- भारत, पाकिस्तानला ‘एससीओ’चे सदस्यत्व
भारत आणि पाकिस्तानने शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (एससीओ) सहभागी होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे.पश्चिमेकडील देशांच्या आघाडीप्रमाणेच ‘एससीओ’चेही महत्त्व असून, त्यावर रशिया आणि चीनचे अधिपत्य आहे. ‘एससीओ’तील सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियातील ऊर्जास्रोतांचा लाभ होणार आहे.आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानाला ‘एससीओ’च्यानिरीक्षकांचा दर्जा प्राप्त होता.दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेसाठी भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियामध्ये आहेत.
शांघाय सहकार्य परिषद
स्थापना : २६ एप्रिल १९९६
संस्थापक सदस्य : चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताझिकिस्तान उझबेकिस्तान १५ जून २००१ पासून सदस्य.
उद्देश : मध्य आशियामध्ये संरक्षणासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे.
- विंबल्डन स्पर्धा आणि भारत :
भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली आहे.महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र
दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ऍलेक्झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) यांचा 6-1, 6-1 असा चाळीस मिनिटांत पराभव केला आहे.
हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले. तर तिने शनिवारी भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. तसेच पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
यामध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलिया (2012), फ्रेंच
(1999, 2001, 2009) विंबल्डन (1999), अमेरिका (2006, 2009, 2013), तर मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलिया (2003, 2010, 2015), विंबल्डन (1999, 2003, 2010, 2015) आणि अमेरिका (2008) या विजेतेपदांचा समावेश आहे. तर मिश्र दुहेरीत त्याने आठव्यांदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे.

- ब्रिक्स राष्ट्रांच्या समन्वयासाठी मोदीयांचा १० कलमी कार्यक्रम
‘ब्रिक्स’ गटातील राष्ट्रांमध्ये अधिक निकटचे सहकार्य आणि समन्वयाच्या आवश्यकतेवर भर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्देशाने ९ जुलै रोजी दहाकलमी कार्यक्रम सुचवला.‘दस कदम : भविष्यासाठी दहा पावले’ असे याचे वर्णन करून मोदींनी उगवत्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या ‘ब्रिक्स’ गटासाठी नवे उपक्रम सुचवले.भारत या गटासाठी पहिला व्यापार मेळावा भरवेल, तसेच रेल्वे आणि शेती या क्षेत्रांसाठी संशोधन केंद्र स्थापन करेल, असे त्यांनी जाहीर करून त्यांनी या दृष्टीने पहिले पाऊल उचलले.जगातील प्रत्येक देशासमोर असलेली आव्हाने लक्षात घेता, सर्व मोठय़ा देशांमध्ये मतैक्य, सहभाग आणि सहकार्य असणे महत्त्वाचे आहे, असे परिषदेच्या पूर्णवेळ अधिवेशनात बोलताना ते म्हणाले.पंतप्रधानांच्या ‘ब्रिक्स’साठी प्रस्तावित उपक्रमांमध्ये व्यापार मेळावा, रेल्वे संशोधन केंद्र, सर्वोच्च अंकेक्षम संस्थांमध्ये सहकार्य, डिजिटल उपक्रम आणि कृषी संशोधन केंद्र यांचा समावेश आहे.रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, ब्राझीलचे अध्यक्ष दिल्मा रोसेफ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा व चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग या परिषदेत सहभागी झाले होते.
- RBI आणि सेन्ट्रल बँक ऑफ श्रीलंका दरम्यान विशेष ‘चलन विनिमय करार’
उद्देश :-
कठीण वित्तीय संकटात गंगाजळीची समस्या निर्माण होते. (परकीय चलन हातात नसते.) त्यावेळी हा करार वित्तीय आधार देण्याचे काम करेल.या करारानुसार श्रीलंकेची सेन्ट्रल बँक ६ महिन्यांसाठी $१.१ बिलियन रक्कम काढू शकते.

'सार्क चलन विनिमय आराखडा’ :-
सार्क देशांनी परस्परांत 'सार्क चलन विनिमय आराखडा’ करार केलेला आहे.
त्यानुसार वित्तीय संकटकाळात (चलन तरलता विषयक समस्या असताना) हे देश परस्परांना पैसा पुरवू शकतात.
जोपर्यंत संबंधित देश या संकटातून बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याला इतर सार्क देश मदत करतील.
यापूर्वी मार्च २०१५ मध्ये भारताने श्रीलंकेशी 'सार्क चलन विनिमय आराखडा’ करार केला आहे.सार्क देशांनी परस्परांत 'सार्क चलन विनिमय आराखडा’ करार केलेला आहे.
त्यानुसार वित्तीय संकटकाळात (चलन तरलता विषयक समस्या असताना) हे देश परस्परांना पैसा पुरवू शकतात.
जोपर्यंत संबंधित देश या संकटातून बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याला इतर सार्क देश मदत करतील.
त्यानुसार $४०० मिलियनचे विनिमयन करता येऊ शकते. ($२ बिलियनच्या मर्यादेत)
- नासाने लावला पृथ्वी 2.0 चा शोध :
केप
कॅनॅव्हरल (फ्लोरिडा) - नासा या अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन
संस्थेस पृथ्वीशी अत्यंत साधर्म्य असलेल्या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले
आहे.
केप्लर या नासाच्या जगप्रसिद्ध अवकाश यानाच्या सहाय्याने हा अत्यंत महत्वपूर्ण शोध लावण्यात आला आहे. या ग्रहाचे नामकरण केप्लर -452 बी असे करण्यात आले आहे.
पृथ्वीपेक्षा सुमारे 60 पट मोठा असलेला हा ग्रह सायग्नस या नक्षत्रसमूहामध्ये असून, तो सुमारे 1400 प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. केप्लर 452 बी हा सूर्याशी साधर्म्य असलेल्या ताऱ्याभोवती फिरत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय, हा तारा व केप्लर 452 बी यांमधील अंतर हे सुमारे पृथ्वी-सूर्यामधील अंतराइतकेच आहे.
केप्लर 452 बी 385 दिवसांच्या कालावधीमध्ये या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले तसेच या ताऱ्याच्या आकारावरुन तो खडकाळ असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
"केप्लर 452 बी म्हणजे पृथ्वीचा आकाराने व वयाने मोठा असलेला भाउ असल्याचे नासाने म्हटले आहे.

- देशातील बरीचशी जनता अजूनही बँकेशी जोडली गेलेली नाही.ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) दीपक मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
दीपक मोहंती = RBI चे कार्यकारी संचालक
समितीचे कार्य :- -
ही समिती नागरिकांच्या वित्तीय अंतर्भावासाठी ५ वर्षांचा योजना आराखडा तयार करेल. (केवळ ४ महिन्यांत)
हा आराखडा असा असेल कि त्याच्या निष्पत्तीवर RBI ला लक्ष ठेवता येईल.
ही समिती संस्थागत आणि धोरणात्मक आराखडा बनवेल.
ग्रामीण भागाच्या वित्तीय अंतर्भावावर ही समिती जास्त भर देईल.

प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) :- -
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने PMJDY योजना सुरु केली होती.
तिचा उद्देश सुद्धा वरील योजनेप्रमाणेच होता. – जास्तीत जास्त लोकांना बँक खाती उघडून देणे = वित्तीय अंतर्भाव (Financial Inclusion).
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने PMJDY योजना सुरु केली होती.
तिचा उद्देश सुद्धा वरील योजनेप्रमाणेच होता. – जास्तीत जास्त लोकांना बँक खाती उघडून देणे = वित्तीय अंतर्भाव (Financial Inclusion).
- न्यायमूर्ती लोढा समिती:
- गरिबी हटावसाठी कौशल्यवृद्धी मिशन: अनेक विकसित देशांकडे संपत्ती आहे, मात्र मानव संसाधनांचा अभाव आहे. देशातील मनुष्यबळाला योग्यरीत्या प्रशिक्षण दिले गेल्यास नजीकच्या भविष्यात केवळ भारतच जगाची कुशल मनुष्यबळाची गरज भागवू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी ‘स्किल इंडिया मिशन’चे उद्घाटन करताना बुधवारी व्यक्त केला. सन २०२२पर्यंत १५ हजार कोटी रुपये खर्च करून देशातील ४० कोटी व्यक्तींना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्याचे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
- सय्यद हैदर रजा यांना 'द लिजन ऑफ ऑनर' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान :
आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांना 'द लिजन ऑफ ऑनर' या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चित्रकलेतील अनोख्या उपलब्धींबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मंगळवारी रात्री फ्रान्सच्या दिल्लीतील
दूतावासात आयोजित कार्यक्रमात राजदूत फ्रेंकोई रिचियर यांनी हा पुरस्कार
प्रदान केला.
हा सन्मान फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून दिला जातो.
तसेच ज्यांनी जगाला सुंदर बनविण्यात योगदान दिले अशा व्यक्तींना हा पुरस्कार बहाल केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा