राजकीय कारणे :-
सन १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सज्ञ्ल्त्;ाा नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.
इ.स. १७९८ मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे. त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत. तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल. त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या. वेलस्लीने निजाम मराठयांचे श्ंिादे होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आवळला व अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सज्ञ्ल्त्;ाा गमवाव्या लागल्या.
इ.स. १८४८ मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो. अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला. याबाबत त्याचे दोन मार्ग होते. एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे डलहौसीने आपल्या अंकित असणार्या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकार्यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले व जी संस्थाने तत्वानुसारच नि:संतान संस्थानिकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परवानगी दिली नाही.
दत्ताक वारस नामंजूर या धोरणानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कंपनीच्या राज्यात सामाविष्ट केली. तर गैरकारभार व अव्यवस्था या त्वाखाली अयोध्येचे संस्थान खालसा केले. डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.
र्लॉड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्ताक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली वर्हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकंाना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते. त्यांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहागिरींची जप्ती केली. र्लॉड डलहौसीने पुरावे न्व्हते. जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले.या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.
आर्थिक कारणे :-
ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता. १८ व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता. परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.
शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतर्यांना उत्पन्नाच्या २/३ हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसार्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.
ब्रिटिशांनी सर्व देशभर एकच अशी शेतसार्याची पध्दत ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रांतामध्ये यात वेगळेपणा होता. र्लॉड कॉर्नवालिसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु केली. तर र्लॉड हेस्ंिटग्जने यात सुधाराण करुन पंजाब व आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने रयतवारी पध्दती सुरु केंली. ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला .
भारत हा एक सधन व संपन्न देश होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट केली. या देशातील प्रत्यके प्रांत कोणत्या ना कोणत्या उत्पनासाठी प्रसिध्द होता. आसाम चहासाठी, महाराष्ट्र्र, गुजरात, कापसासाठी तर पंजाब, व बंगाल धनधान्यासाठी प्रसिध्द होता. ब्रिटिशांनी भारतीयांचे ज्या मार्गाने शोषण केले. ते मार्ग याप्रमाणे (१) भारतात अत्यंत कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणे व तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हणून भारतात विकणे,(२) भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदार्थ, खनिजे, लाकूड, इत्यादी माध्यमातून ब्रिटिशंानी आपले साम्राज्य निर्माण केले होते. या साम्राज्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांना आपले लष्कर सतत सज्ज ठेवावे लागे हा खर्च भारतीय तिजोरीतून दिला जाई.
ब्रिटिशांनी भारतीयांची यंत्रवत लुट केली. त्यांच्या लुटीचे मार्ग अनेक होते. यामुळे ब्रिटनची भरभराट झाली. तर भारत दारिद्रयाकडे वाटचाल करु लागला याबाबत डॉ ईश्र्वरीप्रसाद म्हणतात, भारतमातेच्या दुधावर इंग्रज लठ्ठ झाले. परंतु भारतीयांवर यात उपासमारीची वेळ आली.
-सरकारी अधिकार्यांनी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोखा रकमेच्या स्वरुपात घेण्याचा आग्रह धरला शेतकर्यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्यांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार ठरावीक शेतसरा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या.
सामाजिक - सांस्कृतिक कारणे
काळया लोकांपेक्षा गौरवणीर्य लोक जन्मत श्रेष्ठ आहेत. अशी भावना १९ व्या शतकात युरोपभर पसरली होती. इंग्लंडही त्यास अपवाद कसा असेल हिंदी लोक मागास आहेत. त्यांची संस्कृती रानटी आहे हे भारतीयांच्या मनावर ब्ंिाबविण्याचा ब्रिटिश प्रयत्न करु लागले.
एखादया साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणार्या भारतीयालाही खाली उतरून त्या इंग्रजास सलाम ठोकावा लागे. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव होता. युरोपियनांच्या हॉटेलमध्ये व क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश नसे, हिदी माणसाप्रती असणारी ब्रिटिशांची तुच्छतेची भावना भारतीयांचा असंतोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.
भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्यासाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक कायदे पास केले. सन १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा केला. त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह संमती कायदा, वाबविवाह प्रतिबंधक कायदा असे कायदे पास केले. भारतीय समाज प्रबोधनापासून अ्द्याप दूर होता. ब्रिटिशांनी हे सर्व कायदे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काही रुढीप्रिय भारतीयांना वाटू लागले.
इ.स. १८५० मध्ये ब्रिटिशांनी जातिभेद रद्द करण्याचा कायदा केला व या कायद्यानुसार वारसाहक्क व मालमज्ञ्ल्त्;ाा हक्क्ामध्ये काही बदल केले. तत्कालीन हिंदु मुस्लिमांना या कायद्याचा धोका वाटू लागला हिंदू वा मुस्लीम धर्मातर करुन ख्रिश्चन धर्मात गेला, तरी त्याचा वाससाहक्क व मालमज्ञ्ल्त्;ाा प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता.
भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणव्यवस्था सुरु केली. देशभर ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देणार्या मिशनरी शाळा सुरु झाल्या ब्रिटिशांच्या या धोरणामुळे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजरचना कोलमडते की काय, असे लोकांना वाटू लागले आणि यामधून भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला.
धार्मिक कारणे
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला. इ.स. १८१३ च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले. कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला.
(अ) ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्यांना वडिलोपार्जित संपत्ती त त्यांचा हक्क मिळे.
(ब) अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई.
(क) ख्रिश्चन धर्म स्वीकाराणार्यांना नोकरीत सामावून घेतले जाई व जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई.
(ड) ख्रिश्चन मिशनर्यांच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्वज्ञान दिले जाई.
(ई) तुरुंगवास भोगणार्या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलयास त्याची मुक्तता होई
कंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.
कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषता बेंटिकने इ.स. १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खर्या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.
देवालयांची व मशिदींची वतने जप्त
कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलव्ंिाची अप्रतिष्ठा झाली. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.
लष्करी कारणे
राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यत उठाव घडून येणे शक्य नव्हते. शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली. त्यामुळे शिपायांनी हाती शस्त्र घेण्यासाठी मागची कारणे महत्वाची आहेत.
ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बध लादले. इ.स. १८०६ मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती. र्लॉड कॅन्ंिागने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते. त्यांनी परदेशात जाण्यास विरोध केला, त्यांना नोकरीस मुकावे लागले, तर अनेकांना शिक्षा झाल्या.
हिंदी शिपायांना मिळणारी अयोग्य वागणुक
हिंदी शिपायांत असंतोष वाढीस लागण्यास कारणीभूत ठरलेली कारणे खालीलप्रमाणे:
(अ) लष्करातील उच्च अधिकार पदे भारतीय सैनिकांनी दिली जात नसत.
(ब) एकाच पदावर काम करणार्या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यांत फार मोठी तफावत केली जात होती.
(क) हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राऊंडवर त्यांचा अवमान कला जाई. वेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात.
(ड) लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत. धुमश्चक्री होऊन अनेक हिंदी शिपाई मारले जात मग गोरी फौज पुढे पाठविली जाई. म्हणजे मृत्यूला सामोरे जाताना भारतीय शिपाई व विजयाची माळ यात गोर्या सैन्याकडे, या प्रकारामुळे हिंदी शिपायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
तात्कालिक कारण
काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला. इ. स. १८५७ मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या. या बंदुकांना लागणार्या काडतुसांचे सील गाई व डुकराच्याचरबीने बंद केले. या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणाची माहिती वार्यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली . त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला. नकार देणार्या शिपायांवर खटले भरण्यात आले. १० वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या या सैनिकंाना नोकरीतून काढून टाकणयत आले. त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि यामधून १८५७ च्या उठावाचा भडका उडाला.
उठावाचा कालखंड व नेत्यांची व्यक्तिगत भूमिका
इ.स. १८५७ च्या उठावाचे नियोजन करण्यात आले
होते. ३१ में १८५७ ची उठावाची तारीखही निश्चित केली होती. परंतु
काडतुसाच्या बातमीने सैन्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला. अशातच
बराकपूरच्या छावणीमध्ये एक महत्वपूर्ण घटना घडली एका ब्राम्हण सैनिकास एका
अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने उत्तर
दिले की तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल. यावर तो अस्पृश्य सैनिक
म्हणाला, महाराज आता तो जातीचा अभिमान ठेवा गुंडाळून यापूढे तुम्हाला गाईची
नि डुकराची चरबी आपल्या दातानी तोडावी लागणार आहे. ही नवीन आलेली काडतुसे
याच अपवित्र पदार्थानी हेतुत माखलेली आहेत समजलात.
२९ मार्च १८५७ रोजी बराकपूरच्या छावणीत उठावाची पहिली ठिणगी पडली. नव्याने वापरात आलेल्या इनफिल्ड बंदुका व त्यासाठी वापरण्यास येणारी चरबीयुक्त आपरणाने सील केलेली काडतुसे यामुळे सैनिकात पराकोटीची अस्वस्थता होती. लष्कारी कवायतीच्या प्रसंगी मंगल पांडे याने ही नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला. एवढयावरच न थांबता काडतूस वापरण्याची सक्ती करण्यासाठी पुढे आलेले ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन बाॅं कमांडर जनरल व्हिलर आणि लेफटनंट वाघ यांना गोळया झाडून ठार केले. शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले ही चकमक पाहणार्या एकाही हिंदी सैनिकास मंगल पांडे यांस मदत करावी असे वाटले नाही शेवटी कोर्ट मार्शल होऊन ८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो.
सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते. परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही परिणामत: रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांनी मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.
हे सर्वजण इंग्रजांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावलेले होते. इंग्रज हा सर्वाचा सामूहिक शत्रू होता. कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती. तर दिल्ली लखनौ कोलकज्ञ्ल्त्;ाा व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला व ३१ मे १८५७ हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला.
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. मंगल पांडेच्या फाशीची बातमी देशभरातील लष्करी छावण्यात वणव्यासारखी पसरली. काडतूस प्रकरणामुळे हिंदी शिपायांत संतापाची एकच लाट उसळली आणि यामधून ३ मे रोजी लखनौ व ५ मे रोजी अयोध्या येथील लष्करी तुकाडयांनी काडतूसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. ब्रिटिशांनी अशा शिपायांवर कठोर कारवाई केली. अनेकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली माीरतच्या छावणीमध्ये इ.स. ९ में १८५७ रोजी ८५ शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या सर्व शिपायांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांच्या पायात बेडया ठोकण्याचे काम सुरू झाले. मीरतच्या छावनीतील इतर हिंदी शिपायांना नियोजित वेळेपर्यत वाट पाहणे अवघड वाटू लागले. त्यांनी १० में १८५७ रोजी सायंकाळी उठावास सुरुवात केली. इंग्रज अधिकार्यांना ठार केले लगेचच तुरुंग फ़ोंडून भारतीय वैद्यांची मुक्तता केली. मीरत उठाववाल्यांच्या ताब्यात येताच कंपनी सरकारचे राज्य खालसा झाल्याची घोषणा करण्यात आली. हिंदी सैनिकांनी दुसर्याच दिवशी चौसष्ठ कि.मी. अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गामध्ये हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन मिळाले.
मीरतहून आलेली फौज दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई उठाववाल्यांना येऊन मिळाले. मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी घश्यात घातले होते. परंतु भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या होत्या. त्यामुळे उठाववाल्यांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूरशहाला धोका वाटत असतानाही बंडवाल्यापुढे त्यांचा नाईलाज झाला. ११ में रोजी बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली. बंडवाल्यांच्या आक्रमकतेपुढे ब्रिटिश नामोहरम झाले. उठाववाल्यांनी दिल्लीतील दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली पुढील धोका ओळखून ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग लावली. प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या २४ तासात दिल्ली उठाववाल्यांचा ताब्यात आली. बादशहा बहादूरशहा यांस भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.
उठावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिंग याने ब्रिटिश साम्राज्यामधून १ लक्ष २० हजार सैनिक बोलावून घेतले. तसेच भारतातही पंजाबी, गुरखा, शीख, रजपूत, यांची नव्याने भरती करून ३ लक्ष १० हजार फौज तयार केली इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सूरू केल्या तर बहादूरशहा व बंडवाले दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी दक्ष होत. इंग्रजांनी जून १८५७ मध्ये ६५ हजारांची फौज दिल्लीभोवती गोळा केली मानसशास्त्रीय दबाव ठेवण्यासाठी ज्ंिाकणे इंग्रजांना आवश्यक वाटू लागले १५ सप्टेंबर १८५७ रोजी बंडवाले व इंग्रज यांच्यामध्ये युध्दास तोंड फुटले बंडवाल्यांनी १० दिवस निकराने झुंज दिली. परंतु ब्रिटिशांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही. २५ सप्टेंबर १८५७ मध्ये दिल्ली इंग्रजांच्या हाती आली. दिल्ली ताब्यात येताच दहशत बसविण्यासाठी इंग्रजांनी अमानुषपणे कत्तल सुरु केली ब्रिटिशांनी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. बादशहा बाहदूरशहा यास कैद करुन एका हुजर्याच्या कोठीत डांबले.
मीरत व दिल्ली येथील उठावाच्या यशस्वी वाटचालीमुळे सर्वच लष्करी छावण्यात अस्वस्थता निर्माण झाली. अशाच अस्वस्थ झालेल्या कानपूरमधील एका गोर्या शिपायाने ५ जून १८५७ रोजी हिंदी शिपायांवर गोळया झाडल्या यामूळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी बंड पुकारले नानासाहेब येथील उठाववाल्यांचे नेते बनले कानपूरमधील इंग्रजांनी एका खंदक असणार्या इमारतीचा आश्रय घेतला. नानासाहेबांनी या इमारतीस वेढा दिला इंग्रजांनी मोठया धैर्याने २१ दिवस उठाववाल्यांचा प्रतिकार केला शेवठी नानासाहेबाांशी करार करून इंग्रजांनी आपली सुटका करुन घेतली.
१ जूलै १८५७ रोजी कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले. इंग्रजांना कानपूरमधील उठावाची बातमी समजताच कानपुरच्या दिशेने इंग्रज फौज धावू लागली. १२ जुलै १८५७ रोजी तुंबड युध्द झाले इंग्रजांच्या तोफखान्यापुढे नानाचा निभाव लागला नाही. १७ जुलै रोजी इंग्रजांनी कानपुरवर ताबा मिळविला. अवध संस्थानच्या माध्यामातून पुन्हा कानपुरवर ताबा मिळविण्यात नानासाहेब व तात्या टोपे यशस्वी झाले मात्र फार काळ त्यांना कानपूर टिकविता आले नाही.
ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पबेलने पुन्हा नानासाहेब व तात्या टोपे यांचा पराभव करुन कानपूर मिळविले. यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी निघून गेले तर मागे सेनापती तात्या टोपे मात्र जवळ जवळ दहा महिने इंग्रजांविरुध लढत होते. पंरतु फिरतिमुळे त्यांचाही घात झाला. इंग्रजांनी त्यांना पकडले व १८ एप्रिल १८५९ रोजी फासावर लटकविले.
र्लॉड डलहौसीने अयोध्या (औंध/अवध) संस्थान खलसा केले. ३० मे १८५७ रोजी अयोध्या संस्थानात उठावास सुरुवात झाली अयोध्या संस्थानच्या नवाबाच्या हजरत महल या बेगमने बंडवाल्याचे नेतृत्व केले आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसवून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले. ब्रिटिश सेनापती हॅव लॅक मोठी फौज घेऊन सप्टेंबर १८५७ मध्ये लखनैास आला. बंडवाल्यांशी लढा देऊन १७ नोव्हेंबर १८५७ रोजी बंडवालयांचा ब्रिटिश रेसिडेन्साी भेावतीचा वेढा उठविला. इंग्रजांनी ताकद वाढत असतानाच ब्रिटिश सेनानी जनरल कॅम्बेल २० हजारांची फौज घेऊन लखनौस पोहोचला. त्यांनी बंडवाल्याशी मुकाबला दिला. बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली बंडवाल्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. शेवटी २२ मार्च १८५७ रोजी ब्रिटिशांनी लखनौ मिळविण्यात यश मिळविले.
पाटणजवळ दानापूर येथे ब्रिटिशांनी फौज होती
येथील ब्रिटिश अधिकारी र्लॉड याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांत उठावाची
लागण होऊ नये म्हणून त्याने शिपायांना निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला
हिंदी सैनिक शस्त्रे खाली ठेवण्यास आणि गोर्यांची फौज तेथे येण्यास एकच
गाठ पडली. आपणास नि:शस्त्र करुन लॉईड आपली कत्तल करणार अशी भीती हिंदी
शिपायांना वाटल्याने त्यांनी हाती शस्त्रें घेतले व गोर्या फौजेवर गोळीबार
सुरु केला. र्लॉडड हतबल झाला. त्यांची जमीनदार राणा कंुबरसिंह
ब्रिटिशांच्या विरोधात बंड करुन उठला. इंग्रजांकडून झालेल्या अन्यायाची
संधीच उठावाच्या रुपाने राणा कुवरस्ंिाहाला चालून आली. उठाववाल्यांनाही
कुंवरसिंहाच्या रुपाने नेता मिळाला इंग्रजांशी त्यांनी दिलेला लढा
तरुणांनाही लाजवेल असा होता. ब्रिटिशांशी लढता लढता इ.स. १८५७ मध्ये
कुंवरसिंह मरण पावला.
र्लॉड डलहौसीने दत्ताक वारस नामंजूर या तत्वाखाली झाशीचे राज्य खालसा केले राणीच्या दत्ताक पुत्रास राज्याधिकार नाकारणसत आला आपल्या मुलाच्या मुंजीसाठी आपल्याचा खजिन्यातील १ लाख रुपयांची मागणी राणीने इंग्रजाकडे केली. इंग्रजांनी यासाठी जामीन मागितला यामुळे राणी अपमानित झाली व तिने हाती शस्त्र घेंतले उठावाची वार्ता जसजशी समजेल तस-तसे उठावाचे लोण पसरत होते. ६ जून १८५७ रोजी झाशी येथील हिंदी शिपायांनी बंड पुकारून इंग्रज अधिकार्यांची कत्तल केली. यापाठी मागे राणीचा हात आहे. असे वाटून इंग्रजांनी राणीच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.
संभाव्य धोका ओळखून राणीनेही आपली लष्करी सिध्दता केली. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठया निर्धाराने किल्ला लढवू लागली राणीच्या मदतीस तात्या टोपे धावून आले. पण त्यांना पराभवास सामोरे जोवे लागले ब्रिटिश सेनापती सर हयूरोज याने किल्ल्याच्या तटबंदीस खिंडार पाडलें इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश करताच भयंकर कतल सुरु केली. मोठया युक्तीने आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोडयावर स्वार होऊन राणी किल्ल्याबाहेर पडली. काल्पीच्या दिशेने राणीची दौड सुरु झाली. १०० मैलाचे अंतर राणीने वार्याच्या वेगाने पार केले.
झाशीची राणी लक्ष्मीबाई काल्पीला येताच नानासाहेब पेशवे तात्या टोपे, बांद्याचा नवाब इ. नेते एकत्र आले. ब्रिटिश सेनापती सर हयू रोज काल्पीवर आक्रमण केले. बंडवाले आणि इंग्रज यांच्यात दोन लढाया झाल्या पण त्यात बंडवाल्यांचा पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले. राणी व तात्या टोपे ग्वाल्हेरला येताच तेथील सैनिकात उत्साह संचारला व त्यांनी बंडाचे निशान उभारले यावेळी ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव मात्र आगर्यास पळून गेला. ग्वाल्हेरचा किल्ला जून १८५८ मध्ये बंडवाल्यांच्या ताब्यात आला. ग्वाल्हेरच्या बंडाची बातमी समजाताच सर हयेरोज काल्पीहून ग्वाल्हेरला आला राणी, तात्या टोपे व इंग्रज यांचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु होता. ग्वाल्हेर ज्ंिाकणे इंग्रजाना आवश्यक वाटू लागले. त्यांनी बंडवाल्यांवर आक्रमण केले यावेळी राणी लक्ष्मीबाई उठावाचे स्वत: नेतृत्व करत होती सर ह्यूरोज व जनरल स्मिथ यांच्या भेदक मार्यापुढे उठाववाल्यांचा निभाव लागेनासा झाला राणीला शत्रूने वेढा दिला.
राणीने मोठया चपळतेने घोडा उडवून वेढयाचा छेद केला. ब्रिटिश फौज पाठीवर होतीच अशा आणीबाणीच्या प्रसंगी एका ओढयाजवळ राणीचा घोडा अडला पाठलाग करणार्या इंग्रज सैनिकांनी राणीच्या डोक्यावर छातीवर जबर वार केले. राणीने पराक्रमाची शर्थ केली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी राणीने वार करणार्या दोन शत्रू सैनिकांना ठार केले. राणीच्या मृत्यूने १७ जून १८५८ उठावाच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला.
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.
उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.
१८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता. ंिहंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.
ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.
१८५७ च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.
फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.
लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या २ हजार इंग्रजांनी १ लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो. मला गोर्या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.
र्लॉड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.
उठावाचे नेतृत्व करणारे नानासाहेब तात्या साहेब टोपे बहादूर शहा, झाशीची राणी, हे पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी हॅव, लॉक, कॅम्बेल, नील, लॅरेन्स, हयू, रोज, हे अत्यंत पराक्रमी अनुभवी व मुत्सदी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या त्यामुळे त्यांचा विजय झाला.
१८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून १ लक्ष १२ हजाराची फौज आणली आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती त्यामुळे १८५७ च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.
- कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-
सन १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सज्ञ्ल्त्;ाा नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.
- र्लॉड वेलस्लीची तैनाती फौज :-
इ.स. १७९८ मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे. त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत. तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल. त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या. वेलस्लीने निजाम मराठयांचे श्ंिादे होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आवळला व अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सज्ञ्ल्त्;ाा गमवाव्या लागल्या.
- संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती :-
इ.स. १८४८ मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो. अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला. याबाबत त्याचे दोन मार्ग होते. एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे डलहौसीने आपल्या अंकित असणार्या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकार्यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले व जी संस्थाने तत्वानुसारच नि:संतान संस्थानिकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परवानगी दिली नाही.
दत्ताक वारस नामंजूर या धोरणानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कंपनीच्या राज्यात सामाविष्ट केली. तर गैरकारभार व अव्यवस्था या त्वाखाली अयोध्येचे संस्थान खालसा केले. डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.
- पदव्या आणि पेन्शन रद्द :-
र्लॉड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्ताक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली वर्हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.
- वतने, इनाम व जहागिरीची जप्ती :-
ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकंाना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते. त्यांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहागिरींची जप्ती केली. र्लॉड डलहौसीने पुरावे न्व्हते. जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले.या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.
आर्थिक कारणे :-
- देशी उद्योगधंद्याचा र्हास
ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता. १८ व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता. परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.
- शेतीसंबंधी उदासीन धोरण
शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतर्यांना उत्पन्नाच्या २/३ हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसार्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.
ब्रिटिशांनी सर्व देशभर एकच अशी शेतसार्याची पध्दत ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रांतामध्ये यात वेगळेपणा होता. र्लॉड कॉर्नवालिसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु केली. तर र्लॉड हेस्ंिटग्जने यात सुधाराण करुन पंजाब व आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने रयतवारी पध्दती सुरु केंली. ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला .
- हिंदी जनतेची आर्थिक पिळवणूक
भारत हा एक सधन व संपन्न देश होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट केली. या देशातील प्रत्यके प्रांत कोणत्या ना कोणत्या उत्पनासाठी प्रसिध्द होता. आसाम चहासाठी, महाराष्ट्र्र, गुजरात, कापसासाठी तर पंजाब, व बंगाल धनधान्यासाठी प्रसिध्द होता. ब्रिटिशांनी भारतीयांचे ज्या मार्गाने शोषण केले. ते मार्ग याप्रमाणे (१) भारतात अत्यंत कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणे व तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हणून भारतात विकणे,(२) भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदार्थ, खनिजे, लाकूड, इत्यादी माध्यमातून ब्रिटिशंानी आपले साम्राज्य निर्माण केले होते. या साम्राज्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांना आपले लष्कर सतत सज्ज ठेवावे लागे हा खर्च भारतीय तिजोरीतून दिला जाई.
ब्रिटिशांनी भारतीयांची यंत्रवत लुट केली. त्यांच्या लुटीचे मार्ग अनेक होते. यामुळे ब्रिटनची भरभराट झाली. तर भारत दारिद्रयाकडे वाटचाल करु लागला याबाबत डॉ ईश्र्वरीप्रसाद म्हणतात, भारतमातेच्या दुधावर इंग्रज लठ्ठ झाले. परंतु भारतीयांवर यात उपासमारीची वेळ आली.
- शेतसार्यासाठी शेतकर्यांवर अन्याय, अत्याचार
-सरकारी अधिकार्यांनी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोखा रकमेच्या स्वरुपात घेण्याचा आग्रह धरला शेतकर्यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्यांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार ठरावीक शेतसरा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या.
सामाजिक - सांस्कृतिक कारणे
- हिंदूविषयी तुच्छतेची भावना
काळया लोकांपेक्षा गौरवणीर्य लोक जन्मत श्रेष्ठ आहेत. अशी भावना १९ व्या शतकात युरोपभर पसरली होती. इंग्लंडही त्यास अपवाद कसा असेल हिंदी लोक मागास आहेत. त्यांची संस्कृती रानटी आहे हे भारतीयांच्या मनावर ब्ंिाबविण्याचा ब्रिटिश प्रयत्न करु लागले.
एखादया साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणार्या भारतीयालाही खाली उतरून त्या इंग्रजास सलाम ठोकावा लागे. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव होता. युरोपियनांच्या हॉटेलमध्ये व क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश नसे, हिदी माणसाप्रती असणारी ब्रिटिशांची तुच्छतेची भावना भारतीयांचा असंतोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.
- हिंदू संस्कृती व समाज जीवनावर आघात
भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्यासाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक कायदे पास केले. सन १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा केला. त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह संमती कायदा, वाबविवाह प्रतिबंधक कायदा असे कायदे पास केले. भारतीय समाज प्रबोधनापासून अ्द्याप दूर होता. ब्रिटिशांनी हे सर्व कायदे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काही रुढीप्रिय भारतीयांना वाटू लागले.
- जातिभेद रद्द करण्याचा कायदा
इ.स. १८५० मध्ये ब्रिटिशांनी जातिभेद रद्द करण्याचा कायदा केला व या कायद्यानुसार वारसाहक्क व मालमज्ञ्ल्त्;ाा हक्क्ामध्ये काही बदल केले. तत्कालीन हिंदु मुस्लिमांना या कायद्याचा धोका वाटू लागला हिंदू वा मुस्लीम धर्मातर करुन ख्रिश्चन धर्मात गेला, तरी त्याचा वाससाहक्क व मालमज्ञ्ल्त्;ाा प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता.
- नवीन शिक्षणव्यवस्था अप्रिय
भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणव्यवस्था सुरु केली. देशभर ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देणार्या मिशनरी शाळा सुरु झाल्या ब्रिटिशांच्या या धोरणामुळे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजरचना कोलमडते की काय, असे लोकांना वाटू लागले आणि यामधून भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला.
धार्मिक कारणे
- धार्मिक संकट
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला. इ.स. १८१३ च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले. कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला.
(अ) ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्यांना वडिलोपार्जित संपत्ती त त्यांचा हक्क मिळे.
(ब) अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई.
(क) ख्रिश्चन धर्म स्वीकाराणार्यांना नोकरीत सामावून घेतले जाई व जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई.
(ड) ख्रिश्चन मिशनर्यांच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्वज्ञान दिले जाई.
(ई) तुरुंगवास भोगणार्या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलयास त्याची मुक्तता होई
कंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.
- धर्म व सामाजिक सुधारणाविरुध्द प्रतिक्रिया
कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषता बेंटिकने इ.स. १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खर्या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.
देवालयांची व मशिदींची वतने जप्त
कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलव्ंिाची अप्रतिष्ठा झाली. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.
लष्करी कारणे
राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यत उठाव घडून येणे शक्य नव्हते. शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली. त्यामुळे शिपायांनी हाती शस्त्र घेण्यासाठी मागची कारणे महत्वाची आहेत.
- हिंदी शिपायावरील निर्बंध
ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बध लादले. इ.स. १८०६ मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती. र्लॉड कॅन्ंिागने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते. त्यांनी परदेशात जाण्यास विरोध केला, त्यांना नोकरीस मुकावे लागले, तर अनेकांना शिक्षा झाल्या.
हिंदी शिपायांना मिळणारी अयोग्य वागणुक
हिंदी शिपायांत असंतोष वाढीस लागण्यास कारणीभूत ठरलेली कारणे खालीलप्रमाणे:
(अ) लष्करातील उच्च अधिकार पदे भारतीय सैनिकांनी दिली जात नसत.
(ब) एकाच पदावर काम करणार्या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यांत फार मोठी तफावत केली जात होती.
(क) हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राऊंडवर त्यांचा अवमान कला जाई. वेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात.
(ड) लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत. धुमश्चक्री होऊन अनेक हिंदी शिपाई मारले जात मग गोरी फौज पुढे पाठविली जाई. म्हणजे मृत्यूला सामोरे जाताना भारतीय शिपाई व विजयाची माळ यात गोर्या सैन्याकडे, या प्रकारामुळे हिंदी शिपायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
तात्कालिक कारण
- इनफिल्ड बंदुका व चरबीयूक्त काडतूसे
काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला. इ. स. १८५७ मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या. या बंदुकांना लागणार्या काडतुसांचे सील गाई व डुकराच्याचरबीने बंद केले. या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणाची माहिती वार्यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली . त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला. नकार देणार्या शिपायांवर खटले भरण्यात आले. १० वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या या सैनिकंाना नोकरीतून काढून टाकणयत आले. त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि यामधून १८५७ च्या उठावाचा भडका उडाला.
उठावाचा कालखंड व नेत्यांची व्यक्तिगत भूमिका
- मंगल पांडेचे हौतात्म्य
Mangal Pandey |
२९ मार्च १८५७ रोजी बराकपूरच्या छावणीत उठावाची पहिली ठिणगी पडली. नव्याने वापरात आलेल्या इनफिल्ड बंदुका व त्यासाठी वापरण्यास येणारी चरबीयुक्त आपरणाने सील केलेली काडतुसे यामुळे सैनिकात पराकोटीची अस्वस्थता होती. लष्कारी कवायतीच्या प्रसंगी मंगल पांडे याने ही नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला. एवढयावरच न थांबता काडतूस वापरण्याची सक्ती करण्यासाठी पुढे आलेले ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन बाॅं कमांडर जनरल व्हिलर आणि लेफटनंट वाघ यांना गोळया झाडून ठार केले. शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले ही चकमक पाहणार्या एकाही हिंदी सैनिकास मंगल पांडे यांस मदत करावी असे वाटले नाही शेवटी कोर्ट मार्शल होऊन ८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो.
क्रांतीचे आयोजन
सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते. परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही परिणामत: रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांनी मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.
हे सर्वजण इंग्रजांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावलेले होते. इंग्रज हा सर्वाचा सामूहिक शत्रू होता. कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती. तर दिल्ली लखनौ कोलकज्ञ्ल्त्;ाा व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला व ३१ मे १८५७ हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला.
- मीरत
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. मंगल पांडेच्या फाशीची बातमी देशभरातील लष्करी छावण्यात वणव्यासारखी पसरली. काडतूस प्रकरणामुळे हिंदी शिपायांत संतापाची एकच लाट उसळली आणि यामधून ३ मे रोजी लखनौ व ५ मे रोजी अयोध्या येथील लष्करी तुकाडयांनी काडतूसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. ब्रिटिशांनी अशा शिपायांवर कठोर कारवाई केली. अनेकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली माीरतच्या छावणीमध्ये इ.स. ९ में १८५७ रोजी ८५ शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या सर्व शिपायांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांच्या पायात बेडया ठोकण्याचे काम सुरू झाले. मीरतच्या छावनीतील इतर हिंदी शिपायांना नियोजित वेळेपर्यत वाट पाहणे अवघड वाटू लागले. त्यांनी १० में १८५७ रोजी सायंकाळी उठावास सुरुवात केली. इंग्रज अधिकार्यांना ठार केले लगेचच तुरुंग फ़ोंडून भारतीय वैद्यांची मुक्तता केली. मीरत उठाववाल्यांच्या ताब्यात येताच कंपनी सरकारचे राज्य खालसा झाल्याची घोषणा करण्यात आली. हिंदी सैनिकांनी दुसर्याच दिवशी चौसष्ठ कि.मी. अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गामध्ये हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन मिळाले.
- दिल्ली
मीरतहून आलेली फौज दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई उठाववाल्यांना येऊन मिळाले. मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी घश्यात घातले होते. परंतु भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या होत्या. त्यामुळे उठाववाल्यांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूरशहाला धोका वाटत असतानाही बंडवाल्यापुढे त्यांचा नाईलाज झाला. ११ में रोजी बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली. बंडवाल्यांच्या आक्रमकतेपुढे ब्रिटिश नामोहरम झाले. उठाववाल्यांनी दिल्लीतील दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली पुढील धोका ओळखून ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग लावली. प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या २४ तासात दिल्ली उठाववाल्यांचा ताब्यात आली. बादशहा बहादूरशहा यांस भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.
Bahadur Shah Jafar |
उठावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिंग याने ब्रिटिश साम्राज्यामधून १ लक्ष २० हजार सैनिक बोलावून घेतले. तसेच भारतातही पंजाबी, गुरखा, शीख, रजपूत, यांची नव्याने भरती करून ३ लक्ष १० हजार फौज तयार केली इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सूरू केल्या तर बहादूरशहा व बंडवाले दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी दक्ष होत. इंग्रजांनी जून १८५७ मध्ये ६५ हजारांची फौज दिल्लीभोवती गोळा केली मानसशास्त्रीय दबाव ठेवण्यासाठी ज्ंिाकणे इंग्रजांना आवश्यक वाटू लागले १५ सप्टेंबर १८५७ रोजी बंडवाले व इंग्रज यांच्यामध्ये युध्दास तोंड फुटले बंडवाल्यांनी १० दिवस निकराने झुंज दिली. परंतु ब्रिटिशांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही. २५ सप्टेंबर १८५७ मध्ये दिल्ली इंग्रजांच्या हाती आली. दिल्ली ताब्यात येताच दहशत बसविण्यासाठी इंग्रजांनी अमानुषपणे कत्तल सुरु केली ब्रिटिशांनी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. बादशहा बाहदूरशहा यास कैद करुन एका हुजर्याच्या कोठीत डांबले.
- कानपूर
मीरत व दिल्ली येथील उठावाच्या यशस्वी वाटचालीमुळे सर्वच लष्करी छावण्यात अस्वस्थता निर्माण झाली. अशाच अस्वस्थ झालेल्या कानपूरमधील एका गोर्या शिपायाने ५ जून १८५७ रोजी हिंदी शिपायांवर गोळया झाडल्या यामूळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी बंड पुकारले नानासाहेब येथील उठाववाल्यांचे नेते बनले कानपूरमधील इंग्रजांनी एका खंदक असणार्या इमारतीचा आश्रय घेतला. नानासाहेबांनी या इमारतीस वेढा दिला इंग्रजांनी मोठया धैर्याने २१ दिवस उठाववाल्यांचा प्रतिकार केला शेवठी नानासाहेबाांशी करार करून इंग्रजांनी आपली सुटका करुन घेतली.
Nanasaheb Peshava |
१ जूलै १८५७ रोजी कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले. इंग्रजांना कानपूरमधील उठावाची बातमी समजताच कानपुरच्या दिशेने इंग्रज फौज धावू लागली. १२ जुलै १८५७ रोजी तुंबड युध्द झाले इंग्रजांच्या तोफखान्यापुढे नानाचा निभाव लागला नाही. १७ जुलै रोजी इंग्रजांनी कानपुरवर ताबा मिळविला. अवध संस्थानच्या माध्यामातून पुन्हा कानपुरवर ताबा मिळविण्यात नानासाहेब व तात्या टोपे यशस्वी झाले मात्र फार काळ त्यांना कानपूर टिकविता आले नाही.
ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पबेलने पुन्हा नानासाहेब व तात्या टोपे यांचा पराभव करुन कानपूर मिळविले. यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी निघून गेले तर मागे सेनापती तात्या टोपे मात्र जवळ जवळ दहा महिने इंग्रजांविरुध लढत होते. पंरतु फिरतिमुळे त्यांचाही घात झाला. इंग्रजांनी त्यांना पकडले व १८ एप्रिल १८५९ रोजी फासावर लटकविले.
- लखनौ
Hajarat Mahal Begam |
र्लॉड डलहौसीने अयोध्या (औंध/अवध) संस्थान खलसा केले. ३० मे १८५७ रोजी अयोध्या संस्थानात उठावास सुरुवात झाली अयोध्या संस्थानच्या नवाबाच्या हजरत महल या बेगमने बंडवाल्याचे नेतृत्व केले आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसवून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले. ब्रिटिश सेनापती हॅव लॅक मोठी फौज घेऊन सप्टेंबर १८५७ मध्ये लखनैास आला. बंडवाल्यांशी लढा देऊन १७ नोव्हेंबर १८५७ रोजी बंडवालयांचा ब्रिटिश रेसिडेन्साी भेावतीचा वेढा उठविला. इंग्रजांनी ताकद वाढत असतानाच ब्रिटिश सेनानी जनरल कॅम्बेल २० हजारांची फौज घेऊन लखनौस पोहोचला. त्यांनी बंडवाल्याशी मुकाबला दिला. बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली बंडवाल्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. शेवटी २२ मार्च १८५७ रोजी ब्रिटिशांनी लखनौ मिळविण्यात यश मिळविले.
- बिहार
Kunvar Singh |
- झाशी
Zansi ki raani |
र्लॉड डलहौसीने दत्ताक वारस नामंजूर या तत्वाखाली झाशीचे राज्य खालसा केले राणीच्या दत्ताक पुत्रास राज्याधिकार नाकारणसत आला आपल्या मुलाच्या मुंजीसाठी आपल्याचा खजिन्यातील १ लाख रुपयांची मागणी राणीने इंग्रजाकडे केली. इंग्रजांनी यासाठी जामीन मागितला यामुळे राणी अपमानित झाली व तिने हाती शस्त्र घेंतले उठावाची वार्ता जसजशी समजेल तस-तसे उठावाचे लोण पसरत होते. ६ जून १८५७ रोजी झाशी येथील हिंदी शिपायांनी बंड पुकारून इंग्रज अधिकार्यांची कत्तल केली. यापाठी मागे राणीचा हात आहे. असे वाटून इंग्रजांनी राणीच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.
संभाव्य धोका ओळखून राणीनेही आपली लष्करी सिध्दता केली. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठया निर्धाराने किल्ला लढवू लागली राणीच्या मदतीस तात्या टोपे धावून आले. पण त्यांना पराभवास सामोरे जोवे लागले ब्रिटिश सेनापती सर हयूरोज याने किल्ल्याच्या तटबंदीस खिंडार पाडलें इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश करताच भयंकर कतल सुरु केली. मोठया युक्तीने आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोडयावर स्वार होऊन राणी किल्ल्याबाहेर पडली. काल्पीच्या दिशेने राणीची दौड सुरु झाली. १०० मैलाचे अंतर राणीने वार्याच्या वेगाने पार केले.
Tatya Tope |
झाशीची राणी लक्ष्मीबाई काल्पीला येताच नानासाहेब पेशवे तात्या टोपे, बांद्याचा नवाब इ. नेते एकत्र आले. ब्रिटिश सेनापती सर हयू रोज काल्पीवर आक्रमण केले. बंडवाले आणि इंग्रज यांच्यात दोन लढाया झाल्या पण त्यात बंडवाल्यांचा पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले. राणी व तात्या टोपे ग्वाल्हेरला येताच तेथील सैनिकात उत्साह संचारला व त्यांनी बंडाचे निशान उभारले यावेळी ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव मात्र आगर्यास पळून गेला. ग्वाल्हेरचा किल्ला जून १८५८ मध्ये बंडवाल्यांच्या ताब्यात आला. ग्वाल्हेरच्या बंडाची बातमी समजाताच सर हयेरोज काल्पीहून ग्वाल्हेरला आला राणी, तात्या टोपे व इंग्रज यांचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु होता. ग्वाल्हेर ज्ंिाकणे इंग्रजाना आवश्यक वाटू लागले. त्यांनी बंडवाल्यांवर आक्रमण केले यावेळी राणी लक्ष्मीबाई उठावाचे स्वत: नेतृत्व करत होती सर ह्यूरोज व जनरल स्मिथ यांच्या भेदक मार्यापुढे उठाववाल्यांचा निभाव लागेनासा झाला राणीला शत्रूने वेढा दिला.
राणीने मोठया चपळतेने घोडा उडवून वेढयाचा छेद केला. ब्रिटिश फौज पाठीवर होतीच अशा आणीबाणीच्या प्रसंगी एका ओढयाजवळ राणीचा घोडा अडला पाठलाग करणार्या इंग्रज सैनिकांनी राणीच्या डोक्यावर छातीवर जबर वार केले. राणीने पराक्रमाची शर्थ केली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी राणीने वार करणार्या दोन शत्रू सैनिकांना ठार केले. राणीच्या मृत्यूने १७ जून १८५८ उठावाच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला.
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
- उठावाचे क्षेत्र मर्यादित
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.
- योग्य नेतृत्वाचा अभाव
उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.
- एकाच ध्येयाचा अभाव
१८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता. ंिहंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.
- नियोजनाचा अभाव
ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.
- जनतेच्या पाठिंब्याचा अभाव
१८५७ च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.
- स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत
फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.
- लष्करी साहित्यातील तफावत
लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या २ हजार इंग्रजांनी १ लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो. मला गोर्या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.
- दळणवळणाच्या साधनातील प्रगती
र्लॉड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.
- अनुभवी ब्रिटिश सेनापती
उठावाचे नेतृत्व करणारे नानासाहेब तात्या साहेब टोपे बहादूर शहा, झाशीची राणी, हे पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी हॅव, लॉक, कॅम्बेल, नील, लॅरेन्स, हयू, रोज, हे अत्यंत पराक्रमी अनुभवी व मुत्सदी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या त्यामुळे त्यांचा विजय झाला.
- इंग्लडची मदत
१८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून १ लक्ष १२ हजाराची फौज आणली आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती त्यामुळे १८५७ च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.
so usfull
उत्तर द्याहटवा