Post views: counter

लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

                            लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) 

लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –


१) सायमन कमिशन :
  1. १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 
  2. इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
  3. १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला. 

Current Affairs April 2015 Part - 4

चालू घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs

 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार:-
  1. -२०११ ते २०१४ या कालावधीत देशामध्ये बँक खात्यांची वाढ ३५ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर झेपावली.
  2. -देशातील व्यवहारशून्य खात्यांच्या संख्येत होणा-या वाढीचा वेगही प्रचंड असून हा दर ४३ टक्के एवढा आहे.
  3. -२०११ ते २०१४ या कालावधीत १७.५ कोटी नवी खाती सुरू झाली.
  4. -जनधन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त खाती सुरू करण्यात आली. यातील ७२ टक्के खाती ही ‘झीरो बॅलन्स’ दाखवत आहेत.
सेबीची आकडेवारी:-
  1. -देशातील ४४ फंड हाऊसेसमधील गुंतवणूकदारांच्या खात्यांची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे.
  2. -यात गेल्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी खात्यांची ३.१७ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षाअखेरीस ही संख्या २.९२ कोटी एवढी होती.
  3. -२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या २५ लाख खात्यांची भर पडली.
  • केपीएमजी या संस्थेने जागतिक बांधकाम अहवाल नुकताच जाहीर केला आहे.त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये देशभरातील जवळपास किती  टक्के बांधकाम कंपन्यांवर एका किंवा त्यापेक्षा जास्त सुमार प्रकल्पांचा भार असल्याचे केपीएमजीने आपल्या अहवालात म्हटले आहे?
== ८०%

पृथ्वीचे अंतरंग

 ●● पृथ्वीचे अंतरंग ●●

'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

  1. पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे.  
  2. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

The complete list of National Highways in India :

The complete list of National Highways in India :
 

NH 1 (km. 456) – Delhi to Amritsar and Indo-Pak Border
NH 1A (km. 663) – Jalandhar to Uri
NH 1B (km. 274) – Batote to Khanbal
NH 1C (km. 8) – Domel to Katra
NH 1D (km. 422) – Srinagar to Kargil to Leh
NH 2 (km. 1,465) – Delhi to Dankuni
NH 2A (km. 25) – Sikandra to Bhognipur
NH 2B (km. 52) – Bardhaman to Bolpur
NH 3 (km. 1,161) – Agra to Mumbai

Rajyaseva New Syllabus

                                  या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपी, पेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्य व महाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम. पण या अचानक बदलाविरुद्ध कुठेच दाद मागण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीप्रमाणे परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

• नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.
पेपर- १ (गुण २००- २ तास)
राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण
चालू घडामोडी. 

भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ