- मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा :
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तब्बल 30 हजार कोटी रुपयांत उभारला जाणारा हा महामार्ग 2019 पर्यंत बांधला जाणार असून, या महामार्गावर ऑप्टिक फायबरचे जाळे असेल.
घोटी, औरंगाबाद, अमरावती या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला "कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस हायवे" संबोधले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.

प्रकल्प माहिती :
मुंबई ते नागपूर सहापदरी द्रुतगती मार्ग
अंतर दहा तासांत पार होणार
मागास भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले
अंतर दहा तासांत पार होणार
मागास भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले
- आता फेसबुक करणार प्रसार :
जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
फेसबुक आता इंटरनेटचा प्रसार करणार असून, यासाठी प्रथमच सौरऊर्जेवर उड्डाण
करणाऱ्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.
यामुळे इंटरनेट कनेक्शनपासून दूर असणाऱ्या विकसनशील देशातील दुर्गम भागात लेसरच्या माध्यमातून वायरलेस इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज या ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली.
"इंटरनेट डॉट ओरजी"च्या सहकार्याने फेसबुकने हा प्रकल्प राबविला आहे.
"ऍक्विला" असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या पंखांचा विस्तार
"बोइंग-737" विमानाएवढा असेल.यामुळे इंटरनेट कनेक्शनपासून दूर असणाऱ्या विकसनशील देशातील दुर्गम भागात लेसरच्या माध्यमातून वायरलेस इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज या ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली.
"इंटरनेट डॉट ओरजी"च्या सहकार्याने फेसबुकने हा प्रकल्प राबविला आहे.
"ऍक्विला" असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या पंखांचा विस्तार
पण त्याचे वजन मात्र एका कारपेक्षाही कमी असून हे ड्रोन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हवेत तरंगू शकेल असे म्हटले आहे.
- क्षयरोगग्रस्त देशांच्या क्रमवारीमध्ये भारत चौदाच्या स्थानी :
जागतिक पातळीवर 22 क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत चौदाच्या स्थानी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 26 लाख एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत बोलताना दिली.
तसेच "एमडी-आर" क्षयरोग झालेल्यांची संख्या केवळ 61 हजार एवढीच असून, त्यांना बहुविध प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जात आहे.

- ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके काही महिन्यांत प्रकाशित :
माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची अनेक
पुस्तके प्रकाशनाच्या रांगेत असून, ती येत्या काही महिन्यांत प्रकाशित होत
आहेत.
'इग्नायटेड माइंड्स' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा त्यात समावेश आहे.
पफिन बुक्स 'इग्नायडेड माइंडसचा' दुसरा भाग 'माय इंडिया-आयडियाज फॉर द फ्युचर' या नावाने प्रसिद्ध करणार आहे.
कलाम यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कारकीर्दीनंतरच्या भाषणांचा त्यात समावेश आहे.
त्यात सात भाग असून मुलांसाठी, प्रौढांसाठी असे वर्गीकरण केले आहे.
तसेच आयआयएम शिलाँग येथे त्यांचे जे भाषण होणार होते त्यावर 'क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट' अर्थ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

- नासाने परग्रहावरील मानवासाठी अंतराळात मेसेज पाठविले :
नासाने परग्रहावरील मानवासाठी म्हणजेच एलियन्ससाठी अंतराळात
मेसेज पाठविले असून, त्यात साउंड क्लाऊडवर पाठविलेल्या ऑडिओमध्ये मराठी व
हिंदी संदेश पाठविण्यात आले आहे.
नासाने 1977 साली प्रक्षेपित केलेल्या एका यानात साउंड क्लाऊडवर पृथ्वीवरील अनेक आवाज पाठविले आहेत.
त्यात हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील स्वागतपर शब्द आहेत. तसेच पृथ्वीवरील विविध आवाजांत पावसाची झिम्मड, आई व मुलाचे बोलणे, विविध पक्ष्यांचा चिवचिवाट, हृदयाची धडधड यांचा समावेश आहे.
एखाद्या ग्रहावर खरेच एलियन्स असतील तर ते या आवाजाला प्रतिसाद देतील, काही आवाज त्यांच्या ओळखीचे असतील. साउंड क्लाऊडवर पाठविलेले संदेश 55 भाषांत असून, प्रत्येक भाषेतील अभिवादन या तंत्रासाठी निवडण्यात आले आहे.
तसेच भारतीय भाषांत मराठी, हिंदीखेरीज बंगाली भाषेचाही समावेश आहे.

- रविचंद्रन अश्विनला अर्जुन पुरस्कार प्रदान :
भारताचा आघाडीचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अर्जुन पुरस्कार प्रदान करुन गौरव केला.
अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 29 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी अश्विन इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अनुपस्थित होता.
अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 29 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी अश्विन इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अनुपस्थित होता.
अर्जुन पुरस्कार
-सुरुवात : १९६१
-पुरस्काराचे स्वरूप : रु. ५ लाख रोख, कांस्य धातू पासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र
-राष्ट्रीय
खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर
ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीयक्रीडादिनी प्रदान करण्यात
येतो.
-२००१
पासून अर्जुन पुरस्कार फक्त पुढे उल्लेखकेलेल्या क्रीडासत्रांतील
खेळांसाठी दिला जाऊ लागला : ऑलिंपिक खेळ, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ,
विश्वचषक, विश्वविजेतेपद, क्रिकेट, देशी खेळ आणि अपंगांसाठीचे खेळ . - ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर
-विविध
उत्पादनांबाबत ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा वेगाने निपटारा व्हावा,
तसेच, मुळात त्यांना दर्जेदार व सुरक्षित उत्पादने मिळावीत, हा या
विधेयकाचा हेतू आहे.
-उत्पादनात
खोट असल्यास व त्याचा फटका एकपेक्षा अधिक ग्राहकांना बसल्यास वेळप्रसंगी
संबंधित उत्पादकास त्याची उत्पादने बाजारातून काढून घेण्याचे आदेश देण्याचा
अधिकार या प्रस्तावित प्राधिकरणास असेल.
-ग्राहकहक्कांना
नख लागल्यास काही प्रकरणांत संबंधितांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा देण्याची
तरतूद या विधेयकात असून, ई-रिटेलिंगव्यवहारांतही ग्राहकहित जपण्याचा
प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.
- २०२२ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश
संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक लोकसंख्या अहवाल-२०१५’ची सुधारित आवृत्ती २९ जुलै रोजी जाहीर केली.
भारत
२०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार
असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या या अहवालात नमूद करण्यात
आले आहे. यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले
आहे.पुढील
सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असून २१००
सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली
आहे.सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी इतकी, तर भारताची १३१ कोटींच्या घरात आहे.भारताच्या
लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर २०३० साली भारताची
लोकसंख्या १५० कोटींच्या आसपास असेल. २०५० साली हाच आकडा १७० कोटींच्या
घरात जाऊ शकतो.चीनच्या बाबतीत २०३०पर्यंत त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बऱ्यापैकी स्थिर राहील तर २०५० नंतर दर कमी झालेला असेल.२०१३
साली जाहीर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात भारत २०२८ सालापर्यंत
लोकसंख्येच्या आकडेवारीत चीनच्या पुढे जाईल, असे नमूद करण्यात आले होते.
- क्रिकेटमध्ये डेल स्टेनचे ४०० बळी
दक्षिण
आफ्रिकेच्या डेल स्टेनने ४०० विकेट घेणाऱ्या महान गोलंदाजांच्या पंक्तीत
स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारातो
तेरावा गोलंदाज ठरला आहे.शेर-ए-बांगला
स्टेडियमवर बांगलादेशविरूद्ध मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत
स्टेनने ४०० वा बळी टिपला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा
सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल ही स्टेनची ४००वी शिकार ठरली. या विकेटने ४००
चा टप्पा गाठणाऱ्या अन्य १२ महान गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन स्टेन बसला
आहे.२००४ मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी पदार्पण करणारा स्टेन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात ‘खतरनाक’ गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
- शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन
- मॅगसेसे पुरस्कार:
आशियातील नोबेल अशी ओळख असलेला "रॅमन मॅगसेसे‘ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार
2014 या वर्षासाठी संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता या दोन भारतीय तरुणांना
घोषित झाला. दिल्लीच्या एम्सच्या उपसचिव पदावर कार्यरत असलेले संजीव
चतुर्वेदी आणि "गुंज‘ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले अंशू
गुप्ता या दोघांना उदयोन्मुख नेतृत्वातील असामान्य कामासाठी हा पुरस्कार
देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतर तिघाना लाओसचे कोमली चॅनथावोंग,
फिलिपिन्सचे लिगाया फर्नाडो अमिलबंगसा, म्यानमारचे क्या थू यांना हा
पुरस्कार जाहीर झाला. फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रॅमन
मॅगसेसे फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा
एप्रिल 1957 पासून झाली.तर पहिला पुरस्कार १९५८ दिला गेला
सरकारी सेवा, लोकसेवा, शांतता, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता अशा विविध
क्षेत्रांत ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार
दरवर्षी प्रदान केला जातो.
हा पुरस्कार दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी फिलिपिन्समध्ये येथे देण्यात येतो
हा पुरस्कार दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी फिलिपिन्समध्ये येथे देण्यात येतो
संजीव चतुर्वेदी
संजीव चतुर्वेदी एम्सचे उपसंचालक आहेत. त्यांनी 1995मध्ये एनआयटी अलाहाबाद येथून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी संपादन केली. ते हरियाना केडरच्या 2002च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचे पहिले पोस्टिंग कुरुक्षेत्र येथे झाले. आपल्या स्वच्छ आणि धडाडीच्या कार्यपद्धतीने त्यांनी अभयारण्यातील हरणांची शिकार आणि अवैध वृक्षतोडीविरुद्ध आवाज उठविला. परिणामी, त्यांचे हरियाना सरकारशी वितुष्ट आले. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. 2012 मध्ये त्यांची एम्सच्या उपसचिवपदी नेमणूक झाली होती. सोबतच त्यांना दक्षता अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता. या काळात त्यांनी एम्समधील भ्रष्टाचाराची तब्बल 200 प्रकरणे बाहेर काढली. संजीव चतुर्वेदींच्या या धडाकेबाज कार्याची दखल घेत त्यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
अंशू गुप्ता
कार्पोरेट क्षेत्रातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्याच्या ध्यासाने 1999 मध्ये "गुंज‘ नावाची संस्था स्थापन करून अंशू गुप्ता या तरुणाने आदर्श घालून दिला आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या दृष्टीने ही संस्था भारतातील 21 राज्यांमध्ये कार्यरत आहे. 2004 च्या त्सुनामीदरम्यान "नॉट जस्ट अ पीस ऑफ क्लॉथ‘ या कॅम्पेनची सुरुवात अंशू गुप्ता यांनी केली. 2009 मध्ये गांधी जयंती सप्ताहाचे औचित्य साधून त्यांनी "जॉय ऑफ गिव्हिंग वीक‘ची सुरुवात केली. ही चळवळ पुढे दान उत्सव म्हणून ओळखली जाऊ लागली. गरीब वस्त्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याचे महत्त्वाचे कार्यही गुंजच्या माध्यमातून केले जाते. गुंजच्या कार्यात भारतातील एक हजार शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते, सोबतच "डिझाइन फॉर चेंज‘ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 30 देशांमध्ये राबविला जातो.
- विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणवीर सैनीला सुवर्ण
भारताचा गोल्फपटू रणवीर सैनीने लॉस एंजलिस येथे सुरू असलेल्या विशेष
ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला . शारीरिक अपंगत्व असलेल्या विशेष खेळाडूंसाठी दरवर्षी 'स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा' घेतली जाते.
ऑटिझमग्रस्त असलेल्या १४ वर्षांच्या रणवीरने जीएफ गोल्फ लेवल-२ अल्टरनेट शॉट सांघिक प्रकारात ही कामगिरी करून दाखविली.यापूर्वीही रणवीर सैनीने आशियाई पॅसिफिक जागतिक स्पर्धेत दोन
सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ऑटिझमच्या
व्याधीने ग्रस्त असलेल्या रणवीरने नऊ वर्षांचा असल्यापासून गोल्फ खेळण्यास
सुरूवात केली होती
- शास्त्रज्ञांना एक सिक्रेट ग्रहमाला आढळली :
पृथ्वीपासून फक्त 21 प्रकाशवर्षे अंतरावर खगोल शास्त्रज्ञांना
एक सिक्रेट ग्रहमाला आढळली असून, त्यात एक महाकाय ग्रह व तीन सुपर अर्थ
आहेत.
एचडी 219134 असे या ग्रहमालेच्या ताऱ्याचे नाव असून ग्रहमाला कॅसियोपिया या नक्षत्र समूहात आहे.
तसेच या तीन सुपर अर्थपैकी एक ग्रह त्यांच्या सूर्यासमोरून जातो.
सूर्यासमोरून जाणाऱ्या या सुपरअर्थची घनता पृथ्वीसारखीच आहे.
हा ग्रह आतापर्यंत आढळलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहापैकी सर्वात जवळ आहे.

- 🔹एक रुपया बाजारमूल्याच्या नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले :
एक रुपया बाजारमूल्याच्या 15 कोटी नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
1 जानेवारी 2015 पासून दरवर्षी या नोटा छापल्या जातील.
1 जानेवारीपासून दरवर्षी 1 रुपया बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी 15 डिसेंबर 2014 रोजी राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी करण्यात आली होती.
तसेच या नोटा कॉइनेज अॅक्टमधील तरतुदींनुसार छापण्यात येतील.
नोटा छपाईचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन 1, 2 व 5 रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी स्पष्ट केले होते.
त्यामुळे या नोटा सरकारने छापण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप 2 व 5 रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.

- ऐतिहासिक भूसीमा कराराची अंमलबजावणी
सुमारे
सात दशकांनंतर भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या १६२ लहान-मोठ्या
गावांमध्ये ३१ जुलै रोजी मध्यरात्री स्वातंत्र्याची पहाट उगवली.या
दोन्ही देशांमधील गेल्या ४१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूसीमा कराराची
अंमलबजावणी झाल्यामुळे भारतातील १११ गावांचाबांगलादेशमध्ये आणि
बांगलादेशमधील ५१ गावांचा भारतामध्ये समावेश करण्यात आला. रात्री १२ वाजून
०१ मिनिटांनी या गावांमधील नागरिकांनी आपापल्या देशाचे राष्ट्रध्वज फडकावून
आनंद साजरा केला.या
हस्तांतर प्रक्रियेत भारतातील १७,१६० एकरमध्ये पसरलेल्या १११ वसाहती
बांगलादेशच्या हद्दीत समाविष्ट झाल्या असून, बांगलादेशमधील ७ हजार ११०
एकरमध्ये वसलेल्या ५१ वसाहती भारतीय हद्दीत समाविष्ट झाल्या आहेत.पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी जून महिन्यात
ढाकायेथे ऐतिहासिक भू-सीमा करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. वास्तविक,
१९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख
मुजीबुर रहमान यांनी सीमावाद संपवण्यासाठी हा करार केला होता. परंतु, चार
दशके त्याची अंमलबजावणीच होऊशकली नव्हती.भारत
व बांगलादेशदरम्यान ४०९६ किलोमीटरची सीमा असून, तेथून दहशतवादी सहज
बांगलादेशात जाऊ शकत होते. त्याला या करारामुळे आळा बसणार आहे.
या करारातील ठळक मुद्दे
नव्या
करारानुसार त्या भागातील जनतेला आहे तेथेच राहून त्या देशाचे नागरिकत्व
घेण्याचा किंवा मायदेशात परत येण्याचा पर्याय दिला आहे.
भारतीय
हद्दीतील ५१ बांगलादेशी भूभागांमध्ये१४,८५६ लोक राहतात. त्या सर्वानी
भारतीय नागरिकत्व पत्करून येथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशी
भूमीतील १११ भारतीय भूभागांमध्ये३७,३६९ लोक राहतात. त्यातील ९७९
भारतीयांनी भारतात येण्यासाठी अर्ज केला आहे. अन्य लोक तेथेच राहून
बांगलादेशी नागरिकत्व स्वीकारू इच्छितात.
नागरिकांच्या
देवाणघेवाणीची प्रक्रिया नोव्हेंबपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आता तेथे
नागरी सुविधा पुरवता येऊ शकतील आणि या भूभागांच्या विकासातील अडसर दूर झाला
आह
- 'एनएससीएन' व भारत सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण शांतता करार
नागालँडमधील प्रमुख बंडखोर संघटना 'एनएससीएन'ने (Nationalist Socialist Council of Nagaland)भारत सरकारशी ३ ऑगस्ट २०१५ रोजीमहत्त्वपूर्ण शांतता करार केला.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि एनएससीएन संघटनेच्या
प्रतिनिधींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर
करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
या
करारानुसार परस्परांवरील हल्ल्यांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी हा करार होणे महत्त्वपूर्ण
होते.
या करारामुळे गेल्या ६० वर्षांपासून असलेल्या समस्या निकाली निघाल्या असून खांद्याला खांदा लावून नागालँड आणि देशाचा विकास होईल.
या
करारानुसार नागालँडच्या प्रश्नांकडे लक्षदेण्यासाठी, तेथील नागरिकांशी
संवाद साधण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मोदी
यांनी केली आहे.
'एनएससीएन'
ही संघटना नागालँडमधील एक शक्तीशाली बंडखोर संघटना म्हणून ओळखली जाते.
त्यामुळे हा शांती करार म्हणजे पूर्वोत्तर राज्यांमध्ये शांतता
नांदण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.
- जीवसृष्टीस अनुकूल असलेल्या महापृथ्वीचा शोध
पृथ्वीपासून
फक्त २१ प्रकाशवर्षे अंतरावर खगोल शास्त्रज्ञांना एक ग्रहमाला आढळली
असून,त्यात एक महाकाय ग्रह व तीन सुपर अर्थ (महापृथ्वी) आहेत.
एचडी
२१९१३४ असे या ग्रहमालेच्या ताऱ्याचे नाव असून ग्रहमाला कॅसियोपिया या
नक्षत्र समूहात आहे. या तीन सुपर अर्थपैकी एक ग्रह त्यांच्या सूर्यासमोरून
जातो. सूर्यासमोरून जाणाऱ्या य सुपरअर्थची घनता पृथ्वीसारखीच आहे. हा ग्रह
आतापर्यंत आढळलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहापैकी सर्वात जवळ आहे.
या
तीनही सुपरअर्थ खडकाळ असून, आपली सौरमाला तयार झाल्यानंतर राहिलेल्या
अवशेषातून हे ग्रह तयार झाले असावेत असे मानण्यात येत आहे. एचडी २१९१३४ हा
तारा व सुपरअर्थ यांच्यातील अंतर मोजण्यासाठी सर्व ग्रह एकमेकांसमोर व
तीनही ग्रह ताऱ्यासमोर यावे लागतील म्हणजेच ग्रहण व्हावे लागेल.
या
ग्रहाचा शोध पहिल्यांदा कॅनरी आयलंड येथीलगॅलिलिओ नॅशनल टेलिस्कोपच्या
मदतीने लावण्यात आला होता. ही दुर्बीण इटलीची आहे. याग्रहाच्या शोधाची
निश्चिती मात्र नासाच्या स्पिट्झर दुर्बिणीने केली आहे.
- मनीषा वाघमारेने एल्बुरस शिखर यशस्वीपणे सर केले
४०
पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर
परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती,जबरदस्त
फिटनेस या बळावर औरंगाबाद येथील इंडियन कॅडेट फोर्सची साहसी वीरांगना मनीषा
वाघमारे हिने युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बुरस शिखर
यशस्वीपणेसर करण्याचा पराक्रम केला.
रशियाची राजधानी मॉस्कोजवळ असणारे एल्बु्रस शिखर हे १८,६१० फूट उंचीवर आहे.
या
मोहिमेसाठी औरंगाबादच्या मनीषा वाघमारेसहनागपूर आणि दिल्लीतील जवळपास सात
ते आठ जणांचा गट भारतातून २४ जुलै रोजी रवाना झाला होता. या मोहिमेची
सुरुवात मनीषाने २६ जुलै रोजी केली आणि मधील तीन टप्पे १८ तासांत यशस्वीपणे
पूर्ण केले.
याआधी
मनीषा वाघमारे हिने गेल्या वर्षी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान एव्हरेस्टवीर
आनंद बनसोडेसह १० जणांच्या पथकासह पूर्ण बर्फाळ असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील
माऊंट कोसिस्को, माऊंट टाऊनसेंड, माऊंट राम्सहेड, माऊंट इवरारिज, माऊंट
राम्सहेड नॉर्थ, माऊंट आलिस, माऊंट साऊथ वेस्ट आॅफ अब्बीट पीक, माऊंट
कॅरवरही शिखरे सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर
यशस्वी शिखरे सर करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच गिर्यारोहक आहे.
- सुंदरबनातील रॉयल बंगाली वाघांची संख्या घटली आहे.
२००४ साली ४४०
२०१५ साली १०६
भारत आणि बांगलादेश यांनी‘भारत-बांगलादेश संयुक्त व्याघ्र-गणना प्रकल्प’राबवला.
हा प्रकल्प‘आशियातील वन्यजीवनाच्या संरक्षणासाठी क्षेत्रीय सहकार्य वृद्धींगत करणे’या मोहिमेचा एक भाग आहे.
या मोहिमेला जागतिक बँकेने आर्थिक सहकार्य केलेले आहे.
गणना पद्धत :--
यापूर्वी व्याघ्रगणनेसाठी वाघांच्या पावलांचे ठसे विचारात घेतले जात.
मात्र यावेळी छुपे कॅमेरे वापरण्यात आलेले आहेत. ही पद्धत ठश्यांपेक्षा अधिक विश्वसनीय आहे.
वाघ का घटले? :--
वाघांचे अधिवास (जंगले) कमी झाले.
अनिर्बंध शिकारी
मानव-प्राणी विसंवाद
वनव्यवस्थापनातील त्रुटी इ.
सुंदरबन :--
बांगलादेशातील सुंदरबन ६०९७ चौकिमी वर पसरलेले आहे. येथे प्रामुख्याने सुंद्री नावाचे वृक्ष आढळतात.
रॉयल बंगाली वाघांचे हे जगातील एकमेव नैसर्गिक अधिवास आहे.
भारतातील सुंदरबनात सुमारे ७४ बंगाली वाघ आढळतात.
रॉयल बंगाल वाघ :--
भारतात वाघांच्या एकूण ९ प्रजाती आढळत होत्या.
त्यांपैकी आता केवळ ६ शिल्लक आहेत. ३ नामशेष झाल्या.
या उरलेल्या ६ जातींपैकी एक जात म्हणजे – रॉयल बंगाली वाघ
भारताबरोबरच हे बंगाली वाघ नेपाळ, चीन, बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे अल्प प्रमाणात आढळतात.
- इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला 101 वर्षे पूर्ण :
जगभरातील वाहतुकीस शिस्तीचे वळण लावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला आज 101 वर्षे पूर्ण झाली.
नेटविश्वातील आघाडीचे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलनेही आपल्या होमपेजवर अनोख्या पद्धतीने या ऐतिहासिक घटनेचे स्मरण केले आहे.
लिस्टर वायर या उटाह प्रांतातील सॉल्टलेक सिटी शहरातील पोलिसाने सर्वप्रथम 1912 मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाइटचा शोध लावला होता.
याच सिग्नलमध्ये सर्वप्रथम लाल-हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता.
तसेच पुढे 5 ऑगस्ट 1914 मध्ये अमेरिकी ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ओहियो प्रांतातील क्लेव्हलॅंडमध्ये "ईस्ट-105 स्ट्रीट अँड युक्लिड अव्हेन्यू" येथील चौकामध्ये सर्वप्रथम सिग्नल यंत्रणा बसविली होती.
यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या लाइट्सच्या चार जोड्या होत्या तसेच त्याला विद्युत पुरवठा करण्याचे काम नियंत्रण कक्षात नेमण्यात आलेले कर्मचारी करत असत.

- आरबीआयचे पतधोरण जाहीर :
रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) - 4 टक्के
वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) - 21.50 टक्के
रेपो दर - 7.25 टक्के
रिव्हर्स रेपो दर - 6.25 टक्के
बँक रेट - 8.25 टक्के
मार्जिनल स्टँडींग फॅसिलीटी - 8.25 टक्के
वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) - 21.50 टक्के
रेपो दर - 7.25 टक्के
रिव्हर्स रेपो दर - 6.25 टक्के
बँक रेट - 8.25 टक्के
मार्जिनल स्टँडींग फॅसिलीटी - 8.25 टक्के
- राष्ट्रीय हातमाग दिवस :
हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी
तसेच, या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकारतर्फे 7 ऑगस्ट हा
राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया हँडलूम या ब्रँडचे अनावरण करणार आहेत.
या दिवशी 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती.
त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा होणार असून याचा पहिला मोठा कार्यक्रम चेन्नईमध्ये होईल.

- ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन :
औष्णिक विद्युत केंद्रांमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह
वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी
महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले आहे.
'ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन' या नावाने हे धोरण ओळखण्यात येत आहे.
हवामानातील बदलावर पॅरिस येथे चर्चा होणार असून, त्या दृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे मानण्यात येते. 'अमेरिकेच्या वीज प्रकल्पांमधून 2030 पर्यंत कार्बनी वायूंचे प्रदूषण 32 टक्क्यांनी कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. या धोरणामध्ये कार्बनी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचलण्याबरोबरच दरडोई उर्जेच्या वापराविषयीही विचार करण्यात आला आहे. यामध्ये अपारंपरिक उर्जा आणि किमान खर्चात जास्त उर्जा देणाऱ्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या राज्यांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा उल्लेखही या धोरणामध्ये करण्यात आला आहे.

- गुगल लुन प्रकल्प राबवण्याबाबत श्रीलंका आणि गुगलमध्ये करार झाला आहे.या प्रकल्पांतर्गत काय केले जाईल? :
गुगल श्रीलंकन आकाशात अतिउंचावर १३ मोठे बलून(फुगे) सोडेल.
त्या बलून्समार्फत संपूर्ण श्रीलंकेत 3-G इंटरनेट सेवा पुरवली जाईल.
3-G = हे इंटरनेट हाय-स्पीड असणारे आणि परवडणाऱ्या दरात सर्वांना वापरता येईल.
म्हणजेच संपूर्ण श्रीलंका मोफत wi-fi ने जोडली जाईल.
गुगल लुन प्रकल्प:
हा गुगलचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
उद्देश :
जगभरातील
ग्रामीण आणि दूरस्थ (जेथे इंटरनेट पोहोचू शकत नाही असे भाग – डोंगराळ,
घनदाट जंगले, बर्फाळ प्रदेश, वाळवंट इ.) प्रदेशात इंटरनेट माफक दरात उपलब्ध
करून देणे.
काय केले जाते?
आकाशात उंचावर मोठे बलून सोडले जातात.
हे बलून इंटरनेट टॉवरचे काम करतात.
-
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा
जन्मदिन महाराष्ट्र राज्यात प्रत्येक शाळेमध्ये ----------- दिवस म्हणून
पाळला जाणार आहे :-वाचन प्रेरणा दिवस
(माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन तामिळनाडू राज्यात " युवा नवचेतना दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे) - केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिझव्र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कोणाची निवड केली:- अजय त्यागी
- दीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर कोणत्या कंपनीने ताबा मीळवला:- बीएनपी पारिबास (फ्रान्स)
- मुख्य प्रवर्तकाला तुरुंगाचा रस्ता दाखविणाऱ्या सेबीने कोणत्या समूहातील फंड व्यवसायाचा व्यवसाय परवाना ही रद्द केला :- सहारा
- भारताचा कोणत्या गोल्फपटू ने लॉस एंजलिस येथे सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले:- रणवीर सैनी
- भारत कोणत्या सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले:- २०२२
- देशातील सर्वात मोठे सुवर्ण आभूषणे निर्यातदार असलेल्या कोणत्या कंपनीने जगातील सर्वात मोठा सोने शुद्धीकरण (रिफायनरी) सुविधा असलेल्या व्हाल्कम्बी या स्विस कंपनीवर ताबा मिळविला :-राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड
-
फोर्ब्स आशिया फॅब्युलसच्या ५० कंपनी यादीत १० भारतीय
कंपन्यांना स्थान मिळाले आहे.यात टाटा समूहातील किती कंपन्यांचा समावेश
आहे:- ३
(टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, टाटा मोटर्स, व टायटन ) - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूची शिफारस केली:- सानिया मिर्झा
- कोणत्या कंपनीला २०१९ पर्यंत बीसीसीआयचे प्रायोजकत्व देण्यात आले ?:-पेटीएम
- शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ओम प्रकाश चौटाला यांना १० वर्षाची शिक्षा ठेवली कायम ठेवली ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते :-हरियाणा
- नागालँडमधील कोणत्या फुटिरतावादी संघटनेबरोबर भारत सरकारने शांती करार केला:- एनएससीएन (नागा बंडखोर)
- 27 जुलै 2015 रोजी कोणता देश जागतिक व्यापार संघटनेचा १६२ वा सदस्य देश बनला ;- कझागीस्तान
- मराठी भाषा विभागातंर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेनुसार, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली:- बाबा भांड
- कोणत्या देशातील सरकारने गेल्या वर्षी अदानी यांना कारमायकेल खाण प्रकल्पात खाणकाम करण्यासाठी देऊ केलेला परवाना न्यायालयाने रद्दबातल ठरवला ? :- ऑस्ट्रेलिया
- इंग्लंडने कोणत्या खेळाडूची सल्लागार म्हणून निवड केली आहे:- जयवर्धने (श्रीलंका)
- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांच्यावर कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे? :- साऊथसाईड विथ यू
- रिज़र्व बैंक ऑफ़ इंडिया ने 30 जुलाई 2015 रोजी अन्तरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त किती रुपयाचे नाणे चलनात आणले:- 10 रुपए
- 2022 मध्ये होणार्या हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात भरविण्यात येणार आहे:- बींजिग
- गावक-यांच्या सहभागातून वन, वन्यजीवांचे संरक्षण, व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे यासाठी “श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वनविकास योजना” राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला:- महाराष्ट्र
- हिमालयातील पास परिसरातील ५२६८ मी उंचीचे अनामिक शिखरला कोणते नाव देण्यात आले:- नलिनी’ सेनगुप्ता
(हिमालयातील कोणत्याही अनामिक शिखरावर जो संघ किंवा व्यक्ती प्रथम चढाई करतो त्या संघाला त्या अनामिक शिखराचे नामकरण करण्याचा मान प्राप्त होतो. -
नलिनी’ सेनगुप्ता
पुणे शहरातील विद्या व्हॅली शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी सेनगुप्ता यांच्या गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाचे कायमस्वरूपी स्मरण ठेवण्यासाठी व त्यांच्या प्रीत्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून गिरिप्रेमीने त्यांचे नाव या शिखराला दिले आहे.
सन १९७० च्या सुमाराला, ज्यावेळी भारतामध्ये गिर्यारोहण हा खेळ देखील सर्व सामान्यांना अवगत नव्हता त्यावेळी नलिनी सेनगुप्ता यांनी नेहरू पर्वतारोहण संस्थेतून पहिला महिला बेसिक माउंटेनियरिंग कोर्स पूर्ण केला. तसेच संपूर्ण भारतातील सुमारे ३० प्रशिक्षणार्थींमधून त्यांची अॅडव्हेंचर कोर्स साठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. गेली सुमारे ५० वर्षे सेनगुप्ता गिर्यारोहणाचा प्रचार त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये करत आहेत. आज त्यांच्या शाळेत मुलांचा व पालकांचा ट्रेकिंग क्लब आहे तसेच आनंद माळी यांच्याकडून सुमारे ४० विद्यार्थी गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणदेखील घेत आहेत. पुण्यातून एखाद्या व्यातीच्या कर्तृत्वाला स्मरून त्यांचे नाव शिखराला देण्याचा पहिला मान गिरिप्रेमीतर्फे नलिनी सेनगुप्ता यांना देण्यात आला.) - कोणाची २०१५ या वर्षासाठीच्या फ्यूकूवोका आशियाई संस्कृती पुरस्कारासाठी निवड झाली:- रामचंद्र गुवा
- केंद्र सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला:- राष्ट्रीय हातमाग दिवस
- अखिल भारतीय मराठी साहीत्य परिषदेच्या वतीने या वर्षीपासुन नाटय समेलनासारखेच ' बाल नाटयसमेलन" भरविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिले बाल नाटयसमेलन कोणत्या ठिकाणी यावर्षी भरविण्यात येणार आह:- सोलापूर
sunder khup sunder ahet current affairs
उत्तर द्याहटवाsunder khup sunder ahet current affairs
उत्तर द्याहटवा