Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part - 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हत्तींसाठी 2 किलोमीटरची भिंत पाडण्याचे आदेश

 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील हत्तींच्या मार्गात अडथळा ठरणारी तब्बल दोन किलोमीटर अंतराची एका खाजगी कंपनीची भिंत पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.

नैसर्गिकरित्या आसाममध्ये विस्थापित होणाऱ्या हत्तींच्या मार्गात एक 2. 2 किलोमीटर अंतराची भिंत अडथळा ठरत होती . नुमालिगड रिफायनरी लिमिटेड ( एनएफएल) या कंपनीची ही भिंत 2011 साली बांधण्यात आली होती . या भिंतीमुळे हत्तीचे एक पिल्लू मृत्युमुखी पडले होते. भिंत बांधल्यानंतर चार वर्षांची वन विभागाने वन संरक्षण कायद्याचा भंग करून ही भिंत बांधण्यासाठी जागा दिल्याचे म्हणत हरकत घेतली . होती . यावर हरित लवादाने परवानगी नसताना अविकसन क्षेत्रामध्ये ( नो डेव्हलपमेंट झोन ) भिंत उभारल्याने ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनएफएलला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे .

Join your all friends @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताचा दीपोत्सव अमेरिकेत टपाल तिकिटावर

न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीयांचा दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे . याचे कारण म्हणजे दिव्यांच्या या उत्सवाचे प्रतिबिंब टपाल तिकिटातून उमटणार आहे .


दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते . अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांनी त्यावर मोहोर उमटविल्याने यंदाच्या दिवाळीत हे टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे . तेथील भारतीय समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे . सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे . त्यावर "फॉरएव्हर यूएसए 2016 ' हे शब्द असतील. 5 ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे .

दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेतील टपाल विभागातर्फे ( यूएसपीएस) हे तिकीट नोव्हेंबरमध्ये व्यवहारात आणले जाईल , असे येथील कॉंग्रेसच्या प्रतिनिधी कॅरोलिन मॅलोनी यांनी जाहीर केले. या ऐतिहासिक घोषणेप्रसंगी भारताच्या महावाणिज्यदूत रिवा गांगुली दास , दिवाळी तिकीट प्रकल्पाचे अध्यक्ष रंजू बात्रा व भारतीय वंशाचे वकील रवी बात्रा उपस्थित होते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' बेटी बचाओ, बेटी पढाओ ' ची साक्षी ब्रँड ऍम्बेसिडर

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाना सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे . साक्षीला हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते अडीच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला .

साक्षीचे आज ( बुधवार ) पहाटे भारतात आगमन झाले असून , दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले . साक्षी ही हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा खास गावातील रहिवाशी आहे . साक्षीचे आज पहाटे चारच्या सुमारास विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला . साक्षीच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री खट्टर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते . ढोल -ताशाच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले . साक्षीने 58 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मदर तेरेसांच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट

संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गौरवार्थ जगभरात तयारी सुरू झाली आहे. भारतातही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.

भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. त्यावर २०१० मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.

मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे हे येथील खास आकर्षण असेल. १०० दिनार किंमतीची ५० नाणी भारतात पाठवली जणार आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राज्याला तेलंगणची ‘ वेसण ’

गोदावरी खोरे पाणीवाटप करारात ८१ टीएमसीचे नुकसान

मुंबई - महाराष्ट्र व तेलंगणमध्ये गोदावरी खोरे पाणीवाटप करारावर आज शिक्कामोर्तब झाले . मात्र या करारातून तेलंगणचेच घोडे गंगेत न्हाले असून , कृष्णा खोऱ्यातील तीन राज्यांच्या पाणीवाटप लवादाने दिलेल्या निर्णयात तेलंगणने घातलेली खीळ काढण्यात महाराष्ट्राला अपयश आले आहे .

तेलंगण राज्यनिर्मितीच्या अगोदर महाराष्ट्र -कर्नाटक - आंध्र प्रदेश या राज्यांच्या पाणीवाटप लवादाने कृष्णा खोऱ्यातील ८१ टीएमसी पाणी महाराष्ट्राला अधिकचे दिले होते . मराठवाड्यातल्या दुष्काळी भागांत यातले काही पाणी वळवून दिलासा देणे शक्य होते . पण तेलंगणने या करारात हस्तक्षेप करून या पाण्याचे नव्याने चार राज्यांत फेरवाटप व्हावे , अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली . मुळात तीन राज्यांतील पाणीवाटप निवाडा अंतिम झाल्यानंतर तेलंगणने आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेल्या पाण्यावर हक्क सांगायला हवा होता . पण त्यांनी चार राज्यांत फेरवाटप होण्यासाठी हस्तक्षेप केल्याने कृष्णा खोऱ्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे .

तेलंगणबरोबर आज मेडीगट्टा प्रकल्पाचा करार अंतिम करताना कृष्णा खोऱ्यातील ८१ टीएमसी पाण्याबाबतचा आक्षेप मागे घेण्याबाबत विषयपत्रिकेत स्पष्ट भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य होते ; पण मागील तीन वर्षांत सतत ही भूमिका विविध स्तरांवरून सरकारसमोर मांडण्यात आल्यानंतरही आजही संधी हुकल्याचे चित्र आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सूर्यमालेबाहेरील ग्रहावर ऑक्सिजनचे अस्तित्व

अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे संशोधन; मात्र पाण्याचा पुरावा नाही

नवी दिल्ली - सूर्यमालेबाहेरील आकाशगंगेत शुक्राशी साम्य असणाऱ्या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे . याचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावर प्राणवायूचा ( ऑक्सिजन ) पातळ थर असल्याचे आढळले आहे . पृथ्वीपासून हा ग्रह 39 प्रकाशवर्षे दूर आहे . प्राणवायूचे वातावरण असलेला हा आपल्या सूर्यमालेबाहेरील पहिलाच ग्रह आहे , असा दावा संशोधकांनी केला आहे .

वैचित्र्यपूर्ण वातावरण
या ग्रहाचा शोध गेल्या वर्षी लागला. तेथील वैचित्र्यपूर्ण वातावरणामुळे संशोधकही आश्चर्यचकित झाले आहेत. तेथील तापमान 232 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे . नवीन संशोधनानुसार येथील वातावरण अस्पष्ट व विरळ असल्याचे निदर्शनास आले आहे . याचे नामकरण " जीजे 1132 बी' असे करण्यात आले आहे . अमेरिकेतील हॉवर्ड - स्मिथसोनियन सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक ( सीएफए ) या संस्थेतील खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर व त्यांचे सहकारी याविषयी संशोधन करीत आहे . "जीजे 1132 बी' वर वाफेसारखे व जलयुक्त वातावरण असले तर काय घडू शकते , याचा अभ्यास शेफर करीत आहेत.

ऑक्सिजन आहे , पाणी नाही !
" जीजे 1132 बी' हा ग्रह त्यांच्या सूर्यमालेतील ताऱ्याच्या अत्यंत जवळ आहे . हे अंतर 14 लाख मैल इतके आहे . या ग्रहावर अतिनील अथवा "यूव्ही ' किरण मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे . हे किरण पाण्यातील रेणूंचे हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विभाजन करतात . हायड्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा हलका असल्याने तो अंतराळात नाहीसा होतो . त्यामुळे "जीजे 1132 बी' वर प्राणवायूचे विरळ वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे . मात्र जीवसृष्टीसाठी अनिवार्य असलेल्या पाण्याचे अस्तित्व येथे आढळलेले नाही . दोन्ही वायू अवकाशात नाहीसे होतात . ""थंड ग्रहावर असलेला ऑक्सिजन हा निवासास योग्य समजला जातो ; पण "जीजे 1132 बी' सारख्या गरम वातावरणाच्या ग्रहावर अगदी याच्या विरुद्ध स्थिती आहे , असे मत शेफर यांनी नोंदविले आहे . या ग्रहावर हरित वायूचा मोठा प्रभाव आहे . यावर आधीच गरम वातावरण असल्याने येथील पृष्ठभाग लाखो वर्षांपासून वितळत आहे , असेही त्या म्हणाल्या .

अधिक अभ्यास शक्य
या ग्रहावर आम्हाला प्रथमच ऑक्सिजनचे अस्तित्व आढळले , असे "हॉवर्ड पॉलसम स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस ' चे रॉबिन वर्डस्वर्थ यांनी सांगितले . " जीजे 1132बी' वर ऑक्सिजन असला तर अत्याधुनिक व शक्तिशाली "जायंट मॅग्लन' व जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीतून याचा शोध घेऊन त्याचे विश्लेषण करता येईल , असे मत संशोधकांनी नोंदविले आहे .

" मॅग्मा ओशन ' ची उपयुक्तता
खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर यांनी एक "मॅग्मा ओशन' नावाची प्रतिकृती तयार केली आहे . यातून आकाशगंगेत शुक्रासारख्या असणाऱ्या ग्रहांचा शोध घेणे शक्य होणार आहे . ग्रहांवर ऑक्सिजन का नसतो हा शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावणारा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे . " मॅग्मा ओशन' द्वारे सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेता येणार आहे . " ट्रॅपिस्ट - 1 ' या सूर्यमालेत तीन ग्रह असून , त्यावर अधिवास करण्यायोग्य वातावरण असल्याचे आढळले आहे . हे ग्रह "जीजे 1132 बी' पेक्षा थंड असल्याने त्यावर निवासासाठी योग्य वातावरण असण्याची दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सरोगसी विधेयकाला केंद्राची मंजुरी

सरोगसी विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विधेयकासंदर्भात चर्चा करण्यात येत होती. भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्कांच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे. तसेच या नव्या विधेयकामुळे सरोगसीच्या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्यात येणार आहे. या नव्या विधेयकात अविवाहित जोडप्यांसाठी सरोगसीद्वारे अपत्य न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी याआधी अपत्य दत्तक घेतले आहेत त्यांना सरोगसीद्वारे अपत्य दत्तक घेता येणार नाही अशीही तरतूद करण्यात आली आहे. सरोगसीच्या व्यापारीकरणावर रोख लावण्यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. सरोगसीद्वारे अपत्य प्राप्त करण्यासाठी अनेक परदेशी दाम्पत्य हे भारतीय मातांना प्राधान्य देतात. दरवर्षी २००० हजार विदेशी अपत्यांना भारतीय माता सरोगसीद्वारे जन्म देतात. यासाठी अनेकींना चांगले पैसे देखील मिळतात असेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. परदेशी दाम्पत्याकडून भारतीय मातृत्त्व विकत घेण्यावर या विधेयकात रोख लावाण्यात आली आहे.
 या निर्णयामुळे आता फक्त मूल होऊ न शकणारे विवाहीत भारतीय दाम्पत्यच सरोगसीद्वारे मुलांना जन्म देऊ शकतात. सरोगसीद्वारे जन्म देणा-या मातांची आर्थिक स्थिती बेताची असते असेही अनेक प्रकरणात आढळून आले आहे त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी देखील यात काही तरतूदी मांडण्यात आल्या आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी जिम योंग किम?

वॉशिंग्टन : जागतिक बॅंकेचे ( वर्ल्ड बॅंक ) अध्यक्ष जिम योंग किम यांचे नाव पुन्हा अध्यक्षपदासाठी अमेरिकेने जाहीर केले आहे . दारिद्य्र आणि हवामान बदलच्या आव्हानांना नावीन्यपूर्ण सामोरे जाण्याची क्षमता किम यांच्यात आहे , असे अमेरिकेने म्हटले आहे .

अमेरिकेचे कोषागार विभागाचे मंत्री जॅकब जे लू यांनी किम यांच्या नावाची घोषणा आज केली . लू म्हणाले , " किम त्यांच्या कारकीर्दीत जागतिक विकासासमोरील आव्हानांना नावीन्यपूर्ण पद्धतीने सामोरे गेले आहेत. दारिद्य्र , असमानता आणि हवामान बदलाबाबतही त्यांनी पावले उचलली आहेत. " इबोला' आणि निर्वासित यासारखे मोठे प्रश्न त्यांनी हाताळले आहेत. तसेच , जागतिक बॅंकेत सुधारणा करण्याचे काम ते करीत असून , वित्तीय स्त्रोतांचा वापर ते वाढवीत आहेत. '' जागतिक बॅंकेत अमेरिका सर्वांत मोठा भागीदार देश आहे . त्यामुळे अमेरिकेकडून किम यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांची पुन्हा निवड निश्चित मानली जात आहे .

जुलै 2012 मध्ये किम यांनी जागतिक बॅंकेचे बारावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला . ते डॉक्टर असून , मानववंशशास्त्रज्ञ आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. जगभरातील वंचित वर्गाचे जीवनमान सुधारावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹धान्य न घेतल्यास शिधापत्रिका होणार रद्द

कुटुंबातील एकाने तीन महिन्यांत केंद्रावर हजेरी लावणे गरजेचे

मुंबई - आगामी काळात तीन महिने सातत्याने शिधावाटप दुकानांवरील धान्य न घेतल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे . अन्न , नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यातील 52 हजार शिधावाटप दुकानांत पॉज मशिन बसविण्यात येतील . यानंतर कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने तीन महिन्यांत शिधावाटप केंद्रावर हजेरी लावणे गरजेचे आहे . शिधापत्रिकाधारक हजर न झाल्यास अशा शिधापत्रिका अपात्र ठरवण्यात येतील .

अन्न , नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका " आधार ' क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . या प्रक्रियेनुसार एकाच नावाने अनेक ठिकाणी शिधापत्रिका घेण्यास पायबंद बसेल .
 बनावट नावे वगळली जातील , अशी माहिती अन्न , नागरी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याने दिली . पॉज मशिनद्वारे खरा लाभार्थी शोधण्याचे काम आणखी सोपे होईल , असे तो म्हणाला . सध्या पॉज मशिन बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून , या योजनेत चार कंपन्या सहभागी झाल्या आहेत. आणखी महिनाभरात तांत्रिक आणि वाणिज्यिक अशा दोन्ही गोष्टींसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होईल .

क्विंटलमागे मिळणार कमिशन

पॉज मशिन बसवण्याचे आणि देखभालीचे काम करणाऱ्या कंपनीला प्रत्येक क्विंटलमागे कमिशन मिळेल. सध्या राज्यात 34 लाख क्विंटल धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटण्यात येते .
 राज्य सरकार पॉज मशिनसाठी कोणतीही गुंतवणूक करणार नाही . कंत्राटाच्या कालावधीनंतर या मशिनची मालकी राज्य सरकारकडे राहील . सध्या राज्यात एक कोटी 48 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. राज्यातील 52 हजार दुकानांमध्ये 24 आठवड्यांत पॉज मशिन बसवण्याचे उद्दिष्ट कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दक्षिण कोरिया - इराणचा युरोतून व्यापार होणार

सोल : दक्षिण कोरियाने इराणशी युरो चलनाच्या माध्यमातून 29 ऑगस्टपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . दक्षिण कोरियाचे अर्थमंत्री यू इल - हो यांनी गुरुवारी ही माहिती दिली .
अर्थमंत्री इल - हो म्हणाले , ""पुढील सोमवारपासून इराणशी व्यापार सुरू होईल . हा व्यापार युरो चलनाच्या माध्यमातून होईल . इराणशी व्यापार आणि गुंतवणूक करण्यातील अडथळे दूर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . केईबी हाना बॅंक , शिनीहान बॅंक आणि वूरी बॅंक या तीन बॅंकांमार्फत हा व्यवहार होणार आहे . '' याआधी दक्षिण कोरिया इराणमधून केलेली तेल खरेदी आणि इराणमधील बांधकाम प्रकल्प यांची देणी देण्यासाठी वॉन चलनाचा उपयोग करीत होता . पश्चिमी देशांनी इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवल्याने पुन्हा अनेक देशांचा व्यापार पूर्ववत सुरू होत आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹युद्धग्रस्त कोलंबियात नांदणार शांतता

हवाना - कोलंबिया सरकार व " रेव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया ' ( एफएआरसी) या बंडखोरांच्या संघटनेत बुधवारी ( ता. 24 ) शांतता करार करण्यात आला . यामुळे गेल्या 50 वर्षांपासून देशात सुरू असलेले गनिमी युद्ध अखेर संपुष्टात येणार आहे .

जगात सर्वाधिक काळ चाललेले युद्ध अशी या युद्धाची ओळख असून , यात आतापर्यंत दोन लाख 20 हजार नागरिक मारले गेले आहे . दीर्घ संघर्ष संपवून शांतता व स्थिरता निर्माण करण्यासाठी शांतता करार करण्याचे पाऊल उचलले आहे , असे सरकार व "एफएआरसी' ने एका संयुक्त निवेदनाद्वारे काल जाहीर केले. या करारात समन्वयाची भूमिका बजावणारे क्यूबा व नॉर्वेच्या प्रतिनिधींनी हे निवेदन वाचले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मंगळ मोहिमेसाठी चीनची जय्यत तयारी

यानाची छायाचित्रे प्रसिद्ध करून सामथ्र्य प्रदर्शन

चीनने आपल्या बहुप्रतीक्षित, महत्त्वाकांक्षी मंगळ यानाची जोरदार तयारी केली आहे. २०२० मध्ये सोडण्यात येणाऱ्या मंगळ यानाची छायाचित्रे चीनने प्रसिद्ध केली असून भारत, अमेरिका, रशिया यांच्याशी स्पर्धा करीत अवकाश सामथ्र्य वाढविण्यावर चीनचा भर असणार आहे.

जुलै किंवा ऑगस्ट २०२० मध्ये मंगळाच्या कक्षेत हे यान पाठविण्याची चीनची तयारी आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा तीन महिने अभ्यास करता येईल, अशी मंगळ यानाची रचना करण्यात आली आहे, असे चीनच्या मंगळ मोहिमेचे प्रमुख झांग रोंगकिओ यांनी सांगितले. चीनने पत्रकार परिषदेत मंगळ यानाची छायाचित्रे दाखवली. यानाच्या यंत्रात चार सौर पॅनलचा समावेश आहे.

चीनच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमेत मोठे यश मिळवले असले तरी मंगळ मोहिमेचा समावेश नसल्याने चीनला उणेपणाची जाणीव होत होती. याआधी चीनने चांद्रमोहीमही फत्ते केली होती. भारताने ७३ दशलक्ष डॉलर्स इतक्या कमी खर्चात मंगळ मोहीम फत्ते केल्यानंतर चीनच्या महत्त्वाकांक्षेला पुन्हा धुमारे फुटू लागले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹नसिरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्राचे मराठीत रूपांतर

खलनायक, नायक व चरित्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लिहिलेले आत्मचरित्र 'ऍण्ड देन वन डे' मराठीत अनुवादित करण्यात आले आहे.
  'आणि मग एक दिवस' असे या पुस्तकाचे नाव असून सई परांजपे यांनी हा अनुवाद केला आहे.
  नुकतीच मुंबईत याविषयी एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळी अभिनेते नसिरुद्दीन शाह, सई परांजपे व पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.
  तसेच या मराठी अनुवादाचे प्रकाशन 2 सप्टेंबरला प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी अभिनेते सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ई-मेल आयडी आता मराठीत सुरू

स्टार्ट-अप कंपनी दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीने देवनागरी लिपित ई-मेल देण्याची सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा मोफत नाही. तथापि, ती लवकरच मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
  तसेच ही सेवा मोफत सुरू झाल्यास भारतात जी-मेल, आऊटलूक आणि याहू या कंपन्यांच्या ई-मेल आयडी सेवांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
  हिंदी, मराठी, नेपाळी आदी अनेक प्रमुख भारतीय भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. या भाषा वापरणारे लोक देवनागरी ई-मेल आयडीला पसंती देऊ शकतील.
  दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अजय दाता यांनी सांगितले की, शे-दोनशे आयडी आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत.
  ‘डॉट भारत’ या डोमेनवर ते आहेत. आमच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही देवनागरीतील ई-मेल आयडी विकत घेऊ शकतो. या वेब पत्त्यावरून पाठवलेले मेल जी-मेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या सेवा यंत्रणांमध्ये स्वीकारले जात आहेत.
  नेटवर हिंदी देवनागरीची सोय यापूर्वीच झाली आहे. आता देवनागरी लिपीत ई-मेल अ‍ॅड्रेस तयार करण्याची सोय आम्ही दिली आहे.
  इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने घेतलेल्या एका बैठकीत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी देवनागरी ई-मेल आयडी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हाजी अली दर्ग्यात आता महिलांना प्रवेश

मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरील बंदी आज ( शुक्रवार ) मुंबई उच्च न्यायालयाने हटविली आहे . या निर्णयामुळे यापुढे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

हाजी अली दर्ग्यात प्रवेशासंदर्भातील याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने जेथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे . तेथे महिलांनाही जाण्याचा अधिकार असल्याचे म्हणत दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावरची बंदी उठवली आहे . त्यामुळे यापुढे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . या निर्णयामुळे हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत महिलांना प्रवेश करता येणार आहे . दर्ग्यात जाण्यासाठी महिलांना असलेली बंदी ही राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 व 21 च्या विरोधात आहे . येथे जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची काळजी सरकारने व ट्रस्टने घ्यावी , असे न्यायालयाने म्हटले आहे . याशिवाय ट्रस्टला या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठीच्या आदेशास सहा आठवड्यांची स्थगितीही देण्यात आली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹बिहारचे माजी राज्यपाल ए . आर . किडवई यांचे निधन

नवी दिल्ली - बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल ए . आर. किडवई ( वय 96 ) यांचे काल येथील एका रुग्णालयात निधन झाले . किडवई यांच्या पश्चात दोन मुले , चार मुली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किडवई यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला आहे . ट्विटरवर म्हटले की , डॉ . ए . आर. किडवई यांच्या अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनात अनेक जबाबदाऱ्यांचा समावेश आहे . शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या किडवई यांच्या आत्म्यास शांती लाभो , असे मोदी यांनी म्हटले आहे . कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की , बिहार , पश्चिम बंगाल , हरियानाचे माजी राज्यपाल डॉ . किडवई यांचा निधनाने आपल्याला अतिव दु : ख झाले आहे . 1920 मध्ये जन्मलेले अकलाख उर्रहमान किडवई यांनी सतरा वर्षे बिहारचे दोनदा आणि पश्चिम बंगाल , हरियानाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे . 2000 ते 2004 या कालावधीत राज्यसभेचे खासदार असलेले किडवई यांनी 1974- 78 या काळात यूपीएससीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे . 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹शिवलिक प्रकल्पाला अधिक गती

ऋषिकेश - उत्तराखंडमधील भारत - चीन सीमेवरील " शिवलिक' या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या बांधकामाची गती वाढविण्यात आली आहे . या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सीमा रस्ते महामंडळाने कंबर कसली आहे .
याबाबत महामंडळाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुरेश शर्मा म्हणाले , ' उत्तराखंडमधील या प्रकल्पाचे व्यूहात्मक स्थान लक्षात घेता ते अधिक गतीने पूर्ण करण्यात येणार आहे . त्यासाठी सध्यापेक्षा अधिक निधी व यंत्रणा पुरविण्यात येणार आहे . ''

शिवलिक प्रकल्पाचे मुख्य अभियंता ब्रिगेडियर गुरुगोपाल सिंग यांच्यासह शर्मा यांनी चीनच्या सीमेवरील जोशीमठ भागातील रिमखिम व मौसापाणी भागाची पाहणी केली . शर्मा यांनी जानेवारीमध्ये कार्यभार स्वीकारला . तेव्हापासून त्यांनी सीमारेषेला दिलेली ही चौथी भेट आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पृथ्वीसारखा ग्रह ' प्रॉक्झिमा- बी' चा शोध

युरोपियन संशोधकांचे 16 वर्षांचे अथक संशोधन

लंडन - पृथ्वीपासून जवळपास चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या पृथ्वीसारख्याच दुसऱ्या ग्रहाचा शोध संशोधकांनी लावला. हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून , प्रॉक्झिमा - बी असे त्याला नाव देण्यात आले आहे . या ग्रहाची आकारासहित बहुतेक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत. या ग्रहावरील वातावरणाचे अस्तित्व व सजीवांचा अधिवास याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे .

प्रॉक्झिमा - बी हा ग्रह प्रॉक्झिमा सेन्शॉरी या लाल लघुताऱ्याच्या शेजारीच असल्याचे संशोधन " नेचर' या विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे . ब्रिटिश संशोधकांच्या पुढाकाराने युरोपियन शास्त्रज्ञांनी हे संशोधनपर लिखाण केले आहे . या लिखाणासाठी संशोधकांनी 16 वर्षांपासून माहिती संकलन केले. या माहिती संकलनाच्या आधारे व चिलीमधील युरोपियन साऊदर्न ऑब्जर्व्हेटरी टेलेस्कोपच्या साह्याने संशोधकांनी या ग्रहाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले .

लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील प्रमुख संशोधक लेखक ग्युलेम अँग्लाडा एस्क्युड यांनी या संशोधनाला त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितले .

प्रॉक्झिमा बीची वैशिष्ट्ये

प्रॉक्झिमा - बीचे वस्तुमान पृथ्वीच्या वजनापेक्षा 1 . 3 पटीने जास्त
स्वतःभोवती एक फेरी मारण्यास 11 दिवस लागतात
या ग्रहावर अतिउष्णता किंवा अतिथंडी नाही
वातावरण किंवा पाण्याचे अस्तित्व आढळण्याची शक्यता
प्रॉक्झिमा - बी ग्रह पृथ्वीशी साधर्म्य राखणारा आहे . हा ग्रह सूर्य आणि पृथ्वी या दोन्हींच्या जवळ आहे . पण या ग्रहावर वातावरण किंवा पाणी आहे की नाही हे सांगता येणार नाही . मात्र, अस्तित्व असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹स्कॉटलंड यार्डमध्ये गणवेश म्हणून हिजाब

लंडन - मुस्लिम युवतींना पोलिस खात्यात भरतीसाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी गणवेश म्हणून हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली आहे . त्यामुळे पोलिस दलात असणाऱ्या मुस्लिम महिलांना हिजाब परिधान करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे .
स्कॉटलंड यार्ड पोलिस दलात सध्या आशियायी आणि कृष्णवर्णीय नागरिकांची संख्या कमी आहे . ही संख्या वाढविण्याचा येथील प्रशासनाचा इरादा आहे .

यापूर्वीही पोलिस दलात असलेल्या मुस्लिम महिलांना हिजाबची परवानगी होती , मात्र त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता होती . आता मात्र हा गणवेशाचाच भाग केल्याने पोलिस दलातील मुस्लिम महिला त्यांच्या मर्जीनुसार हिजाबचा वापर करू शकणार आहेत. " आम्ही ज्या समाजासाठी काम करत आहोत , त्यांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून हा प्रयत्न असल्याचे पोलिस दलातर्फे सांगण्यात आले आहे . या सुधारणेमुळे विविध समाजांतील नागरिकांच्या क्षमता आणि त्यांचे वैयक्तिक गुण यांचा पोलिस दलाला फायदा होईल , असेही या वेळी सांगण्यात आले.

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी दहा वर्षांपूर्वी महिला पोलिसांना हिजाब घालण्याची परवानगी देण्यास सुरवात केली होती . सध्या या दलामध्ये सहा मुस्लिम महिला अधिकारी काम करत असून , त्यापैकी कोणीही कामावर असताना अथवा नसतानाही हिजाब घालत नाहीत .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आर. एस. सोधी यांची भारतीय टपाल देयक बँक (IPPB)च्या मंडळावर नियुक्ती

आर. एस. सोधी यांना भारतीय टपाल देयक बँक (India Post Payment Banks-IPPB) च्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे. सोधी हे 'अमूल' चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. IPPB हे डाक विभागाची देयके बँक शाखा आहे.ते IPPB च्या मंडळावर नेमणूक केलेल्या 5 स्वतंत्र सदस्यांपैकी एक आहे, जे की मार्च 2017 पासून कार्यरत असेल.IPPB ही प्रगत बँकिंग व देयक तंत्रज्ञान या मधून जगभरात सर्वात सेवा देणारी बँक होण्याचे लक्ष्य ठेवून आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मनेका गांधी यांच्या हस्ते डेहराडूनमध्ये पशू जन्म नियंत्रण केंद्र चे उद्घाटन

केंद्रीय महिला व बाल विकास (WCD) मंत्री, मनेका गांधी यांनी अधिकृतपणे केदारपूरम येथे उत्तराखंड चे पहिले पशू जन्म नियंत्रण केंद्र (Animal Birth Control Centre-ABC) चे उद्घाटन केले.हे केंद्र शहर आणि राज्य मधील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर अंकुश आणण्यासाठी त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना अमलात आणतील. डेहराडून व्यतिरिक्त, हे केंद्र मसुरी आणि नैनिताल आणि रूरकी, हरिद्वार, हल्दवानी, काशीपूर आणि हल्दवानी या इतर 5 महानगरपालिकेमध्ये स्थापन केले जाईल.त्यासाठी, शहर विकास विभागाने केंद्रे स्थापन करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे.

काही महत्त्वाचे:
---------------------------------------
* आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या खेळाडूंच्या आयोगासाठी झालेल्या निवडणुकीत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अपयशी ठरली. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या आयोगावर येलेना इसिनाबायेवाला (रशिया), तलवारपटू ब्रिटा हिडेमन (जर्मनी), टेबल टेनिसपटू रियू सेयुंगमिन (दक्षिण कोरिया) आणि जलतरणपटू डॅनियल ग्युएर्टा (हंगेरी) यांची निवड झाली
* अनिल अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र यांची रिलायन्स कॅपिटल या कंपनीच्या संचालक पदी वर्णी लागल्याने, रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहात (एडीएजी) या उद्योगघराण्याच्या दुसऱ्या पिढीची रुजुवात झाली
* देशातील पहिल्या महिला बँकेसह पाच सहयोगी बँकांना विलीन करून घेण्याच्या निर्णयावर भारतीय स्टेट बँकेने शिक्कामोर्तब केले. पाच पैकी अद्याप केवळ तीन सहयोगी बँका मुख्य बँकेत सहभागी झाल्या असल्या तरी बँक क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलीनीकरण मानले जात आहे. या रुपात स्टेट बँक ही जगातील अव्वल अशा ५० बँकांमध्ये गणली गेली आहे. यामुळे एकाच बँकेची मालमत्ता सर्वाधिक ३४ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. ती आयसीआयसीआय बँक या देशातील दुसऱ्या बँकेच्या मालमत्तेपेक्षा पाच पट अधिक आहे.
* वित्त सेवेसह विविध व्यवसाय असलेल्या आदित्य बिर्ला नुवोचे समूहातील ग्रासीममध्ये विलिनीकरण होणार असून ४१ अब्ज समूहाच्या बिर्ला समूहाची परिपूर्ण वित्त सेवा कंपनी नंतर भांडवली बाजारतही सूचिबद्ध होईल. दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर ६०,००० कोटी रुपयांची एक मोठी कंपनी आकारास आली आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांची एकत्रित उलाढालही मोठी ठरणार आहे. ग्रासीमदेखील सिमेंट क्षेत्रातील क्रमांक एकची कंपनी ठरणार आहे
* भारतीय विमान कंपन्या सध्या पाकिस्तानवरून विमाने नेण्यास राजी नाहीत. अरब देशांत जाताना पाकिस्तानवरून न जाता थेट अरबी समुद्रावरून जाण्यास परवानगी देण्याची विनंती अनेक विमान कंपन्यानी सरकारकडे केली
* जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न म्हणून येथील एक लाख चाळीस हजार युवकांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली "हिमायत‘ या योजनेनुसार एक लाखाहून अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्यांची संधी दिली जाणार आहे. याशिवाय, 2013 मध्ये सुरू केलेल्या "उडान‘ या योजनेअंतर्गत राज्यातील चाळीस हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व युवक पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. आतापर्यंत एकवीस हजार युवकांना "उडान‘अंतर्गत प्रशिक्षण देऊन कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना नोकरीही देण्यात आली आहे.
* राज्यातील विविध भागांतील विमानतळांचा तत्काळ विकास व्हावा, या हेतूने भारतीय विमानतळ विकास प्राधिकरण व केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाशी राज्य सरकारने करार
* केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रादेशिक जोड योजनेसाठी (रिजनल कनेक्‍टिव्हिटी स्कीम) राज्य सरकारचा केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
* बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती (जीएसटी) विधेयकास हिमाचल प्रदेशच्या विधानसभेनेही ) मंजुरी दिली. या घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणारे हिमाचल प्रदेश हे चौथे राज्य ठरले आहे. यापूर्वी बिहार, झारखंड आणि आसाम या राज्यांनीही घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली आहे
* भारत बांगलादेश सीमेवरील वाढत्या दहशतवादाविरोधात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमांवर कुंपण घालण्याचा प्रस्ताव पश्‍चिम बंगाल राज्य सरकारकडे सोपविला
* उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन (इस्रो) पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी चार उपग्रह अवकाशात झेपावणार आहेत. "इस्रो‘च्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी म्हटले "ऑगस्ट 2015 पासून ऑगस्ट 2016 पर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत. आता सप्टेंबरमध्ये इन्सॅट 3 डी आर आणि स्कॅटसॅट-1 हे उपग्रह, तर ऑक्‍टोबरमध्ये जीसॅट-18 आणि नोव्हेंबरमध्ये रिसोर्ससॅट-2 ए हे उपग्रह सोडले जातील. पुढील तीन वर्षांत 70 उपग्रह अवकाशात सोडण्याचे "इस्रो‘चे नियोजन आहे.

काही महत्त्वाचे :
―――――――――――
* दुष्काळात होरपळणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं डोणजे हे दुर्गम गाव सचिनने दत्तक घेतलं आहे. संसद आदर्श ग्राम योजनेत सचिनने महाराष्ट्रातले पहिले गाव म्हणून डोणजेची निवड केली.
* अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील ‘कस्र-ए-स्तोर’ या नूतनीकृत राजवाडय़ाचे मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी संयुक्तरीत्या उद्घाटन केले.
* उलची फ्रीडम ड्रिल २०१६ :- दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी कवायती
* क्रिकेटच्या इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना 1971 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला होता. सुरुवातीच्या काळात एकदिवसीय क्रिकेट सामने 60-60 ओव्हर चे खेळवले जायचे. काही कालावधीनंतर षटकांची संख्या 50 ओव्हर करण्यात आली. कालानुरूप या क्रीडाप्रकारात अनेक बदल कारण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (18,426) आणि सर्वाधिक शतकांचा (49) विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे
* केरळ आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून धुरा सांभाळल्यानंतर न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी 22 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला.
* ’द इकॉनॉमिस्ट‘ या संस्थेने 140 देशांमधील राहणीमानाचा अभ्यास करून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहराने सलग सहाव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला. विविध शहरांचा अभ्यास करताना आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, संस्कृती, पर्यावरण आणि स्थैर्य या मुद्द्यांचा अभ्यास केला
* भारतातील इंटरनेटच्या वापराने अमेरिकेला मागे टाकले असून दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. सध्या भारतात 35 कोटी लोक इंटरनेट वापरतात. चीननंतर भारतातील इंटरनेटचा पाया हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा आहे.
* भारत ही इंटरनेटची जगातील सर्वात जलदीने वाढणारी बाजारपेठ असेल.
* आरोग्य न्यायालयांची स्थापना प्रथम न्यूझीलँड व नंतर युरोपात झाली. भारतातही कर्नाटक राज्यात पहिले आरोग्य न्यायालय जुलै 2016 मध्ये स्थापन करण्यात आले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹रोनाल्डो ठरला दुसऱ्यांदा युरोपचा सर्वश्रेष्ठ खेळाडू

पोर्तुगालचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपचा या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
  रोनाल्डोच्या शानदार खेळामुळे रियल माद्रिदने 2015-16 मध्ये चॅम्पियन्स लीग किताब पटकावला. तर त्याच्याच नेतृत्वात पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कप जिंकला आहे.
  चॅम्पियन्स लीगच्या येणाऱ्या सत्रातील ड्रॉच्या घोषणेनंतर त्याला युईएफए बेस्ट प्लेअरचा पुरस्कार घोषीत करण्यात आला.
  रोनाल्डोने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. रोनाल्डो सोबतच या पुरस्काराच्या शर्यतीत रियल माद्रिदचा गॅरेथ बेल आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदचा स्ट्राईकर एंटोनियो ग्रिझमन हा देखील होता.
  रोनाल्डोने या आधी 2014 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. तर 2015 मध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्राईकर लियोनेल मेस्सीने मिळवला.
  तसेच महिलांच्या गटात हा पुरस्कार नॉर्वेची अदा हेगरबर्गला मिळाला.

•    वह खिलाड़ी जिसे हरियाणा के ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ अभियान का ब्रांड एम्बेसडर बनाया गया: साक्षी मलिक

•    दिव्यांग लोगों हेतु केंद्र सरकार द्वारा आरंभ की गयी सुलभ ई-लाइब्रेरी का नाम: सुगम्य पुस्तकालय

•    वर्ष 1979 से 1985 तथा 1985 से 1993 तक दो बार बिहार के राज्यपाल रहने वाले नेता जिनका हाल में निधन हो गया:  ए आर किदवई

•    वह हॉकी खिलाड़ी जिन्हें मरणोपरांत उत्तर प्रदेश सरकार द्वारा राज्य के सर्वोच्च खेल पुरस्कार हेतु चयनित किया गया: मोहम्मद शाहिद

•    केंद्र सरकार द्वारा इन सेवाओं की संरचना का अध्ययन करने के लिए टास्क फ़ोर्स बनाई गयी गयी: ग्रुप ए सेवाएं

•    वह राज्य पुलिस जिसने डीएनए सूचकांक प्रणाली की शुरुआत की: आंध्र प्रदेश

•    भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ने केंद्र सरकार और जिस राज्य सरकार के साथ समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए: महाराष्ट्र सरकार

•    ब्रिक्स देशो ने प्राकृतिक आपदाओं से निपटने के लिए जिस स्थान पर संयुक्त टॉस्क फोर्स के गठन का निर्णय लिया है: उदयपुर

•    फार्क विद्रोहियों और जिस देश की सरकार ने शांति समझौता पर हस्ताक्षर किए: कोलंबिया

•    एयरलाइन्स कंपनी ‘विस्तारा’ ने बॉलीवुड के जिस एक्ट्रेस को अपना ब्रांड एंबेसडर नियुक्त किया: दीपिका पादुकोण

•    उत्तर-प्रदेश सरकार ने जितने करोड़ रूपये का पूरक बजट पारित किया: 25 हजार 3 सौ 48 करोड़

•    दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संगठन (सार्क) देशों के वित्त मंत्रियों का दो दिन का सम्मेलन जहाँ हाल ही में संपन्न हुआ: इस्लामाबाद

•    उच्चतम न्यायालय ने महाराष्ट्र में जन्मांष्टमी पर्व पर दही हांडी रस्म हेतु मानव पिरामिड की अधिकतम ऊंचाई जितने फुट रखे जाने संबंधी आदेश में कोई संशोधन करने से इंकार कर दिया है: 20 फुट

•    केन्द्रीय मंत्रिमंडल ने 24 अगस्त 2016 को सरोगेसी के नए विधेयक के मसौदे को मंजूरी दी. इस विधेयक का उद्देश्य है: सरोगेट माताओं के अधिकारों की रक्षा करना

•    भारतीय क्रिकेट के जिस प्रथम श्रेणी टूर्नामेंट का पहली बार दूधिया रोशनी में गुलाबी गेंद के साथ शुभारम्भ किया गया: दलीप ट्रॉफी

26 अगस्त को समाज सेविका मदर टेरेसा की 106वीं जयंती मनाई गयी। किस वर्ष उन्हें देश के सर्वोच्च नागरिक सम्मान ‘भारत रत्न’ से अलंकृत किया गया था?


  1980

ट्रेन में सफर करने वाले यात्रियों को आगामी 31 अगस्त से ऑनलाइन टिकट बुक कराने पर कितनी धन राशि का बीमा कवर मिलेगा?

  10 लाख रुपये

किस हाई कोर्ट ने 26 अगस्त को महिलाओं को हाजी अली दरगाह के प्रतिबंधित मजार क्षेत्र में प्रवेश की अनुमति दे दी?


  बंबई

नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने यूपीआई एप की शुरुआत की है जिसके द्वारा UPI ID (र्इमेल आईडी, मोबाइल नंबर या आधार) स्‍मार्टफोन के जरिए पैसा ट्रांसफर किया जा सकता है। UPI निम्न में से किसका संकेताक्षर है?


  यूनीफाइड पेमेंट इंटरफेस

निशानेबाजी प्रतियोगिता में भारत को मिली असफलता की पड़ताल करने के लिए गठित की गई पांच सदस्यीय समीक्षा समिति का अध्यक्ष किसे नियुक्त किया गया है?

  अभिनव बिन्द्रा

अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ ने किस देश के भारोत्तोलकों के डोप टेस्ट में लगातार नाकाम होने के कारण एक साल का प्रतिबंध लगाया गया है?


  चीन

दुनिया की पहली सेल्फ ड्राइविंग टेक्सी सर्विस 25 अगस्त से सिंगापुर में शुरू हो गयी। किस कंपनी द्वारा यह सर्सिस प्रदान की जा रही है?


  नुटोनोमी

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी

चेन्नई - पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती आणि उपग्रह प्रक्षेपणावरील खर्चात मोठी कपात करण्यासाठीच्या प्रकल्पांतर्गत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ( इस्रो) आज ( रविवारी) स्वदेशी बनावटीच्या स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली.

' इस्रो ' च्या श्रीहरिकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून या स्क्रॅमजेट इंजिनाची चाचणी घेण्यात आली . भारतीय बनावटीचे स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या आरएच - 560 रॉकेटद्वारे ही चाचणी घेण्यात आल्याचे " इस्रो' शी संबंधित सूत्रांनी सांगितले . आज सकाळी सहा वाजता ही चाचणी घेण्यात आली . आमची चाचणी यशस्वी झाली असून , या चाचणीबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल , असे इस्त्रोकडून सांगण्यात आले.

संबंधित चाचणी 28 जुलै रोजीच घेण्यात येणार होती . मात्र, भारतीय हवाईदलाचे मालवाहू विमान बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती . आरएच - 560 रॉकेटमध्ये वापरण्यासाठी स्क्रॉमजेट इंजिनाची निर्मिती तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्रामध्ये करण्यात आली आहे . पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारच्या इंजिनाची अवश्यकता असून , त्यामुळे खर्चातही मोठी बचत होऊ शकणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जिल्हा , गावातही मिळणार पासपोर्ट : ज्ञानेश्वर मुळे

पुणे - ' सुमारे 150 देशांना भारताने इलेक्ट्रॉनिक व्हिसा ( ऑनलाइन व्हिसा ) मिळण्याची सुविधा दिली आहे . गेल्या पाच वर्षांत आपल्या पासपोर्ट आणि व्हिसा धोरणात आमूलाग्र बदल घडले आहेत . गेल्या वर्षी 2 कोटी पासपोर्ट देण्यात आले , हा एक विक्रमच आहे . येणाऱ्या काळात याही पुढे जात , नागरिकांना त्यांच्या गावाजवळ , तालुक्यात अन् जिल्ह्यात पासपोर्ट उपलब्ध व्हावा , हा आमचा प्रयत्न असेल. पासपोर्ट मिळविण्यासाठी शहरांत यावे लागण्याची गरज लवकरच संपुष्टात येईल , '' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे दिली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹बलुतेदारी पद्धतीवर कौशल्य विकास प्रशिक्षण

गवळी , कुंभार , कोळी , गुरव , चर्मकार, कुडमोडे जोशी, धोबी , नाभिक , महार , लोहार, सुतार अशी ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेली बारा बलुतेदार पद्धती आता नामशेष झाली आहे ; पण आता याच बलुतेदारी पद्धतीवर आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे . जातिव्यवस्थेला पाठिंबा न देता , बेरोजगार युवकांना अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन समाज स्वयंपूर्ण करण्यासाठी ही नवी योजना राबविली जाणार आहे . येत्या काही दिवसांत या योजनेची सुरवात होणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी " सकाळ ' ला दिली .
ब्रिटिश राजवट भारतात असेपर्यंत ग्रामीण भागात 12 बलुतेदार व 18 अलुतेदार पद्धत अस्तित्वात होती . काळ बदलला तशी या बलुतेदारांच्या कामाची पद्धत बदलत गेली . पूर्वी पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या या बलुतेदारांमुळे ग्रामीण व्यवस्था स्वयंपूर्ण बनली होती ; पण जातिव्यवस्थेतेमुळे समाजाच्या विकासात अडचणी येत होत्या. त्यामुळे जातिव्यवस्थेला खतपाणी न घालता कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगारनिर्मिती होणार आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकार अल्प मुदतीचे नवे अभ्यासक्रम बनवत आहे .
गावांचा विकास करण्यासोबत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आणि अद्ययावत प्रशिक्षणासोबतच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंतचे सहकार्य राज्य सरकार मार्फत केले जाणार आहे .
नितीन देसाई यांच्यासोबत करार
भविष्यामध्ये कौशल्य विकासाला अधिक महत्त्व असून , किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम ( एमसीव्हीसी ) आणि तंत्रनिकेतन( आयटीआय) या अभ्यासक्रमांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे . असे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत विभागाने नुकतीच बैठक घेतली . युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देतानाच कौशल्य विकासाची जोड देण्याचा हा प्रयत्न असल्याने , येत्या काही दिवसांत कलादिर्ग्दशक नितीन देसाई यांच्यासोबत खात्याच्या वतीने सामंजस्य करार ( एमओयू) केला जाणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अपंगांच्या कल्याणासाठी केंद्राची नवी योजना - स्वाधिन क्षत्रिय

मुंबई - देशातील 26 कोटी अपंग जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने "सुगम्य भारत अभियान' सुरू केले आहे . या योजनेअंर्तगत पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई , नागपूर , पुणे , नाशिक या चार शहरांचा समावेश झाला आहे .

याअंतर्गत या शहरांतील सर्व शासकीय इमारतींमध्ये अपंगांसाठी किती सोयीसुविधा उपलब्ध आहेत, याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिली .
समाजातील दुर्बल , दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

 अपंगांना समाजात मानाने जगता यावे यासाठी त्यांना सुविधा देणे अपेक्षित आहे . अपंगांसाठीचा कायदा 1995 मध्ये अस्तित्वात आला ; पण त्याचे पालनही होताना दिसत नाही . आर्थिक , सांस्कृतिक क्षेत्रात यांनी पुढे येण्यासाठी सरकारने पावले उचण्याच्या दृष्टीने देशात सुगम्य भारत अभियान राबविले जात आहे .
 टप्प्याटप्प्याने राबविल्या जाणाऱ्या या अभियानातील पहिल्या टप्प्यात देशातील 50 शहरांचा समावेश आहे . अपंगांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी , त्यांच्या प्रती असलेली लोकांची मानसिकता दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील , या संदर्भातील माहिती या कृती आराखड्याद्वारे सरकारला सादर करायची आहे .

व्याख्या अधिक व्यापक करण्याचा प्रस्ताव

3 डिसेंबर 2015 या आंतरराष्ट्रीय अंपग दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या समाजकल्याण आणि सबलीकरण विभागामार्फत देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे . अपंगांना समान संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 20 वर्षांपूर्वी केलेला अपंग ( समान संधी , नागरी हक्क आणि संरक्षण ) कायदा नव्याने करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून , त्यासाठी एक विधेयक आणण्याचा सरकार विचार करत आहे . सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये अपंगांसाठी असलेले आरक्षण दोन टक्क्यांनी वाढविण्याचा व अपंगत्वाची व्याख्या अधिक व्यापक करण्याचा प्रस्ताव आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कर्ज नियमावलीने बॅंकांची वाढली चिंता

बड्या उद्योगांना अथवा प्रकल्पांना ठराविक मर्यादेपलीकडे कर्ज देताना जादा तरतुदीची नवी नियमावली एप्रिलपासून लागू होणार आहे . याचा व्यवसायावर परिणाम होणार असून , बॅंकांची चिंता वाढली आहे . या नियमावलीबाबत पुनर्विचार करण्याचे गाऱ्हाणे बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेला घातले आहे .

नव्या नियमावलीचा बड्या कर्ज व्यवसायांवर परिणाम होणार आहे . बॅंकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून , रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्याचे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले . इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या बॅंकिंग परिषदेत ते बोलत होते . एक एप्रिलपासून नव्या नियमानुसार बड्या उद्योगांना अथवा प्रकल्पांना निर्धारित मर्यादेपलीकडे ( एनपीपीएल ) जाऊन अर्थसाहाय्य केल्याने जोखीम वाढेल . त्यामुळे या वाढीव कर्जासाठी बॅंकांना किमान तीन टक्के निधीची तरतूद करावी लागणार आहे . मात्र ही अट बॅंकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अडचणीची ठरेल . विशेषतः पर्यावरणपूरक प्रकल्पांना अर्थसाहाय्य करताना बॅंकांना मर्यादा येतील , असे गुप्ता यांनी सांगितले .

प्रकल्प कंपन्यांनादेखील खुल्या बाजारातून निधी उभारताना पत मानांकन नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल , असे त्यांनी सांगितले . बड्या प्रकल्पांमधील कर्जाची मर्यादा टप्प्याटप्प्यात कमी करण्याचा या नियमावलीचा उद्देश आहे . 2018 - 19 मध्ये ही मर्यादा 15 हजार कोटींपर्यंत कमी केली जाणार असून , 2019 पासून ती दहा हजार कोटींपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दहशतवादाशी लढण्यासाठी माहितीची देवाण घेवाण करणार

भारत - बांगलादेशच्या अधिकाऱ्यांचा बैठकीतला निर्णय

आगरतळा - सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाशी लढण्यासाठी संबंधित माहितीची देवाण- घेवाण करण्याचा निर्णय आज भारत आणि बांगलादेशदरम्यान झाला. दोन्ही देशांच्या सुरक्षेबाबतचे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज याबाबत चर्चा झाली .

बांगलादेशमधील दहशतवादाबाबत त्रिपुरा येथे झालेल्या तिसऱ्या गुप्त बैठकीत भारताचे सुरक्षा तज्ज्ञ आणि माजी रॉ प्रमुख आणि सचिव ए . बी. माथूर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा इंटेलिजंसचे ( एनएसआय ) कमांडर नुरुल अब्सर यांनी या वेळी पाकिस्तान हाच जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले . त्रिपुरास्थित एनआरआयआयटी आणि नेटवर्क कम्युनिकेशन्स प्रोफेशनल ग्लोबल यांच्यातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी माथूर यांनी पाकिस्तानचे सरकार हे लष्कर आणि आयएसआय चालवत असल्याचे सांगून त्यांच्या दहशतवादाशी संबंधित धोरणांबाबत टीका व्यक्त केली . नुकत्याच झालेल्या ढाका येथील दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी आपण तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती एकमेकांना पुरवणार नाही , तोपर्यंत दहशतवाद सुरूच राहील असे म्हटले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹लक्ष्मणची २८१ धावांची खेळी ‘ एकविसाव्या शतकात सर्वोत्तम ’!

नवी दिल्ली - भारताचा शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर साकारलेली २८१ धावांची खेळी ‘ एकविसाव्या शतकात सर्वोत्तम ’ ठरली आहे .

क्रिकेट लेखक , इतिहासकार आणि समालोचकांच्या एका पॅनेलने ही निवड केली . त्यासाठी २००० पासूनच्या कामगिरीचा विचार करण्यात आला . त्यात २००१ मध्ये लक्ष्मणने फॉलोऑननंतर साकारलेल्या खेळीला सर्वाधिक पसंती मिळाली. या कालावधीतील २० ‘ इनिंग ’ या पॅनेलने निवडल्या. या पॅनेलमध्ये ३७ जणांचा समावेश होता . पहिल्या क्रमांकाच्या खेळीला दहा, दुसऱ्या क्रमांकासाठी नऊ , अशा उतरत्या क्रमाने गुण देण्यात आले . या गुणांची बेरीज करण्यात आली . त्यातून ही निवड झाली. या क्रमवारीत राहुल द्रविडच्या दोन , तर विरेंद्र सेहवागच्या एका ‘ इनिंग ’ ला स्थान मिळाले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कृष्णद्रव्याने भरलेली दीर्घिका सापडली

कृष्णद्रव्याने पूर्णपणे भरलेली दीर्घिका खगोलवैज्ञानिकांना सापडली असून, कृष्णद्रव्य कधी दिसत नसते, पण विश्वाचा ९० टक्के भाग त्याने व्यापलेला आहे. ड्रॅगनफ्लाय ४४ असे या दीर्घिकेचे नाव असून, ती आकाराला आकाशगंगेएवढी आहे. अरुंधती केश तारकासमूहात ही दीर्घिका असून ती गेल्या वर्षीपासून तिच्या वेगळय़ा रचनेमुळे सापडली नव्हती. आकाशगंगेच्या आकाराची ही दीर्घिका असून त्यात फार कमी तारे आहेत.

ही दीर्घिका सापडल्यानंतर तिच्यात नजरेला दिसण्यापेक्षा इतर बरेच काही आहे, असे येल विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डोकुम यांनी सांगितले. या संशोधक चमूने ड्रॅगनफ्लाय ४४ दीर्घिकेची छायाचित्रे टिपली असून, ती डब्ल्यू. एम. केक वेधशाळा व हवाईतील जेमिनी नॉर्थ टेलिस्कोप या दुर्बिणींनी त्याचे निरीक्षण करण्यात आले होते. सहा रात्री निरीक्षण करून या दीर्घिकांच्या ताऱ्यांचे वेग मोजले जातात. ताऱ्यांच्या गोलाकार प्रकाशमान वलयाचा यात विचार केला जातो.
 आपल्या आकाशगंगेभोवती एक प्रभामंडल आहे तसेच या दीर्घिकेभोवती आहे. ताऱ्यांचा वेग हा दीर्घिकेचे वस्तुमान दर्शवणारा असतो. तारा जितका वेगाने फिरतो तितके दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते. आताच्या दीíघकेतील तारे खूप वेगाने फिरत आहेत. त्याचा अर्थ ड्रॅगनफ्लायवर न दिसणारे बरेच वस्तुमान आहे. असे टोरांटो विद्यापीठाचे रॉबटरे अब्राहम यांनी सांगितले. या दीर्घिकेचे वस्तुमान सूर्याच्या एक ट्रिलीयनपट जास्त तर आकाशगंगेइतकेच आहे.

ताऱ्यांच्या निर्मितीत ९९.९ टक्के वस्तुमान हे कृष्णद्रव्याचे असते, ते दिसत नसते, पण विश्वाचा ९० टक्के भाग त्याचाच बनलेला आहे. कृष्णद्रव्याने भरलेल्या दीर्घिकांचा शोध हा तसा नवा भाग नाही. अतिशय फिकट बटू दीर्घिकांची रचना सारखीच आहे. पण त्या दीर्घिका ड्रॅगनफ्लाय ४४ पेक्षा १० हजारपट कमी वस्तुमानाच्या आहेत. यातील तारकासमूह हे अतिशय घट्ट गुच्छासारखे आहेत. अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘जीवसृष्टीसाठी ग्रह गोल्डीलॉकमध्ये असणे हा एकच निकष नाही’

अवकाशातील गोल्डीलॉक पट्टय़ात वसाहतयोग्य ग्रह असू शकतात असे म्हटले जाते, पण आता दुसरा गोल्डीलॉकसारखा पट्टा असल्याचे दिसून आले आहे. वैज्ञानिकांच्या मते जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी केवळ वसाहत योग्य पट्टय़ात असून उपयोगाचे नाही. गेली अनेक दशके असे मानले जात होते की, सूर्यापासून एखाद्या ग्रहाचे अंतर किती आहे यावर तो ग्रह वसाहत योग्य आहे की नाही हे ठरते.

आपल्या सौरमालेत शुक्र हा सूर्याच्या जवळ तर मंगळ लांब आहे, पण पृथ्वी सूर्यापासून योग्य अंतरावर आहे. हे योग्य अंतर म्हणजे वसाहतयोग्य पट्टा होय, ज्याला गोल्डीलॉक झोन असे म्हणतात. काही ग्रहांमध्ये अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यात येते, त्यात खडक आपली जागा बदलतात किंवा कवचामधील संवहन वेगळ्या पद्धतीने होते व त्यामुळे अंतर्गत तपमानात चढउतार होत असतात. यात ग्रह खूप थंड किंवा उष्ण असू शकतो पण तो योग्य तापमानाला कालांतराने येतो.

अमेरिकेतील येल विद्यापीठातील संशोधकांच्या मते केवळ वसाहतयोग्य पट्टय़ात असणे म्हणजे जीवसृष्टीस अनुकूलता असे म्हणता येणार नाही. त्यात ग्रहाचे अंतर्गत तापमान योग्य प्रमाणात सुरू झाले पाहिजे. पृथ्वीवरील वैज्ञानिक माहिती गोळा केली तर पृथ्वी काही अब्ज वर्षांत कशी विकसित होत गेली ते कळते. त्यामुळे उष्णतेचे संवहन कसे झाले व अंतर्गत तापमान कसे बदलत गेले हे समजते, असे भूगर्भशास्त्र व भूभौतिकशास्त्राचे प्राध्यापक जून कोरेनागा यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते तापमानाचे यात नियंत्रण घडून येते व ते नैसर्गिक असते. जर स्वतापमान नियंत्रण नसेल तर त्याचे अनेक परिणाम होतात. ग्रहांच्या निर्मितीबाबत आपण अनेक अभ्यास पाहिले तर त्यात वेगळे निष्कर्ष दिसून येतात. ग्रहाचा आकार व अंतर्गत तापमान यावर ग्रहाची उत्क्रांती अवलंबून नसते, जेव्हा त्यात तापमान नियंत्रणाची क्षमता असते. पृथ्वीवरचे अंतर्गत तापमान विशिष्ट नसते तर येथे सागर व खंड दिसले नसते असे आपण मानतो. त्यामुळे पृथ्वीचा इतिहास हा तो खूप उष्ण किंवा थंड ग्रह होता असा नाही. ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹टाटा सन्सवर वेणू श्रीनिवास, अजय पिरामल यांची नियुक्ती

विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा विस्तार साधताना, त्यावर दोन ज्येष्ठ उद्योगपतींची नव्याने वर्णी लागली आहे.
पिरामल त्याचप्रमाणे श्रीराम समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल त्याचप्रमाणे टीव्हीएस मोटरचे अध्यक्ष वेणू श्रीनिवास यांची टाटा सन्सचे बिगर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती होत असल्याचे गुरुवारी सायंकाळी उशिराने जाहीर करण्यात आले. विविधांगी ज्ञान, तज्ज्ञता व अनुभवाला प्रतिनिधित्व देणारे व्यापक रूप टाटा सन्सचे संपूर्ण संचालक मंडळाने आजवर जपले आहे. नव्या विस्तारासह आठ सदस्यीय बनलेल्या संचालक मंडळातील अन्य सदस्यांमध्ये अध्यक्ष म्हणून सायरस पी. मिस्त्री यांच्याबरोबरीने हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता नितीन नोहरिया, माजी संरक्षण सचिव म्हणून कारकीर्द राहिलेले विजय सिंग, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत रोनेन सेन, फरिदा खंबाटा, व्होल्टास व टाटा स्कायचे अध्यक्ष इशात हुसैन यांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगधुरिणांच्या अनुभव आणि तज्ज्ञतेचा लाभ मिळावा या उद्देशाने अनेक बडय़ा उद्योगपतींना संचालक मंडळात स्थान देण्याची टाटा समूहाने आजवर प्रथा पाळली आहे. आदित्य विक्रम बिर्ला हे कैक वर्षे टाटा स्टीलच्या संचालकपदी होते. त्याच्या पश्चात त्यांचे सुपुत्र कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे ती धुरा आली. बॉम्बे डाइंगचे नस्ली वाडिया हे आजही टाटा स्टीलचे बिगर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सर्व २९ हजार गावांचे होणार डिजिटायजेशन

राज्यातील सर्व २९ हजार गावांचे डिजिटायजेशन करण्यात येणार असून, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला अग्रभागी ठेवून नागरी सेवांवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. ही योजना सध्या ७५० गावांत राबविण्यात येत आहे.

फडणवीस म्हणाले की, ‘सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे मोठ्या रुग्णालयांना जोडण्यात येणार असून, माहिती तंत्रज्ञानाची यात महत्त्वाची भूमिका असेल. आरोग्य व शिक्षण यासारख्या क्षेत्रात सेवा पुरविण्यासाठी एचपी आणि मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. राज्य सध्या प्रशासनाच्या डिजिटायजेशनद्वारे किमान ४० लाख तक्रारींची सोडवणूक करीत आहे.’

२००९ पासून प्रलंबित असलेला केंद्राचा क्रिमिनल ट्रॅकिंग सीस्टिमला नव्या पद्धतीची जोड देऊन एक पाऊल पुुढे टाकले आहे. यात सर्व पोलीस ठाणी डिजिटल क्रिमिनल नेटवर्किंग सीस्टिमद्वारे जोडण्यात येत आहेत. पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान गुन्हेगारांच्या हालचालींचा माग काढण्यासह गुन्ह्यांच्या तपासात मैलाचा दगड ठरेल. कारागीर, शेतकरी आणि इतर क्षेत्रांतील
लोकांना मोठ्या संख्येने ई-कॉमर्सच्या जागतिक मंचावर पदार्पण करण्यास डिजिटायजेशनच्या प्रणालीची मदत होत आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र आदर्श उदाहरण

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास आणि इतर क्षेत्राबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
मात्र, आपल्या सरकारने मुंबई आणि इतर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकास आणि इतर पायाभुत सुविधा प्रकल्पांचा तपशीलवार कार्यक्रम तयार केला.
नरेंद्र मोदी यांच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या योजनेचे महाराष्ट्र हे आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹महाराष्ट्र विधीमंडळात " जीएसटी ' मंजूर

मुंबई - महाराष्ट्र राज्याने आज ( सोमवार) संसदेने संमत केलेल्या वस्तु व सेवा कर ( जीएसटी ) विधेयकास मान्यता दर्शविली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ( भाजप ) मांडलेल्या या विधेयकास सर्व राजकीय पक्षांनी मान्यता दर्शविली .

 विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत या विधेयकास आवाजी मतदानाने समर्थन दर्शविण्यात आले . जीएसटीस मंजुरी दर्शविणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य आहे .

" जीएसटीमुळे केवळ " मेक इन इंडिया ' मोहिमेस पाठिंबा मिळेल असे नव्हे; तर या विधेयकामुळे भारत एक बाजारपेठ होण्यास मदत होईल . जीएसटीमुळे देशातील वेगवेगळ्या स्वरुपाची कर आकारणी करणाऱ्या राज्यांमधील स्पर्धाही संपुष्टात येईल , ' असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मांडताना व्यक्त केले.

उत्पादन व सेवा क्षेत्रांसहित ग्राहकाभिमुख व्यवसाय क्षेत्रामध्येही आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रास या विधेयकामुळे विशेष फायदा होईल , असे अर्थमंत्री म्हणाले . देशाच्या एकूण सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 19 . 62% असल्याचे निरीक्षण मुनगंटीवार यांनी या पार्श्वभूमीवर नोंदविले . जीएसटी प्रणालीमध्ये राज्यातील एकूण 17 कर एकत्रित केले जाणार आहेत. यामध्ये मूल्यवर्धित कर ( व्हॅट ) , जकात आणि इतर अनेक स्वरुपाच्या करांचा समावेश आहे . याचबरोबर , मद्य , मुद्रांकशुल्क आणि वीज या क्षेत्रांत कर ( लेव्ही टॅक्स ) आकारण्याचा राज्याचा अधिकार अबाधित राहणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सिंधू , साक्षी , दीपा , जितूला खेलरत्न पुरस्कार प्रदान

रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळविणारी पी. व्ही . सिंधू , ब्राँझपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व नेमबाज जितू राय यांना आज ( सोमवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतातील सर्वोत्तम ' राजीव गांधी खेलरत्न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्याचबरोबर अर्जुन , द्रोणाचार्य व इतर पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

दीपा कर्माकरला घडवलेल्या बिश्वेश्वर नंदी यांना "द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . जागतिक स्पर्धेपाठोपाठ ऑलिंपिकमध्येही अंतिम फेरी गाठलेली माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मुंबईकर अजिंक्य रहाणे, भरवशाचा ड्रॅग फ्लिकर व्ही . आर. रघुनाथ यांना " अर्जुन ' पुरस्कार देण्यात आला . रोइंगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला .
साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले , सिंधूचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले, तर दीपा कर्माकरने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ऑलिंपिकमध्ये चौथा क्रमांक मिळवला . तिचे पदक केवळ 0 . 15 गुणांनी हुकले होते . या तिघींसह रिओ ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरी गाठलेला जितू राय यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला . क्रीडा पुरस्कार इतिहासात प्रथमच एका वर्षी चार खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देण्यात आला . 2009 मध्ये 2008 मधील ऑलिंपिक कामगिरी लक्षात घेऊन सुशील कुमार , विजेंदर सिंग आणि मेरी कोमला हा पुरस्कार देण्यात आला होता , तर 2002 आणि 2012 मध्येही दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता .

पुरस्कार विजेते:
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - पी. व्ही . सिंधू ( बॅडमिंटन ) , दीपा कर्माकर ( जिम्नॅस्टिक ) , साक्षी मलिक ( कुस्ती) , जितू राय ( नेमबाजी ) .

अर्जुन पुरस्कार - रजत चौहान ( तिरंदाजी) , ललिता बाबर ( ऍथलेटिक्स ) , सौरव कोठारी ( बिलियर्डस आणि स्नूकर ) , शिवा थापा ( बॉक्सिंग ) , अजिंक्य रहाणे ( क्रिकेट ) , सुब्रत पॉल ( फुटबॉल ) , राणी , व्ही . आर. रघुनाथ ( दोघेही हॉकी ) , गुरप्रीत सिंग , अपूर्वी चंडेला ( दोघेही नेमबाजी ) , सौम्यजित घोष ( टेबल टेनिस ) , विनेश, अमित कुमार ( दोघेही कुस्ती) , संदीपसिंग मान ( पॅरा ऍथलेटिक्स ) , वीरेंदर सिंग ( कुस्ती, कर्णबधिर) .

द्रोणाचार्य पुरस्कार - नागापुरी रमेश ( ऍथलेटिक्स) , सागर मल दयाल ( बॉक्सिंग ) , राजकुमार शर्मा ( क्रिकेट ) , बिश्वेश्वर नंदी ( जिम्नॅस्टिक ) . एस . प्रदीप कुमार ( जलतरण , जीवनगौरव ) , महाबीर सिंग ( कुस्ती, जीवनगौरव ) .

ध्यानचंद पुरस्कार - सत्ती गीता ( ऍथलेटिक्स ) , सिल्वानस डुंग ( हॉकी ) , राजेंद्र शेळके ( रोइंग ) .

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार - खेळाडू गुणवत्ता - हॉकी सिटिझन ग्रुप, दादर पारसी झोरास्ट्रीयन क्रिकेट क्लब , उषा स्कूल ऑफ ऍथलेटिक्स , स्टेअर्स. कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून खेळास प्रोत्साहन - इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेट लिमिटेड . क्रीडापटूंना नोकरी तसेच अन्य उपक्रम - रिझर्व्ह बॅंक . क्रीडाविकास - सुब्रतो मुखर्जी क्रीडा शैक्षणिक सोसायटी .
मौलाना अब्दुल कलाम आझाद करंडक -
पंजाब विद्यापीठ .

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारपद्धतीचा शोध

भारतीय वंशाच्या युवा शास्त्रज्ञाचा दावा; औषधोपचारांना चांगला प्रतिसाद मिळणे शक्य

लंडन - औषधोपचारांनाही दाद न देणाऱ्या अत्यंत दुर्धर आणि "ट्रिपल निगेटिव्ह ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्याची पद्धती शोधून काढल्याचा दावा सोळा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाने केला आहे . क्रितीन नित्यानंदम असे या मुलाचे नाव आहे .

आपल्या उपचारपद्धतीमुळे या कर्करोगाच्या पेशी औषधांना प्रतिसाद देत असल्याचा क्रितीनने दावा केला आहे . स्तनांचा कर्करोग झालेल्या बहुतेक रुग्णांना ओएस्ट्रोजेन , प्रोजेस्टेरॉन यांच्या प्रभावामुळे हा रोग होतो . औषधोपचारांनी हा प्रभाव कमी करून उपचार करता येणे शक्य असते . मात्र, ट्रिपल निगेटिव्ह स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया , अतिनिल किरणे आणि केमोथेरेपी या सर्वांच्या साह्याने उपचार करावे लागतात आणि यामध्ये रुग्ण जगण्याची शक्यता कमी होते . या उपचार पद्धतीला पर्याय शोधला असल्याचा दावा क्रितीनने केला आहे .

उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाचे औषधोपचारांना योग्य प्रकारे प्रतिसाद देणाऱ्या रोगामध्ये रूपांतर घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे क्रितीनचे म्हणणे आहे . कर्करोगाच्या बहुतेक प्रकारांमध्ये औषधांना प्रतिसाद देणारे "रिसेप्टर' असतात . मात्र, ट्रिपल निगेटिव्हमध्ये असे रिसेप्टरच नसल्याने उपचारांना प्रतिसाद मिळत नाही . त्यामुळे या प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाचे प्रतिसाद देणाऱ्या कर्करोगात रूपांतर करणे आवश्यक असल्याचे क्रितीनने सांगितले . " आयडी- 4 प्रोटीन हे अविभक्त मूलपेशींना विभक्त होण्यापासून रोखते . त्यामुळे या मूलपेशी विभक्त होण्यासाठी आयडी- 4 ला रोखणे गरजेचे असते . हे आयडी- 4 प्रोटिन निर्माण करणाऱ्या जनुकांना रोखण्याची पद्धती मी शोधून काढली असल्याने यामुळे कर्करोग कमी धोकादायक स्थितीवर येतो , ' अशी माहिती क्रितीनने दिली .

कर्करोगाच्या पेशी विभक्त होतात की नाही , हीच खरी समस्या असते . विभक्त होणे याचा अर्थ , या पेशी निरोगी पेशींसारख्या भासतात आणि अत्यंत सावकाश वाढतात . याउलट , कर्करोगाच्या पेशी विभक्त न झाल्यास त्या त्यांच्या धोकादायक मूळस्थितीत राहतात आणि त्यांना ओळखणे अवघड बनते . या पेशी वेगाने पसरून त्यामुळे ट्युमर ( गाठ ) तयार होते . या गाठीची वाढ रोखणाऱ्या जनुकाची कार्यक्षमता वाढविण्याची पद्धतही क्रितिनने शोधून काढली आहे .

क्रितिन अंतिम फेरीत
स्तनांच्या कर्करोगावरील क्रितीनच्या उपचारपद्धतीच्या या कल्पनेला ब्रिटनमधील युवा शास्त्रज्ञांच्या "द बिग बॅंग फेअर ' या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे . त्याने गेल्या वर्षी गुगलच्या विज्ञान स्पर्धाही जिंकली आहे . अल्झायमर या रोगाची प्राथमिक लक्षणे ओळखणारी चाचणी त्याने त्या वेळी तयार केली होती .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘द्रुतगती’ वरील बेशिस्त वाहन चालकांवर आता ड्रोन ठेवणार अहोरात्र पहारा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आदी प्रकारांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची चोवीस तास नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यांची मदत घेऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मार्गावर चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे तनात करण्यात येणार असून, त्यांचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले.

द्रुतगती मार्गावर अतिवेगाने वाहन चालविणे, मार्गिकेची शिस्त मोडणे, चुकीच्या पध्दतीने वाहनांना ओलांडून पुढे जाणे यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यात कित्येकांना जीवही गमवावा लागला आहे. अपघातांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. या सर्व घटना रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करूनही वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे यश येत नसल्याने यापुढे ड्रोनच्या साहाय्याने बेशिस्तीचे चित्रीकरण करून खालापूर व उस्रे टोल नाक्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गुजरातमध्ये ढोलवीरा येथे गाडल्या गेलेल्या हडप्पन बंदराचे अवशेष सापडले

गुजरातमध्ये ढोलवीरा येथे गाडल्या गेलेल्या हडप्पन बंदरातील बांधकामांचे अवशेष राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्रज्ज्ञांना सापडले असून त्सुनामीमध्ये नष्ट झालेले जगातील हे पहिलेवहिले बंदर शहर असल्याचा दावा शास्रज्ज्ञांनी केला आहे. अधिक संशोधनासाठी ३४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्राकडे ठेवण्यात आला आहे.
दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. नक्वी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कौन्सिल फॉर सायन्टिफिक रिसर्च (सीएसआयआर) आणि एनआयओ यांनी संयुक्तपणो हे संशोधन हाती घेतले. गुजरातमध्ये कच्छच्या रणात 5 हजार वर्षापूर्वीचे हे बंदर वसविले होते. बांधकामाचे जे अवशेष सापडले आहेत त्यावर मातीचे थर ज्या पद्धतीने आढळलेत ते पाहता दीड हजार वर्षापूर्वी त्सुनामी येऊनच ही बंदर वसाहत गाडली गेली असावी, असा शास्रज्ञांचा दावा आहे.
एनआयओचे ज्येष्ठ शास्रज्ञ राजीव निगम यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. जे. लोवेसन, ए. एस. गौर, सुंदरेशन, एस. एन. बांदोडकर, रायन लुईस, गुरुदास तिरोडकर व रूपल दुबे या शास्रज्ञांच्या पथकाने या शोधमोहिमेत भाग घेतला.

18 मीटर जाडीची संरक्षक भिंत
भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक ते परवाने घेऊन उत्खनन करण्यात आले. बंदराच्या ठिकाणी बांधलेली भिंत 14 ते 18 मीटर जाडीची आढळून आली. इतक्या जाडीची भिंत ही प्राण्यांपासून किंवा शस्नस्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी नव्हे तर त्सुनामीपासून बचावासाठीच त्या वेळी बांधण्यात आली असावी, असे शास्रज्ञ निगम यांचे मत आहे. पुरातत्व उत्खननात या ठिकाणी शत्रूपासून संरक्षणासाठी जाड भिंतीची जुनी मोठी गढी (किल्ला), मध्य शहर व निम्न शहर असे तीन वेगवेगळे भाग आढळून आलेले आहेत. भूमिगत शोध घेणारे ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) या शोधकामासाठी वापरला तसेच मातीचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. अडीच ते साडेतीन मीटर मातीचा थर आढळून आला. या ठिकाणी काही सूक्ष्म जीवांचे अवशेषही सापडले असून यात शिंपल्यांचाही समावेश आहे. हे जीव त्सुनामीतूनच आले असावेत, असा शास्रज्ञांचा ठाम दावा आहे. गाडल्या गेलेल्या बंदर वसाहतीवर मातीचे थर निश्चितपणो कोणत्या काळात साचले, याचा सखोल अभ्यास चालू आहे.

‘गुजरातला त्सुनामीचा कायमच धोका’
ढोलवीरा बंदर शहर नष्ट होण्याची घटना 1500 वर्षापूर्वी घडली असली तरी गुजरातच्या या किनारपट्टीला त्सुनामीचा धोका असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. संरक्षणासाठी 18 मीटर जाडीची भिंत हडप्पनांनी बांधली, त्यामुळे त्यांना त्या वेळीही त्सुनामीच्या धोक्याची जाणीव होती व त्यांनी आपल्या पद्धतीने किनारपट्टी व्यवस्थापन केले होते, हे स्पष्ट होते. या भागाला त्सुनामीचे संकट नवीन नाही. 28 नोव्हेंबर 1945 रोजी गुजरातेतील मोठय़ा त्सुनामीचा फटका मुंबई, रत्नागिरीर्पयत बसला. त्या वेळी समुद्रात 10 मीटर्पयत उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. गोव्यात पोतरुगीज राजवट होती आणि गोव्यालाही त्सुनामीची झळ पोचलेली असावी, असे संचालक नक्वी म्हणाले.

गुजरात सरकारने निधी नाकारला
दोन वर्षाच्या काळासाठी संशोधन व इतर गोष्टींकरिता 10 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव गुजरात सरकारकडे ठेवला होता; परंतु संस्था परराज्यातील असल्याची सबब देऊन त्या सरकारने प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्रलयाकडे निधीसाठी संपर्क केलेला आहे; परंतु अजून प्रतिसाद मिळालेला नाही, असे शास्रज्ञ निगम यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पश्चिम बंगालचे नामकरण, बांगला नावाने ओळखले जाणार

पश्चिम बंगाल विधानसभेनं आज राज्याचं नाव बदलणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार 'पश्चिम बंगाल' राज्याचे नाव यापुढे बंगालीमध्ये बांगला ( Bangla), हिंदीत बंगाल ( Bangal), तर इंग्रजीमध्ये बंगाल ( Bengal) असं असणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगाल या राज्याला आता नवीन ओळख मिळणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यावर पश्चिम बंगालला बंगाली भाषेत बांगला, इंग्रजीत बेंगाल आणि हिंदीत बंगाल या नावाने ओळखले जाईल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल या विद्यमान नावावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र आणि राज्यांमधील संबंधावर आधारित एका जाहीर कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, इंग्रजी अक्षरांप्रमाणे डब्ल्यू हे अक्षर सर्वात शेवटी येते. त्यामुळे आम्हाला नेहमीच सर्वात शेवटी बोलायला संधी मिळते असे त्यांनी म्हटले होते. पश्चिम बंगालमधील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मंत्र्यांनीही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे.

सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत बहुमताने राज्याच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. ज्या लोकांनी या प्रस्तावाला विरोध केला त्यांना इतिहासात माफ केले जाणार नाही अशी टीकाही त्यांनी नामकरणाला विरोध करणा-यांवर केली आहे.

फाळणीच्या वेळी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी बंगालचे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे विभाजन केले होते. यातले पूर्व बंगाल हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. १९७१ मध्ये पूर्व बंगालला पाकिस्तानमधून स्वातंत्र्य मिळाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला. पूर्व बंगालच अस्तित्वात नसेल पश्चिम बंगाल नावाची गरज काय असा सवाल पश्चिम बंगालकडून नेहमीच विचारला जायचा.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तामिळनाडू : तृतीयपंथीयांना पोलीस दलात स्थान देणारे पहिले राज्य

राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
प्रत्यक्षात निवड होऊन तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा त्यांना इतर दोन लिंगासोबत समान हक्क देणारे देशातील ते पहिले राज्य ठरेल.

तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलीस शिपायांच्या भरतीच्या आदेशात पात्र तृतीयपंथी व्यक्तीही अर्ज करू शकतील, असे नमूद केले आहे.

जे ‘तृतीयलिंगी’ म्हणून अर्ज करतील त्यांना शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता व आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाचे निकष लागू होणार आहेत.

यापूर्वीही राज्यामध्ये तृतीयपंथींना अर्ज करण्यास मज्जाव नव्हता. फक्त त्यांना पुरुष मानावे की स्त्री याविषयी सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्यांच्या अर्जांवर पुढे कारवाई केली जाऊ शकत नव्हती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

राष्ट्रीय खेल दिवस :- 29 अगस्त , 2016 को देश में राष्ट्रीय खेल दिवस मनाया गया | यह दिवस हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद की स्मृति में आयोजित किया गया जाता है | मेजर ध्यान चंद का जन्म वर्ष 29 अगस्त , 1905 को इलाहाबाद   में हुआ था |

दास व्यापार एवं इसके उन्मूलन की स्मृति में अंतर्राष्ट्रीय दिवस :- 23 अगस्त 2016 को विश्वभर में दास व्यापार एवं इसके उन्मूलन की याद में अंतर्राष्ट्रीय दिवस मनाया गया |

परमाणु परिक्षण के विरुद्ध अंतर्राष्ट्रीय दिवस : 29 अगस्त , 2016 को विश्व भर में परमाणु परिक्षण के विरुद्ध अंतर्राष्ट्रीय दिवस (International day against nuclear test)  मनाया गया | इस दिवस को मनाने का उद्देश्य परमाणु हथियारों के प्रति लोगों को जागरूक करना है | यह दिवस वर्ष 2010 से  मनाया जा रहा है|

14वां प्रवासी भारतीय दिवस : 26 अगस्त 2016 को केंद्र सरकार ने 14 वां प्रवासी भारतीय दिवस कर्णाटक की राजधानी बेंगलुरु में आयोजित करने की घोषणा की | यह आयोजन 7 से 9 जनवरी , 2017  के  मध्य किया जायेगा |

अल्लामा इकबाल पुरस्कार : 24 अगस्त 2016 को उर्दू डेवलपमेंट आर्गेनाइजेशन ने विश्व उर्दू दिवस (9 नवम्बर) के अवसर पर प्रदान किये जाने वाला ‘अल्लामा इकबाल’ पुरस्कार वर्ष 2016 के लिए प्रो . जगन्नाथ आज़ाद को प्रदान करने की घोषणा की | उन्हें यह पुरस्कार  मरणोपरांत  प्रदान  किया जायेगा |

सरस्वती सम्मान: 29 अगस्त , 2016 को डोगरी भाषा की प्रसिद्ध कवियत्री एवं साहित्यकार पद्मा सचदेवा को वर्ष 2007 में प्रकाशित उनकी आत्मकथा ‘चित्त चेते ’ के लिए वर्ष  2015 का सरस्वती सामान प्रदान किया गया | यह पुरस्कार के .के  बिडला  फाउंडेशन  द्वारा प्रदान किया जाया है | इसके अंतर्गत 15 लाख रूपए की  सम्मान  राशी प्रदान की गई |

#eMPSCkatta_Telegram_Updates

चालू घडामोडी:-
-------------------------------------------------

१) ----------------- हे न्यायालय भारतातले पहिले ई-न्यायालय (e-Court) ठरले :-हैदराबाद उच्च न्यायालय

२) सरकारने वनविभागात कार्यरत प्रशिक्षित हत्तींना शासकीय श्रेणीत समावून घेतलेअसून त्यांना नियमाप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत  ;-बंगाल

३) सुरेश प्रभुनी ----------------- हा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला. हा रेल्वे मार्ग खासगी व सार्वजनिक क्षेत्राचा हा सयुंक्त प्रकल्प आहे व रेल्वे हा नवीन प्रयोग करीत आहे? कराड ते चिपळूण

४) बिश्वेश्वर नंदी यांची २०१६ या द्रोणाचार्य पुरस्कारा साठी निवड करण्यात आली ते-------------- या खेळाशी संबंधित आहे? जिम्नॅस्टिक्स

५) २०१६ मध्ये होणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यात केले जाणार आहे गुजरात

६) ------------- हे राज्य स्वत:च्या अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा तयार करणारे भारतातील पहिले राज्य ठरले :-महाराष्ट्र

७) रिओ ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वज धारकाचा मान कोणत्या खेळाडूला देण्यात आला:- साक्षी मलिक

८) One Indian Girl” हे पुस्तक --------------- यांनी लिहिले आहे?चेतन भगत

९) 2 सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०१६ दरम्यान होणाऱ्या पहिला ब्रिक्स फिल्म सभारंभ ---------- या देशात आयोजित केलाआहे:- भारत

१०) जगातील पहिली ड्राइवर रहित टैक्सी सेवा ---------- या देशात २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरु झाली? :- सिंगापुर

११) भारत अलीकडेच व्यावसायिक प्रशिक्षणा साठी कोणत्या देशाबरोबर करार केला आहे :- जर्मनी

१२) नागरी उड्डयण मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधीकरण यांच्यात आज रिजनल कनेक्टिव्हीटी संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. अशाप्रकारचा सामंजस्य करार करणारे-------- हे पहिले राज्य ठरले आहे. :-महाराष्ट्र

Source:study circle telegram channel

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

सौरऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांच्या निधीची स्थापना करीत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय
सौर मिशनअंतर्गत योजनांसाठी सौर वीजप्रकल्प निर्मात्यांना देण्यात येणारा निधी, त्यामुळे विनाविलंब देता येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया ही सरकारी कंपनी १,५०० कोटी रुपयांच्या सुरक्षा प्रणालीची स्थापना करणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अंधांसाठी आता एका क्लिकवर ‘सुगम्य पुस्तकालय

 डोळ्यांनी वाचण्याखेरीज अन्य ज्ञानेंद्रियांनी आस्वाद घेता येईल, अशा स्वरूपातील दोन लाख पुस्तके उपलब्ध असलेल्या ‘सुगम्य पुस्तकालय’ या अंधांसाठीच्या आॅनलाइन ग्रंथालयाचा केंद्र सरकारने बुधवारी शुभारंभ केला. दिव्यांगांनाही (अपंग) जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समान संधी मिळावी, यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘सुगम्य भारत’ या योजनेचा एक भाग म्हणून व ‘डिजिटल इंडिया’मध्ये या लोकांनाही सामावून घेण्यासाठी हा ऐतिहासिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या पुस्तकालयाचा शुभारंभ केला. ते म्हणाले की, ‘आजच्या युगात माहिती व तंत्रज्ञान या दोन्ही मोठ्या शक्ती आहेत. त्या दृष्टीने अंध आणि इतर यांच्यातील ‘डिजिटल’ दरी या पुस्तकालयाने दूर होईल. ‘नॅशन इन्फर्मेटिक्स सेंटर’ने (एनआयसी) भारत सरकारच्या १०० वेबसाइट दिव्यांगस्नेही करण्याचे काम हाती घेतले असून, १९ वेबसाइट आत्तापर्यंत त्या दृष्टीने तयार करण्यात आल्या आहेत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹शत्रूंच्या मालमत्ते'बाबत चौथ्यांदा अध्यादेश जारी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने शत्रूंच्या मालमत्तेशी निगडित सुमारे 50 वर्षांपूर्वीच्या कायद्यातील दुरुस्तीशी संबंधित अध्यादेश चौथ्यांदा जारी केला . विविध युद्धांनंतर पाकिस्तान आणि चीनला गेलेल्या लोकांनी सोडून दिलेल्या संपत्तीचे वारसदार किंवा हस्तांतराच्या दाव्यांशी संबंधित ही दुरुस्ती आहे .

शत्रूंची मालमत्ता म्हणजे कोणतीही अशी संपत्ती जी कोण्या शत्रू, शत्रू व्यक्ती किंवा शत्रू कंपनीशी संबंधित व्यवस्थापनाखाली असेल. सरकारने अशा मालमत्ता भारतासाठी शत्रू संपत्ती संरक्षकांच्या अधिकार क्षेत्रात दिल्या आहेत. शत्रू संपत्ती संरक्षक एक असे कार्यालय आहे , ज्याची स्थापना केंद्र सरकारअंतर्गत झाली आहे . 1965 च्या भारत -पाकिस्तान युद्धानंतर 1968 मध्ये शत्रू मालमत्ता कायदा लागू करण्यात आला होता , जो अशा प्रकरणाच्या संपत्तींचे नियमन करतो आणि संरक्षकाचे अधिकार दर्शवितो .

एका अधिकृत अधिसूचनेनुसार , राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शत्रू मालमत्ता ( दुरुस्ती तसेच प्रमाणीकरण ) चतुर्थ अध्यादेश 2016 ला मंजुरी दिली आणि तो काल जारी केला . पहिला अध्यादेश एक जानेवारीला , दुसरा अध्यादेश दोन एप्रिलला आणि तिसरा अध्यादेश 31 मे रोजी जारी केला होता . तिसऱ्या अध्यादेशाची मुदत काल ( रविवारी) संपली. शत्रू मालमत्तेशी संबंधित विधेयक राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गुगलकडून गोव्यात इंटरनेट क्रांती

गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून मंगळवारी समझोता करारावर सह्या केल्या. राज्यातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणो व नववी ते बारावीर्पयतच्या विद्याथ्र्याना सुरक्षितपणो इंटरनेट कसा वापरणो याचे शिक्षण द्यावे असे लक्ष्य गुगल व राज्य सरकारने मिळून समोर ठेवले आहे.

राज्यातील सर्व लहान उद्योगांना ऑनलाईन आणले जाणार आहे. इंटरनेटवर त्यांना स्थान असेल. लघू व मध्यम स्वरुपाचे धंदे करणा:या व्यवसायिकांसाठी इंटरनेट सुरक्षा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच सरकारच्या सर्व वेबसाईट्स मोबाईलफ्रेण्डली केल्या जातील, असे गुगलचे वरिष्ठ अधिकारी राजन आनंदन यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत जाहीर केले.

गोव्याचा वैभवसंपन्न सांस्कृतिक वारसा जागतिक नकाशावर येईल. बीटेक,बीई आणि एमसीए अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकणा:या विद्याथ्र्यामध्ये अॅण्ड्रॉईड डेव्हलपर शिक्षण विकसित केले जाईल. गोव्यातील स्टार्टअप कम्युनिटीला पाठींबा दिला जाईल, असे आनंदन यांनी सांगितले. अतिशय वेगाच्या इंटरनेटचे अनेक फायदे असतात. दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर इंटरनेटचा वेग जेवढा आहे, तेवढा माङया कार्यालयात देखील नाही, असे आनंदन म्हणाले.

8क् हजार विद्याथ्र्याना शिक्षण
राज्यातील 46क् सरकारी हायस्कुलमधील नववी ते बारावीच्या 8क् हजार विद्याथ्र्याना इंटरनेट सुरक्षा शिक्षण दिले जाईल. इंटरनेटचा सुरक्षितपणो वापर कसा करावा याविषयी विद्याथ्र्याना शिक्षित करताना हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातच समाविष्ट केला जाणार आहे. सरकारने त्यासाठी मान्यता दिली आहे. तज्ज्ञांशी चर्चा व सल्लामसलत करून गुगलने तसा अभ्यासक्रम तयार केला आहे.

मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी विचार मांडले. गोव्याला ज्या प्रमाणो पर्यटनासाठी ओळखले जाते, त्याचप्रमाणो आयटीसाठीही ओळखले जावे असा आमचा प्रयत्न आहे. गुगलशी झालेला करार हा मैलांचा दगड आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, वरिष्ठ अधिकारी अमेय अभ्यंकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळ्ळ्य़ेकर उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील नवी दालने गोव्यासाठी हा करार खुली करील, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गोलंदाज श्रीकांत मुंढेचा इंग्लंडमध्ये विक्रम

रणजी क्रिकेटपटू श्रीकांत मुंढे याने इंग्लंडमधील क्लब क्रिकेट स्पर्धेत भेदक गोलंदाजी करत एकाच डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या लिव्हरपूल अँड डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये कॉल्विन बे क्लबकडून खेळताना श्रीकांत याने प्रतिस्पर्धी बर्कनहेड पार्कच्या संपूर्ण संघाला गारद केले. या स्पर्धेत एकाच डावात दहा विकेट्स घेणारा श्रीकांत हा पहिला गोलंदाज ठरला आहे. बर्कनहेड पार्क संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली होती. त्यांचा डाव १६८ धावांत संपुष्टात आला. मुंढेने २४.१ षटकांत ८५ धावांत दहा विकेट्स घेतल्या. श्रीकांतने मग नाबाद ४४ धावांची खेळी करून कॉल्विन बे संघाला मिळवून दिला. मुंढेने फलंदाजीतही चमक दाखवली. मुंढेच्या कॉल्विन बे संघाची ८ बाद १२६ अशी स्थिती झाली होती. त्यावेळी मुंढेने मैदानात टिच्चून फलंदाजी करत नाबाद ४४ धावांची खेळी साकारून विजयात महत्त्वाचा योगदान दिले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भातपिकासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम

रायगड जिल्ह्य़ात भातपिकाच्या सर्वेक्षणासाठी कृषी विभागाने एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दर आठवडय़ातून दोन वेळा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

हवामानातील बदल आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेतीची योग्य निगा राखली नाही तर हातातोंडाशी आलेले पीक नाहीसे होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे गरजेचे असते.

ही बाब लक्षात घेऊन भातपिकासाठी एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन आणि सर्वेक्षण कार्यक्रम कृषी विभागाने घेतला आहे.

याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ३ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र सर्वेक्षणासाठी निवडले जाणार आहे. दर आठवडय़ाला दोन वेळा या पिकाची कृषी विभागाच्या २८ स्काऊट्सच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. ही माहिती मोबाइल अॅपच्या माध्यमातून अपलोड केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ परिस्थितीच्या अहवालाचा अभ्यास करून कीडरोगाच्या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी सल्ला देणार आहेत. शेतकऱ्यांनी कुठली फवारणी करावी, कधी करावी, खताचे प्रमाण किती असावे, हवमानाचा परिणाम झाला तर काय उपाययोजना कराव्यात यासारखी माहिती दर आठवडय़ातून दोन वेळा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यामुळे कीडरोगाचे योग्य व्यवस्थापन करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्य़ात सरासरीच्या ६५ टक्के पाऊस झाला होता. मात्र पिकांची योग्य निगा राखल्याने भाताचे उत्पादन वाढले होते. या वर्षी जिल्ह्य़ात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही एक समाधानाची बाब आहे. कीडरोगाचे योग्य व्यवस्थापन केले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले तर या वर्षीही चांगले भात उत्पादन मिळू शकणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘कोठली’ राज्यातील पहिली शासकीय आयएसओ मानांकित आश्रमशाळा

भौतिक आणि शैक्षणिक सुविधांअभावी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा टिकेचे लक्ष होत असतानाच नंदुरबार जिल्ह्य़ातील कोठली शासकीय आश्रमशाळेने आदर्श प्रस्थापित केला आहे. राज्यातील पहिली आयएसओ शासकीय आश्रमशाळा होण्याचा बहुमान या शाळेने मिळवला आहे.

निकृष्ठ दर्जाचे जेवण, शैक्षणिक असुविधा यामुळे आंदोलने ही राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांची ओळख निर्माण झाली आहे. परंतु, आपली नकोशी असणारी ओळख मोडीत काढत नंदुरबार एकात्मीक आदिवासी प्रकल्पातंर्गत असणाऱ्या कोठली आश्रमशाळेने आयएसओ मानांकन मिळवून सुखद धक्का दिला आहे. दोन वर्षांंपासून या शाळेचा कायापालट करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सर्व कर्मचारी आणि शिक्षक, विद्यार्थ्यांंनी विशेष मेहनत केली. आश्रमशाळेत १२ वीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून सुमारे ६४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आश्रमशाळेत डिजीटल क्लासरुम, लहान विज्ञान केंद्र, भूगोल प्रयोगशाळा अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत. भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक सुविधांवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. दररोज चार तास अभ्यासासह विद्यार्थ्यांंनी या ठिकाणी स्वकष्टातून परसबाग फुलवली आहे. या परसबागेतील फळभाज्यांचा उपयोग दररोजच्या जेवणात केला जात आहे. शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून अनेक सुविधा उभारल्या आहेत. अशाच पद्धतीने प्रकल्पातील अजून १० आश्रमशाळा आयएसओ करण्याचा मानस प्रकल्पाधिकारी गजेंद्र केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. सर्व आश्रमशाळा कर्मचारी व विद्यार्थ्यांंच्या सांघिक कष्टाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक जगदीश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹झिकाचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्याचे सिंगापूरचे प्रयत्न

सिंगापूरमध्ये झिकाचे ४१ रुग्ण आढळले असून, त्यामुळे घबराट पसरली आहे. अधिकाऱ्यांनी संरक्षक सूट घालून कीटकनाशकांची फवारणी डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात केली आहे.घरोघरी जाऊन त्यांनी फवारणी केली. राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या निरीक्षकांनी उपनगरी जिल्हय़ात भेटी दिल्या व जेथे परदेशी बांधकाम कामगार राहतात तेथे तपासणी केली. तेथे डासांची पैदास वाढत असल्याचा संशय आहे. शेजारी देशांनी सिंगापूरमधून हा रोग त्यांच्याकडे पसरू नये यासाठी दक्षता घेतली आहे. त्यासाठी कीटकनाशकांची धुरळणी केली जात आहे. झिका रोगात अगदी सौम्य लक्षणे दिसतात. त्यात ताप, चट्टे यांचा समावेश असतो. ब्राझीलसह एकूण ५८ देशांत हा रोग आढळून आला आहे. गर्भवती महिलांच्या जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये मेंदूची वाढ कमी झालेली दिसून येते. त्याला मायक्रोसेफली असे म्हणतात. सिंगापूर हे दाट लोकवस्तीचे बेट असून, तेथे नेहमी पाऊस पडत असतो. तेथे आधीच डेंग्यूचा उपद्रव असताना आता झिका पसरत आहे.
 एडिस एजिप्ती या डासामुळे झिका व डेंग्यू या दोन्ही रोगांचा प्रसार होतो. निरीक्षकांनी प्रसाधनगृहे तसेच पाण्याची डबकी यांची तपासणी केली. डासांना मारण्यासाठी पंपाने धुरळणी करण्यात आले. सिंगापूर सरकारने झिकाचे ४१ रुग्ण असल्याचे सांगितले असून, त्यातील ३६ परदेशी बांधकाम कामगार आहेत. संबंधित कामगारांची राहण्याची ठिकाणे अस्वच्छ असून त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे असे सांगण्यात आले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹देशात महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर

यूपी आणि बिहार म्हणजे देशातील गुन्हेगारीची प्रमुख राज्ये असल्याची चर्चा आपण चवीने करतो . मात्र, केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने नुकतीच प्रसिद्ध केलेली आकडेवारी धक्कादायक व महाराष्ट्रासाठी डोळे उघडणारी आहे .
देशातील महिलांवर 2015 मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या एकूण घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 13 टक्के गुन्हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ मध्यप्रदेशात 9 . 9 , तर उत्तर प्रदेशात 8 . 7 टक्के एवढे महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण आहे . महाराष्ट्रात महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या 11 हजार 713 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच , भारतीय दंडविधानाच्या कलमांनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे 16 हजार 989 गुन्हे झाले .

महाराष्ट्रात 2014 मध्ये बलात्काराचे 3438 गुन्हे दाखल झाले होते . तसेच , 2013 मध्ये महिलांविरोधात महाराष्ट्रात एकूण 24 हजार 895 गुन्ह्यांची नोंद झाली होती .

महत्वाच्या शहरातील दखलपात्र गुन्हे
दिल्ली - 1 , 73 , 947
अहमदाबाद - 15964
पुणे - 15349
मुंबई - 42940
नागपूर - 11018
औरंगाबाद - 7051
चेन्नई- 13422
बंगळूर - 35576
भोपाळ- 14857

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹रौप्य पदक न स्वीकारण्याचा योगेश्वरचा निर्णय

भारताचा मल्ल योगेश्वर दत्त याने आज ( बुधवार ) मनाचा मोठेपणा दाखवित एक निर्णय घोषित केला . दत्त याने लंडन ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकाऐवजी त्याला रौप्य पदक मिळण्याची आशा निर्माण झाली होती . ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा रशियाचा बेसिक कुडुकोव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याचे पदक काढून घेण्याचा आणि ते योगेश्वरला बहाल करण्याचा निर्णय झाला.
मात्र योगेश्वर याने हे पदक न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे . याच्या कुटूंबीयांनीच हे रौप्य पदक त्यांच्याकडे ठेवावे , असे मत दत्त याने या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केले .

कुडुकोव हा कुस्तीतील सर्वोत्तम खेळाडू होता . त्याने चार वेळा जागतिक विजेतेपद मिळविले होते . ऑलिंपिकची दोन पदकेही त्याच्या नावावर आहेत. लंडन ऑलिंपिक स्पर्धेनंतर घेण्यात आलेल्या त्याच्या चाचणीचे नमुने पुन्हा तपासण्यात आल्यावर तो दोषी आढळल्याचे निश्चित झाले . दुर्दैव म्हणजे लंडन ऑलिंपिकच्या रुपेरी यशानंतर एक वर्षाने कार अपघातात त्याचे निधन झाले . ‘ वाडा’ ने बंदी घातलेली औषधे वरचेवर घेत असल्याचे त्याच्या चाचणीतून सिद्ध झाले .

या निर्णयामुळे लंडन ऑलिंपिक स्पर्धेतील ६० किलो वजनी गटातील रौप्यपदक ब्राँझ विजेत्या योगेश्वरला देण्यात आले . योगेश्वर उपउपांत्यपूर्व फेरीत कुडुकोव याच्याकडूनच पराभूत झाला होता . पुढे कुडुकोव याने अंतिम फेरी गाठल्यामुळे योगेश्वरला रेपीचेज गटातून ब्राँझची लढत खेळण्याची संधी मिळाली होती .

"" कुडुकोव हे खूपच चांगले पैलवान होते . त्यांच्या मृत्युनंतर ते उत्तेजक चाचणीत दोषी आढळणे दु : खद आहे . एक खेळाडू म्हणून मी त्यांचा आदर करतो . यामुळे ते रौप्य पदक त्यांच्या कुटूंबीयांकडेच राहू दिले जावे . त्यांच्या कुटूंबीयांसाठीही हे सन्मानजनक असेल . माझ्यासाठी मानवी संवेदना सर्वश्रेष्ठ आहे , '' अशी भावना दत्त याने व्यक्त केली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जीएसटीमधून आम्हाला हवी सूट : ई - कॉमर्स कंपन्या

 देशभरात वेगाने विस्तारणाऱ्या ई -कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी स्वतःला वस्तू व सेवा करातून ( जीएसटी ) सूट देण्याची मागणी केली आहे . आम्ही विक्रेता आणि ग्राहक यांच्या पार पडणाऱ्या व्यवहारासाठी केवळ एक मंच उपलब्ध करुन देतो व यातून होणाऱ्या विक्रीत कोणताही फायदा मिळत नाही असा युक्तिवाद ई - कॉमर्स कंपन्यांतर्फे करण्यात आला आहे . परंतु राज्याच्या अर्थमंत्र्यांना ही मागणी मंजुर नसल्याचे दिसत आहे .

संसदेत जीएसटी विधेयकाला मंजुरीनंतर राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या झालेल्या पहिल्या बैठकीत ऑनलाईन रिटेल विक्रेत्यांनी ही मागणी केली . फ्लिपकार्ट , अॅमेझॉन इंडिया व स्नॅपडीलसारख्या कंपन्या केवळ सेवा पुरवितात आणि केवळ सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू नये असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला . पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी कंपन्यांच्या अब्ज डॉलरमधील मूल्यांकनाविषयी विचारले असता कंपन्यांनी सांगितले की , त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत जाहीराती आहेत व यावर त्या सेवा कर देतात . या कंपन्यांची अब्जावधींची उलाढाल असूनदेखील त्या कोणताही कर भरत नसल्याचा मुद्दा मित्रा यांनी मांडला होता .

" ऑनलाईन उत्पादने खरेदी करणारे ग्राहक मूल्यवर्धित करत देतात . विक्रेते उत्पादन शुल्क भरतात . परंतु ई - कॉमर्स कंपन्यांचे काम केवळ ग्राहकांपर्यंत माल पोचविण्याचे आहे असा समज असल्याने त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही , ' असे मित्रा म्हणाले होते . या पार्श्वभूमीवर , या कंपन्यांना अशा प्रकारे सूट देण्याचे कोणतीहि संकेत समितीकडून देण्यात आलेले नाहीत .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांनाही 'आरटीई '

राज्यातील आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांनाही शिक्षण हक्क कायदा ( आरटीई ) लागू होतो , असे राज्य सरकारने आज ( ता. 30 ) उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे यासंदर्भातील संभ्रमावस्था दूर झाली आहे .

असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्कूलने यासंदर्भात सादर केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्या वेळी सरकारने स्पष्टीकरण दिले . मर्सिडीज बेंझ इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण अधिकाऱ्याने यासंदर्भात नोटीस देऊन या कायद्यानुसार कामकाज करण्यास सांगितले होते. त्यास या असोसिएशनने खंडपीठापुढे आव्हान दिले होते . आमचे इंटरनॅशनल बोर्ड असल्याने आम्हाला हा कायदा लागू नसल्याचा त्यांचा दावा होता , तो सरकारने खोडून काढला. या शाळांनाही सरकारनेच जमिनी दिल्या आहेत, शाळा उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते . त्यामुळे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांनाही हा कायदा लागू होतो , असे सरकारी वकील म्हणाले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अवयव प्रत्यारोपणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म - देवेंद्र फडणवीस

अवयव प्रत्यारोपणाबाबत पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकार डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . अवयव प्रत्यारोपणातील रॅकेट होऊ नये यासाठी हे व्यासपीठ असावे , अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली .

राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे . त्यांची सुरुवात मुंबईत वॉकेथॉनला झेंडा दाखवत केली . त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अवयव प्रत्यारोपणातील गैरव्यवहार थांबविण्यासाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांगितले . अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित वाटेल असे हे व्यासपीठ असेल, असे ते म्हणाले . प्रत्यारोपणातील रॅकेट थांबविण्यासाठी असे व्यासपीठ निर्माण करणार असल्याचे नमूद केले. 08 टक्के एवढे अवयव दान होते . तर रुग्णांची संख्या अनेक पट मोठी आहे . अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आता ' एटीएम 'मधून नोंदवा मोबाईल क्रमांक

 कोणत्याही बॅंकेच्या "एटीएम ' मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत .

अलिकडच्या काळात बॅंकिंग व्यवहारासाठी मोबाईल क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे . आपला मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी ग्राहकांना पूर्वी त्यांच्या मूळ शाखेत जाणे गरजेचे होते . मात्र त्यानंतर कोणत्याही शाखेत मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्यात आली . आता आरबीआयने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. शिवाय इंटरनेट बॅंकिंगद्वारेही मोबाईल क्रमांक नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हडप्पाकालीन ' धोलविरा' बंदर त्सुनामीमुळे नष्ट ?

" एनआयओ' चे संशोधन ; नगररचनेचा नव्याने अभ्यास

पणजी - गुजरातमधील अतिप्राचीन हडप्पाकालीन धोलविरा हे बंदर त्सुनामीमुळे नष्ट झाले असावे , असा कयास "सीएसआयआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी '(एनआयओ ) या संस्थेतील संशोधकांनी व्यक्त केला आहे . "धोलविरा ' हे बंदर प्राचीन नगररचनेचा आदर्श नमुना म्हणून ओळखले जाते. त्या काळी त्सुनामी हे सामान्य संकट होते , त्सुनामीच्या अक्राळविक्राळ लाटांनीच धोलविराचा बळी घेतला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे .

धोलविरामध्ये राहणाऱ्या लोकांनी त्सुनामीचा धोका आधीच ओळखला होता , तटरक्षक व्यवस्थापनाचा पायादेखील त्यांनी आधीच घातला होता . आतापर्यंत हे शहर नष्ट होण्यासाठी अनेक कारणांना जबाबदार धरले जात होते; पण नव्या संशोधनातून प्रथमच त्सुनामीचा धोका स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे , असे "एनआयओ ' चे संचालक डॉ . एस . डब्लू . ए . नक्वी यांनी सांगितले . धोलविरा बंदराच्या भिंतींची रचना संशोधनाचा विषय ठरली असताना ताज्या संशोधनातून काही नवे निष्कर्ष पुढे आल्याचे शोध पथकाचे प्रमुख राजीव निगम यांनी सांगितले .

धोक्याची माहिती
धोलविरातील घरांच्या भिंतींची रचना नैसर्गिक संकटांना डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आली आहे . वादळ आणि त्सुनामींचा धोका बंदरांवरील लोकांना आधीपासून होता , असे नक्वी यांनी म्हटले आहे . तब्बल दीड हजार वर्षांपूर्वी धोलविरा भरभराटीच्या सर्वोच्च बिंदूला पोचले होते . या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांतून शहराचे किल्ले , वरील आणि खालील शहर असे तीन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे .

भिंतींची जाडी
धोलविरा शहरामधील घराच्या भिंतींची जाडी साधारणपणे 14 ते 18 मीटर दरम्यान आहे . संभाव्य संकटांचा विचार करूनच एवढ्या रूंद भिंती उभारल्या गेल्या असाव्यात , असा संशोधकांचा दावा आहे . प्राचीन काळी जेव्हा शस्त्रविद्येचा विकास झाला होता तेव्हादेखील एवढ्या कणखर भिंती बांधण्यात आल्या नव्हत्या , असे संशोधकांनी म्हटले आहे .

याचा अभ्यास
या संशोधनासाठी धोलविराच्या साइटचा संशोधकांनी अभ्यास केला . या संशोधकांमध्ये पुराहवामानशास्त्र , पुरातत्त्वशास्त्र आणि भूभौतिकशास्त्रज्ञही सहभागी झाले होते . ग्राउंड पेनेट्रेटिंग रडारचा वापर करून मातीच्या विविध नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला होता . दरम्यान , धोलविरात उत्खननामध्ये सापडलेल्या जीवाश्मांच्या अवशेषांचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दलित अत्याचार घटले पण मानवी तस्करी वाढली

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांमध्ये दलित अत्याचारांच्या घटनांवर राजकीय वातावरण तापले असताना देशभरात दलित , आदिवासी आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये घट झाल्याचा दावा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेने ( एनसीआरबी ) केला आहे . मात्र लहान मुलांवरील अत्याचार आणि मानवी तस्करीमध्ये वाढ झाल्याचे एनसीआरबीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे .

गेल्या वर्षभरातील गुन्हेगारीचे चित्र मांडणारा " क्राइम इन इंडिया - 2015 ' या " एनसीआरबी' च्या अहवालाचे आज गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रकाशन झाले . सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तसेच 53 मोठ्या शहरांमधील गुन्हेगारीविषयक आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे .

" एनसीआरबी' च्या अहवालानुसार 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 4 . 4 टक्क्यांनी घट झाली आहे . तर अनुसूचित जमातीवरील अत्याचारांच्या घटनादेखील 4 . 7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हेही 2014 च्या तुलनेत 3 . 1 टक्क्यांनी घटले आहेत. परंतु बालकांसंबंधी गुन्ह्यामध्ये 5 . 3 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. या गुन्ह्यांमध्ये 44 . 5 टक्के अपहरणाचे गुन्हे आहेत. मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये 25. 8 टक्के इतकी वाढ झाली आहे . दरम्यान , भारतीय दंड संहितेअंतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्याचे प्रमाण 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये 46. 9 टक्क्यांनी वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे .

गुन्हे घटले -2014 -2015
दलित अत्याचार -47064 -45003
आदिवासी अत्याचार -11451 -10914
महिला अत्याचार -337922 -327394

गुन्हे वाढले -2014 -2015
बालकांसंबंधी - 89423- 94172
मानवी तस्करी - 5466 -6877

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹देशातील दहा हागणदारीमुक्त शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचचा समावेश

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या दहा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या शहरांसह हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि.सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. राज्यस्तरीय यंत्रणेकडून याबाबतच्या कार्यवाहीचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून तपासणी झाल्यानंतर ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्प्यात राज्यातील दहा शहरांची या संस्थेकडून तपासणी सुरु आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत. राज्यात नगरविकास विभागाकडून या अभियानाची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने पुढील वर्षांत पूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ऑल इंडिया रेडिओवर लवकरच बलुचीमध्येही ऐकायला मिळणार कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकिस्तानसह अनेक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींनी बलुचिस्तानातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडल्यानंतर बलुची नागरिकांना मोदींचे आभार तर मानलेच शिवाय बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले जात आहे. आता बलुची नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून ऑल इंडिया रेडिओने (एआयआर) बलुची भाषेत कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एआयआरच्या वतीने बलुची भाषेत एक बुलेटिन सुरू होण्याची शक्यता असल्याचे प्रसारभारतीच्या सूत्रांनी माहिती दिली. या प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

बलुची नागरिकांनी पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यासाठी मदत मागितली असून जर्मनी शहरात बलुची समर्थकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹टेन स्पोर्ट्स चॅनेलसाठी सोनी पिक्चरने मोजले २५७९ कोटी

झी मिडिया नेटवर्कने आपल्या टेन स्पोर्ट्स या खेळांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची विक्री केली आहे. सोनी पिक्चरने तब्बल २५७९ कोटींना या वाहिनीचे मालकी हक्क विकत घतले. झी मिडियाने टेन स्पोर्ट्स ही वाहिनी २००६ मध्ये अब्दुल रेहमान बुख्तरी ताज ग्रुपकडून खरेदी केले होते.

 सोनी पिक्चरने ही रक्कम रोख स्वरुपात दिली आहे. त्यामुळे आता टेन १, टेन १ एचडी, टेन २, टेन ३, टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट तसेच टेन स्पोर्ट्स या वाहिनीचे अधिकार सोनी पिक्चरला प्राप्त झाले आहेत. भारतासह सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व आशिया आणि कॅरेबियन या देशात टेन स्पोर्ट्स वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. टेन स्पोर्ट्स क्रिकेट, फुटबॉलसह फाईट स्पोर्ट्स यासारख्या खेळांचे राष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील खेळांचे प्रक्षेपण केले जाते. झी नेटवर्कने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपनींमध्ये करार पूर्ण झाला आहे. हा सर्व व्यवहार रोखीत झाल्याचे सांगण्यात येते. झी मीडिया ही वाहिनी विकत घेण्यापूर्वी दुबईस्थित ताज टेलिव्हिजनकडून याचे नियंत्रण केले जात होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

इंग्लंडचा कर्णधार आणि आधारस्तंभ वेन रुनीने निवृत्तीची वेळ पक्की केली आहे. २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषकानंतर रुनी इंग्लंडकरता खेळणार नाही.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आणखी ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

आयकर विवरणपत्राची आणि लेखा परीक्षण लेख्याची प्रत नोटीस बजावल्यानंतरही सादर न करणाऱ्या आणखी ५७ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे आता नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या २४८ झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३६५ राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश आहे. आयकर विवरणपत्र व लेखापरीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटिस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.​ नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांना मुक्त चिन्ह वाटपात प्राधान्य मिळणार नाही.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले

ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (६८) यांना बुधवारी पदावरून हटविण्यात आले. राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राष्ट्रपतींना हटविण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असते. आजच्या या महाभियोगात ८१ पैकी ६१ सिनेटर्सनी त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले. यामुळे डाव्या विचारांच्या १३ वर्षांच्या शासनाचा अंत झाला आहे.

दरम्यान, मायकेल टेमर हे आता ब्राझीलचे नवे राष्ट्रपती असतील. इलेक्ट्रॉनिक वोटिंग स्क्रीनवरील ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक सिनेटर्सच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दरम्यान, डिल्मा रोसेफ यांच्या निवासस्थानाबाहेर पन्नासहून अधिक डाव्या विचारांचे आंदोलक त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले होते. लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमचे आंदोलन असल्याचे ते सांगत होते. राजधानीत अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

तत्पूर्वी सोमवारी १४ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत आपली बाजू मांडताना डिल्मा रोसेफ यांनी सांगितले की, आपण निर्दोष आहोत. बेरोजगारी आणि महागाईमुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना राजकीय पातळीवरही देशात वर्षभरापासून असंतोष होता.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ

परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली. त्यामुळे दोन्ही देशांना आता दुरुस्ती आणि वस्तू पुरवठयासाठी परस्परांचे तळ वापरता येतील.
हा करार म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत चालले आहेत.

अन्य जवळच्या सहका-यांप्रमाणेच भारता बरोबर संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञान शेअरींग वाढवणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली. या करारामुळे संयुक्त मोहिम, सरावा दरम्यान भारत आणि अमेरिकन नौदलाला परस्परांना मदत करणे अधिक सोपे झाले आहे असे पर्रिकर यांनी सांगितले.

🚫जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे

🔹जागतिक आरोग्य संघटनेने जगातील हवेच्या दर्जा बाबत 3000 शहरांचा अभ्यास करून सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली 15 मे 2016.

🔸यामध्ये इराण मधील झाबेला हे सर्वाधिक जगातील प्रदूषित शहर होय.

🔷पहिल्या 10 मध्ये भारताच्या 4 शहरांचा समावेश आहे.🔷

➡ग्वालहेर (दूसरा),

➡अलाहाबाद (तिसरा),

➡पटना (चौथा),

➡रायपूर (पाचवा) क्रमांकावर आहे.

➡दिल्ली यादीत 9 व्या स्थानावर आहे.

🔹मागच्या वर्षीच्या अहवालात (2014-15) दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर होते.

🔸मागच्या अहवालात (20 पैकी 13 प्रदूषित शहरे भारताची होती.

🔷पहिल्या पाच शहरामधील हवेचा घातक अशी pm 2.5 चे प्रमाण आत्याधिक आहे. झाबोला मधील pm 2.5 चे प्रमाण 217 इतके आहे. या यादीत 103 देशांचा अभ्यास करण्यात आला.

🔹PM म्हणजे Particulate Matter (धुळीचे कण)

 

       📛जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक📛

🔶ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकाच्या 168 देशांच्या यादीत भारत 76 व्या क्रमांकावर (मागील वर्षी 85 व्या स्थानावर होता)

🔶जागतिक बँक व आशिया विकास बँकेच्या माहितीच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो.

🔷168 देशांच्या यादीत डेन्मार्क सर्वोच्च स्थानी लागोपाठ दुसर्‍या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे.

🔸1 ला-डेन्मार्क,

🔹2 रा-फिनलंड,

🔸3 रा-स्वीडन,

🔹4 था-न्यूझीलँड,

🔸5 वा-नेदरलँड

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा