Post views: counter

Current Affairs Jan 2016 Part- 2

 
 • मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन :-
* देशातील पहिले ‘बुलेट ट्रेन’चे जाळे, नागरी अणुकरार सहकार्य सामंजस्य करारांसह दोन्ही देशांमधील संरक्षण तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीस आरंभ करणाऱ्या इतर महत्त्वाच्या करारांवर भारत आणि जपान यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान धावणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे ५०५ किमीचे हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.
* या प्रकल्पासाठी जपानने भारताला ५०वर्षाच्या दीर्घअवधीसाठी ७९ हजार कोटीचे कर्ज दिले. या कर्जावर ०.१% व्याज आकारण्यात येणार आहे. भारताला १५ वर्षांनतर या कर्जफेडीची सुरुवात करावयाची आहे
* प्रकल्पाची सुरुवात:- २०१७
* २०१४ सालापासून ही बुलेट ट्रेन धावू लागेल

बुलेट ट्रेनचा इतिहास:-
* १९६४ सालच्या ऑलिम्पिक्स वेळी जपानमध्ये बुलेट ट्रेनची संकल्पना अस्तित्वात आली. टोकियो आणि ओसाकादरम्यान ही सेवा सुरू केली गेली.
’* इटली देशाने १९७८ साली रोम आणि फ्लोरेन्सदरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा रेल्वे रुळांची निर्मिती केली आणि अतिवेगवान रेल्वेच्या संकल्पना अस्तित्वात आणण्याची मुहूर्तमेढ युरोपमध्ये रोवली.
* ’कोणत्या देशात बुलेट ट्रेन धावतात – ऑस्ट्रीया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, दक्षिण कोरीया, स्पेन, स्वीडन, तैवान, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि उजबेकिस्तान.
’* जगातील एकमेव युरोप देशामधील अतिवेगवान रेल्वेने
आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या आहेत. तर जगभरातील अतिवेगवान रेल्वेच्या जाळ्यापैकी ६० टक्के भाग चीनने व्यापला आहे.
* ’दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी आधुनिक अतिवेगवान रेल्वेसाठीचे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली.

जगातील पहिल्या पाच बुलेट ट्रेन –
१. शांघाय मागलेव –
जास्तीत जास्त वेग ताशी ४३० किमी आणि कमीत कमी वेग ताशी २५१ किमी
२००४ सालापासून सुरू -शांघाय मागलेव ते शांगाय पुदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत

२. हारमोनी सीआरएच ३८० ए
ताशी ३८० किमी ह्य़ुएन ते गुंनगेजहो
३. एजीव्ही लटालो- (
ताशी ३६० किमी – युरोपमधील नापोली- रोम- फिरेन्जे- बोलोगना – मिलोना कॉरिडॉर या शहरांना जोडते.
४. सीमेन्स वेलारो ई / एव्हीएस १०३ –
वेग ताशी ३५० किमी प्रति तास – स्पेनमधील बार्सेलोना आणि मॅद्रिजदरम्यान धावते.
५. टालगो ३५० (टि ३५०)- (
ताशी ३५० किमी – २००५ सालापासून स्पेनमधील मॅद्रिद- झारागोजा-लिइदा ते मॅद्रिद बार्सेलोनादरम्यान धावते.
 • अबिद अली नीमुचवाला विप्रोचे नवे ‘सी ई ओ
अबिद अली नीमुचवाला यांची विप्रो या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर या पदावरील विद्यमान टी. के. कुरियन यांना कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे.स्पर्धक माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसमधून आलेले व विप्रो समूहात गेल्याच वर्षी समूह उपाध्यक्ष म्हणून दाखल झालेले नीमुचवाला हे येत्या १ फेब्रुवारी रोजी नव्या पदाचा कार्यभार स्विकारतील.विप्रोने तिच्या संचालक मंडळावरील वरिष्ठ पदांमध्ये सोमवारी आमुलाग्र बदल केले. असे करताना विप्रोने टाटा समूहातील व देशातील पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‌र्हिसेसचे नीमुचवाला यांना आपले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. ते विप्रो समूहात एप्रिल २०१५ मध्ये समूह अध्यक्ष व मुख्य परिचलन अधिकारी म्हणून दाखल झाले होते.टीसीएसमधील तब्बल २३ वर्षांच्या अनुभवानंतर ते येथे आले होते. तर पुढील वर्षांत वयाची ५८ वर्षे पूर्ण करणाऱ्या कुरियन यांची विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून याच महिन्यात पाच वर्षेपूर्ण होत आहेत.
 • दारूगोळ्याची संशोधकांकडून यशस्वी चाचणी :
भारताचा सर्वाधिक शक्तिशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, आज संरक्षण संशोधकांनी याची यशस्वी चाचणी घेतली.
 ओडिशातील चांदीपूर येथे ही चाचणी घेण्यात आली असून या वेळी रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
 पुण्यातील "डीआरडीओ"च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थांनी हा दारूगोळा तयार केला आहे.
 तसेच हा दारूगोळा तयार केला जात असताना प्रयोगशाळेत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या तीव्रतेच्या चाचण्या घेण्यात आल्या.  दारूगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अर्जुनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे. 
 • नव्या राज्यघटनेसाठी श्रीलंकेमध्ये प्रक्रिया सुरू :
देशासाठी नवी राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेला श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरवात झाली.
 सर्व सदस्यांचे मिळून घटना मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेमध्ये सादर केला. घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांचा सहभाग आवश्‍यक असून, त्यावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी 17 सदस्यांची नियुक्ती करावी, असे विक्रमसिंघे यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.  अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असलेली 1978 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना अस्तित्वात आणली जाणार आहे. 
 •  माहिती आयुक्तांची नियुक्ती :
केंद्रीय माहिती आयोगात बऱ्याच काळापासून रिक्त असलेल्या तीन पदांवर माहिती आयुक्तांची सहा आठवडय़ांत नियुक्ती करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.
तीन माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी सरकारने मागितलेली मुदत आम्ही यापूर्वीच दिली होती, असे सांगून आता सहा आठवडय़ांच्या मुदतीत या नियुक्त्या कराव्यात, असे न्या. जे.एस. खेहर व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने सांगितले.दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते.मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.
 • 'अतुल्य भारत' या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन यांची नियुक्ती :
गेल्या दहा वर्षांपासून 'अतुल्य भारत' या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता.
परंतु आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खानऐवजी अमिताभ बच्चन  दिसणार आहेत.आमिर खानबरोबरचा करार संपल्यानंतर आता पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली आहे.यापूर्वी, अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटन खात्याच्या 'खुशबू गुजरात की' या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर होते.
 • ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान महाराष्ट्राला :
भारताची औद्योगिक शक्ती जगाला दाखिवण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया सप्ताह’ आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.मुंबईमध्ये होणारा हा जागतिक औद्योगिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी ‘टीम महाराष्ट्र’ म्हणून काम करु या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.या सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.‘मेक इन महाराष्ट्र’ सप्ताहाच्या लोगो अनावरणाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात झाला.
 • जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी :
केंद्राच्या नमामि गंगे योजनेअंतर्गत खासगी आणि सरकारी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.कंपनी कायद्यानुसार सुरु होणारा हा विशेष प्रकल्प आहे.त्यासाठी सरकारने यंत्रणेचे स्वरूप, नियामक मंडळ, बाजारपेठ इत्यादी सर्व मुद्द्यांचा विचार करून त्याची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.गंगा नदीच्या पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे.जलस्रोत मंत्रालयाने अगोदरच रेल्वेशी करार केला आहे.त्यानुसार रेल्वे अशा प्रकल्पातील शुद्धीकरण केलेले पाणी खरेदी करेल.
 • पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार :
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार करून मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ केला आहे.राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या हवाई पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला.‘हेली-टुरिझममुळे पर्यटकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळावा, अशी मूळ संकल्पना असणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
भारतात अशाप्रकारे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.हेलिकॉप्टर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना करांसहित प्रतिव्यक्ती 32,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

 • घड्याळ बनवणाऱ्या एचएमटी कंपनी बंद करण्याचा निर्णय :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या एचएमटी वॉचेस आणि एचएमटी चिनार वॉचेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच समूहाची आणखी एक कंपनी एचएमटी बेअरिंग्जदेखील बंद होणार आहे.
या तीनही कंपन्या अनेक दिवसांपासून तोट्यात आहेत. या कंपन्यांना पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे.सप्टेंबर 2014 मध्येच सरकारने एचएमटीला बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
 • ५९ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा २०१६:
* गतविजेता आणि अनुभवी मल्ल जळगावचा विजय चौधरी याने निर्णायक लढतीत पूर्व मुंबईच्या विक्रांत जाधव याला चारीमुंड्या चीत करीत दुसर्यांदा मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ सन्मान राखला. सलग दोनदा ‘महाराष्ट्र केसरी’ पटकावणारा विजय हा सहावा मल्ल आहे.
* रोहित पटेल यांचा पठ्ठा विजय हा ‘डबल केसरी’ पटकावणारा जळगावचा दुसरा पैलवान ठरला. त्याच्यापूर्वी लक्ष्मण वडार यांनी अशी करामत साधली होती.

* आतापर्यंतचे सलग दोनदा कामगीरी करणारे 'महाराष्ट्र केसरी'
१) गणपत खेडकर (१९६४-१९६५)
२) दादू चौगुले (१९६९-१९७०)
३) लक्ष्मण वडार (१९७२-१९७३)
४) चंद्रहार पाटील (२००७-२००८)
५) नरसिंग यादव (२०११,२०१२,२०१३)
६) विजय चौधरी (२०१४,२०१६)

 • सीओईपीच्या विद्यार्थ्यांची 'स्वयम'भरारी :
सागरी आणि जमिनीवरील सुरक्षा भक्कम करण्यासाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला संपूर्ण भारतीय बनावटीचा 'स्वयम' हा एक किलो वजनाचा उपग्रह एप्रिलमध्ये श्रीहरीकोटा येथून 29 एप्रिल रोजी अवकाशात झेपावणार आहे. 'भारतीय अवकाश संशोधन संस्थेने' (इस्रो) त्यासाठी हिरवा कंदील दाखविला असून, त्याचे लवकरच 'काउंटडाउन' सुरू होईल. अभियांत्रिकीच्या एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम' हा देशातील पहिला उपग्रह आहे. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षात असलेल्या वेगवेगळ्या शाखांमधील 200 विद्यार्थ्यांनी यात योगदान दिले आहे. तसेच जून 2014 मध्ये 'स्वयम' पूर्ण तयार झाला. बंगळूर येथील 'इंडियन सॅटेलाइट ऍप्लिकेशन सेंटर' येथे जुलै 2014 रोजी पाठविण्यात आला. तेव्हापासून दर तीन महिन्यांनी 'सीओईपी'चे विद्यार्थी या केंद्रावर जाऊन त्यातील तांत्रिक गोष्टीची पूर्तता करत होते.
 • इंटरपोलची मदत मागणार :
हवाई तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची ओळख पटविण्यासाठी 'ब्लॅक कॉर्नर' नोटीस बजावण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी इंटरपोलची मदत घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले.
 गृहमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे (एनआयए) पथक हवाई तळ आणि तळाबाहेरील साक्षीदारांची तपासणी करत असल्याचेही गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

 • प्रख्यात गायक डेव्हिड बोवी यांचे निधन :
'ब्लॅकस्टार', 'द राईज अँड फॉल ऑफ झिगी स्टारडस्ट' अशा विविध संगीत कलाकृतींमधून स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले प्रख्यात गायक डेव्हिड बोवी यांचे कर्करोगाने निधन झाले.
 बोवी (वय 69) यांचे निधन झाल्याची घोषणा त्यांचे पूत्र व प्रसिद्ध दिग्दर्शक डंकन जोन्स यांनी केली.
 लंडन येथे 8 जानेवारी 1947 मध्ये जन्मलेल्या बोवी यांचे मूळ नाव डेव्हिड जोन्स असे होते.
 बोवी यांनी 2006 मध्ये न्यूयॉर्क येथे अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम केला होता.   'द मॅन हू फेल ऑन द अर्थ' या 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली.
 • उनामध्ये उभारणार ऊर्जानिर्मिती प्रकल्प :
गुजरातच्या गीर-सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे चार हजार मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला वीस हजार कोटी रुपये खर्च येईल.खासगी क्षेत्रातील हा दुसरा प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्रीय विद्युत आयोगाच्या सहकार्याने उभारला जाणार असून, तो आयात कोळशावर चालेल. या प्रकल्पातून तयार होणारी 40 ते 50 टक्के वीज गुजरातला मिळणार असून, उर्वरित वीज अन्य राज्यांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील पहिला खासगी वीज प्रकल्प कच्छमधील मुंद्रा येथे टाटा पॉवर कंपनीने उभारला असून, चार हजार मेगावॉटचा हा प्रकल्प कार्यान्वितही झाला आहे.
 • 'फ्लिपकार्ट'च्या 'सीईओ'पदी बिनी बन्सल :
ऑनलाइन खरेदी-विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल केले असून, कंपनीचे सहसंस्थापक बिनी बन्सल आता कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम पाहणार आहेत. फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. बिनी बन्सल यांच्याकडे आता फ्लिपकार्टच्या आर्थिक, कायदेशीर, कॉर्पोरेट विकास व मानवसंसाधन विभागांसह ई-कार्ट, एरियाज-कॉमर्स व मिंत्रासारख्या उपकंपन्यांच्या कारभाराची जबाबदारी हस्तांतरित होणार आहे.
 • प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात फ्रांसचे सैन्यही परेड करणार :
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्राचे सैन्य भाग घेत आहे.
 26 जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्यासोबतच यावर्षी फ्रांसचे सैन्यही परेड करणार आहे.
 फ्रांसचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते. फ्रांस आर्मीची एक तुकडी राजस्थानमध्ये भारताबरोबर संयुक्त युद्धसराव करण्यासाठी आली आहे. 8 ते 16 जानेवारीदरम्यान हा युद्धसराव चालणार आहे.
 • ७३ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार २०१६:

* बेस्ट मोशन पिक्चर्स ड्रामा:-सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द रेव्हनंट
सर्वोत्कृष्ट अभिनेता:- लिओनाडरे डी कॅप्रिओ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-अलेजांड्रो गोंझालेझ इनारिटू ( द रेव्हनंट )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- ब्री लार्सनला (चित्रपट:- रूम)

म्युझिकल किंवा कॉमेडी
श्रेणी:-सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द मार्शियन
सर्वोत्कृष्ट अभिनेता :-मॅट डॅमन (चित्रपट:-द मार्शियन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:-जेनिफर लॉरेन्सने (जॉय’ )
४ दा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला
उत्कृष्ट सहायक अभिनेता:-सिल्वेस्टर स्टॅलोन
* गायीका लेडी गागा हिला पहिल्यांदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला " अमेरिकन हाॅरर स्टोरी होटल मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा (टीव्ही) पुरस्कार मिळाला
 • आर.के. माथूर मुख्य माहिती आयुक्त-
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी संरक्षण खात्याचे माजी सचिव आर.के. माथूर यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. त्यामुळे प्रथमच माहिती आयुक्तांपैकी एकाची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रथेला छेद देण्यात आला आहे. आर के माथूर हे त्रिपूरा कॅडरचे आयएएस अधिकारी होते त्यांनी दिल्ली आयआयटीतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या माहिती आयुक्त म्हणून वसंत सेठ, एम,ए.खान युसूफ, प्रा. मदभूषनम आचार्ययुला, सुधीर भरगवा असे सात सदस्य असून त्यात सर्वात जेष्ठ वसंत सेठ आहेत मात्र माथूर यांना नियुक्ती करताना सेठ यांना डावलले गेले आहे.मुख्य माहीती आयुक्ताची निवड प्रधानमंत्री (समीतीचे अध्यक्ष), लोकसभा विरोधीपक्षनेता किंवा मोठ्या पक्षाचा नेता, कॅबीनेट दर्जाचा मंत्री (जो पंतप्रधान सुचवेल) या निवड समीतीच्या शिफारशीने राष्ट्रपती करीत असतो. आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य 5 वर्षापर्यंतकिंवा वयाच्या 65 व्या वयापर्यंत जी अट आधी पूर्ण घेईल तोपर्यंत पदावर कार्यरथ राहतात.केंद्रीय माहिती अधिकार कायदा 2005 नुसार केंद्रात एक माहिती आयोग स्थापन करण्यात आले असून, मुख्य माहिती आयुक्त व 7 इतर माहिती आयुक्त असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते.

 • : आर. एम. लोढा समिती :
विविध वादांमुळे मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुधारणेसाठी न्यायमूर्ती लोढा समितीने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला.

महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे :
प्रत्येक राज्यातून एकच क्रिकेट संघटना ‘बीसीसीआय‘ची पूर्ण सदस्य असेल. म्हणजेच, प्रत्येक राज्यातून एकाच संघटनेस मतदानाचा अधिकार असेल. ‘आयपीएल‘ आणि ‘बीसीसीआय‘ची प्रशासकीय यंत्रणा वेगवेगळी असेल. आयपीएल‘च्या मुख्य प्रशासकीय मंडळामध्ये एकूण नऊ सदस्य असतील.‘बीसीसीआय‘चे खजिनदार आणि सचिव हेदेखील या प्रशासकीय मंडळाचा एक भाग असतील. पूर्णवेळ सदस्यांद्वारे दोन प्रशासकीय सदस्यांची नियुक्ती किंवा निवड होईल. उर्वरित पाच सदस्यांपैकी दोन सदस्यांची शिफारस फ्रॅंचायझी करतील. एक सदस्य खेळाडूंच्या संघटनेचा प्रतिनिधी असेल आणि महालेखापालांनी (कॅग) नियुक्त केलेल्या एका सदस्याचाही यात समावेश असेल. आयपीएल‘च्या प्रशासकीय मंडळाला मर्यादित स्वातंत्र्य असेल. खेळाडूंची संघटना स्थापन करण्याविषयी भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी, मोहिंदर अमरनाथ आणि अनिल कुंबळे यांची समिती अहवाल सादर करेल. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार यांच्या नियुक्तीसाठी किमान निकष निश्‍चित करणे गरजेचे आहे.उमेदवार भारतीय असावा उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे उमेदवार दिवाळखोर नसावा उमेदवार मंत्रीपदी किंवा सरकारी नोकर नसावा उमेदवाराने एकूण नऊ वर्षांहून अधिक काळ ‘बीसीसीआय‘मधील कोणतेही पद भूषविलेले नसावेप्रत्येक पदाधिकाऱ्याचा कालावधी तीन वर्षे असेल. कोणताही पदाधिकारी तीनपेक्षा अधिक वेळा पद भूषवू शकणार नाही. तसेच, प्रत्येक वेळी कालावधी संपल्यानंतर पुढील पद भूषविण्यापूर्वी किमान काही काळ ‘कूलिंग पीरिअड‘ असेल.
 • प्रियंकाला  अमेरिकेत ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ 
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे. अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’ तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला. या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली होती.पीपल्स चॉईस श्रेणीत प्रियंकासमोर एमा रॉबर्टस्, जेमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्शिया गे हार्डन यासारख्या प्रसिद्ध हॉलीवूड-टीव्ही अभिनेत्रीचे तगडे आव्हान होते.मात्र, ते पेलत प्रियंकाने नवीन टी.व्ही. मालिका श्रेणीतील ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ आपल्या नावे केला.हा अवॉर्ड पटकावणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. या पुरस्काराची निवड चाहत्यांच्या मतदानाद्वारे करण्यात येते.‘क्वान्टिको’ हा प्रियंकाचा पहिला हॉलीवूड प्रोजेक्ट होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली.
 • बाल न्याय सुधारणा विधेयक-
अल्पवयीन गुन्हेगाराचे वय बदलून कठोर शिक्षेची तरतूद असलेले बाल न्याय सुधारणा विधेयक राज्यसभेत 22 डिसेंबर 2015 मध्ये संमत करण्यात आले. दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या अमानवीय निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संसदेत नव्हे तर समाजातील सर्व स्तरातून केंद्र सरकारवर अल्पवयीन गुन्हेगाराचे वय बदलविण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. या विधेयकाला माकपचे सीताराम येच्युरी त्यांनी आक्षेप घेत सभात्याग केला परंतु सर्व सहमतीने बालगुन्हेगारासाठीची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षांपर्यंत कमी करण्याच्या बहुचर्चीत ‘बालगुन्हेगार  न्यायीक -काळजी व संरक्षण विधेयक’ (ज्यूवेनाईल जस्टीस) 2015 लाराज्यसभेने मंजुरी दिली.या विधेयकामुळे बालगुन्हेगाराचे वय 18 वरून 16 निश्‍चित करण्यात आले.परीणामी गुन्हेगारीच्या संदर्भातील नव्या व्याख्येनुसार 16 ते 18 वयोगटातील मुलामुलींची गणना प्रौढातच केली जाईल. यापूर्वी 1986 मध्ये राजीव गांधी सरकारनेसंसदेत मंजूर केलेल्या देशातील पहिल्या कायद्यात बालगुन्हेगाराचे वय 16 होते मात्र वाजपेयी सरकारने 2000 मध्ये ते 16 वरून 18 वर नेले. निर्भया प्रकरणातील बलात्कारी मुलगा 18 वर्षाचा आतील असल्याने कायद्यानुसार सुटला परिणामी मोदी सरकारने आपल्या पक्षाचा कायदा पुन्हा बदलवून बालगुन्हेगाराचे वय 16 वर आणले. 
 •          मिस युनिव्हर्स 2015-पिया अलोन्झो-
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये झालेल्या 64 व्या मिस युनिव्हर्स (विश्‍वसुंदरी) स्पर्धेत फिलीपाईन्सच्या पिया अलोन्झो हिने ‘मिस युनिव्हर्स’ चा किताब पटकावला. या स्पर्धेत मिस कोलंबियाची अ‍ॅड्रियाना गुट्रेझ पहिली उपविजेती तर यूएसची ऑलिव्हिया जॉर्डन दुसरी विजेती ठरली आहे. 80 देशांच्या सौंदर्यवतींमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व उर्वशी रौतेलाने केले पण तिला टॉप 15 मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे.विश्‍वसुंदरी (मिस युनिव्हर्स) 2015 या सौंदर्य स्पर्धेत यजमान स्टीव्ह हार्वे यांनी चुकून मिस कोलंबिया अ‍ॅड्रियाना गुट्रेझ यांना विजेते घोषीत केले होते नंतर निवेदकांनी चुकून नाव जाहीर केले असून पिया अलोन्झो ही विजेती आहे असे घोषीत करण्यात आले.मिस युनिव्हर्स स्पर्धेतील पहिली भारतीय महिला सुश्मिता सेन 1994 मध्ये ठरली होती तर 2000 मध्ये लारा दत्ता या स्पर्धेत विजेती ठरली होती.

 • हेमलकसा चित्रपटाला ऑस्करचे नामांकन-
88 व्या ऑस्कर अ‍ॅवार्डस मध्ये मराठी चित्रपटाद्वारे पदार्पणात राष्ट्रीय पुरस्कार मिळणार्‍या महिला चित्रपट दिग्दर्शिका डॉ. समुद्धी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा ‘हेमलकसा’ ला ओपन कॅटेगरी मध्ये नामांकन मिळाले आहे. 88 व्या ऑस्कर अ‍ॅवार्ड मध्ये परदेशी भाषा प्रकारात मराठी, तर ओपन प्रकारात नाचोमिया कुम पसार (कोकणी फिल्म), जलम (मल्याळम) आणि रंगी तरंग (कन्नड) या पाच चित्रपटाची निवड केली आहे. रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते (2008) डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जिवनावर आधारित‘डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो’ हा मराठी चित्रपट यावर्षी सुरवातीला प्रदर्शित झाला होता. त्याच चित्रपटाचा काही भाग चित्रीत करून तो हेमलकसा नावाने हिंदीत तयार करण्यात आला आहे.हेमलकसा हा समृद्धी पोरे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका नाना पाटेकर तर मंदा आमटे यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी केली आहे.

 • साहित्य अकादमी पुरस्कार - 2015
प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आणि लेखक अरूण खोपकर यांच्या ‘चलत-चित्तव्यूह’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच प्रसिद्ध विचारवंत श्रीकांत बहुलकर यांना भाषा सन्मान देण्यात आले आहे.आजपावेतो मराठी साहित्याच्या परीघाबाहेर राहिलेल्या तांडयावरच्या व्यथांना कवितारूप देणारे औरंगाबाद येथील वीरा राठोड यांना त्यांच्या ‘सेन सायी वेस’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला आहे. तर बालसाहित्याच्या योगदानासाठी लिलाधर हेगडे यांना अकादमीच्या पुरस्कार घोषीत करण्यात आला.साहित्य अकादमीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 23 भाषाासाठी हे पुरस्कार घोषीत केले त्यात सायरस मिस्त्री(इंग्रजी), के आर मीरा (मल्याळम), जसविंदर सिंग (पंजाबी), मधू आचार्य आशावादी(राजस्थानी) उदय मेंबरे (कर्णपर्व नाटक) कुला सैकिया (आसामी) मनमोहन झा (मैथिली) गुप्त प्रधान (नेपाळी), विभूती पटनायक (उडिया) माया राही (सिंधी), ध्यानसिंग (डोंगरी) रामदर्श मिश्रा(हिंदी) रामशंकर अवस्थी (संस्कृत) यांना कवितासंग्रहासाठी गौरविण्यात आले.

साहित्य अकादमी विषयी थोडक्यात
*साहित्य अकादमी स्थापना - 1954
*साहित्य अकादमी पुरस्कार सुरवात -1955   साहित्य अकादमीचे मुख्यालय-दिल्ली
*साहित्य अकादमी कार्यालय - कोलकत्ता, मुंबई बंगलोर, चैन्नई.
*साहित्य अकादमी मान्य केलेल्या भाषा - 24
*भाषा सध्याचे साहित्य अकादमी अध्यक्ष - विश्‍वनाथ प्रसाद तिवारी
 • राज्यातील UPSC च्या उमेदवारा साठी शिष्यवृत्ती योजना 
     
 महाराष्ट्राचा रहिवासी आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अखिल भारतीय सेवांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ताही मिळणार आहे.या योजनेनुसार राज्यातील होतकरू आणि गुणवंत उमेदवारांना यूपीएससी परीक्षांची पूर्व तयारी करून घेणाऱ्या दिल्ली येथील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य तसेच दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षणाच्या वास्तव्याच्या कालावधीत प्रतिमहिना दहा हजार रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, या योजनेसाठी २३ कोटी ४६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्राचा रहिवासी आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.तसेच तो मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारा, तथापि, अंतिमत: यशस्वी न झालेला असणे आवश्यक आहे.उमेदवाराने अर्जासह पदवी परीक्षा प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, त्या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणपत्रिका सादर केल्यास भाग-१ (पूर्व परीक्षा ते मुलाखत), भाग-२ (मुख्य परीक्षा) व भाग-३ (मुलाखत) अशा तिन्ही भागांचा तो प्रत्येकी एकदाच लाभ घेऊ शकतो.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना त्या वर्षीच्या मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील निवडक प्रशिक्षण वर्गांमध्ये मुलाखतीपर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी भाग-१ ही शिष्यवृत्ती देण्यात येईल.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी या शिष्यवृत्तीचा अर्ज मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचा शासनाने निवड केलेल्या दिल्ली येथील तीनपैकी एका प्रशिक्षण संस्थेत प्रवेश शुल्काचा भरणा शासनामार्फत केला जाईल.या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा उमेदवार पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दिली गेलेली भाग-१ ची शिष्यवृत्ती त्या वर्षासाठी समाप्त करण्यात येईल. मात्र, पुढील वर्षी तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षेसाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.त्याचप्रमाणे असा उमेदवार मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याची त्यावर्षीसाठीची शिष्यवृत्ती समाप्त होईल. मात्र, पुढील वर्षी तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुलाखतीसाठीच्या शिष्यवृत्तीस पात्र राहील. त्याचप्रमाणे भाग-१ चा लाभ न घेतलेल्या मात्र चालू वर्षात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास भाग- २ व ३ चा लाभ मिळेल. तसेच भाग-१ व २ चा लाभ न घेतलेला मात्र मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार भाग-३ च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकणार आहे.

 
 1. १२०१५ या वर्षाची अंतिम लोक अदालत कोणत्या दिवशी पार पडली:-१२ डिसेंबर ( नवी दिल्ली येथे)
 2.  नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यावेतनात किती टक्के वृद्धी केली आहे:- २३.५%
 3. नोव्हेंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम ---------------ही होती:- मेक इनइंडिया
 4. नोव्हेंबर २०१५ मध्ये आसीयानचे २७वे शिखर सम्मेलन कोठे पार पडले ? :- कुआलालम्पूर (मलेशिया)
 5. नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टरई यांनी कोणता नवा पक्ष स्थापन केला ? :- नया शक्ती
 6. जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर २०१५ मध्ये कोणता देश इबोला मुक्त देश म्हणून घोषित केला :- सिएरा लियाॅन
 7. जी २० देशाचे नोव्हेंबर २०१५ मध्ये -------------- येथे शिखर सम्मेलनआयोजित केले होते ? :-अंताल्या ( तुर्की)
 8.  चिली मध्ये संपन्न झालेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल विश्व कप स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :- नायजेरिया
 9.  निवड
  सुनील कनोरिया:- असोचैम चे नवे अध्यक्ष
  हर्षवर्धन नेओतिया :- फीक्की चे नवे अध्यक्ष
  विजय गोखले:- चीन मधील राजदूत
  अनिल वाधवा:- इटली मधील राजदूत
 10. १०) चर्चित पुस्तके
  द स्टोरी ऑफ माय लाईफ:- हेलेन केलर
  व्हाट हैपण्ड टू नेताजी :- अनुज धरद
  मॉडर्ण गुरुकुल :- सोनाली बेंद्रे
  हिटलर:- बायोग्राफी:- पीटर लोनग्रीच