केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
- अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
- छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बॅंकेची स्थापना
- करसंकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास मनरेगासाठी सर्वाधिक निधीची तरतूद
- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
- अशोकचक्राचे चिन्ह असलेले सोन्याचे नाणे आणणार
- निर्भया निधीसाठी आणखी एक हजार कोटींची गुंतवणूक
- काळ्या पैशांवर रोख लावण्यासाठी रोख पैशांच्या व्यवहारांवर मर्यादा आणणार
- पुढच्यावर्षी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
- पंतप्रधान जनधन योजनेसाठी टपाल कार्यालयांचा वापर
- श्रीमंत लोकांचे गॅस अनुदान कमी करणार
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमधून दोन लाखांचा अपघात विमा मिळणार, त्यासाठी प्रिमिअम वार्षिक १२ रुपये
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, वार्षिक प्रिमिअम ३३० रुपये, मृत्यूनंतर विमाधारकाच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार
- मागासवर्गीयांसाठीच्या सध्याच्या योजना सुरू राहणार
- उत्पादन क्षेत्र म्हणून भारताला विकसित करण्याचे उद्दिष्ट
- करसंकलनातील ६२ टक्के वाटा राज्यांना मिळणार, केंद्राकडे ३८ टक्के वाटा राहणार
- २०२२ हे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष
- अनुदानासाठी जनधन, आधार कार्ड आणि मोबाईल (जॅम) यांचा वापर करणार
- २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला घर
- जलसंधारणासाठी पाच हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद
- ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद
- मनरेगासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद
- भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होण्याचा अंदाज
- देशाच्या आर्थिक विकासात राज्यांचा समतोल वाटा
- घाऊक महागाई वाढ निर्देशांक नकारात्मक
- वेगाने विकसित होणारी जगातील अर्थव्यवस्था
- सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये आता स्थिरता
- लोकांना विश्वासार्ह सरकार हवे आहे आणि आम्ही ते देतो आहोत
- जनधन योजना अल्पावधीत यशस्वी
- कोळसा खाणीच्या लिलावांतून मिळणाऱया रॉयल्टीमुळे राज्यांना फायदा
- सहा कोटी टॉयलेट बांधण्याचे उद्दिष्ट
- जीएसटी एक एप्रिल २०१६ पासून अंमलात येणार
- महागाईमध्ये घट वित्तीय धोरण
- शहरात दोन कोटी आणि ग्रामीण भागात चार कोटी घरे बांधणार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा