Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part - 3

  • केंद्र सरकारचा "अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय
टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने "अमृत योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारची "जलयुक्‍त शिवार योजना" यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. 2 हजार कोटींची "अमृत योजना" राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अमृत योजनेसाठी निश्‍चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
  • फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज" नवे ऍप सादर करणार
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज"बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे. सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
 या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे. तसेच सोबत
संबंधित संकेलतस्थळाचा पत्ताही (युआरएल) देण्यात येणार आहे.
 ट्‌विटरने अलिकडेच अशापद्धतीची सुविधा युजर्सना "न्युज टॅब"द्वारे उपलब्ध करून दिली आहे.
  • बाल्यावस्थेत असलेल्या दीर्घिकेचा शोध 
आपल्या आकाशगंगेच्या चार पट व्यास असलेली पण बाल्यावस्थेत असलेली 10 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली दीर्घिका (गॅलेक्सी) खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
 कॅलटेक म्हणजे कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले असून ही दीर्घिका जन्माला येत असताना तिचा वेध घेण्यात यश आले आहे.
 या दीर्घिकेतील वायू महाविस्फोटाच्या वेळचे असण्याची शक्यता असून ते थंड होत ही दीर्घिका बनत आहे.
 कॅलटेकने बनवलेल्या कॉस्मिक वेब इमेजर या पॅलोमार वेधशाळेतील दुर्बीणीला या बाल दीर्घिकेची छायाचित्रे टिपण्यात यश आले आहे.
आंतरतारकीय माध्यमांच्या वेटोळ्याला ती जोडली गेली असून दीर्घिकांमध्ये फिरणारा वायू म्हणजे हे आंतरतारकीय माध्यम आहे व ते विश्वात पसरलेले आहे. वायूंच्या शीतकरणातून बनणाऱ्या दीर्घिकेचे प्रारूप प्रत्यक्ष शोधण्यात आले असून विश्वाच्या प्रारंभी थंड वायू विश्वाच्या जाळ्यातून दीर्घिकांमध्ये येतो व त्यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीस चालना मिळते.
दीर्घेकेची वैशिष्टय़े :
  1. व्यास- आकाशगंगेच्या चार पट.
  2.  अंतर- 10 अब्ज प्रकाशवर्षे.
  3.  तारे- दोन क्वासार ताऱ्यांचा समावेश.
  4.  निर्मिती- वायूंचे शीतकरण कारणीभूत.
  • मोबाइल डेटा'ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक
'मोबाइल डेटा'ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.
 याशिवाय दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मोबाइल डेटा 'अॅक्टिव्ह' अथवा 'डिअॅक्टिव्ह' करता येणार नाही. या विषयीचा 'डेटा यूज इन्फर्मेशन रेग्युलेशन' 1 नोव्हेंबरपासून देशभर लागू करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशनमध्ये बदल केले असून, ते लागू करण्यासाठी कंपन्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार कंपन्यांना माहितीच्या वापरासंबंधी ग्राहकांना एसएमएस अथवा यूएसएसडीच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे. कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विशेष डेटा ऑफरव्यतिरिक्त अन्य योजनांमध्ये प्रत्येकी 10 एमबी डेटाचा वापर झाल्यानंतर माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची माहिती मागविण्याचे अधिकार ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विविध विशेष डेटा पॅक अंतर्गत 50 टक्के किंवा 100 टक्के डाटा वापरल्यानंतर त्या विषयीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय 500 एमबी, 100 एमबी आणि 10 एमबी डाटा शिल्लक राहिला असतानाही त्या विषयीची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त डाटाची मर्यादा ९० टक्के झाल्यानंतर योजनेची विस्तृत स्वरुपात माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे. मोबाइल डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना तो अॅक्टिव्हेट करण्यासाठी अथवा डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी 1925 या टोल फ्री क्रमांकावर अनुक्रमे ‘START’ अथवा ‘STOP’ एसएमएस करावा लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
  • बॉबी जिंदाल हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

लुईसयाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.
 अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.
 ही निवडणूक 2016 मध्ये होणार आहे.
 बॉबी जिंदाल हे वयाच्या ३६व्या वर्षी लुईसयानाचे राज्यपाल बनले होते.
 त्या वेळी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचे राज्यपाल ठरले होते.
 2016 मधील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मात्र ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार नाहीत.
 जॉन एफ केनेडी हे 43 वर्षांचे असताना निवडणूक जिंकून सर्वांत तरुण अध्यक्ष बनले होते. जिंदाल सध्या 44 वर्षांचे आहेत.

  • पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांचा भारताचा दौरा
भारताशी होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) पातळीवरील चर्चेसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ या चर्चेसाठी 23 ऑगस्ट रोजी भारताचा दौरा करतील. याविषयी नवी दिल्लीतून तारखेचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर याबाबतची घोषणा झाली. भारताने नवी दिल्लीत 23-24 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अझीझ यांच्या दरम्यान बैठकीचा प्रस्ताव सादर केला होता.
  • ट्विटरच्या "डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस"च्या कॅरॅक्‍टर मर्यादेत वाढ
जगातील आघाडीची मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरच्या "डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस"च्या (डीएमएस) कॅरॅक्‍टर मर्यादेत आज मोठी वाढ करण्यात आली आहे. आता ही मर्यादा 140 कॅरेक्‍टरवरून दहा हजारांवर नेण्यात आली आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या मित्रांना खासगी संदेश पाठविणे सहज शक्‍य होईल.
 "डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस लिमिटलेस" असावी म्हणून हा बदल करण्यात आला आहे. तत्पूर्वी जून महिन्यामध्येच कंपनीने कॅरॅक्‍टर लिमिटच्या मर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली होती.
  • उत्तराखंडमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी
उत्तराखंडमधील नदीकिनाऱ्याच्या भागात प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि सभोवतालच्या परिसरातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविक आणि पर्यटक पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन येथे येतात, आणि नदीकिनारी फेकून देतात. हा प्लॅस्टिक कचरा नदी पात्रातच राहतो, त्यामुळे नदीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • रिझर्व्ह बँकेने आपला 65,896 कोटी रूपयांचा वार्षिक अतिरिक्त नफा केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला .यंदा अतिरिक्त नफ्याची रक्कम गेल्या वर्षीच्या (2014) रकमेपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.

  • राष्ट्रपती पोलिस पदक घोषित :
राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विवेक फणसळकर, हिंगोलीचे उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेसाठी तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्यासह 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.
 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झालेल्या मुंबई परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे - चंद्रकांत गुंडगे (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे ग्रामीण), मनोहर धनावडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), शिवाजी घुगे (पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय सुरक्षा), विष्णू मालगावकर (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रामचंद्र सावंत (पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, मुंबई), दीपक सावंत (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग), बाबासाहेब गवळी (सहायक उपनिरीक्षक, अंधेरी), तानाजी लावंड (सहायक उपनिरीक्षक, सशस्त्र पोलिस, नायगाव), रवींद्र दळवी (हवालदार, मोटर वाहतूक विभाग, मुंबई), अनिल सालियन (हवालदार, सीआयडी, मुंबई), अरुण वास्के (हवालदार, अंधेरी पोलिस ठाणे), सदाशिव नाथे (हवालदार, विशेष शाखा, ठाणे), शांताराम डुंबरे (हवालदार, सशस्त्र पोलिस, नायगाव), तानाजी जाधव (हवालदार, वाहतूक शाखा, मुंबई), विजय महाडिक (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई).
  • अजिंक्य रहाणेने नोंदवला जागतिक विक्रम :





श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली पहिली कसोटी भारताच्या अजिंक्य रहाणेमुळे चांगलीच गाजली़ ती त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रहाणेने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल 8 झेल घेताना जागतिक विक्रम नोंदवला. यापूर्वी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक 7 झेल घेण्याचा विक्रम संयुक्तपणे ग्रेग चॅपल (ऑस्टे्लिया), यजुर्विंद्र सिंग (भारत), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्टे्रलिया) यांच्या नावांवर होता.


  • भारताची फुलराणी साईना नेहवाल हिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या साईनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
  • विजेतेपदाच्या लढतीत साईनाचा सामना जागतिक अव्वल मानांकित आणि गतविजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी झाला. साईनाचा कॅरोलिनाने 21-16, 21-19 असा सहज दोन गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
  • सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर :
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी यांनीही वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्याची तयारी दर्शविली आहे. राज्यातील वनपर्यटनाला चालना मिळावी, यासाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती केली होती. बच्चन यांनी 10 ऑगस्टला व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला. सचिनचाही यास होकार आला असून, हेमा मालिनी राष्ट्रीय पक्षी मोर याची ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्यास उत्सुक असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
  • आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची :
सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा स्वातंत्र्यादिनाच्या पाश्र्वभूमीवर केली. पाच नव्या जिल्ह्य़ांमध्ये बिस्वनाथ, चारायदेव, होजाय, दक्षिण सालमारा-मनकाचार आणि पश्चिम कारबी यांचा समावेश आहे. सध्या आसाममध्ये 27 जिल्हे आहेत. 
 
ट्विटर अकाउंट असलेली ताजमहाल ही जगातील पहिली वास्तू बनली .
जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक मानला गेलेला आग्रा येथील ताजमहाल आता ट्‌विटरवर आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने ट्‌विटरवर ताजमहालचे स्वतंत्र अकाउंट सुरू केले आहे. सोळाव्या शतकातील ही ऐतिहासिक वास्तू असून, ट्‌विटरवर स्वतःचे अकाउंट असलेली ही पहिलीच वास्तू ठरली

  • आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन :
पाकिस्तानचे कट्टर इस्लामवादी जनरल आणि आयएसआयचे (इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स) माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. गुल हे 1987 ते 1989 या काळात आयएसआयचे प्रमुख होते.
  • पॉस्को कंपनीची महाराष्ट्रात कोटींची गुंतवणूक :

स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियन कंपनी पॉस्को ही महाराष्ट्रात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरडा येथे स्टील प्रकल्प उभारण्यासाठी पॉस्कोने उत्तम ग्वाला समूहाशी सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पात ऑटोमोबाइल उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या स्टील कॉईल्सचे उत्पादन केले जाईल. निम्न दर्जाचे लोखंड हे स्टीलमध्ये परावर्तित करण्याचे कामही या ठिकाणी होणार आहे. जनरल मोटर्स (6400 कोटींची गुंतवणूक) आणि फॉक्सकॉन (35000 कोटींची गुंतवणूक) या नामवंत कंपन्यांनंतर पॉस्कोच्या माध्यमातून तिसरी मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. पॉस्को कंपनीने या आधी कर्नाटक आणि ओडिशामध्ये गुंतवणुकीचा केलेला प्रयत्न फलद्रूप झालेला नव्हता. ओडिशामध्ये 1990 च्या सुमारास झालेला प्रयत्न, भूसंपादनाला झालेला विरोध आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे फसला होता.
  • संथारा व्रतावर राजस्थान हायकोर्टाची बंदी :
अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. यापुढे संथारा ही आत्महत्या मानली जावी आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम 309 अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणि त्यास साथ देणाऱ्यांवर कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला जावा, असाही आदेश न्यायालयाने दिला. हा निकाल राजस्थान राज्यापुरताच मर्यादित असला तरी त्याने देशभरातील जैन समाजात खळबळ उडाली असून, याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी समाजाच्या अनेक संस्थांनी सुरू केली आहे. संथारा व्रत जैन समाजात 'सल्लेखाना वृत्त' म्हणूनही ओळखले जाते. आपला मृत्यू आता जवळ आला आहे, अशी खात्री झालेली व्यक्ती हे व्रत करते. यात मोह-मायेपासून मन काढून घेण्यासोबतच अन्न-पाण्याचे सेवन पूर्णपणे बंद करून देहत्यागाने शारीरिक क्लेषांपासूनही मुक्ती मिळविली जाते. देशातील जैन धर्मीयांची लोकसंख्या 43 लाखांच्या घरात आहे. अधिकृत नोंद नसली तरी भारतात दरवर्षी सरासरी 240 व्यक्ती संथारा व्रत ठेवून देहत्याग करतात.
  • स्टार्ट-अप इंडिया
  1. देशातील सर्व नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा.
  2. युवा उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी‘स्टार्ट अप इंडिया’ आणि देशाच्या भविष्यासाठी ‘स्टॅंड अप इंडिया’.- खाणकामगारांसाठी विशेष योजना, प्रत्येक वर्षी सहा हजार कोटींची तरतूद.
  3. वीज नसलेल्या १८ हजार ५०० गावांत एक हजार दिवसांत वीजपुरवठा.
  4.  शेती मंत्रालयाचे नाव आता कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय.
  5. देशातील एक लाख २५ हजार बॅंक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला ‘स्टार्ट अप’साठी कर्ज.
  6. नागरिकांसाठी कायद्यांचे सुलभीकरण; सध्याच्या ४४ कामगारविषयक कायद्यांचे चार कायद्यांत एकत्रीकरण.
  7.  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला आरंभ; ५० हजार कोटी रुपयांची तरतूद.
  8. माजी सैनिकांसाठी ‘वन रॅंक वन पेन्शन’ तत्त्वत: मान्य; संबंधितांशी चर्चा
  9. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत १७ कोटी बॅंक खाती उघडून गरिबांच्या सक्षमीकरणाला चालना.
  10.  स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरित करण्यामुळे १५ हजार कोटींची बचत.
  11.  देशातील सर्व शाळांत स्वच्छतागृहांची सुविधा देण्याच्या वचनाची जवळपास पूर्तता; राज्यांकडून चांगले सहकार्य.
  12. भ्रष्टाचारमुक्तसरकारचे स्वप्न साकार, १५ महिन्यांत एकपैशाचाही भ्रष्टाचार नाही; काळा पैसा भारतात परत आणण्याचेप्रयत्न सुरू.
  13.  एनडीए सरकार येण्यापूर्वी सीबीआयकडून तपास सुरू असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे ८००; आता १८०० प्रकरणी तपास सुरू.
  14. जेथे पिण्याचे पाणी मिळणे कठीण होते; तिथे गॅस पाईपलाईनची सुविधा.
  15.  विकासात दलित, पीडित, शोषितांना महत्त्वाचे स्थान
  16.  शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय कृषी विकास अपूर्ण; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवणार.
  17.  मुलाखतीशिवाय केवळ गुणवत्तेनुसार नोकरी देण्याची गरज. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
  18. काही अपवादात्मक पदे वगळून छोट्या-मोठ्या नोकऱ्यांसाठी मुलाखती रद्द करणार.
  • केंद्र सरकारने राष्ट्रीय सौर अभियानाचे उद्दिष्ट वाढवले आहे.
२०२० साली आपण २० हजार MW सौरऊर्जा निर्माण करणार होतो.आता हे उद्दिष्ट वाढवून १ लाख MW केले गेले आहे.२० हजार ==> १ लाख MW . हे वाढीव उद्दिष्ट सध्या करण्यासाठी आपण २ प्रकल्प राबवणार आहोत १. वितरीत छत सौर प्रकल्प (Distributed Rooftop Solar Projects)
२. लघु आणि विशाल स्तर सौर प्रकल्प (Medium& Large Scale Solar Projects)

खालील २ प्रवर्गातून सौरउर्जा निर्माण केली जाईल :
प्रवर्ग १ :.छतांवर सौर पॅनेल बसवून ४० हजार MW सौरऊर्जा मिळवली जाईल.
प्रवर्ग २ :खालील बाबींतून उर्वरित ६० हजार MW सौरउर्जा निर्माण केली जाईल :
बेरोजगार युवक आणि शेतकऱ्यांच्या मदतीने सौरउर्जा निर्मिती योजना राबवली जाईल.
  1. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU)
  2. मोठे खाजगी उद्योग
  3. भारतीय सौरऊर्जा महामंडळ (SECI)
  4. विविध राज्यांचे प्रकल्प
  5. यापूर्वी अस्तित्वात असलेले
प्रकल्प महत्वाचे :हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम ‘केंद्रीय नूतन आणि पुनर्नवीकरणीय मंत्रालय’ करणार आहे.
राष्ट्रीय सौर अभियान:राष्ट्रीय सौर अभियान = जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान
सुरुवात – ११ जानेवारी २०१०
उद्देश :दीर्घकालीन उर्जा आणि पर्यावरण सुरक्षा निर्माण करणे. (मोठ्या प्रमाणावर सौर उर्जा निर्माण करणे. सौरच का? कारण ती प्रदूषण करीत नाही. => पर्यावरण सुरक्षित राहते.)
शासनाचे प्रोत्साहन :केंद्राने सौरप्रकल्पांना आवश्यक साहित्यावरील अबकारी कर आणि जकात कर माफ केलेआहेत.
  • भारत-नेपाळ पेट्रोलियम पाईपलाईनला भारतीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.
पाईपलाईन मार्ग :राक्सौल (बिहार) ते अमलेखगंज(नेपाल)
उद्देश :भारत-नेपाल दरम्यान तेल आणि वायू क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत बनवणे.नेपाळला पेट्रोलियम उत्पादनांचा दीर्घकालीन पुरवठा करणे.
बांधकाम :या पाईपलाईनचे बांधकाम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ही सार्वजनिक कंपनी करील.ही कंपनी नेपाळमधील अमलेखगंज येथील डेपो आणि इतर सुविधांचेही बांधकाम करील.भारत-मंगोलिया आणि
भारत-फ्रांस सामंजस्य करार:--भारतीय कॅबिनेटने भारत-मंगोलिया आणि भारत-फ्रांस सामंजस्य करारास मान्यता दिली आहे.या करारानुसार दोन्ही देशांत सहकारी संस्थागत संबंध स्थापन केले जातील.तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेबाबत परस्परांना तांत्रिक सहकार्य केले जाईल.

 थोडक्यात महत्वाचे : 
  1. कोणत्या सरकारने आपले राज्य " संपूर्णपणे डिजिटल राज्य" जाहीर केले अशी कामगिरी करणारे ते देशातील पहिले राज्य ठरले.:- केरळ
  2.  महाराष्ट्र सरकारच्या वाघ वाचवा मोहिमेसाठी अमिताभ बच्चन आणि --------------------- हे ब्रँड अॅम्बॅसिडर होणार आहे ?:- सचिन तेंडुलकर
  3.  जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी --------------ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली :- सायना नेहवाल
    या अगोदर
    रौप्यपदक : सायना नेहवाल (२०१५)
    कांस्यपदक : प्रकाश पदुकोन (१९८३),
    ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा (२०११),
    पी. व्ही. सिंधू (२०१३, २०१४) यांना पदके मिळाली होती.
  4.  अल्पसंख्याकांसाठी अलीकडेच भारत सरकारने कोणती योजनासुरु केली:-" नई Manzil
  5.  अलीकडेच कोणत्या राज्य विधानसभे मध्ये फाशी रद्द करण्याचा ठराव झाला :- त्रिपुरा
  6.  अलीकडेच भारतीय कोणते शहर जागतिक पर्यटन शहरातील फेडरेशन ( WTCF ) च्या सदस्य बनला:-कोची
  7. (WTCF विविध देश आणि प्रदेशातील पर्यटन शहरे आणि संस्था सहकार्य आणि पर्यटन विकास पातळीवर व्यासपीठ तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहेअध्यक्ष : श्री वांग अंशुन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा