Post views: counter

Current Affairs October 2016 Part - 2

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पालघरमध्ये बाल उपचार केंद्र

मुंबई - मोखाडा, जव्हार तालुक्यांतील कुपोषणग्रस्त बालकांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठ नवीन बाल उपचार केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत यांनी आज येथे दिली .
कुपोषण निर्मूलन आणि कुपोषित बालकांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले , की पालघर जिल्ह्यात सध्या मोखाडा, विक्रमगड , वाडा, डहाणू येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बाल उपचार केंद्रे कार्यान्वित आहेत. साधारण 20 खाटांचे हे उपचार केंद्र असून , उपजिल्हा जव्हार येथे पोषण व पुनर्वसन केंद्र सुरू आहे . त्या माध्यमातून कुपोषित बालकांवर उपचार सुरू आहेत.

जव्हार , मोखाडा तालुक्यांत आठ नवीन बाल उपचार केंद्रे या भागात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला . जव्हार तालुक्यातील जामसर , साकूर , नांदगाव, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर मोखाडा तालुक्यातील खोडाळा , आसे, मोऱ्हांडी, वशाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवीन बाल उपचार केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील .
याबरोबरच या भागातील कुपोषित बालकांच्या तपासणीसाठी बालरोग तज्ज्ञांमार्फत आठवड्यातून दोन वेळेस शिबिरे आयोजित केली जात आहेत. मनोर , पालघर , विक्रमगड , वाडा, तलासरी , मोखाडा , जव्हार येथे अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जात आहेत. बाल उपचार केंद्र, पोषण व पुनर्वसन उपचार केंद्र, व्हीसीडीसी आणि आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या बालकांच्या घरी एएनएम, आशा , आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून दररोज फेरतपासणी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने आजाराची लक्षणे, वजन , उंची यांच्या साप्ताहिक नोंदी ठेवल्या जातील . या बालकांमध्ये होणाऱ्या साप्ताहिक बदलांच्या नोंदीदेखील ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानुसार उपचार करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अपारंपरिक ऊर्जानिर्मिती वाढविण्याचे उद्दिष्ट

मुंबई - देशातील विजेच्या एकूण गरजेमध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाटा 2022 पर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे ; तर 2030 पर्यंत एकूण वीजपुरवठ्यात सौरऊर्जेचा 40 टक्के वाटा असेल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी बडोदा येथील " स्वीच 2016 ' परिषदेत दिली .


स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे . अधिकाधिक स्वच्छ अशा अपारंपरिक स्रोतांतून वीजनिर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे . त्यासाठी सौर , जलविद्युत प्रकल्पांबरोबरच इतर अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून वीजनिर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे . गेल्या काही वर्षांमध्ये सौरऊर्जेचे प्रकल्प सुरू झाल्याने आपण त्या ऊर्जेवर अधिकाधिक अवलंबून राहणार आहोत , असे गोयल यांनी स्पष्ट केले. विजेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्षमता वाढत असताना गुजरातने या प्रक्रियेत घेतलेल्या आघाडीचाही त्यांनी या वेळी उल्लेख केला . ते म्हणाले , की गुजरातमध्ये सध्या सर्वाधिक सौरऊर्जेची निर्मिती होत आहे . " स्वीच ' सारख्या परिषदेतून गुजरातची नवी ओळख निर्माण होण्यास त्यामुळे नक्कीच मदत होईल .

एलईडीतही गुजरातचा प्रकाश

एलईडी बल्ब वापरण्यातही गुजरातचा उल्लेखनीय वाटा असल्याचे गोयल या वेळी म्हणाले . देशात आतापर्यंत 16 कोटी 78 लाख एलईडी बल्ब अवघ्या 17 महिन्यांत लागल्याची आणि त्यात गुजरातचा वाटा 25 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली . गुजरातमध्ये बडोद्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 80 लाख बल्ब लागले असल्याचेही त्यांनी सांगितले .

23 टक्के उद्योग बडोद्यात

वीज क्षेत्रातील उद्योगांमध्ये एकट्या गुजरातमध्ये 23 टक्के उद्योग आहेत, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली . गुजरातमध्ये आतापर्यंत विजेची सर्वाधिक मागणी 25303 मेगावॉट इतकी आहे . सौरऊर्जेद्वारे 1127 मेगावॉट , तर पवन ऊर्जेतून चार हजार मेगावॉट वीजनिर्मिती गुजरातमध्ये होत असल्याचेही ते म्हणाले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पॅन कार्डमधून शेतकऱ्यांना सूट

मुंबई - सरकारकडून विविध लाभांच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना कोषागारातून निधी दिला जातो ; परंतु 5 हजार रुपयांवरील रकमेचे प्रदान थेट स्टेट बॅंकेद्वारे संचलित सी . एम. पी. द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे . या प्रणालीद्वारे रकमेचे प्रदान करण्याकरिता पॅन कार्ड क्रमांक अनिवार्य आहे . शेतकऱ्यांकडे पॅन कार्ड नसल्याने अशी रक्कम देताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसंदर्भातील रकमांचे प्रदान सी . एम . पी पोर्टलद्वारे करताना शेतकऱ्यांना पॅन कार्डची माहिती सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे . यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात विविध योजनांपासून मिळणाऱ्या लाभाच्या रकमा थेट आणि त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील . राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मुंबईकरांना 'रोप वे'नं प्रवास करता येणार

उपनगरांतून मुंबईत येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खूशखबर आहे. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएनं 'रोप वे' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लवकरच माथेरान, नवी मुंबई-घाटकोपर, बोरीवली-ठाणे या दरम्यान 'रोप वे' उभारण्यात येणार आहेत.

गर्दीमुळं रेल्वेतून मुंबईत येणारे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यांची या कोंडीतून सुटका व्हावी; तसंच त्यांना कमी वेळेत आणि खर्चात मुंबईत येता यावं, यासाठी एमएमआरडीएनं 'रोप वे' योजना हाती घेतली आहे. राज्य आणि देशभरातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठीही 'रोप वे' सेवा मेजवानी ठरेल.

भिवपुरी रोड स्थानक- माथेरान, नवी मुंबई-घाटकोपर, बोरीवली - ठाणे या दरम्यान हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

असा असेल हवाई प्रवास!

>> संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे-घोडबंदर रोड ११ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

>> नवी मुंबईतील वाशी येथील सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपोदरम्यानच्या या ८ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी अंदाजे ८०० ते ९०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

>> भिवपुरी रेल्वे स्थानक ते माथेरानमधील गार्बेट लॉर्ड्स गार्डनपर्यंत साधारण साडेतीन किलोमीटरचा हा प्रकल्प असणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारतात सेवा क्षेत्राची वाढ संथ गतीने

नवी दिल्ली - सेवा क्षेत्राची वाढ संथ गतीने होत असून मागणी रोडावल्याने या क्षेत्राचा निर्देशांक गेल्या महिन्यात खालावत असल्याची स्थिती आहे . गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये हा दर 52 अंश नोंदला गेला आहे . " निक्केई इंडिया ' सेवा खरेदी व्यवस्थापकाचा निर्देशांक ( पीएमआय) यापूर्वीच्या महिन्यात , ऑगस्टमध्ये 54 . 7 टक्के असा 43 महिन्यांच्या उच्चांकावर होता .

यावर्षी सेवा क्षेत्राचा निर्देशांक कमी झाल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे , त्यामुळे या क्षेत्रामध्ये उपाययोजना करण्याची गरजही भासू लागली आहे . जागतिक तसेच देशांतर्गत बाजारपेठेत सेवा क्षेत्राची मागणी कमी झाल्याने असे परिणाम दिसू लागले आहेत. 50 टक्क्यांवरील सेवा क्षेत्राचा प्रवास समाधानकारक मानला जातो . सप्टेंबरच्या रूपात सलग 15 महिन्यांत तो या पातळीपेक्षा वर राहिला आहे . पेट्रोल अन्नधान्याच्या चढ्या किमती
अन्नधान्य तसेच पेट्रोल आदींच्या किमती सप्टेंबरमध्येही चढ्याच राहिल्या आहेत.

 खासगी कंपन्यांच्या परिचलन खर्चाचा वाढता दबाव या क्षेत्रावर आहे . सेवा तसेच निर्मिती क्षेत्रातील रोजगारामध्ये अधिक प्रमाणात हालचाल नाही, असे स्पष्ट करत विशेषत: खासगी क्षेत्रातही हीच स्थिती असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे . मासिक तुलनेत निर्मिती क्षेत्राचा प्रवासही गेल्या महिन्यात घसरला होता . ऑगस्टमधील 52 . 6 टक्क्यांवरून तो 52 . 1 टक्क्यांपर्यंतची आकडेवारी सोमवारीच जाहीर झाली होती . एकूण सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राची मागणी कमी राहिली आहे . मात्र उद्योगांकडून नवीन मागणी वाढली आहे . खासगी क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹" ई - नाम 'च्या पहिल्या टप्प्यात दहा राज्ये

नवी दिल्ली - देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एका व्यासपीठावर आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी " ई - नाम ' ( राष्ट्रीय कृषी बाजार ) पोर्टलशी पहिल्या टप्प्यात दहा राज्यांतील 250 बाजार समित्या जोडल्या आहेत. तसेच , 14 राज्यांमधून 399 बाजार समित्यांचे प्रस्ताव त्यासाठी केंद्राकडे आले आहेत. कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .

या वर्षी 14 एप्रिलला " ई - नाम ' पोर्टल सुरू झाले होते , तर 30 सप्टेंबरपर्यंत 200 बाजार समित्यांना " ई - नाम ' शी जोडण्याचे उद्दिष्ट होते . ते सहजपणे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले . आतापर्यंत या व्यासपीठाशी आंध्र प्रदेशातील बारा , छत्तीसगडमधील पाच , गुजरातमधील 40 , हरियानातील 36 , हिमाचल प्रदेशातील सात, झारखंडमधील आठ , मध्य प्रदेशातील 20 , राजस्थानातील 11 , तेलंगणमधील 44 आणि उत्तर प्रदेशातील 67 बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत. याखेरीज 14 राज्यांमधून 399 बाजार समित्यांच्या आलेल्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे , असे ते म्हणाले .

" ई - नाम ' च्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटीहून अधिक टन शेतीमालाची खरेदी -विक्री झाली असून , तब्बल 421 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे . 1 . 60 लाखावर शेतकरी , 46 हजारांहून अधिक व्यापारी, सुमारे 26 हजार कमिशन एजंट यांचीही नोंदणी ई - नामवर झाली आहे . धान्य , कडधान्य , तेलबिया , मसाले, फळे , भाज्या आदी 69 प्रकारच्या शेतीमालाची खरेदी - विक्री "ई - नाम ' वर करण्याची मुभा देण्यात आली आहे , अशी माहितीही राधामोहनसिंह यांनी दिली .

मार्च 2017 पर्यंत 400 बाजार समित्यांना "ई -नाम ' शी जोडण्याची कृषी मंत्रालयाची योजना आहे . मार्च 2018 पर्यंत देशभरातील सर्व 585 बाजार समित्या या व्यासपीठाशी जोडल्या जातील . त्यासाठी महाराष्ट्र , कर्नाटक , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , हरियाना आदी 17 राज्यांनी आपल्या बाजार समिती कायद्यामध्ये अंशतः आणि पूर्ण बदल केला आहे . तमिळनाडू , ओडिशा , आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांनी बदलाची तयारी दर्शविली आहे ; मात्र बिहार , केरळ , मणिपूर , अंदमान आणि निकोबार , लक्षद्विप , दादरा नगर हवेली , दीव - दमण या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाजार समिती कायदा नाही . त्या पार्श्वभूमीवर कायदा बनविण्यासाठी बिहार आणि केरळशी केंद्राची चर्चा होणार आहे .

" ई- नाम ' मधून . . .
1 . 5 कोटी टन - शेतीमालाची खरेदी - विक्री
421 कोटी रुपये - उलाढाल
1 . 60 लाख - शेतकरी
46 हजार - व्यापारी
26 हजार - कमिशन एजंटांची नोंदणी
69 - प्रकारच्या शेतीमालाची खरेदी - विक्री

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हैतीमध्ये 'मॅथ्यू' वादळानेे घेतले ३०० हून अधिक बळी

कॅरेबियन देश हैतीला मॅथ्यू वादळानं जोरदार तडाखा दिला आहे. यात ३०० हून अधिक जण मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत २८३ लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी देण्यात आली आहे. हजारो घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, हे वादळ अमेरिकेतील फ्लोरिडात येण्याची शक्यता असल्यानं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹घाना विद्यापीठातील गांधीजींचा पुतळा हटविणार

आक्रा - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विद्यापीठातील पुतळा हलविण्याचा विचार येथील सरकार करीत आहे . गांधीजी हे वर्णद्वेषी होते, असा दावा येथील टीकाकारांनी केला असून , यावर उद्भवलेल्या वादामुळे पुतळा हटविणार असल्याचे सांगण्यात आले .

नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पुतळ्याच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे , असे सरकारने स्पष्ट केले. गांधीजींच्या या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जून महिन्यात झाले होते. गांधीजींचा पुतळा हटवावा , अशी याचिका विद्यापीठातील प्राध्यापकांनी गेल्या महिन्यात केली होती . सुरक्षेसाठी हा पुतळा विद्यापीठातून हलवून अन्यत्र उभारणार असल्याचे घानाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले .

मात्र , या पुतळ्याचे विद्यापीठातून केवळ स्थलांतर करणे पुरेसे नाही , तर तो पुन्हा भारतात पाठविण्याची मागणी याचिकाकर्त्या प्राध्यापकांपैकी ओबाडेल काम्बोन यांनी सरकारला केली आहे . घानात अन्यत्र हा पुतळा उभारण्यास फारसा प्रतिसाद मिळणार नाही , असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र , प्राध्यापकांच्या " पुतळा हटाव' या मोहिमेचा परिणाम भारत - घानामधील द्विपक्षीय संबंधावर होईल , अशी भीती सरकारने काढलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे .

" स्थानिक नेत्याचा पुतळा उभारा '
आक्रा येथील विद्यापीठ परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याऐवजी स्थानिक नेत्याचा पुतळा उभारणे गरजेचे आहे , असे प्राध्यापकांनी म्हटले आहे . ब्रिटिशांविरोधात आवाज उठविणारे या असांतेवा किंवा घानाचे पहिले अध्यक्ष क्वामे क्रुमा यांचा पुतळा उभारणे योग्य ठरेल , असे त्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कोलंबियन राष्ट्राध्यक्षांना शांततेचे नोबेल

जिनेव्हा - जुआन मॅन्युएल सांतोस या कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यासंदर्भातील औपचारिक घोषणा आज ( शुक्रवार) करण्यात आली .
कोलंबिया व येथील "फार्क' बंडखोरांच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या सांतोस यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात येणार आहे .

" हे पारितोषिक म्हणजे प्रचंड कष्ट व अत्याचार सहन करत असूनही शांततेची आशा न सोडलेल्या कोलंबियामधील जनतेस व शांतता प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना देण्यात आलेली मानवंदना आहे . या यादवी युद्धामुळे अत्याचार सहन करावा लागलेल्या अगणित पीडितांचे स्मरणही या पारितोषिकाच्या माध्यमामधून आम्ही करत आहोत , '' असे नोबेल समितीने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे .

कोलंबियामधील यादवी युद्धामुळे दोन लाखांपेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून साठ लाखांपेक्षाही जास्त जण विस्थापित झाले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जितूचा वर्ल्डकप रौप्यवेध

बोलोग्ना : रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेला पिस्तुल नेमबाज जितू रायने इटलीत सुरू असलेल्या वर्ल्डकप नेमबाजीत ५० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक जिंकून आत्मविश्वास वाढवला. चीनच्या वै पँगने या प्रकारात सुवर्ण जिंकले. त्याने १९०.६ गुणांची कमाई केली तर जितूला १८८.८ मिळवता आले.

 इटलीच्या जिओरडॅनोने ब्राँझ पटकावले. जितूने या कामगिरीनंतर ट्विट केले की, रिओनंतर मी इटलीत प्रथमच खेळत होतो. रिओतील माझी कामगिरी चांगली झाली नाही. पण यावेळी राष्ट्रीय विक्रमासह मी रौप्य जिंकले. माझ्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. मी सेनादल, राष्ट्रीय नेमबाजी फेडरेशन व ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट यांचा आभारी आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल १० नेमबाज भाग घेतात. भारतीयांनी मला या स्पर्धेसाठी जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

जितूच्या या कामगिरीबद्दल ऑलिम्पिक सुवर्णविजेता अभिनव बिंद्राने जितूचे अभिनंदन केले. त्याने पुढील चार वर्षांसाठी आपला कार्यक्रम आखावा अशी सूचनाही अभिनवने केली आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये जितूला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले तर ५० मीटरमध्ये तो १२व्या स्थानावर फेकला गेला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कुपोषण निवारणासाठी ७५ लाखांचा निधी

ठाणे-पालघर जिल्ह्य़ांतील कुपोषणाचा मुद्दा समोर आला असताना रायगड जिल्ह्य़ातही १४१ तीव्र कुपोषित आणि ९६८ कुपोषित बालके आढळून आली होती. तर निधीआभावी ‘‘अमृत आहार’’ योजनेचा बोजवारा उडाला होता. याप्रश्नाबाबात ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या मान्यतेने कुपोषणनिवारणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपाययोजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण योजना उपक्रमासाठी २५ लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजनाअंतर्गत ५० लाख रुपये असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्राम बाल विकास केंद्र आणि बाल उपचार केंद्र पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी २१ दिवस तीव्र कुपोषित आणि कुपोषित बालकांना दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत उपचार केले जाणार आहेत. जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकिस्तक यांची या उपक्रमावर देखरेख असणार आहे. यात श्उऊउ अंतर्गत १२०० रुपये प्रति बालक प्रति महिना तर उळउ अंतर्गत ५२५० प्रति बालक प्रति महिना खर्च होणार आहेत. रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्याची ‘अमृत आहार’ योजनेसाठी या वर्षी निवड करण्यात आली होती. १३५ अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना अतिरिक्त आहार पुरवण्यात येणे अपेक्षित होते. मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आहार शिजवून देण्याचा खर्च परवडत नसल्याने या योजनेस सहकार्य करण्यास नकार दिला होता. या प्रश्नाबाबतही ‘लोकसत्ता’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून निधीअभावी बंद पडलेल्या ‘अमृत आहार’ योजनेसाठी आता २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थ्यांना अंडी व केळीवाटपासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे निधीअभावी बंद पडलेली ‘अमृत आहार’ योजना पुन्हा एकदा कार्यान्वित होऊ शकणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹रेल्वेची प्रवाशांना सुखद भेट, एक पैशांत मिळणार १० लाखांचा विमा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक खुशखबर आणली आहे. खास दसरा, दिवाळी निमित्त शुक्रवार (दि. ७ सप्टेंबर) पासून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक पैशांत १० लाखांचा प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. वैकल्पिक यात्रा विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रवाशांना यासाठी ९२ पैसे द्यावे लागत होते. प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे तात्पुरत्या स्वरूपात ९२ पैशांऐवजी एक पैसा प्रीमियम करण्यात आले आहे. एक पैशांत दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व तिकिटांवर विमा काढता येईल.

प्रवाशांना रेल्वेकडून ही दिवाळीची भेट असल्याचे आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी सांगितले. वैकल्पिक विम्याच्या प्रीमियमची रक्कम कमी करण्यावर आमचा विचार सुरू असून याची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत १,२०,८७,६२५ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एक सप्टेंबर रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. २९ सप्टेंबरपर्यंत एक कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकिट काढल्यानंतर १० लाखांपर्यंत विमा मिळत होता. हा अपघाती विमा असून मृत्यू झाल्यानंतर १० लाख रूपये तर अपंगत्व आल्यास ७.५ लाख रूपये कुटुंबीयांना मिळतात.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘एम. एस. धोनी’ चित्रपटाला करमाफी

आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे देशातील तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार असल्याने शासनाने या चित्रपटाला करमणूक कर माफ केला आहे. यामुळे आता या चित्रपटाच्या तिकिटाचे दर ४० टक्क्यांनी कमी होणार आहे.

एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जागतिक दर्जाचा खेळाडू बनण्याकरिता आवश्यक असलेले उच्च ध्येय, कठीण परिश्रम, धाडस, सबुरी, जिद्द व चिकाटी यासारख्या मानवी व सामजिक मूल्यांबाबचे महत्त्व या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. तसेच, क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्यास भारतातील तरुण पिढीला प्र्रेरित करणारा हा चित्रपट भारताच्या क्रिकेट संघाचे कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ हा हिंदी चित्रपट आहे.

पुण्यासह राज्यातील सर्व चित्रपटगृहामध्ये २३ सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी..’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत तब्बल शंभर कोटी रुपयांची कमाईदेखील केली आहे. आता नागरिकांना शंभर रुपयांचे तिकीट ७४ रुपयांनाच मिळणार असल्याचे करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले.

महत्वाच्या घडामोडी:- (शनिवार , ८ आक्टो. २०१६):-
---------------------------------------------------------

* अय्यो (aiyoh) आणित अय्या (aiyah) या आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या यंदाच्या अवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला

* भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना - पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेर भारताच्या 3 विकेट्स गमावत 267 धावा.विराट कोहलीने फटकावले शानदार शतक.

* कवी राजाभाऊ मंगसुळीकर यांचे निधन. 'हिमालयावर येता घाला, साह्यगिरी हा धावून गेला,' यासह शेकडो अजरामर कविता त्यांनी लिहील्या होत्या.

* भारतीय वायू सेनेचा आज ८४ वा स्थापना दिवस. १९३२मध्ये आजच्या दिवशीच हवाई दलाची स्थापना झाली होती

* पहिली ते आठवी परीक्षा होणार, नापास न करणे धोरण बदलणार- विनोद तावडे

* रणजी करंडक : मुंबईचा तमिळनाडूवर दोन गडी राखून थरारक विजय.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पालघरला पाच महिन्यांत 254 बालकांचा मृत्यू

मुंबई - राज्यात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या कमी होत असल्याचा गवगवा करणाऱ्या राज्य सरकारला आदिवासी विभागानेच घरचा आहेर दिला आहे . केवळ पालघर जिल्ह्यात या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात 254 बालकांचा मृत्यू झाला आहे , तर तब्बल सहा हजार बालके तीव्र आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त आहेत.

पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल जव्हार , मोखाडा तालुक्यांमधील कुपोषणनिर्मूलनास सरकार अपयशी ठरल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने मारल्यानंतर आदिवासी विभागाला खडबडून जाग आली आहे . आदिवासी विभाग कुपोषणनिर्मूलनासाठी महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागावर अवलंबून असतो. कुपोषणग्रस्त बालकांच्या संख्येत वाढ झाल्याने आदिवासी विभागाने युद्धपातळीवर पालघर जिल्ह्यातील बालकांची पाहणी केली आहे . त्याचा अहवाल आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना विभागाने सादर केला आहे . या अहवालानुसार पालघर जिल्ह्यातील एक लाख 75 हजार 987 बालकांची पाहणी करण्यात आली आहे . त्यानुसार एक हजार 319 बालके अतितीव्र कुपोषणग्रस्त आहेत, तर चार हजार 715 बालके तीव्र कुपोषणग्रस्त असल्याचे उघड झाले आहे . पावसाळ्यामध्ये आदिवासींना रोजगाराची कामे न मिळणे , मुलींची लहान वयात लग्न , पोषक आहार नसण्यासारख्या कारणांचादेखील या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे .

दरम्यान , आरोग्य विभाग , महिला व बालकल्याण आणि आदिवासी विभागाबरोबर पुरेसे समन्वय नसल्याने कुपोषणनिर्मूलनास अडथळा येत असल्याची कबुली आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली आहे , तसेच यावर उपाय करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या " टास्क फोर्स ' साठी आदिवासी उपयोजना निधीतून मदत केली जाणार असल्याचेही सवरा यांनी सांगितले . या " टास्क फोर्स ' मध्ये महिला व बालकल्याण , आरोग्य विभागाचे सचिवदेखील असणार आहेत.
वनजमिनीसाठी हवेत 13 पुरावे
आदिवासींना वन हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या वनजमिनीसाठी दावेदारांना विविध 13 पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत. त्यात बदल करून आता या 13 पुराव्यांपैकी कोणतेही दोन पुरावे अर्जासोबत जोडल्यास त्यांचा वन हक्क जमिनीचा दावा मान्य करण्यात येईल , असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी येथे सांगितले . महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यासोबत मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती . आदिवासी कसत असलेली जमीन आणि त्यांच्या नावावर केलेली जमीन यांच्यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे . याबाबत पडताळणी करून दाखल दाव्यांचा निकाल सहा महिन्यांत देण्यात येईल , असा निर्णय या वेळी घेण्यात आला . राज्यात पडकई विकास योजनेंतर्गत वनजमीन विकसित केलेल्या शेतकऱ्यांना कामाचे त्वरित पैसे अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करण्यात येईल , असेही त्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹काझीरंगासाठी विशेष रेल्वे उपलब्ध होणार

नवी दिल्ली - एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा अभयारण्याला भेट देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या वन्यजीवप्रेमी व पर्यटकांसाठी आता लवकरच " काझीरंगा एक्स्प्रेस' सुरू होणार आहे . रेल्वे मंत्रालय याबाबतच्या प्रस्तावावर काम करीत असून , ही सुविधा जलदगतीने उपलब्ध करण्याचा मानस आहे . पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने रेल्वेने जुलै महिन्यात कान्हा व बांधवगड या अभयारण्य मार्गावर टायगर एक्स्प्रेससुरू केली आहे . या पार्श्वभूमीवर रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी याबाबतचा प्रस्ताव पुढे आणला असून , आसाममधील कामाख्य मंदिर , मानस राष्ट्रीय उद्यान, चहाचे मळे आदी प्रसिद्ध पर्यटनस्थळेही या मार्गांतर्गत आणण्याची योजना आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राष्ट्रीय संशोधन प्राध्यापकपदी डॉ . माशेलकरांची फेरनियुक्ती

नवी दिल्ली - उदारीकरणानंतरच्या युगात भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरणाला महत्त्वपूर्ण दिशा देण्यात सिंहाचा वाटा असलेले विख्यात वैज्ञानिक प्रा . डॉ . रघुनाथ माशेलकर यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक ( एनआरपी ) या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे . याबाबतच्या निर्णयावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सायंकाळी मंजुरीची मोहोर उमटविली .

" एनआरपी ' हे देशातील अतिशय प्रतिष्ठेचे पद मानले जाते . विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची यासाठी निवड होते . दर पाच वर्षांनी देशभरातून फक्त सहा ज्येष्ठ मान्यवरांची नियुक्ती यासाठी होते . या पदावर फेरनियुक्ती झालेले डॉ . माशेलकर हे मावळत्या मंडळातील एकमेव सदस्य आहेत. या पदावर फेरनियुक्ती होण्याचा प्रसंग अत्यंत अपवादात्मक आहे . पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून 1949 मध्ये जन्माला आलेल्या या प्रतिष्ठेच्या पदावरील मान्यवरांच्या नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. यासाठी किमान वयोमर्यादा 65 वर्षे आहे . डॉ . माशेलकर यांची नियुक्ती एक जुलै 2016 पासून पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे . सर श्रीरामन हे या पदावर प्रथम नियुक्त होणारे वैज्ञानिक होते . त्यानंतर सी . व्ही . रामन , सत्यजित रे , बिस्मिल्ला खॉं , पंडित रविशंकर व प्रा . सीएनआर राव यांनीही हे पद भूषविले आहे .

डॉ . माशेलकर आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षपद व देशातील प्रयोगशाळांची शिखरसंस्था असलेल्या सीएसआयआर - भारतीय वैज्ञानिक व अभियांत्रिकी मंडळाच्या महासंचालकपदांसह अत्यंत प्रतिष्ठेच्या अनेक पदांवर कार्यरत होते . ब्रिटिश रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळविणारे ते या शतकातील केवळ तिसरे वैज्ञानिक आहेत. अमेरिकी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे प्रतिष्ठचे सदस्यपदही त्यांनी भूषविले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹'अय्यो' आणि 'अय्या' झाले इंग्रजी शब्द

अय्यो (aiyoh) आणि अय्या (aiyah) या आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या यंदाच्या अवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन शब्दांव्यतिरिक्त योगासन (yogasana) या शब्दालाही ऑक्सफर्डने इंग्रजी शब्दाचा दर्जा दिला आहे.

अय्यो आणि अय्या हे दोन शब्द विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये वापरले जातात. एखाद्या गोष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे हे शब्द हिंदी सिनेमांमुळे भारताबरोबरच जगभरात लोकप्रिय झाले आहेत. तर भारताच्या प्रयत्नाने अंतरराष्ट्रीय योगदिनाला मान्यता मिळाल्याने जगभरात योग करणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर योगासने या शब्दाचा वापरही वाढला आहे. त्यामुळेच या शब्दालाही ऑक्सफर्डच्या नवीन यादीमध्ये जागा देण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड डिक्श्नरी १५० वर्षांचा इतिहास असून मागील दिडशे वर्षांत या डिक्श्नरीमध्ये वेगवगेळ्या भाषांमधील सुमारे सहा लाख शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एखादा शब्द या डिक्श्नरीत नाही, म्हणजे तो शब्द इंग्रजी नाही, असेच मानले जाते. गेल्यावर्षी पापड, खिमा, ढाबा, चुडीदार या भारतीय शब्दांनी इंग्रजी शब्द होण्याचा मान मिळवला होता.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचे आदेश

भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिले. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक सुविधांचा वापर करून स्वत:चा किंवा पक्षचिन्हाचा प्रचार करण्याच्या राजकीय पक्षांच्या मनसुब्यांना चाप बसणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील आयकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षित लेख्यांची प्रत सादर करण्यात दिरंगाई करणा-या राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला होता. नोटीस बजावूनही ही कागदपत्र सादर न करणा-या ५७ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाने रद्द केली होती. नोटीसा बजावण्यात आलेल्या पक्षांमध्ये भाजपसह आठ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश होता. तर निवडणूक आयोगाने नोंदणी रद्द केलेल्या पक्षांमध्ये हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रहित पार्टी, युनायटेड सेक्यूलर काँग्रेस पार्टी, विकास कार्य सन्मान पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, भारतीय प्रजासत्ताक पक्ष, क्रांतिकारी जयहिंद सेना, डेमोक्रॅटीक पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर. के), महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वराज सेना, भारतीय बहुजन सेना – धुळे, जळगाव शहर विकास आघाडी, भारतीय लोकसेवा पार्टी, जनमत विकास आघाडी- सासवड, नेताजी काँग्रेस सेना, नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी – दौंड, लोकशाही क्रांती आघाडी, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आदी पक्षांचा समावेश आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पालकांपासून तोडू पाहणाऱ्या पत्नीशी फारकतीचा पतीला हक्क!

विवाहानंतर पतीचे कुटुंब हेच त्याच्या अर्धागिनीचे कुटुंब असते. मात्र, पतीला त्याच्या आई-वडिलांपासून विभक्त करण्याचा प्रयत्न त्याच्या पत्नीने केल्यास तिला घटस्फोट देण्याचा पूर्ण हक्क पतीला आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

विवाहानंतर स्त्री ही पतीच्या कुटुंबाचा एक भाग होते. त्यामुळे त्याचे संपूर्ण उत्पन्न हवे या एकाच कारणासाठी ती पतीला त्याच्या पालकांपासून वेगळे होण्याची मागणी करू शकत नाही, असे न्या. अनिल दवे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने एका आदेशात स्पष्ट केले आहे. नवऱ्याला त्याच्या पालकांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे हा आपली संस्कृती व मूल्ये यांच्याशी विसंगत असलेला पाश्चिमात्य विचार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मुलगा मोठा झाला, किंवा त्याचे लग्न झाले की तो कुटुंबासून वेगळा होता. मात्र भारतीय लोक या पाश्चिमात्य विचारसरणीशी सहसा सहमत होत नाहीत. सामान्य परिस्थितीत, लग्नानंतर पत्नी ही पतीच्या कुटुंबासमवेत राहणे अपेक्षित असते. ती पतीच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनते आणि सहसा एखाद्या समर्थनीय व ठोस कारणाशिवाय, पतीने त्याच्या कुटुंबापासून विभक्त होऊन केवळ आपल्यासोबत राहावे असा आग्रह ती धरत नाही, याचा न्यायालयाने निकालपत्रात उल्लेख केला आहे.

न्यायालय म्हणते..
भारतात एखाद्या हिंदू मुलाने (विशेषत: तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असताना) लग्न झाल्यानंतर पत्नीच्या म्हणण्यावरून त्याच्या पालकांपासून वेगळे होणे ही रूढ परंपरा नाही किंवा इष्ट संस्कृतीही नाही. पालकांनी पालनपोषण केलेल्या आणि शिक्षण देऊन मोठे केलेल्या आपल्या पालकांची काळजी घेणे तसेच त्यांचा सांभाळ करणे हे मुलाचे नैतिक कर्तव्य आणि कायदेशीर बांधीलकी आहे. पालक वृद्ध झाल्यानंतर त्यांची काहीही मिळकत नसेल किंवा उत्पन्न अपुरे असेल, तर हे अधिकच आवश्यक आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मृत्युपंथास लागलेल्या ताऱ्यातून अग्निगोलांचा भडिमार

मृत्युपंथास लागलेल्या ताऱ्यांमधूनही तोफगोळ्यांसारख्या अग्निगोलांचा भडिमार होत असतो. अशाच एका भडिमाराचे छायाचित्र नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने टिपले आहे. या वायुरूपातील तोफगोळ्यांच्या अग्नीरूपातील ज्वालागोल मंगळाच्या दुप्पट वस्तुमानाच्या होत्या. मरणपंथाला लागलेल्या ताऱ्यातून बाहेर पडलेल्या तोफगोळ्यांचा वेध भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काहींनी घेतला आहे. ते द्रायुचे गोल होते व अवकाशात फार वेगाने तरंगत होते. त्यांचा वेग पृथ्वीवरून चंद्रावर ३० मिनिटात जाऊ शकेल इतका होता. ताऱ्यामधील तोफगोळ्यांचे अग्निगोल ४०० वर्षांत दर साडेआठ वर्षांनी एकदा याप्रमाणे आढळून आले आहेत.

हे अग्निगोल म्हणजे वैज्ञानिकांना कोडे होते, कारण ते अग्निगोल हे मातृताऱ्यातून म्हणजे व्ही हायड्रामधून बाहेर पडलेले नसावेत असा अंदाज होता. १२०० प्रकाशवर्षे दूरवरचा हा तारा तांबडा राक्षसी तारा बनला व त्यातून बरेच वस्तुमान अखेरच्या काळात बाहेर पडले होते. तांबडे राक्षसी तारे हे मरणपंथाच्या अखेरच्या अवस्थेतील तारे असतात व त्यांच्यातील अणुइंधन बाहेर पडून संपत आलेले असते त्यामुळे ते तांबडे दिसतात. त्यांचा आकार वाढलेला असतो व त्यांचे बाह्य़स्तर पसरत असतात. प्लाझ्माचे ते गोल असावेत पण त्यांचा स्रोत अज्ञात तारा असावा. सहकारी ताऱ्याची कक्षा अंडाकार असेल तर तो दर साडेआठ वर्षांनी तांबडय़ा राक्षसी ताऱ्याच्या जवळ येतो. जेव्हा सहतारा तांबडय़ा ताऱ्याच्या बाह्य़ वातावरणात येतो तेव्हा तो अग्निगोल बाहेर टाकतो. नंतर सहताऱ्याभोवती एक चकती त्यातून तयार होते व ती प्लाझ्मा सोडण्यासाठीचा एक स्रोत बनते. ही चकती ताशी पाच दशलक्ष मैल वेगाने फिरत असते.

हबल दुर्बिणीने आतापर्यंत मृत ताऱ्यांभोवतीच्या ज्या प्रतिमा दिल्या आहेत त्यांचा उलगडा यातून होत आहे. आधीच्या माहितीनुसार जास्त वेगाने अग्निगोल बाहेर टाकले जातात व ही प्रक्रिया प्रथमच पाहता आली, असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीजचे राघवेंद्र सहाय यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ग्रहीय अभ्रिकांच्या रचना या अग्निगोलातून तयार झाल्या असाव्यात. हबल दुर्बिणीने व्ही. हायड्रा व त्याच्या भोवतालच्या भागातील घटनांचे ११ वर्षे निरीक्षण केले आहे. २००२, २००४, २०११ व २०१३ हा निरीक्षणांचा काळ होता. ज्या अग्निगोलांचे वर्णन या संशोधनात आहे त्यांचे तापमान सूर्याच्या दुप्पट म्हणजे ९४०० अंश सेल्सियस आहे. वैज्ञानिकांनी या अग्निगोलांचा नकाशा तयार केला असून हे संशोधन ‘द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अंध व्यक्तीही होउ शकतात 'इफ्फी'चे प्रतिनिधी

चित्रपट पाहणे आणि त्याची उत्कष्ट अनुभूती घेणे ही चित्रपटप्रेमींसाठी पर्वणीच असते. मात्र एखाद्या अंध व्यक्तीला चित्रपटाची आवड असल्यास त्यांनाही तेवढय़ाच उत्कटतेने चित्रपटाचा अनुभव घेता यावा म्हणून यंदाच्या इफ्फीत खास सोय करण्यात आली आहे. यंदा अंध व्यक्तींनाही 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रतिनिधी होण्याची संधी घेता येईल.

महोत्सव संचलनालयाने युनेस्को दिल्ली आणि सक्षम या संस्थेशी करार असून यंदाच्या इफ्फीत अंध व्यक्तींना चित्रपटांचा अनुभव घेता यावा म्हणून खास व्यवस्था केली आहे. सक्षम या संस्थेतर्फे अंध व्यक्तींसाठी ‘अॅडिओ डिस्क्रीपशन’ हे तंत्र तयार केले आहे. या तंत्रद्वारे काही निवडक चित्रपट पाहण्याची संधी अंध व्यक्तींना लाभणार आहे. पडद्यावर चित्रपट सुरु असताना हे खास तंत्र अंध व्यक्तींकडे देण्यात येईल. याद्वारे चित्रपट सुरु असताना पडद्यावर काय सुरु आहे, घटनेबाबतची अनुभूती, वेषभूषा, कलाकारांच्या चेह:यांवरील हावभाव, शरीराची भाषा तसेच दोन संवादांमधील निशब्द: वर्णय याची अनुभूती अंध प्रेक्षकांना घेता येईल.

सक्षम संस्थेने आतापर्यंत 22 चित्रपटांचे ऑडिओ डिस्क्रीपशन केले आहे. चित्रपट सुरु असताना अंध व्यक्तींना सदर यंत्रे मोफत देण्यात येतात. या उपक्रमाला यापूर्वी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे असा दावा संस्थेने केला आहे. खालील चित्रपटांचे ऑडिओ ड्रिस्क्रीपनशन केले आहे.

ब्लॅक, मुन्नाभाई एमबीबीएस, हनुमान, काट काट काड कड्ड, करामती कोट, कभी पास कभी फेल, तारे जमी पर, तेलगू अमूल्यम, तामिळ देवात ट्रमंगाय, स्टेनली का डब्बा, तामिळ हरीदास, हिडा होंडा, चक्कड बक्कड बम्बे बो, हॅलो, लिटल टेररिस्ट, बर्फी, थ्री इडियट, पिपली लाईव्ह, धोबी घाट, भाग मिल्खा भाग, पी.के, गांधी या चित्रपटांचा समावेश आहे.

चित्रपट ऑडिओ डिस्क्रीपशन या व्यतिरिक्त सक्षमतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांगांना आपले संस्कृती, पुरातन वारसा स्थळे यांची ओळख व्हावी तसेच सहजतेने त्याची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच त्यांना कला, नृत्य शिक्षण घेता यावे म्हणूनही काही उपक्रम करण्यात येत आहेत. टेक्नोलॉजी सोल्यूशन सेंटर, टॉकिंग बुक, श्क्षिणासाठी करमुक्त कर्ज, जुन्या वारशांचे संरक्षण आणि संवर्धन असे उपक्रम राबविण्यात येतात.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹बालसाहित्यिक वसंत निगेवकर यांचे निधन

महाराष्ट्राला बालसाहित्यिक म्हणून परिचित असलेले वसंत श्रीपाद निगवेकर (वय ९१, रा. विश्वतारा अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांचे शुक्रवारी (दि. ७) वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागातील प्रा. अंजली निगवेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सतत हसतमुख आणि मोठा मित्रपरिवार असलेला साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त झाली.

निगवेकर कुटुंबीय मूळचे करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर हे त्यांचे चुलतभाऊ. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे बराच काळ नागपुरात वास्तव्य राहिले. आरोग्य खात्यातील अधिकारी म्हणून ते तेथूनच निवृत्त झाले. त्यामुळे नागपुरातही त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. निवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यांनी चौफेर लेखन केले; परंतु तरीही त्यांची ‘बालसाहित्यिक’ म्हणूनच जास्त ओळख आहे. लहान मुलांसाठी त्यांनी कथा, ललित चरित्र आणि नाटिकालेखन केले आहे. त्यांची सुमारे तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी मुलीच्या नावाने लिहिलेले ‘अंजूच्या गोष्टी’ हे दोन भागांतील पुस्तकही खूपच लोकप्रिय झाले होते. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि सांगली आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. कोल्हापुरातील कोणत्याही साहित्यिक कार्यक्रमास त्यांची आवर्जून उपस्थिती असे. नेहमी हसतमुख व मृदू स्वभाव असलेले निगवेकर ज्येष्ठ नागरिक संघ, मराठी बालकुमार साहित्य सभा या संस्थांशीही एकरूप झाले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पहिले ‘बायोडायजेस्टर’ शौचालय

मुंबई महापालिका नागरिकांना सेवासुविधा देण्यात आघाडीवर असली तरी आजही येथील लोकसंख्येला पुरेशी शौचालये नाहीत. परिणामी अपुऱ्या आणि दुर्गंधीयुक्त शौचालयांचे प्रमाण वाढतच असून, पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे रोगराईचे प्रमाणही वाढत आहे. यावर सारासार विचार करत महापालिकेने आता ‘बायोडायजेस्टर’ या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीवर आधारित सार्वजनिक शौचालयांना प्राधान्य दिले आहे. आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ या अंतर्गत महापालिकेने धारावी व ‘शीव-माहीम लिंक रोड’ येथे ‘बायोडायजेस्टर’ शौचालये बांधली असून, शौचालयातील विष्ठेचे जीवाणूंमुळे ७२ तासांत विघटन
होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, ‘जी/उत्तर’ विभागाद्वारे बायोडायजेस्टर या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीवर आधारित दोन सार्वजनिक शौचालयांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. या दोन्ही शौचालयांची एकत्रित क्षमता ३० आसनांची आहे.

धारावी येथील पिवळा बंगला व सायन-माहीम लिंक रोड हे सागर तटीय नियमन क्षेत्र असल्याने तसेच या ठिकाणी मलनि:सारण वाहिनी नसल्याने अत्याधुनिक पद्धतीचे बायोडायजेस्टर शौचालय उभारण्यात आले आहे.

 शौचालयाची सेप्टीक टँक ही ‘एफ.आर.पी.’पासून बनविण्यात आली असून, टँकमध्ये जीवाणू (बॅक्टेरिया) सोडण्यात येतात. या जीवाणूंकडून ७२ तासांत टँकमधील मैला नष्ट करून बाहेर फक्त पाणी सोडण्यात येते.

हे पाणी दुर्गंधीयुक्त नसून पाण्याचा वापर बागेसाठी करण्यात येणार आहे. पुरुष, महिला व अपंगांकरिता पिवळा बंगला, धारावी येथे १६ आसने व सायन-माहीम लिंक रोड, धारावी येथे १४ आसनी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत.

जास्त आसन क्षमतेचे पहिले शौचालय

बायोडायजेस्टर पद्धतीवर आधारित एवढ्या जास्त आसन क्षमतेचे हे मुंबईतील पहिलेच शौचालय आहे. ‘स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रात नागरिकांकरिता योग्य प्रमाणात शौचालयांची उपलब्धता
करून देण्यासाठी महापालिका कार्यरत आहे.

च्महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाद्वारे धारावी परिसरात आणि ‘शीव-माहीम लिंक रोड’वर पर्यावरणपूरक पद्धतीच्या दोन बायोडायजेस्टर शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या शौचालयांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या शौचालयांची निर्मिती जनजागृती सामाजिक संस्थेद्वारे करण्यात आली आहे.

Swachh Banayen Bharat:
Surat tops the list of cleanest railway stations in India
M Venkaiah Naidu Rajyavardhan Rathore Ministry of Information & Broadcasting, Government of India Press Information Bureau - PIB, Government of India

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹महाराष्ट्र नेट ' चा प्रयोग राबविणार - मुख्यमंत्री

राज्यातील 109 आदर्श शिक्षकांचा गौरव; 38 प्राथमिक शिक्षकांचा सहभाग
मुंबई - केंद्र शासनाच्या " भारतनेट ' च्या धर्तीवर राज्य सरकार " महाराष्ट्र नेट' चा प्रयोग सुरू करणार असून , त्या माध्यमातून गावागावांत आरोग्य आणि शिक्षणाच्या सेवा पोचविण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज केली .

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 2015 - 16 या वर्षीच्या राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी आज उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 109 शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला , त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते .
 शिक्षकांना खऱ्या अर्थाने समाजातील सामन्य माणसांनीही सन्मान दिला पाहिजे. कारण शिक्षकपेशाचा माणूस हा चांगला समाज घडविण्याबरोबर महाराष्ट्र घडविण्याचेही काम करीत आहे . शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र , मूल्यवर्धित शिक्षण हे कार्यक्रम राबविले . यामुळे शिक्षणामुळे महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने प्रगत शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे , असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹रिलायन्स जियोकडे पहिल्याच महिन्यात दीड कोटी ग्राहक

दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एवढ्या गतीने ग्राहक जोडण्यात कंपनीने फेसबुक आणि व्हॉटसअॅपलाही मागे टाकले असल्याचे म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स जियोने ४ जी सेवेने ही नवी योजना ५ सप्टेंबर रोजी सुरू केली. पहिल्या २६ दिवसांतच कंपनीने नवे एक कोटी ६० लाख ग्राहक जोडले आहेत. याबाबत मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, आमच्या योजनांचा नागरिक पूर्णपणे वापर करत आहेत.

डेटाच्या ताकदीतून प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविणे हा जियोचा उद्देश आहे. जियोची सद्या वेलकम आॅफर सुरु असून डिसेंबरपर्यंत ती पूर्ण नि: शुल्क आहे. तर, आयफोनच्या नव्या ग्राहकांसाठी एक वर्षांपर्यंत सेवा नि:शुल्क देण्यात येणार आहे. कंपनीने आगामी काळात दहा कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अत्याचाराची तक्रार आता " पोस्को ई - बॉक्स ' वर

मुंबई - बालकावर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बालकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे . अत्याचाराला बळी पडलेली मुले नैराश्येच्या गर्तेत जातात. तसेच याबाबत तक्रार कोठे करावयाची याचीही माहिती नसते. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुलांवर होत असलेल्या तक्रारीसाठी आपल्या संकेतस्थळावर " पोस्को ई - बॉक्स' तयार केला असून , त्यावर तक्रार नोंदवता येते .

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने शाळेतील मुलांवरील होणाऱ्या मारहाण , लैंगिक छळ , दहशत इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी सादर करण्यासाठी हा "पोस्को ई - बॉक्स ' तयार केला आहे . मुलांचे संरक्षण करणारा लैंगिक अत्याचार गुन्हा विरोधी कायदा- 2012 आहे . राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या
संकेतस्थळावर " होम पेज ' वर हा " पोस्को ई - बॉक्स' आहे . शाळेत, शाळेच्या आवारात तसेच स्कूलबसमधून प्रवास करताना दुर्दैवाने अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जाणीव , प्रसार आणि जागृती करण्यासाठी सर्व शाळांनी याबाबत पुढाकार घेऊन मुलांना या संकेतस्थळांची माहिती करून देणे बंधनकारक राहणार आहे . शाळा प्रशासन , मुख्याध्यापक , शिक्षक यांनी शाळेच्या दर्शनी भागावर याबाबत माहिती लावली जावी, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे .

या संकेतस्थळावर तक्रार करा

www . ncpcr. gov . in या संकेतस्थळावर POCSO e- BOX म्हटले हा बॉक्स तयार केला आहे . या ठिकाणी थेट तक्रार मुलांना करता येईल. त्यासाठी पालक, शिक्षक यांनी मुलांना संगणक साक्षर तसेच या संकेतस्थळाविषयी माहिती करून देणे शाळांना बंधनकारक केले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹" कामधेनू 'मध्ये पंढरपुरी म्हैस, देवणी गाईची निवड

पंढरपूर - राष्ट्रीय गोकूळ मशिनअंतर्गत कामधेनू वंशावळ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून पंढरपुरी म्हैस व देवणी जातीच्या गायींची निवड करण्यात आली आहे . नेल्लूर ( आंध्र प्रदेश ) येथील चिंतन डेअरी फर्ममध्ये या दोन वंशावळींची पैदास केली जाणार आहे , अशी माहिती आंध्र प्रदेशच्या पशुधन महामंडळाचे सहायक संचालक डॉ . सी . व्यंकटरमण यांनी दिली . येथे पंढरपुरी म्हशींची पाहणी केल्यानंतर ते "सकाळ ' शी बोलत होते .

देशभरातून विविध जातींच्या गायी व म्हशींची या चिंतन डेअरी सेंटरमध्ये निवड करण्यात आली आहे . त्यामध्ये पंढरपुरी म्हैस व देवनी जातीच्या गायींचा समावेश आहे . या माध्यमातून राज्यात प्रसिद्ध असलेली पंढरपुरी म्हैस आता देशपातळीवर प्रसिद्ध झाल्याचे व्यंकटरमण यांनी स्पष्ट केले.

पंढरपुरी म्हशींची पाहणी करण्यासाठी आंध्रप्रदेश पशुधन महामंडळाचे वैद्यकीय पथक नुकतेच येथे आले होते. पथकाने तालुक्यातील कासेगाव, भंडीशेगाव , खोमनाळ , मारापूर येथील शेतकऱ्यांच्या म्हशींच्या रक्ताचे नमुने घेतले . विशाखापट्टणम येथील प्रयोगशाळेत या नमुन्यांची आयबीआर रोगासंदर्भात तपासणी केली असता निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे व्यंकटरमण यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ज्युरासिक युगातील " इथेसॉर 'चा शोध

लंडन - डायनॉसोरच्या युगातील ( ज्युरासिक काळ ) दुर्मिळ सागरी प्राण्याचा शोध संशोधकांना लागला आहे . अनेक दशकांपूर्वीच्या जिवाश्माच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे . " ब्रिटिश इथेसॉर ' असे या माशाचे नाव असून , ही सागरी जात तेव्हाही दुर्मिळ समजली जात होती .

डॉल्फिन किंवा शार्कशी साधर्म्य असलेले " ब्रिटिश इथेसॉर ' हे सागरी प्राणी हे अत्यंत धोकादायक भक्षक होते . यातील काही जणांची लांबी 15 मीटर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . हे प्राणी डायनॉसोर युगात म्हणजे 20 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते . त्या वेळी ब्रिटन हा छोटा द्विपसमूहाच्या रूपात होता . मॅंचेस्टर विद्यापीठातर्फे याबाबतचे संशोधन सहा वर्षांपासून सुरू आहे . "ब्रिटिश इथेसॉर ' ची कवटी व पंखांचे जीवाश्म आढळल्याने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. या जीवाश्मावरून हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे व दुर्मिळ असल्याचे निदर्शनास आले आहे .

ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये अनेक वर्षांपासून ठेवलेल्या सांगाड्याच्या अभ्यासावरून या नवीन सागरी जातीचा शोध लागला. मॅंचेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डिन लोमॅक्स व अमेरिकेतील ब्रॉकपोर्ट महाविद्यालयातील प्राध्यापक ज्युडी मसारे यांनी याबाबत संशोधन केले . सॉमरसेट प्रांतातील वॉल्टन येथे " इथेसॉर ' चा प्रचंड सांगाडा आढळला होता . 80 वर्षांपूर्वी हा सांगाडा सिटी म्युझियमने ब्रिस्टॉल विद्यापीठाला भेट दिला होता . 1915 मध्ये तो या संग्रहालयाने विकत घेतला होता . 1930 मध्ये तो विद्यापीठाला देण्यात आला .

नवीन जातीला जीवाश्म शास्त्रज्ञाचे नाव
मॅंचेस्टर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डिन लोमॅक्स म्हणाले , "" हा सांगाडा विद्यापीठात जेथे ठेवला आहे , तेथून रोज शेकडो माणसे ये - जा करीत असतात . मात्र, या सांगाड्यामागचे गुपित नुकतेच उजेडात आले, हे एक आश्चर्यच आहे . ब्रिटिश जीवाश्म शास्त्रज्ञ नायगेल लार्किन यांच्या सन्मानार्थ त्याला आम्ही " इथेसॉर लार्किन ' असे नाव दिले आहे . "लार्किन ' याचा अर्थ " धोकादायक ' असा आहे . त्यामुळे या अतिशय चपळ भक्षक जातीला हे नाव योग्य ठरते . ''

आधुनिक सागरी मासे व डॉल्फिन यांच्याशी " इथेसॉर' चे साम्य आहे . ही जात अत्यंत मनोवेधक व मनोहारी समजली जाते. सुदैवाने याचे दोन नमुने आमच्याकडे आहेत . " युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस ' चे संकलन म्हणून हे जीवाश्म विल्स मेमोरियल इमारतीत ठेवण्यात आले आहेत .
- जोनाथन हॅन्सन , ब्रिस्टॉल विद्यापीठ

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹श्रीमंतांमध्ये बिल गेट्स 23 वर्षांपासून 1 नंबर

न्यूयॉर्क - फोर्ब्सने जाहीर केलेल्या अमेरिकन श्रीमंतांच्या यादीमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे . फोर्ब्सने चारशे श्रीमंतांची यादी जाहीर केली असून , यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा अग्रस्थानी आहेत. गेल्या 23 वर्षांपासून गेट्स या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.

" फोर्ब्स' ने 2016 या वर्षातील श्रीमंत अमेरिकन लोकांची यादी जाहीर केली . यामध्ये पाच भारतीय वंशांच्या श्रीमंतांमध्ये सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रमेश वाधवानी , सिंटेल भारत या आउटसोर्सिंग फर्मच्या सहसंस्थापक नीरजा देसाई , उद्योजक राकेश गंगवाल , उद्योजक जॉन कपूर, सिलिकॉन व्हॅलीचे प्रमुख गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम यांचा समावेश करण्यात आलेला आहे .

या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या गेट्स यांच्याकडे 81 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे . गेट्स हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीबाबतही सर्वपरिचित आहेत. जगातील सर्वांत मोठे खासगी ट्रस्ट " बिल अँड मेंडा गेट्स फाउंडेशन ' मार्फत ते जगभरात समाजसेवेचे व्रत पार पाडत असतात .

अमेरिकन भारतीयांमध्ये वाधवानी यांचा क्रमांक फोर्ब्सच्या यादीमध्ये 222 व्या स्थानी आहेत. मुंबई आयआयटीमधून शिक्षण झालेल्या वाधवानी यांच्याकडे 17 डाटा टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर आणि इतर कंपन्या अशी एकूण 2. 8 अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल असणारी मालमत्ता असल्याचे फोर्ब्समध्ये नमूद करण्यात आले आहे . भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाधवानी यांनी 1 अब्ज डॉलरचा निधी देण्याचे आश्वासन सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिले होते .

फोर्बस् यादीतील भारतीय श्रीमंत

नावे यादीतील स्थान एकूण संपत्ती

रमेश वाधवानी 222 2 . 8 अब्ज डॉलर
नीरजा देसाई 274 2 . 5 अब्ज डॉलर
राकेश गंगवाल 321 2 . 2 अब्ज डॉलर
जॉन कपूर 335 2 . 1 अब्ज डॉलर
कवितर्क राम श्रीराम 361 1 . 9 अब्ज डॉलर

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मंगळावरील शेतीसाठी नासाकडून प्रयोग

मंगळावर बगिचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यीकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करीत असून आगामी मंगळ मोहिमातील अवकाशवीर तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतील याचा अंदाज घेण्यात येत आहे.

मंगळावरील मानवी स्वारीत तेथे पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे. मंगळ बगिचाचे सादृश्यीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे. त्यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.

मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.

नासाच्या केनेडी स्पेस सेंटरचे व्हेजिटेबल प्रॉडक्शन सिस्टीम प्रयोगाचे प्रकल्प व्यवस्थापक ट्रेन्ट स्मिथ यांनी सांगितले की, विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते. यात अवकाशवीर हे अवकाशात विविध वनस्पतींची लागवड करू शकतील. त्याचे प्रयोग आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात करता येतील, असे स्पेस डॉट कॉमने संशोधनाबाबत माहिती देताना म्हटले आहे.

अंकुरण दर कमी

मंगळ बगिच्याच्या सादृश्यीकरणात हवाई बेटावरील माती वापरण्यात आली, कारण ती मंगळासारखी आहे. यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करावी लागतील याचा अंदाज घेण्यात आला. लेटय़ूसची लागवड कुठल्याही पोषकांचे मिश्रण न करता होऊ शकते असे दिसून आले आहे, पण या मातीत लेटय़ूसची मुळे कमकुवत ठरली व अंकुरण दर कमी दिसून आला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गोव्याला इंडिया टुडेचा पुरस्कार

देशातील लहान राज्यामध्ये गोव्याने चांगल्या प्रकारे विकास केला, असे प्रमाणपत्र इंडिया टुडे समुहाने देऊन गोवा राज्याला पुरस्कार जाहीर केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना येत्या 4 रोजी दिल्लीत होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्य़ासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

आरोग्य व साधनसुविधा निर्माण क्षेत्रात गोव्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच एकूण प्रगतीमध्येही छोटय़ा राज्यांच्या तुलनेत गोवा हे अग्रेसर असल्याचे इंडिया टुडेला आढळून आले आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकमतशी बोलताना या पुरस्कारांबाबत आनंद व्यक्त केला. खाण बंदीमुळे महसुल प्राप्ती कमी झाली तरी, देखील आम्ही अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण केली व कल्याणकारी योजनाही सुरू ठेवल्या,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹नेमबाज जीतू राय पिस्तूल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता

भारताचा अनुभवी पिस्तूल नेमबाज जीतू राय हा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.

जीतूने अंतिम लढतीत सर्बियाचा दामिर मिकेच याला २९-६, २८-३ अशा गुणफरकाने मागे टाकून स्पर्धा जिंकली. त्याला ट्रॉफीसह पाच हजार युरोचा रोख पुरस्कार मिळाला. रायफल चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र रशियाचा सर्जेई कामेनस्की याने जिंकली.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सर्व नेमबाजांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाते. दहा मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात स्पर्धेचे आयोजन केले जाते. चार शॉटमध्ये सर्वात कमी गुण नोंदविणारे नेमबाज एलिमिनेशनमध्ये बाहेर पडतात, हे विशेष.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राज्यात प्रथमच नाशिकला मोबाईल इंटरनेट बंद

नाशिक - तळेगाव अंजनेरीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आजही बंद , मूकमोर्चे , निवेदनाद्वारे जिल्ह्यात निषेध सुरु होते . परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्यात प्रथमच नाशिकला शहर व जिल्हाभरात मोबाईल इंटरनेट बंद ठेवले आहे . दसरा -दिवाळीच्या तोंडावर नागरिकांतील द्वेष वाढविणाऱ्या व्हॉटसअप संदेशावर नियंत्रणासाठी प्रथमच हे पाउल उचलले आहे . महिला बाल विकासतर्फे अत्याचारग्रस्त मुलीच्या देखभाल व पुनर्वसनासनाठी शासनाकडून पिडीत कुटुंबाला मनोधैर्य योजने अंर्तगत मदतीचा आधार दिला .

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक नाशिकला तळ ठोकून आहे .
 जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील आंदोलनांचा आढावा घेतला . परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे . पण त्यात , नागरिकांमधील द्वेष वाढविणारे संदेश प्रसारीत होउ नये म्हणून , मोबाईलची इंटरनेट सेवा खंडीत ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले . राज्यात प्रथमच असे पाउल उचलले असले तरी , जम्मू - काश्मीर, राजस्थान आणि गुजरात राज्यात यापूर्वी विविध आंदोलनात असे पाउल उचलले आहे .

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात प्रथमच मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तेलंगणमध्ये नव्या 21 जिल्ह्यांची निर्मिती

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्याची निर्मिती दोन वर्षांपूर्वी झाली. मंगळवारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नवीन 21 जिल्ह्यांची घोषणा केली . यामुळे राज्यात आता एकूण 31 जिल्हे झाले आहेत.

राव यांच्या मेडक जिल्ह्यातून तयार झालेल्या सिद्धीपेठ जिल्ह्याचे आज उद्घाटन करण्यात आले . विधानसभेतील अध्यक्ष , राज्यातील मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत अन्य नव्या जिल्ह्यांतही कार्यक्रम झाला. नव्या जिल्ह्यांचा स्थापन दिन आणि विजयादशमीचा सण आज मोठ्या उत्साहात राज्यात साजरा करण्यात आला .

आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे देशातील 29 वे राज्य म्हणून 2 जून 2014 रोजी उदयास आले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹" झिका' आशियात झपाट्याने पसरण्याचा धोका

लंडन - झिका या विषाणुचा प्रसार आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ( हू ) म्हटले आहे . सिंगापूरमध्ये शेकडो नागरिकांना या विषाणुची लागण झाली आहे ; तर थायलंडमध्येही झिका विषाणुशी संबंधित दोन रुग्ण आढळून आले आहेत.

डासांमुळे निर्माण होणारा हा विषाणु आत्तापर्यंत जगभरातील 70 देशांमध्ये दृष्टोपत्तीस पडला आहे . आशिया - प्रशांत भागामधील 19 देशांचा यामध्ये समावेश आहे . या विषाणुसंदर्भात करावयाचे उपचार अद्यापी निश्चित झाले नसल्याची माहिती हूच्या संचालिका मार्गारेट चान यांनी दिली .

झिकाची लागण होण्यास कारणीभूत असलेली डासांची प्रजाती ( एडीस मॉस्किटो ) आशिया प्रशांत भागामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते ; तसेच या भागामध्ये प्रवासही मोठ्या प्रमाणावर होतो . "दुदैवाने, झिकासंदर्भातील अनेक संवेदनशील प्रश्नांची उत्तरे अद्यापी संशोधकांना सापडलेली नाहीत , '' असे चान म्हणाल्या . झिका हा गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक मानला जातो . या विषाणुची लागण झाल्यास गर्भावर अत्यंत गंभीर परिणाम होण्याची शक्यता दिसून आली आहे . या विषाणुचा सर्वांत धोकादायक प्रादुर्भाव आत्तापर्यंत ब्राझीलमध्ये आढळला आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ब्रह्मपुत्रेबाबत भारताशी सहकार्य

बीजिंग - ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत भारताशी सध्या कोणताही वाद नसल्याचे सांगत , ब्रह्मपुत्रेचा प्रवाह, तसेच याबाबतच्या यंत्रणेबाबत सध्या भारताबरोबर योग्य प्रकारे सहकार्य सुरू असून तसेच ते पुढे ठेवण्याचा इरादा असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे .

दोन देशांतून वाहणाऱ्या या नदीबाबत सहकार्य असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी आज येथे बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले , "" सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत योग्य यंत्रणा कार्यरत आहे . चीनच्या बाजूने याबाबत सहकार्य पुढेही कायम ठेवले जाणार आहे . '' ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत भारत व बांगलादेशसमवेत चीन सहकार्य करण्याच्या तयारीत असल्याचा लेख येथील सरकारी मालकीच्या "ग्लोबल टाइम्स ' मध्ये प्रसिद्ध झाला आहे . त्यावर शुआंग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे . पाणीवाटपाबाबत सध्या चीनचा भारताशी कोणताही करार नाही . त्यामुळे चीनच्या या भूमिकेला महत्त्व आहे .

" चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी तिबेटमध्ये अडविणार ' अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या . ही नदी चीनमधून पुढे आसामात व नंतर बांगलादेशात वाहत जाते. या वृत्तामुळे भारतीय लोकांमध्ये संताप व्यक्त होत असणार यात शंका नाही, असेही या लेखात म्हटले आहे . अशा प्रकल्पांबाबत भारताने लगेच टोकाची प्रतिक्रिया देणाची गरज नाही . भारतातील काही माध्यमांनी याचा संबंध पाकिस्तानशी जोडला आहे . पाकिस्तानला मदत करण्याच्या हेतूने चीन ब्रह्मपुत्रा नदीवर प्रकल्प उभारून पाणी अडवत आहे , अशा आशयाचे वृत्त भारतातील माध्यमांनी दिले आहे . मात्र ब्रह्मपुत्रेच्या उपनदीवर धरण बांधण्याचा प्रकल्प 2014 मध्ये सुरू केल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे . नदीच्या पाण्याचा वापर चीन शस्त्र म्हणून कधीही करणार नाही, असा दावाही लेखात करण्यात आला आहे .

अनेक बहुदेशीय नद्यांचा उगम चीनमध्ये होतो . लानकॅंग - मेकॉंग नदी चीनमध्ये उगम पावते व पुढे म्यानमार, लाओस , थायलंड, कंबोडिया , व्हिएतनाम या देशांतून वाहत जाते. समजा चीनने राजकीय कारणांसाठी ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविले , तर या देशांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल . याचा चीनच्या या देशांच्या संबंधावर परिणाम होईल , असे या लेखात म्हटले आहे .

चीनने एक ऑक्टोबरला ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेल्या नदीवर लाल्हो धरण बांधण्याचे जाहीर केले होते . यामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर कोणताही परिमाम होणार नाही , असा खुलासा नंतर चीनने केला होता . सध्या ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाबाबत भारत व चीनमध्ये तज्ज्ञांची यंत्रणा अस्तित्वात आहे . यामध्ये चीन नदीच्या पाण्याबाबतची माहिती भारताला देतो .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹औद्योगिक उत्पादनात घट

अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या औद्योगिक उत्पादन क्षेत्राची निराशाजनक वाटचाल सलग दुसऱ्या महिन्यातही सुरू राहिली आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक अर्थात आयआयपी ०.७ टक्क्याने घसरला आहे. कारखानदारी, खाणकाम व यंत्रसामग्री या गटांची कामगिरी निराशाजनक झाल्याने औद्योगिक उत्पादनात घट नोंदवली गेली आहे.

याआधी मागील आठ महिन्यांत जुलैमध्ये आयआयपी उणे २.४९ इतका खाली आला होता. परंतु ऑगस्ट महिन्याचा आयआयपी त्याहीपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कारखानदारीमध्ये ०.३ टक्के घट झाली आहे. याच काळात गेल्या वर्षी ४.१ टक्के वाढ नोंदवली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पुन्हा एकदा आश्विन ; किवींना व्हाईटवॉश !

इंदूर - आश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारताने तिसरा कसोटी सामना ३२१ धावांनी जिंकला आहे . भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये आज ( मंगळवार ) विजयासाठी 475 धावांच्या पर्वतप्राय आव्हानाचा पाठलाग करताना न्युझीलंडची फलंदाजी पूर्णत: कोलमडली .

सामन्याच्या पहिल्या डावात सात बळी घेऊन किवींना गुडघ्यावर आणणाऱ्या फिरकीपटू आर आश्विनने आज पुन्हा एकदा अवघ्या 59 धावांत 7 बळी मिळवित न्यूझीलंडला
धाराशयी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . भारताचा अन्य एक अष्टपैलु खेळाडू
रवींद्र जदेजा यानेही 45 धावांत दोन बळी घेत आश्विन याला मोलाची साथ दिली . भारतीय फिरकीपटूंच्या प्रभावी माऱ्यामुळे न्युझीलंडचा 153 धावांत संपुष्टात आला .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘शकुंतला’वरील ब्रिटिशराज संपुष्टात येणार

शंभरी पार केलेल्या व आजही ब्रिटीश कंपनी ‘क्लिक निक्सन’च्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर, मूर्तीजापूर-अचलपूर या ‘शकुंतला’ नावाने परिचित ‘नॅरोगेज रेल्वे’ मार्गासंबंधीचा ब्रिटिश कंपनीशी असलेला करार अखेर संपुष्टात येणार असून हा मार्ग आता केंद्र सरकारच्या ताब्यात येऊा त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी रविवारी येथे ‘लोकसत्ता’शी बोलतांना दिली.

केंद्र सरकारने यासाठी १५०० कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्या म्हणाल्या. उल्लेखनीय म्हणजे, देशात ‘शकुंतला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विदर्भातच असलेल्या रेल्वे मागार्ंपकी आर्वी-पुलगाव रेल्वे केव्हाचीच बंद होऊन भंगारात गेली आहे. उर्वरित २ नॅरोगेज रैल्वेमार्गाचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास भगिरथ प्रयत्नानंतर केंद्र सरकारने मान्यता दिल्याची आनंददायी वार्ता खासदार भावना गवळी यांनी दिली. त्यांनी प्रत्येक निवडणूक काळात ‘शकुंतला’चे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण होण्याची आशा संपली होती. त्यामुळेच वर्धा-नांदेड माग्रे यवतमाळ हा रेल्वेमार्ग मंजूर झाला, पण तोही कासवगतीने सुरू आहे.

‘शकुंतला’चे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकासुध्दा संसदेच्या याचिका समितीसमोर दाखल झाली होती. आता यवतमाळ-मूर्तीजापूर आणि मूर्तीजापूर-अचलपूर हे दोन्ही नॅरोगेज मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. बंद असलेली पुलगाव-आर्वी रेल्वेचे भवितव्य बाकी अंधार कोठडीतच बंद आहे. या मार्गावरील रूळही उखडून पडले आहेत. १९१६ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीने या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावरही देशातील या तीन रेल्वे गाडया आजही याच कंपनीच्या ताब्यात आहेत. यवतमाळ-मूर्तीजापूर हा ११७ कि.मी लांबीचा आणि मूर्तीजापूर-अचलपूर हा १८८ कि.मी लांबीचा रेल्वेमार्ग ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातून काढून केंद्र सरकारच्या ताब्यात येण्याची ही घटना दीर्घ संघर्षांचा परिणाम ठरणार आहे. विशेष हे की, या मार्गावर कोळशाच्या इंजिनवर चालणाऱ्या शंकुतला १९९४ नंतर डिझेल इंजिनवर चालू लागल्या. या मार्गावरील बहुतेक सर्व रेल्वे स्टेशन्स आणि तेथील इमारती भग्नावस्थेत आल्या आहेत. खासदार आनंदराव अडसूळ आणि खासदार भावना गवळी यांच्या सततच्या प्रयत्नामुळे दोन्ही मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये होण्याची शक्यता बळावली आहे.

प्रतीक्षा इथली संपत नाही..

गेल्या १९१६ मध्ये सुरू झालेली ‘शंकुतला’ सुमारे ७० वर्षे वाफेच्या इंजिनवर ‘चालत’ होती. ‘शकुंतला’चे उत्पन्न व खर्च यात जमीन अस्मानचे अंतर पडले आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमती, रेल्वे पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार यामुळे ही रेल्वे प्रचंड तोटय़ा आहे. कारण, तिचे रोजचे उत्पन्न ३०० रुपयेसुध्दा नाही. या मार्गावरील कारंजा वगळता सारे स्टेशन्स उद्ध्वस्त होऊन बंद पडले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पोस्टाची टक्कर थेट बॅंकांशी

मुंबई - पत्र , पार्सल , मनिऑर्डर पाठवणे या पारंपरिक परिघापलीकडे टपाल विभाग झेप घेऊ लागला आहे . त्याची कोअर बॅंकिंग सोल्युशन ( सीबीएस ) सेवा राज्यातही विस्तारत असल्याने , ग्राहकांना कोणत्याही टपाल कार्यालयातून पैशांचे व्यवहार करता येतील . शिवाय , या सेवेला एटीएम कार्डचीही जोड मिळाल्याने टपाल विभागाची स्पर्धा थेट बॅंकांशीच सुरू झाली आहे .

" पोस्टातली गुंतवणूक भरवशाची ' या विश्वासावरच टपाल विभाग पारंपरिक चौकटीच्या बाहेर विस्तार करीत आहे . टपालसेवेच्या संगणकीकरणामुळे राज्यात दोन हजार 136 ठिकाणी सीबीएस सेवा सुरू झाली आहे ; तर आणखी 69 ठिकाणी लवकरच ती सुरू होईल . त्यामुळे टपाल खात्याचे ग्राहक जेथे जातील तेथील टपाल कार्यालयातून आपले व्यवहार करू शकतील. त्याचबरोबर राज्यात 73 ठिकाणी टपाल खात्याने एटीएम सेवाही सुरू केली आहे , तर लवकरच 75 एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

कोणत्याही एटीएममधून पैसे काढा

टपाल खात्याची सध्याची एटीएम कार्ड सेवा ठराविक पोस्टाच्या व्यवहारासाठीच वापरता येते , पण टपाल खात्याच्या "एटीएम ' चा वापर कोणत्याही बॅंकेच्या खातेधारकांना करता यावा , तसेच टपाल खात्याच्या ग्राहकांनाही इतर बॅंकांचे एटीएम वापरता यावेत , या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे पाठपुरावा सुरू आहे . रिझर्व्ह बॅंकेच्या मंजुरीनंतर टपाल खात्याच्या ग्राहकांना कोणत्याही बॅंकेतून व्यवहार करणे सोपे होईल .

उपयुक्तता " सीबीएस' सेवेची

- कोणत्याही टपाल कार्यालयातून व्यवहार
- रक्कम जमा करणे आणि काढणे
- खात्याची माहिती घेणे , व्यवहार पाहणे
- रूपे आणि डेबिट कार्डची सेवा
- इंटरनेट बॅंकिंग , मोबाईल बॅंकिंगचीही सेवा

पोस्टाचा महसूल ( कोटी रुपयांमध्ये )

सेवा वर्ष 2015 - 16 एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2016
स्पीड पोस्ट - 412 . 97 167. 35
बिझनेस पोस्ट - 273. 00 120 . 62
एक्स्प्रेस /बिझनेस पार्सल - 21. 21 1 . 69
बिल मेल सर्व्हीस - 34 . 22 6 . 87
रिटेल पोस्ट - 17 . 12 2. 43
इतर - 1 . 19 9 . 03
एकूण - 759. 71 307. 99

बचतींद्वारे मिळणारे उत्पन्न

वर्ष . . . . . . . . . . . . . महसूल ( कोटी रुपयांत )
2014 - 15 650. 30
2015 - 16 721 . 28
2016 - 17 317 . 90

पोस्टल नेटवर्क ( महाराष्ट्र सर्कल )

59 - हेड पोस्ट ऑफिस
2053 - सब पोस्ट ऑफिस
10489 - शाखा
48336 - पत्रपेट्या
120 - फ्रॅंचायसी ऑऊटलेट्स
69 - पंचायत संचार सेवा केंद्र
51 - मुख्य सर्कल टपाल कार्यालये
4 - महिला टपाल कार्यालये

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आदिवासी विद्यार्थ्यांना सहा हजारांपर्यंत निर्वाह भत्ता

मुंबई - महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळूनही निर्वाहाची काहीही सोय झाली नसलेल्या 20 हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात थेट रोख रक्कम मिळणार आहे . 4 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला आदिवासी विद्यार्थ्यांना हा निर्वाह भत्ता मिळणार आहे . आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये ही सर्वात मोठी योजना ठरणार असून , यासाठी तब्बल 110 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी उच्चशिक्षणासाठी शहरांमध्ये धाव घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची शहरांमध्ये मात्र काही सोय होत नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते .
 उच्चशिक्षणासाठी शहरांमध्ये आलेली जवळपास 20 हजार मुले अशी आहेत ज्यांची निवासाची , खाण्याची काहीच सोय झालेली नाही . बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी शहरांमधल्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अशा जवळपास 20 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्ज आदिवासी विभागाकडे मदतीच्या अपेक्षेत पडून आहेत. मात्र आदिवासी विभागामार्फत चालवली जाणारी वसतिगृहे अपुरी पडत असल्याने इतक्या मुलांची सोय तातडीने करता येणे शक्य नसल्याचे आदिवासी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले , तसेच वसतिगृहांमधील अपुऱ्या सुविधा, कॅंटिनविषयीच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींनी हैराण झालेल्या आदिवासी विभागाने अखेरीस विद्यार्थ्यांच्या हाती थेट रोख रक्कम देण्याचीच योजना आखल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली . आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांनीही याला दुजोरा देत सांगितले , की " आदिवासी विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नये असा आमचा प्रयत्न आहे . 20 हजार विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे ' .

सध्या आदिवासी विभागामार्फत 492 वसतिगृहांमधून 60 हजार विद्यार्थ्यांची निवासाची आणि भोजनाची सोय होते , मात्र अजून 20 हजार विद्यार्थ्यांची वसतिगृहाची मागणी आहे . इतक्या विद्यार्थ्यांची तातडीने सोय करता येणे शक्य नसल्यानेच थेट रक्कम देण्याचा निर्णय घेण्याची वेळ आदिवासी विभागावर आली आहे . विद्यार्थ्यांना हा निर्वाह भत्ता मिळावा यासाठी महाविद्यालयात 80 टक्के हजेरी सक्तीची असणार आहे . लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्याच्या बॅंकेच्या खात्याला लिंक केले जाणार असल्याने विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे . विद्यार्थ्यांना दर महिन्याला वेळेत हा निर्वाह भत्ता मिळावा आणि त्यात पारदर्शीपणा असावा, यासाठी विभागाकडून काळजी घेतली जात आहे .

शहरांच्या श्रेणीनुसार निर्वाह भत्ता
शहरांच्या श्रेणीनुसार हा निर्वाह भत्ता दिला जाणार आहे . मुंबई , पुणे , नागपूर , नाशिक या शहरांमध्ये 6 हजार रुपये , तर त्याखालोखाल असणाऱ्या शहरांमध्ये 5 हजार आणि तालुका पातळीवरील महाविद्यालयांना 4 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे . आदिवासी विभागामार्फत 110 कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली जाणार असून , चालू शैक्षणिक वर्षापासूनच ही मदत दिली जाणार असल्याचे समजते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पर्यटनवृद्धीसाठी रेल्वे डब्यांना काचेचे छत

नवी दिल्ली - स्वित्झर्लंडप्रमाणचेच आता लवकरच भारतातही काचेचे छत असलेल्या आणि विविध प्रकारची माहिती मिळण्याची सुविधा असलेल्या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे . जम्मू - काश्मीरमध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचा डबा असलेली रेल्वेगाडी धावणार असून , त्यासाठी रेल्वेची तयारी सुरू आहे .

काचेचे छत असलेला डबा असलेली रेल्वे सुरू करण्यामागे पर्यटनात वाढ करणे हा उद्देश असल्याचे "आयआरसीटीसी ' ने सांगितले आहे . या रेल्वेची रचना " आयआरसीटीसी ' आणि पेरांबूर येथील कोच फॅक्टरीने केली आहे . अशा प्रकारची रेल्वे पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष धावण्याबाबत रेल्वे आशावादी आहे . काचेचे छत असलेला पहिला डबा काश्मीर खोऱ्यातून जाणाऱ्या नेहमीच्या रेल्वेला जोडण्यात येणार आहे . असाच प्रयोग नंतर विशाखापट्टण येथेही केला जाणार आहे . अशा प्रकारचे सर्वच डबे असलेल्या रेल्वेबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही सूत्रांनी सांगितले .

सुटीच्या कालावधीत पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी स्वित्झर्लंडसह काही युरोपीय देशांमध्ये अशा प्रकारची सुविधा त्या भागातील रेल्वेद्वारे दिली जाते . यामुळे पर्यटनवृद्धीबरोबरच पर्यटकांनाही वेगळा अनुभव मिळतो, असे दिसून आले आहे . त्यामुळेच भारतातील पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना असे विशेष डबे जोडण्याबाबत रेल्वे प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यावर्षीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११,००० रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबरला सांगली येथे या पुरस्काराचे वितरण होईल. या समारंभात ९६वा व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह वि.ज. ताहनकर, कोषाध्यक्ष मेधा केळकर, संचालक बलदेव गवळी, विलास गुप्ते, प्राचार्य भास्कर ताम्हनकर उपस्थित होते.

वयाच्या ८० व्या वर्षीही जयंत सावरकर आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतात. एक कलाकार म्हणून सर्वसामान्यांपेक्षा तब्येतेची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर या वयातही ते अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग त्याच जोषात करतात. नाटकानंतर प्रत्येक कलाकाराबरोबर ते नाटकाबाबतची चर्चाही करतात. नुकतीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ६० वर्ष पूर्ण झाली.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹शौचालय असलेल्या घरीच लेकी देणार

स्वच्छ भारत अभियानाला आता गती मिळू लागली आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील महिला बचत गटातील महिलाही या अभियानांमध्ये सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शौचालय असलेल्या घरीच लेकी देणार अशी शपथ महाड येथील महिला बचत गटांनी घेतली. हागणदारी मुक्त गाव मोहिमेला आता ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.

गावे, वस्ती वाडय़ा स्वच्छ रहावा या दृष्टीकोनातून १९९९ साली निर्मलअभियान राबविण्यात आला. कालांतराने त्यात बदल होऊन दोन ऑक्टोबर २०१४ पासून हागणदारी मुक्त गाव ही मोहिम राबविण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा