Post views: counter

Current Affairs March 2017 part 4

🔰 Current Affairs Marathi 🔰
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टाइम्स ऑफ इंडिया क्रीडा पुरस्कारांचे वितरण

टाइम्स ऑफ इंडिया क्रीडा पुरस्कारांचे वितरण सोमवारी क्रीडा जगतातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा 'स्पोर्टस पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात आला. रिओ ऑलिम्पिकच्या कुस्तीमध्ये भारतासाठी इतिहास रचून ब्राँझपदक पटकावण्याचा पराक्रम करणाऱ्या साक्षी मलिकला मोसमातील ज्युरी चॉइस सर्वोत्तम कुस्तीगीर हा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री विद्या बालन यांनी तिला पुरस्काराने गौरविले. तर, रिओ ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिकमध्ये थेट फायनलमध्ये धडक मारण्याची किमया करणारी पहिली भारतीय ठरलेल्या दीपा कर्माकारला मोसमातील सर्वोत्तम जिम्नॅस्ट ज्युरी चॉइस हा पुरस्कार देण्यात आला. ऑलिम्पियन जिम्नॅस्ट नादिया कोमेनेची हिच्या हस्ते दीपाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.


जेडब्ल्यू मॅरियट येथे पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्रीडाप्रकारांतील खेळाडूंना गौरवण्यात आले. १९७६च्या माँट्रियल ऑलिंपिकमध्ये १० पैकी १० गुण मिळवणारी नादिया कोमेनेची हिच्या प्रमुख उपस्थितीत हे वितरण पार पडले. टाइम्स ऑफ ​इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक जैन यांनी या पुरस्काराची पार्श्वभूमी समजावली. या क्रीडा पुरस्कार सोहळ्या सर्व क्रीडा प्रकारातील दिग्गज खेळाडूंनी उपस्थिती लावली होती.



पुरस्कार विजेते

> रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक पटकावून देणारी पी.व्ही.सिंधू मोसमातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटू ठरली (ज्युरी चॉइस). तसंच सिंधुचा 'स्पोर्टस पर्सन ऑफ द इयर'ने गौरव करण्यात आला.

> क्रीडा चाहत्यांनी सर्वोत्तम बॅडमिंटनपटू म्हणून निवड केली ती के. श्रीकांतची.

> रिओ ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिकमध्ये थेट फायनलमध्ये धडक मारणारी दीपा कर्माकारला मोसमातील 'सर्वोत्तम जिम्नॅस्ट ज्युरी चॉइस' हा पुरस्कार देण्यात आला.



> जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझपदक पटकावणारी द्रोणावल्ली हरिका हिला टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट पुरस्कारांमध्ये मोसमातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूचा सन्मान लाभला.

> टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची ललिता बाबर ठरली
सर्वोत्तम अॅथलिट (ज्युरी चॉइस). रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारल्याने तिला हा मान मिळाला.



> रिओ ऑलिम्पिकच्या कुस्तीमध्ये ब्राँझपदक पटकावत भारतासाठी इतिहास रचणारी साक्षी मलिक मोसमातील सर्वोत्तम मल्ल ठरली.



> टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट पुरस्कारांमध्ये मोसमातील सर्वोत्तम तिरंदाज ठरला (ज्युरी चॉइस) तो तिरंदाज अतनू दास.

> हॉकीमध्ये रुपिंदरपालसिंगला टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट पुरस्कारांमध्ये मोसमातील सर्वोत्तम (ज्युरी चॉइस) हॉकीपटू म्हणून गौरवण्यात आले.

> हॉकीमध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून जनतेने मात्र कौल दिला तो व्ही. आर. रघूनाथला.

> विश्वविजेती भारतीय ज्युनिअर हॉकी संघ ठरला 'टीम ऑफ द इयर'

> पॅराऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीसाठी देवेंद्र झझारिया, दीपा मलिक, मरिय्यपन थांगवेलू आणि वरूण भाटी यांचा विशेष पुरस्काराने गौरव

> भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ठरलाय 'पीपल्स चॉइस क्रिकेटर ऑफ द इयर'

> जगातील अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आर. अश्विन ठरलाय 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी

> ऑलिम्पिकमध्ये रोईंग क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दत्तू भोकनाळ ठरला 'रोवर ऑफ द इयर'

> बॉक्सर विजेंदर सिंह बेनिवाल 'पीपल्स चॉइस ऑफ इयर' पुरस्काराचा मानकरी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केरळ सरकार देणार इंटरनेटचा मानवी हक्क

इंटरनेटची उपलब्धता हा मानवी अधिकार घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य ठरणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी केरळ विधानसभेत कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात २० लाख कुटुंबांना इंटरनेट उपलब्ध व्हावे यासाठी विशेष फंडाची तरतूद करण्यात आली आहे.

हे इंटरनेट कनेक्शन एकतर सवलतीच्या दरात दिले जाईल किंवा मग पूर्णपणे मोफत तरी दिले जाईल असाही उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा विकसित राष्ट्रांमध्ये मूलभूत अधिकार असल्याचे मानले गेले आहे. २०१० मध्ये स्वीडन सरकार हे ब्रॉडबँड इंटरनेट हा प्रत्येक नागरिकांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यानंतर कॅनडा देशानेही असेच पाऊल उचलले. कॅनडाने आपल्या प्रत्येक नागरिकाला ५० एमबीपीएस गतीने इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली आहे.

या नव्या क्रांतीकारी योजनेसाठी नवी कंपनी स्थापन करण्यात येणार असून राज्य विद्युत मंडळाच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी म्हटले आहे. या योजनेसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आमचे पहिले काम असेल. या योजनेसाठी आम्ही केरळ इन्फ्रास्ट्रक्चर फंड बोर्डाकडून १ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहोत. त्यानंतर आम्ही टेलिकॉम कंपन्यांशी बोलणी करणार आहोत अशी माहिचीही अर्थमंत्र्यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आम्ही मोफत इंटरनेट कनेक्शन देणार आहोत, तर इतरांना सवलतीच्या दरात देण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही अर्थमंत्री म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोबाइल महाकंपनीचा उदय!

गुंतवणूकदार, स्पर्धक आणि आंतरराष्ट्रीय बाजार यांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरवत, ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर या कंपन्यांनी विलिनीकरणावर सोमवारी शिक्कामोर्तब केले. यामुळे देशात ग्राहकसंख्या व महसूल याबाबतीत नव्या महाकंपनीचा उदय होणार आहे! नव्या संयुक्त कंपनीची ग्राहकसंख्या ३९ कोटींवर जाणार आहे. ‘व्हॉट अॅन आयडिया!’ या भावनेने ग्राहक याचे स्वागत करतील, असा विश्वास आयडिया सेल्युलरच्या संचालक मंडळाने या विलिनीकरणाला मान्यता देताना व्यक्त केला.

आयडिया व व्होडाफोन यांचे विलिनीकरण हे समभागांसह होणार असल्यामुळे ते परिपूर्ण विलिनीकरण मानले जात आहे. यावेळी व्होडाफोनचा इंडस टॉवर्समध्ये असलेला ४२ टक्के हिस्सा तसाच राहणार आहे. याबरोबर व्होडाफोन नव्याने आयडियाच्या माध्यमातून समभाग बाजारात आणणार आहे. त्यामुळे व्होडाफोन इंडियाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रियाही सुरू होणार आहे. एकत्रिकरणानंतर व्होडाफोनकडे ४५.१ टक्के तर, तर आयडियाकडे २६ टक्के हिस्सेदारी राहील. व्होडाफोन आणखी ४.९ टक्के हिस्सेदारी आयडियाच्या प्रवर्तकांना हस्तांतर करणार आहे. त्यानंतर आगामी काही वर्षांत मूळ प्रवर्तकांची नव्या कंपनीत हिस्सेदारी सारखी होईल. विलीनीकरणाच्या घोषणेनंतर आयडियाच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. नव्या कंपनीवर व्होडाफोन व आयडियाचे संयुक्त नियंत्रण राहणार आहे. याला भागधारकांनी अनुमोदन दिले आहे.
दोन्ही ब्रँड बलशाली असल्यामुळे विलिनीकरणानंतर दोन्ही ब्रँडना स्वतंत्र व्यवसायही करता येईल, असे व्होडाफोनचे सीईओ व्हिटोरिओ कोलाओ यांनी सांगितले.

व्होडाफोन ः डिसेंबर २०१६पर्यंत २०४.६८ दशलक्ष ग्राहक व १८.१६ टक्के बाजारहिस्सा
आयडिया ः डिसेंबर २०१६पर्यंत १९०.५१ दशलक्ष ग्राहक व १६.९ टक्के बाजारहिस्सा
एअरटेल ः डिसेंबर २०१६पर्यंत २६५.८५ दशलक्ष ग्राहक व २३.५८ टक्के बाजारहिस्सा
विलिनीकरणानंतर...

महसुली उत्पन्न ८० हजार कोटींवर जाईल
दूरसंचार कंपन्यांच्या एकूण महसुलात ४३ टक्के हिस्सा व ग्राहकसंख्येत ४० टक्के हिस्सा काबीज केला जाईल
दिलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी नव्या कंपनीचा स्पेक्ट्रम २५ टक्क्याहून अधिक असेल
व्होडाफोन इंडियाचे बाजारमूल्य ८२ हजार ८०० कोटी तर आयडिया सेल्यलुरचे बाजारमूल्य ७२ हजार २०० कोटी रुपये होईल डिसेंबर २०१६पर्यंत एकत्रित कर्ज १.०७ लाख कोटी रुपये आहे.

बिर्ला समूहाला व्होडाफोनचे समभाग अधिक संख्येने घेता येतील. प्रति शेअर १३० रुपये या किमतीने ९.५ टक्के समभाग खरेदी करता येतील.

• अध्यक्ष आयडियाचाच

विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या नव्या संयुक्त कंपनीचे अध्यक्ष म्हणून कुमारमंगलम बिर्ला हे काम पाहतील. व्होडाफोनतर्फे मुख्य वित्त अधिकारी दिला जाईल. ही माहिती व्होडाफोनचे सीईओ व्हिटोरिओ कोलाओ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

• प्रक्रियेसाठी दोन वर्षांचा अवधी

व्होडाफोन आणि आयडिया यांच्यातील विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या विलीनीकरणामुळे चाळीस कोटी यूजर, टेलिकॉम बाजारपेठेतील ४३ टक्के हिस्सा आणि महसुलातील ४१ टक्के हिस्सा नव्या कंपनीच्या ताब्यात आला आहे. विलीनीकरणामुळे आदित्य बिर्ला समूहाकडे २६ टक्के हिस्सेदारी राहणार असून, आगामी काळात हिस्सेदारी वाढविण्यासाठी त्यांना व्होडाफोनकडून आणखी शेअरची खरेदी करावी लागणार आहे असे दोन्ही कंपन्यांतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

• रिलायन्स जिओचा परिणाम

मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या रिलायन्स जिओमुळे देशातील टेलिकॉम सेवा पुरवठादारांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. चीननंतरची सर्वांत मोठी टेलिकॉम बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. ‘जिओ’ने मोफत फोर जी सेवेचे आमिष दाखविल्यामुळे प्रस्थापित कंपन्यांच्या ग्राहकांनी ‘जिओ’ला आपलेसे करण्याचा निर्णय घेतला. जुन्या ग्राहकांना रोखण्यासाठी सर्वच कंपन्यांनी एकापेक्षा एक योजना सादर केल्या. मात्र, त्याचाही फारसा परिणाम झाला नाही.

• एअरटेलच्या नफ्यात मोठी घट

गेल्या चार वर्षांत प्रथमच ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये एअरटेलने सर्वांत कमी नफ्याची नोंद केली. याच कालावधीत आयडियालाही मोठे नुकसान सोसावे लागले. नवे स्पर्धक आणि नवनव्या स्पर्धांना तोंड देणे शक्य व्हावे या हेतूने जानेवारीच्या सुरुवातीलाच एअरटेलने नॉर्वेची टेलिनॉर कंपनी खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विलिनीकरण धमाका!

रिलायन्स जिओने सप्टेंबर २०१६पासून मोफत फोरजी सेवा देण्यास सुरूवात केल्यामुळे अन्य दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आपले ग्राहक जिओकडे जाऊ नयेत, यासाठी प्रत्येक कंपनी धडपडत आहे. यातूनच एकमेकांच्या साथीने अर्थात, विलिनीकरण करून व्यवसायवाढीचा मार्ग या कंपन्या अनुसरणार आहेत. अशा काही होऊ घातलेल्या विलिनीकरणांवर व अधिग्रहणांवर टाकलेला दृष्टीक्षेप...

भारती एअरटेल – टेलिनॉर

- टेलिनॉर कंपनीला अधिग्रहित केल्यावर भारती एअरटेलला टेलिनॉरकडून अतिरिक्त स्पेक्ट्रम मिळेल.
- अतिरिक्त स्पेक्ट्रममुळे एअरटेलला वेगवान फोरजी सेवा देता येईल.
- भारती एअरटेलचे २६.९ कोटी ग्राहक देशात आहेत. टेलिनॉर घेतल्यामुळे ५.२५ कोटी ग्राहक वाढणार आहेत.
- आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश व आसाम ही दाट लोकसंख्येची टेलिनॉरची सेवा घेणारी सर्कल्स (मंडल) एअरटेलला मिळतील.

टाटा टेलिसर्व्हिसेस – रिलायन्स कम्युनिकेशन्स – एअरसेल – एमटीएस

- चारही कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर स्थापन होणारी नवी कंपनी ही देशातील सर्वात मोठी तिसरी दूरसंचार कंपनी असेल
- टाटा टेलिसर्व्हिसेसचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज हा मोठा अडसर ठरणार आहे.
- टाटा सन्सकडून १० हजार कोटींचे अर्थसाह्य मिळण्याची शक्यता
- टाटा टेलिसर्व्हिसेसचे ५३ दशलक्ष ग्राहक, आरकॉम-एअरसेलचे एकत्र २६ कोटी ग्राहक असा मोठा ग्राहकवर्ग नव्या कंपनीला मिळणार
बीएसएनएल – एमटीएनएल
- विलिनीकरण दोन्ही कंपन्यांच्या पथ्यावर पडणार
- दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना होईल, तर एमटीएनएलच्या कर्जाबाबत नव्याने विचार केला जाईल
- विलिनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांना देशभर सेवा देणे शक्य होईल
- एमटीएनएलचे मुंबई व दिल्लीचे मार्केट बीएसएनएलला मिळेल तर, उर्वरित देशाची बाजारपेठ एमटीएनएलला मिळेल

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इंटरनेटविना हवामानाचे अपडेट्स!

इंटरनेटच्या सुविधेविना किंवा हाती स्मार्टफोन नसला तरीही खराब हवामान आणि आपत्कालीन परिस्थितीची पूर्वसूचना मिळणे शक्य होणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आयबीएमने या प्रणालीची निर्मिती केली आहे.

आयबीएमच्या ‘बिझनेस द वेदर कंपनी इंडिया’ सेल्सचे प्रमुख हिमांशू गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने ‘मेश नेटवर्क अलर्ट’ या प्रणालीची निर्मिती केली आहे. ही प्रणाली खराब हवामान आणि वादळांची पूर्वसूचना देणार आहे. इंटरनेटची सुविधा असणाऱ्या आणि नसणाऱ्या ठिकाणीही ही प्रणाली कार्यरत राहणार आहे. नेटवर्कमध्ये बिघाड झाला तरी, ही प्रणाली पूर्वसूचना देऊ शकते. हे तंत्रज्ञान द वेदर चॅनेल अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करता येणार आहे.

मेश नेटवर्क प्रणाली सिग्नल वितरित करण्यासाठी जवळच्या फोनना जोडते. या माध्यमातून ही प्रणाली फोन वापरणाऱ्यांना जोडून ठेवणे आणि त्यांना इंटरनेटविना हवामानाबाबत पूर्वसूचना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. खराब हवामान आणि अचानक येणाऱ्या वादळांमुळे अनेक देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. या पार्श्वभूमीवर या प्रणालीचा वापर करणे हितावह आहे, असेही गोयल यांनी नमूद केले. ‘या तंत्रज्ञानाशी जोडलेला प्रत्येक स्मार्टफोन माहितीचा स्रोत बनत जातो. हा स्रोत आलेल्या माहितीचे जतन करतो आणि सुरक्षित पद्धतीने अन्य उपकरणांना हस्तांतर करतो. अशाप्रकारे माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या एका साखळीची निर्मिती होते. या साखळीच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा नसतानाही संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो,’ असेही गोयल यांनी नमूद केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयडिया-वोडाफोनची 'युती'

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया सेल्युलर आणि वोडाफोन या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे. आज आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने यावर शिक्कामोर्तब केले. नव्या कंपनीत ४५ टक्के भागीदारी वोडाफोनची तर २६ टक्के भागीदारी आयडियाची असेल. भविष्यात ही भागीदारी समसमान होणार आहे.

आयडियाची किंमत ७२ हजार २०० कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. विलीनीकरणाची ही प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल. या दोघांच्या विलीनीकरणातून निर्माण होणाऱ्या नव्या कंपनीचा महसूल देशातल्या एकूण टेलिकॉम क्षेत्राच्या महसूलाच्या ४३ टक्के असणार आहे. हा महसूल ८० हजार कोटी पेक्षाही जास्त असेल. देशातले ४० टक्के मोबाईलधारक या नव्या कंपनीचे ग्राहक असतील.

गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या रिलायन्स जिओने पदार्पणातच संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवली. आधी वेलकम ऑफर आणि आता हॅपी न्यू इयर ऑफर देत मोफत व्हॉइस आणि डेटा सर्व्हिस देऊन मोठ्या प्रमाणावर मोबाईल ग्राहक आपल्याकडे वळवले. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे विलीनीकरण झाले आहे. मागील महिन्यात भारती एअरटेलनेही नॉर्वेची कंपनी टेलिनॉर सोबत हातमिळवणी केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोळशासाठी हॉलमार्क!

 दगडी कोळशाच्या गुणवत्तेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. या कोळशाची गुणवत्ता पारखून घेण्यासाठी हॉलमार्क पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. आतापर्यंत हॉलमार्क केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेचे मानक म्हणून वापरले जात असे. याखेरीज देशातील दगडी कोळशाच्या खाणींमध्ये कोळशाचे प्रमाण किती आहे याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी आयआयटी वाराणसी, आयआयटी गुवाहाटी व आयआयईएसटी शिवपूर यांची मदत घेतली जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तमिळनाडूला विजेतेपद

अनुभवी दिनेश कार्तिकच्या शतकाच्या जोरावर तमिळनाडूने सोमवारी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत बंगालवर ३७ धावांनी मात केली आणि विजेतेपद पटकावले.

तमिळनाडू आणि बंगाल यांच्यात २००९ आणि २०१०मध्ये या स्पर्धेची अंतिम लढत झाली होती. त्यात दोन्ही वेळा तमिळनाडूने बंगालला हरवून जेतेपद मिळविले होते. या वेळीही तशाच कामगिरीची पुनरावृत्ती तमिळनाडू करणार की, ‘त्या’ पराभवाचे उट्टे काढून बंगाल विजेतेपद मिळविणार, याबाबत उत्सुकता होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूने २१७ धावांपर्यंत मजल मारली. त्यात दिनेश कार्तिकने मोलाचा वाटा उचलला. अकराव्या षटकात तमिळनाडूची ४ बाद ४९ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने बाबा इंद्रजितच्या साथीने तमिळनाडूला सव्वाशे धावांचा टप्पा पार करून दिला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. इंद्रजित धावबाद झाला. त्याने ४९ चेंडूंत एका चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. त्यानंतर दिनेश कार्तिकने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ३७व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरही धावबाद झाला. दिनेश कार्तिकने एकबाजू लावून धरत तमिळनाडूला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. ४८व्या षटकात महंमद शमीच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक हिट विकेट झाला आणि तमिळनाडूचा डाव संपुष्टात आला. दिनेश कार्तिकने १२० चेंडूंत चौदा चौकारांसह ११२ धावांची खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालची २१व्या षटकात ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सुदीप चॅटर्जी आणि अनुस्तुप मजुमदार यांनी बंगालला सव्वाशे धावांचा टप्पा पार करून दिला. ही जोडी जमली असे वाटत असतानाच ३६व्या षटकात अपराजितने अनुस्तुपला पायचित केले. त्यानंतर बंगालचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस ४६व्या षटकात बंगालचा डाव १८० धावांवर संपुष्टात आला. बंगालकडून सुदीपने ७९ चेंडूंत पाच चौकारांसह सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा अखेर अस्तित्वात

 पाकिस्तानात हिंदूंच्या विवाहाशी संबंधित कायदा अस्तित्वात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी याला मंजुरी दिल्याने आता पाकिस्तानात राहत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाला कायदेशीर मंजुरी मिळणार आहे. सिंध प्रांत वगळून पूर्ण पाकिस्तानात लागू होणारा हा पहिलाच कायदा आहे. सिंधचा स्वतंत्र विवाह कायदा आहे. नवाज शरीफ यांच्या सल्ल्यावर हिंदू विवाह कायदा 2017 ला राष्ट्राध्यक्षांनी मंजुरी दिल्याचे पाकच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले. या कायद्याचा उद्देश हिंदूंचे विवाह, त्यांचे कुटुंब, महिला आणि मुलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आहे. हा कायदा पाकिस्तानात राहत असलेल्या हिंदूंच्या विवाहांच्या विधींना पूर्ण करण्यास सहाय्यभूत ठरेल असेही वक्तव्यात नमूद करण्यात आले. तर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांना समानतेचा हक्क मिळावा हे आपल्या सरकारने नेहमीच लक्षात ठेवल्याचे सांगितले. पाकचे अल्पसंख्याक इतर समुदायांप्रमाणेच देशभक्त आहेत. यामुळे त्यांना समानतेचा हक्क देणे देशाची जबाबदारी बनते असे शरीफ यांनी उद्गार काढले.

कायद्यातील तरतुदी

सरकार हिंदूंच्या लोकसंख्येच्या हिशेबाने प्रत्येक भागात विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करणार आहे. या कायद्यामुळे विवाहाच्या अधिकारांची पूर्तता, विभक्त झाल्याच्या स्थितीत पत्नी आणि मुलांच्या आर्थिक सुरक्षेचा हक्क देखील देतो.

 याशिवाय हा कायदा विधूर व्यक्तीला पुन्हा विवाह करण्याचा, विधवेला पूनर्विवाहाचा अधिकार प्रदान करतो. तसेच यात अनौरस मुलांना देखील कायदेशीर हक्क देण्यात आले आहेत. हा कायदा बनण्यापूर्वी झालेले हिंदूंचे विवाह देखील वैध मानले जातील. याच्याशी संबंधित याचिकांना कुटुंब न्यायालयात सादर केले जाईल. हा कायदा मोडल्यास तुरुंगवास आणि 1 लाखाचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. पाक संसदेने 10 मार्च रोजी या कायद्याला संमती दिली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डेन्मार्क जगातील सर्वात आनंदी देश

संयुक्त राष्ट्राच्या संस्थेकडून यादी जाहीर

वर्ल्ड हॅप्पीनेस अहवाल 2017 नुसार डेन्मार्क हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱया नॉर्वेला मागे टाकून डेन्मार्कने हा मान मिळविला आहे. संयुक्त राष्ट्राने याप्रकारचे मानांकन सुरू करण्याची मोहीम 2012 साली सुरू केली होती.

कोणत्याही देशातील सामाजिक सुरक्षा आणि न्यायसमवेत तेथील लोकांमधील समानता, राहणीमान यांचा विचार करून हे मानांकन ठरविले जाते. या अहवालाची निर्मिती सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्ककडून केली जाते. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या मानकांनुसार सर्व देशांच्या आकडेवारीचा विचार करून ही यादी तयार करते.

155 देशांच्या या यादीत आफ्रिकेच्या काही देशांबरोबरच सीरिया आणि येमेन सर्वात तळाला आहेत. ही यादी तयार करण्यापूर्वी संबंधित देशांमधील लोकांचा समृद्धी स्तर, आरोग्य संतुलन, लोकांचा सरकारवरील विश्वास, लोकांमधील असमानतेचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊन आकडे तयार करण्यात आले. तसेच जीडीपी, सुदृढ आयुर्मान, स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षा, सरकार आणि व्यापार समवेत तेथे असणारा भ्रष्टाचारही पाहण्यात आल्याचे एसडीएसएनचे संचालक जेफरी सॅक्स यांनी सांगितले.

युरोपीय देशच आघाडीवर

विकासाच्या शर्यतीत खूपच मागे राहिलेल्या देशांना शिकवण देण्याचा उद्देश या अहवालामागे असल्याचे त्यांनी म्हटले. या यादीत डेन्मार्क अग्रस्थानी असून त्यानंतर आइसलँड, स्वीत्झर्लड, फिनलँड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन यांना स्थान मिळाले आहे.

आफ्रिकी देश तळाला

तर यादीत सर्वात शेवटी दक्षिण सूदान, लायबेरिया, गयाना, टोगो, रुआंडा, टांझानिया आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन सारखे देश सामील आहेत.
या यादीत अमेरिकेला 14 वे स्थान, जर्मनीला 16वे तर इंग्लंडला 19 आणि फ्रान्सला 31 वे स्थान मिळाले आहे.

अमेरिकेचे मानांकन खालावले

अमेरिकेत आलेली असमानता आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे त्याचे मानांकन खालावल्याचे जेफरी यांनी म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे तेथील लोकांमध्ये असमानता पाहावयास मिळत आहे. तर संरक्षण आणि लष्करावरील खर्च आणि आरोग्यविम्याची भूमिका देखील याचे मोठे कारण राहिले आहे. सर्व देशांनी हा अहवाल पाहून आपल्या धोरणांमध्ये बदल करावेत असे जेफरी यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹संयुक्त राष्ट्राच्या समूहात स्वामीनाथन यांची नियुक्ती

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालिका सौम्या स्वामीनाथन यांना संयुक्त राष्ट्राच्या एका उच्चस्तरीय समूहात नियुक्त करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍण्टोनिओ गुतेरेस यांनी या समूहाची स्थापना जगभरात विषाणूविरोधी कार्यक्रमासाठी केली आहे. हा समूह अनुभवांच्या देवाणघेवाणीबरोबरच समन्वयाचे काम करणार आहे. समूहाचे सहअध्यक्षत्व उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालिका मार्गारेट चान करतील. स्वामीनाथन या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव देखील आहेतबालरोगतज्ञ असणाऱया स्वामीनाथन यांना क्षयरोगावरील त्यांच्या संशोधनासाठी देखील ओळखले जाते. स्वामीनाथन यांनी 1992 साली क्षयरोग संशोधन केंद्र चेन्नईत काम सुरू केले होते. आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी 23 वर्षे काम केले आहेत. पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस आणि नवी दिल्लीच्या एम्समधून त्यांनी एमडीची पदवी प्राप्त केली. त्यांना लॉस एंजिलिसच्या बालरुग्णालयाकडून फेलोशिप देखील मिळाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महिला बँकेचे होणार एसबीआयमध्ये विलीनीकरण

तीन महिन्यांत सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता : अन्य बँकांचे 1 एप्रिलपासून अधिग्रहण

एसबीआयमध्ये पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्यास केंद्र सरकारने गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे. महिलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय महिला बँकेच्या एसबीआयमध्ये विलीनीकरणासंदर्भात सरकारने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र आगामी तीन महिन्यांच्या आत सरकारकडून अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात सरकारकडून तीन महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एसबीआयमध्ये महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी देण्यात आल्यानंतर सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचे पहिले सत्र समाप्त होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेने अधिग्रहणाच्या पहिल्या चरणास प्रारंभ झाला होता.

भारतीय महिला बँकेची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली. देशातील सर्व राज्यांत या बँकेच्या शाखा असून त्यांची संख्या 103 आहे. बँकेचा एकूण व्यवहार 1,600 कोटी रुपयांचा आहे. कंपनीजवळ 1 हजार कोटी रुपये जमा रक्कम असून 600 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. अन्य सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण समजण्यात येत आहे.
एसबीआयमध्ये करण्यात येणाऱया विलीनीकरणामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर यांचा समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गंगा आणि यमुना या नद्या ‘सजीव’: उत्तराखंड हायकोर्ट

गंगा आणि यमुना या ‘सजीव’ असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उत्तराखंड हायकोर्टाने दिला आहे. यामुळे या दोन्ही नद्यांना आता मानवाधिकार लागू होणार असून नद्यांमध्ये प्रदुषण करणाऱ्यांवर आता चाप लावण्यात मदत होऊ शकेल.

गंगानदीवषियी उत्तराखंड कोर्टात याचिका दाखल झाली आहे. हायकोर्टाच्या निकालाविषयी माहिती देताना वकील एमसी पंत म्हणाले, हायकोर्टाने माणसाला दिलेले सर्व अधिकार गंगा आणि यमुना या नदीला लागू करण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टाने दोन्ही नद्यांना मानवाधिकार देतानाच नमामी गंगा मोहीमेचे संचालक, उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि महाधिवक्ता हे या नदीचे ‘कायदेशीर पालक’ असतील. या नदीचे संरक्षण, जतन करण्याची जबाबदारी त्यांची असेल असे हायकोर्टाने स्पष्ट केले.

हरिद्वारमधील रहिवासी मोहम्मद सलिम यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गंगा नदीच्या शक्ती कालव्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवावे असे आदेश हायकोर्टाने डेहराडूनच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडमधील एका नदीला अशाच स्वरुपाचे मानवाधिकार देण्यात आले आहे.

गंगा आणि यमुना या नद्यांना भारतात धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचा फटका या नद्यांना बसला आहे. नद्यांमधील प्रदुषणाची पातळीही वाढल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुकेश अंबानी भारतीय अब्जाधीशांमध्ये ‘टॉप’; बिल गेट्स जगात सर्वात श्रीमंत

भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे. तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. गेट्स हे सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे.

बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंतांच्या फोर्ब्सच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले आहे. २२० क्रमांकावरून ५४४ व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे. गेट्स सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी राहिले आहेत. बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची ७५.६ अब्ज डॉलर संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. अव्वल दहा जणांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या तर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत. जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २ हजार ०४३ वर पोहोचली आहे. फोर्ब्जकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या यादीच्या ३१ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठी झेप आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे. या यादीतील अब्जाधीशांमध्ये ५६५ अमेरिका, चीन ३१९, जर्मनीतील ११४ जण आहेत. ट्रम्प हे ५४४ व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर आहे. अब्जाधीशांच्या या यादीत भारतातील १०१ व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील १३ व्यक्तींना पहिल्यांदाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. भारताकडून मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची २३.२ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. या यादीत ते ३३ व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्या स्थानी होते. त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल ५६ व्या स्थानी, तर अझीम प्रेमजी ७२ व्या स्थानी आहेत. दिलीप संघवी ८४ तर शीव नाडर १०२व्या स्थानी आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹UN सरचिटणीसांकडून ‘हैती पीसकिपिंग

मिशन’ बंद करण्याचा प्रस्ताव सादर
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ऑक्टोबरपर्यंत हैतीमध्ये सुरू असलेले ‘UN पीसकिपिंग मिशन’ बंद करण्यास आणि त्याला अगदी थोड्या प्रमाणात संयुक्त राष्ट्रसंघाची उपस्थिति दर्शवणार्या बदलासह बदलण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

हैतीमधील ‘UN पीसकिपिंग मिशन’ (फ्रेंच भाषेत MINUSTAH) 13 वर्षापासून म्हणजेच 2004 सालापासून सुरू आहे. अमेरिकेने UN ला देशाकडून पुरविला जाणारा निधि कमी करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार, UN सुरक्षा परिषदेने त्याचे सर्व 2,370 सैनिक हळूहळू मोहिमेमधून परत बोलावले जात आहेत आणि ऑक्टोबर 2017 पर्यंत मोहीम बंद केली जाणार. नवीन मोहिमेत MINUSTAH मध्ये कार्य करण्यासाठी सध्याच्या 1,001 पोलीस अधिकार्यांपैकी फक्त 295 अधिकारी ठेवले जाणार. सध्या दरवर्षी या मोहिमेला $ 346 दशलक्षचे अर्थसंकल्प लागते, त्यामुळे हे बंद केल्यास नव्या लहान स्वरुपाच्या मोहिमांना जागा मिळेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹22 मार्च: जागतिक जल दिन

दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस “व्हाय वेस्टवॉटर?” या संकल्पनेखाली साजरा केल्या जात आहे.

1993 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेकडून अधिकृतपणे 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यास मान्य केले गेले. प्रथम जागतिक जल दिन 1993 साली साजरे केले गेले होते.

UN ने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येय (SDG)-6 ला अनुसरून ही संकल्पना मांडली गेली आहे. SDG-6 म्हणजे सन 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता यांची उपलब्धता व स्थायी व्यवस्थापन सुनिश्चित करणे. जागतिक पातळीवर समाजाद्वारे निर्मीत 80% सांडपाणी उपचार न करता किंवा पुन्हा न वापरता पर्यावरणात सोडले जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत, पाकिस्तान “मियार प्रकल्प” चे
पुनरावलोकन करणार

भारत आणि पाकिस्तान यांनी मियार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा संरचित करण्यासाठी मान्य केले आहे. इस्लामाबादमध्ये सिंधू जल आयुक्तांच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चिनाब नदीची मियार नल्लाह या उपनदीवर हिमाचल प्रदेशमध्ये मियार जलविद्युत प्रकल्प उभारण्याची योजना आहे.

तसेच यावेळी लोअर कल्नाई आणि पकल दुल प्रकल्पांची पुन्हा पाहणी करण्याचे मान्य केले गेले. हे प्रकल्प 1960 सिंधू जल तहांतर्गत साकारण्याचे मानी केले गेले आहे. बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व के. सक्सेना यांनी तर पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व मिर्झा असिफ सईद यांनी केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹छापील पत्रकारितेमध्ये उत्कृष्टतेसाठी KCK आंतरराष्ट्रीय पुरस्कार सादर

भारतीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नवी दिल्ली येथे राजस्थान पत्रिका द्वारा आयोजित छापील पत्रकारितेमध्ये उत्कृष्टतेसाठी (Excellence in Print Journalism) KCK आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले आहेत.

2014 सालासाठी, वांजोही काबूकुरू यांच्या चमूला लंडन आधारित न्यू आफ्रिकन मॅगजीन मध्ये प्रकाशित ‘हाऊ ईस्ट आफ्रिका लॉस्ट इट्स इनोसेन्स’ या गोष्टीला पुरस्कार देण्यात आला. 2015 सालासाठी, अमर उजाला मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सेक्सुयल हरॅसमेंट इन नारी निकेतन’ या तपासपूर्ण बातमीच्या मालिकेसाठी राकेश शर्मा आणि त्यांच्या चमूला पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्कारामध्ये US $11000 रोख रक्कम दिली जाते. हा पुरस्कार राजस्थान पत्रिकेचे संस्थापक कपूर चंद्रा कुलीश यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाते.

छापील पत्रकारितेसंदर्भात, भारतात 1819 साली राजा राममोहन रॉय यांनी 'सामवाद कौमुदी' सुरू केले होते. त्यानंतर महात्मा यांनी 'समाचार चंद्रिका' आणि 'मिरत-उल-अखबार', 'हरिजन अँड यंग इंडिया' या वृत्तपत्रिकेला संपादित केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सरकारने ऑलिम्पिक विजेत्यांना राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नेमले

भारत सरकारने 12 क्रीडा प्रकारासाठी 14 ऑलिम्पिक विजेत्यांना राष्ट्रीय निरीक्षक (National Observers) म्हणून नेमले आहे.

यामध्ये ऍथलेटिक्स (पी. टी. उषा, अंजू बॉबी जॉर्ज), तिरंदाजी (डॉ संजीव कुमार सिंग), बॅडमिंटन (अपर्णा पोपट), मुष्टियुद्ध (मेरी कोम, अखिल कुमार), हॉकी (जगबीर सिंग), शूटिंग (अभिनव बिंद्रा), टेनिस (सोमदेव देववर्मन), भारोत्तोलन (कर्नम मल्लेश्वरी), कुस्ती (सुशील कुमार), फुटबॉल (आय. एम. विजयन), जलतरण (खजान सिंह), टेबल टेनिस (कमलेश मेहता) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय निरीक्षक खेळाडूंच्या गुणवत्तेपासून ते त्यांच्या विकासासाठी कारणीभूत ठरणार्या दीर्घकालीन विकास योजना, प्रशिक्षण, विविध धोरणे अश्या विविध पैलूवर भारतीय ऑलिम्पिक महामंडळाच्या समावेशासह सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांना (NSFs) मदत करतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शास्त्रज्ञांनी अति-जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करणारी नवी Wi-Fi प्रणाली विकसित केली

नेदरलॅंन्डमधील आइंडहोवेन यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी एक नवे वायरलेस इंटरनेट इन्फ्रारेड (अवरक्त) किरणांवर आधारित नेटवर्क विकसित केले आहे, जे विद्यमान Wi-Fi (वायरलेस फिडेलिटी) नेटवर्कपेक्षा 100 पट वेगाने काम करते.

नव्या यंत्रणेमध्ये प्रति सेकंद 40 गिगाबिट्स (Gbit/s) पेक्षा अधिक इतकी प्रचंड क्षमता आहे. या नेटवर्कमध्ये वायरलेस डेटा प्रक्षेपित करण्यासाठी काही केंद्रीय 'लाइट अॅंटेना' वापरले गेले आहे. यामध्ये सुरक्षित रेडिओ लहरी वापरल्या गेल्या आहेत. यामध्ये 1500 नॅनोमिटर आणि अधिक इन्फ्रारेड रेडिओ लहरी वापरले आहे. तसेच Wi-Fi लहरीसाठी 2.5 किंवा पाच गिगाहर्त्झ वारंवारता वापरते.

या नेटवर्कवर, संशोधकांना 2.5 मीटर अंतरावर 42.8 Gbit/s गती साध्य करता आली, जी सध्या वापरकर्त्याला जास्तीत जास्त 300 mbps इतकी उपलब्ध आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एलएचसी प्रयोगात पाच नवीन कणांचा शोध

अणूचे पाच नवीन उपकण लार्ज हैड्रॉन कोलायडर या महाकाय उपकरणाच्या मदतीने केलेल्या प्रयोगात शोधण्यात आले आहेत. एकाच निरीक्षणात अणूच्या उपकणातील पाच अवस्था सापडण्याचे हे दुर्मीळ संशोधन आहे.

एलएचसी प्रयोग हा जगातील सात कण भौतिकी शोधन प्रयोगांपैकी एक असून युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीयर रीसर्च या संस्थेच्या नेतृत्वाखाली तो केला जात आहे. काही अणू उपकणांचे क्षरण यात आढळून आले असून त्यात द्रव्य-प्रतिद्रव्य असममिती दिसून आली आहे. नवीन कण हे उत्तेजित अवस्थेत असून त्यांची ऊर्जा क्षमता खूप जास्त आहे. यातील कणाचे नाव ओमेगा सी झिरो असे आहे, त्याला बेरीऑन असेही म्हणतात. त्यात तीन क्वार्क असतात.

ओमेगा सी झिरोचे क्षरण होऊन एक्सआय -सी -प्लस व काओन के हा कण तयार होतो, एक्स आय प्लस कणाचे क्षरण होऊन त्यात काओन के व प्रोटॉन पी व पियॉन पी प्लस हे कण तयार होतात. ओसी (३०००)०, ओसी (३०५०) ०, ओसी (३०६६) ०, ओसी (३०९०) ० व ओसी (३११९)० अशी या कणअवस्थांची नावे असून त्यात त्यांचे वस्तुमान मेगाइलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे, बेरीऑन मध्ये तीन क्वार्क कसे बंधित असतात व क्वार्कमधील परस्पर संबंधातून मल्टी क्वार्क स्टेटसचेही ज्ञान मिळणार आहे. त्यात टेट्राक्वार्क व पेंटाक्वार्कचा समावेश आहे.

या कणांचे पुजांक शोधणे अजून बाकी आहे, त्यांचे गुणधर्मही अधिक सखोलतने शोधावे लागतील, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यामुळे पुंज भौतिकीतील संशोधनात मोठी प्रगती होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर यांचे निधन

अमेरिकेत खनिज तेल उद्योगाचा पाया रचणारे जॉन डेव्हिडसन रॉकफेलर (सीनिअर) यांचे नातू आणि दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर यांचे वयाच्या १०१व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले. न्यू यॉर्कच्या पोकॅन्शियो हिल परिसरातील प्रासादात मंगळवारी निद्रावस्थेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्यांचे प्रवक्ते फ्रेझर सिटेल यांनी सांगितले. त्यांचे आजोबा अमेरिकेतील पहिले अब्जाधीश म्हणून गणले जातात. वडिलोपार्जित अब्जावधींच्या मालमत्तेचे धनी असूनही त्यांनी रॉकफेलर घराण्याची दानशूरतेची परंपरा अबाधित राखली. लहानपणापासून त्यांना मिळणाऱ्या खर्चाच्या पैशातून काही हिस्सा समाजकार्यासाठी राखून ठेवण्याचे त्यांच्यावर संस्कार झाले होते. त्याचा पगडा इतका होता की, २०१५ साली १०० वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी अमेरिकेतील मेन या राज्याला राष्ट्रीय उद्यानाजवळील १००० एकर जमीन दान केली होती. न्यू यॉर्क शहर आणि जगभरातील अनेक संस्था व प्रकल्पांना त्यांनी मुक्त हस्ताने मदत केली होती. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना त्यांनी सल्ला दिला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. रॉकफेलर घराण्याच्या निकटवर्तीय वंशजांपैकी ते अखेरचा दुवा होते.

हार्वर्ड विद्यापीठातून ते १९३६ साली पदवीधर झाले आणि १९४० साली शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी सेवाही बजावली. त्यानंतर चेस बँकेत (१९५५ साली मॅनहटन कंपनीत विलीन झाल्यावर चेस मॅनहटन बँक आणि आता जेपी मॉर्गन चेस) रुजू होऊन यथावकाश अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्यकाळात बँकेने १९७४ साली तत्कालीन सोव्हिएत महासंघ, चीन आणि १९५६ च्या सुएझ युद्धानंतर इजिप्तमध्येही शाखा उघडल्या. दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन वर्णद्वेषी राजवटीशी व्यावसायिक संबंध आणि १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर पदच्यूत झालेल्या इराणच्या शाह यांना अमेरिकेत वैद्यकीय उपचारांसाठी केलेली मदत यामुळे ते वादात सापडले. डेव्हिड यांचा १९४० साली मार्गारेट मॅक्ग्राथ यांच्याशी विवाह जाला होता. त्यांना सहा अपत्ये होती. मार्गारेट यांचा १९९६ साली मृत्यू झाला होता.

आपल्या हयातीत त्यांनी १०० देशांच्या २०० हून अधिक प्रमुखांच्या भेटी घेतल्या होत्या. जागतिक मंचावर त्यांचा दबदबा इतका होता की, कोणत्याही देशात गेले तरी त्यांना एखाद्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे मानसन्मान मिळत असे. मात्र त्यांनी प्रत्यक्ष कोणतेही राजकीय पद न स्वीकारता आपला प्रभाव टाकणे पसंत केले. अमेरिकी भाडवलशाहीचे मोकळेपणे कौतुक करत असत. त्यामुळेच जगात संपत्तीनिर्मितीला चालना मिळून समृद्धी आल्याचे ते मानत. मात्र त्या व्यवस्थेला अधिक कार्यक्षम व भ्रष्टाचारमुक्त केले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

फिरते प्रसूतिगृह


       आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा 3 वर्षांपूर्वी सुरू केली. रस्ते अपघातातील जखमी, विविध हल्ल्यांत जखमी होणे, हृदयविकार असणारे, आगीत जखमी होणे, विषबाधा अशा इत्यादी रुग्णांना जवळच्याच रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी पोहोचता यावे, हा उद्देश त्यामागे ठेवण्यात आला.
        ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत 14 लाख जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. विशेषत: गरोदर महिलांसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी मदतीला धावून आल्याचे दिसते. गेल्या 3 वर्षांत 13 हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाली आहे. त्यामुळे गरोदर महिलांसाठी ही रुग्णवाहिका ‘प्रसूतिगृह’च बनली आहे.
सध्या 108 क्रमांकाच्या राज्यात 937 रुग्णवाहिका कार्यरत असून, यात 704 रुग्णवाहिका प्राथमिक वैद्यकीय सुविधा, तर 233 रुग्णवाहिका या अत्याधुनिक व सुसज्ज अशा आहेत. ग्रामीण भागात 1 लाख लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका, तर शहरी भागात 2 लाख लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका असे प्रमाण या रुग्णवाहिकेचे ठरवण्यात आले.
       108 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर, अवघ्या 20 मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी उपलब्ध होते. या रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यासाठी आणि जवळच्याच रुग्णालयापर्यंत रुग्णांना नेण्यासाठी एक डॉक्टरही उपलब्ध करण्यात आला आहे. जानेवारी 2014 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत या रुग्णवाहिकेने 14 लाख 10 हजार 709 जणांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गरोदर महिलांना या रुग्णवाहिकेची चांगलीच मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे, प्रसूती वेदना होणार्‍या 4,36,512 महिलांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत राज्यातील लोकांना होत आहे. खासकरून अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना याची मदत मिळत आहे.
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा-प्रकल्प संचालक - डी. जी. जाधव

नॉर्वे जगातील सर्वांत आनंदी देश; भारत 122 वा


        दहशतवादाने त्रस्त पाकिस्तानने भारतावर मात करीत 80 वे स्थान मिळविले आहे, तर गरीब समजला जाणारा नेपाळही भारतापेक्षा आनंदी ठरला आहे. त्याचा क्रमांक 99 वा असून भूतान 97, बांगला देश 110 व श्रीलंका 120 व्या क्रमांकावर आहे.
       भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) ’वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017’मध्ये जागतिक आनंदी अहवाल काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉर्वेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसर्‍या स्थानावर आहे.
       ’यूएन’च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश केला आहे. 13 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला. त्यावेळी या अहवालाचे प्रकाशन केले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी केली होती. असमतोल, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन 1 ते 10 क्रमांकात केले आहे.
       सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास ’यूएन’ने 2012 पासून सुरुवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश आहे. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झंलंड व फिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम युरोप व उत्तर अमेरिकेनेही यात वरचे स्थान मिळविले आहे. यानुसार अमेरिका 14 व्या तर ब्रिटन 19 व्या स्थानावर आहे

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रायलकडून शिकवण घेण्याची गरज

पाण्याची नासाडी रोखण्यास जगात अव्वल

22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. यावेळच्या जलदिनासाठी संयुक्त राष्ट्राने ‘पाण्याची नासाडी का’ असा विषय ठेवला होता. संयुक्त राष्ट्राच्याच एका अहवालानुसार जगभरातील घरे, शेती आणि कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱया जवळपास 80 टक्के पाणी वाया होऊन जाते, तर इस्रायलसारखा छोटा देश वापर झालेल्या 80 टक्के पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूनर्वापर करतो.

जगात प्रतिदिन 95 टक्के पाण्याची नासाडी

युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वेनुसार एक व्यक्ती प्रतिदिन सरासरी 100 गॅलन पाणी वापरतो. यापैकी 95 टक्के पाणी (76 ते 95 गॅलन) पुन्हा वापरले जात नाही. 2030 पर्यंत पाण्याच्या मागणीत 50 टक्के वाढ होणार असल्याने पाण्याचा पूनर्वापर करणे अनिवार्य बनले आहे.

40 टक्क्यांची टंचाई

संयुक्त राष्ट्रानुसार जर जगभरात पाण्याच्या बचतीवर काम केले गेले नाही तर पुढील 15 वर्षांमध्ये 40 टक्के पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

प्रक्रियेसाठी 4 प्रकल्प

इस्रायलमध्ये सरासरी फक्त 10 सेंटीमीटर पाऊस पडतो तर 80 टक्के पाण्याचा तेथे पूनर्वापर केला जातो. कृषी कार्यांसाठी 70 ते 80 टक्के ठिबक सिंचनाचा वापर इस्रायलकडून होत असतो. तेथील सरकारने खाऱया पाण्यावर प्रक्रियेकरता 4 मोठे प्रकल्प उभारले आहेत.

सिंचनात वापर

इस्रायल सरकारच्या आकडेवारीनुसार देशात 80 टक्के प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्यापैकी 75 टक्के हिस्सा सिंचनासाठी वापरला जातो. हे प्रमाण 2025 पर्यंत वाढवून 95 टक्के केले जाणार आहे.

भारताची स्थिती

भारताचा विचार केल्यास, येथे पाण्याच्या पूनर्भरणाची कोणतीही योग्य व्यवस्था नाही. देशाच्या शहरी भागामंध्ये केवळ 30 टक्के सांडपाणीच पूनर्वापरायोग्य बनविले जाते. उर्वरित 70 टक्के पाणी वाया होऊन जाते. भारताची लोकसंख्या जगाच्या 18 टक्के एवढी आहे, जगात अस्तित्वात असणाऱया पाण्याचा फक्त 4 टक्के हिस्सा भारताला उपलब्ध आहे.

सातत्याने भूगर्भजलाचा उपसा
देशात 1951 पासून 2009 दरम्यान कृषी क्षेत्रात इलेक्ट्रिक पंपसेटचा वापर 26 हजारवरून वाढत 1 कोटी 6 लाखपर्यंत पोहोचला आहे. तर डिझेल इंजिन सेटचा वापर 83 हजारांवरून 92 लाखांवर गेला आहे. शेतीसाठी सातत्याने भूगर्भजलाचा उपसा केला जात असल्याने भूजल पातळी खालावत चालली
आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन

महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक, राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक गोविंद तळवलकर यांचं आज अमेरिकेत राहत्या घरी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होतेय.

महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची धुरा तब्बल २७ वर्षं सांभाळलेले गोविंद तळवलकर हे पत्रकारितेतील मानदंड ठरले होते. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता. त्यातून त्यांच्या कर्तृत्त्वाची कल्पना येऊ शकते.

२२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीतील सुसंस्कृत घरात जन्मलेले गोविंद तळवलकर यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेत प्रवेश केला होता. एका नियतकालिकामध्ये ते लिखाण करू लागले. त्यानंतर, २३व्या वर्षी ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले होते. लोकमान्य टिळक, एम एन रॉय यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक झाल्यानंतर तर त्यांच्या लेखणीला वेगळीच धार आली होती. त्यांचं लिखाण अत्यंत परखड, अभ्यासपूर्ण आणि अभिजात दर्जाचं होतं. राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर निर्भिडपणे प्रहार करत, सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या लेखणीचा प्रभावी वापर केला होता. त्यांचे अनेक लेख, त्यांनी मांडलेले विचार आजही कालसुसंगत वाटतात, हे त्यांचं मोठं यश म्हणावं लागेल.
गोविंद तळवलकर यांनी मराठीसोबत इंग्रजीतही विपुल लिखाण केलं होतं. द टाइम्स ऑफ इंडिया, द टेलिग्राफ, द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, फ्रंटलाइन मॅगझिन, डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रांमधील त्यांचे लेखही गाजले होते.

पत्रकारितेतील या योगदानाबद्दल गोविंद तळवलकर यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आलं होत. त्याचप्रमाणे, बी डी गोयंका, दुर्गा रतन पुरस्कार आणि रामशास्त्री पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. पत्रकारितेतील दोन पिढ्यांना त्यांनी दिशादर्शन केलं, आपल्या लेखनाने समृद्ध केलं.

साहित्यक्षेत्रातही गोविंद तळवलकर यांनी आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं होतं. त्यांची २५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नौरोजी ते नेहरू, विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे, नेक नामदार गोखले, भारत आणि जग, इराकदहन, अग्निकांड, अग्रलेख, पुष्पांजली, लाल गुलाग, नियतीशी करार, बदलता युरोप, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त ही त्यापैकी काही संग्राह्य साहित्यसंपदा. ती पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मोलाचा दस्तऐवज ठरणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय हवाई दल इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास करणार; चीन, पाकिस्तानला नो एंट्री

भारतीय हवाई दलाचे वैमानिक इस्रायलमध्ये जाऊन युद्धाभ्यास करणार आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह भारतीय वैमानिक संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही. हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जातो आहे.

इस्रायलमध्ये करण्यात येणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. भारतीय हवाई दलाचे वैमानिक वर्षाच्या शेवटी ब्लू फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे इकॉनॉमिक टाईम्सने म्हटले आहे. भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.

इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे. भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. जवळपास १०० लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे. यामध्ये भारताची कोणती विमाने सहभागी होणार आहेत, याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिलेली नाही. मात्र मानवरहित हॉरेन एरियल व्हेईकल यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याआधी भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील रेड फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी घेतला होता. भारतीय सैन्याने मे २०१६ मध्ये अलास्कामध्ये संयुक्त युद्धाभ्यास केला होता. यामध्ये भारताची ४ सुखोई ३० एमकेआय, ४ जॅग्वार विमाने आणि दोन आयएल ७८ मिड एअर टँकर सहभागी झाले होते.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताने इस्रायलकडून क्षेपणास्त्रांसाठी करार केला आहे. भारत आणि इस्रायल संयुक्तपण भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या (एमआर-एसएएम) क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहेत. यासाठी भारताने इस्रायलसोबत १७ हजार कोटींचा करार केला आहे. यामधून निर्माण केलेल्या आलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर भारतीय लष्कराकडून केला जाणार आहे. भारताची सुरक्षा संशोधन आणि विकास संस्था आणि इस्रायलची एअरक्राफ्ट इंडस्ट्री क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार; मोदी सरकारचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी आता नवीन आयोग स्थापन केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस’ (एनएसईबीसी) या आयोगाची स्थापना केली जाणार आहे.

मोदी यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णय़ानुसार आता देशातील ओबीसी प्रवर्गातील घटकांसाठी एससी-एसटी आयोगाच्या धर्तीवर ‘नॅशनल कमिशन फॉर सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस’ची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एनएसईबीसी ही घटनात्मक संस्था असणार आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी अथवा त्यातून नावे हटवण्यासाठी संसदेची परवानगी लागणार आहे.

 एनएसईबीसीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार संसदेत विधेयकातील सुधारणा प्रस्ताव मांडणार आहे. सद्यस्थितीत ओबीसीमध्ये नवीन जातींचा समावेश अथवा नावे हटवण्यासंदर्भात सरकार पातळीवर निर्णय घेतला जात होता. दरम्यान, जाट आरक्षणासह देशभरातून ओबीसी आरक्षणाची होणारी मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी संसदेत विधेयकातील सुधारणांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गात नव्या जातींचा समावेश करणे अथवा नाव हटवण्याबाबत संसदेची मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. सद्यस्थितीत असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा १९९३च्या जागी नवीन आयोगाची स्थापना करण्यात य़ेणार आहे. नॅशनल कमिशन फॉर सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस (एनएसईबीसी) या आयोगाची स्थापना करण्यात येईल. या आयोगावर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹किनारी बांधकामांसाठी नियम शिथिल?

सागरी किनारपट्टी क्षेत्रातील जमिनींचा व्यापारी तत्त्वांवर वापर करण्याच्या दृष्टीने तसेच किनारपट्टय़ांवर असलेल्या परिसंस्थांकडे पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी केंद्र सरकारने किनारपट्टी नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) र्निबधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील नवी अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. नव्या कायद्यामुळे सागरी मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे.

लांबच लांब किनारपट्टी लाभलेल्या राज्यांना केंद्राच्या विद्यमान सीआरझेड कायद्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. किनारपट्टी क्षेत्रातील जमिनींचा विकास करण्यासाठी राज्यांना केंद्राकडून विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. या सर्व पाश्र्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सागरी आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (एमसीआरझेड) या नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार किनारपट्टी भागात भराव टाकून त्यांचा व्यापारी तत्त्वांवर वापर करण्याला परवानगी देण्यात येईल. विद्यमान कायद्यानुसार या प्रकारावर कठोर र्निबध आहेत. हे र्निबध हटवून किनारपट्टी भागात भराव टाकण्याला परवानगी द्यावी यासाठी महाराष्ट्राचा जास्त आग्रह होता.

नवी पर्यटन केंद्रे

संवेदनशीलतेच्या नावाखाली आजपर्यंत पर्यटकांपासून लांबच राहिलेल्या किनारी भागातील परिसंस्था पर्यटकांसाठी खुल्या होणार आहेत. सीआरझेडमधील जाचक अटींमुळे पाणथळ जागांवरील परिसंस्था लोप पावत चालल्या आहेत. या परिसंस्थांकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, अतिक्रमण तसेच त्या ठिकाणी टाकला जाणारा घनकचरा यांमुळे या परिसंस्थांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या परिसंस्था पर्यटकांना खुल्या करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नव्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

यांनाही परवानगी..

मत्स्यप्रक्रिया उद्योग

किनारी भागात गस्तीसाठी तैनात पोलिसांना आवश्यक सोयीसुविधांची उभारणी

किनारी भागात गृहबांधणी अथवा पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करण्यासाठी पर्यावरणीय मंजुऱ्यांची आवश्यकता नाही

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेटला भारताचे नागरिकत्व!

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खुद्द शॉनने याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली. शॉन टेटला १९ मार्च रोजी भारतीय नागरिकत्व देण्यात आले. त्याने २०११ साली आंतरराष्ट्रीय वन डे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे प्रतिनिधीत्व करतो. शॉन टेटने याआधी अनेकदा भारताबद्दलचे प्रेम जाहीरपणे बोलून दाखवले आहे. २०१० साली आयपीएल स्पर्धेदरम्यान शॉन टेट याचे भारतीय वंशाची मॉडेल माशुम सिंघासोबत त्याचे सुत जुळले होते. चार वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २०१४ साली दोघांनी विवाह देखील केला.

३४ वर्षीय शॉन टेटने २००५ साली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००५ साली कसोटीतून त्याने क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले होते, तर २००७ साली वन डे क्रिकेटमध्ये शॉन टेटने एण्ट्री केली होती. शॉन टेटने तीन कसोटी आणि ३५ वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेट विश्वात सर्वाधिक वेगाचा चेंडू टाकणाऱयांच्या यादीत शॉन टेट दुसऱया क्रमांकावर आहे. त्याने तब्बल १६१.१ किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता. वन डे क्रिकेटमध्ये शॉन टेटच्या नावावर ६२ विकेट्स, तर ३ कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट्स जमा आहेत. शॉन टेटने आजवर तब्बल १७१ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून यात त्याच्या नावावर २१८ विकेट्सची नोंद आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं!

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. अण्णाद्रमुकमधल्या पन्नीरसेल्व्हम् आणि शशिकला संघर्षाचती याला पार्श्वभूमी आहे. चेन्नईमधल्या आर के नगर या भागातल्या पोटनिवडणूकीसाठी पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी या दोन्ही गटांनी प्रयत्न चालवले होते पण आता या दोन्ही गटांना पक्षाचं चिन्ह वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षामध्ये सुरू झालेल्या सत्तास्पर्धेत जयललितांच्या अत्यंत जवळच्या शशिकला आणि जयललितांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा भार वाहणारे ओ. पन्नीरसेल्व्हम् यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. आपल्या प्रभावी राजकीय ताकदीचा वापर करत शशिकलांनी या स्पर्धेत बाजी मारली होती पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठोवल्याने त्यांना मोठा हादरा बसला होता. पण तरीही त्यांच्यात गटातल्या पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या.

चेन्नईमधल्या एका पोटनिवडणुकीत अण्णाद्रमुकचं निवडणूक चिन्ह कुठल गट वापरणार यावरून या दोन्ही गटामध्ये वाद सुरू होता. या चिन्हावर हक्क सांगण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडे मोर्चेबांधणी करण्यात आली होती. पण आता कोणालाही हे चिन्ह वापरता येणार नाही आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश आम्हाला मिळाले नसल्याची भूमिका पन्नीरसेल्व्हम् गटाने घेतली आहे. तर निवडणूक चिन्ह आम्हाला मिळालं नाही तरी त्याचा आर के नगर मधल्या पोटनिवडणुकीतल्या आमच्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा शशिकलांच्या गटाने केला आहे

पवन हंस आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये नागरी उड्डाण क्षेत्रात कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार



सामान्य नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये कुशल मनुष्य बळ उपलब्ध व्हावे, आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी पवनहंस आणि मुंबई विद्यापीठ यांच्या दरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला. पवनहंस हेलिकॉप्टर प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विशेष पदवी अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या करारामुळे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (एएमई) तसेच एरोनॉटिक्समध्ये बीएससी विद्यार्थ्यांना करता येणार आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिली. यावेळी पवनहंसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.पी.शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नागरी उड्डाण क्षेत्रात ‘कुशल भारत’ अंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठात एएमई आणि बीएससी (एरोनॉटिक्स) या अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठ दरवर्षी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

पूर्व पिठीका:
हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये ‘पवनहंस’ अग्रणी असून, दक्षिण आशियाई क्षेत्रात सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे. कंपनीकडे 50 हेलिकॉप्टर असून, हवाई पर्यटन, हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मानवी विकास निर्देशांकात भारत 131 व्या स्थानावर

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मानवी विकास निर्देशांक प्रकरणी 188 देशांच्या यादीत भारताचे स्थान 131 आहे. भारताची अर्थव्यवस्था आशियामध्ये तिसऱया क्रमांकाची आहे. 2014 मध्येही भारताचे स्थान संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास 131 चे होते. भारतीय नागरिकांचे आयुर्मान 2015 साली 68.3 वर्षांचे असून राष्ट्राचे एकंदर राष्ट्रीय उत्पन्न (जीएनटी) दरडोई 5663 डॉलर्सचे असल्याचे सदर अहवालाने म्हटले आहे.

सुरक्षिततेच्या भावनेसंदर्भात पुरुषांच्या 78 टक्के प्रतिसादावर महिलांचा प्रतिसाद 72 टक्के असल्याने आपण समाधानी आहोत, असे महिलांनी सांगितले. 2014-15 काळात आपला केंद्रीय शासनावर विश्वास असल्याचे 69 टक्के नागरिकांनी सांगितले तर 74 टक्के व्यक्तींनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. रोजगारासंबंधात सदर अहवालाने भारताच्या रोजगार हमी योजनेची प्रशंसा केली आहे.

जीडीपीच्यासंदर्भात विचार केला तर वीस वर्षांमध्ये 1.5 टक्के ऊर्जाविषयक क्षेत्रात गुंतवणूक झाली आहे. कोळसाविषयक कमतरतेने उद्योग क्षेत्रात कर्मचाऱयांची कपात असली तरी या धोरणामुळे 10 दशलक्ष रोजगारही वाढले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि आरोग्य रक्षणार्थ घ्यायच्या खबरदारीमध्ये जनतेचे समाधानकारक लक्ष देणे वाढले असल्याचे सदर अहवालाने म्हटले आहे. सदर अहवाल स्टॉकहोममध्ये प्रसृत झाला. 1990 पासून महिलांच्याबाबतीत सुधारणा असली तरी शास्त्रशुद्ध भेद दर्शविणारी तुलना, जनता आणि वंशशास्त्रानुसार अल्पसंख्याकांमध्ये प्रगतीचा दर अनियमित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा