● मी स्पर्धा परीक्षा देऊ का ?
- स्पर्धा परीक्षा देऊ का?
- कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू?
आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंतलागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुकक्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. आपल्याला काहीच येत नाही, काहीच जमत नाही, निदान स्पर्धा परीक्षा तरी देऊच असं म्हणत, या परीक्षांकडे वळू नका. कारण तसं केलं तर पुढे यशाची वाट सापडणं अशक्यच!आपण स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, याचं उत्तर आधी स्वत:कडे तयार ठेवा!
- मला कशातच रस नाही, काहीच जमत नाही, आता नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन पहाव्यात असं वाटतं?
- देता येतील का?
- या स्पर्धा परीक्षेला कुणीही बसलं तर चालतं का?
आपल्याला काहीच जमत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांकडे मुळीच वळू नये. स्पर्धा परीक्षाच काय खरं तर एकूणच


