सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :
विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :
- पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
- जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.
- उंची - 200 ते 300 मीटर
- ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
- पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
- पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
- या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्यात अजिंठा लेण्या आहेत.
- या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
- धुळे - गाळणा डोंगर
- नांदेड - निर्मल डोंगर
- औरंगाबाद - वेरूळ डोंगर
- हिंगोली - हिंगोली डोंगर
- नांदेड - मुदखेड डोंगर
- यवतमाळ - पुसद टेकड्या