेष रस असेल, त्यांच्या भविष्यासाठी ही इन्स्टिट्यूट आशेचे केंद्रच ठरणार आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून २७ फेब्रुवारी २०१७ पासून मुंबईत सेंट्रल हिंदू मिलिटरी हिंदू एज्युकेशन सोसायटी व मुंबई विद्यापीठातर्फे दोन दिवसीय परिषद होणार आहे. यात सागरी सुरक्षा विषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०० तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

ब्रिटिश आणि पोर्तुगिजांसह परकीय आक्रमकांसमोर अखेरपर्यंत अजिंक्य ठरलेले मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे सीएचएमई सोसायटी ‘कान्होजी आंग्रे मेरीटाइम रिसर्च इन्स्टिट्यूट’ सुरू करणार आहे. यासंबंधित परिषद फेब्रुवारीत मुंबईत होईल. आंग्रे यांच्या वंशजांच्या भेटीनंतर या संकल्पनेला अधिक चालना मिळाली आहे. या प्रकल्पाचे एक अभ्यास केंद्र नाशिकमध्ये असेल.
- दिलीप बेलगावकर, सीएचएमई सोसायटी, नाशिक विभाग कार्यवाह

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोमदेव देववर्मनची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

दुखापतीने त्रस्त असलेला भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आज (रविवार) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
सोमदेवने आपल्या ट्विटर पेजवरून निवृत्तीबाबत घोषणा करताना सांगितले, की यावर्षाच्या सुरवातीलाच मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत टेनिससाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.

नवे वर्ष नवी सुरवात.

सोमदेव 2012 पासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळेच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सोमदेव प्रशिक्षक म्हणून पुढील कारकिर्द पूर्ण करण्याच्या विचारात आहे. पुरुष एकेरीत सोमदेवने 2008 मध्ये टेनिस क्षेत्रात पदार्पण केले होते. डेव्हिस करंडकासाठी तो भारतीय संघाचा सदस्य होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हिवरेबाजार वाचवणार ६ कोटी लिटर पाणी

नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने येत्या वर्षभरात तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाचविण्याचे ध्येय ठेवले आहे. गावात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा ताळेबंद आज सायंकाळी गावात झालेल्या ग्रामसभेत मांडला गेला. या ताळेबंदात गावातील पिके तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन मांडले गेले. या नियोजनानुसार गावात सुमारे ६ कोटी लिटर पाणी शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये दरवर्षी वर्षाखेरीच्या दिवशी ग्रामसभा घेऊन मागील वर्षभरात ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची माहिती दिली जाते व येणाऱ्या वर्षात करावयाच्या कामांचे नियोजन सादर केले जाते. या ग्रामसभेत गावातील पाण्याचा हिशेब मांडला जातो. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून गावाच्या केलेल्या सर्वांगीण विकासात पाण्याचा हा मांडला जाणारा ताळेबंद वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.

प्रत्येक थेंबाचे स्पष्टीकरण

हिवरेबाजार ग्रामपंचायतीने गावात पडणाऱ्या पावसाच्या जवळपास प्रत्येक थेंबाचे स्पष्टीकरण ताळेबंदात दिले आहे. गावाच्या शिवारात २५४ मिलीमीटर पाऊस झाल्याने २४८ कोटी १२ लाख लिटर पाणी उपलब्ध झाल्याचे यात स्पष्ट केले आहे. यातील एक थेंबही पाणी वाहून जाणार नाही, असा दावाही केला गेला आहे. ८६.८४ कोटी लिटर पाण्याची वाफ होणार आहे, जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी १२.४१ कोटी लिटर असणार आहे, जमिनीत आपोआप मुरणारे पाणी २४.८१ कोटी लिटर असेल, जमिनीत ओलाव्याच्या स्वरुपात राहणारे पाणी ७४.७३ कोटी लिटर असेल व जलसंधारण कामामुळे जमिनीत मुरणारे अधिकचे पाणी १९.६२ कोटी लिटर असल्याने असे सगळे मिळून गावासाठी प्रत्यक्ष उपलब्ध पाणी १६१.२७ कोटी लिटर असेल, असा हिवरेबाजार ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

आवश्यकताही स्पष्ट

हिवरेबाजार गावात उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी गावाला प्रत्यक्ष आवश्यक असलेल्या पाण्याचा हिशेब मांडताना गावातील ग्रामस्थ तसेच पाळीव जनावरे यांना पिण्यासाठी ४.२७ कोटी लिटर पाणी आवश्यक असून, शेतीसाठी १४७.९० कोटी लिटर पाणी गरजेचे आहे. तसेच बिगरशेती वापरासाठी ३.२३ कोटी लिटर पाणी आवश्यक असल्याने या तिन्ही गरजा मिळून गावाला १५५.३९ कोटी लिटर पाणी गरजेचे आहे. उपलब्ध १६१.२७ कोटी लिटर पाण्यापैकी केवळ १५५.३९ कोटी लिटर पाण्याची गावाला गरज भासणार असल्याने यातून ५.८८ कोटी लिटर पाणी शिल्लक राहणार असल्याचाही दावा या ताळेबंदाद्वारे केला गेला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘या’ गावातील लोकांनी १००० रुपयांची नोट कधी पाहिलीच नाही…

काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने सर्वांना रांगेत उभे केले. गेल्या ५० दिवसांपासून एटीएम आणि बँकाबाहेरील रांगाची चांगलीच चर्चा रंगली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दलच्या अनेक घटना समोर आल्या. सरकारच्या या निर्णयाचा देशातील प्रत्येक घटकाला झळ पोहचली. देशाच्या कानाकोपऱ्यात चलन कलह सुरु असताना नंदुरबार जिल्हातील एका गावाला मात्र देशात काय चाललय त्याची कल्पनाच नाही. या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही वारे पोहचलेले दिसत नाही. तसेच मोदींनी घेतलेला निर्णयाचीही माहिती नाही. नंदुरबार जिल्ह्यातील रोशामल (बुद्रुक) या गावातील धक्कादायक माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने समोर आणली आहे. या गावातील लोक आजही भारतीय राजकारणामध्ये सोनिया गांधीचे सरकार असल्याच्या भ्रमात आहेत. सोनिया गांधीं या इंदिरांटच्या सून असताना हे लोक सोनिया यांना इंदिरा गांधी यांची मुलगी म्हणून ओळखतात. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार झाल्यानंतर २००० रुपयांची नवी नोट व्यवहारात आली. मात्र या गावातील लोकांनी आतापर्यंत बंद झालेली १००० रुपयांची नोटच पाहिली नसल्याचे समोर आले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाने देशातील अनेक लोकांना त्रस्त केले. मात्र या नोटांशी कधी संबंधच आला नसल्यामुळे गावातील लोकांवर या निर्णयाचा काहीच परिणाम झालेला नाही. या गावातील लोकांना जेव्हा सरकारने पैसे काढण्यावर घातलेल्या मर्यादेवर विचारले. त्यावेळी त्यांना या निर्णयाचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसून आले. आमच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महिनाभरासाठी १५०० रुपये पुरेसे आहेत. असे तेथील लोक सांगतात.

नोटाबंदीमुळे बाजारातील परिस्थिती कोलमडली आहे. परिणामी १३ ते १५ रुपये प्रति किलोच्या धान्याला त्यांना १० रुपये मिळत असल्यामुळे त्यांनी धान्य विक्रिसाठी बाजारात आणण्याचे बंद केले आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे अदिवासी गाव प्राथमिक सुविधांपासून देखील वंचित आहे. रस्ते, पाणी, वीज या प्राथमिक गरजा देखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. या गावातील लोकांना आपले धान्य बाजारात नेण्यासाठी एखादी दोनचाकी वाहन किंवा जीप अवलंबून राहावे लागते. ही वाहने देखील कित्येक दिवसानंतर या ठिकाणी येतात. गावाच्या जवळपास पेट्रोल पंप देखील नाही. परिणामी या भागातील दुकानदार बाटलीमध्ये खुलेआम तेलाची विक्री करतानाचे चित्रही पाहायला मिळते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'एनएसजी'ची वेबसाइट हॅक, मोदींसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर

भारताची दहशतवादविरोधी सेनेची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां (एनएसजी)संदर्भात असलेली अधिकृत वेबसाइट काही अज्ञातांनी हॅक केली आहे. रविवारी ही वेबसाइट हॅक करण्यात आली असून, हॅकर्सने Alone Injector अशी स्वतःची ओळख सांगितली आहे. हॅकर्सनं या वेबसाइटवर मोदींसंदर्भात काही आक्षेपार्ह मजकूरही टाकला आहे. वेबसाइटच्या होमपेजवर नागरिकांना पोलीस मारहाण करत असल्याचे फोटोही अपलोड करण्यात आले आहेत. तसेच काश्मीरला स्वतंत्र करा, असा मजकूरही टाकण्यात आला आहे.

वेबसाइट पाकिस्तानस्थित हॅकर्सनी हॅक केल्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागानं व्यक्त केली आहे. वेबसाइटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ मजकूरही अपलोड करण्यात आला आहे. तत्पूर्वी लिजियन ग्रुपकडून अशाच प्रकारे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. त्यावेळीही राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अश्लील मजकूर टाकण्यात आला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘गोल्डन ग्लोब २०१७’ चे सुत्रसंचालन करणार प्रियांका चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’ समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे. अमेरिकी टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि हॉलिवूड सिनेमा ‘बेवॉच’ यामध्ये काम केल्यानंतर आता प्रियांका लवकरच ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’ समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे. अॅना केंड्रिक आणि स्टीव कैरल यांच्यासोबत प्रियांका या समारंभाचे सुत्रसंचालन करणार आहे.

प्रियांकाच्या नावाची घोषणा ‘गोल्डन ग्लोब’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ७४ व्या ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’च्या सुत्रसंचालनासाठी टिमोथी ओलीफैंट, जस्टिन थेरॉक्स आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.

नावाजलेल्या पुरस्कारांमध्ये ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराचे नाव प्रामुख्याने घेण्यात येते. येत्या ८ जानेवारीला हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. प्रियांका चोप्रासोबत या पुरस्कार सोहळ्यात ड्रयू बैरीमोर, मेट डेमन, वियोला डेविस, लॉरा डेर्न, गोल्डी हॉन, निकोल किडमॅन, सिएना मिलर, क्रिस पाइन यांसारखे नावाजलेले कलाकारही सहभागी होणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कर्मचाऱ्यांना घरी फोन बंद ठेवण्याची मुभा

फ्रान्समध्ये नव्या कायद्याने खासगी व कार्यालयीन जीवन वेगळे करण्याचा प्रयत्न

स्मार्टफोनवर इंटरनेट वापरता येत असल्याने आता घरी असतानाही लोकांना कार्यालयाचे ईमेल बघावे लागतात, त्यामुळे घर व कार्यालय यात काही फरकच राहात नाही, त्यामुळे फ्रान्समधील कंपन्यांना आता तेथील कामगारांना उद्यापासून (१ जानेवारी) इंटरनेटपासून दूर राहू देण्याच्या हमीचा अधिकार द्यावा लागणार आहे.

फ्रान्समध्येच नव्हे तर इतर देशांतही कर्मचाऱ्यांना घरीही कंपनीचे ईमेल बघून त्यांना उत्तरे देत बसावी लागतात किंवा त्यावर कृती करावी लागते. १ जानेवारीपासून नवीन रोजगार कायदा कंपन्यांना लागू होत असून, त्यानुसार पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्या किंवा संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना स्मार्टफोनवर कंपनीचे ईमेल आले असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार राहील.

डिजिटल साधनांचा अतिवापर हा डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे लोकांना झोप मिळत नाही. नातेसंबंध बिघडतात तसेच अनेक कर्मचारी जेव्हा फोन बंद ठेवतात तेव्हा त्यांना अनिश्चितता वाटत राहते. सतत कामावर या पद्धतीची जी संस्कृती आहे त्याला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये हा नवा कायदा आणला जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पीडित महिला-मुलींसाठी पोलिसांचा 'भरोसा सेल'

हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी भरोसा सेलमधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही भरोसा सेलची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

हैदराबादच्या धर्तीवर शहर पोलिसांनी राज्यातील पहिलेवहिले भरोसा सेल नागपुरातील सुभाषनगर टी पाइंटजवळ सुरू केले. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनमध्ये हस्तीदंत व्यवसायावर बंदी

हत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंत्तच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली. सन २०१७ अखेरपर्यंत हस्तीदंत्ताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे. नामशेष होणाºया प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये आॅक्टोबर २०१६ आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला. जगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा ७० टक्के सहभाग आहे हे विशेष. यापूर्वी केनिया देशाने एप्रिल २०१६ मध्ये १०५ टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील सर्व वर्ग मार्चपर्यंत ‘डिजिटल’

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान’ आता अधिक जलद; शिक्षकांचा स्मार्टफोन अद्ययावत होणार

शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट फ सल्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ऐवजी आता ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला असून राज्यातील शिक्षकांचे स्मार्टफोन अद्ययावत ‘अॅप’ने परिपूर्ण केले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व वर्ग मार्चपर्यंत डिजिटल करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
प्रगत शैक्षणिक आराखडय़ाचे कामकाज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्यावर त्यांनी निराशा दाखविल्याचे शिक्षण खात्याने नमूद केले. आता अपेक्षेनुसार साध्य गाठण्यासाठी या अभियानात वेगळे पैलू येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यातील केवळ १५ हजार प्राथमिक शाळा व ४ हजार उच्च प्राथमिक शाळा प्रगत झाल्याचे निदर्शनास आणले. उद्दिष्ट ५० टक्के शाळा म्हणजे, ३३ हजार शाळा प्रगत करण्याचे होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेस प्रतिसाद म्हणून आता हे अभियान ‘जलद’ झाले आहे.

आता पुढील एक महिन्यात संबंधित शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातील शाळा तपासण्याचे फ र्मान आहे. राज्यातील २५ हजार शाळा डिजिटल झाल्या असून यावरील खर्च कमी झाल्याने यापुढे शाळांऐवजी वर्गखोल्या ‘डिजिटल’ करण्याचे ठरले आहे. हा कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वी करण्याची अपेक्षा आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती टॅबलेट व वर्गखोलीत ‘इंटरअॅक्टिव्ह’ फळा असेल. फळा नसेल तर शिक्षकाने स्वत:च्या मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. प्रत्येक वर्गखोलीसाठी २० हजार रुपयांचे साहित्य आणून राज्यातील सर्व वर्ग मार्चपर्यंत डिजिटल करण्याचे ध्येय शासनाने शिक्षकांपुढे ठेवले आहे.
प्रत्येक शिक्षकाचा मोबाइल अशा ‘अॅप’ने परिपूर्ण करण्याचे ठरले. ‘व्हॉटसअॅप’चा अधिकाधिक उपयोग करण्याचे निर्देश पूर्वी देण्यात आले होते, परंतु त्याची मर्यादा व सक्रिय सहभागातील त्रुटी लक्षात आल्यावर शिक्षण क्षेत्रातील ‘एक स्टेप’ या संस्थेसोबत चर्चा केली.

आता त्याअंतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांचा एकच गट स्थापन होणार आहे. आगामी ३० दिवसांत सर्व शाळांनी विकासाचा आलेख तपासण्यासाठी ‘शाळा सिद्धी’ हा स्वमूल्यमापनाचा अर्ज भरून द्यावा लागेल. ज्या शाळा ‘अ’ गटात असतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करून प्रमाणित केले जाणार आहे. येत्या दोन ते चार महिन्यांत हा ‘प्रगत’ होण्याचा कार्यक्रम अमलात येण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची हजेरी संगणकाद्वारे

शाळाबाह्य़ मुलांची बाबही या परिपत्रकात गंभीरतेने मांडण्यात आली. त्यांना शाळेत आणण्याचा कार्यक्रम आहे. प्रगत शाळेद्वारेच अशी मुले आकृष्ट होत असल्याचे औरंगाबाद व नंदूरबार जिल्ह्य़ांतील उदाहरणे आहेत. राज्यात आठवीपर्यंत एकूण ४ लाख २० हजार मुले शाळाबाह्य़ असून त्यांना शाळेत आणून अशा प्रत्येक मुलाची नोंद सरल प्रक्रियेत करावी लागेल. विद्यार्थ्यांची हजेरी-गैरहजेरी संगणकाद्वारे तपासणार असल्याने आता या प्रक्रियेत थेट शासनाची निगराणी असेल. विद्यार्थी कुठल्या विषयात मागे पडतो व त्यासाठी शिक्षकांनी काय करावे, याचे तंत्र एका अॅपद्वारे विकसित होत असून अमरावतीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ते तयार केले आहे.

फक्त ४७ हजार शिक्षक ‘टेक सॅव्ही’

राज्यातील ७ लाख २५ हजार शिक्षकांपैकी ४७ हजार १४२ शिक्षकांनी स्वत:ला ‘टेक सॅव्ही’ घोषित केल्याची आकडेवारी शिक्षण विभागाने दिली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील संकल्पना मोबाइलवर ‘अपलोड’ करण्याचे नियोजन असून त्यासाठी विद्या प्राधिकरणद्वारे अॅप विकसित केले जात आहे. या पद्धतीतून मुले झपाटय़ाने शिकणार व हाच जलद प्रगतीचा मार्ग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षकांसोबत पर्यवेक्षक पातळीवरही नवा बदल अमलात येण्यासाठी योग्य काम होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत केंद्रप्रमुख, विषयसाधन व्यक्ती, गटशिक्षणाधिकाऱ्यांना नेतृत्व प्रशिक्षण घ्यावे लागेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निर्मल सागरतट अभियानासाठी ७३ गावांची निवड

राज्यातील चार जिल्ह्य़ात अभियान राबविले जाणार

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून राज्यातील चार जिल्ह्य़ात निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येणार आहे. यात पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्य़ांचा समावेश आहे. समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता व्हावी. आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून किनारपट्टीवरील गावांचा विकास व्हावा हा या अभियाना मागचा मुळ उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्य़ातील ७३ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. अभियानाअंतर्गत या गावांमध्ये सागरतट व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून सागरी किनाऱ्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन केले जाणार आहे.

योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना किनारा व्यवस्थापन आणि पायाभुत सुविधांच्या विकासाठी २० लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तीन टप्प्यात हा निधी उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात ४० टक्के म्हणजेच ८ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

यात किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी उपाय योजना करणे, कचरा कुंडय़ा बसवणे, बायोगॅस, सौर दिवे, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी वाहनतळ, निवारा शेड, रेस्टींग खुच्र्या, एटीएम व्यवस्था, वायफाय सुविधा, स्वच्छतागृह, स्थानगृह यासारख्या सुविधा विकसित कराव्या
लागणार आहेत. याशिवाय जीवरक्षकांची नेमणुक करणे, मदत व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असणार आहे.

यामुळे गावातील पर्यटनाला चालना मिळेल, पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि गावात रोजगार निर्मिती होईल. असा विश्वास मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर विकास अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी व्यक्त केला. गावाच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढावा हा देखील या योजनेमागचा मुळ उद्देश असणार आहे. मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या अभियानाअंतर्गत केलेल्या कामांचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील निधीचा योग्य विनियोग केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वर्षांच्या शेवटी अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना तीन विभागात पारितोषिके दिली जाणार आहेत. यात उत्कृष्ट सागरतट व्यवस्थापन, निर्मल सागरतट व्यवस्थापन, आणि रोजगार निर्मिती आणि सुजल व्यवस्थापनासाठी ५ लाखांपासून ५० लाखांपर्यंतची पारितोषिके दिली जाणार आहेत.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीना पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक, एडीबी उपसंचालक रायसिंघानी, मरीन इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रायगड जिल्ह्य़ातील
११ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. यात काशिद, नागाव, दिवेआगर, रेवदंडा, आक्षी, हरीहरेश्वर, मिळकतखार, किहीम, आवास आणि उरण तालुक्यातील पिरवाडी नागाव या ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. यावेळी काशिद नागाव ग्रामपंचायतीना ८ लाख, दिवेआगर ग्रामपंचायतीला ६ लाख तर उर्वरीत ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दुष्काळी जतमध्ये स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन

सांगलीत जिल्ह्य़ातील जत तालुका म्हटले, की एरवी केवळ दुष्काळच डोळय़ांपुढे येतो. पण याच तालुक्यात गेल्यावर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले आणि या पाण्याने तालुक्यातील तिपेहळ्ळी व बिरनाळ हे तलाव भरले. पाण्याचे हे सुख जतची जनता अनुभवत असतानाच आता या तलावावर हजारो किलोमीटर दूरवरून स्थलांतर करून येणारे रोहित (फ्लेमिंगो), चक्रवाक सारखे पक्ष्यांचेही आगमन झाल्याने या रुक्ष प्रदेशात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

जत तालुक्याचा आजही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या भागात फिरू लागले, की दुष्काळ आणि कोरडे पडलेल्या जलव्यवस्था सर्वत्र दिसतात. मात्र, गेल्या वर्षी या दुष्काळी तालुक्यातील काही भागात म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले. या पाण्याने जतपासून काही अंतरावर असलेला तिपेहळ्ळी व बिरनाळ तलाव भरण्यात आले. तलावामध्ये बारमाही पाणी यंदा प्रथमच उपलब्ध झाल्याने त्याचे सुख यंदा तालुक्यातील जनता अनुभवत असतानाच आता या जलाशयावर स्थलांतरित पक्ष्यांनी गर्दी केली आहे. यंदाच्या हिवाळ्यात आगमन केलेले हे परदेशी पाहुणे सध्या सर्वत्र आकर्षणाचा विषय ठरला आहे. यामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले लाल चोचीचे फ्लेिमगो म्हणजेच रोहित, चक्रवाक, स्पूनबिल, िपक पेन्टेड स्टॉर्क म्हणजेच चित्राबलाक असे स्थलांतरित पक्षी लक्षवेधी ठरत आहेत.

दरवर्षी सातारा जिल्ह्यातील मायणी तलावावर येणारे फ्लेिमगो यंदा जतला आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षकांना ही एक पर्वणीच लाभली असल्याचे पक्षी निरीक्षक प्रा. संगीता देशमुख यांनी सांगितले.

पोषक थंड हवामान, खाद्य म्हणून आवश्यक असलेले कीटक, लहान मासे, शेवाळ याची सहज उपलब्धता झाल्याने या पक्ष्यांनी या जलाशयास पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेस्ट सिटी होणार हगणदारीमुक्त शहर

बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता लवकरच हगणदरीमुक्त शहर अशीही होणार आहे. येत्या मार्चपर्यंत ११ हजार ६८४ कुटुंबांसाठी स्वच्छतागृह उभारून उद्योगनगरी हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प आहे. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम राबविली जात आहे.

वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह उभारण्यासाठी योजना असून, पात्र लाभार्थींना केंद्र शासनाकडून चार, राज्य शासनाकडून ८ व पालिकेकडून चार असे एकूण १६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत झोपडपट्ट्यांची संख्या ३७ घोषित आणि ३४ अघोषित अशी एकूण ७१ आहे; तर झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे तीन लाख लोक वास्तव्यास आहेत. अशा झोपड्यांतील नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतही अनेक झोपड्यांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आहे.

 झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती चांगली नसल्याने किंवा स्थापत्य आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीने संबंधित स्वच्छतागृहे वापराअभावी ती पडून असल्याने झोपडपट्ट्यांबाहेरील रस्त्यावरच नागरिक प्रातर्विधीसाठी बसतात. त्यामुळे शहरातील सर्र्वेक्षण महापालिकेने केले होते. त्यात एकूण ११ हजार ६४८ कुटुंबे वैयक्तिक स्वच्छतागृहे नसल्याचे आढळून आले. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ प्रभागांपैकी १९ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत.

उर्वरित प्रभाग मार्चपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार चौकाचौकांत फ्लेक्स उभारणे, जनजागृती मोहीम राबविणे, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई आणि फ अशा सहा प्रभागांत एकूण ६८८५ अर्जांपैकी ४५६९ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यांपैकी ४९९ अर्ज नामंजूर करण्यात आले, तर ४३८२ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यांपैकी ३५२४ जणांचे स्वच्छतागृहांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली. त्यांपैकी ४०९७ जणांना पहिला आणि २३५४ जणांना अनुदानाचा दुसरा हप्ता जमा केला आहे. सर्वाधिक अर्ज ब आणि क प्रभागातून आले होते. त्यांना अनुदान देऊन वैयक्तिक स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे.

स्वच्छतेसाठी सुमारे आठ कोटी निधी
स्वच्छ भारत अभियानाचा कक्षही महापालिकेत स्थापन केला आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी २ कोटी ४४ लाख, राज्य शासनाकडून चार कोटी ८९ लाख, सामुदायिक स्वच्छतागृहासाठी ३४ लाख ६७ हजार, राज्य शासनाकडून ११ लाख, क्षमता बांधणीसाठी दीड लाख केंद्राकडून आणि पन्नास हजार राज्य शासनाकडून मंजूर झाले आहेत. स्वच्छसाठी केंद्र शासनाकडून एकूण तीन कोटी, राज्य शासनाकडून पाच कोटी असा एकूण सात कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून अनिल बैजल शपथबद्ध

दिल्लीचे 21 वे उपराज्यपाल म्हणून माजी केंद्रीय सचिव अनिल बैजल यांनी शपथ घेतली. राज्यनिवासामध्ये झालेल्या या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती.
1969 बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱया बैजल यांनी माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्या राजीनाम्यानंतर हा पदभार स्वीकारला आहे. जंग यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला होता. बैजल हे वाजपेयी सरकारमध्ये गृहसचिव होते. 2006मध्ये ते शहर विकास सचिव पदावरून निवृत्त झाले होते. याशिवाय डीडीएमध्ये उपाध्यक्ष, एअर इंडियासाठी सीएमडी आणि प्रसारभारतीचे सीईओ पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. बैजल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे जवळचे सहकारी असल्याचीही मान्यता आहे. त्यामुळेच दिल्ली उपराज्यपाल पदासाठी त्यांची निवड झाल्याचे मानले जात आहे.

 याशिवाय थिंक टँक म्हणून कार्यरत असणाऱया विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशनचे कार्यकारिणी सदस्यही आहेत. या संस्थेची स्थापना अजित डोभाल यांनी केली आहे. तब्बल 37 वर्षांचा प्रशासकीय अनुभव बैजल यांना आहे. मात्र केजरीवाल यांच्यासारख्या अजब व्यक्तीमत्त्वाबरोबर ते कशाप्रकारे जुळवून घेतात यावरच त्यांच्या दुसऱया टप्प्यातील कारकिर्दीची यशस्वीता ठरणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नान्नज गाव डिजिटलच्या दिशेने

सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण आहे़. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गावातील व्यवहार डिजिटल, आॅनलाइन पेमेंट व कॅशलेस व्यवहारासाठी आता पुढे येऊ लागले आहे़ गावात अनेक लहान-मोठी दुकाने आहेत़ या दुकानात आता स्वॅप, पेटीएमचा वापर वाढत आहे़ शिवाय चेकद्वारे देवाण-घेवाणीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत.नान्नज हे द्राक्षपिकांसाठी प्रसिद्ध आहे़ त्यामुळे द्राक्ष बागायतदारही आपला व्यवहार करीत असताना आॅनलाइन पेमेंट व चेकचा वापर करीत आहे़ त्यामुळे नान्नज हे डिजिटलच्या दिशेने जात आहे़.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील कृषी विद्यापीठांना मिळणार स्वतंत्र हवामान संशोधन केंद्रे

हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा हवामानविषयक अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता राज्यातील कृषी विद्यापीठांनी स्वतंत्र हवामान अभ्यास संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. या प्रस्तावाला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अनुकूलता दर्शविली आहे. ही केंद्रे निर्माण झाल्यास शेतकर्यांना हवामानाचा अचूक सल्ला देणे सोयीचे होणार आहे.

आपल्या राज्याचा हवामानविषयक अभ्यास आपल्याकडे असावा याकरिता सर्वप्रथम केरळने ह्यहवामान बदल शिक्षण आणि संशोधन अकादमीह्णची स्थापना केली आहे. त्यानंतर पंजाब कृषी विद्यापीठाने स्कूल ऑफ क्लायमेंट चेंज अँन्ड अँग्रो मेटेरॉलॉजीची स्थापना करीत या बदलाचा अभ्यास करण्यासाठी आघाडी घेतलेली आहे. वास्तविक बघता या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्य शासनाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविलेला आहे; परंतु अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव तेथे धूळ खात पडला आहे.

राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले तर राज्यातील एकाही कृषी विद्यापीठामध्ये कृषी हवामान या विषयावर पीएच.डी. अभ्यासक्रमच नाही. तेथेही या विषयात पीएच.डी. करण्यासाठी कमी जागा आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या विषयात पीएच.डी. करण्यावर र्मयादा आली आहे.

राज्यातील शेतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसात जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस अलीकडे होतानाची नोंद आहे. तापमानातही बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत असल्याने कृषी शास्त्रज्ञांना पीक, शेतीचे नियोजन करताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे; पण आता कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं नी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आले असून, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येत्या वर्षात स्वतंत्र हवामान केंद्र निकाली काढण्याचे आश्वासन अकोल्यात कृषी विद्यापाठाच्या कुलगुरूंना दिले आहे.

 यामुळे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकटराव एम. मायंदे यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेस्वरलू यांनीही याबाबत शासनाकडे मागणी केलेली होती.

राज्यात कृषी हवामानावर पीएच.डी. नाही !

महाराष्ट्र प्रगत राज्य असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अल्प जागा सोडल्या तर एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन, अभ्यास केंद्र नाही. त्यामुळे या विषयावर या राज्यात पीएच.डी. करता येत नाही. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करायचे असेल तर कृषी विद्यापीठांतर्गत ही केंद्रे सुरू करण्याची गरज असल्याने डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी प्रस्ताव पाठविला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-सिंगापूर कर कराराची पुनर्रचना

विदेशी साठविल्या जाणाऱया काळय़ा पैशाचा प्रभावीपणे शोध घेता यावा, तसेच देशाबाहेर बेहिशेबी पैसा नेणे अशक्य व्हावे, यासाठी भारत आणि सिंगापूर यांनी त्यांच्यातील कर कराराची पुनर्रचना केली आहे. दोन्ही देशांमध्ये दुहेरी कर टाळण्यासाठी करार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा दुरूपयोग करून विदेशी पैसा नेण्याचे प्रकार घडल्याने करारात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता अशा पैशाची त्वरित सूचना दिली जाणार आहे. गेल्यावर्षी भारताने मॉरिशसशी असणाऱया करारातही अशी सुधारणा केली होती. आगामी काळात स्विट्झर्लंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, हॉलंड इत्यादी देशांशीही असे सुधारित करार केले जाणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात पहिले सौर शीतगृह होणार अकोल्यात!

भाजीपाला बियाणे साठवणुकीसाठी राज्यातील पहिले आद्र्रता विरहित सौर शीतगृह (कोल्ड स्टोरेज) अकोल्यात होणार आहे. ३६0 कोटी रुपये खचरून बांधण्यात येणार्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) या शीतगृहाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५0 टक्के अनुदान उपलब्ध होईल.

अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत १0 हजार स्केअर फूट जागेवर हे शीत गोदाम होणार आहे. अनेक वेळा भाजीपाला बियाण्यांची मागणी घटल्यास बियाणे साठवून ठेवण्यात येते. महाबीजकडे एक शीतगृह आहे; परंतु त्या शीतगृहाची साठवण क्षमता र्मयादित असल्याने महाबीजने नवीन गोदामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याने महाबीजने सौर शीतगृहाच्या कामास सुरुवात केली आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी केले.

भाजीपाला बियाणे सुरक्षित राहण्यासाठी आद्र्रता विरहित, पूरक तापमान या गोदामात असेल. खासगी कंपन्याचे भाजीपाला बियाणे महागडे असून, शेतकर्यांना परवडत नसल्याने महाबीजच्या भागधारक शेतकर्यांनी महाबीजने भाजीपाला बियाणे निर्माण करावे यासाठीची मागणी सातत्याने केली आहे. म्हणूनच महाबीजने भाजीपाला बियाणे उत्पादनात पाऊल टाकण्याचा निश्चय केला आहे. त्या दृष्टीने शीतगृह उभारणी आणि तेही सौर ऊर्जा शीतगृह बांधणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मो फराह, अँडी मरेचा सन्मान

ऍथलिट मो फराह व टेनिसपटू अँडी मरे यांना नव्या वर्षातील पुरस्कारांच्या यादीत नाईटहूड किताबाने गौरवले जाणार असल्याची घोषणा शनिवारी केली गेली.

 राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी फराह व मरे यांच्या नावाची रीतसर घोषणा केली. 29 वर्षीय मरेने यंदा दुसरे विम्बल्डन व पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला तर मो फराहने यंदा रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 5 हजार व 10 हजार मीटर्सचे जेतेपद कायम राखले. फराह 4 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला ब्रिटीश ट्रक अँड फिल्ड ऍथलिट आहे. मरेला यापूर्वी 2012 मध्ये ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ हा पुरस्कार प्रदान केला गेला. ब्रिटिश साम्राज्यात मेंबर, ऑफिसर व कमांडर अशा चढत्या क्रमाने पदवी देण्याची प्रथा रुढ आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महानगर गॅसने आणली सीएनजीवर चालणारी स्कूटर

सीएनजी इंधनावर चालणाऱ्या स्कूटरचे अनावरण रविवारी मुंबईत करण्यात आले. महानगर गॅस लिमिटेडने ही स्कूटर बाजारात दाखल केली असून त्याचे अनावरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

सीएनजी इंधनावर चालत असल्यामुळे या स्कूटरचा इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर ६० पैसे येईल, असा दावा महानगर गॅसने केला. याच कार्यक्रमात प्रधान यांनी सीएनजी इंधनाचा भरणा करण्यासाठी वापरता येतील अशा ई-वॉलेट पेमेंट सुविधेचेही अनावरण केले.

सीएनजी इंधनाचा वापर दुचाकीसाठी होऊ लागल्यास त्याचा फायदा मुंबई महानगरातील सुमारे ३६ लाख दुचाकीधारकांना होईल, असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. दुचाकींच्या सीएनजी यंत्रणेमध्ये १.२ किलोचे दोन सीएनजी सिलिंडर बसवण्यात येणार असून एक किलो सीएनजीमध्ये १२० ते १३० किलोमीटर जाणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक राजीव माथुर, गेल इंडियाचे अध्यक्ष बी. सी. त्रिपाठी आदी उपस्थित होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तंटामुक्त गाव योजनेचे स्वरूप बदलणार

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता नव्या स्वरूपात राबविण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. यासाठी पूर्वीच्या योजनेतील उणिवा लक्षात घेऊन नव्याने योजना राबविताना काय बदल करावे लागतील. या व इतर बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सरकारने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनीवर (यशदा) टाकली आहे.

यासंदर्भात यशदाच्या पथकाने नुकतीच तंटामुक्त पुरस्कारप्राप्त म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावाला भेट देऊन योजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी पोलिस पाटील तुषार झेंडे, सरपंच स्वाती थोरवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चांदगुडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंखे, लक्ष्मण चांदगुडे, नारायण थोरवे, शेखर मोहिते उपस्थित होते. म्हसोबावाडी गावाने ही योजना यशस्वीरीत्या राबविली आहे. म्हणूनच गतवर्षीदेखील केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पथकाने गावाला भेट दिली होती. केंद्र सरकारने तंटामुक्त मोहिमेवरील आधारित २० भाषांतील लघुपट तयार करण्यासाठी या गावाच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसेच गतवर्षी गावचे पोलिस पाटील तुषार झेंडे यांना केंद्र सरकारने भोपाळ येथे आयोजित केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या कार्यशाळेत या योजनेची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते. यात झेंडे यांनी या योजनेचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने म्हसोबावाडी गावाला व झेंडे यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने प्रथम क्रमांक देत प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले होते.

महाराष्ट्रात ही योजना यशस्वीपणे राबविल्यानंतर देशभर ही योजना पोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच राज्य सरकार ही योजना नव्याने राबविण्यासाठी विचार करीत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अपघात टाळण्यासाठी रेल्वेवर इन्फ्रारेड कॅमेरे

मुंबईतील लोकल मार्गावर काही महिन्यांपासून रुळांवरून लोकल घसरण्यासह देशभरात काही गंभीर अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर सुरक्षेसंदर्भात नवीन वर्षात इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच देशपातळीवर अल्ट्रासोनिक यंत्रणा आणि जपान-कोरियामधील अद्ययावत तंत्रज्ञानासारखे विविध उपाय अवलंबण्यात येणार आहेत. त्यामुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, असा दावा केला जात आहे.

विठ्ठलवाडी येथे नुकतीच लोकल रुळांवर घसरल्याने ११ तास सेवा विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेस इन्फ्रारेड सिग्नल बसविण्याविषयी सूचना केल्या आहेत. त्यात सिग्नल वा रुळांजवळ इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्यावर भर दिला आहे. रुळांमधील बिघाडाची किंवा लोकलच्या चाकांचे तापमान वाढल्याची नोंद या कॅमेऱ्यांमुळे टिपली जाणार आहे. अशाप्रकारची माहिती तातडीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला उपलब्ध होणार आहे. हिवाळ्यात धुक्यामुळे अनेकदा सिग्नल दिसण्यासह रुळांची नेमकी स्थिती समजणे अवघड होते. पावसाळ्यातही अनेकदा कठीण स्थिती निर्माण झालेली असते. अशावेळी या कॅमेऱ्यांची मोलाची मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतात 'भीम' ऍप बनले 'नंबर वन!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेले 'भीम' ऍप हे काही तासांतच भारतात 'नंबर वन'चे ऍप बनले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ऍपचे मोदींच्या हस्ते 30 डिसेंबर शुभारंभ झाला आहे. (‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या ऍपचे खरे नाव.) काही वेळातच ते नागरिकांच्या पसंतीचे ऍप ठरले असून, क्रमांक एकवर पोहचले आहे. अंगठ्याच्या सहाय्याने पेमेंट करता येण्याच्या या ऍपला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर इतक्या कमी वेळात सर्वाधिक डाउनलोड होणारे हे पहिले भारतीय ऍप ठरले आहे. या ऍपला 86000 हून अधिक रिव्ह्यू मिळाले असून, या ऍपची रेटिंग ही 4.1 एवढी आहे. सध्या हे ऍप केवळ अॅंड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे ऍपलवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, देशातील संपूर्ण व्यवहार या ऍपवरून होण्याचा दावा मोदींनी केल्याने पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज, एसबीआयबीडी यासारख्या खासगी ‘ई-वॉलेट’ना या ऍपमुळे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

आण्विक क्षमता असलेल्या अग्नी-4 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने आज (सोमवार) यशस्वी चाचणी घेतली. या आधुनिक क्षेपणास्त्रामुळे भारताचे लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील दामरा गावाच्या जवळ असलेल्या अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने एका रोड-मोबाईल प्रक्षेपकावरून अग्नी-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अग्नी-4 हे लांब पल्ल्याचे आंतरखंडीय स्वानातीत क्षेपणास्त्र असून, चार हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यामध्ये आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून अण्वस्त्रांचा वापर करता येऊ शकतो. सुमारे एक टन स्फोटके वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे.

मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र असून, सध्या ते चाचणीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत अग्नी-1, 2, 3 ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत. मागील महिन्यात अग्नी-5 क्षेपणास्त्राचे शेवटच्या टप्प्यातील कॅनिस्टर चाचणीदरम्यान यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹धर्म, जातीच्या आधारे मते मागता येणार नाहीत- सर्वोच्च न्यायालय

धर्म, जाती, जमाती आणि भाषा यांच्या आधारावर राजकीय पक्ष मते मागू शकत नाहीत. निवडणूकसंबंधी कायद्यांनुसार हा भ्रष्टाचार ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) स्पष्ट केले.

सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर म्हणाले, "धर्मनिरपेक्ष देशामध्ये मतदारांना करण्यात येणारे कोणतेही आवाहन हे धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाशी सुसंगत असले पाहिजे. मते मिळविण्याच्या उद्देशाने एखाद्या धर्माचे काम पुढे नेणाऱ्या राजकीय चळवळीला मान्यता देता येणार नाही."

या वर्षामध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 'जनतेच्या कायद्याचे प्रतिनिधित्व' (Representation of People's Act) याअंतर्गत कलम 123 (3) नुसार 4 विरुद्ध 3 अशा बहुमताने हा आदेश दिला. त्यानुसार देशातील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना या आदेशातील मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करावे लागणार आहे.

सरन्यायाधीश ठाकूर, न्या. एम.बी. लोकूर, एन.एल. राव हे या आदेशाच्या बाजूने होते. तर न्या. यू.यू. ललित, ए.के. गोयल आणि डी.वाय. चंद्रचूड या तिघांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा होता. चार विरुद्ध तीन बहुमताने हा निर्णय देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डेंग्यू-मलेरियाने दगावल्यास विमा लागू

डेंग्यू आणि मलेरियामुळे होणारा मृत्यू आता अपघाती मृत्यू समजला जाणार आहे. त्यामुळे आता डेंग्यू किंवा मलेरियामुळे प्राण गमवावे लागल्यास विमा कंपन्यांना आपल्या अॅक्सिडेंट पॉलिसीअंतर्गत मृतांच्या वारसांना विमा द्यावा लागू शकतो. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

डेंग्यू किंवा मलेरियाने रुग्णाचा मृत्यू ओढवल्यास त्याला विम्याचा क्लेम लागू होत नाही. हा क्लेम लागू व्हावा म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)चे अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांनी सर्वात प्रथम प्रयत्न सुरू केला होता. ट्रेन अपघात, भूकंप आणि पुरामुळे होणाऱ्या मृत्यूंना विमा लागू होतो. या नैसर्गिक आपत्तींना आपत्ती मानल्या गेले आहे. त्याच प्रमाणे मच्छर चावून होणाऱ्या मृत्यूंनाही आपत्ती मानण्यात आले आहे.

 नॅशनल कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशननेही मच्छर चावून कुणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना अपघात विम्या अंतर्गत भरपाई देण्याच्या सुचना विमा कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे आता मलेरिया किंवा डेंग्यूने मृत्यू ओढवल्यास विमा लागू होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हॉटेलात सेवा शुल्क भरणे ग्राहकांच्या मर्जीवर

आता कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला तर पाहिजे तेवढ्या खाद्यपदार्थांची ऑर्डर द्या, भरपेट खा आणि या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची सेवा आवडली तरच सेवा शुल्क भरा. अन्यथा भरू नका. तसे हॉटेलमालकाला स्पष्ट सांगा. कारण नव्या वर्षा निमित्त केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क भरणं बंधनकारक राहणार नाही. सेवा शुल्क भरणं ऐच्छिक करण्यात आलं असून हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या सेवेवर आणि दर्जावरच ग्राहकांना सेवा शुल्क भरायचं कि नाही हे ठरवता येणार आहे. तसा निर्णयच आज केंद्र सरकारनं जाहीर केला आहे.

हॉटेल आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून बिलांमध्ये ५ ते २० टक्के रक्कम वसूल केली जायची. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अशी रक्कम वसूल करणे गैर होते. त्याबाबत तक्रारही करता येऊ शकत होती. पण त्याची माहिती सर्वसामान्य ग्राहकांना माहित नसल्यानं त्यावर केंद्र सरकारने भारतीय हॉटेल संघाला स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर हॉटेल संघानं सेवा कर देणं ऐच्छिक करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार हॉटेलच्या बिलावर सेवाशुल्क देणं ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या बिलावर सेवाशुल्क भरायचे किंवा नाही, हे ग्राहकांनी ठरवायचं आहे. केंद्रीय ग्राहक कामकाज खात्याने यासंबंधी राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सेवाशुल्क ऐच्छिक आहे, याबाबतची माहिती देणे अपेक्षित आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अनुराग ठाकूर यांची हकालपट्टी

क्रिकेटच्या 'शुद्धीकरणा'साठी न्या. लोढा समितीनं सुचवलेल्या शिफारशी लागू करण्याबाबत सातत्याने टोलवाटोलवी करणाऱ्या बीसीसीआयला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अनुराग ठाकूर यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून आणि अजय शिर्के यांची सचिवपदावरून हकालपट्टी करत असल्याचा आदेश देऊन न्यायमूर्तींनी क्रिकेटवर्तुळात आणि राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगच्या धक्कादायक प्रकारानंतर, भारतीय क्रिकेटच्या साफसफाईची मोहीम हाती घेऊन सुप्रीम कोर्टानं लोढा समितीची स्थापना केली होती. या समितीनं सर्वांगीण अभ्यास करून आपल्या शिफारशी सादर केल्या होत्या. मंत्री व सरकारी सेवेत असलेल्यांना बीसीसीआयमध्ये काम करण्यास बंदी, सत्तरी ओलांडलेले पदाधिकारी नकोत, बीसीसीआयमध्ये लेखापालाची नियुक्ती करावी, 'एक राज्य, एक मत', अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा त्यात समावेश होता. या सर्व शिफारशींची बीसीसीआयने अंमलबजावणी करावी, असे आदेश १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, गेले पाच महिने वेगवेगळी कारणं पुढे करत 'ठाकूर अँड कंपनी' या शिफारशी लागूच करत नव्हती. उलट, १८ जुलैला दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. परंतु, मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका १३ डिसेंबरला फेटाळली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी अनुराग ठाकूर यांना चांगलंच फटाकरलं होतं. खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर तुरुंगात पाठविण्याची कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशाराच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोही अनुराग ठाकूर यांनी गांभीर्यानं न घेतल्यानं कोर्टाने आज त्यांना दट्ट्या दिला.

'बीसीसीआय'वर केलेल्या कारवाईमागील 6 प्रमुख कारणे -

1) लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी 'बीसीसीआय'ला 3 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, या शिफारसी अद्याप लागू केलेल्या नाहीत.

2) निरीक्षकांचे पॅनेल नेमण्यासाठी नावे सुचवावीत, असे 'बीसीसीआय'लाच सांगितले होते. अखेर आज न्यायालयानेच प्रशासक नेमण्यासाठी नावे सुचविली.

3) सर्वोच्च न्यायालयाने एकदा आदेश दिल्यानंतर तुम्ही 'आयसीसी'कडे जाता आणि त्यांना पत्र लिहायला सांगता. लोढा समितीच्या शिफारशी म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेप असल्याचे लेखी मागता. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल का करीत आहात, असेही न्यायालयाकडून फटकाविण्यात आले.

4) 'बीसीसीआय'मधील बदलासाठी जानेवारी 2015 मध्ये माजी मुख्य न्यायाधीश लोढा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती.

5) 'बीसीसीआय'ची सर्व खाती गोठविण्याचा निर्णय ऑक्टोबर 2016 मध्ये झाला. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यायालयाकडून मोजका निधी देण्यात आला.

6) 'एक राज्य एक मत, सामने सुरू असताना दोन षटकांमध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध, खर्चावर मर्यादा अशा शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या शिफारसी व्यावसायिकदृष्ट्या न परवडणाऱ्या असल्याची 'बीसीसीआय'ची भूमिका होती.

• मंजूर केलेल्या प्रमुख शिफारसी

मंत्री, आयएएस अधिकाऱ्यांना क्रिकेट संघटनात प्रवेश नाही

क्रिकेट पदाधिकारी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा

एक व्यक्ती, एक पद. बीसीसीआय व राज्य संघटनेत एकाच वेळेस पद भूषविता येणार नाही

खेळाडूंची संघटना गरजेची
मतदान प्रक्रियेत प्रत्येक राज्याला एकच मत

बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार 'कॅग'च्या निरीक्षणाखाली

नऊ सदस्यांची सर्वोच्च परिषद, बीसीसीआयची कार्यकारी समिती रद्दबातल

बीसीसीआयमध्ये पाचऐवजी एकच उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सहसचिव अशी एकूण पाच पदे
पदाधिकाऱ्याची एक 'टर्म' तीन वर्षांची, जास्तीत जास्त तीन 'टर्म', सत्तेत एकूण नऊ वर्षे

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अॅप

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेतही डिजिटल तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. गरोदर माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अॅप जिल्हा परिषद लाँच करणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नागपूर जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

संगोपन मोबाईल अॅप नावाने हा अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व आयसीटी मीडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त उपक्रमातून ही यंत्रणा जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका कार्यरत आहे. गरोदर मातेपासून तर बाळाच्या जन्म झाल्यानंतर तो पाच वर्षांचा होईपर्यंत त्याची नोंद त्यांच्याकडे असते. परंतु एखादी महिला व बाळ जर गाव सोडून बाहेरगावी गेले असेल, अशावेळी आरोग्यसेविका काहीच करू शकत नाही. गरोदर मातेला तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला लावणारे, तसेच शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या लसीकरणासाठी माहिती व मदत संगोपन अॅप करणार आहे.

संगोपन अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर माता व बाळाची संपूर्ण माहिती त्यात भरावयाची आहे. ही माहिती अॅपमध्ये नोंदविल्यानंतर गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यानपर्यंत घ्यावी लागणारी काळजी, आवश्यक लसीकरण तसेच बाळाला सुद्धा त्याच्या जन्मानंतर व पाच वर्षापर्यंत प्रत्येक वर्षात करविण्यात येणारे लसीकरणाची माहिती वेळेत देणार आहे. एकप्रकारे हा अॅप माता आणि बाळाच्या आरोग्यासंदर्भात आठवण करून देणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘यूपीएससी’चे अध्यक्ष म्हणून प्रा. डेव्हीड आर. सिम्लिह

केंद्रीय लोक सेवा आयोगाचे (यूपीएससी) नवे अध्यक्ष म्हणून प्रा. डेव्हीड आर. सिम्लिह यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे.  दि. 4 जानेवारी 2017 पासून प्रा. सिम्लिह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत अथवा दि. 21 जानेवारी 2018 पर्यंत ते यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर, मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख, शाम जोशी यांचा गौरव

राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार आणि अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

 यंदाचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनाला जाहीर झाला आहे. याशिवाय विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली, मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार शाम जोशी आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली.

व्यावहारिक नफा-तोटा न पाहता, प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा व समाजसेवक असे अनेक विषय व अनुषंगिक विचार विविध चरित्र पुस्तिकांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या भारतीय विचार साधना प्रकाशनास यंदाचा श्री.पु. भागवत पुरस्कार दिला जाणार आहे. पर्यावरण आणि वन्यजीवन हे क्षेत्र मराठी भाषेच्या परीघात समृद्ध करणाऱ्या आणि कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी भाषेला असंख्य नवे शब्द देणाऱ्या मारुती चितमपल्ली यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येणार आहे.

अत्त्युच्च त्याग करून सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोहोचविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक शाम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी व्याकरणाच्या अध्वर्यू आणि कोश, व्याकरणाचे नियम, म्हणी व वाकप्रचार आणि शालेय शिक्षणातील मराठी या सर्वच बाबतीत उत्तम पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ व भाषाशास्त्रज्ञ यास्मिन शेख यांना या वर्षीचा अशोक केळकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य श्रीपाद भालचंद्र जोशी, बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, शामा घोणसे व बाबा भांड यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करून, मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. येत्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹या वर्षांत ब्रिटनमध्ये जन्मलेले पहिले मूल हे भारतीय वंशाचे

एलिना कुमारी या चिमुकलीला जगात येऊन फक्त तीन दिवस झाले आहे. तरीही तिच्या जन्माची जगभरात चर्चा आहे. आणि याचे कारण आहे ते एलिनाची जन्मतारिख. तिचा जन्म बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी झाला. म्हणूनच २०१७ मध्ये जन्मलेली ती ब्रिटनची पहिली मुलगी ठरली आहे.

एलिना कुमारी ही भारतीय वंशाची आहे. तिच्या जन्मवेळेमुळे तिच्या नावाची चर्चा अधिक आहे. कारण २०१७ मध्ये जन्मलेली ती पहिली व्यक्ती आहे. तिची जन्मतारिख १ जानेवारी असली तरी तिची जन्मवेळ रात्री १२ वाजून १ मिनिटे अशी आहे. या वेळेमुळेच तिच्या जन्माची चर्चा आहे. बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात तिचा जन्म झाला. भारती कुमारी असे एलिनाच्या आईचे नाव आहे. एलिनाला दोन वर्षांचा छोटा भाऊ देखील आहे.

 एलिनाची प्रकृतीही उत्तम आहे. भारती यांची प्रसूतीची तारिख ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होती. त्यातून ३१ डिसेंबरला त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आणि बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी एलिनाचा जन्म झाला. पण त्याचबरोबर या वर्षांत जन्मलेली एलिना ही ब्रिटनमधली पहिली व्यक्ती ठरली. तिच्या जन्मवेळेमुळे जगभर तिची चर्चा आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डेव्हिड वॉर्नरकडून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत, कसोटीच्या पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तिसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दमदार फलंदाजी करत पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अशी किमया करणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे.

डेव्हिड वॉर्नरने ठोकलेले शतक सिडनीच्या मैदानावरील आजवरचे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. वॉर्नरच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून डॉन ब्रॅडमन यांनी १९३० साली असा पराक्रम केला होता. तर १९७६ साली पाकिस्तानच्या माजिद खान यानेही शतकी कामगिरी केली होती.

 वॉर्नरने पाकिस्ताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत नाबाद १०० धावा केल्या. त्यानंतर तो ११३ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपर याने १९०२ साली मॅनचेस्टरमधील सामन्यात उपहारापूर्वी १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी १९२६ साली लिड्समध्ये ११२ धावा केल्या होत्या. कसोटी विश्वातील या विक्रमी कामगिरीनंतर वॉर्नर म्हणाला की, विक्रमामुळे मला आनंद तर आहेच पण माझा हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मारुती चितमपल्लींना राज्य सरकारचा पुरस्कार

राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, यंदाचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.

व्यावहारिक नफा-तोटा न पाहता, प्रामुख्याने राष्ट्रभक्ती व राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा व समाजसेवक असे अनेक विषय व आनुषंगिक विचार विविध चरित्र पुस्तिकांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणाऱ्या भारतीय विचार साधना प्रकाशनास यंदाचा श्री. पु. भागवत पुरस्कार देण्यात येणार आहे.

पर्यावरण आणि वन्यजीवन हे क्षेत्र मराठी भाषेच्या परिघात समृद्ध करणाऱ्या आणि कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी भाषेला असंख्य नवे शब्द देणाऱ्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येणार आहे.

अत्युच्च त्याग करून सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोचविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक श्याम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी व्याकरणाच्या अध्वर्यू आणि कोश, व्याकरणाचे नियम, म्हणी व वाक्प्रचार आणि शालेय शिक्षणातील मराठी या सर्वच बाबतीत उत्तम पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या प्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ व भाषाशास्त्रज्ञ यास्मिन शेख यांना या वर्षीचा अशोक केळकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. पु. व विंदा पुरस्कार निवड समितीमध्ये श्रीपाद भालचंद्र जोशी, बाबा भांड यांचा समावेश होता. तर पाडगावकर व केळकर पुरस्कार समितीत डॉ. सदानंद मोरे, शामा घोणसे व बाबा भांड यांचा समावेश होता. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, 27 फेब्रुवारी 2017 रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली.

श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार- भारतीय विचार साधना प्रकाशन

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार- मारुती चितमपल्ली

मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार- श्याम जोशी

अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार- ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महापालिका निवडणुकीसाठी ‘ट्रू व्होटर’ अॅप

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यंदा झालेली वॉर्डांची फेररचना लक्षात घेऊन मतदारांना आपला वॉर्ड कळावा, पोलिंग बूथ कुठे आहे माहीत व्हावे, तसेच आपले नाव मतदार यादीत आहे नाही हे कळण्यासाठी पालिका आणि निवडणूक आयोगाने एकत्रितरीत्या ‘ट्रू व्होटर’ नावाने अॅप तयार केले आहे.

हे अॅप मतदारांच्या मोबाइलवर उपलब्ध होणार असून त्यावर आपले नाव टाइप करताच आपल्या नावाची नोंद आहे की नाही यासह मतदारांसाठीची सर्व आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारीत निवडणूक होण्याची शक्यता असल्याने पहिल्या आठवड्यात हे अॅप मतदारांच्या मोबाइलवर उपलब्ध होईल. २२७ वॉर्डपैकी ९० टक्के वॉर्डची पुनर्रचना झाली आहे. यामुळे मतदारांना आपण नेमके कोणत्या वॉर्डमध्ये आहोत हे कळण्यासाठी या अॅपची मदत होणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जीआयएस मॅपिंगची मदत

जीआयएस मॅपिंगवर हे अॅप्लिकेशन आधारित असल्याने वॉर्डांच्या घालून देण्यात आलेल्या सीमारेषांची नोंद या अॅपवर असणार आहे. याआधी पालिकेने नोंदणीकृत मतदारांचा सर्व्हे केला असून, मुंबईत एकूण ९२ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत तीन लाख नवीन मतदारांचीही नोंद झाली आहे. त्यामुळे या जीआयएस मॅपिंगमुळे कोणता मतदार कोणत्या वॉर्डात आहे हे कळणार आहे. पालिकेने आपल्या ५० हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नद्यांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र मागेच

‘देशातील अनेक नद्या आणि त्यांच्या पाण्याची गुणवत्ता ही मरणासन्न अवस्थेत आहे. परंतु, तुलनेने महाराष्ट्रातील नद्यांची गुणवत्ता फारच घसरली आहे. पाण्याच्या प्रदूषण मोजणीकरिता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या अनेक घटकांपैकी बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) घटकाची परिस्थिती ही राज्यातील नद्यांमध्ये फारच वाईट आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत एका दृष्टिकोनातून राज्यातील नद्यांची परिस्थिती ही फारच वाईट असल्याची परिस्थिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालातून स्पष्ट होते आहे’, अशी माहिती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (नीरी) संचालक डॉ. राकेश कुमार यांनी बुधवारी दिली.

विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळातर्फे राकेश कुमार यांचे ‘गंगा नदीतील पाण्याच्या आरोग्यविषयक गुणवत्तेवर आधारित विज्ञान संस्कृती संगम व्याख्याना’चे आयोजन बुधवारी करण्यात होते.

लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित या व्याख्यानादरम्यान डॉ. राकेश कुमार बोलत होते. खरे पाहता नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेकरिता यात पाण्यातील डिझॉलव्ह्ड ऑक्सिजन (डीओ), बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) टोटल डिझॉलव्ह्ड सॉलिड्स (डीडीएस), टोटल कॉलिफॉर्म (टीसी) आणि फिकल कॉलिफॉर्म (एफसी) या घटकांचा अभ्यास करण्यात येतो. यातील बीओडी घटकाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार म्हणाले, ‘राज्यातील नद्यांच्या पाण्याचे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या आधारे या पाण्यातील बीओडीची गुणवत्ता फारच घसरल्याचे दिसते. परिणामतः या नद्यांमधील पाण्याचीही गुणवत्ता घसरली आहे. देशातील इतर नद्यांचा विचार केल्यास राज्यातील नद्यांची परिस्थिती सगळ्यात वाईट असल्याचे सीपीसीबीच्या अहवालातून समोर येते आहे.’

यावेळी नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, व्हीएनआयटीचे गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष विश्राम जामदार, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गंगेच्या पाण्यात गुणवत्ता!

गेल्या काही वर्षांत कानपूर ते वाराणसी या पट्ट्यात होत असलेल्या प्रदूषणामुळे गंगेच्या पाण्याची गुणवत्ता फारच ढासळली, हे सत्य आहे. परंतु, उत्तराखंडातील काही भागांतसुद्धा या नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. या नदीच्या पाण्यातील बॅक्टेरिओफाज या तत्त्वामुळे या नदीचे पाणी फारच लवकर शुद्ध होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा या तिन्ही नद्यांच्या पाण्याच्या तुलनेत गंगेच्या पाण्यात ही गुणवत्ता जास्त असल्याची माहिती डॉ. कुमार यांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक ‘बीकेसी’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्न प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे मुंबईतील मुख्य स्थानक नक्की कुठे होणार, हा प्रश्न आता निकाली निघाला असून वांद्रे-कुर्ला संकुलातील ४० हजार चौरस मीटर जागा मुंबईतील स्थानकासाठी देण्याचे आता नक्की झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किलोमीटरचे अंतर दोन ते अडीच तासांत पार केले जाईल. या मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. यातील चार स्थानके महाराष्ट्रात तर उर्वरित आठ स्थानके गुजरातेत असणार आहेत.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्थानकासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील जमीन देण्यासाठी एमएमआरडीए फारशी उत्सुक नव्हती. बुलेट ट्रेनसाठी दादर वा कुर्ला येथील जागा घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. एकतर जो भूखंड या स्थानकासाठी मागण्यात येत होता तिथे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेची टोलेजंग इमारत प्रस्तावित होती. त्यातून एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार होता. मात्र निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानागरिया आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांच्यासोबत झालेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर यातून तोडगा काढण्यात आला. यानुसार आता बीकेसीमधील हे स्थानक भुयारी असणार असून त्याच्या वर एमएमआरडीएला वित्तीय संस्थेच्या कार्यालयाची इमारत बांधता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई ते अहमदाबाद ः ५०८ किलोमीटर
एकूण स्थानकेः १२
महाराष्ट्रः मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार, बोईसर
गुजरातः वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, साबरमती

बुलेट ट्रेनसाठी ९९ हजार कोटी!

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प ९९ हजार कोटी रुपयांचा असून या प्रकल्पासाठी जपानच्या जायकातर्फे ७९ हजार कोटी रुपये ५० वर्षांच्या दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाणार आहे. उर्वरित २० हजार कोटींसाठी स्पेशल पर्पज व्हेहिकल अंतर्गत उभे केले जाणार असून यातील ५० टक्के वाटा रेल्वे उचलणार आहे, तर महाराष्ट्र सरकार व गुजरात सरकार प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलणार आहे.

एकंदर ९९ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांना पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दोन-तृतीयांश भाग गुजरातेत असूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र समान खर्च येणार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हा प्रकल्प सात वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प असून बुलेट ट्रेनच्या तिकिटाचा दर हा कुठल्याही गाडीच्या फर्स्ट क्लास एसीच्या दीडपट ठेवण्यात येणार असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. 1444

केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी 1444 ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.

या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्नांवर उत्तरे मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरसंचारचे सचिव जे. एस. दीपक यांनी दिली. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे. सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या 'अग्नि-४' क्षेपणास्त्राने चीन भडकला

भारताद्वारे लांब पल्ल्यांची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या आणि त्यांच्या चाचण्यांवरून चीन भडकला आहे. आपला राग काढण्यासाठी आणि भारताला घेरण्यासाठी पाकिस्तानला अशी क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आम्ही मदत करू शकतो, असा इशारा चीनने दिला आहे.

भारत आपल्या सामरीक शक्तीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढवत असेल तर चीन आपला जुना विश्वासू मित्र पाकिस्तानला अशा क्षेपणास्त्रांसाठी मदत करेल, असं चीनने म्हटलं आहे. भारताने सोमवारी ४ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या आंतरखंडीय 'अग्नि-४' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्यावर चीनची ही प्रतिक्रिया आली आहे. या आधी गेल्या आठवड्यात भारताने ५ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या भारताच्या चाचणीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदे ( UNSC )ला आक्षेप नाही तर ठिक आहे. मग पाकिस्तानचीही अण्वस्त्र क्षमता वाढेल. आणि अशी क्षेपणास्त्र विकसित करण्यास चीन पाकिस्तानला मदत करेल, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. चीन सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भारताला हा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या विकासामुळे चीनने कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आगामी काळात भारताला चीनचा मुख्य प्रतिस्पर्धी मानलं जायला नको. पण भारत खूपच पुढे जात असेल तर चीन गप्प बसणार नाही. चीनशी भौगोलिक आणि राजकीय संबंध बिघडल्यास भारताचेच नुकसान होईल, हे भारताने लक्षात घ्यावे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. याशिवाय अण्वस्त्रांच्या आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या संख्येबाबत संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोपही अग्रलेखातून भारतावर केला गेला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चिनी रेल्वे पुन्हा रेशीममार्गावर

पाश्चात्त्य देशांसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी चीनने लोहमार्गाचा नवा "रेशीममार्ग' पत्करला असून, यासाठी ड्रॅगनने थेट लंडनपर्यंत आपल्या लोहमार्गाचा विस्तार केला आहे. आता बारा हजार किमीचा प्रवास करत चिनी रेल्वे थेट गोऱ्या साहेबांच्या लंडनमध्ये पोचणार आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे नेटवर्कचा विस्तार तर होईलच; पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. चीनच्या पहिल्या मालवाहू रेल्वेने झिजियांग प्रांतातील यिवू शहरातून लंडनकडे धाव घेतली आहे. यिवू हे चीनचे आंतरराष्ट्रीय माल उत्पादक केंद्र म्हणून ओळखले जाते.

यिवूत कशाचे उत्पादन?

यिवू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कपडे, दागिने, प्रवासी बॅग, सुटकेस आदींचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे या चिनी उत्पादनांचा दर्जाही उच्च प्रतीचा असतो. आपल्या निर्यात बाजारपेठेला बळ देण्यासाठी चीनने रेल्वेच्या माध्यमातून ही मालवाहतूक सुरू केली आहे. यासाठी चीन सरकारने "वन बेल्ट, वन रोड' (रेशीममार्ग) या धोरणाचा अवलंब केला आहे.

प्रवासाचा अवधी

चीनमधून निघालेल्या मालवाहू गाडीला लंडनमध्ये पोचण्यासाठी अठरा दिवसांचा अवधी लागणार असून, ती बारा हजार किलोमीटर लांबीचे अंतर पार करेल, असे "चायना रेल्वे कार्पोरेशन'ने म्हटले आहे. कझाकस्तान, रशिया, बेलारूस, पोलंड, जर्मनी, बेल्जियम आणि फ्रान्समधून ही गाडी लंडनमध्ये पोचेल. यामुळे या लोहमार्गावरील देशांशीही चीनचे आर्थिक संबंध निर्माण होतील.

लंडन पंधरावे शहर

चीनच्या मालवाहू रेल्वे नेटवर्कशी जोडले गेलेले लंडन हे युरोपातील पंधरावे शहर असून, यामुळे चीन- ब्रिटन व्यापारी संबंध अधिक बळकट होण्यास हातभार लागेल. आता पश्चिम युरोपशीही चीनचे घनिष्ठ व्यापारी संबंध निर्माण होतील. आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्यावर चीनचा भर आहे.

चीनचे निर्यात व्यापार

2.27 ट्रिलियन डॉलर (2015)
2.34 ट्रिलियन डॉलर (2014)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुगलच्या साह्याने बनवा तुमचे संकेतस्थळ

भारतातील लघू उद्योग आणि मध्यम उद्योगांना चालना मिळावी म्हणून गुगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी डिजिटल अनलॉक आणि माय बिजनेस वेबसाइट या दोन योजनांची घोषणा केली आहे. भारतामधील लघू उद्योजकांमध्ये भरपूर क्षमता असून, त्यांनी जर तंत्रज्ञानाचे साह्य घेतले, तर त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते. त्याकरिता गुगल लघू उद्योजकांसाठी डिजिटल अनलॉक आणि माय वेबसाइट या दोन योजना राबविणार असून, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीला अनेक लघू उद्योजक क्षमता असूनही पुरेसा व्यवसाय करू शकत नाहीत किंवा पैसा कमवू शकत नाहीत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते त्याचे सोने करू शकतात. ऑनलाइनच्या माध्यमातून अशा उद्योजकांना सुवर्णसंधीची दारेच खुली होणार असल्याने या योजना फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. डिजिटल अनलॉक अंतर्गत इंटरनेटचा वापर करून आपला व्यापार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचावा यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. देशातील 40 शहरांमध्ये या कार्यशाळा होणार असल्याची माहिती सुंदर पिचाई यांनी लघू उद्योगांसाठी आयोजित मेळाव्यामध्ये दिली.

त्याचप्रमाणे "माय बिजनेस वेबसाइट' या कार्यक्रमातून प्रत्येक छोट्या व्यापाऱ्यालादेखील गुगलद्वारे आपली स्वतंत्र वेबसाइट तयार करता येऊ शकेल, असे पिचईंनी म्हटले आहे. संकेतस्थळ बनवणे आणि ते सांभाळणे या दोन्ही गोष्टी अतिशय क्लिष्ट असल्याने व्यापाऱ्यांना सोईस्कर अशी संकेतस्थळे गुगल बनवणार आहे. ही संकेतस्थळे मोबाईलद्वारेसुद्धा चालवली जाऊ शकतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांना जागतिक दहशतवादाची चिंता

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगातील वाढत्या संघर्ष आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. मी चमत्कार करणारी व्यक्ती नाही. दहशतवादाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

बान की मून यांच्या जागी संयुक्त राष्ट्रसंघात सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांशी बोलताना 67 वर्षीय गुटेरेस म्हणाले, की आपण अतिशय आव्हानात्मक काळाचा सामना करत आहोत, याविषयी कोणालाच शंका असण्याचे कारण नाही. एका बाजूला आपण पाहतो, की संपूर्ण जगात संघर्ष वाढत आहे आणि तो एकमेकांशी जोडला गेलेला आहे. या घटनांनी एक प्रकारच्या नव्या जागतिक दहशतवादाला जन्म दिला असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी नियमांचा आदर राखला जात नाही. अशा परिस्थितीत आपल्याला मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचा भंग पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे; तर काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे निर्वासितांचा सन्मान होत होता, तोसुद्धा नियमांप्रमाणे होत नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'बुकर' विजेते लेखक जॉन बर्जर यांचे निधन

कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे नुकतेच निधन झाले.

बर्जर 90 वर्षांचे होते. पॅरीसमधील अँटनी भागातील राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मागील वर्षभरापासून ते आजारी होते, अशी माहिती द टिलिग्राफने दिली आहे.

मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या 'वेज ऑफ सीईंग' या 'बीबीसी'वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टीकोन आणला.

G हे एकाक्षरी शीर्षक असलेल्या कादंबरीसाठी त्यांना 1972 मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या रकमेपैकी अर्धे मानधन 'द ब्लॅक पँथर्स' या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले.

उत्तर लंडनमधील हॅकनी येथे जन्म झालेल्या बर्जर यांनी चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांची चित्रकला 1940 मध्ये प्रदर्शनातून मांडल्यानंतर त्यांनी लेखनामध्ये नशीब अजमावले. कवितांपासून ते पटकथांपर्यंत, तसेच छायाचित्रणाविषयी, स्थलांतरित कामगारांचे शोषण, पॅलेस्टिनींचा संघर्ष अशा विविध विषयांवर, वेगवेगळ्या स्वरुपात त्यांनी लेखन केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘फोर्ब्ज गेमचेंजर्स’ यादीत ३० भारतीय!

फोर्ब्ज नियतकालिकाच्या ‘गेमचेंजर’ ६०० उद्योजकांच्या यादीत भारतीय वंशाच्या ३० उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे. हे ३० जण आरोग्यनिगा (हेल्थकेअर), कारखानदारी, क्रीडा व वित्त या क्षेत्रांतील कल्पक नवोद्योजक आहेत. औद्योगिक क्षेत्राला आलेली सुस्ती दूर करण्याचा व त्यायोगे जग बदलून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेल्या उद्योजकांचा समावेश फोर्ब्जने यंदाच्या यादीत केला आहे.

निवडक गुणवंत व त्यांचे वय

विवेक कोपार्थी (२७) – निओलाइटचा सहसंस्थापक, काविळ तपासण्यासाठी फोटोथेरपी यंत्राची निर्मिती.

प्रार्थना देसाई (२७) – ड्रोनचा वापर विकसनशील देशांना औषधे पोहोचवण्यासाठी. रवांडासारख्या आफ्रिकी देशांना मोठा लाभ.

शौन पटेल (२८) – डॉक्टरांना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी मोबाइल अॅपची निर्मिती.

रोहन सुरी (२७) – मेंदुला झालेली इजा शोधून काढणारी चाचणी विकसित.

नेहा गुप्ता (२८) – कारखान्यांतील कामगारांची सुरक्षितता वाढावी यासाठी हेडसेटची निर्मिती.

आदित्य अगरवाला (२३) – भारतातील चोट्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठेची, किसान नेटवर्कची निर्मिती.

अजय यादव (२९) – हॉस्टेलवर आपला रुममेट निवडण्यासाठी उपयुक्त अॅपची, ‘रुमी’ची निर्मिती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'कॅप्टन कूल'ची टॉप 5 विजेतेपदे

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कसोटीतून यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या कारकिर्दीचा अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. धोनीने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असला तरी त्याच्या चाणाक्ष निर्णयाची झलक आता पाहायला मिळणार नाही.

धोनीच्या कारकीर्दीतील महत्वाचे टप्पेः

1. ICC T20: 2007
2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा ODI सिरिजः 2008
3. ICC World Championship: 2011
4. Champions Trophy: 2013
5. Asia Cup T20: 2016

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा राजीनामा

भारताचे माजी कर्णधार, कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा बुधवारी राजीनामा दिला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासनात ९ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी अधिक प्रतीक्षा न करता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट बोर्डातील आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व राज्य संघटनांतील पदाधिकाऱ्यांना लोढा समितीच्या शिफारशीत नमूद केल्याप्रमाणे अपात्र ठरत असल्यास पद सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार विविध राज्य संघटनांचे पदाधिकारी आता राजीनामे देत आहेत. वेंगसरकर यांनी मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला हे पत्र पाठवून आपला राजीनामा कळविला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कायदा समितीचे प्रमुख संजीव गोरवडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पद सोडण्याचे ठरविले.

२००३मध्ये मुंबई क्रिकेटच्या प्रशासनात वेंगसरकर यांनी प्रवेश केला. उपाध्यक्षपदावर ते विराजमान झाले आणि पुढील ८ वर्षे ते प्रशासनात होते. त्यानंतर चार वर्षांच्या विरामानंतर पुन्हा एकदा ते २०१५मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रणजी करंडक: पृथ्वी शॉचे पदार्पणातच शतक, मुंबई अंतिम फेरीत

मुंबईच्या युवा खेळाडू पृथ्वी शॉने आपल्या रणजी पदार्पणातच शतकी कामगिरी करण्याचा विक्रम केला आहे. शॉच्या या शतकी कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या संघाला रणजीच्या अंतिम फेरीत धडक मारता आली आहे. मुंबईच्या संघाने तामिळनाडूवर सहा विकेट्सने मात केली.

 तामिळनाडूच्या संघाने मुंबईसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. पृथ्वी शॉने यावेळी जबाबदारी फलंदाजी करत आपले पहिले रणजी शतक तर झळकावलेच पण तीन विकेट्ससाठी तीन भागिदाऱया रचून त्याने संघाला विजय मिळवून दिला. पृथ्वी शॉने १७४ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १२० धावांची खेळी साकारली. त्याने सलामीसाठी प्रफुल्ल वाघेलाच्या साथीने ९० धावांची, दुसऱया विकेट्ससाठी श्रेयस अय्यरसोबत ९१ धावांची, तर सुर्यकुमार यादवसोबत तिसऱया विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
रणजीच्या यंदाच्या मोसमात आता अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध गुजरात असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.

 गुजरातने झारखंडवर १२३ धावांनी दणदणी विजय प्राप्त करून अंतिम फेरी गाठली आहे. गुजरातकडून जसप्रीत बुमराह याने नेत्रदीपक कामगिरी करत सहा विकेट्स मिळवल्या. पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या गुजरातने झारखंडपुढे विजयासाठी २३५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला झारखंडचा संघ बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे बेचिराख झाला. बुमराहची खेळपट्टीवर बळींची प्रीत फुलली आणि गुजरातने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. बुमराहच्या बळींच्या षटकाराच्या जोरावर गुजरातने झारखंडचा दुसऱ्या डावात १११ धावांवर खुर्दा उडवत १२३ धावांनी विजय साकारला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नव्या मानवी अवयवाचा लागला शोध!

मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात दडलेला व साध्या डोळ्यास न दिसणारा ‘मेसेन्टरी’ हा एक स्वतंत्र अवयव असल्याचे वैज्ञानिकांनी चार वर्षांच्या संशोधनानंतर जाहीर केले आहे. अशा प्रकारे स्वतंत्रपणे गणल्या गेलेल्या ज्ञात मानवी अवयवांची संख्या ७९वर पोहोचली आहे.

आयर्लंडमधील लिमेरिक विद्यापीठाच्या इस्पितळात स्वादूपिंडावर शस्त्रक्रिया करताना शल्यक्रिया विभागाचे प्राध्यापक जे. काल्विन कॉफे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मेसेन्टरी’चे स्वतंत्र स्थान निश्चित करण्यासाठी सन २०१२ पासून सूक्ष्मदर्शक यंत्रातून अथक निरीक्षण व अभ्यास केला. यावरून ‘मेसेन्टरी’ला स्वतंत्र अवयवाची ओळख देणारा त्यांचा सविस्तर शोधनिबंध ‘लॅन्सेट’ या जगन्मान्य वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकाच्या ‘गॅस्ट्रेएन्टेरॉलॉजी अॅण्ड हेपॅटोलॉजी’ विभागात प्रसिद्ध झाला आहे.

‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनाची सत्यता वैज्ञानिकच आपसात तपासून प्रमाणित करीत असल्याने ‘मेसेन्टरी’चे स्वतंत्र अवयव म्हणून अस्तित्व अधिकृतपणे जाहीर झाल्याचे मानले गेले आहे. आंग्लवैज्ञकातील शरीरशास्त्राचे बायबल म्हणून मानल्या गेलेल्या ‘ग्रे‘ज अॅनॉटोमी’ या पाठ्यपुस्तकातही ‘मेसेन्टरी’ची स्वतंत्र अवयव म्हणून नोंद घेण्यात आली आहे. वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश करण्यात आला आहे.

‘मेसेन्टरी’चा शब्दश: अर्थ ‘आतड्यांच्या आतमध्ये असलेले’ असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात हे ‘मेसेन्टरी’ असते. या आवरणामुळे मोठया आतड्याचे वेटोळे अघळपघळ न पसरता उदर पोकळीत एका जागी स्थिर राहते. लिओनार्दो द्् व्हिन्सी या मध्ययुगीन प्रज्ञावंतांने त्याच्या लेखनात ‘मेसेन्टरी’चा उल्लेख केला होता.

 परंतु कोणतेही फारसे महत्व नसलेले शरीरातील एक पेशीबंध म्हणून कित्येक शतके त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नव्हते. गेल्या शतकभरात काही निवडक डॉक्टमंडळींनी ‘मेसेन्टरी’चा अभ्यास जरूर केला. पण त्यांनी त्याची रचना एकसंध नव्हे तर अनेक तुकड्यांमध्ये विभागलेली मानली होती. आता प्रा. कॉफे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा समज चुकीचा ठरवून ‘मेसेन्टरी’ हा एक सलग रचना असलेला स्वतंत्र अवयव असल्याचा सिद्धांत मांडला आहे.

मानवी शरीर ही सजीव सृष्टीतील अगाध रचना आहे. यात प्रत्येक पेशीला व अवयवाला स्वतंत्र ओळख, स्वतंत्र स्थान व स्वतंत्र कार्य आहे. काही तरी ठराविक आणि ज्यावाचून शरीराचा जैविक गाडा सुरळितपणे चालणार नाही असे काही तरी नेमून दिलेले ‘मेसेन्टरी’चे कार्य असल्याखेरीज त्याचे शरीरातील अस्तित्व निरर्थक मानणे हे वैज्ञानिक गृहितक आहे. वैज्ञानिकांपुढील यापुढचे आव्हान ‘मेसेन्टरी’चे नेमके कार्य शोधण्याचे आहे.

या संशोधनाचे महत्त्व आणि भावी दिशा विषद करताना प्रा. कॉफे म्हणतात : पोटाच्या कोणत्या ना कोणत्या विकाराशी ‘मेसेन्टरी’चा थेट संबंध असणार हे नक्की. आता आपण त्याचे शरीरातील स्थान व रचना नक्की केली आहे. त्याचे कार्य शोधणे हे पुढचे पाऊल आहे.
एकदा नेमके कार्य कळले की त्या कार्यातील बिघाडही ओघानेच कळेल. मग त्यातून या बिघाडामुळे होणाऱ्या आजाराचे ज्ञान होईल.

या सर्वांचा समुच्चय केला की ‘मेसेन्टेरिक सायन्स’चे एक नवे दालन अभ्यासासाठी खुले होईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनमधून ‘न्यूयॉर्क टाईम्स’ अॅप हद्दपार

प्रसारमाध्यमांवर कठोर निर्बंध लादणाऱ्या चिनी सरकारच्या दबावामुळे चीनमधल्या ‘अॅपल’ अॅप स्टोअरमधून न्यूयॉर्क टाईम्स’चं अॅप हद्दपार करण्यात आलंय. या अॅपमुळे चीनमधल्या काही स्थानिक कायद्यांचा भंग होत असल्याचं थातुरमातुर कारण देत चीनने प्रसारमाध्यमांचा गळा पुन्हा घोटलाय. विशेष म्हणजे या अॅपमुळे नक्की कोणते कायदे मोडले जात आहेत याचं कुठलंही स्पष्टीकरण चीनने दिलेलं नाही. चीनमध्ये न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर २०१२ पासून बंदी आहे. आता अॅपसुध्दा बंद झाल्याने चिनी वाचकांचे न्यूयॉर्क टाईम्स वाचण्याचे जवळपास सगळेच मार्ग बंद झालेत.

न्यूयॉर्क टाईम्सने चिनी सरकारचा निषेध केलाय. “चीनच्या या कृतीमुळे तिथल्या नागरिकांना निष्पक्ष बातम्या मिळण्याचा आणखी एक मार्ग बंद झालाय.” न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रवक्त्या एलीन मर्फी म्हणाल्या. चिनी सरकारकडून अशी कृती वारंवार आणि हेतुपूर्वक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिनी सरकारच्या दबावाला भीक न घालता हे अॅप चीनमद्ये पुन्हा उपलब्ध करून देण्याचं आवाहन ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने ‘अॅपल’ला केलंय.

चीनमध्ये प्रसारमाध्यमांवर अतिशय जाचक बंधनं आहेत. इंटरनेटच्या युगात माहितीच्या प्रसाराला कोणी रोखू शकणार नाही हा समज चीनने बऱ्याच अंशी खोटा ठरवलाय. इंटरनेटवरची माहिती सेन्सॉर करण्यासाठी चीनच्या सरकारने हजारो तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. ही तज्ज्ञांची फौज चीनच्या हातातलं एक धोकादायक अस्त्र मानलं जातं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्त्रो एकाचवेळी करणार 103 उपग्रहांचे प्रक्षेपण

इस्रो फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवडय़ात एकाचवेळी 103 उपग्रहांच्या प्रक्षेपण पराक्रम करणर आहे. ही विक्रमी कामगिरी पार पाडल्यानंतर दक्षिण आशायाई उपग्रह प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती ईस्त्राsचे संचलक एस. सोमनाथ यांनी दिली.

पीएसएलव्ही – सी 37 या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी प्रक्षेपित केल्या जाणऱया 103 उपग्रहांमध्ये अमेरिका आणि जर्मनीसह अन्य देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरीस 80 विदेशी 83 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा निर्णय इस्त्रोने घेतला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फिनलँडच्या बेरोजगारांना 40 हजाराचा मासिक भत्ता

 फिनलँडच्या बेरोजगारांसाठी हे वर्ष खरोखरच आनंदाचे ठरत आहे. फिनलँड युरोपमधील पहिला असा देश बनला आहे, जो आपल्या बेरोजगार नागरिकांना प्रतिमहिना 587 डॉलर्स म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये देईल. देशात गरीबी कमी करण्s आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने हा अनोखा पुढाकार घेतला आहे. परंतु सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सादर करण्यात आली आहे. फिनलँड सरकारची संस्था केईएलएचे ओली कंगस यांनी याची माहिती दिली. ही चाचणी दोन वर्षांसाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 2000 बेरोजगारांना निवडण्यात आले असून त्यांना एक जानेवारीपासून या सुविधेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही सुविधा प्राप्त करणाऱयांना ते पैसे कोठे खर्च करत आहेत हे सांगावे लागणार नाही.

फिनलंडच्या खासगी क्षेत्रात सरासरी एक व्यक्ती प्रत्येक महिन्याला 500 युरो म्हणजेच जवळपास अडीच लाख रुपये कमावतो. ज्यांना या योजनेसाठी निवडण्यात आले आहे, त्यांना जर नोकरी मिळाली तरी देखील सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळणे सुरूच राहील.

जर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर नंतर तो इतर कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी सुरू केला जाईल. मागील वर्षी स्वीत्झर्लंडमध्ये देखील प्रत्येक नागरिकाला सरकारकडून निश्चित रक्कम देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹न्यायमूर्ती खेहर भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश

भारताचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायमूर्ती खेहर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर हे पदावरुन निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी आता न्यायमूर्ती खेहर यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती खेहर यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्याने न्यायमूर्ती खेहर ते देशाचे पहिले शीख सरन्यायाधीश ठरले आहेत. न्यायमूर्ती खेहर यांचा कार्यकाळ आठ महिन्यांचा असणार आहे. न्यायमूर्ती खेहर हे 28 ऑगस्ट 2017 पर्यंत जबाबदारी पार पाडतील. राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती खेहर यांना राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अफगाणमध्ये जाण्यास आता पाक नागरिकांनाही पासपोर्ट अनिवार्य

पाकिस्तानचे नागरिक आता पासपोर्टशिवाय शेजारी देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाहीत. अफगाण प्राधिकरणाने पाकिस्तानी नागरिकांचा दस्तऐवजाविना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्यात आला.
7 महिन्यांआधी इस्लामाबादने देखील कठोर सीमा नियंत्रण पावले उचलली होती. याद्वारे पाकिस्तानात दहशतवादी कारवाया रोखण्याचा हेतू होता. तज्ञांनुसार अफगाणच्या या निर्णयानंतर अनेक आदिवासींना अडचण होईल, कारण त्यांचे नातलग दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात वास्तव्य करतात.

अफगाण प्राधिकरणाने सीमेला लागून असणाऱया अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत, याद्वारे पाकिस्तानी नागरिकांना आता पासपोर्टशिवाय सीमा पार करता येणार नसल्याचा संदेश देण्यात आला. पाक-अफगाण सीमेवर सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे. अनेक नाक्यांवर लष्कराच्या अतिरिक्त तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

दुरंद रेषेच्या दोन्ही बाजूला राहणाऱया आदिवासी समुदायाच्या रहिवाशांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. या आदिवासींकडे प्रवास दस्तऐवज आहे, जे खैबरच्या राजकीय प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. परंतु याशिवाय जर कोणतीही व्यक्ती पासपोर्ट न बाळगता अफगाणमध्ये गेली, तर त्याला तालिबानचा समर्थन मानून चौकशी केली जाणार आहे. अफगाणिस्तान दीर्घकाळापासून देशात तालिबानी हिंसाचारासाठी पाकिस्तानवर आरोप करत आला आहे. परंतु हा आरोप पाक नेहमीच फेटाळतो. सूत्रांनुसार जवळपास 93 हजार पाकिस्तानी कुटुंबे अफगाणिस्तानात नोंदणीकृत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पेटीएम पेमेन्ट्स बँकेला आरबीआयची मान्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हिरवा कंदील

पेटीएम या देशातील सर्वात मोठय़ा ऑनलाईन वॉलेट कंपनीच्या पेमेन्ट्स बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली. पुढील महिन्यात पेमेन्ट्स बँकेची सुरूवात होण्याची शक्यता कंपनीकडून वर्तविण्यात आली. या बँकेमध्ये ग्राहक आणि लहान व्यापारी एक लाखापर्यंत रक्कम प्रत्येक खात्यात जमा करू शकतात.

पेटीएमच्या पेमेन्ट्स बॅँकेला आरबीआयकडून औपचारिक मान्यता देण्यात आली. लवकर ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना जास्त वेळ वाट पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. पेटीएम पेमेन्ट्स बँकेमुळे बँकिंग उद्योगाला नवीन व्यावसायिक मॉडेल बनविण्याचे आपले लक्ष्य आहे. बँकिंग सुविधांपासून वंचित असणाऱया आणि बँकिंग सेवेचा कमी लाभ घेणाऱयांना उत्कृष्ट सेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे वन97 कम्युनिकेशन्सचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ऑनलाईन पोस्टमध्ये म्हटले.

सध्या केवळ एअरटेल पेमेन्ट्स बँकेने आपली सेवा सुरू केली आहे. आदित्य बिर्ला पेमेन्ट्स बँकेला 2017 च्या पहिल्या सहामाहीत प्रारंभ होण्याची शक्यता आहे. सध्या पेटीएम पेमेन्ट्स बँकेची अधिकांश हिस्सेदारी विजय शेखर शर्मा यांच्याजवळ आहे. उर्वरित हिस्सेदारी वन97 कम्युनिकेशन्सजवळ असेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एफडीआयमध्ये 27 टक्क्यांनी वृद्धी

एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यातील विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत यंदा 27.83 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यता आली. गेल्या वर्षी या कालावधीदरम्यान 21.87 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती.

औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात एकूण 55.6 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी 23 टक्क्यांनी वृद्धी झाली होती. विदेशी गुंतवणुकीमध्ये सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड आणि जपान या देशांचा महत्त्वाचा हिस्सा आहे. विदेशी गुंतवणूक वाढीसाठी सरकार मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. यामुळे भारतात उत्पादन होत रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. सेवा, दूरसंचार, ट्रेडिंग, संगणक हार्डवेअर आणि सॉप्टवेअर, तसेच ऑटोमोबाईल या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे.

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये इकिया, किया मोटर्स आणि चायना रेल्वे कन्ट्रक्शन कॉर्पोरेशन यासारख्या कंपन्या गुंतवणूकीसाठी इच्छूक आहेत. विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी नियमावली पारदर्शक करणे, पेटन्ट प्रणाली योग्य बनविणे गरजेचे असून सरकार प्रयत्नशील आहे. सध्या कंपन्यांना टेडमार्क मिळविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मार्च 2017 पर्यंत एका महिन्यापर्यंत खाली आणण्यास सरकार प्रयत्नशील आहे. ट्रेडमार्कसाठी नोंदणीत 10 टक्क्यांनी वृद्धी झाली असून परिक्षण कालावधीत 250 टक्क्यांपर्यंत घट झाली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लहान व्यावसायिकांसाठी गुगलकडून ‘माय बिझनेस’ ऍप

स्मार्टफोनवर बनविता येणार स्वतःची वेबसाईट

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल देशी उद्योजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. गुगलने लघू आणि मध्य उपक्रमातील पाच कोटी व्यावसायिकांना मदत करण्यासाठी पाऊल उचलले आहे. कंपनीने यासाठी ‘माय बिजनेस’ ही सेवा सादर करत नवीन मोबाईल ऍप्लिकेशन ‘प्रायमर’ आणि प्रशिक्षण मॉडय़ुल सहभागी केले. कंपनी भारतातील उत्पादकांना मदत करण्यासाठी काम करत आहे आणि यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम नेण्याचा प्रयत्न आहे, असे कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले.

भारतासारख्या देशातील समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आम्ही विश्वातील प्रत्येक देशाच्या समस्येचा विचार करतो. यातून आपल्याला पथक बनविण्याची प्रेरणा मिळते आणि आपली उत्पादने अनेकांच्या वापरासाठी योग्य व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माय बिजनेसच्या माध्यमातून कोणताही लहान उद्योजक केवळ स्मार्टफोनच्या सहाय्याने आपली वेबसाईट तयार करू शकतो असे त्यांनी म्हटले.

यावेळी पिचाई यांनी ‘डिजिटल अनलॉक्ड’ नावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यासाठी उद्योग क्षेत्रातील संघटना फिक्की आणि इंडियन स्कूल ऑफ बिजनेस बरोबर भागीदारी केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून लोकांना मोबाईल आणि ऑनलाईन पाठय़क्रम उपलब्ध करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून लहान व्यावसायिकांना डिजिटल प्रवास करण्यास मदत होईल. या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा