Post views: counter

पालघर जिल्हा निर्मित


 पालघर जिल्हा
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड

ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर

या आदिवासी तालुक्यांचा समावेश होता . तर वसई, भिवंडी, कल्याण,
मुरबाड, उल्हासनगर, ठाणे आणि अंबरनाथ
या शहरी तालुक्यांचा समावेश होता .

नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात वसई, पालघर डहाणू,
विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा यांचा समावेश आहे .
तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ,
मुरबाड, शहापूर यांचा समावेश आहे.

याचबरोबर प्रशासकीयदृष्ट्या मोठा जिल्हा ही ठाने जिल्ह्याची ओळखही आता गमावली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा