Post views: counter

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

                         राज्यसेवा पूर्वपरीक्षेपासून लिपिक, टंकलेखक या  सर्वच परीक्षांमध्ये इतिहासासंबंधी प्रश्न विचारले जातात. गेल्या दोन-तीन वर्षांत इतिहासावर विचारले जाणारे प्रश्न पाहिले तर असे लक्षात येते की, भारताच्या कला आणि संस्कृतीसंबंधीच्या भागावर (विशेषत: राज्यसेवा व यूपीएससी परीक्षेसाठी) तसेच राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभेच्या समांतर असणाऱ्या चळवळी व आंदोलने, राष्ट्रीय चळवळीतील स्त्रियांचा समावेश, स्वातंत्र्योत्तर काळातील सीमा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वपूर्ण घटना यांचे महत्त्व वाढलेले आहे.
पीएसआय-एसटीआय, असिस्टंट पूर्वपरीक्षा व राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम बघितल्यास आधुनिक भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहासदेखील समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचा घटनाक्रम समजून घेऊयात-

आधुनिक जगाचा इतिहास

                      मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
                        केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

MPSC राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप

                    
                      नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आपण उभे राहतो. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जानेवारी महिना  महत्त्वाचा असतो, कारण या व यानंतरच्या काही काळात नवीन परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांपासून करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धापरीक्षेकडे विद्यार्थी वळत आहेत. खरेतर महाविद्यालयात असल्यापासूनच या परीक्षेची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. आज आपण या परीक्षेचे स्वरूप समजून
घेणार आहोत.
  •  एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी

UPSC परीक्षेची तोंडओळख

                केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असते, याची ओळख करून देणारा लेख-

                     केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) या व इतर अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. सर्व पदांची यादी आयोगाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असते.
                      या परीक्षेचे तीन टप्पे असतात- पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी). पूर्वपरीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या स्वरूपाची असून यामध्ये दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी या घटकांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्या पेपरमध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, निर्णयक्षमता, तर्क, बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एकतृतीयांश गुण वजा होतात. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते.
मुख्य परीक्षेमध्ये ९ पेपर असतात. सामान्य अध्ययन पेपर- १ ते ४, वैकल्पिक विषय पेपर- १ व २, निबंध या सात पेपरमधील गुण यशस्वी उमेदवारांची यादी ठरवण्यासाठी गृहीत धरले जातात. इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा या विषयांचे पेपर केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचे असतात. मात्र, या भाषाविषयांच्या पेपरमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यासच इतर पेपर तपासले जातात.

हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या - खिंडी

  • हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या 
 
  1. काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
  2. कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.
  3. कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
  4. काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.