Post views: counter

पंडिता रमाबाई



स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी! 

                      परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत. यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या

नामदार गोपाळ कृष्ण गोखले



‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’! 

                     ’झाले बहु होतील बहु; परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले होत. 

                    रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही

गोपाळ गणेश आगरकर



भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक!



                         महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे  अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. 

                         आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड,

गोपाळ हरी देशमुख



इंग्रजी शिक्षणातून मिळालेल्या मूल्यांच्या साहाय्याने आधुनिक विचार देण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील अगदी पहिल्या पिढीतील समाजसुधारक!


                      एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे एक नवी पिढी घडत होती. त्या पिढीच्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) होत. गोपाळरावांचे वडील पेशव्यांच्या दरबारात हिशेबनीस म्हणून काम करत होते. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. 

आजपावेतो झालेले राष्ट्रपती



१) राजेंद्र प्रसाद ............. १९५० ते १९६२

२) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ........... १९६२ ते १९६७

३) डॉ. झाकीर हुसेन .............. १९६७ ते १९६९

४) वराहगिरी व्यंकटगिरी गिरी ..............  १९६९ ते १९७४

५) फक्रुद्दीन अली अहमद .............. १९७४ ते १९७७

६) नीलम संजीव रेड्डी ............. १९७७ ते १९८२