Post views: counter

How to prepare state service mains exam in 45 days ?




नमस्कार मित्रहो,
मी यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 साठी साधारण 120 दिवसांचे नियोजन आखून दिले होते , त्यानंतर बऱ्याच मित्रांनी त्याचा फायदा झाल्याचे सांगितले.

परवाच आपल्या राज्यसेवा पूर्व 2016 चा निकाल लागला , आणि आता शेवटच्या 40 दिवसांसाठी पूर्व परिक्षेप्रमाणे वेळापत्रक आखून देण्याची मागणी करत आहेत , त्या मित्रांसाठी खास राज्यसेवा मुख्य 2016 साठी हा लेख.


मित्रांनो आज 6 ऑगस्ट 2016 मुख्य परीक्षा 24,25,26 सप्टेंबर 2016 रोजी आहे म्हणजे साधारणतः 47 दिवस आहेत अजून हातात आपल्या , पण आपण साधारण ते 45 दिवस असे गृहीत धरू.( शेवटच्या या दिवसात आपण एकही दिवस सुट्टी घेणार नाही असे गृहीत धरून. )

तर या 45 दिवसात आपणास 9 विषयांची तयारी करायची आहे.
1) मराठी
2) इंग्रजी
3) इतिहास
4) भूगोल व कृषी
5) राज्यशास्त्र
6) मानव संसाधन विकास व मानवी हक्क
7) अर्थशास्त्र
8) विज्ञान व तंत्रज्ञान
9) चालू घडामोडी

या उपलब्ध दिवसांचा व विषयांचा विचार केल्यास , एका विषयास 5 दिवस विभागून येतात.




मराठी व इंग्रजी हे विषय सोडल्यास बाकीचे विषय आपण थोड्याफार प्रमाणात पूर्व परीक्षेसाठी आपण अभ्यासले आहेत, त्यामुळे आता मराठी व इंग्रजी साठी प्रथम वेळ देणे हे क्रमप्राप्त आहे, लक्षात घ्या मराठी इंग्रजी हे विषय तुमच्या गुणांच्या वृद्धीत खूप महत्वाचे आहेत. या विषयासाठी लिखाणाचा चांगला सराव करा , विविध विषयांवरील निबंध लिहा , ते तपासून घ्या व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा.मराठी व्याकरण विषयात वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतात.मराठी व इंग्रजीच्या जास्त प्रश्नपत्रिका सोडावा . मागील काही आयोगाच्या तसेच स्टाफ सिलेक्शन च्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा.

बाकी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,तंत्रज्ञान या विषयाचा आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करा. अभ्यासक्रमाबाहेर जास्त भारकटण्याची श्यक्यता असते तेंव्हा सोबत अभ्यासक्रमाची प्रत ठेवा.

मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास हा एक महत्वाचा विषय आहे त्याची योग्य तयारी करणे खूप महत्वाचे आहे. कारण याचे मराठी मध्ये मटेरियल कमी उपलब्ध आहे. या विषयाचा अभ्यास करताना आपण सर्व राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय संस्थांचे लोगो , त्याची घोषवाक्ये , त्याचे मुख्यालयाचे ठिकाण, त्यांची थोडक्यात माहिती ,इ. गोष्टी अवश्य पाहाव्यात.
अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटक अभ्यासा , योजनांची सविस्तर माहिती वाचणे खूप महत्वाचे आहे ,( आपल्या eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल वर आपण रोज एका योजनेची सविस्तर माहिती update करणार आहोत.)




चालू घडामोडी हा एक महत्वाचा घटक आहे जो सर्व विषयांना स्पर्श करतो , माझ्या मते आपण चालू घडामोडींचा अभ्यास शेवटच्या टप्प्यात केला तर आपणास जास्त फायदा होईल.शिवाय आपल्या ब्लॉग वर जानेवारी 2015 पासूनच्या चालू घडामोडी आहेत त्याही आपण एकदा वाचू शकता , चालू घडामोडी शक्यतो आपण जानेवारी 2016 पासूनच्या वाचा.

तुमच्या स्वतःच्या नोट्स काढल्या असतात तर त्याची जास्तीत जात उजळणी करा , ते खूप फायद्याचे ठरेल. जर नोट्स काढल्या नसतील तर तुम्ही वाचलेल्या पुस्तकातूनच उजळणी करा , नवीन पुस्तक वाचण्याचे कटाक्षाने टाळा.

चांगल्या क्लास च्या टेस्ट सिरीज लावल्या असतील तर उत्तमच , कारण शेवटी सराव हा महत्वाचाच आहे. आणि टेस्ट सोडवण्याचा आणखी एक फायदा असा की आपण टेस्ट सोडवताना लक्षात येते की आपली कितपत तयारी झाली आहे , आणि आपले काही घटक अभ्यासाचे राहिलेत का किंवा ते कमकुवत आहेत का? त्यानुसार आपण त्या त्या घटकाला न्याय देऊ शकतो.

एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा कधीच पूर्ण होत नसतो , तेंव्हा जास्तीत जास्त वाचन करणे हे खूप महत्वाचे आहे/असते. जातीत जास्त वाचन सराव याच गोष्टी तुम्हाला या परीक्षेत यशश्वि करू शकतात.

All the best...

Be the best version of you...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा