Post views: counter

केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग:


  1. भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
  2. डॉ. नरेंद्र जाधव समिती-  विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
  3. राम प्रधान समिती-  २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
  4. माधवराव चितळे समिती-  मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
  5. न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेबआंबेडकर
    यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
  6. बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या कल्याणाकरिता
  7. न्या. बापट आयोग (२००८)- मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
  8. न्या. सराफ आयोग (२००९) - मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
  9. न्या. राजन कोचर समिती- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
  10. डॉ. अभय बंग समिती-  कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
  11. विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.
  12. देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
  13. प्रा. वि. म. दांडेकर समिती- प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्
  14. प्रा. जनार्दन वाघमारे समिती-  नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती
  15. पी. एस. पाटणकर समिती-  महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी
  16. वसंत पुरके समिती (२००८)-  शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती
  17. सुनील तटकरे समिती (२००९)- रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती
  18. अशोक बसाक समिती- दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
  19. न्या. राजिंदर सच्चर समिती- मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती
  20. जगदीश सागर समिती (१९९५)-नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
  21. न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी
  22. के. नलिनाक्षण समिती - ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
  23. नंदलाल समिती- ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती
  24. न्या. बी. एन. श्रीकृष्ण- सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
  25. न्या. कुलदीपसिंग समिती - मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी
  26. लिबरहान आयोग - बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
  27. न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती- गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
  28. फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
  29. मणिसाना आयोग- पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा