Post views: counter

Current Affairs April 2017 Part - 2

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिप्रेशन: लेट्स टॉक” संकल्पनेखाली
जागतिक आरोग्य दिवस (7 एप्रिल ) साजरा

7 एप्रिल 2017 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात ‘जागतिक आरोग्य दिवस’ जगभरात साजरा करण्यात आला आहे. यावर्षी हा दिवस “डिप्रेशन: लेट्स टॉक” संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.

उदासीनता ही आज जगात सगळीकडे आजारी आरोग्य आणि अपंगत्व यांचे एक प्रमुख कारण बनले आहे. आज 300 दशलक्षपेक्षा जास्त लोक आता उदासीनतेने जगत आहेत. वर्ष 2005 आणि वर्ष 2015 या दरम्यानच्या काळात 18% पेक्षा जास्त प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे.

उदासिनता म्हणजे काय?

उदासिनता ही स्थिती म्हणजे अश्या काळात व्यक्ति आपले विचार, जगण्यामागील उद्देश गमावून बसतो. या परिस्थितीत व्यक्तिला जीवनाची किंमत काळात नाही, एकलकोंडेपणा तयार होतो वा काहीही करण्याची इच्छा/आवड निर्माण होत नाही. उदासिनता व्यक्तीच्या जीवनकाळात कोणत्याही स्थितीमध्ये आढळून येऊ शकते.

उदासिनता येण्यामागे ठराविक असे कोणतेही कारण नाही मात्र सर्वसाधारण प्रमाणात पहायचे झाले तर सामाजिक-आर्थिक स्थितीतील कमकुवतपणा, शारीरिक अपंगत्व, आरोग्यासंबंधित अनियमित परिस्थिती अश्या परिस्थितीत ही स्थिती निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात अल्पवयीन बालक प्राभावित आहेत.

या परिस्थितीला पाहता जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सुरू केलेल्या त्याच्या मोहिमेमध्ये ही समस्या हाताळण्यासाठी वर्गवारी

केली आहे. ते म्हणजे - युवक आणि तरुण प्रौढ; गर्भावस्थेत महिला (विशेषतः जन्म दिल्यानंतर) आणि वयाच्या 60 वर्षांनंतरचे प्रौढ.

इतिहास

1948 साली WHO ने प्रथम ‘वर्ल्ड हेल्थ असेम्ब्ली’ आयोजित केली होती. या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला. प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक स्तरावर केले जाते आणि त्यामधून जनजागृती निर्माण केली जाते.

जागतिक आरोग्य दिवस हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा म्हणजे जागतिक क्षयरोग दिवस, जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक मलेरिया दिवस, जागतिक तंबाखू विरोधी दिवस, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिवस आणि जागतिक हिपॅटायटीस दिवस.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शेतजमिनीच्या जियोटॅगिंगसाठी RKVY आणि NRSC दरम्यान सामंजस्य करार

शेतजमीनीच्या जियोटॅगिंगसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) आणि राष्ट्रीय सुदूर संवेदी केंद्र (NRSC) दरम्यान एक सामंजस्य करार केला गेला आहे. RKV योजना ही राज्यांना प्रवृत्त करून कृषी आणि संबंधित क्षेत्रात विकास काम करीत आहे. 1.5 लाख पेक्षा अधिक साधने शेती, फलोत्पादन, पशुधन, मत्स्य आणि दुग्ध क्षेत्रात ह्या योजने अंतर्गत विकसित केले गेले आहे. या नव्या अंतराळ संबंधित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्यांना कीटकनाशक/शेतमाल चाचणी प्रयोगशाळा, गोदाम आणि कृषीबाजारपेठ यासंबंधी वेळेवर माहिती मिळण्याचे प्रयत्न केले जातील.

ISRO चे हैदराबाद येथील NRSC हे वापरकर्त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 2D / 3D स्वरूप प्रदान करते, जे “भुवन” नावाच्या सॉफ्टवेअर व्यासपीठावरून उपलब्ध होते.

▪️जियो टॅगिंग म्हणजे काय?

जियोटॅगिंग म्हणजे छायाचित्र किंवा चित्रफिती अश्या विविध माध्यमाला अक्षांश आणि रेखांश सारखी भौगोलिक ओळख जोडण्याची प्रक्रिया होय. यामुळे वापरकर्त्यांना साधनाद्वारे ठिकाणाविषयी दृश्य माहिती उपलब्ध होते, ज्याला जियोमॅपिंग असे म्हणतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शहरी गरिबी निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये राज्यनिहाय कामगिरी जाहीर

आवास व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाच्या माहितीनुसार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये गेल्या तीन वर्षांत म्हणजेच वर्ष 2014-17 या काळात शहरी गरिबी समस्या हाताळण्यामध्ये अग्रेसर आहेत.

दीनदयाळ अंत्योदय योजना-NULM (DAY-NULM) अंतर्गत बचत गटाची निर्मिती करणे आणि स्वयं-रोजगारासाठी वैयक्तिक आणि गट लघु उद्योग स्थापन करण्यासाठी शहरी गरीबाला अनुदानित कर्ज प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश शहरी गरीबाला कौशल्य प्रदान करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्यानंतर मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो.

DAY-NULM च्या अंमलबजावणीमध्ये अग्रेसर शीर्ष 10 राज्यांच्या पुढील पाचमध्ये पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा आणि गुजरात यांचा समावेश आहे. शहरी गरिबीच्या निर्मूलनाकरिता आणि कामाच्या संधी प्रदान करण्यासाठी स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2016 मध्ये राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (NULM) सुरू करण्यात आले. NULM वर्ष 2013 मध्ये 790 शहरे आणि गावांमध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्यानंतर फेब्रुवारी 2016 मध्ये सर्व वैधानिक 4,041 शहरे आणि गावांमध्ये आणले गेले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाम सरकारने गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी “गुणोत्सव” उपक्रमाला
सुरूवात केली

आसाम सरकारतर्फे गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी 5 एप्रिल 2017 पासून “गुणोत्सव” उपक्रमाला सुरूवात केली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी 4320 प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 2000 शाळांचे मूल्यांकन केले जाईल. मूल्यमापनाच्या पहिल्या टप्प्याचे परिणाम दोन महिन्यांनी जाहीर केले जाणार आहेत. शाळांना त्यांच्या कामगिरीनुसार चार श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जाईल. याप्रमाणेच आणखी एक कार्यक्रम सप्टेंबर-ऑक्टोबर 2017 मध्ये उच्च माध्यमिक शाळांसाठी सुरू केले जाईल.

गुणोत्सव” हा मूळतः गुजरात सरकारने सुरू केलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधून विद्यार्थीचे मूल्यमापन करण्यासाठी शाळेमध्ये शाळाबाह्य मूल्यांकन करणार्यांची नियुक्ती केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्ष 2016 साठी विस्डेनचा ‘लिडिंग
क्रिकेटर इन द वर्ल्ड’: विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे वर्ष 2016 साठी ‘विस्डेन्स लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड’ म्हणून ठरवण्यात आले आहे. विस्डेन क्रिकेटर च्या ‘अल्मानेक’ मासिकाच्या वर्ष 2017 च्या आवृत्तीत समावेश करून कोहलीला हा सन्मान दिला गेला आहे.

वर्ष 2016 मध्ये त्याने 75.93 इतक्या सरासरीने 1,215 कसोटी धावा, 10 एकदिवसीय सामन्यात 92.37 सरासरीने 739 धावा, तर T-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 106.83 सरासरीने 641 धावा काढलेल्या आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रदर्शन आहे.

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये हा सन्मान याआधी वीरेंद्र सेहवाग (दोनदा) आणि सचिन तेंडुलकर (एकदा) यांनी मिळविलेला आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिला वर्ष 2016 साठी ‘विस्डेन्स लिडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड’ म्हणून सन्मान देण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माल्विका सिन्हा यांची RBI च्या
कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती

भारतीय रिजर्व बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून माल्विका सिन्हा यांना नियुक्त केले गेले आहे. सिन्हा यांनी 3 एप्रिल 2017 पासून पदभार स्वीकारला आहे. सिन्हा या आधी RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदावर होत्या. शिवाय, डेप्युटी गव्हर्नर म्हणून बी. पी. कानुंगो यांचीही नियुक्ती केली गेले आहे.

सिन्हा या 1982 सालापासून RBI मध्ये कार्य करीत आहेत. त्या याआधी सहकारी बँकिंग नियंत्रण विभागाच्या प्रधान मुख्य सरव्यवस्थापक होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आरोग्य आणि औषधी क्षेत्रात
सहकार्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कराराला मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आरोग्य आणि औषधी क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे.

करारामधून मलेरिया आणि क्षयरोग असे संसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य आणि असंसर्गजन्य रोग, औषधी प्रतिरोधक सूक्ष्मजीव यासारखी सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन स्थिती, औषधनिर्माण, लस व वैद्यकीय उपकरणे यांचे नियमन, डिजिटल आरोग्य, तंबाखू नियंत्रण अश्या विविध आरोग्य क्षेत्रात संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य घेण्याकरिता प्रयत्न केले जातील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद होणार

महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांची मंजुरी दिली आहे.

परदेशात रोजगार मिळवण्यासाठी जाणार्या एमिग्रेशन चेक रीक्वायर्ड (ECR) श्रेणीतील कामगारांसाठी वर्ष 2012 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेंतर्गत अत्यल्प नोंदणी होत असल्याने तसेच वर्षभराहून अधिक काळ यात एकही नवी नोंदणी न झाल्याने आवर्ती प्रशासकीय आणि नोंद ठेवण्यामागील खर्च टाळण्यासाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत आणि यूके हे ‘ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड’ स्थापन करणार

भारतातील पर्यावरण पूरक पायाभूत प्रकल्पांमध्ये लंडनपासून खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संयुक्त यूके-भारत निधी कोष - ‘ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड (GGEF)’ – स्थापन करण्याची घोषणा भारत आणि यूनायटेड किंगडम (यूके/ग्रेटब्रिटन/इंग्लंड) यांच्याकडून करण्यात आली आहे. सुरुवातीला 500 दशलक्ष पाऊंडचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या कोषात दोन्ही देश प्रत्येकी 120 दशलक्ष पाऊंड (£) ची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहेत. हा निधि 2015 साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधि कोष (NIIF) चौकटीअंतर्गत स्थापन केला जाईल. हा निधि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या हरित ऊर्जा आणि नवीकरणीय प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जागतिक बँकेचा “ग्लोबल ट्रॅकिंग फ्रेमवर्क ( GTF ) 2017” अहवाल जाहीर

वर्तमान प्रगती दर्शवणार्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या अंदाजावर आधारित “ग्लोबल ट्रॅकिंग फ्रेमवर्क 2017 – प्रोग्रेस टूवर्ड सस्टेनेबल एनर्जी” अहवाल जागतिक बँकेने जाहीर केला आहे.

वर्तमान प्रगतीनुसार, जगातील फक्त 91% जणांना वर्ष 2030 मध्ये वीज मिळणार. तर 72% ला स्वच्छ स्वयंपाक करण्यास वाव मिळणार. शिवाय वर्ष 2030 मध्ये नवीकरणीय ऊर्जेमधील वाटा हा फक्त 21% असणार.

▪️ठळक वैशिष्टये

वर्ष 2030 पर्यंत जागतिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच्या आवश्यकतेत ऊर्जा मिळवणे, नविकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता यावरील शाश्वत ऊर्जा उद्दिष्टे यावरील प्रगतीमध्ये उचलण्यात येणारी पावले कमी पडत आहे.

शाश्वत ऊर्जेच्या प्रत्येक क्षेत्रात, काही देशांमध्ये जगाच्या तुलनेत कमी विकास दिसून येत आहे, जे असे सुचविते की धोरणावरील मोठ्या प्रमाणात केंद्रित लक्ष यामुळे लक्षणीय परिणाम होऊ शकते.
उद्योग, शेती, सेवा, आणि वाहतूक यांच्यातील अंतिम ऊर्जा वापरातील तीव्रता कमी केल्यामुळे ऊर्जा कार्यक्षमतेतील प्रगतीला चालना मिळाली आहे.

▪️मुख्य निष्कर्ष

विजेची उपलब्धता: 2014 साली जागतिक स्तरावर वीज मिळवण्यातील वाटा हा 85.3% इतका वाढला होता. म्हणजेच 1.06 अब्ज लोकांना अजूनही वीज मिळालेली नाही, मात्र प्रत्येक वर्षी 86 दशलक्ष लोकांना नव्याने वीज मिळत आहे. आफ्रिकेमध्ये लोकसंख्येच्या वाढीदराच्या तुलनेत वीज मिळवण्याचा दर कमी आहे. मात्र केनिया, मलावी, सुदान, युगांडा, झांबिया आणि रवांडा या देशात वर्ष 2012-2014 या काळात विद्युतीकरणात दरवर्षी 2 4% ची वाढ झाली आहे.

स्वच्छ स्वयंपाकाची उपलब्धता: जागतिक स्तरावर स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन आणि तंत्रज्ञान मिळवण्यामध्ये 57.4% इतकी वाढा झाली आहे. म्हणजेच 3.04 अब्ज लोकांना अजूनही स्वच्छ इंधन उपलब्ध नाही. 2012 साली हे प्रमाण 56.5% इतके होते. आफ्रिकेमध्ये दरवर्षी फक्त 4 दशलक्ष लोकांना स्वच्छ स्वयंपाक उपलब्ध होत आहे, जेव्हा की दरवर्षी तेथील लोकसंख्येत 20 दशलक्ष या प्रमाणे वाढ होत आहे. या बाबतीत इंडोनेशिया, पेरू आणि व्हिएतनाम येथे उल्लेखनीय प्रगती दिसून आलेली आहे.

ऊर्जा कार्यक्षमता: ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात वर्ष 2014 मध्ये सर्वाधिक प्रगती ब्राझील आणि पाकिस्तान मध्ये दिसून आलेली आहे, जेथे शाश्वत जागतिक ऊर्जा बचत ही संपूर्ण ऊर्जेच्या वापराच्या समतुल्य आहे. वर्ष 2012-2014 या काळात जगातील 20 उच्च ऊर्जा ग्राहकांपैकी दरवर्षी 2.6% पेक्षा जास्त कपात दर्शवणार्या चीन, मेक्सिको, नायजेरिया आणि रशियन फेडरेशन यासारख्या 15 देशांनी त्यांची ऊर्जा तीव्रता कमी केली आहे. मुख्यताः उद्योग या मोठ्या ऊर्जा वापराच्या क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमतेत चांगली कामगिरी दिसून आलेली आहे. प्रवासी वाहतूकीमध्ये इंधन कार्यक्षमता मानके आणले गेले आहेत.

नवीकरणीय ऊर्जा: वर्ष 2014 मध्ये जगातील एकूण अंतिम ऊर्जा वापरामध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वाटा हा 18.3% इतका आहे, जेव्हा की वर्ष 2012 मध्ये हा वाटा 17.9% होता. पवन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात तंत्रज्ञानामध्ये वेगाने वाढ होत आहे. मात्र सर्वात मोठे आव्हान म्हणजे 80% जागतिक ऊर्जा वापर असलेल्या उष्ण व वाहतूक क्षेत्रात याचा उपयोग करणे. जगातील 20 सर्वात मोठ्या ऊर्जा ग्राहकांमध्ये वर्ष 2012-2014 मध्ये, फक्त 13 देशांमध्ये याबाबतीत वाढ दिसून आली आहे. फक्त इटली आणि युनायटेड किंगडम मध्ये या काळात सर्वाधिक 1% पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे.

▪️भारतामधील परिस्थिती

▪️विजेची उपलब्धता: भारतात 79% लोकसंख्येसाठी वीज उपलब्ध झाली आहे. वर्ष 1990-2014 या काळात लोकसंख्येनुसार शहरी आणि ग्रामीण भागात वीज उपलब्धता याच्या आधारावर हे निष्कर्ष आहेत.

▪️स्वच्छ स्वयंपाक उपलब्धता: भारतात 34% लोकसंख्येसाठी स्वच्छ स्वयंपाक उपलब्ध झाले आहे. वर्ष 2000-2014 या काळात लोकसंख्येनुसार स्वयंपाकाचे इंधन व तंत्रज्ञान याची उपलब्धता याच्या आधारावर हे निष्कर्ष आहेत.

▪️नवीकरणीय ऊर्जा: वर्ष 1990-2014 या काळातील नवीकरणीय ऊर्जेच्या अहवालानुसार, एकूण अंतिम ऊर्जा वापरात 37% नवीकरणीय ऊर्जेचा वाटा आहे.

▪️ऊर्जा कार्यक्षमता: वर्ष 1990-2014 या काळातील राष्ट्रीय ऊर्जा तीव्रता आणि सर्व देशांसाठीच्या CAGR च्या अहवालानुसार, 5 MJ प्रती US$ PPP 2011 इतकी आहे.

▪️ग्लोबल ट्रॅकिंग फ्रेमवर्क 2017 विषयी

ग्लोबल ट्रॅकिंग फ्रेमवर्क 2017 (GTF) यामधून ऊर्जा उपलब्धता, ऊर्जा कार्यक्षमता आणि नवीकरणीय ऊर्जा यामध्ये निंदवलेल्या प्रगतीच्या जागतिक आकडेवारीसह आंतरराष्ट्रीय समुदाय प्रदान करते. या तीन स्तंभावर प्रत्येक देशातील प्रगतीचे मूल्यांकन केले गेले आहे, ज्यामधून 2030 शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण किती दूर आहोत याचे चित्र उपलब्ध होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रीय समुद्रतटवर्ती दिवस देशभरात साजरा

5 एप्रिल रोजी भारताचा राष्ट्रीय समुद्रतटवर्ती दिवस देशभरात साजरा करण्यात आला.

सायइंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे पहिले जहाज ‘एस.एस. लॉयल्टी’, ज्याने युनायटेड किंगडमकडे प्रवास करून 5 एप्रिल 1919 साली सुचालन इतिहास तयार केला होता. या घटनेच्या स्मृतीत हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रथम राष्ट्रीय समुद्रतटवर्ती दिवस 1964 साली साजरा करण्यात आला.

भारताला सुमारे 7516 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. देशात केंद्र सरकारच्या नियंत्रणात एकूण 182 बंदरे आहेत, त्यापैकी विशेष दर्जा ‘मेजर पोर्ट’ असलेले 12 बंदरे आहेत. ही बंदरे भारतीय बंदरे कायदा (IPA), 1908 अन्वये प्रशासित केले जाते. मेजर पोर्ट ट्रस्ट कायदा (MPTA), 1963 हे मेजर पोर्टमध्ये प्रशासकीय चौकट निश्चित करते. वर्तमानात प्रमाणाच्या दृष्टीने भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 90% आणि किंमतीच्या दृष्टीने 77% व्यापार समुद्रमार्गे होतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ईशान्य भारतात 40000 कोटी रुपयांचा द्रुतगती प्रकल्प जाहीर

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ईशान्य भारतात 40,000 कोटी रूपयांचा द्रुतगती महामार्ग विकसित करण्याचा प्रकल्प जाहीर केला आहे.

प्रकल्पांतर्गत 1300 किलोमीटर लांब पट्टा विकसित केला जाणार आहे. हा मार्ग आसाम मध्ये ब्रम्हपुत्रा नदीलगत विकसित केल्या जाणार आहे.

यासाठी आसाम सरकार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि भारतीय जमिनी जलमार्ग (Inland Waterways of India -IWAI) यांच्या करार झाला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंध्र प्रदेशातील सर्व मंदिरांमध्ये
प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली

आंध्रप्रदेश सरकारने राज्यातील सर्व मंदिरांच्या परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. आदेशानुसार, प्रसाद वा लाडू बांधून देण्याकरिता देवदेवतांच्या प्रतिमा चित्रित नसलेल्या कागदी पिशव्या वापरण्यास परवानगी दिली गेली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सत्यार्थी यांनी बांग्लादेशात '100
मिलियन फॉर 100 मिलियन' अभियान सुरू केले

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी 2 एप्रिल 2017 पासून बांग्लादेशमध्ये '100 मिलियन फॉर 100 मिलियन' या त्यांच्या बालकांचे अधिकार अभियानाला सुरुवात केली आहे. अभियानात, जगभरातील 100 दशलक्ष वंचित बालकांसाठी 100 दशलक्ष युवक आणि बालके जमवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वोच्च न्यायालयाकडून HIV बाधित बालकांना वंचित गट म्हणून सूचित

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत एक सूचना जारी करण्याचा विचार करण्यासाठी राज्य सरकारांना आदेश दिला आहे. हा आदेश HIV बाधित बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करण्यात, राज्यघटना अंतर्गत मूलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त अधिकार मिळवून देण्यासाठी 'वंचित गट' म्हणून जाहीर करणे, यासाठी आहे.

हा निर्णय भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहार आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी दिला आहे. खंडपीठाने मोफत आणि सक्तीचे शिक्षणासाठी बालकांचे अधिकार अधिनियम, 2009 च्या कलम 2 (ड) अंतर्गत सूचना जारी करण्यासाठी राज्यांना चार आठवड्याचा कालावधी दिला आहे.
राज्यांना जात, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, भौगोलिक, लिंग इ. कारणांवरून वंचित गटातील बालक म्हणून परिभाषित करण्यासाठी राज्य सरकारला त्यासंबंधित सुचना जारी करावी लागते. कायद्यानुसार, 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षण सक्तीचे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्ष 2016-17 मध्ये 5400MW पवन ऊर्जा क्षमतेची वाढ झाली

देशाने ठरवलेल्या 4000 मेगावॅट (MW) ऊर्जेच्या ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात, वर्ष 2016-17 मध्ये 5400 MW ने पवन ऊर्जा क्षमतेत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान आंध्र प्रदेशचे (2190 MW) आहे. त्यानंतर गुजरात (1275 MW) आणि कर्नाटक (882 MW) या राज्यांचे सर्वाधिक योगदान आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मिझोरम UDAY योजनेत सहभागी
होणारा 27 वा राज्य

राज्य वीज वितरण विभागाच्या क्रियान्वयक सुधारणेसाठी उज्वल DISCOM अॅश्युरन्स योजना (UDAY) अंतर्गत भारत सरकार आणि मिझोरम राज्य यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

यासोबतच मिझोरम हा UDAY योजनेत सहभागी होणारा 27 वा राज्य ठरला आहे. मिझोरम योजनेत भाग घेतल्याने अंदाजे 198 कोटी रूपयांचा एकूणच निव्वळ लाभ मिळणार आहे.

UDAY योजना वीज वितरणामध्ये आढळून येणार्या आर्थिक गोंधळावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे, ज्यामधून भारतामधील वीज वितरण कंपन्यांना (DISCOM) आर्थिक सुरक्षा आणि पुनरुज्जीवन अर्थसहाय्य प्रदान केले जात आहे. योजनेला नोव्हेंबर 2015 पासून सुरुवात झाली. आंध्रप्रदेश हे या योजनेत सहभागी होणारे प्रथम राज्य आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाक कैद्याची भारतीय तुरूंगात जन्मलेली मुलगी भारतीय घोषित

दहा वर्ष तुरूंगात खितपत पडल्यावर घरी जायची वेळ आली की तो कैदी किती आनंदी असतो. शिवाय तो तुरूंग जर परदेशातला असला तर आपली शिक्षा संपवून मायदेशी परतण्याची वेळ झाल्यावर तर त्या कैद्याच्या आनंदाला कुठलीच सीमा नसते. पण एकमेकांची शत्रुराष्ट्रं असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमधून एकमेकांचे कैदी परत पाठवण्याच्या बाबतीत अनेक गुंते असतात.

तसाच एक प्रकार फातिमा आणि तिच्या बहिणीसोबत झालाय. २००६ च्या मे महिन्यात या दोघींना वाघा बाॅर्डरवर ड्रग्जचं स्मगलिंग करत असताना पकडलं गेलं होतं. त्यांना भारतीय कोर्टाने शिक्षा सुनावली. पण या शिक्षेदरम्यान फातिमाने तुरूंगात तिच्या मुलीला जन्म दिला. आता फातिमा आणि तिची बहीण तिच्या पाकिस्तानमधल्या घरी जायला तयार झाली असली तरी तिच्या मुलीला पाकिस्तानमध्ये जाऊ देण्यात अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याच कारण म्हणजे फातिमाची मुलगी भारतीय नागरिक ठरली आहे. तिला आता भारतीय पासपोर्ट घेत पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. आणि त्यानंतर तिला कुठे पाकिस्तानमध्ये राहायची परवानगी मिळेल.

नागरिकत्वाच्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या देशात झाला असेल त्या देशाचं नागरिकत्व त्या व्यक्तीला आपोआप मिळतं. फातिमाच्या मुलीचा जन्म भारतातल्या तुरूंगात झाला असल्याने तिला भारतीय म्हणून गणलं जाणार आहे. आणि आपल्या पोटच्या पोरीला आपल्यासोबत ठेवण्यासाठी फातिमाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर

केंद्रीय कॅबिनेटने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विकासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. रेल्वे सेवा सुधारणा आणि रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

आरडीए आता रेल्वेचे तिकीट दर आणि मालगाडीच्या भाडय़ावर अंतिम निर्णय घेईल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही स्वतंत्र समिती असेल. रेल्वेत ही समिती असावी, अशी शिफारस अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. 2001 मध्ये राकेश मोहन समिती आणि 2014मध्ये विवेक देवराय समितीनेही या समितीची शिफारस केली होती. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 2015-16च्या अर्थसंकल्पात या समितीचा उल्लेख केला होता. रेल्वे तिकीट दर, मालगाडीचे भांड आणि प्रवासी सुविधा याबाबतचा निर्णय आता केवळ रेल्वेमंत्रालयच घेणा नाही. आरडीएमध्ये अर्थमंत्रालय,निती आयोगासह विविध विभागाचे अधिकारी असतील, सर्वांच्याह सहमतीनंतर कोणत्याही निर्णयावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मिग-29 चे उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला ठरू शकते आयशा

वयाच्या 21 व्या वर्षी वाणिज्यिक वैमानिकाचा परवाना मिळविलेली आयशा अजीज लढाऊ विमान मिग-29 उडविण्याच्या तयारीत आहे. यासाठी ती रशियन संस्थेच्या संपर्कात आहे. जर तिला यात यश मिळाले तर ती लढाऊ विमानाचे सारथ्य करणारी देशाची पहिली आणि सर्वात तरुण महिला वैमानिक होण्याचा मान मिळवेल. आयशाला माध्यमिक शिक्षणादरम्यान विद्यार्थी वैमानिक परवाना मिळाला होता. आता माझे लक्ष्य लढाऊ विमान उडविण्याचे आहे. जर यावर निर्णय झाला तर रशियाच्या सोकुल हवाईतळावरून लवकरच उड्डाण भरेन असे तिने म्हटले. आयशा ही जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लाची रहिवासी असून सध्या एक इंजिन असणारे सेसना-152 आणि सेसना-172 विमानाचे सारथ्य ती करते.

काश्मीरसमवेत देशांच्या सर्व युवांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करा असा माझा संदेश आहे. जीवनात लक्ष्य निश्चित करा आणि ती मिळविण्यासाठी मेहनत करा असे तिने म्हटले आहे. मेहनत आणि निर्धारामुळे ती देशाच्या लाखो युवतींची आदर्श बनली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹26वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार

64व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बॅलिवूड सुपरस्टार अक्ष कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रूस्तम’चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आले आहे.

प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रूस्तम या चित्रपटात अक्षय कुमारनं नेव्ही ऑफिसर रूस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला एका पुरूषाने भुलवल्यानंतर ‘रूस्तम’ने त्याची केलेली हत्या आणि त्याची देशभक्ती या विषयावर चित्रपटाची कथा आधारित आहे. रूस्तमध्ये अक्षयसोबत एलियाना डिप्रुज, इशा गुप्त, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते. दरम्यान, अक्षय कुमारने या सन्मानाविषयी सर्वांचे आभार मानले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा

आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनसंबंधीच्या स्पर्धात्मक यादीमध्ये भारताचे मानांकन 12 ने सुधारले असून आता 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. हे मानांकन वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आशियामध्ये 12 स्थानाने कामगिरी सुधारणा भारत हा एकच देश आहे. मात्र जपान आणि चीनच्या तुलनेत ही कामगिरी अद्यापही कमीच असल्याचे दिसून येते. या यादीमध्ये जपान आणि चीन अनुक्रमे चौथ्या आणि 13 व्या स्थानी आहे. युरोपातील स्पेन हा देश प्रथम स्थानी विराजमान आहे.

भारतासारख्या आकाराने विशाल असणाऱया देशात अनेक सांस्कृतिक वारसाकेंद्रे आहेत. त्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशही झालेला आहे. ई-व्हिसा आणि ऑन अराव्हयल व्हिसा देण्यात आल्याने भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले पर्यटन केंद्र अधिक खुले करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात आला. पर्यटन आणि प्रवास क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याने भारताने चांगली मजल मारली असल्याचे म्हणण्यात आले.

गेल्या 15 वर्षात भारता येणाऱया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. 2015 मध्ये 80 लाख पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गित स्त्राsतांनी समृद्ध असल्याने पर्यटक भारताला भेट देणे अधिक पसंत करतात. पर्यटनास चालना देण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येत आहेत. मात्र सुरक्षेसंदर्भात अजूनही समाधानकारक प्रगती झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी हे देश यादीमध्ये पहिल्या तीन स्थानी आहेत. पहिल्या 15 देशांमध्ये 12 देश हे उभरत्या अर्थव्यवस्थेचे आहेत. जपान, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, स्वित्झर्लंड हे पहिल्या 10 देशांमध्ये आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फिफा मानांकन यादीत भारताला 101 वे स्थान

भारतीय फुटबॉल संघाने तब्बल दोन दशकानंतर पुन्हा एकदा 101 व्या स्थानी गुरुवारी झेप घेतली. नव्याने जाहीर मानांकन यादीत गत आठवडय़ाच्या तुलनेत भारताचे मानांकन 31 अंकांनी सुधारले आहे. याशिवाय, आशिया मानांकन यादीत देखील भारत 11 व्या स्थानी पोहोचला आहे.

फिफा मानांकन यादीत भारताने प्राप्त केलेले आजवरचे सर्वोच्च मानांकन 94 इतके राहिले आहे. फेब्रुवारी 1996 मध्ये त्यांनी या मानांकनापर्यंत मजल मारली होती. त्य़ानंतर भारतीय संघ ऑक्टोबर 1993 मध्ये 99 व्या स्थानी तसेच ऑक्टोबर 1999, डिसेंबर 1993 व एप्रिल 1996 मध्ये 100 व्या स्थानी विराजमान होता.

मागील दोन-एक वर्षाच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने उत्तम यश प्राप्त केले असून त्यांनी तब्बल 13 पैकी 11 सामने जिंकले आहेत. यामध्ये भूतानविरुद्ध खेळवल्या गेलेल्या अनधिकृत लढतीचाही समावेश आहे. भारताने या सर्व लढतीत एकंदरीत 31 गोल नोंदवले. अलीकडेच संघाने एएफसी आशियाई चषक पात्रता लढतीत म्यानमारचा 1-0 फरकाने पराभव केला. 64 वर्षांच्या कालावधीत भारताने म्यानमारविरुद्ध विजय संपादन करण्याचा हा एकमेव प्रसंग ठरला. यापूर्वी, मैत्रीपूर्ण लढतीत कंबोडियाविरुद्ध मिळवलेला 3-2 फरकाचा विजय देखील लक्षवेधी ठरला. गतवर्षी भारताने प्युएर्तो रिकोचा तब्बल 4-1 असा जोरदार धुव्वा उडवला होता, तो ही ऐतिहासिक विजय ठरला.

दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी या पराक्रमाबद्दल संघाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ‘आतापर्यंतचा संघाचा प्रवास खूपच खडतर होता आणि एकंदरीत वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल पटेल व सचिव कुशल दास यांनी मला माझ्या प्रशिक्षणात स्वातंत्र्य दिले. म्हणूनच या बाबी साध्य करणे शक्य झाले. सहायक पथकातील सहकाऱयांच्या योगदानाचाही येथे मी आवर्जून उल्लेख करेन’, असे स्टीफन याप्रसंगी म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्स्टेन्टाइन प्रशिक्षकपदी रुजू झाले, त्यावेळी भारतीय संघ तब्बल 171 व्या स्थानी फेकला गेला होता. पुढे नेपाळविरुद्ध भारताने 2-0 असा विजय मिळवला व त्यानंतर काही अपवाद वगळता संघाने सातत्याने यश प्राप्त केले आहे.

आता दि. 7 जून रोजी भारत मायदेशात लेबनॉनविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैत्रीपूर्ण लढत खेळणार असून त्यानंतर दि. 13 जून रोजी एएफसी आशियाई पात्रता सामन्यात किर्गीज प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला करणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पोलाद निर्यात वाढली

 भारतीय पोलाद उद्योग आता सावरला असून पोलादाच्या निर्यातीत वाढ होऊन ती यंदा ५७ टक्के झाली आहे. त्याचवेळी परदेशी पोलादावरील अवलंबित्व कमी होत असून यंदा आयात ३४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. पोलादाचे देशातील उत्पादन १२० दशलक्ष टन झाले असून २०३०पर्यंत हे उत्पादन ३०० दशलक्ष टनांवर नेण्याचा संकल्प सरकारने सोडला असल्याचे केंद्रीय पोलादमंत्री चौधरी वीरेंद्र सिंग यांनी सांगितले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उज्ज्वला’चे लाभार्थी २ कोटींवर

दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना घरगुती गॅस मोफत उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींच्या घरात गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘एक वर्षापेक्षा कमी कालावधीत लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींच्या घरात गेली आहे. ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. गरीब महिलांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना क्रांतिकारक ठरली आहे,’ असेही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्यावर्षी १ मे रोजी उत्तर प्रदेशातील बलियामध्ये योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. लाकूड आणि कोळशाच्या माध्यमातून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना सुरक्षित पर्याय देण्यासाठी उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत जगात स्मोकिंगमध्ये चौथा


'सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे तुम्हाला कँन्सर होऊ शकतो,' असा वैधानिक इशारा सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेला असला तरी सिगारेट ओढणाऱ्यांवर मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक स्मोकिंग करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे कोणत्याही वैधानिक इशाऱ्याचा स्मोकर्सवर काहीही परिणाम झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

'द लॅनसेट' या वैद्यकीय मासिकात हे सर्वेक्षण छापून आलं आहे. २०१५ मध्ये जगात जेवढे मृत्यू झाले आहेत त्यापैकी प्रत्येक १० मृत्यूमागे एका मृत्यूचं कारण स्मोकिंग हे आहे. त्यातही ५० टक्के मृत्यू जगातील ज्या चार देशात झालेत, त्यात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये जगात ६४ लाख लोकांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. त्यात ११ टक्के लोकांचा मृत्यू धुम्रपानामुळे झाल्याचं आढळून आलं आहे. या ११ टक्के मृत्यूमध्ये ५२ टक्के लोकांचा मृत्यू चीन, भारत, अमेरिका आणि रशियात झाला आहे.

चीन, भारत आणि इंडोनेशिया या तीन देशातील पुरूष सर्वाधिक स्मोकिंग करत असल्याचं आढळून आलं आहे. २०१५ मध्ये जगात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये सुमारे ५१.४ टक्के लोक या तीन देशातील आहेत. जगातील धुम्रपान करणाऱ्यांमध्ये एकूण ११.२ टक्के लोक भारतात राहतात. या सर्वेक्षणानुसार २००५ च्या तुलनेत २०१५ मध्ये धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूत ४.७ टक्के वाढ झाली आहे. तर भारत, चीन आणि अमेरिकामध्ये जगातील धुम्रपान करणाऱ्या महिलांपैकी २७.३ टक्के महिला राहत असल्याचंही आढळून आलं आहे. एकूण १९५ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अखेर राज्यसभेत जीएसटी विधेयक मंजूर


जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विधेयकाशी संबंधित चार विधेयके कोणत्याही दुरुस्तीविना आज राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या विधेयकाला ऐतिहासिक विधेयक संबोधले होते. हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानेच कोणत्याही दुरुस्तीविना हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता देशभरात १ जूलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सेंट्रल जीएसटी, इंटीग्रेटेड जीएसटी, युनियन जीएसटी आणि नुकसान भरपाई कायदा विधेयक ही चार विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेसने जीएसटी कौन्सिलने केलेल्या शिफारशींना संसदेने अनिवार्य करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जीएसटी कॉन्सिलचे अध्यक्ष अरूण जेटली आणि राज्यांचे अर्थमंत्रीही उपस्थित होते. तृणमुल काँग्रेसचा अपवाद वगळता कोणीही या विधेयकांमध्ये दुरुस्ती सुचवली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या विधेयकाची स्तुती केली होती. या विधेयकावर कोणतीही दुरुस्ती सुचवू नका. सहमतीने विधेयक मंजूर होऊ द्या, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे काँग्रेसने विधेयकाला खोडा घातला नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर झालं. काँग्रेसनेही या विधेयकात कोणतीही दुरुस्ती सुचवली नाही. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही विरोधाविना राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकायच्या मंजूरीचे श्रेय सर्वांना जाते. ते कोण्या एका व्यक्ती किंवा सरकारचे श्रेय नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले. लोकसभेत गेल्या महिन्यातच या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात बैलगाडा शर्यतींचा थरार पुन्हा रंगणार

बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याची तरतूद असलेले सुधारणा विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यामुळे शंकरपटांचा थरार अनुभवण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मात्र, सरकारची भूमिका न्यायालयाने मान्य केल्यानंतरच या शर्यती होतील.
बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून, शर्यतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांचा छळ करणाऱ्यास पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यत, छकडी, शंकरपट अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धा भरविण्याची परवानगी मिळणार आहे. सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रथा चालू ठेवण्यासाठी ही परवानगी असेल. गाडीवानासह किंवा गाडीवानाव्यतिरिक्तही स्पर्धेला परवानगी मिळू शकेल. वळू किंवा बैलांचा सहभाग असलेल्या शर्यती भरविता येतील. कर्नाटक व तमिळनाडू राज्याने केलेल्या कायद्यातील त्रुटींचा अभ्यास आपल्या समितीने केला असून, सर्वोच्च न्यायालयात राज्याची योग्य ती बाजू मांडण्यात येईल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधेयक मांडताना व्यक्त केला.

>जलिकट्टूच्या धरतीवर उठवली बंदी

या शर्यतीत प्राण्यांवर अत्याचार होतो, या मुद्द्यावर प्राणिमित्र संघटना न्यायालयात गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने यामुळे बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. तमिळनाडूतील जलिकट्टूवरही बंदी आली होती. मात्र स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यानंतर तमिळनाडू सरकारने कायद्यात सुधारणा करून बंदी उठविली होती. महाराष्ट्रातही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे आपल्याकडेही कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार सुधारणा विधेयक विधिमंडळात
मंजूर करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹64 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

या चित्रपटांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार

- सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव (सुवर्णकमळ)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)

- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )

- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा

- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक

- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस - शिवाय

- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग - व्हेंटिलेटर

- साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर

- सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर

- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल

- फिल्म फ्रेंडली राज्य - उत्तरप्रदेश

जॉईन करा @ChaluGhadamodi

🔹भारत,चीन, पाकिस्तानचे 'ऑपरेशन सी'

भारत,चीन आणि पाकिस्तान दरम्यान विस्तवही जात नाही. हे तिन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. पण जेंव्हा या तिन्ही देशांवर हल्ला होत असेल तर ते एकत्र येऊन शत्रूंचा बंदोबस्तही करू शकतात, याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे. एडनच्या समुद्रात सोमालियन चाचांनी एका मालवाहू जहाजावर हल्ला केला असता भारत, चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांने संयुक्त कारवाई करत सोमालियन चाचांवर हल्ला करून त्यांना सळो की पळो करून सोडले.

शनिवारी रात्री ही घटना घडली. मलेशियातील केलांगमधून निघालेल्या ओएस ३५ या मालवाहू जहाजावर सोमालियन चाचांनी हल्ला केला. काही तरी गडबड झाल्याचा धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नाविक दलानं शनिवारी रात्री हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रात्रीच्या अंधारात मालवाहू जहाजाच्या आसपासची परिस्थिती जाणून घेतली. भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश जहाजे ज्या भागात हल्ला झाला, त्या ठिकाणी पोहोचली. भारतीय नौदलाची जहाजे हल्ला झालेल्या ठिकाणी पोहोचताच चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाची जहाजेदेखील संबंधित ठिकाणी आली. चीनने ओएस-३५ या १७८ मीटर जहाजाच्या मदतीसाठी १८ जणांचे पथक पाठवले. तर भारतीय नौदलाने या जहाजासाठी कम्युनिकेशन लिंक उपलब्ध करुन दिली. यासोबतच या संपूर्ण मोहिमेला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई मदत देण्याची कामगिरीदेखील भारतीय नौदलाने पार पाडली.

त्याचबरोबर चीनच्या नौदलाच्या युलीन जहाजावरुन क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यामुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका होण्यास मदत झाली. ‘भारतासह पाकिस्तान आणि चीनच्या नौदलांच्या मदतीमुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका करण्यात यश आले,’ अशी माहिती भारतीय नौदलाचे प्रवक्ते डी. के. शर्मा यांनी सांगितले. पहाटे जहाजाची पाहणी केली असता त्यात सोमालियन चाचे रातोरात पळून गेल्याचं आढळून आलं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मलाला बनली जगातील सर्वात तरुण शांतीदूत

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिला जगातील सर्वात तरूण शांतीदूत बनण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी या सन्मानासाठी मलालाच्या नावाची घोषणा केली. लहान मुलींमध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे काम मलालाच्या हातून अधिक जोमाने वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे गुटेरेस यांनी जाहीर केले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पुढच्याच आठवड्यात मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जगातील एखाद्या नागरिकाला संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

दहशतवादी कारवायांचा धोका पत्करून मलालाने महिलांच्या, मुलींच्या आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी आपले प्रयत्न मोठ्या धैर्याने सुरूच ठेवले अशा शब्दात गौरव करत गुरेटस यांनी या सर्वोच्च पुरस्कारासाठी मलालाचे नाव घोषित केले.

मुलींच्या शिक्षणासाठी मलाला करत असलेल्या निडर कार्यामुळे जगातील अनेक लोक प्रेरित झाले आहेत. आता संयुक्त राष्ट्राची सर्वात तरुण शांतीदूत म्हणून मलाला अधिक चांगले काम करून शकेल असेही गुरेटस म्हणाले.

पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाचा मोठा विरोध तालिबानच्या दहशतवाद्यांनी केला होता. परंतु मलालाने सर्व प्रकारचे धोके पत्करून आपले शैक्षणिक कार्य नेटाने पुढे रेटले. यामुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये मलालाला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या हल्ल्यातून ती बचावली. तिच्या कार्याची दखल घेत मलालाला शांततेचा २०१४ सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती.

जगभरात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मलालाने 'मलाला फंड' या ट्रस्टची स्थापना केली आहे. तिच्या निडर आणि महत्त्वाच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्राने मलालाला 'शांतीदूत' हा पुरस्कार घोषित केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चार मुख्य हायकोर्टांची सूत्र महिलांच्या हाती

न्यायालयीन सेवांमध्ये उच्च पदांवरील पुरुषांना मागे टाकत पहिल्यांदाच देशातील सर्वात जुन्या चार प्रमुख हायकोर्टांची सूत्र महिलांच्या हाती आली आहेत. मुंबई, मद्रास, कोलकाता आणि दिल्ली या हायकोर्टाच्या न्यायमूर्ती महिला आहेत. मद्रास हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून इंदिरा बॅनर्जी यांची नियुक्ती झाल्याने हा इतिहास रचला गेला.

मद्रास हायकोर्टात न्यायमूर्तींसह एकूण सहा महिला न्यायाधीश आणि ५३ पुरूष न्यायाधीश आहेत. मुंबई हायकोर्टात देशातील इतर कोर्टांच्या तुलनेत सर्वाधिक महिला आहेत. इथं ६१ पुरुष न्यायाधीश आणि ११ महिला न्यायाधीश आहेत. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर व्ही.एम. ताहिलरामानी या न्यायाधीश आहेत.

दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून २०१४ पासून जी. रोहिणी या काम पाहात आहेत. दिल्ली कोर्टात महिला न्यायाधीश ९ तर पुरुषांची संख्या ३५ इतकी आहे. इथंही दुसऱ्या क्रमांकावर गीता मित्तल या महिला न्यायाधीश आहेत. कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून १ डिसेंबर २०१६ पासून निशिता निर्मल या काम पाहात आहेत. पण इथं महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. इथं ३५ पुरुष आणि फक्त ४ महिला न्यायाधीश आहेत. असंच काहीचं चित्र सुप्रीम कोर्टात आहेत. २८ न्यायाधीशांच्या कोर्टात आर. भानुमती या फक्त एकच महिला न्यायमूर्ती आहेत.

🔹मध्यप्रदेश सरकारची दीनदयाल अंत्योदय रसोई योजना

मध्यप्रदेश सरकारने दीनदयाल अंत्योदय रसोई योजनेचा शुभारंभ केला आहे. ही राज्यातील गरीबांसाठी लोकप्रिय अनुदानित भोजन प्रदान करण्याची योजना आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यभरातील 49 जिल्हा मुख्यालयी ठिकाणी या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला आहे. मध्यप्रदेश ही योजना सुरू करणारे तिसरे राज्य ठरले आहे.

योजनेनुसार, दरिद्री, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना रुपये 5 या अनुदानित दराने पौष्टिक आहार प्रदान करणार. योजना राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अन्न केंद्रे (कॅंटीन) उघडण्यात येतील. या केंद्रात प्रत्येक दिवशी कमीतकमी 2000 व्यक्तींची व्यवस्था असणार आहे. यासाठी लागणारा निधि मुख्यमंत्री शहरी पायाभूत सुविधा योजनेंतर्गत उपलब्ध करून दिला जाईल. तामिळनाडूने प्रथम अम्मा कॅंटीनच्या नावाखाली अशी योजना सुरू केली आणि त्यानंतर राजस्थानमध्ये अशी योजना सुरू करण्यात आली.

🔹थायलंड इंटरनॅशनल स्पर्धेत बॉक्सर श्याम कुमारने सुवर्णपदक पटकावले

बँगकॉक मध्ये खेळल्या गेलेल्या थायलंड इंटरनॅशनल 2017 स्पर्धेत भारतीय बॉक्सर के. श्याम कुमार (49 किलो गटात) सुवर्णपदक पटकावले आहे. श्यामकुमारने उझबेकिस्तानच्या हसनबॉय दस्मातोव्ह याचा अंतिम सामन्यात पराभव केला. याशिवाय, रोहित तोकस (64 किलो गटात) ने कांस्यपदक पटकावले आहे. अश्याप्रकारे भारताने या स्पर्धेत दोन पदके मिळवलेली आहेत.

🔹प्रवास आणि पर्यटन स्पर्धा त्मक निर्देशांक ( TTCI) 2017 जाहीर

5 एप्रिल 2017 रोजी जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) ने जाहीर केलेल्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक 2017 (Travel and Tourism Competitive Index -TTCI) मध्ये भारत 40 व्या स्थानावर आहे. मागील क्रमवारीत भारताचा 52 वा क्रमांक होता.

WEF ने ब्लूम कंसल्टींग, डेलॉईट, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (IATA), आंतरराष्ट्रीय प्रकृती संवर्धन संघटना (IUCN), UNWTO आणि जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषद (WTTC) या त्याच्या माहिती भागीदारांच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला आहे.

▪️TTCI मध्ये भारत

भारत त्याच्या अफाट सांस्कृतिक संसाधने आणि नैसर्गिक संसाधने या श्रेणीत अनुक्रमे 9 वे आणि 24 वे स्थान मिळाले आहे. किंमती स्पर्धात्मकता फायदे या श्रेणीत 10 वे स्थान मिळाले आहे. भारताच्या मजबूत व्हिसा धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय मोकळेपणा या श्रेणीत भारत 55 क्रमांकावर आले आहे.

देशातील जमिनीवर वाहतूकीच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणेने टुर अँड ट्रॅवल्स क्षेत्राला फायदा झाला आहे, यामध्ये भारत 29 व्या स्थानी आहे.

▪️TTCI 2017 ची ठळक मुद्दे

सर्व क्षेत्रांमध्ये आशिया हे सर्वात पर्यटन-अनुकूल क्षेत्र ठरले आहे. आशिया खंडात भारत (40 व्या स्थानी), जपान (14) आणि चीन (15) या देशांनी त्यांचे स्थान उंचावले आहे.

क्रमवारीमध्ये स्पेन, फ्रान्स व जर्मनी हे प्रथम तीन स्थान मिळवणारे देश आहेत. नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधने, पायाभूत सुविधा आणि आदरातिथ्य सेवा या घटकांमुळे या देशांना हे स्थान मिळाले आहे.

बुरुंडी (134),
चड (135) आणि
येमेन (136) हे क्रमवारीत शेवटच्या स्थानी आहेत.

या अहवालात 15 घटकांचा अभ्यास करून 136 देशांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे. व्यवसाय पर्यावरण, सुरक्षा आणि सुरक्षितता, आरोग्य आणि स्वच्छता, कामगार दलाची पात्रता, कामगार बाजारपेठ, ICT तयारी, प्रवास आणि पर्यटन याची प्राथमिकता, आंतरराष्ट्रीय मोकळेपणा, किंमती स्पर्धात्मकता, पर्यावरण शाश्वतीकरण, हवाई वाहतूक पायाभूत सुविधा, जमिनी व बंदरे पायाभूत सुविधा, पर्यटक सेवा पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधने, सांस्कृतिक संसाधने व व्यवसाय प्रवास या घटकांचा समावेश आहे.

जागतिक प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचा जागतिक GDP च्या 10% वाटा आहे. हे क्षेत्र इतर क्षेत्रांमध्ये जास्त वेगाने वृद्धिंगत होत असून त्यामधून प्रत्येक 10 रोजगारामध्ये एक रोजगार हे क्षेत्र प्रदान करते.

यादीतील शीर्ष 10 मध्ये स्पेन, फ्रान्स व जर्मनी यांच्यानंतर जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे.

जागतिक आर्थिक मंच व TTCI बद्दल
जागतिक आर्थिक मंच (WEF) हे गेल्या 11 वर्षापासून जगभरातील 136 अर्थव्यवस्थांच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकतेचे सखोल विश्लेषण करून प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतलेले नेते आहेत.

प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक (TTCI) हे प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील शाश्वत विकासास सक्षम करणार्या घटकांच्या आणि धोरणांच्या संचाचे मोजमाप करते, जे देशाच्या विकासात आणि स्पर्धात्मकतेमध्ये योगदान देते. या निर्देशांकामुळे देशातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी एकत्रपणे कार्य करण्यासाठी सर्व भागधारकांना सक्षम करते. 2007 साली प्रथम TTCI जाहीर करण्यात आला होता.

🔹मुक्ता तोमर यांची जर्मनीमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती

जर्मनीमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून मुक्ता दत्ता तोमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तोमर या 1984 सालच्या भारतीय विदेशी सेवा अधिकारी आहेत. त्या सध्या परराष्ट्र मंत्रालयात (MEA) अतिरिक्त सचिव म्हणून कार्य करीत आहेत. ही नियुक्ती गुरजीत सिंग यांच्या जागी झाली आहे, जे मार्च 2017 पर्यंत या पदावर होते.

🔹कॅनडाने 1984 शीख विरोधी दंगलीला “नरसंहार” म्हणून वर्णन करणारा एक कायदा मंजूर केला

1984 शीख विरोधी दंगलीला “नरसंहार” म्हणून वर्णन करणारा कॅनडामधील पहिला कायदा कॅनडाच्या ऑन्टारियो विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

1984 शीख विरोधी दंगल ही 1-4 नोव्हेंबर या काळात उसळली होती. यामध्ये सरकारी अंदाजानुसार, जवळपास 2800 लोकांचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर 8000 पर्यंत मृत्यू झाल्याचे निर्देशनास आले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाने केल्यानंतर हे आंदोलन पेटले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उमा भारती यांनी PMKSY प्रकल्पाच्या देखरेखीसाठी MIS चा शुभारंभ केला

केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी नई दिल्लीत प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजनेच्या (PMKSY) देखरेखीसाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) चा शुभारंभ केला आहे. MI'S अंतर्गत योजनेच्या प्रकल्पाची भौतिक आणि वित्तीय प्रगती यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी प्रकल्पानुसार नोडल अधिकारी नामनिर्देशित केले गेले आहे. MIS ला सार्वजनिक यंत्रणेत सामील करण्यात आले आहे. MIS मध्ये प्रकल्पानुसार/ प्राथमिकतेनुसार/ राज्यनिहाय भौतिक/वित्तीय तपशील उपलब्ध आहे. येथे 3 महिन्यांची माहिती तुलनात्मक रीतीने उपलब्ध होते आणि शिवाय प्रकल्पा संबंधित अडचणीबाबत विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

🔹सौर पारेषण प्रणालीसाठी भारत, ADB
यांच्यात US$ 175 दशलक्षचा कर्ज करार

भारत आणि एशियन डेवलपमेंट बँक (ADB) यांच्यात नवीन मोठ्या सौर पार्कपासून निर्मित वीज आंतरराज्य ग्रीडकडे वळवण्यासाठी आणि राष्ट्रीय ग्रीड यंत्रणेची विश्वासर्हता सुधारीत करण्यासाठी उच्च व्होल्टेज पारेषण प्रणालीचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी US$ 175 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे.

हे कर्ज पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) ला दिले जाईल आणि यामध्ये भारतात विविध ठिकाणी असलेले उप-प्रकल्पांचा समावेश असणार आहे. कर्जाचा परिपक्वता कालावधी हा 20 वर्षाचा असेल. भादला, राजस्थान मध्ये 2,500 MW क्षमतेचा सौर प्रकल्प आणि बनासकांठ, गुजरात मध्ये 700 MW क्षमतेचा सौर प्रकल्प या उप-प्रकल्पांचा समावेश आहे. यांच्या उभारणीने POWERGRID ची एकूण क्षमता 4.2 GW इतकी होणार आणि दरवर्षी 7 दशलक्ष टन इतके कार्बन उत्सर्जन कमी होईल. राज कुमार (संयुक्त सचिव, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत) आणि केनिची योकोयामा (ADB चे देश संचालक) यांनी करारावर सह्या केल्या आहेत.

🔹भारताचे बांगलादेशसोबत २२ करार


भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश आर्थिक आणि सुरक्षा भागीदारी करत दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येत असल्याचे आवाहन आज संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आजपासून चार दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत संयुक्त वक्तव्य करताना दहशतवादाविरोधात असहिष्णू धोरण आपणा सर्वांसाठीच आदर्श ठरेल, असे मोदी म्हणाले. यावेळी दोन्ही देशांमध्ये कोलकाता-ढाका बससेवे समवेत एकूण २२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी व्यावसायिक संबंधही दृढ होण्याच्या दृष्टीने मोदींनी बांगलादेशसाठी ४.५ अरब डॉलर(२९ हजार कोटी रु.) कर्जाची('लाइन ऑफ क्रेडिट')ही घोषणा केली. भारत आणि बांगलादेश सहकाराचा लाभ दोन्ही देशांच्या नागरिकांना मिळावा यासाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचेही मोदी म्हणाले. भारत बांगलादेशसोबत ऊर्जा, सायबर सुरक्षा, सिविल न्युक्लिअरसह अनेक क्षेत्रांमध्ये व्यावसायिक भागीदारी वाढवत असून भारतीय कंपन्या बांगलादेशमधील कंपन्यांसोबत मिळून तेल पुरवठ्याचे काम करत आहेत. त्यादृष्टीने भविष्यात अनेक करार केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुक्तिसंग्रामात शहीद होणाऱ्या भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यासाठी बांगलादेशाने घेतलेली भूमिका प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारी असल्याचेही मोदी म्हणाले. यावेळी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात झालेल्या आदरातिथ्याबद्दल नवी दिल्लीचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, 'भारत आणि बांगलादेश खास शेजारी आहेत. दोन्ही देश सीमासुरक्षेसाठीही बांधिल असून दोन्ही देशात शांतता कायम राहावी यासाठीही सहकाराचे पाऊल महत्त्वाचे आहे.' तिस्ता करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

▪️दोन्ही देशात झालेले करार पुढीलप्रमाणे आहेत -

भारत आणि बांग्लादेश सरकार यांच्यात संरक्षण सहकार्य चौकटसंदर्भात सामंजस्य करार

धोरणात्मक आणि कार्यान्वयन अभ्यासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार

राष्ट्रीय सुरक्षा, विकास आणि धोरणात्मक अभ्यास क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार

बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापर करण्यात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार

अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर करण्यामध्ये सहकार्यामध्ये करार

तांत्रिक माहितीची देवाण-घेवाण आणि आण्विक सुरक्षा आणि किरणोत्सर्जन संरक्षण च्या नियमनामधील सहकार्य करण्यासाठी करार

बांग्लादेशमध्ये अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात सहकार्य करण्यासाठी आंतर-संस्था करार

माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार

भारत आणि बांग्लादेश यांच्यादरम्यानच्या सीमेलगत हाट्स सीमा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

द्वैपक्षीय न्यायालयीन क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

भारतामध्ये बांग्लादेशी न्यायालयीन अधिकार्यांसाठी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सामंजस्य करार

सुचालनास मदत करण्यासाठी सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

संशोधन आणि विकास यासाठी भूविज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार

भारत व बांग्लादेश दरम्यान सागरीकिनारी आणि शिष्टाचार मार्गावर प्रवासी व क्रूझ सेवा यावर सामंजस्य करार आणि प्रोटोकॉलचा जाहीरनामा

भारत-बांग्लादेश शिष्टाचार मार्गावर ‘सीरजगंज ते दाइखोवा’ आणि ‘आशुगंज ते झाकीगंज’ यामध्ये सुयोग्य मार्गांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार

प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार

ऑडिओ-व्हिज्युअल सह-उत्पादन करार
USD500 दशलक्ष पर्यंत संरक्षण कर्जमर्यादा विस्तारीत करण्यासाठी सामंजस्य करार

मोटार वाहन प्रवासी वाहतूक (खुल्ना-कोलकाता मार्ग) च्या नियमनासाठी करार
भारत सरकारकडून बांग्लादेश सरकारला तिसरी कर्जमर्यादा विस्तारीत करण्यासाठी सामंजस्य करार

बांग्लादेशमध्ये 36 समुदायीक दवाखान्यांचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक करार

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव “नोमेदिक एलिफंट” ला सुरूवात

व्हॅरेंगेट (कोलासिब जिल्हा, मिजोरम) येथे भारतीय आणि मंगोलियन सैन्याच्या एका तुकडीने दोन आठवड्यांच्या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. या लष्करी सरावाचे नाव “नोमेदिक एलिफंट” असे आहे. ही या सरावाची 12 वी आवृत्ती आहे. हा सराव 5 एप्रिल 2017 ते 18 एप्रिल 2017 या काळात सुरू राहणार आहे. पर्यंत कडे वळले आहेत.

हा सराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखाली दहशतवाद विरोधी कारवाया आणि दहशतवादाचे प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित केला गेला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹19 एप्रिल रोजी पृथ्वीजवळून एक विशाल लघुग्रह जाणार: NASA

19 एप्रिल 2017 रोजी पृथ्वीपासून 1.8 दशलक्ष किलोमीटर दूरवरून पृथ्वीच्या उपग्रहांच्या तुलनेत प्रचंड आकारमान असलेला एक लघुग्रह जाणार आहे. हे अंतर पृथ्वी ते चंद्र या दरम्यान अंतराच्या चार पट आहे.

या लघुग्रहाला “2014 JO25” असे नाव दिले गेले आहे. NASA च्या NEOWISE मिशननुसार, या लघुग्रहाचे आकारमान अंदाजे 650 मीटर इतके आहे आणि त्याचा पृष्ठभाग चंद्राच्या तुलनेत दुप्पट आहे.

ही घटना महत्वाचे असल्याचे कारण म्हणजे, त्याच्या आकारमानाचे लघुग्रह प्रथमच पृथ्वीच्या जवळून पुढे जाणार आहे. याचा शोध मे 2014 मध्ये अमेरिकेतील एरिझोनातील कॅटालिना स्काय सर्व्हे येथील खगोलशास्त्रज्ञांनी लावला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹NITI आयोग जिल्हा रुग्णालयासाठीचा निर्देशांक जाहीर करणार

राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्थान (National Institution for Transforming India -NITI) आयोगाने सरकारी रुग्णालयांमध्ये स्पर्धा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आरोग्य निर्देशकांवर त्यांच्या कामगिरीवर आधारित जिल्हा रुग्णालयांसाठी क्रमवारी प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालय आणि NITI आयोग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. आयोगाचे वाइस-चेअरमन अरविंद पानगारीया यांनी “हेल्थ ऑफ अवर हॉस्पिटल्स” निर्देशांक जाहीर केला आहे. यामधून जिल्हा रुग्णालयांची कामगिरी तपासली जाईल. प्रथमच मूल्यांकन करण्यासाठी रुग्णांकडून अभिप्राय प्राप्त केले जाणार आहेत. दुय्यम आरोग्य सुविधा पुरविणारी देशभरात 700 जिल्हा रुग्णालये आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹10 एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिवस

10 एप्रिल 2017 रोजी जगभरात जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने नवी दिल्लीत AYUSH राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येस्सो नाईक यांनी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.


"वैज्ञानिक पुरावा आणि श्रीमंत वैद्यकीय अनुभव यांच्या माध्यमातून होमिओपॅथीत वर्धित गुणवत्तापूर्ण संशोधन" ही या परिषदेची संकल्पना आहे. सर्व भागधारकांना होमिओपॅथिक संशोधनाबाबत शिक्षण देणे आणि वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यक, परिचारिका आणि संशोधकांना गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

होमिओपॅथीचे जनक डॉ. क्रिस्टियन फ्रेडरीक सेमुएल हॅनिमॅन (एक जर्मन वैद्यक) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी त्यांचा हा 262 वा वाढदिवस आहे. होमिओपॅथी ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डी. जी. तेंडुलकर लिखित “गांधी इन
चंपारण्य” पुस्तक

दीनानाथ गोपाल तेंडुलकर यांच्या “गांधी इन चंपारण्य” शीर्षक असलेल्या पुस्तकाचे अनावरण झाले आहे. भारताचे प्रकाशन विभाग हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

दक्षिण आफ्रिकामधून परतल्यानंतर 1917 साली भारतीय भूमीत गांधीजींच्या पहिल्या सत्याग्रहाचा संघर्ष या पुस्तकामध्ये वर्णन केलेला आहे. उत्तर बिहार मधील चंपारण जिल्ह्यातील शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला होता. लेखक डी. जी. तेंडुलकर (1909-1971) हे 1951 साली प्रकाशित झालेल्या आठ खंडात महात्मा गांधीजींचे व्यापक चरित्र वर्णन केलेल्या त्यांच्या “महात्मा” या पुस्तकांसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध लेखक आहेत. 1967 साली त्यांनी खान अब्दुल गफार खान यांचे जीवनचरित्र “फेथ इज ए बॅटल” लिहिले. 1957 साली स्थापन झालेल्या नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया चे नियुक्त सदस्य होते. ते चित्रपट निर्माता सुद्धा होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्तर प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी

उत्तर प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेश राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण देशाच्या सरासरापेक्षा जास्त आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या सरकारबरोबर बरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार मदतीचा हात पुढे करणार आहे, असे कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी म्हटले. देशाचे राष्ट्रीय बेरोजगारीचे प्रमाण 5.8 टक्क्यांवर आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 3.4 टक्के असून नागरी भागात 4.4 टक्के आहे. मात्र उत्तर प्रदेशाच्या बाबतीत ग्रामीण भागात 5.8 टक्के आणि नागरी भागात 6.5 टक्के बरोजगारीचे प्रमाणात आहे. अन्य राज्यांपेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण देशात 470 रोजगार मेळा आयोजित करण्यात आले असून उत्तर प्रदेशात त्यांची संख्या 21 असल्याचे दत्तात्रेय यांनी लोकसभेत सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्लिपकार्टकडून ई-बे इंडियाचे अधिग्रहण

तीन कंपन्यांकडून 9,300 कोटी रुपयांचे उभारले भांडवल

ई-बे, टेन्सेट आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी साधारण 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये केली. याचवेळी फ्लिपकार्टने ई-बे या अमेरिकन कंपनीचा भारतातील व्यवसायाची खरेदी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीने फ्लिपकार्टचे बाजारमूल्य आता 76 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. स्नॅपडीलचे गुंतवणूकदार कंपनीची विक्री करण्याच्या तयारीत असताना फ्लिपकार्टला निधी मिळाला आहे.

लवकरच फ्लिपकार्टची स्थापना झाल्यापासून 10 वर्षे पूर्ण होणार आहे. आतापर्यंत कंपनीमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीत ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे समजते. मायक्रोसॉफ्ट आता फ्लिपकार्टबरोबर व्यूहरचनात्मक भागीदारीत जोडला गेला आहे. फ्लिपकार्टमध्ये इक्विटी हिस्सेदारीच्या बदल्यात ई-बे ने काही रक्कम रोख स्वरुपात दिली आहे आणि कंपनीने भारतातील आपला व्यवसाय फ्लिपकार्टकडे सोपविला आहे. ई बे डॉट इन फ्लिपकार्टचा एक हिस्सा राहत स्वतंत्र रुपात काम सुरू ठेवणार आहे.

टेन्सेट ही चिनी कंपनी असून तिच्याजवळ वीचॅट हे सोशल मॅसेजिंग ऍप आहे. याचप्रमाणे पेक्टो आणि आयबीबोमध्ये कंपनीने गुंतवणूक केली आहे. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी नवीन भांडवलाला ऐतिहासिक व्यवहार म्हटले आहे. सध्या फ्लिपकार्टजवळ मिंत्रा, जबॉन्ग, फोनपे आणि ईकार्ट यासारख्या कंपन्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच 5जी चाचणीस प्रारंभ

एअरटेल-बीएसएनएलबरोबर नोकियाचा करार

भारतात नुकतीच 4जी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रारंभ झाला. मात्र 5जी नेटवर्कच्या चाचणीसाठी नोकिया कंपनीने पुढाकार घेतला आहे. देशात 5जी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी नोकिया या फिनलंडच्या कंपनीने एअरटेल आणि बीएसएनएलबरोबर चर्चा करण्यास प्रारंभ केला आहे.

भारतात 5जी नेटवर्कची चाचणी करण्यासाठी बीएसएनएल या सरकारी आणि एअरटेल या देशातील सर्वात मोठय़ा दूरसंचार कंपनीबरोबर सामंजस्य भागीदारी करण्यात येणार आहे. बार्सेलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्सदरम्यान भारतात 5जी नेटवर्कची चाचणी करण्याचे संकेत नोकियाकडून देण्यात आले होते. तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या बाबतीत 5जी तंत्रज्ञानासाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारतात स्मार्ट सिटीचा वेगाने विकास होत आहे. 4जी तंत्रज्ञानाबरोबर 5जी आणि आयओटी ही भविष्यातील तंत्रज्ञान राहणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. 5जी तंत्रज्ञानासाठी सामंजस्य भागीदारी करण्यात आल्याने त्याचा स्मार्ट सिटीसाठी मोठय़ा प्रमाणात उपयोग होईल असे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

5जी तंत्रज्ञानास उपयुक्त असणाऱया 3 हजार मेगाहर्ट्ज क्षमतेच्या बॅन्डचा लवकरच लिलाव करण्यात येईल. देशात 5जी तंत्रज्ञानाच्या चाचणीस लवकरच प्रारंभ होईल, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील नागरिकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी 2019-2020 वर्ष उजाडेल असा अंदाज आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेगाने वाढतोय हिंदू धर्म

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सचा अहवाल : 5 वर्षांमध्ये भारतीयांची संख्या झाली दुप्पट

आपले उमदे कौशल्य आणि स्वस्त मनुष्यबळामुळे भारत जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. भारतीय प्रतिभांमुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारखे देश सर्वोच्च स्तरावर कायम राहण्याचे स्वप्न पाहतात. भारतीयांच्या प्रतिभेला या देशांमधील मागणी वाढत आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सचा (एबीएस) नवा अहवाल देखील या गोष्टीची पुष्टी देतो. मागील 5 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियात भारतीयांची संख्या दुप्पट झाली आहे. तेथे हिंदू धर्म सर्वाधिक वेगाने वाढणारा धर्म ठरला आहे.

▪️उपयुक्त ठरली धोरणे

दोन्ही देशांदरम्यान प्रवास
कार्यक्रमांमुळे जवळपास 40 हजार भारतीय 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियात गेले. तर 2014-15 दरम्यान अशांची संख्या केवळ 34874 एवढीच होती.
हिंदू धर्माने मागे टाकले

2011 च्या जनगणनेत हिंदू धर्म ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेगाने फैलावणारा धर्म आढळला होता. 2016 च्या जगणनेत 2.7 टक्के हिंदू लोकसंख्येचा अनुमान आहे. तर तेथे इस्लाम मानणाऱयांची संख्या 2.6 टक्के आहे.

▪️उच्चशिक्षणप्राप्त भारतीय

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सनुसार ऑस्ट्रेलियात येणाऱया भारतीयांमध्ये 54.6 टक्के भारतीय पदवीधर किंवा उच्चशिक्षण प्राप्त केलेले आहेत. हा आकडा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सरासरीच्या तीनपट अधिक आहे.

▪️भारतीयांचे पसंतीचे ठिकाण

ऑस्ट्रेलियाचे दक्षिणपूर्व राज्य व्हिक्टोरिया भारतीयांचे पसंतीचे ठिकाण आहे. तेथील स्थलांतरितांच्या संख्येत 2.1 टक्के वाढ झाली आहे. एबीएसनुसार भारतीयांची वाढती संख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल.

▪️स्थलांतरितामंध्ये आघाडीवर (2015-16)

देश संख्या (टक्केवारीत)
भारत……. 21.2
चीन……… 15.3
ब्रिटन 10.0

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लंडन न्यायालयात न्यायाधीशपदी अनुजा धीर

भारतीय वंशाची एक महिला लंडनच्या ओल्ड बॅले न्यायालयात गौरवर्णीय नसलेली पहिली न्यायाधीश बनली आहे. 49 वर्षीय अनुजा रवींद्र धीर यांनी लंडन न्यायालयातील सर्वात तरुण न्यायाधीश होण्याचाही मान मिळविला आहे. अनुजा या बालपणी डिस्लेक्सियाने पीडित होत्या. या आजाराने पीडित व्यक्तींना शिक्षण घेताना समस्या होत असते. भारतीय स्थलांतरितांच्या पोटी जन्मलेल्या अनुजा यांनी डुंडी विद्यापीठातून स्कॉटिश लॉचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी लंडनमधील ग्रे इन शिष्यवृत्ती मिळविली होती, ज्यानंतर त्यांना 1989 साली लंडन येथे बोलाविण्यात आले आणि तेथे त्यांनी 23 वर्षे वकिली क्यवसाय केला. मी डिस्लेक्सियाने पीडित होती, यामुळे मला शिक्षण घेताना अडचण व्हायची असे अनुजा यांनी म्हटले आहे. जेव्हा मी न्यायालयात जायचे तेव्हा लोक मला साक्षीदार किंवा आरोपी समजत. परंतु जेव्हा मी त्यानां वकील असल्याचे सांगायचे ते चकीत होत असेही त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत- ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली मोदींची स्तुती

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या भारत दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार झाले असून दहशतवाद, संघटीत गुन्हेगारी अशा विविध विषयांवरील करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. तर भारतात आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींची भरभरुन स्तुती केली आहे. मोदी भारताला विकासाच्या वाटेवर नेत असल्याचे टर्नबुल यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल हे सोमवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात आल्यावर टर्नबुल यांनी नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले. नरेंद्र मोदी हे भारताला विकासाच्या वाटेवर नेत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर असेल असे त्यांनी सांगितले. आम्ही भारतासोबत एकत्र काम करु इच्छितो. ऑस्ट्रेलियात सुमारे पाच लाख नागरिक भारतीय वंशाचे आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

माल्कम टर्नबुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. यामध्ये दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली. यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सायबर सुरक्षा आणि दहशतवादासारख्या प्रश्नांविरोधात जागतिक पातळीवर समान धोरण राबवण्याची गरज असल्याचे मोदी म्हणालेत. भारतीय विद्यार्थ्यांना चांगली संधी आणि सोयी सुविधा दिल्या जातील असे टर्नबुल यांनी सांगितले. दहशतवादविरोधी करार तसेच मानवी तस्करी, आर्थिक गैरव्यवहार आणि अन्य गुन्ह्यासंबंधीच्या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील अशी आशाही त्यांनी वर्तवली आहे.

सोमवारी टर्नबुल यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर टर्नबुल यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान टॉनी अॅबोट भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर मोदीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते.

साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी


        रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने नुकतीच ही क्रमवारी जाहीर केली आहे.

साक्षीने 58 किलो वजनी गटात खेळताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमधील तिची कामगिरी नेत्रदीपक होती. भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी ती पहिली महिला होती. या कामगिरीच्या जोरावरच साक्षीने क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. महिलांच्या क्रमवारीत जपानची काओपी इचो अव्वल स्थानावर आहे.

पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताच्या संदीप तोमरने अव्वल 10 कुस्तीपटूंमध्ये प्रवेश केला आहे. या गटामध्ये जॉर्जियाच्या व्लादिमीर के. याने अव्वल स्थान पटकावले आहे. साक्षी आणि संदीप हे दोघेही आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची तयारी करत आहेत. ही स्पर्धा 10-14 मे या कालावधीमध्ये होणार आहे.

नवी दिल्ली - सभा, समारंभ, महागडी हॉटेल, मोठेमोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासधूस ही भारतीयांसाठी नित्याची बाब असते. काहींना तर अन्न वाया जाणे म्हणजे मोठेपणा अथवा आर्थिक सुबत्तेचे लक्षण वाटते; मात्र आता केंद्र सरकार अन्नाची नासाडी थांबवणारा कायदा अस्तित्वात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशातील अन्नाची नासधूस थांबून तेच अन्न गरिबांच्या मुखात जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासधूस कमी व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली. हॉटेलमध्ये जेवण मागवण्यापूर्वी ते जेवण किती येते याची ग्राहकाला कल्पना असायला हवी. त्यानुसार ते मागणी करू शकतात. त्यामुळे ग्राहकाचे पैसे वाया जाणार नाही तसेच अन्नही वाया जाणार नाही, असे पासवान म्हणाले.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अत्यावश्‍यक पावले उचललली जाणार आहेत. नासाडीबाबतचा नियम केवळ ग्राहकांच्या हितासाठी असून, प्रत्येक हॉटेलमध्ये हाफ किंवा क्वार्टर प्लेट मागवता येईल याबद्दलही विचार सुरू आहे.

याआधी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या "मन की बात' या कार्यक्रमामधून सातत्याने वाया जाणाऱ्या अन्नाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानुसारच पासवान पावले उचलत आहेत, असे म्हटले जात आहे. हे नियंत्रण केवळ मोठ्या हॉटेलमध्येच असणार आहे. ज्या ठिकाणी मर्यादित थाळी अथवा बुफे पद्धतीने जेवण दिले जाते, तिथे हे नियंत्रण नसेल.

ज्या देशात लाखो लोक उपाशी राहतात, त्या देशात अन्नाची नासधूस करणे हे पाप आहे. ही अन्नाची नासधूस थांबावी, म्हणून हॉटेल व्यावसायिकांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अन्नाचे प्रमाण किती असावे, हे ठरवले जाईल.
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरणमंत्री

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते SCOPE पुरस्कार सादर

भारतीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत 11 एप्रिल 2017 रोजी 8 व्या सार्वजनिक क्षेत्र दिवसाच्या समारंभात केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांना (CPSEs) सार्वजनिक उपक्रमांची स्थायी परिषद (SCOPE) पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. SCOPE आणि सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.

▪️वर्ष 2014-15 साठी विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

SCOPE उत्कृष्टता पुरस्कार – (सर्वोत्कृष्ट योगदानासाठी)

वैयक्तिक नेतृत्व श्रेणी – डॉ. अनुप कुमार मित्तल, बी. अशोक, ए. के. जैन, के. एस. पोपली, पूजा कपूर

PSE मधील विशेष महिला व्यवस्थापक -4 पूजा कपूर

संस्थात्मक श्रेणी – REC, NALCO, MECL, ONGC विदेश मर्या., ECIL GSL

SCOPE गुणवंत पुरस्कार (CPSE ची कामगिरी) - HPCL, PFC, HAL, WAPCOS, NALCO, REIL, SAIL, REC, GAIL NTPC

10 एप्रिल 1973 रोजी SCOPE अस्तित्वात आले आणि त्याला औपचारिकपणे नोव्हेंबर 1976 मध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची एक शिखर संस्था म्हणून मान्यता देण्यात आली. सध्या सुमारे 18,55 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय असलेले 320 CPSE आहेत.

🔹स्वच्छता घटकावरील बंदरांच्या क्रमवारीतेमध्ये हल्दीया बंदर प्रथम

प्रथमच, जलवाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 12 प्रमुख बंदरांना स्वच्छतेच्या घटकावर क्रमवारीता प्रदान करण्यात आलेली आहे. या क्रमवारीत हल्दिया आणि विजाग बंदरांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळाले. हे मूल्यांकन 16-31 मार्च 2017 दरम्यान पाळलेल्या “ स्वच्छता पखवाडा ” कार्यक्रमात भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

🔹खगोलशास्त्रज्ञांना गुरूवर दुसरा 'ग्रेट स्पॉट' आढळला

गुरु ग्रहावर आणखी एक "ग्रेट स्पॉट (प्रचंड ठिपका)" आढळलेला आहे. हे ठिकाण अतिशय थंड आणि उभारलेले आढळून आले आहे. हा ठिपका 15,000 मैल (24,000 किलोमीटर) लांब आणि 7,500 मैल (12,000 किलोमीटर) रुंद आहे. हे ग्रहाच्या सर्वाधिक वरच्या वातावरण असून थंड आहे. त्यामुळे याला “ ग्रेट कोल्ड स्पॉट ” हे नाव देण्यात आले आहे.

याआधी गुरुवर “ग्रेट रेड स्पॉट” आढळले आहे. या ठिकाणी अगदी नव्या प्रकारची हवामान प्रणाली आढळते, जे सतत आकार आणि आकारमान बदलत असते. हे गुरुच्या ध्रुवीय औरोरस पासूनच्या ऊर्जेमुळे तयार झाले आहे. गुरुच्या वातावरणाचे तापमान आणि घनता मापन अभ्यासात, चिलीमधील दुर्बिणीच्या सहाय्याने इंग्लंडच्या लेंसेस्टर विद्यापीठाचे टॉम स्टेलार्ड यांच्या नेतृत्वातील चमूने हा शोध लावला आहे. हा शोध अमेरिकन जियोफिजिकल युनियनचे जर्नल जियोफिजिकल रिसर्च लेटर्स मध्ये प्रकाशित झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अश्विनी कुमार लिखित “होप इन ए चॅलेंज्ड डेमॉक्रसी; अॅन इंडियन नॅरेटीव्ह”

अश्विनी कुमार लिखित “होप इन ए चॅलेंज्ड डेमॉक्रसी; अॅन इंडियन नॅरेटीव्ह” पुस्तकाचे अनावरण झाले आहे. डॉ. अश्विनी कुमार हे एक नामवंत वकील, लेखक आणि ज्येष्ठ खासदार आहेत. ते सलग चौदा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते आणि एप्रिल 2016 मध्ये निवृत्त झालेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आणि जगातील आर्थिक मंच (WEF) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

🔹भारतीय सर्वेक्षणाच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त "नक्शे" संकेतस्थळाचे अनावरण

10 एप्रिल 2017 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते भारतीय सर्वेक्षण (Survey of India -SoI) च्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त "नक्शे" नावाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे.

संकेतस्थळावर, प्रदेश किंवा भौगोलिक स्थिती यांच्या समावेशासह नैसर्गिक आणि मानवनिर्मित भौगोलिक वैशिष्ट्ये असलेले भौगोलिक स्थितिचे नकाशे किंवा ओपन सिरीज मॅप्स (OSM) हे 1767 सालापासून SoI द्वारे तयार केलेली आहेत आणि ते राष्ट्रीय नकाशा धोरण-2005 अनुरुप आहेत. हे नकाशे अगदी मोफत उपलब्ध आहेत.

भारतीय सर्वेक्षण (SoI) याचे मूळ सन 1767 मध्ये आहे. हे भारतातील सर्वांत जुने वैज्ञानिक विभाग आणि जगातील सर्वात प्राचीन सर्वेक्षण आस्थापन आहे. देशाचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’ चा पाया रचला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोल्सन व्हाइटहेड यांच्या "अंडरग्राऊंड रेलरोड" पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार

"अंडरग्राऊंड रेलरोड" या पुस्तकाला ‘कल्पनारम्य (फिक्शन)’ श्रेणीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक कोल्सन व्हाइटहेड हे आहेत. हे पुस्तक डबलडे चे प्रकाशन आहे. पुलित्झर पुरस्काराचे हे 101 वे वर्ष आहे.

▪️"अक्षरे आणि नाटक" श्रेणीतील विजेते -
 हीशाम मातर (आत्मचरित्र); हेदर अॅन थॉम्पसन (इतिहास); मॅथ्यू डेस्मंड (सर्वसाधारण), त्येहिम्बा जेस (कविता), लिन नोटेज (नाट्य).

जोसेफ पुलित्झर हे त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार होते. त्यांच्या 1904 मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने 1917 साली पुलित्झर पुरस्काराची स्थापना करण्यात आली. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्ष 2016 मध्ये चीनमध्ये सर्वाधिक
फाशीच्या शिक्षा दिल्या गेल्या: अॅमनेस्टी इंटरनॅशनल

मानवाधिकार संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनल ने त्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. हा अहवाल जगभरात दिल्या जाणार्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आहे. वर्ष 2016 मध्ये जगभरातील प्रथम 23 देशांमध्ये किमान 1,032 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, मात्र यामध्ये चीनचा आकडा समाविष्ट नाही. कॉर्नेल लॉ स्कूल अंतर्गत “डेथ पेनॉल्टी वर्ल्डवाइड” चमूच्या अहवालानुसार, चीनमध्ये दरवर्षी हजारो लोकांना फाशीची शिक्षा सुनावली जाते.

सर्वाधिक फाशीची शिक्षा दिलेल्या देशांच्या यादीत क्रमाने चीन (87%), इराण, सौदी अरेबिया, इराक आणि पाकिस्तान हे अग्रेसर देश आहेत. अमेरिकेमध्ये 20 फाशीच्या शिक्षा देण्यात आल्या, जे की 1991 सालापासून देशातील सर्वात कमी आकडा आहे. वर्ष 2016 मध्ये किमान 18,848 लोकांना मृत्युदंड (सर्व प्रकारे) देण्यात आले.

बेलारूस, बोट्सवाना, नायजेरिया आणि पॅलेस्टाईन राज्यांनी वर्ष 2016 मध्ये फाशीची शिक्षा देण्यास पुन्हा सुरू केले. जगभरातील 141 देशांमधील कायद्यामध्ये फाशीची शिक्षा आहे. वर्ष 2016 मध्ये बेनिन आणि नौरू या देशांनी कोणत्याही गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा रद्द केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यसभेने संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2017 मंजूर केले

राज्यसभेच्या तोंडी मतांसह संसदेत संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2017 मंजूर करण्यात आले आहे. 23 मार्च 2017 रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर केले गेले होते.

विधेयकामधून, संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 मध्ये सुधारणा करून केंद्राच्या अनुसूचित जातीच्या यादीत ओडिशातील दोन जाती (सबाखिया जातीसाठी प्रतिशब्द म्हणून सुयलगिरी, स्वालगिरी) समाविष्ट केल्या जाईल आणि संविधान (पाँडिचेरी) अनुसूचित जाती आदेश, 1964 मधील पाँडिचेरी हा शब्द पुडुचेरी या शब्दाने पुनर्स्थित केल्या जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रथम पृथ्वी समान वातावरण असलेल्या ग्रहाचा शोध लागला

जर्मनीमधील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रॉनॉमी येथील खगोलशास्त्रज्ञांना प्रथमच पृथ्वी समान वातावरण असलेल्या एका ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह सौरमाला पलीकडे पृथ्वीपासून फक्त 39 प्रकाश वर्षे अंतरावर आहे.

ग्रहाला “GJ 1132b” हे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह पृथ्वीच्या 1.4 पटीने मोठा आहे. ग्रहाचे वस्तुमान आणि त्रिज्या हे पृथ्वीच्या (1.6 पृथ्वीचे वस्तुमान, 1.4 पृथ्वी त्रिज्या) जवळपास आहे. चिलीमधील युरोपियन साऊथर्न अब्जर्वेटरीच्या 2.2 मीटर ESO/MPG दुर्बिणीच्या सहाय्याने हा शोध लागला आहे. हा शोध अॅस्ट्रॉनॉमीकल जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 6 करार करण्यात आलेत

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल हे 9-12 एप्रिल 2017 या दरम्यान भारत भेटीवर आहेत. ही भेट दोन्ही देशातील संबंध विस्तारीत करण्याच्या उद्देशाने आहे. या भेटीदरम्यान 6 करार करण्यात आलेली आहेत. ते म्हणजे -

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि बहुराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात लढा देण्यास सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार

नागरी हवाई वाहतूक सुरक्षेमध्ये सहकार्याच्या जाहिरात व विकासासाठी सामंजस्य करार

पर्यावरण, हवामान आणि वन्यजीव क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार

क्रीडा क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार
आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार

पृथ्वी निरीक्षण आणि उपग्रह सुचालन यामध्ये सहकार्यावर ISRO आणि जियोसायन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात अंमलबजावणी व्यवस्था करार

▪️भेटीदरम्यान चर्चित मुद्दे

आर्थिकदृष्ट्या संपन्न भारत-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता आणि सुरक्षा आणण्यासाठी 1982 संयुक्त राष्ट्रसंघ सागरी कायदा परिषद (UNCLOS) वर आधारित कायदेशीर सागरी आदेशांचे महत्त्व ओळखून शांततेने सागरी वाद मिटविण्यासाठी समर्थन दिले गेले.

2014 साली मान्य केलेल्या सुरक्षा सहकार्यासाठी द्वैपक्षीय फ्रेमवर्क याच्या माध्यमातून भागीदारी विस्तारीत करण्यास मान्यता दर्शवली.

2015 साली बंगालच्या उपसागरात आयोजित प्रथम द्वैपक्षीय सागरी सराव (AUSINDEX) पुन्हा वर्ष 2018 च्या पहिल्या सहामाहीत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सागरी क्षेत्रात आयोजित करण्यास दोन्ही देशांनी मान्य केले.

वर्ष 2018 मध्ये प्रथम द्वैपक्षीय लष्कर-ते-लष्कर सराव आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

सहकार्य वाढवण्यासाठी वाढविण्यासाठी आणि दोन्ही देशाच्या सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायदा व संबंधित स्थानिक कायदे यांना सुसंगत मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याचे मान्य केले गेले.

2015 सालापासून भारतात अभ्यास आणि प्रशिक्षण घेण्यासाठी सुरू केलेल्या नवीन कोलंबो योजने अंतर्गत पदवीचे शिक्षण घेणासाठी ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून ती 1790 हून जास्त करण्यात आली आहे.

दोन्ही देशाने नवकल्पना व संशोधन कार्य चालवण्यासाठी स्थापन केलेल्या ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटजीकं रिसर्च फंड (AISRF) चा दहावा वर्धापनदिन साजरा केला. दोनही सरकारने यात US$ 100 दशलक्ष (500 कोटी रुपये) गुंतवण्याचे वचन दिले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंध्र प्रदेश मध्ये प्रथम राष्ट्रीय महिला संसदेला सुरुवात

Join us @ChaluGhadamodi

आंध्र प्रदेशामध्ये विजयवाडा जवळ, राजधानी शहर अमरावती प्रदेशातील ‘पवित्र संगमम’ येथे 10 फेब्रुवारी 2017 पासून तीन दिवसीय राष्ट्रीय महिलांच्या संसदेला (National Women’s Parliament -NWP) सुरुवात झालेली आहे. या सभेच्या सभापती आणि चेअरमन डॉ. कोडेला सिवप्रसादा राव या आहेत आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे मुख्य समर्थक आहेत.

सभा “ बिल्डिंग ओन आयडेनटिटी अँड व्हिजन ऑफ द फ्यूचर अँड विमेन इन पॉलिटिक्स: चेंज-मेकर इन ग्लोबल सीनेरीओ” या संकल्पनेखाली भरवण्यात आली आहे. भारतीय स्त्रियांमध्ये सामाजिक जबाबदारी जागृत करण्यासाठी आणि पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम MIT स्कूल ऑफ गवर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्र प्रदेश विधानसभेतर्फे आयोजित केले गेले आहे.
भारत आणि परदेशामधून 10,000 पेक्षा जास्त उच्च शिक्षण घेणार्या मुली, महिला आमदार, खासदार आणि महिला व्यावसायिक नेत्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. सभेच्या समारोपिय दिवशी स्वराज मैदान ते तुमलपल्ली वरी क्षेत्रया कलाक्षेत्रम पर्यंत एक दौड शर्यतीचे आयोजन करण्यात येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2017 BRICS परिषदेची संकल्पना चीनने प्रकाशित केली

चीनने यावर्षी सप्टेंबर मध्ये आयोजित 2017 BRICS परिषदेची संकल्पना आणि सहकार्य प्राधान्यक्रम अधिकृतरीत्या प्रकाशित केले आहे. ही परिषद पूर्व चीनच्या फुझिअन प्रांतातील क्षियामेन येथे आयोजित आहे.

परिषदेची संकल्पना "BRICS: स्ट्रॉंगर पार्टनरशिप फॉर ए ब्राइटर फ्यूचर”  ही आहे. शिवाय सहकार्यामध्ये प्राधान्य असलेल्या पाच मुख्य बाबी सहकार्य वाढवणे, जागतिक प्रशासन बळकट करणे, लोकांचे आदानप्रदान चालवणे, संस्थात्मक सुधारणा करणे व विस्तारीत भागीदारी तयार करणे या आहेत.

2009 साली BRIC (ब्राझिल, रशिया, भारत, चीन) परिषदेला येकाटेरिंबर्ग, रशिया येथे उद्घाटनासाठी परिषद भरवण्यात आली होती. 2010 साली दक्षिण आफ्रिका या गटात सामील झाले. आतापर्यंत एकूण आठ परिषदे घेतल्या गेल्या आहेत. 2016 साली परिषद गोवा, भारत येथे आयोजित केली गेली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विरार लोकलला १५० वर्षे पूर्ण!
मुंबई मिरर

मुंबई पश्चिम उपनगरीय रेल्वेला आज १५० वर्षे पूर्ण झाली. १८६७ मध्ये आजच्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता परतीचा प्रवस करायची.

महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसऱ्या श्रेणासाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण मध्ये स्थानके कमी होती. स्थानके अशी होती - नीअल (नालासोपारा), बसीन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड.

मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे, कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन - देशातली पहिली ट्रेन - धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे माजी मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव म्हणाले, 'या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे.' मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.

▪️काही ठळक घडामो़डी :-

१२ एप्रिल १८६७ : विरार स्थानकातून पहिली लोकल धावली

१८९२ पर्यंत बीबी अँड सीआय कंपनीने ४ विरार, १ बोरीवली आणि २७ वांद्रे लोकल अशा सेवा वाढवल्या

पहिली जलद लोकल बॅकबे ते वांद्रे या मार्गासाठी सुरू झाली. हे अंतर ती ५ मिनिटांत पार करत असे (आजच्यापेक्षा कमी वेळेत!)

१९०० : सेवा वाढल्या. आता विरार ५, बोरीवली ७, अंधेरी ३ आणि वांद्रे २७ फेऱ्या होत्या

१९२५ : वाफेवरच्या इंजिनाऐवजी इलेक्ट्रिफाइड इंजिनाचा वापर
सध्याच्या सेवा : दरदिवशी १,३२३ फेऱ्या, ३५ लाख प्रवासी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोंदियात पुन्हा ‘सी-६०’

छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या सिमेला लागून असलेला गोंदिया जिल्हा माओवादग्रस्त व संवेदनशील आहे. त्यातच नक्षल्यांनी या जिल्ह्याला आपला रेस्टझोन म्हणून निवडला असल्याने शेजारच्या राज्यात माओवादी कारवाया झाल्यानंतर ते या भागाकडेच येतात. हे हेरून माओवाद्यांच्या बिमोडासाठी जिल्ह्यात आणखी सी-६०चे सात पथक तयार करण्यात आले आहेत.

या पथकांचे प्रभारी पोलिस अधिकारीही नेमण्यात आले आहेत. या पथकांना माओवादाच्या बिमोडासाठीचे जेटीएस प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या सात पथकांमध्ये २२६ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यातील ७८ कर्मचाऱ्यांना जेटीएससी प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. तसेच १२२ कर्मचाऱ्यांना सशस्त्र दूरक्षेत्र येथे काम करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर यांनी ही पथके तयार केली आहेत.

देवरी व सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी सी-६० काटेगे पथक, रक्षा पथक, नेताम पथक, मल्लखांबे पथक यांचे मुख्यालय देवरी; तर सी-६० तुरकर पथक, बिसेन पथक व जनबंधू पथक यांचे मुख्यालय सालेकसा राहणार आहे. सी-६० सालेकसाच्या तुरकर पथकात ३२ कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे हे या पथकाचे प्रमुख आहेत. सी-६० देवरी नेताम पथकात ३२ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, सी-६० देवरी रक्षा पथकात ३४ कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार राहणार आहेत. सी-६० सालेकसा जनबंधू पथकात ३१ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून रोहीतदास पवार नेतृत्व करणार आहेत. सी-६० सालेकसा बिसेन पथकात ३१ कर्मचाऱ्यांची बदली असून प्रभारी अधिकारी म्हणून अतुल कदम, तर सी-६० देवरी काटेंगे पथकात ३३ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक विजय गोपाळ यांची निवड करण्यात आली आहे. सी-६० देवरी मल्लखांबे पथकात ३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक दिनेश शेलार यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मध्यप्रदेशात १ मेपासून प्लॅस्टिकबंदी

मध्य प्रदेश सरकारने एक मेपासून राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मध्य प्रदेशमध्ये एक मेपासून प्लॅस्टिक वा पॉलिथिनच्या पिशव्या वापरता येणार नाहीत.

जनसंपर्कमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही माहिती दिली. गायी व अन्य गुरे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या खातात. या पिशव्या खाल्ल्याने गायींचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत उघडकीस आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. या निर्णयामुळे गायींचा जीव वाचेल तसेच पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे ते म्हणाले. प्लॅस्टिक व पॉलिथिनच्या पिशव्यांवर बंदी येणार असली तरी प्लॅस्टिकच्या अन्य उत्पादनांना मात्र यातून वगळले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रायल दौऱ्याच्या आधी ८,००० क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. इस्राइल दौऱ्याआधीच दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांना बळकटी मिळण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्य वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. इस्रायलकडून भारत तब्बल ८,००० क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. आपल्या शस्त्रास्त्रांची सर्वात मोठी निर्यात इस्रायल भारतामध्येच करतो. त्यामुळे दोन्ही देशांच्या दृष्टीने हे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. भारत इस्रायलकडून अॅंटी टॅंक मिसाइल आणि बराक-८ एअर मिसाइल्स विकत घेणार आहे.

या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये एकूण २००० क्षेपणास्त्रे भारतात दाखल होणार आहेत. हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे. भारत एकूण २ अब्ज डॉलरची खरेदी करणार आहे. भारतीय सेनेला अत्याधुनिक करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. २०२५ पर्यंत २५० अब्ज डॉलरची संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार आहे. २०१४ ला पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून आपला पदभार सांभाळला आहे तेव्हापासून त्यांनी इस्रायलसोबत संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. आयातीबरोबरच भारतामध्ये देखील क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रे बनवण्याच्या कामावर भर दिला जात आहे. भेल, भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपन्या भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी डीआरडीओला सहकार्य करत आहेत. आतापर्यंत भारत आणि इस्रायलमध्ये साडे सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे व्यवहार झाले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील ५० हजार गावांमध्ये अजूनही नाही मोबाइल नेटवर्क

देशातील ५० हजार अशी गावे आहेत, जिथे अजूनही मोबाइल नेटवर्क नसल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तर काळात ही माहिती दिली. देशातील नक्षल प्रभावित राज्य, ईशान्य भारत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसहित अनेक क्षेत्र असे आहेत. जेथे अजूनही मोबाइल नेटवर्क पोहोचलेले नाही. सरकारकडून हे क्षेत्र मोबाइल नेटवर्कच्या कक्षेत आणण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देशातील मोबाइल नेटवर्कची माहिती दिली. देशभरात मोबाइल नेटवर्क पोहोचल्याचा आम्ही दावा केलेला नाही. देशातील सुमारे ५० हजार अशी गावे आहेत जिथे आतापर्यंत मोबाइल नेटवर्क पोहोचले जाऊ शकत नाही. दूरसंचार मंत्रालयाला सर्व राज्यातील अशा गावांची नावे द्यायला सांगण्यात आली आहेत जे अद्यापही मोबाइल सेवेपासून वंचित आहेत.

एका खासदाराने संसद परिसरात कॉल ड्रॉपच्या समस्येबाबत प्रश्न विचारला होता. संसदेच्या परिसरात असताना कॉल ड्रॉप होतो. पण लोकांना वाटतं आम्ही कॉल कट केलाय, अशी तक्रार संबंधित खासदाराने केली. यावर गुजरातच्या काही महिला सदस्यांनीही त्यांचे समर्थन केले. पण यावर सिन्हा यांनी कॉल ड्रॉपच्या समस्येत मोठी घट झाल्याचे सांगितले. तसेच येत्या काही दिवसांत स्थिती आणखी चांगली होईल, असे आश्वस्त ही केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातून विक्रमी हस्तमाग निर्यात

3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च

नवीन बाजारपेठांतून मागणी आणि चीनपेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या हस्तमाग वस्तू पुरविल्याने भारताची हस्तमाग निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात हस्तमाग निर्यात 24,530 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या लक्ष्यापेक्षा ही निर्यात 970 कोटी रुपयांनी जास्त आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन बाजारपेठ, दर्जा आणि कमी किमतीने भारतीय मालाने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर मागे टाकले आहे. निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करण्याबरोबरच दोन अंकी वाढ नोंदविण्यात आली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात हस्तमाग निर्यात 23,560 कोटी रुपयांची करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. भारताला आपले लक्ष्य गाठण्यास यश आले असून 24,530 कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली. 2015-16 या आर्थिक वर्षात 21,557 कोटी रुपयांच्या हस्तमागाची निर्यात करण्यात आली होती आणि त्यामध्ये 6.85 टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या आर्थिक वर्षात हस्तमाग निर्यातीमध्ये 13.79 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली.

भारतीय निर्यातदारांकडून चीनला मोठय़ा प्रमाणात आव्हान देण्यात येत आहे. चीनच्या तुलनेने भारतीय वस्तू अधिक स्वस्त आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय वस्तू सरासरी 2 डॉलर्सने विकल्या जातात. चिनी वस्तूंची किंमत 3 डॉलर्स आहे. भारतातील 90 टक्के उत्पादने ही हाताने तयार केलेली असतात, तर चीनच्या बाततीत हे प्रमाण 10 टक्के आहे. चीनच्या वस्तूंच्या तुलनेत भारतीय वस्तू अधिक चांगल्या दर्जाच्या आहेत, त्यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

अद्यापपर्यंत भारतीय निर्यातदार अमेरिका, युरोप आणि मध्य आशियात मालाची विक्री करत होते. गेल्या वर्षी चीनकडून मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेवर ताबा मिळविण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऊर्जा मित्र ॲप’चे उद्घाटन

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज ‘ऊर्जा मित्र ॲप’चे उद्घाटन केले. देशाला 24 तास दर्जेदार आणि अखंड वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माहितीचे अदान प्रदान केल्याने ऊर्जा प्राप्त होते, राखून ठेवल्याने नाही, असे निरीक्षण पियूष गोयल यांनी नोंदवले आहे. ‘ऊर्जा मित्र ॲप’च्या सहाय्याने नागरिकांना ऊर्जा पुरवठाबाबतची ताजी माहिती मिळू शकेल, अशी माहिती एका मध्यवर्ती मंचासह वेबपोर्टल आणि मोबाईल ॲप प्रदान करणारी ही पहिलीच सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बृहन्मुंबईतील छतांच्या सौर ऊर्जा क्षमतेच्या अंदाजासंदर्भातील अहवाल प्रकाशित

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव राजीव कपूर यांच्या हस्ते आज आयआयटी मुंबई येथे ‘बृहन्मुंबईतील छतांच्या सौर ऊर्जा क्षमतेच्या अंदाज’ या अहवालाचे प्रकाशन झाले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सौर मोहिमेअंतर्गत 2022 सालापर्यंत 100 गीगावॅट सौर ऊर्जेचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यामुळे भारताला ऊर्जेचा हरीत आणि स्वच्छ स्रोत प्राप्त होईल आणि दुर्गम भागातही वीजपुरवठा करणे शक्य होईल. त्याचबरोबर पॅरीसमध्ये आयोजित सीओपी-21 मध्ये भारताने दिलेल्या वचनांचीही पूर्तता होईल.

निर्धारित 100 गिगावॅटपैकी 40 गिगावॅट ऊर्जा देशभरातील छतांच्या माध्यमातून प्राप्त केली जाणार आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च बराच कमी झाला आहे. त्यामुळे छतांवर सौर ऊर्जा सयंत्र बसविणे सोपे झाले आहे. या माध्यमातून शहरी तसेच निम शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती शक्य आहे.

बृहन्मुंबईतील छतांद्वारे प्राप्त होऊ शकणाऱ्या सौरऊर्जेच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी तसेच देशभरात वापरात येण्याजोगी यंत्रणा विकसित करण्यासाठी पाच संस्थांनी विविध मुद्दे आणि निकषांच्या आधारे अहवाल तयार केला आणि त्यातील माहितीचे संगणकाधारित विश्लेषणही केले.

मुंबईतील निवासी इमारती, शैक्षणिक संकुले, व्यावसायिक इमारती, सरकारी इमारती आणि उद्योगांवरील छतांचा वापर करुन 1720 मेगावॅट ऊर्जा निर्मिती शक्य असल्याचे या संस्थांच्या अहवालातून निष्पन्न झाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जैव उत्पादन निर्यात 285663 मेट्रीक टन

जैव उत्पादनांच्या प्रमाणनासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जैव उत्पादनांसाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे. 2001 सालापासून हा कार्यक्रम लागू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत प्रमाणित झालेली जैव उत्पादनांचीच देशातून निर्यात करता येते. 2014-15 या वर्षात 285663 मेट्रीक टन जैव उत्पादनाची निर्यात भारतातून झाली. भारतीय चलनात त्याचं मूल्य 209916 कोटी रुपये इतकं होतं. तर 2016-17 या वर्षात 309767 इतक्या विक्रमी जैव उत्पादनांची निर्यात झाली. या उत्पादनांचे भारतीय चलनातील मूल्य 2478.17 कोटी रुपये इतकं होतं. वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चंपारण्य सत्याग्रहाची 100 वर्षे, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या स्वच्छताग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन

चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला, त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत “स्वच्छाग्रह – बापू को कार्यांजली – एक अभियान, एक प्रदर्शनी” या नावाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित
ऑनलाईन इंटरॲक्टिव्ह क्वीझ” या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्घाटन करतील.

या उपक्रमाबद्दल पंतप्रधानांनी ट्विटच्या मालिकेद्वारे माहिती दिली. चंपारण्य सत्याग्रह ही ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा अभूतपूर्व परिणाम दिसून आला असे सांगत पंतप्रधानांनी नागरिकांना स्वच्छाग्रही होण्याचे आणि स्वच्छ भारताची निर्मिती करण्याचे आवाहन केले.

ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचा 100 वर्षांचा महत्वाचा टप्पा ओलांडताना उद्या मी
स्वच्छाग्रह - बापू को कार्यांजली” या विशेष उपक्रमात सहभागी होणार आहे.
या उपक्रमात चंपारण्य सत्याग्रहाची झलक दाखविणारे प्रदर्शन पहायला मिळेल आणि सत्याग्रहाला स्वच्छाग्रहाशी जोडणारी आधारभूत तत्वे त्याद्वारे प्रदर्शित होतील. स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत लोक चळवळ उभारताना केलेले कार्य ही या प्रदर्शनात पाहता येईल.

शतकापूर्वी भारतीयांनी सत्याग्रही होऊन वसाहतवादाविरुध्द लढा दिला होता. आज, आपण सारे स्वच्छाग्रही होऊ या आणि स्वच्छ भारताची निर्मिती करुया. चंपारण्याचा सत्याग्रह ही बापूंच्या नेतृत्वाखालची ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा प्रभाव अभूतपूर्व होता”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ICC चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी हरभजन सिंग सदिच्छादूत

भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 साठी एकूण आठ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एक जून ते 18 जूनदरम्यान पार पडणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंग याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा पहिला चेंडू मैदानावर पडण्यासाठी बरोबर 50 दिवस बाकी असतानाच सदिच्छादूतांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. द ओवल मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान पहिला सामना पार पडणार आहे.

2002 चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारतीय संघात सहभागी असलेल्या हरभजन सिंगने आपण सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 'भारताने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. एक क्रिकेटर म्हणून अशा महत्वाच्या इव्हेंटसाठी सदिच्छादूत म्हणून माझी नियुक्ती होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे', अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली आहे.

आठ सदिच्छादूतांनी एकूण 1774 वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय 48 शतकांसह 51,906 धावा केल्या असून 838 विकेट्स घेतल्या आहेत. हे सर्व सदिच्छादूत चॅम्पिअन्स ट्रॉफी टूरचा भाग असतील. तसंच हे आठ क्रिकेटर्स आयसीसीच्या एडिटोरिअल टीमचाही सहभाग असतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा