Post views: counter

Current Affairs July 2016 Part - 4

★|| eMPSCkatta ||★
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना करणार

विधिमंडळात 2016 - 17 चा अर्थसंकल्प सादर करताना चंद्रभागेच्या पावित्र्याचे व निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन " नमामि चंद्रभागा' मोहीम राबवून 2022 पर्यंत चंद्रभागा नदी निर्मळ , पवित्र व प्रदूषणमुक्त करून तिचे संवर्धन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता . यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली . यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे . पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखणे व ही नदी प्रदूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या "नमामि गंगे ' या अभियानाच्या धर्तीवर "नमामि चंद्रभागा ' ही मोहीम राबविण्याचा संकल्प सरकारने जाहीर केला होता . "नमामि चंद्रभागा ' ही मोहीम जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असून , चंद्रभागा नदी व त्यासाठी वसलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे .

चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कायम राहावी , यासाठी बंधारे बांधणे , नदीचा किमान पर्यावरणीय प्रवाह अबाधित ठेवणे , पंढरपूर यात्रेच्या दरम्यान आळंदी , देहू यांसारख्या वारकऱ्यांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्नानगृहे व शौचालये उपलब्ध करून देणे , पंढरपूर वारीच्या मार्गिकेवरील मुक्कामांच्या ठिकाणावर पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे , स्नानगृहे , निवारा , पिण्याच्या पाण्याची सुविधा कायमस्वरूपी तयार करणे , पंढरपूर शहराची लोकसंख्या ; तसेच येणाऱ्या यात्रेकरूंची लोकसंख्या विचारात घेऊन पुरेशा प्रमाणात फिरती जैविक पद्धतीची शौचालये उपलब्ध करून देणे , चंद्रभागा नदीच्या वरील भागातील भीमा नदीच्या उपनद्यांवरील नागरी वस्त्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे व नागरी घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आदी कामांचा या मोहिमेत प्रामुख्याने समावेश आहे .

या मोहिमेसंदर्भात चंद्रभागा नदीसंवर्धन व संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून , त्यास " नमामि चंद्रभागे प्राधिकरण ' असे संबोधण्यात येणार आहे . मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाचे सहअध्यक्ष अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे .
____________________________
join us @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशात वाय-फाय सर्व ठिकाणी!
.
देशभर अधिकाधिक सार्वजनिक स्थळी वाय-फाय सुविधा विपुल प्रमाणात उपलब्ध व्हावी, यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी (ट्राय)ने पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक व्हायफायचा अधिकाधिक विस्तार करण्याच्या या संकल्पनेला पंतप्रधान कार्यालयाचाही पूर्ण पाठिंबा आहे. नव्या प्रयोगात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून १0 आॅगस्ट पर्यंत ट्रायने प्रस्ताव मागितले आहेत. विचाराअंती सार्वजनिक व्हाय फाय योजनेविषयी नवे धोरण ठरेल, असे संचार मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजते.

इंटरनेट डेटासाठी ग्राहकांना सध्या प्रति एमबी २३ पैसे खर्च करावे लागतात. सार्वजनिक व्हाय फाय सुविधा अधिकाधिक ठिकाणी उपलब्ध झाली तर हा खर्च १0 ते १५ पटीने कमी होईल.
सध्या नेटवर्कवर इंटरनेट डेटा ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात वाढल्याने सारे मोबाईल ग्राहक कॉल ड्रॉप, खराब आवाज व नेटवर्क उपलब्ध नसण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. सार्वजनिक स्थळांवर व्हाय फाय सुविधा उपलब्ध झाल्यास या समस्येला बऱ्यापैकी विराम मिळेल. स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्यास रोजगारही उपलब्ध होईल.

>अनेक स्टार्टअप कंपन्या येऊ शकतील पुढे
ग्राहकांना सार्वजनिक व्हाय फाय सुविधा एकतर मोफत अथवा विशिष्ट दर आकारून किंवा मिश्र स्वरूपात उपलब्ध करून देण्याची ट्रायची योजना आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या अथवा अन्य कंपन्यांना या योजनेतून पैसा कमवता येणार आहे. ना नफा ना तोटा तत्वानुसार सरकारही त्यात सहभागी होऊ शकेल. टेलिकॉम क्षेत्रात नसलेल्या कंपन्यांना व्हाय फाय हॉट स्पॉट विकसित करण्याची संधी ट्राय देऊ इच्छिते, ही नवी संकल्पना या योजनेतून प्रथमच पुढे आली आहे. त्यामुळे अनेक स्टार्ट अप कंपन्या या योजनेचा लाभ उठवण्यासाठी पुढे येऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

>आठ लाख हॉटस्पॉट लागणार
जानेवारी २0१६ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर व्हायफाय सुविधा पूर्णत: उपलब्ध झाली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत देशातील प्रमुख रेल्वे स्थानके व पर्यटन स्थळांवर सार्वजनिक व्हायफाय सुविधा सुरू करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.
देशात एका वेळी १५0 लोकांना ही सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक व्हाय फाय चा एक हॉटस्पॉट याप्रमाणे किमान ८ लाख हॉटस्पॉट तयार करावे लागणार आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

>धोके काय : आजवर व्हाय फायमधून मिळणारे उत्पन्न फारसे आकर्षक नाही. त्यामुळे किती कंपन्या या व्यवसायासाठी तत्परतेने पुढे येतील याविषयी शंका आहे. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेत निर्माण होणारे धोके हा आणखी एक प्रश्न आहे.

>खेड्यांकडे लक्ष : संसदेत नेट न्यूट्रॅलिटीवर चर्चा सुरू असताना, सरकार कशाप्रकारे आणि किती ठिकाणी मोफत इंटरनेट सुविधा प्रदान करू शकते, याची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी संचार मंत्रालयाला दिल्या होत्या. छोटी गावे, खेडी यांनाही ही सुविधा पुरवण्यासाठी लक्ष केंद्रित करावे, असा पंतप्रधान कार्यालयाचा आग्रह आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज ( बुधवार ) करण्यात आली . रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे . ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती .
अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळणे हा आपला बहुमान असल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली . " मी कष्ट करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही , ' असे आश्वासन ट्रम्प यांनी घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिले . ट्रम्प हे अध्यक्षीय उमेदवारीचा यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव उद्या ( गुरुवार) स्वीकारतील , असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .
दरम्यान , या अधिवेशनामध्ये बोलताना विविध रिपब्लिकन नेत्यांनी आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर तिखट हल्ले चढविले . न्यू जर्सी राज्याचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांनी क्लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी वापरलेल्या खासगी इमेल अकाऊंटसंदर्भातील उघडकीस आलेल्या माहितीवरुन त्यांना लक्ष्य केले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये क्लिंटन या " अत्यंत निष्काळजीपणे' वागल्याचा ठपका येथील "एफबीआय' ने ठेवला आहे . यावरुन ख्रिस्ती व अन्य रिपब्लिकन नेत्यांनी क्लिंटन यांच्यावर टीका केली .
ट्रम्प यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार , हे काही महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते . मात्र आज यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले . ट्रम्प व क्लिंटन यांच्यामधील लढत आता अधिक टोकदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रोहित खंडेलवाल पहिला भारतीय ' मिस्टर वर्ल्ड'

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ' मिस्टर वर्ल्ड ' हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे . साऊथपोर्ट येथील साऊथपोर्ट थिएटरमध्ये काल (मंगळवार ) मोठ्या उत्साहात ' मिस्टर वर्ल्ड 2016 ' चा कार्यक्रम पार पडला .
' मिस्टर वर्ल्ड 2016 ' च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भव्य सोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या स्पर्धेत जगभरातील एकूण 47 स्पर्धक सहभागी झाले होते. रोहित खंडेलवाल याने या किताबासह 50 हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले .
निवेदिता साबू यांनी डिझाईन केलेला टक्सिडो रोहितने यावेळी परिधान केला होता . मिस्टर वर्ल्ड जिंकून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल रोहित खंडेलवाल याच्यावर भारतीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी टर्नबुल

माल्कम टर्नबुल यांनी आज ऑस्ट्रेलियाचे 29 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली . पंतप्रधानपदाची ही त्यांची सलग दुसरी टर्म आहे . अस्थिरतेच्या मुद्द्यावरून टर्नबुल यांनी देशामध्ये मतदान घेतले होते . यामध्ये येथील नागरिकांनी गेल्या अडीच वर्षांतील राजकीय अस्थिरता संपवत टर्नबुल यांच्या बाजूने कौल दिला होता .

 गेल्या अडीच वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये पाच पंतप्रधान झाले आहेत. टर्नबुल यांनी आपले पूर्वीचे मंत्री कायम ठेवले असून , नव्यानेही काही जणांचा समावेश केला आहे . तेवीस मंत्र्यांचा समावेश असलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठ्या मंत्रिमंडळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते . जनतेने आम्हालाच पुन्हा निवडून दिल्याने आमची आर्थिक धोरणे पूर्वीप्रमाणेच राबविणार असल्याचे टर्नबुल यांनी स्पष्ट केले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद कालवश

भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे आज (बुधवार ) गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले . ते 56 वर्षांचे होते . 1980 मध्ये झालेल्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते. शाहिद यांनी संघामध्ये " फॉरवर्ड ' म्हणून खेळताना त्यांच्या असामान्य गुणवत्तेचा प्रत्यय घडविला होता .
शाहिद यांना पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागल्याने गेल्या 29 जून रोजी त्यांना बनारस हिंदु विद्यापीठामधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते . मात्र त्यांची प्रकृती आणखी ढासळल्याने त्यांना तातडीने दिल्ली येथे हलविण्यात येऊन गुडगावमधील रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे सुमारे तीन आठवडे उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत आज मालविली. शाहिद यांच्यामागे त्यांची पत्नी परवीन शाहिद आणि मोहम्मद सैफ व हीना शाहिद या दोन मुलांचा परिवार आहे .
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेल्या शाहिद यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फ्रान्समधील युवा विश्वकरंडक स्पर्धेत खेळतानाच आपली छाप पाडली होती . याचबरोबर , सुमारे याच काळात मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेमधील त्यांच्या खेळामुळे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघामधील खेळाडू अक्षरश : अचंबित झाले होते . शाहिद यांचा खेळ वेगवान होता व चेंडू " ड्रिबल ' करण्याची पद्धत अत्यंत प्रभावित करणारी होती . शाहिद यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांचा देशभरात चाहतावर्ग तयार झाला होता .
शाहिद यांना 1981 मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते . याशिवाय , 1986 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते . हॉकीमधून निवृत्ती घेतल्यानंतर शाहिद हे त्यांचे जन्मस्थान असलेल्या वाराणसीमध्येच भारतीय रेल्वेमध्ये काम करत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नरेंद्र मोदींना गुन्हेगारांच्या यादीत टाकल्याबद्दल Google ला न्यायालयाकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील 10 प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत टाकल्याबद्दल न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिका-यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.

वकील सुशील कुमार मिश्रा यांनी याबद्दल न्यायलयात तक्रार केली होती. गुगलवर जगातील 10 प्रमुख गुन्हेगार असं सर्च केलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही दाखवला जात आहे, अशी तक्रार सुशील कुमार मिश्रा यांनी केली होती. 'मी याप्रकरणी गुगलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. मी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती', अशी माहिती सुशील कुमार मिश्रा यांनी दिली आहे.

सुशील कुमार मिश्रा यांना कोणाकडूनच दाद मिळाली नाही तेव्हा त्यांनी मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे धाव घेतली. हे सिव्हिल प्रकरण असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. मात्र सुशील कुमार मिश्रा यांनी मुख्य न्यायदंडाधिका-यांच्या निर्णयाविरोधात आव्हान देत पुनरावृत्ती अर्ज केला ज्यानंतर त्याची याचिका स्विकारण्यात आली. 31 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फॉर्च्युन 500 मध्ये यंदा सात भारतीय कंपन्या
.
फॉर्च्युन मासिकाच्या जगभरातील आघाडीच्या 500 कंपन्यांच्या यादीत यंदा सात भारतीय कंपन्यांना स्थान प्राप्त झाले आहे . यामध्ये इंडियन ऑईल, भारतीय स्टेट बँक , हिंदुस्थान पेट्रोलियम , भारत पेट्रोलियम या चार सरकारी कंपन्यांचा समावेश आहे . खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज , टाटा मोटर्स व राजेश एक्सपोर्ट्सदेखील यादीमध्ये सामील आहेत. उत्पन्नाच्या आधारावर कंपन्यांची क्रमवारी निश्चित केली जाते.
.
रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट तब्बल 482 ,130 दशलक्ष डॉलर उत्पन्नासह जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे . भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने 54 .7 अब्ज डॉलर उत्पन्नासह 161 वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे . यादीत पहिल्यांदाच स्थान प्राप्त झालेल्या राजेश एक्सपोर्ट्सचा क्रमांक 423 वा आहे . याअगोदरच्या वर्षातील यादीत राजेश एक्सपोर्ट्सऐवजी सरकारी तेल उत्पादक कंपनी ओएनजीसीचा समावेश होता .
.
याशिवाय , रिलायन्स इंडस्ट्रीज 215 व्या स्थानावर आहे . अगोदरच्या यादीत रिलायन्स 158 व्या क्रमांकावर होती . परंतु टाटा मोटर्स( 226 ) व एसबीआयच्या( 232 ) स्थान क्रमांकामध्ये सुधारणा झाली आहे . याआधी दोन्ही कंपन्या अनुक्रमे 254 व 260 व्या क्रमांकावर होत्या . हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम क्रमवारीत घसरुन अनुक्रमे 358 व्या व 367 व्या स्थानावर पोचल्या आहेत.
.
वर्ष 2015 मध्ये जगातील 500 आघाडीच्या कंपन्यांनी एकत्रितपणे 27 .6 लाख कोटी डॉलरएवढे उत्पन्न व 1 . 5 लाख कोटी डॉलर नफा मिळविला, असे फॉर्च्युनने आपल्या अहवालात नमूद केले आहे . वॉलमार्टशिवाय स्टेट ग्रिड ( 329 ,601 दशलक्ष डॉलर उत्पन्न ) आणि चायना नॅशनल पेट्रोलियम (299 ,271 दशलक्ष डॉलर उत्पन्न ) , सिनोपेक समुह ( 294 ,344 दशलक्ष डॉलर) , रॉयल डच शेल (272 ,156 दशलक्ष डॉलर ) , एक्झॉन मोबी (246 ,204 दशलक्ष डॉलर ), फोक्सवॅगन ( 236 ,600 दशलक्ष डॉलर) , टोयोटा मोटर ( 236 ,592 दशलक्ष डॉलर) , अॅप्पल ( 233 , 715 दशलक्ष डॉलर ) आणि बीपीला (225 ,982 दशलक्ष डॉलर ) आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" फेसबुक मेसेंजर ' च्या युजर्सची संख्या एक अब्जावर

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाच्या " मेसेंजर ' ऍपने आता एक अब्ज युजरचा पल्ला गाठला आहे . फेसबुक मेसेंजर हे फेसबुकच्याच कुटुंबाचा एक भाग असून संकेतस्थळापेक्षाही जास्त वेगाने या ऍपची लोकप्रियता वाढत असल्याची माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी "फेसबुक' पोस्टद्वारे दिली आहे .

" आज आधुनिक युगातील या एक अब्ज युजर्सच्या प्रवासात संवादाच्या माध्यमाला आणखी उत्तम करण्यासाठी आमचे प्रयोग सुरू आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने युजर्सना अधिक चांगल्या पध्दतीने कसा संवाद साधता येईल यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत ,' असे फेसबुकचे उपाध्यक्ष डेव्हिड मॅरकस यांनी सांगितले .

फेसबुकचे 1 .6 अब्ज युजर्स असून , 2014 मध्ये "फेसबुक फॅमिली ' ने व्हॉट्स ऍप आणि इतर मेसेजिंग ऍप 20 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्या आहेत. याशिवाय फेसबुक "फॅमिली ' त 50 कोटी युजर्स असलेले आणि छायाचित्र शेअर करण्याची सुविधा असलेले " इन्स्टाग्राम ' आणि आभासी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या " ऑक्युलस ' च्या सेवांचाही समावेश आहे . " फेसबुकच्या व्यावसायिक उपयोगासाठी मेसेंजरद्वारे "बोटस् ' नावाचे एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे . यातून सबंधित क्षेत्रातील बातम्यांची देवाण -घेवाण करता येते . मेसेंजरमध्ये आज असे 18 हजार बोटस् उपलब्ध आहेत जे तुमच्या व्यवसायाला वृध्दिंगत करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. फेसबुकच्या मेसेंजरच्या मदतीने युजर्सच्या चॅटिंगमधील जाहिरातींशी सबंधित मजकूरावर लक्ष ठेवले जाते आणि त्याच्याशी सबंधित जाहिराती फेसबुकवरील टाईमलाईनशेजारी युजर्सला दिसतात . यामुळे सबंधित व्यावसायिकालाही त्याचा फायदा होतो . भविष्यात कंपनीकडून या फेसबुक साखळीचा वापर करून एखाद्या जाहिरातीचे "व्हेक्टर्स ' युजर्सला कसे दिसतील यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे . मात्र या प्रक्रियेला पुरेसा वेळ लागणार आहे , ' अशी माहिती मॅरकस यांनी दिली .

" व्हॉट्सऍप ' मध्ये प्रत्यक्ष जाहिरातीसाठी वाव नाही . मात्र युजर्सशी , सबंधित ग्राहकाशी जोडण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मेसेंजर हे ऍप आयफोन ऑपरेटिंग सिस्टिमवरील फेसबुकनंतरचे सर्वाधिक लोकप्रिय दुसऱ्या क्रमांकाचे ऍप आहे .

 मेसेंजरवर दर महिन्याला 17 अब्जाहून अधिक छायाचित्रे परस्परांमध्ये शेअर केली जातात. 1 .2 अब्ज मेसेंजर युजर्स व्हर्च्युअल बास्केटबॉल खेळत असल्याची माहिती फेसबुकच्या सूत्रांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौदीत 'पोकेमॉन गो' विरोधात फतवा

पोकेमॉन गो गेम सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. तरुणालाईला तर या गेमने अक्षरक्ष: वेड लावलं आहे. दिवसेंदिवस या गेमची लोकप्रियता वाढू लागली आहे. मात्र काही ठिकाणी या गेमला विरोध होतानाही दिसत आहे. सौदी अरेबियामध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढण्यात आला असून असे प्रकार मुस्लीम धर्मात व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सौदीतील एका धार्मिस संस्थेने हा फतवा काढला आहे. याअगोदरही या संस्थेने 2001 मध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढत हा गेम झुगार असल्याचं सांगितलं होतं. अधिकृतपणे हा गेम सौदीमध्ये उपलब्ध नसला तरी अनेकजणांनी बेकायदेशीरपणे हा गेम डाऊनलोड केला असल्याची माहिती मिळत आहे.
_____________________________________
आणखी चालू घडामोडी साठी जॉईन करा @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पनवेल लवकरच राज्यातील 27 वी महानगरपालिका :

    पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली असून, 13 मे 2016 पर्यंत पनवेल महापालिकेची अधिसूचनाही विधी व न्याय खात्यामार्फत काढण्यात येणार आहे. पनवेल नगरपालिकेसह लगतच्या 68 गावांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश असणार आहे. पनवेल महापालिका ही राज्यातील 27 वी महानगरपालिका असेल तर मुंबई महानगर प्रदेशामधील ही 9 वी महापालिका ठरणार आहे.

नव्या पनवेल महापालिकेची वैशिष्ट्ये :
* पनवेल महापालिकेची लोकसंख्या – 5 लाख 95 हजार
* पनवेल महापालिका क्षेत्रात 90 टक्के नोकरदार-व्यावसायिक
* पनवेल महापालिका क्षेत्रात 10 टक्के कृषिक्षेत्र
महाराष्ट्रातील महानगरपालिका : 27  परभणी (26 वी) पनवेल (27 वी)

source : fb page

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रोड रोमियोंवर कारवाईसाठी कोल्हापूर पोलिसांचं ‘दामिनी पथक’

महिला आणि मुलींच्या छेडछाडीचं प्रमाण दिवसेंदिवस कोल्हापुरात वाढतच चालल्यानं पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. या पथकांकडून सावर्जनिक ठिकाणं आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबत रोड रोमियोंवर कारवाईही सुरु झाली आहे. दामिनी पोलीस पथक या पथकाचं नाव आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवाई दलाचं विमान बेपत्ता

चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला निघालेले भारतीय हवाई दलाचे विमान खराब हवामानामुळे बंगालच्या उपसागरादरम्यान बेपत्ता झाले असून या विमानात २९ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गेल्या सात तासांहून अधिक वेळापासून या विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही त्यामुळे क्षणाक्षणाला चिंता वाढत आहे.

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ क्रमांकाच्या विमानाने आज सकाळी चेन्नई येथील तंबाराम येथून अंदमान-निकोबार येथील पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण घेतले. त्यानंतर ८.४५ वाजताच्या सुमारास या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. हे विमान सकाली ११.३० वाजता पोर्ट ब्लेअर येथे पोहोचणे अपेक्षित होते मात्र अद्याप ते तिथे पोहोचलेले नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डुडलद्वारे मुकेश यांना गुगलची आदरांजली

आपल्या आवाज देऊन चित्रपटसृष्टीतील गीते अजरामर करणारे पार्श्वगायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त "गुगल ' ने विशेष "डुडल ' तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे .

' गुगल ' ने त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त सादर केलेल्या डुडलमध्ये "गुगल ' या नावासह मुकेश यांच्या रेखाचित्राचा समावेश आहे . " कभी कभी मेरे दिल मे ' या गीताच्या आधारे हे " डुडल ' बनविण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे .
मुकेश यांनी गायलेले " जीना यहॉं मरना यहॉं ' हे गाणं आजही लोकप्रिय आहे . मुकेश चंद माथुर असं त्यांचे पूर्ण नाव असून ते मुकेश या नावाने लोकप्रिय ठरले . राजधानी दिल्लीत 22 जुलै 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. तर वयाच्या 53 व्या वर्षी 27 ऑगस्ट 1976 रोजी त्यांचे निधन झाले . 1940 पासून ते 1976 पर्यंत ते चित्रपटसृष्टीय सक्रिय होते. मुकेश यांच्या मोतीलाल नावाच्या एका दूरच्या नातेवाईकांनी त्यांच्यातील कलेला ओळखलं . एका विवाहसमारंभात मुकेश यांनी गायलेलं गीत मोतीलाल यांना भावलं आणि त्यांनी मुंबईतील पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीतशिक्षणासाठी पाठवलं . 1941 सालीच त्यांनी " निर्दोष ' चित्रपटात अभिनेता-गायक म्हणून भूमिका केली . मात्र 1945 साली " पहली नजर ' या चित्रपटातून ते प्रकाशझोतात आले आणि त्यांना लोकप्रियता मिळाली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फेसबुकच्या 'अकिला'चे पहिले यशस्वी उड्डाण

संपूर्ण जगात इंटरनेट पोहचविण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न फेसबुकचा निर्माता संस्थापक मार्क झुकेरबर्गने पाहिले आणि त्यादृष्टीने आता पहिले पाऊल, नाही, पहिले उड्डाण त्याने केले आहे. फेसबुक निर्मित मानवरहित आणि संपूर्णत: सौरऊर्जेवर उडणाऱ्या अकिला ड्रोनने अमेरिकेतील अॅरिझोना येथील सैनिक विमानतळावरून पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले.

बोर्इंग ७३७ विमानाच्या पंखाच्या आकाराचे पंख असणारे अकिला कमी उंचीवर अपेक्षेपेक्षा तीन मिनेट जास्त काळ, सुमारे ९६ मिनिटे हवेत राहिले. मागील काही महिन्यांपासून या स्वयंचलित ड्रोनची चाचणी सुरू होती. परंतु २८ जून रोजी केलेल्या पहिल्या यशस्वी विमान उड्डाणाचा व्हिडियो मार्क झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर गुरुवारी (ता. २१) शेअर करून संपूर्ण जगाला याची माहिती दिली.

यशस्वी उड्डाण झाल्यावर झुकेरबर्ग आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष करत एकमेकांना टाळ्या देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी झुकेरबर्गच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. इंटनेटपासून वंचित लोकांनाह्यअकिलाह्ण ड्रोनद्वारे इंटरनेट सुविधा पुरवून जगाला एकत्रित करण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार याची अनुभूती बहुधा त्याने प्रथमच घेतली असावी.

काय आहे अकिला?
आकाशात घिरट्या मारणारे ह्यअकिलाह्ण ड्रोन नवीन लेझर-बीम तंत्रज्ञानाद्वारे ९६ किमी त्रिज्येतील लोकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. अकिलाने प्रक्षेपित केलेले सिग्नल्सला जमिनीवर असणारे टॉवर्स आणि अँटेना वाय-फाय किंवा ४-जी नेटवर्कमध्ये रुपांतरित करतील, अशी सर्व साधारण संकल्पना आहे.

पण हे खरंच व्यवहार्य आहे का?
ही संकल्पना प्रत्यक्षात आणि व्यवहारिक स्वरुपात उपयोगात आणण्यासाठी फेसबुकला अनेक दिव्यांना सामोरे जावे लागणार आहे. लगातार तीन महिने जमिनीपासून साठ हजार फूट किं वा त्यापेक्षा जास्त उंचीवर उडणाचे ध्येय फेसबुकने ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी तर सर्व प्रथम ड्रोनला दिवसभरात एवढी सौरऊर्जा जमा करावी लागेल ज्याद्वारे ते दिवसरात्र उडू शकेल. शिवाय एवढी प्रचंड ऊर्जा साठवणाऱ्या बॅटरीज्देखील विकसित कराव्या लागणार.
सौरऊर्जेवर उडणारे चालकरहित विमान आजमितीला केवळ दोन आठवडे लगातार उडू शकले आहे. फेसबुकच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष जय पारीख म्हणाले की, अजून खूप मोठा टप्पा गाठायचा बाकी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदाच्या वर्षांतील सहा महिने सर्वात उष्ण

यंदाच्या वर्षी पहिले सहा महिने हे उपग्रह नोंदणी सुरू झालेल्या १९७९ या वर्षांपासून सर्वात उष्ण होते व आक्र्टिकमधील बर्फही सर्वात कमी होते, असे नासाने म्हटले आहे. जागतिक पृष्ठीय तापमान व आक्र्टिकवरील बर्फाचे प्रमाण या दोन्ही घटकांचा विचार हवामान बदलांचे निदर्शक म्हणून केला जातो. या दोन्ही घटकांनी पहिल्या सहा महिन्यातच विक्रम मोडला असल्याचे नासाने उपग्रहाच्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर म्हटले होते. २०१६ या वर्षांतील पहिले सहा महिने जागतिक पातळीवर जास्त तापमानाचे होते. तापमानाची नोंद १८८० पासून सुरू आहे, ती बघता हा आधुनिक काळातील तापमानाचा विक्रम आहे, असे नासाच्या ‘गोडार्ड इन्स्टिटयूट ऑफ स्पेस स्टडीज’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

 जानेवारी ते जून हे सर्वात उष्ण अर्धवर्ष मानले जात असून त्यात १९ व्या शतकाच्या तुलनेत तापमानामध्ये सरासरी १.३ अंश वाढ झाली आहे. पहिले पाच महिने आक्र्टिक भागातील बर्फाचे प्रमाण नीचांकी होते. १९७९ पासून बर्फाची नोंद उपग्रहांच्या माध्यमातून घेतली जात असून त्यात इतके कमी बर्फ कधीच नव्हते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. मार्चमध्ये बर्फाचे प्रमाण कमी असण्याचा क्रम सहा महिन्यातील दुसरा होता. कार्बन डायॉक्साईड व हरितगृहवायू वातावरणात अडकून पडल्याने हा परिणाम झाला आहे. आक्र्टिक सागरातील बर्फ १९७० च्या उन्हाळ्यात व १९८० च्या सुरूवातीला होते त्यापेक्षा ४० टक्के कमी भागात दिसून आले. आक्र्टिक सागरात सप्टेंबरमध्ये वार्षिक चक्रात बर्फाचे प्रमाण दशकामागे १३.४ टक्के कमी झाले आहे. एल निनो या कटीबंधीय पॅसिफिक परिणामामुळे ऑक्टोबरनंतर तापमान वाढत गेले होते, असे जीआयएसएसचे संचालक गव्हीन श्मिडट यांनी सांगितले. गेल्या एल निनोच्या वेळी तापमान जास्त होते, तो काळ १९९८ मधील होता.यावर्षी एल निनोचा प्रभाव कमी होत असला तरी जागतिक तापमान गेल्या १८ वर्षांपेक्षा जास्त झाले आहे कारण एकूणच उष्णतामानात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर तापमान वाढीचा कल कायम असून आक्र्टिकमध्येही ते जास्त आहे, असे नासाच्या गोडार्ड केंद्राचे सागरी बर्फ तज्ज्ञ वॉल्ट मियर यांनी सांगितले. हवामानाचे वेगळे अनुभव या सहा महिन्यात आले असून कमी बर्फ व जास्त तापमान त्यात नोंदले गेले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘आयएनएस विराट’ निघाली अखेरच्या प्रवासाला

जगातील सर्वाधिक कार्यरत राहिलेली युद्धनौका हा बहुमान लाभलेली ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आज तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली. जवळपास ५७ वर्षे सेवा केल्यानंतर ही युद्धनौका सेवानिवृत्त होत आहे.

कोच्ची येथे २७ तारखेला पोहचल्यानंतर या युद्धनौकेवरच्या महत्वाच्या तोफा, रडार, इंजिन काढले जाईल. ‘आयएनएस विराट’च्या सेवानिवृत्तीनंतर या युद्धनौकेचा संग्रहालयात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर संरक्षण खात्याने अजून निर्णय दिलेला नाही. आपल्या ५७ वर्षांच्या सेवेतील २९ वर्षे या युद्धनौकेने भारतीय नौदलाच्या सेवेत व्यतित केली आहेत. व्यक्ती असेल तर आपल्याकडे ५८ किंवा साठीला सेवानिवृत्ती देण्याची प्रथा आहे. मात्र युद्धनौकेच्या बाबतीत हा खूप मोठा कालखंड आहे कारण तिचे आयुष्यमानच २५ वर्षांचे गृहीत धरलेले असते. फार तर त्यात वेळोवेळी केलेल्या डागडुजीनंतर १० ते १५ वर्षांनी तिचे आयुष्यमान वाढविले जाते. मात्र ‘आयएनएस विराट’ ही तब्बल ५८ वर्षे सेवा करीत असलेली जगातील एकमेव युद्धनौका ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या वेळेसच ‘आयएनएस विराट’च्या निवृत्तीचे संकेत मिळाले होते.

.
आयएनएस विराट:

मूळ नाव- एचएमएस हर्मिस (इंग्लंडचे शाही नौदल)
शाही नौदलात दाखल- २५ नोव्हेंबर १९५९
१९८६ साली भारतीय नौदलाकडून खरेदी
१९८७ साली मे महिन्यात ‘आयएनएस विराट’ असे नामकरण
भारतीय नौदलाच्या पश्चिमी ताफ्यात दाखल- १२ मे १९८७
वेळोवेळी केलेली महत्त्वपूर्ण डागडुजी
एप्रिल १९८६, जुलै १९९९, नोव्हेंबर २००४, ऑगस्ट २००८
नोव्हेंबर २००९ आणि नोव्हेंबर २०१३
बोधवाक्य- जलमेव यस्य, बलमेव तस्य
वजन- २३ हजार ९०० टन
पूर्ण वजनी क्षमता – २८ हजार ७०० टन
लांबी- २२६. ५ मीटर्स (७४३ फूट)
नेहमी पाण्याखाली राहणारा
भाग- सुमारे २९ फूट
वेग- ताशी २८ सागरी मैल (प्रतितास ५२ किलोमीटर्स)
युद्धनौकेवर काम करणाऱ्या नौसैनिकांची एकूण संख्या – १२०७
युद्धनौकेवरील लढाऊ विमानांसाठीचा कर्मचारी वर्ग- एकूण १४३
युद्धनौकेवरील लढाऊ विमाने- १६ सी हॅरिअर्स, ४ सीकिंग
हेलिकॉप्टर्स, २ चेतक आणि ४ ध्रुव

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा यांचे दीर्घ आजाराने दिल्लीमध्ये शनिवारी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून रझा यांची प्रकृती अस्थिर होती. त्यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ११ वाजता त्यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. रझा यांच्यावर मध्य प्रदेशच्या मंडाला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९८३ साली ललित कला अकादमीमध्ये रझा यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. भारत सरकारने १९८१ मध्ये पद्मश्री तर २००७ साली पद्म भूषण पुरस्काराने त्यांच्या कलेचा गौरव केला होता. २०१० साली भारताचे आधुनिक आणि सर्वाधिक महागडे कलाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. सौराष्ट्र नावाच्या त्यांच्या चित्र संग्रहाला १६.४२ करोड एवढी किंमत मिळाली होती. यावेळी ते ८८ वर्षाचे होते. सय्यद यांचा जन्म मध्यप्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील बाबरिया या ठिकाणी झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधील नागपूर कला विद्यालयामध्ये १९३९ ते १९४३ मध्ये कलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पुढील कलेच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील जे. जे. कला विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मुंबईमध्ये त्यांनी १९४३ ते १९४७ या काळात शिक्षण घेतले.

पुराणकथांमध्ये काही आगळ्यावेगळ्या राज्यांचा म्हणजे एकही पुरुष नसलेल्या, पूर्णपणे स्त्रियाच असलेल्या राज्यांचा उल्लेख आहे. मात्र, आता ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया पूर्णपणे महिलांसाठी असलेले शहर उभारण्याच्या विचारात आहे. त्यांच्या शरियत कायद्यांच्या कडक चौकटीत राहून महिलांना त्यांचे करिअर घडवता यावे, यासाठी ही योजना आखली जात आहे.
‘सौदी इंडस्ट्रियल प्रॉपर्टी ऑथोरिटी’ला पूर्णपणे महिलांसाठी असलेले जागतिक दर्जाचे शहर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शहराच्या उभारणीचे काम पुढील वर्षापासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे वृत्त सौदी प्रसार माध्यमांनी दिले आहे.
देशामध्ये अतिशय कडक असलेल्या शरियत कायद्याचे उल्लंघन न करता महिलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा या शहरामध्ये पूर्ण करता येणार आहेत. गुन्हे, राजकारण व अर्थव्यवस्था यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष संबंध, स्वच्छता, आहार, प्रार्थना व उपवास यांच्यासंदर्भात मार्गदर्शन करणारा नैतिकता व धर्म यांच्यावर आधारित शरियत कायदा आहे.
सौदी अरेबियामध्ये महिलांना काम करण्यास बंदी नसली तरी काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे केवळ 15 टक्के आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी सरकारने आखलेल्या योजनेला गती देण्यासाठी ही योजना पूरक ठरणार आहे. सरकारच्या या उद्दिष्टांमध्ये महिलांसाठी विशेष करून तरुण महिलांसाठी रोजगार निर्मितीचा समावेश आहे.
त्यामुळे जर पूर्णपणे महिलांसाठी असलेले शहर निर्माण झाले तर महिलांना कामाच्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम करता येईल व उद्योगधंद्यांमध्ये आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करता येईल. त्यांची क्षमता व त्यांची आवड यानुसार त्या काम करू शकतील, असे या योजनेशी संबंधित असलेल्या मोडॉनचे उपमहासंचालक सालेह अल रशीद यांनी सांगितले आहे.
सौदी अरेबियामध्ये विविध भागांमध्ये केवळ महिलांसाठी असलेल्या उद्योगांची निर्मिती करण्याची आमची योजना आहे. केवळ महिलांसाठी असलेले दुसरे औद्योगिक शहर तयार करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे रशीद यांनी सौदीमधील दैनिकाला सांगितल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.
सौदी अरेबियाच्या मनुष्यबळात आमूलाग्र बदल करण्याच्या हेतूने अधिकाधिक महिलांना रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी परदेशी विक्री कर्मचा-यांना कमी केले जात आहे.
यंदा सौंदर्यप्रसाधने व परफ्युमच्या दुकानात ब-याच स्थानिक महिलांना नियुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महिलांच्या पोशाखांच्या दुकानातही पुरुष कर्मचा-यांऐवजी महिलांची भरती करण्यात आली होती. गेल्याच वर्षी सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची व 2015 मध्ये निवडणुका लढवण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली होती.
source: prahaar

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी दिला राजीनामा

ज्येष्ठ राजकारणी के.पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. चांगले काम करण्याची मला शिक्षा मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली. अविश्वास ठरावामध्ये आपल्याला बहुमत मिळवता येणार नसल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा सीपीएन-माओवादीने काढून घेतल्याने सरकार अडचणीत सापडले होते. यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास सरकार असमर्थ ठरल्याचा आरोप सीपीएन-माओवादीने केला होता. नेपाळमध्ये थेट लढतीत त्यांनी विद्यमान पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव करुन नेपाळची सुत्रे हाती घेतली होती. देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी निवडणूक आवश्यक ठरली होती. यावेळी संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली होती. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला यांना फक्त २४९ मते मिळवता आली होती. सध्या नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीमध्ये राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे संविधानाती कलम ३०५ मधील तरतुदीमधील अडचणी दुर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत विश्वविक्रम रचण्याचा मान पटकाविला आहे. पोलंड येथील आयएएफ वर्ल्ड अंडर-२० मधील भालाफेक स्पर्धेत नीरजने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. त्याने ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकून ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला.
अॅथलेटीक्समध्ये विश्वविक्रम रचणारा नीरज पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे तसेच वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणाराही तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रोबरलने ८०.५९ मीटर अंतरावर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले. तर ७०.६५ मीटर अंतरावर भाला फेकत ग्रॅनाडाच्या अॅन्डरसन पीटर्सला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या नीरजने पहिल्या फेरीत ७९.६६ मीटर अंतरावर भाला फेकून सुरुवात केली. पहिली फेरी संपेपर्यंत तो ग्रोबरलपेक्षा मागे होता. मात्र, दुस-या प्रयत्नात नीरजने ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकून विश्वविक्रमाला गवसणी घातली. यापूर्वीचा ज्यूनियर गटातील विश्वविक्रम लाटव्हीयानच्या झिगीसमुंड सिरमायसच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये ८४.६९ मीटर अंतरावर भाला फेकला होता. नीरजने त्याच्या या विक्रमाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता केशॉर्न वॉलकॉट यालाही मागे टाकले आहे. त्याने याच वर्षी ८६.३५ मीटर अंतरावर भालाफेक केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्याघ्रदूत अमिताभ बच्चन , मुनगंटीवार यांच्यात चर्चा

दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महानायकाकडून कौतुक
मुंबई - अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन व्याघ्र संरक्षण व संवर्धन यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली . मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वन विभागाने राबविलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे बच्चन यांनी कौतुक करत वन खात्याचे अभिनंदन केले.

बच्चन म्हणाले , की व्याघ्र व वन संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाया वन विभागातील क्षेत्रीय पातळीवरील वनरक्षकासारख्या शेवटच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे व त्यांना आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात , अशी अपेक्षा व्यक्त केली . त्याचबरोबर वाघांच्या अवैध शिकारीसंदर्भात जनजागृतीसोबतच अत्यंत कठोर अशी कायदेशीर कारवाई केली जाणे आवश्यक असल्याचे सांगितले . यावर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना सरकारमार्फत करण्यात येणाऱ्या उपयायोजना आणि नावीन्यपूर्ण निर्णयांची माहिती दिली . वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना राज्य सरकारने नुकतेच 20 वाहने उपलब्ध करून दिली असून , शस्त्रेदेखील पुरविण्यात आली आहेत. वनरक्षकांच्या गस्तीसाठी लवकरच 4 हजार मोटारसायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात वाघाची एकही अवैध शिकार झाली नसल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले , की वाघांच्या शिकारीच्या प्रकरणात महाराष्ट्राने शिक्षा वाढविलेली असून , त्याचे परिणाम दिसून येत आहेत. व्याघ्र प्रकल्पामुळे पुनर्वसित गावांसाठी राज्याने प्रभावी अशी योजना केली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जी - 20 बैठकीत " ब्रेक्झिट ' वर चर्चा

चेंगडू ( चीन ) : ब्रिटनने युरोपीय महासंघाबाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरात लवकरच चर्चा करण्याचे जी -20 देशांच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आल्याचे फ्रान्सने सांगितले आहे .

' ब्रेक्झिट ' नंतर होणाऱ्या परिणामांवर आताच चर्चा करून दीर्घकालीन धोरणे निश्चित करण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे फ्रान्सने म्हटले आहे . चीनमध्ये आज जी - 20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बॅंकांच्या प्रमुखांची बैठक झाली . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फ्रान्सचे अर्थमंत्री मिशेल सापीन यांनी ही माहिती दिली .
______________________________

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातला पहिला ग्रीन ट्रेन कॉरिडॉर वाहतुकीसाठी खुला

देशातला पहिला बहुप्रतीक्षित ग्रीन कॉरिडॉर रामेश्वरम ते मनामदुराईदरम्यानच्या रेल्वे मार्गावर खुला करण्यात आला आहे. या ग्रीन कॉरिडॉरचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. ग्रीन कॉरिडॉरमुळे भारताच्या पूर्वेकडील वाहतूक आणखी जलद होणार असून, प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आता बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ट्रॅकवर होणारं मलविसर्जन आता बंद होणार आहे.

रेल्वेमध्ये 35,104 बायो-टॉयलेट लावणार असून, त्यातील जवळपास 30 हजारांहून अधिक बायो-टॉयलेटस यंदाच्या आर्थिक वर्षात बसवणार असल्याची घोषणा सुरेश प्रभूंनी केली. गुगलच्या सहकार्यानं चेन्नई स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधाही पुरवण्यात आली आहे. ही वाय-फाय सेवा पुरवणं हा नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमाचाच एक भाग असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. यावेळी सुरेश प्रभूंनी तामिळनाडू सरकारला रेल्वेला अत्याधुनिक बनवण्यासाठी सामंजस्य करार करण्याचं आवाहन केलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनच्या तीन पत्रकारांची भारताने केली हकालपट्टी

शिन्हुआ या चीनी वृत्तसंस्थेत काम करणा-या तीन चिनी पत्रकारांना भारत सरकारने देश सोडून जाण्यास सांगितले आहे. तिघांच्या हालाचालींबद्दल गुप्तचर यंत्रणांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सरकारने या तिघांना देश सोडून जाण्यास सांगितले. या तिघांमध्ये शिन्हुआचे दिल्लीतील ब्युरो चीफ आणि मुंबईतील लु तांग आणि सी यॉंगगँग यांचा समावेश आहे.

३१ जुलैपर्यंत या तिघांना देश सोडण्यास सांगितलं आहे. भारताने प्रथमच अशा पद्धतीने चिनी पत्रकारांबद्दल निर्णय घेतला. हे तिन्ही पत्रकार वेगवेगळया नावांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वु व्हिसाची मुदत वाढवून मागच्या सहावर्षांपासून भारतात रहात होते.

त्यांच्या दोन सहका-यांनाही व्हिसाची मुदत वाढवून दिली होती. पण त्यांच्या या कृत्यांमुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. शिन्हुाआ ही चीन सरकारची अधिकृत वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेचा अध्यक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या केंद्रीय समितीचा सदस्य असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा