Post views: counter

how to face PSI/STI/Asst pre exam ?


PSI/ STI /ASST  पूर्व परिक्षेला कसे सामोरे जाल ??



  • माझ्या मते तुम्ही जर खालील प्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवण्या साठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.
  • 100 प्रश्न – सोडवण्यासाठी 60 मिनिटे असतात. साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:

» अंकगणित व बुद्धिमापन - 15 प्रश्न
» भूगोल – 15 प्रश्न
» इतिहास – 15 प्रश्न
» विज्ञान – 15 प्रश्न
» नागरिकशास्त्र – 10 प्रश्न
» चालू घडामोडी – 15 प्रश्न
» अर्थव्यवस्था – 15 प्रश्न

तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber)




तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber):

                     ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत शुद्ध काचेचा तंतू. या तंतूचा व्यास अतिशय लहान असतो. अशा १००० तंतूंच्या जुडग्याचा व्यास एका मिलिमीटरपेक्षाही कमी असतो. सर्वसाधारणपणे एखाद्या संदेशाचे वहन करण्यासाठी त्याचे रूपांतर इलेक्ट्रिकल इम्पल्सेसमध्ये करून ते तांब्याच्या तारांमधून वहन केले जाते, जेव्हा अशा संदेशांचे रूपांतर प्रकाशलहरींमध्ये करून त्यांचे वहन काच किंवा प्लॅस्टिकच्या तंतूंमधून केले जाते, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला तंतू प्रकाशशास्त्र असे म्हणतात. प्रकाशीय तंतूंमधून प्रकाशाचे वहन संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्त्वांच्या आधारे होते. परंपरागत संदेशवहन व्यवस्थेपेक्षा फायबर ऑप्टिकल्सचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हे तंतू केसाच्या आकाराचे असल्याने एका

कर्मवीर भाऊराव पाटील


बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

                    रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले.

पंडिता रमाबाई



स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी! 

                      परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत. यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या

नामदार गोपाळ कृष्ण गोखले



‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’! 

                     ’झाले बहु होतील बहु; परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले होत. 

                    रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही