Post views: counter

अरवली पर्वतरांग

अरवली पर्वतरांग 




अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे. 

• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यान 


महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

• स्थान-सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

• स्थापना- 

या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.

वाळवंट

 वाळवंट

  

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापिवाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार- वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.
उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे 


वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

• वैशिष्ट्ये - सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

• भौगोलिक वैशिष्ट्ये-

  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी

नदी

 नदी 



नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
  2. अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
  3. मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)
  4. यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
  5. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
  6. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
  7. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
  8. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
  9. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
Post views: counter

एमपीएससी पेपर-१ : घटक पर्यावरण


पर्यावरणशास्त्र घटकाची तयारी




                           सामान्य क्षमता चाचणी पेपर १च्या दिलेल्या अभ्यासक्रमातील भाग- ६ म्हणजेच पर्यावरणशास्त्र.