Post views: counter

Current Affairs Feb 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी:फेब्रुवारी २०१५

  • राज्यात ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी होती. मात्र, त्याची अंमलबजावणी ठोसपणे होत नव्हती.त्यामुळे पर्यावरण विभागाने किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे?
== ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या
>पर्यावरणमंत्री रामदास कदम
>दुकानदार आणि उत्पादकांना १ ते ५ लाख रुपये दंड आणि पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद

  • भारताने ऑस्करसाठी पाठविलेल्या "लायर्स डाइस‘ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटासाठी नामांकनही मिळाले नाही. हा पुरस्कार पोलंडच्या कोणत्या चित्रपटाला मिळाला?
== इडा
  • ऑस्कर विजेते - ८७वे ऍकॅडमी ऍवार्डस (ऑस्कर)
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - बर्डमॅन
  2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आलेहांद्रे जी. इनारितो (बर्डमॅन)
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेता - एडी रेडमेन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ज्युलियन मूर (स्टील ऍलिस)
  5. परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट - इडा (पोलंड)
  6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पॅट्रिशिया ऍराक्वेट (बॉयहूड)
  7. परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट - इडा (पोलंड)
  8. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म - क्राईसिस हॉटलाईन
  9. सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म - बॅग बाय द फोन कॉल
  10. सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मिलेना कॅनोनेरो (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
  11. सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग - ऍलन रॉबर्ट मुरे आणि बुब अस्मान (अमेरिकन स्नायपर)
  12. >सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग - क्रेग मन, बेन विलकिन्स, आणि थॉमस कर्ले (व्हिपलॅश)
  13. सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - इंटर्सटेलर
  14. ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म - पॅट्रीक ऑसब्रोन व क्रिस्टिना रिड (फिस्ट)
  15. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म - डॉन हॅल, ख्रिस विल्यम्स व रॉय कोनली (बिग हिरो 6)
  16. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - ऍडम स्टॉकहाऊसेन व ऍना पिनॉक (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
  17. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - इमॅन्युएल लुबेझ्की (बर्डमॅन)
  18. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - टॉम क्रॉस (व्हिपलॅश)
  19. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - लॉरा पॉट्रास, मॅथिल्ड बोनीफॉय व डर्क विलुत्झी (सिटीझन फोर)
  20. सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - ग्लोरी (सेल्मा)
  21. सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर - अलेक्झांड्रे डेस्पलाट (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
  22. सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले - बर्डमॅन
  23. सर्वोत्कृष्ट ऍडाप्टेड स्क्रिनप्ले - ग्रॅहम मूर (द इमिटेशन गेम)
  •  ८७व्या ऍकॅडमी ऍवार्डस (ऑस्कर) पुरस्कारांमध्ये "बर्डमन या चित्रपटाला नऊ नामांकने होती.त्यापैकी या चित्रपटाला किती पुरस्कार मिळाले आहेत?
== चार
>उत्कृष्ट दिग्दर्शक, ओरिजिनल स्क्रीन प्ले आणि सिनेमॅटोग्राफीसाठी
  • फौजदारी आणि कर निवाडय़ासंदर्भातील खटले तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच किती स्वतंत्र न्यायालये सुरू केली आहेत?
== दोन
>सर्वोच्च न्यायालयात ११,१३७ फौजदारी आणि १०८४३ करविषयक खटले प्रलंबित
  • कुकटपल्ली येथील गल्फ ऑइल कॉर्पोरेशनच्या आवारात डिटोनेटर्स निष्कासित करत असताना अचानक स्फोट झाल्यामुळे काही कामगार मृत्युमुखी पडले असून अन्य जण भाजल्याने जखमी झालेत हे ठिकाण कोठे आहे?
== हैदराबाद
  • १९ टक्के वेतनवाढ देण्याच्या मागणीवरुन बँक कर्मचा-यांनी चार दिवसांच्या संपाची घोषणा केली होती.परंतु आता किती टक्के वेतनवाढ मान्य करण्यात आली आहे.ज्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे?
== १५% (नोव्हेंबर २०१२पासून ही वाढ लागू) सार्वजनिक क्षेत्रातील बँका=२७
  • पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरीप्रकरणी अटक कऱण्यात आलेल्या चार आरोपींना दिल्ली न्यायालयाने सहा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यांची नावे काय आहेत?
== लाल्ता प्रसाद, राकेश कुमार, प्रयास जैन आणि शंतनू सैकिया
  • राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.आझाद यांची राज्यसभेवर निवडून येण्याची ही पाचवी वेळ आहे.ते राज्यसभेवर कोठून निवडून आले आहेत?
== जम्मू-काश्मीर
  • यूपीए सरकारच्या भू-संपादन कायद्यात किती टक्के ग्रामीण जनतेची मंजुरी आवश्यक होती. त्याशिवाय जमीन सरकारला ताब्यात घेता येत नव्हती?
== ८०%
  • प्रसारभारती दूरदर्शनला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करायला मनाई करणा-या कोणत्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.त्यामुळे दूरदर्शनला आता विश्वचषकातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करता येणार आहे?
== दिल्ली उच्च न्यायालय
>केंद्र सरकार आणि प्रसारभारतीच्या वतीने युक्तीवाद करणारे अॅर्टोनी जनरल मुकूल रोहतगी
  • डीआरडीओ, एचएएल आणि हवाई दलाने एकत्रितपणाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने लक्ष्यावर प्रहार करणा-या सुखोई विमानावर कोणते क्षेपणास्त्र बसविले आहे?
== ब्राह्मोस
>हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष टी. सुवर्णा राजू
>हवाई दल प्रमुख अरुप राहा
  • कोळसा खाण वाटपप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा, माजी कोळसा सचिव एच. एस. गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोककुमार बसू यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या कोणत्या न्यायाधीशांनी जामीनाला मंजुरी दिली?
== भारत पराशर
  • करचुकवेगिरीला मदत केल्याप्रकरणी विविध देशांमध्ये चौकशीच्या फे-यात सापडलेल्या कोणत्या बँकेला भारतीय करविभागानेही नोटिस बजावली आहे?
== एचएसबीसी (एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुलिव्हर)
  • कलर्स मिक्ता पुरस्कार(दुबई)
  1. गर्व महाराष्ट्राचा:-सलीम खान
  2. झेंडा रोवला:-अशोक कोरगांवकर(बांधकाम डिझाईन क्षेत्र)
  3. सर्वोत्कृष्ट चित्रपट:-अस्तू 
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेता:- मोहन आगाशे-अस्तू 
  5. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:-इरावती हर्षे-अस्तू 
  6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री:-अमृता सुभाष-अस्तू 
  7. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता:-किशोर कदम-फॅन्ड्री
  8. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अभिनेता(नाटक):-मधुरा वेलणकर व चिन्मय मांडलेकर-मिस्टर अॅ ण्ड मिसेस
  9. प्रेक्षक पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट:-पोश्टर बॉईज
  10. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:-अभिजित पानसे-रेगे
  11. प्रेक्षक पसंतीने सर्वोत्कृष्ट अभिनेता-रितेश देशमुख-लई भारी

  • ब्रिटनमधील पार्लमेंट स्क्वेअरमध्ये बसवण्यात येणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत?
== फिलिप जॅकसन
  • भारत फोर्ज उच्च तंत्रज्ञानावर आधारीत संरक्षणसामग्रीच्या उत्पादनासाठी इस्राइलच्या कोणत्या कंपनीशी भागीदारी (जॉइंट व्हेंचर) करीत असल्याची घोषणा केली आहे?
== राफाएल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम (रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचे उत्पादन)
  • मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोणत्या कंपनीने भारतातील पहिल्या वहिल्या वायफाय एसीची निर्मिती केली आहे?
== व्हिडीओकॉन
  • गुजरातमधील अहमदाबादमध्ये स्वाइन फ्लू रोखण्यासाठी कोणते कलम लागू करण्यात आले आहे?
== कलम १४४(जमावबंदी)
  • पुरस्कार:
संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१५:
>ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:
>ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे
>गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते रामदास कामत व अरुण काकडे
  • १४व्या वित्त आयोगाचा अहवालाच्या शिफारशी:-
(अध्यक्ष:-रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी)
  1. केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के
  2. २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना १.७८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल(केंद्राकडून)
  3. महसुलाची चणचण असलेल्या ११ राज्यांना ४८,९०६ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची शिफारस
  4. आंध्र प्रदेश (तेलंगणच्या विभाजनानंतर), आसाम, जम्मू आणि काश्मीहर, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, त्रिपुरा आणि पश्चिाम बंगाल चा समावेश
  5. २०२० पर्यंत एकूण १.९४ लाख कोटींचा निधी केंद्राकडून अदा
  6. २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपयांचा वाटा
  7. २०१९-२० सालापर्यंत राज्यांचा एकूण महसुली वाटा ३९.४८ लाख कोटींचा असेल.
  8. पाच वर्षांत पंचायती आणि महानगरपालिकांसाठी २.८७ लाख कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडून मिळेल.
  9. याशिवाय आपत्ती निवारणासाठी सर्व राज्यांसाठी ५५,०९७ कोटी रुपयांचा निधी
  • भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा कोणी केला आहे?
== आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने(अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी)
>वापरण्यात आलेली पद्धत:-अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती
  • लोकसभेत सादर झालेले वादग्रस्त ६ वटहुकूम:-
  1. भूमी अधिग्रहण
  2. विमा क्षेत्रातील एफडीआय
  3. कोळसा खाणपट्ट्यांचा लिलाव
  4. ई-रिक्षा तसेच रिक्षाच्या दर्जासंबंधी सुधारणा
  5. खाण व खनिज 
  6. नागरिकत्व कायद्यात सुधारणा
  • नौदलाने स्वदेशनिर्मित आयएसी- २ या जहाजाच्या निर्मितीसाठी विस्तृत अभ्यास चालविला असून आयएसी-२ या जहाजाचे नाव काय राहणार आहे?
== आयएनएस विशाल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोनोग्राम असलेला बहुचर्चित कोट अखेर तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकला गेला! सूट कोणी विकत घेतला?
== धर्मानंद डायमंड कंपनीचे लालजी पटेल आणि त्यांचे पुत्र हितेश पटेल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी व खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी कोणती योजना सुरु केली आहे?
== मृदा स्वास्थ्य कार्ड’ (सॉईल हेल्थ कार्ड)-सुरतगड
  • रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ब्युरो चीफ असलेली कोणती रिपोर्टर इस्लामाबादेतील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आल्या आहेत?
== मारिया गोलोव्हनिना
  • मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष व विरोधी पक्षनेते असलेल्या कोणत्या नेत्यास दहशतवादविरोधी कायद्याखाली अटक करण्यात आली आहे?
== मोहंमद नशीद (४७)
  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या २० शहरांपैकी भारतातील १३ शहरे असून यापैकी कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित शहर आहे?
    == दिल्ली
     
  • डस्कव्हर उपग्रह
  1. संभाव्य धोकादायक सौर हालचाली व खोल अंतराळाच्या दिशेने निघालेल्या भूचुंबकीय वादळांबाबत लोकांना सावध करण्यासाठी 
  2. अमेरिकी हवाई दल, नासा व नॅशनल ओशनिक अॅशण्ड अॅाटमॉस्फेरिक अॅलडमिनिस्ट्रेशन यांचा संयुक्त उपक्रम
  3. केप कॅनव्हरल, फ्लोरिडा येथून ‘स्पेसएक्स फाल्कन ९’ अग्निबाणाने अंतराळात सोडला.
  4. खर्च:- ३४० दशलक्ष डॉलर
  5. पृथ्वी व सूर्यादरम्यानच्या ‘लॅग्रान्जाइन पॉइंट’ वा ‘एल १’ या ठिकाणी जाणार असून तेथे पोहोचण्यास त्याला ११० दिवस लागतील
  • दिल्ली चे ६वे विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
== रामनिवास गोयल(आम आदमी पार्टी)-शाहदरा
विधानसभा उपाध्यक्ष:-वंदना कुमारी-शालीमार बाग
  • एफ-सिक्युदअर लॅबने "द स्टेट ऑफ इंटरनेट इन इंडिया‘ नावाचा एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये देशभरातील ५४० शहरांमधील इंटरनेट सुविधेचा अभ्यास केला असता इंटरनेट सुविधेसाठी सर्वात धोकादायक शहर कोणते ठरले आहे?
== दिल्ली
  • सौर कृषिपंप वितरण:-
  1. केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय स्तरावर एक लाख सौर कृषिपंप वाटप करण्यात येणार
  2. राज्यात सात हजार ५४० सौरऊर्जा पंपांचे वितरण करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ४४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  3. राज्याच्या वाट्याची पाच टक्के रक्कम (२२ कोटी २५ लाख रुपये) हरित ऊर्जा निधीमधून
  4. सुरवातीला या योजनेंतर्गत राज्यासाठी चार हजार ६०० सौर कृषिपंप वाटप करण्याचे उद्दिष्ट होते.
  5. योजनेची अंमलबजावणी:- "महावितरण‘मार्फत करण्यात येईल. तसेच, "महाऊर्जा‘मार्फत तांत्रिक साह्य
  • महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या कुलगुरूचे पद रिक्त झाल्यापासून १२ महिन्यांसाठी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात येत होती. या अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे हा कालावधी आता १२ महिन्यांवरून किती महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे?
== १८ महिने
  • जिल्हा न्यायालयात आर्थिक अपील करण्याची मर्यादा दहा लाख रुपयांवरून किती कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे?
== एक कोटी
  • महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प:-
>अर्थसंकल्प अधिवेशन:- नऊ मार्चपासून
>अर्थसंकल्प:- १८ मार्च

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा