Post views: counter

लॉर्ड रिडिंग - 1921 ते 26

लॉर्ड रिडिंग ( 1921 ते 26 )  च्या काळातील महत्वाच्या घटना 



विश्वभारती विद्यापीठ रविंद्रनाथ टैगोर यानि स्थापना केलि.
1921 - मोपला उठाव
1922 - चौरीचौरा घटना
1923 - स्वराज्य पक्ष स्थापना
1923 - सनदी सेवा परीक्षा भारतात आयोजित
करण्यास प्रारम्भ झाला.
1924. - ली समिति सनदी सेवा संबधी स्थापन केलि
1924 - मुदिमन समिति 1919 कायद्याच्या चौकशी
साथी नियुक्त करण्यात आले

आधुनिक भारताचा इतिहास या घटकाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या बाबी


                 समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तिथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीतून घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडांतील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे. 
Post views: counter

लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे


                                यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्यांची उत्तम संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहे. पण या संधी नेमक्या कशा मिळवाव्यात याविषयी हजारो विद्यार्थी अजूनही अंधारात आहेत. यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांबाबत आजही अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग नेमका कसा प्राप्त करावा, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची नेमकी पद्धती काय असते, ती कशी द्यायची, त्याचे वेगवेगळे टप्पे कोणते, यांसारख्या अनेक प्रश्नांचा आढावा घेऊ या.

स्पर्धा परीक्षांमधील समज-गैरसमज


                                  स्पर्धापरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण काल केला. हे प्रश्नोपनिषद आपण आज चालू ठेवू. स्पर्धापरीक्षा देऊ बघणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पालकांना अनेक समज-गैरसमजांचा सामना करावा लागतो. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या क्षेत्रातील करिअरविषयी अनेक चुकीच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. अशाच काही चुकीच्या कल्पनांमुळे अनेकजण स्पर्धापरीक्षांच्या वाटेलाच येत नाहीत. 'हा नाद खुळा!' असे त्यांना वाटते. हा व्हायरस डिलिट करण्याचा अॅण्टी-व्हायरस आपण टाकूया...

खूप वर्षे अभ्यास करावा लागतो:
- आपल्याकडे स्पर्धापरीक्षांचे वातावरण आता कुठे तयार होते आहे. जे उत्तरेत व दक्षिणेत पूर्वीच तयार झाले आहे. त्यामुळे अनेकांना या परीक्षांबद्दल उशिरा माहिती मिळते. त्यामुळे त्यांची सुरुवातही उशिरा होते. आपला एक उमेदवार रोहिदास दोरकुळकर याला एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहितीच वयाच्या तिसाव्या वर्षी मिळाली. तरीही त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास करून मुख्याधिकारी हे पद मिळवले व तो त्या पदावर काम करतो आहे. त्यामुळे पद मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामागे हे एक कारण असते. इतरही कारणे असतात. काहींनी उमेदवारांच्या मनात असे भरवून दिले असते की परीक्षा उत्तीर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात. मग काहींचा पंचवार्षिक योजना पद्धतीने कारभार चालतो.

राज्यव्यवस्था घटकाची तयारी कशी करावी ?


                                          स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पॉलिटी हा घटक अतिशय महत्त्वाचा मनाला जातो. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. पहिले कारण म्हणजे, प्रशासक म्हणून कार्यरत झाल्यावर ज्या संवैधानिक चौकटीमध्ये काम करायचे आहे, त्या व्यवस्थेची तोंडओळख 'पॉलिटी'च्या अभ्यासामधून होते. दुसरे कारण म्हणजे, राज्यव्यवस्थेच्या (पॉलिटी) अभ्यासामुळे चालू घडामोडींचे विश्लेषण करणे सोपे पडते. तिसरे कारण म्हणजे, हा विषय सामान्य अध्ययन पेपर क्र. २ (मुख्य परीक्षा), निबंधाचा पेपर तसेच मुलाखतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. तात्पर्य, 'इंडियन पॉलिटी' या घटकाचा सखोल अभ्यास व चिंतन यूपीएससीसाठी (व अन्य स्पर्धा परीक्षांसाठीही) अपरिहार्य ठरते.