Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part -3


चालू घडामोडी:-
---------------------------------
१) गुजरात भाजपा ने----------------------- यांना गुजरात चे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली:- विजय रूपाणी

२) 23 वां राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ------------ यांना जाहीर झाला - शुभा मुदगल

३) -------------------- या भारतीय महिलेचीप्रथमच अंतरराष्ट्रीय ओलंपिक समिति चे सदस्य म्हणून निवड केली - टीना अंबानी

४) रियो-डि-जेनेरो येथे सुरूअसलेली---------------- व्या क्रमांकाची स्पर्धा - 3 वी

५) रियो ओलंपिक स्पर्धेत भाग घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू --- यादेशाचीआहे:- गौरिका सिंह (नेपाळ वय:- १३वर्ष)

६) नेपाळ चे प्रधानमंत्री म्हणून ---------------- यांची आत्ताच निवड करण्यात आली :- पुष्प कमल दहल/प्रचंड

७)2014-15 पर्यटन पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ राज्यचा पुरस्कार ------------ याला जाहीर झाला:- मध्य प्रदेश

८) ‘आर डी बर्मनिया: पंचमेमोयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- चैतन्य पादुकोण

९) भारतीय महिला क्रिकेट टीम ची उप-कप्तान हरमनप्रीत कौर ------------ या देशाची ‘महिला बिग बैश टी-20 लीग’ ही स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटरबनली:- ऑस्ट्रेलिया

१०) इंडिया राइजिंग: फ्रेश होप, न्यू फीयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- रवि वेल्लूर
११) प्रो-कबड्डी सीज़न-4 चा विजेता:- पटना पायरेट्स

१२) न्यायमूर्ति दिलीप बाबा साहेब भोसले ने ---------- याउच्च न्यायालयाच्या के मुख्य न्यायाधीश पदाची शपथघेतली:- अलाहाबाद उच्च न्यायालय

१३) ऑक्टोंबर २०१६ मध्ये होणाऱ्या कबड्डी विश्वकप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणारआहे:- भारत

१४) चिंधी रॅग्स टू रिचेस आणी विदाऊट फायरिंग सिंगल बुलेट’ या पुस्तकाचे ---- हे लेखक :-ज्योतिर्मय डें(जे.डे.)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मराठीप्रश्नी गोवा सरकारची डबलगेम

मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला खासगी ठराव शुक्रवारी विधानसभेत सर्वानुमते संमत झाला तरी मराठी राजभाषेचा प्रश्न संपलेला नाही. केवळ
तात्विकदृष्टय़ा मराठी राजभाषा प्रस्ताव सरकारने महत्वाच्या दुरुस्तीसह मंजूर केला तरी मराठीच्या चळवळीतील जाणकारांना सरकारची डबलगेम कळून आली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून ठराव मंजूरीची कृतीही पोकळ ठरते. सरकारने सर्वाना खुश करण्याच्या नादात मराठी व कोकणी अशा दोन्ही घटकांना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सरकारने राजभाषा कायद्यात स्वत:हून दुरुस्ती केली व त्याद्वारे मराठीला राजभाषा केले असे अजून ठरलेले नाही. मराठी राजभाषा समितीने शनिवारी पत्रक प्रसिद्धीस देउन आमदार नरेश सावळ, भाजपचे आमदार विष्णू वाघ, सुभाषा फळदेसाई व मगोचे आमदार लवू मामलेदार यांचे अभिनंदन केले आहे. राजभाषा कायद्यात दुरुस्ती करुन मराठीला राजभाषेचे स्थान देण्यास सरकार तत्वता मान्य झाल्याचे सावळ यांच्या ठरावातून सिद्ध झाले आहे, असे समितीने म्हटले आहे. मात्र आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर यांची दुरुस्ती पाहिल्यास सरकार मराठीचा विषय पुढे ढकलण्याचा खेळी खेळत आहे हेही लक्षात येते. यामुळे मराठीप्रेमींनी हुरळून जाउ नये व लढा अधिक जोमाने सुरुच ठेवावा. निवडणूकीपुर्वी कायद्यात बदल न झाल्यास सरकारला धडा शिकण्याची तयारी ठेवावी असे आवाहन समितीने केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर यांचे निधन

नऊ फूट उंचीच्या पुतळ्यापासून ते साडेअठरा फूट उंचीचा अशी छत्रपती शिवाजीमहाराजांची शिल्पे घडविणारे, के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ शिल्पकार बी.आर.खेडकर यांचे दीर्घ आजारपणाने दि. १३ आॅगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्यामागे ९ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बी.आर.खेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५ हून अधिक अश्वारुढ पुतळयांसह सुमारे ३५० पुतळे घडवले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले आदि महान व्यक्तींची शिल्पे त्यांनी घडवली. पुण्यातील गणेशोत्सव आणि खेडकर यांचे अतूट नाते होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ पुण्यात गणेशसेवा कली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांनी दिलेले व्हिक्टोरिया क्रास पदक सापडले

तेलंगणात खोदकाम करताना आढळले पदक

व्हिक्टोरिया क्रास पदक केवळ इंग्लंड व दिल्लीच्या म्युझियमध्येच आढळते
गोंडपिपरी, दि. 13 - पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटीशांकडून युद्धात उडी घेतली. या युद्धात लाखोंच्या संख्येत जीवित हानी झाली. युद्धात पराक्रम गाजविणाºया मोजक्या सैनिकांना ब्रिटीशांनी व्हिक्टोरिया क्रास पदक देवून गौरव केला होता. हे व्हिक्टोरिया पदक सध्या इंग्लंड व दिल्ली येथील संग्राहलयात पहायला मिळते. तेलंगणात इमारतीच्या बांधकामाचे खोदकाम करीत असताना धाबा येथील भिकारू जुनघरे या तरुणास हे पदक तीन वर्षांपूर्वी सापडले. आजही ते त्यांनी अतिशय जपून ठेवले आहे.

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणाची सीमा लागून आहे. तालुक्यातील नागरिक मजुरीच्या शोधात तेलंगणाला जात असतात. धाबा येथील भिकारू जुनघरे हा तरुण तीन वर्षापूर्वी तेलंगणातील शाळेच्या इमारतीचा पायवा खोदण्यासाठी गेला. खोदकाम करीत असताना भिकारूला पदकासारखी पितळेची वस्तू मिळाली. पदक स्टारच्या आकाराचे असून वर ब्रिटीशांची टोपी व मध्यभागी एकमेकाला छेदणाºया तलवारी कोरल्या आहेत. त्यात सन १९१४-१५ असे लिहिले आहे. पदकाच्या खालच्या भागावर लहान अक्षरात इंग्रजी भाषेत ‘व्ही’ व मोठ्या अक्षरात ‘सी’ कोरलेले आहे. इंटरनेटवर १९१४-१५ हा कालखंड लिहून सर्च केले असता पहिल्या महायुद्धात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाºया यौद्धांना देण्यात येणारे व्हिक्टोरिया क्रास नावाचे हे पदक असल्याचे भिकारूच्या लक्षात आले. हे अतिशय दुर्मिळ असल्याचे लक्षात आल्यावर भिकारू जुनघरे या तरुणाने मागील तीन वर्षापासून पदकाला जपून ठेवले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला बुधवारी सेवानिवृत्त झाल्यावर गुरुवारी तातडीने या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. न्या. चेल्लुर २४ आॅगस्टपासून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत.

विधी व न्याय मंत्रालयाने १० आॅगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले.

न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१ व्या मुख्य न्यायाधीश असतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असतील. त्यांच्यापूर्वी १९९४ मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते. तब्बल २२ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाला दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान चेल्लुर यांना मिळाला आहे. २२ आॅगस्ट रोजी त्यांच्या शपविधी व्हावा, यासाठी उच्च न्यायालयाकडून राज्यपालांना पत्र लिहिण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लिओनेल मेस्सीने घेतली निवृत्ती मागे, पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्ती मागे घेण्याचे जाहीर केले असून त्याने यांसदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता तो पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळताना दिसणार आहे.
लिओनेल मेस्सीने एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये अर्जेंटिना फुटबॉलमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात मला आणखी करण्याची इच्छा नाही. निवृत्ती घेण्याचा निर्णय मी गंभीरपणे घेतला होता. परंतु माझे या देशावर आणि जर्सीवर खूप प्रेम आहे, असे म्हटले आहे.
जून 2016 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर मेस्सीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी निवृत्ती मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्राची वाटचाल स्वच्छतेच्या दिशेने

राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्तीकडे सुरू असून , "स्वच्छ भारत अभियानां ' तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे , तर राज्यात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे . राज्यात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात एक लाख 64 हजार 871 शौचालयांची उभारणी झाली आहे , तर 88 हजार 117 शौचालयांचे बांधकाम सुरू आहे .

" स्वच्छ भारत शहर अभियाना ' स राज्यात 15 जून 2015 रोजी सुरवात झाली . या कार्यक्रमांतर्गत राज्यात आठ लाख 32 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे . देशांतर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा क्रमांक सर्वप्रथम लागतो . राज्याने शौचालय निर्मितीत आघाडी घेतली आहे . आतापर्यंत 100 शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. या मोहिमेस 14 महिने झाले आहेत . गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते . त्यामुळे अमरावती , औरंगाबाद या महसूल विभागांत शौचालय बांधणीची गती मंद होती . मात्र , गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सर्व विभागांत कामाने गती घेतली आहे . राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे . यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त 17 हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकार चार हजार व राज्य सरकार आठ हजार रुपये अशी मदत करते. स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त पाच हजार रुपये इतकी मदत करते . उरलेला खर्च लाभार्थीला उचलावा लागतो . एका शौचालयासाठी 20 हजार रुपये खर्च येतो .

- राज्यभरात शहरी भागासाठी उद्दिष्ट ः 8 लाख 32 हजार

- सध्या एक लाख 64 हजार 871 शौचालये पूर्ण , तर 88 हजार 117 शौचालयांचे बांधकाम सुरू

- महाराष्ट्र देशात पहिला , सिंधुदुर्ग राज्यात पहिला

देशपातळीवर . . .
1 ) महाराष्ट्र ः 1 लाख 64 हजार 871
2 ) गुजरात ः 1 लाख 59 हजार 371
3 ) मध्य प्रदेश ः 1 लाख 31 हजार 529
4 ) आंध्र प्रदेश ः 1 लाख 27 हजार 712
5 ) छत्तीसगड ः 76 हजार 112

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नव्या वर्षात " मनरेगा ' कात टाकणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा ) येत्या काळात कात टाकणार आहे . देशातील अन्य राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातही प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. यातूनच सामुदायिकपेक्षा वैयक्तिक लाभाच्या योजना मोहीम स्वरूपात राबविण्यात येणार आहेत. या बदलानुसारच स्वातंत्र्यदिनी (ता. 15 ) होणाऱ्या ग्रामसभेत योजनेतील कामांचा आराखडा ( लेबर बजेट ) मंजूर करण्यात येणार आहे .

दर वर्षी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत " लेबर बजेट ' मंजूर करण्यात येते .
 त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेत हा आराखडा मंजूर करून त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करण्यात येते . 2017 - 2018 या वर्षासाठी आराखडा तयार करताना योजनेला सामाजिक रूप देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे . " मनरेगा ' तून अन्य राज्यांत मोठ्या संख्येने कामे होऊन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो . यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत "मनरेगा ' अंमलबजावणीत महाराष्ट्र मागे आहे . कामे नसल्याने मजुरांची उपासमार होण्याची स्थिती राज्यात नाही . यामुळे वैयक्तिक लाभाच्या कामांतून मजुरांची उपलब्धता करण्याचे धोरण सरकारने नवीन वर्षात स्वीकारले आहे . यातूनच अकरा कलमी योजनेतील वैयक्तिक लाभाची कामे मोहीम स्वरूपात घेण्यासाठी तसा आराखडा ग्रामसभेत मंजूर करण्याचा आदेश सरकारने दिला आहे . चालू वर्षाच्या आराखड्यातही सुधारणा करून मोहीम स्वरूपात कामे घेण्याच्या सरकारच्या सूचना आहेत.

अंगणवाडीच्या इमारती बांधणार:
नवीन आराखड्यात ग्रामपंचायत भवनासोबत अंगणवाडीच्या इमारती , घरकुल, गुरांचे गोठे , शेळीपालन व कुक्कुटपालनासाठी शेड , मत्स्य व्यवसायासाठी ओटे , सिंचन विहिरी , शेततळी , वर्मी व नाफेड कंपोस्ट , फळझाडे लागवड , स्वच्छतागृहे , शोषखड्डे, गावतलाव व पारंपरिक तलावांचे नूतनीकरण, रोपांची निर्मिती व वृक्षलागवडीची कामे व्यापक स्वरूपात होणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाम विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर

देशाच्या संसदेत बहुमतानं मंजूर झालेलं ऐतिहासिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक आसाम विधानसभेनं आज एकमतानं मंजूर केलं. केंद्र सरकारनंतर हे विधेयक मंजूर करणारं आसाम हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला नवं वळण देऊ शकणाऱ्या जीएसटी विधेयकाला गेल्याच आठवड्यात राज्यसभेनं व त्यापाठोपाठ लोकसभेनं मंजुरी दिली. संसदेतील मंजुरीनंतर देशातील किमान १५ राज्यांनी हे विधेयक आपापल्या विधीमंडळात संमत करणं बंधनकारक आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत जीएसटी विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" ग्रीनलॅंड शार्क ' चे वय तब्बल 400 वर्षे!

ग्रीनलॅंड येथील वैशिष्ट्यपूर्ण शार्क प्रजातीचे मासे हे पृथ्वीवरील सर्वाधिक आयुर्मर्यादा असलेले कणा असलेले (व्हर्टिब्रेट्स ) प्राणी असल्याचा निष्कर्ष सायन्स या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधनिबंधामधून संशोधकांनी मांडला आहे .

" रेडिओकार्बन डेटिंग ' पद्धतीचा वापर करुन एकूण 28 शार्क माशांचे वय शोधण्यात आले. या पाहणीत एका मादी शार्कचे वय सुमारे 400 वर्षे इतके असल्याचे आढळून आले . शार्क माशांची वाढ दरवर्षी 1 सेमी वेगाने होते आणि साधारणत : वयाच्या 150 वर्षी त्यांना लैंगिक प्रगल्भता येते , असेही या अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे . शार्क माशांची वयोमर्यादा इतकी असल्याचे पाहून संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे मत या संशोधन मोहिमेचे प्रमुख ज्युलियस निल्सेन यांनी व्यक्त केले.

याआधी , एका ' बोहेड व्हेल ' माशाचे 211 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले होते . तो आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्हर्टिब्रेट प्राणी असल्याचे मानले जात होते . ग्रीनलॅंड शार्क हे आकाराने अवाढव्य मासे असून ते उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आढळून येतात .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताची ललिता बाबर अंतिम फेरीत

रिओ डि जानिरो : भारताची ललिता बाबर महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे . ललिताने 9 : 19 : 76 अशी वेळ नोंदवत तिच्या गटात चौथे स्थान मिळविले . ' फास्टेस्ट लूझर ' च्या नियमानुसार ललितालाही अंतिम फेरीसाठी संधी मिळाली आहे .

प्रत्येक गटातून पहिल्या तीन स्पर्धक अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरतात . उर्वरित खेळाडूंमधील सर्वांत चांगली वेळ नोंदविणाऱ्या सहा स्पर्धकांनाही अंतिम फेरीत स्थान मिळते . ललिता तिच्या गटात चौथी आल्याने तिला ही संधी मिळाली.

3000 मीटर स्टीपलचेसमधील पहिल्या गटातील पहिल्या तीन स्पर्धकांची वेळ अनुक्रमे 9 : 12 : 62 , 9 : 18 : 75 आणि 9 : 19 : 70 अशा होत्या . ललिताच्या गटातील पहिल्या तीन स्पर्धकांची वेळ अनुक्रमे 9 : 17 : 55 , 9 : 18 : 12 आणि 9 : 18 : 71 अशी होती . ललिताची वेळ 9 : 19 : 76 अशी आहे . यामुळे ' फास्टेस्ट लूझर ' च्या नियमानुसार ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

#Rio_Olympic_updates

🔹फेल्प्ससारख्या हिरोलाच मागे टाकून जिंकले सुवर्ण

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये 22 सुवर्णपदकांची कमाई करणारा अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्सला आपला आयडॉल मानणाऱ्या सिंगापूरच्या जोसेफ स्कुलिंगने त्यालाच मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले . फेल्प्सने स्कुलिंगची शाळेत घेतलेल्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

सिंगापूरच्या जोसेफ स्कुलिंगने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली . स्कुलिंगच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतुक करण्यात येत आहे . स्कुलिंगने हे अंतर 50 .39 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले . तर , फेल्प्सने हे अंतर 51 . 14 सेकंदात पूर्ण केले. फेल्प्सने आपल्या रिओ ऑलिंपिक अभियानाचा शेवट रौप्य पदक मिळवून केला .

मायकेल फेल्प्सच्या कारकिर्दीतील हे एकूण 27 वे पदक आहे . फेल्प्सला गेल्या तिन्ही ऑलिंपिक स्पर्धांमध्ये 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक मिळाले होते . पण , यंदा चौथ्यांदा त्याला सुवर्णपदक मिळविण्यात अपयश आले. फेल्प्सला मागे टाकल्यानंतर स्कुलिंग म्हणाला की , मी आज खूप खूश आहे . मी आतापर्यंत हे समजू शकलेलो नाही , माझ्यासाठी हा वेडेपणा आहे . माझी अजून इच्छा आहे की मायकेलने बाहेर जाऊ नये . आम्ही पुन्हा एकदा रेस करावी , मला हे चांगले वाटते.

#eMPSCkatta_Current_Affairs

#Rio_Olympic_updates

🔹नदाल - लोपेझला पुरुष दुहेरीत सुवर्ण

स्पेनच्या राफेल नदालने मार्क लोपेझच्या साथीने रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले .

नदाल व लोपेझ यांच्या जोडीने रोमानियाच्या फ्लोरीन मर्जिया आणि होरिया तेकायू यांचा 6 -2 , 3 -6 , 6 -4 असा पराभव केला . शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात नदाल आणि लोपेझ यांनी सामना जिंकल्यानंतर मैदानावर अलिंगन घेत आनंद साजरा केला . नदाल आणि लोपेझ हे लहानपणीचे मित्र आहेत.
नदालला मे महिन्यात आपल्याला मनगटाच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार घ्यावे लागल्याचे सांगतान खूप दुःख झाले होते . आता या विजयामुळे नदालने पुन्हा टेनिसमध्ये कमबॅक केले आहे . नदाल म्हणाला की , माझ्यासाठी हा खूपच मोठा अनुभव होता . विशेषतः मी लहानपणीच्या मित्रासोबत खेळत होतो . आम्ही दोघांनीही कोणतीही तयारी केली नव्हती . तरीही आम्हाला सुवर्णपदक मिळविण्यात यश आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अवकाशयानांना सुरक्षित करणाऱ्या एरोजेलची चीनमध्ये निर्मिती

अवकाशमोहिमात वापरण्यात येणाऱ्या अवकाशयानांचे कवच किंवा संरक्षक आवरण हे जास्त तपमानाला टिकून राहणे आवश्यक असते. कोलंबिया यानाची दुर्घटना जास्त तपमान न सहन करता आल्याने घडली होती, असे सांगितले जाते पण आता चीनने क्रांतिकरी तंत्रज्ञानात हलका एरोजेल पदार्थ शोधला असून तो हलका घन पदार्थ मानला जातो, इतका हलका पदार्थ प्रथमच तयार केला असून तो अग्निबाण व अवकाशयानांच्या आवरणांसाठी वापरला जाणार आहे. तो अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात परत येताना निर्माण होणारे जास्त तपमान सहन करू शकतो. एरोस्पेस इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स्ड मटेरियल्स अँड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या बीजिंगमधील संस्थेने एरोजेल तयार केले असून ही कल्पना नवीन नाही. अमेरिका, रशिया व युरोप त्यांच्या अवकाश मोहिमात एरोजेल वापरत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. पण झो जुनफेंग यांच्या मते चीनच्या या संस्थेने तयार केलेले एरोजेल उत्पादन वेगळे असून त्यातील काही एरोजेल्स हे जगात तंत्रज्ञान दृष्टिकोनातून मजबूत आहेत. अनेक अवकाशयाने, उपग्रह व अग्निबाण यात आम्ही हे एरोजेल वापरत असून त्यामुळे अंतर्गत तपामान नियंत्रित राहते, असे जुनफेंग यांनी सांगितल्याचे ‘चायना डेली’ने म्हटले आहे. अतिशय मजबूत मानल्या जाणाऱ्या मार्च ५ या अग्निबाणात त्याचा वापर करून नंतर उड्डाण करण्याचा प्रयोग या वर्षांच्या अखेरीस केला जाणार आहे. झो यांच्या संस्थेने इंजिनच्या पाइपचे अंतर्गत तपमान योग्य राखण्यासाठी या एरोजेलची निर्मिती केली आहे. आम्ही बनवलेल्या एरोजेलमुळे यानाचे तपमान जे घर्षणाने वाढत जाते त्यापासून संरक्षण मिळते.अवकाशयानाला स्पंदनांमुळे निर्माण होणारा धोका टळतो. चीनच्या पुढील मार्स रोव्हर यानात या एरोजेलचा वापर केला जाणार आहे. मालवाहू अवकाशयानांमध्येही आता प्रशीतक म्हणजे रेफ्रीजरेटर ठेवले जाणार असून त्यातही एरोजेल वापरले जाईल. त्यामुळे रेफ्रीजरेटरचे वजनही कमी करता येईल. नासा ही संस्था मार्स रोव्हर व स्पेससूटमध्ये एरोजेलचा वापर उष्णतारोधक आवरणासाठी करते. झो यांच्या संस्थेने थर्ड अॅकडमी ऑफ द चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कार्पोरेशन मोठय़ा संस्थेचा एक भाग म्हणून अवकाशयान व क्षेपणास्त्रे यांच्यासाठी एरोजेलसारखे विशिष्ट पदार्थ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, त्यांनी एरोजेलचे अनेक प्रकार शोधले असून ते उणे १०० अंश सेल्सियस ते २५०० अंश सेल्सियस तपमानालाही टिकू शकतात. चीनच्या अत्याधुनिक शस्त्रात त्यांचा वापर केला जातो, असे संस्थेचे संचालक काव हुइ यांनी सांगितले. एरोजेल हे हलके व घन असून सर्वात मजबूत आहे. जगातील अनेक गोष्टीत बदल घडवण्याचे सामथ्र्य त्यात आहे. एरोजेल्स हे चीनची मोठी जहाजे, वेगवान रेल्वे यांच्यात वापरले जाते.

👉 जागतिक शांतता निर्देशांक - 2015

नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये 162 देशांचा समावेश आहे. हिंसेचे प्रमाण, संघर्ष व सैन्यदलांचा वापर या मुद्यावर प्रत्येक देशाला गुण देण्यात आले आहेत. ज्या देशाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत, तो देश सर्वात अशांत असलेला देश आहे, असे सूत्र आहे. यामध्ये भारताला 2.504 गुण मिळाल्यामुळे भारत 143 व्या स्थानावर आहे, तर आईसलँड हा छोटासा देश जागतिक शांततेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.जागतिक शांतता सूचीमधील काही देश -
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
क्र.          देश               स्थान

1)      आईसलँड               1

2)      डेन्मार्क                  2

3)     ऑस्ट्रिया                3

4)      भूतान                   18

5)      नेपाळ                   62

6)      बांगलादेश             84

7)      अमेरिका               94

8)      श्रीलंका              114

9)      चीन                  124

10)    भारत                143 🇮🇳 ✅

11)    पाकिस्तान         154

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात 44 सायबर लॅबचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन

मुंबई - स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला राज्यात एकाच दिवशी 44 ठिकाणी सायबर लॅबचे उद्घाटन केले जाणार आहे . सायबर गुन्हेगारीवर वचक बसवण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तत्काळ उकल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .

15 ऑगस्टला राज्यातील 44 ठिकाणी या सायबर लॅबचे उद्घाटन होत असून , सायबर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे . माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई -बॅंकिंग , पेपरलेस कार्यालय , सोशल मीडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे . त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा , या दृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारावा , असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते . त्यानुसार राज्यातील जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सायबर लॅब उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे . सर्व जिल्हे, पोलिस आयुक्तालयांसह मुंबई , पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात 44 ठिकाणी सायबर लॅबची उभारणी करण्यात आली आहे .

#Rio_Olympic_updates

🔹१०० मीटर शर्यतीच्या विक्रमांचा विक्रम

जगातील वेगवान धावपटूंच्या शर्यतीचा थरार रविवारी ऑलिम्पिक स्टेडियमवर रंगणार आहे. जमैकाचा उसेन बोल्ट आपले अधिराज्य कायम राखतो, की अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन त्याचे साम्राज्य खालसा करतो. हे चित्र रविवारी स्पष्ट होईल. शंभर मीटर शर्यतीचे सुवर्णपदक हे खेळाडूला जागतिक ओळख मिळवून देतो. त्यात विश्वविक्रम प्रस्तापित करणे म्हणजे अमरत्व मिळवणे. त्यामुळेच जगातील दिग्गज धावपटू आपले सर्वस्व पणाला लावतात. अमेरिकेचा डोनाल्ड लिप्पिंकोट आणि झेकोस्लोव्हाकियाच्या मारी मेझलिकोव्हा हे या प्रकारात विश्वविक्रम करणारे पहिले खेळाडू, तर जमैकाचा उसेन बोल्ट आणि अमेरिकेची फ्लोरेन्स ग्रिफीथ-जॉयनर यांच्या नावावर सद्य:स्थितीला हा विक्रम आहे. या विक्रमांच्या विक्रमांचा घेतलेला थोडक्यात आढावा.

२००९ जमैकाच्या उसेन बोल्टने १०० मीटर शर्यतीतील अधिराज्य अधिक मजबूत करताना जागतिक विक्रमाची नोंद केली. बर्लिन येथे पार पडलेल्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दोन वेळा त्याने (९.७२ व ९.६९ सेकंद) विक्रम नोंदवला होता. त्याचवर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने ९.५८ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत स्वत:चा विक्रम मोडला.

१९९९ : मॉरिस ग्रीने (अमेरिका, ९.७९ से.)
१९९६ : डोनोव्हॅन बेली (कॅनडा, ९.८४ से.)
१९९४ : लेरॉय बुरेल (अमेरिका, ९.८५ से.)
१९९१ : कार्ल लुईस (अमेरिका, ९.८६ से.)
१९९१ : लेरॉय बुरेल (अमेरिका, ९.९० से.)
१९८८ : कार्ल लुईस (अमेरिका, ९.९२ से.)

२००७ जमैकाच्या असाफा पॉवेलने ९.७४ सेकंदांचा विक्रम नोंदवताना स्वत:च्याच नावावर असलेल्या ९.७७ सेकंदांची वेळ मोडीत काढली. २००५ आणि २००७ या कालावधीत पॉवेलने वर्चस्व गाजवले, परंतु दुखापतीमुळे त्याची पीछेहाट झाली.

१९८८ : सेऊल ऑलिम्पिक स्पध्रेतील सर्वात विवादास्पद १०० मीटर शर्यत पार पडली. कॅनडाच्या बेन जॉन्सनने ९.७९ सेकंदांसह विक्रमी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले, परंतु उत्तेजक चाचणीत तो दोषी आढळला.

१९८८ अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफीथ-जॉयनर यांनी १०.४९ सेकंदांची विक्रमी वेळ अजूनही कोणाला मोडता आलेली नाही.

१९२२ झेकोस्लोव्हाकिया मारी मेझलिकोव्हा या जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या पहिल्या महिला धावपटू आहेत. त्यांनी १३.६ सेकंदांची वेळ नोंदवली.

१९१२ : अमेरिकेचा डोनाल्ड लिप्पिंकोट हे जागतिक विक्रम नोंदवणारे पहिले पुरुष धावपटू. त्यांनी स्टॉकहोम ऑलिम्पिक स्पध्रेतील पहिल्या पात्रता फेरीत १०.६ सेकंदांची वेळ नोंदवली होती, परंतु अंतिम फेरीत त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये एक अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदकं, दोन नौसेना पदकं आणि दोन वायुसेना पदकांचा समावेश आहेत. हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हुबळीचे एकमेव केंद्र पुरवते राष्ट्रध्वज

तिरंगा बनवण्याचेही तीन टप्पे - यंदा एक कोटीची विक्री

हुबळी - राष्ट्रध्वज बनवणारे देशभरात एकच अधिकृत केंद्र आहे , ते म्हणजे हुबळीजवळचे बेंगेरी खादी ग्रामोद्योग केंद्र . यंदा या केंद्रातून सुमारे एक कोटी रुपयांची ध्वजविक्री झाली आहे . गेली दोन वर्षेही साधारण कोटीच्या घरात विक्री झाल्याची माहिती आहे . राष्ट्रध्वज बनवण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत. सूतकताई , रंगकाम आणि शिलाई. कापसापासून चरख्याद्वारे सूतकताई करून ध्वजाचे कापड विणले जाते. या कापडाच्या एक चौरस इंचात 32 उभे आणि 32 आडवे धागे असले पाहिजेत , असा निकष भारतीय मानक विभागाने ( ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस्- बीआयएस ) ठरवला आहे . त्यामुळे हे कापड बनवण्याचे काम फक्त बागलकोट ( कर्नाटक ) जिल्ह्यातील तुलसगिरी व वेलूरमध्ये चालते . सूत विणून बनलेले कापड फिकट तपकिरी रंगाचे असते . या कपड्याचे तागे हुबळीच्या बेंगेरी केंद्रात मागवले जातात.

रंगकाम
बागलकोटहून कापडाचे तागे हुबळीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे "ब्लीचिंग ' करून ते कापड पांढरे शुभ्र बनवले जाते. त्यानंतर काही ताग्यांना केशरी रंग तर काही ताग्यांना हिरवा रंग दिला जातो . रंगांचा "पीएच ' आणि " स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू ' बीआयएसच्या मानकाप्रमाणे असते . त्यानंतर पांढऱ्या कापडावर निळ्या रंगाचे अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग तंत्राद्वारे छापले जाते.

शिलाई
तिरंगा ध्वज सलग एकाच कापडाचा नसतो , तर तीन कापडे जोडून शिवलेला असतो. तीन एकक लांबी आणि दोन एकक रुंदी होईल , अशा प्रमाणात तीन रंगांचे तुकडे शिलाई मशिनवर जोडले जातात. केशरी तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना शिलाईसाठी केशरी दोरा वापरला जातो . तर हिरवा तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना हिरवा दोरा वापरला जातो . त्यामुळे दुरून पाहिले असता एकाच कपड्याला तीन रंग दिले असल्याचा भास होतो . प्रत्यक्षात तिरंगा बनतो तो तीन रंगांचे प्रमाणबद्ध कापलेले तुकडे जोडून !

खास खोबण
तिन्ही तुकडे एकमेकांना शिलाईने जोडल्यानंतर एका बाजूला खास शिवून तयार केलेली खोबण ( स्लीव्ह ) जोडली जाते. ही खोबण हातमागावर तयार केलेली असते . ती वरून खाली अशी जोडली जाते. शिवाय , खोबणीचे वरचे तोंड बंद केले जाते. एकदा ध्वज शिवून तयार झाला की तो "स्टीम इस्त्री ' केला जातो . त्यानंतर तो पिशवीबंद केला जातो . हुबळीतील या केंद्रात बीआयएसच्या मानकानुसार 9 विविध आकारांचे राष्ट्रध्वज तयार केले जातात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' नाझीं ' च्या सोन्याच्या रेल्वेचा शोध पुन्हा सुरू

नैर्ऋत्य भागात रेल्वे असल्याचा ट्रेझर हंटरचा कयास
वालब्रेझ ( पोलंड ) - नाझींच्या सोन्याने भरलेल्या रेल्वेगाडीचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला असून , ही रेल्वे पोलंडच्या नैर्ऋत्य भागामध्ये गाडली गेल्याचा संशय आहे . दरम्यान , या रेल्वेच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा दर्शविणारा अद्याप एकही ठोस पुरावा संशोधकांच्या हाती लागलेला नाही . ही रेल्वे म्हणजे काही सुई नाही , ती जर जमिनीमध्ये गाडली गेली असेल, तर तिला आम्ही शोधून काढू , असे या शोध प्रकल्पाचे प्रवक्ते अंद्रेज गेक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले .
तत्पूर्वी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघा संशोधकांनी सोन्याच्या विटांनी भरलेली ही रेल्वे वालब्रेझ शहराजवळ कोठेतरी भूगर्भात गाडली गेल्याचा दावा केल्याने खळबळ निर्माण झाली होती . पोलिश वंशाचे संशोधक प्यातोर कोपेर आणि जर्मन नागरिक अँड्रियास रिश्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागामध्ये जमिनीखाली 320 फूट लांबीचे गाडीचे अवशेष आढळून आले असून , ते साधारणपणे 26 ते 28 फूट खोलीवर असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला . या गाडीमध्ये नाझी सैनिकांनी चोरलेल्या शस्त्रांबरोबरच काही दुर्मिळ कलाकृती , दागिने आणि हिऱ्यांचाही समावेश आहे . नाझी युद्धकैद्यांनी या भागामध्ये बोगद्यांचे जाळे खोदले होते , त्या वेळी रशियाच्या लाल सैन्याची आगेकूच सुरू असल्याने नाझींनी त्यांचा खजिना या बोगद्यांमध्ये दडविल्याचे सांगितले जाते. येथील स्थानिक संशोधकांनी मात्र यास नकार दिला आहे . याबाबत प्रो . जानुझ मादेज म्हणाले , की या भागामध्ये शंभर टक्के सोन्याच्या विटांनी भरलेली रेल्वे नाही ; पण बोगदा मात्र आहे . पण या रेल्वेचा शोध घेणाऱ्या ट्रेजर हंटर्सनी मात्र बोगदा सापडला तर रेल्वेही सापडेल असे म्हटले आहे .
जुन्या रेल्वे ट्रॅकच्या शेजारी आम्ही सहा मीटरपर्यंत खोदकाम करणार आहोत , तीन विविध रेल्वे ट्रॅकच्या शेजारी शंभर मीटरपर्यंत हे खोदकाम होणे अपेक्षित आहे .
- अंद्रेज गेक , शोध प्रकल्पाचे प्रवक्ते

#eMPSCkatta_Current_Affairs

#Rio_Olympic_updates

🔹२३ सुवर्ण पदके प्राप्त करणारा मायकेल फेल्प्स निवृत्त

आॅलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके मिळविणाऱ्या जगविख्यात मायकेल फेल्प्स या जलतरणपटूने आज आपल्या सोनेरी कारकिर्द समाप्त केली. ४७x१00 मिटर मेडल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. रिओ आॅलिंपिमध्ये त्याने हे पाचवे पदक प्राप्त केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.

#eMPSCkatta_Current_Affairs

#Rio_Olympic_updates

🔹अमेरिकेने ऑलिंपिकमध्ये जिंकली 1000 सुवर्ण

रिओ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक तालिकेत कायमच आपले वर्चस्व कायम असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे .

रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या 4 बाय 100 मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले . अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक 1896 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते . त्यानंतर अमेरिकेचा सुवर्णपदके मिळविण्याचा धडाका सुरूच आहे . यंदाच्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत अमेरिकेने 24 सुवर्णांसह 61 पदके मिळविलेली आहेत. जलतरणात अमेरिकेने 16 सुवर्णपदाकांसह 33 पदके मिळविली आहेत. लंडन ऑलिंपिकमध्येही जलतरणात अमेरिकेने एवढीच पदके मिळविली होती .

रिओ ऑलिंपिकमधील मायकेल फेल्प्सने पाच सुवर्ण मिळविली आहेत. त्याने या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य पदकही मिळविलेले आहे . फेल्प्सने आपल्या जलतरणाच्या कारकिर्दीत एकूण 28 पदके मिळविलेली आहेत. यात 23 सुवर्ण, 3 रौप्य आणि दोन ब्राँझपदकांचा समावेश आहे . अमेरिकेच्या खेळाडूंकडून ऍथलेटिक्समध्येही भरीव कामगिरी करण्यात येत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कायदा मंत्रालयाच्या मसुद्याला "कॉलेजियम ' चा विरोध कायम

न्यायाधीशपदाचा उमेदवार नामंजूर करणे आणि न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेचे पुनरावलोकन याविषयीच्या सरकारी प्रस्तावांबाबत सर्वोच्च
न्यायालयाचे कॉलेजियम पुन्हा एकदा आक्षेप नोंदविणार आहे .
सरन्यायाधीश टी . एस . ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियममध्ये चार न्यायाधीशांचा समावेश आहे . कायदा मंत्रालयाने न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेचा सुधारित मसुदा जाहीर केला आहे . या मसुद्यावर कॉलेजियमने काही आक्षेप घेतले आहेत. यामुळे हा मसुदा अंतिम होण्यास आणखी विलंब लागणार आहे . या सुधारित मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कॉलेजियमची बैठक लवकरच होणार आहे . या बैठकीनंतर या मसुद्याचे भवितव्य निश्चित होणार आहे .
सुधारित मसुद्यामध्ये कॉलेजियमने शिफारस केलेल्या न्यायाधीशांचे नाव राष्ट्रहित व जनहित लक्षात घेऊन नामंजूर करण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत. मात्र , यामुळे न्यायव्यवस्थेच्या कामात हस्तक्षेप वाढेल , असे कारण सांगून कॉलेजियमने याला विरोध दर्शविला आहे . उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयांवर सरकारकडून कार्यवाही झालेली नाही . यामुळे कायदेशीर कामकाज ठप्प होत असून , न्यायव्यवस्था ढासळत असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातील पहिला " अँटी हॅकिंग ' उपग्रह

 चीन जगातील पहिल्या क्वांटम संचार उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे . या उपग्रहाचे वैशिष्ट्य हे , की या उपग्रहामध्ये एक असे बटण आहे , ज्यामध्ये हॅकरना रोखण्यासाठी उच्च सुरक्षा साधनांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे जगातील पहिला अँटी- हॅकिंग उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मान चीनला मिळणार आहे . चीनमधील झिन्हुआ वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त रविवारी दिले . या उपग्रहामुळे हॅकिंगविरहित अभेद्य संचारप्रणालीचा चीनचा मार्ग प्रशस्त होणार आहे . येत्या काही दिवसांमध्ये चीन हा उपग्रह प्रक्षेपित करेल .

कशी झाली निर्मिती
जुलै, 2015 मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळेची शांघायमध्ये निर्मिती करण्यात आली होती , ज्याची स्थापना चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्स , तसेच इंटरनेट व्यापारातील चीनची सर्वांत मोठी कंपनी " अलिबाबा ' ने केली होती .

काय आहेत वैशिष्ट्ये
क्वांटम प्रमुख प्रौद्योगिकी अतिउच्च दर्जाच्या सुरक्षेबाबत आश्वस्त करत आहे . कारण , फोटॉनला वेगळे करता येत नाही किंवा त्याची प्रतिकृतीही बनविता येत नाही , त्यामुळे यामधून जाणाऱ्या सूचना हॅक करणे केवळ अशक्य आहे . यासोबतच क्वॉंटममध्ये संवाद करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या किंवा त्यांचे संभाषण चोरून ऐकणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीविषयी सूचनाही देण्याची क्षमता यामध्ये आहे . 2030 पर्यंत 50 ते 100 क्वांटम बिट्झचे एकसारखे संगणक बनविण्यात येणार आहेत. या संगणकांची क्षमता सर्वसाधारण संगणकापेक्षा कितीतरी पटीने उच्च दर्जाची असणार आहे .

असा होईल उपयोग
आर्थिक सेवा , शासकीय व्यवहार, तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये या क्वॉंटमचा उपयोग करण्यात येणार आहे . ऑनलाइन बॅंकिंग तसेच ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेसाठी क्वांटम सेवेचा सर्वाधिक उपयोग करता येणार आहे . संरक्षणविषयक तसेच देशहिताच्या माहितीचे जतन व संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कामही याद्वारे करणे शक्य होणार आहे .

#Rio_Olympic_updates

वेड व्हॅन निएकर्कला विश्वव्रिकमासह सुवर्ण : पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या वेड व्हॅन निएकर्क याने विश्वव्रिकमासह सुवर्णपदक पटकावले. त्याने 43 .03 सेकंद वेळ दिली . तब्बल सतरा वर्षे आबाधित विक्रम त्याने मोडीत काढला.

दीपा कर्माकरचे पदक थोडक्यात हुकले
: दीपा कर्माकरचे पदार्पणाच्या ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न थोडक्यात हुकले . चौथ्या स्थानी.


बोल्ट ' एक्स्प्रेस ' सुसाट; ऑलिंपिकमध्ये हॅट्ट्रिक
जमैकाच्या उसेन बोल्ट याने सोमवारी ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास घडवला . आजपर्यंत भल्याभल्यांना जे जमले नाही ते त्याने करून दाखवले .

आमिर खानच्या पाणी फाऊंडेशन तर्फे घेतल्या गेलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळू गाव, 45 दिवसांत जलसंधारणाची उत्तम कामं करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे, प्रथम क्रमांकासाठी त्यांना मिळाले 50 लाख रुपये
तसेच कोरेगाव तालुक्यातील जायगाव या गावानेही दुसऱ्या क्रमांकाचं 15 लाखांचं पारितोषिक पटकावलं.

#eMPSCkatta _Current_Affairs

🔹आसामपाठोपाठ बिहारचा ' जीएसटी ' ला हिरवा कंदील

आसामपाठोपाठ आता बिहार विधानसभेने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी ) घटनादुरुस्ती विधेयकास सार्वमताने मंजुरी दिली आहे . शुक्रवारी आसाम विधानसभेत विधेयक सार्वमताने मंजुर करण्यात आले होते .

जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी बिहार विधानसभेत एकदिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते . राज्यातील सत्ताधारी पक्ष जदयू , आरजेडी आणि काँग्रेसने विधेयकास पाठिंबा दिला . परंतु मार्क्सवादी -लेनिनवादी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला तीव्र विरोध करत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला .

जीएसटी विधेयक राज्यासाठी तसेच केंद्रासाठी फायदेशीर असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.

जीएसटीचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर बिहारला अंदाजे आठ ते नऊ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . यामुळे राज्याकडून विधेयकाला विशेष पाठिंबा देण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . दारुबंदी घोषित केल्यानंतर बिहारचे उत्पन्न कमी झाले आहे .

आतापर्यंत दोन विधानसभांनी या विधेयकास मंजुरी दिली आहे . एकुण 29 पैकी किमान 15 राज्यांनी या विधेयकास मंजुरी देणे गरजेचे आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नरसिंग यादवला धक्का, ‘नाडा’ने दिलेली क्लिन चीट ‘वाडा’ने फेटाळली

भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादवच्या रिओ ऑलिम्पिकमधील समावेशाबाबतची साशंकता अद्याप कायम आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) नरसिंग यादवला क्लिन चीट दिली असली तरी मंगळवारी जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा), मात्र नरसिंगला मोठा धक्का दिला आहे. ‘नाडा’ने दिलेली क्लिन चीट ‘वाडा’ने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नरसिंग यादववर असलेली ४ वर्षांची बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नरसिंग यादवने वाडाकडे आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला असून, याप्रकरणावरील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

अहवाल :

न्यु वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार आफ्रिकेतील अतिश्रीमंत देश मॉरिशस (या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न 21,700 अमेरिकन डॉलर्स) तर सर्वात दरिद्री देश झिम्बांबे (दर डोई उत्पन्न 200 रुपये)
  आशिया विकास बँकेच्या अहवालानुसार 2016-17 या वर्षीचा आशिया खंडाचा विकास दर 5.7 टक्के असणार आहे. असा अंदाज व्यक्त केला. 2015 मध्ये विकास दर 5.9 टक्के होता. 2016-17 या साली चीनचा विकासदर 6.5 टक्के तर भारताचा विकास दर 7.4 टक्के राहील असे अहवालात म्हटले आहे.
  न्यु वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार 2015 मध्ये भारतातून 4 हजार कोट्याधीश परदेशात जाऊन स्थायिक झाले. सर्वाधिक 10 हजार कोट्याधीश फ्रान्समधून परदेशात स्थायिक झालेत.
  'वर्ल्ड रिचेस्ट कंट्रीज डॉटकॉम' च्या सर्वेक्षणानुसार श्रीमंत देशाच्या यादीत भारताला तिसरे स्थान पहिले चीन तर दुसरे स्थान अमेरिका होय.
  यासाठी देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) च्या अभ्यास करण्यात आला.
  जागतिक माध्यम स्वातंत्र निर्देशांक : 180 देशांच्या यादीत भारताचे 133 आहे. (2015 मध्ये 136 वे स्थान होते) फीनलँड सर्वोच्च स्थानी (प्रथम) त्यानंतर नॉर्वे व नेदरलँडचा क्रमांक लागतो. रिपोर्टस विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने 2016 चा जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. (20 एप्रिल 2016)
  द फायनान्शियल रिपोर्ट - एफडीआय विभागाने अहवाल प्रकाशित केला. (22 एप्रिल 2016), हा अहवाल 2015 वर्षाचा आहे. थेट परकीय गुंतवणूकीत भारताने चीन, अमेरिकेला मागे टाकले आहे. 2015 मध्ये भारतात (63 अब्ज डॉलर्स) अमेरिका (59.6 अब्ज डॉलर्स), चीन (56.6 अब्ज डॉलर्स) इतकी गुंतवणूक झाली आहे. भारतात ज्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक झाली ती क्षेत्र म्हणजे तेल, नैसर्गिक वायु, कोळसा अशी क्षेत्राशी निगडीत आहे.
  एका संस्थेच्या सर्वेक्षणानुसार न्यायव्यवस्था, भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्था या बाबतीत 106 देशांच्या यादीत भारत 59 व्या क्रमांकावर डेन्मार्क प्रथम क्रमांकावर.
  अमेरिकेतील ब्रँडीज विद्यापीठाच्या प्रमुख आरोग्य शास्त्रज्ञानाच्या अहवालानुसार, डेंग्युमुळे जगाचे वार्षिक 60 हजार कोटींचे नुकसान, या रोगाचा सर्वाधिक धोका ब्राझील, इंडोनेशिया, भारत या देशांना आहे. या रोगास हाडमोडया रोग' या नावाने संबोधले जाते.
  जागतिक बँकेच्या 'हाय अॅड ड्राय क्लायमेंट चेंज' वॉटर अँड इकॉनॉमी, अहवालानुसार, वाढती लोकसंख्या, वाढणारे सरासरी आयुष्यमान आणि शहराचा विस्तार यामुळे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. पण पाण्याचा पुरवठा मात्र अनियमित आणि अनिश्चित होणार आहे. या जलसंकटामुळे जगाचे आर्थिक, नुकसान होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे.

काही महत्वाचे पुरस्कार :

वि.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार -

ज्येष्ठ साहित्यीक आणि समीक्षक प्रा.रा.ग. जाधव यांना राज्यशासनाचा हा पुरस्कार 2015 वर्षाचा जाहीर झाला. (22 फेब्रु. 2016)
  स्वरूप - पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र
  रा.ग. जाधव यांची प्रसिद्ध पुस्तके - निळी पहाट, संध्या समयीच्या गुजगोष्टी, सामाजिक संदर्भ, साहित्यांचे परिस्थिती विज्ञान 2004 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार -

पुरस्कार जाहीर - 30 मार्च 2016
  हा पुरस्कार 2012-13 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा होय.
  हे पुरस्कार राज्याच्या ग्रामविकास खात्यातर्फे दिले जातात.
  प्रथम क्रमांक - कुंभेफळ ग्रामपंचायत (औरंगाबाद) (25 लाख रुपये)
  व्दितीय क्रमांक - चांदोरे ग्रामपंचायत (ता. माणगाव जि. रायगड) व जातेगाव (ता. दापोली जि. रत्नागिरी) विभागून देण्यात आला.

व्ही. शांताराम पुरस्कार -

राज्यशासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपटी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही.एन. मयेकर यांना सर व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुबल यांना प्रदान.
  व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार पाच लाख, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रूपयांचा आहे.
  व्ही.एन मयेकर यांनी घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व आदि चित्रपटाचे उत्कृष्ट संकलन केले आहे.
  अलका कुबल यांनी माहेरची साडी, तुझ्या वाचुन, करमेना, दुर्गा आली घरा, माहेरचा आहेर, देवकी, नवसाचा पोर, स्त्रीधन असे कौटुंबिक चित्रपट केले.

शौर्यपदके

          15 ऑगस्ट 2016 रोजी राष्ट्रपतींनी 1 अशोकचक्रा समवेत, 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, 2 नौसेना पदके आणि 2 वायूसेना पदकांची घोषणा केली.

         * उत्तर कश्मीरमधील 13 हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये रक्त गोठविणार्‍या थंडीत पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले.

          हंगपान दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे. त्यांच्या लष्करी करिअरला 1997 मध्ये आसाम रजिमेंटमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती.

         * पठाणकोट हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देणारे लेफ्टनंट कर्नल निरंजन आणि कार्पोरल गुरूसेवक सिंह यांच्यासह संरक्षण आणि निमलष्करी दलांमधील 82 कर्मचार्‍यांना शौर्यपदके जाहीर.

         * नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर.

         * स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड.

         * भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक जाहीर.

          * लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर) 11 शौर्यचक्रे (यातील 6 मरणोत्तर) आणि 63 सेनापदके जाहीर झाली असून, यातील 12 ही मरणोत्तर बहाल.

          * ऑपरेशन मेघदूत‘, ऑपरेशन रक्षक‘ आणि ऑपरेशन र्‍हिनो‘ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणार्‍या जवानांसाठी 28 शौर्यपदके जाहीर.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एनपीसीआयचे *99# मोबाइल ॲप सुरू

राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेन्टरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) या प्रणालीवर आधारित *99# हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे.
 हे अॅप्लिकेशन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणारी युनियन बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे.
 युनियन बँकेने हे अॅप यूएसएसडी मंचावर अॅड्रॉइड प्रणालीच्या साह्याने लाँच केले आहे.
 तसेच या अॅपचे नाव बँकेने 'युनियन बँक *99#' असे ठेवले आहे.
 ग्राहकांना आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, मिनी स्टेटमेंट पाहणे, पैसे हस्तांतरित करणे असे व्यवहार करणे या अॅपमुळे सोपे होणार आहे.

अॅपची काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये -

व्यवहार करताना इंटरनेटची गरज पडत नाही.
 प्राथमिक खाते व्यवहार करता येणार आहे.
 आधारसंलग्न ओव्हड्राफ्ट व जनधन योजनेतील रक्कम तपासता येणार आहे.
 विविध भाषांत उपलब्ध आहे.

इंग्रजीत चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे :

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील हवेच्या दर्जा बाबत3000 शहरांचा अभ्यास करून सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली 15 मे 2016. यामध्येइराण मधील झाबेला हे सर्वाधिक जगातील प्रदूषित शहर होय.
 पहिल्या 10 मध्ये भारताच्या 4 शहरांचा समावेश आहे.
 ग्वालहेर (दूसरा), अलाहाबाद (तिसरा), पटना (चौथा),रायपूर (पाचवा) क्रमांकावर आहे. दिल्ली यादीत 9 व्या स्थानावर आहे.
 मागच्या वर्षीच्या अहवालात (2014-15) दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर होते. मागच्या अहवालात (20 पैकी 13 प्रदूषित शहरे भारताची होती.
 पहिल्या पाच शहरामधील हवेचा घातक अशी pm 2.5चे प्रमाण आत्याधिक आहे. झाबोला मधील pm 2.5 चे प्रमाण 217 इतके आहे. या यादीत 103 देशांचा अभ्यास करण्यात आला.
 PM म्हणजे Particulate Matter (धुळीचे कण)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक -

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकाच्या 168 देशांच्या यादीतभारत 76 व्या क्रमांकावर (मागील वर्षी 85 व्या स्थानावर होता)
 जागतिक बँक व आशिया विकास बँकेच्या माहितीच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो.
 168 देशांच्या यादीत डेन्मार्क सर्वोच्च स्थानीलागोपाठ दुसर्‍या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे.
 1 ला-डेन्मार्क, 2 रा-फिनलंड, 3 रा-स्वीडन, 4 था-न्यूझीलँड, 5 वा-नेदरलँड

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹युएन वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2015

भारत 117 व्या स्थानी आहे.

प्रथम क्रमांक - स्वित्झर्लंड
 व्दितीय क्रमांक - आइसलंड
 तृतीय क्रमांक - डेन्मार्क
 चतुर्थ क्रमांक - नॉर्वे

मोठे देश -

अमेरिका - 13 व्या स्थानी
 ब्रिटन - 21 व्या स्थानी
 फ्रान्स - 29 व्या स्थानी
 जपान - 46 व्या स्थानी
 रशिया - 66 व्या स्थानी

शेजारील देश -

भूतान - 79 व्या स्थानावर
 पाकिस्तान - 81 व्या स्थानावर
 चीन - 84 व्या स्थानावर
 बांगलादेश - 109 व्या स्थानावर
 नेपाळ - 121 व्या स्थानावर

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशात शौचालय निर्मितीत महाराष्ट्र प्रथम

राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्तीकडे सुरू असून, ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
 तसेच महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.
 महाराष्ट्रात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात 1,64,871 शौचालयांची उभारणी झाली आहे.
 ‘स्वच्छ भारत शहर अभियाना’स महाराष्ट्रात 15 जून 2015 रोजी सुरवात झाली.
 देशांतर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा क्रमांक सर्वप्रथम लागतो. महाराष्ट्रात आतापर्यंत 100 शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.
 राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे.
 तसेच यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त 17 हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकार 4 हजार, राज्य सरकार 8 हजार रुपये व स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त 5 हजार रुपये इतकी मदत करते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - 2016

 सामाजिक कार्य शंकरबाबा पापळकर
 संगीत सेवा पंडित अजय चक्रवर्ती
चित्रपट सेवा जितेंद्र
साहित्य क्षेत्र अरुण साधू
पत्रकारिता दिलीप पाडगावकर
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी
मराठी रंगभूमी प्रशांत दामले
अभिनेता हिंदी रणविर सिंग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार 2016


जिल्हा परिषद स्तर - प्रथम क्रमांक - कोल्हापूर
  व्दितीय - लातूर
  तृतीय - अहमदनगर


  पंचायत समिती स्तर -
  प्रथम क्रमांक - ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)
  व्दितीय क्रमांक - कराड (जि. सातारा)
  तृतीय क्रमांक (संयुक्त) - राहुरी (अहमदनगर), मालवण (सिंधुदुर्ग)


  ग्रामपंचायत स्तर -
  प्रथम क्रमांक - महालगाव (ता. कामठी, नागपूर)
  व्दितीय क्रमांक - लोणी बु. (ता. राहाता, अहमदनगर)
  तृतीय क्रमांक - कसबा उत्तुर (ता. आजरा, कोल्हापूर)  

__________________________________
JOIN Us @ChaluGhadamodi

🔹दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धा 2016

दिनांक 5 ते 16 फेब्रुवारी 2016
  स्पर्धा - 12 वी
  सहभाग - 8 देश
  खेळाडूचा सहभाग - 2500
  क्रिडा प्रकार - 23 स्पर्धा - 228
  स्थळ - गुवाहाटी (आसाम)
 समारोप-शिलोंग
  उद्घाटन - इंदिरा गांधी अॅथेलेटिक्स स्टेडीयम
  उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  ही स्पर्धा आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या नियोजनाखाली झाली.
  याआधी या स्पर्धेचे आयोजन 2012 मध्ये दिल्ली येथे होणार होते.
 मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने 2012 व 2014 या काळासाठी निलंबित केल्याने स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडले होते.
 त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (2015) मध्ये बंदी मागे घेतल्याने ह्या स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले होते.
भारतात या आधी 1987 (कोलकत्ता) 1995 (चेन्नई) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  यापूर्वी ह्या स्पर्धा 2010 मध्ये ढाका येथे घेण्यात आल्या होत्या. त्यात भारताने 175 पदके जिंकली होती त्यात 90 सुवर्ण पदके जिंकली होती.
  भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या 8 देशांचा या स्पर्धेत सहभाग आहे.
  या स्पर्धेचे घोषवाक्य - शांती, प्रगती आणि समृद्धि

#eMPSCkatta_Current_Affairs

राजभवनच्या तळाशी ' बंकरचा बंगला ' . . .

राजभवन . महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अत्यंत देखणं अन् सुरक्षित निवासस्थान . तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या राजभवनच्या पाताळात दडलेलं रहस्य आज अखेर उलगडलं . दीडशे वर्षांपूर्वी समुद्राच्या कडेला खडकात उभारलेल्या या बंकर सदृश्य "वॉर रूम ' चं अवाढव्य रूप पाहून स्वत : राज्यपालही अचंबित झाले . आजपर्यंत कोणाच्याही दृष्टीस न पडलेलं , कोणत्याही संशोधनात समोर न आलेलं ; पण ब्रिटिशकालीन वास्तव म्हणजे मुंबईच्या पर्यटन व कुतूहलाच्या शिरपेचात मानाचा तुराच असल्याचं मानलं जात आहे . त्यातच संशोधन अन् ब्रिटिशकालीन शैली व गुप्ततेच्या वास्तूचा हा इतिहास नव्याने समोर आल्याने राजभवनाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होणार , हे निर्विवाद सत्य आहे .
राजभवनच्या ज्या जागेवर आजपर्यंत हिरवळ होती , ज्या जागेवर शेकडो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अतिमहत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली, त्या जागेच्या खाली एक अवाढव्य बंकर अथवा एक प्रकारचा राजवाडाच असल्याचे सांगूनही पटणार नाही ; पण राज्यपाल सी . विद्यासागर राव यांच्या चौकस व संशोधक स्वभावानं हा पाताळात दडलेला इतिहास अपघातानेच समोर आला . राजभवनच्या पश्चिम बाजूला एक छोटीशी भिंत होती . त्या भिंतीच्या आत बंकर असल्याचे आजपर्यंत बोलले जात होते; पण कोणत्याही राज्यपालांनी याकडे अधिक लक्ष देण्याचे टाळलेच होते . विद्यासागर राव यांनी मात्र उत्सुकतेपोटी ही भिंत दूर करून जो असेल तो बोगदा उघडा करण्यास प्रशासनाला सांगितले . 12 ऑगस्टला ही भिंत दूर करण्यात आली . त्यानंतर जे समोर दिसले ते केवळ अद्भुत व अवर्णनीय दडलेलं सत्य !
तब्बल 20 फूट उंचीचे लोखंडी भक्कम गेट नजरेस पडल्यानंतर काम करणाऱ्यांना धक्काच बसला. गेट उघडून अधिकारी आत गेले तसं तसं एक एक वास्तव समोर आले . तब्बल तेरा अवाढव्य खोल्या . यामध्ये हवा व प्रकाश येण्यासाठी केलेली सुसज्ज व्यवस्था . खोल्यांतून पाण्याचा निचरा होणारी अप्रतिम यंत्रणा . सर्व काही जसेच्या तसे जागच्या जागी .
ब्रिटिशांनी हे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची उणीव ठेवलेली नाही . शेल स्टोअर , गन शेल, कार्टेज स्टोर , शेल लिफ्ट , पंप , वर्कशॉप यांसारख्या नावाने या खोल्या आहेत. हा अद्भुत ठेवा दीडशे वर्षांनंतर उलगडला असल्याने राजभवनाच्या कुतुहलात अधिकच भर पडली आहे .
अशी आहे ही रचना. . .
- दीडशे मीटर लांबीचा भव्य व सुसज्ज बोगदा
- लोखंडी दरवाजाच्या 13 अवाढव्य खोल्या
- 20 फूट उंचीचा लोखंडी दरवाजा
- पाच हजार चौरस फुटांचे मजबूत दगडी बांधकाम
युवराजाच्या सुरक्षेसाठी बांधकाम
ब्रिटिश युवराज ( प्रिन्स ऑफ वेल्स ) 1875 ला मुंबईला भेट देणार होते . त्यासाठी त्यांची सुरक्षा व त्याबाबतच्या गुप्त बैठका , यासाठी हे बांधकाम केल्याचा दावा करण्यात येत आहे . या वेळी या जागेवर तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याचे कार्यालय होते . 1885 पासून हे निवासस्थान गव्हर्नर हाउस म्हणून कायम करण्यात आले . देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याला "राजभवन ' असे नाव दिले . या पाताळातल्या बंकरचा वापर ब्रिटिश गुप्त बैठका , अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा यासाठी वापर करत असावेत , असे मानले जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाम, बिहारनंतर झारखंडमध्येही ' जीएसटी ' मंजूर

आसाम, बिहारपाठोपाठ आज ( गुरुवार) झारखंडमध्येही वस्तू आणि सेवाकर ( जीएसटी ) घटनादुरुस्ती विधेयकास विधानसभेनेही मंजुरी दिली .
जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज झारखंड विधानसभेचे एक दिवसाचे सत्र आयोजित करण्यात आले होते . यावेळी तातडीच्या प्रश्नाला उत्तर देता यावे म्हणून राज्यातील सर्व सचिवांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या गॅलरीत उभे राहण्याचे निर्देश सरकारने दिले होते . यापूर्वी शुक्रवारी आसामने तर बुधवारी बिहारने जीएसटी विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे . " जीएसटी ' चे खूप फायदे आहेत आणि करारातही खूप सुधारणा करण्यात आल्या आहेत, अशा प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी जीएसटी मंजूर केल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹" सियाचीन पायोनिअर्स' ची " चितळ ' हेलिकॉप्टरची मागणी

सियाचीन ग्लेशियर - जगातील सर्वांत उंचीवरील युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये अत्यंत कठीण वातावरणात देशाचे रक्षण करत तैनात असलेल्या हजारो जवानांचे " सियाचीन पायोनिअर्स ' हे हवाई दलाचे केंद्र आधारस्तंभासारखेच आहे . हवाई दलाच्या येथील पथकाच्या ताफ्यात असलेले " चित्ता ' हे हेलिकॉप्टर बदलून त्याऐवजी अत्याधुनिक शक्तिशाली इंजिन असलेले "चितळ ' हेलिकॉप्टर मिळावे , अशी या पथकाने मागणी केली आहे .
" सियाचीन पायोनिअर्स ' या नावाने प्रसिद्ध असलेले 114 हेलिकॉप्टर युनिट हा या भागात तैनात असलेल्या जवानांचे मुख्य ठाणे आहे . कारण येथूनच सियाचीन भागात विविध ठिकाणी तैनात असलेल्या जवानांना शस्त्र आणि अन्नाचा पुरवठा केला जातो . या पथकाकडे सध्या 14 हेलिकॉप्टर असून , त्यापैकी दहा " चितळ ' प्रकारची असून , चार " चित्ता ' प्रकारातील आहेत. "चित्ता ' हेलिकॉप्टर प्रथम 1970 मध्ये या पथकाला देण्यात आले होते . " चितळ ' हे "चित्ता ' चेच आधुनिक रूप असून , त्याला अत्याधुनिक ध्रुव हेलिकॉप्टरप्रमाणेच फ्रेंच बनावटीचे इंजिन बसविण्यात आले आहे . अधिक उंचीवर आणि कमी तापमानात हे इंजिन चांगले काम करते . " चितळ ' ची क्षमता चांगली असल्याने हवाई दलाचे अधिकारी याबाबत समाधानी आहेत. त्यामुळे पथकाकडे असलेली उर्वरित चार "चित्ता ' हेलिकॉप्टर बदलून " चितळ ' द्यावीत , अशी त्यांनी मागणी केली आहे .
" सियाचीन पायोनिअर्स ' ची वैशिष्ट्ये
- वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा आणि खराब वातावरणाचा या पथकाला दररोज सामना करावा लागतो .
- कारगिल ते लडाखपर्यंत त्यांना उड्डाण करत पुरवठा करावा लागतो
- गेल्या तीन दशकांपासून "ऑपरेशन मेघदूत ' अंतर्गत हे पथक तैनात. कदाचित जगातील असे एकमेव पथक .
- 25 ,142 फुटांवर हेलिकॉप्टर उतरविल्याबद्दल पथकाचे नाव "लिम्का बुक ' मध्ये .
- हिमालयातील मोहिमांदरम्यान अडकलेल्या पर्यटकांना कठीण परिस्थितीतही वाचविण्याचे काम .
- लेह , लडाखमध्ये राहणाऱ्या स्थानिकांनाही सहकार्य .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हे आहेत जगातले सगळ्यात जास्त कलात्मक देश

भारत सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेली बाजारपेठ असली तरी, कलात्मकता आणि नाविण्य यात आपण अजूनही काही देशांच्या मागेच आहोत. चला तर मग जगातले पहिले १० देश कोणते आहेत जे कलात्मक काम करतात ते पाहूया…
चीन
कलात्मकता आणि नाविण्य यामध्ये चीनचा जगात २५ वा क्रमांक लागतो. जर चीनचा २५ वा क्रमांक लागत असेल तर भारताचा कितवा नंबर असेल हे पुढे कळेलच.
जर्मनीः आपल्या मशिन्स आणि तंत्रज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध असलेले जर्मनीचा कलात्मकतेच्या स्पर्धेमध्ये १० वा क्रमांक लागतो.
नेदरलॅण्डः कलात्मकतेमध्ये नेदरलॅण्ड किंवा ज्याला हॉलंडही म्हटले जाते त्याचा नववा क्रमांक लागतो.
डेनमार्कः डेनमार्क ही कलात्मकतेमध्ये भारताच्या खूप पुढे आहे. डेनमार्कचा आठवा क्रमांक लागतो.
आयरलॅण्डः भारताच्या एखाद्या राज्या एवढा हा देश असेल पण कलात्मकतेमध्ये मात्र त्याने बाजी मारली आहे. आरयरलॅण्डचा सातवा क्रमांक लागतो.
सिंगापुरः पर्यटनाचा देश अशी याची खरी ओळख. पण पर्यटनाबरोबरच कलात्मकता आणि तंत्रज्ञानामध्ये सिंगापुरचा सहावा क्रमांक आहे.
फिनलॅण्डः सर्वोत्कृष्ट पाच देशांमध्ये फिनलॅण्डचा पाचवा नंबर येतो.
अमेरिकाः अमेरिकेची अर्थव्यवस्था जरी डगमगत असली तरी ते कलात्मकतेमध्ये मात्र दिवसेंदिवस प्रगतीच करत आहेत. जगात त्यांचा चौथा क्रमांक लागतो.
ब्रिटनः जगभारत स्वतःचं साम्राज्य परसवलेल्या ब्रिटनने या बाबतीतही जगाला मात दिली आहे.
स्विडनः केवळ ९९ लाख लोकसंख्या असलेला हा देश कलात्मकता आणि नाविण्यामध्ये पूर्ण जगाला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आपलं नाव घट्ट रोवून बसला आहे.
स्वित्झर्लंडः जेवढा या देशावर निसर्ग सौंदर्याचा वर्षाव केला आहे. तेवढाच वर्षाव इथल्या लोकांनी कलात्मकता आणि नाविण्य यांच्यामध्ये केला आहे. म्हणूनच सगळ्यांच्या पुढे पहिला क्रमांक पटकवला आहे. यात त्या देशाची मेहनतही आहेच म्हणा..
कलात्मकता आणि नाविण्य यांच्या शर्यतीत भारत मात्र पहिल्या ५० मध्येही नाही. भारताचा ६६ वा क्रमांक लागतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पुरोहित आसामचे तर हेपतुल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी

केंद्र सरकारने बुधवारी पंजाब, मणिपूर, आसाम, अंदमान आणि निकोबर या चार राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसाम, माजी खासदार व्ही. पी. सिंह बडनोर यांची पंजाबच्या तर दिल्लीचे माजी आमदार प्रो. जगदीश मुखी यांची अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले.
७५ पेक्षा जास्त वय असलेल्या मंत्र्यांनी पदावर राहण्यापेक्षा मंत्रिमंडळाला आणि पक्षाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ७६ वर्षीय नजमा हेपतुल्ला यांनी गत महिन्यातच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पूर्वीच्या काँग्रेसच्या सदस्य राहिलेल्या हेपतुल्लाह या १९८० पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. १९८५-८६ तसेच १९८८ ते २००७ पर्यंत त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या. यापूर्वी मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्याकडे मणिपूर राज्याचा अतिरिक्त पदभार होता.
नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांच्याकडे आसामचा पदभार होता. तिथे आता पुरोहित यांची निवड झाली आहे. नागपूरमधील दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संपादक असलेले पुरोहित हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. हरयानाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडे पंजाबचा अतिरक्त पदभार होता. शिवराज पाटील हे मागच्या वर्षी पंजाबच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाले होते. तेव्हापासून कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडे पदभार होता. आता राज्यस्थानचे बडनोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढीलवर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल (निवृत्त) ए. के. सिंग यांची जागा दिल्लीचे प्रो. जगदीश मुखी हे घेतील.

#Rio_Olympic_Updates

आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथमच अमेरिका पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत पदक जिंकू शकले नाही. गेल्या १२० वर्षात झालेल्या २७ आॅलिम्पिक स्पर्धेत (३ आॅलिम्पिक स्पर्धा झाल्या नाहीत) प्रथमच अमेरिकेचे खेळाडू पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत कोणतेही पदक जिंकू शकले नाही.

महिला कुस्तीमधील ५८ किलो वजनी गटातील साक्षी मलिकचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पराभव,रूसच्या वेलेरिया ने 9-2 केला पराभव.

महिला कुस्ती - चीनच्या सॅन येनानाचा विजय, जखमी विनेश फोगटचा आव्हान संपुष्टात.

महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत भारताची टिंटू लुका सहाव्या स्थानावर, उपांत्य सामान्यातील आव्हान संपुष्टात.

उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्यामुळे बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतच्या पदकाच्या आशा संपुष्टात.

#eMPSCkatta_Current_Affairs

#Rio_Olympic_Updates

🔹भारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ

रिओ: ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.

साक्षीनं 58 किलो वजनीगटात किर्गिस्तानच्या आयसूलू तायनाबेकोव्हर मात करत ब्राँझ मेडलची कमाई केली. कुस्तीमध्ये ब्राँझ मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

रिपेचाजमुळे तिला ब्राँझ मेडलच्या मुकाबला खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत साक्षीनं मेडल जिंकलं. याआधी 2008 मध्ये सुशील कुमारनं रिपेचाजची लढत जिंकत भारताला ब्राँझ पटकावून दिलं होतं.

#eMPSCkatta_Telegram_Current_Affairs

🔹'रणथंबोरची राणी' मछली वाघिणीचा मृत्यू

'रणथंबोरची राणी' अशी ओळख असलेली वाघीण 'मछली'चा आज सकाळी मृत्यू झाला. 'मछली' अनेक दिवसांपासून आजारी होती. गेल्या पाच दिवसांपासून तिने काहीही खाल्लं नव्हतं. निपचित पडून असलेल्या 'मछली'वरील सर्व उपचार व्यर्थ ठरले आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील तिचा दरारा कायमचा संपला.

उद्यानातील अमा घाटी भागात मछलीला ठेवण्यात आलं होतं. तिथे आज सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी तिने प्राण सोडले, असे उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मछली १९ वर्षांची होती. सामान्यपणे वाघ १३ ते १५ वर्षांपर्यंत जगतात मात्र १९ वर्षे जगलेल्या मछलीच्या बाबतीत अपवाद ठरला.

#eMPSCkatta_Telegram_Current_Affairs

🔹भारतरत्न आणि खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील डोंजा या गावाला दत्तक घेतले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांदा तालुक्यात वसलेल्या या गावाची लोकसंख्या साधारण पाच हजार इतकी आहे. सध्या गावामध्ये पाणीपुरवठा होत असलेली जलवाहिनी पुरातन असल्यामुळे ग्रामस्थांसमोर पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे. सचिनने गावाला दत्तक घेतल्याचे कळताच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावाचा लवकरच कायापालट होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत यापूर्वी सचिनने आंध्र प्रदेशातीलप नेल्लोर जिल्ह्यातील गावाचा कायापालट केला होता. सचिनने आंध्र प्रदेशमधील गाव दत्तक घेतल्यानंतर अनेकांनी सचिन महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले होते. मैदानात नेहमी आपल्या फलंदाजीने उत्तर देण्याच्या शैलीतच यावेळीही सचिनने आपल्या कार्यातून टीकाकारांना उत्तर दिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावातील ग्रामस्थांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांचा दोन महिन्यापूर्वी आढावा घेण्यात आला होता. अहवाल सादर झाल्यानंतर सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासापासून कोसोदूर असलेले डोंजा गाव दत्तक घेत असल्याबाबत पंचायत राज समितीच्या सचिवांना कळविण्यात आले.

#eMPSCkatta_Telegram_Current_Affairs

🔹भारत - बांगलादेशतर्फे 1971 च्या युद्धावर माहितीपट

नवी दिल्ली - पूर्व पाकिस्तानचे विभाजन होऊन 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला. या वेळी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धावर आधारित माहितीपटाची निर्मिती भारत व बांगलादेश संयुक्तपणे करणार असल्याचे माहिती व नभोवाणी मंत्रालयातर्फे बुधवारी सांगण्यात आले .

बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजबीर रहेमान यांची 100 वी जयंती 2020 मध्ये आहे . त्यानिमित्त बांगलादेशतर्फे भव्य चित्रपट काढण्यात येणार असून , भारत त्याला मदत करणार आहे . माहिती व नभोवाणीमंत्री वेंकय्या नायडू व बांगलादेशचे माहितीमंत्री हसनूल हक इनू यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले . अखिल भारतीय नभोवाणीतर्फे बांगलादेशसाठी " आकाशवाणी मैत्री ' ही रेडिओ वाहिनी येत्या 23 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे नायडू यांनी सांगितले . राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार असून , याद्वारे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा पूल बांधला जाईल , असे अधिकृत प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे . बांगलादेश 2021 मध्ये 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करीत आहे . त्यानिमित्त माहितीपटाची निर्मिती करण्यात येणार आहे .
बैठकीत बोलताना नायडू म्हणाले , ' भारत व बांगलादेशला दहशतवादाचा प्रश्न भेडसावत आहे . योग्य माहितीच्या अभावामुळे दहशतवादाशी लढा देणे अवघड बनत आहे . योग्य माहिती वेळेत मिळाल्यास अफवा व खोट्या माहितीला पायबंद बसेल. नागरिकांमध्ये सहकार्य व सामंजस्याची भावनाही वाढीला लागेल .


" देवदास ' च्या फिल्मची रिळे मिळणार
मंत्र्यांच्या या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान संयुक्त ध्वनिचित्रफीत सहकार्य निर्मिती करार करण्यास भारत व बांगलादेशने मान्यता दिली आहे . भारतात बांगलादेश चित्रपट महोत्सव व बांगलादेशात भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला . 1935 मध्ये प्रथमेश बरुआ यांनी दिग्दर्शित केलेला बंगाली चित्रपट " देवदास' ची जतन केलेल्या फिल्मची रिळे भारताला देण्याची नायडू यांची विनंती इनू यांनी मान्य केली , असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Current_Affairs

🔹' अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणार नाही'

टोकिओ - अणू बॉंबच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीला आम्ही पुन्हा सुरवात केली असल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले. तसेच अमेरिकेपासून आमच्या देशाला धोका कायम असून , त्यामुळे आम्ही आमचा अण्विक कार्यक्रम बंद करणार नाही , असेही उत्तर कोरियाने आज स्पष्ट केले. जपानी वृत्तसंस्था क्योडोने हे वृत्त दिले आहे .

उत्तर कोरियाच्या एका अणूभट्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने लेखी मुलाखतीत ही माहिती दिली आहे . यापूर्वी वापरण्यात आलेल्या आण्विक रॉडचा आम्ही पुन्हा उपयोग करत असून , प्लुटोनियमच्या निर्मितीला आम्ही पुन्हा सुरवात केली आहे . आण्विक ऊर्जा आणि अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्चप्रतीच्या युरेनियमचीही निर्मिती करण्यात येत आहे .

#eMPSCkatta_Telegram_Current_Affairs

#Rio_Olympic_Updates

🔹सिंधूची ऐतिहासिक कामगिरी ; रौप्य पदक निश्चित

वयाच्या 21 व्या वर्षी भारताच्या पी. व्ही . सिंधूने बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरी गाठत ऐतिहासिक कामगिरी केली . उपांत्य फेरीत जपानच्या नोझामी ओकुहारा हिच्यावर सरळ सेटमध्ये मात करत सिंधूने थाटातच अंतिम फेरी गाठली . यामुळे सिंधूचे किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे . यापूर्वी भारताचा एकही बॅडमिंटनपटू ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत दाखल झाला नव्हता . सुवर्ण पदकासाठी सिंधूची लढत उद्या ( शुक्रवार) सायंकाळी 7 .30 वाजता स्पेनच्या कॅरोलिना मार्टिन हिच्याशी होईल .

उपांत्य फेरीमध्ये सिंधूने विजेत्याच्या थाटातच खेळ केला . पहिल्या गेममध्ये ओकुहाराने तिला कडवी लढत दिली . जवळपास प्रत्येक गुणासाठी या दोघींमध्ये दीर्घ रॅली झाल्या . दोघींनीही स्मॅश आणि बॅकहॅंडचा अप्रतिम वापर करत एकमेकांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला . सिंधूने तिच्या उंचीचा अचूक फायदा घेत ओकुहाराला संपूर्ण कोर्टमध्ये खेळविले आणि मोक्याच्या क्षणी वेगवान स्मॅश मारत गुण जिंकले . पहिला गेम सिंधूने 21 -19 असा जिंकला .

दुसरा गेम सुरू होण्यापूर्वीच ओकुहारावरील दडपण स्पष्ट दिसत होते . त्यातच , सिंधूने सलग तीन गुण जिंकत तिच्यावरील दडपण वाढविले . स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय प्रेक्षकांची साथही सिंधूला लाभली . सिंधूच्या वेगवान खेळासमोर ओकुहारा दमल्यासारखी वाटत होती . अखेर हा गेम सिंधूने 21 -10 असा जिंकला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा