Post views: counter

महत्वाच्या घटना दुरुस्त्या


पहिली घटनादुरुस्ती (इ.स. १९५१) -  
भारतीय राज्यघटनेत इ.स. १९५१ मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. घटनेतील पहिली दुरुस्ती एवढय़ापुरतेच तिचे महत्त्व मर्यादित नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांमुळे जमीन सुधारणाविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीच्या मार्गात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करणे हा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. पहिल्या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या १९ व्या कलमात बदल करण्यात आले. त्यानुसार भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर काही नवे र्निबध लादण्यात आले; तसेच या दुरुस्तीने राज्यघटनेत ३१-अ आणि ३१-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.

सातवी घटनादुरुस्ती (इ.स. १९५६) - 
भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यपुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी इ.स. १९५६ मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याबरोबरच ही घटनादुरुस्तीही संमत केली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघराज्यातील राज्यांचे 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन प्रकारांत किंवा गटांत वर्गीकरण करण्यात आले होते. या घटनादुरुस्तीने हे वर्गीकरण रद्द ठरविण्यात आले आणि संघराज्यातील सर्व घटकराज्यांना समान दर्जा देण्यात आला. याशिवाय काही केंद्रशासित (संघ)प्रदेश निर्माण करण्यात आले. सातव्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आलेल्या घटकराज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे १४ व ६ इतकी झाली. या घटनादुरुस्तीने आणखीही काही महत्त्वाचे बदल घडवून आणले. घटकराज्यांच्या विधानसभेची सभासद संख्या जास्तीत जास्त ५०० व कमीत कमी ६० इतकी असेल अशी व्यवस्था करण्यात आली. दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच राज्यपालाची नियुक्ती करणे, दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच उच्च न्यायालयाची स्थापना करणे, भाषिक अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळवून देण्याविषयीची व्यवस्था करणे यांसारख्या तरतुदीही या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात आल्या.

हायड्रोजन

हायड्रोजन 
उदजन → He

उदजन (हायड्रोजन) (अणुक्रमांक: १) 

हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्या चिन्हाने दर्शवितात. सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात. १.००७९४ ग्रॅ/मोल एवढा अणुभार असणारे उदजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे. विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज- इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. इलेक्ट्रॉलिसिस पद्धतीने पाण्यापासूनही उदजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून उदजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.

हेलियम

 हेलियम 


• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- हेलियम, He, 2

दृश्यरू , परंगहीन वायू

रासायनिक श्रेणी निष्क्रीय वायू

• अणुभार- 4.002602ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म स्थिती- वायू

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे.

हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदु सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो.

लिथियम

 लिथियम 



• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- लिथियम, Li, 3 दृश्यरूप

• रासायनिक श्रेणी- अल्कली धातू

• अणुभार- 6.941ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म-स्थिती- घन

(Li) ( अणुक्रमांक ३) अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन

बेरिलियम

 बेरिलियम 



• सर्वसाधारण गुणधर्म- दृश्यरूप

• अणुभार- ग्रॅ·मोल −१


(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार