Post views: counter

सह्याद्री पश्चिम घाट


जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
  4. तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी), पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५ वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व केरळमधील आरळम संरक्षित वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
  5. कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.), सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील जंगले यांचा समावेश आहे.
  6. सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७ वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे.
  7. प्राणीजगत पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.

सस्तन प्राणी: पश्चिम घाटात सस्तन प्राण्यांच्या जवळपास १३९ प्रजाती आढळतात. यापैकी मलबार
गंधमार्जार व सिंहपुच्छ वानर या दोन प्रजाती विनाशाच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात आढळणाऱ्या सिंहपुच्छ वानरांची संख्या तर फक्त २,५०० आहे. सिंहपुच्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात आढळते. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात सुद्धा सिंहपुच्छ वानरे आढळतात.ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.  . सुंदरबन नंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,००० पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात. कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर , चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.

सरपटणारे प्राणी :अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. उभयचर प्राणी : जगात आढळणाऱ्या १७९ उभयचर प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ८०% प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.