Post views: counter

भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टय़े

भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टय़े
                   भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीचे अपत्यदेखील
मानले जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप प्राप्त झालेले आहे. तिची काही ठळक वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २४ प्रकरणे, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
  1. ताठरता व लवचीकता यांचा समन्वय -भारताची राज्यघटना अंशत: ताठर आणि अंशत: लवचीक आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचीक आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय राज्यघटनेत घालण्यात आला आहे.
  2. लोककल्याणकारी राज्य - भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वागीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा होय. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे.

साावित्रीबाई फुले

साावित्रीबाई फुले 
सावित्रीबाई फुले

  • जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१.
  • मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
                         सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 

Refrance Book List For Tax Assistant exam ?

कर सहायक तयारी कशी करावी
               मित्रानो कशी सुरु आहे तयारी.कर सहायक पदाची ४५० पदासाठीची एम पी एस ची जाहिरात आली आहे.पण हि फक्त मराठी ३० आणि इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा पास केलेल्या किवा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारानाच देता येते. त्यामुळे अजून ज्यांनी कोणी टायपिंग केले नसेल त्यांनी जून पासून करण्यास काही हरकत नाही कारण इतर विभागाच्या सुधा जाहिरात निघत असतात झाला तर फायदाच होतो. पण आता ज्यांचे टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी आहे तेव्हा एक world cup च्या वेळी प्रसिद्ध होत असलेल्या
जाहिरातीप्रमाणे "मौका मौका " आहे तेव्हा फायदा करून घ्या एक पोस्ट हातात घ्या आणि पुढे अभ्यास करतच राहा चांगल्या पोस्ट साठी. आता कर सहायक हि परीक्षा कशी असते किवा त्याचे स्वरूप काय असते.

                        या परीक्षेमध्ये मराठी,इंग्रजी,सामान्यज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी,मुलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन आणि लेखाकर्म हे विषय असतात. या विषयावर साधारणपणे २०० प्रश्न ४०० गुणासाठी विचारले
Post views: counter

Current Affairs April 2015 Part - 3

चालू‬ घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs April 2015

  • नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान व १९६३ ते २००४ या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झालेल्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नुकतेच निधन झाले आहे?
== सूर्य बहादूर थापा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट‘ असणाऱ्या स्मार्ट शहरांच्या उभारणीला आता हिरवा कंदील मिळाला असून, देशातील पहिली स्मार्ट सिटी कोठे तयार करण्यात येणार आहे?
== साबरमती नदीच्या तीरावर-गुजरात
  1. -देशातील स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सरकारने 60 अब्ज रुपयांची अर्थसंकल्पी तरतूद केली आहे.
  2. -या स्मार्टसिटीला "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी‘ (गिफ्ट) असे नाव देण्यात आले असून, हे शहर मोठे आर्थिक केंद्रही असेल.
  3. -"आय. एल. अँड एफ. एस.‘ इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्‍शनच्या सहकार्याने या शहराची उभारणी केली जात आहे.
  • नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना:-सर्व वेबसाईट्स सारख्याच वापरता आल्या पाहिजेत. सर्व वेबसाईट्सचा डाऊनलो़डिंग स्पीड सारखाच असला पाहिजे. तसेच शुल्कही सारखेच असले पाहिजे, अशी नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना आहे. थोडक्यात सांगयाचे तर इंटरनेट सेवा पुरविणा-या सर्व कंपन्यांच्या सेवेचा दर्जा सारखा असावा. तसेच सेवेची किंमतही सारखी असावी.
  • नेट न्युट्रॅलिटीला सेवा प्रदाता कंपन्यांकडून विरोध का?

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

                        राज्य सेवा मुख्य परीक्षेत इतिहास घटकाची तयारी करताना भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

                        ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून याचा तक्त्यांच्या स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उदय़ोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना या विषयीच्या बाबी कालक्रमाने लक्षात घ्याव्यात. १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते याचा अभ्यास करावा.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी जसे- ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी इत्यादींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक  आहे.