🔹काही संयुक्त कवायती / युद्धाभ्यास
इंद्र २०१५:-
स्थळ :- बिकानेर (राजस्थान)
भारत आणी रशिया यांच्यातील इंद्र या सामरिक कसरतीची सातवी आवृती. या कसरती ऐकून १४ दिवस सुरु होत्या.
मलबार :-
२०१५ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अमेरिका, जपान आणी भारत यांच्या नौदलामध्ये या सयुक्त कसरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येयुद्धनौका, विनाशिका आणी विमानवाहू नौंकाचा सहभाग होता.
मित्र शक्ती:-
स्थळ :- पुणे
भारत आणी श्रीलंका यांच्या लष्करामध्ये २९ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर या कालावधीत सयुक्त कसरत पार पडली.
___________________________________
Join our telegram channel telegram.me/empsckatta
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!
जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ ची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे ‘याहू’च्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे.
‘याहू’सोबत झालेल्य या करारामुळे व्हेरिझॉनच्या ‘एओएल इंटरनेट’ व्यवसायाला तेजी मिळेल. व्हेरिझॉनने गेल्याच वर्षी एओएलला ४.४ अरब डॉलमध्ये विकत घेतले होते. या विक्रीनंतर याहूचा ऑपरेटिंग कंपनी म्हणून असलेला प्रवासदेखील संपुष्टात येईल. तसेच, यानंतर ‘याहू’ची केवळ ‘याहू जापान’मध्ये ३५.५ टक्के आणि चीनच्या ई-कॉमर्स कंपनी ‘अलीबाबा ग्रुप होल्डिंग’मध्ये १५ टक्के हिस्सेदारी राहिल.
व्हेरिझॉन सध्या ‘याहू’चा मूळ व्यवसाय खरेदी करणार आहे. या व्यवहारात ‘याहू’च्या मालमत्तेचा समावेश असला तरी ‘याहू’च्या पेटंटचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. ‘याहू’चे बाजारमूल्य ३ हजार ७४१ कोटी डॉलर्स आहे. तर ‘याहू’च्या मूळ व्यवसायाचे बाजारमूल्य २४ हजार ७०० कोटी रूपये आहे.
_____________________________
Join us @ChaluGhadamodi
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सरकारी तेल कंपन्यांच्या एकत्रीकरणाची तयारी?
सार्वजनिक क्षेत्रातील 13 तेल कंपन्यांना एकत्रित करुन एक भव्य कंपनी तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात सरकारी पातळीवर चर्चा सुरु झाली असून मंत्रिमंडळ सचिवालयाने सुरक्षा तसेच विकास व विश्लेषणासंबंधित अन्य संस्थांचे तेल मंत्रालयात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती खासगी सुत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर, या कंपनीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या पूर्तीसंदर्भातील प्रकियेचे परीक्षण तेल मंत्रालयाकडून सुरु करण्यात आले आहे. रशियाची बलाढ्य सरकारी तेल कंपनी रोसनेफ्ट आणि भारतामधील रिलायन्स उद्योगसमूहापेक्षाही या कंपनीचे बाजारमूल्य जास्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर, एकत्रीकरण होत असलेल्या तेल कंपन्यांमधील सर्व भागधारकांशी चर्चा करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही कंपनी निव्वळ नफा, भांडवली खर्च, उलाढाल आणि बाजारमूल्य अशा सर्व परिमाणांवर आधारित देशातील सर्वांत मोठी कंपनी असेल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
नव्या कंपनीत ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, गेल, मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, चेन्नई पेट्रोलियम, नुमालीगढ पेट्रोलियम आणि ऑईल इंडियासारख्या महत्त्वाच्या कंपन्या एकत्रित केल्या जातील. याशिवाय, ऑईल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड(ओआयडीबी), पेट्रोलियम प्लानिंग अँड अॅनालिसीस सेल(पीपीएसी) आणि पेट्रोलियम कन्झर्व्हेशन रिसर्च असोसिएशनसारख्या इतर कंपन्यांनादेखील सामील करुन घेण्याविषयीची शक्यता तपासून पाहिली जात आहे.
देशातील सहा नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 77 अब्ज डॉलर आहे. गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) या कंपन्यांनी एकत्रितपणे 45,500 कोटी रुपयांचा नफा मिळविला व 9,32,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव दहा वर्षांपुर्वीदेखील मांडण्यात आला होता. परंतु यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार समितीने हा प्रस्ताव त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरुन नसल्याचे म्हटले होते. तेल क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणाच्या दृष्टीने हे अयोग्य असल्याचे समितीने म्हटले होते. भुतकाळात, अशा प्रकारच्या एकत्रीकरणांमधून कंपन्यांच्या शेअरचे मूल्य कायम राखण्यास अपयश आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याशिवाय, नव्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबतदेखील समस्या निर्माण होऊ शकते, असे सूचित करण्यात आले होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹रेल्वे प्रवाशांना मिळणार आता १० लाखांचा अपघात विमा!
प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे.
हा विमा ऐच्छिक असेल व त्यात प्रवाशास अपघातात मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याची सोय असेल. हा विमा एका तिकिटावर केल्या जाणाऱ्या एका वेळच्या प्रवासासाठी लागू असेल. याचबरोबर सामानाचाही विमा उतरविण्याची सोय रेल्वे उपलब्ध करून देणार आहे.
आॅनलाइन रेल्वे आरक्षणाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या उपक्रमामार्फत ही विमा योजना राबविण्यात येईल. यासाठी रेल्वेने सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी तीन कंपन्यांची निवड रीतसर टेंडर काढून करण्यात आली असून, त्यांच्याशी यासाठी करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शक्यतो आॅगस्ट महिन्यापासूनच ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
अशी विमा योजना सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना केली होती.
येत्या महिन्यापासून ऐच्छिक सुविधा
सुरुवातीस आॅनलाइन रेल्वे
तिकिटे काढणाऱ्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार.
नंतर ती तिकीट खिडक्यांवरून तिकिटे व मासिक पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
हा विमा ऐच्छिक असल्याने आॅनलाइन तिकिटाचे बुकिंग करताना अगोदर विम्याच्या कॉलममध्ये प्रवाशाला आपली संमती नोंदवावी लागेल.
विमा हवा असा पर्याय
निवडल्यास तिकिटाच्या भाड्यासोबत विम्यासाठी द्यावी लागणारी रक्कमही त्यात आपोआप जोडली जाईल.
प्रीमियम किती असेल?
ई-तिकीट काढताना प्रवाशाला विमा हवा की नको, याचा पर्याय विचारला जाईल. विम्याच्या प्रीमियमची रक्कम प्रवासाचा वेळ व अंतर यावर अवलंबून असेल. विमा कंपनीची निवड केल्यावर तिच्याशी चर्चा करून विमा पॉलिसीचा तांत्रिक तपशील ठरविला जाईल.
तर ५० लाखांपर्यंतचे कवचही मिळेल
प्रवाशांना इच्छेनुसार विम्याची रक्कम वाढवून घेण्याचा पर्याय देण्याचाही विचार आहे. तूर्तास विम्याची कमाल रक्कम १० लाख ठरविली आहे. ही योजना कितपत यशस्वी होते हे पाहून प्रवाशांना हवा असल्यास त्यानुसार प्रीमियम घेऊन ५० लाखांचाही विमा दिला जाऊ शकेल. या खेरीज प्रवासात सामानाचाही विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
रेल्वे कायद्यानुसार प्रवासात मृत्यू झाल्यास रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरण यांच्याकडून चार लाखांची भरपाई मिळू शकते.
रेल्वे अपघात
२०१२-१३ १२३
२०१३-१४ ११८
२०१४-१५ १३५
२०१५-१६ १००
अपघातग्रस्थांना मदत
२०१२-१३ ३.१८ कोटी रु.,
२०१३-१४ १.४९ कोटी रु.,
२०१३-१४ १.२७ कोटी रु.
२०१५-१६ १.१ कोटी रुपये
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹फ्लिपकार्ट समुहाकडून जबोंगची खरेदी
फ्लिपकार्टची फॅशन क्षेत्रातील उपकंपनी मिंत्राने जागतिक फॅशन समुह जबोंगची खरेदी केली आहे . कराराची आर्थिक आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही परंतु या करारानंतर मिंत्राला फॅशन उद्योगात आपले स्थान मजबूत करता येणार आहे .
" हे अधिग्रहण म्हणजे आमच्या देशातील आघाडीचा फॅशन मंच होण्याच्या प्रवासात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे . दोन्ही कंपन्यांमध्ये ब्रँड रिलेशनशिप्स आणि ग्राहक अनुभवाबाबतीत समन्वय साधला जाईल , असे मत मिंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांनी व्यक्त केले.
मिंत्रा आणि जबोंगचे एकत्रितपणे सुमारे दीड कोटी युझर्स आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑनलाईन मंचावर अनेक बड्या फॅशन ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध आहेत.आर्थिक कामगिरी खालावल्याने गेल्या काही काळापासून जबोंगच्या विक्रीचा प्रस्ताव होता . जबोंगची खरेदी करण्यासाठी फ्युचर समुह , स्नॅपडील , आदित्य बिर्ला समुहाच्या अबॉफसमवेत अनेक कंपन्या शर्यतीत होत्या .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹इरोम शर्मिला १५ वर्षांपासूनचे उपोषण सोडणार; मणिपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय
४२ वर्षीय इरोम शर्मिला गेली सुमारे १४ वर्षे अन्नसत्याग्रह करीत आहेत. २००० साली इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्स या निमलष्करी दलाने एका चकमकीत १० अतिरेक्यांना ठार केले होते. ही चकमक बनावट असल्याचा आरोप करून शर्मिला यांनी हा अन्नसत्याग्रह सुरू केला होता, परंतु पोलिसांनी हा ‘आत्महत्येचा प्रयत्न’ असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक केली होती.
मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेली तब्बल १५ वर्षे उपोषण करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्यां इरोम शर्मिला चानू यांनी मंगळवारी आपण उपोषण सोडणार असल्याचे जाहीर केले. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी उपोषण सोडत असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच अफ्स्पाचा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही शर्मिला इरोम यांनी सांगितले. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इरोम शर्मिला येत्या ९ ऑगस्टला उपोषण सोडतील. त्या गेल्या १५ वर्षांपासून मणिपूरमधील अफ्स्पा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण करत आहेत. मात्र, या काळात त्यांना इम्फाळ येथील सरकारी रूग्णालयात जबरदस्तीने दाखल करून नाकातून नळीवाटे अन्न देण्यात येत होते. त्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.
लष्करी दडपशाहीला आळा
१९५८ पासून मणिपूरमध्ये अफ्स्पा लागू आहे. सीमावर्ती भागातील अशांततेचे वातावरण नियंत्रणाखाली राहावे म्हणून लष्कराला अधिकार देणारा हा कायदा १९५८ पासून नागालँड व मणिपूरमध्ये (इम्फाळ वगळता) लागू करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये लष्करी कारवाईत गेल्या २० वर्षांत १५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका १२ वर्षांच्या मुलाचा तर एका कारवाईत राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या तरुणाचाही समावेश होता. या प्रकरणांनंतर आफ्स्पाच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. याबाबतच्या इरोम चानू शर्मिला यांच्या उपोषणाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे. यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल भारत सरकारवर टीकाही झाली आहे.
४२ वर्षीय इरोम शर्मिला गेली सुमारे १४ वर्षे अन्नसत्याग्रह करीत आहेत. २००० साली इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्स या निमलष्करी दलाने एका चकमकीत १० अतिरेक्यांना ठार केले होते. ही चकमक बनावट असल्याचा आरोप करून शर्मिला यांनी हा अन्नसत्याग्रह सुरू केला होता, परंतु पोलिसांनी हा ‘आत्महत्येचा प्रयत्न’ असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक केली होती. त्यांना एका रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्या खोलीचाच तुरुंग करण्यात आला आहे. त्यांना नळीद्वारे नाकातून अन्नपदार्थ दिले जात आहेत. ‘आम्र्ड फोर्सेस (स्पेशल पॉवर्स) अॅक्ट-१९५८’ या कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, २०१४ मध्ये स्थानिक न्यायालयाने इरोम यांची आत्महत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन
बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणे अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत मुक्कामासाठी आजपासून आले आहेत़ दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून हम्बोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विनचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात आज आगमन झाले़ भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय उभे राहणार आहे़ या प्राणीसंग्रहालयात पेंग्विन हे विशेष आकर्षण ठरणार आहे़.
तीन वर्षांपूर्वी असे पेंग्विन आणण्याची घोषणा करण्यात आली़ अखेर अनंत अडचणी पार करीत दक्षिण कोरिया ते राणी बाग असा प्रवास करीत पेंग्विन मुंबईकरांच्या भेटीला आले आहेत़ यामध्ये तीन नर आणि पाच माद्या पेंग्विनचा समावेश आहे़ त्यांचे वय दोन ते तीन वर्षे आहे़ हम्बोल्ट पेंग्विन पक्षी हा चार ते २५ डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या तपमानात राहू शकतात़ त्यामळे मुंबईतील वातावरणाशी या पक्षांनी जुळवून घेईपर्यंत सुरुवातीचे तीन महिने पेंग्विनला देखरेखीखाली वेगळ्या कक्षात ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर हम्बोल्ट पेंग्विनला प्रदर्शन कक्षात हलविण्यात येणार आहे़
एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़.
सद्यस्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़ त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा कि़लो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़ पेंग्विनच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था प्राणीसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौफ़ूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आला आहे़.
त्याचे तापमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़ या पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा ध्यानात ठेवून हे पक्षीगृह तयार करण्यात आले आहे़ बांगडे व मोरशीचा पाहुणचार या खास परदेशी पाहुण्यासाठी बांगडा आणि मोरशी माशाचा बेत आखण्यात आला आहे़ हेच या पक्ष्यांचा आहार असून दररोज त्यांना अर्धा ते एक किलो मासे खाद्य म्हणून पुरविण्यात येतील़ असा तयार केला बर्फाळ प्रदेश पेरु आणि चिल्ली या देशात पेंग्विन सापडतात़ या पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत असलेल्या पिंजऱ्याला शंभर चौ़मी़ची काच असणार आहे़.
या पिंजरा अर्धा पाण्याने भरुन त्यामध्ये रेती आणि समुद्र खडकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे़ या कक्षात ठेवण्यासाठी सुमारे सहा ते आठ हजार लीटर पाणी लागणार आहे़ मुख्य कक्षात स्थानांतरीत केल्यानंतर तेथे वर्षाला सुमारे ६० ते ८० हजार लीटर्स पाणी पुरवावे लागणार आहे़.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कल्याणमध्ये आढळला दुर्मिळ पक्षी
कल्याणमध्ये एका अत्यंत दुर्मिळ पक्षी पाहायला मिळाला. हा पक्षाचं नाव मास्क बुबी आहेय याला मराठीत याला समुद्री कावळा असेही म्हणतात.
अत्यंत दुर्मिळातला दुर्मिळ असा हा पक्षी आहे. समुद्राच्या आत 8 ते 10 किमी आतमध्ये या पक्षाचं वास्तव्य असतं. हिंदी महासागरात हा पक्षी जास्त आढळून येतो.
पावसाळ्यात समुद्रात जोरदार वारे वाहू लागल्यावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हा पक्षी आपलं बस्तान हलवतो. तरीही समुद्रताच राहतो. मात्र, समुद्र किनाऱ्यापासून 50 किमी आत कल्याणमध्ये हा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्याने कुतूहल आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षीतज्ञ सुद्धा आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कल्याण ग्रामीण भागातील नेवाळी गावात पोलिसांना एका नागरिकाने हा आणून दिला. पोलिसांनी कल्याणचे प्राणी मित्र आणि अग्निशमन कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून तो त्यांच्या ताब्यात दिला. सध्या आधारवाडी अग्निशमन कार्यालयात याची निगा राखली जात आहे. उपचारानंतर लवकरच त्याच्या मूळ स्थानी समुद्रात त्याला सोडण्यात येणार आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सोशल मीडिया स्पर्धेत ट्विटर पडले पिछाडीवर .
ट्विटरची स्थापना झाल्यापासून कंपनीचे प्रथमच महसुलात सर्वाधिक कमी वाढ नोंदविली असून , सोशल मीडियाचे जग वेगाने विस्तारत असताना ट्विटर मात्र मागे पडू लागल्याची चिन्हे आहेत. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया सेवा वेगाने आपली पावले या क्षेत्रात रोवू लागल्या आहेत. याचवेळी ट्विटरला आपले यूजर्स वाढविण्यासाठी धडपड करण्यासाबेत जाहिरातदारांचे मन जिंकण्याचेही प्रयत्न करावे लागत आहेत.
कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी हे मागील वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीत पुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात बदल आणण्याचे सूतोवाच मागील वर्षी केले होते . मात्र, यादृष्टीने काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत . कंपनीचा महसूल दुसऱ्या तिमाहीत अंदाजापेक्षा कमी झाला असून , या तिमाहीतील महसुलाचा अंदाज 590 ते 610 दशलक्ष डॉलरवर आणण्यात आला आहे . तो अपेक्षित अंदाजापेक्षा कमी आहे . दुसऱ्या तिमाहीत ट्विटरचे यूजर्स एक टक्क्याने वाढले आहेत. महिन्याचे सरासरी सक्रिय यूजर्स 313 दशलक्षांवर गेले आहेत. पहिल्या तिमाहीत सरासरी सक्रिय यूजर्स 310 दशलक्ष होते .
या वर्षाच्या सुरवातीला ट्विटरने दीर्घकालीन धोरण आखले आहे . यात प्रमुख पाच क्षेत्रे विस्तारासाठी निवडण्यात आली आहेत. या ट्विटरची मुख्य सेवा , लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग , व्हिडिओंची सुरक्षा आणि विकास, संकेतस्थळांची निर्मिती व प्रभाव याबाबींचा समावेश आहे . यासोबत कंपनीने मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनशी करार केला आहे . यूजर्स वाढविणे आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्याचा हेतू यामागे आहे .
ट्विटरच्या वाटचालीची दिशा बदलणार:
सोशल मीडियातील भूमिका निश्चित करण्याचे ट्विटरने ठरविले आहे . त्यामुळे ट्विटरच्या पुढील वाटचालीची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. यासाठी ट्विटरने या आठवड्यात एक व्हिडिओ प्रसारित केला होता . यात थेट बातम्या , नव्या घडामोडी , चालू घडामोडींवरील तज्ञांची चर्चा या बाबींचा समावेश होता . तसेच , दुसऱ्या तिमाहीतील निकालांचे लाइव्ह स्ट्रिमही ट्विटरने या वेळी केले नाही .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारत अमेरिकेकडून विकत घेणार घातक पॉसीडॉन-८ आय विमान
भारत अमेरिकेकडून आणखी चार पोसीडॉन - ८ आय विमाने विकत घेणार आहे. भारताने बुधवारी अमेरिकन कंपनी बोईंगबरोबर यासंबंधीचा एक अब्ज डॉलरचा खरेदी करार केला. पोसीडॉन - ८ आय ही सागरी टेहळणी आणि पाणबुडी विरोधी विमाने आहेत. या कराराबरोबरच भारताचे अमेरिकेबरोबरचे शस्त्रास्त्र खरेदी करार १५ अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.
जून महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या व्यवहाराला मंजुरी दिली होती. जून २०१३ ते ऑक्टोंबर २०१५ दरम्यान नौदलाच्या ताफ्यात आठ पी-आय विमाने दाखल झाली. २००९ मध्ये या विमानाच्या खरेदीचा करार झाला होता.
नव्या करारातील पहिले विमान तीन वर्षांच्या आत नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. हारपून ब्लॉक क्षेपणास्त्राने सज्ज असणारी ही विमाने टेहळणी बरोबरच शत्रूच्या पाणबुडयांनाही लक्ष्य करु शकतात. या विमानांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कोहिनूर हिरा परत करण्यास बांधिल नाही, इंग्लंडचा भारताला झटका
कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास आम्ही बांधिल नाही म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा हिरा परत करण्यास नकार दिला आहे. इंग्लंडच्या या भुमिकेमुळे भारतामध्ये कोहिनूर हिरा परत येण्याच्या आशा कमी झाल्या आहेत.
'इंग्लंडने अगोदरपासून हीच भुमिका घेतली आहे. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे असं आम्हाला वाटत नाही. कायदेशीर मार्गाने न आणता दुस-या मार्गाचा विचार करत आहोत', असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 15 ऑगस्टआधी सर्वोच्च न्यायालयात कोहिनूरसंबंधी शपथपत्र दाखल करणार आहे.
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी ब्रिटनकडे करू शकत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते. शिखांबरोबर झालेल्या युद्धांत ब्रिटिशांनी पंजाब काबीज केल्यानंतर पंजाबचे तत्कालीन शासक महाराजा रणजीत सिंग यांनी कोहिनूर हिरा ईस्टइंडिया कंपनीला भेटीदाखल दिला होता. पुढे १८५०मध्ये पंजाबचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो ‘नजराणा’ म्हणून नेऊन दिला.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जलवाहतूक दोन वर्षांत सुरू करणार - मुख्यमंत्री
मुंबई आणि उपनगरांतून नवी मुंबईला येत्या दोन वर्षांत समुद्रमार्गे पोचता येणार आहे . मांडवा , नेरूळ आणि भाऊचा धक्का या किनारपट्टीवरून नवी मुंबई विमानतळ , तसेच अन्य ठिकाणांकडे जाणारी जलवाहतूक मेरिटाईम बोर्डामार्फत सरू करण्यात येणार असून , त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे , अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलतांना दिली . मांडवा जेट्टीसाठी 135 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे . नेरूळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सिडकोमार्फत पूर्ण केले जाणार आहे . भाऊचा धक्का येथील जेट्टी पोर्ट ट्रस्टमार्फत उभी करण्यात येईल. मार्च 2018 मध्ये ही सेवा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, असे फडणवीस यांनी सांगितले .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी जाहीर
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिलरी क्लिंटन या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.
फिलाडेल्फिया येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी सिनेटर बर्नी सेंडर्सच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. मात्र, पक्षाने हा विरोध दूर करत हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी दिली.
हिलरी क्लिंटन या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहेत. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये आता हिलरी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिपब्लिकन पार्टीचे डोनॉल्ड ट्रम्प असणार आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹केवळ परंपरा आहे म्हणून मान्यता नाही
' जलिकट्टू ' वरून न्यायालयाने तमिळनाडूस खडसावले
वादग्रस्त " जलिकट्टू' या खेळावरून सर्वोच्च न्यायालयाने आज थेट तमिळनाडू सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. केवळ या क्रीडा प्रकारास पाच हजार वर्षांची परंपरा आहे म्हणून त्यास कायदेशीर मान्यता देता येणार नाही , असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे .
' जलिकट्टू ' या खेळास अनेक शतकांची परंपरा असल्याने त्याला मान्यता दिली जावी, असे तमिळनाडू सरकारने आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते ; पण न्यायालयाने राज्य सरकारचे म्हणणे अमान्य केले. तत्पूर्वी 1899 मध्ये बारा वर्षांखालील दहा हजार मुलींचे विवाह लावण्यात आले होते . केवळ या परंपरेला मोठा इतिहास आहे म्हणून तिचे समर्थन करता येणार नाही . हा घटनात्मक मुद्दा असून , कायद्याच्या चौकटीमध्ये या क्रीडा प्रकारास मान्यता देता येईल किंवा नाही याचा अभ्यास केला जाईल , असेही न्यायालयाने नमूद केले. केंद्र सरकारने तमिळनाडूमधील " जलिकट्टू' या क्रीडा प्रकारास मान्यता दिल्यानंतर विविध प्राणी हक्क संघटनांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती . यावर न्यायालयाने केंद्राच्या अधिसूचनेला स्थगिती देताना सरकारला नोटीसही बजावली होती . या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीस 23 ऑगस्टपासून सुरवात होईल .
राजकीय दबाव:
" जलिकट्टू ' वर बंदी येऊ नये म्हणून तमिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार लॉबिंग केली होती . या क्रीडा प्रकारामध्ये प्राण्यांचे संरक्षण करण्याचे आश्वासनदेखील राज्य सरकारने दिले होते . परंपरांना आव्हान देण्याचा अधिकार स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांना नसल्याचे सरकारने म्हटले होते. न्यायालयाने मात्र हे म्हणणे अमान्य केले.
आक्षेप कशाला ?
स्पेनमधील बैलांच्या झुंजीपेक्षा जलिकट्टू वेगळा असल्याचा दावा राज्य सरकारने केला होता . यामध्ये प्राण्यांना मारले जात नाही ; पण काही तज्ज्ञांच्या मते बैलांना पळविण्यापूर्वी त्यांना दारू पाजली जाते, त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडरदेखील टाकली जाते. बैलांना शर्यतीत उतरविण्यापूर्वी काचेच्या साह्याने त्यांची शिंगे छिलून तीक्ष्ण केली जातात यामुळे त्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो, असे प्राणी हक्क संघटनांनी म्हटले होते .
__________________________________
दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी आमचे @chalughadamodi चॅनेल जॉईन करा
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹दुखापतीमुळे रॉजर फेडररची रिओ ऑलिम्पिकमधून माघार
एकेकाळी टेनिस जगतावर अधिराज्य गाजवणारा पण सध्या दुखापतींनी त्रस्त असलेला स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने दुखापतीमुळेच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतूनन माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच यावर्षातील इतर कोणत्याही स्पर्धांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. फेडररच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
१७ वेळा ग्रँडस्लॅम खिताब पटकावणारा फेडरर गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त आहे. त्याच्या गुडख्याला जबर दुखापत झाली असून फेब्रुवारीमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याचमुळे तो मे महिन्यातील फ्रेंच ओपन स्पर्धेलाही मुकला होता. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली असून परिणामी तो पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेला तसेच या मोसमातील इतर स्पर्धांनाही मुकणार आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹चिनी पाणबुड्यांना रोखणार अत्याधुनिक विमाने
हिंदी महासागरामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारताने बोईंग या जगप्रसिद्ध कंपनीकडून सुमारे 1 अब्ज डॉलर्स किंमतीची चार सागरी टेहळणी विमाने खरेदी करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आज ( बुधवार ) सूत्रांनी दिले .
हिंदी महासागरामधील चिनी पाणबुड्यांच्या वाढत्या वावरावर लक्ष ठेवण्यासाठी याआधीच अशा स्वरुपाच्या मोठ्या पल्ल्याच्या ( लॉंग रेंज ) आठ विमानांचा ( पी- 8 आय ) भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे . या विमानांपैकी काही विमाने ही मलाक्का सामुद्रधुनीपासून जवळच असलेल्या अंदमान व निकोबार बेटसमूहांवर तैनात करण्यात आली आहेत. येत्या तीन वर्षांच्या काळात ही विमाने नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे . सागरी टेहळणीबरोबरच या विमानावर पाणबुडीविरोधात वापरण्यात येणारी हार्पून क्षेपणास्त्रेही बसविण्यात आली आहेत.
अमेरिकेचे उप संरक्षण मंत्री फ्रॅंक केंदेल यांच्या भारत दौऱ्यादरम्यानय्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले . भारत व अमेरिकेमधील लष्करी सहकार्य गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाले असून ही विमान खरेदी या प्रक्रियेचाच एक टप्पा मानला जात आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹संयुक्त राष्ट्राच्या जागतिक नागरिक महोत्सवाची होस्ट प्रियांका चोप्रा
नावाजलेले टीव्ही कलाकार सेठ मेयेर्स, नील पॅट्रीक हॅरीस आणि सलमा हायेक पिनॉल्ट आणि अन्य कलाकारांबरोबर प्रियांका चोप्राही संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करणार आहे.
२४ सप्टेंबर २०१६ ला न्यू यॉर्कच्या सेण्ट्रल पार्कमध्ये होणार आहे. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. केण्ड्रीक लमर, मेचॅलीका, रिहाना, मेजर लेझर. युशेर, एली गोल्डींग, सेलेना गोमेझ यांसारखे कलाकार यात सहभागी होणार आहेत.
या सगळ्या कलाकारांच्या मांदीयाळीत एक भारतीय नावही दिमाखात उभं राहणार आहे. ते म्हणजे प्रियांका चोप्रा.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹ताडोबातील व्याघ्रवैभव आता जगाच्या नकाशावर
टपाल तिकिटाचे शुक्रवारी प्रकाशन
जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला असून हे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे.
ताडोबाच्या जंगलातील एक वाघीण आपल्या बछडय़ावर प्रेम करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्या अमोल बैस या तरुण हौशी वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले आहे. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे व ताडोबाचे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. यासाठी त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली.
या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्याचे महत्व व तेथील व्याघ्रवैभवाचा सविस्तर तपशील त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना सादर केला.
या मागणीचा पाठपुरावा करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून केंद्र सरकारने ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून, जागतिक व्याघ्रदिनी २९ जुलैला रोजी हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येत आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार
सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे.
चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपल्या गायनामधून सामाजिक सलोखा जपला आहे. कृष्णा यांनी भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या गायनामधून करून देत, दलित व इतर वर्गाच्या समुदायाला संगीताची ओळख करुन दिली. तर बेझवाडा विल्सन यांना मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते लढत आहेत. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्यां अरूणा रॉय यांच्यासह काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹जीएसटीवर सर्व राज्यांची सहमती
एक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच
सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता वाढली आहे. या बैठकीतील निर्णयांच्या आधारे सुधारित विधेयक ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात राज्यसभेत मांडले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये व्यापक एकमत झाल्याची टिप्पणी यासंदर्भातील अधिकारप्राप्त समितीचे अध्यक्ष आणि प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केली. त्यास मार्क्सवादी कम्युनिस्टशासित केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांनीही दुजोरा दिला. ‘विधेयकाच्या मसुद्यावर सर्व राज्ये सर्वसाधारणपणे समाधानी आहेत,’ असे मित्रा म्हणाले.
राज्यसभेतील संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसने तीन मागण्यांसाठी हे विधेयक दोन वर्षांपासून रोखून धरले आहे. जीएसटीचा कमाल दर १८ टक्केच ठेवण्याची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकातच हवी, एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करावे आणि तक्रार निवारणासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र लवाद नेमावा, या काँग्रेसच्या प्रमुख मागण्या आहेत. यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यापैकी एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याचा निर्णय झाला; पण अठरा टक्क्य़ांच्या करमर्यादेची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकात करण्याची आणि स्वतंत्र लवाद नेमण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर काही एकमत झाले नाही. त्यामुळे राज्यसभेत सादर होणाऱ्या विधेयकात हे दोन्ही मुद्दे नसतील, असे मित्रा यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘जीएसटीचा दर असा असावा, की सामान्यांना झळ पोचणार नाही आणि राज्यांच्या महसुलाला फटका बसणार नाही,’ असेही ते म्हणाले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹अॅपलने केली तब्बल एक अब्ज आयफोन्सची विक्री
अॅपल कंपनीने आपले सुप्रसिद्ध उत्पादन असलेल्या आयफोन्सच्या विक्रीत एक महत्त्वाचा टप्पा गाठत , आतापर्यंत तब्बल एक अब्ज आयफोन्सची विक्री केली आहे .
गेल्या आठवड्यात कंपनीने एक अब्ज आयफोन्सची विक्री पुर्ण केली . मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ही अधिकृत घोषणा केली . आम्ही ( अॅपल ) सर्वोत्कृष्ट उत्पादने बनवितो , असे सांगत आयफोन हे अत्यंत महत्त्वपूर्ण उत्पादनांपैकी एक असे वर्ल्ड - चेंजिंग आणि यशस्वी उत्पादन ठरले आहे , असे कुक यांनी सांगितले .
विशेष म्हणजे , पहिला आयफोन 2007 मध्ये सादर करण्यात आला होता . त्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये अॅपलने ही किमीया साधली आहे . दशकभरात अॅपलच्या या उत्पादनांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविली आहे .
_______________________________
जॉईन करा @chalughadamodi
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी कालवश
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कोलकात्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताने एक महान लेखक आणि बंगालने आई गमावली आहे. मी माझा व्यक्तीगत मार्गदर्शक गमावला असून, महाश्वेता देवींच्या आत्म्याला शांती लाभो असे टि्वट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.
महाश्वेतादेवी लेखिका त्याच्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारताच्या वेगवेगळया समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती.
महाश्वेता देवीच्या कथेवर आधारीत मराठी चित्रपट:
महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सारंग साठ्ये, राजकुमार तांगडे, वीणा जामकर, कैलास वाघमारे, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार अशी तगडी कास्ट होती. या चित्रपटाची कथा कोरकू या मागासलेल्या जमातीवर बेतलेली होती. मेळघाटात राहाणाऱ्या या आदिवासी जमातीत कुपोषण ही मोठी समस्या आहे. ही जमात संपूर्ण जगापासून काहीशी दूर राहाण्याचाच प्रयत्न करते. आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वासच नाहीये. त्यामुळे आजारी पडल्यावर डॉक्टर, उपचार अशा काही गोष्टी असतात हे त्यांना पटतच नाही. याच त्यांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या एका डॉक्टरची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कुपोषण या गंभीर समस्येवर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक संदेश भंडारे यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता.
या चित्रपटाची कथा ही महाश्वेतादेवी यांची असल्याने हा चित्रपट बनवण्यापूर्वी संदेश भंडारे महाश्वेतादेवी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव शब्दांत मांडणे खूपच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले होते. संदेश यांनी भेटल्यानंतर महाश्वेतादेवी यांना रॉयल्टीच्या रक्कमेबाबत विचारले होते. त्यावर त्यांनी त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक रुपयाची मागणी केली होती. त्यांनी मागितलेली ही रक्कम ऐकून मला धक्काच बसला होता असे संदेश यांनी सांगितले होते. तरीही इतक्या मोठ्या व्यक्तीला इतकीशी छोटी रक्कम कशी द्यायची असा विचार करून संदेश यांनी या चित्रपटासाठी 21000 रुपये इतके मानधन त्यांनी दिले होते. अमोल धोंडगे या अभिनेत्याने या चित्रपटात म्हादू ही प्रमुख भूमिका साकारली होती.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹'झिका' प्रतिबंधक औषधाचा शोध
संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या झिका विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. १९४७ मध्ये यूगांडात हा विषाणू आढ़ळला होता. डासांपासून होणाऱ्या झिका विषाणू बाधित बाळ दोन दिवसापूर्वी स्पेन मध्ये जन्मले होते.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भालाफेकपटू नीरजसाठी भारताने मागितले 'वाईल्ड कार्ड'
२० वर्षांखालील गटाचा विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टवाईल्ड कार्डटद्वारे रिओ आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देण्याची मागणी भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय)आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटिक्स
महासंघाकडे(आयएएएफ) केली आहे. एएफआयने यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख सॅबेस्टियन को यांना
पत्र लिहिले आहे. त्यात नीरजला रिओमध्ये ५आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये भालाफेकीत वाईल्ड कार्डने थेट प्रवेश देण्याची मागणी केली.
हरियाणाचा १८ वर्षांचा नीरज याने पोलंडमध्ये २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करीत विश्व विक्रमाची नोंद केली होती. लॅटेव्हियाचा जिगिरमंड सिरमायस याचा ८४.६९ मीटरचा विक्रम नीरजने मोडित काढला. नीरजचा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कालच सन्मान केला.
त्याला क्रीडा मंत्रालयाकडून दहा लाखांची रोख रक्कमदेखील भेट दिली. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याची अखेरची तारीख ११ जुलै होती. नीरज निर्धारित वेळेत पात्रता गाठू शकला नव्हता. आॅलिम्पिक भालाफेकीत पात्रता अंतर ८३ मीटर असे होते. नीरजचे वय फारच कमी असल्याने आणि सध्या तो सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकू
शकतो, या भावनेतून भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने त्याच्यासाठी वाईल्ड कार्डची मागणी पुढे रेटली.
एएफआयचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय महासंघाचे सदस्य आदील सुमारीवाला यांनीदेखील विश्व संस्थेने मनावर घेतल्यास नीरजला रिओसाठी वाईल्ड कार्ड मिळण्यास अडचण जाणार नसल्याचे सांगितले. आॅलिम्पिकमध्ये जगातील
सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वत:ला पारखतात. नीरजने अलीकडच्या कामगिरीवरून स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे. भारताच्या या खेळाडूला विश्व संस्थेने वाईल्ड कार्ड द्यावे, असे भारतीय अॅथ्लेटिक्स संघटनेने पत्रात आवाहन केले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹योजनांच्या लाभासाठी ' आधार' ला सर्वेक्षणाची जोड - स्वाधीन क्षत्रिय
सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी " आधार ' आणि केंद्र सरकारचे " सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण ' यांची सांगड घालणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी ( ता. 27 ) नवी दिल्ली येथे निती आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेत केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे निती ( नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ) आयोगातर्फे सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव तथा नियोजन सचिवांची राष्ट्रीय परिषद झाली . त्यात क्षत्रिय बोलत होते . केंद्र सरकारच्या आधार योजनेमुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर होण्यास मदत होत आहे . केंद्र सरकार दर वर्षी सामाजिक , आर्थिक सर्वेक्षण करते. कोणतीही योजना राबवण्यासाठी परिपूर्ण माहितीची आवश्यकता असते . यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती व " आधार ' मधील माहितीची एकत्र सांगड घालण्याची आवश्यकता आहे . यामुळे सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थींपर्यंत पोहचवण्यात मदत होईल , असेही क्षत्रिय म्हणाले .
राज्य सरकारने सुरू केलेल्या सेवा हमी कायदा, आपले सरकार याद्वारे लोकाभिमुख प्रशासनाचा सामान्य माणसाला अनुभव येत आहे . " जलयुक्त शिवार ' सारख्या योजनेद्वारे राज्यातील 11 हजार 400 गावांत जलसंधारणाची कामे सुरू आहेत. चार वर्षांपासून महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे . दीड वर्षात जलयुक्त शिवारच्या कामांचा चांगला परिणाम पावसाळ्यात दिसून आला . महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही योजना राज्याला वरदान ठरत आहे , असेही क्षत्रिय यांनी सांगितले .
ते म्हणाले , की दर सहा महिन्यांनी राष्ट्रीय परिषद घेऊन त्यात विविध राज्यांनी राबवलेल्या यशस्वी योजनांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. यशोकथांद्वारे विविध राज्यात सुरू असलेले अभिनव उपक्रम अन्य राज्यांनाही उपयुक्त ठरू शकतील.
ऑनलाईन सेवांवर भर:
राज्य सरकारच्या योजना व प्रकल्पांची या वेळी क्षत्रिय यांनी दिली . यंदा राज्यात " जलयुक्त शिवार ' च्या कामांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे ते म्हणाले . सेवा हमी कायदा, "आपले सरकार ' याद्वारे नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यात येत आहे . गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे , असेही त्यांनी सांगितले .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹' विराट' नंतर नौदलाकडे विमानवाहू नौकाच नाही
' विक्रमादित्य ' येण्यास अजून आठ महिने
जगामधील एक प्रमुख सत्ता म्हणून उदय पावत असलेल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये अजून आठ महिने तरी एकही विमानवाहू नौका असणार नाही , असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे .
जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान झालेल्या हिंदी महासागरामध्ये भारतास अत्यंत संवेदनशील भौगोलिक स्थान ( पायव्होटल पोझिशन ) लाभले आहे . यामुळेच हिंदी महासागर व लगतच्या विस्तीर्ण प्रदेशातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हिताचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे .
' आयएनएस विक्रमादित्य' ही सध्याची एकमेव भारतीय विमानवाहू नौका अजून आठ महिन्यांनी तयार होणार आहे . 44 हजार 570 टन वजन असलेल्या या नौकेच्या दुरुस्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे . याचबरोबर , येत्या सहा - सात वर्षांसाठी "आयएनएस विक्रमादित्य' ही भारताच्या नौदलाच्या ताफ्यातील एकमेव विमानवाहू नौका राहणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे .
महालेखापाल कार्यालयाकडून (कॅग ) नुकत्याच संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या अहवालानुसार , सध्या बांधणी करण्यात असलेली स्वदेशी बनावटीची " आयएनएस विक्रांत ' ही विमानवाहू नौका 2023 पर्यंत तयार होईल , अशी माहिती या नौकेची बांधणी करणाऱ्या कोचीन शिपयार्डाकडून देण्यात आली आहे . या नौकेच्या बांधणीसाठी याआधीच मोठा उशीर झाला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे . भारतास किमान तीन विमानवाहू नौकांची गरज असल्याचे नौदलाकडून याआधीच सांगण्यात आले आहे . परंतु 2023 पर्यंत एकच आणि त्यानंतरही ( ही कालमर्यादा पाळली गेल्यास ) दोनच विमानवाहू नौका भारताच्या ताफ्यात असतील, असे सूत्रांनी सांगितले .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹अमेरिका भारताला देणार चार लढाऊ विमाने
एक अब्ज डॉलरचा करार
भारताने अमेरिकेसोबत चार पोसायडन -8 आय लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक अब्ज डॉलरचा करार केला . याबाबतच्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या . गेल्या दहा वर्षांत भारताने संरक्षण सामग्रीसाठी केवळ अमेरिकेसोबत 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे .
ही चार लढाऊ विमाने रडार्स व शस्त्रांसहित 1 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलात दाखल होणार आहेत. या आधी मे 2013 व ऑक्टोबर 2015 रोजी अशी विमाने भारतीय नौदलात आयात करण्यात आली होती . सध्या नौदलात पी 8 आयएस हे लढाऊ विमान हार्पन ब्लॉक 2 मिसाईलसह सज्ज आहे . याचसोबत एमके -54 लाइटवेट पाणबुड्या , रॉकेट आदींचा समावेश आहे . तसेच समुद्रावर लक्ष्य करण्यासाठी " इंटेलिजंट हॉक हाय ' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे .
पोसायडन -8 आय बाराशे मैलांपर्यंत मारा करू शकणार आहे . समुद्री निरीक्षण व गुप्तचर तपास मिशन अशा महत्त्वाच्या मोहिमांवरही याचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹महाराष्ट्राच्या मदतीने नेपाळमध्ये शाळा
अन्नपूर्णा असेल किंवा एव्हरेस्ट या मोहिमांसाठी गिर्यारोहकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे नेपाळ . 2015 मध्ये झालेल्या भूकंपाने नेपाळ हादरले आणि अत्यंत सुंदर असलेली ही भूमी बेचिराख झाली . नेपाळच्या दऱ्याखोऱ्यांत अंगाखांद्यावर खेळलेल्या या गिर्यारोहकांना झालेली ही वाताहत पाहवेना म्हणून त्याच्या उभारणीसाठी ठोस काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला . आता लवकरच महाराष्ट्रातील गिरीप्रेमी आणि मैत्री या संस्थांच्या मदतीने तेथील अतिदुर्गम भागातील त्रिपुरेश्वरमध्ये शाळा उभारणीचे काम सुरू होणार आहे .
भूकंप झाल्यानंतर जगभरातून पुनर्वसनासाठी मदतीचे हात पुढे आले . एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा काठमांडू अशा प्रसिद्ध ठिकाणी रोजगार , पर्यटन बुडू नये यासाठी तेथील शाळा, रुग्णालये, बाजाराची लागलीच उभारणी झाली ; मात्र अतिदुर्गम भागात असलेल्या शाळा आणि घरांकडे दुर्लक्ष झाले . या दुर्लक्षित राहिलेल्या अतिदुर्गम भागांतील शाळांचे काम करावे असं गिरीप्रेमीच्या वतीने ठरवण्यात आले आणि त्यातूनच निवड झाली ती पोखरा व्हॅलीतील दाडिंग जिल्ह्यातील त्रिपुरेश्वर या गावाची. काठमांडू विमानतळापासून दाडिंग गाठायला पाच ते सहा तास लागतात . त्यानंतर पुढे 27 किमीवर असलेले हे गाव गाठायला चार तास लागतात . तिथे आजूबाजूच्या गावातील व वाड्या -वस्त्यांमध्ये असलेली एकमेव शाळा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झाली होती . 10 वीपर्यंतच्या या शाळेत 1200 विद्यार्थी शिकत आहेत. इमारत ढासळल्याने सध्या पत्र्याच्या शेडमध्ये मुलांना शिकावे लागत आहे . हे शेडही गिरीप्रेमीच्या मदतीनेच उभारण्यात आले आहे . मध्यंतरी नेपाळ सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे या कामाला गती मिळाली नाही ; मात्र नुकताच गिरीप्रेमीचे शिरीष जोशी यांनी नेपाळ दौरा केला . तांत्रिक बाबींवर चर्चा झाली आणि येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पंचायत समिती निवडणुकीसाठी
2 / 3 सदस्य बंधनकारक
राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे सदस्य मंडळ अस्तित्वात येण्यासाठी सदस्यसंख्येच्या किमान दोनतृतीयांश जागांवर निवडणूक होणे आवश्यक असेल, याबाबतचे विधेयक आज विधान परिषदेत संमत करण्यात आले .
जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील प्रचलित तरतुदीनुसार झेडपी सदस्यांची संख्या 50 ते 75 , तर पंचायत समितीसाठी प्रत्येक गणातून सदस्य निवडले जातात. मात्र ठाणे जिल्ह्यात झालेल्या काही बदलामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली . ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीत जिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी अनुक्रमे फक्त 8 व 10 उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले. मात्र एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश संख्या नसल्याने जिल्हा परिषदेची रचना होऊ शकली नाही . तसेच 11 मार्च 2015 मध्ये मुरबाड आणि शहापूर ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रूपांतर झाले . कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात 27 गावांचा समावेश होण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याने ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कमी होत आहे . या पार्श्वभूमीवर प्रचलित कायद्यात सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद , पंचायत समिती क्षेत्रातील एकूण जागेच्या दोन तृतीयांश जागांवर निवडणूक होणे बंधनकारक असेल, त्यानंतरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात येईल.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹छत्तीसगड : घरांवरील पाट्यांवर मुलींची नावे
शिक्षणासाठी छत्तीसगड सरकारचा अभिनव उपक्रम
घरांवरील पाट्या बहुतेक वेळा कुटुंबप्रमुखाच्या नावाने असतात . पण छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील गावांत अशा पाट्या घरातील शालेय मुलींच्या नावे लावण्याची अभिनव उपक्रम हाती घेतला आहे . मुलींचे शिक्षण , समाजात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा प्रयोग येथील जिल्हा प्रशासनाने राबविला आहे .
नक्षलवादी भाग समजल्या जाणाऱ्या बालोद जिल्ह्यांमधील छोट्याछोट्या गावांमध्ये अशा पाट्या दिसत आहेत. मुलींच्या जन्माचे व तिला शिक्षित करण्याचे महत्त्व लोकांवर बिंबविण्यासाठी दीड महिन्यांपासून हा उपक्रम सुरू केला आहे . याद्वारे मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पालकांना प्रेरणा मिळते शिवाय मुलींबाबत आदराची भावनाही निर्माण होत आहे . मुलींमध्येही उत्साहाचे वातावरण आहे , असे जिल्हाधिकारी राजेशसिंह राणा यांनी सांगितले .
मार्काटोला गावातील नववीत शिकणारी पेमिना साहू हिच्या नावाने घरावर पाटी लागली तेव्हा ती हरखून गेली होती . अन्य गावांमध्येही विविध वयोगटातील दोन हजार 700 मुलींच्या नावाने पाट्या त्यांच्या घरावर विराजमान झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "बेटी बचाओ , बेटी पढाओ' ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य , ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाटी लावण्याच्या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात आले. दोंडी व गुंडेरदी विभागातील 12 गावांमधून याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्याचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत आहे . मुलींची शाळेतील गळतीचे प्रमाणही कमी होत असल्याचे राणा यांनी सांगितले .
आपले घर आपल्या नावाने ओळखले जाईल , अशी कल्पनाही कधी न केलेल्या पेमिनासारख्या अनेक मुलींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . "" या योजनेद्वारे आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे . तसेच मुलींकडे बघण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोनही बदलत आहे , '' अशी प्रतिक्रिया पेमिनाने व्यक्त केली . उकारी -दोंडी गावातील जागृती टिकम म्हणाली , की हा उपक्रम केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यातील कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे. मुलांपेक्षा मुली कुठेही कमी नसतात, हे यामुळे सर्वांना समजेल .
हिरव्या रंगात पाट्या
गावातील प्रत्येक घराला भेट देऊन घरावर मुलींच्या नावाची पाटी लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य जागृती करीत आहेत. या पाट्या हिरव्या रंगात असून अक्षरे पांढऱ्या रंगात रंगविलेली आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची निवड केली असून मुलांनी याविषयी जनजागृती करावी , अशी अपेक्षा आहे , असे जिल्हाधिकारी राणा यांनी सांगितले . शालेय पातळीवरील हा उपक्रम लवकरच सरकारी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे .
_____________________________________
Join us click here @ChaluGhadamodi
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सुरक्षा समितीपासून भारत दूरच
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सुरक्षा समितीमध्ये नव्या सदस्यांच्या समावेशाबाबत सर्व देशांमध्ये एकमत न झाल्याने भारताचा या समितीमधील प्रवेश या वर्षी तरी होणार नसल्याचे निश्चित झाले आहे . पुढील वर्षी पुन्हा याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे .
ब्राझील , जपान आणि जर्मनीबरोबर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत भारताने ही माहिती दिली आहे . "संयुक्त राष्ट्रसंघाच्या 70 व्या स्थापना वर्षात या विषयावर अपेक्षित चर्चा आणि सुधारणा घडवून आणण्यात संघाला अपयश येणे दुर्दैवी आहे , ' असे या निवेदनात म्हटले आहे . सुरक्षा समितीच्या कायम सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी या चारही देशांनी गेल्या वर्षभरात जोरदार प्रयत्न केले होते .
तसेच , एकमेकांना सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबाही जाहीर केला होता . राष्ट्रसंघाच्या महासंघाची बैठक नुकतीच संपली. तीमध्ये सुरक्षा समितीमध्ये सुधारणा करून तिचा विस्तार करण्याची चर्चा कोणत्याही निर्णयाविनाच संपली. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे . खूप प्रयत्न करूनही भारताला अणू पुरवठादार गटात सहभागी होण्यातही अपयश आले होते . मात्र, डिसेंबरमध्ये या गटाची पुन्हा बैठक होणार असून त्यात भारताला मोठा पाठिंबा मिळण्याची आशा आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. आता हा धडा वगळण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गोव्याच्या विद्यार्थ्यांना शारापोव्हाच्या प्रेरणेची गरज नाही, असे दिसत आहे. डोपिंग (उत्तेजक द्रव्य सेवन) प्रकरणात अडकल्यामुळे शारापोव्हाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा परिणाम भारताच्या विविध भागात होत आहे.
शारापोव्हाच्या जीवनावर आधारित एक धडा गोव्याच्या नववीतील पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता.
ज्यात शारापोव्हाच्या यशाची गाथा सांगण्यात आली होती. मात्र, ती डोपिंगमध्ये अडकल्यानंतर तिचा धडा पुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत याच वर्षी शारापोव्हाने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिला बंदीचा सामना करावा लागत आहे.
काहींच्या मते, गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाने (जीबीएसएचएसई) हा धडा इंग्रजी पाठ्यपुस्तकातून वगळण्यात यावा, ही मागणी बोर्डाने सुद्ध मान्य केली असून हा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या मारियावर ह्यरिच फॉर द टॉपह्ण हा धडा २००६-०७ मध्ये गोव्याच्या इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. आता त्याचा गोव्यातील शिक्षक संघांनी विरोध केला आहे.
विरोधानंतर जीबीएसएचएसईने एक सर्क्युलर जारी केले असून आता हा धडा पुढील वर्षापासून वगळण्यात येईल. यासंदर्भात, बोर्ड सचिव शिवकुमार जंगम यांनी दुजोरा दिला असून पुढील वर्षापासून हा निर्णय अमलात आणला जाईल, असेही स्पष्ट केले.
#eMPSCkatta_Current _Affairs
🔹जलयुक्त शिवार : राज्यात 38 टीएमसी जलसंचय
दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील 11 हजार 465 गावांमध्ये दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे . आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक कामे पूर्ण झाली असून , 29 हजार 317 कामे प्रगतिपथावर आहेत. या साऱ्या कामांमधून 38 टीएमसी जलसंचय होणार आहे . उपलब्ध साठ्यातील एकवेळचे पाणी 11 लाख 12 हजार 550 हेक्टरला, तर दोनवेळचे पाणी पाच लाख 59 हजार 204 हेक्टरला देता येणार आहे .
जलयुक्तमध्ये लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे . गाळ काढणे, खोलीकरण -रुंदीकरणाची सरकारी यंत्रणांतर्फे 10 हजार 234 आणि लोकसहभागातून सात हजार 424 कामे घेण्यात आली आहेत. लोकसहभागातून 679 .16 , तर सरकारी यंत्रणांनी 457 .65 लाख घनमीटर गाळ काढला आहे . याशिवाय एक हजार 787 किलोमीटर इतके खोलीकरण -रुंदीकरणाचे काम सरकारी यंत्रणांनी केले आहे . लोकसहभागातून हेच काम एक हजार 514 किलोमीटर इतके झाले आहे . या कामांसाठी सरकारी यंत्रणेने 384 कोटी 54 लाख रुपये खर्च केले आहेत. लोकसहभागातून 473 कोटी 11 लाख रुपयांची कामे झाली.
राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये आठ हजार 664 साखळी सिमेंट नालाबांधाची कामे मान्य करण्यात आली आहेत. त्यातील सहा हजार 933 कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत . त्यांपैकी पाच हजार 921 कामे सुरू करण्यात आली असून , पाच हजार 290 कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर 610 कोटी 74 लाख खर्च करण्यात आले . सुरू झालेल्या 47 हजार 291 कामांपैकी 43 हजार 264 कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर 769 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गावांनी केलेली प्रगती
- 100 टक्के पूर्ण गावे : तीन हजार 465
- 80 टक्के पूर्ण गावे : एक हजार 263
- 50 टक्के पूर्ण गावे : 805
- 30 टक्के पूर्ण गावे : 350
- 30 टक्क्यांपेक्षा कमी : 309
- अद्याप कामे न सुरू झालेली गावे : 10
- विशेष निधीसह इतर योजनांमधून झालेला खर्च : तीन हजार 86 कोटी
महाराष्ट्र
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक
माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. दीक्षित यांनी मुदतवाढीसाठी प्रयत्न न केल्यानं सेवाज्येष्ठतेनुसार माथूर यांची या पदावर वर्णी लागली आहे. १९८१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या माथूर यांनी याआधी विधी व तांत्रिक तसंच, पोलीस गृहनिर्माण व कल्याण विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहिलं आहे. केंद्र सरकारच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी एअर इंडिया, सीबीआयमध्येही काम केलं आहे. त्यांनी पुण्याचं पोलीस आयुक्तपदही भूषविलं आहे. ते २०१८ साली सेवानिवृत्त होणार असल्यानं महासंचालक म्हणून त्यांना बराच कालावधी मिळणार आहे. माथूर यांच्या बढतीमुळं रिक्त होणाऱ्या एसीबीच्या महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹सुधारित मिराज- 2000 चे उड्डाण
भारतीय हवाई दलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने ( एचएएल) सुधारणा केलेल्या मिराज -2000 या विमानाने आज पहिले उड्डाण केले . या सुधारणा केलेल्या विमानामध्ये विशिष्ट अस्त्रे , सेन्सर्स आणि इतर अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि "एचएएल' चे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेली ही चाचणी 45 मिनिटे चालली . मिराज - 2000 मध्ये सुधारणा झाल्याने विमानाची विश्वासार्हता आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता वाढली आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारतीय तरुणी ठरली सर्वाधिक तरुण प्रतिनिधी
फिलाडेल्फिया - डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारतीय वंशाची 18 वर्षांची तरुणी सर्वांत कमी वयाची प्रतिनिधी ठरली आहे . अधिवेशनात हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे .
श्रुती पलानीअप्पन असे या तरुणीचे नाव आहे . ती हार्वर्ड युनिर्व्हसिटीची विद्यार्थिनी असून , हिलरी क्लिंटन यांची समर्थक आहे . क्लिंटन या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मोठ्या राजकीय पक्षाने निवडलेल्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. श्रुतीचे वडील पलानीअप्पन आंडीअप्पन हेही या अधिवेशनाला नामनिर्देशन समितीचे सदस्य म्हणून उपस्थित आहे . या अधिवेशनात श्रुती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे . अधिवेशनात सर्वाधिक वयाचे प्रतिनिधी जेरी एमेट (वय 102 ) यांचा समावेश आहे .
सर्वांत कमी वयाची प्रतिनिधी ठरण्यासोबत श्रुतीने मंगळवारी (ता. 26 ) इतिहास घडविला होता . मतदान घेताना त्या वेळी तिला आयोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली होती . "एका मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी रॉडडॅम क्लिंटन यांची अमेरिकेच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून निवड करून आपल्याला इतिहास घडविण्याची संधी मिळाली आहे , ' असे श्रुती हिने " फेसबुक' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹कोयना जलाशयावर तरंगत्या सौरउर्जा पॅनेलच्या माध्यमातुन ६०० मेगावॅट उर्जानिर्मितीचा प्रस्ताव
सह्याद्री पर्वताच्या रांगामधुन वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर, सातारा येथे “कोयना धरण” सन १९६४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे हा असुन या प्रकल्पाची स्थापित जलविद्युत क्षमता १९२० मेगावॅट एवढी आहे. देशातील पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोयना प्रकल्पाची क्षमता सर्वात जास्त आहे.
आता कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या ८९१ वर्ग किलोमीटर क्षेत्रावरील जलाशयावर तरंगते सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या सौर पॅनेलच्या माध्यमातुन ६०० मेगा वॅट एवढी उर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असुन या प्रकल्पामधुन निर्माण होणारी वीज राज्याच्या वीजजाळ्यामध्ये (grid) जोडण्यात येणार आहे. कोयना जलाशयातील पाण्याचा वापर झाल्यानंतर पाणीपातळीत घट झाल्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी कमी होत जाणार आहे आणि अशा वेळी तरंगत्या सौर पॅनेल बाबतचे कोणती कार्यवाही करावी याबाबत चर्चा सुरु आहे.
या कामासाठीचा आवश्यक असणारा प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आले असुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये जलसंपदा विभाग व महाउर्जा विभाग हे राज्य शासनाचे विभाग तर केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेला राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळ (NHPC) यांचा सहभाग असणार आहे.
NHPC च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी रु. ६,००० कोटी (रु. १० कोटी प्रती मेगावॅटनुसार) एवढा खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा बांधकामाचा खर्च जरी जास्त असला तरी या प्रकल्पाचा व्यवस्थापनाचा व देखभालीचा खर्च कमी असणार आहे व यामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय़ उर्जा (New and Renewable Energy) मंत्रालयाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासुन वीज निर्मितीचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन अशा उर्जा स्त्रोतांद्वारे देशात सन २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट एवढा वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यामध्ये १०० गिगावॅट सौर उर्जा निर्मिताचा समावेश आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दि. २० जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्याचे नवीन व नवीकरणीय़ उर्जा स्त्रोत (अपारंपारिक उर्जा स्त्रोत) यापासुन वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण जाहीर केले आहे. तसेच दि. ९ सप्टेंबर २०१५ रोजीच्या शासन
निर्णयान्वये उपरोक्त प्रकल्पांची उभारणी करण्यासाठीची कार्यपध्दती जाहीर केली आहे. या अनुषंगाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासुन वीज निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारतीय लेखक प्रेमचंद यांना गुगलकडून श्रद्धांजली
प्रसिद्ध भारतीय लघुकथा लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त आज ( रविवार ) गुगलकडून विशेष डुडल बनवून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे .
मुन्शी प्रेमचंद यांचा 31 जुलै 1880 मध्ये उत्तर प्रदेशातील लाम्ही येथे जन्म झाला होता . प्रेमचंद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लघु कथा, कादंबरी लिहिल्या .
त्यांच्या लिखाणात गावाकडील गोष्टींचा उल्लेख असे. त्यामुळे गुगलने डुडलमध्येही शेती, गावकडील घरे दाखविण्यात आली आहेत. प्रेमचंद यांनी 1936 मध्ये लिहिलेल्या गोदान या कादंबरीतील डुडलसाठी प्रेरणा घेण्यात आली आहे .
प्रेमचंद यांनी 13 व्या वर्षी लिखाणास सुरवात केली होती . त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. प्रेमचंद हे शिक्षक म्हणून कार्यरत होते . हिंदी भाषेला त्यांना प्राधान्य दिले होते .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी मिळवला विजय
प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनमध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी विजय मिळवला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पटना पायरेट्सने सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा विजय खेचून आणला. पटनाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला असून, प्रदीपने चढाईत एकूण 16 गुणांची कमाई करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जयपूरला स्वतःचा बचाव करताना नाकीनऊ आल्यानं या परिस्थितीचा उत्तम फायदा उचलत प्रदीपने 16 गुण मिळवले.
सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पटना पायरेट्सला फक्त तीन गुण मिळवता आले होते. जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी असतानाही पटनाने अखेरच्या सिझनमध्ये वर्चस्व कायम राखत जयपूरला पराभवाची धूळ चारली. पटनाने जयपूरवर 37-29 असा विजय मिळवला. या विजयामुळे पटना पायरेट्सचा हा सलग दुस-यांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा विजेता ठरला.
याआधी पहिल्या उपांत्य फेरीतही पटना पाटरेट्सनं पुणेरी पलटनवर 37-33 असा विजय मिळवला होता. तर दुस-या उपांत्य फेरीत जयपूर पिंक पँथर्सनं तेलुगू टायटन्सचा 34-24 असा पराभव केला होता. पटना पायरेट्सनं सलग विजय मिळवल्यानं त्यांचा फायनल प्रवेश मिळाला. सिझनच्या शेवटच्या सामन्यापर्यंत 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून 52 गुण मिळवून पटना पायरेट्स आघाडीवर होती. धर्मराज चेरालथन यांच्या नेतृत्वाखाली पटना पायरेट्सनं चांगली कामगिरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा