Post views: counter

Current Affairs July 2016 Part - 3

★|| eMPSCkatta ||★
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' एमआयएम' सह 191 पक्षांची मान्यता रद्द

नोटीस बजावूनही आयकर विवरण व लेखा परीक्षण लेखा परीक्षणाची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली असून , ओवैसी बंधूंच्या ' एमआयएम' पक्षाचा समावेश आहे , अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज ( बुधवार ) दिली .
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 359 राजकीय पक्षांची नोंदणी आहे . यामध्ये 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून , 342 अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणप्राप्त भरल्याची व लेखा परीक्षणाची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते . परंतु , ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे 326 राजकीय पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या . कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली होती . परंतु , 191 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , अशी माहिती सहारिया यांनी दिली .
Source: sakaal news paper portal

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता गुगल हॅंगआउटवरही व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

 मेसेजिंग ऍपमधील सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने हॅंगआउटमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली असून , व्ही .11 .0 या अपडेटद्वारे तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे . तब्बल दोन वर्षांपूर्वी ऍपल मोबाईलधारकांसाठी आलेली ही सुविधा आता अँड्राइडधारकांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे .गुगल प्ले स्टोअरवर सध्या ही अपडेट उपलब्ध नसली तरी एपीके मिररद्वारे तुम्ही ती मिळवू शकता. आयओएसधारकांसाठी ही सुविधा 2014 पासून उपलब्ध असल्याने त्यांना ऍप स्टोअरवर ही अपडेट उपलब्ध आहे . नव्या अपडेटनुसार आयओएसधारकांसाठी व्हिडिओ कॉलिंगचा कालावधी दोन मिनिटे करण्यात आला असून , अँड्राइडधारकांना मात्र एक मिनिटाचीच मर्यादा ठेवण्यात आली आहे .

ग्रुप चॅटही करता येणार
गुगल हॅंगआउटने व्हॉट्सऍप आणि हाइकसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी कात टाकली असून , ग्रुप चॅटची सुविधा उपलब्ध केली आहे . तसेच यापूर्वी असलेली हॅंगआउट आणि टेक्स्ट मेसेज एकत्र करणारी यंत्रणा रद्द केली आहे . या एकत्रित यंत्रणेमुळे यूजर्सना हॅंगआउट आणि टेक्स्ट मेसेजमध्ये संभ्रम निर्माण होत होता .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील रस्ते सुरक्षेसाठी अमेरिकेचे सहकार्य घेणार

 भारतातील वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . रस्ते सुरक्षेसाठी अमेरिका भारताला सहकार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली .

गडकरी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज भारतीय पत्रकारांशी संवाद साधला . भारतातील वाढते अपघात आणि मृत्युमुखी पडणारे लाखो लोक याविषयी माहिती देतानाच वाढते अपघात रोखण्यासाठी अमेरिकेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली . ते म्हणाले , की भारतात रस्ता सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न आहे . दरवर्षी देशात पाच लाख अपघात होतात आणि या अपघातात पंधरा लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात . वाढते अपघात सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे . वैयक्तिक पातळीवर अपघाताविषयी तर मला खूप चिंता वाटते. ही समस्या सोडविण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे . भारतीय वाहतुकीच्या अत्याधुनिकीकरणासाठी सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे .
अमेरिकेतील सध्याचे वाहतूक नियम , कोडीफिकेशनची अंमलबजावणी भारतात करणार आहे .

दृष्टिक्षेपात रस्ते
- 96 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
- देशात दरवर्षी पाच लाख अपघात
- 150000 लोकांचा दरवर्षी मृत्यू

Source : esakal.com

ऑपरेशन संकट मोचन‘:-
--------------------------------------------------

* दक्षिण सुदानमधील जूबा शहरात अडकलेल्या 600 भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी ‘ऑपरेशन संकट मोचन‘ केंद्र सरकाने  सुरु केले सुरु केले  सुदानमधील जूबा शहरात बंडखोर आणि लष्कराच्या जवानांमध्ये युद्ध सुरु आहे.  राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडले आहे. या संघर्षात आतापर्यंत 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे
नेतृत्व :- जनरल व्ही. के. सिंह (परराष्ट्र राज्यमंत्री)

Source: study circle fb page

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹थेरेसा मे ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान

काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा यांनी आज (ता. १३ ) रात्री उशिरा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली . मार्गारेट थॅचर यांच्यानंतर थेरेसा या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. युरोपियन युनियनमधून (ईयू ) बाहेर पडल्याने ब्रिटनसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना थेरेसा यांना करावा लागणार आहे .

ब्रिटनने ‘ईयू’ मधून एक्झिट घेतल्यानंतर मोठी उलथापालथ झाली होती . यामुळे कॅमेरॉन यांनाही राजीनामा द्यावा लागला. कॅमेरॉन यांनी आज संध्याकाळी राणी एलिझाबेथ-द्वितीय यांची भेट घेऊन आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणीने थेरेसा यांना पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आमंत्रण दिले . थेरेसा यांनी आपल्या पतीसह राणीची भेट घेतली . त्यानंतर थेरेसा यांचे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘१० , डाउनिंग स्ट्रीट’ येथे आगमन झाले .

तत्पूर्वी , कॅमेरॉन यांना ‘ १० , डाउनिंग स्ट्रीट’ येथे निरोप देण्यात आला .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नेपाळ सरकारविरोधात अविश्वास ठराव

- नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्याविरोधात आज नेपाळी कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाने अविश्वास ठराव दाखल केला . पुष्प कमल दहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील माओवादी पक्षाने (सीपीएन ) काल ओली सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने हे सरकार अल्पमतात आले आहे .

सध्याचा विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसच्या सहकार्याने प्रचंड यांचा पक्ष नवीन सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे . त्या दृष्टिकोनातून ओली सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ओली यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला . त्यास नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांनी समर्थन दिले आहे . ठरावावर नेपाळ कॉंग्रेसच्या 183 , सीपीएनच्या 70 आणि सीपीएन युनायटेडच्या 3 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती नेपाळी कॉंग्रेसचे नेते राम कृष्ण यादव यांनी दिली .

लोकसभेच्या एकूण 601 जागांपैकी ओली यांच्या पक्षाचे 175 उमेदवार निवडून आले होते . त्यांच्या विरोधात एकवटलेल्या तिन्ही पक्षांचे संख्याबळ 292 इतके आहे . तर सहा मधेशी पक्षांचे संख्याबळ 50 असून , त्यांनीही या ठरावास पाठिंबा दर्शविला आहे . त्यामुळे हा विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी ओलींना 299 चा आकडा गाठणे अपरिहार्य आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या 'पोरां'कडून जर्मन फुटबॉल संघाचा धुव्वा

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आज भारताचा झेंडा खूपच मागे फडकत असला, तरी फुटबॉलमधील देशाचं भविष्य आशादायी असल्याचे शुभसंकेत देणारी एक बातमी थेट युरोपातून आली आहे. भारताच्या १६ वर्षाखालील संघाने एका जर्मन संघाचा ५-० असा धुव्वा उडवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या निकालामुळे, पुढच्या वर्षी आपल्याच देशात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची 'यंग ब्रिगेड' काय किमया करते, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे.

युरोपीय देश फुटबॉलमध्ये किती सरस आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. नुकत्याच झालेल्या युरो कपमध्ये छोट्या संघांनीही अफलातून खेळ करत आपला दर्जा दाखवून दिला. मग, जगज्जेता जर्मनी, फ्रान्स, युरोचा 'हिरो' पोर्तुगाल, इटली यांची महती काय वर्णावी? असं असतानाच, भारताच्या अंडर-१६ संघाने जर्मनीतील सारलँडाउस्व्हलच्या अंडर-१८ संघावर दणदणीत विजय मिळवून खळबळ उडवून दिली आहे. जर्मनीचे निकोलाई अॅडम यांच्याकडून प्रशिक्षण घेणारे भारताचे तरुण सध्या युरोपमध्ये सराव करताहेत. त्यांनीच हा पराक्रम केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'युनिकोड कन्सॉर्शियम'मध्ये फडकली मराठी पताका.

महाराष्ट्र शासनाने युनिकोड कन्सॉर्शियम या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व मिळवले आहे. यामुळे महाराष्ट्राने गुगल, फेसबुक, आयबीएम, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सॅप, सीमॅन्टेक अशा युनिकोडच्या सदस्यांच्या रांगेत स्थान प्राप्त केले आहे. असे सदस्यत्व प्राप्त करणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य बनले आहे.

राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती जाहीर केली आहे. मराठी राजभाषा दिनाला (२७ फेब्रुवारी २०१६) विनोद तावडे यांनी सदस्यत्व मिळवण्याची घोषणा केली होती.

मराठी भाषा विभागाच्या अंर्तगत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेने हे सदस्यत्व प्राप्त केले आहे. मराठी भाषा, युनिकोड पद्धत, संगणक व मोबाईल तंत्रज्ञान आणि देवनागरी लिपी यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयासाठी आणि प्रमाणीकरणासाठी, तसेच मराठी भाषाविकासाच्या दृष्टिनेही ही महत्त्वाची घटना असल्याचे मानले जात आहे.
मराठी भाषा आणि देवनागरी लिपी यांबद्दलच्या तंत्रज्ञानात्मक गरजा कन्सॉर्शियमच्या सदस्य कंपन्यांना कळविणे, आता शासनाला सहज शक्य होणार आहे. नामांकीत सदस्य कंपन्या नव्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती करताना शासनाने दिलेल्या गरजांचा संदर्भ लक्षात घेणार आहेत. त्याचबरोबर, सदस्य-कंपन्यांच्या सॉफ्टवेअर्समध्ये युनिकोड-मराठी परिपूर्णतेने चालत नसेल, तर तशा सूचना शासन सदस्य-कंपन्यांना देऊ शकते अशी माहिती भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ह्या सदस्यत्वामुळे जागतिक स्तरावर राज्य शासनाला या संदर्भात मताधिकारही प्राप्त झाला आहे. तसेच युनिकोड संदर्भातील जागतिक चर्चेमध्ये शासनाच्या मताला मूल्य प्राप्त झाले आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपिचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित स्थानही प्राप्त होणार आहे. सध्या युनिकोडात समाविष्ट नसलेली पण मराठीसाठी आवश्यक असलेली लिपिचिन्हे (अपूर्णांक, संगीतविषयक चिन्हे इ.) आणि भावचिन्हे (वडापाव, जातं, छ.शिवरायांची राजमुद्रा, इ.) यांना प्रमाणित संकेतांक मिळविणे शासनाला सोपे जाणार आहे.

मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडलेल्या विविध चिन्हांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित मान्यता मिळवण्यासाठी मराठी जनतेनेही या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा आणि निवडक लिपिचिन्हे व भावचिन्हे rmvs_mumbai@yahoo.com या पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. उषा माधव देशमुखांना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार घोषित

राज्य शासनाच्यावतीने संत साहित्य, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१५-१६चा 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार हा संशोधक-समीक्षक डॉ. उषा माधव देशमुख यांना आज घोषित करण्यात आला.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचं निधन.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचं आज मुंबईतील राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती सुधीर नाईक (माजी क्रिकेटपटू) व विवाहित कन्या आहे. वसुंधरा पेंडसे यांची मुलगी सध्या ऑस्ट्रेलियात असून ती भारतात परतल्यावर रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वसुंधरा पेंडसे यांनी मराठी आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांत त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए. केलं होतं. सुरुवातीला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या वसुंधरा पेंडसे यांनी वडील आप्पा पेंडसे यांच्या पावलावर पाऊल टाकत पत्रकारितेत प्रवेश केला. 'लोकप्रभा साप्ताहिकाच्या त्या पहिल्या कार्यकारी संपादक होत्या. त्यानंतर त्यांनी 'नवशक्ती' या दैनिकाचं संपादकपदही भूषवलं. दूरदर्शनवर दर रविवारी प्रसारित होणाऱ्या 'अमृत मंथन' या संस्कृत भाषेच्या विशेष कार्यक्रमाचं त्यांनी अनेक वर्षे सूत्रसंचालन केलं होतं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दहशतवादी बुरहानला पाकिस्तानने घोषित केले 'शहीद'

- काश्मीरमधल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला पाकिस्तानने 'शहीद' घोषित केले आहे. मागच्या शुक्रवारी सुरक्षापथकांनी चकमकीत बुरहानला कंठस्नान घातले होते. काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ १९ जुलै काळा दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी सांगितले.

लाहोरमध्ये बोलवलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत त्यांनी काश्मीरमुद्यावर चर्चा केली. काश्मीरमधली चळवळ ही काश्मीरी स्वातंत्र्याची चळवळ आहे असे शरीफ म्हणाले. अधिकारांसाठी काश्मीरी जनतेची जो संघर्ष सुरु आहे. त्यामध्ये पाकिस्तान काश्मीरीजनतेला नैतिक, राजकीय आणि कुटनितीक समर्थन देत राहील असे शरीफ यांनी सांगितले.
स्वातंत्र्य चळवळीच बुरहान शहीद झाला आहे. भारताकडून जे क्रौर्य दाखवले जातेय त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्य संघर्षाला अधिक बळच मिळणार आहे. काश्मीरी जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान ठामपणे त्यांच्या मागे उभा आहे अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली आहेत. आतंरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडा असे निर्देश शरीफ यांनी दिले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जागतिक युवा कौशल्य दिन

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली कौशल्य भारत (स्किल इंडिया)
योजनेची घोषणा केली. मात्र अर्थसहाय्याविना कौशल्याचा विकास करायचा तरी कसा? असा सवाल अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. मुद्रा बँकेमार्फत केंद्र शासनाने राज्यातील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यात अनुभवी प्रशिक्षणार्थींना १० लाख रुपयांपर्यंत, तर नवोदित प्रशिक्षणार्थींना ५ लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित झाले. मात्र केंद्र शासनाकडे राज्यातून या कर्जपुरवठ्यासाठी केवळ शासकीय आयटीआयची यादी देण्यात आली. परिणामी अशासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्ञानेश्वरीची अठराव्या शतकातील प्रत

शालिवाहन शक 1212 , अर्थात इसवी सन 1290 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीची एक प्रत अमेरिकेतील " व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाइन ऑर्टस् ' या संग्रहालयात असल्याचे एका अनिवासी मराठी युवकाला नुकतेच आढळले आहे . विशेष म्हणजे ही प्रत नागपुरी चितारी घराण्याच्या चित्रकलेचा उत्कृष्ट असल्याचे मानले जाते . या ज्ञानेश्वरीच्या प्रतीचे काही छायाचित्रे -

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹धान्योत्पादनाचे उद्दिष्ट 27 कोटी टनांचे

यंदाच्या आर्थिक वर्षात ( 2016 -17 साठी ) सरकारने 27 कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे . तसेच गहू आणि तांदळाप्रमाणेच येत्या काही वर्षांत डाळींच्या उत्पादनातही देश स्वावलंबी होईल , असा दावा कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केला .

कृषी मंत्रालयाशी संबंधित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली . लोकसभेचे चिंतामण वनगा , रोडमनल नागरह , जी . हरी , एम . बी. राजेश , संजय श्यामराव धोत्रे , डॉ . तापस मंडल आणि राज्यसभेचे डॉ . चंद्रपालसिंह यादव हे खासदार या वेळी उपस्थित होते. समितीने बीज प्रमाणीकरणाच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली . कृषी मंत्रालयाने बीज प्रमाणीकरणावर बारकाईने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाचे संकरित बियाणे उपलब्ध करून दिले जावे , अशा सूचना या समितीने केल्या.

राधामोहनसिंह म्हणाले , की धान्योत्पादनाच्या तिसऱ्या अंदाजानुसार 2015 - 16 मध्ये एकूण धान्योत्पादन 25 .22 कोटी टन झाले . हे प्रमाण 2014 -15 मध्ये 25 .20 कोटी टनांपेक्षा थोडे अधिक होते . यंदाच्या वर्षात 27 कोटी टन धान्योत्पादनाचे लक्ष्य सरकारने ठरविले आहे . त्याचप्रमाणे खाद्यतेलाची गरज आणि दरवर्षी होणारी 1 .2 कोटी टन खाद्य तेलाची आयात पाहता सरकारने विशेष मोहीम राबबिली आहे . त्याअंतर्गत तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविण्यात आले आहे .

कडधान्याच्या ; विशेषतः डाळींच्या वाढत्या मागणीबद्दल ते म्हणाले , की डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी 2013 -14 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत (एनएफएसएम ) 16 राज्यांमधील 468 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते . केंद्रात एनडीए सरकार आल्यानंतर या मोहिमेमध्ये 29 राज्यांमधील 638 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यात ईशान्य भारतातील राज्ये , डोंगराळ भागातील राज्ये , केरळ , गोवा यांसारखी किनारपट्टीवरील राज्येही त्यात सहभागी झाली आहेत. केंद्र सरकारने कडधान्योत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून , 2016 - 17 मध्ये "एनएफएसएम ' अंतर्गत दिल्या जाणाऱ्या एकूण 1700 कोटी रुपयांपैकी 1100 कोटी रुपयांची तरतूद कडधान्योत्पादन वाढविण्यासाठी केली आहे .

#व्यक्तिविशेष

🔹तोच जोश . . . तोच ‘पेस ’

चार वर्षांनंतर लिअँडर पेस वयाच्या अर्धशतकाच्या आणखी जवळ आलेला असेल. तरीही तो अजूनही नव्या उमेदीने , उत्साहाने खेळत आहे . लिअँडरचे अनेक समकालीन टेनिसपटू निवृत्त होऊन एक दशकापेक्षा अधिक काळ झाला आहे . लिअँडर कधी निवृत्त होईल हे भाकीत करणे कठीण असले , तरी वय आणि ऑलिंपिकची पात्रता गाठण्याचे आव्हान यामुळे बहुधा टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याचा सहभाग नसेल , हा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. त्यामुळे सलग विक्रमी सातव्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असलेल्या ४३ वर्षीय लिअँडरची रिओ ही शेवटची ऑलिंपिक स्पर्धा ठरू शकते .

 आंतरराष्ट्रीय हॉकीपटू वेस आणि बास्केटबॉलपटू जेनिफर यांचा हा मुलगा १९८५ मध्ये चेन्नई येथील ब्रिटानिया अमृतराज अकादमीत दाखल झाला आणि येथेच डेव्ह ओ मेरा यांनी हिऱ्याला सर्वप्रथम पैलू पाडले . १९९०मध्ये अमेरिकन ओपन आणि विंबल्डनच्या ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावून त्याने आपली चमक दाखवली . अजूनही ही चमक कायम आहे . १९९१ पासून तो व्यावसायिक टेनिसमध्ये सहभागी होऊ लागला. १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये रमेश कृष्णनसोबत खेळताना लिअँडरने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली . चार वर्षांनंतर अटलांटात इतिहास घडला . मनगट दुखत असतानाही त्याने एकेरीत ब्राँझपदक जिंकले . खाशबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळविणारा लिअँडर पहिला भारतीय खेळाडू ठरला . २००४ च्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये दुहेरीतील त्याचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले. महेश भूपतीसोबत खेळताना ही जोडी ब्राँझपदकाच्या लढतीत पराभूत झाली.

 लिअँडर आणि महेश भूपतीने भारताला डेव्हिस करंडकात अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले . ही जोडी त्यांच्या कामगिरीने जशी गाजली , तशीच वादग्रस्तपणे तुटली . ग्रॅंडस्लॅम जिंकणारा सर्वांत वयस्कर टेनिसपटू , एकाच वेळी विंबल्डनमध्ये पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी ( १९९९ ) अशी दुर्मिळ कामगिरी करणारा एकमेव टेनिसपटू , असे कितीतरी विक्रम लिअँडरच्या नावावर नोंदविले गेले आहेत. सहा ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला तो पहिलाच टेनिसपटू होय . असा भारतीय क्रीडा क्षेत्राचा राजदूत रिओत रोहन बोपण्णासोबत दुहेरीत खेळेल .

 लिअँडरच्या ऑलिंपिक कारकिर्दीची दिमाखात सांगता होवो , अशीच तमाम भारतीयांची इच्छा आहे .

लिअँडरची महत्त्वपूर्ण कामगिरी
ऑलिंपिक
एकेरी - अटलांटा ( १९९६ ) - ब्राँझ
राष्ट्रकुल - दिल्ली (२०१० ) - ब्राँझ

आशियाई क्रीडा -
१९९४ हिरोशिमा ( पुरुष दुहेरी व सांघिक -सुवर्ण , एकेरी - ब्राँझ ) ,
२००२ (बुसान - दुहेरी-सुवर्ण )
२००६ (दोहा - दुहेरी व मिश्र दुहेरी-सुवर्ण )

ग्रॅंड स्लॅम -
मिश्र दुहेरी - ३ ऑस्ट्रेलियन , ४ विंबल्डन , २ अमेरिकन , १ फ्रेच
दुहेरी - ३ फ्रेंच , ३ अमेरिकन , १ विंबल्डन , १ ऑस्ट्रेलियन .

पुरस्कार -
अर्जुन - १९९० ,
राजीव गांधी क्रीडा रत्न- १९९६ ,
पद्मश्री - २००१
पद्मभूषण : २०१४ .
___________________________________
For more Daily Current Affairs join us @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹संसदीय कामकाज समितीतून स्मृती इराणी यांची हकालपट्टी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात केंद्रीय मंत्रिपदावरून वस्रोद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेल्या स्मृती इराणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्रिपदापाठोपाठ इराणी यांची संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर मोदींनी सर्व सहा कॅबिनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. याआधी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून स्मृती इराणी यांचा समितीमध्ये समावेश होता. मात्र आता वस्त्रोउद्योग मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री असून सुद्धा इराणी यांना सहापैकी एकाही कॅबिनेट समितीवर जागा मिळू शकली नाही. विशेष म्हणजे समितीवरील नव्या सदस्यांमध्ये स्वतंत्र कारभार असलेल्या एका मंत्र्यासह अन्य दोन राज्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे.

🔹'जीएसटी'साठी वाटाघाटी

काँग्रेसच्या विरोधामुळे राज्यसभेत अडलेल्या बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकावर शुक्रवारी मोदी सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांदरम्यान 'सकारात्मक' प्राथमिक चर्चा झाली. मात्र, सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत होणार काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. या विधेयकावर सर्वसंमती घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या संसद भवनातील कक्षात अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी जीएसटी विधेयकाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याविषयी चर्चा केली. या चर्चेत राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्माही सहभागी झाले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तुर्कीत लष्करी उठाव; १२० बंडखोरांना अटक

आतातुर्क विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून सावरत असलेल्या तुर्कीला काल रात्री मोठा हादरा बसला. तुर्की लष्करातील एक गटानं शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला. बंडखोर सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४२ लोक ठार झाले आहेत. त्यात २०हून अधिक पोलिसांचा समावेश आहे. तुर्की पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत १२० बंडखोरांना अटक केली आहे. पोलीस व बंडखोरांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरूच आहे. मात्र, तुर्कीचे राष्ट्रपती इर्दोगन यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे.

सरकारविरोधात उठाव करणाऱ्या बंडखोरांनी सर्वप्रथम आशियाला युरोपशी जोडणारा पूल बंद करून टाकला. त्यानंतर तुर्कीच्या विशेष पोलिसांच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यात १७ पोलिसांचा मृत्यू झाला. बंडखोरांनी संसदेलाही लक्ष्य केले. संसदेच्या वास्तूवर बॉम्बहल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच सरकारनं तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जमावबंदी लागू करण्यात आली असून सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, तुर्की पोलिसांनी बंडखोरांना कडवी झुंज देत त्याचे एक हेलिकॉप्टर पाडले आहे. बंडखोरांना सामील असलेल्यांपैकी १२० जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी, देशातील लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

तुर्कीचे राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासीयांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'तुर्कीतील बंडाशी लष्करप्रमुखांचा काहीही संबंध नाही. काही मोजक्या लोकांनी हा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं असून १२० अटक करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून हल्ला करणाऱ्या बंडखोरांना संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती इर्दोगन यांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' इसिस ' ला शह देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

मुस्लिम धर्मोपदेशक करत आहेत विचार
कोलकता - इसिस या दहशतवादी संघटनेचा देशातील प्रभाव कमी करण्यासाठी मुस्लिम धर्मोपदेशकांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे .

देशातील मुस्लिम समाजातील अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून " इसिस ' च्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे . या पार्श्वभूमीवर मुस्लिम तरुणांमध्ये इस्लामविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मुस्लिम धर्मोपदेशकांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे . मुस्लिम तरुणांचे इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांबद्दल वाढते आकर्षण कमी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांना धडे देणार असल्याची माहिती बंगालचे इमाम फजलूर रेहमान यांनी शुक्रवारी दिली . यासंदर्भात अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नसून बंगाली धर्मोपदेशक रेहमान इतर इस्लामी धर्मोपदेशकांशी चर्चा करत आहेत.

इसिस या संघटनेसह इतर दहशतवादी संघटना इस्लाम आणि कुराण चुकीच्या पद्धतीने तरुणाईसमोर मांडत असल्याचे रेहमान यांनी म्हटले आहे . या दहशतवादी संघटनांना ते वापर करत असलेल्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला इस्लामचे धडे देण्यात येतील . तसेच दहशतवादी संघटना पसरवत असलेल्या चुकीच्या इस्लामी संकल्पनेला विरोध करण्यात येईल .

विविध भाषांतून इस्लाम समजविणार
स्लम तरुणाईचे इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांविषयीचे आकर्षण कमी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामचा अर्थ हिंदी , उर्दू, बंगाली , इंग्रजी भाषेतून समजाविण्याचा विचार सध्या सुरू आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोण आहेत तुर्कस्तानमधील फतेउल्लाह गुलेन ?

तुर्कस्तानमध्ये लष्कराने सत्ता हाती घेत केलेल्या उठावामुळे निर्माण झालेल्या संघर्षात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे . मृतांमध्ये 17 पोलिसांचा समावेश आहे . पंतप्रधान बिनाल यिल्दीरीम यांनी आपण नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे . यिल्दीरीम यांनी अमेरिकन मुस्लिम मोलवी फतेउल्लाह गुलेन यांनी आपल्या अनुयायांसह उठाव केल्याचे म्हटले आहे .

फतेउल्लाह गुलेन यांच्याविषयी थोडक्यात -
गुलेन हे तुर्कस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते समजले जातात

75 वर्षीय गुलेन प्रकृतीच्या कारणांमुळे त्रस्त आहेत

मुस्लिम मौलवी गुलेन यांचे तुर्कस्तानमध्ये लाखो अनुयायी आहेत

दीडशेहून अधिक देशांत त्यांच्याकडून शाळा चालविण्यात येतात

कोट्यवधी डॉलरमध्ये यांचे व्यवहार आहेत
अमेरिकेतील पेनसिल्वव्हिनियामध्ये ते 90 च्या दशकात राहत होते

तुर्कस्तानमध्ये देशविरोधक कारवायांचा आरोप झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते
त्यानंतर त्यांना काही दिवसांतच आरोपमुक्त करण्यात आले

2014 मध्ये गुलेन यांनी तुर्कस्तान सरकारविरोधात कारवाईचे संकेत दिले होते

सध्याचे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तयिप एर्दोगन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले गुलेन प्रतिस्पर्धी मानले जातात
तुर्कस्तानमध्ये पोलिस , न्यायपालिका आणि तपास यंत्रणांमध्ये गुलेन यांचा प्रभाव असलेले कर्मचारी आहेत

सध्याच्या लष्करी उठावात या समर्थकांचा प्रामुख्याने समावेश आहे

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्कॉटलंडबाबत पुन्हा सार्वमत नाही - ब्रिटन

' ब्रेक्झिट ' च्या बाजूने ब्रिटनच्या जनतेने कौल दिल्यानंतर स्कॉटलंडने स्वातंत्र्याबाबत दुसऱ्यांदा सार्वमत घेऊ नये , असे ब्रिटनचे स्कॉटलंड मंत्री डेव्हिड मुंडेल यांनी आज स्पष्ट केले. युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये 52 : 48 या प्रमाणात मतदान झाले होते , तर स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत घेण्यात आलेल्या सार्वमतावेळी 62ः38 या प्रमाणात नागरिकांनी मतदान केले होते . ' स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत घेण्याचा प्रश्नच नाही . अशा प्रकारे पुन्हा सार्वमत घेण्यास माझा स्पष्ट विरोध असून , तो यापुढेही कायम राहील. स्कॉटलंडला ब्रिटनपासून अनेक फायदे मिळत आहेत,'' असे मुंडेल यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹औरंगाबादच्या युवकाची कंपनी ‘ई-बे’ने केली खरेदी!

मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील ‘ई बे’ कंपनीने खरेदी केली आहे.

मुक्तक जोशी याचे औरंगाबादेतील सरस्वती भुवन प्रशालेत मराठी
माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले
आहे. देवगिरी महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर त्याने एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या काळातच त्याने सॉफ्टवेअर कंपन्यांचे ‘फ्री लान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. २००५मध्ये बी. ई. कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण झाला. २००७मध्ये ‘टेक्नोप्रोटेन’ कंपनी स्थापन केली. त्यानंतर २०१२मध्ये ‘टिकेट युटिल्स’ची सुरुवात केली.

मुक्तकचे बंधू सत्यक जोशी आणि पत्नी श्रुती हे त्यांना कंपनीच्या कामात मदत करतात. त्याचे वडील शोधन जोशी हे शहरातील प्रसिद्ध बिल्डर आहेत.

 अमेरिकेतील लास वेगास शहरात शुक्रवारी मुक्तकच्या ‘टिकेट युटिल्स’चा ‘ई-बे’शी करार झाला. मात्र, हा करार किती किमतीला झाला याची माहिती दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी)
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्टेडियममध्ये आणि इनडोअर ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि विविध इव्हेंटची तिकिटे अनेक ब्रोकर गठ्ठा पद्धतीने (बल्क) खरेदी करतात आणि नंतर ती आॅनलाइन नागरिकांना विक्री करतात.

ग्राहकांपर्यंत आॅनलाइन तिकीट पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर ‘टिकेट युटिल्स’ने तयार केले असून, काही सेकंदांत लाखो लोकांपर्यंत ही तिकिटे पोहोचण्यास मदत होत आहे. तिकिटांची पुनर्विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ‘पॉइंट आॅफ सेल’ असे हे उत्पादन ‘टिकेट युटिल्स’ने विकसित केले आहे.

कंपनीचे हे उपयुक्त सॉफ्टवेअर
पाहून या क्षेत्रात बडी कंपनी असलेल्या ‘ई बे’ने कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मुक्तकच्या कंपनीत औरंगाबाद, जालना, बीड आदी ठिकाणांहून आलेली तरुण मंडळी आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय

मुंबई : रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मुंबई सेंट्रल स्थानकात ही सेवा सुरू झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या आणखी पंधरा उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मंजुरी देण्यात आली असून १५ आॅगस्टपर्यंत सर्व स्थानकांवर वायफाय सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे टेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे.

२0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सुरुवातीला १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा २0१६ पर्यंत देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६ च्या जानेवारी महिन्यात सुरू झाली. मात्र त्यानंतर अन्य स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. अखेर १५ उपनगरीय स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

२१ एप्रिल २0१६ रोजी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत मुंबईतील काही स्थानकांवर १५ आॅगस्टपर्यंत वायफाय सेवा देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी

भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसनं डेव्हिस चषकात बोपण्णाच्या साथीनं कोरियाविरुद्धच्या लढतीतील दुहेरी सामना जिंकला आहे. या विजयामुळे लिएंडर पेसनं डेव्हिस चषक पुरुष दुहेरीत इटलीच्या निकोला पित्रांगेलीच्या सर्वाधिक 42 विजयांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. पेस आतापर्यंत भारतासाठी पुरुष दुहेरीत 53 सामने खेळला असून त्यात तो केवळ 11 वेळा पराभूत झालाय.
_____________________________________
दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल @ChaluGhadamodi जॉईन करा .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पेमा खांडू देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री

#इटानगर - कॉंग्रेस पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी आज अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली , तर चौना मेन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . अरुणाचल प्रदेशात मागील काही दिवसांतील वेगवान राजकीय घडामोडींनंतर माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याऐवजी खांडू यांची कॉंग्रेसच्या नेतेपदी निवड करण्यात आली . अवघे 37 वर्षांचे पेमा खांडू हे देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत.

राज्यपाल तथागत रॉय यांनी खांडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली . त्रिपुराचे राज्यपाल असलेल्या रॉय यांच्याकडे अरुणाचलच्या राज्यपालपदाचाही कार्यभार आहे . पेमा खांडू हे अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री दोर्जी खांडू यांचे पुत्र आहेत. दोर्जी खांडू यांचे 2011 मध्ये विमान अपघातामध्ये निधन झाले .

सूत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खांडू म्हणाले , की राज्यपालांचे राज्यात आगमन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल . अरुणाचलच्या विकासासाठी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन काम करू . दोन अपक्षांसह एकूण 45 आमदारांचे आपल्याला समर्थन असल्याचा दावा खांडू यांनी केला आहे .
दरम्यान , नबाम तुकी यांना राज्यपालांनी सभागृहात शनिवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र , त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने अनपेक्षितपणे तुकी यांच्या जागी खांडू यांची निवड केली . तुकी हेच अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता .
________________________________
For more join us @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमृतसर आणि जलंधरला भूकंपाचे सौम्य धक्के.

पंजाबमधील अमृतसर आणि जलंधरमध्ये रविवारी संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पाकिस्तानमधील लाहोरजवळ झालेल्या भूकंपाचे धक्के भारतात जाणवल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी नोंदवण्यात आली.
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लाहोरसह शेखुपूरा आणि अन्य भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबसह भारत-पाकिस्तान सीमेवर पाच वाजून २४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना माहिती आयोगाची नोटिस

नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आयोगाने ( सीआयसी ) आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह देशातील सहा प्रमुख पक्षांच्या बड्या नेत्यांना नोटिस बजावत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याचा आरोप करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सहा राष्ट्रीय पक्षांविरोधात तक्रार दाखल केली होती .

नोटिस बजावलेल्या इतर नेत्यांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती , कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माकपचे नेते प्रकाश कारत , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाकपचे नेते सुधाकर रेड्डी यांचा समावेश आहे . याचिकाकर्त्यांपैकी आर. के . जैन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी भाजप , कॉंग्रेस , बसप , राष्ट्रवादी कॉंग्रेस , भाकप आणि माकप या सहा राष्ट्रीय पक्षांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेताना "सीआयसी ' च्या रजिस्ट्रार यांनीही दुटप्पी धोरण स्वीकारले होते . त्यांनी नोटीस बजावताना त्यात केवळ सोनिया गांधी यांच्याच नावाचा थेट उल्लेख केला होता व इतर पक्षांना नोटिस पक्षप्रमुख या नावाने पाठविण्यात आली होती . त्यांच्या या आरोपानंतर "सीआयसी ' ने आज या सहा पक्षांच्या तत्कालीन अध्यक्षांच्या नावाने आज पुन्हा नोटीस बजावली आहे .

माहिती अधिकार कायदा, 2013 अंतर्गत सर्व पक्ष उत्तर देण्यास जबाबदार असल्याचे माहिती आयोगाने जाहीर केल्यानंतर जैन यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षांना मिळालेली देणगी , निधी, अंतर्गत निवडणुका याबाबत माहिती मागविली होती . या सर्वांकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती . यानुसार , आयोगाने आज पाठविलेल्या नोटिशीमध्ये या सर्व नेत्यांना 22 जुलैला आयोगाच्या खंडपीठासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नोटिशीला 20 जुलैपूर्वी उत्तर न दिल्यास आणि दिलेल्या वेळी हजर न राहिल्यास याबाबत पक्षांना कोणताही बचाव करायचा नसून कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यास हरकत नाही , असा अर्थ घेण्यात येईल, असेही आयोगाने बजावले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चाळीसगावची हर्षा बनली ' पायलट'

🔹21 व्या वर्षी "कमर्शिअल पायलट ' होणारी हर्षा ठरली एकमेव महिला वैमानिक

 वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी "एअर इंडिया' मध्ये "कमर्शिअल पायलट ' म्हणून रुजू झालेल्या चाळीसगावच्या हर्षा महाले ( राजपूत) हिने गगन भरारी घेऊन चाळीसगावच्या लौकिकात भर घातली आहे . विशेष म्हणजे , 21 व्या वर्षी " कमर्शिअल पायलट ' होणारी हर्षा ही भारतातील एकमेव महिला वैमानिक ठरली आहे .

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हर्षाने सर्वप्रथम "पायलट ' होण्यासाठी काय तयारी लागते , याची सर्व माहिती जाणून घेतली . त्यासाठी ती रायबरेली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान ऍकॅडमीत गेली . हैदराबादच्या एका संस्थेतूनही तिने प्रवेश प्रक्रिया , अभ्यासक्रम जाणून घेतला . " पायलट ' साठी असलेल्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीमध्ये ती पात्र ठरली . त्यानंतर " एअर बस ' च्या दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी तिने प्रवेश घेतला . अमेरिकेतील फ्लोरिडा व त्यानंतर टेक्सास येथे तिने तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतले . प्रशिक्षणादरम्यान हर्षाला बरेच काही शिकता आले . विमान चालवतानाचा अनुभव विलक्षण असून यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असल्याचे ती सांगते .

पायलट म्हणून नियुक्ती
हर्षा महाले हिची "एअर बस 302 ' ची सीनिअर पायलट म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे . या पदासाठी भारतातून जवळपास 550 उमेदवारांचे अर्ज आले होते . त्यातून हर्षा ही राजपूत समाजातील पहिली व एकमेव महिला पायलट ठरली आहे . चाळीसगावच्या या कन्येने " नासा गर्ल ' स्विटी पाटेसारखी उंच भरारी घेतली आह

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माईक पेन्स उपाध्यक्षपदाचे उमेदवार

 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियानाचे गव्हर्नर माईक पेन्स यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे . ट्रम्प यांनी केलेली ही निवड महत्त्वाचे पाऊल समजले जात असून , त्यामुळे ट्रम्प यांना त्यांच्या स्वतःच्याच पक्षात जनाधार वाढण्याची शक्यता आहे .

रिपब्लिकन पक्षातील अनेकांचा ट्रम्प यांना विरोध आहे . मात्र , पेन्स यांना पाठिंबा देणारा मोठा वर्ग आता ट्रम्प यांच्या बाजूने येण्याची शक्यता आहे . त्यामुळे पेन्स यांच्या निवडीमुळे ट्रम्प यांना फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे . इंडियानाचे गव्हर्नस असलेले पेन्स हे नावाजलेले सामाजिक आणि पुराणमतवादी नेते आहेत. पेन्स यांच्या निवडीने अनेकांनी स्वागत केले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नवज्योतसिंग सिद्धू यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा सोमवारी राजीनामा दिला. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर नवज्योतसिंग सिद्धू यांनी घेतलेला हा निर्णय भाजप सरकारला धक्का देणारा आहे. भाजप नेत्यांनी सिद्धूकडे दुर्लक्ष केल्याने सिद्धू राजकारण सोडून पुन्हा सन्मानाची वागणूक असणाऱ्या आपल्या मूळ क्षेत्रात परत जाणार असल्याची प्रतिक्रिया सिद्धू यांच्या आमदार पत्नी नवज्योत कौर यांनी फेसबुकच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, अखेर सिद्धू राजकारणाच्या मैदानातून सध्या तरी बाहेर पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमृतसर मतदार संघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले सिद्धू दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नवज्योतसिंग सिद्धू समालोचन आणि इतर कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे संसदेत कमी उपस्थिती असायचे. त्यामुळे राजकीय कारकिर्दीनंतर पुन्हा ते आपल्या क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राकडे वळणार की भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पंजाबमधील आगामी निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या साथीने पुन्हा राजकीय मैदानात उतरणार याचा अंदाज तुर्तास लावणे अशक्य आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मंत्री , आयएएस अधिकाऱ्यांना " बीसीसीआय ' चे दरवाजे बंद

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळात ( बीसीसीआय ) मंत्री आणि आयएएस पदाधिकारी यांना सामावून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला . त्याचबरोबर लोढा समितीने दिलेल्या बहुतेक सर्व शिफारशी स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे " बीसीसीआय ' वर जरबच बसवली .

लोढा समितीच्या शिफारशींना आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश टी . एस . ठाकूर आणि न्या . इब्राहिम कलिफुल्ला यांच्या खंडपीठाने आज अंतिम आदेश दिला . त्यानुसार , बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले . त्याचबरोबर याची अंमलबजावणी सहा महिन्यांत करण्याचेही आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बीसीसीआयचे कार्यक्षेत्रच ढवळून निघणार असून , अनेक पदाधिकाऱ्यांना याचा फटका बसणार आहे . शिफारशींची अंमलबजावणी करताना त्यांना आपल्या कारभाराची मोट नव्याने बांधावी लागेल .

 बीसीसीआयकडून या संदर्भात थेट प्रतिक्रिया उमटली नसली , तरी आयपीएल कार्याध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करायला हवा , अशी प्रतिक्रिया दिली आहे . अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी निर्णय वाचल्यावर प्रतिक्रिया देऊ असे म्हटले आहे .

दरम्यान , सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे माजी क्रिकेटपटूंनी स्वागत केले आहे . बीसीसीआयला नेहमीच धारेवर धरणाऱ्या बिशनसिंग बेदी आणि कीर्ती आझाद या माजी क्रिकेटपटूंनी आता तरी बीसीसीआय सुधारेल , अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रेल्वे अपघात टाळण्यासाठी आता " त्रिनेत्र "

 खराब हवामान आणि रुळामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर रेल्वे करीत आहे . रेल्वे अपघात टाळणारी त्रिसूत्रीची "त्रिनेत्र रडार यंत्रणा ' रेल्वेतर्फे विकसित करण्यात आली आहे . ही यंत्रणा देशभरातील सर्व रेल्वेगाड्यांच्या इंजिनला लावण्यात येणार आहे . यामुळे रेल्वे अपघातांना आळा बसणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ ' ला दिली .

खराब हवामान , धुके, रूळ तुटण्याच्या प्रकारामुळे रेल्वे अपघात होतात . मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तीय हानी होते . रेल्वेचेही मोठे नुकसान होते . त्यामुळे सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यानुसार रेल्वे बोर्डाच्या डेव्हलपमेंट सेलने इंजिनचालकाला पुढील मार्ग स्पष्ट दाखविणारी त्रिनेत्र रडार यंत्रणा विकसित केली आहे . रेझोल्युशन ऑप्टिकल व्हिडिओ कॅमेरा , उच्च दर्जाचा इन्फ्रारेड व्हिडिओ कॅमेरा आणि पुढील ट्रॅकचे स्वच्छ छायाचित्र देणाऱ्या नकाशा यंत्रणेचा संगम घडवून " त्रिनेत्र रडार' यंत्र तयार करण्यात आले आहे . या यंत्रणेमुळे इंजिनचालकांना खराब वातावरणातही पुढील ट्रॅक स्पष्टपणे इंजिनमधील संगणकाच्या स्क्रीनवर दिसणार आहे . धुके, पाऊस आणि रात्रीच्या वेळीही याचा फायदा होईल . यामुळे इंजिनचालकाची कसरत वाचणार आहे . या यंत्रणेमुळे चालकाला दूरवरचे चित्र स्पष्ट दिसणार असल्यामुळे वेगावर अचानक नियंत्रण आणण्याची गरज राहणार नाही आणि अपघात टळेल .

लढाऊ विमानांच्या यंत्रणेतून घेतली प्रेरणा
वायुदलाच्या विमानांत ही यंत्रणा कार्यरत असते . धुक्यातही पायलटला पुढचे चित्र स्वच्छपणे दिसत असते . युद्ध नौकांनाही रात्रीच्या वेळी प्रवास करताना समुद्राचा खोलीचा अंदाज सातत्याने घ्यावा लागतो . अनेक अडचणींच्या ठिकाणांतून विमान आणि युद्धनौका कसे मार्ग काढतात , याच्या कुतूहलातून " त्रिनेत्र रडार' यंत्रणेची निर्मिती झाली आहे . या यंत्रणेला रेल्वेने जन्म घातला असला , तरी त्याच्या मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी अमेरिका , इस्राईल, फिनलंड आणि ऑस्ट्रिया येथील कंपन्या उत्सुक आहेत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .
________________________________
Join us @chalughadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹He किंवा She नव्हे ; Zie

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा अवमान टाळण्यासाठी त्यांना " ही ' ( He ) अथवा " शी ' (She ) असे सर्वनाम लावण्यापेक्षा " झी ' (Zie ) हे सर्वनाम लावण्याचे आदेश येथील बोर्डिंग स्कूलच्या शिक्षकांना देण्यात आले आहेत. युके बोर्डिंग स्कूल असोसिएशनने हा आदेश जारी केला आहे .

शाळांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून त्यांच्याबद्दल बोलताना "ही ' अथवा "शी ' सर्वनामाचा वापर करण्यास त्यांचा विरोध असतो. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले . "झी ' हे लिंगभेद न दर्शविणारे सर्वनाम समजले जात असून युरोपमध्ये या सर्वनामाचा वापर वाढत आहे . त्यामुळेच शिक्षकांनी तृतीयपंथी विद्यार्थ्यांबरोबर अथवा त्यांच्याबद्दल बोलताना याच सर्वनामाचा वापर करावा , असे सांगण्यात आले आहे . समानता कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक आणि मान मिळणे आवश्यक असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जैवविविधता ओलांडतेय धोक्याची पातळी

जागतिक स्तरावरील जैवविविधतेने धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरवात केली असून , त्याचा परिणाम पर्यावरणातील घटकांवर होऊ लागला आहे . त्यामुळे मानवी समाजाच्या शाश्वततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ आल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे .

याबाबत " जर्नल सायन्स ' मध्ये माहिती प्रकाशित करण्यात आली आहे . याबाबत बोलताना ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक टीम न्यूबोल्ड म्हणाले , की जैवविविधतेमधील अधिवासांवर गंभीर परिणाम होत असल्याचे पहिल्यांदाच निदर्शनास येत आहे . जगाच्या जैवविविधतेचा विचार करता धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरवात झालेली आहे , असे अनेक पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे असल्याचेही न्यूबोल्ड म्हणाले . मानवाचा पर्यावरणाच्या साखळीमध्ये हस्तक्षेप वाढला आहे ; पण आता विधायक व शाश्वत विकासाला अनुकूल असा हस्तक्षेप वाढविणे आवश्यक आहे . त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल , असेही न्यूबोल्ड यांनी नमूद केले.
गवताळ प्रदेश , उष्ण कटीबंधीय प्रदेशातील काटेरी वने व झुडपांची वने सातत्याने कमी असल्याने त्याचा पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम होत आहे . जगभरातील जवळपास सर्वच वनांमध्ये ही परिस्थिती असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे . जैवविविधतेचा सातत्याने ऱ्हास होत आहे . याचा सूक्ष्म जीव व अन्नसाखळीवर परिणाम होऊन पर्यावरणात अनिश्चितता निर्माण होऊ लागली आहे . जगातील 58 . 1 टक्के जमिनींवर सजीवांचा अधिवास आहे . त्यापैकी 71 .4 टक्के जमीन मानवी लोकसंख्येने व्याप्त आहे . लोकसंख्या वाढत आहे , तशी वनांची संख्या कमी होत आहे . त्यामुळे जैवविविधतेमध्ये कमालीचा समतोल जाणवत आहे . या अवस्थेत मानवी समजाला सहकार्य करण्याची पर्यावरणाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे .

पर्यावरणाचा ऱ्हास हा जमिनीच्या मानवी वापरामुळे होत असून , जैवविविधतेने तर सुरक्षेची पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच प्रवेश केला असल्याचे संशोधक सांगतात .

याबाबत लंडनमधील नॅशनल हिस्टरी म्युझियमचे अँडी पर्व्हिस म्हणतात , की मानवाच्या जमीनवापराविषयी चिंता वाटू लागली आहे . यामुळेच जैवविविधतेची पातळी आणखी खालावत असून , ती जगासाठी धोक्याची सूचना आहे .
23 लाख 8 हजार नोंदी तपासल्या
संशोधकांनी अहवालासाठी जगभरातील शंभर शास्त्रज्ञांच्या माहितीचा आधार घेतला. यासोबत 18 हजार 959 भागांतील 39 हजार 123 प्रजातींच्या एकूण 23 लाख 8 हजार नोंदी तपासल्या . यावरूनच जैवविविधतेतील बदल अभ्यासला गेला . मानवाचा अधिवास बदलायला लागल्यापासून जैवविविधता जमिनीच्या प्रति घनकिलोमीटरला बदलत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोव्यात १८२ कि. मी. अंतर्गत जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण

राज्यात तब्बल १८२ किलोमिटर सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलमार्ग आणि जहाजोद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

विस्तृत प्रकल्प अहवालांच्या आधारे विविध जलमार्गांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतर्गत नद्या तसेच सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध अहवाल आणि पर्यावरणावर परिणाम यांचे मूल्यांकन, राष्ट्रीय जलमार्ग ६८ आणि राष्ट्रीय जलमार्ग १११ साठी वन्यजीव अभ्यास समितीच्या मंजुरीचा विचार करण्यात आला असल्याचे राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय जलमार्ग कायदा २0१६ अंतर्गत गोव्यात ज्या सहा जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण होणार आहे त्यात खालील जलमार्गांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकरणामुळे अंतर्गत जलमार्गांवर विकासाचा मार्ग खुला होणार आहे.

मांडवी नदी - रेइश मागुश येथील दर्यासंगम ते उसगांव पूल (४१ कि. मी.)
झुवारी नदी - मुरगांव बंदर ते सावर्डे पूल (५0 कि. मी.)

शापोरा नदी - मोरजी दर्यासंगम ते मणेरी (३३ कि. मी.)

कुंभारजुवें नदी - कुंभारजुवे व झुवारी नदी संगम (कुठ्ठाळी) ते कुंभारजुवे व मांडवी नदी संगम (१७ कि. मी.)

म्हापसा नदी - म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पूल ते म्हापसा व मांडवी नदी संगम (पर्वरी) (२७ कि. मी.)

साळ नदी - देवसा पूल ते मोबोर येथील दर्यासंगम (१४ कि. मी.)
__________________________________
Join our channel here @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौरव घोषालचे विक्रमी विजेतेपद

भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावले. सौरवला विजेतेपदासाठी हरींदरपाल सिंग संधूविरुद्ध पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. तर, तब्बल ५ वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असलेल्या दिपिकाने गतविजेत्या जोश्ना चिनप्पाला चार सेटच्या लढतीत नमवले.
मुंबईतील ओट्टर्स क्लबमध्ये झालेल्या या लढतीत सौरवने पहिला सेट जिंकून आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर हरींदरपालने सलग दोन सेट जिंकताना २-१ अशी आघाडी घेतली. यावेळी काहीसा दबावाखाली आलेल्या सौरवने सावध सुरुवात करताना मोक्याच्यावेळी खेळ उंचावर सौरवने हरींदरपालवर वर्चस्व राखले आणि ११-७, ७-११, ३-११, ११-८, १४-१२ असा झुंजार विजय मिळवत ११व्य्यांदा राष्ट्रीय जेतेपद पटकावले.
दुसरीकडे महिलांमध्ये विक्रमी १५व्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या चिनप्पाला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवरातील १९व्या स्थानी असलेल्या दिपिका पल्लीकलने पहिला सेट गमावल्यानंतर नियंत्रित खेळ करताना अग्रमानांकीत आणि गतविजेत्या चिनप्पाला ४-११, ११-६, ११-२, ११-८ असा पराभवाचा धक्का दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा