Post views: counter

विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?


               अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

मराठी व इंग्रजीचा अभ्यास कसा करावा ?

              उमेदवाराची आकलनक्षमता अभिवृत्ती, विचार-प्रक्रिया, उमेदवाराची अभिव्यक्ती, लेखन आणि संवादाचे कौशल्य या गोष्टी जोखण्यासाठी इंग्रजी व मराठी या दोन अनिवार्य भाषाविषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश एमपीएससी- मुख्य परीक्षेत करण्यात आला आहेत. अनिवार्य इंग्रजी व मराठी विषय १०० गुणांसाठी आणि बारावीच्या परीक्षेच्या समकक्ष असेल व प्रश्नांचे स्वरूप पारंपरिक असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या विषयांच्या तयारीची व प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती अभ्यासूया.
व्याकरण : हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा     आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
लेखन :कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे.

भारतातील लोहमार्ग विभाग व त्यांची मुख्यालय :


भारतातील लोहमार्ग विभाग व त्यांची मुख्यालय :


क्र        विभागाचे नाव              मुख्यालय

1. मध्य विभाग------------------ मुंबई
2. पूर्व विभाग-------------------- कोलकाता
3. उत्तर विभाग -----------------नवी दिल्ली
4. उत्तर पूर्व विभाग------------- गोरखपूर
5. उत्तर पूर्व सीमा विभाग ------गुवाहाटी
6. दक्षिण विभाग ----------------चैन्नई
7. दक्षिण मुख्य विभाग----------सिकंदराबाद
8. दक्षिण पूर्व विभाग----------- कोलकाता
9. पश्चिम विभाग चर्चगेट ------मुंबई
10. पूर्व मध्य विभाग हाजीपूर---बिहार
11. पूर्व किनारी विभाग--------- भुवनेश्वर
12. उत्तर मध्य विभाग --------अलाहाबाद
13. उत्तर पश्चिम विभाग-------जयपूर
14. दक्षिण पूर्व मध्य विभाग ---विलासपुर
15. दक्षिण पश्चिम विभाग----- हुगळी
16. पश्चिम मध्य विभाग------ जबलपूर
17. मेट्रो रेल्वे झोन -------------कोलकाता

विविध क्रांत्या :

विविध क्रांत्या :


  1. हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन
  2. नील क्रांती- मत्स्य उत्पादन
  3. पीत क्रांती- तेलबिया उत्पादन
  4. सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ
  5. कृष्णा क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र
  6. करडी क्रांती- खत उत्पादन
  7. श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन
  8. गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन
  9. चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन
  10. अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प

काही महत्त्वाची कलमे

काही महत्त्वाची कलमे:- 
  1. राष्ट्रपती - 52
  2. उपराष्ट्रपती- 63
  3. राज्यपाल -153
  4. पंतप्रधान - 74
  5. मुख्यमंत्री - 164
  6. विधानपरिषद - 169
  7. विधानसभा - 170
  8. संसद - 79
  9. राज्यसभा - 80
  10. लोकसभा - 81
  11. महालेखापरीक्षक :- 148
  12. महाधिवक्ता - 165
  13. महान्यायवादी - 75
  14. महाभियोग - 61