Post views: counter

Current Affairs Jan 2016 Part-3


 • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.७५ टक्के तर रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) देखील ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले
 • पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्याचा निकालही तीन दिवसांतच लागला. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखलेल्या सामन्यात अखेर पीटर सीडलने विजयी धाव घेऊन ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन गडी राखून ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकत मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंड २००३ नंतर प्रथमच एखाद्या मालिकेत पराभूत झाले.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क‘ प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव‘ प्रक्रिया राबविणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चिऱत केली
 • विमा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या सरकारच्या धोरणाला कॅनेडियन सन लाइफ फायनान्शिअलने प्रोत्साहन देऊ केले आहे. कंपनीने तिची पूर्वीपासून भागीदार असलेल्या बिर्ला सन लाइफ इन्शुरन्समधील हिस्सा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १,६६४ कोटी रुपये मोजण्यात आले . बिर्ला समूहाची सन लाइफबरोबरची भागीदारी १९९९ पासून आहे. याच भागीदारीतून बिर्ला समूहाने आयुर्विमा तसेच म्युच्युअल फंड व्यवसायात २००१ मध्ये शिरकाव केला.
 •   संयुक्त अरब अमिरातीचा प्रमुख स्ट्रायकर अहमद खलील याची आशियातील या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली
 • टाइम पर्सन ऑफ द ईयर' :-
टाइम नियतकालिकाने जर्मनीच्या चांसलर अन्जेला मर्केल यांना २०१५ च्या टाइम पर्सन ऑफ द ईयर या पुरस्कारासाठी निवड केली२९ वर्षानी प्रथमच एखाद्या महिलेची यासाठी निवड केली मर्केल यांच्या अगोदर 1986 मध्ये फिलीपींस च्या पहिल्या महिला प्रेसिडेंट कोराजन एक्वीनो यांना या पुरस्कारासाठी निवडले होते एक्वीनो च्या अगोदर ब्रिटेन ची राणी क्वीन एलिजाबेथ-2 (1952) आणी विंडसर ची राजकुमारी वैलीज सिम्प्सन (1936) मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता युरोपातील हजारो निर्वासीतासाठी राष्ट्राच्या सीमा खुल्या केल्याबद्दल मर्कल यांना हा सन्मान देण्यात आला.तसेच निर्वासितांना सामावून घेणे हाच या संकटावरील उपाय असल्याची भूमिका यांनी मांडली होती
* आयएसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी यादीत दुसर्या क्रमांकावर राहिला
* पुरस्काराची सुरुवात:- १९२७
या अगोदर हा पुरस्कार
२०१२:- बराक ओबामा
२०१३:-पोप फ्रांसिस
२०१४:-Ebola fighter
* महात्मा गांधीना हा पुरस्कार १९३० मध्ये मिळाला होता
 • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित :
- नाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत अमरावती, नाशिक, ठाणे, नागपूर असे चार अप्पर आयुक्त आणि एकूण 24 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असे कार्यक्षेत्र विभागले आहे. त्यापैकी धारणी, नाशिक, कळवण, तळोदा, जव्हार, डहाणू, किनवट, पांढरकवडा, गडचिरोली,अहेरी व भामरागड हे 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले.

- आदिवासी विद्यार्थी स्पर्धेत टिकावे म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी निवासी आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 ते 60 हजार रुपये खर्च करते.

- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक प्रकल्पामधून किमान हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी आश्रमशाळेत पाठविण्याचा निर्णय झाला होता. 25 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते.

- तसेच हे उद्दिष्टही केवळ पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच पूर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चून हा प्रयोग करण्याऐवजी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही.
 • गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांचा राजीनामा :
- तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी उचललेल्या पावलांमुळे नाराज असलेले गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांनी राजीनामा दिला.
- तालिबानशी शांततेच्या चर्चा केल्या जाऊ नयेत, असे नबील यांचे ठाम मत आहे.
- याच आठवड्यामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी कंदाहार विमानतळावर केलेल्या भीषण हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला आणि त्यानंतरची चकमक तब्बल 27 तास सुरू होती. अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीनिमित्त पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांतील शांततेची दीर्घकाळ प्रलंबित असलेली चर्चा सुरू करणे, हादेखील त्यांच्या भेटीचा एक उद्देश होता.
- पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या चर्चेची पहिली फेरी जुलैमध्ये झाली होती. अफगाणिस्तानमधील सध्याच्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार असल्याची स्थानिक प्रशासनातील काही घटकांची भावना आहे.
- पाकिस्तान आणि तालिबानशी चर्चेचा विरोध करत नबील यांनी दिलेला राजीनामा हा याच अस्वस्थतेतून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 • "इसिस"ने तयार केले मॅंडारिन भाषेमध्ये गाणे :
- जिहादमध्ये सहभाग घेण्यासाठी चिनी युवकांना प्रेरित करण्यासाठी "इसिस"ने मॅंडारिन भाषेमध्ये एक गाणे तयार केले असून हे गाणे पाकिस्तानमध्ये तयार केले गेले आहे.
- दोन आठवड्यांपूर्वीच "इसिस‘ने चीनच्या नागरिकाची हत्या केली होती. आता त्या देशातील मुस्लिमांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी त्यांच्याच भाषेत हे गाणे तयार केले आहे.
- "इसिस"ने जागतिक स्तरावर सुरू केलेल्या जिहादमध्ये चीनमधील मुस्लिमांनी सहभाग घ्यावा, असा आग्रह या गाण्यामध्ये केला आहे
- तसेच "इसिस"ने तयार केलेल्या "सैतानाचे राज्य" असलेल्या साठ देशांच्या यादीत चीन आहे.

 • # फेसबुकवर पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय :
- लवकर 'बाय बाय' करण्यात येणाऱ्या 2015 या वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय ठरलेले विषय जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याचे समोर आले आहे.
- जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमातून चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.
- जगातील 'टॉप 10' राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे.
- मोदींनंतर भारतामध्ये ई-कॉमर्स बूम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, बाहुबली, नेपाळचा भूकंप आदी विषय सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत.
 •  गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत प्लस्टिक बंदी :
- गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लस्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. 1 फेब्रुवारी 2016 पासून या निर्देशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे
- गंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योगही बंद करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तसेच गंगा नदीची उपनदी असलेल्या रामगंगा नदीतील पाण्याचे नमुने लवादाने तपासणीसाठी मागविले आहेत.
- तसेच नोव्हेंबरमध्ये लवादाने उत्तराखंडमधील गंगा नदीच्या परिसरात 200 मीटर अंतरावर बांधकामावर बंदी आणली आहे.
 • पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) वतीने चालू आर्थिक वर्ष 2015-16 साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.
- ईपीएफओसाठी जानेवारीमध्ये बैठक होणार आहे. त्यात 2015-16 वर्षासाठीचे व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे.
- तसेच ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे.
- गेल्या दोन वर्षांपासून पीएफवर 8.75 टक्के व्याजदर मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 • अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात मान्यता :
- अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.
- अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले.
- अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
- अ‍ॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे 2500 हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी.
 • रिअल इस्टेट विधेयक मंजूर
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना होणार तीन वर्षांची कैद
‘रिअल इस्टेट विधेयक २०१५’ला बुधवारी कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली. या नव्या कायद्यानुसार ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दंडाबरोबरच तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.
नव्या कायद्यातील ठळक तरतुदी
 1. रिअल इस्टेटसाठी स्वतंत्र प्राधिकरण : राज्यांमध्ये रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. हे प्राधिकरण सेबीच्या धर्तीवर काम करेल आणि बिल्डरांच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवेल. तर सर्व राज्यांच्या नियामक प्राधिकरणावर केंद्रीय प्राधिकरणाची नजर असेल. बिल्डरला लेआउट प्लॅन, जमिनीची स्थिती, सर्व मंजुऱ्या, एजंट, कंत्राटदार, आर्किटेक्ट, अभियंता या सोबतच करारासारखे सर्व व्यवहारांची नोंदणी या प्राधिकरणाकडे करावी लागणार आहे.
 2. स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बिल्डरांना प्रत्येक प्रकल्पासाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक असेल. या खात्यात बिल्डरला संबंधित प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ७० टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक असेल. तसेच या खात्यातील पैसे बिल्डरला दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाहीत.
 3. तीन वर्षांचा कारावास : घराचा ताबा देण्यास उशीर केल्यास बिल्डरला मोठा दंड भरावा लागले. एखाद्या बिल्डरने ग्राहकांची फसवणूक केली, तर नव्या कायद्यानुसार त्याला तीन वर्षांचा कारावास भोगावा लागेल.
 4. कार्पेट एरियावरच विक्री होणार : नव्या कायद्यानुसार बिल्डरला घरांची विक्री ही कार्पेट एरियानुसारच करावी लागणार आहे.
 5. परवानगीशिवाय बदल नाही : ग्राहकांच्या परवानगीशिवाय बिल्डरला प्रकल्पाच्या आराखड्यात योजनेत कोणतेही बदल करता येणार नाहीत.
 • रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ क्षेपणास्त्रे खरेदीस मान्यता :  
पाकिस्तान व चीन यांच्या बरोबरच्या सीमारेषेवर सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेण्यास मान्यता दिली आहे. अशी पाच प्रगत क्षेपणास्त्रे खरेदी केली जात असून त्यांची किंमत ३९ हजार कोटी रूपये आहे. हीक्षेपणास्त्रे नाटो देशांनाही हादरवणारी असून त्यांच्या मदतीने ४० कि.मी टप्प्यातील विमाने, लढाऊ विमाने व ड्रोन विमाने तसेच इतर क्षेपणास्त्रे यांना लक्ष्य करता येते. एस ४०० क्षेपणास्त्रे तैनात करण्यास प्रत्यक्षात काही वर्षे लागणार आहेत. पश्चिमकेडील पाकिस्तान सीमेवर तीन व पूर्वेकडे चीनच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे लावल्यानंतर भारताची संरक्षक फळी मजबूत होणार आहे. भारतीय हवाई दलात असलेल्या कमतरता दूर करण्याचा एक भाग म्हणून ही क्षेपणास्त्रे खरेदी केली जात आहेत.

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी पीक विमा योजना "प्रधानमंत्री फसल विमा योजना" मंजूर केली आहेपंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 'प्रधानमंत्री फसल विमा योजना'- शेतक-यांच्या कल्यानासाठी योजना' याला मान्यता दिली आहे.या योजनेचे संक्षिप्त स्वरूपखालीलप्रमाणे आहे:शेतक-यांकडून सर्व खरीप पिकांसाठी फक्त 2% समान स्वरुपाचे प्रीमियम आणि सर्व रब्बी पिके साठी 1.5% ची भरणा केली जाईल. वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांच्या बाबतीत, शेतक-यांनी फक्त 5% प्रीमियम भरावी. शेतक-यांनी भरावयाचे प्रीमियम दर फार कमी आहेत आणि शिल्लक प्रीमियम नैसर्गिक आपत्तीच्या खात्यामध्ये सरकारद्वारे पिकांचे नुकसान भरपाई म्हणून शेतक-यांना पूर्ण इन्शुअर रक्कम प्रदान करण्यात येईल.सरकारी अनुदान मध्ये कोणतीही वरची मर्यादा नाही. जरी शिल्लक प्रीमियम 90% आहे, तरी सरकार कडून मान्य केले जाईल.याआधी, प्रिमियम दर मध्ये मर्यादित तरतूद होती ज्यामुळे शेतक-यांना कमी दावे अदा केले जात होते. या मर्यादेमुळे प्रीमियम अनुदानावर सरकारने खर्च मर्यादित केले होते. ही मर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे आणि शेतक-यांना कोणतीही कपात न करता इन्शुअर व्यक्तीस पूर्ण रक्कम मिळेल.तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल. स्मार्टफोन द्वारे शेतक-यांना पीक कापणी ची माहिती दिली जाईल ज्यामुळे हक्क रक्कम मिळण्यास वेळ कमी लागणार. रिमोट सेन्सिंग द्वारे पीक कापणी प्रयोग संख्या कमी करण्यात येईल नवीन पीक विमा योजना हे वन नेशन – वन स्कीम या पार्श्वभूमीवर आधारलेले आहे. हे सर्व मागील योजनेमध्ये उत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट करून आणि त्याच वेळी सर्व मागील उणीवा / वर्गावर काढून टाकण्यात आले आहे.
 • 10 वे विश्‍व हिंदी संम्मेलन :-
विश्‍व हिंदी संम्मेलन हिंदी भाषेतील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय संम्मेलन आहे. यामध्ये जगातील हिंदी विचारवंत, साहित्यकार, पत्रकार, भाषा वैज्ञानिक तसेच हिंदी प्रेमी या संम्मेलनात सहभागी होत असतात.नुकतेच 10 वे जागतिक हिंदी संम्मेलन भारतातील मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथे पार पडले या संम्मेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.हे संम्मेलन मध्यप्रदेशातील पहिले व भारतातील 32 वर्षांनी आयोजीत केलेले 3 रे संम्मेलन आहे.या संम्मेलनाचे आयोजन मध्यप्रदेश राज्य सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांनी केले.10 जानेवारी 1975 पासून जागतीक हिंदी संम्मेलनाचे आयोजन केले जात आहे.पहिले विश्‍व हिंदी संम्मेलन नागपूर येथे पार पडले तेव्हापासूनच 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.9 वे विश्‍व हिंदी संम्मेलन दक्षिण आफ्रिकेत 2012 मध्ये पार पडले.
 • न्या. तीर्थसिंग ठाकूर भारताचे 43 वे सरन्यायधिश -
सर्वोच्च न्यायालयाचे 43 वे सरन्यायधिश म्हणून न्या.टी.एस.ठाकूर यांनी 3 डिसेंबर 2015 ला राष्ट्रपतीकडून पद व गोपनियतेची शपथ घेतली. 63 वर्षीय न्या.टी.एस.ठाकूर यांनी 42 वे सरन्यायधिश न्या.एच.एल दतू यांच्याकडून पदभार स्विकारला असून ते 4 जाने 2017 पर्यंन्त सरन्यायधिश म्हणून कार्यरथ राहतील.4 जानेवारी 1952 मध्ये पंजाबी काश्मिर कुटुंबात जन्मलेले इंग्लंडमधून (1972) वकीलीची पदवी घेऊन विविध उच्च न्यायालयात मुख्य न्यायधीश म्हणून काम केले आहे. 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश झाल्यानंतर 2010 मध्ये लिव्हइन रिलेशनशिप, 2014 मध्ये गंगा शुद्धीकरण, BCCI सार्वजनिक स्वरुपाची संस्था आहे असे अनेक महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय घेतले आहे. टि.एस.ठाकूर यांना न्यायीक वारसा वडीलाकडून मिळाला होता. त्यांचे वडील जम्मू काश्मिर न्यायालयात न्यायाधिश होते. नंतर ते सोडून जम्मू काश्मिरचे उपमुख्यमंत्री झाले.

भारतीय सरन्यायधिशासंबंधी थोडक्यात -
* भारताचे पहिले सरन्यायधिश - एच.के. कानिया 
*सर्वाधिक काळ राहिलेले सरन्यायधिश - वाय.व्हि.चंद्रचुड (फ्रेबु- 1978 - जूलै 1985)
* सर्वात कमी काळ राहिलेले सरन्यायधिश - के.एन.सिंग (17 दिवस) 
*भारताचे पहिले दलीत सरन्यायधिश - न्या.के.जी.बाळकृष्णन
*भारताचे सरन्यायधिश होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती - पी.बी. गजेन्द्रगडकर
* स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायधिस - एस.एच.कपाडिया

 • राज्यातील पहिले निर्भया केंद्र पुण्यात स्थापन -
केंद्रसरकारच्या महिला व बालकल्याण मंत्र्यालयाच्या वतीने पीडीत महिलांना मदत करण्यासाठी राज्यतील पहिले निर्भया केंद्र पुण्यात सुरू होणार आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर पीडीत महिलांना मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रूपयाची तरतूद केली होती.त्या निधीतून प्रत्येक राज्यात एक निर्भया केंद्र (वन स्टॉप सेंटर) निर्माण करण्याचे धोरण ठरविले होते. त्यानुसार या केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. हे केंद्र मुंढवा येथे स्थापन होणार असून या केंद्रासाठी माहेर या मुलीच्या राज्यगृहातील जागा आयुक्तलयाने सुचविली आहे.
 • फॉर्च्युन इंडीयाच्या यादीत अरूंधती भट्टाचार्य प्रथम -
फॉर्च्यून इंडीयाच्या यादीत भारतीय उद्योग क्षेत्रातून बँक ऑफ इंडीयाच्या पहिल्या महिला अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांकमिळाला आहे. या यादीत आयसीआयसीआयच्या चंद्रा कोचर यांना दुसरा तर अ‍ॅक्सीस बॅकेच्या शिखा शर्मा यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.तर निशी वासुदेव चौथे, झिया मोदी व अरुणा जयंती यांना पाचवे स्थान मिळाले आहे. फॉर्च्यून इंडीयाने बॅकिंग, वितपुरवठा, उर्जा, आरोग्यसेवा, माध्यमे, मनोरंजन, फॅशन अशा विविध क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणार्‍या महिलांचा आपल्या यादीत समावेश केला आहे.
   
 •  मेस्सी वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू;
अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोनाचा व्यावसायिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार मिळविला.त्यापूर्वी सलग चार वर्षे मेस्सीने हा पुरस्कार पटकावला होता. पाचव्यांदा या पुरस्कारावर नाव कोरणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू आहे.मेस्सीने आपल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाला ला लिगा, कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले.२०१५ या वर्षांत मेस्सीने ६१ सामन्यांमध्ये ५२ गोल करताना २६ वेळा गोल होण्यासाठी साहाय्यकाची भूमिकाही बजावली एफसी बार्सिलोना संघाला चॅंपियन्स लीग, स्पॅनिश कप, ला लिगा, यूईएफए सुपर कप आणि क्लब विश्वकरंडक अशी पाच विजेतीपदे मिळवून देणारे लुईस एन्रिक सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक ठरले. महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानविरुद्ध पहिल्या सोळा मिनिटांतच हॅटट्रिक साधणारी आणि स्पर्धेत सहा गोल करणारी अमेरिकेची कार्ली लॉइड सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली,
 • निधन:
 प्रोफेसर स्नेप (ऍलन रिकमन) :-
• हॅरी पॉटर, डाय हार्ड आणि रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्ज अशा चित्रपटांमधून स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविलेले अभिनेते ऍलन रिकमन (वय 69) यांचे निधन झाले.
• हॅरी पॉटर या चित्रपट मालिकेमधील प्रोफेसर स्नेप आणि डाय हार्डमधील हान्स ग्रुबर या दोन व्यक्तिरेखांनी रिकमन यांना ब्रिटीश व जगभरातील चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवून दिले होते.
• रिकमन यांनी एकूण 68 चित्रपटांमध्ये काम केले असून एमी, गोल्डन ग्लोब यांसहित अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळविले होते.

 राजेश विवेक:-
• लगान‘ चित्रपटात ‘गुरन‘ची भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
• लगान‘ चित्रपटातील ‘गुरन‘ व बॅंडिट क्वीन चित्रपटातील दरोडेखोर व ‘स्वदेस‘ चित्रपटात पोस्टमास्तरची भूमिका गाजली होती.• शिवाय, ‘महाभारत‘, ‘भारत एक खोज‘ आणि ‘अघोरी‘ या गाजलेल्या दूरचित्रवाहिनी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
• श्यायम बेनेगल यांच्या जुनून (1978) या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.

 लेफ्टनंट जनरल जेकब:-
• भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या शरणागतीत मोलाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब (वय 92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
• लेफ्टनंट जनरल जॅक फराज राफेल जेकब यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील कोलकता शहरात जानेवारी 1923 मध्ये झाला. 1942 मध्ये महू येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्रातून (ओटीएस) लष्करी शिक्षण पूर्ण केल्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची नियुक्ती इराकमधील किर्कुक येथे झाली होती. इराकच्या तेल क्षेत्रांवर जर्मनीच्या संभाव्य हल्ल्यांची शक्यूता असण्याच्या काळात ते तेथे होते.
• ग्लब पाशाच्या "अरब लिजन‘ला त्यांनी प्रशिक्षण दिले. 1943 मध्येलेफ्टनंट जनरल जेकब यांची नियुक्ती उत्तर आफ्रिकेत जर्मन जनरल अर्विन रोमेल यांच्या "आफ्रिका कोअर‘ला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांच्या तोफखाना ब्रिगेडमध्ये झाली. नंतर त्यांनी तत्कालीन ब्रह्मदेशात जपानी सैन्याबरोबरही मुकाबला केला. सुमात्रातही त्यांनी काम केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर लेफ्टनंट जनरल जेकब यांनी ब्रिटन आणि अमेरिकेत तोफखाना आणि क्षेपणास्त्रांचे प्रशिक्षण घेतले.
• भारताच्या फळणीनंतर ते भारतीय लष्करात दाखल झाले.
• पाकिस्तानबरोबरच्या 1965च्या युद्धात लेफ्टनंट जनरल जेकब यांनी पायदळाच्या एका डिव्हिजनचे नेतृत्व केले. हीच डिव्हिजन नंतर बारावी पायदळ डिव्हिजन म्हणून ओळखली जाऊ लागली. फिल्ड मार्शलसॅम माणकशॉ यांच्या काळात जेकब 1967 मध्ये मेजर जनरल झाले आणि 1967 मध्ये ते पूर्व विभागाचे "चीफ ऑफ स्टाफ‘ झाले. 1
•1971च्या युद्धात पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धात पाकिस्तानच्या शरणागतीसाठी तेव्हा लष्कराच्या पूर्व विभागाचे "चीफ ऑफ स्टाफ‘ असलेल्या लेफ्टनंट जनरलजेकब यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

डेव्हिड बोवी:-
• ब्लॅकस्टार‘, ‘द राईज अँड फॉल ऑफ झिगी स्टारडस्ट‘ अशा विविध संगीत कलाकृतींमधून स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले प्रख्यात गायक डेव्हिड बोवी यांचे कर्करोगाने निधन झाले.
• लंडन येथे 8 जानेवारी 1947 मध्ये जन्मलेल्या बोवी यांचे मूळ नाव डेव्हिड जोन्स असे होते.
• बोवी यांनी 2006 मध्ये न्यूयॉर्क येथे अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम केला होता.
•गाण्याशिवाय बोवी यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये मुशाफिरी केली होती. "द मॅन हू फेल ऑन द अर्थ‘ या 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली.
 • प्रधानमंत्री फसल बीमा योजना:-
• कमी प्रीमियम आणि अधिक भरपाई‘ हे वैशिष्ट्य असलेली नवी "प्रधानमंत्री फसल बीमा योजना‘ जाहीर केली
 वैशिष्ट्ये;
• नव्या योजनेत खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्का, तर वार्षिक नगदी पिके आणि फळबागांसाठी पाच टक्के प्रीमियम द्यावा लागेल. उर्वरित प्रीमियम रक्कम सरकार भरणार. पिकाच्या संपूर्ण मूल्याच्या प्रमाणात विमा रक्कम मिळेल.
• दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पेरणी करता आली नाही तरीही त्याचा विमा शेतकऱ्यांना मिळू शकेल.
• गारपीट, भूस्खलन, पूर यांसारख्या आपत्तींना स्थानिक आपत्ती मानून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल.
• कापणी/ काढणीनंतरच्याही (पोस्ट हार्वेस्ट) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे होणाऱ्या हानीचा यात विचार करण्यात आला आहे. कापणीनंतर 14 दिवसांपर्यंत पीक शेतात असताना नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाल्यास विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकेल.
• हानीची पाहणी करण्यासाठी स्मार्टफोन, ड्रोन, रिमोटसेन्सिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तहसीलदारांना यासाठी स्मार्टफोन उपलब्ध करूनदिले जातील आणि ऍप तयार केले जाईल. यामुळे स्थानिक पातळीवरील नुकसानीची आकडेवारी लगेच सरकारला मिळेल.
• संपूर्ण देशभरात प्रीमियमची रक्कम एकच असेल. विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल. हानीनंतर प्रथम भरपाईची 25 टक्के रक्कम तत्काळ मिळेल. सर्वेक्षण आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल.
 1. 2017-18 मध्ये होणाऱ्या 105 व्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे ( ISCA ) अध्यक्ष म्हणून --------- यांची नियुक्ती करण्यात आली आहे? :- Achyuta सामंत
 2. The Country of First Boys या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? :- अमर्त्य सेन
 3. खालील पैकी कोणत्या शहरात जगातील पहिले झोपडपट्टी संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे :-मुंबई
 4. ---------------- यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?:- डी के सिक्री
 5. -------- यांच्या नेतृत्वाखालील समिती जपान बरोवर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समस्या सोडवणार आहे ? :- अरविंद पनागाढीया
 6. प्रवाशी भारतीय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? :- जानेवारी 9
 7. शक्ती 2016 ,हा भारत आणी ------------ या देशा मधला संयुक्त सैन्य अभ्यास होय :-फ्रान्स
 8.  "Creating Leadership’? ' हे पुस्तक कोणी लिहिले ? :-किरण बेदी
 9.  खालीलपैकी कोणत्या राज्यात २०१६ चा राष्ट्रीय युवा महोत्सव भरणार आहे? :-छत्तीसगड
 10.  खालीलपैकी --------------------- हे १०० % प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनले ? :- केरळ
 11.  ---------------या राज्यात फ्लॅमिंगो उत्सव - 2016 आयोजित केलेला आहे :-आंध्र प्रदेश
 12.  " Operation Cold" हे कोणत्या पोलिस दलात राबविण्यात येत आहेसीमा सुरक्षा दल(बीएसएफ)
 13.  पदवी स्तरावर लिंग शिक्षण ( gender education) सक्तीचे करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? :- तेलंगणा
 14.  जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? :- जानेवारी 10
 15.  Who is the writer of the book titled “Maru Bharat Saru Bharat”? :-Ratnasundersuriswar
 16. Which of the following domains has become the world’s most commonly used domain in the internet? :- .cn
 17.  फेब्रुवारी २००९ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे पहिले विश्व साहित्य संमेलन झाले त्या वेळी-----------हे अध्यक्ष होते. (टी.ई. टी परीक्षा २०१६) :-गंगाधर पानतावणे
 18. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? (टी.ई. टी परीक्षा २०१६):-सिंधुताई सपकाळ