चालू घडामोडी:-फेब्रुवारी २०१५
- शैक्षणिक पात्रतेच्या निकषावरून नेमणुकीपासूनच वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या कोणत्या व्यक्तीस कुलगुरूपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतला आहे?
>महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या १२(७) या तरतूदीनुसार प्रकुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याकडे कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविला आहे.
- कुलगुरूंना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठविणे, ही महाराष्ट्रातील दुसरी तर मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.अशी कारवाई पहिल्यांदा कोणावर करण्यात आली होती?
> कुलपती(राज्यपाल) के. शंकरनारायणन
- नंदेश उमप यांनी 'जांभूळ आख्यान'मध्ये केलेला पन्नास मीटरच्या पायघोळ अंगरख्याचा विक्रम प्रसिद्ध लोककलावंत सोंगी भारुडकार निरंजन भाकरे यांनी अखेर मोडला असून त्यांच्या विक्रमाची नोंद कोठे होणार आहे?
- 'बेटी बढाओ बेटी बचाओ' या योजनेत राज्यातील किती जिल्ह्यांचा स्त्री- पुरुष जन्मदरात तफावत कमी करण्यासाठी समावेश केला असून असून, येथेे आठ मार्चपासून मोहिम सुरू होणार आहे?
- 'बेटी बढाओ बेटी बचाओ' या योजनेअंतर्गत महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या महिला व बालकल्याणविभागाकडून कोणते अभियान राबविण्यात येणार आहे?
- बुऱ्हानी फाऊंडेशन इंडिया (बीएफआय) आणि नझाफत या संस्थातर्फे राबवण्यात येणार्या कोणत्या स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईबरोबरच देशभरातील ५०० गावे, शहरांमध्ये स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार आहे?
- प्रथमच सुरू होणारे कायमस्वरूपी ज्युडिशियल म्युझियम('न्यायिक वस्तुसंग्रहालय') कोठे उभारण्यात आले आहे?
- प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणात भूकंपग्रस्त कुटुंबांनाही लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा केवळ लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावांतील कुटुंबांपुरता मर्यादीत नाही, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भूकंपग्रस्तांसाठी लागू आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच कोणी दिला आहे?
जनहित याचिकाकर्ते:- सुरेश पवार व शंभूराज देसाई
- नाना कोचरेकर यांच्या 'महाराष्ट्र रंगभूमी',मच्छिंद्र कांबळी यांच्या 'भद्रकाली' संस्थेत तसेच सुधीर भट 'सुयोग' या संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करण्यार्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
- टाटा पॉवरचे १२ मेगावॉटचे पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र ९ फेब्रुवारी, १९१५ रोजी खोपोली येथे कार्यान्वित झाले.शताब्दी वर्षात किती मेगावॉटचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संकल्प टाटा पॉवरने सोडला असून सध्याच्या ४५० मेगावॉट जलविद्युत क्षमतेत भविष्यात आणखी ४५० मेगावॉटची भर घालण्यात येणार आहे?
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील हॉस्पिटलांच्या इमारतींच्या उंचीवरील बंधने शिथिल करण्यात आली असून, या इमारतींची उंची ३० मीटरवरून किती मीटर करण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे?
- कोणत्या नियमानुसार मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विधवांना पुनर्विवाहानंतर पेन्शन मिळण्याचा नियम नव्हता.परंतु आता त्यात सुधारणा केली असून मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विधवांनी पुनर्विवाह केल्यानंतरही त्यांना सामाजिक जाणिवेतून फॅमिली पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?
> सरकारी महिला कर्मचारी मयत झाल्यास तिच्या विधुर पतीला फॅमिली पेन्शनचा लाभ आहे. मात्र त्या विधुर पतीने दुसरे लग्न केल्यास त्याला हा लाभ मिळू शकणार नाही.
- गोव्यातील संस्कृती, खाद्यांती आणि लघु उद्योगांची ओळख मुंबईकरांना व्हावी यासाठी ‘आमी गोंयकर’ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गोवा महोत्सवात गोवेकरांचे स्फूर्तिस्थान असलेल्या शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा कोणत्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे?
- राज्यव्यापी पाचवे शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
> उद्घाटन:-ज्येष्ठ गायिका फैयाज
> अध्यक्ष:- लोकशाहीर संभाजी भगत
- राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट, लेखक डॉ. जयंत बी. जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे,त्यांचे प्रसिध्द पुस्तक कोणते?
- सीएसटी (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला स्टेशनपर्यंत पहिली विजेवरील लोकल कधी धावली होती या घटनेला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली?
- महिला व बालविकास विभागाच्या कामात पारदर्शकता आणि सूसुत्रता आणण्यासाठी कोणत्या सिस्टीमचा अवलंब करण्यात येणार आहे?
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांना अंतर्गत पालघर जिल्हा अभियान व पालघर जिल्हा परिषदेमार्फत कोणती योजना राबविण्यात येणार आहे?
- आयसीसी क्रिकेट ‘हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश करण्यात आलेला ७७ वा सदस्य व बिशनसिंह बेदी, कपिलदेव आणि सुनील गावसकर यांचा नंतर चौथा भारतीय क्रिकेटपटू कोण?
- भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने २०१५-१६ चा स्पर्धा कार्यक्रम जाहीर केला असून, एप्रिल महिन्यात कोठे राष्ट्रीय युवा ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?
- विश्वचषकाच्या इतिहासात ‘स्वयंचीत’ (हिटविकेट) होणारा आठवा फलंदाज कोण?
- आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद करणारा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ५० लाख रुपयांत बोली लावलेला खेळाडू कोण?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा