Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part -2

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी
जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतव्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स प्रथम क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर  ३३ व्यक्ती या आशियातील  आणि ८ युरोपमधील आहेत.या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्‌स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे.तिसऱ्या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेशआहे.गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिकश्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.

  • मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'
गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आलीआहे.२०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे.याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंकाव सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सचीथेट परकी गुंतवणूक केली आहे.या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.


  • राज्यांत ‘आंतरराज्य पारेषण प्रणाली’ लागू होणार आहे. 
‘आंतरराज्य पारेषण प्रणाली’ = Intra-state Transmission System (ISTS)७
राज्ये :महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचलप्रदेश
  1. ही ७ राज्ये मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय उर्जानिर्माण करू शकतात.
  2. उदा. सौरऊर्जा, पवनउर्जा इ.
  3. या राज्यांत नवीकरणीय उर्जेचे मोठमोठे प्रकल्प सुरु होत आहेत.
  4. त्यामुळे या नवीकरणीय उर्जेचा योग्य आणि पूर्ण वापर व्हावा, म्हणून ‘आंतरराज्य पारेषण प्रणाली’ नावाचे हे वीजजाळे निर्माण केले जाणार आहे.
  5. येत्या ३-५ वर्षांत हे जाळे पूर्ण होईल.
खर्च :८५४८ कोटी रु. पैकी ४०% म्हणजे ३४०० कोटी रु. राष्ट्रीय स्वच्छ उर्जा फंडातून [National Clean Energy Fund (NCEF)] मिळतील.
  • राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय :
 
पाकिस्तानमध्ये होणा-या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये 61 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेचे आयोजन 30 सप्टेंबर ते 8 आक्टोंबरच्या दरम्यान करण्यात आले आहे. तसेच या परिषदेचे पाकिस्तानकडून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह इतर राज्यातील विधानसभा अध्यक्ष्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना या परिषदेचे आमंत्रण देण्यात न आल्यामुळे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

  • अनाथांच्या मूलभूत हक्कांकरिता सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेला यश :
अठरा वर्षांपुढील अनाथांच्या मूलभूत हक्कांकरिता सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेला यश मिळाले आहे.
 या मुलांकरिता सर्वंकष धोरण राबवू, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर याचिका निकाली काढण्यात आली. यामुळे या मुलांच्या सामाजिक पुनर्वसनातील अडचणी दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. घटनेच्या कलम 32 नुसार या अनाथ मुलांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जावे आणि पुनर्वसन हा अनाथ मुलांचा मूलभूत अधिकार म्हणून जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे :
  1. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कोणतीच तरतूद, योजना नाही
  2.  शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती नाही
  3.  विविध प्रकारचे दाखले दिले जात नाहीत
  4.  अनाथ असल्याचा दाखला त्यांना देण्याची मागणी
  5.  त्यांच्या पुनर्वसनाचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून जाहीर करावा
  • गायत्री व पारिजात यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये :
सलग 18 तास 33 मिनिटे गायन करून 222 मराठी, हिंदी गीते सादर करणाऱ्या गायत्री व पारिजात चव्हाण यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. सोलो (वैयक्तिक) गायनाच्या 12 तासांच्या विक्रमाची यापूर्वी नोंद आहे.

  • नासाचे ड्रोन चंद्र व मंगळावरील जागांचा शोध घेऊ शकतील :
नासाचे अभियंते नव्या पद्धतीचे ड्रोन विकसित करीत असून, हे ड्रोन रोव्हर जिथे पोहोचत नाहीत अशा चंद्र व मंगळावरील जागांचा शोध घेऊ शकतील. मंगळावरील खड्डे, लघुग्रह व चंद्रावरील न पोहोचलेल्या जागांचे नमुने हे ड्रोन घेऊन येतील, असे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच नवी यंत्रणा एक्स्ट्रीम अ‍ॅक्सेस फ्लायर्स या नावाने विकसित केली जात आहे. त्यांची रचनाच अशी आहे
  • इस्रो २०१५-१६ मध्ये अमेरिकेचे ९ सूक्ष्म उपग्रह सोडणार आहे.

✈हे इतिहासात फर्स्ट टाइम होत आहे की – इस्रो नासाचे उपग्रह सोडणार आहे.
✈इस्रोच्या अंट्रिक्स कॉर्पोरेशन ली. या व्यावसायिक शाखेने तसा करार अमेरिकेशी केला आहे.
✈हे उपग्रह इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान (PSLV) द्वारे अवकाशात सोडले जातील.

PSLV चे यश :
✈ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान (PSLV) हे इस्रोचे सर्वात यशस्वी यान आहे.
✈आत्तापर्यंत या यानाने १९ देशांचे ४५ उपग्रह अवकाशात सोडले आहेत.

RLV-TD :
  1. RLV-TD = पुनर्-उपयोगी प्रक्षेपक यान – तंत्रज्ञान प्रात्यक्षिक / Reusable Launch Vehicle-Technology Demonstration (RLV-TD)
  2. इस्रो या वर्षअखेर RLV-TD चे प्रात्यक्षिक करणार आहे.*.त्यातून द्विस्तरीय कक्षा म्हणजेच Two Stage To Orbit (TSTO) ची क्षमता चाचणी केली जाईल.
  3. (भारत असे यान बनवणार आहे, जे अवकाशात सोडल्यावर उपग्रहाला निरोप देऊन पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परत येईल. त्यामुळे आपला खर्च वाचेल. वेळ वाचेल. त्याचेच नाव RLV-TD )
  • गुगलच्या सीईओ पदी सुंदर पिचई यांचे नाव जाहीर :
जगात सर्वांत लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी भारतीय वंशाचे सुंदर पिचई यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
 तसेच अल्फाबेट या नव्या पालक कंपनीची घोषणा केली असून, गुगलवर या कंपनीचे नियंत्रण असणार आहे.
 गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन हे अध्यक्षपदी कायम असून, सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडे नव्या अल्फाबेट कंपनीच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 सुंदर पिचई हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी आहेत तसेच 43 वर्षीय पिचई हे आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी आहेत. पिचई हे टेक वर्ल्डमधील मोठे नाव असून, ते गेल्या अकरा वर्षांपासून गूगलमध्ये काम करत आहेत.
  • अभिनेते अमिताभ बच्चन यांनी "व्याघ्रदूत" बनण्यास होकार :
वाघांच्या संवर्धनासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी "व्याघ्रदूत" बनण्यास होकार दिला आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना पत्र पाठवून विनंती केली होती. राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करत वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महराष्ट्राचे "व्याघ्रदूत" म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती मुनगंटीवार यांनी बच्चन यांना केली होती. नागपूरला चार जुलैला झालेल्या राज्यातील व्याघ्र संरक्षण फाउंडेशनच्या बैठकीत अमिताभ बच्चन यांना "व्याघ्रदूत" म्हणून योगदान देण्यासाठी विनंती करण्याची कल्पना पुढे आली होती. बच्चन यांच्याप्रमाणे वन खात्याने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनाही अशाच प्रकारे पत्र पाठवून विनंती केली होती. मात्र, अद्याप तेंडुलकर यांनी होकार अथवा नकार कळविला नाही.
  • अमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा "नासा" चा प्रतिष्ठेचा पुरस्कार :
उत्तर प्रदेशमधील नोएडा जिल्ह्यात असलेल्या अमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पथकाला अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा"चा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. "नासा"ने आयोजित केलेल्या "इंटरनॅशनल स्पेस सेटलमेंट डिझाइन" या अत्यंत प्रतिष्ठेच्या वार्षिक स्पर्धेत या पथकाने हे देदीप्यमान यश मिळविले आहे. दोन ते चार ऑगस्ट या काळात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील चार तुकड्यांमधून जगभरातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पृथ्वीबाहेर मानववस्तीसाठी उपयुक्त ठरणारी रचना तयार करण्याच्या या स्पर्धेत या पथकाने मंगळावरील वस्तीची प्रतिकृती तयार केली. यामध्ये त्यांनी ऍल्युमिनिअम ऑक्‍सिनायट्राइड या पारदर्शी पदार्थाचा वापर करून 24 हजार नागरिकांना सामावून घेणाऱ्या आणि अतिरिक्त तीन हजार नागरिकांची तात्पुरती सोय करणाऱ्या दोन मुख्य वस्त्या आणि चार इतर वस्त्यांची रचना तयार केली.
  • हनुमान चालिसाचे उर्दूत भाषांतर केले :
उत्तर प्रदेशातील अबिद अल्वी या मुस्लिम युवकाने हनुमान चालिसाचे उर्दूत भाषांतर केले आहे.
 याआधी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद्‌भागवत गीतेचे उर्दूत भाषांतर केले होते.
 हिंदू आणि मुस्लिमांना कुराण, हिंदू चालिसा आणि भागवत गीतेची मातृभाषेत माहिती मिळावी, हा भाषांतर करण्यामागे मुख्य उद्देश असल्याचे तो म्हणाला.
 तसेच हनुमान चालिसाप्रमाणे शिव चालिसाचेही भविष्यात भाषांतर करण्याचा विचार आहे.
 मुसादस पद्धतीप्रमाणे हनुमान चालिसाचे सहा ओळींत भाषांतर करण्यात येत आहे.
  • गुजरात निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य :
गुजरात सरकारने राज्यातील स्थानिक निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात स्थानिक कायदा 2009 संशोधक अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला असून स्थानिक निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. गुजरातमध्ये गतवर्षी स्थानिक निवडणुकीत केवळ 50 ते 60 टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गुजरात पंचायत निवडणूक नियम (संशोधन) 2015 आणि नगर पालिका निवडणूक नियम (संशोधन) 2015] अंतर्गत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला 100 रुपये दंड केला जाणार आहे. निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला मॉनिटरी दंड आणि सोशल सर्विस अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते. तसेच त्या व्यक्तीला सरकारी योजनेपासूनही वंचित ठेवण्याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे. मतदान यादीत नाव असलेल्या पण मतदान न करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक अधिकारी मतदानानंतर नोटीस बजावतील. महिनाभराच्या आत त्या व्यक्तीला मतदान न करण्याचे कारण सांगावे लागेल. दोषी आढळल्यास 15 दिवसात त्या व्यक्तीला 100 रुपये दंड भरावा लागेल.
  • मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन :
अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळ यानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानाने केलेला मंगळप्रवास त्यामुळे अनुभवता येईल. मुख्य म्हणजे यामुळे नवोदित संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना हा खजिना उपलब्ध होणार आहे. 'क्युरिऑसिटी रोव्हर' मंगळाची अद्भूत सफर केली आहे. त्यातून 'नासा'कडे मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व माहिती संकलित झाली आहे. शिवाय 50 वर्षांतील अन्य यानाच्या मदतीने मिळालेली माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. 'मार्स ट्रेक' हे वेबबेस्ड अॅप्लिकेशन असून, ते नेटकरांना विनामूल्य उपलब्ध असेल. मंगळावर पहिली मानवी मोहीम 2030 मध्ये आखली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी व अन्य माहितीची आदानप्रदान करण्यासाठी 'मार्स ट्रेक'चा वापर सध्या केला जातो. 6 ऑगस्ट 2012 रोजी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर हे यान मंगळावर सोडले. कारच्या आकाराचे हे यान यशस्वीपणे मंगळावर उतरलेच पण त्याच्यावर सोपविण्यात आलेले कामही ते चोख पार पाडते आहे. या यानाकडून मिळालेली माहिती, मातीचे नमुने, प्रतिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत.

  • चौथ्या विश्व साहित्य समेलनच्या अध्यक्षपदी प्रा. शेषराव मोरे.
=नियोजीत - आफबीट डेस्टिनेशन्स व पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र साहित्य मडल.
= ठिकाण - अदमान
= तारीख - ५व ६ सप्टेबर
= अध्यक्ष - प्रा. शेषराव मोरे (जेष्ठ साह.- विचारवत आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक....
= जाहिर - माधवी वैद्य  ( अ.भा.म.सा.महा. अध्यक्षा.
= मोरे याची साहित्य सपदा -:
१) सावरकराचा बुध्दिवाद : एक चिकित्सक अभ्यास.
२)सावरकराचे समाजकारण: सत्य आणि  विपर्यास
३) काश्मीर : एक शापित नदवदन.
४) आबेडकराचे सामाजिक धोरण : एक अभ्यास.
५) विचारकलह.
६) अप्रिय  सण...
७) शासनपुरस्कत मनूवादी : पाडुरगशास्री आठवले.
८) मुस्लिम मनाचा शोध.
९) इस्लाम : मेकर आफ द मुस्लिम माइड.
१०) घोषतानतरचे चार  आर्दश खलिफा.
११) १८५७  चा जिहाद.
१२) अप्रिय  सण..२ भाग.
१३) क्रागसचे आणि  गांधीजीनी अखड भारत का नाकारला  ?
  • भालचंद्र यांचे वृद्धापकाळाने निधन :
संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होता. "सत्तेचे गुलाम" या नाटकापासून त्यांनी रंगभूमीवरील आपली कारकीर्द सुरू केली. राज्य सरकारसोबतच अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
  • अवकाश स्थानकात उगवलेली भाजी खाऊन इतिहास घडविला :
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणाऱ्या तीन "शेतकऱ्यांनी" तेथेच उगवलेली भाजी खाऊन आज इतिहास घडविला. या अवकाशवीरांनी अवकाश स्थानकातच यंत्राच्या मदतीने उगवलेली लाल रंगाची पालेभाजी खात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, अशी भाजी खाणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. तसेच, यामुळे यंत्राच्या मदतीने अवकाशातच खाण्यायोग्य भाजीचे उत्पादन घेण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. अवकाश स्थानकातील स्कॉट केली, जेल लिंडग्रेन आणि किमिया यूई या अंतराळवीरांनी ही किमया केली आहे. अवकाश स्थानकातील युरोपीय अवकाश संस्थेच्या कोलंबस प्रयोगशाळेत भाजी उगविण्याचा प्रयोग केला गेला. यासाठी "व्हेजी" ही भाजी उगविण्याची यंत्रणा विकसित केली गेली असून अत्यंत नियंत्रित वातावरणात या भाजीची वाढ करण्यात आली. 
व्हेजीची रचना : या यंत्राची अमेरिकेतील केनेडी अवकाश स्थानकातच पूर्ण चाचणी करण्यात आली होती. भाजीची बियाणे, माती आणि खत असलेल्या दोन "उश्‍या" यंत्राबरोबर अवकाश स्थानकात पाठविण्यात आल्या होत्या. हे बियाणे अवकाश स्थानकात 15 महिने गोठविलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते. "व्हेजी‘ यंत्रणा 8 जुलैला सुरू करण्यात आली. "व्हेजी"मध्ये रोपाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या लाल, निळे आणि हिरवे एलईडी दिव्यांची रचना केली आहे. अवकाश स्थानकात पाणी ओतता येत नसल्याने उश्‍यांच्या खालच्या बाजूला दव निर्माण करून रोपांची पाण्याची गरज भागविण्यात आली. त्यानंतर आज 33 दिवसांनी ही भाजी उगविली.
  • दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला :
'स्टार वॉर' चित्रपट मालिकेत दाखवलेल्या ग्रहांसारखा दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला आहे. म्हणजे या ग्रहावर दोन सूर्य उगवलेले दिसतात. तसेच स्टार वॉर चित्रपटात जो टाटुनी ग्रह दाखवला आहे त्यावर दोन सूर्य (तारे) उगवताना दिसतात व ते तारे एकमेकांभोवतीची प्रदक्षिणा 27 दिवसांत पूर्ण करतात अशी कल्पना केली आहे. नासाच्या केप्लर दुर्बिणीने त्याचा शोध लागला आहे, या ग्रहाचे नाव केप्लर 453 बी असे असून, वसाहतयोग्य ग्रह ताऱ्यापासून ज्या अंतरावर असतात त्या अंतरावर असूनही तेथे जीवसृष्टीस अनुकूल स्थिती नाही कारण तो वायूंचा बनलेला आहे.

केप्लर 453 बी :
  1. ताऱ्यांपासून वसाहतयोग्य अंतरावर असूनही जीवसृष्टी अशक्य.
  2.  ग्रहाच्या चंद्रावर मात्र जीवसृष्टी शक्य.
  3.  दहावा बाहय़ग्रह.
  4.  आता शोधला गेला नसता तर 2066 पर्यंत वाट पाहावी लागली असती.
  5.  अधिक्रमण तंत्राने शोध.
  • भावंडांच्या नावाने छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम :
कंदर्प शर्मा (5 वर्षे 10 महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (8 वर्षे 11 महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम नोंदला जाईल.
 नेपाळच्या उत्तरपूर्वेकडील 5,380 मीटर उंचीवरील एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे यशस्वीपणे परतले.
 या मुलांसोबत बेस कॅम्पवर त्यांचे पालकही होते. बेस कॅम्पवर वैयक्तिक पातळीवर यशस्वीपणे परतणारे वयाने सगळ्यात तरुण भाऊ व बहीण म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे.
 हे शर्मा कुटुंब 8,848  मीटर उंचीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅ म्पवर पोहोचणारे पहिले कुटुंब ठरले आहे.

  • बॉबी जिंदाल सर्वांत तरुण उमेदवार

 लुईसयाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.ही निवडणूक २०१६ मध्ये होणार आहे.बॉबी जिंदाल हे वयाच्या ३६व्या वर्षी लुईसयानाचे राज्यपाल बनले होते. त्या वेळी तेअमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचे राज्यपाल ठरले होते.२०१६मधील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मात्र ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार नाहीत. जॉन एफ केनेडी हे ४३ वर्षांचे असताना निवडणूकजिंकून सर्वांत तरुण अध्यक्ष बनले होते. जिंदाल सध्या ४४ वर्षांचे आहेत.अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे एकूण १७ उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये जिंदाल यांचे नाव पहिल्या दहामध्येही नाही. त्यामुळेआपल्या नावाचा विचार होण्यासाठी त्यांना आपली लोकप्रियता वाढवावी लागणार आहे.सध्या आयोवा येथे त्यांचा प्रचार सुरू असून त्यांच्या सभांना गर्दीही होत आहे.
  • भारतातील वर्तमानपत्रांच्या संख्येत वाढ
रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर इन इंडिया (आरएनआय) या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक कल लक्षात घेऊन भारतातील इंग्लिश आणि प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मार्च २०१३ ते मार्च २०१५ या दोन वर्षांत वृत्तपत्र नोंदणीची संख्या ९४,०६७ वरून १,०५,४४३ वर पोचली आहे.मार्च २०१४ मध्ये देशातील इंग्लिश वर्तमानपत्रांची संख्या १३,१३८ अशी होती. एका वर्षात ती १३,६६१ अशी झाली. याच कालावधीत हिंदी वर्तमानपत्रांची संख्या ४०,१५९ वरून ४२,४९३ झाली. मार्च २०१४ मध्ये संस्कृत वर्तमानपत्रांची संख्या ८० होती. या वर्षी मार्चमध्ये ती ९५ झाली.वृत्तपत्रांच्या संख्येबरोबरच विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
वर्तमानपात्रांच्या संख्येनुसार आघाडीची तीन राज्ये
राज्य
उत्तर प्रदेश
मार्च २०१३-१४,३३६
मार्च २०१४-१५,२०९
मार्च २०१५-१६,१३०
महाराष्ट्र
१२,४६६
१३,३७५
१४,३९४
दिल्ली
११,४१०
     -
१२,१७७

थोडक्यात महत्वाचे :
 
  1.  कोणत्या दिवशी "वर्ल्ड वाइड वेब डे" हा दिवस साजरा केला जातो? :-१ सप्टेंबर
  2. सिंगापूर स्वातंत्र्य दिनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिवस संचलनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांनी कोणाची नियुक्ती केली आहे.:- अनंत गीते
  3. केंद्रीय गृहमंत्रालयाने बेपत्ता झालेली मुले मिळून येण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणती मोहीम राबवली :- "ऑपरेश मुस्कान‘(पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार गाझीयाबाद पोलिसांनी "ऑपरेशन स्माईल‘ या नावाखाली बेपत्ता मुलांना शोधणे व त्याचे पुनर्वसन करण्याची मोहीम यशस्विरीत्या राबविली होती. त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2015 मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी अशीच मोहीम हाती घेण्याचे सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशाला निर्देश दिले होते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने ऑपरेश मुस्कान‘ या नावाने राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम राबवण्यात आली)
  4. डिसेंबर२०१५ मध्ये अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे:- सोलापूर
  5. पॉर्न साईट्‌सवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, इंटरनेटच्या माध्यमामधून सर्वाधिक पॉर्न साईट्‌स पाहिल्या जाणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे :-मिझोराम( या यादीमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.तसेच सर्वाधिक पॉर्न साईट्‌स पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे.)
  6. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर २२ क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे:- १४ व्या( देशात सर्वप्रथम २००३ मध्ये क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम सुरू झाला होता)
  7. समभागांच्या (शेअर्स) स्वरूपातील दान स्वीकारण्यासाठीकोणत्या देवस्थानाने डिमॅट खाते उघडले ?:- तिरुपती बालाजी ( तिरुमला वेंकटेश्वर)६ आगस्ट रोजी हिरोशिमा शहरावर अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्याला किती वर्षे पूर्ण झाली:- ७०
  8. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेचा सदस्य बनला २०६ वा देश कोणता:-दक्षिण सुदान
  9. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) अधिकृतपणे अलीकडेच ऑलिम्पिक खेळात कोणत्या खेळला मान्यता दिली :-Frisbee (Flying Disc)
  10.  मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी-----------यांची निवड करण्यात आली ? :- सदानंद मोरे
  11. पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कितवे साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे :-८९ वे( डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला हे संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या भागात होणारे हे पहिले संमेलन असले, तरी पुणे परिसरातील 14वे संमेलन आहे.
  12. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,देशामधील राजकीय पक्षांची संख्या एकूण किती आहे :-1866(या 1866 पक्षांपैकी अवघे 56 राजकीय पक्ष हे राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेले पक्ष आहेत. )
  13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिहारच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती केली :- राम नाथ कोवीद(उत्तर प्रदेशातील कानपूरचे 69 वर्षीय कोविंद हे दोन वेळेस राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. स्वतः वकील असलेल्या कोविंद यांनी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रमुखपदीही काम केले आहे. )
  14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात केंद्र सरकारने जाहीर केली असून,यात भारतातील कोणते शहराने प्रथम क्रमांक पटकावला :- म्हैसूर (कर्नाटक)
  15.  देशभरातील ४७६ शहरांतील स्वच्छतेचा आढावा घेऊन त्यांची क्रमवारी केंद्र सरकारने जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कोणत्या शहराने त्यात तिसरे स्थान मिळवले ?:- नवी मुंबईकेंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने "स्वच्छ भारत‘ योजनेत पहिल्या वर्षी निवड झालेल्या 476 पैकी महाराष्टातील ४३ शहराचा समावेश आहे यात नवी मुंबई व्यतिरिक्त पुण्याने 31 वा तर नागपूरने 256 वा क्रमांक पटकावला )
  16.  " चतुरंग प्रतीष्टान' च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ----------------यांना जाहीर झाला? :- गिरीश प्रभुणे
  17. --------- येथे झालेल्या गतिमंदांच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताने तब्बल १७३ पदकांची कमाई केली यामध्ये ४७ सुवर्ण, ५४ रौप्य आणि ७२ कांस्य पदके अशी पदके पटकावली :- लॉस अँन्जेलीस
  18. सिंगापूर हे शहर-राष्ट्र असून ते जगात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर मानले जाते. त्याच्या स्वातंत्र्याला ९ ऑगस्टला किती वर्ष पुर्ण झाले:-पन्नास वर्षे
  19. फेसबुकवर 'पीपल टॉकींग अबाऊट दॅट' या रँकिंगमध्ये ----------- हे फेसबुक पेज अव्वल ठरले:- भारतीय सेना
  20.  महाराष्ट राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करत वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने कोणत्या अभिनेत्याने यांनी महराष्ट्राचे "व्याघ्रदूत‘ बनण्यास होकार दिला :- अमिताभ बच्चन
  21. जगात सर्वांत लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी भारतीय वंशाचे --------- यांचे नाव जाहीर करण्यात आले:- सुंदर पिचई(भारतीय वंशाचे ४३ वर्षीय सुंदर पिचई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचई, गेल्या ११ वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत. गुगलचा क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे पिचई यांचा मोलाचा वाटा आहे. २००८ साली पिचई यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने गुगल क्रोम ब्राऊझर महाजालात उपलब्ध करून दिला होता)
  22. दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर ही गाजलेली नाटके कोणी लिहिली :- भालचंद्र पेंढारकर नाट्यतपस्वी भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर यांचे दि. ११ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
  23. भारतातील ------------व ----------------या दोन संस्थाची गणना जगातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या पहिल्या दहा संस्थामध्ये झाली:- भारतीय लष्कर व भारतीय सेना
  24. राज्य सरकारच्या वतीने आद्यकवी केशवसुत( कृष्णाजी केशव दामले) यांचे ----------- हे जन्मगाव " पुस्तकाचे गाव " म्हणुन विकसित करण्यात येणार आहे:- मालगुंड
  25. गुजरात निवडूनक नियम ( सुधारणा) २०१५ नुसार गुजरात राज्यात मतदान न करणार्याना--------------- -रू दंड आकारण्यात येणार आहे:-१०० रू
  26. रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर इन इंडिया (आरएनआय) या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोणत्या राज्यात सर्वातजास्त वृत्तपत्रे आहेत:- उत्तर प्रदेश त्यानतर दुसर क्रमाक;- महाराष्ट्र नंतर दिल्ली आणी आंध्र प्रदेश असा क्रमांक लागतो
  27. २९ ऑगस्ट म्हणजे क्रीडा दिनाला सानिया मिर्झाला खेलरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . हा पुरस्कार पटकावीणारी ती --------------टेनिसपटू आहे?:- २ री(या अगोदर हा पुरस्कार लिएंडर पेस (१९९६) या टेनिसपटू ला मिळाला होता)
  28. राज्य सरकारने कोणत्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला:- दहीहंडी
  29. केन्द्र सरकारने काळा पैसा अधिनियम, २०१५ अन्वये परदेशातील काळा पैसा जाहीर करण्याची मुदत कधीपर्यंत आहे:- ३० सप्टेंबर २०१५
  30. केंद्रीय नव आणी अक्षय ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील सौरऊर्जा मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला :- राजस्थान (११४७ MW)२ रा क्रमांक :- गुजरात ( १००० MW)3 रा क्रमांक:- मध्यप्रदेश
  31. कोणत्या देशाने पहिले इलेक्ट्रिक प्रवाशी विमान तयार केले :- चीन (BX1E)
  32. १ जुलै २०१५ रोजी संशोधनाच्या क्षेत्रातील प्रतिस्टेचा जी. डी. बिर्ला पुरस्कार कोणाला जाहेर झाला :- डॉ. संजीव गलांडे
  33. सेद्रींय शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते :- सिक्कीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा