Post views: counter

Current Affairs June 2015




  • संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क) अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कार संगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • होळकर घराणे:

होळकर घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरूष मल्हारराव होळकर यांनी छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली.त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली.याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा "महाराजा यशवंतराजे होळकर" तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले.'   दिल्लीतील 'रायसीना' हा भुभाग होळकरांच्या अधिपत्यात होता.याच रायसीना ग्राममध्ये 'होळकर उद्यान' होते.आज याच 'रायसीना होळकर इस्टेट मध्ये' आपले राष्ट्रपती भवन,संसदभवन,केंद्रीय सचिवालस आदि भव्य वास्तु दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती 'होळकरांचा राजेशाही झेंडा' डौलाने फडकत आहे.तसेच राष्ट्रपतींच्या आगमव प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ डौलाने होळकरांचा राजेशाही झेंडा मिरवत आणते. 

  •  जन्म:अहिल्याबाई यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदी काठच्या "चौंडी" या गावात ३१-मे-१७२५ रोजी जन्म झाला.     
  • विवाह: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह अहिल्येशी करण्याची मागणी केली.अहिल्या व खंडेराव यांचा लग्न सोहळा पुण्यातील शनिवारवाडा परिसरात "सातारकर छत्रपती शाहू महाराज{थोरले}" यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

भारतातील व्हाईसरॉय

भारतातील व्हाईसरॉय 
  1. लॉर्ड कॅनिंग - 1856-1862
  2. लॉर्ड एलिगन - 1862-1863
  3. सर जॉन लॉरेन्स - 1864-1869
  4. लॉर्ड मियो - 1869-1872
  5. लॉर्ड नॉर्थब्रूक - 1872-1876
  6. लॉर्ड लिटन - 1876-1880
  7. लॉर्ड रिपन - 1880-1884
  8. लॉर्ड डफरिन - 1884-1888
  9. लॉर्ड लॅन्सडाऊन 1888-1894

रेपो रेट म्हणजे काय?


  1. रेपो रेट म्हणजे काय? = > आपल्याकडच्या व्यापारी, सहकारी किंवा खाजगी बँकांना देशांची पैशांची टंचाई भासते, तेव्हा बँका रिझर्व बँकेकडून पैसे कर्जरूपाने घेतात. रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँक रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर... रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं... म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  
  2. रिवर्स रेपो रेट म्हणजे काय? => रिवर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. ज्याप्रमाणे देशभरातल्या वेगवेगळ्या बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिवर्स रेपो रेट म्हणतात. बँका नेहमीच रिझर्व बँकेला पैसे देण्यासाठी तत्पर असतात. कारण त्यांच्यासाठी ही गुंतवणूक असते. शिवाय सर्वाधिक सुरक्षित असते आणि चांगलं व्याजही मिळतं. रिवर्स रेपो रेटमध्ये

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक 

                                   टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.
                                 गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.