Post views: counter

भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ


एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला संपूर्ण आशिया खंड मागासलेल्या अवस्थेत होता. याउलट युरोपात क्रांतीचे युग सुरु झाले होते. फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्फूर्ती घेऊन युरोपातील अनेक राष्ट्रांनी मध्ययुगीन जुलमी व एकतंत्री राजवटींना आव्हान दिले होते. इंग्लंडमध्ये तर सतराव्या शतकाच्या अखेरीसच राजेशाहीला मर्यादित चौकट निर्माण झाली होती. अठराव्या शतकाच्या उतरार्धात, इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती होऊन नव्या भौतिक संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीच्या प्रभावामुळे मध्ययुगीन रीतीरिवाज, अंधश्रध्दा आणि भाषांतरांवरूनरामक समजूती यांना हादरा बसला. मानवी जीवनाला गतिमानता प्राप्त झाली नवीन आचारमुल्ये निर्माण होऊ लागली भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सज्ञ्ल्त्;ाा प्रस्थापित होत असतानाच धार्मिक आणि सामाजिक सुधारणा
चळवळींना प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी सत्ताविस्तार करताना युरोपात ज्या शासन व्यवस्थेत सुधारणा झाल्या होत्या, त्याचा उपयोग आपल्या या वसाहतींमध्ये करुन घेण्याचे धोरण स्वीकारले, महसूल व्यवस्था, करपध्दती, शिक्षण व्यवस्था यासारख्या विविध क्षेत्रांत ब्रिटिशांनी महत्वपूर्ण बदल घडवून आणले. त्यामुळे मध्ययुगीन अनियंत्रित सत्तेखाली पारंपरिक जीवन जगणार्‍या भारतीय समाजाला हा नवा बदल सुखावणारा वाटला. ब्रिटिशांची शिस्त, ज्ञम्प्;म्प्;ाानलालसा, कायद्यावरील श्रध्दा, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. गुण पाहून भारतीय जनता सुरुवातीस आश्चर्यकित झाली. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा तत्कालीन विचारवंतांना वाटू लागली भारतीय समाजात शेकडो वर्षापासून चालत आलेल्या अनिष्ट रुढी परंपरा भाषांतरांवरूनरामक समजुती धर्मभोळेपणा, वाटू लागली, या विचार प्रवाहामुळे इंग्रज हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अशी भावना काही काळ निमार्ण झाली. परंतु त्याचबरोबर भारतीय समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी नव्या वैचारिक क्रांतीची गरज आहे यांची जाणीवही विचारवंतांना झाली यातूनच भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ झाला. यालाच भारतीय प्रबोधनाचे असेही म्हणतात. बंगालमधील आद्य सुधारक राजा राममोहन रॅाय हे प्रबोधनाचे जनक मानले जातात. त्यांनी सुरु केलेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे लोण हळूहळू सर्व भारतभर पसरले या धार्मिक व सामाजिक पुनरुज्जीवनाची करणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

ब्राम्हो समाज

Raja Rammohan Roy
धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला. विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषंाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले. ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते. आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती. त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते. त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता.
सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने १८२९ साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.
  • ब्राम्हो समाजाची स्थापना-

त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते. हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते. हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञा;म्प्;ाानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदंात सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी १८२८ मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

प्रार्थना समाज

ब्राम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने १८४९ मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली. १८६७ मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आत्माराम पांडुरंग १८२३-१८९८ नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते. प्रार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत. थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती. एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला. मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.
समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले.
(१)जातिभेद निर्मूलन (२) बालविवाह प्रतिबंध,(३) विधवा विवाह (४) स्त्री शिक्षण ,
या चळवळीचे आध्यात्मिक नेतृत्व न्या. माहदेव गोविंद रानडे यांनी केले राष्ट्रीय काॅंग्रेसच्या अधिवेशनात भरवल्या जाणार्‍या समाज सुधारणा परिषदेच्या संस्थापकांपैकी न्या. रानडे हे होते. प्रार्थना समाजाची शिकवणूक लोकांना कळावी व त्यावरील आक्षेप दूर व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी एकेश्र्वरी निष्ठेची कैफियत हा निबंध लिहिला. रानडे यांचे असे मत होती की एखादी दुसरी सुधारणा करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजच बदलावयास हवा ते म्हणतात सुधारणा अमलात आणत असताना भूतकाळाशी संबंध तोडून चालणार नाही कारण शेकडो वर्षाच्या सवयी व प्रवृज्ञ्ल्त्;ा्ीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खर्‍या सुधारकाला कोर्‍या पाटीवर लिहावयाचे नाही तर अर्धवट असलेले वाक्य पूर्ण करावयाचे आहे. रानडे यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या तत्वांचा असा काही सुंदर उपयोग केला की, ही तत्वे भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरावी. डॉ भांडारकरांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांची भाषांतरे केली. त्यानी आपल्या एका भाषणात परमेश्र्वर सगूण आहे हे तत्वही मान्य केलेले आढळते. परमेश्र्वराची एकाग्रतेने प्रार्थना केली असता, अंत:करण शुध्द होऊन निश्चय सामर्थ्य प्राप्त होते. अशी या समाजाची विचारसरणी होती. प्रार्थना समाजातील सभासद हे बुध्दी प्रामाण्यावादी होते. भागवत धर्मावर त्यांची पूर्ण श्रध्दा होती. म्हणूनच संत तुकाराम व नामदेव या संतांनी सांगितलेल्या शिकवणूकीचा त्यांनी प्रचार केला ना.म.जोशी यांनी १९११ मध्ये कामगारांची स्थिती सुधारावी यासाठी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. न्या रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विधवा डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापन केले. पंढरपूरचे अनाथ बालिकाश्रम मुलीच्या शाळा इ. संस्था प्रार्थना समाजाच्याच कार्यकर्त्यानी स्थापन केल्या होत्या जस्टिम चंदावरकर व वामन आबाजी मोडक हे देखील प्रार्थना समाजातील मान्यवर सभासद होते.

सत्सशोधक समाज

fule
शूद्र, अतिशूद्र, यांच्या वतीने उच्च वर्णियांविरूध्द लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे ज्योतिबा हे महाराष्ट्र्राचे पहिले समाज सुधारक होते. ख्रिस्ती धर्मातील समतेचे तत्व त्यांना आवडत होते तसेच मिशनर्‍यांच्या समाजसेवेबदल त्यांना आदर वाटत होता. पण ज्योतिबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही त्यांना माणसामाणसांमधील जातिबंधने नष्ट करून आपल्याच धर्मात समता आणावयाची होती. जातिभेदाविरुध्द आवाज उठविताना ते सामान्यांना समजेल अशा भाषेत म्हणतात, मानव प्राण्यात मूळ जातिभेद नाही. पशूपक्षी वगैरे प्रत्येक प्राण्यात जर जातिभेद नाही, तर मानव प्राण्यात कोठून असणार जातिभेद व अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. एवढेच नव्हे तर महारवाडयातील मुलांना शिकवून आपल्या घरातील हौद अस्पृष्यांसाठी खुला करुन आपल्या सेवाभावी वृत्तीवरचा आदर्श समाजासमोर उभा केला.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केला या समाजाची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. (१) सामाजिक विषमता व दलितांची दु:खे नाहीशी करणे (२) समाजातील भटभिक्षुकांच्या व उच्च वर्णियांच्या जुलूमांचा प्रतिकार करणे, (३) अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करुन सोडणे, (४) मानवधर्माचे व ईश्र्वरभक्तीचे सत्य स्वरूप बहुजन समाजासमोर ठेवणे यांसारख्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी त्यांनी आयूष्यभर प्रयत्न केले.

आर्य समाज

Swami Dayanand Saraswati
आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांचा जन्म १८२४ मध्ये गुजरातमधील टंकारा मध्ये झाला. त्यांचे मुळ नाव मूळशंकर हे होते. १८४६ मध्ये त्यांनी लहानपणीच घरदार सोडून संन्यास घेतला. १५ वर्षे ते सतत भटकत राहिले. संस्कृतचे अध्ययन व ज्ञानप्राप्तीसाठी निरनिराळया ठिकाणी प्रवास करीत असतांना त्यांची मथुरा येथे स्वामी विरजानंद सरस्वती नावाच्या एका अंध पंडिताशी १८६० मध्ये गाठ पडली. स्वामी विरजानंद यांच्याकडूनच त्यांना वेदांचा खरा अर्थ समजला व वेदांवर त्यांची गाढ श्रध्दा निर्माण झाली. विरजानंदांनीच त्यांचे नाव दयानंद असे ठेवले.
प्राचीन वैदिक धर्म शुध्द स्वरुपात मांडण्याच्या उद्दिष्टाने त्यानी मुंबई येथे १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली. गुरुच्या प्रेरणेने वैदिक धर्माच्या प्रसाराचे कार्य करण्याचा त्यांनी निर्धार केला. हे कार्य पार पाडण्यासाठी ते देशाच्या निरनिराळया भागात प्रवास करुन हिंदी व संस्कृत भाषेत प्रवचने व भाषणे करु लागले. पुढे आर्य समाजाच्या शाखा देशाच्या विविध भागात स्थापन झाल्या १८७७ मध्ये पंजाबातील लाहोर येथे आर्य समाजाची एक नवीन शाखा त्यांनी स्थापन केली. हेच शहर पुढील काळात आर्य समाजाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले वेदांकडे परत चला ही स्वामी दयानंद सरस्वतींची घोषणा होती.

आर्य समाजाचे तत्वज्ञान व कार्य

या समाजाचे प्रमुख तत्वज्ञान पुढीलप्रमाणे (१) ईश्र्वर निर्गुण व निराकार आहे. (२) या समाजास बहुदेवता वाद व मूर्तिपूजा मान्य नाही. (३) आर्यसमाज वेद प्रामाण्यावर भर देतो (४) मानव धर्माचे आचरण करुन मोक्ष मिळवता येतो. (५) ईश्र्वर हा सच्चिदानंद स्वरूप आहे.(६) आर्य समाज वेद प्रामाण्यावर भर देतो.

थिऑसॉफिकल सोसायटी

भारतीय संस्कृती आणि विचारसरणी यांचा प्रभाव पडलेल्या पाश्चात्य विद्वानांनी थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन केली. अमेरिकेतील न्यूर्यॉक शहरात मॅडम ब्लाव्हाटस्की (रशियन) आणि कर्नल हेन्री स्टील आलकॉट (अमेरीका) यांनी भारतात येण्याची विनंती केली असता ते १८७९ मध्ये भारतात आले. त्यावेळी ज्या धार्मिक व सामाजिक चळवळी भारतात चालू होत्या त्या चळवळीशी त्यांचा संबध आला. ऑलकॉट हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या कार्याने फार प्रभावित झाले होते. म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या बरोबर कार्य केले. ब्लाव्हाटस्की आणि ऑलकॉट या दोघांनी लोकांच्या मनावरील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. १८८६ मध्ये या दोघांनी मद्रासजवळ अडयार येथे थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्य कार्यालय स्थापन केले. (१) आत्मिक उन्नती व आंतज्ञम्प्;म्प्;र्ाानाद्वारे ईश्र्वर ज्ञान प्राप्त करणे सोसायटीच्या अनुयायांचे उद्दिष्ट होते. (२) कर्मवाद आणि पुनर्जन्म यावर त्यांचा विश्र्वास होता. (३) अध्यात्मिक बंधुभाव निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. अशा रीतीने थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य हिंदू धर्माला पूरक असेच होते.

Annie Besant
१९०७ मध्ये ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्षपद श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांच्याकड गेले. आणि तेव्हापासून या सोसायटीचे कार्य लोकप्रिय बनले. सुरुवातीपासून अ‍ॅनी बेझंटचा ख्रिश्चन धर्मावर विश्र्वास नव्हता शेवटी आपल्या ख्रिश्चन धर्म प्रचारक असलेल्या पतीशी घटस्फोट घेऊन बेझंट १८८२ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीच्या संपर्कात आल्या १८९१ मध्ये ब्लाव्हाटस्कीच्या मृत्यूनंतर त्या भारतात आल्या भारतीय विचार आणि संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध होता. भगवदगीतेच्या त्यांनी केलेल्या अनुवादावरुन त्यांचा वेदांतावर विश्र्वास होता हे दिसून येते. त्या जन्माने आयरिश होत्या. भारताला आपली मातृभूमी व हिंदू धर्माला आपला धर्म मानून त्यांनी या देशाची फार मोठी सेवा केली. भारतीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी बेझंट बाईनी धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात फार मोलाची कामगिरी बजावली. बनारस येथे स्वत:चा पैसा खर्च करून स्वत:च्याच इमारतीत त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली पुढे हे कॉलेज त्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या हाती सोपविले. या बाईच्या प्रभावामुळे अनेक विद्वान व उच्च वर्गीय नेते मंडळी थिऑसॉफिकल सोसायटीच्या कार्यात भाग घेऊ लागले.
थिऑसॉफी हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. थिऑस म्हणजे परमेश्र्वर आणि सोफिया म्हाजे ज्ञान त्यानुसार थिअ‍ॅासॉफि या शब्दाचा अर्थ ईश्र्वरीय ज्ञान असा होतो. संस्कृतमध्ये याला ब्रम्हविद्या असे म्हणतात ही सोसायटी सर्व धर्म समानतेवर आणि एकेश्र्वरवादावर विश्र्वास ठेवते स्त्री पुरुष हे दोघेही समान आहेत. संत महात्मे गुरु मनुष्याला निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवतात म्हणून समाजाने त्यांचा उपदेश ग्रहण करुन त्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. जगात जे काहि घडते ते ईश्र्वरी प्रेरणेनेच घडते. पशुपक्ष्यांबदल दयाबुदी बाळगावी सर्वच धर्माना महत्वाचे स्थान आहे कारण प्रत्येक धर्म मनुष्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो. या गोष्टीवर या सोसायटीचा विश्र्वास होता.
थिऑसॉफिकल सोसायटीने शिक्षण प्रसाराचे कार्य फार मोठया प्रमाणावर केले ठिकठिकाणी त्यांनी शाळा, कॉलेज व वसतिगृहाची स्थापना केली. अ‍ॅनी बेझंटने स्वखर्चाने बनारस येथे उघडलेल्या सेंट्रल हिंदू कॉलेजचे रुपांतर पुढे बनारस हिंदू विश्र्व विद्यालयात झाले. त्यांनी १९१२ नंतर भारतीय राजकारणात प्रवेश करुन टिळकांना कॉग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळावा आणि जहाल मवाळ गटांचे सामीलीकरण होऊन कॉग्रेस पुन्हा प्रबळ व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आले. होमरूल लीग स्थापन पुन्हा प्रबळ व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आले. होमरूल लीग स्थापन करुन देशाला स्वायज्ञ्ल्त्;ा शासन मिळावे यासाठी चळवळ सुरु केली त्यामूळे १९१७ मध्ये सरकारने त्यांना स्थानबध्द केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी केलेले कार्य फार महत्वाचे मानले जाते.

रामकृष्ण मिशन

(अ) स्वामी रामकृष्ण परमहंस

रामकृष्ण परमहंसाचे जिवन विचार व कार्य या गोष्टी या मिशनचा आत्मा आहे. स्वामी रामकृष्णांचे मुळ नाव गदाधर चटोपाध्याय हे होते. पश्चिम बंगाल हुबळी जिल्हयातील कामारपुकुर नावाच्या खेडेगावात ब्राम्हण कुटुंबात १८३६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. अगदी लाहानपणापासून परमेश्र्वर भक्तीकडे त्यांचा ओढा होता.
Swami Ramkrushna Paramhance
वयाच्या १७ व्या वर्षी ते कोलकत्यास आले आणि २१ व्या वर्षी कोलकत्याजवळील दक्षिणेश्र्वराच्या कालीमंदिराचे पुजारी झाले. त्यांचा विवाह झाला होता, पण आपल्या पत्नीला ते देवीच्या स्वरुपात पाहात असत. निरनिराळया स्वरुपात त्यांना परमेश्र्वरी साक्षात्कार झाला त्यांचे अधिकांश जीवन काली मंदिरातच व्यातीत झाले. १८८६ मध्ये त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. रामकृष्णांनी कोणताही संप्रदाय किंवा मठ स्थापन केला नाही. ते लोकांना साध्या पध्दतीने उपदेश करीत.
राजा राममोहन रॉय व स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रमाणे त्यांनी वेदांचा अभ्यास केला नसला तरी, त्यांची वैचारिक बैठक वेदांवरच आधारलेली होती. ते म्हणत असत, मनुष्याचे एकमेव ध्येय परमेश्र्वर प्राप्तीचे असेले पाहिजे ही प्राप्ती अध्यात्म वादाच्याय मार्गाने होऊ शकेल त्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही.
तसेच ते म्हणत संसारात राहा कार्य करा आणि इच्छांवर लगाम घालण्यापेक्षा त्या परमेश्र्वरप्राप्तीकडे वळवा. ज्ञानापेक्षा चारित्र्य निर्मितीवर त्यांचा अधिक भर होता. ते म्हणत विवेक व वैराग्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. हिंदू समाजात आपल्या पवित्र धार्मिक ग्रंथांबदल श्रदधा आणि विश्र्वास त्यांनी निर्माण केला. ते सर्व धर्म समान समजत. ते म्हणत व्यक्तीने धर्मातर करू नये. सर्व धर्म ईश्र्वर प्राप्तीचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी कोणताही मार्ग अनुसरला तरीही ईश्र्वर प्राप्ती होऊ शकेल.

सिंग सभा :

आर्य समाजाच्या शाखा पंजाब प्रातांत अनेक ठिकाणी स्थापना झाल्या होत्या. तेथील शीख समाजाने आर्य समाजाला प्रारंभी पाठिंबा दिला; परंतु वेदांवरील निष्ठेचा आर्य समाजाने धरलेला आग्रह त्यांना मान्य नव्हता. त्यांनी अमृतसर येथे 'सिंग सभा' नावाची संस्था स्थापना केली. गुरू गोविंदसिंगांच्या शिकवणुकीचे पुनरूज्जीवन करणे व शिक्षणप्रसार करणे ही सिंग सभेची मुख्य उद्दिष्टे होती. शीख समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य सिंग सभेने केले. त्यासाठी अमृतसर येथे १८९२ साली खालसा कॉलेज सुरू करण्यात आले.

साहित्य, कला आणि विज्ञान या क्षेत्रांतील प्रगती :

सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारकांनी साहित्य आणि कला यांचा वापर केला. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा आग्रह धरला. त्यामुळे साहित्य, कला व विज्ञान या क्षेत्रांतही प्रबोधन काळात लक्षणीय बदल घडून आले.
प्रबोधन काळात आधुनिक भारतीय साहित्याचा उदय झाला. छापखान्यांच्या उदयामुळे त्यास गती मिळाली. साहित्याच्या विषयांमध्ये फार मोठा फरक पडला. पूर्वीच्या देवादिकांच्या पौराणिक कथांच्या जागी सामान्य माणसांच्या कथा आल्या. सामान्य माणसांची सुखदु:खे, त्यांच्या आशा-आकांक्षा यांना वाङ्मयात स्थान मिळू लागते. अद्भुत गोष्टींच्या जागी प्रत्यक्षात घडणार्‍या वास्तव गोष्टींवर भर देण्यात आला. निसर्गसौंदर्य, सामाजिक प्रश्न इत्यादी विषयांचा वाङ्मयातून प्रत्यय येऊ लागला. सामाजिक प्रश्न कादंबरीचे विषय झाले. बाबा पदमनजी यांनी विधवांच्या दारूण परिस्थितीवर 'यमुनापर्यटन' ही कांदबरी लिहीली. ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. राष्ट्रवाद आणि देशप्रेम यावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'आनंदमठ' ही कांदबरी लिहीली. 'वंदे मातरम्' हे गीत त्याच कादंबरीत आहे. 'सरस्वतीचंद्र' ही गुजराती भाषेतील सामाजिक कांदबरी याच काळात लिहिली गेली. कवितेच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले. केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेचा पाया घातला. निसर्गसौंर्य, देशाभिमान, सामाजिक परिस्थिती, मानवी भावभावना इत्यादीचा ह्रद्यस्पर्शी आविष्कार भारतातील विविध प्रादेशिक भाषामधील कवितांमधून होऊ लागला. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांना तर जागतिक मान्यता मिळाली. त्यांना साहित्याचा 'नोबेल पुरस्कार' देण्यात आला.
ललित साहित्याबरोबर या काळात वैचारिक लेखनाही विपुल प्रमाणात झाले. निंबध हा वैचारिक साहित्याचा प्रकार रूढ झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तो आपल्या 'निबंधमालेतून' मराठी वाचकांत विशेष लोकप्रिय केला. विविध विषयांवरील निबंध, कथा, कविता, नाटके ही सामान्य वाचकापर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य प्रादेशिक भाषामधील नियतकालिकांनी केले. संवाद कौमुद्री,उद्रन्तमार्तंड, दर्पण, प्रभाकर, ज्ञानप्रकाश, रास्त गोफ्तार ही त्यांपैकी काही नियतकालिके होती.
साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. अजिंठा शैली, मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे पुनरूज्जीवन झाले. स्थापत्य शैलीवर पाश्चात्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला. मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वेस्थानक व कोलकता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल या वास्तू या संमिश्र शैलीची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.
इंग्रजी शिक्षंणामुळे विज्ञान व तंत्रज्ञाम्प्;ाानाचा अभ्यास भारतात होऊ लागला. मुंबई, कोलकज्ञ्ल्त्;ाा, चेन्नई येथे विद्यापीठे स्थापन झाली. वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या अभ्यासाला गती मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा