Post views: counter

Current Affairs March Part - 5


  • कॉफीटेबल बुक ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमेन)’ :
पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन (दि.19) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
 तसेच लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
 पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे.
 महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे, याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल.
 दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत.
 असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
 ‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 तसेच यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
  • एअरबसची 275 कोटींची गुंतवणूक :
विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच 4 कोटी डॉलर्स (सुमारे 275 कोटी रूपये) गुंतवणार आहे.
 तसेच या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे.

 केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारत आहे.
 प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ 2017 मध्ये होणार असून, 2018 ते 2028 या 10 वर्षांत या केंद्राद्वारे एअरबसच्या 8 हजार प्रशिक्षित पायलटस्चे तसेच 2 हजार विमान दुरूस्ती अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असेल.
 एअरबस कंपनीतर्फे संचलित या केंद्रात एअरबस उद्योगातील जागतिक विशेषज्ञ प्रशिक्षण देणार आहेत.
 प्रशिक्षणार्थींना ए 320 विमानांच्या संपूर्ण उड्डाण प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला 4 सिम्युलेटर्स स्थापन केले जाणार असून कालांतराने त्यांची संख्या वाढवली जाईल.
  • 21 राज्यांत अन्नसुरक्षा कायदा :
एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले.
 तसेच या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या 21 होणार आहे.
 एक एप्रिलपासून मात्र गुजरातसह 1 राज्यांमध्ये या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे.
 डिजिटायझेशन, आधार कार्ड, रेशन कार्डला जोडले जाणे, संगणकीकृत यंत्रणा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक असलेल्या बाबी या राज्यांनी पूर्ण केल्या आहेत.
 देशभरातील एकूण 24 कोटी 18 लाख 50 हजार रेशन कार्डांपैकी 99.90 टक्के रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात केले असून, 48 टक्के रेशन कार्ड आधार कार्डला जोडण्यात आले आहेत.
  • रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी मिझोराममध्ये दाखल :
गुवाहाटीहून 2600 मेट्रिक टन तांदूळ घेऊन येणारी रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी (दि.21) मिझोरामच्या बैराबी स्थानकात दाखल झाली.
 राज्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मत मिझोरामचे परिवहन मंत्री जॉन रोतुआंग्लीना यांनी व्यक्त केले.
 मालगाडीतून मोठ्या प्रमाणात तांदूळ आल्यामुळे मिझोराम-आसाम सीमेवरच्या बैराबीमध्ये अन्न स्वस्त दराने उलब्ध होऊ शकेल.
 आसामच्या सिल्चर शहरातून मिझोरामला देशाबरोबर जोडणारा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 54 हाच सध्या मिझोरामचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे.
 तसेच लोहमार्गामुळे वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.
  • चीन पासून नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग :
चीन व नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात (दि.21) आली.
 ओलि हे सध्या चीनच्या सात दिवसीय दौऱ्यावर असून (दि.21) या दोन देशांमध्ये दहा महत्त्वपूर्ण करार झाले.
 चीन व नेपाळमधील रेल्वेमार्गामुळे नेपाळचे भारतावरील भूराजकीय अवलंबित्व कमी होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
 नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या आंदोलनावेळी येथील भारतीय वंशाच्या मधेसी समुदायाने भारत व नेपाळमधील मार्ग रोखून धरल्याने नेपाळमधील जनजीवन विस्कळित झाले होते.
 तसेच या पार्श्‍वभूमीवर, नेपाळ व चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व प्रयत्नशील आहे.
 नेपाळमध्ये एक विमानतळ व या दोन्ही देशांस जोडणाऱ्या एका पुलाच्या निर्मितीसाठी चीन विशेष आग्रही आहे.
  • देशात वाहन उद्योगावर 'मारुती'चे वर्चस्व :
देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे.
 कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे.
 केवळ मारुती व ह्युंडाई कंपन्यांची बाजारपेठेत एकत्रितपणे 64 टक्के हिस्सेदारी आहे.
 उर्वरित सर्व कंपन्यांची मिळून 36 टक्के हिस्सेदारी आहे.
 विशेष म्हणजे, इतर कोणत्याही मोटार उत्पादक कंपनीची वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी नाही.
 तिसऱ्या क्रमांकाची मोटार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीदेखील बाजारपेठेत केवळ 8.26 टक्के हिस्सेदारी आहे.
 मारुती सुझुकीचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक आर एस कलसी यांच्या मते, विविध कारणांमुळे कंपनीची बाजारपेठेतील हिस्सेदारी वाढण्यास मदत झाली आहे.
 'यंदा कंपनीने 200 विक्री शोरुम्स व 125 नेक्सा(प्रिमियम)' शोरूम्सची सुरु केली आहेत.
 देशात विक्री होणाऱ्या आघाडीच्या पाचही मोटारी मारुती सुझुकीच्या आहेत.
  • अॅपलचा सर्वात स्वस्त 'आयफोन SE' लॉन्च :
अॅपलने आपला सर्वात स्वस्त 'आयफोन SE' अखेर लॉन्च केला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरु होती.
 अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत आयफोन SE लॉन्च करण्यात आला.
 तसेच या आयफोनची किंमत 30 ते 35 हजारापर्यंत असणार आहे.
 भारतामध्ये एप्रिल महिन्यात फोन उपलब्ध होणार आहे.
 मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगातील 110 देशांमध्ये आयफोन SE उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
 आयफोन SE सोबत आयपॅड प्रो आणि आयवॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लाँच करण्यात आले.
  • जगातील सर्वात मोठा 'एअरक्राफ्ट' :
जगातील सर्वात मोठं एअर क्राफ्ट 'एअर लॅण्डर-10'च अनावरण करण्यात आलं.
 तसेच त्यानंतर 'एअर लॅण्डर-10' ची पहिली टेस्ट घेण्यात आली, ती यशस्वीरित्या पार पडली.
 विशेष म्हणजे हे 'एअर लॅण्डर-10' कुठेही ल्रॅण्ड होऊ शकते.
 'एअर लॅण्डर-10' या एअरक्राफ्ट निर्मिती युकेतील ब्रिटीश कंपनी हायब्रीड एअर व्हीकल्सने केली आहे.
 दरम्यान, या 'एअर लॅण्डर-10' ला बनवणा-याने असा दावा केला आहे की, हे एक साउंड प्रूफ आणि इकोफ्रेंडली एअरक्राफ्ट आहे.
 तसेच त्याच्या बॉडी आणि टेक्सचर विषया सांगायलं झालं तर हे 26 मीटर ऊंच आणि 44 मीटर रुंद आहे, त्याची लांबी 92 मीटर आहे.
 एकावेळेस हे 48 प्रवासी आणि 50 टन माल घेवून 92 मैल प्रतितासाच्या वेगानं उडू शकतं.
  • दोन वर्षात राज्यातील 12,433 औद्योगिक कंपन्यांना टाळे :
राज्यात गेल्या दोन वर्षात तब्बल 12 हजार 433 औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
 राज्यातील महागड्या वीज दरामुळे उद्योग परराज्यात जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अनिल भोसले, किरण पावसकर, संदीप बाजोरिया आदी सदस्यांनी विचारला होता.
 राज्यातून 2013-14 मध्ये औद्यागिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी 2014-15 मध्ये औद्यागिक वीज वापरामध्ये 5.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 महावितरण कंपनीचा औद्यागिक ग्राहकांसाठीचा वीजदर सर्वात कमी असल्याचा दावा उर्जा मंत्री बावनकुळे यांनी केला.
 औद्योगिक ग्राहकांसाठी टाटा पॉवर 8.40 रुपये प्रति युनिट तर रिलायन्स कंपनी 7.27 रुपये प्रति युनिट इतका दर आकारते.
 तसेच यातुलनेत महावितरणचा दर 7.21 रुपये असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
.
  • अहवाल:-
द वर्ल्ड हैप्पीनैस रिपोर्ट 2016'
* संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या 'द वर्ल्ड हैप्पीनैस रिपोर्ट 2016' (World Happiness Report/ ) नुसार या यादीत भारत ११८ व्या स्थानावर आहे
* या यादीत पहिले स्थान डेन्मार्क या देशाला मिळाले* २०१५ च्या याच अहवालात १५६ देशात भारताचे स्थान ११७ वे होते. या वर्षी मात्र १ अंकाने घसरून ११८ वे स्थान मिळाले
* या यादीत भारताचे स्थान चीन, पाकिस्तान आणी बांग्लादेश या देशांच्या खाली आहे
* या यादीत दसऱ्या स्थानावर स्विट्जरलैंड, ३ र्या वर आइसलैंड, आणी ४वर नॉर्वे आणी पाचव्या स्थानावर फिनलैंड असा क्रम लागतो२०१३ या वर्षी याच यादीत भारत १११ व्या स्थानावर होता.
  • चर्चित स्थळ:-
अगस्त्यमाला:-
• जैव पर्यावरण क्षेत्रांच्या जागतिक साखळीमध्ये युनेस्कोने
१९ नवीन ठिकाणांचा समावेश केला असून त्यात भारतातील
अगस्त्यमाला या क्षेत्राचे नाव आहे.
• अगस्त्यमाला जैव पर्यावरण पश्चिम घाटातील असून ते
समुद्रसपाटीपासून १८६८ मीटर उंचीवर आहे. हा भाग सदाहरित
वनांचा असून या ठिकाणी सुमारे वनस्पतींच्या २२५४ प्रजाती
आहेत. यातील ४०० प्रजाती प्रादेशिक आहेत. प्राचीन
काळापासून येथे वेलदोडा, जायफळ, सुपारी, मिरी यांची
लागवड केली जात आहे.
• या भागात तीन अभयारण्ये असून येथे शेंदुर्णी, पेप्परा, नेय्यार,
कलाकाड मुंदनथुराई व्याघ्र प्रकल्पही आहेत. केरळ आणि
तामिळनाडू या राज्यांमध्ये अगस्त्यमाला जैव पर्यावरण क्षेत्र
पसरलेले आहे. या क्षेत्रात जवळपास ३ हजार आदिवासी
वास्तव्यास आहेत. दरम्यान, भारतात एकूण १८ जैव पर्यावरण
क्षेत्रे असून त्यातील नऊ क्षेत्रांचा युनेस्कोच्या यादीत आहेत.
निलगिरी, नंदादेवी, मन्नारचे आखात, सुंदरबन, निकोबार
यांच्यासह नऊ क्षेत्रांचा यात समावेश आहे.
• युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय समन्वय मंडळाची बैठक पेरूची
राजधानी लिमा येथे झाली. यात जैव पर्यावरणाची संख्या
वाढवण्यात आली असून १२० देशांमधील ६६९ जैव पर्यावरणांचा
समावेश आहे.
  • पुण्यभूषण' पुरस्कार भाई वैद्य यांना जाहीर:-
* आपल्या कार्यातून पुण्याचे नाव देशभर पोचविणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा मानाचा "पुण्यभूषण‘ पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना जाहीर झाला आहे.
* सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
* पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल) आणि पुणेकरांच्या वतीने गेल्या 27 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो.
* शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी भाईंचे नाव एकमताने निवडले आहे.
* भाई वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील दापोडे या खेड्यातला.
* 1942च्या "चले जाव‘ चळवळीत वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी उडी घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला.
* स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवा आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कच्छ सत्याग्रह, आणीबाणी अशा अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी 25 वेळा तुरुंगवास भोगला. पुढे 1974-75 मध्ये महापौरपद भूषविल्यानंतर 78 ते 80 मध्ये ते सत्ताधारी आमदार होते.
* गृह खात्याचे राज्यमंत्रिपदही त्यांनी सांभाळले.
* समाजवादी जनपरिषद, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या माध्यमातून भाईंनी सतत समाजप्रबोधनाच्या मोहिमांवर आघाडीवर राहून जनजागृती केली. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष या नात्याने भारतयात्रा काढून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
  • भारताला नाटो NATO  देशांच्या बरोबरीचा  दर्जा मिळावा  असा ठराव अमेरिकान संसदेत  मांडण्यात आला आहे , हा दर्जा मिळाल्यास संरक्षण साहित्याची विक्री ,निर्यात करणे सोपे जाईल , या प्रस्तावाचे स्वागत भारत अमेरिका व्यापार परिषदेनेही केले आहे .

  • ‘प्रवीं’ यांची नोंद वंडर बुकमध्ये
➡सलग 17 तास 10 मिनिटे कवितांचा एकपात्री प्रयोग करून रसिकांना थक्क करून सोडणाऱ्या सोलापुरातील कवी प्रशांत विजय राजे अर्थात प्रवी यांची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्‌स या जगप्रसिद्ध पुस्तकानं घेतली आहे.
➡30 जुलै 2015 रोजी कवी प्रवी यांनी सलग 17 तास 10 मिनिटे हिंदी, मराठी कविता, गझल यांच्या सादरीकरणाचा एकपात्री प्रयोग सोलापुरात केला होता. तसेच त्यांच्या या विक्रमी सादरीकरणाची दखल अनेक संस्थांनी घेतली होती.
➡हरियाणास्थित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स आणि नवी दिल्लीस्थित इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये याची नोंद झाली होती.
➡युनायटेड किंग्डममधील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्‌सनेही प्रवी यांच्या या प्रयोगाची दखल घेतली आहे. वंडर बुकमध्ये नोंद झाल्याचे पत्र प्रवी यांना 19 फेब्रुवारी 2016 रोजी प्राप्त झाले.
➡वंडर बुककडून प्रवी यांना एन्‍रोलमेंट किट देण्यात येणार असून त्यामध्ये एका सुवर्णपदकाचा समावेश आहे.
  • रेल्वे मध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या आरक्षणात वाढ
➡ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा अधिक वयाच्या महिला, तसेच गर्भवती महिलांसाठी रेल्वेमधील आरक्षण 50 टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
➡तसेच आता प्रत्येक रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 90 बर्थ उपलब्ध होणार आहेत, या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
➡ज्येष्ठ नागरिकांच्या आरक्षणात वाढ करावी अशी प्रवाशांची मागणी होती, त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आरक्षण कोट्याची घोषणा केली होती.
➡नव्या आरक्षणानुसार ज्येष्ठ नागरिकांसह 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला, तसेच गर्भवती महिलांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.
  • इंदू मिल स्मारकासाठी एक समिती सज्ज
➡इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यावर मतैक्य घडविण्यासाठी सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
➡तसेच, येत्या 14 एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
➡पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी अद्याप इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत झाली नाही. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती होत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला.
➡तसेच यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीसाठी सर्व आवश्यक परवानग्या केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. जागेचे हस्तांतरण ही केवळ तांत्रिक बाब असून प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याची लेखी परवानगी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने दिली आहे.
➡तसेच 14 एप्रिलला मोठ्या प्रमाणावर लोक चैत्यभूमी आणि इंदू मिलला येतात, त्यामुळे 14 एप्रिलनंतरच या कामाला सुरुवात केली जाईल.
  • टी-20 विश्वचषकाची सेमीफायनल दिल्लीमध्येच होणार
➡टी-20 विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 30 मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल.
➡दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील वादग्रस्त आर.पी. मेहरा ब्लॉकचे ‘उपयुक्तता प्रमाणपत्र’ या ब्लॉकचे प्रमाणपत्र न मिळाल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह लागले होते.
➡डीडीसीएला मंजुरी प्रमाणपत्र देण्यासाठी (दि.23) दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला.
➡सर्वोच्च न्यायालयाने डीडीसीएचे पर्यवेक्षक असलेले माजी न्या. मुकुल मुद्गल आणि डीडीसीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मंजुरी प्रदान केली.
➡बैठकीची माहिती देताना डीडीसीएचा एक अधिकारी म्हणाला,‘डीडीसीएला 2017 पर्यंत मंजुरी मिळाली आहे.
व्यावसायिक शिक्षणासाठी 50 टक्के शिष्यवृत्ती
➡निमशहरी आणि ग्रामीण भागांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना इच्छा असूनही परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येत नाही.
➡आर्थिक पाठबळाबरोबरच जागृतीच्या अभावामुळे त्यांना शिक्षणाच्या धोपटमार्गावरून चालावे लागते.
➡तसेच या मुलांनाही दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलने विशेष शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे.
➡ऑनलाइन परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना रिजेनेसिसकडून 50 टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती रिजेनेसिसच्या भारतातील प्रमुख डॉ. रिचा अरोरा यांनी दिली.
➡क्रोएशियन संन्याशी डॉ. मार्को सरावांझा यांनी दक्षिण आफ्रिकेत काही वर्षांपूर्वी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलची स्थापना केली.
➡तसेच या बिझिनेस स्कूलला विद्यापीठाचा दर्जा असून दक्षिण आफ्रिकेतील ते चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.
➡आता ते भारतातही त्यांचा विस्तार करीत असून भारतातील सर्वसामान्यांना विद्यापीठाकडून चालविण्यात येणाऱ्या एमबीए, बीबीए आदी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी ऑनलाइन परीक्षेत यंदा 200 विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांपर्यंत विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची 1 एप्रिल पासून अंमलबजावणी
 
➡राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (एनएफएसए) अंमलबजावणी आणखी 10 राज्यांमध्ये येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
➡तसेच यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या 21 होणार आहे.
➡गुजरातमध्ये 1 एप्रिलपासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • गोव्यात 'डिफेक्‍स्पो' प्रदर्शन :
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतर्फे (डीआरडीओ) आयोजित प्रदर्शन दक्षिण गोव्यातील केंपे तालुक्‍यातील नाकेरी कितोल गावात होत असून त्यामध्ये संघटनेतर्फे विकसित वैशिष्ट्यपूर्ण लष्करी उपकरणे, तंत्रज्ञान व हत्यारे प्रदर्शित केली जाणार आहेत.
 28 ते 31 मार्च या काळात हे प्रदर्शन (डिफेक्‍स्पो) होणार आहे.
 संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्याचे उद्‌घाटन करतील आणि तिन्ही सेना दलांतील सर्व प्रमुख अधिकारी या प्रदर्शनाला भेट देतील.
 'राइज ऑफ फ्युचरिझम' किंवा 'भविष्यवादी उदय' ही यावेळेच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना आहे.
 पंतप्रधानांच्या "मेक इन इंडिया‘ या बहुचर्चित घोषणेशी ही संकल्पना जोडण्यात आली आहे.
 जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांची निर्मिती करुन भारतीय संरक्षण दलांना सुसज्ज करणे या उद्दिष्टावर यानिमित्ताने भर देण्यात येणार आहे.
 या महाप्रदर्शनाच्या निमित्ताने 'डीआरडीओ' तर्फे त्यांच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण उत्पदानांचे प्रात्यक्षिकही केले जाणार आहे.
 तसेच यामध्ये 'एअरबोर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टिम' (ऍवॅक्‍स), 'तेजस' या हलक्‍या लढाऊ विमानाचे प्रात्यक्षिक, 'अर्जुन' रणगाड्याच्या 'एमके-2' या अत्याधुनिक नमुन्याचे प्रात्यक्षिक, व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म, 'आकाश' हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र, पिनाका मल्टिबॅरल रॉकेट लॉंटर, नवीन रडार आदींचा समावेश असेल.
  • इंटेलचे माजी सीईओ अँडी  यांचे निधन :
संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
 नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले.
 इंटेलमध्ये 37 वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता.
  • नेपाळचा चीनसोबत इंधन करार :
इंधनाच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नेपाळने भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत, त्यामुळे यापुढे भारताशिवाय चीनकडूनही नेपाळ इंधन खरेदी करू शकणार आहे.
 नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतीच बीजिंगला भेट दिली, त्यावेळी हे करार करण्यात आले.
 भारत हा नेपाळला अनेक वर्षांपासून इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो.
 नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.
  • इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपद :
नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले.
 तसेच या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे तिसरे जेतेपद आहे.
 अंतिम लढतीत जोकोव्हिचने खोलवर सर्व्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकचा 6-2, 6-0 असा पराभव केला.
 व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला 6-4, 6-4 असे नमवले.
 जेतेपदासह अझारेन्काने 2014 नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे.
  • जगातील 50 नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा समावेश :
दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवाल यांचा 'जगभरातील 50 महान नेत्यांच्या' यादीत समावेश झाला आहे.
 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध 'फॉर्च्यून' मॅगिझनच्या या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत.
 दिल्ली सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दलही मॅगझिनने केजरीवालांचे कौतुक केले आहे.
 दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात 15 दिवसांसाठी सम-विषम वाहतूक योजनेचा प्रयोग राबवला होता, जो यशस्वी ठरला.
 तसेच येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा 15 दिवसांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
 फॉर्च्युन मासिकाच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज हे अव्वल स्थानावर असून केजरीवाल 42 व्या स्थानावर आहेत.
 तर जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुस-या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की (3), अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली (22) आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडी  (48) यांचाही या यादीत समावेश आहे.
  • उत्तर कोरियाच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी :
उत्तर कोरियाने पुन्हा एकदा लघू पल्ल्याच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
 वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध झुगारून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे.
 अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
 तसेच दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
 अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा संयुक्त सराव सुरू असून, त्याला उत्तर कोरियाचा आक्षेप आहे.
  • भारताचे हवाईदल प्रमुख इस्राईलच्या दौऱ्यावर
➡भारताचे हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा हे चार दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
➡भारत व इस्राईलमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होत असून; या दौऱ्यादरम्यान राहा हे इस्राईलचे संरक्षण मंत्री मोशे यालून यांची भेट घेणार आहेत.
➡संरक्षण मंत्र्यांबरोबरच राहा हे इस्राईलच्या अनेक लष्करी उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
➡तसेच गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्राईल या दोन देशांमधील राजकीय व लष्करी सहकार्य वृद्धींगत होत असून या पार्श्‍वभूमीवर राहा यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.
  •  निदा फाजली यांना उर्दू अकादमीचा पुरस्कार
➡उर्दू अकादमीचा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार प्रसिद्ध शायर निदा फाजली यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
➡माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना अमिर खुसरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, या पुरस्काराची घोषणा (दि.27) अकादमीने केली.
➡विविध क्षेत्रांतील पाच जीवनगौरव पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय एकता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
➡तसेच याशिवाय विविध पुस्तकं आणि प्रकाशनांसहित अनेक क्षेत्रांत दीडशेहून अधिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
➡मौलाना अबुल कलाम आझाद हा पाच लाखांचा पुरस्कार निदा फाजली यांना (मरणोत्तर) घोषित केला आहे.
➡तसेच याशिवाय प्रत्येकी एक- एक लाखाच्या जीवनगौरव पुरस्कारांचे मानकरी असे - अजमल सुलतानपुरी (शायरी), मसरूह जहॉं (फिक्‍शन), सय्यद फजले इमाम रिझवी (शोध आणि समालोचन), महानामा नूर (बाल साहित्य), नुसरत झहीर मंजूर उस्मानी (हास्यव्यंग).
➡प्रमुख पुरस्कार असे - डॉ. सुराग मेहंदी राष्ट्रीय एकता पुरस्कार अख्तरुल वासे आणि डॉ. सगीर अफ्राहीम यांना, अमिर खुसरो पुरस्कार माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना, तर प्रेमचंद पुरस्कार डॉ. अली अहमद फातिमी यांना जाहीर झाला आहे.
  • भामरागडमध्ये सर्व शाळा डिजिटल
➡छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच 107 शाळा डिजिटल बनल्या आहेत.
➡विद्यार्थी यानिमित्ताने शाळेत नियमितपणे येऊ लागल्याने पहिल्यांदाच गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
➡गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हा तालुका दत्तक घेतला.
➡तसेच त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या तालुक्याला वेळोवेळी भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
➡तालुक्यात एकूण 107 प्राथमिक शाळा आहेत व त्यामध्ये 4 हजार 886 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
➡बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप मोबाइलही बघितलेला नाही, त्यातच आता मोबाइल, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर यांच्या मदतीने अध्यापन केले जात असल्याने हे साहित्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यार्थी स्वत:हून शाळेत येऊ लागले आहेत.
➡डिजिटल साधनांबरोबरच सर्वच शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन सुरू झाले आहे.
  • देशात ऑनलाइन खरेदी वाढणार
➡देशात फोर जी सेवेचा विस्तार होत असतानाच ऑनलाइन खरेदी वाढणार असल्याचा अंदाज डेलायट या संस्थेने वर्तविला आहे.
➡फोर जी सेवेच्या विस्तारासोबतच इंटरनेटचा वापर वाढेल, आज भारत डिजिटल प्लॅटफॉर्म बनत आहे.
➡विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकही ऑनलाइन सेवेला प्राधान्य देत आहेत.
➡देशातील इंटरनेट समुदायात ग्रामीण भागात सेवा घेणाऱ्यांचे प्रमाण 35 टक्के आहे.
➡देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागाचा हिस्सा 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
➡एकूणच फोर जीच्या विस्ताराबरोबरच आगामी काळात देशात ऑनलाइन व्यवहार वाढतील
  • उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
➡उत्तराखंडमध्ये होणा-या विश्वासदर्शक ठरावाआधीच केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
➡मुख्यमंत्री हरीश रावत (दि.28) विधानसभेत बहुमत सिद्ध करणार होते.
➡राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी (दि.27) सकाळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारसीवर स्वाक्षरी केल्या.
➡काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उत्तराखंडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
➡राज्यातील सद्य स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्यपाल के.के.पॉल यांच्याकडून मिळालेल्या अहवालावर चर्चा केली.
➡उत्तराखंडच्या विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारत काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना (दि.26) रात्री अपात्र ठरवले होते. तसेच त्यामुळे हरीश रावत सरकारचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
  • इंटेलचे माजी सीईओ अँडी ग्रूव्ह यांचे निधन :
संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले.
इंटेलमध्ये 37 वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता.
  • राष्ट्रपतीच्या हस्ते 'पद्म' पुरस्कारांचे वितरण :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या 'पद्म' पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
 राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला.
 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतर मान्यवारांना 12 एप्रिल रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
 धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) - रिलायन्स समूहाचे संस्थापक (महाराष्ट्र), श्री. श्री रविशंकर, अभिनेता रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कार तर प्रियांका चोप्रा, अॅड. उज्वल निकम, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
 तसेच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेता अनुपम खेर, मूर्तिकार राम सुतार, गायक उदित नारायण यांचादेखील पद्मभूषण पुरस्कारात समावेश आहे.
 विशेष म्हणजे लोकमत समूहाचे फोटो एडिटर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचाही या पुरस्कारांच्या यादीत समावेश असून त्यांना 'पद्मश्री' किताब जाहीर झाला आहे.
  • सर्व आपत्कालीन सेवांसाठी डायल करा 112 :
पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांसाठी आतापर्यंत देशभर 100, 101 आणि 102 या क्रमांकांवर संपर्क साधावा लागत असे.
 आता मात्र 112 या एकाच क्रमांकावर या तिन्ही सेवा उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
 टेलिकॉम ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने तिन्ही सेवांसाठी एकच क्रमांक असावा, अशी केलेली शिफारस केंद्रीय मंत्री गटाने मान्य केली.
 तसेच ही सेवा एका महिन्यात देशभरात अमलात येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत दिली.
 अमेरिकेत 911 या एकाच क्रमांकावर या सर्व सेवा उपलब्ध होतात.
  • विद्यापीठाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर :
मुंबई विद्यापीठाचा 2016-17 आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प (दि.28) पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे.
 विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी 6 कोटी 39 लाख 54 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
 तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
 यामध्ये कौशल्य विकास केंद्र, मेक इन इंडिया केंद्र, डिजिटल विद्यापीठ, संरक्षित जागेचा विकास, स्मार्ट गाव योजना, शैक्षणिक विद्वत्तेची जोपासना, विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, रेल्वे संशोधन केंद्र, विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी यांचा समावेश आहे.
 विद्यापीठाच्या 160 व्या वर्धापन दिनासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
  • जाट समुदायाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर :
जाट समुदायाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारे विधेयक हरियानाच्या मंत्रिमंडळाने (दि.28) मंजूर केले.
 तीन एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा जाट समुदायाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाट आणि इतर चार जातींना आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले.
 आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायाने गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
 'क' आणि 'ड' वर्गातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
 तसेच, या सर्व जातींना 'अ' आणि 'ब' वर्गातील सरकारी नोकऱ्यांमध्ये सहा टक्के आरक्षणाचा सरकारचा प्रस्ताव आहे.
 जाट समुदायाला आरक्षण देण्याबरोबरच हरियाना सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यासाठी स्वतंत्र विधेयक मांडण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.
  • नांदेड संमेलनाध्यक्षपदी डॉ. एस.एन. पठाण :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त नांदेड येथे 3 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. एस. एन. पठाण यांची निवड करण्यात आली आहे.
 संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रम (जि. अमरावती) व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 डॉ. पठाण हे अखिल भारतीय सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष आणि पुणे येथील एम. आय. टी. विश्वशांती केंद्राचे सल्लागार आहेत.
 तसेच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
 साहित्य संमेलनात ‘राष्ट्रसंतांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान’, ‘राष्ट्रसंतांच्या साहित्यातील कृषीविषयक धोरण’ आणि ‘ग्रामगीता एक जीवनग्रंथ’ हे तीन परिसंवाद होणार आहेत.

  • काही महत्वाचे
  1.  रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणात भारतातील 16 झोनमधील एकूण 407 रेल्वे स्थानकांमध्ये -------- हे भारतातील सर्वांत स्वच्छ स्थानक ठरले :- सुरत , दुसरा क्रमांक:- राजकोट  , तिसरा:- विलासपूर , चौथा:- सोलापूर
  2. देशातील पहिले एव्हीएशन पार्क ------------------------ या राज्यात साकारले जात आहे ?:- गुजरात
  3. २०१६ मध्ये झालेल्या तिसऱ्या प्रो- कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजककोण आहेत :-मशाल स्पोर्ट्स
  4. उत्कृष्ट पत्रकारिता साठी दर वर्षी दिला जाणारा चमेली पुरस्कार२०१५- १६ साठी -------------- यांना जाहीर झाला प्रियंका काकोडकर व रक्षा कुमार
  5. आत्ताच प्रकाशित झालेले ‘गाँधी: एन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे पुस्तक ---------------यांनी लिहिले आहे:- प्रमोद कपूर
  6. ब्रिटिश गणितज्ञ सर एंड्रयू विल्सयांना २०१६चा प्रसिद्ध एबल पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार गणितात अभूतपूर्व कार्य केल्याबद्दल दर वर्षी ---------------- या देशाकडून दिला जातो :- नार्वे
  7. संयुक्त राष्ट्र द्वारा प्रकाशित झालेल्या 'द वर्ल्ड हैप्पीनैसरिपोर्ट 2016' (World Happiness Report/ विश्व प्रसन्नता रिपोर्ट) नुसार भारत जागतिक स्तरावर --------- व्या स्थानावर आहे. २०१५ मध्ये भारत ११७व्या स्थानावर होता :-११८
  8. 2016 ची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोणी जिंकला?१) वांग तिला :-लिन डॅन .
  9.  Art off living ने जागतिक संस्कृती महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला होता ? :- नवी दिल्ली
  10. कोणते राज्य सरकार चिमण्या ना संरक्षण देण्यासाठी शाळा स्तरावर जागरूकता मोहीम सुरू केली आहे ? :- उत्तर प्रदेश
  11. महाराष्ट्र सरकारने ------------------ हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून जाहीर केले ?:-२०१६-१७
  12.  सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी- २० क्रिकेटची संकल्पना सर्वात पहिल्यांदा ---------- यांनी मांडली होती:- मार्टिन क्रो
  13. सेनादलाने चुरशीच्या अंतिम सामन्यात ---------चा २-१ गोलने पराभव करून ७० व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्योपद पटकाविले. :-महाराष्ट्र
  14. ट्वेंटी-20 विश्वकरंडकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला होणाऱ्या सामन्यावेळी ----------- हे भारताचे राष्ट्रगीत गाणार आहेत :-अमिताभ बच्चन
  15. महिला ई- HAAT " हे कोणत्या मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आले :-मानव संसाधन विकास मंत्रालय मंत्रालय
  16. खालीलपैकी कोणती बँका भारताची पहिली सूक्ष्म वित्त पुरवठा बॅंक असेल :- कॅपिटल स्थानिक क्षेत्र बँक लिमिटेड
  17.  भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत ---------- वेळा आशिया टी -20 ही स्पर्धा जिंकली:-६
  18. राष्ट्रीय विशेष ऑलिम्पिक विशेष मुलांसाठी कोणत्या शहरात ऑलिम्पिक आयोजित करण्यात आले होते :- सिमला
  19. ------------- या क्रिकेट संघाने २०१५-१६ या वर्षीचा कर्नल सी.के. नायडू करंडक जिंकला आहे? :- मुंबई
  20.  ग्रामीण भागातील सर्व पोस्ट ऑफिस ------------- पर्यंत डिजिटल करण्याचा केद्र सरकारचा मानस आहे :-मार्च, २०१७
  21. फोर्स १८ या सैनिकी कसरती ------------------- या शहरात सुरु आहे :-पुणे
  22. जागतिक वन्यजीव दिवस-------------- या दिवशी तारखेला साजरा केला जातो ? :-३ मार्च
  23.  ----------------- यांची २०१५ च्या बिहारी पुरस्कार निवड करण्यात आली आहे? :-भगवतीलाल व्यास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा